Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मनपा शाळांमधील विद्यार्थी होणार टेक्नोसॅव्ही

$
0
0

शिक्षकच तयार करणार ई-लर्निंगचे सॉफ्टवेअर

ashwini.kawale @timesgroup.com

नाशिक : हलके दप्तर, तंत्रज्ञानाशी नाळ जोडण्याची गरज, शाळांचा विकास या सर्वांसाठी सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा 'ई-लर्निंग'ला प्राधान्य देत आहेत. मनपाच्या शाळांनीही तंत्रज्ञानाच्या या वाटेवर प्रवास सुरू केला खरा, मात्र तो पूर्ण होण्यापूर्वीच संपला. शाळांमधील तंत्रज्ञानाचा हाच प्रवास मजबूत करण्यासाठी आता थेट मनपा शाळांचे शिक्षक विडा उचलणार आहेत. तंत्रज्ञानाची कास धरुन ते स्वतः विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगचे सॉफ्टवेअर तयार करणार आहेत.

शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरल्यास विद्यार्थ्यांना आपोआपच त्याचे ज्ञान मिळेल, तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज, अभ्यासक्रम यांची माहिती असल्याने शिक्षकांचा सहभाग सॉफ्टवेअर निर्मितीत अग्रगण्य ठेवण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेने ई-लर्निंगसाठी खास सॉफ्टवेअर लाखो रुपये खर्च करुन विकत घेतले होते. मात्र हे सॉफ्टवेअर शिक्षणक्षेत्राची जाण नसलेल्यांनी तयार केली असल्याची तक्रार केली गेली. त्यातच इयत्ता तिसरी व चौथीचा अभ्यासक्रमही बदलल्याने हा खर्चही वाया गेला आणि हे सॉफ्टवेअर केवळ नावापुरते उरले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याप्रकारची परिस्थिती समोर आली होती. परिणामी, विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित ठरले.

यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेतर्फे घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व शिक्षा अभियानातील समावेशित शिक्षक या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स)चे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. यासाठी अद्याप राज्यातील २० हजार ४८७ शिक्षकांनी नोंदणी केली आहे. विद्या परिषदेकडून निवडलेले तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद व महारपालिकेतील शिक्षकांना या सॉफ्टवेअरसाठी दोन दिवसांचे रितसर प्रशिक्षण दिले जाणार आहे. मार्चअखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकणार आहेत.


संशोधनातून होणार निर्मिती

ई-लर्निंग सॉफ्टवेअर निर्मिती करुन घेण्यासाठी 'संशोधन' ही जमेची बाजू असणार आहे. इंटरनेटवरील सॉफ्टवेअर्सचा अभ्यास, ज्या शाळांमध्ये ई-लर्निंग उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे, अशा शाळांना भेटी, कॉम्प्युटर तज्ज्ञांशी विचारविनिमय अशा अनेक बाबींच्या संशोधनातून या सॉफ्टवेअरची निर्मिती शिक्षक करणार आहेत.



विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख शालेय वयापासूनच व्हावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. शिक्षकांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजी, आजोबा अन् नातवंडांची धमाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजी आजोबा आणि नातवंडं असं उबदार नातं, तीन पिढ्यांच्या घट्ट बंधनात टिकून असतं. आजी-आजोबा व नातवंडे यांच्यातील अनामिक प्रेमाला उजाळा देण्यासाठी व्हॅलेंटाइन डे या प्रेम अधोरेखित करणाऱ्या दिवशी आजी आजोबा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.

आजी आजोबा हे जगातील पहिले विकिपीडिया असल्याचे सांगत तरुणांनी घडवून आणलेल्या आजी आजोबा कृतज्ञता सोहळा या अनोख्या उपक्रमाचे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कौतूक केले. गंगापूर रोडवरील स्व. प्रमोद महाजन उद्यान येथे नातवंडं आणि आजी-आजोबा यांचे नाते दृढ करण्यासाठी सनविवि, एकनिष्ठ व नमस्कार फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त डॉ. गेडाम यांची उपस्थिती होती. तसेच सचिन जोशी, आमदार देवयानी फरांदे, प्रा. सुहास फरांदे, सीताबाई मोरे, समुपदेशक डॉ. संदीप भानोसे, नंदकुमार भुतडा, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांची कार्यक्रमात उपस्थिती होती.

यावेळी सचिन जोशी यांनी आपल्या आजी आजोबांच्या आठवणींना उजाळा देत आजी आजोबांबद्दल प्रेमभाव व्यक्त केला. तसेच कार्यक्रमाच्या सेलिब्रिटी ठरलेल्या सीताबाई मोरे यांनी आजी आजोबांनी वार्धक्याने खचून न जाता आनंदाने आयुष्य जगण्याचा सल्ला उपस्थितीतांना दिला तसेच ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी आजी आजोबा यांच्यात संवाद घडवून आणून त्यातून आजी आजोबा, नातवंडं तसेच कुटुंब पद्धती यातील विविध गोष्टींचा उलगडा केला. गीता माळी यांनी गायलेल्या गीतांवर आजी आजोबांनी आपल्या नातवंडांसमवेत ठेका धरला. आजी आजोबांनी समवेत फुगड्या खेळून आनंद लुटला.

या कार्यक्रमाला नाशिक शहरातील आजी आजोबा आपल्या नातवंडांसमवेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सनविविचे धीरज बच्छाव, एकनिष्ठचे योगेश गांगुर्डे आणि नमस्कारचे हर्षल खैरनार यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पसच्या सुरक्षेसाठी हवी प्राचार्यांमध्ये एकजूट

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

गोखले एज्युकेशन कॅम्पसमधील काही कॉलेजेसमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेली गुंडागर्दी आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने सोमवारी आरवायके कॉलेजात विद्यार्थी सभेची ब्रीफ म‌िट‌िंग पार पडली. यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये असलेल्या एचपीटी आरवायके, एसएमआरके, एनबीटी लॉ, गोखले इंजिनीअरिंग, बिवायके, फार्मसी, इंटरपरिनिअरशीप कॉलेजेसच्या प्राचार्यांचे यासाठी एकमत झाल्यासचं या कार्यवाही यशस्वीपणे राबविल्या जाऊ शकते असाही सूर यावेळी प्रकटला.

