Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात ठिय्या

$
0
0

शहरातील नामवंत १६ कॉलेजेसने विद्यार्थ्यांकडून जादा फी घेतली आहे. त्याविरुद्ध छात्रभारती तीन वर्षांपासून आंदोलन करत आहे. जादा फी विद्यार्थ्यांना परत करावी, असा आदेश शिक्षण विभागाने काढला असतानाही शुल्क परत करण्यात आले नव्हते. त्यामुळे छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष सागर निकम, शहराध्यक्ष राकेश पवार, विशाल रणमाळे, रोशन वाघ, मुन्ना पवार, निलेश तासकर, आरती मडके, गौरी जाधव, कौमल गांगुर्डे, गणेश चौधरी, निखील गुंजाळ, प्रशांत शार्दुल, वैभव गुंजाळ, दीपक पवार आदींनी सूर्यवंशी यांचे कार्यालय गाठले. अधिकारी नसताना त्यांच्या खुर्चीला घेराव घातला. नंतर ते येताच त्यांच्यापुढे ठिय्या दिला.

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडेही दाखल झाले. जादा फी विद्यार्थ्यांना परत करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चार महिन्यापूर्वी काढले असताना आणि कॉलेजेसच्या चौकशीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमलेल्या तीन समित्यांचा अहवाल येऊनही कारवाई होत नसल्याबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली. अखेर सूर्यवंशी यांनी कॉलजेसने जादा फी ३० जानेवारीपर्यंत परत करण्याचे आदेश काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


असहिष्णुता पुतळ्याचे मुस्लिम ब्रिगेडतर्फे दहन

$
0
0

'इसि‌स'सारख्या संघटना भारतीय तरुणांना अमिष दाखवून तसेच धर्मांतराचा बुरखा घालून इस्लामला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा निषेध करून छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने दहशतवाद जातीयवाद व असहिष्णुतेच्या पुतळ्याला चपला मारून निषेध करण्यात आला. याप्रसंगी तरुणांनी राष्ट्र निर्मिती व विकासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष अजिज पठाण यांनी केले. यावेळी शहराध्यक्ष मुश्ताक शेख, संभाजी ब्रिगेडचे योगेश मिसाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनोव्हेशन कल्चर नाशिकची नवी ओळख

$
0
0

स्मार्ट सिटी अभियानात शहरवासियांचा सहभाग व प्रतिसाद व्हावा, यासाठी महापालिकेने विविध स्पर्धा घेतल्या. त्यातील विजेत्यांना सोमवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमांत पारितो‌षिक देऊन गौरविण्यात आले. यात ऑनलाइन स्मार्ट सूचना व संकल्पनेचे पहिले ५० हजाराचे बक्षीस आदिती कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आले. जितेंद्र कन्सारा यांना द्वितीय (३० हजार रुपये), मोहन काळोगे यांना तृतीय (२० हजार रुपये) बक्षीस मिळाले. सोबतच अजय चांडक, ए. गोसावी, शिल्पा धामने, विशाल सांगळे यांना दहा हजार रुपयांचे पाच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तर स्मार्ट सिटीच्या लोगोचे प्रथम क्रमांकाचे ११ हजाराचे पारितोषिक ऋता कानडे यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिकांचे वितरण करण्यात झाले. यावेळी उपमहापौर गुरूमित बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, वत्सला खैरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना रासकर म्हणाले, की कुंभमेळ्यानिमीत्ताने नाशिकमध्ये इनोव्हेशन कल्चरला सुरूवात झाली आहे. इनोव्हेश बद्दल नाशिकमध्ये चर्चा व काम होत असल्याने त्याची चर्चा आता जगभर व्हायला लागली आहे. कुंभमेळा, कुंभथॉन, स्मार्ट सिटीमुळे झालेल्या बदलामुळे मुंबई, दिल्ली नंतर जागतिक पातळीवर नाशिकचेही नाव घेतल जात आहे. हे इनोव्हेशन कल्चर अधिक वाढायला हवे. टाटाच्या इनोव्हेशन सेंटरमुळे त्यात आणखीन भर पडली आहे. स्मार्ट सिटीच्या निमीत्ताने आलेल्या तीन हजार संकल्पना या इनोव्हेशन कल्चर वाढीस लागल्याचा पुरावा आहे. या कल्चरमुळे जगभरातील कंपन्या या नाशिकमध्ये येतील आणि नाशिक एका वेगळ्या उंचीवर पोहचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या निमित्ताने

नाशिक झेप घेत असून त्याचा उपयोग इथल्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्मार्ट सिटीमुळे नाशिकमधील तरूणांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. या संकल्पनामुळे स्मार्ट सिटीचा आराखडा तयार झाल्याचे ते म्हणाले. तर परदेशातील कल्चरही आपल्याकडे सुरू झाल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचनेत बदलीसाठी अतिरिक्त जबाबदाऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नगररचना विभागात बदलीसाठी कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांकडून लॉबिंग केले जाते. पंरतु आता या विभागातील क्रिम पोस्ट‌िंगवर बदलीसाठी लॉबिंग लावणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागणार आहेत. या विभागात येवू इच्छिणाऱ्या पदनिर्देशीत अधिकारी म्हणून पद दिले जाणार असून, नगररचनेतील फाईल्स मंजूर करण्यासह अतिक्रमणासह इतर जबाबदाऱ्याही स्व‌िकाराव्या लागणार आहेत. शहरातील अतिक्रमणाला थेट जबाबदार धरण्यात येणार असल्याचा प्रस्ताव आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांपुढे ठेवला आहे.

पालिकेत सध्या बदल्यांचा मौसम सुरु झाला असून, सर्वच विभागात एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बदल्यांची गाज येणार आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यात २२ संवर्गापैकी ११ संवर्गातल्या २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परंतु यात नगररचना विभागाला अद्याप हात लावलेला नाही. या विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. तर या विभागात जाण्यासाठी इच्छुकांची यादी मोठी आहे.

