Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रोजगाराच्या हजारो संधी

$
0
0

रेनबो डेको प्लास प्रा. लि, एसएमपी ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि, लिएर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि, गॅबरियल इंडिया लिमिटेड, फिन्स फ्रोजन फुड्स लिमिटेड, क्रिस्टल सोल्युशन्स लिमिटेड, एसके सारडा ग्रुप, हॉटेल गेटवे या उद्योगांच्या प्रतिनिधींनी यावेळी मुलाखती पार पडल्या. पेंटर, इंजिनिअर फिटर, एक्झीक्युटिव्ह, ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, तर पुरुष व महिलांसाठी हॉटेल मॅनेजमेंट सुपरवायझर, टेलिफोन ऑपरेटर, हाऊसकिपिंग आदी पदांसाठी या मुलाखती झाल्या.

शारीरिकदृष्ट्या असक्षम असणाऱ्यांनीही यात आपला सहभाग नोंदवला. सिक्युरीटी गार्ड, टेक्निकल सपोर्टर, ट्रेनी पदांसाठी मंगळवारी (दि. १९) भरती करण्यात येणार आहे. तर ट्रेनी, ट्रेनी असोसिएटच्या ४४२ रिक्तपदांसाठी बुधवारी (दि. २०) भरती केली जाणार आहे.

येथे करा नोंदणी मेळाव्यात शिकाऊ प्रशिक्षण कायद्यांतर्गत, विविध उद्योजकांकडून तांत्रिक (आयटीआय उत्तीर्ण) शिक्षण प्राप्त केलेल्या बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या www.maharojgar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करून कौशल्य रोजगार मेळाव्यास उपस्थित राहवे. त्यांना उचित संधी प्राप्त होतील, असे आवाहन सहाय्यक संचालक म. नि. धाकड यांनी केले आहे.

आज होणार मेगा भरती मेळाव्यात मंगळवारी (दि. १९) मोठी भरती होणार आहे. एक हजार ६० जागांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यापैकी पुण्यातील जीफोर एस सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सिक्युरिटी गार्ड या पदाच्या एक हजार जागा आहेत. फक्त पुरुष उमेदवारांसाठी या जागा आहेत. त्यासाठी दहावी उत्तीर्ण, ५ फूट ६ इंच उंची, ५६ किलो वजन व १८ ते २४ वय वर्षे ही पात्रता ठेवण्यात आली आहे. तसेच क्रिस्टील सोल्युशन ही कंपनी ट्रेनी टेक्निकल सपोर्टर या पदासाठी मुलाखती घेणार आहेत. यासाठी डिप्लोमा उत्तीर्ण व १८ ते २४ वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धार्मिक कार्यक्रमांसाठी कोर्टाच्या परवानगीनेच पाणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई नाशिकमधील गोदावरी नदीवरील गंगापूर धरणासह इतर धरणांमधील पाणी यापुढे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी आमच्या परवानगीविना सोडू नका, असे निर्देश सोमवारी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार व संबंधित प्रशासनांना दिले.

महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असताना गंगापूर धरणातून कुंभमेळामधील शाहीस्नानासाठी पाणी सोडले जात असल्याने प्रा. एच. एम. देसरडा यांनी जनह‌ति याचिका केली होती. त्यात हायकोर्टाने यापुढे आमच्या परवानगीविना कुंभमेळासाठी पाणी सोडू नये, असे निर्देश गेल्या वर्षी दिले होते. पाण्याच्या टंचाईमुळे पाणीवाटपाबाबत राज्य सरकारने ठरवलेल्या प्राधान्यक्रमानुसार, प्रथम पिण्यासाठी पाणी देणे आवश्यक आहे. असे असताना प्रशासनाकडून बिनदिक्कतपणे शाहीस्नानासाठी पाणी सोडले जाते. सरकारकडूनच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही, असा आक्षेप देसरडा यांनी नोंदवला होता. याच पार्श्वभूमीवर, सोमवारी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत देसरडा यांनी नाशिकमधील ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यानच्या मांगीतुंगी सोहळ्याविषयी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ६ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संदर्भ दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणाऱ्या या सोहळ्यात मांगीतुंगी नावाच्या पर्वतावर जगातील सर्वाधिक उंच व अखंड पाषाणातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्याला जगभरातील जैनधर्मीय जमा होणार असल्याने नाशिक परिसरात खूप मोठी गर्दी होणार आहे. त्यानंतर नदीतील प्रदूषण दूर करण्यासाठी गोदावरीवरील धरणसमुहांमधील धरणांतील पाणी सोडले जाईल, अशी भीती देसरडा यांनी व्यक्त केली. पुढची सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षात इंधनावर पाच कोटींचा चुराडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षात इंधनावर पाच कोटी १५ लाख रुपयांच्या इंधनाचा धुराळा उडविल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. पालिकेच्या १९८ वाहनांसह पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर हा खर्च झाला आहे. महापौरांच्या वाहनावर दरवर्षी सरासरी दोन लाख रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे.

