Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

घोडांबे धरणाला गळती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील घोडांबे धरणात पाण्याचा साठा वाढावा, यासाठी दोन वर्षापूर्वी सांडव्याची उंची वाढवण्याचे काम कळवण पाटबंधारे उपविभागातर्फे करण्यात आले. परंतु, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाण्याची गळती सुरूच आहे. पाणी वाया जात असल्याने किमान रब्बीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पाण्यासाठी सर्वत्र रान पेटलेले असताना या ठिकाणी वाया जाणारे पाणी पाहता संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जलसंपदा तथा पालकमंत्री याकडे लक्ष देतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बोरगाव, घाटमाथा परिसरातील घोडांबे धरण नागशेवाडी, घोडांबे, बोरगाव, पोहाळी, पासोडी, साजोळे, हतगड, उंडओहळ, हिरीडपाडा, खरुडे आदी गावांकरिता पिण्यासाठी व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बांधण्यात आले आहे. परंतु, धरणाच्या जागेत लोकांनी अतिक्रमण करून विहिरी खोदल्या आहेत. सदर पाणी हतगड परिसरातील हॉटेल व्यवसायासाठी वापरले जाते.

घोडांबे धरणातील पाण्याचा वापर बोरगाव, घोडांबे, हिरीडपाडा, खरुडे गावांना पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक कारणासाठी केला जातो. या धरणाकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या सांडव्याच्या खालच्या बाजूला काही ठिकाणचा तळ तुटला असून, सांडव्याचे पाणी शेतात जाऊ नये यासाठी बांधलेली संरक्षण भिंत तुटली आहे. पावसाळ्यात सांडाव्याचे पाणी शेतात शिरते. धरणाचा पाट पूर्णपणे बुजला असून, पाटात झाडी झुडपी वाढली आहेत. काही मोऱ्यांचे बांधकाम तुटले आहे. काही मोऱ्यांमधे गाळ साचला आहे. घोडांब्याकडे जाणाऱ्या पाटाचीही तीच अवस्था झाली आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून, आदिवासी शेतकऱ्यांना पाटाच्या पाण्याची आवश्यकता आहे. पाटाला पाणी सोडण्याची मागणी बोरगांव, हिरीडपाडा, चिखली, खरुडे आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

कुठलेही पाणी वाया जात नसून, ते नदीलाच जाऊन मिळते. कामासाठी निधी सद्यस्थितीत उपलब्ध होत नाही. एकंदरीत पाण्याची उपलब्धता पहाता पाणी पिण्यासाठी महत्त्वाचे असून, सिंचनाला पाणी देऊ नये अशा वरिष्ठ पातळीवरून सूचना

आहेत.

- श्यामसुंदर विसपुते, शाखा अभियंता, कळवण पाटबंधारे उपविभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चणकापूर, पुनदमधून कसमादेसाठी आवर्तन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

चणकापूर व पुनद धरणातून पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना दिलासा मिळणार असून, पाणीटंचाईही दूर होणार आहे. आमदार जे. पी. गावित यांच्या हस्ते हे आवर्तन सोडण्यात आले.

कळवण तालुका हा पावसाचा व धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या पाच वर्षांपासून घटलेल्या पर्जन्यमानामुळे भूजल पातळी कमी झाली आहे. तसेच, विविध लहान मोठ्या धरणसाठ्यात गाळ साचला असल्याने पाणी उपलब्धता कमी झाली आहे. यामुळे मार्चनंतर होणारी पाण्याची मागणी यावर्षी जानेवारी महिन्यातच करावी लागली. तालुक्यातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना या पुनंद व चणकापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावरच अवलंबून आहेत.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली. धरण लाभक्षेत्रातील व उजव्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या गावांना पिण्याची टंचाई जाणवू लागल्याने या गावातील नागरिकांनी आमदार गावित यांच्याकडे दोन्ही धरणातून पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली होती. आमदार गावित यांची भूमिका पटल्याने जिल्हधिकारी यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने धरणांतून पाणी सोडण्यात आले. यामुळे सुमारे साठ गावांना याचा फायदा मिळून पुढील काही दिवस तरी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.

यावेळी भादवण, विसापूर, बिजोरे, चाचेर, पिळ्कोस, काकाणे, दरेभणगी, मोकभणगी, गणोरे, देसराणे, धनेर, अभोणा, बार्डे, कळमथे, पाळे, एकलहरे, कळवण, मानूर, नाकोडे, बेज आदी गावातील नागरिक पाणी सोडण्याच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.

पाणीप्रश्न सुटणार

सटाणा शहरात गेल्या पंधरवड्यापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परिणामी शहरवासीयांवर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. गत काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने पाण्याची अशंता गरज कमी झालेली असली तरीही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी चणकापूर धरणातून कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव परिसरातील काही भागांना या पाण्याने दिलासा मिळणार आहे. लोहणेर येथील गिरणा नदीपात्रात सटाणा व देवळा शहर पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने या दोन गावांना लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर पालिकेकडून अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपालिकेने अतिक्रमण विरोधात कारवाई केली असून, रस्ता कामासाठी अडचण करणारी पक्की बांधकामे काढण्यात आली आहेत. शहरातील अनधिकृत होर्डिंग्जविरोधातही मोहीम राबवण्यात आली. यात २० हून अधिक होर्डिंग्ज काढण्यात आले. आडवा फाटा भागात विनापरवानगी लावलेले होर्डिंग्ज हटविण्यात आले.

अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू केल्यानंतर प्रथमच अतिक्रमित पक्की बांधकामे तोडण्यास सुरुवात केली. पंचायत समितीजवळील झोपडपट्टीत २० कामे तोडण्यात आली. अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. अतिक्रमण काढताना कुणीही विरोध केला नाही. पंचायत समितीजवळून नायगाव मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने ही कारवाई झाली. बहुतांश बांधकामे रस्त्यावर आलेली होती. त्यामुळे अतिक्रमणविरोधी पथकाने ही कारवाई केली.

