Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

घंटागाडीचा त‌िढा सुटला?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शासनाच्या हस्तक्षेपामुळे वादात अडकलेल्या पाच वर्षाच्या घंटागाडी ठेक्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा महापौर अशोक मुर्तडक यांनी केला आहे. महापौरांनी गुरूवारी नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर यांची भेट घेतली असून, त्यांनी पाच वर्षासाठी ठेका देण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शनिवारी घंटागाडी निविदा प्रक्रिया प्रशासनातर्फे राबविली जाणार आहे.

म्हैसकर या गुरूवारी नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी महापौर मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांची भेट घेऊन घंटागाडी योजनेवरील स्थगिती हटवण्यासह पेस्ट कंट्रोलचा विषय मार्गी लावण्याची विनंती केली. घंटागाडीचा ठेका रखडल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. त्यावर घंटागाडी ठेका पाच वर्षासाठी देण्यात हरकत नसल्याचे म्हैसकर यांनी सांग‌ितल्याचा दावा महापौरांनी केला आहे. निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी आयुक्ताना दिल्या. त्यामुळे या ठेक्याचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी या ठेक्यावर आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया रखडली होती.

दरम्यान, म्हैसकर यांच्या सुचनेनंतर प्रशासनाने सुद्धा पाच वर्षाचा ठेका देण्याची निविदा प्रक्रिया सुरू कऱण्याचा निर्णय़ घेतला आहे.आयुक्त शुक्रवारी दिल्लीत असून शनिवारी ते नाशिकमध्ये परतणार आहेत.त्यामुळे शनिवारीच निविदा प्रक्रिया काढली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

घंटागाडीला मुदतवाढ

सद्यस्थितीत अधांतरी लटकलेल्या वादग्रस्त घंटागाडी योजनेला स्थायी समितीने गुरूवारी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नाशिककरांना आता महिनाभर तरी दिलासा मिळाला आहे. 'सदस्यांनी निविदा काढल्याशिवाय मुदतवाढ देऊ नका' असा पवित्रा घेतला होता. परंतु सभापतींनी प्रशासनाची विनंती मान्य केल्याने घंटागाडीचा त‌िढा एक महिन्यासाठी सुटला आहे. दरम्यान, विकासकामांच्या विषयांवरून सदस्य पुन्हा आक्रमक झाले असून, आयुक्तांशिवाय बैठक घेणार नसल्याचा पवित्रा स्थायी समितीने घेतला आहे.

सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी स्थायी समितीची बैठक झाली. त्यात घंटागाडी योजनेला तीन महिन्याची मुदतवाढ, भूसंपादनाचे विषय आणि शरणपूर रोडवरील गाळ्यांचे विषय मंजुरीसाठी ठेवले होते. घंटागाडीच्या मुदतवाढीला सदस्यांनी तीव्र विरोध केला. शासनाच्या हस्तक्षेपामुळे घंटागाडी योजना लटकली असून, जोपर्यंत महासभेच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यत मुदतवाढ देऊ नये, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर सभापतींनी आयुक्तांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला. तरीही सदस्य आक्रमक होते. घंटागाडीला मुदतवाढ आवश्यक असताना प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित राहत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. स्थायी समितीच्या बैठकीबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. घंटागाडीचा विषय प्रशासकीय पातळीवर अडकला असला तरी, लोकप्रतिनिधींना बदनाम केले जात असल्याचा आरोप राहुल दिवे यांनी केला.

सदस्यांचे मत ऐकल्यानंतर सभापती चुंभळे यांनी घंटागाडीला योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. सोबतच एक महिन्याच्या आत महासभेने घंटागाडी संदर्भात दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. घंटागाडी, पेस्ट कंट्रोलचा विषय भिजत घोंगडे ठेवल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. महापालिकेत कामे

होत नसतील तर इथे येण्याची गरजच काय असा सवाल सभापतींनी

केला.

व्हॉट्सअपवर बैठक घ्या

सदस्यांची विकासकामे अजूनही मार्गी लागत नसल्याने सदस्यांमध्ये तीव्र संताप होता. प्रशासकीय अधिकारी मि‌टिंगला येऊ शकत नसतील आणि सदस्यांचे प्रश्न सोडवू शकत नसतील तर, त्यांनी व्हॉटसअपवर बैठका घ्याव्यात, अशी मागणी सदस्या ललिता भालेराव यांनी केली. व्हॉटसअपवर बैठका घेतल्या तर उपस्थित राहण्याची गरज नसल्याचा टोला त्यांनी प्रशासनाला लगावला.

