Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गहू, हरभऱ्याचे उत्पादन घटणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील असमतोलपणा व त्यातच कमी प्रमाणात झालेल्या पर्जन्यमान यामुळे यंदा खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामाला सुध्दा 'बुरे दिन 'आले आहेत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या गहू पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. तर ज्वारीसह, कांदा व इतर नगदी पिके पाण्याअभावी धोक्यात सापडली आहेत. त्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात आल्याने शेतकरी वर्गास यंदाचे आर्थिक वर्ष तोटा देणारे ठरत आहे कमी पर्जन्यमानामुळे रब्बीला मोठा फटका बसल्यामुळे जिल्हाभरात गव्हाच्या व हरभऱ्याच्या पिकासह इतर नगदी पिकांच्या उत्पन्नात निम्म्याने घट होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या कृषी नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणुन नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, अलीकडच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील खरीप व रब्बी पिकाला फटका बसत आहे. त्यातच अवेळी आलेला पाऊस, अवकाळी, गारपीट व कमी झालेल्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. त्यामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते.

इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगामासाठी यंदा ४ हजार ८०२ हेक्टर सरासरी लागवडीसाठी गृहीत धरण्यात आले होते. मात्र, पाण्याअभावी अवघ्या २ हजार ४८० हेक्टरवर रब्बीच्या पिकांची लागवड झाली आहे. त्यातच तालुक्यात रब्बीत १,४५१ हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड होत असते. यंदा फक्त ९८५ हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने अवकृपा केल्याने रब्बी हंगामावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यात गव्हाची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात सरासरी ७६ हजार ८०० हेक्टर गव्हाचे क्षेत्र असतांना केवळ ३७ हजार ८७२ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झालेली आहे. त्याचबरोबर याच हंगामातील हरभऱ्याच्या बाबतीतही तीच गत आहे. ४१ हजार १०० हेक्टर क्षेत्र हरभऱ्यासाठी असूनही केवळ २६ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा गव्हाबरोबर आता हरभऱ्याचेही उत्पन्न घटणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ज्वारी व कांदा अव्वल यंदाच्या रब्बी हंगामात फक्त कांदा व ज्वारीने आघाडी घेतली असून, जिल्ह्यात यंदा १ लाख ३९ हजार ३९० हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे, तर १ लाख १९ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र, असे असूनही सर्वाधिक वाईट स्थिती ऊस पिकाची झाली आहे. यंदा फक्त ६ हजार २१२ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. इगतपुरी तालुक्यात फक्त ३३९ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची, तर अवघ्या ११८ हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बेटी बचाव’ फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फसवणूक करणारे भामटे काय योजना आणून सर्वसामान्यांच्या ​खिशातील पैसे काढून घेतील, याचा नेम नाही. दुप्पट पैसे, जास्त व्याज अशा भंपक आमिषांना खूप जण बळी पडतात. याबाबत काही प्रमाणात जनजागृती होत असल्याने गुजरात राज्यातील भामट्यांनी एक नवी आयडीया लढवत शेकडो वाहनधारकांना गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. यातील एका संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

मयूर वाघेला (वय ३१, रा.भावनगर), भावेश धनाजी सुरवैया (रा.गुजरात), सुनील टाटिया, गोविंद पाटील (दोघे रा. नाशिक) अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. यातील वाघेलाला अंबड पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो पोलिस कोठडीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील चारचाकी वाहनांना 'बेटी बचाव, बेटी पढाव' असा संदेश लावलेले बॅनर दिसून येत होते. या बॅनरसंदर्भात करार करणे आणि त्याद्वारे वाहनधारकांना मोबादला देण्याचे काम लेखानगर परिसरातील साईलिला कार अॅडव्हरटायझिंग या शाखेमार्फत सुरू होते. सुरत येथे मुख्य शाखा असलेल्या कंपनीने काही महिन्यापूर्वी लेखानगरसह शहरात बऱ्याच ठिकाणी उपशाखा सुरू केल्या. या शाखेतील व्यक्ती परिचितांना आपल्या कारवर जाहिराती लावण्यास उद्युक्त करीत होते. याबाबत माहिती देताना अंबड पोलिस स्टेशनचे पीएसआय सुमेध सोनाने यांनी सांगितले की, पाच लाखपासून १० लाख रुपये किमतीच्या कारनुसार कंपनी मोबादला परत करणार होती. समजा साडेसात लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीची कार असेल तर कंपनीच्यावतीने बेटी बचाव, बेटी पढाव किवा अशा तत्सम जाहिरात लावण्यासाठी देण्यात आल्या. महिन्याभरात एक वाहन जाहिरातीसह एक हजार किलोमीटर फिरले तर त्याला ९ ते १० हजार रुपयांचा परतावा मिळणार होता. कर्ज काढून वाहने घेणाऱ्या वाहनधारकांना कंपनीची ही ऑफर पसंत पडल्याने शेकडोच्या संख्येने वाहनधारक नोंदणी करण्यासाठी पुढे आले. लेखानगर येथील शाखेतच ९० वाहनधारकांची नोंदणी आहे. नोंदणीसाठी वाहनधारकाला कंपनीकडे सुरुवातीस पाच हजार रुपये रोख आणि ३१ हजार रुपयांचा धनादेश द्यावा लागला. दुसऱ्या महिन्यात पुन्हा ३१ हजार रुपयांचा धनादेश कंपनीने घेतला. अर्थात मोबादला म्हणून वाहनधारकास दोन महिन्यात अवघे १९ ते २० हजार रुपये मिळाले. प्रत्येक वाहनधारकांकडून साधारणतः ४० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे उकळून कंपनीने शटर बंद केले असल्याचे पीएसआय सोनाने यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात साक्ष नोंदवण्याचे काम सुरू आहे. फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी आपली तक्रार देण्यासाठी अंबड पोलिस स्टेशनशी संपर्क साधवा. हा घोटाळा मोठा असून तक्रारदारांनी पुढे येणे आवश्यक आहे.