रस्ता विस्तारीकरण कामासाठी अडचण होणारीच कामे काढण्यात आली असून, रस्त्याने काही प्रमाणात मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, शहरातील अनधिकृत होर्डिंग्जविरोधातही मोहीम राबवण्यात आली. यात २० हून अधिक फलक जमा करण्यात आले. विनापरवाना फलक लावण्यात येत असल्याने त्या विरोधात आडवा फाटा भागात विनापरवानगी लावलेले होर्डिंग्ज हटविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामपूर शहरात रिपाइंचा मूकमोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला हा विद्यार्थी शिक्षण व जात व्यवस्थेचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने तालुक्यातील नामपूर येथे मूकमोर्चा काढण्यात आला.

येथील सारदे रस्त्यावर आरपीआयचे तालुकाध्यक्ष किशोर मोरे व संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी संपूर्ण गावातून मोर्चा नेण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी हातात शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

यावेळी नामपूर औटपोस्टचे पोलिस उपनिरीक्षक आर. एस. सोनजे यांना मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. मागासवर्गीयांवर हल्ले होणे हे धोक्याचे लक्षण असल्याने जातीयवादी शिक्षण व्यवस्था बदलण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात अमोल पाटील, सचिन अहिरराव, सागर अहिरे, अविनाश बोरसे, किशोर मोरे, प्रकाश निकम, दिनेश पवार, विकी पवार, बंटी दाणी, अमोल बच्छाव, प्रितम भामरे, संजय भामरे, आंनद अहिरे, कैलास चौधरी व विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रन फॉर गर्ल्स’मधून जागवल्या संवेदना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

मराठा विद्या प्रसारक समाज व युवा मित्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे रन फॉर गर्ल्स कार्यक्रमात हजारो मुलींनी सहभाग घेवून कडाक्याच्या थंडीत उपस्थिती नोंदवून मुलींबाबत असलेली नकारात्मक दृष्टी बदलण्याचा संदेश दिला.

नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा फाटा येथील वंजारी समाज मैदानावर रन फॉर गर्ल्स चा प्रारंभ आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील किशोरीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार मनोज खैरनार, एमव्हीपीचे संचालक कृष्णाजी भगत, प्राचार्य काळे, मुसळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी धावपटू अंजना ठमके, जुदोपटू प्रियंका घुमरे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा सत्कार युवा मित्रचे अध्यक्ष सुनील पोटे, संचालिका मनीषा मालपाठक यांनी केला.

समाजात मुलींबद्दल संवेदना निर्माण व्हावी, मुलींबद्दल वाढती अनास्था कमी व्हावी, प्रश्न समजून घेवून त्यांना पाठिंबा द्या हा रॅलीमागचा उद्देश होता. मुलींबरोबर मुल आणि समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन मुलींसाठी धावावे, यासाठी रन फॉर गर्ल्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- सुनील पोटे, अध्यक्ष युवा मित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांचे सभापती बिनविरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत विविध विषय समिती सदस्य व सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. तहसीलदार शरद मंडलिक हे या सभेचे पीठासनाधिकारी होते.

विशेष सभेच्या प्रारंभी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते तथा नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी तर विरोधी बाकावरील भाजप व शिवसेना पक्षातर्फे गटनेते सागर लोणारी यांनी त्यांच्या गटातील सदस्यांचे नामनिर्देशन करणारे पत्र अध्यासी अधिकारी यांना सादर केले. त्यानुसार अध्यासी अधिकारी शरद मंडलिक यांनी पक्षीय बलाबल तसेच तौलनिक संख्याबळ लक्षात घेऊन पालिकेच्या विविध विषय समित्यांवरील सर्व सदस्यांचे नामनिर्देशन केले.

पालिकेच्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतिपदी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे तर नियोजन व विकास समितीच्या पदसिद्ध सभापतिपदी उपनगराध्यक्ष पंकज पारख हे आहेत. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी मुश्ताक अहमद सगीर अहमद शेख, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी मीना बुर्हाण तडवी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी रिजवानउल्ला सलीमउल्ला शेख, आरोग्यरक्षण व वैद्यकीय समिती सभापतिपदी पद्मा शिंदे, शिक्षण समितीच्या सभापतिपदी नीता संतोष परदेशी यांची यावेळी निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सदस्यपदी उषा शिंदे, सागर लोणारी, रवींद्र जगताप यांची निवड करण्यात आली. विशेष सभेस पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह पालिकेतील २५ सदस्यांपैकी १६ सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नैताळेत यात्रोत्सवास उत्साहात सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व नैताळेकरांचे आराद्य दैवत श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यात्रोत्सव अखंड १५ दिवस सुरू राहणार आहे.

माजी आमदार दिलीप बनकर, मंदाकिनी बनकर तसेच, नाशिक ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, दिलीप घायाळ, वर्षा घायाळ यांच्या हस्ते महापूजा, तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड यांच्या हस्ते रथपूजा करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

यात्रोत्सवात कोणताही अनूचित प्रकार घडू नये, म्हणून निफाड पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. यात्राकाळात रोगराई पसरू नये म्हणून नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक कार्यरत आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच यात्रा भागातील साफसफाई करण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे.

यात्रोत्सवात पाळणे, हॉटेल्स, जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने, मौत का कुवाँ असे करमणुकीचे साधनेही आहेत. यात्रोत्सव काळात पाणीटंचाई भासणार नाही याची ग्रामपंचायतीने दखल घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थपूर्ण घडामोडींच्या चर्चा लागल्या रंगू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३१ जानेवारी रोजी होत असून, या चुरस शिगेला पोहचली आहे. अर्थपूर्ण घडामोडी घडत असल्याच्या चर्चाही आता रंगू लागल्या आहेत. यापूर्वी कथित भ्रष्टाचार, उच्च न्यायालयीन कायदेशीर प्रक्रिया, आरोप-प्रत्यारोपांमुळे वादग्रस्त व बहुचर्चित असलेल्या मनमाड बाजार समितीची यंदाची निवडणूक उत्सुकतेचा विषय बनली आहे.

