Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वेळेत सेवा का देत नाही?

$
0
0



सातपूर एमआयडीसीतील प्रशिक्षण केंद्रात झालेल्या खुल्या चर्चासत्रात 'बीएसएनएल'च्या ग्राहकांनी सेवा अखंड मिळत नसल्याचे आरोप केला. तसेच खासगी मोबाइल कंपन्यांकडून अगदी ग्राहकांच्या घरापर्यंत सेवा दिली जात असतांना त्यातुलनेत 'बीएसएनएल' कुठे आहे, असा प्रश्न ग्राहकांनी यावेळी उपस्थित केला. विशेष म्हणजे इतर कंपन्याच्या मोबाइल अथवा इंटरनेटचे रिचार्ज शहराच्या सर्वच भागात तत्काळ उपलब्ध होते. परंतु, 'बीएसएनएल'चे रिचार्ज ठराविक ठिकाणी मिळते. त्यामुळे 'बीएसएनएल' ग्राहकाला रिचार्जसाठी भटकंती करावी लागते. केंद्र सरकारचे नियंत्रण असलेल्या 'बीएसएनएल'च्या ग्राहकांना वेळेत योग्य सेवा वेळेवर मिळत नसल्याने इतर कंपन्यांचे मोबाइल व इंटरनेट सेवा घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे वास्तव ग्राहकांनी मांडले.

'बीएसएनएल'चे महाप्रबंधक सुरेश बापू प्रजापती यांनी ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. सेवेत आमूलाग्र बदल केला जाणार आहे. तसेच इंटरनेट सेवेत ग्राहकांकडून बीएसएनएलच्या ब्राड ब्रॅण्डला प्राधान्य देत आहे. त्यात अधिक सुधारणा केली जाणार असल्याचे प्रजापती यांनी सांगितले. यावेळी व्यासपिठावर उप-महाप्रबंधक पी. डी. रेडे, ए. एस. बर्वे, नारायण पाटोळे, शाम मंडलिक, मनीष रावळ, दिलीप मोरे व विजय गोळेसर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्ट ऑफिसच्या दारात मद्यपींची गर्दी

$
0
0

गेल्या काही वर्षांत बदलत्या काळानुसार पोस्ट विभागाने आपल्यामध्ये झपाट्याने बदल करीत देशभरातील सर्वसामान्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, पोस्ट विभागाला अद्याप कार्पोरेट लुक प्राप्त करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्रिमूर्ती चौकातील पोस्ट विभागाचे ऑफिस विविध अस‌ुविधांच्या विळख्यात फसलेले आहे. ऑफिस परिसरात मद्यपींचा अड्डा बनला आहे. चायनिस व अंड्डा भुर्जीचे स्टॉल या ऑफिसच्या बाहेर आहेत. सायंकाळी तेथे ग्राहकांसह टवाळखोरांची गर्दी होते. पोस्ट ऑफिसच्या इमारतीला सुरक्षेसाठी दरवाजे नाहीत. त्यामुळे तेथे अंधार पडल्यानंतर मद्यपींचा मुक्त वावर असतो. पोस्ट ऑफिस इमारतीच्या टेरेससुद्धा मद्यपींच्या पाट्या रंगतात. मद्यप्राशनानंतर तेथेच रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या जातात. तसेच अनेकदा इमारतीच्या जिन्यात आणि कानाकोपऱ्यात मद्यपींकडून लघुशंका केली जाते. त्यामुळे पोस्टात येतांना नागरिकांना नाकाला रुमाल लावून प्रवेश करावा लागतो. पोस्ट कर्मचारी देखील हैराण झाले आहेत.

नगरसेवकही उदासीन पोस्ट ऑफिस इमारतीच्या अस्वच्छतेबाबत पोस्ट मास्तर एस. एस. पाठक यांनी सिडको प्राधिकरणाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करीत समस्या मांडल्या. मात्र, सिडको प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांनीही याकडे लक्ष दिले नाही. पोलिसांनी रात्री पोस्ट ऑफिस आवारात शिरकाव करणाऱ्या मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पोस्ट ऑफिस इमारत अस्वच्छतेबाबत सिडको प्राधिकरणाला कळविले. सिडको प्राधिकारण कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन समस्येच्या तीव्रतेबाबत माहिती दिली. मात्र, कुणीही लक्ष देत नाही. त्यामुळे पोस्ट कर्मचारी स्वतः पैसे देऊन स्वच्छता करून घेतात. मात्र, मद्यपींचा थांबविण्यासाठी कारवाई करणार कोण, असा माझा सवाल आहे. - एस. एस. पाठक, पोस्ट मास्तर, त्रिमूर्ती चौक डाकघर

त्रिमूर्ती चौक पोस्ट ऑफिस इमारतीत नेहमीच अस्वच्छता असते. टवाळखोर व मद्यपींचे इमारतीच्या गच्चीवर अड्डे रोज भरतात. याकडे पोलिस आणि सिडको प्रशासनाने लक्ष नाही. याचा सर्वाधिक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. - भास्करराव पाटील, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटीचा अंकुर फेस्टिव्हल शनिवारपासून

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर
भल्याभल्यांनाही न उकलणारे मनाचे कोडे सोडविण्यासाठी प्रयत्नशील मानसशास्त्र विभागाच्या वतीने अंकुर फेस्टीव्हल २०१६ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. एचपीटी आणि आरवायके कॉलेजमध्ये शनिवार व रविवारी (२७ व २८ फेब्रुवारी) या दिवशी हा उपक्रम पार पडणार आहे. यामध्ये मानसशास्त्राशी निगडीत असंख्य संकल्पना उलगडल्या जाणार आहेत. हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे.

शनिवारी या उपक्रमाचे उदघाटन होईल. अॅप्लिकेशन ऑफ सायकॉलॉजी या थीमवर हा उपक्रम होणार आहे. रोजच्या जगण्याशी मानसशास्त्राचा असलेला संबंध या माध्यमातून उलगडला जाणार आहे. याशिवाय, मानसशास्त्राच्या विविध शाखांची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत. यासाठी कॉलेजियन्सनी मानसशास्त्रीय वेगवेगळ्या विषयांवर मॉडेल्स आणि चार्टस तयार केले आहेत. शनिवारी सुप्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते हे उदघाटन होणार आहे. एचपीटीच्या कुसुमाग्रज हॉलमध्ये (२८ व २९ फेब्रु) रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत सर्वांसाठी खुले फेस्ट असणार आहे.