पालिकेतील सर्वात क्रिम पोस्ट‌िंगचा हा विभाग असल्याने यात जाणाऱ्यांसाठी आयुक्तांनी नवा फंडा शोधला आहे. या विभागात बदली हवी असल्यास त्यास पदनिर्देशीत अधिकारी म्हणून आता पोस्ट मिळणार आहे. परंतु या पदासोबतच त्याच्यावर नगररचना विभागातील कामकाजासह इतर आणखी चार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या जाणार आहेत. संबंध‌िताला कार्यालयीन कामकाजासह शहरातील अतिक्रमणाशी संबंध‌ित अतिरिक्त काम करावे लागणार आहेत. यामुळे बदलीसाठी अतिरिक्त जबाबदारी स्व‌िकारावी लागणार आहे.

शहरातील विश‌िष्ट भाग त्याला दिला जाणार असून त्यातील अतिक्रमण शोधणे,त्याचा फालोअप घेवून ते पाडणे अशी जबाबदारी त्याला पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे बदलीसाठी इच्छुक असलेल्यांचा हिरेमोड होण्याची शक्यता आहे. क्रिम पोस्ट‌िंगसोबतच इतर झंझटीही मागे लागणार असल्याने त्रास नको म्हणून या विभागातील बदल्यांसाठी इच्छुक असलेल्यांची संख्या रोडावणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिवटिवाट पण ऑफलाइन!

$
0
0

नाशिक हळूहळू स्मार्ट होत आहे. त्याच्या विकासात भर पडत आहे. त्यामुळे याठिकाणी राहणाऱ्यांच्या नवमाध्यम वापरातही वाढ होतांना दिसते. पण ही माध्यमे आपल्याला किती फायद्याची आणि घातक आहेत याचा आपण विचार करायला हवा. तसेच यावर टाकल्या जाणाऱ्या मजकूराचा आपल्यावर कसा परिणाम होतो, याचाही विचार होणे आवश्यक आहे. यासोबतच अनेक प्रश्नही माध्यमे वापरताना आपल्याला भेडसावतात. याचेच उत्तर शोधण्यासाठी या अनौपचारिक चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये पहिल्यांदाच हा प्रयत्न केला जात असून नुकतेच ट्विटर संमेलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता याला यश नक्की मिळेल, असे आयोजकांचे मत आहे. ऑनलाइन राहताना येणाऱ्या अडचणी आणि आपल्याला व्हर्च्यूअली भेटणाऱ्या मित्रांना ऑफलाइन भेटून ही 'ट्विटअप' संकल्पना साकार होणार आहे. यासाठी ट्विटर युझर्सकडून ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. तसेच यासाठी कोणतेही शुल्क नाही. कार्यक्रमाचे आयोजन 'जस्ट नाशिक', 'वूई आर नाशिक' आणि 'नाशिक न्यूज' या नावाने ट्विटर अकाऊंट चालविणाऱ्या तरुणांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सायकल स्पर्धेसाठी नाशिकच्या संघाची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य हौशी सायकलिंग असोसिएशनतर्फे नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे. या संघातील खेळाडूंच्या निवडीसाठी खुल्या गटातील पुरुष व महिला गटात ४० किमी. अंतराची स्पर्धा घेण्यात आली, त्यातून संघाची निवड करण्यात आली आहे.

या निवडचाचणीत पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ निवडण्यात आले. पुरुष गटात सर्वेश धोंडगे (प्रथम), अनिकेत सोनवणे (द्वितीय), भरत सोनवणे (तृतीय) तर महिला गटात प्रांजली पाटोळे (प्रथम), यामिनी खैरनार (द्वितीय), रेणुका गावीत (तृतीय) यांनी विजेतेपद पटकावले. त्याशिवाय राज्य स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या संघात वरील विजेत्यांसह योगेश टिळे, प्रवीण शेंडे, किशोर डुमरे, महेंद्र पवार, नीलेश भोये यांची निवड करण्यात आली. संघाचे व्यवस्थापक म्हणून योगेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. निवड चाचणीसाठी जिल्हा संघटनेचे सचिव नितीन नागरे, राजेंद्र निंबाळते, शरद जोशी, हेमंत वैद्य, उत्तम जोशी, कैलास पोटींदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धात्मक सायकलिंगसाठी नाशिक जिल्हा हौशी सायकलिंग असोसिएशनतर्फे विविध गटांत स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी सचिव नितीन नागरे (सराफ बाजार) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकवर्गणीतून शाळा झाली डिजिटल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

लोकसहभागातून ई-लर्निंगचे स्वप्न साकार करण्यासाठी अंबासन (ता.बागलाण) येथील बाहेरगावी असलेल्या शिक्षणप्रेमी नोकरदारांनी व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करून भरभरून मदत केली. यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल ई-लर्निंग वर्ग सुरू होऊ शकला आहे. मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात माझी डिजिटल शाळेचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक तुळसाबाई भामरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, गटशिक्षणाधिकारी पी. आर. जाधव, पंचायत समिती सदस्य सतीश विसपुते, माजी मविप्र संचालक नारायण कोर, श्रावण महाराज, पी. आर. देवरे, केंद्रप्रमुख अशोक पवार, मुख्याध्यापिका जिजाबाई देवरे, राष्ट्रपती पुरस्कारार्थी सोपान खैरनार, माजी शिक्षक तानाजी शेवाळे, सरपंच रोहिणी कोर आदी उपस्थित होते.

पहिल्या डिजिटल ई-लर्निंग क्लासरूमचे उद्घाटन नारायण कोर यांनी केले. दुसऱ्या डिजिटल ई-लर्निंग क्लासरूमचे शं. वा. दांडेकरमामा यांचे नातीशिष्य श्रावण महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. मनोहर आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.