- सुमेध सोनाने,

पीएसआय, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरसंख्येत चारपट वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील गावांची तहान वाढतच चालली असून, गवर्षापेक्षा यंदा फेब्रुवारी महिन्यातच टँकर्सच्या संख्येत चारपट वाढ झाली आहे. अनेक गावांचे प्रस्ताव दाखल असून, टँकर संख्येत आणखी वाढ होणार आहे.

दुष्काळी भागांना पाणी पुरविण्यासाठी सध्या ५१ टँकर्सच्या तब्बल १६८ फेऱ्या दररोज होत आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत केवळ १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यापेक्षा चारपट अधिक टॅँकर यंदा पुरवावे लागत असून, जुलै २०१६ पर्यंत तब्बल २७० टँकर्सची आवश्यकता भासू शकते, असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

पावसाने यंदा पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. नाशिक सर्वाधिक धरणांचा जिल्हा असला तरी यंदा बराचशी धरणे निम्मीही भरू शकलेली नाहीत. दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, दिवसेंदिवस गावोगावी फिरविल्या जाणाऱ्या टँकरच्या संख्येतही त्यामुळे वाढ होत आहे.

सिन्नर, येवला, नांदगाव आणि बागलाण, देवळा या तालुक्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या चारही तालुक्यांमध्ये ५८ गावे आणि १०१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. येवल्यात सर्वाधिक २१ गावांना तर सिन्नरमध्ये सर्वाधिक ५३ वाड्या आणि १० गावांमध्ये सध्या टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. बागलाण तालुक्यात १४ गावांना तर नांदगाव तालुक्यात ३३ वाड्या आणि सहा गावांमध्ये टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात एकूण आठ गावे आणि ६४ वाड्या अशा ७२ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यासाठी केवळ १३ टँकरची मदत घेण्यात येत होती. यंदा त्यामध्ये तब्बल चार पटीने वाढ झाली आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणाने गाठला तळ, आता पाणीकपात अटळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावल्याने येत्या काळात शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस उघडे पडणारे धरणातील जॅकवेल चॅनल यंदा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच उघडे झाले आहे. सोबतच धरणाच्या गेटचा तळही उघडा पडला आहे. शहराला नव्याने वाढीव पाणी उपलब्ध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे आता कपातीशिवाय कोणताही पर्याय महापालिका प्रशासनापुढे नाही. आज, शनिवारी (ता. २०) वाढीव कपातीची घोषणा केली जाणार असल्याचे समजते.

सध्या वाढवून दिलेल्या ३०० दशलक्ष घनफूट पाण्याव्यतिरिक्त नव्याने ३०० दशलक्ष घनफूट पाणी वाढवून मिळण्याची मागणी महापालिकेने केली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी वाढीव पाण्याची मागणी फेटाळली असून, ३१ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे बंधन आयुक्तांना घालण्यात आले आहे. सध्या महापालिकेकडून १५ टक्के पाणीकपात केली जात आहे. सध्याच्या १२.३५ दशलक्ष घनफूटने पाणीपुरवठा केल्यास हा साठा ५ जुलैपर्यंत पुरणारा आहे. त्यामुळे महापौरांनी तातडीने भाजप आमदारांसह सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक ११ फेब्रुवारीला बोलाविली होती. परंतु, या बैठकीत वाढीव पाणीकपातीला आमदारांनी विरोध केला होता. याच बैठकीत पालकमंत्र्यांनी गंगापूर धरणातून आणखी वाढीव ३०० दलघफू पाणी आरक्षित केल्याचे अधिकृत पत्र महापालिकेला दिले नसल्याचे समोर आले होते. हा प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पालिकेला वाढीव पाण्याचे पत्र पाठवून पाणीसाठी ३१ जुलैपर्यंत वापरण्याचे बंधन घातले आहे. उपलब्ध पाण्यात २५ दिवसांचा तुटवडा जाणवत आहे. तर धरणाने आताच तळ गाठला आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली असून, प्रशासनावरील पाणीकपातीचा दबाव वाढला आहे. महासभेने अगोदरच आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवसाची पाणीकपात लागू केली जाणार आहे. ही पाणीकपात विभागवार करायची, की जलकुंभनिहाय करायची याचा फैसला आज होणार आहे. आता राजकारण्यांचा दबाव सहन करायचा नाही, असा निर्धार प्रशासनाने केला आहे. शुक्रवारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जंलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाणीसाठ्याचा निश्चित आकडा जाणून घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेत अभूतपूर्व गोंधळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महानगरपालिकेच्या महासभेत प्रशासनाकडून मनपा करात सुचवण्यात आलेल्या दोन टक्के करवाढ व अमृत अभियानांतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्पाची अंमलबाजावणी या विषयावरून काँग्रेस नगरसेवकांकडून जोरदार विरोध झाल्याने महासभेत प्रचंड गदारोळ झाला. यामुळे महापौर हाजी मो. इब्राहीम यांना महासभा तहकूब करावी लागली.

महासभेच्या प्रारंभीच काँग्रेस नगरसेवक शाकील बेग, ताहेरा शेख, अस्लम अन्सारी यांनी 'नहीं चलेगी नहीं चलेगी घरपट्टी वाढ नहीं चलेगी अशा घोषणा देत प्रवेश केला. त्याचवेळी महासभा वादळी होण्याचे संकेत मिळाले. यानंतर नगरसेवक मलिक इसा यांनी महापौर हाजी मो. इब्राहीम यांना शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत सभागृहात चर्चा करावी, अशी विनंती केली. मात्र, या मोहिमेंतर्गत प्रशासनाकडून अतिक्रमण हटवताना जाणीवपूर्वक भेदभाव केला जात आहे, असा आरोप केला. प्रशासनाने याबाबतीत निःष्पक्ष कार्यवाही करावी, अन्यथा शहरवासीयांच्या विरोधास सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.