आम आदमी पक्षाचे जितेंद्र भावे यांनी महापालिकेत माहितीच्या आधारे पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसह अधिकाऱ्यांच्या वाहनावर झालेल्या तीन वर्षातील इंधन खर्चाची माहिती मागवली होती. या माहितीत सन २०१२-२०१५ अशी तीन वर्षांची माहिती देण्यात आली आहे. या काळात तीन वर्षांत पाच कोटी १५ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या आयुक्तांसह विभाग अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मिळून १९८ वाहने आहेत. त्यावर सन २०१२-१३ एक कोटी ९८ लाख, सन २०१३-१४ मध्ये एक कोटी २७ लाख, सन २०१४-१५ मध्ये एक कोटी ९० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यात महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता यांच्या वाहनांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत नागरिकांची कुचंबना

$
0
0

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती‍मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांकडून अनेक प्रकारचे कर बाजार समिती घेते. या कारच्या पैशातून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सोयीसुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र, या ठिकाणी शौचास अथवा लघुशंकेस जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांनी बाजार समितीच्या मुख्य इमारतीकडेच जावे लागते. त्यामुळे इमारतीच्या आवाराला शौचालयाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. भर रस्त्यावर मूत्र वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.

बाजार समितीच्या मुख्य कार्यालय असलेल्या इमारतीच्या कंपाउंडच्या भिंतीवरच अनेक जण लघुशंका करून जातात. त्या ठिकाणी 'येथे लाघवी करू नये' असा फलक लावण्यात आलेला आहे. मात्र, सुविधा नसल्याने या ठिकाणी नागरिक प्रात:विधी देखील करतात. तसेच याच ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे लिलाव होतात. खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या अशा घाणीच्या ठिकाणी ठेवणे किती योग्य आहे याचा विचार बाजार स‌मिती प्रशासनाने करण्याची गरज आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

ओंगळवाणे दर्शन बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न कोट्यवधीच्या घरात आहे मात्र, सोयीसुविधा देण्यास प्रशासन कानाडोळा करताना दिसते. या ठिकाणी काही शौचालयाची निर्मिती केली आहे. मात्र, आर्थिक भुर्दंड बसत असल्याने नागरिकांनी हा पर्याय निवडलेला दिसत आहे. शहरातील अनेक नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात. त्यांना येथे आल्यावर बाजार समितीचे ओंगळवाणे दर्शन घडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार साखर कारखाने जगवू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा भ्रष्ट आणि अनियमीत कारभारामुळे सहकारी कारखान्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या सहकारी साखर कारखान्यांना दवा की नहीं, दुवा की जरूरत असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. सहकार क्षेत्र उद्धवस्त झाल्यास खासगी क्षेत्राची मक्तेदारी निर्माण होऊन सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होईल, याची राज्यकर्त्यांना जाणीव आहे. त्यामुळे राज्य सरकार अवसायनात निघालेल्या कारखान्यांची विक्री करण्याऐवजी त्यांना सहकारी क्षेत्रावर पुन्हा चालविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकारचे पहिले वर्ष भ्रष्टाचार शोधण्यात गेले असून, आता प्रत्यक्ष कृतीचे वर्ष असणार असल्याचे सांगत, नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या त‌सिाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार राहुल आहेर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'सहकाराच्या संस्कारीत भावनेतून कारखाना चालविल्यास निश्चितपणे वसाकाला गतवैभव प्राप्त होईल. सहकार क्षेत्र उद्धवस्त झाल्यास खासगी क्षेत्राची मक्तेदारी निर्माण होऊन सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होईल याची राज्यकर्त्यांना जाणीव आहे. खासगी क्षेत्राशी स्पर्धा निश्चित हवी आहे. मात्र, सहकार जगायला हवा ही देखील आपली भूमिका असून, दोघांची एकमेकांशी पूरक स्पर्धा असायला हवी. सहकारी साखर कारखाने जिवंत असणे ही काळाची गरज असून, ते चालविणे जिकिरीचे झाले आहे. याची देखील आपणास जाणीव आहे. यामुळे वसाकाचा वसा पेलण्यासाठी नियोजन, काटकसर व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारखाना अडचणीत येऊ नये, यासाठी प्रशासन, कर्मचारी व ऊस उत्पादकांनी सहकाराच्या संस्कारीत भावनेतून कारखाना चालविण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदोष नोटाप्रकरणी तीन कामगार निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड नाशिकरोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयात झालेल्या एक हजार रुपयाच्या सदोष नोटप्रकरणी साोमवारी प्रशासनाने तीन कामगारांना निलंबित केल्याचे समजते. तसेच सहा जणांना नोटिसा बजावण्यात आल्याचे वृत्त आहे. याआधी मुख्य दोषी असलेल्या होशिंगाबादच्या व्यवस्थापकासह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. नाशिकरोड प्रेसमध्ये वर्क्स कमिटीची निवडणूक होती. त‌चिा निकाल साोमवारी लागला आणि कारवाई करण्यात आली. कामगार नेत्यांनी कारवाई होऊ नये म्हणून मनापासून प्रयत्न केले होते. रिझर्व्ह बँकेने एक हजाराच्या ५० कोटी नोटा छापण्याची मागणी नोंदवल्यानंतर नाशिकरोडच्या प्रेसमध्ये तीस कोटी नोटा छापण्यात आल्या. त्यापैकी दहा कोटी नोटा रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना वित‌रीत केल्यानंतर त्यात सुरक्षा तारच नसल्याचे स्पष्ट झाले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय पक्षांमध्ये संतापाचे वातावरण

$
0
0

आता शाखाफलकही रडारवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गल्लोगल्ली राजकीय पक्षांची ओळख असलेल्या शाखा फलकांसह, सूचनाफलकांवर आता होर्डिंगमुक्त मोहिमेत गंडांतर आल्याने राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. हाय कोर्टाच्या आदेशाने प्रशासनाने राजकीय पक्षांना शाखाफलक व सूचनाफलक काढून टाकण्याचे फर्मान सोडले आहे. या कारवाईमुळे राजकीय पक्ष अस्वस्थ झाले असून, या कारवाई विरोधात एकवटण्याची तयारी सुरू केली आहे.