आयुक्तांशिवाय बैठक नाही

स्थायी समितीच्या बैठकीला प्रशासकीय अधिकारी गंभीर घेत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. गुरूवारी आयुक्त बैठकीला आले नाहीत, तर अतिरिक्त आयुक्तही दुसऱ्या बैठकीसाठी जाण्यासाठी लवकर बैठकीतून बाहेर निघाले. तर आरोग्य अधिकारीही उपस्थित नव्हते. त्यामुळे सदस्यांचा संताप अनावर झाला. प्रशासन गंभीर नसेल तर बैठकींना कशाला यायचे? असा संतप्त सवाल सदस्यांनी केला. त्यामुळे यापुढे आयुक्तांना विचारूनच बैठक घेऊ आणि आयुक्त हजर राहणार असतील तरच बैठक होईल, असे सभापतींनी यावेळी सांगीतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुराव्यांच्या आधारे कोणाचीच गय नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर परिसरातील स्वारबाबानगरमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा तपास करताना पुराव्यांच्या आधारे कोणाचीच गय केली जाणार नाही, असा इशारा सहायक पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी दिला. या प्रकरणात पीएल ग्रुपचे कार्यालय केंद्रस्थानी आहे. नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण याचा या गुन्ह्यात सहभाग आहे किंवा नाही, हे सांगणे आता संयुक्त‌िक होणार नाही, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.

सातपूर परिसरातील तडीपार अर्जुन महेश आव्हाड आणि सराईत गुन्हेगार निखील विलास गवळी या दोघांची ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री हत्या झाली. ही घटना स्वारबाबानगर परिसरातील पीएल ग्रुपच्या कार्यालयात झाल्याची कबुली संशयितानी दिली आहे. अद्यापपर्यंत या घटनेत पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. हत्येच्या घटनेनंतर संशयितांनी मुंबई गाठली. तिथे एका हॉटेलमध्ये काही काळ वास्तव केले. तेथील सीसीटीव्हीमध्ये पाच जण असल्याचे दिसून येत असल्याने पोलिस या पाचव्या साथिदाराचा शोध घेत आहेत. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून या गुन्ह्याचे तपासाचे केंद्र पोलिस आयुक्तालयात सरकल्याचे दिसते. सहायक पोलिस अधीक्षक मुंढेयांच्यासह आणखी काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. आज, गुरूवारी दुपारी मुंढे पोलिस आयुक्तालयात हजर होते. हत्याकांडाची घटना शहर हद्दीत घडली. संशयिताचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात असल्याचे मुंढे यांनी सांगितले. शहर पोलिसांचे सहकार्य मिळत असून, पुरावे संकलन ही महत्त्वाची बाजू असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. या गुन्ह्यात भूषण लोंढेला अटक होण्याची चर्चा असल्याबाबत मुंढे यांना विचारले असता, हा तपासाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गुन्हे रोखा

कामगार, कष्टकऱ्यांची वस्ती असलेला सातपूरचा भाग गुन्हेगारीमुळे प्रकाश झोतात आला आहे. आठ ते दहा तास कंपन्यांमध्ये काम करुन सुखाने झोपणाऱ्या कामगार, कष्टकऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे पोलिसांना माहिती देऊन देखील गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप नाग‌रिक करत आहेत. स्वारबाबानगर येथील दुहेरी हत्यांकांडाचे पडसाद नक्कीच उमटतील, अशी भीती सातपूरकरवासीयांना आहे. 'खून का बदला खून' असे सत्र सातपूरमध्ये सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आक्रमकतेवर संघ पडला भारी!