सत्ताधारी नगरसेवकांनी विषय पत्रिकेवरील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी, असे सुचविले. यावेळी मनपा गृहकर विभागाकडून मनपा करात सुचवण्यात आलेली दोन टक्के वाढ विषय सभागृहापुढे येताच काँग्रेस नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही नगरसेवकांनी महापौरांसमोरील दालनात उतरत निदर्शने केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळातच केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्पविषयी विचार विनिमय व्हावा, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी लावून धरली. मात्र, शहर पाणीपुरवठा अभियंता जहीर अन्सारी रजेवर असल्याचे कारण महापौरांनी दिल्याने काँग्रेसचे नगरसेवक अधिक आक्रमक झाले. मात्र, या गदारोळतच सत्ताधारी नगरसेवक कालिम दिलावर यांनी महासभा तहकूब करण्याची लेखी सूचना केली. त्यास नगरसेवक जमील शेख यांनी अनुमोदन दिले, असे जाहीर करीत महापौर हाजी इब्राहीम यांनी महासभा तहकूब झाल्याचे जाहीर करून राष्ट्रगीत सुरू केले. या सगळ्या गोंधळामुळे मात्र सभागृहात सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? असे चित्र पहायला मिळाले.

विरोधकांची टीका महासभेतील गदारोळानंतर काँग्रेस नगरसेविका माजी महापौर ताहेरा शेख, माजी सभापती अन्सारी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महापौरांवर घणाघाती आरोप केले. महापौर मनमानी कारभार करीत आहेत. विरोधक सभागृह चालवण्यास तयार आहेत मात्र, महापौर आणि सत्ताधारी नगरसेवकांना जनतेचे प्रश्न सोडावयाचे नसल्याने ते जाणीवपूर्वक महासभा तहकूब करीत आहेत. शहरातील जनतेस मूलभूत सोई सुविधा मिळत नसताना करवाढीचा बोजा काँग्रेस जनतेवर येऊ देणार नाही.

राजदंड पळवला महासभेत उडालेल्या गोंधळातच काँग्रेस नगरसेवक विठ्ठल बर्वे यांनी महापौरांसमोरील राजदंड पळवला. राजदंड परत आणण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. तर, तिकडे महापौर यांनी सरळ राष्ट्रगीत सुरू केले. मात्र, राष्ट्रगीत सुरू झाल्यावर देखील बहुतांश काँग्रेस नगरसेवकांचा गोंधळ सुरूच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद जवानाच्या कुटुंबीयांना सेनेची पाच लाखाची मदत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दहशतवाद्याशी लढतांना वीरमरण आलेले भयाळे येथील शहीद जवान शंकर शिंदे यांच्या कुटुंबीयांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या आदेशानुसार शिवसेनावतीने पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. आर्थिक मदतीसोबतच शिवसेना शंकर शिंदे यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. शनिवारी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगर प्रमुख यांच्या हस्ते हा धनादेश शिंदे यांच्या कुटुंबाला देण्यात आला.

शहीद शंकर शिंदे हे अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी शिवसेनेने त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पाच लाखाच्या मदतीचा धनादेश खा. हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विनायक पांडे, जयंत दिंडे उपस्थितीत शनिवार शहिदांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला. वडील सखाराम शिंदे, आई सुमन शिंदे, पत्नी सुवर्णा शिंदे यांच्या हातात हा धनादेश देण्यात आला. या प्रसंगी शिवसैनिक सुशील भालेराव यांनी शहिदांच्या दोन्ही मुलांच्या पदव्युत्तर शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार असल्याचे सांगितले. तसेच वडाळीभोई येथील शिवसैनिक पिंटूशेट संचेती यांनी देखील अतिरिक्त पाच हजारांचा धनादेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या घटनांत तिघांची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ​वेगवेगळ्या भागात तिघा जणांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली. यात एका विवाहितेचा समावेश असून याप्रकरणी मुंबई नाका, म्हसरूळ तसेच उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई नाका परिसरात हॉटेल रूचीमध्ये कूक म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रणजीत सूर्यभानजी भुरभुरे असे या मृत युवकाचे नाव आहे. वर्धा जिल्ह्यातील टाकरखेड तालुक्यातील रहिवाशी आहे. हॉटेलमध्ये कूकचे काम करणाऱ्या भुरभुरेने मोटकरीवाडी येथे एका खोली भाड्याने घेतली होती. हॉटेलचे काम संपवून घरी परतलेल्या भुरभुरेने छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आत्महत्येची दुसरी घटना म्हसरूळ पोलिस स्टेशनतर्गंत झाली. के. के. वाघ कॉलेज परिसरातील व्यंकटेश सोसायटीत राहणाऱ्या दगडू शिवाजी जमदाडे (वय ४०) यांनी उंच इमारतीवरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. जमदाडे यांचा एक अपघात झाला होता. अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांना त्रास होत होता. या त्रासातूनच जमदाडे यांनी शुक्रारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी सीता दगडू जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. नाशिकरोड परिसरातील विहीतगाव येथील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या सोनाली संदीप उनव्हणे (वय ३०) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनालीने गळफास घेतल्याची बाब शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर ​बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पानसरेंच्या मारेकऱ्यांवर कारवाई करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ‌

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास जलदगतीने करून त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डाव्या लोकशाही आघाडीने केली आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.