कोर्टाने महापालिकेला २६ जानेवारीपर्यंत शहर होर्डिंगमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. २६ जानेवारीनंतर शहरात होर्डिंग दिसले तर संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेने होर्डिंग विरोधात जोमात कारवाई सुरू केली आहे. होर्डिंग, फलक, बॅनर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. या कारवाईत आता राजकीय पक्षांच्या शाखा फलकांचाही समावेश करण्यात आला आहे.

गल्लोगल्ली पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी उघडलेले शाखाफलक काढून टाकण्याचे आदेश महापालिकेने राजकीय पक्षांना दिले आहेत. निवडणुकांच्या तोंडावरच शाखाफलक काढण्याची सक्ती सुरू झाल्याने पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, माकपसह सर्वच पक्षांनी प्रत्येक प्रभाग, वॉर्डात आपल्या पक्षांचे शाखाफलक लावलेले आहेत. विशेषतः शहरातील चौकांमध्ये ह्या फलकांची भाऊगर्दी झालेली आहे. त्यामुळे या सर्वांची साफसफाई करण्याचे आदेशच महापालिकेने काढले आहेत. आता राजकीय पक्षांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली असून, त्यांनी या कारवाईविरोधात एकजूट होण्याची तयारी सुरू केली आहे.

प्रशासन विरुद्ध पक्ष महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यात पक्ष आपले अस्तित्व दाखविण्यासाठी चौका चौकात शाखा उघडणार आहेत. परंतु, पालिकेच्या या आदेशाने पक्षाच्या विस्तारीकरणालाच आळा बसणार आहे. त्यामुळे या निर्णयावरून प्रशासन विरुद्ध राजकीय पक्ष असा संघर्ष रंगणार आहे.

शहराच्या विद्रुपीकरणाला आमचा विरोध आहे. परंतु, शाखाफलक हे राजकीय पक्षाचे आत्मा असतात. हायकोर्टाच्या आदेशाचा अभ्यास आम्ही करू. कोर्टाच्या निर्णयाचा विपर्यास केला असल्यास त्याला विरोध केला जाईल.
- अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार देणारे कुटुंबच झाले निराधार !

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिक आर्थिक व्यवहाराचे निमित्त करीत जोडप्यास गाव सोडण्यास भाग पाडणाऱ्या अन् या जोडप्याला आश्रय देणाऱ्या कुटुंबालाही बहिष्कृत करण्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. जात पंचायतींकडून बहिष्कृत करण्याच्या अमानवी कृतीमुळे नाशिकमध्ये गोंधळी समाजातील बहिष्कृत कुटुंबांची संख्या ३० झाली आहे. बह‌ष्किृत कुटुंबाला आधार देणाऱ्या नाशिककर कुटुंबालाही जात पंचायतीने हद्दपार केल्याने हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जातीत समाविष्ट करून घ्या अन्यथा कायदेशी कारवाईला सामोर जा असा इशारा अनिंसच्या जातपंचायत मूठमाती अभियानाने दिली आहे.

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील रहिवासी दीपक भोरे व त्यांच्या पत्नी यांनी परभणीत जात पंचायतीशी आर्थिक व्यवहार झाले होते. याची परतफेड करताना आकारले जाणारे अवास्तव व्याज बघता रक्कम फेडणे शक्य न झाल्याने पंचायतीशी संबंधित काही व्यक्तींकडून त्यांना दमबाजी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गाव सोडून हे कुटुंब नाशिकमधील नातेवाईकांकडे आश्रयास आले होते. ही माहिती गावातील पंचायतीस समजताच त्यांनी नाशिकमधील या जोडप्याचे आश्रयदाते नातेवाईक सुभाष उगले यांच्या कुटुंबास जातीतून बहिष्कृत केल्याचे वाळपत्र पाठविले आहे.

शुभाशुभ कार्यात समाजाशी या कुटुंबाचा कसलाही संबंध राहणार नसल्याचे संदर्भ या वाळपत्रात असल्याची माहिती जातपंचायत मूठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे यांनी दिली. नाशिकमधील पंचांची भूमिका समन्वयाची असतानाही त्यांच्या प्रयत्नांना परभणी जिल्ह्यातील पंचांकडून मात्र दाद मिळत नसल्याचेही सुभाष उगले यांनी सांगितले.

या पध्दतीने या जात पंचायतीच्या मनमानी निर्णयांमुळे गोंधळी समाजातील नाशिकमधील एकूण ३० कुटुंबे आतापर्यंत बहिष्कृत झाली आहेत. या कुटुंबांना पुन्हा समजात सामावून घ्यावे, अन्यथा कायदेशीर लढा आकार घेईल, अशी भूमिका अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाच्या वतीने घेण्यात आली आहे.