एकूण १८ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात असून, शिवसेनेचे माजी आमदार संजय पवार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांचे सत्ताधारी पॅनल आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड यांनी उभे केलेले व्यापारी पॅनल या दोन गटात निवडणूक रंगणार आहे. या निवडणुकीत माजी सभापती प्रकाश घुगे, व्यंकट आहेर, सतीश पाटील, राजेंद्र पवार यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्याने आणि चंद्रकांत गोगड यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता चंद्रकांत गोगड यांचे व्यापारी पॅनल हेच शिवसेनेपुढे निवडणुकीतील खरे आव्हान ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘यळकोट यळकोट जय मल्हार’ चा जयघोष

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून लोकमानसात श्रद्धेय असलेल्या श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला. श्री खंडेराय आणि बाणाई यांच्या प्रेम आणि भक्तीचे प्रतीक म्हणून शेकडो वर्षांपासून मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे हा यात्रोत्सव होत आहे. अलीकडे गाजलेल्या जय मल्हार मालिकेमुळे चंदनपुरीचे महत्त्व वाढले असून, यावर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे.

पौष पोणिमेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी श्री खंडेराव महाराजांची सपत्नीक महाआरती केली. यावेळी चंदनपुरी गावाचे सरपंच योगिता अहिरे, उपसरपंच केतकी सूर्यवंशी, प्रसाद हिरे, मालेगाव मध्यवर्ती बँकेचे चेअरमन राजेंद्र भोसले, शांताराम देसाई आदी उपस्थित होते. महाआरतीनंतर भुसे यांनी सपत्नीक श्री खंडेराव महाराजांची तळी भरली. यात्रोत्सवात पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थ, संसारपायोगी वस्तू, लहानमुलांची खेळणी, मनोरंजनाचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

श्री खंडेराय महाराज यांच्या जेजुरी इतकेच माहात्म्य असलेल्या चंदनपुरी येथे पौष्य पौर्णिमा ते अमावस्या असे पंधरा दिवस हा यात्रोत्सव असतो. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रपासून ते अगदी कर्नाटक राज्यातील लाखो भाविक हजेरी लावत असतात. जय मल्हार या नावाजलेल्या मालिकेमुळे तर मल्हारींच्या लाडक्या बाणाईच्या गावी म्हणजेच चंदनपुरीत भरणाऱ्या यात्रोत्सवाला भाविकांची संख्या वाढते आहे.

या यात्रोत्सवानिमित्ताने चंदनपुरी नगरी सजली आहे. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात भाविकांकडून भंडारा उधळला जात आहे. यात्रोत्सवासाठी येथील ग्रामपंचायत आणि जय मल्हार ट्रस्ट यांनी जय्यत तयारी केली असून, येणाऱ्या भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिर परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. गावातील पंडित देवचंद अहिरे यांच्या कुटुंबीयांकडे वर्षानुवर्ष देवाचे मुखवटे सांभाळण्याची आणि तेथून ते वाजत गाजत मंदिरात आणण्याची परंपरा आहे. यात्राकाळात हे मुखवटे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात ठेवण्यात येतात.

भाविकांसाठी पिण्याचे पाणी, वाहनतळ, चौकशी व मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. तसेच, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाची स्वच्छता, पथदीपक व्यवस्था व इतर कामे पूर्ण करण्यात आली आहेत. खंडेराय महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी मिळाव्यात अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, सरपंच योगिता अहिरे, उपसरपंच केतकी पाटील यांनी दिली.

पोलिस बंदोबस्त

यात्रोत्सवला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, दहा सहाय्यक पोलिस निरीक्षक, १०५ पोलिस शिपाई, २७ महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर परिसरात सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकातील थंडी गेली नागपुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना गारठवून टाकणारी थंडी आता विदर्भाकडे वळली आहे. रविवारी नाशिकमधील तापमानाचा पारा वाढून ८.५ अंशांवर पोहोचला. नागपुरात राज्यातील सर्वात कमी ६.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

यंदाच्या हंगामात एकदा नव्हे तर अनेकदा राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विशेषत: नाताळच्या कालावधीत नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा पारा ५ अंश सेल्सियसच्याही खाली घसरला होता. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे नाशिकमधील तापमानात कमालीची घट झाली होती. मात्र त्यानंतर त्यामध्ये वाढ होत गेली. त्यानंतर पुन्हा जानेवारीच्या पंधरवड्यानंतर शहरात आणि जिल्ह्यातही थंडीचा जोर वाढला. १९ जानेवारीला राज्यातील सर्वात निचांकी ८.६ अंश सेल्सियस तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. त्यानंतरही तापमान कमी होत गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आतिथ्यशिलतेची कसोटी

$
0
0

किशोर अहिरे

आतिथ्याची आचारसंहिता पाळणे हे जसे शहरातील नागरिकांचे कर्तव्य आहे, तसेच ते पोलीस व प्रशासनाची देखील महत्त्वाची जबाबदारी आहे. नुकतीच नाशिकमध्ये पंचवटीत घडलेली घटना याचे बोलके उदाहरण आहे. पंचवटीत मध्यप्रदेशातील यात्रेकरूंना तथाकथित पर्यटन स्थळाच्या व्यवस्थापन करणाऱ्या लोकांकडून झालेली मारहाण ही शहराच्या आतिथ्यशिलतेला कलंक लावणारी अशीच आहे. या प्रकारातून प्रकर्षाने जाणवते की प्रशासन तसेच पोलिसांनी या सगळ्यांवर कडक अंकुश ठेवणे गरजेचे आहे.