कष्टकऱ्यांचे नेते अशी ओळख असलेल्या पानसरे यांनी अनेक जनआंदोलनांचे नेतृत्व केले. दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. २० फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला. या घटनेला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. अनेक संघटनांनी आजचा दिवस शहीद दिन म्हणून पाळला. मात्र, पानसरे यांच्या हत्येचा तपास ज्या पध्दतीने सुरू आहे, ते पहाता सरकारला खऱ्या गुन्हेगारांना पकडायचे नाही, हे सिध्द होते असा आरोप डाव्या लोकशाही आघाडीने केला. कॉ. पानसरे यांच्या खुनातील साक्षीदारांना खुलेआम धमक्या येत आहेत. मात्र, तरीही धमकावणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कुलबर्गी, रोहित वेमुला यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, अशा घटनांमागील सूत्रधारांवर कारवाई करा, जेएनयूमधील ऑल इंडिया फेडरेशनचा कार्यकर्ता कन्हैय्या कुमार यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करा, देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना अटक करा, माकप दिल्ली मुख्य कार्यालयावर हल्ला करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक करा, अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबतचे निवेदन राजू देसले, सुनील मालुसरे, मनिष बस्ते, शरद कोकाटे, महेंद्र दातरंगे आदींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाळेधारकांना स्थायीचा दिलासा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या मालकीच्या शहरातील ४३३ गाळ्यांचा फेरलिलाव करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला आहे. गाळ्यांचा फेरलिलाव केल्यास अनेकांवर बेरोजगाची वेळ येईल. त्यामुळे गाळेधारकांना पंधरा वर्षाची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी जाहीर केले आहे. तसेच रेड‌रिेकनरची भाडेवाढही फेटाळून लावली असून, महासभेत प्रलंबित धोरणात्मक निर्णयानुसार या गाळेधारकांना भाडेवाढ लागू करावी, असे आदेशीत केले आहे. त्यामुळे शहरातील गाळेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत शहरातील गाळेधारकांचा तहकूब विषयावर चर्चा झाली. मनसेच्या यशवंत निकुळे यांनी फेरलिलावाला विरोध केला. या निर्णयाने भूमीपुत्रावर अन्याय होईल, त्यामुळे सध्याच्या गाळेधारकांनाच पंधरा वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी केली. शिवसेनेच्या शैलेश ढगे यांनी फेरलिलावाला विरोध करत, पंधरा वर्षाच्या मुदतवाढीची मागणी केली. काँग्रेसच्या राहुल दिवे यांनी या निर्णयाने गोरगरीबांचे नुकसान होणार आहे. तुम्ही गरीबांनाच मारणार का असा सवाल करत, त्यांनी पंधरा वर्ष मुदतवाढ व पाच टक्के भाडेवाढ करण्याची मागणी केली. कुणाल वाघ यांनी मुदतवाढ देण्याची मागणी करत, मिळकत धोरणही गाळेधारकांना दिलासा देण्याची मागणी केली. सुरेखा भोसले यांच्यासह सर्वच सदस्यांनी फेरलिलावा विरोध, करत अव्वाच्या सव्वा भाडेवाढ टाळावी अशी मागणी केली. त्यामुळे सभापती शिवाजी चुंभळे यांनी महापालिकेचे गाळे हे बेरोजगारांना रोजगार मिळावेत यासाठी बांधले आहे. फेरलिलाव केल्यास बेरोजगारी वाढेल. त्यामुळे फेरलिलावाचा प्रस्ताव फेटाळत, सध्याच्या गाळेधारकांनाच १५ वर्षाची मुदतवाढ देण्याचा व रेड‌रिेकनरची भाडेवाढ न करता भाडेवाढ करावी असा धोरणात्मक निर्णय जाहीर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरती-ओहोटी सुरुच असते

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आयुष्यात पराभव चाखणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपण कुठे आहोत आणि आपले कोण आणि परके कोण हे कळत नाही. त्यामुळे मनसेचा झालेला पराभव ही इष्टापत्ती समजा आणि नव्याने जोमाने कामाला लागा,' अशी भावनिक साद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना घातली आहे. सूर्यास्तानंतर सूर्योदय होतो अन् समुद्रात भरतीनंतर ओहोटी अन् ओहोटीनंतर भरती येते हे लक्षात ठेवा, असा संदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह मनसेवर टीका करणाऱ्या राजकीय पक्षांना दिला आहे. एप्रिलनंतर नाशिकमध्ये मनसेचा चमत्कार बघायला मिळेल असे सांगतानाच, 'मी माझे काम करतो, तुम्ही तुमचे करा' असे आवाहन त्यांनी केले आहे.

नाशिकच्या धावत्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नाशिकमध्ये मनसेचा ढासळलेल्या गड सावरण्यासाठी ठाकरेंनी शनिवारी थेट भावनिक होऊन मनसेच्या नगरसेवकांचे आणि पदाधिकाऱ्यांनी मनोधैर्य उंचावण्याचे प्रयत्न केले. विशेषतः त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उभारी देण्याचे काम केले. पृथ्वी, चंद्र तारे यांचे दाखले देऊन ठाकरेंनी थेट सूर्योदय आणि सूर्यास्ताची आठवण कार्यकर्त्यांना करून दिली. आपण शांत असून, दौरे करीत नसल्याची चर्चा करतात. परंतु, मी सध्या विचार करतोय. राज्य काही मला मिरवायला नको होते. मला राज्य घडवायचे होते असे त्यांनी यावेळी सांगीतले. त्यामुळे पराभवातून शिका. स्वतःला कमी लेखू नका. सहकाऱ्यांना पुढे घेऊन जा. स्वार्थी विचार करू नका. तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. ती निट सांभाळा. नियोजनबद्ध काम करा. मतदारांना काय हवे त्यानुसार निर्णय घ्या. मावळ्यांसारखे काम करा. शिवाजी महाराज आग्रा येथे बंद‌स्ति असताना ते सुटणार नाहीत, अशी शक्यता होती. तरीही मावळ्यांनी गड किल्ले जिंकलेच असे सांगत, 'राजा परत येईल अशा आशेने मावळ्यांनी काम केले. त्यानुसार तुम्हीही काम करा' असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले. सूर्योस्त झाल्यानंतर सूर्योदय येतच असतो. त्याच प्रमाणे भरती व ओहोटीचे असते सांगून एप्र‌लिनंतर नाशिकमध्ये चमत्कार करणार असल्याचा आशावाद त्यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये जागवला आहे.