बाहेरगावी असलेल्या शिक्षणप्रेमीं नोकरदारांनी ई-लर्निंगसाठी 'सुजान पाईक आम्ही-अंबासनकर' या व्हॉट्स अॅप ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल तीन लाख रुपये जमा झाले. यामुळे दोन स्वतंत्र वर्गात डिजिटल ई-लर्निंग सज्ज केली. या खोलीला लोकवर्गणीतून स्थानिक व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून रंगकाम, लाईट फिटिंग करून वर्ग सज्ज केले आहेत. शाळेत प्रोजेक्टर लावून भव्य स्वरुपात उद्घाटन करून विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगचे धडे सुरू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकाऊंट हॅक करून नऊ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकाउंट हॅक करून इंटरनेट व बँकेच्या आरटीजीएस प्रणालीद्वारे एका कंपनीला सव्वानऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी मोहित गुप्ता या संशयितावर आयटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर परिसरातील कामगारनगर येथील साई गार्डन सोसायटीत जगन्नाथ महिपत पवार (वय ७४) राहतात. त्यांची युनिका एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. गुप्ता याने इंटरनेटद्वारे १६ ते १८ जानेवारी या कालावधीत कंपनीचे अकाउंट हॅक केले. कंपनीच्या अकाउंटबाबतची माहिती चोरून जगन्नाथ पवार यांच्या बँक खात्यातून दिल्ली येथील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर चार लाख ६० हजार रुपये, तर कांदीवली मुंबईतील एस. के. ट्रेडर्स यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यावर चार लाख ६० हजार रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे ट्रान्सफर केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मूर्ती चोरीस

त‌ीर्थाटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या गुजरामधील आखाड्याच्या महंतांकडील हनुमानाची पाच किलो वजनाची अष्टधातूची मूर्ती चोरीस गेली आहे. शनिवारी (दि. २३) सकाळी तपोवनात हा प्रकार घडला. याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात राज्यातील जुनागडमधील महाराज भीमदास गुरू सुरेशदास (२९, रा. जि. जुनागड) हे आपल्या आखाड्याच्या महंतांसमवेत नाशिकला आले आहेत. ते तपोवनात वास्तव्यास आहेत.

शनिवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास ते रामकुंड परिसरात आले होते. ते पुन्हा तपोवनात गेले असता चबुतऱ्यावर ठेवलेली दीड फूट उंचीची आणि सुमारे एक लाख रुपये किंमतीची हनुमानाची मूर्ती चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अपघातात दोघांचा मृत्यू

ट्रक व पिकअप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत नूरमहंमद युनूस शेख (४२, रा. बागवानपुरा, नाशिक) आणि भरत रामदास भांगरे (४०, रा. वाकी, ता. इगतपुरी) या दोघांचा मृत्यू झाला. मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे परिसरात रेमंड कंपनीसमोर रविवारी (‌दि. २४) रात्री साडेअकरा सुमारास हा अपघात झाला. वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रेमंड कंपनीसमोर ट्रक आणि पिकअप या वाहनांची समोरासमोर धडक झाली. शेख यांच्या डोक्यास व पायास तर भांगरे यांच्या डोक्यास जबर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यु झाला.

मृतांची संख्या तीन

दिंडोरी-नाशिक रस्त्यावरील पिंपळनेर फाट्याजवळील अपघातात जखमी झालेल्या दोघांपैकी आणखी एकाचा उपचारादरम्यान पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातामध्ये मृतांची संख्या तीन झाली आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास स्वीफ्ट कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात नितीन जाधव (रा. नाशिक) व गोरख पोपट ठोंबरे (रा. सिंधी कॉलनी, जेलरोड) यांचा मृत्यू झाला होता. विकी दाहिजे आणि आसाराम ढाकणे (दोघेही रा. आम्रपाली झोपडपटटी, जेलरोड) यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र पहाटे पाचच्या सुमारास दाहिजे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृत बिबट्याची नखे गायब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी/त्र्यंबकेश्वर

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांच्या सीमारेषेवर असलेल्या वावी हर्ष शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शिखारीच्या उद्देशानेच मारून बिबट्याची नखेच गायब झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

वावी हर्ष परिसरात सुभाष मधे हा शेतकरी आपल्या शेतीला पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेले असता वैतरणा धरणालागतच्या आळवंडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन फूट खोलवर त्याला एक पूर्ण वयाचा बिबट्या पाण्यामध्ये मृतावस्थेत दिसून आला. या बिबट्याचे नखे गायब असल्याच्या कारणाने बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की शिकार करून झाला हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बिबट्याच्या मृत्यूची चौकशी होण्याची मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भगवान मधे यांनी केली आहे. यावेळी घोटी पोलिसांनी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

गेल्या महिनाभरापूर्वीही इगतपुरी तालुक्यात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. महिनाभरात आतापर्यंत दोन बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. वैतरणा परिसरात पाण्यासाठी बिबट्यांचा वावर असतो. यामुळे ‌‌शिकार करण्याच्या नादातूनही या बिबट्याला मारण्यात यावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची पाणीकपात लांबणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात मंगळवारपासून एकवेळ वाढीव पाणीकपात लागू करण्याचे महापौरांचे आदेश पुन्हा धाब्यावर बसविण्यात आले. त्यामुळे मंगळवारची प्रस्तावित पाणीकपात पुन्हा लांबणीवर पडली आहे. प्रशासनाच्या पाणीकपातीच्या निर्णयाला जलसंपदा मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा आडकाठी केली आहे. आज (ता.२६) पालकमंत्र्यांसोबत पाणीकपातीसंदर्भात बैठक होणार असून, त्यानंतरच पाणीकपातीचा निर्णय होणार आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक दिवसांचे पाणीपुरवठ्याचे नियोजन होत नसल्याने महापौरांनी एक दिवस पाणीकपात करण्याचे आदेश प्रशासनाला दिला होता. सध्याच्या कपातीत जुलै अखेरपर्यत पाणीपुरवठा करणे शक्य नसून तब्बल ४९ दिवसांचा पाणीपुरवडा खंडीत करावा लागणार आहे.