उपप्राचार्य यांच्या कार्यालयात ही मिटिंग पार पडली. यात प्रामुख्याने कॉलेजच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला गेला. कॉलेजच्या आवारात सातत्याने घडणाऱ्या मारामाऱ्या, सीसीटीव्हींची दुरूस्ती, लेडीज रूमसाठीच्या सुविधा या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या सर्व मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना पार्किंगसाठी स्ट‌िकर सिस्ट‌िम सुरू करणे, कॉलेजियन्स व्यक्तिरिक्त येणाऱ्याना काम विचारून गेट पास देत त्याची योग्य शहानिशा करणे, कॉलेजमध्ये असलेला सिक्युरिटी स्टाफ महिन्याला बदलण्यात यावा, यासोबतच ड्रेस कोड ठरवत पार्किंग उपलब्ध करून देऊन त्यानुसार फॉलोअप घेणे, असे कार्यवाहीचे निकष मांडण्यात आले. हे निकष आंमलात आणण्यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसनी यासाठी पाठिंबा दर्शवल्यास हे शक्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश ताजने सहावा

$
0
0

गणेश ताजने सहावा अखिल भारतीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळगाव येथे ९ ते १४ पेब्रुवारी दरम्यान झालेल्या अखिल भारतीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकचा आंतरराष्ट्रीय मानांकीत खेळाडू गणेश ताजनेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सहावा क्रमांक पटकावत सात हजारांचे बक्षीस जिंकले.

जळगावच्या स्पर्धेत तीन आंतरराष्ट्रीय मास्टरसह शंभर आंतरराष्ट्रीय मानांकीत खेळाडू सहभागी असूनसुद्धा गणेशने या स्पर्धेत चमक दाखविली तर दिल्लीच्या स्पर्धेत भारतासह आशियाई देशातील एकूण सहाशे खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी ५३८ खेळाडू आंतरराष्ट्रीय मानांकीत होते. स्पर्धा अतिशय अटीतटीच्या झाल्या. तरीसुद्धा गणेशने आत्मविश्वास कायम ठेवून यश मिळविले. त्याने या स्पर्धेमधून तब्बल शंभर एलो रेटिंग गुणाची कमाई केली. त्याअगोदर दिल्ली येथे झालेल्या १४व्या आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर (बी ग्रुप) बुद्धिबळ स्पर्धेत त्याने १३वा क्रमांक मिळवला व रोख १५ हजारांचे बक्षीस जिंकले. तो शताब्दी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असून गेल्या वर्षीपासून तो विविध राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन उल्लेखनीय यश मिळवत आहे. बुद्धिबळचे प्रशिक्षण तो नाशिकचे राष्ट्रीय खेळाडू व नामवंत प्रशिक्षक विनोद भागवत व तुषार गोसावी यांच्याकडे घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा बिल्लाडेला सुवर्णपदक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभाग व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुडो मार्शल आर्ट स्पर्धेत येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा बिल्लाडे हिने सुवर्णपदक पटकावले.

५ ते ६ फेब्रुवारी या दरम्यान धारावी (मुंबई) येथील भारतरत्न राजीव गांधी क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत राज्यभरातील १९ वर्षांखालील मुले व मुली सहभागी झाले होते.

येवल्यातील स्वामी मुक्तानंद कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा राजेंद्र बिल्लाडे हिने तालुका, जिल्हा, विभाग असे विविध टप्पे पार केल्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. राज्यस्तरीय कुडो स्पर्धेत प्रतीक्षा बिल्लाडे हिने चमकदार कामगिरी करत पुणे, मुंबईच्या खेळाडूंवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यावर्षी प्रतीक्षा बिल्लाडे हिने कराटे, चॉयक्वांदो, कबड्डी, खो-खो, किक-बॉक्सिंग, मैदानी स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याने तिची तिची विभागीय पातळीपर्यंत निवड झाली आहे.

प्रतीक्षा बिल्लाडे हिला कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. जी. जे. सोनवणे, गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद नागडेकर, सचिव दीपक गायकवाड, प्राचार्य सी. ए. दुकळे, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. निकम आदींचे मार्गदर्शन तिला लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तकी वाचन महत्त्वाचे’

$
0
0

नाशिक : 'व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणायचा असेल तर वाचन वाढवायला हवं. व्यक्तीच्या विचाराने त्याचे व्यक्तिमत्त्व घडत असतं. विचार कौशल्य हे विविध पुस्तकांच्या अवांतर वाचनाने विकसित होत असल्याने व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी वाचन करायला हवं. व्यक्तिमत्व विकासाचे टॉनिक म्हणजे पुस्तकांची पाने आहेत.' असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डीन डॉ. पुंडलिक रसाळ यांनी केले.


एचपीटी कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बही:शाल शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने एचपीटीत बॅरिस्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. बॅ. जयकर व्याख्यानमालेचे उद् घाटन सोमवारी (ता.१५) रोजी करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, प्रा. आर. बी. बागुल, प्रा. रामदास भोंग, प्रा. ए. जे. बोडके उपस्थित होते.