राज्यात अद्यापही जात पंचायतींची मनमानी सुरू असल्याचे हे ताजे प्रकरण आहे. अशा प्रकारे होणारी मनमानी ही संविधानाच्या विरोधात जाणारी आहे. मानवी हक्कांवर गदा आणणारे हे प्रकार बंद व्हावेत. यासाठी कठोर कायद्याची निर्मिती व्हावी.

कृष्णा चांदगुडे, संयोजक,

जात पंचायत मूठमाती अभियान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्ते निधीवरून असंतोषाचे वारे!

$
0
0

पंचवटीला झुकते माप दिल्याचा नगरसेवकांचा आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील रस्त्यांचे खडीकरण करण्यासाठी महापालिकेने काढलेल्या ४० कोटींच्या निविदेवरून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांमध्येच असंतोष निर्माण झाला आहे. सिंहस्थात कोट्यवधी रुपये पंचवटीत खर्च करूनही पुन्हा रस्त्यांच्या कामांसाठी पंचवटीला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप नाशिकरोड व सिडकोतील नगरसेवकांनी केला आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी महासभेने नुकतेच १९१ कोटी रुपयांच्या कामांचा ठराव मंजूर केला. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, रविवारी यातील पहिल्या टप्प्यातील ४० कोटींच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक रस्त्यांची कामे ही पंचवटीत प्रस्तावित आहेत. तर सिंहस्थ निधी न मिळालेल्या सिडको, सातपूर व नाशिकरोड विभागात कमी कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे इतर भागांतील नगरसेवकांमध्ये असंतोष पसरला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात पंचवटीत सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला. कोट्यवधींच्या रस्त्यांची कामे पंचवटीत करण्यात आली आहेत. तरीही पुन्हा निधी देतांना पंचवटीला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. विशेष म्हणजे मनसेचे नगरसेवक आर. डी. धोंगडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिककरोडच्या नगरसेवकांनी महापौर अशोक मुर्तडक यांची भेट घेवून नाशिकरोडला निधी देण्याची मागणी केली. तर सिडकोतील नगरसेवकांनीही सेना पदाधिकाऱ्यांची भेट घेवून पंचवटीला अधिक निधी देण्याच्या कृतीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. पंचवटीला अधिक निधी देण्याचा प्रश्न आता महासभेत तापण्याची शक्यता आहे. तर हा पहिलाच टप्पा असून, उर्वरित कामे अजून निघायचे बाकी असल्याचा दावा महापौरांनी केला आहे.

पंचवटी बनले सत्ताकेंद्र

पंचवटीत महापौर, उपमहापौर, सत्ताधारी पक्षाचे अध्यक्षांसह पालिकेतील बडे पदाधिकारी राहतात. त्यामुळे पाणीवाटपासह निधीवाटपातही पंचवटीलाच झुकते माप देण्यात आले आहे. सिंहस्थात पंचवटीत शेकडो कोटींची कामे झाली आहेत. तरीही पुन्हा पंचवटीलाच अधिक प्राधान्य दिल्याने नगरसेवकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. सत्ताकेंद्राखाली इतर नगरसेवकांना दाबले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २७ हजार नव्या मतदारांची भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील प्रारुप छायाचित्र मतदार याद्यांचा पुनर्रीक्षण कार्यक्रमात २७ हजार २१३ नवीन मतदारांची नोंद झाली असून विधानसभा मतदार यादीत जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या ४० लाख ३ हजार ८८१ झाली आहे. छायांकित मतदार नोंदणीलाही मतदारांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून, ९६ टक्के छायांकित मतदार झाले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या पुनर्रीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. मतदार यादीतील नाव दुरुस्ती, छायाचित्र समाविष्ट करणे, नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे तसेच पत्ता बदल करणे आदी कामे या कार्यक्रमांतर्गत करण्यात आली. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये जिल्ह्यात ४० लाख ३ हजार ८८१ मतदारांची नोंदणी झाली आहे. कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी मतदार संख्या ३९ लाख ७६ हजार ६८३ होती. त्यामध्ये २७ हजार २१३ मतदारांची भर पडली आहे. पुनर्रीक्षण कार्यक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३८ लाख ८० हजार ३४६ म्हणजे ९६.९१ टक्के मतदारांचे फोटो यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहेत. तर ३९ लाख २ हजार ५६३ म्हणजे ९७.४७ टक्के मतदारांकडे मतदान ओळखपत्र आहे. जाहीर मतदार यादीत २१ लाख ७ हजार २५० पुरुष तर १८ लाख ९६ हजार ६२३ महिला मतदार आहेत.

