Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सार्वजनिक वाचनालयाकडून वाचकांची गैरसोय

0
0



'सावाना' हे शहरातील प्रमुख वाचनालय आहे. या वाचनालयाला १७४ वर्षांची दीर्घ परंपरा आहे. सुमारे एक लाखाहून अधिक पुस्तके असलेली ही संस्था वाचनालयापुरती मर्यादित नसून ती एक सांस्कृतिक चळवळ आहे असे मानले जाते. वाचनालय नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने सर्वांना सोयीस्कर आहे. वाचकांना वाचनाचा मुक्तपणे आणि मोफत आनंद घेता यावा. यासाठी 'सावाना' वाचनालयात मुक्तद्वार विभागही आहे. मुख्य ग्रंथालयात सुमारे तीन हजारहून अधिक वाचक दररोज मुक्तद्वार विभागांचा विनामूल्य लाभ घेताना दिसतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून वाचनालयाचे नूतनीकरण सुरू असल्याने अनेक विभागांची उचलआपट होत आहे. यात प्रामुख्याने मुक्तद्वार विभाग ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहातून बाहेर काढण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपर्यंत नूतनीकरणाचे कारण देत तो बंदच होता. आता हा विभाग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. परंतु, त्याला औरंगाबादकर सभागृहाच्या ओसरीत तात्पुरती जागा देण्यात आली आहे. याठिकाणी काही खुर्च्या, टेबल व बाकेही ठेवण्यात आली आहे. येथेच वाचक मोफत वृत्तपत्रे वाचण्यासाठी येतात. परंतु, वाचकांशी बोलले असता त्यांनी अशी माहिती दिली, की ज्यावेळी औरंगाबादकर सभागृहात एखादा कार्यक्रम असतो तेव्हा हा विभाग बंद ठेवण्यात येतो. सरकारचा ग्रंथोत्सव या सभागृहात ९ ते ११ फेब्रुवारी या काळात आयो‌िजत करण्यात आला होता. तेव्हा देखील मुक्तद्वार बंद ठेवण्यात आले असल्याची तक्रारही काही वाचकांनी केली आहे.

वाचकांकडे दुर्लक्ष डागडूजी न झालेले सभागृह अगदी कार्पोरेट बनविणे, भाडेतत्त्वावर देऊन त्यातून नफा मिळवणे ही संस्थेच्या दृष्टीने चांगली बाब आहे. त्यातून संस्थेचा विकासच होणार असतो; मात्र मुक्तद्वार विभाग ओसरीत काढून वाचकांना वाटेला लावणे ही बाब 'सावाना'साठी नक्कीच शोभनीय नाही. नफा कमाविण्याच्या नादात वाचकांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी वाचकांची प्रतिक्रिया आहे.

'सावाना'ला अनुदान 'मुक्तद्वार'साठीच मुळात कोणत्याही वाचनालयाला अनुदान मिळते ते मुक्तद्वार विभागासाठीच. या विभागात गरीबापासून श्रीमंतापर्यंत कोणताही वाचक येऊन मोफत वाचनाचा आनंद घेऊ शकतो. परंतु, ज्यासाठी अनुदान मिळते तोच विभाग सभागृहाच्या बाहेर आणून स्वच्छतागृहाशेजारी आणण्याचा 'सावाना'चा विचार वाचकांवर अन्याय करणारा आहे. याबाबत 'सावाना'ने पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत जाणकार वाचकांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जैन संस्कृतीचे घडतेय दर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मानवता के करते नाश...मछली अण्डा मंदिरा मास, वेद पुराण और गीता सार... शाकाहार है शुद्ध आहार या सारख्या असंख्य सुसंदेश व विविध आकर्षक पेंटींग व कला दालनाच्या विविध स्टॉल्सने मांगीतुंगी येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विस्तीर्ण पटांगणावर लक्ष्य वेधले आहे.

श्री मांगीतुंगी येथील १०८ फुटी श्री भगवान ऋृषभदेव यांच्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवा निमित्ताने येणाऱ्या भाविक, यात्रेकरू व सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधणाऱ्या या आकर्षक स्टॉल्सला दररोज हजारो भाविक भेट देत आहेत. पुना हॉस्टिपलमधील एम. डी. मेडिसिन व कन्सल्टंट फिजिशियन डॉ. कल्याण गंगवाल यांच्या कल्पकतेतून साकार झालेल्या सर्वेताभद्र महलासमोरील विस्तीर्ण पटागंणावर तीन भोजनालयाच्या लगोलग उभारलेल्या या शाकाहार सुंसदेशाच्या खुल्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहेत.

या प्रदर्शनाच्या दालनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविक व व्यक्तीला मानवी सभ्यता की सुबह शाकाहार, अमृत शाकाहार है, विष है मासांहार या तीन पानी पुस्तिका हातात ठेवण्यात येते. या पुस्तिकेत प्रत्येक पानावर शाकाहार क्यों, मांसाहार क्यों नही, वैज्ञानिक एवं महापुरूषो के संदेश, क्या कहते है धर्म-ग्रंथ, शाकाहार सुसंदेश ही पत्रिका देवून शाकाहार सर्वोत्तम आहार हे पटवून देण्यासाठी विविध चित्रांतून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर भारतभूमी व जगभरातील मान्यवर व ख्यातकीर्त नामवंत व्यक्ती देखील शाकाहार पसंत करीत असल्याचे अनेक चित्र व पुरावे या प्रदर्शनातून मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाला खेटूनच ज्ञाममती कॉस्मिक एनर्जी पेटिंग्ज हे प्रा. अरुणकुमार जाधव, पवन काला व सुमित लोहाडे मालेगाव यांचे कलादालन भाविक व भक्तपरिवाराचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये अध्यात्म व विज्ञानाच्या माध्यमातून कॅनव्हॉस, अ‍ॅक्रेलिकचा वापर करून चार बाय चार आकाराच्या अत्यंत देखण्या व सुदंर ३० फ्रेम्स लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रातून संपूर्ण जैन अध्यात्मिक संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जागरूक नाशिककरांचे’ आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी विविध संघटना आंदोलने करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत. पोलिस आपल्या बळाचा वापर करून सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जागरूक नाशिककर या संघटनेने केला असून याविरोधात सोमवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकाऱ्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

दीड वर्षापासून शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगार आर्थिक पाठबळावर मोकाट फिरत असून, पोलिस मात्र सर्वसामान्यांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सर्वसामान्यांच्या तक्रारीची दखल पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन घेत नाहीत. त्यामुळे काही पोलिस अधिकाऱ्यांची भीड चेपली असून, ते सर्वसामान्यांना वेठीस धरत आहेत. पोलिस आयुक्त प्रत्येक प्रकरणात चौकशीचा फार्स करतात. चौकशी दरम्यान पोलिस अधिकारी आपल्या हिताचे कागदे रंगवून घेतात. शाकीब पठाण या विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीनंतर काही जाब जबाबाच्या आधारे या मुलालाच दोषी ठरवण्याची योजना सुरू असल्याचे जागरूक नाशिककर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. समाधान कांबळे या नागरिकाला‌‌ही सिनेमाला शोभेल, अशी मारहाण करण्यात आली. यातील दोषी अधिकाऱ्याच्या रूटीन बदलीनंतर कारवाई केल्याचे दाखवत कांबळे यांच्याकडून आपण या कारवाईमुळे संतुष्ट असल्याचे लेखी मागण्यात आले. पोलिसांच्या या दडपशाहीची पुराव्यासह माहिती मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेवेळी संघटनेचे पदाधिकारी व आयटकचे राजू देसले, हंसराज वडघुले अॅड. राजपाल शिंदे, कृष्णा शिलावट आदी उपस्थित होते.