....

पाणीकपातीचा निर्णय लागू होणार नसल्याने महापौरांच्या आदेशाला पुन्हा केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांसह मनसे संतप्त झाली आहे. आम्ही प्रशासनाला पाणीकपातीसंदर्भात आदेशीत केले असून, त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला आंदोलन करावे लागले असा इशारा महापौर अशोक मुर्तडक यांनी दिला आहे. नागरिकांना पाणी कमी पडल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अतिक्रमणाची साफसफाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत होर्डिंग्जसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर महापालिकेने सुरू केलेल्या साफसफाई मोहिमेला समिश्र यश आले आहे. २५ जानेवारीपर्यंत अतिक्रमण विभागाने ९४ राजकीय होर्डिंग काढले असून, २२६२ व्यावसायिक बोर्डसह राजकीय पक्षांचे शाखा फलक काढले आहेत. गेल्या आठ दिवसात पालिकेच्या पालिकेने २३५० होर्डिंग व फलकांवर कारवाई केली असून, ही मोहीम अजूनही सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज व फलक २६ जानेवारीपर्यंत काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने १८ जानेवारीपासून शहरातील अनधिकृत होर्डिंग, बॅनर व फलकांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. शहरातील अनेक भागात महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आलेले होर्डिंग, फलक, पोल बॅनर व झेंडे जप्त करण्याची मोहीम सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने या अनधिकृत होर्डिंगसंदर्भात रतन लथ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिल्यानंतर त्यांची अंमबजावणी केली जात आहे. गेल्या आठ दिवसापासून महापालिकेच्या या मोहिमेत ९४ राजकीय होर्डिंग्ज व २२६२ व्यावसायिक व राजकीय पक्षांचे शाखा फलक काढण्यात आले आहे. जवळपास २३५० होर्डिंग व फलक जप्त करण्यात आले असून १२ जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहराची बऱ्यापैकी साफसफाई झाली असली तरी, गल्लीबोळात मात्र राजकीय फलक कायम आहेत. अतिक्रमण विभागाने होर्डिंग, फलक, बॅनर जप्त केले; मात्र संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया संथ असल्याने आश्चर्य व्यक्त केले. महापालिकेच्या या दुजाभावामुळे अनधिकृत जाहिरातबाजीला लगाम कसा लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजना कामगार नव्हे, अभिनव कंत्राटीकरण

$
0
0

श्रीधर देशपांडे
सामाजिक क्षेत्रातील आरोग्य शिक्षण, पोषण आहार, अशा मूलगामी बाबतीत विशेष करून गरीब महिला, शिशु, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी सरकारच्या वतीने समाज कल्याणाचे उद्दिष्ट्य ठेवून काही योजना जसे एकात्मिक बालविकास योजना (आयसीडीएस), राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्वशिक्षा अभियान, कस्तुरबा गांधी बालिका, राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ मिशन अशा विविध योजना देशात चालविल्या जात आहेत. मानव संसाधन विकास मंत्रालयासारखी खाती यामध्ये काम करतात.
या योजना विशेषकरून ग्रामीण, आदिवासी भागात राबविल्या जातात. या क्षेत्रात कामही गरीब महिला विशेषतः करतात. हे सर्व कार्य श्रेष्ठ व वाखाणण्यासारखे आहे. या महिलाही येथे आत्मियतेने काम करतात. तशी येथे विशेष गरजही आहे.

स्वास्थ क्षेत्रात महाराष्ट्रात तब्बल ५९ हजार आशा वर्कर्स म्हणून महिला काम करतात. त्यांची नाशिक जिल्ह्यातील संख्या आहे ४-५ हजार. शाळांमध्ये मध्यान्ह भोजन, शालेय पोषण आहार, साक्षर भारत यासाठी कामे होतात. कस्तुरबा गांधी योजनेखाली शिक्षिकाही नेमल्या जातात. आंगणवाडी शिक्षिकांची संख्या महाराष्ट्रात २ लाखांच्या वर आहे. मध्यान्ह भोजन देशात १२ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात येते. ३० लाख कामगार काम करतात. देशात एकूण १ कोटीहून अधिक कामगार कर्मचारी हे या योजनांमध्ये श्रेष्ठ कार्य पार पाडत आहेत. मेजॉरिटी महिलांची आहे. राज्यामध्येही तशाच योजना आहेत. या कामकरी महिला देशासाठी ७/८ तास काम सहज करतात. शिवाय अनेकांचे काम एकसारखे, मात्र सलग नाही.

एक गोष्ट अर्थातच लक्षात घेणे आवश्यक आहे. एक कोटीहून अधिक महिला कामगार संसार चालविण्यासाठीच जरूर काम करतात. स्वतःच्या मुलांबाळांसाठीच व त्यांच्या अडचणी बाजूला ठेवून काम करतात. प्रश्न असा आहे, की सरकार हे उपक्रम चालवितांना या गंभीर प्रश्नांकडे पुरेसे लक्ष देते का?

बघा काय परिस्थिती आहे. सद्या कामगार क्षेत्रासमोर सर्वात प्रमुख प्रश्न आहे कंत्राटी कामगार व मजुरांचा. असे मजूर पूर्वीही होते. पण जागतिकीकरण, उदारीकरणानंतर यांचा सर्रास व सर्वव्यापी वापर सुरू झालाय. कारण समजण्यास सोपे आहे. कमी कमी वेतन दिले, किमान वेतनही दिले नाही, वार्षिक पगारवाढ, पीए, ग्रॅच्युइटी दिले नाही की नफा वाढतो. किंबहुना याशिवाय नफा वाढतच नाही. उद्योजकाला सर्वात प्रिय नफा ही गोष्ट सुपरिचित आहे. यासाठी म्हणून ते सरकारी नियम धाब्यावर बसवतात आणि या सर्वांमधून जन्माला येतात ती आंदोलने, संप, देशव्यापी संप हे चित्र नेहमीचेच आहे.