$
0
0

आता दादा जाधव यांच्यासमोर जिल्हा परिषद निवडणुकांचे आव्हान

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात भाजपची सत्ता येताच, भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या निष्ठावान जुना विरुद्ध नवीन प्रवेशकर्त्यांच्या वादात जिल्हाध्यक्ष पद निवडणूकीत निष्ठावान गटाचा विजय झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांकडून माजी आमदार माणिकराव कोकांटे सारख्या आक्रमक चेहऱ्याला पुढे करण्याचा डावही फसला आहे. आक्रमकतेवर संघ भारी पडला असून, पक्षात नव्याने दाखल होणाऱ्यांना लवकर संधी दिली जात नसल्याचा संदेशही या निवडणुकीतून गेला आहे. लोकशाही पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया राबविली गेल्याचा दावा निरीक्षक सुनील बढे यांनी केला आहे.

भाजपची सत्ता असल्याने सध्या भाजपमध्ये प्रवेशकर्त्यांची संख्या जोमात वाढली आहे. सत्ता असल्याने पदे मिळविण्याचीही स्पर्धा पक्षात असून, त्यामुळे जुना व नवा असा संघर्ष आता उभा राहिला आहे. काही ठिकाणे नव्याना संधी दिली जात असल्याने जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. सिडको मंडल अध्यक्षपद निवडीचा वाद हा त्याच प्रकारातून घडल्याने जिल्हाध्यक्षपद निवडणुकीत हा वाद टाळावा याची पूर्ण खबरदारी भाजपने घेतली. जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष विकास देशमुखसह यांच्यासह माणिकराव कोकाटे, दादा जाधव, शंकर वाघ, डॉ. प्रशांत भदाणे, केदा आहेर, अद्वय हिरे यांच्यात चुरस होती. या पदासाठी मोठी चुरस व स्पर्धा असल्याने पक्षनिरीक्षक सुनील बढे यांनी जिल्हा समन्वय समिती, तालुका मंडलचे मत जाणून घेतले. या पदासाठी कोकाटे व जाधव अशी दोन नावे शेवटच्या क्षणी उरली. जिल्हापरिषद निवडणूक असल्याने आक्रमक अशा कोकाटे नेतृत्व द्यावे, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या गटाची होती. त्यासाठी काही आमदार व मंत्रीही इच्छूक होते. परंतु निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नवीन पक्षात आलेल्या कोकाटेंना पद देऊ नये अशी जुन्या भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भावना होती. त्यामुळे हा निर्णय थेट प्रदेशपातळीवर गेला. प्रदेश पातळीवरूनही कोकाटे यांनाच झुकते माप देण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता.

पक्षाचे कोकाटे यांना झुकते माप बघून संघ या निवड प्रक्रियेत सक्रिय झाला. सामान्य कार्यकर्ता व निष्ठावान असलेल्या जाधव यांना संधी देण्यात यावी, असा दबाव संघातर्फे टाकण्यात आला. त्यामुळे बढे यांनी इच्छूकांशी चर्चा व सल्लामसलत करत, अखेरीस जाधव यांच्या नावाची घोषणा केली. जाधव यांचा निर्णय कोकाटेंसह इतरानाही मान्य केला. निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला.

निवडणुकीचे आव्हान

जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असली तरी, त्यांच्या समोर जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मोठे आव्हान आहे. जिल्ह्यात पक्षाची मोठी ताकद नाही. सध्या पक्ष सत्तेवर असल्याने त्याचा फायदा घेऊन त्यांना पक्ष तळागाळात न्यावा लागणार आहे. सोबत पक्षातील जुना व नवा असा संघर्ष त्यांना मिटवावा लागणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी त्यांना आतापासूनच तयारी करावी लागणार असून, जिल्हा परिषद निवडणुकीचे शिवधनुष्य ते कसे पेलतात यावर भाजपचे भविष्य अवलंबून आहे.


सामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष

मालेगाव : भाजपाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दादा जाधव यांची निवड झाल्याची बातमी समजल्यावर त्यांचे वास्तव्य असलेल्या मालेगाव शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व्यक्त केला गेला. दादा जाधव मूळचे देवळा तालुक्यातील तिसगाव येथील आहेत. शेती व्यवसायाच्या निमित्ताने मात्र त्यांचा नेहमीच मालेगावशी संबंध कायम राहिला. येथील मसगा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतूच्या माध्यमातून त्यांच्यातील नेतृत्व गुणाला वाव मिळत गेला. १९९०-९२ च्या कालावध‌ीत अभावीच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहिले. त्यानंतर १९९५-९६च्या काळात सुरेश नाना निकम यांच्या भाजपप्रवेशानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकीर्द सुरू झाली. भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ते जेष्ठ नेते सुरेश निकम यांच्या समवेत नेहमीच पक्षाच्या कार्यरत आणि पक्ष उभारणीत अग्रभागी राहिले. मालेगावसह संपूर्ण कसमादे पट्ट्यात त्यांनी आपला दांडगा जनसंपर्क प्रस्ताप‌ित केला. भाजप नाशिक ग्रामीण आणि दादा जाधव हेच सम‌ीकरण गेल्या काही दिवसात पक्षात बनत गेले. पक्षाने देखील त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वास अनेकवेळा संधी दिली. मालेगाव तालुका सरचिटणीस, जिल्हा सरचिटणीस, चिटणीस अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळी आहे. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष असा त्यांचा प्रवास त्यांच्यातील पक्षनिष्ठेचेच फळ असल्याचे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे.
पक्षाकडे काहीच माग‌ितले नाही, परंतु जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली असून, ती यशस्वीपणे पार पडेल. जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष हा भाजपचाच असेल. सर्वांना विश्वासात घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करेन.

- दादा जाधव, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, भाजप

जुना नवा असा काही वाद निर्माण करू नका. सर्वच पक्षात अशी स्थिती असते. अनेक वर्षानंतर सत्ता आली, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. पक्षाला सर्वांनाच संधी द्यावे लागते.

- माणिकराव कोकाटे, माजी आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी बी. जी. वाघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक साहित्य मंडळाची नुकतीच स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी माजी जिल्हाधिकारी व जेष्ठ लेखक बी. जी. वाघ यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी विजय पवार व कार्याध्यक्ष म्हणून डॉ. धर्मेंद्र मुल्हेरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

साहित्य चर्चा, पुस्तक प्रकाशन, काव्यवाचन, लेखक वक्ते यांची व्याख्याने आयोजित करणे, नवोदित साहित्यिकांचे संमेलन आयोजित करणे त्यांच्या स्पर्धा व गौरव करणे, साहित्य निर्मितीसाठी वातावरण तयार करणे, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचक मेळावे आयोजित करणे, शासकीय योजनांचा प्रसार करणे, मराठी भाषा संवर्धन करणे, व्याकरण शुद्धता, सुंदर हस्ताक्षर, नाटक, काव्य, संगीताचा प्रचार प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन आदी उद्देशासाठी साहित्य मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

कार्यकारणी सदस्यांमध्ये अभिमन्यू सूर्यवंशी, सचिव डॉ. वेदश्री थिगळे, खजिनदार प्रा. यशवंत पाटील, सह सचिव पद्माकर देशपांडे, सदस्य उत्तम कोळगावकर, डॉ. भास्कर गिरीधारी, विश्वास देवकर, चंद्रकांत महामिने, नरेंद्र महाजन यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक साहित्य मंडळात सहभागी व्हायचे असेल त्यांनी श्री गुरुदेव टॉवर, एकलन्स पॉईंट, अहिरराव फोटो स्टुडिओ जवळ कॉलेजरोड नाशिक येथे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील बदल्यांना लोकप्रतिनिधींचा विरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, तीन वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना बदलीत प्राधान्य देण्यात आले आहे. या बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची फाईल आता आयुक्तांच्या टेबलावर गेली असली तरी, यातील काही बदल्यांना लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या बदल्यांवरून पुन्हा प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेत भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला असून, वर्षानुवर्ष एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रशासन विभागाने तीन वर्षापेक्षा जास्त एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार केले असून त्यासंदर्भातील फाईल आयुक्तांपुढे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या बदल्यांच्या ऑर्डर कधीही निघण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये या बदल्यांसदर्भात धास्ती पसरली आहे.