डॉ. रसाळ म्हणाले,'व्यक्तीचे बाह्यसौंदर्य म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी फॅशन करण्यापेक्षा कर्तृत्वातून व्यक्तिमत्व घडवले पाहिजे. व्यक्तीचे विचार सौंदर्य विकसित झालं की, व्यक्तिमत्वही विकसित होतं.' यावेळी विद्यार्थ्यांना व्यक्त‌िमत्व विकासाच्या टिप्स देण्यात आल्या. व्याख्यानमालेत आज (ता.१६) सकाळी १० ते ११ यावेळेत डॉ. आर. पी. भामरे हे स्पर्धा परीक्षा पूर्वपरीक्षा तर उद्या (ता.१७) सकाळी १० ते ११ या वेळेत अॅड. जयश्री मालपुरे या महिलांच्या कोर्टविषयक समस्या या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची महासभा ठरणार वादळी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणीकपात, सरकारचे नवे टीडीआर व नगरसेवक विकासनिधीवरून मंगळवारी, आज होणारी महासभा वादळी होणार आहे. सरकारकडून नाशिकवर सुरू असलेल्या अन्यायावरून मनसे आणि शिवसेना पुन्हा महासभेत भाजपला घेरण्याच्या तयारीत आहे. मनसे टीडीआर धोरणाविरूद्ध लक्षवेधी आणणार आहे तर शिवसेना टीडीआर धोरण रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करणार आहे. सोबतच पाणीकपातीवरून प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. दरम्यान, नाशिकचे ब्रॅडिंग करण्यासाठी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर नेमण्यासह, नाशिकरोड क्रीडांगण, बचत गटांची नियमावली बदलाचे प्रस्ताव महासभेत आहेत.

महापालिकेची महासभा महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या सभेत नाशिकचे ब्रॅडिंगसाठी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात धावपटू कविता राऊत, सायकलपटू डॉ. महाजन बंधू, चित्रकार सावंत बंधू, शिशिर शिंदे, अभिनेता चिन्मय उदगीकर यापैकी एकाची निवड केली जाणार आहे. सोबतच नाशिकरोडच्या क्रीडांगणासाठी ७५ लाखाचा निधी देण्याचा प्रस्ताव आहे. तर वैद्यकीय अधिकाऱ्याचे वय ५८ वरून ६० करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबत नगरसेवकांच्या विविध विकासकामांचेही प्रस्ताव चर्चेला येणार आहे.

विकासकामांचे प्रस्ताव असले तरी, महासभेत पाणीकपात आणि टीडीआर धोरणावरूनच महासभा वादळी होण्याची शक्यता आहे. भाजपला पुन्हा घेरण्याची तयारी मनसेसह शिवसेनेनेही केली आहे. मनसेचे गटनेते अनिल मटाले लक्षवेधी मांडणार आहे. तर शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्तेंनी टीडीआर धोरण रद्द करण्यासाठी महासभेत प्रस्ताव मांडणार आहेत. टीडीआर धोरणामुळे नाशिकचा विकास खुंटणार आहे. तर हा निर्णय बड्या बिल्डरांसाठीच घेतला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे टीडीआर धोरणावरून भाजपसह सरकारला घेरले जाणार आहे. तर शहरात होणाऱ्या छुप्या पाणीकपातीवरून सुद्धा महासभेत पुन्हा वादळी चर्चा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बचतगटांसाठी होणार नियम बदल

दरम्यान, महापालिकेने शहरातील 286 उद्यानांची देखभाल व दुरूस्तीचे काम बचतगटांना दिले होते. परंतु मनपाच्या या निवीदा प्रक्रियेला बचतगटाकंडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने ठेकेदारांसाठी नियमावली तयार केली होती. ही नियमावलीच आता बदलली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेवर नवीन प्रस्ताव ठेवण्यात आला असून, अटीशर्तीमंध्ये फेरबदल करण्यात आले आहे. ठेकेदारांसाठी असलेल्या जाचक अटी काढून बचत गटांच्या सोयीच्या अटीशर्ती टाकल्या जाणार आहेत.

टीडीआर धोरण बड्या बिल्डरांना समोर ठेवून तयार केले आहे. सर्वसामान्य माणसाला त्याचा काहीच फायदा नाही. सर्वसामान्यांना संपवायचे मोठे रॅकेटच आहे. त्यामुळे या टीडीआर धोरणाचा विरोध करण्यासाठी एकमताने प्रस्ताव पारीत करून शासनाला पाठविला जाणार आहे.

पाण्यासाठी अकरा कोटी

शहरातील पाणीकपातीवर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने महासभेवर अकरा कोटी रुपये मिळावेत, असा प्रस्ताव सादर केला आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, शहरात नव्याने बोअरवेल्स करणे, गंगापूर धरणावर नवीन पॅनल्स बसवणे, चेहेडी बंधाऱ्यावर फ्लोटिंग पंपसेट बसविणे, पाईपलाईनची दुरूस्ती, टँकर भाड्याने घेण्यासाठी तब्बल अकरा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रस्तावावरूनही सभेत वाद होणार आहे. नाशिकचे हक्काचे पाणी पळविल्याने शासनानेच हा निधी द्यावा, अशी मागणी सभागृहाकडून केली जाण्याची शक्यता आहे.

अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

नव्या टीडीआर धोरणामुळे थेट नाशिकच्या विकासावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मनसेचा या धोरणाला विरोध आहे. शहराच्या विकासाला अडथळा ठरणारे हे धोरण असून, त्यावर महासभेत चर्चा होणे अपेक्षित आहे.

अनिल मटाले, गटनेता, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मविप्र’ संचालकांची कोर्टात हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदनामीप्रकरणी दाखल दाव्याच्या सुनावणीसाठी सोमवारी दुपारी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नील‌िमा पवार यांच्यासह इतर संचालकांनी कोर्टात हजेरी लावली. पुढील सुनावणीपर्यंत संचालक मंडळातील सदस्यांना वैयक्तिक जात मुचलक्यावर कोर्टाने सोडले. यामुळे संस्थेत खळबळ उडाली आहे.

