Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बाफना ज्वेलर्सतर्फे शाही अलंकार महोत्सव

$
0
0

महोत्सवात सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या विस्तृत श्रृंखला प्रदर्शित केली जाणार आहे. विशेषत: बदलत्या काळातील ग्राहकांच्या फॅशन आणि आवडी-निवडींना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या असंख्य व्हरायटी पाहण्याची सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यात मनमोहक वेडींग ज्वेलरी कलेक्शन, टेम्पल ज्वेलरी, पेशवाई ज्वेलरी, अॅन्टीक ज्वेलरी, चांदीची स्वनिर्मित सुबक भांडी यांच्या कलाकृती मांडल्या जाणार आहेत. नाशिककर ग्राहकांनी या महोत्सवातला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नायलॉन मांजानेच घेतली भरारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात पंतग उत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. कुठे ढोलताशा, तर कुठे डीजे लावून तरुणाईने पतंग उडविण्याचा आनंद लुटला. दुसरीकडे शहर पोलिसांनी गुरूवारी वेगवेगळ्या भागातील १४ विक्रेत्यांवर कारवाई केली. शुक्रवारी सुध्दा ठिकठिकाणी पोलिस कारवाई करताना दिसले. मात्र, पोलिसांच्या या कारवाईचा तितकासा फरक पडला नाही. नायलॉन मांजाची छुपी विक्री करण्यात विक्रेते यशस्वी ठरले असून, १०० रूपयांचा मांजा ५०० रूपयांपर्यंत विक्री झाला.

दरवर्षी उदभवणारा नायलॉन मांजाचा प्रश्न यावर्षी शहर पोलिसांनी वेळीच हातळण्यास सुरूवात केली. काही ठिकाणी अगदी जोरात कारवाई झाली. तुलनेत पंचवटी परिसरात दुर्लक्ष झाले. अगदी नाशिकरोड भागातील पतंगप्रेमींनी पंचवटीतून नायलॉन मांजा खरेदी करण्यासाठी धावपळ केली. बंदीमुळे या मांजाची मागणी वाढली. विक्रेत्यांनी ओळखीच्याच ग्राहकांना आपलेसे केले. तसेच, १०० रूपयांच्या मांजासाठी ३०० ते ५०० रूपये आकरण्यात आले. शहर पोलिसांनी गुरूवारी दिवसभरात नाशिकरोड, भद्रकाली, सातपूर, अंबड, सरकारवाडा, गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले. या विक्रेत्यांविरोधात कलम १८८ ,२९० आणि २९१ नुसार गुन्हे दाखल झाले. मात्र, या कलमामुळे विक्रेत्यांवर तितकासा फरक पडलेला नाही. वास्तविक, नायलॉन मांजाची समस्या मोठी असून, यात पोलिसांनाच बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग किंवा यासंबंधित इतर विभागांनी पुढाकार घेतल्यास मोठ्या प्रमाणात कारवाई होऊ शकते. इतर जबाबदार विभाग अंग काढून घेतात. मनुष्यबळाची कमतरता असलेले पोलिस दल मग उसने आवसाण घेऊन कारवाई करते. या कारवाईत तितकीशी ताकद नसल्याने आज, शहरात वेगवेगळ्या भागात नायलॉन मांजाचा सर्रास वापर झाल्याचे दिसून आले. मांजाची समस्या निकाली काढण्यासाठी नोव्हेंबर महिन्यांपासूनच संबंधित विभागाने कारवाई करणे अपेक्षित असल्याचे मत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले. नायलॉन मांजा ग्रामीण भागात उपलब्ध होत होता. त्याचाही परिणाम झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचा शुक्रवार तिळगुळाने झाला गोड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आपल्या जीवनातील गोडवा टिकवून ठेवणारा आणि दररोजची धावपळ, ताणतणाव बाजूला ठेवून 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' असा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण शुक्रवारी शहर-परिसरात पारंपरिकरित्या साजरा करण्यात आला. यादिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होत असल्याने हिंदू संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने सर्वांनी संक्रांत साजरी केली. पतंग उडविण्याचा आस्वाद घेतानाच टेरेसवर डीजे लावून मनमुराद नाचण्याचा आनंद युवावर्गाने घेतला.

सकाळपासूनच गल्लोगल्ली तिळगूळ देण्यासाठी लहानग्यांची धावपळ सुरू झाली होती. सायंकाळी संक्रांतीच्या सणाच्या आनंदाला उधाण आले होते. मकर संक्रांत म्हणजे सुवासिनींचे वाण, तिळगुळाचे फक्कड लाडू, काटेरी रंगीबेरंगी हलवा आणि गोडधोड जेवणाचा बेत अशा वातावरणात सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले होते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी गुरूवारी भोगी उत्साहात साजरी करण्यात आली. तीळ लावलेली भाकरी, विविध भाज्यांच्या मिश्रणाची भाजी, चटण्या, दही असा जेवणाचा बेत घरोघरी रंगला होता.

सकाळपासून घरोघरी संक्रांत सणाची लगबग सुरू झाली होती. सायंकाळी तिळगूळ वाटण्यासाठी लोक घराबाहेर पडले. देवदर्शनानंतर 'तीळगूळ घ्या गोड बोला' असे म्हणत एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. घरोघरी सुवासिनींच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला बहर आला होता. दहा दिवसांत जन्मलेल्या बालकांना हलव्यांचे दागिने घालून 'बोरन्हान' केले गेले तर नवविवाहीत मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व असल्याने घरोघरी नवविवाहितांच्या आनंदाला उधाण आले होते. संक्रांतीनिमित्त कपालेश्वर मंदिर,काळाराम मंदिर, रामकुंड, नीळकंठेश्वर मंदिर आदी परिसरातील सर्वच धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी दिसून आली. संक्रांतीच्या आदल्या दिवशी गुरूवारची भोगी, दुसऱ्या दिवशी म्हणजे आज, शुक्रवारी संक्रांत व उद्या शनिवारचा तिसरा दिवस किंक्रातीने संक्रांत सणाचा समारोप होणार आहे.

