Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डोळ्यांचे फेडले पारणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तबला, गिटार, मृदंग, टाळ या वाद्यांच्या संगतीने परदेशी युवतींनी सादर केलेले कथ्थक व कुच्चीपुडी नृत्य... बम बम भोले, श्री गणेशा गणेशा, जय जय महाराष्ट्र माझा, महालक्ष्मी स्रोत्र आदींसह नृत्याविष्कार...अगदी तालासुरात मुग्ध करणारी भजने सादर करीत परदेशी युवा कलाकारांनी मंगळवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येवल्यात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

समृद्ध व वैविध्यपूर्ण असलेल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास आपल्याला नव्हे तर जगाला प्रिय आहे, याचे या रंगारंग कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकवार दर्शन घडले. युक्रेन, रशिया, इंग्लंड, चीन, इटली, स्पेन, कॅनडा व बेल्जियम या देशातील २२ कलाकारांनी विविध भजने, नृत्यातून ही भारतीय संस्कृतीची महान परंपरा उभी केली तेव्हा उपस्थितांच्या नेत्रांची पारणे फेडली.

येवल्यातील जगदंबा व मातोश्री शिक्षण संस्थेच्या एस. एन. डी. शिक्षण संकुलात झालेला सोहळा लक्षवेधी ठरला तो चक्क परदेशातील आठ देशातील २४ युवा कलाकारांनी सादर केलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांमुळे. या कार्यक्रमात मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी या परदेशी पाहुण्यांनी देखील ध्वजाला देखणी सलामी देत प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी कांचन सुधा अॅकेडमीचे संचालक अक्षय जैन उपस्थित होते. वंदे मातरम् गाऊन या अनोख्या कार्यक्रमाचा समारोप केला.

महाराष्ट्राची मराठमोळी ओळख असलेले फेटे या परदेशी युवकांना श्रीकांत खंदारे या येथील कलाकाराने बांधले होते. त्यामुळे हा कार्यक्रम अधिकच संस्कृतीचे दर्शन घडवणारा झाला. निर्मलादेवी सहजयोग राष्ट्रीय ट्रस्टतर्फे या आंतरराष्ट्रीय युवाशक्तीच्या भारत दौऱ्याचे आयोजन केले असून, त्याअंतर्गत हा आगळावेगळा नृत्याविष्कार पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सप्तशृंग गड घेणार लवकरच मोकळा श्वास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंग गडावर व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले असले तरी येत्या दोन फेब्रुवारीला उर्वरित अतिक्रमणांवरही हातोडा पडणार आहे. महसूल, पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या माध्यमातून गडावरील संपूर्ण अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन फौज फाट्यासह सज्ज झाले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी गडावरील अतिक्रमण काढले जावे असे संकेत दिले होते. त्यानुसार यंत्रणा सज्ज झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्या हद्दीतील अतिक्रमण काढून घेतले. त्यासाठी सप्तशृंग देवस्थानमार्फत अतिक्रमणात येणाऱ्या संरक्षक भिंतीचाही बळी दिल्याचे पाहून गडावरील व्यावसायिक हादरले आहेत. बारा मीटरऐवजी दहा मीटर अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचे सत्र ग्रामस्थांनी अवलंबिले आहे. स्वतःहून आम्ही अतिक्रमण काढून घेतलेले असताना पुन्हा ही कारवाई होत असल्याचे समजताच अतिक्रमणधारक धास्तावले आहेत.

कळवण पंचायत समितीमार्फत सप्तशृंग गड ग्रामपंचायतीचे पाच जेसीबी, पाच मालवाहू ट्रक, वैद्यकीय पथक, ५० मजूर, अग्निशमन यंत्रणा असा लवाजमा कारवाईसाठी सज्ज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसपातर्फे कळवणमध्ये रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

बहुजन समाज पार्टीच्या कळवण शाखेच्या वतीने रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्मत्याप्रकरणी दोषींवर कडक कार्यवाही व्हावी म्हणून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. परवानगीच्या कलगीतुऱ्यात रंगलेल्या या आंदोलनाचा शेवट प्रांताधिकारी कार्यालयाचे शिरस्तेदार राजेंद्र चव्हाण यांना निवेदन देत करण्यात आला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व बंडारू दत्तात्रेय तसेच, विद्यापीठाचे कुलगुरू यांचे राजीनामे घ्यावेत. त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी, या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी कळवण विधानसभेच्या वतीने निषेध नोंदवत कळवण-नाशिक रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तासभर चाललेल्या या रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाबाबत कळवण पोलिसांना कळविले नसल्यामुळे पोलिस व आंदोलनकर्ते यांच्यात शाब्दीक चकमक झाली. प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार राजेंद्र चव्हाण यांना निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सागर पाझर तलावात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमारेषेवरील अस्वली हर्ष परिसरातील एका पाझर तलावात प्रेमीयुगुलाने आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.

घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व त्र्यंबक तालुक्यातील अस्वली हर्ष परिसरातील सागर या पाझर तलावात मंगळवारी युवक व युवतीचा एकमेकांना बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. याबाबत सरपंच पिंटू कडाळी यांनी या घटनेची घोटी पोलिसांना माहिती दिली. मृत प्रेमीयुगुलाची ओळख पटली आहे. मृतांचे नाव पोपट पिलाजी जाधव (वय २२, रा. झारवड खुर्द) व सत्यभामा नथू घारे (वय १८, काळुस्ते) अशी आहेत. दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. दोंघाच्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करून नातेवाईकांना सोपविण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जळालेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

सिडको : नवीन नाशिक सिडकोतील पेलिकन पार्कमध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका तरुणाचा जळालेल्या मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीचे नाव हा गौतम प्रकाश मुळे (वय ३५) असे आहे. मुळे हे सिडको मोरवाडी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी मुळे यांचे वडील प्रकाश मुळे यांच्याकडे गौतमची चौकशी केली असता, तो गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याचे सांगितले. अंबड पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांसाठी मित्रावर कुऱ्हाडीने वार

$
0
0

सटाणा : बागलाण तालुक्यातील कंधाणे येथे मित्रावर कुऱ्हाडीने वार करून त्याच्या जवळील ६० हजार रुपयांची रोकड लुटून पसार झालेल्या संश‌यिताला सटाणा पोलिसांनी मुद्देमालासह २४ तासाच्या आत ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बबलू ऊर्फ संभाजी शिवाजी बिरारी (वय ३०) यांच्या शेतातील राहत्या घरी त्याचा मित्र भाऊसाहेब जिभाऊ बिरारी हा मुक्कामाला होता. बबलूकडे साठ हजार रुपये रक्कम असल्याचे भाऊसाहेबला माहीत असल्याने त्याने बबलूच्या डोक्यावर वार केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरला रंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते मालेगाव येथील पोलिस कवायत मैदानावर झाला. ध्वजारोहण सोहळ्यानंतर मालेगावातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

मालेगाव महानगरपालिकेचे महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम, युनूस ईसा, पंचायत समितीचे सभापती भरत पवार, माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, मनपा आयुक्त किशोर बोर्डे, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, निवासी नायब तहसीलदार डॉ. अमित पवार, नायब तहसीलदार गिरीश वाखारे, संजय तराळकर, जगदीश निकम, किशोर बच्छाव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

राज्य राखीव पोलिस दल, गृहरक्षक दलाचे जवान, राष्ट्रीय छात्रसेना, रस्ता सुरक्षा पथक, स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करीत ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, कवायत सादर केली.