मविप्र संस्थेचे आजीव सभासद भाऊसाहेब गडाख यांनी काही वर्षांपूर्वी संस्थेच्या कार्यपध्दतीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. संस्थेच्या मालकीच्या जागेचा टीडीआर महापालिका घेत असताना तो कमी किंमतीत विक्री करण्यात आला. डोनेशनच्या पैशांच्या अपहार होत असून, यात संस्थेच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाते. कॅन्ट‌ीन भाडे, मयताचे वारस सभासद करताना होत असलेली अनियमितता अशा विविध मुद्द्यांवरून गडाख यांनी धर्मदाय आयुक्तांसह विविध ठिकाणी अर्ज केले.

याचा परिणाम म्हणून संचालक मंडळाने सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न करताना बदनामी करण्यात आल्याचा आरोप गडाख यांनी केला होता.

मानहानीमुळे काही व्यक्ती, सभासद व नातेवाईकांनी सामाजिक बंधने आणली असा दावा करुन गडाख यांनी संचालक मंडळाविरोधात प्रथम न्याय दंडाधिकारी अमित टेकाळे यांच्या कोर्टात भारतीय दंड विधान कलम ५०० नुसार दाद मागितली. काही साक्षीदारांनी कोर्टाला सांगितल्यानुसार गडाख यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने कोर्टाने संस्थेचे अध्यक्ष प्रताप सोनवणे, सभापती नितीन ठाकरे, उपसभापती नानाजी दळवी, सरचिटणीस नील‌िमा पवार, चिटणीस सुनील ढिकले, कार्यकारी मंडळ सदस्य भाऊसाहेब खताळे, रविंद्र देवरे, शिरीष कोतवाल, श्रीराम शेटे, नामदेव महाले, दिलीप मोरे, दिलीप पाटील, भरत कापडणीस, तुषार शेवाळे, अंबादास बनकर, कृष्णा भगत, विश्राम निकम, मुरलीधर पाटील, भाऊसाहेब पाटील, नंदू कोर, अशोक पिंगळे या सर्वांना समन्स काढून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, प्रताप सोनवणे, अॅड. नितीन ठाकरे आणि मुरलीधर पाटील हे तिघे वगळता इतर पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कोर्टात हजेरी लावली.

फिर्यादीतर्फे अॅड. आय. वाय. पटेल यांनी युक्तिवाद केला. संबंध‌ित पदाधिकाऱ्यांना वैयक्तीक जात मुचलक्यावर सोडण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चांगल्या गोष्टींचे कौतुक करण्याचे कौशल्य हवे’

$
0
0

लेज क्लब रिपोर्टर कळवण : 'यशाचे शिखर गाठत असताना अहंकाराला थारादेता चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा अंगी असणे गरजेचे असते. इतरांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास आयुष्य अधिक आनंदी बनते.' असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केले. कळवण एज्युकेशन सोसायटी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सरचिटणीस बेबिलाल संचेती, पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. रावसाहेब शिंदे, प्राचार्या डॉ. उषा शिंदे, विश्वस्त सुमन देवरे, राफियोद्दिन शेख, व्ही. के. व्यवहारे आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले,'आज दुसऱ्याचे कौतुक करण्यापेक्षा वाईट गोष्टींकडेच लक्ष दिले जात असून खेकडा प्रवृत्ती समाजासाठी घातक आहे. तरुण पिढीने सोशल मीड‌ियाच्या अतिआहारीजाता विधायकतेची वाट जोपासत रचनात्मक कार्य उभे करून स्वतःमधील वेगळेपण सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. छत्रपती शिवरायांवर अनेक संकटे आली मात्र त्याही परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला असे सांगत आपल्या आयुष्यात ज्या ज्या वेळी संकटे किंवा संघर्ष करण्याची वेळ येईल त्यावेळी शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.' प्राचार्या डॉ. उषाताई शिंदे म्हणाल्या,'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील राहील.' प्रगती परदेशी हिने सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. टी. बी. खैरनार यांनी वार्षिक अहवाल वाचन तर प्रा. भदाणे यांनी जिमखाना अहवाल वाचन केले. यावेळी उपप्राचार्य के. पी. चव्हाण, प्रा. आर. बी. आहेर, प्रा. राजेंद्र कापडे, प्रा. डॉ. बी. एस. पगार, प्रा. डॉ. एस. जे. पवार, प्रा. यु. के. पवार, प्रा. एन. बी. कोठावदे उपस्थित होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य घोटाळ्यातील दोघांना ‘एमसीआर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या रेशन धान्य घोटाळ्यातील कोल्हापूरच्या दोघा संशयितांना कोर्टाने आज, सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोल्हापूरच्या गणपती रोलर फ्लोअर मीलचा मालक अश्विन सुरेश जैन व व्यवस्थापक प्रकाश माधवराव शेवाळे अशी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना दुपारी विशेष मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिस तपासामध्ये या दोघा संशयीतांनी घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार जितूभाई ठक्कर याच्याकडून वेळोवेळी सव्वा तीन कोटी रुपयांचे रेशनचे धान्य खरेदी केले आणि त्याचे धनादेश बनावट कंपन्यांच्या नावाने दिल्याचे समोर आले होते. कमी भावात घेतलेल्या धान्याचे पीट बनवून त्याची विक्री करण्याचे काम संशयित करीत होते. मात्र, मुख्य स‌ूत्रधार जितूभाई पकडला गेल्यानंतर जैन व शेवाळे यांचा घोटाळ्यातील सहभाग कसा होता, हे स्पष्ट होणार आहे. यामुळे जीतुभाई ठक्करला अटक झाल्यानंतर या दोघांना पुन्हा पोलिस कोठडी मिळण्याचा हक्क अबाध‌ित ठेवत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, १३७ रेशन दुकानदारांची यादी न्यायालयालस सादर करण्यात आली असून त्यापैकी ८४ दुकानांची तपासणी करून त्यांची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पसच्या सुरक्षेसाठी हवी प्राचार्यांमध्ये एकजूट

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

गोखले एज्युकेशन कॅम्पसमधील काही कॉलेजेसमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेली गुंडागर्दी आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने सोमवारी आरवायके कॉलेजात विद्यार्थी सभेची ब्रीफ म‌िट‌िंग पार पडली. यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये असलेल्या एचपीटी आरवायके, एसएमआरके, एनबीटी लॉ, गोखले इंजिनीअरिंग, बिवायके, फार्मसी, इंटरपरिनिअरशीप कॉलेजेसच्या प्राचार्यांचे यासाठी एकमत झाल्यासचं या कार्यवाही यशस्वीपणे राबविल्या जाऊ शकते असाही सूर यावेळी प्रकटला.