शहराच्या धार्मिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पोलिसांनी अत्यंत चोख अशी सुरक्षा यंत्रणा ठेवणे गरजेचे आहे. ही सुरक्षा यंत्रणा अपप्रवृत्तीच्या लोकांना सांभाळून घेणारी अथवा मदत करणारी नसावी तर ती शहरात येणाऱ्या पर्यटकांना किंवा भाविकांना दिलासा देणारी व सहाय्य करणारी असावी. बहुतेक मंदिरांच्या ठिकाणी भाविकांना दक्षिणा देण्यासाठी तसेच ठराविक पुजाऱ्यांकडून पुजा करण्यासाठी दबाव आणला जातो. तसेच अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी केली जाते. ही एक प्रकारे येथे येणाऱ्या भाविक तसेच पर्यटकांची लूटच आहे. या गोष्टी शहराची प्रतिमा मलीन करतात. आपल्याकडे असलेल्या धार्मिक स्थळांची स्वच्छता हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधांचा अजिबातच विचार केलेला नसतो. आपण त्यांची शक्य तितकी गैरसोय करण्याचाच प्रयत्न करतो. तिथल्या स्वच्छतेकडे तसेच सार्वजनिक सुविधांकडे प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. तेथे बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेले छोटे मोठे विक्रेते हे प्रवाशांची लुटच करत असतात. साध्या-साध्या गोष्टी अवाजवी दारात विकतात व त्यांच्याकडून जर भाविकांनी वस्तू घेतली नाही तर त्यांची मजल भाविकांना शिव्या देण्यापर्यंत सुद्धा जाते. याचे अगदी साधे उदाहरण म्हणजे रामकुंडावर गोदावरी नदीला अर्पण करण्यासाठी दिव्यांची विक्री करणाऱ्या बायका. या भाविकांनी जर त्यांच्याकडून दिवे घेतले नाही तर त्यांची मजल भाविकांना गलिच्छ शिव्या देण्यापर्यंत जाते, यांसारख्या गोष्टी आपल्या आतिथ्याला काळिमा फासणाऱ्या आहेत. या सगळ्यात पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील पोलीस कर्मचारी हे कर्तव्यदक्ष असले तरी ते स्थानिकांच्या अशा उपद्रवांकडे दुर्लक्ष करतात. यावर पोलिसांनी अत्यंत कडकपणे कारवाई करणे गरजेचे आहे.

मध्यंतरीच्या काळात शहर व परिसरात इतर राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील पर्यटकांची वाहने अडवून त्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरू झाले होते. याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेली होती. त्यामुळे पर्यटक तसेच भाविकांमध्ये आपल्या परिसराबद्दल अत्यंत नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. यासाठी पोलिसांनी पर्यटकांची अडवणूक करण्यापेक्षा त्यांना मदत करण्याची भूमिका असणे गरजेचे आहे. कुंभमेळ्याच्या काळात आपल्या पोलीस दलाच्या कार्याचे देशभरात कौतुक झाले. या काळात पोलिसांनी भाविकांना अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वयंसेवकांच्या भूमिकेतून सहाय्य केले. ही बाब आपली प्रतिमा उंचावणारी आहे. अशीच भूमिका पोलिसांनी इतर काळात देखील घेतली तर आपल्या आतिथ्याचे सर्वत्र कौतुकच होईल.

शहरात मुंबईच्या धर्तीवर पर्यटक-पोलीस ही संकल्पना देखील राबवणे गरजेचे आहे. शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था या पोलीस दलास सहाय्य करण्यास सदैव तयार असतात. त्यांचादेखील पोलिसांनी योग्य असा वापर करून घेतल्यास प्रवासी व पर्यटकांना सुसह्य असा अनुभव आपण देऊ शकतो. या सगळ्यात आपण स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य घेतले तर आपल्या आतिथ्याचा दर्जा निश्चितच उंचावेल. यासोबतच उपद्रवी घटकांचा पर्यटकांना होणारा त्रास देखील कमी होईल.

शहरात असणारी ऑटो रिक्षा सेवा ही पर्यटकांना शहराच्या सगळ्या भागात सेवा देणारी अत्यंत प्रभावी अशी वाहतूक व्यवस्था आहे. पण ही वाहतूक व्यवस्थाच आपल्या शहराचे नाव खराब करते आहे. शहरातील कुठलीही रिक्षा मीटरवर चालत नाही, प्रवाशांची अडवणूक करून अक्षरशः लूट केली जाते. प्रवाशांनी जर त्यांना या संदर्भात प्रश्न विचारले तर रिक्षाचालक अत्यंत उर्मटपणे वागतात प्रसंगी प्रवाशांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. यावर पोलीस तसेच परिवहन विभागाने अत्यंत कडक नियमन करणे गरजेचे आहे. यात शहरातील राजकीय पक्ष तसेच संघटनांनी देखील त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. कारण या संघटनानमुळेच रिक्षा चालकांची अरेरावी वाढते आहे. भविष्यात या सेवांचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

शहरात नागरी सुविधांसोबत पर्यटकांच्या वाहनांचा पार्किंगचा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. शहरात धार्मिक तसेच इतर पर्यटन स्थळांच्या वाहनतळाची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची तसेच प्रसाधनगृहांची व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र बऱ्याच वाहनतळांचा ताबा हा अलिकडे गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे गेल्यामुळे याचा देखील प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागतो. याची देखील प्रशासनाने योग्य दखल घेणे गरजेचे आहे. पर्यटन विभागाने देखील शहराची प्रतिमा सुधारण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनात अतिथी देवो भव ही संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे पर्यटन विभाग हा निव्वळ दिशादर्शक फलक लावणे व माहिती पुस्तिका छापणे या पुरता मर्यादित झाला आहे. त्यांनी देखील शहरातले प्रमुख आकर्षणे व शहराच्या सकारात्मक गोष्टींची प्रवासी तसेच पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे माहिती पोहोचवणे गरजेचे आहे. तसेच प्रवाशांना पूर्ण वेळ मार्गदर्शन अथवा सहाय्य करणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. जगभरात त्या त्या देशांचा पर्यटन विभाग हा त्या देशाची प्रतिमा पर्यटक तसेच प्रवाशांपुढे प्रभावीपणे मांडणारी तसेच प्रशासनाच्या विविध विभागात याकरिता समन्वय घडवून आणणारी संस्था म्हणून कार्य करतो.