एमएसजी कॉलेज एमएसजी कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ. आर. के. देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर एनसीसी पथकाने ध्वजास शानदार सलामी दिली. तसेच, प्रांगणात विविध प्रकारचे उपक्रम साजरे करण्यात आले.

शाह विद्यालय वर्धमान शिक्षण संस्थेच्या श्री र. वी. शाह माध्यमिक विद्यालय, का. र. शाह प्राथमिक विद्यालयात व वर्धमान उच्च माध्यमिक विद्यालय मुख्य ध्वजारोहण सोहळा झाला. संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपाध्यक्ष कीर्तीकुमार शाह, सचिव प्रताप शाह, सहसचिव गौतम शाह, प्राचार्य एस. डी. बेलन, मुख्याध्यापक ठाकरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीवर खल

$
0
0

सर्वसंमतीने निर्णय होणार, पालकमंत्र्यांसोबत ३ फेब्रुवारीला पुन्हा बैठक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील प्रस्तावित पाणीकपातीच्या मुद्यावर राजकीय चिखलफेक सुरू असतांनाच आता या पाणीकपाती संदर्भात शासकीय खल सुरू झाला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाणीकपाती संदर्भात अधिकाऱ्यांना पाण्यासंदर्भातील वस्तुस्थिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बुधवारी (दि. ३ फेब्रुवारी) विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत अधिकारी, महापौर आणि भाजप आमदारांची बैठक झाली.त्यात सर्वसमतीने निर्णय घेण्यावर सहमती झाली असून पालकमंत्र्यांच्या पुढील दौऱ्यात अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शहरातील पाणीकपातीच्या मुद्यावरून महापालिका विरुद्ध भाजप असा वाद सुरू असून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करावी, असा आदेश महापौरांनी दिला आहे. परंतु, कपात लागू करू नये असा भाजप आमदारांचा दबाव असून पालकमंत्र्यांनी कपात लागू करू नये असे आदेश दिले. त्यामुळे प्रशासनाची गोची झाली असून मंगळवारची पाणीकपात लांबणीवर पडली आहे. पालकमंत्र्यांनी मंगळवारी (दि. २६) नाशिक दौऱ्यावर आले असतांना, त्यांनी कपाती संदर्भात अधिकारी व भाजपच्या आमदारांशी चर्चा केली. या बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. भाजपच्या आमदारांनी पाणीकपातीला विरोध केला तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पाणीकपातीवर जोर दिला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी अधिकारी व आमदारांना एकत्रित बसून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.

विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नाशिकरोडला आमदार व अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात पाणीसाठ्याचा आढावा घेण्यासह एक दिवसाच्या कपातीवर खल झाला. पाणीकपातीसंदर्भात तांत्रिक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शहरात एक दिवस पाणीकपात करू नये, अशा प्रकारची चर्चा या बैठकीत झाल्याचे समजते. सध्याची कपात कायम ठेवून धरणातील शिल्लक पाणी शेवटच्या क्षणी वापरावे, असाही प्रस्ताव या बैठकीत समोर आला. अधिकाऱ्यांनी पाणीकपातीशिवाय पर्याय नसल्याचे या बैठकीत सांगितले. बराच वेळ या बैठकीत खल झाला. पालकमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करून सर्वसंमतीने हा विषय मार्गी लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. पालकमंत्री पुढील आठवड्यात २ किंवा ३ फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत आता पाणीकपातीचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विभागवार कपातीचा प्रस्ताव

सध्या १५ टक्के पाणीकपात ही दररोजच्या पुरवठयातूनच केली जात आहे. परंतु, एक दिवस पाणीकपात केल्यास सर्व पाईपलाईन रिकामे होतील. संबंधित पाईपलाईन भरण्यासाठी पुन्हा एक दिवस लागेल. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या पूर्ण दिवसभर शहराचा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचा तांत्रिक मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे एक दिवसाची पाणीकपात होण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे एकतर विभागवार पाणीकपात करावी किंवा आहे त्याच कपातीत वाढ करण्यावर विचार सुरू आहे. यासंदर्भात सध्या प्रशासनात काथ्याकुट सुरू झाला आहे. त्यावर आता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीला हवी पूरक व्यवसायाची जोड

$
0
0

शेतीला हवी पूरक व्यवसायाची जोड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेती व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी आणि नैसर्गिक संकटांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे. शेतीबरोबरच आणखी एक उत्पन्नाचे साधन असेल, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र सरकारचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या 'जागतिक कृषी महोत्सव २०१६'चे डोंगरे वसतिगृहावर आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी बागडे बोलत होते. बागडे पुढे म्हणाले की, ज्या भागात शेतीला दुग्धव्यवसायासारख्या धंद्याची जोड मिळाली आहे, त्या भागात शेतकरी आत्महत्या कमी झाल्या आहेत. उत्पन्नाचे दुसरे साधन असल्याचा असा फायदा इतर शेतकऱ्यांनाही होऊ शकतो. यासाठी वीज व पाण्याची समस्या दूर करण्यास कार्य करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास ते प्रगतीचे वेगळे मार्ग निर्माण करतील.पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पावसाच्या लहरीपणामुळे बदलत्या परिस्थितीत ठिबक सिंचनपद्धत स्वीकारणे काळाची गरज आहे. शाश्वत आणि विकसित शेतीचा विचार करताना नवतंत्रज्ञानाबरोबरच पाण्याचा नियोजित वापर महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीवर आधारित उद्योग वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतीतील उत्पादन खर्च कमी झाल्यास त्याचा लाभ होईल. तसेच, शेतकऱ्यांनी शेतीला पशूपालनाचीही जोड द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग संस्थेने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा महाजन यांनी विशेष उल्लेख केला.