परंतु या कल्याणकारी योजना तर सरकार चलीत व स्थायी स्वरूपाच्या आहे. त्याला संविधानिक तरतूदींचा पाया आहे. शिक्षण, आरोग्य, कुपोषणापासून संरक्षण देणे सरकारचे कर्तव्य आणि जनतेचा अधिकार आहे. या योजनांमध्ये तर लाभार्थी व कष्टकरी दोन्ही फार गरीब वर्ग आहे. मग या कामगार कर्मचाऱ्यांना नियमित काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांसारखे वेतन लाभ का देऊ नये याचे उत्तर कोणी देऊ शकेल का? पण सरकार ते देत नाहीये व देण्यास तयारही दिसत नाही. म्हणजेच सरकार उद्योजकांसारखेच वागत आहे. दरवर्षी बजेटच्या वेळी सरकार या सामाजिक क्षेत्राबद्दल बड्याबड्या गोष्टी करते. परंतु, सरकारने कित्येक वर्षात संपूर्ण बजेटच्या १० टक्के सुद्धा खर्च या क्षेत्रात केलेला नाही. सरकारने खरे म्हणजे कामगार कायद्यांचे पालन करून कामगारांना चांगले वेतन व इतर लाभ देऊन उद्योजकांपुढे एक आदर्श निर्माण करावयास पाहिजे.

आता वानगी दाखल बघा काही योजनांमधील परिस्थिती. वरील अतिकठीण काम करणाऱ्या अशा वर्कर्सना केवळ १०००/१२०० मानधन दिले जाते पण काम १०/१२ तास. अंगणवाडी योजनेत २ लाखाहून अधिक शिक्षिका आहेत. काम एकूण ८ तास वेतनमात्र ५ हजार मिळते. शालेयपोषण आहार ५/६ तास काम मानधन मात्र १००० रुपये हॉस्पिटलमधील नर्सेसच्या ठिकाणी या कामगार यशोदा किंवा ममता नावाने काम करतात. त्यांना अल्प मुदतीसाठी नेमणूक दिली जाते. २-३ वर्षांसाठी वेतनही फक्त १००० रुपये ठराविक रक्कम अधिकाधिक पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये काम करीत असेल तर तीन हजार रुपये वेतन दिले जाते.

म्हणजे कामाचा मोबदला अत्यंत असमाधानकारक राग यावा असा आहे. मात्र, निरनिराळ्या योजनांची नावे आकर्षक व कामगार मजुरांनाही छान छान नावे! बघा नावे कार्यकर्ता - अतिथी - शिक्षामित्र - व्हॉलटिअर - यशोदा - ममता हा केवळ वरवरचा देखावा आहे. वरीलप्रमाणे प्रत्यक्षात उद्योजकांहून अधिक कठोर सरकारची वागणूक आहे. किमान वेतन, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सकट धरून २० हजारावर येते. संघटनांची मागणी १५,००० इतकीच आहे. पण या योजना कामगार किमान वेतनापासून मैलच्या मैल लांब आहेत.

देशाच्या विविध ग्रामीण व आदिवासी भागात हे कामगार विखुरलेले आहेत. त्यांना संघटीत करण्याचे अतिशय जटील काम संघटनांनी करून त्यांची राज्य व देशपातळीवर मोठमोठी आंदोलनेही केली व हे आव्हान ते सतत पेलवत आहेत. सरकार तरीही काहीही प्रतिसाद देत नाही. भारतीय श्रम संमेलनाच्या सहमतीनंतर व अंतरराष्ट्रीय श्रम संमेलनाचा पाठिंबा असूनही सरकार उदासीनच आहे.

धक्कादायक बाब म्हणजे असे असूनही वेतनवाढीचा विचार करण्याऐवजी सध्याच्या सरकारने उलट २०१४/१५ मधील 'आयसीडीएस'मधील साडे अठरा हजार कोटीचा निधी २०१५/१६ मध्ये साडे आठ हजार इतका कमी केला. राष्ट्रीय आरोग्य अभियानात ४००० कोटींची कपात, सर्व शिक्षा अभियान व शालेय मध्यान्य भोजनात अनुक्रमे ५ हजार व ४ हजार कोटींची कपात केली त्याचवेळी बड्या कॉर्पोरेट उद्योजकांना पावणे सहा कोटींच्या सवलती दिल्या आहेत. कसला विकास व कोणाचा विकास? मानव विकास निर्देशांकात अमूल्य वाढ करून देशाचे नाव जगात उंचीवर नेण्यासाठी झटणाऱ्या योजना कामगारांची सरकार अशी दुर्दशा करीत असेल तर सरकारला विकासाची कास आहे व त्याला मानवतावादी विचार आहे असे म्हणता येईल का?

(लेखक कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कुंभदर्पण'चे पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याचे औचित्य साधून दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, नाशिक सेंटरतर्फे 'कुंभदर्पण' या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमूर्तपर्व छायाचित्र प्रकारात महाराष्ट्र टाइम्सचे फोटोग्राफर सतीश काळे यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

स्पर्धेतील छायाचित्रांचे परीक्षण छायाचित्रकार प्रसाद पवार, संजय पाटील, अभय ओझरकर यांनी केले. शनिवार (३० जानेवारी) रोजी होणाऱ्या कार्यक्रमात विजेत्यांचा सत्कार होणार आहे. यावेळी संस्थेतर्फे एका दिनदर्शिकेचे देखील प्रकाशन करण्यात येणार आहे.