काय असेल फेस्टीव्हलमध्ये?

अंकुर फेस्टमध्ये प्रामुख्याने इमोशनल हेल्थ, प्रिस्केप्शन, स्ट्रेस मॅनेजमेंट, मूड-इमोशनल डिसॉर्डर, रक्तगट आणि व्यक्तिमत्व, वुमन सायकॉलॉजी, आत्महत्या, इमोशनल डेव्हलमपमेंट, इंटरनेट ऍडिक्शन, पॉझिटिव्ह इमोशनल, काउन्सलिंग, सायकोथेरेपी' या मानसशास्त्रीय विषयांवर अनॅलिसिस टेस्ट तसेच माहिती देणारे प्रोजेक्ट्स स्टॉल्सवर असणार आहेत. यासोबत या फेस्टमध्ये हँडरायटिंग, आयक्यू टेस्ट, इमोशनल, डेव्हलपमेंट, स्किरिच्युअर(अध्यात्मिक) गुणांक टेस्ट असणार आहेत. विशेष आकर्षण म्हणजे या फेस्टमध्ये 'अदृश्य शक्तींची गुपीते उलगडणारी पॅरा-सायकॉलॉजी आणि गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या साठी असलेले फॉरेसनिक सायकॉलॉजी' या दोन मानसशास्त्राच्या शाखांचेही स्टॉल्स असणार आहेत. यात सर्वप्रकारच्या मानसशास्त्रीय चाचण्या फेस्ट बघायला येणाऱ्या सर्वांना देता येणार असून त्याचे कौन्सिलींग आणि अनॅलिलिस मोफत करवून मिळणार आहे. अधिकाधिक विद्यार्थी अन् नागरीकांनी उपक्रमाचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.चुडामण बडगुजर, प्रा.राजश्री कापुरे, प्रा. तन्मय जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे प्रकल्पाची अॅलर्जी

$
0
0

सुमारे २६६ किलोमीटरच्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी सन २००१-०२ साली पहिला सर्वे करण्यात आला. सन २००९-१० साली पुन्हा सर्वे झाला. सन २०१२ साली नियोजन विभागाकडे सर्वे रिपोर्ट गेला तेव्हा १८९३ कोटी खर्च प्रकल्पासाठी अपेक्षित होता. प्रकल्पाच्या सर्वेसाठी एक कोटी तीन लाखाची तरतूद २०१५-१६ आर्थिक वर्षात करण्यात आली. त्या सर्वेनुसार प्रकल्पासाठी २४२४ कोटी खर्च अपेक्षित आहे.

सामनगाव येथील रेल्वे ट्रॅक्शन कारखान्याचे विस्तारीकरण करून आऊटसोर्सिंगची कामे मिळावित. त्यामुळे कमी किमतीत काम व रोजगारनिर्मिती होईल. अजमेर, तिरुपतीला जाणाऱ्या गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवावी. नाशिक-सूरत प्रकल्प व्हावा, या मागण्या प्रलंबित आहेत.

रेल्वे मंत्र्यांना साकडे आगामी २०१६-१७ च्या रेल्वे अंदाजपत्रकात प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबई-पुणे-नाशिक सुवर्ण त्रिकोणामुळे सार्वजनिक वाहतूक, व्यापार आणि कृषीक्षेत्राला फायदा होणार आहे. सध्या नाशिक-पुणे या महत्त्वाच्या शहरांदरम्यान रस्तामार्गेच वाहतूक होत आहे. त्याला समांतर नाशिक-पुणे रेल्वेमार्ग होणे आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी सन १९९५-९६ साली अभियंता अहवाल मंजूर झाला होता. सन २००९ च्या रेल्वे अर्थसंकल्पातही ७९.५० लाखाची तरतूद करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पातही एक कोटी तीन लाखाची तरतूद सर्वेसाठी झाली. प्रकल्पासाठी रेल्वे अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला ‘राजधानी’ची भेट!

$
0
0

मध्य रेल्वेच्या मार्गावर इगतपुरी, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ या ठिकाणाहून दिल्लीला जाण्यासाठी जलद एसी राजधानी एक्स्प्रेस उपलब्ध नाही. तसेच दिल्लीला जलद पोहचण्यासाठी विमान सेवा अथवा वेस्टर्न रेल्वे मार्गाचा अवलंब करावा लागतो. यात प्रवाशांचा अनाठायी वेळ व पैसा खर्च होतो. ही गाडी मध्य रेल्वेच्या मार्गावरून सुरू झाल्यास उद्योग, व्यापाराला फायदा होणार असून आसपासची गावे दिल्लीशी कनेक्ट होणार आहेत. दळणवळण सुविधा जलद झाल्यास नाशिकला येणाऱ्या उद्योगांमध्ये वाढ होईल. तसेच सध्या याच मार्गावरून सुरू करण्यात आलेल्या हरिद्वार एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राजधानी एक्स्प्रेसलाही प्रतिसाद मिळेल अशी रेल्वे प्रशासनाला आशा आहे. नाशिकहून दिल्लीला जाण्यासाठी सध्या फक्त तीन एक्स्प्रेस आहेत. आता राजधानी एक्स्प्रेस सुरू झाल्यास यात भर पडणार असून निश्चित चागला प्रतिसाद मिळेल, अशी प्रशासनाला खात्री आहे.