संक्रांतीच्या आधीच बाजारात ठिकठिकाणी तीळगूळ, तीळगुळासाठी प्लॅस्टिकचे लहान-मोठे डबे आणि वाणाच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या होत्या. रविवार कारंजा, नेहरू गल्ली, शालीमार, दहीपूल, भांडीबाजार, कापडबाजार आदी बाजारपेठासह उपनगरातील बाजारपेठेत पांढऱ्या साध्या तिळगुळासह रंगबिरंगी तिळगूळ, काटेरी हलवा, रेवडी, चिक्की, तिळाचे लाडू अशा साहित्यांनी भरलेल्या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी होती.

सोशल शुभेच्छा!

बदलत्या काळानुसार तरुणांनी मोठ्या प्रमाणात सोशल साईटच्या मदतीने शुभेच्छांची देवाणघेवाण सुरु केली आहे. आज शुक्रवारी मकर संक्रांतीचा मुख्य दिवस असला तरी गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस अॅप, फेसबुक, ट्विटर व मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून नातलग व मित्रपरिवारावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत असल्याचे दिसून आले.

हळदी कुंकू कार्यक्रम
मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी हळदीकुंकू कार्यक्रमास प्रारंभ केला. अनेक महिलांनी हळदीकुंकवाचा कार्यक्रम पार पाडला. महिलांनी या दिवशी हिंदू पद्धतीप्रमाणे विशेष पोषाख परिधान केला होता. एकमेकींना वाण देण्यासाठी सुवासिनींना या सणाचे खास आकर्षण असते. काळ्या रंगाची साडी नेसून सुगड्याचे वाण देण्याची पारंपरिक प्रथा त्यांनी पार पाडली.

बदलली वाणाची पध्दत
संक्रांतीला वाण देण्याची पद्धत खूप जुनी असली, तरी आताचा जमाना थोडा बदलला आहे. त्यामुळे महिलांची संक्रांतही ट्रेंडी होत चालली आहे. दरवर्षी नवा ट्रेंड संक्रांतीच्या अत्याधुनिक वाणाच्या माध्यमातून प्रचलित होऊ लागला आहे. आधीच्या करंड्याची जागा आता वेगवेगळ्या वस्तूंनी घेतल्याने महिलांच्या बदलत्या आवडीनिवडीनुसार आता वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये विविध प्रकार बाजारात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुहेरी हत्याकांडातील संशयितास १८ पर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील दुहेरी हत्याकांडात ग्रामीण पोलिस दलाने अटक केलेल्या पीएल ग्रुपच्या किशोर गायकवाडला शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, त्याला १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गायकवाडला पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांना आतापर्यंत पाच संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सातपूर परिसरातील अर्जुन ऊर्फवाट्या महेश आव्हाड (वय २४) व पंचवटीतील गोपाळनगर येथील निखिल गवळे (वय २२) या सराईत गुंडांची ३१ डिसेंबरच्या रात्री सातपूरच्या 'पीएल ग्रुप'च्या कार्यालयात गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आजवर पाच जणांना अटक केली आहे.


भद्रकालीत दुचाकीची जाळपोळ


भद्रकालीतील दिल्ली दरवाजा परिसरातील सिंहाणे वाडा येथील सागर अशोक रामदासाणे (वय २७) यांची हिरोहोंडा पॅशन (एमएच १५ डीबी ३१४३) दुचाकी समाजकंटकाने पेटवली. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. अज्ञात आरोपींनी सागर रामदासणे यांची दुचाकी पेटवल्यानंतर शेजारीच उभी असलेली एमएच १५ सीपी ४६६० ही बाईक सुध्दा आगीच्या तडाख्यात सापडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक साबळे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


दोन मोबाइल लंपास

मालविय चौकातील सुमित्रा सारीज येथे गप्पा मारत उभे असलेल्या प्रमोद बाळकृष्ण दीक्षित (वय ६७) यांचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वाआठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मित्रासमवेत गप्पा मारत असताना दीक्षित यांनी आपला मोबाइल दुचाकीच्या सिटवर ठेवला होता. दरम्यान, इच्छामणी लॉन्स ते पंचवटी कारंजा असा बसने प्रवास करीत असलेल्या मधुकर पुंडलिक पवार यांच्याही मोबाइलवर चोरट्यांनी डल्ला मारला. या दोन्ही घटनांबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

निमाणीत चोरी

बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेच्या पर्समधील ५६ हजार ५०० रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे दागिने गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केले. दिंडोरीरोडवरील कालिकानगर परिसरातील मायको दवाखान्याच्या पाठीमागे राहणाऱ्या अनिता कौतिक आहिरे (वय २९) ही महिला शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास निमाणी बसस्टॅण्ड येथे उभी होती. बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पर्समधील कप्प्यात ठेवलेले दागिने लंपास केले. आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

उघड्या खिडकीतून चोरी

बेडरूमच्या अर्धवट उघड्या खिडकीतून हात घालून चोरट्याने महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले. ही घटना सिध्देश्वरनगर, हिरावाडी येथे घडली. या प्रकरणी चंद्रमणी दयानंद भैसारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

श्वान फिरवण्यावरून मारहाण

रस्त्यावरून श्वान फिरवयाचा नाही, अशी किरकोळ कुरापत काढून दोघांनी एकास बेदाम मारहाण केली. या प्रकरणी नेहरूनगर येथे राहणाऱ्या रोहित गोरक्षनाथ ठोसरवाला (वय २५) याने दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिसांनी नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या सागर रामकृष्ण जाधव आणि मयूर विजय रोहम यांच्याविरोधात कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला. ९ जानेवारी रोजी रोहित आपले श्वान घेऊन व्यायाम शाळेजवळ गेले असता जाधव आणि रोहमने त्यास हरकत घेतली. या बाचाबाचीनंतर दोघांनी मिळून रोहितला बेदम मारहाण केली.