दिनदर्शिकेसाठी तसेच स्पर्धेच्या नियोजनामध्ये चिन्मय धामणे, योगेश महाजन, रोहन जाधव, रसिक बोथरा, मनोज गुप्ता, रोहिणी मराठे, स्मिता कासार पाटील यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेतील विजेते

अमूर्तपर्व (अॅबस्ट्रॅक्ट)

१) सतीश काळे (रुपये अकरा हजार)

२) प्रथमेश दीक्षित व प्रसाद जोशी (रुपये पाच हजार)

३) साकेत गोसावी (रुपये तीन हजार)

उत्तेजनार्थ : विनय बच्छाव (रुपये एक हजार)

कुंभरजनी

(नाईट लॅन्डस्केप) :

१ ) प्रशांत खरोटे (रुपये अकरा हजार)

२) अनिल पाटील (रुपये पाच हजार)

३) प्रशांत खरोटे व आकांक्षा

गुप्ता (रुपये तीन हजार विभागून विभागून)

उत्तेजनार्थ : दिनेश जातेगावकर, रोहन लोंढे (रुपये एक हजार)

भावदर्शन

(पोर्टेट फेस्टीव्हिटी) :

१) अनिरुद्ध जुन्नरे (रुपये अकरा हजार)

२) समीर बोन्दार्डे (रुपये पाच हजार) ३) संग्राम गोवर्धने

उत्तेजनार्थ : विनय बच्छाव, सचिन पाटील, किरण तांबट, एकनाथ मंडल, संजय जगताप (रुपये एक हजार)

उत्सव (फेस्टीव्हिटी) :

१) प्रा. आनंद बोरा (रुपये अकरा हजार)

२) जोर्ज कोरुथ (रुपये पाच हजार)

३) सायली मंडलिक व समीर बोन्दार्डे (रुपये तीन हजार विभागून)

उत्तेजनार्थ : किरण तांबट (रुपये एक हजार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदाराकडूनच अनधिकृत वृक्षतोड

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील अमरधाम अंत्यविधी साहित्याचा पुरवठा करणारा कंत्राटदारच शहरात अनधिकृतपणे वृक्षतोड करत असल्याचे समोर आले आहे. रविवारी (‌दि. २४) हा प्रकार समोर आला असून महापालिकेने संबंधित कंत्राटदारासह जागा मालकाविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेचा कंत्राटदारच अनधिकृत वृक्षतोडीत सामील असल्याने शहरात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

रविवारी इफ्को कॉलनी श्रीराम निवास येथे तीन वृक्षांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर उद्यान विभागाने धाव घेतल्यानंतर महापालिकेच्या पथकाने वृक्षतोड रोखली. परंतु, संबंधित वृक्षाची तोड करणारे कामगार हे अमरधाममध्ये अंत्यविधी साहित्याचा पुरवठा करणारे कंत्राटदार अकबर मनियार यांचे असल्याचे समोर आले. त्यामुळे महापालिकेने मनियार यांच्यासह जागामालक परशुराम निंबा सोनवणे यांच्या विरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अनधिकृत वृक्षतोड हा फौजदारी गुन्हा असतांनाही थेट महापालिकेचा कंत्राटदारच यात वृक्षतोड करत असल्याचे समोर आले. त्यामुळे शहरात अनधिकृत वृक्षतोड करणारे मोठे रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता आहे. अशी वृक्षतोड आढळल्यास नागरिकांनी ९८९०९८६६६७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबे सुकेणेचा पारा ३.२ अंशावर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे भागात बुधवारी तापमानाचा पारा ३. २ सेल्सिअसपर्यंत घसरला. विशेष म्हणजे ओझर रस्त्याच्या परिसरातील भंडारे वस्ती भागात पुदिन्याच्या पानांवर दवबिंदू अक्षरश: गोठले.

कसबे सुकेणे हा परिसर गोदावरी-बाणगंगा-कादवा या प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात आहे. ज्या ठिकाणी दवबिंदू गोठले तो भागात बाणगंगा नदी प्रवाहित आहे. बारा महिने जलसिंचन, बागायती प्रदेश असल्याने येथे थंडीचा जोर बारा महिने असतो. थंडीबाबत राज्यातील थंड हवेच्या स्थळांना मागे टाकणाऱ्या निफाड तालुक्यात तब्बल ४ वर्षानंतर दवबिंदू गोठल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कसबे सुकेणेची तुलना काश्मीरशी केली जात आहे. काश्मीरप्रमाणे बर्फाची दुलई काही भागात दिसत होती. नानासाहेब भंडारे यांच्या शेतात ३.२, द्राक्ष संशोधक वासुदेव काठे यांच्याकडे ६ तर निफाडच्या कुंदेवाडी येथे ५ अंश तपमानाची नोंद झाल्याचे समजते. कसबे सुकेणे येथील नानासाहेब महिपत भंडारे, केशव भंडारे, साहेबराव भंडारे, विक्रम भंडारे व शेवकर आणि जाधव वस्तीच्या परिसरातील पुदिना पानांवर बर्फाचा थर असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नाशिक जिल्ह्याचा 'ग्रीन बेल्ट' म्हणून ओझर, सुकेणे, निफाड, उगाव हा भाग प्रसिद्ध आहे. दरवर्षी या भागात थंडीचा जोर कायम असतो. गेल्या आठवड्यात ६ अंशांवर स्थिरावलेला पारा बुधवारी पहाटे ३.२ अंशावर आला आहे. कसबे सुकेणे येथील पंकज भंडारे व विक्रम भंडारे यांनी सांगितले, की चार वर्षांपूर्वीही याच भागात पुदिन्यावर बर्फ साचला होता. तेव्हा ४ अंश तापमानाची नोंद झाली होती.