भुसावळ-इगतपुरी मार्गावर लोकल सेवा सुरू करावी. तसेच नाशिकहून तिरुपती व अजमेरसाठी खास गाडी सोडावी अशा प्रवाशांच्या जुन्या मागण्या आहेत. नाशिककर्षण मशिन कारखाना येथे रेल्वेच्या मालकीची २५० एकर जागा आहे या जागेचा उपयोग करून येथे रेल्वे मेंन्टेनन्स कारखाना उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यातील मागण्यांबाबत आतातरी विचार होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

रेल्वे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्र्यांकडून त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला. यातील राजधानी एक्स्प्रेसची मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

सध्या धावणाऱ्या गाड्या मंगला एक्स्प्रेस (रोज रात्री ८.३०) पंजाब मेल (रोज रात्री ११ वाजता) अमृतसर एक्स्प्रेस (रोज रात्री १ वाजता) हरिद्वार एक्स्प्रेस (आठवड्यातून दोनदा, रात्री ८ वाजता) हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा, सायंकाळी ५ वाजता)

वेस्टर्न मार्गे जाणाऱ्या गाड्या गरीब रथ सुपर फास्ट संपर्क क्रांती युवा एक्स्प्रेस राजधानी एक्स्प्रेस ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस दुरांतो एक्स्प्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोईंगचे आता व्हीडिओ शूटिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टोईंग व्हॅनवरील कर्मचारी चिरीमिरी घेऊन वाहने सोडत असल्याच्या तक्रारींवर वाहतूक पोलिसांनी व्हीडिओ शूटिंगचा अजब उतारा शोधला आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना टोईंगच्या कारवाईतून सूट देण्यात येणार असून, त्याबाबत कुणी आक्षेप घेऊ नये यासाठी व्हीडिओ शूटिंगद्वारे ही कारवाई चित्रीत करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. आता पोलिसांचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो याकडे लक्ष लागले आहे.

रस्त्यात कोठेही वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते. बेशिस्त वाहनधारक मोकळी जागा दिसेल तेथे वाहने लावून निघून जातात. असे प्रकार वाहतुकीची कोंडी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटील बनल्याने पोलिसांनी टोईंग व्हॅनद्वारे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांकडून वाहनांची हेळसांड होऊ लागली. कर्मचारी वाहने उचलतेवेळी व्यवस्थित हाताळत नसल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी पोलिस अधिकाऱ्यांना प्राप्त होऊ लागल्या. यातून व्हॅनवरील कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असून, पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच टोईंगचे कर्मचारी काही वाहनधारकांवर कारवाई न करता चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देत असल्याचे आरोप नागरिकांकडून होऊ लागले आहेत. सर्वांना समान न्याय आवश्यक असताना एकास एक तर दुसऱ्यास दुसरा न्याय का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाल आहे. त्यातच टोईंग व्हॅनवरील कर्मचारी ५० रुपयांपर्यंत चिरीमिरी घेऊन काही नागरिकांची परस्पर वाहने सोडून देत असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. अशा सर्व तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी आता अशा काही आक्षेपार्ह ठरू शकणाऱ्या कारवायांचे व्हीडिओ शू‌टिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

इनकॅमेरा प्रतिक्रिया नोंदविणार

सर्वांवर सर्रास कारवाई न करता परिस्थितीनुरूप ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि रुग्णांना घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना या कारवाईतून वगळण्यात येणार आहे. मात्र अशी सूट दिल्यास पोलिसांच्या कारवाईबाबत अधिक शंका उपस्थित होऊ शकतात. म्हणूनच अशा कारवाया इन कॅमेरा करतानाच संबं‌धित व्यक्ती आणि आसपासच्या किमान तीन ते चार नागरिकांची साक्षीदार म्हणून इनकॅमेरा प्रतिक्रिया नोंदविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाभानगर उद्यान दुरवस्थेच्या विळख्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक
भाभानगर प्रभाग क्रमांक ३९ मधील नवशक्ती चौक परिसरातील उद्यान दुरवस्थेच्या विळख्यात सापडले आहे. लहान मुलांपेक्षा अधिक या उद्यानात जुगारी आणि मद्यपींचाच वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी रहिवाशी करीत आहेत.
या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले एकही खेळणे सुस्थितीत नसल्याचे आढळले आहे. कुठे साखळ्या तुटलेले झोपाळे तर कुठे पत्रा तुटलेल्या घसगुंड्या असे चित्र इथे पाहायला मिळते. याचसोबत अनेक खेळणी जागेवरुन उखडून बाजूला पडली आहेत. सुकलेल्या गवताचे ढीग, कचरा आणि अस्वच्छता या उद्यानामध्ये पसरली आहे. अनेक खेळणी चोरीला गेल्याची माहिती या भागातील जुन्या रहिवाशांनी दिली. या गैरसोयींमुळे लहान मुले उद्यानात फिरकतही नसल्याची माहिती रहिवाशांनी दिली. परिणामी इथे मद्यपी तसेच जुगारींचा वावर वाढला आहे.
उद्दानातील दिवे बंद असल्याने रात्री इथे अंधाराचेच साम्राज्य असते. उद्यानाची संरक्षक भिंतही तुटली आहे.याचा फायदा या मद्यपींमार्फत उठविला जात आहे. त्यामुळे सय्यद सैफअली यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिले आहे. हे उद्यान दोन वर्षांपासून बंद अवस्थेत पडून आहे. येथील लहान मुलांच्या खेळणी व इतर साहित्य याची आयुक्तांनी पाहणी करून तत्काळ दुरुस्तीचे आदेश देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंग बोर्ड झाले दिसेनासे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प वाहतुकीला शिस्त लागावी या हेतूने देवळालीमध्ये प्रशासनाच्यावतीने जागोजागी लावण्यात आलेल्या पार्किंग फलकांची दुरवस्था झाली आहे. वाहतुक कोंडीसोबतच नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करण्याचा प्रकारही यामुळे वाढला आहे.
कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या वतीने शहरातील हौसन रोड, मेन स्ट्रीट, मिठाई स्ट्रीट, वडनेर रोड या मुख्य रस्त्यांसह शहराच्या अंतर्गत भागात विविध ठिकाणी पार्किंग बोर्ड लावण्यात आले आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून त्यावर कुठलेही रंगकाम करण्यात न आल्याने त्यावरील सूचना वाचणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी तर हे फलकच निघाल्याचे निदर्शनास आले आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निगार हुसेन व अमोल जगताप यांनी शहरात विविध भागात पार्किंग झोन जाहीर करीत दिवसानुसार पार्किंग फलक लावले होते. बोर्ड प्रशासनाने हे फलक नव्याने बसविल्यास त्यावरील सूचना वाचता येईल आणि पार्किंगची समस्या काही प्रमाणात सुटेल असे नागरिकांचे मत आहे.