अशा प्रकारची भूमिका आपल्या देशात देखील त्या त्या राज्यातील पर्यटन विभागाने जोपासणे गरजेचे आहे. नागरिकांची भूमिका ही आतिथ्यशीलतेत जितकी महत्त्वाची आहे. त्यापेक्षा प्रशासनाची भूमिका ही निश्चितच अधिक महत्त्वाची आहे. गरज आहे ती या सगळ्याकडे सकारात्मकतेने बघण्याची व 'अतिथी देवो भव:' या भुमिकेतून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करण्याची.

(लेखक हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाला धरले धारेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

कर वसुलीत होत असलेली दिरंगाई, महासभा इतिवृतात कायम करण्यास होणारा विलंब, हद्दवाढ क्षेत्राच्या विकास आराखड्यास झालेला विलंब आणि जुना आग्रा रोडच्या कामांच्या निकृष्ट दर्जा अशा विविध विषयांवर महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी चांगलेच धारेवर धरले. विरोधकांनी महापौरांनाही लक्ष्य केल्याने गदारोळामुहे महासभा सायंकाळी उशिरापर्यंत लांबली.

महापालिकेच्या सभागृहात दि. २० जानेवारी रोजी तहकूब झालेली महासभा सोमवारी बोलावण्यात आली. महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. महासभेला सुरुवात झाल्यावर नगरसेवक अब्दुल मलिक, रिजवान साहेब यांनी शोक प्रस्तावावरून वारंवार महासभा तहकूब होण्याबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत योग्य धोरण निश्चित करावे, अशी मागणी केली. तसेच, मनपाच्या अवैध नळजोडणी आणि अतिक्रमण हटाव मोहीम योग्य असल्याचे सांगत पवारवाडी भागातील रस्ते आधी पूर्ण करावेत, मगच नळजोडणी बंद करावी, अशी मागणी लावून धरली.

नगरसेवक शकील अहमद यांनी मनपा हद्दवाढ झाल्यानंतर देखील अनेक मिळकतींवर अद्याप देखील करवसूल केला जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे मनपाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात कर वसुलीचा तगादा नागरिकांकडे न लावता वर्षभर नियमित वसुली करावी. याबाबतीत प्रशासन दिरंगाई करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नगरसेवक सखाराम घोडके यांनी मनपाचे उत्पन्न वाढत नसून, आस्थापन खर्च मात्र वाढत आहे, यावर आळा घालावा असा मुद्दा उपस्थित केला. तसेच, शकील बेग यांनी मनपा आस्थापन विभागात नव्या एक हजार पदांची भरती होणार असल्याची शहरात चर्चा असून, प्रत्यक्ष मात्र शासनाच्या नियमानुसार आस्थापन खर्च ३५ टक्के पेक्षा जास्त असल्यास त्यास मंजुरी मिळणे कठीण आहे. याबाबीत आयुक्तांनी खुलासा करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर आयुक्त किशोर बोर्डे यांनी मनपाचा आस्थापनात एकूण एक हजार ३६ पदे मंजूर आहेत आणि नव्या आकृतीबंधानुसार एक हजार ४७ पदे नियुक्त करता येतील. मात्र, सध्या आस्थापन खर्च हा ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असून ४४ टक्के झाला आहे, अशी वस्तुस्थिती मांडली. त्यामुळे अशी कुठलीही पद भरती अद्याप शक्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, आगामी आर्थिक वर्षात मनपाचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले.

मनपाच्या हद्दवाढीतील क्षेत्राचा विकास आराखड्याबाबत देखील चांगलाच गोंधळ उडाला. हद्दवाढ भागातील नगरसेवक महिला तसेच शिवसेनेचे नगरसेवक संजय दुसाने आदींनी या भगात अद्याप देखील नागरी सुविधा नाहीत, याकडे लक्ष वेधले. तसेच, २०११ नंतर दोन वेळा मुदतवाढ देवून देखील विकास आराखडा तयार होत नसल्याने यास जबाबदार कोण? असा सवाल दुसाने यांनी उपस्थित केला. या प्रश्नावरून देखील नगरसेवक आक्रमक झाले होते. आग्रा रोडचे काम चौदाव्या वित्त आयोगातून करण्याबाबतच्या विषयावरून काँग्रेस नगरसेविका ताहेरा शेख व अन्य नगरसेवक यांनी या आधी हजारो कोटी रुपये या रस्त्यावर खर्च करण्यात आले. मात्र, काम निकृष्ट झाले आहे त्याचे काय? तसेच ठेकेदारांकडून कोटीच्या कोटीची बिले मंजूर होत आहेत मात्र लोकांना रस्ते चांगले मिळत का नाहीत? असा संतप्त सवाल करीत महापौरांना धारेवर धरले. तब्बल दोन तास महासभेचे कामकाज अनेकवेळा अशा गोंधळ आणि वादविवाद यामुळे चांगलेच तापले होते. त्यामुळे सायंकाळी उशिरा पर्यंत कामकाज सुरूच होते.

नगरसचिवांच्या निलंबनाची मागणी

महासभेत २८ जुलै २०१५ च्या महासभेचे इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावरून चांगलाच गदारोळ झाला. नगरसेवक शकील बेग यांनी थेट नगरसचिव राजेश धसे हे जाणीवपूर्वक इतिवृत्त मंजुरीचे विषय लांबणीवर टाकीत असून, प्रत्यक्ष ठराव होतात वेगळे आणि इतिवृत्त वेगळेच मांडले जात असल्याचा आरोप करीत निलंबन करण्याची मागणी केली. यामुळे सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नगरसेवकांचा चांगलाच रोष असल्याचे पहायला मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या विमुक्तांसाठी दबावतंत्राची गरज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

अविकसित, दुर्बल, अवमानीत आणि विषमतेने जर्जर झालेल्या भारतातील सामाजिक परिस्थितीचा एकूण विज्ञाननिष्ठ अभ्यास सध्या केला जात असला तरीही मानवी समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचा खरा मान केवथ्‍ ऑगस्ट कॉम्टे या शास्त्रज्ञाकडेच जातो. अभ्यासाची एक मालिकाच झाली असून, या माध्यमातून खऱ्या भटक्यांची दखल केंद्राने घ्यावी, यासाठी दबावतंत्र निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रखर मत येवल्यातील भटक्या विमुक्तांच्या साहित्य संमेलनात अध्यक्ष भिकुजी इदाते यांनी मांडले.

महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्थेच्या वतीने येवल्यातील आसरा लोन्सवर आयोजित भटक्या विमुक्तांच्या दोन दिवसीय नवव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी भिकुजी इदाते बोलत होते. भटक्या विमुक्तांच्या नागरिकत्वाचा हक्क नाकारून, त्यांना सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्याची चूक इंग्रजांनी केली. तीच चूक भारतीय राज्यकर्त्यांनी करू नये. त्यात सुधारणा करून त्यांना भारतीय लोकसंख्येत सामावून घेतले जावे, अशी मागणी करणाऱ्या समाजशास्त्रज्ञ डॉ. धुर्ये यांच्या कार्याचा बहुमान करण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी भिकुजी इदाते यांनी केली. भटके विमुक्त अजूनही पालातच राहत असून, त्यांनी आपला संसार हा तीन दगडावरच मांडला आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या उत्थानाची गरज असून, याकरिता संघटना प्रमुखांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे, मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केले.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी भटक्या विमुक्तातील साहित्य संग्रह असलेल्या पुस्तकांचे जतन करण्यात येताना येवला शहरातून 'ग्रंथ दिंडी' काढण्यात आली होती. संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाताना गोंधळी गीतांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. संमेलनाच्या शनिवारच्या पहिल्या दिवशी कवी संमेलनाचे उद्घाटन प्राचार्य वा.ना. आंधळे (खांदेश कवी), संमेलनाध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते, कवी संमेलनाध्यक्ष रिता जाधव, संस्थापक तथा निमंत्रक प्राचार्य डी. के. गोसावी, भास्कर लगड (लोणी, प्रवरा), अॅड. सुरेश मोकळ (कोपरगाव), प्रा. रमेश राठोड (धुळे), संजय वऱ्हाडे (विदर्भ), विष्णू भालेरे (येवला) यांनी काव्य वाचनात सहभाग घेतला. व्यास पीठावरील मान्यवराचे स्वागताध्यक्ष आणि उपाध्यक्ष ललिता गोसावी, अरुण ओतारी या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

भटके विमुक्त भूषण पुरस्कार प्रदान

स्वागताध्यक्ष नरेंद्र दराडे, संमेलनाध्यक्ष भिकुजी इंदाते, रघुनाथ राठोड, प्रा. वा.ना. आंधळे, रिता जाधव, प्रा. शांताराम वान्द्रे, प्रा. सुवर्णा रावळ, भटू गवळी, माणिक लोणारे, भरत कोटकर, गितांजली गोसावी यांना भटके विमुक्त भूषण पुरस्कार प्रदान करण्यात अला. तसेच दत्ता बैरागी, सुनीता पाटील, बापू बैरागी, तृप्ती बैरागी, विष्णू भारती आणि अनिष्ठ प्रथा विरोधात एकाकी झुंज देणाऱ्या कोमल वर्दे यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. संजय परमसागर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने संमेलनाची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी लवादाची स्थापना करावी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती, दिवसागणिक वाढणाऱ्या आत्महत्या तसेच, शेतीची होणारी हेळसांड बघता शेतकऱ्यांना आपल्या समस्या खुलेपणाने मांडता याव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनाने घटना कलम ३२३ ब नुसार अ‍ॅग्रीकल्चर ट्रिब्युनलची (कृषी लवादाची) स्थापना करावी, असे परखड मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

बागलाण तालुक्यातील करंजाड येथील छत्रपती शेतकरी बचत गटाच्या वतीने डॉ. श्रीपाल सबनीस यांचे शेतकरी बचाव या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपिका चव्हाण होत्या. या प्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, सद्यस्थितीत राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रेतयात्रा बघून गलबलून येत आहे. दुष्काळ हा काही आजच जन्माला आलेला पाहुणा नसून, तो वर्षानुवर्षे येत असतो. मग, प्रत्येक सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी काहीच उपाययोजना कशा केल्या नाहीत, हा खरा चिंतनाचा विषय आहे. पाण्याच्या थेंब अन् थेंब साठविण्यासाठी अद्यापपर्यंत का प्रयत्न झाले नाहीत, हा खरा सवाल आहे. यामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचे पापाचे धनी सरकार नव्हे तर कोण आहे, असा रोखठोक सवाल सबनीस यांनी उपस्थित केला.

एकीकडे ऊस बागायतदारांचे हिरवेगार फड असताना दुसरीकडे पाण्याच्या थेंबासाठी तहानलेला दुसरा मनुष्य ही शोकांतिका नव्हे तर काय आहे, याची आत्मपरिक्षणाची वेळ आली असल्याचेही सबनीस यांनी स्पष्ट केले. देशाला आपल्या शेतातून अन्न देणारा शेतकरी आपल्या शेतातील उत्पादनाचा व मालाचा भाव ठरवू शकत नाही. सरकार देखील उपाययोजना शोधत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होतच राहणार असल्याची भीती सबनीस यांनी व्यक्त केली.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र पाटील, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संजय वाघ शिरसमणीकर, खेमराज कोर, तालुका कृषी अधिकारी कापडणीस उपस्थित होते. नरेंद्र देवरे, माधुरी देवरे, अभिजीत देवरे, दीपक देवरे, देवाजी अहिरे, भूषण शेवाळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कमल आहेर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवण बाजार समितीवर देशमुख, पालवी यांची नियुक्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर भाजपाचे पाळे बु. येथील विकास देशमुख व दह्याणे येथील बेबिलाल पालवी यांची नियुक्ती करण्यात आली. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयाकडून संचालक मंडळावर दोघांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