उपप्राचार्य यांच्या कार्यालयात ही मिटिंग पार पडली. यात प्रामुख्याने कॉलेजच्या सुरक्षेचा प्रश्न मांडला गेला. कॉलेजच्या आवारात सातत्याने घडणाऱ्या मारामाऱ्या, सीसीटीव्हींची दुरूस्ती, लेडीज रूमसाठीच्या सुविधा या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. या सर्व मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना पार्किंगसाठी स्ट‌िकर सिस्ट‌िम सुरू करणे, कॉलेजियन्स व्यक्तिरिक्त येणाऱ्याना काम विचारून गेट पास देत त्याची योग्य शहानिशा करणे, कॉलेजमध्ये असलेला सिक्युरिटी स्टाफ महिन्याला बदलण्यात यावा, यासोबतच ड्रेस कोड ठरवत पार्किंग उपलब्ध करून देऊन त्यानुसार फॉलोअप घेणे, असे कार्यवाहीचे निकष मांडण्यात आले. हे निकष आंमलात आणण्यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसनी यासाठी पाठिंबा दर्शवल्यास हे शक्य आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गेल इंड‌ियातर्फे टॅलेंट सर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक टोक‌ियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरातून १०० मीटर, २०० मीटर व ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सहभागी होण्यासाठी गेल इंड‌िया स्पोर्ट स्टार व नॅशनल युवा को-ऑप सोसायटी यांच्यावतीने 'गेल रफ्तार' ही टॅलेंट सर्च मोहीम राबविण्यात येणार आहे. नाशिकमध्ये मीनाताई ठाकरे स्टेड‌ियम हिरावाडी औरंगाबाद नाका पंचवटी येथे १८ फेब्रुवारी सकाळीवाजता या मोहिमेला सुरुवात होणार आहे. निवड प्रक्रिया ते ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडू सहभागी होण्यापर्यंत येणारा सर्व खर्च भारत सरकारच्या गेल इंड‌िया या कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. नॅशनल युवा को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या माध्यामातून ही निवड प्रक्रीया आयोजित केली आहे. या क्रीडा प्रकारात ११ ते १७ वयोगटातील कोणतेही खेळाडू (शाळेत जाणारेशाळाबाह्य) असे सहभागी होऊ शकणार आहे. या खेळाडूंची जिल्हा, राज्यराष्ट्रीय पातळीवर निवडचाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर निवडलेल्या खेळाडूंना पी. टी. उषा, रचिता मिस्त्री, अनुराधा बिस्वाल आणि कविता राऊत यांच्या सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे खेळाडूंना २०२० पर्यंत पूर्ण प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची तयारी करुन घेण्यात येणार आहे. तसेच खेळाडूंना भारतीयपरदेशी खेळाडूंचे मार्गदर्शन, फिजीओथेरपिस्ट, आहार, मानसिक तंदुरुस्ती इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्य़ा खेळाडूंना या निवड प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल असा खेळाडूंनी स्पर्धेपूर्वी सहभागाबद्दलचा अर्ज करणे आवश्यक आहे. हे सर्व अर्ज www.gailindiaspeedstar.org या वेसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सुरुवातीला ही स्पर्धा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये होणार असून नाशिक (१८ फेब्रुवारी), जळगाव (२० फेब्रुवारी), मुंबई (२२ फेब्रुवारी), धुळे व अहमदनगर (२३ फेब्रुवारी), पुणे (२४ फेब्रुवारी) या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. राज्य निवड चाचणी स्पर्धा २७ व २८ फेब्रुवारी रोजी बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हळहळले भयाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना प्राणांची आहुती देणारे वीर जवान शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर भयाळे (ता. चांदवड) गावी आज, सोमवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भूमिपुत्राच्या धाडसी कामगिरीचा अभिमान बाळगतानाच, वीर सुपुत्र गमावल्याचे दुःख शिंदे कुटुंबीयांबरोबरच गावकऱ्यांच्या आसवांमध्ये स्पष्ट दिसत होते. शंकर शिंदे अमर रहे... वंदे मातरम... भारत माता की जय... या घोषणाबाजीतच भयाळेसह संपूर्ण पंचक्रोशी हळहळली.

शंकर शिंदे ज्या शाळेत शिकले, त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील जागेत त्यांना निरोप देण्यात आला. भाऊ केशव शिंदे आणि दीड वर्षांचा मुलगा ओम यांनी अग्निडाग दिला. देवळाली कॅम्प सैन्य दलाच्यावतीने बँडची धून वाजवून अन् आकाशात बंदुकीच्या फैरी झाडून शहीद शंकर यांना मानवंदना देण्यात आली. या वेळी तालुक्यातील विविध गावांहून आलेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. घरातील कर्ता मुलगा गेल्याने शिंदे कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्टांचा शोक पाहून सारेच उपस्थित हेलावले होते.