तक्रारींसाठी साधा संपर्क

नागरिकांनी आपल्या तक्रारी सीबीएससमोरील आयटक कामगार केंद्र, २५ अ, मेघदूत शॉपिंग सेंटर येथे प्रत्यक्षात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​नागरिक ९८९०२६७११२ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू शकतील.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

एस. टी. महामंडळातील बसचालकांचा बेजबाबदारपणा अनेकवेळा अनुभवास येतो. अशाच एका बसचालकाचा बेजबाबदारपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून अपघात टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा नि.श्वास टाकला.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अमळनेर-नाशिक (एमएच २०, बीएल २५१८) ही बस अमळनेरहून नाशिककडे जात असताना पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त चिंचखेड चौफुलीजवळ आली. या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम न झाल्यामुळे साधारण एक किमीचे अंतर अत्यंत धोकादायक झाले आहे. रस्त्यालगर दोन्ही बाजूने सर्विस रोड आहे. मात्र, मुख्य रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे या परिसरात जाताना वाहनधारकांची चांगलीच कसरत होते. महामार्गावरील वाहने सर्विस रोडने जात असल्यामुळे पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. यामुळे अपघातांनाही आमंत्रण मिळते. असे असताना अमळनेर-नाशिक या बसच्या चालकाने शक्य नसतानाही सर्विसरोडवरून अवघड भागातून महामार्गावर घेण्याचा केलेला प्रयत्न चांगलाच अंगलट आला. बसची पुढची चके काहीशी वर जात आणि मागील चाके सुध्दा जमिनीत अडकली. यावेळी बस उलटी होण्याची शक्यता होती. प्रवाशांनी घाई करीत बाहेर पडत सुरक्षित स्थळ गाठले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डरसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोठ्याची जागा खाली करून घेण्यासाठी १३ ते १४ जणांनी मिळून गोठामालक व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी बिल्डरसह इतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

पेठरोडवरील दत्तनगर परिसरातील विश्वस्वरूप बंगला येथे राहणाऱ्या रत्नाकर विश्वनाथ कोठुळे (वय ५५) यांनी फिर्याद दिली. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, कोठुळे यांचा उन्नत्ती शाळेच्या पाठीमागे म्हशीचा गोठा आहे. ही जागा कल्पना पांडे यांच्या मालकीची असून, सुमारे ७० वर्षांपासून कोठुळे या जागेचा भाडेकरू म्हणून उपयोग करतात. सन २०११ च्या दरम्यान सदर जागा विक्री करीत असून तुम्ही जागा खाली करा, असा निरोप कल्पना पांडे यांनी कोठुळे यांनी दिला. तसेच, जागेचे भाडेही घेण्यास नकार दिला. पंरतु, कोठुळे आजतागायत मनीऑर्डरच्या मदतीने जागेचे भाडे पांडे यांना पाठवत आहेत. दरम्यान, तीन वर्षापूर्वी बिल्डर गुलाब त्रिपाठी कोठुळे यांच्याकडे गेले. तुम्हाला २२ लाख रुपये देतो, ही जागा खाली करा, असे त्रिपाठी यांनी त्यांना सांगितले. मी घरच्यांशी बोलून तुम्हाला सांगतो, असे कोठुळे यांनी सांगितले. मात्र, यानतंर त्रिपाठी यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे कोठुळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

हा वाद सुरू असताना रविवारी दुपारच्या सुमारास १४ ते १५ जण कोठुळे यांच्या गोठ्यात पोहचले. त्यांनी जागा खाली करण्यासाठी धमकी देत थेट धक्काबुक्की केली. आई व मला जीवे मारण्याची धमकी देत काही संशयित आरोपींनी दहा ते १२ म्हशी सोडून दिल्या. हा प्रकार सुरू असताना कोठुळेंनी पंचवटी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार अवघ्या काही मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी लागलीच कारवाई करीत किरण दत्तात्रय शेळके, विनायक दीपक लाटे, अक्षय रमेश धार्डे, विकी संतोष परदेशी, नीलेश राजू जाधव, किरण मधुकर सोनवणे, राहुल बाबाजी पाटील, रमेश बाळू साळवे, विकी रमेश रोशन बोधक, केतन विलास हिरवे, विजय राजेंद्र पाटील, आकाश चंद्रकात भाग्यवंत तसेच गंगाधर लक्ष्मण दिघोळे इत्यादी संशयितांना अटक केली. यातील काही सराईत आरोपी असून, पंचवटी पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.


महिला विक्रेत्याकडील ४० हजार रुपयांची चोरी

बाळ येशू यात्रेनिमित्त नेहरूनगरमधील सेंट झेवियर्स स्कूलच्या प्रांगणात धार्मिक पुस्तके विक्री करणाऱ्या महिलेच्या पर्समधील ४० हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

मुंबईतील बांद्रा वेस्ट परिसरातील रहिवाशी सिस्टर मिशेल मथायस (वय ३८) व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेंट झेवियर्स स्कूलच्या प्रांगणात धार्मिक पुस्तके व सीडी विक्रीचे दुकान थाटले. दोन संशयित पुस्तक खरेदीच्या बहाण्याने आले. त्यापैकी एकास सिस्टर मिशेल त्यास ग्रंथ दाखवित होत्या. तर दुसऱ्या दुसऱ्या संशयिताने सिस्टर रुबा यांना तुमच्या पायाजवळ दहा रुपयांच्या नोटा पडल्याचे सांगितले. त्या पैसे उचलण्याकरिता खाली वाकल्या असता या संशयिताने सुमारे ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली..

मंगळसूत्राची चोरी

शहर बसने प्रवास करणाऱ्या सातपूर कॉलनीतील महिलेच्या पर्समधील तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरी केले. गजानन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लता भागवत उदावंत (वय ३२) बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या पर्सच्या उघड्या चेनमधून चोरट्यांनी तीन तोळे वजनाचे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.