वाहतुकीला शिस्त हवी शहरातील अंतर्गत भागात जुन्या बस स्थानक परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतुकीच्या बेशिस्तीवर आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु बोर्ड प्रशासन व वाहतूक विभाग याकडे काणाडोळा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लेव्हीट मार्केट व जुन्या बस स्थानक परिसरात खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्याच्या मधोमध वाहने पार्किंग करुन खरेदीसाठी जातात. त्यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर रविवारी भरणाऱ्या बाजाराच्या दिवशीही अशाच प्रकारच्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीसाठ्याची धडपड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी पंचवटीतील विविध भागात पिण्याचे पाणी वेळेवर आणि मुबलक मिळत नसल्याने पाणी साठविण्यासाठी या भागातील रहिवाशांची धडपड सुरू आहे. गुरुवारी पिण्याचे पाणीच न मिळाल्यामुळे अनेक महिलांना बोरींगच्या पाण्याचा साठा करावा लागला. तसेच जालवाहिनीच्या समस्येमुळे पेठे शाळेतील विद्यार्थ्यांना टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागला. पाणीकपातीमुळे गुरुवारी पंचवटी भागात पाणी न मिळाल्याने शक्य तिथून पाणी मिळविण्याकडे रहिवाशांचा प्रयत्न होता. बोरींग, टँकर यांच्या सहाय्याने या भागात रहिवाशांनी पाण्याची गरज भागवावी लागली. नाशिकच्या रविवार कारंजा ते महात्मा गांधी रोड पर्यंतच्या रस्त्याचे काम चालू असल्याने आठ दिवसांपासून पेठे हायस्कूलमधील ४ हजार विद्यार्थ्यांना पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन तुटळी आहे. शाळेच्या नळाला पाणी येत नसल्याने मुलांच्यासाठी भाड्याने टँकेर बोलावून पाणी विकत घेण्याची वेळ शाळेवर आली. एकीकडे पाणीटंचाई असताना के. के. वाघ कॉलेज परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहतीजवळच गेल्या अनेक महिन्यापासून पाईप लाईन तुटली आहे. त्यामुळे इथून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यालय स्थलांतर वाद कळवणमध्ये चिघळणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण
कळवण शहरातील सर्व शासकीय कार्यालये शहरापासून ५ किलोमीटर अंतरावरील कोल्हापूर फाटा येथील नव्या प्रशासकीय इमारतीमधे येत्या १५ मार्च २०१६ पर्यंत तातडीने स्थलांतरीत करण्याचा आदेश काढण्यात आल्याने व्यापारीवर्गात संतापाची लाट उसळली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार प्रांताधिकारी गंगाथरण डी यांनी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय प्रमुखांना आपापले कार्यालय येत्या १५ मार्चपर्यंत स्थलांतरीत करण्याबाबत पत्र पाठविले आहे. कळवण व्यापारी महासंघाचा या स्थलांतर प्रक्रियेला कडाडून विरोध आहे. त्याबाबत रात्री कळवण परिसरातील व्यापारी बांधवांची बैठक होऊन कळवण बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला.

राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाच्या या कठोर निर्णयाचे सर्व व्यापारी बळी ठरले आहेत. केवळ प्रशासकीय कार्यालय इमारतीसाठी मंजूर असलेल्या कोट्यवधीचा निधी परत जाऊ देत कामा नये, या तत्कालीन राज्यकर्त्यांच्या भूलथापांना विरोध करूनही बळी ठरलेल्या व्यापारी बांधवांनी तत्कालीन आमदार ए. टी. पवारांना विधानसभेत पराभूत केले. व्यापाऱ्यांच्या या जीवन मरणाशी जुळलेल्या विषयाला आयत्या वेळी हाताळत जे. पी. गावीत आमदार झाले.

सत्ताबदल घडवण्याच्या ताकदीचा असलेला हा विषय आजपर्यंत चर्चेत आहे. मध्यंतरी या प्रशासकीय इमारतीत अभियांत्रिकी विद्यालय स्थापन करण्याचा विषय पुढे आला. कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाहीत ही भूमिका राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी घेतली. जिल्हा परिषद सदस्या जयश्री पवार यांनी या ठिकाणी अभियांत्रिकी विद्यालय येणार असल्याचा फतवा काढला. त्यासाठी राज्यापालांनीच हिरवा कंदील दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढाऱ्यांच्या या कलगीतुऱ्यात सामान्य जनता, व्यापारी होरपळत आहे. दुष्काळ, जागतिक मंदी यामुळे आधीच मेटाकुटीस आलेला व्यापारीवर्ग या स्थलांतर निर्णयाने हतबल झाला आहे. १६ लाख रुपये भाड्यापोटी शासनाचे दिले जात असल्याचे निमित्त पुढे करीत प्रांत तथा प्रकल्पाधिकारी गंगाथरण डी यांनी १५ दिवसांपूर्वीच आदिवासी प्रकल्प कार्यालय स्थलांतरित केले आहे.

कळवण शहरापासून ५ किमी अंतरावर सर्व कार्यालये नेण्याचा निर्णय लागू झाला तेव्हापासून व्यापारी बांधवांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. आजही आमचा विरोध कायम असून, या प्रकरणी स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांना भेटणार आहोत. गरज पडल्यास व्यापारी बांधव रस्त्यावर येऊन आंदोलन करतील. आगामी प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल.

- मोहनलाल संचेती, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, कळवण

त्या इमारतीत कळवण शहरात भाडेतत्वावरील जागेत असलेले कार्यालय स्थलांतरास करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, सर्वच कार्यालये सर्वसामान्य जनतेला गैरसोयीची ठरेल अशा ५ किमी अंतरावर नेण्यास आमचा विरोध आहे. कळवण बंद आंदोलनाला व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेली महाराष्ट्र चेंबर्स संघटना व्यापारी बांधवांच्या पाठीशी आहे.