राज्य सरकार शंकर शिंदे यांच्या पाठिशी असल्याचा मुख्यमंत्र्यांचा संदेश सहकार मंत्री दादा भुसे यांनी वाचून दाखवला. शंकर यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेतर्फे पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणाही करण्यात आली. ब्रिगेडियर पी. एन. मुरली, कर्नल असिन डे, कर्नल सुनील उपाध्याय, खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल आहेर, शिरीष कोतवाल यांच्यासह स्थानिक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. शहीद शंकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यापूर्वी देवळालीतील टेंपल हिल रोडवरील शवागृहात ठेवण्यात आले होते. पहाटे लष्करी अधिकाऱ्यांसह पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, खासदार हेमंत गोडसे आदिंनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८०० कोटींचा नाशिकला बूस्ट

$
0
0

Tushar.pawar@

timesgroup.com

मुंबई : गत काही कालावधीपासून मंदीचा सामना करणाऱ्या नाशिक विभातील उद्योगाला 'मेक इन इंडिया' च्या प्रवाहाने तब्बल २८०७.५४ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून नवसंजीवनी दिली आहे. 'मेक इन इंडिया' वीकमध्ये सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

ऑटो उद्योगातील महिंद्रा अँड महिंद्राच्या एकट्या नाशिक युनिटसोबत १५०० कोटींचा करार करण्यात आला आहे. नाशिकमधील उद्योगांच्या वाट्याला या करारातून सुमारे २३२६.५५ कोटींची गुंतवणूक येणार आहे. यातील उर्वरित १३०७.५४ कोटी रुपयांची गुंतवणूक ४३८ लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये करण्यात येणार आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि समूह अध्यक्ष पवन गोएंका यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. तर सूक्ष्म आणि लघु उद्योगांसोबत उद्योग विभागाचे विकास आयुक्त सुरेंद्रकुमार बागडे यांनी करारावर स्वाक्षरी केली. नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यासह जळगाव, धुळे, नंदूरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ही २८०० कोटींची गुंतवणूक नव्याने करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन गुन्हेगाराकडून शेतमजुराचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतीच्या कामासाठी शहरात आलेल्या मजुरांच्या तांड्यातील महिलेशी अंगलट करण्यास मज्जाव केल्याने एका अल्पवयीन मुलाने शेतमजुराचा खून केला. ही घटना पंचवटी पेठरोडवरील भक्तीधाम चौकात घडली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलावर काही दिवसांपूर्वीच खूनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेतमजुरीच्या शोधात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गारमळ येथील ४० ते ५० जणांचा एक तांडा शहरात आला होता. पुढील प्रवास करण्यापूर्वी रात्र झाल्याने हे सर्व मजूर भक्तीधाम समोरील फुटपाथवर झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास नर्मदा लहारे तिचा पती लक्ष्मण लहारे, सुनील तुकाराम निकुळे व त्यांचे इतर साथीदार झोपलेले असताना पायाजवळ काहीतरी हालचाल होत असल्याचे नर्मदा लहारे यांच्या लक्षात आले. झोपेतून जागे झालेल्या नर्मदाबाईंनी आरडाओरड करताच संशयित मुलाने दिंडोरीरोडच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी सुनील निकुळे व इतर तरूणांनी त्याचा पाठलाग केला असता संशयिताने त्यांच्यावर दगडफेक केली व आरोपी अंधारात लपला. त्याच्या शोधात असलेल्या सुनील निकुळे बेसावध असताना आरोपीने पाठीमागून येऊन त्याच्या पोटावर चाकू हल्ला केला. वर्मी घाव बसलेला सुनील रक्ताच्या थारोळ्यात पडला. दरम्यान, त्याचे साथीदार तिथे पोहचले. सदरची घटना एका वाचमॅनने पोलिसांना कळवली. या घटनेनंतर फरार झालेल्या संशयितास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंध‌ित अल्यवयीन मुलावर यापूर्वी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पंचवटी पोलिस स्टेशनचे सीनीअर पीआय प्रकाश सपकाळे यांनी दिली. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार करीत आहे.

संशयितांना कोठडी

जागा खाली करून घेण्यासाठी धमकी देऊन दमदाटी करणाऱ्या १३ ते १४ जणांच्या टोळीला कोर्टाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. पंचवटी पोलिसांनी सर्वांना रविवारी अटक केली होती. कोठडी मिळालेल्यांमध्ये बिल्डर गुलाब त्रिपाठी, किरण दत्तात्रय शेळके, विनायक दिपक लाटे, अक्षय रमेश धार्डे, विकी संतोष परदेशी, निलेश राजू जाधव, किरण मधुकर सोनवणे, राहुल बाबाजी पाटील, रमेश बाळु साळवे, रमेश रोशन बोधक, केतन विलास हिरवे, विजय राजेंद्र पाटील, आकाश चंद्रकात भाग्यवंत तसेच गंगाधर लक्ष्मण दिघोळे इत्यादी संशयितांचा समावेश आहे. पेठरोडवरील रत्नाकर विश्वनाथ कोठुळे (५५) हे भाडेकरू म्हणून वापरत असलेली जागा खाली करून घेण्यासाठी वरील संशयितांनी रविवारी दुपारी उन्नत्ती शाळेच्या पाठीमागे असलेल्या म्हशीच्या गोठ्यात जाऊन कोठुळे यांना हाणामारी करीत जागा सोडण्याची धमकी दिली होती.

एकलहरेत घरफोडी

एकलहरेतील भोर मळा आणि शिंदे पळसे येथे अशा दोन घरफोड्या झाल्याची नोंद नाशिकरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, एकलहरे मार्गावरील भोरमळा येथील विठ्ठल मंदिराजवळ राहणारे गोरख जयराम भोर हे कुटुंबासह रात्री झोपी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मागील खिडकीतून प्रवेश केला. कपाटातील आठ तोळे सोन्याचे दागिने व रोख ४८ हजार असा १ लाख ७७ हजाराचा एवज लांबवला. दुसऱ्या घटनेत शिंदे गावातील सप्तशृंगी नगरमध्ये राहणारे महेंद्र नामदेव जाधव रविवारी सायंकाळी कामानिमित्त कुटुंबीयांसह बाहेर गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधत कपाटातील ३९ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने नेले.