देवदर्शनासाठी आलेल्या महिलेच्या पर्सची चोरी


उत्तराखंडहून देवदर्शनासाठी पंचवटीत आलेल्या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. दीपा अमित सागुडी (वय ४०) असे फिर्यादी महिलेचे नाव असून उत्तराखंड राज्यातील नैनीताल जिल्ह्यातील हल्दवाणी येथील जेलरोड, सागुडी गार्डन येथे राहणाऱ्या सागुडी आपल्या नातेवाइकांसह देशदर्शनासाठी नाशिकला आल्या होत्या. पर्समध्ये १४ हजार रुपये रोख, स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड, मोबाइल फोन असा १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल होता. बाहेरून आलेल्या पर्यटकांना लुटण्याचे प्रकार वाढतच चालल्याने पर्यटकांमध्ये भीती पसरली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढारी तुपाशी; स्वातंत्र्यसैनिक उपाशी

0
0

आमदार-खासदार व स्वातंत्रसैनिक यांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये कमालीची तफावत आहे. देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांवर सरकारकडूनच अन्याय केला जात आहे, असा आरोप ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक वसंतराव हुदलीकर यांनी 'मटा'शी बोलतांना केला. ही पेन्शन अनियमित येत असल्याचेही ते म्हणाले. एकदा आमदार झालेल्या व्यक्तीला सरकार तब्बल ४० हजार पेन्शन लागू करते. मात्र, स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना ४ ते ८ हजार इतकीच पेन्शन मिळते. ही इतकी तफावत का? असा संतप्त सवालही स्वातंत्र्यसैनिकांनी केला. त्यातही ही पेन्शन अनियमित मिळत असल्याने अनेकदा बँक, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कोषागार विभागात सारख्या खेटा घालाव्या लागतात. याउलट आमदारांची पेन्शन मात्र वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होत असते. माजी आमदारांना महिन्याला ४० हजार रुपये पेन्शन मिळत असतांना त्यांना त्यासाठी एकही रुपया कर का आकारला जात नाही, असा देखील सवाल उपस्थित होतो.

देश, राज्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची चेष्टा सरकार करीत असल्याचे हुदलीकर म्हणाले. याबाबत काही तक्रार करावयाची असल्यास जावे कुठे असा प्रश्न स्वातंत्र्यसैनिकांसमोर आहे. कारण पेन्शन देते कोण याची माहिती बँक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी देत नाहीत.

हुतात्मा स्मारकाला तुटपुंजे अनुदान एकीकडे माजी आमदार व स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनमध्ये मोठी तफावत असताना दुसरीकडे माजी सैनिकांच्या हुतात्मा स्मारकाला सरकार वर्षांकाठी केवळ १० हजार रुपये अनुदान देत असल्याचेही स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर यांनी सांगितले. यात महापालिका व सामाजिक संस्थेकडून निधी उपलब्ध करून हुतात्मा स्मारकाची देखभाल केली जात असल्याचे ते म्हणाले.

माजी आमदारांसाठी २५ लाख पेन्शन नाशिक जिल्हात ५९ माजी आमदारांसाठी महिन्याकाठी २५ लाख ६४ हजार रुपयांच्या पेन्शनचा बोजा सरकारवर येत आहे. वर्षाला जिल्हातील ७० ते ८० स्वातंत्र्यसैनिकांना केवळ ५ ते ६ लाखइतकीच पेन्शन दिली जाते. माजी आमदारांची पेन्शन सर्वसामान्यांनी दिलेल्या करातूनच दिली जात असल्याने यावर आपण सरकारकडे दाद मागण्याची काही स्वातंत्र्य सैनिकांची तयारी आहे.

स्वातंत्र्यसैनिकांची सरकारने क्रूर चेष्टा केली आहे. सुरुवातीला केवळ शंभर रुपयांपासून पेन्शन सुरू केली. आता ती ४ ते ८ हजारपर्यंत झाली आहे. तीदेखील अनियमितच. माजी आमदारांना वेळेवर पेन्शन तर स्वातंत्र्यसैनिकाच्या पदरी ससेहोलपट का? मेक इन इंडिया म्हणणारे पंतप्रधान नरेंद मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. - वसंतराव हुदलीकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ महिन्यांच्या मुलीसह आई आढळली मृतावस्थेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील करंजाड येथे नऊ महिन्याच्या तान्हुल्या बालिकेसह आई विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर माहेरच्या मंडळींनी जायखेडा पोलिसांसमोर तीव्र निर्देशने केल्यानंतर सासरकडील मंडळीविरुद्ध खुनाचा दाखल करण्यात आला.

तालुक्यातीलच मुळाणे येथील माहेर असलेल्या उज्वला ह्याळीज (वय २३) हिचे करंजाड येथील भूषण सुपडू बोरसे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना नऊ महिन्याची नियती नावाची गोंडस मुलगी होती. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उज्वला व ही आपल्या नऊ महिन्याच्या नियती या मुलीसह विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली होती. याच वेळी सासरच्या मंडळीचा शोध घेतला असता ते कुणीही घरी सापडले नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अधिकच चर्चेला उधाण आले. माहेरील मंडळींनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. जायखेडा पोलिसांसमोर तीव्र निर्देशने केल्यानंतर सासरकडील मंडळीविरुद्ध खुनाचा दाखल करण्यास भाग पाडले.

या प्रकरणी मृत उज्वला हिचा भाऊ राकेश ह्याळीज यांनी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल केला असून पती भूषण बोरसे, सासरे सुपडू बोरसे, सासू द्रौपदाबाई बोरसे, जेठ भटू बोरसे, जेठानी रोहिणी बोरसे, नणंद प्रगती बागुल, भाचा दर्शन बागुल, अशोक पवार, राणी पवार आदींवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रकाश होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मायलेकींवर शवविच्छेदन करून उशिरा अत्यंसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाड्यांवरील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिक्षणाचे धडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पारंपरिक पध्दतीने शिक्षण घेणाऱ्या अन् सामान्य सुविधांपासूनही वंचित असणाऱ्या पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर 'प्रयास' या समाजसेवी संस्थेने कॉम्प्युटर शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. प्रयासच्या कॉम्प्युटर ट्रेनिंग अन् इतर प्रशिक्षणाच्या उपक्रमांना पेठ तालुक्यातील २६ शाळांचा प्रतिसाद लाभला.

आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे योग्य शिक्षण मिळत नसल्याचे प्रयासचे ‌निरीक्षण होते. यानुसार पेठ तालुक्यात करंजळी आणि कोहोळ या दोन केंद्रांसह २ आश्रमशाळांतर्गत २५ शाळांपर्यंत प्रयासचे कार्यकर्ते पोहचले. कॉम्प्युटर म्हणजे काय? या प्रश्नापासून तर इंटरनेटद्वारे ग्लोबल प्लॅटफॉर्म कसा मिळवाल, या प्रश्नापर्यंतच्या विद्यार्थ्याच्या शंकांचे या कार्यकर्त्यांनी निरसन केले. सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. संगणक साक्षरतेसोबतच करिअर मार्गदर्शन, वैज्ञानिक खेळ, वैदिक गणिते, पथनाट्य सादरीकरण, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रमांचाही यात सहभाग होता. पथनाट्यांमध्ये सामाजिक विषयांवर सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय पाच शाळांमध्ये ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले. यात प्रत्येक शाळेस सुमारे ५०० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक या पाच दिवसीय उपक्रमाच्या अखेरच्या दिवशी सर्व शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व यांसह खो खो, धावणे आदी क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या.शिबिरात प्राचार्य केशव नांदूरकर, प्रा. नानासाहेब गुरूळे, स्वप्नील पाटील यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वीज अधिकाऱ्यांनी ज्ञान वाढविण्याची गरज’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जागतिकीकरणामुळे स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी वीज अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करावा व ज्ञान वाढवावे, असे प्रतिपादन महावितरणचे कार्यकारी संचालक निलेश गटणे यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकरोड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.

महापारेषणचे कार्यकारी संचालक सूरज वाघमारे, मानव संसाधनचे मुख्य महाव्यवस्थापक विजय शिरुरकर, नाशिक परिमंडळचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, एकलहरे येथील मुख्य अभियंता (सुरक्षा) कांचन अजनाळकर, संजीब राय यांनी अधिवेशनाचे उदघाटन केले. स्वागताध्यक्ष रमेश शंकपाळ, प्रवीण बागूल, प्रशांत लहाने, संजय गायकवाड, दत्ता कुलकर्णी, सतीश तळणीकर व्यासपीठावर होते.

विजय शिरुरकर म्हणाले, की वीज थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल करण्याची गरज आहे. इआरपी व सॅप प्रणाली स्वीकारणारी राज्य विद्युत कंपनी जगातील पहिली कंपनी आहे. सरचिटणीस दिलिप शिंदे म्हणाले, की कमी कर्मचारी, वाढलेली कामे, वीजबील वसुलीवेळी होणारी कोंडमारी आदी समस्या अधिकाऱ्यांपुढे आहेत. आर. के. भालेराव, चेतन पाटील, अभिजित रासकर आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद शंकरच्या आठवणीत बुडाले गाव

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील भयाळे गावात आज प्रत्येकाच्या ओठी चर्चा आहे, ती काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झुंजताना प्राण पणाला लावून लढणाऱ्या आणि मातृभूमीसाठी आपले बलिदान देणाऱ्या झुंजार शंकर चंद्रभान शिंदे या वीर जवानाची. ग्रामस्थांच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सैन्यात जाऊन पोहचलेल्या आणि आपल्या लढवय्या वृत्तीने देशाच्या कामी आलेल्या या शूर शिलेदाराला आता अखेरचा सलाम ठोकून त्याचा कायमचा निरोप घेण्याच्या कल्पनेने भयाळे ग्रामस्थांचे डोळे भरून येत आहेत.

आपला शंकर आता पुन्हा सुटी घेऊन आनंदाने गावी पुन्हा कधीच परतणार नाही, या भावनेने इथले समाज मन थरारून गेले आहे. पण, त्याचाही अभिमान आहे असा सार्वत्रिक सूर चांदवड तालुक्यात कानी पडतोय. 'शंकर अमर रहे'चे फलक, पोस्टर्स देखील दृष्टीस पडतात.

गरिबीच्या वेदना अन् स्वप्न शंकरचे वडील चंद्रभान शिंदे एक सामान्य शेतकरी आहेत. आई-वडील, भाऊ केशव, भावजयी, पत्नी, दोन मुले, पुतण्या-पुतणी असा मोठा परिवार शंकरच्या मागे आहे. घरची परिस्थिती हलाखीची असून, अवघी एक एकर शेती त्यांच्याकडे आहे. त्यात दुर्दैव असे की शेती चार महिने पाण्याखाली असल्याने शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. शंकर अत्यंत हुशार व समजूतदार विद्यार्थी होता. गरीब परिस्थितीची त्याला जाणीव होती. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, दहावीपर्यंत शिक्षण वडाळी भोई शाळेत झाले. पिंपळगांव बसवंत येथे कला शाखेत कॉलेजचे शिक्षण घेत असताना सैन्यात भरती होण्याची क्रेझ शंकरच्याही मनात पुरती भिनली. सैन्यात त्याला संधी मिळाली. सोळा वर्षात नाईक पदापर्यंत तो पोहचला. गावाकडची घरची परिस्थिती मातीचे पत्र्याचे घर हे सारं त्याला बदलायचं होतं. असे त्याचे वर्गमित्र आणि गावचे सरपंच रवींद्र पुरकर सांगतात.

शंकर माझा वर्गमित्र. आमच्या गावाची शान. देशासाठी तो शहीद झाला. त्याचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्याच्या गौरवासाठी गावात स्मारक उभारणार आहोत. त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आयुष्यभर उभे राहू. - रवींद्र पुरकर, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युरोपसाठी द्राक्ष झाली‘गोड’

0
0

गत सप्ताहापासून नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे या विभागांतील द्राक्षांच्या शिवारसौद्यांना वेग वाढला आहे. सर्व भागांतील बागांना यंदा बहुतांशी पूरक वातावरण मिळाल्यामुळे द्राक्षांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ दिसत आहे. परिणामी पश्‍चिम बंगाल, दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, जम्मू व काश्‍मीर या राज्यातील बाजारपेठेतून चांगली मागणी वाढली. दीर्घकाळापासून रेंगाळलेली थंडी आता कमी होत असल्याने यामुळेही द्राक्षांना उठाव वाढत असल्याचे परराज्यात माल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले.



द्राक्षनिर्यातीची आगेकूच कायम यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरच्या सप्ताहापासूनच निर्यात हंगामाची दमदार सुरुवात झाली आहे. गतवर्षीच्या दुपटीने यंदा द्राक्ष निर्यातीचा वेग आहे. गत सप्ताहाच्या अखेरपर्यंत तब्बल ७०० कंटेनरमधून ९००८ मेट्रिक टन द्राक्षे युरोपकडे रवाना झाली आहेत. गतवर्षी याचवेळी २६८ कंटेनरमधून ३३५७ कंटेनर द्राक्षे युरोपला पाठविली होती. या शिवाय लगतचा बांगलादेश, थायलंड, दुबई, मलेशिया, रशिया, चीन या देशांतूनही द्राक्षांना मागणी वाढली आहे.