शाळेतील साहित्याची चोरी

शिवाजीनगर येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयातील कार्यालयाचा दरवाजा फोडून चोरट्यांनी एक २१ इंची एलईडी, ८०० रुपये रोख आणि ३२ जीबी क्षमतेचा पेनड्राईव्ह चोरी केला. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अरुण चंद्रभान नवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलास मारहाण

किरकोळ कारणावरून दोघा अल्पवयीन मुलांनी मिळून १४ वर्षाच्या मुलास बेदम मारहाण करण्याची घटना बॉईज टाऊन शाळेजवळील सिध्दार्थनगर झोपडपट्टीजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. तिडके कॉलनीतील आदित्य हाईटस येथे राहणारा विशाल श्रीकांत घोडके हा १४ वर्षीय मुलगा क्लाससाठी सायकलवरून जात असताना तिथे आलेल्या दोघा १७ वर्षीय मुलांनी त्याच्याकडे सायकल मागितली. त्याने नकार दिल्यानंतर संशयितांनी पीव्हीसी नळाच्या पाईने मारहाण केली. तसेच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सुरुवातीस सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ही हद्द गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये असल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वृध्दाची फसवणूक

फोन आणि ईमेलद्वारे सहलीचे नियोजन करणाऱ्या कोलकात्ता येथील दि गोल्डन ट्रिप्स कंपनी या कंपनीने गोविंदनगर परिसरातील सुमतीलाल चिंधुलाल बुरड (७४) यांची ७ लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मनीष अजय शर्मा, चिराग शर्मा आदींविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजेसमध्ये होतोय आरटीओचा ‘तास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील कॉलेजेसमध्ये डेजची धूम सुरू असताना या सेलिब्रेशन मूडमध्ये आरटीओनेही उडी घेतली आहे. हेल्मेट आणि सीटबेल्ट वापराच्या आग्रहाबरोबरच तरुणाईला रूचेल अशा विशेष शोद्वारे कॉलेज कॅम्पसमध्ये वाहतुकीच्या नियमांचा तास भरतो आहे. एखाद्या सरकारी विभागाकडून प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या प्रयोगाला तरूणाईचाही भरभरून प्रतिसाद न मिळेल तरच नवल! गेल्या चार दिवसांत शहरातील २५ हजारांहून अधिक तरुणांना वाहतुकसाक्षर करणारा हा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारी यंत्रणांकडून हाती घेतल्या जाणाऱ्या रस्ता सुरक्षा पंधरवड्यात रटाळ उपक्रमांद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले जाते. केवळ सोपस्कार म्हणून असा पंधरवडा साजरा होतो. त्याद्वारे वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत नागरिकांचे कितीही प्रबोधन केले तरी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतात. असे होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) ने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अपघातांमध्ये मृत्यमूखी पडणाऱ्यांत तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी आरटीओद्वारे २० मिनिटांच्या विशेष शोचे सादरीकरण करण्यात येत आहे. शहरातील सर्वच मोठ्या कॉलेजेसमध्ये डान्स, मिमिक्री आणि गायनावर हुकूमत असणाऱ्या मुंबईतील एका विशेष कलापथकाकडून हा शो सादर होत असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. 'जवा नवीन पोपट हा' या गीताच्या चालीवरच प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सुरक्षित वाहतुकीबाबत गीत बनविले आहे. आतापर्यंत शहरातील मराठा विद्या प्रसारक समाजाची कॉलेजेस, भुजबळ नॉलेज सिटी, सपकाळ नॉलेज सिटी, के. के. वाघ कॉलेज, पंचवटी कॉलेज, गोखले एज्युकेशन सोसायटीची एच. पी. टी. आणि आर. वाय. के आणि बिटको कॉलेज, भोसला कॉलेज, संदीप फाऊंडेशन या कॉलेजेसमध्ये २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचे धडे देण्यात आले आहेत.

हेल्मेट व सीटबेल्टची आवश्यकता, वाहन चालवितेवेळी मोबाईलचा वापर टाळणे, अतिवेगात वाहने चालविणे टाळा यांसारख्या विषयांवर प्राधान्याने प्रबोधन केले जात आहे. या पथकाला अन्य कॉलेजेसच्या व्यवस्थापनाकडूनही निमंत्रित केले जात असून या उपक्रमाला प्रतिसाद वाढतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कामगार होणार कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको
संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर ओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील कंत्राटी कामगारांना गोड भेट मिळाली आहे. कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा आदेश मुंबईच्या सेंट्रल गर्व्हमेंट इंडस्ट्रियल ट्रिब्युनल-२ ने दिला असून, त्याचा लाभ ८०० कामगारांना होणार आहे. वि‍शेष म्हणजे, गेल्या वर्षी फेब्रुवारीत लवादाने निर्णय दिला असला तरी तब्बल ११ महिन्यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाली आहे. नियमित काम करणाऱ्या कामगारांप्रमाणेच वेतन व भत्ते देण्याचे निर्देश लवादाने दिल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

एचएएलमध्ये कायम कामगारांसोबत ८०० कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. १९९५ मध्ये एचएएल कामगारांना कायम करावे लागू नये, या गैरहेतूने कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराकडे वर्ग करण्यात आले. यानंतर कंत्राटदाराने कामगारांचा भविष्य निर्वाह निधी स्वतःच्या कोडवर भरण्यात सुरुवात केली. या कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात नाशिक वर्कर्स युनियने मुंबईच्या सेंट्रल गर्व्हमेंट इंडस्ट्रियल ट्रिब्युनलकडे २००३ साली अर्ज दाखल केला. अर्जात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सर्वच कामगारांना कायम करण्याची व कायम कामगारांप्रमाणेच वेतन देण्याची मागणी करण्यात आली. ट्रिब्युनलने कंत्राटी कामगारांना नेमणुकीच्या तारखेपासून कायम करण्याचा व कायम कामगारांप्रमाणेच भत्ता देण्याचा आदेश दिला आहे. हे लाभ कंत्राटी कामगारांच्या नेमणुकीच्या तारखेपासून ५० टक्के रोख व उर्वरित ५० टक्के भविष्य निर्वाह निधी मध्ये सहा महिन्यात देण्याचे निर्देश ट्रिब्युनलने दिले आहेत, अशी माहिती सीटूचे डॉ. डी. एल कराड यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या नाशकात दंगल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक/नाशिक
पतंग उडविण्याच्या क्षुल्लक कारणावरून संध्याकाळच्या सुमारास जुने नाशिकच्या नानावली भागात दोन गटात दंगल झाली. दोन्ही बाजूने दगडफेक झाल्याने नागरिकांची पळापळ झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याने तणावात भर पडली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नानावली मैदानात शिंपी गल्लीतील व अजमेरी गल्लीतील १५ ते २० मुले पंतग उडवत होती. याच कारणामुळे दोन्ही गटात बाचाबाचीस सुरूवात झाली. दोन्ही गटातील मुलांनी आपआपल्या मित्रांना मोबाईलद्वारे कॉल करून बोलावून घेतले. गर्दी वाढताच दगडफेकीला सुरूवात झाली. शीघ्र कृती दलाच्या जवानांसह वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमधून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. पोलिस उपायुक्त एन. अंबिका, उपायुक्त अविनाश बारगळ यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी शांतता कमिटीच्या सदस्यांची तातडीने बैठक आयोजित करून दोन्ही गटातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकाराला हवे सरकारचे बळ