छायांकित मतदार मोहिमेत निफाड अव्वल
निफाड -९९.९९ टक्के

दिंडोरी - ९८.८६

नाशिक पूर्व- ९८.८

चांदवड- ९८.०७

इगतपुरी- ९७.९४

येवला- ९७.८७

नाशिक पश्चिम- ९७.७०

कळवण- ९७.५३

नाशिक मध्य- ९७.१८

सिन्नर- ९५.९९

नांदगाव- ९५.७१

देवळाली- ९३.७८

मालेगाव बाह्य- ९३.२९

बागलाण- ९२.७१

मालेगाव मध्य- ९२.०४



विधानसभानिहाय मतदारांची संख्या

नाशिक पश्चिम -३,१४,६४२

मालेगाव बाह्य- ३,००,४५३

नाशिक पूर्व - २,९०,३४७

नांदगाव - २,९७,०२१

सिन्नर- २,७५,०९०

येवला -२,७३,७३८

दिंडोरी- २,७१,१२५

नाशिक मध्य -२,६५,८२१

चांदवड-२,५५,७७९

बागलाण -२,५०,८३८

मालेगाव मध्य - २,४७,८७०

कळवण -२,४४,३८८

निफाड- २,४४,००८

देवळाली -२,३६,७२०

इगतपुरी - २,३६,१४१


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे प्रेमकरण पोहचले निलंबनावर

$
0
0



जॉगिंग ट्रॅकवरील पोलिसाचे प्रेमकरण पोहचले निलंबनावर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वय आणि नोकरीचे भान विसरून विवाहीत महिलेच्या प्रेमात पडलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी झालेल्या या प्रकाराबाबत सर्वच पातळ्यांवर कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास महिलांची संख्या लक्षणीय वाढते. यात सिडको येथील एक ३२ वर्षीय महिलेचाही सहभाग होता. दोन मुले व पती चांगल्या कंपनीत कार्यरत असलेल्या या महिलेवर इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने प्रमाचे जाळे फेकले. जॉगिंग ट्रॅकवरच सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित महिला व पोलिस कर्मचाऱ्याचे सूत जुळले. मोबाइल फोनचा सर्रास वापर करणाऱ्या पत्नीबाबत परगावी राहणाऱ्या पतीचा संशय बळावला. बी. ई. कॉम्प्युटर असलेला हा तरूण मग नोकरी सोडून शहरात आला. त्याने कॉल रेकॉर्डर व इतर तंत्रज्ञानाचा वापर करीत पत्नीचे पोलिस कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेले संभाषण व इतर पुरावे संकलीत केले. पत्नीला जाब विचारला असता तिने थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला माहेरी पाठवून संबंधित पतीने त्या पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू केला. त्याने पत्नी व त्या पोलिस कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या अनेक संभाषणांची सीडी तयार करून पुरावा म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सादर केली. आपल्या पोलिस दलातील एका कर्मचाऱ्यामुळे दोन लहान मुले असलेले एक सुखी कुंटुंब उद्धवस्थ झाले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्याने केली. तक्रारदाराच्या आरोपात तथ्य असल्याने त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निलंबनाला आता महिना होत असून, या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत माहिती देताना संबंधित पतीने सांगितले की, इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या त्या कर्मचाऱ्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. त्याचे इतर काही साथिदार असून, ते सतत जॉगिंग ट्रॅकवर येणाऱ्या महिलांवर लक्ष ठेऊन असतात. आतापर्यंत किमान चार ते पाच महिलांची अशा प्रकारे फसवणूक झाली असून, त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतरच मी तक्रार करण्याचे धारिष्ट्य दाखवले. पोलिस असल्याचे दाखवत ते हा उद्योग करीत असल्याचा दावा पीडित व्यक्तीने केला.

पी‌डित पतीने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली. त्याच्यावर मागील महिन्यातच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- विजय पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रेत्यांवर कारवाई

$
0
0

सातपूर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शाळा, कॉलेजच्या १०० मीटर परिसरात सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांविरोधात मंगळवारी कारवाई केली. पाथर्डी फाटा प्रोग्रसिव्ह स्कूल, व्ही. एन. नाईक सिडको, जनता विद्यालय, उत्तमनगर, गंगापूररोड भोसला मिलिटरी कॉलेज, मविप्र आर्किटेक्चर कॉलेज गंगापूररोड आदी पाहणी करण्यात आली.

शहरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ शाळा व कॉलेज परिसरात विक्री होत असल्याच्या तक्रारी 'एफडीए'कडे होत्या.

त्यानुसार 'एफडीए'च्या पथकाने शहरातील विविध भागातील शाळा, कॉलेजच्या परिसरात जाऊन विक्रेत्यांवर कारवाई केली. यामध्ये पाथर्डी फाटा प्रोग्रसिव्ह स्कूल, व्ही. एन. नाईक सिडको, जनता विद्यालय, उत्तमनगर, गंगापूररोड भोसला मिलिटरी कॉलेज, मविप्र आर्किटेक्चर कॉलेज गंगापूररोड आदी ठिकाणी १०० मीटरच्या आत सिगारेट व तंबाकूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर 'एफडीए'कडून कारवाई करण्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची घोषणाबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोहित वेमुला नामक दलित विद्यार्थ्यांने आंध्र प्रदेशातील हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतीगृहात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध करीत पंचवटीतील काट्या मारुती चौक येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हैदाबाद केंद्रीय विद्यापीठातून खोट्या आरोपाखाली चार विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. यांना वसतिगृहातूनही काढण्यात आले. विद्यापीठाच्या आवारात प्रवेशबंदी करण्यात आली. न्यायाची सर्व अशा संपुष्टात आल्यामुळे रोहितने आत्महत्येचा मार्ग अवलंबला होता, असा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला आहे.