तीन महिन्यापूर्वी झालेल्या कळवण बाजार समितीच्या निवडणुकीत विकास देशमुख यांचा पाच मतांनी तर बेबिलाल पालवी यांचा अवघ्या आठ मतांनी निसटता पराभव झाला होता. शासनाने संचालक मंडळावर नियुक्तीचे आदेश देत दोघांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना शेतकरी बांधवांमध्ये दिसून आली. पाच कोटीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळावर दोन व्यक्तींची विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्याचा अधिकार महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमान्वये शासनास अधिकार आहे. शेतकरी हिताचे काम करणार असून, बाजार समितीतील गैरव्यवहारांना आळा घालणे, शासनाच्या शेतकरी हिताच्या विविध योजनांची माहिती शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवणे, त्याचा प्रचार व प्रसार करणे, शेतीहिताच्या मूलभूत सुविधा मिळवून देणे हा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील, असे पालवी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीआयडी चौकशीसाठी देवगावकरांचे उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

देवगाव येथील सतरा वर्षीय कॉलेज युवतीची हत्या होऊन पंचवीस दिवसांपेक्षा जास्त दिवस लोटूनही तिच्या मारेकऱ्यांना पोलिस शोधू शकलेले नाहीत. याचा निषेध व सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी आजपासून देवगाव येथील नागरिक उपोषणाला बसणार आहेत.

मनीषा संजय चोपडे ही कॉलेजातून घरी येत असताना रस्त्यात तिची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. आत्महत्या दिसावी यासाठी तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. अर्धवट जळलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा तपास होऊन मारेकऱ्यांना अटक करावी, यासाठी देवगाव ग्रामस्थांनी दोन जानेवारी रोजी आंदोलन केले होते. सहा जानेवारी रोजी सुमारे एक तास नाशिक-औरंगाबाद महामार्गावर भरवस फाट्याजवळ रास्तारोको केला होता. चार दिवसात आरोपींना अटक करू, असे आश्वासन मिळाल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. मात्र, आज वीस दिवस उलटूनही मारेकरी मोकाट आहेत.

या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून मारेक-यांना कडक शासन करावे, या मागणीसाठी आज (२६ जानेवारी) पासून मनीषाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन राजेंद्र शंकर चोपडे, बद्रीनाथ लोहारकर, धनंजय विनोद जोशी, संदीप बबन लोहारकर आदींनी निफाड तहसीलदारांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नामपूरला घरफोडीत १३ तोळे सोन्यावर डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील नामपूर येथे घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. जय शंकर चौकातील भालचंद्र सावंत यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १३ तोळे सोन्यासह रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

भालचंद्र सावंत यांनी आपल्या शेतात कांद्याची लागवड केली आहे. रात्री वीजपुरवठा सुरू होत असल्याने कांद्याला पाणी भरण्यासाठी कुटुंबासह ते शेतात मुक्कामाला होते. चोरट्यांनी या संधीचे सोने साधून मध्यरात्रीच्या सुमारास १३ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम रुपये १२ हजार असा ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. गत काही दिवसांपूर्वीच किराणा व्यापारी जुजर बोहरी यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह १० लाखांची घरफोडी झाली होती. डिसेंबर महिन्यात नळकेस रस्त्यावरील माजी सैनिक कारभारी देवरे यांच्या घरात दरोडा पडून पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत प्रस्थापितांना दणका

$
0
0



पाच सहायक आयुक्त, चार अधीक्षकांसह २४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत वर्षानुवर्ष एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या सहायक आयुक्तांसह, अधीक्षक, सहायक अधीक्षकासह तब्बल २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नववर्षात जोर का झटका दिला आहे. प्रशासनाने एक तपाहून अधिक काळ एकाच टेबलावर कार्यरत शिपायांपासून अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या केल्या.

पालिकेने तब्बल एक हजार ११० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित केल्या आहेत. त्यातील पहिला टप्पा सोमवारी पार पडला. शहरातील सहा विभागीय अधिकाऱ्यांमधील चार विभागीय अधिकाऱ्यांचा या बदल्यात समावेश आहे. वरिष्ठ व कनिष्ठ लिपिकांचा दुसरा टप्पा पंधरा दिवसात सुरू होणार असल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेतील बदल्यांचा बार सोमवारी अपेक्षेप्रमाणे फुटला. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील सहायक आयुक्त ते शिपाईपदावर १२ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या २४९ कर्मचाऱ्यांच्या सोमवारी बदल्या केल्या. त्यासाठी ३० सप्टेंबर २०१५ पर्यंतची सेवा ग्राह्य धरणात आली. पालिकेने तीन वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या एक हजार ११० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित केल्या आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील बदल्या सोमवारी करण्यात आल्या. त्यात सातपूरचे प्रभारी विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांची बदली अतिक्रमण विभागाच्या अधीक्षकपदी करण्यात आली. सातपूरच्या विभागीय अधिकारीपदी सहायक आयुक्त चेतना केरूरे यांची नियुक्ती करण्यात आली. नाशिकरोडच्या प्रभारी विभागीय अधिकारी कुसूम ठाकरे यांची नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातील आस्थापना विभागात पाठविण्यात आले आहे. तर, नाशिक रोडच्या विभागीय अधिकारीपदी सहायक आयुक्त सोमनाथ वाडेकर यांची बदली करण्यात आली आहे. नाशिक पूर्वच्या विभागीय अधिकारी मालिनी क्षीरसाठ त्याच ठिकाणी आस्थापनापणा विभागाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. नाशिक पूर्वच्या विभागीय अधिकारीपदी डॉ. वसुधा कुरणावळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक पश्चिम विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांची मुख्यालयात बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे मुनिकससह नाट्यगृह विभागाचा पदाभर देण्यात आला आहे. नाशिक पश्चिमच्या विभागीय अधिकारीपदी नितीन नेर यांची बदली करण्यात आली आहे. विभागनिहाय पदांचे वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासन सहआयुक्त विजय पगार यांनी केला आहे.