$
0
0

महाराष्ट्राची कृषी अर्थव्यवस्था एकेकाळी सहकाराच्या पायावर उभी होती. सहकार क्षेत्राने सामान्य शेतकऱ्याला विकासाची वाट दाखवली आणि या वाटेने जाण्याचे बळही दिले. सुरुवातीच्या काळात राज्य सरकारने जाणीवपूर्वक सहकारी क्षेत्र मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण सहकारी कारखाने, सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दूधसंस्था, प्रक्रिया संस्था, विपणन संस्था, खरेदी विक्री संघ अशा कितीतरी सहकारी संस्था स्थापन झाल्या. मात्र आज सहकार क्षेत्र खिळखिळे झाले आहे. यामुळे या लाखमोलाच्या संस्‍थांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा व मातीमोल भावात विकण्यापेक्षा शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या सहकारी संस्थांना सरकारने आधार द्यायला हवा.

सहकारी संस्थांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला पत प्राप्त करून दिली. दुसरी म्हणजे सहकार क्षेत्रातून ग्रामीण नेतृत्वाखाली चालना दिली. पद्मश्री विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, वसंतदादा पाटील यांनी सहकारी संस्था स्थापन केल्या, त्यांना नेतृत्व दिले. विशेष म्हणजे सहकारी संस्था लोकाभिमुख पद्धतीने कशा चालवाव्यात याचा मूर्तिमंत आदर्श उभा केला. त्यातून राज्यात अनेक ठिकाणी समृद्धीचे बेटे निर्माण झाली.

नाशिक जिल्ह्यात भाऊसाहेब हिरे यांनी सहकारी चळवळीचा पाया घातला. गिरणा सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, मालेगावचा खरेदी विक्री संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदी संस्था स्थापन करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकासाची वाट दाखवली. त्यानंतरही अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या. राज्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा सहकारी बँक व निफाड सहकारी साखर कारखाना यांचा दबदबा निर्माण झाला. निफाडसह साखर कारखान्याने तालुक्याच्या विकासाला फार मोठा हातभार लावला. तालुक्यात शेकडो लहानमोठे बंधारे बांधले, ठिबक सिंचन आणि पाइप लाइनसाठी शेतकऱ्यांना सहकार्य केले. तालुक्यातील शिक्षणसंस्थांना सर्वाधिक मदत, दरवर्षी शेकडो जोडप्यांचे सामुदायिक विवाह लावले, अशी कितीतरी सामाजिक उपयोगाची कामे या कारखान्याने केली.

आज या सहकारी संस्थांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, रानवड सहकारी साखर कारखाने आज बंद पडलेले आहेत. गिरणा कारखाना बंद पडून त्याची विक्री करण्यात आलेली आहे. एकेकाळी सहकारी संस्थांच्या विकासाचा आदर्श निर्माण करणाऱ्या या जिल्ह्यात सहकारी संस्था बंद पडलेल्या आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. त्याची चर्चा करण्यापेक्षा या संस्था पुन्हा कशा उभ्या करता येतील, याचे सामुदायिक प्रयत्न व्हायला हवेत.

सहकार क्षेत्रात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या त्याचा अर्थातच मोठा दुष्परिणाम या संस्थांवर झाला. अनेक नामांकित सहकारी संस्था बंद पडल्या. सहकारी क्षेत्राचे खासगीकरण हा त्यावरील उपाय नव्हे. पूर्वी सहकारी संस्थांना शासनाने ज्या प्रमाणे पाठबळ दिले, तशी आता सरकारची भूमिका रहिलेली नाही. शेतकऱ्यांचे अर्थकारण आजही सहकार क्षेत्राशी निगडीत आहे. तेंव्हा सहकारी संस्थांना घरघर लागणे म्हणजे शेतकऱ्यांची कृषी अर्थव्यवस्था खिळखिळी करणे होय. ज्यांनी सहकार क्षेत्रात गैरवर्तन केले त्यांच्या बाबतीत सरकारला जी भूमिका घ्यावयाची असेल, ती सरकारने घ्यावी पण बंद पडलेल्या सहकारी संस्था कशा उभ्या करता येतील, याचा मूलगामी विचार करून त्याची परिणामकारक कार्यवाही करणे ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड, नाशिक हे सहकारी साखर कारखाने गेल्या कही वर्षांपासून बंद आहेत. या कारखान्यावर आज कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. पण, या कारखान्याची मालमत्ता २०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. निफाड सहकारी साखर कारखान्यावर आज सुमारे २२५ कोटी रुपयांचे कर्ज आहे पण, कारखान्याची मालमत्ता सुमारे ३०० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. या कारखान्याच्या मालमत्ता, त्यांच्या कर्जासाठी संबंधित वित्तीय संस्था ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करू शकतील. या संस्थांची विक्री पारदर्शक होईल का? त्यातून कारखान्याच्या मालमत्तेची भरपाई होईल का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. यापूर्वीचे अनुभव काही फारसे चांगले नाहीत. शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता मातीमोल किमतीत विकल्या गेलेल्या आहेत. वित्तीय संस्था केवळ त्यांचे कर्ज वसूल होण्यापुरताच विचार करतील परंतु, शेतकऱ्यांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या या संस्था अशाप्रकारे मातीमोल किमतीला विकू देण्याच्या प्रक्रियेकडे सरकारने डोळसपणे पहायला हवे.