मूळ गुंटूरचा रहिवासी असलेला रोहित हा विज्ञान-तंत्रज्ञान व समाज या विषयात पीएच. डी. करीत होता. ऑगस्ट २०१५ मध्ये विद्यापीठात एका वृत्तचित्र प्रदर्शनावरून दलित विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात वाद झाला. त्यामुळे रोहित व अन्य पाच विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर 'अभाविप'च्या नेत्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे रोहित तणावाखाली होता. त्याला सहा महिन्यांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नव्हती. या प्रकरणाला सरकारचा जबाबदार असल्याचा आरोप संघटनेचे शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिष्कार घालणारे पंच ‘आऊट ऑफ कव्हरेज’

$
0
0

पंचायत बरखास्त न झाल्यास पोलिसात तक्रार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भटक्या व विमुक्त वर्गातील गोंधळी समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबास बहिष्कृत केल्याच्या प्रकारानंतर मनमनी करणारी ही जातपंचायतच मंगळवारी 'आऊट ऑफ कव्हरेज' झाली. मनमानी पध्दतीने समाजातील एका कुटुंबास वाळपत्र देऊन शेखी मिरवणाऱ्या पंचायतीच्या तोंडावर मात्र माध्यमांच्या टीकेने मंगळवारी पाचावर धरण बसली.

आर्थिक व्यवहाराचे कारण उकरून काढत जोडप्यास गावाच्या हद्दपार करणारी जात पंचायत या प्रकारामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परभणीतील स्वच्छता कर्मचारी अन् त्याच्या पत्नीस आर्थिक वसुलीच्या मुद्द्यावरून पंचायतीने बेअब्रू करण्याची धमकी दिल्यानंतर या जोडप्याने परभणीतून पळ काढत नाशिकमध्ये आश्रय घेतला होता. या प्रकराचा सुगावा लागल्यानंतर नाशिकमधील आश्रयदात्या नातेवाईकांनाच बहिष्कृत करण्याचा प्रताप या पंचायतीने केला. दरम्यान, या प्रकाराचा गवगवा झाल्यानंतर जात पंचायतीच्या सदस्यांचे मोबाइल्स मात्र दिवसभर 'स्वीच ऑफ' किंवा 'आऊट ऑफ कव्हरेज' होते.

ही जात पंचायत बरखास्त करण्यास पंचायतीचे सदस्य तयार असल्यास आम्ही पोलिसात जाणार नाही, मात्र त्यांच्या भूमिकेवर पंच अडून राहिल्यास दोन दिवसात नाशिक पोलिसात या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा जात पंचायत मूठमाती अभियानाचे समन्वयक कृष्णा चांदगुडे यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहायक प्रकल्प अधिकाऱ्यास लाच स्‍वीकारताना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेत होणाऱ्या कार्यक्रमांचे फोटोग्राफ्स काढल्यानंतर त्यांच्या बिलाची रक्कम देण्यासाठी दोन हजार ९०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकाऱ्यास अॅन्टी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात रंगेहाथ पकडले.

मुख्याध्यापक आणि सध्या प्रतिनियुक्तीवर सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) म्हणून दादा भगवान जाधव हे काम पहात असून, त्‍यांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. नाशिक तालुक्यातील देवरगाव येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत होणाऱ्या कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी तक्रारादारास वारंवार बोलवण्यात येत होते. फोटोंचे बिल तक्रारदार हे जाधव यांच्याकडे ​देत असे. यानंतर जाधव ते बिले आदिवासी विकास विभागाकडून मंजुरीकरिता सादर करीत असे. मंजूर झालेल्या बिलाचा पैसे मुख्याध्यापकांमार्फत तक्रारदाराला मिळत होते.

तक्रारदाराने इयत्ता दहावीच्य परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढले होते. या बिलांची मंजूर रक्कम आणि यापूर्वीच्या बिलांची मंजूर रक्कम तक्रारदाराला देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि सध्या प्रतिनियुक्तीवर सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) म्हणून काम पाहणाऱ्या जाधवने पाच हजार रुपयांची रक्कम मागितली. तडजोडीअंती दोन हजार ९०० रुपये घेण्यास जाधवने सहमती दर्शवली. याबाबतची माहिती तक्रारदाराने एसीबीला दिली असता मंगळवारी दुपारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात येथे सापळा रचून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जाधवला रंगेहाथ पकडले. यामुळे आदिवासी विभागात चर्चेच्या फेरी झडत असून, या प्रकरणामुळे सरकारी अधिकारी किती छोट्या कारणांची ढाल पुढे करून पैसे उकळण्यासाठी पुढे सरसावतात, याकडे लक्ष वेधले गेले आहे. दरम्यान, लाचखोर अधिकारी वा कर्मचाऱ्यांबाबत सर्वसामन्यांना तक्रार करायची असल्यास त्यांनी पोलिस अधिक्षक डी. पी. प्रधान यांच्या मोबाइल क्रमांक ९९२३१८५५६६ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच ०२५३-२५७५६२७, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरपीआय’ला संपविण्याचा भाजप कट

$
0
0

दुहेरी हत्याकांडप्रकरणी पवन क्षीरसागर यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणाची ढाल पुढे करीत भारतीय जनता पक्षाकडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पक्षाचे महानगरप्रमुख पवन क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केला. नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण व अन्य एका जणाविरोधात दुहेरी हत्याकांडात सहभाग असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर क्षीरसागर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