- विलास शिरोरे, उपाध्यक्ष- महाराष्ट्र चेंबर्स अॅण्ड कॉमर्स संघटना

व्यापारी बांधवांचा विरोध लक्षात घेता, आपण सुरवातीपासूनच प्रशासकीय इमारतीला विरोध होता व आजही आहे. त्या इमारतीत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे. तसेच वनविभाग अथवा सद्यस्थितीत असलेल्या पंचायत समिती, प्रांत कार्यालय परिसरात प्रशासकीय इमारत उभारली जावी. आजही व्यापारीवर्गाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.

- जे. पी. गावित,

आमदार, कळवण

मोठ्या अंतरामुळे नागरिकांची गैरसोय होईल. तिथे अतिक्रमण वाढेल व कळवणमधील व्यापारी, युवक बेरोजगार होतील. भ्रष्टाचाराला तेथे खतपाणी

मिळेल. सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होईल. कर्मचारी व अधिकारी वर्गाची मुजोरी वाढेल.

- जितेंद्र वाघ, तालुकाप्रमुख शिवसेना, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईचा द्राक्षांना फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
यंदाच्या दुष्काळाची भयाण दाहकता अन् त्याचे चटके सोसताना येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जेथे पिण्याच्या पाण्याचीच मोठी वानवा तेथे शेतीच्या पाण्याची व्यथा विचारायलाच नको. पाण्याअभावी यंदा काळ्या आईच्या कुशीतील विविध पिकांना मोठा झटका अन् फटका बसताना त्याला येवला तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा अपवाद ठरलेले नाहीत. अशाच प्रकारे पाणीटंचाईमुळे कसे सोसावे हे दुखः, कशी पोसावी द्राक्ष बाग अशी महाचिंता लागलेल्या येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याने हताश होत नाईलाजाने आजवर पोटच्या पोरागत जीवापाड जपलेल्या आपल्या शेतातील द्राक्ष बागेवर चक्क कुऱ्हाड चालवली.

यंदाच्या दुष्काळाच्या झळा सोसतांना नको नकोसं झालेल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर कसं घ्यावं उत्पन्न, कशासाठी करावा नाहक खर्च याचा प्रश्न पडला आहे. दुष्काळातील तूव्र पाणीटंचाईचा मोठा फटका शेतातील विविध पिकांना बसतानाच, आता द्राक्ष बागाईतदारांनाही या दुष्काळाच्या दाहकतेची झळ बसत आहे. वर्षानुवर्षे पोटच्या पोरासारखी माया लावून जपलेल्या द्राक्षवेलींवर पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. येवला शहरानजीकच्या येवला-नगरसूल रोडवरील रेल्वे गेटजवळ असलेले कैलास देशमुख हे तालुक्यातील सायगाव येथील शेतकरी त्यापैकी एक. बाग जागविण्यासाठी पाणीच नसल्यानं हताश झालेल्या देशमुख यांनी आता चक्क आपली द्राक्षबाग तोडली आहे. आशेपोटी त्यांनी खिशाला हात घालत प्रथम दररोज २५ ते ३० हजार लिटर पाणी विकत आणताना बाग जगवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढे प्रयत्न पुरेस नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी द्राक्षबाग तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळी येवला तालुक्यात तसं पाहिलं तर मोठ्या पाटपाण्याअभावी द्राक्षबागा अन् द्राक्ष उत्पादन घेणारे शेतकरी अगदी जेमतेमच. तालुक्यात द्राक्ष बागांचे क्षेत्र ५०२ हेक्टरच्या आसपास असून, नजीकच्या निफाड तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या येवला तालुक्यातील देशमाने, मुखेड, मानोरी या गावांसह पाटोदा परिसर व शहराजवळील वडगाव बल्हे शिवारात द्राक्षबागा उभ्या राहिलेल्या आहेत. कधी गारपिटीसारखं अस्मानी संकट, तर कधी बेमोसमी पाऊस याचा फटका या द्राक्षबागांना आजवर बसलेला. यंदा या अस्मानी संकटातून तालुक्यातील द्राक्षबागा वाचलेल्या असल्या तरी यंदाच्या थंडीत काही ठिकाणच्या द्राक्ष बागांना झटका बसताना या द्राक्षबागाची प्रत खालवलेली. परिणामी यंदा स्थानिक बाजारात निम्म्याहून कमी किंमतीत त्यांना माल विकावा लागणार आहे. तर आताच्या भीषण दुष्काळाचा सामना करताना कमी पाण्यात अन् विकतच्या पाण्याने द्राक्षबागा कशा जगवाव्यात याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोईंगचे आता व्हीडिओ शूटिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टोईंग व्हॅनवरील कर्मचारी चिरीमिरी घेऊन वाहने सोडत असल्याच्या तक्रारींवर वाहतूक पोलिसांनी व्हीडिओ शूटिंगचा अजब उतारा शोधला आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांना टोईंगच्या कारवाईतून सूट देण्यात येणार असून, त्याबाबत कुणी आक्षेप घेऊ नये यासाठी व्हीडिओ शूटिंगद्वारे ही कारवाई चित्रीत करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. आता पोलिसांचा हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो याकडे लक्ष लागले आहे.