खर म्हणजे सरकारने स्वतः पुढाकार घेऊन या सहकारी संस्था कशा वाचवता येतील, हे शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचा करून ठरवायला हवे. अनेक सहकारी संस्थांवर आपल्या विरोधकांचे वर्चस्व आहे. या कारणास्तव या संस्थाकडे दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. या सहकारी संस्था पुन्हा चालू करणे आवश्यक आहे. या संस्था चालविण्यासाठी निधीची गरज आहे. तो सरकारने स्वतः वित्तीय संस्थांच्या मदतीने उभा करायला हवा. संस्था कार्यक्षमतेने चालविण्यासाठी सरकारला कठोर उपाययोजना करता येतील. संचालक मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एखाद्या रेग्युलेटरी ऑथोरिटीची तरतूद करता येईल. संबंधित ऑर्डर्सवरही जबाबदारी निश्चित करण्याची तरतूद करावी लागेल. कठोर उपाययोजना करून गैरकारभाराला आळा घालता येईल. पण, कोणताही उपाय न करता लिलावाच्या मार्गाने त्यांची विल्हेवाट लावणे कदापिही योग्य ठरणार नाही. हजारो शेतकऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे आणि त्या परिसरातील संबंधितांचे जीवन या सहकारी संस्थांशी निगडीत आहे. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्तीचे समर्थन करता येणार नाही. सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार आहे आणि त्या संस्था विरोधकांच्या ताब्यात आहेत. या कारणास्तव त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. सहकारी संस्थाना यापूर्वीही सरकारने अनेक वेळा मदत केली; अनेक वेळा त्या मदतीचा दुरुपयोग झाला. गैरप्रकारला आला घालणारी व्यवस्था निर्माण करणे आज अतिशय महत्त्वाचे आहे. सहकार क्षेत्राच्या निवडणुकांमध्ये अनेक दोष आहेत. त्यातच या क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे मूळ आहे. सहकार क्षेत्रातील निवडणुकांची पद्धत दुरुस्त व्हायला हवी. उदा. जिल्हा बँकेत संचालकपदाची निवडणूक सदोष आहे. त्यात अमुलाग्र दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

बंद पडलेले सहकारी सखार कारखाने चालू करण्यासाठी सरकारने स्वतःच पुढाकार घ्यायला हवा. सरकारची बांधिलकी शेतकऱ्याशी आहे, म्हणून शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या सहकारी संस्थाना सरकारने आधार द्यायला हवा.

(लेखक कृषी क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तळेगाव एमआयडीसी भूसंपादनात घोटाळा?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक दिंडोरी तालुक्यातील तळेगाव-अक्राळे येथील भूसंपादन प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत असून, या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. एमआयडीसी तसेच महसूलच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्याची वदंता असून, याप्रकरणाच्या चौकशीसाठी एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर होणार असून, यामुळे सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे.

औद्योगिक विकासासाठी बिगर बागायती जमीन घेण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यासाठी दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्राळे शिवारातील शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. विशेष म्हणजे बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी रेड‌िरेकनरपेक्षाही मोठ्या प्रमाणात मोबदला देण्यात आला. याखेरीज दिलेल्या जमिनीच्या एकूण क्षेत्रापैकी १५ टक्के राखीव जमीन बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही बाब गरीब शेतकऱ्यांसाठी मदतदायी असली तरी पूर्वजांच्या नावे शेती असल्याने स्वत: शेतकरी असल्याचा दावा करीत काहींनी मोबदला लाटला. नफा कमावण्यासाठी सरकारची फसवणूक करून जमिनी घेण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी आदींकडे केली होती. स्वत:जवळील काळा पैसा करमुक्त आणि सफेद करण्यासाठीचा महसूल आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा हा नियोजित कट असल्याचा आरोपही जोशी यांनी केला होता. संबंधितांनी स्वत:चे कुटंबीय, नातलगांच्या, मित्रांच्या नावे या जमिनी खरेदी केल्या. जमीन मोबदला तडजोडीमध्ये सहभागी होऊन सरकारकडून जास्तीत जास्त मोबदला हडपल्याची तक्रार करीत जोशी यांनी पाठपुरावा केला.

या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश उद्योग मंत्रालयातील राज्य सरकारचे उपसचिव वै. भू. लटके यांनी दिले आहेत. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांना दोन महिन्यात अहवाल सादर करावा लागणार आहे. एमआयडीसीने नाशिक इंडस्ट्री को ऑपरेटीव्ह इस्टेट लिमिटेड या संस्थेला वाटप केलेल्या भुखंडांचाही गैरवापर झाल्याची जोशी यांची तक्रार होती. त्याचा तपासही या समितीने करावा, असे या आदेशात म्हटले आहे. उद्योग उपसंचालकांनीही या तक्रारींची दखल घेतली असून, एमआयडीसीच्या मुख्य नियोजकांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

या घोटाळ्यात महसूल आणि एमआयडीसीचे अधिकारी सहभागी आहेत. स्थानिक पातळीवर अधिकारी दाद देत नसले तरी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, एसीबीचे अतिरीक्त महासंचालक संजय बर्वे यांनी माझ्या तक्रारींची दखल घेतली. हा किमान एक हजार कोटींचा घोटाळा आहे.

जयप्रकाश जोशी, उद्योजक



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडी झाली नित्याची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहरातील अत्यंत महत्त्वाच्या त्र्यंबक नाका सिग्नलला कुणीच वाली नाही काय, असा संतप्त सवाल वाहनचालक शनिवारी उपस्थित करीत होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. वाहतूक पोलिसही जागेवर नव्हते. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यात अॅम्बुलन्सही अडकली होती. यामुळे सिग्नल यंत्रणा बंद असेल तेव्हा वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

नाशिक शहरात सातपूर व अंबड दोन औद्योगिक वसाहती आहेत. यात शनिवारी दोनही औद्योगिक वसाहतींना साप्ताहीक सुटी असते. यामुळे शहरात शनिवारी कामगारांची मोठी गर्दी होत असते. नेमके शनिवारीच वाहतूक पोलिस त्र्यंबकनाका सिग्नलवर दुपारच्यावेळी हजर नसताना नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे वाहनचालक सांगतात. शनिवारी देखील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागले. वाहतूक पोलिस नसल्याने त्यांचे काम रिक्षाचालक व काही सुज्ञ नागरिकांनी केले. परंतु, सिग्नलवर तैनात असलेले वाहतूक पोलिस गेले कुठे असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत होते. चारही बाजूंनी वाहनांची कोंडी झाल्याने अॅम्बुलन्सही यामध्ये अडकली होती. नाशिक शहर पोलिस आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वाहनचालक तसेच, प्रवाशांनी केली आहे.

पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्र्यंबकनाका सिग्नलवर झालेली वाहतूक कोंडीची गंमत वाहतूक पोलिस एका बाजूला उभे राहून पहात होते. यामध्ये रिक्षाचालक व सुज्ञ नागरिक सिग्नलवर उतरत वाहतूक कोंडी हटविण्याचे काम करीत होते. यामुळे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असे वाहनधारक म्हणत होते

औद्योगिक कामगारांसाठी शनिवार हा सुटीचा दिवस असतो. यामुळे शहरात शनिवारी गर्दी वाढते. दुपारी त्र्यंबकनाका सिग्नलवर वाहतूक पोलिस नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे. - जगदीश पगारे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या वर्दळीमुळे हवेत गतिरोधक

$
0
0

पंचवटी : पंचवटी विभागीय कार्यालयासमोरील रामवाडी आणि मखमलाबादकडे जाणाऱ्या रोडवरील चौफुलीजवळ वाहनांची खूपच वर्दळ असते. या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे हा रस्ता धोकादायक बनत चालला आहे. यामुळे येथे गतिरोधक ठाकण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

निमाणी, मालेगाव स्टॅँड, मखमलाबादकडून येणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. सिग्नल सुटल्यावर या ठिकाणी वाहनांचा वेग जास्त असतो. यामुळे पंचवटी विभागीय कार्यालयसमोर छोट्या मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळते. यामुळे येथे गतिरोधक टाकल्यास वाहनांच्या वेगाला अटकाव होऊन अपघातांना आळा घालता येईल.

रस्त्साला उतार असल्याने वाहने नाक्यावरून रामवाडीकडे भरधाव वेगाने जातात. त्यामुळे रोड ओलांडने अवघड होत आहे. पंचवटी विभागीय कार्यालयात ये-जा करणाऱ्यांना देखील याचा त्रास होत आहे. या ठिकाणी चारही बाजूंना गतिरोधक टाकणे आवश्यक आहे. गतिरोधक टाकल्याने वाहनांचा वेग कमी होणार आहे. शाळकरी मुलांना तारेवरची कसरत करावी लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत छायाचित्रांचे प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्ता सुरक्षा सप्ताहातंर्गत शहर पोलिस दलामार्फत छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. यासाठी प्रेस फोटोग्राफर्ससह हौशी छायाचित्रकारांनी आपले छायाचित्र २० जानेवारीपर्यंत आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार १ ते ७ जानेवारी हा आठवडा रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून पाळला जातो. तथापि, राज्य सरकारकडून आठवड्याऐवजी 'रस्ता सुरक्षा पंधरवडा' साजरा केला जातो. त्यानुसार यंदाही याच सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवाड्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात छायाचित्र प्रदर्शनाचाही समावेश आहे. इच्छुक छायाचित्रकारांनी वाहतूक विषयावरील छायाचित्रे बंद लिफाफ्यात सादर करायचे असून, त्यानंतर निवडक छायाचित्रांचे शहरातील वेगवेगळ्या भागात प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साने-पाटील वादात सानपांची सरशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इच्छुकांची संख्या वाढल्याने शहर भाजपने आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत अनुभवी आमदार बाळासाहेब सानप यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ टाकली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत विजय साने आणि सुरेश पाटील यांच्यात शहराध्यक्षपदासाठी चुरस झाल्याने पक्षाने वाद नको म्हणून सानपांकडे पक्षाची धुरा सोपवली. भाजपने महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवण्याचे मोठे आव्हान सानपांसमोर आहे.

भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. निरीक्षक संभाजी पगारे, उदय वाघ यांच्यासह संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत निवडीची औपचारिकता पार पडली. भाजप सत्तेवर असल्याने शहराध्यक्षपदावर इच्छुकांची संख्याही मोठी होती. विजय साने, सुरेश पाटील, सुनील आडके, जगन पाटील, गोपाळ पाटील अशी पाच नावे पक्षाच्या वतीने प्रदेश पातळीवर पाठविण्यात आली होती. या पदासाठी स्थानिक समन्वय समितीने अंतिम साने आणि सुरेश पाटील यांची नावे निश्चित केली. साने यांनी यापूर्वी तीनवेळा शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध होता. तर, पाटील यांच्या बाजूने लक्ष्मण सावजी यांनी वजन वापरले होते. त्यामुळे चुरस वाढली होती. स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याचे आदेश पक्षाने दिले होते. त्यामुळे साने आणि पाटील यांच्या वादात सानप यांना अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव पुढे आला. पक्षानेही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन चेहरा म्हणून सानप यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ टाकली.

आमदार सानप यांना महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे. पक्षनिष्ठेसोबतच नगरसेवक, माजी उपमहापौर, माजी महापौर आणि आमदार असा त्यांना कामाचा अनुभव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकामंध्ये त्याचा फायदा होईल म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक म्हणूनही त्यांची नाशिकमध्ये ओळख आहे. त्यामुळे महाजन यांचाही त्यांना पाठिंबा होता. या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

सावजी नाही, असे समजू नका!

शहराध्यक्षपदाची सहा वर्षाची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर लक्ष्मण सावजी यांनी तडाखेबाज भाषण करीत विरोधकांनाही टोमणे मारले. सहा वर्षात पक्षासाठी काम केले.

शाखेवर जाण्याची शिस्त लावून घेतली. आता माजी अध्यक्ष झालो म्हणजे उद्यापासून सावजी कार्यालयात नाही असे समजू नका, असा दमच त्यांनी विरोधकांना भरला. प्रा. सुहास फरांदे यांच्याकडे पाहत माजी शहराध्यक्ष सुद्धा काय काम करू शकतो, हे तुम्हाला दाखवून देईल असे खडे बोल सुनावले.

पक्षाने आतापर्यंत दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. आताही अपेक्षांपेक्षा जास्त काम करणार असून, पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करणार आहे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढवून सर्वाधिक जागा जिंकून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- बाळासाहेब सानप, नवनियुक्त शहराध्यक्ष

पदे व्यक्ती केंद्रित?

आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे नगरसेवक, आमदार, एनटी समितीचे अध्यक्षपद अशी पदे आहेत. या पदासोंबतच आता शहराध्यक्षपदही त्यांना बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे सानपांवर एवढ्या पदांची बरसात का?, असा सवालही आता काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. आमदार सानप पक्षाचे निष्ठावान असले तरी, त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांचे फारसे चांगले मत नाही. त्यांची आमदारकीची कारकिर्द फारशी समाधानकारक नाही. तरीही महापालिका निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आल्याने पक्ष व्यक्ती केंद्रित झाल्याची प्रतिक्रिया नाराज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल

$
0
0

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शौचालयाचे दूषित पाणी संचालक मंडळाच्या बेजबाबदारपणामुळे परिसरातील शेती शिवारात पसरून या भागातील शेतकऱ्यांच्या आरोग्यास धोका पोहचल्याबद्दल तसेच, परिसरातील विहिरींचे पाणी पिण्यायोग्य न राहिल्याप्रकरणी बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्यासह तत्कालीन सोळा संचालकांवर पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. लवकरच याबाबत पिंपळगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.