सातपूर परिसरातील पीएल ग्रुपच्या कार्यालयात दोघा सराईत गुन्हेगारांची हत्या करण्यात आली. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणाबाबत ग्रामीण पोलिस दलाने पीएल ग्रुपच्या पाच जणांना अटक केली आहे. सर्व संशयित पोलिसांच्या ताब्यात असून सोमवारी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात भूषण लोंढे आणि संदीप गांगुर्डे या दोघांचा समावेश संशयित आरोपींमध्ये केला. मूळ फिर्यादीनुसार झालेल्या गुन्ह्यात १०९ आणि २०२ हे कलम वाढवण्यात आले. यानंतर, मंगळवारी दुपारी पवन क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपसोबतची युती तोडण्याची वेळ आली असल्याचा सूचक इशारा दिला. भाजप आपल्या ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सातपूर भागातील मनसेच चार नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहे. शहरात सगळीकडेच ही परिस्थिती असून त्याचाच एक भाग म्हणून आरपीआयचा झंझावात रोखण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर आम्ही स्वतः‍ चार संशयित आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले. यात कोठेही भूषणचा सहभाग असल्याचा पुरावा नसताना पोलिस राजकीय दबावापोटी हे कृत्य करीत असल्याचे क्षीरसागर म्हणाले. भूषणचा येत्या शुक्रवारी (दि. २२) विवाह असून आम्ही सनदशीर मार्गाने अटकपूर्व जामिनासाठी व इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी प्रयत्न करू. पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले २२ जानेवारी रोजी विवाहाला हजेरी लावणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

..

मारणारे आमचे अन् गेले तेही आमचे

पीएल ग्रुप सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेत असल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला. मारणारे संशयित दोघे आमचेच असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तडीपार व गुन्हेगारांना रोखण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यांचे वास्तव सातपूर भागात असेल तर त्याचा आम्ही जबाबदार कसे, असा उलट प्रश्न क्षीरसागर यांनी केला. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या ललीत अशोक विठ्ठलकर, निखील मधुकर निकुंभ, प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार आणि किशोर गायकवाड पैकी निकुंभ वगळता इतर संशयितांना आम्हीच शोधून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला.

..

पीएसआय शिंदेची हजेरी

दुहेरी हत्याकांडाची माहिती दडवून ठेवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सातपूर पोलिस स्टेशनचे पीएसआय महेश शिंदे यांनी या पत्रकार परिषदेबाहेर हजेरी लावली. पत्रकार परिषदेत काय झाले हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पीएल ग्रुपच्या सदस्यांशी असलेल्या हितसंबंधांच्या कारणांमुळे शिंदे यांच्यावर कारवाई झाली. त्यामुळे शिंदेची उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली.

..कोट..

पोलिसांनी आजवर केलेली कारवाई तथ्यांवर आधारित आहे. आम्ही संशयितांना कशी अटक केली याबाबत कोण काय बोलते याला महत्त्व नाही. पोलिस तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे काम सुरू आहे.

- प्रवीण मुंढे, सहायक पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको, सातपूरमध्ये १४३ फलक हटविले

$
0
0

सातपूर : हायकोर्टाच्या आदेशावरून महापालिकेच्या हद्दीत रस्त्यांच्या बाजूला अनधिकृतपणे उभारलेले फलक होर्डींग हटविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यात दोन दिवसांत सिडको विभागामध्ये १०३ तर सातपूर भागात ४० अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.

रस्त्यांच्या कडेला कुणी लावले असतील, तर ते तत्काळ काढून घेण्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आवाहन केले आहे. महापालिकेने परवानी घेऊन दिलेल्या जागेवरच फलक नागरिकांनी लावावेत, असे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शाखा फलकांवर कारवाई

महापालिकेने शहरातील चौक व रस्त्यांवर लावलेल्या राजकीय पक्षांच्या शाखा फलकांवर मंगळवारी कारवाई सुरू केली. महापालिकेच्या सहा विभागातील सहा पथकांनी विविध चौकांमध्ये असेलेले राजकीय पक्षांचे फलक व वार्ताफलक उखडून काढलेत. पोलिस संरक्षणात ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय पक्षांचा विरोध मावळला होता. शाखांच्या फलकावर कारवाईला पक्षांनी विरोध केला होता. परंतु, हायकोर्टाचा आदेश असल्याने महापालिकेने कारवाई सुरू केल्यानंतर पक्षांनी नांग्या टाकल्या आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिकीट प्रदर्शनात नाशिककरांची बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या १७ व्या राज्यस्तरीय टपाल तिकिट प्रदर्शनाचा समारोप उपनगर येथे झाला. नाशिकच्या शांतीलाल हिरण यांना डॉग्ज ऑफ द वर्ल्ड फ्रेमसाठी तर आनंद काकड यांना बेस्ट एक्झिबिटरचा करंडक व सुवर्णपदक मिळाला. याशिवाय नाशिकला ४ रौप्य तर ३ कांस्यपदक मिळाले. हे सर्व नाशिक फिलाटेलिक क्लबचे सदस्य आहेत.