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, धर्मादाय आयुक्त शशिकांत साबळे, न्या. अंबादास जोशी, अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते. आमदार योगेश घोलप, आमदार अनिल कदम, चंद्रकांत मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

नवतंत्रज्ञान शेतीसाठी लाभदायक : रामदास कदम

नवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी पाण्यातही चांगली शेती करता येते. त्यामुळे तंत्रज्ञान शेतीच्या प्रगतीसाठी लाभदायक असल्याचे मत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. कृषी महोत्सव प्रदर्शन उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे नमूद केले. तसेच, शेतीच्या वाढत्या खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्याला लाभ होत नाही. नैसर्गिक संकटांना वारंवार सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्याला प्रदर्शनाच्या माध्यमातून नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यावरण विभागाच्या माध्यमातून जलप्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून येत्या काळात त्याचे परिणाम दिसतील. अध्यात्माच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश घरोघरी पोहोचवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांमुळे रामकुंड झाले स्वच्छ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराची ओळख समजल्या जाणाऱ्या प्राचीन ठेव्यांपैकी एक असलेल्या रामकुंड परिसरात स्वच्छता मोहीम राबवित विद्यार्थ्यांनी यात पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निकच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी ही स्वच्छता मोहीम राबविली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजास मानवंदनेचा उपक्रम झाल्यानंतर श्रमदानाचा संकल्प सोडत सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी यशवंत महाराज पटांगणापासून मोहिमेस सुरुवात केली. आमदार सीमा हिरे यांनीही यावेळी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या समवेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा, प्राचार्य संजय बागूल, आयोजक प्रा. रवी पाटील यांनी परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या निमित्ताने विद्यार्थ्यांतर्फे प्रदूषण, पर्यावरण, स्वच्छता अभियान, आरोग्य या विषयांवरील पथनाट्याचे सादरीकरण केले. भाविकांसोबतच विदेशी पर्यटकही मोहिमेत सहभागी झाले. प्लास्टीकचा वापर टाळण्यासाठी 'इको फ्रेंडली' कापडी पिशव्यांचेही वाटप यावेळी करण्यात आले. अभियानात संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे, सचिव कुणाल दराडे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे, उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामे रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील अनधिकृत बांधकामे व इमारतींवर उभे असलेले अनधिकृत मोबाईल टॉवर्स महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी रडारवर घेतले आहेत. शहरात उभ्या असलेल्या अनधिकृत इमारतींसह सोसायटी, अपार्टमेंटमधील अनधिकृत बांधकामे आणि मोबाइल टॉवर्सचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून त्यावर हातोडा चालविण्याचेच थेट आदेश गेडाम यांनी दिल्याने बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहे.

बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्यांनी शहरातील अनधिकृत मोबाईल्स टॉवरवर कारवाईची मागणी केली. प्रा. कुणाल वाघ यांनी अनधिकृत टॉवर्सचा मुद्दा उपस्थित करीत ५० टक्के टॉवर्स अनधिकृत असल्याचा आरोप केला. तर रंजना भानसी यांनी बिल्डरांनीच इमारतींवर अनधिकृत टॉवर्स उभारल्याचा आरोप केला. त्यामुळे अनधिकृत टॉवर्ससह इमारतींमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर, शहरातील सर्व बांधकामांचे एक महिन्यात सर्वेक्षण करण्याचे फर्मान आयुक्तांनी नगररचना विभागाला सोडले. सहा विभागात प्रत्येकी दोन अभियंत्यावर अनधिकृत बांधकामे तपासण्याची व त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सुरूवातीला मोठे रस्ते, त्यानंतर बाजारपेठा आणि इमारतींवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविला जाणार आहे. सोबतच यापूर्वी ज्यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी आहेत, त्यांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.


प्रजासत्ताक दिनी आदिवासी लोकनृत्याचा गौरव

पेठच्या सोंगी मुखवट्यांना पहिले पारितोषिक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नाशिकच्या आदिवासी तरुणांनी सादर केलेल्या सोंगी मुखवट्यांचा गौरव झाला आहे. संचलनातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक या लोकनृत्याला जाहिर झाला असून पंतप्रधान मोदींनीही या लोकनृत्याचे फोटो ट्विट केले आहेत. त्यामुळे या लोकनृत्याने महाराष्ट्राच्या चित्ररथाची कसर भरून काढतानाच घवघवीत यशही संपादन केले आहे.

प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथही नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रात काहीशी नाराजी होती. पण, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ढाब्याचा पाडा येथील १६ जणांचा गट संचलनात 'सोंगी मुखवटे' हे लोकनृत्य सादर करीत होता. या लोकनृत्याने अवघ्या देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले. जवळपास दोन मिनिटांचे सादरीकरण पथकाने केले.

नागपूर येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे २० पालिका शाळांमधील १५० विद्यार्थ्यांना या नृत्यासाठी तयार कण्यात आले. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्या समवेत नृत्य करण्यासाठी धाब्याचा पाडा येथील या १६ आदिवासी युवकांना पाचारण करण्यात आले होते. काही दिवसातच युवकांनी हे नृत्य शिकविले. परंतु, त्यात काही बदल करण्यासाठी मुंबईहून कोरिओग्राफरही बोलाविण्यात आले. त्यात अरविंद राजपूत यांनी थोडे बदल करीत मुलांना नृत्य शिकवले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तयारी सुरु होती. दिल्लीत वीस दिवस तालीम केल्यानंतर संचलनामध्ये १६६ जणांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. या लोकनृत्याला ६६व्या प्रजासत्ताक संचालनातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी कलर्स ऑफ इंडिया या त्यांच्या ट्विटमध्ये या आदिवासी लोकनृत्याचे फोटोही ट्विट केले आहेत. यामुळे आदिवासी लोकनृत्याचा गौरव होतानाच त्याची प्रसिद्धीही झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोंगी मुखवट्यांना पहिले पारितोषिक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नाशिकच्या आदिवासी तरुणांनी सादर केलेल्या सोंगी मुखवट्यांचा गौरव झाला आहे. संचलनातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक या लोकनृत्याला जाहिर झाला असून पंतप्रधान मोदींनीही या लोकनृत्याचे फोटो ट्विट केले आहेत. त्यामुळे या लोकनृत्याने महाराष्ट्राच्या चित्ररथाची कसर भरून काढतानाच घवघवीत यशही संपादन केले आहे.

प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथही नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रात काहीशी नाराजी होती. पण, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ढाब्याचा पाडा येथील १६ जणांचा गट संचलनात 'सोंगी मुखवटे' हे लोकनृत्य सादर करीत होता. या लोकनृत्याने अवघ्या देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले. जवळपास दोन मिनिटांचे सादरीकरण पथकाने केले.