पिंपळगाव न्यायालयात नुकसानग्रस्त शेतकरी विश्वास माधवराव मोरे यांनी दावा दाखल केला होता. त्यानुसार पिपंळगाव न्यायालयाच्या न्या. रेणुका सातव यांनी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पिंपळगाव पोलिसांना दिले होते. या प्रकरणी तपास अधिकारी गजेंद्र पाटील यांनी तपास पूर्ण केला असून, आठवडाभरात तत्कालीन संचालकांवर आरोपपत्र दाखल होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची विमानसेवा पुन्हा लांबणीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या विमानसेवेला लागलेले ग्रहण सुटता सुटत नसून, एअर इंडियाने घोषित केलेली विमानसेवा आणखी लांबणीवर पडली आहे. ही सेवा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणे अपेक्षित असताना, आता ती २६ मार्चपासून सुरू होणार आहे.

अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर येत्या १५ फेब्रुवारीपासून एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सद्वारे नाशिक ते मुंबई ही विमानसेवा सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव ही सेवा १५ फेब्रुवारीपासून देणे शक्य नसल्याने ही सेवा आता २६ मार्चपासून दिली जाईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.

एअरपोर्ट अथॉरिटी इच्छुक

ओझर विमानतळाच्या देखभालीस भारतीय विमानतळ प्राधिकरण इच्छुक आहे. ओझरला विमानांच्या पार्किंगसाठी तसेच इतर सुविधांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविल्याचे प्राधिकरणाचे संचालक जे. पी. अलेक्स यांनी खासदार गोडसे यांना कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोतया वकिलाने फसविले वकिलाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल केस लढण्यासाठी वकील असल्याचे भासवून एका ७५ वर्षीय जेष्ठ वकिलाला २२ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्ह दाखल झाला आहे.

सर्वोच्च न्यायायाचे वकील असल्याचे भासवून फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या संशयिताचे नाव बाळासाहेब आनंदा चौधरी असे असून, ते गोळे कॉलनी परिसरात राहतात. अशोक स्तंभ परिसरातील रमेशचंद्र धुलचंद बाफणा यांचा जमीनबाबतचा वाद असून, ते संशयित चौधरीला २५ ते ३० वर्षांपासून ओळखतात. सन २००८-०९ मध्ये जमिनीबाबत तिढा निर्माण झाल्यानंतर बाफना यांनी चौधरींशी संपर्क साधत केस लढण्याबाबत विचारणा केली. त्यानुसार, चौधरींनी होकार दिला. वकीलपत्र मिळाल्यानंतर चौधरीने वेगवेगळ्या कारणास्तव बाफनांकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. मुंबई हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात केस चालवणे, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक येथे पैसे जमा करणे, वरिष्ठ वकिलांची फी भरणे आदी कारणे दाखवत चौधरीने बाफना यांच्याकडून तब्बल २२ लाख ५० हजार रुपये उकळले. लाखो रुपये खर्ची पडत असताना जमीन मात्र नावावर होत नसल्याने बाफना यांनी चौधरीकडे तगादा सुरू केला. त्यावेळी चौधरींनी बाफना यांच्याकडून २५ लाख रुपयांचा सिक्युरिटी चेक लिहून घेतला होता. दरम्यान, मार्च २०१५ मध्ये चौधरीचा भांडाफोड झाला. बाळासाहेब अनंत चौधरी व बाळासाहेब अनंत अडावदकर हे वकीलच नसल्याचे समोर आले. त्यानुसार बाफना यांनी दिल्ली येथील बार कौन्सिलकडे चौकशी केली. तिथेही अशा कोणत्याही वकिलाची नोंदणीच झाली नसल्याची बाब स्पष्ट झाली. विशेष म्हणजे चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी चौधरीनेच बाफना यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. या गुन्ह्यात कोर्टाने बाफना यांना निर्दोष सोडले. बँकेची सुरक्षा धनादेश हे खटल्याचा निकाल लागल्यानंतर संशयिताने त्यांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक असताना त्याने ते पूर्वीच आपल्या खात्यात वर्ग करून घेतले. तर, वकीलपत्रावर सह्या करून सुप्रीमकोर्टापुढे सादर करून कोर्टाचीही फसवणूक केली. बाफणा यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांनी आर्थिक फसवणूक तसेच कोर्टाची फसवणूक केल्याप्रकरणी बाळासाहेब चौधरीवर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षार्थींच्या उत्साहावर विरजण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षक बनून नीतिवान समाज घडविण्याची स्वप्ने बघणाऱ्या जिल्ह्यातील २२ हजार टीईटी परीक्षार्थींच्या आनंदावर पेपर फुटीच्या घटनेने विरजण पडले. नाशिकमध्ये टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट निर्विघ्न पार पडली असली तरीही बीडमधील पेपर फुटीच्या घटनेचा परिणाम नाशिककरांच्या भवितव्यावरही होणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा यंदा शनिवारी (दि.१७) पार पडली. नाशिक जिल्ह्यातून २३ हजार १७७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात २१ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. १५८३ विद्यार्थी या परीक्षेसाठी अनुपस्थित राहिले. सुमारे ९३ टक्के ‌विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविण्यात आली. दोन भागात ही परीक्षा पार पडली.