विह‌िरीत पडून मृत्यू

पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या वनिता नरसकर (६३, जगताप मळा, नाशिकरोड) महिलेचा पाय घसरुन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिधापत्रिका आधारशी जोडण्यासाठी लगीनघाई

$
0
0






pravin.bidve@

timesgroup.com

नाशिक : लाभधारकांचे आधारक्रमांक रेशनकार्डला जोडण्याच्या कार्यवाहीत नाशिक जिल्हा राज्यात सर्वात पिछाडीवर असल्याची माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत केवळ ४० टक्केच लाभधारकांची रेशनकार्ड आधारला जोडण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदी स्वत: या कामाचा आढावा घेणार असल्याने येत्या १० दिवसांत तब्बल १३ लाख रेशनकार्ड धारकांची आधारजोडणी करण्याचे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे.

सुरगाणा रेशन धान्य घोटाळा आणि रेशन धान्य घोटाळ्यामुळे राज्यात नाशिक जिल्हा प्रशासनाची पुरती बदनामी झाली. या प्रकरणात निलंबित आठ तहसीलदारांना पुन्हा सेवेत रूजू करण्यात आले. मात्र, नाशिक पुरवठा विभागाला लागलेला काळा डाग पुसला गेलेला नाही. बोगस शिधापत्रिकाधारक, दारिद्र्यरेषेखाली नसतानाही आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना सरकारकडून दिले जाणारे लाभ मिळविणारे बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारने आधारक्रमांक रेशनकार्डला

जोडण्याची मोहीम हाती घेतली. नाशिकमध्ये ४० टक्केच काम पूर्ण होऊ शकले आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असून, २६ फेब्रुवारीला त्यांनी याबाबत दिल्लीत विशेष बैठक बोलावली आहे. तोपर्यंत आधारजोडणीचे ७५ टक्के काम पूर्ण करण्याचे आदेश पुरवठा विभागाच्या सचिवांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. हे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‌निलंबनासारखी कठोर कारवाई होऊ शकते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रेयच्या १५ कंपन्यांवर दोघेच संचालक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मैत्रेय ग्रुपच्या संचालिका वर्षा सत्पाळकरांच्या पोलिस कोठडीत आज, सोमवारी चार दिवसांची वाढ करण्यात आली. मैत्रेय ग्रुपच्या एकूण १५ कंपन्या असल्याचे निष्पन्न झाले असून, सर्व कंपन्यांमध्ये वर्षा सत्पाळकर व त्यांचा भाऊ जनार्दन अरविंद परूळेकर हे दोनच संचालक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या दोघांनी ठेवीदाराकडून कोट्यवधी रुपये घेऊन ते कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानत कोर्टाने सत्पाळकरांच्या कोठडीत वाढ केली.

आजपर्यंत पोलिसांनी २६३ गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, हा ओघ वाढताच आहे. यामुळे फसवणुकीचा आकडा वाढत असल्याचे पोलिसांतर्फे सरकारी पक्षाने कोर्टात स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाचे वकील अॅड. राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद करताना सेबीच्या २०१३च्या निर्देशानंतर कंपनीने गुंतवणुकदारांकडून पैसे स्वीकारले नसल्याचे सांगितले. ८०० कोटी रुपयांपैकी ७६७ कोटी रूपये परत करण्यात आले असून वर्षा सत्पाळकरांना पोलिस कोठडी देऊ नये अशी विनंती केली. सरकारी पक्षातर्फे अॅड. पंकज चंद्रकोर यांनी मालमत्तेचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरूच असल्याचा युक्तिवाद केला. कंपनीकडे ६०० कर्मचारी असून त्यातील काहींची चौकशी करणे आवश्यक असून या गुन्ह्यातील दुसरे संशयित जनार्धन परूळेकर अद्याप फरार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ शहरांत नाशिकची घसरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नवी दिल्ली/नाशिक

देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये नाशिकची आठव्या स्थानावरून ३१ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. `स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक` असे ब्रीद मिरवणाऱ्या नाशिकची स्वच्छ शहरांच्या यादीतील घसरण नाशिकमधील नेतृत्व तसेच सामान्य नाशिककरांसाठीही नक्कीच भूषणावह बाब नाही. आधीच केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या टप्प्यात नाशिकला हुलकावणी मिळालेली आहे.

सन २०१४ मध्ये देशातील स्वच्छ शहरांमध्ये नाशिकचे स्थान आठवे होते. यंदा त्यात २३ नंबरने घसरण झाली असून, नाशिक थेट ३१ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. घंटागाडीचा वाद, सिंहस्थ कुंभमेळ्यातील अस्वच्छता, खतप्रकल्पाचे भिजत घोंगडे याचा परिणाम थेट नाशिकच्या रँकिंगवर झाल्याचे मानले जात आहे. सोबतच शहर स्वच्छतेसाठी नव्याने काम करण्याची गरज असल्याचाही संदेश यातून मिळाला आहे. आज केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी एका पत्रकार परिषदेत देशातील ७३ शहरांची स्वच्छतेनिहाय यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांनी यंदा अव्वल दहातील आपले स्थान गमावले. राज्यातील औरंगाबाद (५६ वा क्रमांक) तसेच कल्याण-डोंबिवली (६४ वा क्रमांक) ही शहरे स्वच्छतेच्या आघाडीवर अतिशय संथगतीने वाटचाल करीत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

२०१४ च्या यादीत दहा अव्वल शहरांमध्ये समावेश असलेल्या महाराष्ट्रातील नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांनी यंदा आपले स्थान गमावले. २०१४ च्या सर्वेक्षणातही म्हैसूरने अव्वल क्रमांक पटकावला होता, तर पिंपरी-चिंचवड नवव्याच स्थानावर होते. २०१४ साली मुंबईचा दुसरा, पुण्याचा पाचवा आणि नाशिकचा आठवा क्रमांक लागला होता. यंदाच्या यादीत पुणे अकराव्या, तर नवी मुंबई बाराव्या क्रमांकावर आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी चोरी पडणार शेतकऱ्याला महागात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाइपला तालुक्यातील पुरणगाव येथील एका शेतकऱ्याने अनधिकृत नळ जोडणी करून ते पाणी शेतीसाठी वापरल्याची बाब उघडकीस आली आहे. पाणीचोरी केल्याचा ठपका ठेवत पाणीपुरवठा योजना व्यवस्थापन समितीच्या वतीने संबंधित शेतकऱ्यास तब्बल २ लाख ३० हजार रुपये दंड भरण्याची तंबी दिली आहे. दोन दिवसात दंड न भरल्यास पाणी चोरी विरोधात व पाणी योजनेच्या नुकसानीस जबाबदार धरून पोलिसात रितसर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