चांगले वातावरण आणि उच्च गुणवत्ता यामुळे आपली द्राक्षे देशांतर्गत व निर्यातीच्या बाजारपेठेत चांगला भाव घेत आहेत. प्रत्येक टप्प्यात योग्य काळजी घेणाऱ्या मेहनती द्राक्षउत्पादकांच्या गुणवत्ता व्यवस्थापनाचे हे फळ आहे. यापुढील काळात सातत्याने पूर्ण पक्व झालेला, किमान १८ ब्रीक्‍स साखरनिर्मिती झालेला गोड मालच बाजारात आणावा म्हणजे बाजारातील तेजी टिकून राहील. - जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना



देशांतर्गत बाजारातील द्राक्षांचे दर (प्रतिकिलो) द्राक्षवाण----किमान दर ---कमाल दर ----सरासरी दर थॉमसन---३५---४५---४० सोनाका---५०---६०---५५ शरद सीडलेस---४५---५५---५० जम्बो/ नानासाहेब पर्पल---५५---६५---६० फ्लेम सीडलेस---४०---५०---४५

निर्यातक्षम द्राक्षांचे दर (प्रतिकिलो) द्राक्षवाण---किमान दर---कमाल दर---सरासरी दर थॉमसन---८५---९६---९० सोनाका---५०---६०---५५ शरद सीडलेस---८५---९६---९० जम्बो/नानासाहेब पर्पल---९०---१०००---९५ फ्लेम---८५---९०---८५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधांनी अनुभवली सायकल राईड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन व नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड महाराष्ट्र (नॅब) आणि नाशिक इंडस्ट्रीज वेल्फेअर सेंटर (निवेक) यांच्या संयुक्त विद्यमाने अंध अपंगांसाठी झालेल्या डिव्हाईन सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिकच्या साठ अंध सायकलपटूंनी रॅलीत सहभाग घेतला.

महात्मानगर येथील क्रिकेट मैदानाजवळून सुरू झालेल्या रॅलीत महानॅब स्कूलच्या अंध विद्यार्थिनी, नॅब बहुविकलांग केंद्रातील मुले, डेफ ब्लाईंड, नॅब कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी तसेच नॅबतर्फे चालविल्या जाणाऱ्या विशेष डी. एड - बी. एड कॉलेजचे विद्यार्थी व नाशिक ब्लाइंड फेडरेशनचे विद्यार्थी तीन चाकी सायकली, व्हिलचेअर व साध्या सायकलींसह मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सर्वसामान्यांंप्रमाणेच अंध-अपंग व्यक्ती सुद्धा तितक्याच सक्षमतेने सर्व काही करू शकतात हे या 'डिव्हाईन राईड'च्या निमित्ताने नाशिककरांना अनुभवायला मिळाले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, ज्येष्ठ क्रीडा तज्ज्ञ भीष्मराज बाम, पोलिस उपायुक्त विजय पाटील, नाशिक सायक‌िस्टचे संस्थापक हरिश बैजल, डॉ. महाजन बंधू यांच्या हस्ते सायकलस्वरांना टी- शर्ट आणि हेल्मेटचे वाटप करण्यात आले. एकूण ५५ सायकलस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी सर्वांचे स्वागत केले. मानद महासचिव गोपी मयूर व माजी अध्यक्ष अशोक बंग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग, श्रीकांत जोशी, सुनील खालकर तसेच 'निवेक'चे श्रीयुत सोनार यांनी सायकलपटूंना मार्गदर्शन केले. महात्मानगर मैदानापासून सुरू झालेली रॅली पारिजात नगर मार्गे भोसला मिलिटरी स्कूलच्या कॉलेजरोड गेटवर संपली. रॅलीच्या यशस्वीतेसाठी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, श्याम पाडेकर, सतीश भावे, चक्रधर जाधव, विनोद जाधव, वर्षा चकोर, ज्योती आव्हाड, संपत जोंधळे, डॉ. मनीषा रौंदळ आदींनी परिश्रम घेतले.

सायकल पार्किंग स्टँड उदघाटन

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे रविवारी सकाळी ९ वाजता गोल्फ क्लब मैदान येथे सायकल पार्किंग स्टॅँडची उभारणी करण्यात आली. दररोज गोल्फ क्लब येथे सकाळी सायकलवर फिरायला येणाऱ्या सायकलप्रेमींना त्यांची सायकल व्यवस्थित पार्क करून लॉक करता यावी यासाठी या स्टॅँडची उभारणी केली आहे. महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते या स्टँडचे उदघाटन करण्यात आले.

सायकल स्टॅम्पचे मार्किंग

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनतर्फे नाशिक-त्र्यंबकरोडवर दररोज सायकलिंग करणाऱ्या नाशिककरांसाठी रविवारी सकाळी ७ वाजता पपया नर्सरी ते त्र्यंबक रोड या ३ किलोमीटर मार्गावर महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते सायकल स्टॅम्पचे मार्कींग करण्यात आले. यावेळी नाशिक सायकलिस्टचे योगेश शिंदे, शैलेश राजहंस, दत्तू आंधळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद शंकर शिंदे यांचे पार्थिव नाशकात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काश्मिरमधील कुपवाडा येथे अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेल्या शहीद शंकर शिंदे यांचे पार्थिव रविवारी लष्कराच्या विशेष क्राफ्टने नाशिकमध्ये आणण्यात आले. ओझर विमानतळावर शासकीय इतमामात त्यांना मानवंदना देण्यात आली. सोमवारी सकाळी चांदवडमधील भयाळे या त्यांच्या गावी त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

काश्मिरमधील कुपवाडा जिल्ह्यातील झोंरेशी गावात अतिरेक्यांशी दोन हात करताना शिंदे यांना वीरमरण आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ओझर विमानतळावर त्यांचे पार्थिव आले असता शिंदे यांना सैन्यदलातर्फे मानवंदना देण्यात आली. मेजर जनरल जे. एस. बेदी, ब्रिगेडीअर पी. आर. मुरली, एअर कमोडोर विभास पांडे, पोल‌िस अधीक्षक संजय मोहिते आदींनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद शिंदे यांना मानवंदना दिली. जिल्हा प्रशासनातर्फे तहसीलदार संदीप आहेर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शिंदे यांचे बंधु केशव शिंदे, चुलतभाऊ कैलाश शिंदे, अंबादास शिंदे व मित्र उपस्थित होते. ओझर येथून लष्कराच्या विशेष वाहनाने शहीद शिंदे यांचे पार्थिव देवळाली आर्टीलिअरी सेंटर येथे नेण्यात आले. तेथील मिलेट्री हॉस्पिटलमधील शवागारात हे पार्थिव ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास देवळाली येथून शहीद शिंदे यांचे पार्थिव भयाळे गावी नेण्यात येणार आहे. तेथे हे पार्थिव कुटुंबीयांकडे सोपविले जाईल. सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठीची तयारी प्रशासनाकडून केली जात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

सेनेने जम्मू आणि काश्मिरमधील चौकीबल (झोंरेशी गाव) येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान जखमी झाले असतानाही शहीद शिंदे यांनी अतिरेक्यांचा धैर्याने प्रतिकार केला. या चकमकीत त्यांना वीरमरण आले. कुपवाडा येथे देखील सैन्यदलाने शहीद शिंदे यांना मानवंदना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची विजयी सलामी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वडाळा रोड येथील जे. एम. सी. टी. (जुम्मा मस्जिद च्यारीटेबल ट्रस्ट) तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या बास्केटबॉल सामन्यात यजमान नाशिक संघाने नांदेड संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. या वेळी जे. एम. सी. टी. ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अद्ययावत बास्केटबॉल क्रीडांगणाचे उद्‍घाटनही झाले.