टीईटी परीक्षेस उत्साहाने हजर राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये पेपर फुटीच्या वृत्ताबाबत दिवसभर संभ्रम होता. याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांच्याशी संपर्क साधला असता नाशिकमध्ये कुठल्याही तक्रारीशिवाय ही परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती त्यांनी दिली. सोशल मीडियाच्या आधारे तथाकथित पेपर फुटीबाबत चौकशीचे व ही परीक्षा रद्द करण्यात यावी काय, या संदर्भातील निर्देश शिक्षणमंत्र्यांनीच शनिवारी संध्याकाळी दिल्याने शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला ओलांडणार शिंगणापूरचा चौथरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांसाठी शिंगणापूर देवस्थानने थेट चौथऱ्यावरून दर्शनास परवानगी द्यावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी राज्यातील चार हजार महिलांसह शिंगणापूर देवस्थानच्या चौथऱ्यावरून दर्शन घेऊ, असा इशारा भूमाता ब्रिगेड, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील युवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातून या मोहिमेत ४०० महिला सहभागी होणार असल्याची माहिती या संघटनांच्या वतीने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

देशाला २६ जानेवारी रोजी घटना मिळाली आहे. या घटनेने देशात महिला व पुरुषांना समान अधिकार दिला आहे. या अधिकाराची अंमलबजावणी मात्र बुरसट विचारसरणीमुळे होण्यास अडसर येत असल्याने पुरोगामी विचार आधुनिक युगात सर्वांनी स्वीकारायला हवेत, असे आवाहन यावेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई व युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कुटे यांनी केले.

ते म्हणाले, गत महिन्यात शिंगणापूर देवस्थान काही महिलांनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेण्याच्या प्रयत्नावर पुरूष सुरक्षा रक्षकांकडून अत्यंत टोकाची प्रतिक्रिया आली. या रक्षकांनी महिलांना धक्काबुक्की केल्यानंतर शिंगणापूर पोलिसात फिर्यादही नोंदविण्यात आली आहे. हिंदू धर्मातील कुठल्याही धर्मग्रंथांमध्ये किंवा वेद व उपनिषदांमध्येही अशा पध्दतीने शिंगणापुरात महिलांना रोखण्याचा संदर्भ देण्यात आलेला नाही. तरीही काही धार्मिक संघटनांच्या वतीने महिलांच्या विरोधात घेतली जाणारी भूमिका ही विषमतेला खतपाणी घालणारी असल्याचे म्हटले आहे. महिलांच्या या चळवळीस विरोध करणाऱ्या संघटना व व्यक्तींना घटना मान्य नाही का, असाही सवाल या संघटनांच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

संघटनांना नोटीस

या इशाऱ्यानंतर पोलिसांना या संघटनांना नोटीसही बजावली आहे. मात्र कुठल्याही अटकावास न जुमानता २६ जानेवारीस चौथऱ्यावर जाऊनच महिला दर्शन घेतील, असा इशारा युवा प्रतिष्ठान व भूमाता ब्रिगेड यांच्या वतीने देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यावसायिकाकडून खंडणी मागणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यावसायिकाकडून ५० लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयितास क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून आडगाव परिसरातून अटक केली. दोन दिवसापूर्वी संशयित आरोपीने संबंधित व्यावसायिकाच्या मोबाइलवर फोन करून खंडणीसाठी धमकी दिली होती.

या प्रकरणी पोलिसांनी मेरी परिसरातील साईनगर येथील अनिल राम जियानी (वय २६) या संशयित आरोपीस अटक केली. संशयित जियानी पूर्वी ज्या व्यावसायिकाकडे काम करीत होता, त्याच व्यावसायिकाकडून त्याने खंडणी मागण्यासाठी प्लॅन केला. काम सोडल्यानंतर अनिलवर काही प्रमाणात कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने पूर्वी संबंधित व्यावसायिकाला निवडले. १४ जानेवारी रोजी पोलिसांना या घटनेची माहिती समजली. त्यानुसार क्राईम ब्रँचच्या युनिट एकने आडगाव परिसरात सापळा रचला. मात्र, आरोपी पैसे घेण्यासाठी आलाच नाही. यानंतर, पोलिसांनी ज्या मोबाइलवरून कॉल झाला त्याची डिटेल काढली. तांत्रिक बाबींचा सखोल तपास करीत अनिल जियानीला हुडकून काढत जेरबंद केले. म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला म्हसरूळ पोलिसांकडे सोपवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गच्चीवरून तोल गेल्याने शिक्षकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गच्चीवरून तोल जाऊन खाली पडलेल्या शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाला. गंगापूर गावातील गोवर्धन शिवारातील कोळीवाडा येथे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

भूषण रंगराव पाटील (वय ३६) असे शिक्षकाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील पाचोरा येथील शाळेत शिक्षक असलेले पाटील हे घरी आलेले असताना ही दुर्देवी घटना घडली. शनिवारी सकाळी त्यांचा सात वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी घराच्या गच्चीवर खेळण्यासाठी गेले. या गच्चीला जास्त उंचीची संरक्षक भिंत नसल्याने मुलांना खाली आणण्यासाठी पाटील गच्चीवर गेले. त्यावेळी त्यांचा तोल जाऊन ते खाली पडल्याचा अंदाज नातेवाईकांनी वर्तवला. गच्चीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा मावस भाऊ विनोद सुरेश पाटील यांनी भूषण पाटील यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

साडेतीन लाखांची चोरी

एटीएम कार्ड हॅक करून बँक खात्यावरील ३ लाख ५० हजारांची रक्कम काढून घेण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभय रघुवीर राजोरीया यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. राजोरीया हे चार जानेवारी रोजी रात्री पाथर्डी फाटा येथील हॉटले गेटवे येथे मुक्कामी थांबले होते. त्यांनी हॉटेलचे बिल एटीएम कार्डद्वारे दिल्यानंतर त्यांच्या स्टेट बँक, बेलकवाडी, म्हैसूर, कर्नाटक या शाखेतील खात्यावरून ३ लाख ५० हजारांची रक्कम काढण्यात आली आहे. चोरट्याने एटीएम हॅक करून हा प्रकार केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. नागरिकांनी एटीएमचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बारा होर्डिंग जप्त; सात जणांवर गुन्हे

नाशिक महापालिकेने शहरातील अवैध होर्डिंग व बॅनर्स विरोधात जोमात कारवाई सुरू केली असून, पालिकेने आतापर्यंत १२ होर्डिंग्ज आणि १९४ बॅनर्स जप्त केले आहेत. अवैध होर्डिंग प्रकरणी सात जणांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत.

उच्च न्यायालयाने २६ जानेवारीपर्यंत शहरातील अवैध होर्डिंग व बॅनर्स काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेने अवैध होर्डिंग विरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यात आतापर्यंत १२ होर्डिंग जप्त केले आहेत. त्यात सरकारी तीन, खासगी दोन आणि व्यावसायिक सात होर्डिंग्जचा समावेश आहे. तर, सहा विभागातून १९४ बॅनर्स जप्त करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images