रस्त्यात कोठेही वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते. बेशिस्त वाहनधारक मोकळी जागा दिसेल तेथे वाहने लावून निघून जातात. असे प्रकार वाहतुकीची कोंडी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटील बनल्याने पोलिसांनी टोईंग व्हॅनद्वारे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांकडून वाहनांची हेळसांड होऊ लागली. कर्मचारी वाहने उचलतेवेळी व्यवस्थित हाताळत नसल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी पोलिस अधिकाऱ्यांना प्राप्त होऊ लागल्या. यातून व्हॅनवरील कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असून, पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच टोईंगचे कर्मचारी काही वाहनधारकांवर कारवाई न करता चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून देत असल्याचे आरोप नागरिकांकडून होऊ लागले आहेत. सर्वांना समान न्याय आवश्यक असताना एकास एक तर दुसऱ्यास दुसरा न्याय का असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाल आहे. त्यातच टोईंग व्हॅनवरील कर्मचारी ५० रुपयांपर्यंत चिरीमिरी घेऊन काही नागरिकांची परस्पर वाहने सोडून देत असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. अशा सर्व तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी आता अशा काही आक्षेपार्ह ठरू शकणाऱ्या कारवायांचे व्हीडिओ शू‌टिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

इनकॅमेरा प्रतिक्रिया नोंदविणार

सर्वांवर सर्रास कारवाई न करता परिस्थितीनुरूप ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि रुग्णांना घेऊन येणाऱ्या वाहनधारकांना या कारवाईतून वगळण्यात येणार आहे. मात्र अशी सूट दिल्यास पोलिसांच्या कारवाईबाबत अधिक शंका उपस्थित होऊ शकतात. म्हणूनच अशा कारवाया इन कॅमेरा करतानाच संबं‌धित व्यक्ती आणि आसपासच्या किमान तीन ते चार नागरिकांची साक्षीदार म्हणून इनकॅमेरा प्रतिक्रिया नोंदविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगवाना खूनप्रकरणी तिघे ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

आर्टिलरी रोडवरील जैन भवनसमोर पूर्ववैमनस्यातून प्रापर्टी डिलर रणजीत मंगवाना यांची पत्नीसमोर डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तिघा संशयितांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनने बुधवारी अटक केली. रोहित माले, विनोद साळवे आणि संजय बेद अशी त्यांची नावे आहेत. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने २९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

रणजीत मंगवाना यांची २१ फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून संशयित चकवा देत होते. युनिट तीनचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांना तिघे संशयित इगतपुरी रेल्वेस्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून समजली. त्यांनी सहाय्यक निरीक्षक देवरे, हवालदार अन्सार सय्यद, परमेश्व दराडे, दीपक जठार, जाकीर शेख, संजय मुळक, विलास गांगुर्डे, रवींद्र बागूल आदींच्या मदतीने तातडीने कारवाई करून मंगळवारी मध्यरात्री त्यांना शिताफीने अटक केली. चौथा फरार हल्लेखोर मयूर बेदलाही लवकरच ताब्यात येईल, असे सानप यांनी सांगितले. तिघा संशयितांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करायचे आहे, ते कोठून आले याचा शोध घ्यायचा आहे, फरार मयूर बेदचाही तपास करायचा असल्याने हल्लेखोरांना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली. पोलिस निरीक्षक अशोक भगत, भाऊसाहेब कोटकर व सहकाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारची काच फोडून लांबवली रोकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्याने सुमारे ९० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. मुंबई नाका परिसरात ही घटना घडली. गत आठवड्यातही या परिसरात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. डॉ. राजश्री सुनील पाटील (रा. गीतांजली सोसायटी, गंगापूररोड) यांनी त्यांची कार शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हॉटेल एसएसके समोरील लुथरा शोरूम येथे पार्क केली होती. चोरट्यांनी कारची काच फोडून ९० हजारांची रोकड चोरून नेली.

टायर चोरीस

महागड्या मोटरसायकलचे दोन्ही टायर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली. म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर श्याम देशमुख (रा. शिवअमृत अपार्टमेंट, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या यामाहा एफझेड मोटरसायकलचे दोन्ही टायर मॅकव्हीलसह चोरट्याने चोरून नेले. याखेरीज हेडलाइटही चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या भुरट्या चो-यांना आळा घालण्याची मागणी होत आहे.

विद्यार्थिनीचे अपहरण

शालेय विद्यार्थिनीचे एका संशयिताने अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये दिली. मायकल जगधने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाडेगाव, सामनगाव परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीस संशयित जगधने याने सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास मोटरसायकलवरून पळवून नेले.

दोघांवर गुन्हा

सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोघांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी एक संशयित अल्पवयीन आहे. पंचवटीतील क्रांतीनगर परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास संशयित अमोल अनिल सोनवणे (वय २४) व त्याचा अल्पवयीन साथीदार लोखंडी चाकू घेऊन परिसरात आरडाओरड करीत होते. त्यामुळे पंचवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

दोघांची आत्महत्या

शहरात आडगाव आणि निलगिरी बाग परिसरात आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.

आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका १३ वर्षीय मुलीने औरंगाबाद रोडवरील नीलगिरी बागेतील बिल्डिंग क्रमांक आठमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योती मोतीराम आंबेकर असे तिचे नाव आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आडगाव पोलिसांना दिली.

दुसरी घटना हनुमाननगर परिसरात घडली. सोमनाथ रतन जगताप (वय ३२) यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना आडगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील ३० अनधिकृत धार्मिक स्थळे हटविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिक्रमित आणि अनधिकृत धार्मिक स्थळे हटवावीत या कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत जिल्ह्यातील ४ हजार ६२४ पैकी केवळ ३० स्थळे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, काही स्थळे हटवली आहेत. चार स्थळे स्थलांतरीत करण्यात येणार असून, महापालिका हद्द वगळता तब्बल ४ हजार ५९० स्थळे कायम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत कालबध्द कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. कारवाई करणे सोपे व्हावे यासाठी सप्टेंबर २००९ पूर्वीची आणि नंतरची धार्मिक स्थळे असे दोन भागात विभाजन करून प्राप्त निर्देशांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक महापालिका वगळता उर्वरित जिल्ह्यात ४ हजार ६२४ स्थळे आढळून आली आहेत. त्यापैकी ३० स्थळांचे निष्कासन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार स्थळे स्थलांतरीत करण्यात आली असून, उर्वरित ४ हजार ५९० स्थळे १ मे १९६० पूर्वीची असल्याने ती कायम करण्यात आली आहेत. त्यामुळे नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात धार्मिक स्थळांची संख्या अधिक असली तरीही त्यातील बहुतांश स्थळे ही अडचणीची नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सन २००९ नंतरची सर्वच धार्मिक स्थळे काढूनच टाकायची होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ती स्थळे हटविण्यात आली आहेत.