जायचे त्यांना जाऊ द्या !

मधल्या काळात मनसे सोडण्याच्या तयारीत असलेल्या काही नगरसेवकांनाही ठाकरेंनी टोला लावला. ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, दोन माणसे माझ्याकडे राहिली तरी, त्यांच्या बळावर २० लाख माणसे जमा करण्याची माझी धमक असल्याचे त्यांनी फुटीरांना ठणकावले. 'संकटाच्या काळातच आपले कोण आणि परके कोण हे कळते' असे सांगत, 'निवडणुकांच्या काळात सगळेच जण आपले विश्वासू असल्याचे भासवतात. परंतू नंतर त्यांचे रुप कळते. पराभव व विजय या गोष्टी येऊन जाऊन असतात. त्यामुळे कुठेतरी आग असली पाहिजे, त्याशिवाय धूर दिसत नाही' असे सांगत, ठाकरेंनी बंडखोरांसह नव्या पदाधिकाऱ्यांनाही संदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान अन् मतमोजणी यंत्रणा सज्ज

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि. २१) मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी बाजार समितीची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची वेळ आहे. तब्बल आठ वर्षानंतर मालेगाव बाजार समितीची निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकूण १८ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात असून, तीन पॅनलमध्ये लढत होत आहे.

बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेसाठी शहर व तालुक्यात एकूण नऊ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. शहरात एक तर तालुक्यात आठ मतदान केंद्र आहेत. मालेगाव कॅम्प भागातील संत ज्ञानेश्वर सेमी इंग्लिश स्कूल व विद्या विकास स्कूल येथे एक तर झोडगे, कळवाडी, मळगाव, निमगाव, रावळगाव, सौंदाणे, करंजगव्हाण, वडनेर येथे आठ केंद्र असणार आहेत. सर्वच नऊ केंद्रांवर सोसासटी गट व ग्रामपंचायत गटासाठी मतदान होईल. व्यापारी गटाचे मतदान केंद्र मालेगाव शहरातच असेल. हमाल व्यापारी गटासाठी शहर व झोडगे येथील केंद्रावर मतदान होईल. मालेगाव बाजार समितीचे एकूण तीन हजार ७३५ मतदार आहेत.

दरम्यान, उद्या (दि. २२) सकाळी आठ वाजेपासून येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौतम बलसाने, सहाय्यक सचिव साहेबराव पाटील हे काम पाहत आहेत.

-

मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

मालेगाव बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे शेतकरी पॅनल, भाजप नेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनल, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बळीराजा पॅनल निवडणूक रिंगणात असल्याने यावेळी तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेचे बंडू बच्छाव, भाजपचे अद्वय हिरे तर काँग्रेसचे प्रसाद हिरे सोसायटी गटातून आमनेसामने असून, अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

--

उमराणेत दुरंगी लढत

उमराणे बाजार समितीसाठी देखील आज (दि. २१) मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान प्रक्रिया असणार आहे. एकूण १८ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात असून, ५६७ मतदार या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

उमराणे बाजार समितीच्या निवडणुकीत जि. प. सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल, तर विलास देवरे यांच्या नेतृत्वात कर्मवीर पॅनल अशी सरळ दुरंगी लढत होत आहे. मतदान प्रक्रिया उमराणे जि. प. शाळेतील चार मतदान केंद्रांवर पार पडणार आहे. व्यापारी गटात सर्वाधिक २५८ मतदार आहेत. मतमोजणी प्रक्रिया उद्या (दि. २२) सकाळी ८ पासून सुरू होणार आहे.

--

मालेगाव बाजार समिती

गट जागा मतदार

सोसायटी ११ १५४८

ग्रा.पंचायत ४ ११९१

हमाल मापारी १ ३०३

व्यापारी २ ६९३

एकूण १८ ३७३५

उमराणे बाजार समिती

गट जागा मतदार

सोसायटी ११ १००

ग्रा.पंचायत ४ ८०

हमाल मापारी १ १२९

व्यापारी २ २५८

एकूण १८ ५६७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुरांच्या निवाऱ्यासाठी नाईट शेल्टरची गरज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेठरोड येथे सुनील निकुळे या मजूराचा खून प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्थलांतरीत मजूरांच्या निवाऱ्यासाठी नाईट शेल्टर होम सुरू करावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती संघटनेने केली आहे.

१५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास उघड्यावर झोपलेल्या निकुळे यांचा खून करण्यात आला होता. मात्र या प्रकरणातील संशयितांवर अद्याप कारवाई होऊ शकलेली नाही. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यातील अनेक आदिवासी बांधव रोजगारानिमित्त नाशिकमध्ये येत असतात. अशा बेघर स्थलांतरीत मजुरांना रात्रीचा निवारा (नाईट शेल्टर होम) उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानसागर कांबळे, अरविंद चव्हाण, निलेश सोनवणे, लक्ष्मण गायकवाड आदींनी केली आहे.

याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दोन मुलींचा विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या संशयिताविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. रमेश पांडूरंग बेंडकुळे असे या संशयिताचे नाव असून, तो भारतनगर परिसरातील शिवाजीवाडी परिसरात राहतो. येथून जवळच राहणारी एक विद्यार्थिनी तिच्या मैत्रणीसमवेत शाळेत जात असताना संशयिताने अमरधामरोडवरील हरी मंजिल येथे एकटी पकडून विनयभंग केला. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत घडली. २१ वर्षीय पीडित तरुणी कॉलेजला जात संशयित आरोपी सुजय अनिल दिवे हा तिचा दुचाकीने पाठलाग करायचा. मागील चार महिन्यापासून सुजयचा पाठलाग सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही मुलगी नाशिकरोड परिसरातील कॉलेजला जात असताना संशयिताने तिला थांबवून काही सांगण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सदर मुलीने उपनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच गुन्ह्याची नोंद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाषेच्या पेपरला सापडले जिल्ह्यात २० कॉपीबहाद्दर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्य माध्यमिकउच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेचा दुसरा पेपर शनिवारी पार पडला. भाषा विषयांचे पेपर यादिवशी विद्यार्थ्यांनी दिले असून, जिल्ह्याभरात २० कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना भरारी पथकाने

पकडले आहे. विभागातील कॉपीबहाद्दरांची एकूण संख्या ही २८ आहे.

भाषा विषयाचे पेपर शनिवारी पार पडले. यामध्ये मराठी, गुजराती, बंगाली, सिंधी, पंजाबी, उर्दू, पर्शियन, पाली, मल्याळम, तमिळ, तेलुगू या भाषांचा समावेश होता. विभागात ९३१ कॉलेजांमध्ये २१४ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. त्यापैकी ८४ केंद्र नाशिक जिल्ह्यातील होती. यापैकी चांदवड तालुक्यात १२, सुरगाणा २ व देवळा तालुक्यात ६ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. तर विभागानुसार जळगाव जिल्ह्यात ५ व

नंदुरबारमध्ये ३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. धुळे जिल्ह्यात एकही कॉपीबहाद्दर भाषेच्या पेपरला निदर्शनास आलेला नाही.

मंडळातर्फे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जात आहे. सोमवारी (दि.२२) हिंदी, जर्मन, अर्धमगधी, पर्शियन या भाषांचे पेपर होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेत पुन्हा हातचलाखी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील काही सराईत गुन्हेगारांनी बँकांमध्ये येणाऱ्या नागरिकांना टार्गेट केले असून, हातचलाखी करीत ते सर्वसामान्य खातेदारांचे पैसे हातोहात लंपास करीत आहेत. अशीच एक घटना दिंडोरीरोडवरील एसबीआयच्या मेरी शाखेत घडली असून, संशयिताने फिर्यादीचे १३ हजार रुपये चोरी केले. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

केतकीनगर परिसरातील गजलक्ष्मी रो हाऊस येथे राहणारा १७ वर्षीय जितेश राजाराम भोये त्याच्या मामाच्या घराच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे आलेल्या दोघा अनोळखी इसमांनी रूमालात ठेवलेले एक लाख रुपये जितेशकडे देऊन त्याच्याकडील १३ हजार रुपये आपल्याकडे घेतले. थोड्यावेळातच दोघा व्यक्तींनी बँकेतून काढता पाय घेतला. यानंतर जितेशने रूमाल उघडून पाहिला असता यात कागद भरले असल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक दिवस पाणीबंद!

0
0


नाशिकमध्ये सोमवारपासून जलकुंभनिहाय वाढीव पाणीकपात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढीव पाणीकपातीची कोंडी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अखेर फोडली आहे. सर्वपक्षीय सहमतीनंतर शहरात आता सोमवारपासून जलशुद्धिकरण केंद्रनिहाय संपूर्ण एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विभागवार जलकुंभनिहाय पाणीकपातीचे नियोजन पालिकेने केले असून, भविष्यात एकलहरेकडून अजून अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. या निर्णयामुळे दर आठवड्याला १२.३५ दलघफू पाण्याची बचत होणार आहे. वाढीव कपातीच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा पर्यायही प्रशासनाने ठेवला आहे.

गंगापूर धरणातील उपलब्ध साठा आणि ३१ जुलैपर्यंत पाणीपुवठ्याचे गणित जुळत नसल्याने महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, भाजपच्या आमदारांनी या कपातीला विरोध करीत अतिरिक्त ३०० दलघफू पाणी उपलब्ध करून दिले होते. तरीही २६ दिवसांचा तुटवडा जाणवत असल्याने पाणीकपात अनिवार्य होती. परंतु, या कपातीवरून महापालिकेतील मनसे आणि भाजपमध्ये राजकारण सुरू झाले होते.

आता वाढीव पाणीकपातीला भाजपनेही सहमती दर्शविल्याने आयुक्तांनी शनिवारी पाणीकपातीची घोषणा केली. विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत आमदार, महापौर, आयुक्त यांच्या उपस्थितीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, सर्वपक्षांच्या सहमतीने शहरात आता जलकुंभनिहाय पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करून विभागवार कपातीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आठवड्यातून चार दिवस प्रत्येक विभागात एक दिवस पूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे आठवड्यातून १२.३५ दलघफू पाण्याची बचत होणार आहे.
विभागीय आयुक्तांच्या बैठकीत आमदार, महापौर व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णयाला सर्वपक्षीय सहमती मिळाली आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकलहरेचे अतिरिक्त पाणी मिळण्याची शक्यता असून, कपातीवर फेरविचार होऊ शकतो.

डॉ. प्रवीण गेडाम,

महापालिका आयुक्त

प्रशासनाने घेतलेला निर्णय हा पाणीकपातीचा नव्हे, तो पाणीबचतीचा आहे. सरकारच्या वतीने वाटल्यास आणखी अतिरिक्त पाणी वाढवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावरून सुरू ठेवलेले राजकारण थांबविले पाहिजे.