द्राक्षमण्यांना तडे

कसबे सुकेणे हा परिसर संपूर्णपणे बागायती प्रदेश आहे. बाणगंगा नदीच्या खोऱ्यात ओझर रस्त्याच्या शिवारात मोठ्या प्रमाणात पुदिना शेती आहे. यंदाच्या हंगामात या भागात सातत्याने थंडीचा पारा घसरत आहे. बुधवारी पहाटे २०११ नंतर प्रथमच तपमान ३.२ वर घसरले. थंडीमुळे द्राक्ष शेतीला फटका बसला आहे. द्राक्षांच्या मण्यांना तडे जात असल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेस्ट कंट्रोलला मुदतवाढ

$
0
0




म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेत घंटागाडीनंतर वादग्रस्त ठरलेल्या पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला बुधवारी स्थायी समितीने १६ वी मुदतवाढ दिली आहे. स्थायी समितीने पेस्ट कंट्रोल संदर्भात यापूर्वी घेतलेल्या १८ कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी समितीचे सदस्य पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यत पोहचले होते. याच कंत्राटावरून प्रशासन व स्थायी समिती आमनेसामनेही आले होते. मात्र, बुधवारी समितीने आश्चर्यकाररित्या त्याला पुन्हा ६ महिन्यांची मुदतवाढ दिली.

स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीची बैठक झाली.त्यात महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे फेरलिलाव किंवा शीघ्रगणक पद्धतीने देणे, पेस्ट कंट्रोलसह भूसंपादनाचे विषय ठेवण्यात आले. पेस्ट कंट्रोलच्या कंत्राटाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी स्थायीनेच पेस्ट कंट्रोलला मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. स्थायीने पेस्ट कंट्रोलचा ठेका १९ कोटींसाठी दिला होता. परंतु, आयुक्तांनी त्यास विखंडनासाठी पाठवला होता. त्यामुळे प्रशासन व स्थायी समितीत वाद होवून तो मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता. घंटागाडीसह पेस्ट कंट्रोलला मुदतवाढ देण्यास स्थायीने नकार देत, स्थायीचा निर्णय लागू करा, अशी मागणी होती. परंतु, बुधवारच्या बैठकीत स्थायीने मुदतवाढीच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध न करता त्याला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे स्थायीने अचानक बदललेल्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर भूसंपादनाचे सर्व विषय तहकूब ठेवण्यात आले आहेत.

गाळ्यांचा फेरलिलाव?

तिबेटीयन मार्केटसह शहरातील ४२३ गाळ्यांचा फेरलिलाव किंवा शीघ्रगणक पद्धतीने भाडेवाढ करण्यासह मुदतवाढीचा प्रस्ताव चर्चेला आला. त्यात स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होईल म्हणून त्यांनाच भाडेवाढ करून मुदतवाढ द्यावी अशी मागणी यशवंत निकुळे व प्रा. कुणाल वाघ यांनी केली. भूमिपुत्रांवर अन्याय होईल म्हणून फेरलिलाव करू न करता ५ टक्के भाडेवाढ करून मुदतवाढ द्यावी, अशी सूचना सभापती चुंभळे यांनी केली. परंतु, आयुक्तांनी फेरलिलाव करावा अशी भूमिका घेतली. त्यामुळे यात मध्यममार्ग काढावा, अशी सूचना पुढे आल्याने यावर अभ्यास करण्यासाठी विषय तहकूब करण्याचा निर्णय घेतला. शहरातील १२८७ गाळ्यांना दोन महिन्यांपूर्वीच पाच वर्षांची मुदतवाढ स्थायी समितीने दिली. त्यामुळे अशीच वाढ आपल्यालाही स्थायीकडून मिळेल या आशेवर गाळेधारक होते. मात्र, आता त्याचा निर्णय पुढच्या सभेवर ढकलला गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड-सिन्नर तालुक्यांत संस्कृतिवेध मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

नाशिक जिल्ह्याच्या निफाड व सिन्नर या दोन तालुक्यांत सामाजिक व सांस्कृतिक माहिती गोळा करण्यासाठी 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे कार्यकर्ते ३ ते ६ फेब्रुवारीच्या दरम्यान फिरणार आहेत. महाराष्ट्राचे समग्र चित्र इंटरनेटवर उभे करण्याच्या हेतूने 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलने राज्याच्या विवधि तालुक्यांत जाऊन सामाजिक व सांस्कृतिक माहिती गोळा करण्याची संस्कृतिवेध नावाची मोहीम आखली आहे. तिचा आरंभ गतवर्षी सोलापूर जिल्ह्याच्या तेरा तालुक्यांत झाला.

या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून नाशिकच्या दोन तालुक्यांत दहा लेखक-कार्यकर्ते जात आहेत. त्यांचे नेतृत्व मकरंद कर्णिक (निफाड) व महेश खरे (सिन्नर) यांच्याकडे आहे. कार्यकर्ते तालुक्यातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्ती, उपक्रमशील संस्था आणि संस्कृतिसंचित अशा तीन अंगांनी माहिती गोळा करीत असतात. संस्कृतिसंचितात ग्रामदेवता, यात्रा-जत्रा-परंपरा अशा विविध अंगांनी खेड्याखेड्यात विचारणा करण्यात येते. जमा झालेली माहिती तिच्यावर यथायोग्य संस्कार करून 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर प्रसिद्ध केली जाते. पोर्टलला सध्या तीन ते चार लाख हिट्स असून, वीस हजार नियमित वाचक आहेत.

महाराष्ट्राचे समग्र चित्र साकार होण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून सुमारे पन्नास लेख निर्माण व्हावे लागतील असा 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या संयोजकांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० तालुके आहेत. हा खटाटोप ना नफा तत्त्वावर चालत असतो. त्यामुळे साधनसंपत्तीची मर्यादा खूपच जाणवते. मात्र, हे काम पुढे नेणे महत्त्वाचे आहे, हे विचारी जगाला पटले आहे. महादेवशास्त्री जोशी यांनी केलेल्या संस्कृतिकोशाच्या कार्याचा हा पुढचा टप्पा होय असाच त्यांच्याकडून अभिप्राय व्यक्त केला जातो.