मालेगावात सर्वाधिक ६७७ धार्मिक स्थळे कायम

जिल्ह्यात सर्वाधिक ६७७ धार्मिक स्थळे मालेगावमध्ये कायम केली जाणार आहेत. त्याखालोखाल निफाडमध्ये ६४८, दिंडोरीत ५८४, येवल्यात ५१५, सुरगाण्यात ४०३, कळवणमध्ये ३५८, नाशिक तालुक्यात ३११, पेठमध्ये २१३, इगतपुरीत १८१, नांदगावमध्ये १६३, देवळ्यात १५१, त्र्यंबकेश्वरमध्ये १४७, बागलाणमध्ये १२४, चांदवड ९५ तर सिन्नरमध्ये सर्वात कमी २० धार्मिक स्थळे कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपहृत बालक पालकांच्या स्वाधीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी फाटा परिसरातून अपहरण केलेल्या नऊ वर्षांच्या बालकाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलगा सुखरूप घरी परतल्याने त्याच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. महिनाभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना असून, त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास दादेश राजू पेटारे हा नऊ वर्षांचा मुलगा पाथर्डी फाटा परिसरातील घराजवळ सायकल खेळत होता. त्याच्यासमवेत त्याचा लहान भाऊ देखील होता. याचवेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. तुला यापेक्षा चांगली सायकल आणि ६० रुपये देतो असे सांगून दादेश याला सोबत घेऊन गेला. घडला प्रकार त्याच्या लहान भावाने घरी सांगितला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांची पायाखालची वाळू सरकली. त्यांनी दादेशचा शोध सुरू केला. मात्र तो मिळेना.

अखेर दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली.

पोलिसांनी दादेश याचे फोटो सर्व पोलिस स्टेशन्सला पाठविले. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. दादेश याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता सायंकाळी सहाच्या सुमारास तो द्वारका परिसरातील एका हॉटेलजवळ आढळून आला. त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, या मुलास घेऊन जाणारी व्यक्ती सायंकाळी देखील या परिसरात पाहिल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांनी दिली. मात्र, संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

या महिनाभरात घडलेली अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १२ फेब्रुवारीला द्वारका परिसरातून निरस जोग बोहरा (वय ६) या बालकाचे अपहरण करण्यात आले. स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या संदीप प्रकाश सोनवणे याच्यावर संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहृत निरस दुसऱ्या दिवशी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर मिळून आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबडमध्ये ११ लाखांचा पानमसाला पकडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

अंबड परिसरातून एका वाहनावर कारवाई करीत सुमारे ११ लाख रुपये किमतीचा पानमसाला पोलिसांनी ताब्यात घेतला. अंबड लिंकरोड परिसरात गस्तीदरम्यान हवालदार सचिन शिंपले यांनी वाहनात बेकायदा पानमसाल्याची साठवणूक केल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे आणि पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

परिसरात एक आयशर ट्रक उभा असल्याची माहिती शिंपले यांना सहाय्यक निरीक्षक डी. डी. इंगोले यांनी दिली. आयशरची तपासणी केली असता त्यामध्ये सागर पानमसाल्याच्या १९ गोण्या मिळून आल्या. पोलिसांनी हे वाहन आणि पानमसाला जप्त केला. गेल्याच आठवड्यात दोन लाखांचा पानमसाला जप्त केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दोन दिवस पाणीकपात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातील पाण्याची पातळी चिंताजनक आहे. प्रशासनाने विभागानुसार एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याच निर्णय घेतला. मात्र, त्याचा फेरआढावा घेऊन आणखी कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असे सूतोवाच महापौर अशोक मुर्तडक यांनी केले. गुरूवारी सांयकाळी महापालिका पदाधिकाऱ्यांसमवेत गंगापूर धरणाची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

राज्य सरकारच्या धोरणांमुळे गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला मिळाले. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विर्सग झाला आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात १ हजार ९९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. यातील डेड स्टॉकचा विचार करता पिण्याच्या पाण्याची पातळी खूपच खाली गेल्याचे दिसते. फेब्रुवारी संपत आला असून, मार्च महिन्यापासून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढेल. ३१ जुलैपर्यंत पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा लागेल, असे मुर्तडक यांनी स्पष्ट केले. सध्या विभागातील ​जलशुध्दिकरण केंद्रनिहाय एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा काय परिणाम झाला हे लवकरच स्पष्ट होईल. त्यानुसार प्रशासन पाणी पुरवठ्याचे फेरनियोजन करणार आहे. आणखी पाणीकपात होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. महापौरांच्या पाहणी दौऱ्यावेळी स्थायी सभापती शिवाजी चुंभळे, सभागृह नेते सलीम शेख, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, उद्धव निमसे, यशवंत निकुळे आदी उपस्थित होते.

राजकारणाला फोडणी

गंगापूर धरणातील पाणीसाठा आणि होणारी पाणीकपात यावरून राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महापालिकेतील सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढाई सुरू आहे. पाण्यासारख्या संवेदनशील मुद्द्यावरून कुरघोड्या करण्याचा प्रयत्न सुरू असून याचा फटका सर्वसामन्य करदात्यांना सहन करावा लागतो आहे. गुरुवारी सकाळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विल्होळी येथील कचरा डेपोची पाहणी केली. यानंतर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांयकाळी गंगापूर धरण गाठल्याने पावसाळ्यापर्यंत राजकारण सुरूच राहणार, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

अन् कावळ्यांची शाळा भरली

महापौरांचे श्वान प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. भूतदयेवर विश्वास असलेले मुर्तडक मुक्या प्राण्यांच्या मदतीला सदैव तत्पर असतात. गंगापूर धरणावर पाहणी दौऱ्यासाठी निघालेल्या मुर्तडक यांनी कावळ्यांसाठी फरसाण, कुरमुरे असे खाद्यपदार्थ सोबत घेतले. धरणाच्या भिंतीवर हे पदार्थ ठेवण्याचा उशीर की कावकाव करीत चारी दिशांनी कावळे जमा झाले. सुमारे १५ ते २० मिनिटे कावळ्यांनी खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारत पुन्हा घरट्याची वाट पकडली.