नागपूर येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे २० पालिका शाळांमधील १५० विद्यार्थ्यांना या नृत्यासाठी तयार कण्यात आले. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्या समवेत नृत्य करण्यासाठी धाब्याचा पाडा येथील या १६ आदिवासी युवकांना पाचारण करण्यात आले होते. काही दिवसातच युवकांनी हे नृत्य शिकविले. परंतु, त्यात काही बदल करण्यासाठी मुंबईहून कोरिओग्राफरही बोलाविण्यात आले. त्यात अरविंद राजपूत यांनी थोडे बदल करीत मुलांना नृत्य शिकवले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तयारी सुरु होती. दिल्लीत वीस दिवस तालीम केल्यानंतर संचलनामध्ये १६६ जणांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. या लोकनृत्याला ६६व्या प्रजासत्ताक संचालनातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी कलर्स ऑफ इंडिया या त्यांच्या ट्विटमध्ये या आदिवासी लोकनृत्याचे फोटोही ट्विट केले आहेत. यामुळे आदिवासी लोकनृत्याचा गौरव होतानाच त्याची प्रसिद्धीही झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोहळा केशकर्तनाचा !

$
0
0

धनंजय गोवर्धने


माझ्या वडिलांना मुलांचे डोक्याचे केस वाढलेले किंवा वाढवलेले आवडत नसे. त्यांना स्वतःलाही बारीक केस ठेवलेले आणि स्वच्छ दाढी केलेली आवडे. अगदी शेवटी दवाखान्यात अॅडमिट असताना देखील दाढी करुन घेतलेली त्यांना आवडे व ते आवडीने करत. त्यांना मिशी ठेवलेली मी कधी पाहिले नाही, ते स्वतःसोबत मलाही घेऊन जात कटिंग करायला. रामलाल काका हे त्यांचे ठरलेले न्हावी होते. गोरेपान, तरतरीत नाक, स्वतःचा पांढरा सदरा, पायजमा आणि डोक्यावर टोपी, स्वतः स्वच्छ दाढी केलेले. बोलायला एकदम गोड, सरदार चौकात त्यांचे दुकान होत.

उभ्या फळीच्या बिजागरीने मुडपणारे दरवाजे. त्यावर एक लोखंडी आडवी पट्टी असे उंचावर दुकान होते. त्यामुळे पाय ठेवण्यासाठी खाली एक लोखंडी बाकडं होतं. दुकानात वर चढतांना पकडण्यासाठी एक लोखंडी सळई बांधलेली होती. तिचा आधार घ्यावा लागे. उजव्या कोपऱ्यात एक पत्र्याचा डबा आणि झाडुखाली शहाबादी फर्शी, दरवाजाजवळ एका फळी इतकंच उभं पार्टिशन, वरती काच आणि निम्मी लाकडी फळी, दोन मोठ्या मजबूत लाकडी खुर्च्या, त्या खुर्चीवर बसलेला माणूस स्वतःला सिंहासनावर बसलेला बादशहा समजत असावा असा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसे आणि रामलाल काका त्यांना अत्यंत आदराने शेठ संबोधत असत. एखाद दुसरा भाऊ, तात्या, दादा असे. त्यांना त्यांच्या नावाने संबोधून हसतमुखाने स्वागत करणे चालू असे. समोरच्या भिंतीवर दोन मोठ्ठे आरसे, त्याच्या मधोमध पाण्याचा फवारा मारण्याची वाटली बुढीका बालचा जसा गुलाबी रंगाचा, साखरेच्या पाकाच्या तंतुचा, बांबुच्या काडीला गुंडाळलेला, रेशमाच्या कोशासारखा पदार्थ मिळे तशा आकाराचा एक झुपकेदार मोठ्ठा ब्रश त्या गुलाबी रंगाच्या पावडरच्या बसक्या गोल डब्यावर असे. दोनचार टोकदार बारीक कात्र्या, दोनचार वस्तरे, जाड बारीक कंगवे, स्नो, पावडर, तेल आणि बरंच काही दाढीच्या साबणासाठी एक रबरी गोल वाटीच्या आकाराची विचित्र वास येणारी वस्तू आणि त्यावर ठेवलेला मेदूवड्यासारख्या आकाराचा पांढरा साबण, त्यासोबत एक जाडा भरडा केसाळ ब्रश, डाव्या हाताच्या पार्टिशनच्या कोपऱ्यात एक चामड्याचा पट्टा टांगलेला असे. तिथेच जवळ धार लावण्यासाठी दोन काळे दगड, भिंतीवर बांधून ठेवलेला एक जाड रुमाल, त्याचा रंग ओळखू न येणारा विचित्र वास असलेला उगाचच लटकत असे.

वडिलांची दाढी-कटिंग होईपर्यंत तिथल्या लाकडी बाकावर बसून राहणं त्या वयात कंटाळवाणं नव्हे तर शिक्षाच वाटायची. कारण रामलाल काका मध्येच काय प्रश्न विचारतील याचा नेम नाही आणि वडिलांसमोर त्यांना उत्तर देणं जरा अवघड असे. कोणताही माणूस त्या लाकडी खुर्चीवर बसलेला असो रामलाल काकांना त्यांच्याविषयी माहिती असायची. आपल्या डाव्या हातातला कंगवा दोनचार वेळा मानेपासून वर नेताना केसांची हालचाल गव्हाच्या शेतावरुन जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उठणाऱ्या लाटांसारखी दिसे. उजव्या हातातली कात्रीसारखा चकचक आवाज करुन एका लयीत कातरत डाव्या हाताच्या कंगव्यावर एक टिचकी मारत एखादा चित्रकार पॅलेटच्या कोपऱ्यावर रंग ब्रशवर घेऊन एका लयीत गोलाकार फिरवत मिसळतो आणि ब्रशवरचा अनावश्यक रंग पॅलेटच्या कोपऱ्यावर ब्रश झटकतो त्याच लयीत त्याचे काम चालत असे. चित्रकाराच्या हातातून कोऱ्या कागदावर हळूहळू एखादं चित्र निर्माण होत जातं तसंच एका डोक्यावर अनावश्यक केसांची काटछाट करत कलात्मक केश रचना निर्माण करीत.

पेठे हायस्कूलमध्ये असताना चित्रकलेच्या डोंगरे सरांनी मला पेन्सिल शेडिंग करताना न्हाव्याचं उदाहरण दिलं होतं. ते म्हणाले होते, 'न्हावी कसा मानेवरचा केस कपतांना सर्वात खाली वस्तऱ्याने स्वच्छ करतो नंतर झिरो नंबरचे मशिन आणि त्यानंतर दोन नंबर मशिनची लयबद्ध हालचाल करत कंगव्यातून वर येणारे केस क्रमाक्रमाने जास्त

ठेवतो. तसंच वस्तू चित्रात हायलाईट नंतर शेडिंग हळूहळू डार्क करत जावं.' फक्त चित्र काढतांना आपण गप्पा मारु शकत नसतो पण रामलाल काका खुर्चीतला माणूस जागा राहील याची दक्षता घेत. त्याच्या आवडीचे विषय घेऊन गप्पा मारत. कात्रीसारखीच त्यांची जीभही चालत असे. गावभरातल्या महत्त्वाच्या खबरींची बातमी त्यांच्याकडे असे. त्यामुळे विविध स्तरातले सर्वजण त्यांच्याशी गोडच वागत.