पहिल्या दिवशीच्या सामन्यात नाशिकच्या संघाने नांदेड संघाचा ३० विरुद्ध १७ अशा गुणांनी पराभव करून विजयी सलामी दिली. नाशिक संघाकडून खेळताना संकेत पाटोळे, शेख मुनाफ, अल हसन मन्सुरी, हकीफ, केतन लांडगे आणि साकीब शेख यांनी चांगला खेळ करून संघाला विजयी केले, तर पुणे आणि मुंबईच्या संघानेही सहज विजय मिळवून आपले विजयी अभियान सुरू केले. रविवारी सर्व प्राथमिक सामने घेण्यात आले.

सामन्यांचे निकाल

१) नाशिक विजयी विरुद्ध नांदेड (३० - १७), २) पुणे वाघोली विजयी विरुद्ध मलकापूर (३८ - ०२), ३) मुंबई विजयी विरुद्ध ब्रह्मपुरी (२५ - १६)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेतील कलह शिगेला

0
0

महापालिका वर्चस्वासाठी पदाधिकाऱ्यांमध्येच संघर्ष सानेंचा बोलविता धनी कोण?

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक शिवसेनेमधील गृहकलह शिगेला पोहचला आहे. शिवसेनेला संकटात पाठ दाखवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी सक्रीय झालेले जुने पदाधिकारी व विद्यमान पदाधिकारी यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी संघटना ताब्यात रहावी यासाठी काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीची तयारी करायची की गटबाजीचा सामना करायचा अशा चक्रव्यूहात पदाधिकारी अडकले आहेत.

पुढील वर्षी फेब्रुवारीत नाशिक महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेनेही जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण संघटनेत फेरबदल केले आहेत. त्यामुळे महानगरातील इच्छुक पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. ग्रामीण प्रमाणे शहरातील संघटनेतही फेरबदल व्हावे, अशी या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या अडचणी वाढण्याबरोबरच डोक्याचाही ताप वाढला आहे.

शिवसेनेत सध्या अडगळीत पडलेल्या काही जुन्या नेत्यांचा गट निवडणुकीच्या तोंडावर सक्रीय झाला आहे. महापालिका निवडणुकीची सूत्रे आपल्या हातात यावीत यासाठी प्रयत्नशील झाला आहे. त्यासाठी कधीकाळी नाशिकचे संपर्कप्रमुख असलेल्या मातोश्रीवरील एका बड्या नेत्यालाच हाताशी धरण्यात आले आहे. पक्षातून बाहेर पडलेल्या काही नेत्यांची नव्याने जमवाजमव करून त्यांच्या पुनरप्रवेशाचे प्रयत्न सुरू केले आहेत. सेनेला संकटात पाठ दाखविणाऱ्या या नेत्यांना मातोश्रीवरूनच नकार देण्यात आला. त्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी कायम ठेवल्याने गटबाजीला उत आला आहे. त्यामुळे पक्षाने गटबाजीला कंटाळून अखेरीस बदलाची चाचपणी सुरू केली आहे. सध्याच्या पदाधिकाऱ्यांना बदलल्यास पक्षाला काय फटका बसू शकतो याचाही विचार केला जात आहे.


भाजप, मनसेशी दोन हात

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्ताधारी मनसेसह भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठ्या ताकदीची गरज असून आतापासून मायक्रो प्लॅनिंग करावे लागणार आहे. विशेषत: मित्रपक्ष असलेल्या भाजपशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे नेमके उद्दिष्ट ठरवून पदाधिकाऱ्यांनी एकोप्याने निवडणूक तयारी करणे अपेक्षित असतांना, गटबाजीला उत आल्याने वरिष्ठांचीही डोकेदुःखी वाढली आहे. मनपा निवडणुकीच्या वेळेस ऐनवेळी शिवसेनेत बदल करण्यात आले होते. त्याचा फटका पक्षाला बसला होता. त्यामुळे वरिष्ठांनीच हा तीढा सोडवावा, अशी वर्तमान पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी फाळके स्मारकाच्या ठेक्यावरून शिवसेना नगरसेवक शिवाजी सहाणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेना म्युनिसीपल कामगार सेनेचे प्रमुख असलेल्या सहाणे यांनी फाळके स्मारक कामगारांच्या वेतनावरून तांबडे यांच्या संस्थेची तक्रार केली होती. त्यामुळे तांबडे यांनी थेट आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीकास्र सोडत त्यांचा बोलविता धनी कोणीतरी तिसराच असल्याचे सांगून गटबाजीला तोंड फोडले आहे. सदरील ठेका आपण कधीच सोडला असून सहाणे हे वकील असल्याने त्यांचा आदर करतो. मात्र, त्यांची माहिती अज्ञानातून आली असून शिवसेनेच्या दृष्टीने दुर्दैवी असल्याचा खुलासा त्यांनी दिला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थायीला वेध नव्या सदस्यांचे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २९ फेब्रुवारी रोजी पूर्ण होत असून स्थायीला आता नव्या आठ सदस्यांच्या नियुक्तीचे वेध लागले आहेत. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूक असल्याने स्थायीचे हे शेवटचे वर्ष असेल. त्यामुळे नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात निवडणुकीची तारीख निश्चित होणार आहे.

स्थायी समितीतून दरवर्षी आठ सदस्य निवृत्त होतात. त्यामुळे येत्या २९ फेब्रुवारीला भाजपच्या रंजना भानसी, कुणाल वाघ, आरपीआयच्या ललिता भालेराव, अपक्ष गटाच्या रशीदा शेख, काँग्रेसचे राहुल दिवे, मनसेच्या सुरेखा भोसले, शिवसेनेचे शैलेश ढगे, शोभा फडोळ असे आठ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे या रिकाम्या होणाऱ्या जागांसाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. स्थायी समितीची ही शेवटची टर्म आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थायीत कोट्यवधीचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. नव्या सदस्यांची निवड ही २९ फेब्रुवारी पूर्वीच होणार आहे. त्यामुळे नगरसचिव विभागाने नव्या सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली असून विभागीय आयुक्तालयाकडे संपर्क साधला आहे. त्यामुळे एक-दोन दिवसात निवडणूक तारखांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