धरण - पाणीस्थिती

गंगापूर- १९९० दशलक्ष घनफूट

काश्यपी- ५९० दशलक्ष घनफूट

गौतमी- ६१ दशलक्ष घनफूट

एकूण-२ हजार ६४१

शहरासाठी आरक्षित पाणी- १ हजार ४६४ दशलक्ष घनफूट

आजवरची उचल- १ हजार ५३६ दशलक्ष घनफूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचे पाणी पळविणाऱ्यांना जाब विचारा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर
'पाणी बचतीचे आवाहन करण्यापूर्वी नाशिकचे पाणी पळविणासाठी जबाबदार असणाऱ्यांंना या कृतीचा जाब विचारा,' असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला. महापालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या पाणी बचत जनजागृती मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना पिण्याचे पाणी वाहणाऱ्या रस्त्यावरूनच चालत आणि नागरिकांच्या या प्रश्नांचे समाधान करत प्रबोधन करावे लागले.
उन्हाळ्यापूर्वीच सुरू झालेली पाणीटंचाई आणि भविष्यातील पाण्याची गरज पहाता पाणी कपातीसोबतच पाणी बचतीसाठी महापालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या प्रबोधनादरम्यान नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी महिलांमध्ये कोण जास्त पाणी वाया घालवते, अशी जणू स्पर्धाच लागत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा अन्यथा दंडात्मक कारवाईला किंवा नळ कनेक्शन बंद होण्याला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या अधिकाऱ्यांनी दिला.
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शहराच्या सहाही प्रभागात पाणी बचत जनजागृतीची मोहीम घेतली आहे. सातपूरला पहाटे सात वाजेपासून जुन्या कॉलनीतून अधिकाऱ्यांनी या प्रबोधनाला सुरुवात केली. अनेक रहिवाशांना मुबलक पाणी मिळूनही ते पाणी वाया घालवत असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आले. पाणी बचतीबाबतच्या अनेक सूचना यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्या.

मोटार होईल जप्त

सातपूर कॉलनीत अनेक ठिकाणी पाण्याच्या कनेक्शनला मोटार बसविल्याचे अधिकाऱ्यांना निर्दशनास आले. अशा ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कारवाईनंतरही पाण्यासाठी पुन्हा मोटारचा वापर केल्यास मोटार जप्ती मोहीम राबविणार असल्याचे कर उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सांगितले.


पाणी वरून वाहून येते!

पाणी बचतीचे प्रबोधन करत असताना विभागीय अधिकारी चेतना केरुरे महिलांना पाणी वाया न घालविण्याच्या सूचना देत होत्या. परंतु बहुतांश पाणी वाया घालविणाऱ्या महिलांनी, 'मॅडम पाणी आमचे नाही, वरून वाहून येते', असेच उत्तर दिले. घरापुढे पाण्याने सडा मारलेला दिसल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे व वेळप्रसंगी पाण्याची नासाडी करणाऱ्यांचे कनेक्शन बंद करणार असल्याची माहिती केरुरे यांनी यावेळी महिलांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार जातपात विरहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प
'देशहितासाठी सावरकरांनी मांडलेले विचार जातपात विरहित असून, त्यामुळेच आजचा विचारवंत माणूस व समाज त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी धडपडत आहे. स्वा. सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस व डॉ. आंबेडकर एकत्र असते तर भारत पूर्वीच महासत्ता झाला असता', असे प्रतिपादन पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस. झेड. देशमुख यांनी केले. भगूर येथील स्वा.सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ते बोलत होते.
अभिनव भारत व जॅक्सन वधाची कहाणी या विषयावर संमेलनातील बीजभाषणातून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. सावरकारांची जन्मभूमी अर्थात भगूर येथील तुळसा लॉन्स येथे भगूर शिक्षण मंडळ, मुंबईची स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक समिती, औरंगाबाद येथील स्वा.सावरकर प्रेमी मंडळ, ठाणे येथील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व भगूर नगरपालिका यांच्यावतीने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सावरकर जन्मस्थानकात ध्वजारोहण करण्यात आले. येथील शिवाजी चौकातून शहरातील प्रमुख मार्गावरून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. नाशिकच्या तालरुद्र ढोलताशा पथकाने यात सहभाग घेतला. विविध क्रांतीकारकांची माहिती असलेल्या १८ पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
त्यानंतर डॉ. मंगला वैष्णव, मेधा कुलकर्णी, स्नेहल पाठक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्यिक योगदान, या विषयावर परिसंवादात आपले विचार व्यक्त केले. तिसऱ्या सत्रात हिंदुत्व आणि सावरकरांची विज्ञाननिष्ठा, या विषयावर प्राचार्य डॉ. रमेश जलतारे, डॉ. वि. ल. दारूरकर यांनी आपले मनोगत मांडले. चौथ्या सत्रात सावरकर एक विचार, या विषयावरील चर्चेत पार्थ बाविस्कर, प्रियंका सोनवणे यांनी सहभाग घेत सावरकरप्रेमींना वैचारिक मंथन घडविले.
नूतन प्राथमिक विद्यामंदिर, नूतन हायस्कूल व तिजाबाई झंवर विद्यामंदिराच्या अडीच हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस वंदे मांतरम्..., जयोस्तुते... तसेच ने मजसी ने... या गीतांचे सादरीकरण केले. दीपा शेंबेकर या युवतीने पुणे ते भगूर असा सुमारे २२० किमीचा सायकल प्रवास करीत संमेलनात सहभाग घेतला. नाशिकच्या बागेश्री वाद्यवृंदातर्फे यावेळी सावरकरांना संगीतमय आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष चंद्रकांत शहासने, मार्गदर्शक एकनाथ शेटे, निमंत्रक भाऊ सुरवडकर, कार्यवाह मिलिंद रथकंठीवार, प्रख्यात व्याख्याते वा. ना. उत्पातशास्त्री, विजय करंजकर, नगरध्यक्षा अनिता करंजकर, उपनगराध्यक्षा शैलजा कापसे, मुख्य अधिकारी संगीता नांदुरीकर यासह विविध मान्यवर, उपस्थित होते. दिवसभर हे संमेलन सुरू राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images