मोठ्या लाकडी खुर्चीच्या दोन्ही हातांवर एक आडवी फळी ठेवली जाई किंवा पाय ठेवायला लाकडी खोकं खुर्चीवर ठेवून त्यावर लहान मुलांना बसावं लागे. काका बगलेत धरुन उचलून घेऊन खुर्चीवर प्रेमाने बसवत, पण गळ्याभोवती पांढरं कापड आवळून बांधतांना त्यांचा राग येई डाव्या हातानं ते डोकं दाबून धरुन वस्तरा लावायला लागले की भीती वाटे. वस्तरा आपल्याला लागेल कल्पनेनंच प्रतिकार केलेला असे. केस कमी करु नये म्हणून मानेला झटका दिलेला त्यांना कळे. कापलेले केस कापडावर पडत. खाली मान दाबून धरलेली असल्याने श्वासाबरोबर बारीक केसांचे तुकडे नाकात जात. नाकाची श्वासांशी लढाई चालू होई. शरीरात चुळबु‍ळ‍ सुरू होई. नाकातला पदार्थ गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने वेगाने खाली ये‍ऊ पाहे आणि लहानग्या श्वासाची ओठाताण होई. त्यात श्वासांचा परीजय करुन द्रवपदार्थ विजयी मुद्रेने फुत्कार करु पाहे. गुदमरलेल्या श्वासांची क्रांती फुग्याच्या रुपाने बाहेर येई. आपले हात पांढऱ्या कपड्याच्या आत बंदिस्त आहेत ही भावना साखळदंडाने बंधिस्त केलेला संभाजी महाराजांसारखी अस्वस्थ करी आणि त्वेषाने खोशांच्या सहाय्याने नाक पुसण्याच्या प्रयत्नांची चाहुल काकांना लागे. प्रेमळ हाताने ते श्वासातला अडसर दूर करत. स्थितप्रज्ञासारखे आपले काम करत. अशावेळी काकांचा आदर वाटे. तेव्हा लहान मुलांची कटिंग चार आणे होती आणि मोठ्या माणसांची बारा आणे.

केसांचा कोंबडा केलेला भांग वडिलांना अजिबात आवडत नसे. हे मवाली मुलांचे लक्षण आहे. नीटनेटका भांग, तेल लावून, चापूनचोपून भांग पाडलेला त्यांना आवडे. आपणही सुंदर दिसावे अशी भावना जागी होण्याचा काळ होता. निसर्गाने त्याची किमया चेहऱ्यावर सुरू केली होती. सभ्य तारुण्य पिटीका चेहऱ्यावर अवतरायला लागल्या होत्या. आपण इतरांसारखे सुंदर दिसायलाच हवे या हट्टाने चेहऱ्याचे हाल झाले. आपण यापेक्षा सुंदर दिसणार नाही आहोत याची खात्री झाली आणि मन शांत झाले. आपण सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर कलाकृती करू आणि सौंदर्याला आपल्याकडे यायला भाग पाडू शकू. या गुलाबी कल्पनेने चेहऱ्यावर उगवणाऱ्या हरळीसारख्या कोवळ्या केसांवरुन मशीन फिरवण्यासाठी रामलाल काकांना सांगितले. त्यांनी पहिल्यांदा खुर्ची मागचा दांडा डाव्या हाताने वर उचलला त्याच्या वरच्या पितळी पट्टीवर खरखर असा आवाज झाला. उजव्या हाताने त्यांनी खालची पितळी पट्टी घट्ट केली. खुर्चीच्या वरल्या दांड्यावरच्या चंद्राकार गादीवर माझी मान टेकवली, मला एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं, मी शरीर सैलावून राजासारखा बसलो. काकांनी गुलाबी पावडरचा तो झुबकेदार ब्रश पावडरच्या डब्यात दोनदा बुडवला एकदा झाकला. पावडरचा हलकासा धुरळा सुगंधासह नाकात गेला. हळुवार हातांनी काकांनी नवागत वधुला हळदीकुंकू लावावं तशी पावडर लावली. झिरोचं मशीन हातात घेऊन नवागत हिरवळ नष्ट केली. पांढरा ब्रश गळ्याभोवती फिरवला. दोन रुपयांची नोट काकांना दिली, त्यांनी मला बारा आणे परत दिले. मी गुपचुप ते घेतले. कारण कटिंगचा एक रुपयाच ते घेतील असं मला वाटलं होतं.

अपराध्यासारखी खाली मान घालून मी उरलेले बारा आणे वडिलांना परत दिले. त्यांनी विचारले कटिंगचा सव्वा रुपया कसा झाला? मी गप्पच. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हणाले ठीक आहे राहु दे जा. आज मुलगा ब्रॅन्डेड पार्लरमध्ये जाऊन येतो आणि विचारतो कशी दिसते आहे हेअर स्टाईल, मी विचारतो किती पैसे दिले. तो म्हणते फक्त तीनशे रुपये. मी गालातल्या गालात हसतो म्हणतो छान दिसतेय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघु उद्योजकच अर्थव्यवस्थेचा कणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या विकास प्रक्रियेत अर्थव्यवस्थेचा आलेख महत्त्वाचा असतो. या व्यवस्थेवर ज्या क्षेत्रांचा प्राधान्याने प्रभाव पडतो त्यात उद्योगविश्वालाही आघाडीचे स्थान आहे. बळकट अर्थव्यवस्थेत बड्या उद्योगांचे स्थान अतुलनीय असले तरीही या उद्योगांना लघु अन् मध्यम उद्योगांचे पाठबळ आवश्यकच असते. यामुळे लघु अन् मध्यम उद्योजकच अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असा सूर निमा हाऊस मधील चर्चासत्रात प्रकटला.