तर १५ नवीन सदस्य

स्थायीत दरवर्षी आठ सदस्य निवृत्त होत असले तरी प्रत्येकाला एक वर्ष संधी मिळावी म्हणून पक्ष उर्वरित सदस्यांचे राजीनामे घेऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसच्या विमल पाटील वगळता सर्व सदस्यांना पायउतार व्हावे लागणार आहे. नव्याने १५ सदस्यांची निवड होवून स्थायीला नवे रुप मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेकंड होमचे अर्थकारण

0
0

किशोर अहिरे

आतिथ्यक्षेत्रात नजीकच्या काळात सेकंड होम या संकल्पनेने महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आतिथ्याच्या क्षेत्रात सेकंड होमच्या प्रवेशामुळे एक नवे अर्थकारण निर्माण झाले आहे. याची व्याप्ती इतकी मोठी आहे की यात देखील आता नव्या नव्या संकल्पनाचा उदय होतांना दिसतो आहे. हे क्षेत्र गुंतवणुकदार, स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) क्षेत्रातील मोठे उद्योजक, पर्यटक तसेच विविध सेवा पुरवणाऱ्या सेवा क्षेत्रातील कंपन्यांना देखील आकर्षित करते. गेल्या दशकापर्यंत सेकंड होम म्हणजे शहरापासून दूर कुठे तरी निसर्गरम्य ठिकाणी बांधलेले छोटेसे, टुमदार असे सुरेख घर व त्याभोवती विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड येथपर्यंतच मर्यादित होते. परंतु गेल्या दशकभरात या संकल्पनेत मोठ्या प्रमाणात बदल होत गेले.

कुठल्यातरी एकांताच्या ठिकाणी एकटे घर बांधण्यापेक्षा एखाद्या मोठ्या क्षेत्रावर सुनियोजित पद्धतीने सर्व सुविधांयुक्त अशा सेकंड होमच्या प्रकल्पांना लोक अधिक पसंती देऊ लागले आहेत. या सेकंड होमच्या संकल्पनेत झालेल्या मूलगामी बदलास अनेक महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरलेले दिसतात. यात प्रामुख्याने तेथील सुरक्षेचा प्रश्न, तेथील मुलभूत नागरी सुविधा म्हणजे वीज, पाणी, रस्ते यांचा प्रश्न व यासोबतच तेथे थांबल्यावर आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या मनोरंजन करणाऱ्या सुविधांची आवश्यकता हे होत. भारतात सुनियोजित अशा सेकंड होम प्रकल्पांना गेल्या दशकभरात सुरुवात झाली. यात पुण्याजवळ असलेला लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली प्रकल्प, पुण्याच्या खडकवासला, पानशेत धरणांच्या परिसरात उभे राहिलेले भव्य असे सेकंड होम प्रकल्प यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

नाशिक व परिसरात देखील गेल्या दशकभरात या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे राहिलेले दिसतात. यात प्रामुख्याने नाशिक, त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत अत्यंत सुंदर सेकंड होम प्रकल्प मोठ्या प्रमाणात विकसित झालेले दिसतात. कल्पतरू हिल्स, ई.एन.जी ग्रीन व्हॅली, ग्रेप कंट्री यांसारख्या प्रमुख प्रकल्पांची प्रामुख्याने नोंद घ्यावी लागेल. नशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये सेकंड होम संकल्पनेचा अलीकडच्या काळात झपाट्याने विकास होतांना दिसतो आहे. याचे कारण म्हणजे तेथील आल्हाददायक वातावरण, डोंगरदऱ्या, नद्यानाले यांच्यातील विविधता कुठल्याही सेकंड होम घेणाऱ्याला आकर्षित करणारी अशीच आहे. त्यासोबतच नाशिक शहरापासून या परिसरातल्या कुठल्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची उपलब्धता यामुळेच कुठलीही व्यक्ती आपल्या सेकंड होमपर्यंत अर्ध्यातासाच्या आत पोहोचू शकते. या परिसरात विविध संकल्पनांवर आधारित सेकंड होम प्रकल्पांना चांगलीच मागणी आहे. पावसाळ्यात तर हा परिसर अक्षरशः नंदनवनच वाटतो. येथे असलेली पाण्याची मुबलकता देखील तिथल्या विकासास कारणीभूत ठरते आहे. मोठ्या क्षेत्रावरील सेकंड होम प्रकल्प हे लोकांना अधिक आकर्षित करतात. याची कारणे म्हणजे तेथे असलेल्या सुविधांची उपलब्धता वीज, पाणी, रस्ते यासोबतच विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या साधनांमुळे लोक सुटीच्या काळात आपल्या परिवारासोबत राहण्यास पसंती देतात. सेकंड होमच्या प्रकल्पांमध्ये रेस्तराँ, स्विमिंग पूल, कॉन्फरन्स हॉल यासारख्या सुविधांमुळे सेकंड होमच्या मालकांसोबतच, पर्यटन तसेच उद्योग क्षेत्रातील लोकदेखील त्यांच्या कॉन्फरन्स व संमेलनांसाठी याला पसंती देतांना दिसतात.

या सेकंड होममधल्या गुंतवणुकीत अलीकडच्या काळात लोकांचा कल वाढलेला दिसतो आहे. याचे कारण म्हणजे एक तर गुंतवणुकदाराला विशिष्ट अशा क्षेत्राच्या जमिनीचा मालकी हक्क मिळतो. सोबतच सर्व सुविधांयुक्त असे त्याच्या आवडीचे घर तो तेथे बांधू शकतो. तसेच त्याच्या आवडीच्या झाडांची, पालेभाज्या, फुलझाडे यांची लागवड तेथे करू शकतो. त्याला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आवश्यक अशा ठिकाणाची यातून पूर्तता होते. बऱ्याच सेकंड होम प्रकल्पांमध्ये प्रवर्तक कंपनी इतर वेळी तेथे येणाऱ्या पर्यटकांना उपलब्ध करून देतात. हा रेंट-बॅक पर्याय अलीकडच्या काळात सेकंड होम धारकांना आकर्षित करू लागलेला दिसतो. यामुळे ते वापरत नसलेल्या काळात देखील ते घर वापरले जाते व यातून त्यांना अर्थप्राप्ती होते. याचबरोबर त्याची योग्य अशी देखभाल देखील होते. या सगळ्यामुळेच सेकंड होम प्रकल्प ही नवीन पर्यटन क्षेत्रे विकसित होतांना दिसतात. यातून नव्या आतिथ्याच्या नव्या अर्थव्यवस्थेचा उदय होतांना दिसतो. या प्रकल्पांमुळे त्या परिसरातल्या शेतजमिनींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात. याचा फायदा येथील जमीन धारकांना होतांना दिसतो. यामुळे या परिसरात स्थानिकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होते आहे. सोबतच हा परिसर विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी नटतांना पाहायला मिळतो. अत्यंत संरक्षित अशा क्षेत्रात यामुळे आपसूकच जैव-विविधता जपली जाते आहे.