येवला तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सन २०१२ पासून संयुक्त पाणीपुरवठा समितीच्या वतीने व्यवस्थापन करताना चालविण्यात येत आहे. तालुक्यातील जळगाव नेऊर, मानोरी, नेऊरगाव, देशमाने या गावाकडे योजनेतून जाणाऱ्या जलवाहिनीतून या गावांना पाणी कमी पोहचते ही शंका आल्यावर योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी पाइपलाइनला ज्ञानेश्वर बाळकृष्ण ठोंबरे यांनी पुरणगाव शिवारात अनधिकृत कनेक्शन घेऊन शेतात पाणी चोरी केल्याचे निदर्शनास आले.

ठोंबरे यांनी २० ते २१ लक्ष लिटर शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाण्याचा शेतीसाठी अपव्यय करून सदर पाइपलाइनचे नुकसान केले असल्याचे योजना समितीचे म्हणणे आहे. कॉक चालू करून तपासणी केली असता पाणी विहिरीत जात असल्याचे निदर्शनास आल्याचा पंचनामाच समितीने सादर केला आहे. सदरची अनधिकृत नळजोडणी करण्यासाठी ज्या शेतकरी, वेल्डर, प्लंबर यांनी या गैरप्रकारास सहकार्य केले अशांचा देखील शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पदाधिकांऱ्यांकडे केली आहे.

दहा दिवसाआड पाणी साठवण तलावातील पाणीसाठा लक्षात घेता आता सोमवारपासून येवला शहराला १० दिवसाआड एकवेळेस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे

टंचाई काळात साठवण तलाव परिसरातील विहिरींमधील पाणी उपसा करण्यास शासननियमानुसार पूर्णतः बंदी आहे. येवला पालिकेच्या साठवण तलाव परिसरात पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी बघता मोहीम राबविण्यात आली. यापुढेही अशा प्रकारची मोहीम सुरूच राहणार. - शरद मंडलिक, तहसीलदार

साठवण तलावातील पाणीसाठा बघता येवला शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी उपसा करणाऱ्या साठवण तलाव परिघातील विहीरमालकांना पुढील काळात कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. - राहुल वाघ, मुख्याधिकारी, नगरपालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये दिवसाआड पाणी

$
0
0

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरास दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. शहरात भाविकांची गर्दी वाढलेली आहे. यामुळे दोन दिवस पुरेल इतके पाणी साठवून ठेवावे लागणार आहे. त्याकरिता पाण्याची टाकी आदी साधने खरेदी करण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.

तीन धरणांच्या योजना तरीही त्र्यंबकवासीयांच्या नशिबी पाणीटंचाई आली आहे. शहरास सिंहस्थ नियोजनात गौतमी बेझे ही सुमारे ३० कोटींची योजना केली. या याजनेचे श्रेय घेताना तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आता शहरास २४ तास पाणीपुरवठा देता येईल, असे स्वप्न नागरिकांना दाखविले होते. तथापि, दररोज अर्धा तास देखील पाणी मिळत नसल्याची शहराच्या अनेक भागात तक्रार आहे.

शहरास पावसाळ्यात अहल्या धरणातून पाणीपुरवठा शक्य आहे. या धरणासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्चाचे जलकुंभ बांधले आहेत. अंबोली धरणातून पाणीपुरवठा होत असतो. ही योजना देखील सक्षम आहे. एकूणच तीन धरणातून पाणीपुरवठा होत असताना दिवसाआड पाणीपुरवठ्याची आपत्ती नागरिकांना सहन करावी लागत आहे. कधी वीजपुरवठा नाही, तर कधी शहरांतर्गत वितरण नळयोजनेचे कारण पुढे करीत नागरिकांना वेठीस धरले जाते. तशात यावर्षी पाऊस कमी म्हणून नियोजन असे कारण पुढे करण्यात आले आहे.

गत काही वर्षात पाणीपट्टीत वाढ करण्यात आली आहे. नवीन नळयोजना करण्यात आली तेव्हा नव्याने नळजोडणी सक्तीची करून रस्ते फोडण्यासह रक्कम आकारली गेली. नागरिकांना हजारो रुपये भुर्दंड सोसावा लागला. तरी देखील पुरेसे पाणी मिळणे मुश्किल होत आहे. काही ठिकाणी जादा दाबाने पाणी येते, तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन अपव्यय होतो. त्याचे खापर सरसकट सर्व नागरिकांवर फोडून सर्वांना वेठीस धरण्याच्या या अजब प्रकाराबाबत कोणी बोलण्यास तयार नाही.

संत निवृत्तीनाथ यात्रेपूर्वी झालेल्या नगरसेवकांनी अशा प्रकारे एकदिवसआड पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावास विरोध केला होता. मात्र, यात्रा संपताच आठ दिवसात पाणी कपातीची घोषणा करण्यात आली.

यावर्षी फेब्रुवारीतच पाणीकपात सन २००७७ पासून अशा प्रकारे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. दरवर्षी एप्रिलमध्ये होणारे नियोजन यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यातच करण्यात आले आहे. यावर्षी पाऊस कमी झाला मात्र गौतमी बेझे योजना झालेली आहे आणि या धरणात आरक्षित पाणीसाठा भरपूर आहे. तरी देखील असा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images