--

'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'चे आवाहन

निफाड व सिन्नर तालुक्यांतील बरेच संपर्क 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ने मिळवले आहेत. तरीसुद्धा तेथील कोणतीही व्यक्ती वा संस्था दुर्लक्षित होऊ नये म्हणून सर्व उपक्रमशील व्यक्तींनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चालवणाऱ्या 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'चे कार्यकारी संचालक किरण क्षीरसागर (९०२९५५७७६७) यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉम्‍बच्या शक्यतेने उडाली धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बॉम्बसदृश वस्तू असल्याचे प्रवाशांनी कळविल्यावर पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, बॉम्ब नसून एका निष्काळजी प्रवाशाची बॅग असल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वांनी सुस्कार सोडला. खोदा पहाड निकला चुहा असा हा प्रकार होता. रात्री साडेदहाला नाशिकरोडला आलेली ही गाडी सव्वा तासांनी पावणे बाराच्या सुमारास रवाना झाली.

विदर्भ एक्स्प्रेस २६ जानेवारीला मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघाली होती. कसारा ते इगतपुरी दरम्यान एसी कारच्या ३३ नंबरच्या सीटवर एक बॅग प्रवाशांना आढळली. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी घातपाती कारवाया करू शकतात, असा धोक्याचा इशारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर बराच वेळ कोणी न आल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दलाला कळवले. नाशिकरोड येथे नाशिकरोड पोलिस ठाण्याचे नारायण न्याहाळदे, लोहमार्गचे चंद्रशेखर भाबल, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस, अग्निशामक, बॉम्ब निकामी पथक व स्फोटके शोधणारे दोन श्वानपथक सज्ज होते. गाडी येताच बॅगची व गाडीची कसून तपासणी करण्यात आली. बॅगमध्ये नेहमीच्या वस्तू होत्या. ही बॅग नागपूरला जाणाऱ्या विश्वास या व्यक्तीची होती. तो पुढील डब्यात असलेले आपल्या काका समवेत जेवण करण्यासाठी गेला होता. नाशिकरोडला फौजफाटा बघितल्यावर त्यांना सगळा उलगडा झाला. पोलिसांनी नंतर त्यांना चांगलेच फैलावर घेतले. या गाडीची दादरलाही तपासणी करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील मालेगाव महापालिकेने गेल्या आठवड्यापासून शहरातील मुख्य रस्त्यांलागत असलेले अतिक्रमण हटविण्याची जोरदार मोहीम सुरू

केली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक अतिक्रमण हटविण्यात आले आहेत. बुधवारी देखील मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई सुरू ठेवत ५० अतिक्रमणांवर हातोडा चालविला.

बुधवारी १२ वाजेपासून अतिक्रमण हटाव पथकाने शहरातील प्रभाग तीन अंतर्गत असलेल्या नवीन बसस्थानक ते देवीच्या मळा परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. शहरातील दरेगाव ते नवीन बसस्थानक दरम्यान रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, या मार्गावरील बस वाहतूक तसेच दुचाकी व खासगी वाहतुकीस नेहमीच अडथळा निर्माण होत असतो. सर्वाधिक रहदारीचा रस्ता असल्याने हे अतिक्रमण काढण्याची मागणी वारंवार होत होती.

बुधवारी प्रभाग अधिकारी सलीम युसूफ, अतिक्रमण अधीक्षक दीपक हादगे व बिट मुकादम विष्णू जेधे, संजय जगताप, अजय चांगरे, हर्षल गडरी, दिलीप निकम, संजय वालखेडे, गौरव पवार आदींसह पथकातील कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. यात एकूण ५० अतिक्रमण हटविण्यात आले. या भागातील व्यावसायिकांचे रस्त्यालगतचे शेड्स, बांधकाम, सामान पथकाने काढून घेत जप्त केले आहे.

शहरातील नवीन बसस्थानक, किदवाई रोड, जुना आग्रा रोड, सटाणा रोड अशा विविध भागातील प्रमुख रस्त्यांवर हॉटेल व्यावसायिक, विक्रेते, व्यापारी, दुकानदार यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्यांचा जीव गुदमरला आहे. यामुळे महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त झाल्याने रस्‍त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. ही अतिक्रमणे पुन्हा होणार नाही, याची महापालिकेने काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठाजवळील अपघात थांबणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतरराज्य महामार्ग असलेल्या दिंडोरी रस्त्यावरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ अपघातांची संख्या वाढली आहे. या परिसरातील अपघाताच्या घटना रोखण्यासाठी व त्या संदर्भातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यासाठी मनपा इंजिनीअर्सच्या पथकाने परिसरास भेट देऊन पाहणी केली.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. परिणामी या रस्त्यावर वाहनेही भरधाव वेगाने चालतात. आंतरराज्य महामार्ग व याच रस्त्यावर पुढे दिंडोरी, वणी यासारख्या धार्मिक स्थळांमुळे येथे वाहतूक वाढली आहे. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून परिसरात अपघातांची संख्या वाढली आहे. याबाबत सातत्याने विद्यापीठाच्या विविध संघटनांकडून विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी करण्यात येत होती. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ यांनी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी यावर कार्यवाही करीत मनपा इंजिनीअर्सच्या पथकास पाहणी करण्यास पाठविले.

या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेचे उपअभियंता एस. एस. रौंदळ व सहाय्यक अभियंता पी. एस. निकम यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट देऊन दिंडोरीकडे जाणाऱ्या आंतरराज्य महामार्गाच्या अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत विद्यापीठाच्या रस्ता विषयक समस्यांबाबत लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, डॉ. आर. टी. आहेर, संजय नेरकर, डॉ. स्वप्नील तोरणे, संदीप राठोड व महेश बिरारी हे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images