या परिसरात अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा भात, नाचणी, वरई अशा पिकांचे उत्पादन होते. या स्थानिक जातींचा भाताचे जरी योग्य असे मार्केटिंग केले तर या नैसर्गिकरित्या पिकवलेल्या (ऑर्गेनिक) धान्याला येथे येणाऱ्या पर्यटकांसोबतच सेकंड होम धारकांकडून देखील मोठी मागणी वाढू शकते. या परिसरातल्या जंगलात येणाऱ्या करवंद, जांभूळ, आंबा अशा रानमेव्याची तसेच पावसाळी भाज्या जर येथे येणाऱ्या पर्यटकांना तसेच प्रवाशांना जर आपण उपलब्ध करून दिल्या तर यातून स्थानिक तसेच आदिवासी कुटुंबांना चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते.

त्र्यंबकेश्वर परिसर व इगतपुरी परिसर या भागात सेकंड होम प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्यामुळे या भागाची अर्थव्यवस्थाच बदलून गेली. तसेच आता वैतरणा धरण क्षेत्राला लागूनच असलेल्या परिसराचा या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात विकास होईल असे दिसते आहे. सेकंड होम या क्षेत्राने संधीचे नवीन दालनच खुले केले आहे. फक्त गरज आहे ती आपण या अर्थकारणात आपला वाटा निर्माण करण्याची.

(लेखक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा आतुरला भुजबळांच्या भेटीसाठी!

0
0

समर्थक, कार्यकर्ते नाराज; नाशिक भेटीची अपेक्षा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संकटात सापडलेल्या माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी मुंबई विमानतळावर शक्तीप्रदर्शन केले. या समर्थकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी भुजबळांकडून तातडीने नाशिक दौरा अपेक्षित होता. परंतु, भुजबळांना मुंबईत येवून आठवडा झाला तरी ते नाशिकमध्ये फिरकले नसल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी चिंतेत सापडले आहे. भुजबळांनी नाशिकमध्ये येवून समर्थक व कार्यकर्त्यांचे बळ वाढवावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आर्थिक गैरव्यवहारावरून भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ सध्या 'ईडी'च्या अटकेत आहेत. सोबत पंकज भुजबळही चौकशीच्या फेऱ्यात आहे. तर भुजबळांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. समीरच्या अटकेने थेट भुजबळ विरुद्ध केंद्र व राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा संकटातही गेल्या मंगळवारी अमेरिकेहून परतलेल्या छगन भुजबळांच्या पाठीशी नाशिकमधील त्यांचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वागतासाठी थेट मुंबईत गेले. आपल्या समर्थकांच्या माध्यमातून भुजबळांनी सरकारसह पक्षालाही ताकद दाखवली.

संकटाच्या काळात नाशिकमधील त्यांचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलने करत पोलिसांच्या लाठ्या काठ्या झेलल्या. त्यामुळे भुजबळांनी लागलीच त्यांच्या समर्थकांच्या पाठीशीही भुजबळांनी तात्काळ उभे राहून नाशिकचा दौरा करणे अपेक्षित होते. विशेषत: येवल्यातील त्यांचे समर्थक व मतदार त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, भुजबळ यांना मुंबईत येवून आठवडा लोटला तरी भुजबळ नाशिककडे फिरकले नाहीत. नाशिक व येवल्यात येवून भुजबळांनी समर्थक व कार्यकर्त्यांचे बळ वाढवतील अशी अपेक्षा होती. मात्र, भुजबळांनी मुंबईतच तळ ठोकल्याने समर्थकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे भुजबळ समर्थक आता भुजबळांच्या नाशिक दौऱ्याची वाट पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सद्भावना रॅलीतून मानवतेचा संदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांप्रतीच्या संवेदना जपणे हीच खरी मानवता असून सदभावना हाच समाजात शांती प्रस्थापित करण्याचा मार्ग असल्याचा संदेश सद्भावना रॅलीमधून देण्यात आला. मानवधर्म प्रणेते सदगुरूदेव श्री सतपालजी महाराज यांच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सातपूर कॉलनी परिसरात दोन दिवसीय सदभावना संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सातपूर कॉलनी, सावरकरनगर परिसरातून ही सद्भावना रॅली काढण्यात आली. आपण कोणत्याही धर्माचे असण्यापूर्वी सर्वप्रथम मानव आहोत या विचारधारेला मानणारे शहरातील शेकडो मानवधर्म प्रेमी या रॅलीमध्ये सहभागी झाले. नगरसेवक सलीम शेख यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.

श्री हंस कल्याण धामच्या प्रबंधक साध्वी आराधनाजी, साध्वी प्रियंवदाजी आदींच्या मार्गदर्शनाखाली सातपूर कॉलनीतील नवीन पाण्याच्या टाकीजवळील समाज मंदिरापासून रॅली मार्गस्थ झाली. हिंदु, मुस्लिम, सीख इसाई आपस में सब भाई भाई, हमारा देश कैसा हो रामराज्य जैसा हो, विश्व शांती कैसे होगी केवल आत्मज्ञान से यांसारख्या घोषणा देऊन मानवधर्म प्रेमींनी सद्भावनेचा संदेश दिला. मौले हॉल, निळकंठेश्वर मंदिर, सावरकर नगरमार्गे पुन्हा समाज मंदिराजवळ रॅलीचा समारोप झाला. यावेळी अध्यात्मावर आधारित प्रवचनांचा लाभ भाविकांनी घेतला. दुसऱ्या दिवशीही भाविकांनी सत्संगाचा लाभ मिळाला. त्यानंतर संमेलनाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिमखान्याच्या क्रीडा महोत्सवाला सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिमखान्यातर्फे दरवर्षीप्रमाणे वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. शिवछत्रपती पुरस्कारविजेते शेखर भंडारी यांच्या हस्ते लॉन टेनिस स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. उद्‍घाटनप्रसंगी नाशिक जिमखाना, व्यवस्थापक संजय मराठे, जयंत कर्पे, भारत दाभाडे आदींसह खेळाडू व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत बिलियर्ड्‍स व स्नूकर या खेळात ओपन स्नूकर, हँडीकॅप स्नुकर व ओपन बिलियर्ड्‍स या स्पर्धा सुरू आहेत. १० व १२ वर्षांखालील मुले व मुली यांच्या टेनिस स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली, तर १४ वर्षांखालील मुले व मुली यांचे सामने सकाळच्या सत्रात खेळविले जाणार आहेत.

बॅडमिंटनच्या सर्व गटातील स्पर्धा सकाळच्या सत्रात सुरू होतील. टेबल टेनिस स्पर्धा १७ फेब्रुवारी व बुद्धिबळ रॅपिड स्पर्धेला २१ फेब्रुवारी रोजी सुरुवात होईल. या स्पर्धा विविध वयोगटांत खेळवल्या जाणार आहेत. विजयी खेळाडूंना विशेष पारितोषिके व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images