प्रा. देवयानी फरांदे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर्सच्या कार्यकर्तृत्त्वाचा गौरव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
समाजाच्या समस्या मांडल्याबद्दल 'त्यांच्या' कार्याचा गौरव 'महाराष्ट्र टाइम्स'ने केला. हा क्षणच त्यांच्यासाठी स्वप्नवत होता. केवळ आपण सांगितलेल्या समस्यांची दखल घेऊन ते प्रसिध्द करणेच नव्हे, तर त्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन त्या मार्गी लावून समस्या आपल्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल आपला सत्कार होतोय ही जाणीव 'त्यांना' सुखावणारी होती. यापुढेही समाजात चालणाऱ्या विविध विघातक गोष्टी 'मटा'च्या नजरेस आणून देऊ, असा पणच 'त्यांनी' केला. पूजा राका, अरूण मिस्त्री व कल्पेश खैरनार हे ते ‌तिघेजण. या ‌तिन्ही सिटिझन रिपोर्टर्सचा गौरव शनिवारी करण्यात आला.

वृत्तपत्राचे वाचक आपल्या अवती-भवती घडणाऱ्या अनेक घटना, समस्या आणि प्रश्नांचे साक्षीदार असतात. त्यांना त्यांचे म्हणणे तीव्रतेने सांगायचे असते, समाजातील घटकांना न्याय मिळवून द्यायचा असतो. ते साध्य व्हावे यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत 'मटा सिटिझन रिपोर्टर' हे 'अॅप' उपलब्ध करून दिले आणि आतापर्यंत अनेक समस्यांना वाचा फुटून त्यांच्यावर मार्गही निघाला. प्रश्नांची तड लावण्यासाठी झटणाऱ्या अशा सामान्यांतील तीन 'मटा सिटिझन रिपोर्टर्स'चा शनिवारी सन्मान करण्यात आला.

गुगल प्ले स्टोअरवरून हे 'अॅप' डाऊनलोड करून 'मटा'च्या वाचकांनी त्याला तुफान प्रतिसाद दिला. फोटो, समस्या, त्यांना 'दिसणाऱ्या' बातम्यांचा ओघ या 'अॅप'वर सुरू झाला. खऱ्या अर्थाने सामान्यांमधील पत्रकारांचा चेहरा या 'अॅप'वर प्रत्येक दिवशी प्रभावीपणे दिसत होता. अशा 'सिटिझन रिपोर्टर्स'पैकी पूजा राका, कल्पेश खैरनार आणि अरूण मिस्त्री या तीनजणांचा 'मटा'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या हस्ते 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. दर आठवड्याला अशाप्रकारे 'सिटिझन रिपोर्टर्स'ना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे.

'मटा'चेे अॅप डाऊनलोड करून मला खूप आनंद झाला. कारण, आता मी त्यावर बातम्या देऊ शकतो व त्याची दखलही घेतली जाऊ शकते.

कल्पेश खैरनार

प्रत्यक्षात काम होते हे पाहून खूप समाधान वाटले. आता कोणतीही समस्या तडीस लागू शकते, असे काम 'मटा'च करू शकते याबाबत दुमत नाही.

अरूण मिस्त्री

'मटा'ने हे अॅप आणून सामान्य वाचकांवर खूप मोठा विश्वास दाखवला आहे. यातून समस्या सुटू शकतात.
पूजा राका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथक रोखणार पाण्याची नासाडी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने विभागानिहाय स्वतंत्र पथक नेमले आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पाण्याचा अपव्‍यय निदर्शनास आल्यास त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती देता येणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

प्रत्येक विभागात पाण्याचे अतिरिक्त दोन टँकर उपलब्‍ध करून देणे. शहरातील मनपाचे हातपंप, बोअरवेल कार्यान्वित करणे. चेहडी पंपिंग स्टेशन येथे पाणी उचलण्यासाठी नदीपात्रातील इनटेक पाइपची लांबी वाढविणे. गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील इनटेक चॅनलमधील गाळ काढणे. गंगापूर धरण पंप‌िंग स्टेशन येथील इनटेक चॅनलमध्ये धरणातील मृत साठ्याचे पाणी पंपिंग करून टाकण्यासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त पंप वापरणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. - विभागनिहाय संपर्क विभागाचे नाव विभागीय अधिकारी (मो.क्र.) उपअ‌भियंता (मो.क्र.) नाशिक पूर्व ९४२३७७७१२५ ९४२०६९१०९९ नाशिक पश्चिम ९४२३१३१३२१ ९४२३१७९१७९ पंचवटी ९४२३१७९१२४ ८२७५०२२७६९ नाशिकरोड ८२७५०१५३९१ ९४२२२२२८४३ नवीन नाशिक ७५८८०३८५८१ ९४२३१७९१५९ सातपूर ९४२३१७९१२१ ९४२३१७९१५३
पाणी बचतीचे नियोजन