समारोपप्रसंगी पोलिस आयुक्त एस. जग्गनाथन, औरंगाबाद रिजनचे पोस्टमास्तर प्रणव कुमार, गोवा रिजनचे रणजित कुमार, दिल्ली डाक विभागाचे शेखर सिन्हा प्रमुख पाहुणे होते. त्यांच्याहस्ते नाशिक ढोल तसेच भारताच्या पहिल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावरील विशेष आवरणाचे प्रकाशन झाले. नाशिक विभागाने दोन लाख तर मुंबई व औरंगाबाद विभागाने एक लाखाची तिकीट व्रिकी केली. पारंपारिक विभागात बर्नाड राड्रीग्ज यांनी सुवर्ण मिळवले. जे. एस. घुमान, धीरेंद्रनाथ मिश्रा, खुशालचंद तातेड, बस्तीमल सोलंकी यांनी रौप्यपदक मिळवले. थिमॅटिकमध्ये वरुण अग्रवाल, पोपटलाल हलपावट, विनुभाई भावीश यांना सुवर्णपदक मिळाले. तिया गोग्रीला ११ ते १२ वयोगटात सुवर्णपदक मिळाले. धनंजय देसाई व पी. के. बिशाप यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

..

टपाल संग्राहक विभागाचा निकाल :

- सुवर्णपदक विजेते : डॉ. बर्नाड राड्हीग्ज, किशोर चांडक, श्रृती चांडक, वरुण अगरवाल, कबीर मोदी, ऊर्जा नळगावकर

- रौप्य पदक विजेते : हिरेंद्रनाथ मिश्रा, बस्तीमल सोलंकी, किरण जोशी, महेश तातेड, अंजुल गुप्ता, प्रतिभा गांधी.

- कांस्यपदक विजेते : रुचिरा कर्णिक, रवींद्र वामनचार्य, सुधा अग्रवाल, विश्वास मेनन, किशोर भजारीया, गुणवंत शहा, दीपक मोदी, सुभाष बाफना

- चॅम्पियनशिप गटातील विजेते : ब्रीजमोहन मोदी, विजयप्रकाश अग्रवाल, अजय अग्रवाल, किरीट संघवी, सुरेद्र कोटडिया, प्रतिसाद नूरगावकर, विनीत वैद्य, सुनील जोशी, विनायक आवटे, श्रुती चांडक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी हितासाठी ‘सीटू’चे जेलभरो

$
0
0

शेती कर्जमाफीसह कामगार कायदा संरक्षणाची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतमालाला किफायतशीर भाव द्यावा, कामगार कायद्यांचे संरक्षण व्हावे यांसह अनेक मागण्यांसाठी सीटू किसान सभेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी जेलभरोचा पवित्रा स्वीकारल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनामुळे सीबीएस, शालिमार, एम. जी. रोड परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला.

'संरक्षण द्या, संरक्षण द्या कामगारांना कायद्याचे संरक्षण द्या..' 'कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही', अशा आक्रमक घोषणा देत बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. सीटू-किसान सभा आणि शेतमजूर संघटनेचे शेकडो कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले. शालिमार, एम. जी. रोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा मोर्चा पोहोचला. संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांनी मोर्चाचे नेतृत्व करीत प्रशासनासमोर आंदोलकांच्या विविध मागण्या मांडल्या. प्रत्येक कामगाराला दरमहा १८ हजार रुपये किमान वेतन द्या, कंत्राटी रोजंदारी आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करा, बेरोजगारांना काम द्या, मागेल त्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे, ५५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला तीन हजार रुपये मासिक पेन्शन द्या, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करा, गावपातळीवर मनरेगाची कामे करून सर्व महिला आणि पुरुषांना ३०० रुपये रोज द्या, शेतमजुरांसाठी इंदिरा आवास घरकुल योजना व रमाई आवास योजना राबवून सर्व बेघर कुटुंबांना घरे मंजूर करून द्या, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जेलभरोचा पवित्रा स्वीकारल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनात सीताराम ठोंबरे, अ‍ॅड. तानाजी जायभावे, डॉ. वसुधा कराड, अ‍ॅड. भूषण सातळे, संतोष कुलकर्णी, अशोक लहाने, हरिभाऊ तांबे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटी टोलनाक्यावर ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

केंद्र व राज्य सरकारचे कामगार विरोधी धोरण, शासनाच्या जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरण या त्रिसूत्री धोरणाचा निषेध करीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी माकपच्या सिटू संघटनेने घोटी टोल नाक्यावर रास्तारोको आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.

आंदोलकांनी शासनाच्या गलथान धोरणाविषयी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी सुमारे शंभराहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. यात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे देवीदास आडोळे, चंदू लाखे, कांतीलाल गरुड यांनी केले.

या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक दुतर्फा काही काळ ठप्प झाली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र पवार यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात कॉ. देवीदास आडोळे, चंदू लाखे, कांतीलाल गरुड, अप्पा भोले, सुनील मालुंजकर, विश्राम गवते, भाऊसाहेब जाधव, जनक लंगडे, सदाशिव डाके, हनुमान गतीर, आदीचा समावेश होता.



या आहेत मागण्या

महागाईला लगाम लावावी.

जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीला आळा घालावा.

रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकरण करून मागेल त्याला दोन रुपये किलो दराने किमान ३५ किलो धान्य द्यावे.

शाश्वत रोजगार निर्मिती करावी.

किमान वेतनासह सर्व कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी.

असंघटित कामगारांसह सर्वांना पेन्शन व सामाजिक सुरक्षाचा लाभ द्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images