अपंग, निवृत्तांना वगळले

महापालिकेने सोमवारी केलेल्या बदल्यांमध्ये चालू वर्षात निवृत्त होणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसह अपंगांना वगळले आहे. जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ पर्यंत निवृत्त होणारे व अपंग १११ कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

डॉ. कुरणावळ पूर्वमध्ये

महिला व बालकल्याण विभागात वादग्रस्त ठरलेल्या सहायक आयुक्त डॉ. वसुधा कुरणावळ यांना मुख्यालयातून हलविण्यात आले असून, त्यांच्याकडे आता नाशिक पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारीपदाचा पदभार देण्यात आला आहे. कुरणावळ यांची बदलीची मागणी महिला व बालकल्याण समिती सभापती वत्सला खैरे यांनी केली होती.
बदल्या झालेले अकरा संवर्ग

सहायक आयुक्त - ५

अधीक्षक - ४

सहायक अधीक्षक - ४४

नाईक, दप्तरी - ८

शाखा अभियंता - ९

इलेक्ट्रिशियन - १४

मिस्तरी - २९

रोड मुकादम - २०

उद्यान निरीक्षक - ४

हेडमाळी - ३

शिपाई - १०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रध्वज सन्मानासाठी दक्ष

$
0
0

पोलिस आयुक्तालयाच्या वतीने नाशिक शहर क्षेत्रात प्लास्टिक ध्वजाची विक्री करणाऱ्यांवर काटेकोर नजर ठेवण्यात येईल. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शहरात प्लास्टिक ध्वजांचा वापर वाढत असल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. यानुसार प्लास्टिक ध्वजाचा उपयोग कटाक्षाने टाळण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा १९७१ कलम २ नुसार कारवाई करण्यात येते. राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विशेष कला-क्रीडाप्रसंगी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतरत्र दिसतात. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकच्या वापरास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशानुसार आदेशाचा भंग करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.

सामाजिक संस्थांच्या वतीनेही आवाहन प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वाहनांवर लावताना किंवा राष्ट्रप्रेमाचे प्रतिक म्हणून जवळ बाळगण्यामागची नागरिकांची भूमिका योग्य असली तरीही नंतर मात्र या ध्वजांची हेळसांड होते. याबाबत शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीनेही प्रबोधन करण्यात येत आहे. या प्रकारच्या ध्वजांचा उपयोग टाळावा, असे आवाहन विविध शाळा, कॉलेजेस आणि सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले. दिवसभरात या प्रकारे प्लास्टिकचे ध्वज नजरेस पडल्यास सोशल माध्यमांद्वारे किंवा थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनासारख्या औचित्यांवर प्लास्टिकचे राष्ट्रीय ध्वज विक्रीस येतात. मात्र, अशा ध्वजांच्या वापरात केंद्राच्या गृह मंत्रालयाची मान्यता नाही. आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान जपण्यासाठी नागरिकांनी अशा प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा; अन्यथा पोलिसांच्या वतीने दोषींवर व विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. - अविनाश बारगळ, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छोट्या नाणीसम्राटाचा वर्ल्ड रेकॉर्ड

$
0
0

माणके कंपाउंड परिसरातील संस्कार बेदमुथा याची नोटा आणि नाणे यांनी भरलेली खोली सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे. आता हा छोटा नाणेसम्राट जागतिक विक्रमवीर होण्याच्या मार्गावर आहे. मनमाड येथील सामाजिक कार्यकर्ते पोपटलाल बेदमुथा यांचा नातू आणि बिपीन बेदमुथा यांचा मुलगा संस्कार याने तीन वर्षांपासून देशी-विदेशी नाणी, नोटा, तिकिटे यांचा संग्रह करण्याचा छंद जपला आहे. एकदा आई वडिलांसोबत तो औरंगाबाद येथे गेला. तेथे एका पोलंडच्या जोडप्याकडे त्याला एक नाणे दिसले. त्याला ते आवडले. त्याने त्यांच्याकडे ते नाणे विकत मागितले. पण, त्याची हौस पाहून त्या जोडप्याने नाणे भेट देऊन टाकले. यापासून संस्कारच्या या विश्वविक्रमी छंदाची सुरुवात झाली.

सुरुवातीला अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल म्हणून वडिलांनी त्याला विरोध केला. मात्र, अंकाई येथील गुरू हसमुख मुनिजी यांनी संस्कारला शिवकालीन नाणे भेट देऊन छंद जोपासण्यास सांगितले. कुटुंबीय तसेच अहमदनगर येथील बन्सीलाल लोढा नाशिकचे श्री अच्युत यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. संस्कारच्या या छंदाने गरुड भरारी घेत संग्रहाच्या विश्वात आपले वेगळे आस्तित्व निर्माण केले. विविध राज्यांमधक्षल प्रदर्शनांना भेटी देतांना प्रवासात परदेशी पर्यटकांकडे कोणताही संकोच न ठेवता मागितलेली नाणी व तिकिटे तसेच, अमेरिका दौऱ्यावर नासा भेटीत गेला असता या छंदिष्ट मुलाने तिथून विनयशील स्वभावाच्या जोरावर आणलेली नाणी अशा विविध मार्गाने हा प्रवास विश्वविक्रमाकडे निघाला आहे.

असा आहे बिपीनचा खजिना आतापर्यंत विदेशातील ८,२६६ नाणी, ३६६ नोटा, १,९५५ तिकिटे संग्रहित आहेत. तसेच भारतातील ४,५६० पोस्ट तिकिटे, ९६० नाणी आणि शेकडो नोटा या विक्रमवीराकडे आहेत. इंदूरचे नाणी संग्रहक गिरीश शर्मा यांनी संस्कारचे कौतुक करून त्याला मार्गदर्शन केले. येवल्याच्या विद्या इंटरनेशनल शाळेत शिकणाऱ्या संस्कारने आता गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे झेप घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images