निमा हाऊस येथे निमा, हेम सिक्युरिटीज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्यावतीने 'एसएमपी आयपीओ: लघु व मध्यम उद्योगवाढीस उत्तेजक' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

निमा सेमिनार समितीचे अध्यक्ष व्हीनस वाणी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लघु व मध्यम उद्योग क्षेत्राबद्दल माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाची रुपरेषा हेम सिक्युरिटीजतर्फे इन्व्हेस्टमेंट बँकींगच्या मॅनेजर प्राची मित्तल यांनी स्पष्ट केली. एसएमई हेड सीमा नायक यांनी माहितीपर सत्रात लघु व मध्यम उद्योगांचे अर्थव्यस्थेतील महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या विविध आव्हानांची माहिती दिली. भारतात लघु व मध्यम उद्योग क्षेत्र हे अर्थिक वाढीस, रोजगार निर्मितीत व संसाधनांच्या गतिशीलतेत महत्त्वाची भूमिका बजावते. या क्षेत्रास विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यात उत्पादक भांडवलाची उभारणी करणे याचाही समावेश असतो. गेल्या अनेक दशकांपासून ते वित्त पुरवठ्यासाठी बँकिंग क्षेत्रावर अवलंबून आहे. परंतू त्याद्वारे मिळणारे सहाय्य यावर प्रकाश टाकला. यावेळी तज्ज्ञांनी लिस्टींगचे महत्त्वही अधोरेखित केले.

यानंतर प्रश्नोत्तरांचे सत्र पार पडले. या परिसंवादाचा उद्देश लघु व मध्यम उद्योजकांमध्ये जागृती निर्माण करुन त्यांना व्यवसाय विस्तारासाठी सहाय्य व्हावे हा होता. कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

यावेळी निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेष पाटणकर, सेमिनार समितीचे अध्यक्ष व्हीनस वाणी, संजय सोनवणे, एस. के. नायर व सुधाकर देषमुख आदी उपस्थित होते. हेम सिक्युरिटीजतर्फे रजत बैद, प्राची मित्तल, सीमा नायक, एस.एम.ई. हेड, एन.एस.ई. आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट मेहनतीवर अखेर पाणी

$
0
0

पहिल्या टप्प्यातील नाशिकची संधी हुकली; महापालिका दाखल करणार सुधारित प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धावपळीतही नाशिकचा स्मार्ट सिटी योजनेत पहिल्याच टप्यात समावेशासाठी शेवटपर्यंत धावपळ करणाऱ्या महापालिका आयुक्तांसह प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यातून नाशिकला वगळण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यातील घोषणेकडे आता नजरा लागून आहेत. महापालिकेला आता दुसऱ्या टप्प्यातील समावेशासाठी सुधारीत प्रस्ताव सादर करावा लागणार असून आपले गुणांकन वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे. दरम्यान स्मार्ट सिटीच्या या प्रस्तावावरून पुन्हा मनसे विरुद्ध भाजप असा सामना शहरात रंगण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने गुरूवारी स्मार्ट सिटी योजनेतील देशभरातील २० शहरांची यादी जाहीर केली. त्यात नाशिकचा पहिल्या टप्प्यातील यादीत समावेश होवू शकला नाही. महापालिकेतर्फे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिवसरात्र मेहनत घेत, स्मार्ट सिटी योजनेसाठी १९४५ कोटीचा प्रस्ताव सादर केला होता. स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये समावेश होण्यास पोषक स्थिती असतांनाही, नाशिकचा समावेश होवू शकला नाही. सिंहस्थ कामांमुळे महापालिकेला प्रस्ताव तयार करण्यास केवळ दोन महिन्यांचा कालावधी मिळाला तर गुणांकनासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यास सत्ताधाऱ्यांनी विरोध केला. त्यातच शेवटच्या क्षणी एसपीव्हीवरून झालेल्या राजकारणाचा महापालिकेच्या प्रस्तावाला फटका बसला आहे. त्यामुळे आता महापालिकेला सुधारित प्रस्ताव मार्चमध्ये सादर करावा लागणार आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात आणखीन २० शहरांची निवड होणार असून एप्रिलपर्यंत आशा पल्लवित ठेवाव्या लागल्या आहेत.

गुणांकन वाढणार कसे?

पहिल्या प्रस्तावात प्रशासनाने ठेवलेला करवाढीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावला होता. त्यामुळे पुन्हा नव्याने सुधारित प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. त्यात सुधारित प्रस्ताव दाखल केला जाणार असला तरी त्यात मालमत्ता करासह विविध करांमध्ये वाढ करावी लागणार आहे. या वाढीचा पुर्नप्रस्ताव सादर केल्यानंतरच नाशिकचे गुणांकन वाढणार आहे. मात्र, पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूक असल्याने सत्ताधाऱ्यांकडून करवाढीला विरोध होणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीचे स्रोत कमी होवून गुणांकन वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील समावेशावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

भाजपची पुन्हा कोंडी

स्मार्ट सिटीच्या शेवटच्या टप्प्यात एसपीव्हीला तीव्र विरोध झाल्याने स्मार्ट सिटीचा प्रस्तावच लटकला होता. स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेवर अतिक्रमण असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी त्यास विरोध केला. परंतु, भाजपने शेवटच्या टप्प्यात जोर लावत विशेष अटींसह हा प्रस्ताव पारीत करण्यास भाग पाडले. पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकनेही नव्याने अटीशर्तींसह एसपीव्हीला प्रस्ताव मंजूर केला होता. परंतु, पुण्याच्या अटीशर्तींच्या प्रस्ताव असतांनाही पुण्याचा अखेर समावेश झाला. पुण्याचा समावेश झाला नसता तर भाजपला सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्याची संधी मिळाली असती. मात्र, पुण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने अपयशाचे खापर कुणावर फोडायचे असा प्रश्न आता भाजपला पडला आहे. केंद्रात सत्ता असतांनाही नाशिकचा समावेश झाला नसल्याबद्दल भाजपलाच जाब विचारला जाणार आहे. त्यामुळे भाजपची गोची झाली असून सत्ताधारी मनसेला भाजपवर आरोप करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपचे इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे.

नव्या दमाने लढा : डॉ. गेडाम

नाशिकची संधी थोडक्यात हुकल्याने थोडीसी निराशा आहे. परंतु, स्मार्ट सिटी बनण्यासाठी शहराचे सुरू झालेले प्रयत्न प्रशासन आणि नागरिकांमध्ये तयार झालेला सुंसवादाचा पूल याबाबी स्मार्ट सिटी चळवळीचे फलित आहेत. हा अनुभव नाशिककरांना शिकण्यासाठी महत्त्वाचा होता. जगापासून चांगल्या गोष्टी शिकण्याचा नवा अनुभव या प्रक्रियेने दिला. या प्रक्रियेत नागरिक आणि तज्ज्ञांनीही सकारात्मक सहभाग घेवून अनेक युक्त व सूचना मांडल्यात. या सूचनांमुळे नाशिक महापालिका समृद्ध झाली आहे. नाशिकच्या विकासासाठी याचा भविष्यात निश्चित उपयोग होणार आहे. नव्या दमाने पुढील फेरीमुध्ये चुका टाळून आम्ही नव्याने सहभागी होवू. यातील काही उपयुक्त सूचनांची अमंलबजावणी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.


केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणेच पूर्ण प्रस्ताव दिला होता. पहिल्या टप्प्यात नाशिकची निवड व्हायला हवी होती. मात्र, राज्यकर्ते नाशिकला न्याय देवू शकले नाहीत. पुण्याच्या धर्तीवरच नाशिकचाही प्रस्ताव होता. दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा समावेश व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

- अशोक मुर्तडक, महापौर

पहिल्या टप्प्यात निवड झाली नाही याची खंत वाटते. गुणात्मक दृष्ट्या निवड झाली असती तर त्यात नाशिकचा समावेश झाला असता. लहान राज्यांना झुकते माप दिले आहे. राज्यातून चार शहरे हवी होती. गुणात्मक ऐवजी राजकीय निर्णय सत्ताधाऱ्यांना घ्यावे लागतात. त्याचा फटका नाशिकला बसला आहे.

- गुरूमीत बग्गा, उपमहापौर

पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश झाला नसला तरी दुस-या टप्प्यात नाशिकच्या समावेशासाठी प्रयत्न करू. जिथे आम्ही कमी पडलो त्यात सुधारणा करून नव्याने गुणांकन वाढविण्यासाठी प्रयत्न करू. स्मार्ट सिटीच्या प्रस्तावासाठी राजकीय इच्छाशक्ती एकवटण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करू.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी उद्दिष्ट जानेवारीतच पूर्ण

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने महापालिकेला एलबीटीचे चालू वर्षात दिलेले ७५१ कोटीचे उद्दिष्ट महापालिकेने जानेवारीतच पूर्ण केले आहे. जानेवारीअखेर एलबीटी वसूली आणि सरकारचे अनुदान मिळून ७४७ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. तर मुंद्राक शुल्काचे पाच कोटी मिळणार असल्याने हा आकडा ७५२ कोटीपर्यंत जाणार आहे. तर पुढील दोन महिन्यात आणखीन ९० कोटींची वसूली होणार आहे.

चालू अंदाज पत्रकात एलबीटीचे उद्दिष्ट हे ८१० कोटी दिले होते. तर सरकारने ७५१ कोटीचे उद्दिष्ट दिले होते. एलबीटीत धोरणात बदल झाल्याने उत्पन्नावर फटका बसेल असा अंदाज आहे. मात्र, एलबीटी विभागाने सक्षमतेने वसूली करीत जानेवारीत राज्य सरकारचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जानेवारी अखेर एलबीटी वसूली आणि सरकारचे अनुदान मिळून ७४७ कोटी ५५ लाख रुपये तिजोरीत जमा झाले आहेत. तर चालू महिन्यात मुंद्राक शुल्काचे पाच कोटी मिळणार असल्याने हा आकडा ७५२ कोटीपर्यंत जाणार आहे. तर पुढील दोन महिन्यात आणखीन एलबीटी, सरकारचे अनुदान आणि मुंद्राक शुल्कातून ९० कोटींची वसूली होणार आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज संचप्रश्नी अभियंत्यांना घेराव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

एकलहरेतील औष्णिक वीज केंद्रातील प्रस्तावित ६६० मेगावॅटचा प्रकल्प रखडल्यामुळे आणि संच क्रमांक चार बंद केल्यामुळे मुख्य अभियंता पकंज सपाटे यांना आठ गावांमधील ग्रामस्थांनी घेराव घातला.

माजी मंत्री बबनराव घोलप व प्रकल्प बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकर धनवटे यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळाने हा घेराव घातला. त्यात विजय जगताप, तानाजी गायधनी, प्रकाश म्हस्के आदींसह ग्रामस्थांचा समावेश होता. या औष्णिक केंद्रावर सुमारे २० हजार नागरिकांचा चरितार्थ तसेच युवा वर्ग आणि व्यावसायिकांचा रोजगार अवलंबून आहे. या संचाचे नूतनीकरण करुन दहा वर्षापर्यंत त्याचे आयुष्य वाढवावे, अशी मागणी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली. यावर अभियंता सपाटे म्हणाले, की थंडीचा प्रभाव वाढल्याने विजेची मागणी कमी आहे. अतिरिक्त वीज निर्मितीसाठी कोराडी येथील संच क्रमांक पाच आणि एकलहरेतील एक असे दोन संच तात्पुरते बंद ठेवण्यात आले. प्रस्तावित ६६० मेगावाट प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या चिमणीच्या उंचीचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आमदार देवयानी फरांदे यांनी येथे भेट दिली. जुन्या संचाबाबत लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. नवा प्रकल्प एकलहरेतून स्थलांतरित करू देणार नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान, विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांना याप्रश्नी निवेदन देण्यात आले. यावेळी गजानन पुराणिक, शांताराम राजोळे, गजानन पुराणिक, शांताराम राजोळे, शेखर आहेर, विनायक हरद आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविकसित शहरे अगोदर स्मार्ट करा

$
0
0

संजय राऊत यांचा भाजपला टोला

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

राज्यातील मुंबई व पुणे ही शहरे अगोदरच विकसित व स्मार्ट आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी अविकसित शहरांचा विचार व्हायला हवा असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश स्वागतार्ह असला तरी पुण्याच्या बाबतीत पुणेकरांशी पुन्हा चर्चा करा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच 'एसपीव्ही'वगळून स्मार्ट सिटी व्हाव्यात अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहावर बोलतांना राऊत यांनी स्मार्ट सिटी योजनेबाबत केंद्राच्या सध्याच्या धोरणावर टीका केली. मुंबई व पुणे शहरे ही आधीच विकसित असून त्यांची वाढ वेगवान आहे. या ठिकाणी सेवा सुविधाही चांगल्या उपलब्ध आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेसाठी अविकसित शहराचा विचार केंद्राने करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला. स्मार्ट सिटी योजनेतील सोलापूरचा समावेश योग्य असला तरी पुण्याचा समावेशावर चर्चा व्हायला हवी. स्मार्ट सिटीबाबत पुणेकरांशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एसपीव्ही वगळून स्मार्ट सिटी व्हायला हवी. तसेच स्मार्ट सिटीच्या यादीत बेळगावचा समावेश केला. त्याचे स्वागत असले तरी मराठी माणसांची मते लक्षात घ्या, असा सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावरील ऑईल वाहचालकांच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील हॉटेल सिबल समोरील चौफुलीवर अज्ञात वाहनाचा ऑईल ड्रम फुटल्याने रस्त्यावर ऑईल सांडले. या ऑईलमुळे रस्ता निसरडा होऊन त्यामुळे अनेक वाहने स्लिप झाली. जवळच असलेल्या रिक्षा स्टँडवरील रिक्षाचालकांनी याबाबत अग्निशामक दलास कळविले. त्यानंतर या भागात रस्त्याची साफसफाई करण्यात आली.

रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे तीन वाहनचालकांनी एकामागे एक घसरत पडले. यात सुदैवाने पाठीमागून अवजड वाहन नसल्याने किरकोळ दुखापत वाहनचालकांना झाली. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाचालकांनी पडलेल्या वाहनचालकांना तत्काळ बाजुला नेले आणि सांडलेल्या ऑईलवर माती टाकली. याबाबत पोलिस व अग्निशमन दलाला तत्काळ माहिती देण्यात आली. पोलिस प्रशासनाच्या दोन गाड्या ऑईल सांडलेल्या ठिकाणावरून गेल्या. परंतू गर्दी का झाली आहे, याची साधी विचारणा देखील त्यांनी केली नसल्याचे उपस्थितांनी सांगितले. यानंतर अग्निशमन दलाची गाडी येऊन रस्त्यावर पडलेले ऑईल पाण्याने साफ केले.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नेहमीच किंवा रोजच होणारे अपघात थांबतील कधी असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. रस्ता सुरक्षा
अभियनाचे केवळ कार्यक्रम घेऊन चालणार नाही, तर रस्त्यावर सुरक्षा निर्माण देखील झाली पाहिजे अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

अग्निशमन दलाची तत्परता

त्र्यंबकरोडवर सकाळी ऑईल सांडल्यानंतर नागरिकांनी व रिक्षाचालकांनी तत्काळ अग्निशमन दलास बोलावले. दोनच मिनिटात छोटी व्हॅन घेऊन ते घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावरील चिकट ऑईल पाण्याच्या जोरदार प्रवाहाने धुवून काढण्यात आले. रिक्षाचालकांच्या मदतीने त्यांनी रस्ता स्वच्छ केला. यावेळी झालेली वाहतूक कोंडी देखील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनीच सोडविली.

सकाळी साडेदहाच्या सुमारास त्र्यंबकेश्वर रोडने जात असतांना अचानक दुचाकी स्लिप झाली. मी कसा पडलो हेच कळले नाही. यानंतर रिक्षाचालकांनी मला उचलून रस्त्याच्या बाजुला नेले.

- किरण पिसोळकर, जखमी दुचाकीचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेपो बनला समस्यांचे आगार!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण परिवहन आगार समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. बसस्थानक आवारात पसरलेले घाणीचे साम्राज्य, दैनंदिन वाहतूक करणाऱ्या काही वाहनांचे फाटलेले शिट पाहता उभ्याने होणारा प्रवास थक्क करणारा आहे. रोडरोमिओंची वाढती गर्दी, भुरट्या चोऱ्यांचे वाढलेले प्रमाण, जनावरांचा वाढता उपद्रव, गुटखाप्रेमींनी बसस्थानक परिसरात केलेली रंगरंगोटी याबाबत परिवहन महामंडळ लक्ष घालेल का, असा प्रश्न प्रवाशी वर्गाकडून उपस्थित होत आहे.

कळवण डेपो अनेक समस्यांनी ग्रासले असल्याने त्याचे नूतनीकरण व परिसराचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. बसस्थानक परिसरात उखडलेला रस्ता पाहता डांबरीकरण होणे गरजेचे आहे. आतील भागात संरक्षक भिंत, स्वच्छतागृहाबाहेर येणारी दुर्गंधी, साचलेला कचरा या बस स्थानकाला विद्रूप करीत आहेत.

अनेकदा `प्रवाशांच्या सेवेसाठी` असलेल्या काही बसेस फाटलेल्या शिटांमुळे गैरसोयीच्या ठरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक बांधिलकीचा उदात्त हेतू ठेवून पाणपोयीची व्यवस्था केली जाते. मात्र, केवळ दुर्लक्ष व अस्वच्छतेमुळे ती बंद पडते. याचे उदाहरण कळवण बस स्थानक आवारातील पाणपोयीकडे पाहून समजेल. जनावरांचा बस स्थानकावर सतत वावर दिसून येतो. रोड रोमियोच्या बाबतीत पोलिस यंत्रणा अधून-मधून प्रयोग करते. मात्र, हा प्रयोग इलाज ठरत नाही.

खासगी वाहनांची बेशिस्त वर्दळ बस स्थानकात आढळून येत असते. अनेक बस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरतात. तर काही थांबत नाहीत. असा आरोप नित्यनियमाने होत असतो. बस स्थानकाच्या समस्या आ वासून उभ्या आहेत. मात्र, याकडे लक्ष देणे परिवहन खात्याला दुरापास्त वाटते. बस व्यवस्थापनाकडून सेवेला महत्व देणे गरजेचे आहेच. शिवाय, या कामी स्वतः लक्ष दिले जाईल. तसेच नूतनीकरण व सुशोभीकरण या विषयावर वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले आहे.

- अमोल आहिरे,

आगार व्यवस्थापक, कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षा यंत्रणेची उडाली धांदल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिरात गुरूवारी दुपारी रणरागिणी प्रवेश करणार म्हणून काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी बारा वाजेच्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त दिसून आल्याने नागरिकांत आणि येथे दर्शनार्थ आलेल्या भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, हा सर्व घोळ व्हॉटसअपच्या मेसेज मुळे झाला असे नंतर सांगण्यात आले व कोणी रणरागिणी मंदिर प्रवेश करणार नसल्याचे समजल्याने पोलिस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला आणि हळूहळू गर्दी कमी झाली.

व्हॉटसअपवर एक मेसज फिरत होता व त्यामध्ये ११ वाजता मंदिर प्रवेश होणार आणि त्याचे लाइव्ह प्रक्षेपण होणार असा संदेश देण्यात आला होता. दोन दिवसांमध्ये शणिशिंगणापूर येथे भूमाता ब्रिगेडचे अंदोलन व त्यावर मुख्य्यमंत्री महोदयांसह मान्यवरांनी केलेले भाष्य विचारात घेता त्र्यंबकेश्वर येथे गर्भगृहात महिला प्रवेश करणार व त्याचा आज प्रारंभ होणार असा अर्थ लावला. हा संदेश पोलिस यंत्रणेपर्यंत पोहचल्याने त्यांनी सावधगिरी म्हणून येथे बंदोबस्त लावला अगदी गुप्तवार्ता विभाग देखील उपस्थित राहिला होता. दोन महिन्यांपूर्वी येथील दोन महिलांनी निवेदन दिले होते. आम्हाला मंदिर गर्भगृह प्रवेश द्यावा, अशी मागणी केली होती. या व्यतिरिक्त अद्याप ञ्यंबकेश्वर गर्भगृह मंदिर प्रवेशाबाबत महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलेला नाही. त्यामुळे या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू होती. येथे उपस्थित झालेल्या याबाबत पूर्व परंपरेचा अभ्यास करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images