सोमवारी पाणी बंद असलेला परिसर *नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक ४१ ते ४९ व ५१ ते ५२. नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ५१ ते ५२ व ५३ मधील विशाखा कॉलनी, राणेनगर, चेतनानगर, किशोरनगर, रायगड उधाम, भगतसिंगनगर, अल्को मार्केट. प्रभाग क्रमांक ५४ मधील पांडवनगरी, श्रद्धा विहार, शर्वरी नगरी, नाशिक केब्रिंज शाळा परिसर. प्रभाग क्रमांक ६१ मधील वडनेर गेट, पिंपळगाव खांब, गणेशनगर, पोरजे वस्ती, राजपुक कॉलनी. मगंळवार पाणी बंद असलेला परिसर सातपुरमधील प्रभाग क्रमांक १६ ते २१ व ५०. नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५ मधील आकाशवाणी केंद्र, आयोध्या कॉलनी, अरिहंत हॉस्पिटल, एसटी कॉलनी व उदय कॉलनी, गितांजली सोसायटी, सहदेवनगर, चिंतामणी मंगलकार्यालय, दादेजी कोंडदेवनगर, सुयोजित संकुल, माणिकनगर, श्रमिक कॉलनी. प्रभाग क्रमांक २२ मधील कृषीनगर, डीसुझा कॉलनी, मॉडेल कॉलनी, महात्मानगर, पारिजातनगर, समर्थनगर. नाशिक पश्चिममधील प्रभाग क्रमांक १३, १४, २३ ते २५. नाशिक पूर्व प्रभाग क्रमांक १५ मधील गितांजली सोसायटी व गंगापूररोड बाजु, जुना गंगापुर नाका, चोपडा लॉन्स व राठी आमराई परिसर. प्रभाग क्रमांक २२ मधील सिद्धार्थनगर, पर्णश्री कॉलनी, लव्हाटे नगर, पीटीसी, उत्कर्षनगर. प्रभाग क्रमांक २६ ते २९, ३९ ते ४०. प्रभाग क्रमांक ३८ मधील साईनाथनगर, अमृतवर्षा कॉलनी, जेएमसीटी वडाळारोड परिसर. प्रभाग क्रमांक ५३ मधील विशाखा कॉलनी, जाखडीनगर, पाटील गार्डन, पेठेनगर इ. प्रभाग क्रमांक ५४ मधील आण्णाभाऊ साठेनगर मेघदुत नगर, घरकुल योजना, कलानगर, रंगरेज मळा. गुरूवारी पाणी बंद असलेला परिसर *पंचवटी प्रभाग क्रमांक १ ते १२. नाशिक पूर्व प्रभाग क्रमांक ३० व चित्रघंटा परिसर. शुक्रवारी पाणी बंद असलेला परिसर *नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक ३२ ते ३६ व ५५ ते ६१. प्रभाग ६१ मधील (पिंपळगाव खांब व वडनेर गेट परिसर वगळून) सर्व प्रभाग. * नाशिक पूर्वमधील प्रभाग क्रमांक ३१, ३७, ३८ संपूर्ण भाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलाखालीच भरतोय बाजार

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या दुतर्फा विविध वस्तू विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय वाहने दुभाजकावर चढवून वाहन दुरुस्तीही केली जात आहे. या दुभाजकावर फुले फुलविण्याचा निर्णय महापालिकेमार्फत घेण्यात आला होता. परंतु त्याऐवजी इथे हे उद्योग सुरू झाले आहेत.
फुलझाडे किंवा लहान झुडपांच्या माध्यमातून या दुभाजकांचे सुशोभीकरण करणार असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात आले होते. परंतु ते न केल्यामुळे दुभाजकावर विविध विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी पादत्राणे, चादर, ब्लँकेट्स, चिनी कोंबडी पिल्लू, काचेच्या विविध वस्तू, गॉगल्स यासारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दुकाने उभी केली जात आहेत. दुभाजकावर वाहन दुरुस्तीचे गॅरेजही सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी वाहनांचे ऑईल मिश्रित सुटे भाग जाळले जात असल्याने इथे धुरामुळे प्रदूषणाची समस्याही निर्माण होत आहे.
केवळ वाहने दुरुस्ती नव्हे तर काही वाहनचालक शक्कल लढवून दुभाजाकावर वाहने पार्क करताना दिसत आहेत. दुभाजकावर मोठी सपाट लाकडी फळी ठेवून वाहने दुभाजकावर चढविली जातात. रस्त्याच्या दुतर्फा दुभाजाकावर वाहनांच्या या आतिक्रमणाचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे.
या सर्व प्रकारांकडे प्रशासन आणि पोलिस यांचे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. उड्डाणपुलाखालील दुतर्फा दुभाजकावर थाटत असलेली दुकाने हटवून या ठिकाणी फुल झाडे
लावावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​‘गोदेचा श्वास करा मोकळा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
'गोदावरी नदीवर सिमेंटचे बांधकाम केल्याने नदीमधील पाण्याचे जीवंत स्रोत बंद पडले आहेत. सिमेंटचे बांधकाम काढल्यास नक्कीच पाण्याचे स्रोत पूर्ववत होतील. सर्व नाशिककरांनी एकत्र येऊन याबाबत विचार करावा', असे आवाहन महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष दीपक नाईक यांनी केले. गोदाप्रेमी नागरी समितीने आयोजित केलेल्या विचामंथन कार्यक्रमात नाईक बोलत होते.
या समितीमार्फत श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या सभागृहात 'पूर्वीची गोदावरी आणि सध्याची गोदावरी नदी', या विषयावर हे विचारमंथन होते. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'गोदावरीविषयीची नाशिककरांची तळमळ आणि प्रदूषण मुक्तीचा लढा कौतुकास्पद आहे. सिमेंटचे बांधकाम गटारीसाठी असते नदीसाठी नसते. यामुळे नदीचा प्रवाह आणि स्रोत कमी होतात. सिमेंटची कामे उखडून टाकणे गरजेचे आहे.' यावेळी नाशिकच्या विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी गोदावरीच्या स्वच्छतेसाठी आणि प्रदूषण मुक्तीसाठी काय करावे याबाबत सूचना केल्या.
यावेळी रेखा सोमय्या, कृष्णकुमार नेरकर, कल्पना पांडे, सतीश शुक्ल, रवींद्र धरणे, किशोर गरड, नितीन शुक्ला, कैलास यंदे, सुरेश माखनिया यासह अनेकांनी आपल्या सूचना मांडल्या. देवांग जानी यांनी स्वागत व प्रास्ताविक केल तर नंदू मुठे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
उपस्थितांच्या सूचना
१ विविध कंपन्यांमधून नदीत सोडल्या जाणाऱ्या विषारी पाण्यावर बंदी आणावी.
२ निर्माल्य हे निर्माल्य कलशातच टाकले जाईल यांची सर्वांनी दक्षता घ्यावी.
३ नदीच्या पाण्यात गाड्या धुणे आणि कपडे धुणे यावर महापालिकेने बंदी आणावी.
४ नदीतील स्वच्छता वारंवार करावी. पाणवेली काढण्यासाठी कायमस्वरूपी विचार व्हावा.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images