एकीकडे प्रशासनाने या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, दुसरीकडे सरसकट बदल्यांना लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. पाणीपुरवठा सारख्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यास पाणीपुरवठा विभागाचे नियोजन बिघडणार आहे. सध्या पाण्याबाबत आणीबाणीची स्थिती असून, याचा फटका नगरसेवकांनाच बसणार आहे. त्यामुळे या सरसकट बदल्यांना आता लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला असून, आयुक्तांकडे आक्षेप नोंदविले जाणार आहेत. विश्वासात घेऊनच बदल्या कराव्यात, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठे विद्यालयात पेशवेवाडा दिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या ९३ व्या वर्धापनदिनानिमित्त पेठे विद्यालयात नवा पेशवेवाडा दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाला माजी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आठवणीतल्या शाळेचे जुने चित्र उभारले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे होते. प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर उपस्थित होते. व्यासपीठावर कार्यवाह शशांक मदाने, शिक्षक मंडळ अध्यक्ष राजेंद्र निकम, उपाध्यक्ष दिलीप फडके, दत्ता नागपूरे, चंद्रशेखर वाड, पा. म. अकोलकर, वि. भा. देशपांडे, श्रीरंग वैशंपायन, सरोजिनी तारापूरकर उपस्थित होते. पेशवेवाडा दिनाच्या संकल्पनेवर यावेळी चंद्रशेखर मोंढे, सूर्यकांत रहाळकर यांनी प्रकाश टाकला.

माजी विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. विकास गोगटे, विधिज्ञ अजय तोष्णीवाल यांनी मनोगत व्यक्त केले. शैलेश पाटोळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पूनम वाल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर मुख्याध्यापिका गीता कुलकर्णी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जेलरोड येथे घडली. विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिसांनी सासू, सासरे, पती, भाया व जाव यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. उपनगर पोलिसांनी पतीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. अन्य फरार संशयितांचा शोध घेतला जात आहे.

अश्विनी सुबोध माळोदे (वय २४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा ११ मे २०१३ रोजी सुबोध दत्तात्रय माळोदे यांच्याशी विवाह झाला होता. सासरे दत्तात्रय, सासू अल्का, भाया सुशांत, जाव ऋषिता व पती सुबोध समवेत ती जेलरोड येथे राहत होती. चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये मागितले. वडिलांनी ज्युपिटर मोटरसायकल घेण्यासाठी पन्नास हजार दिलेले असल्याने आता ते पैसे देऊ शकत नाही, असे अश्विनीने तिच्या सासरच्या मंडळींना सांगितले. त्यानंतर सासू व जाव अश्विनीला घरकाम व स्वयंपाक नीट येत नाही, अशी कुरापत काढून शिवीगाळ करुन मारहाण करू लागले.

अश्विनीने हा प्रकार वडिलांना फोनवर सांगितला. वड‌ील व नातेवाईकांनी सासरच्यांची समजूत घातली. ११ जानेवारी १६ रोजी अश्विनीने फोन करुन वडिलांना सांगितले की, पती काहीच एकत नाही. सुटी असली तरी घरी थांबत नाही. सासरचे नेहमी टाकून बोलतात. अश्विनीच्या आई- व़डीलांनी सासरी जाऊन सासरच्यांची समजूत घातली. १३ जानेवारीला सकाळी अश्विनीने पुन्हा फोन करुन वडिलांना सासरी बोलावले.

सासरच्यांनी पुन्हा हुंड्याची मागणी केली. त्यानंतर अश्विनीने घराच्या वरच्या मजल्यावर फॅनच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिचे वडील सुनील गंगाधर रोकडे (जहांगीरदार वाडा, विहितगाव) यांनी दिली आहे. पोलिसांनी पती सुबोधला अटक केली असून उर्वरीत फरार संशयितांचा तपास उपनिरीक्षक काळे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तश्रृंग गडावरची अतिक्रमणे हटविली

$
0
0

म. टा वृत्तसेवा, कळवण
साडेतीन शक्तीपिठातील अर्धे पीठ असलेल्या श्री सप्तश्रृंग गडावरील चांदणी चौकातील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने "प्रहार" करीत ते हटवले. अतिक्रमण हटाव मोहीम केवळ याच चौकात राबविली गेली असली तरी हा चौक आज मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येत आहे.

याच परिसरात देशातील क्रमांक १ चा फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प शासनातर्फे राबविला जात आहे. म्हणून या ठिकाणी दुकाने थाटण्यासाठी व्यावसायिकांना दहा बाय दहाचे २० ते २५ गाळे बांधून दिले होते. परंतु, व्यावसायिकांनी व्यवसायासाठी वाहन पार्किंग म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करीत मोठमोठे शेड बांधले होते. या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद होऊन रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची मोठी कसरत होत होती. शिवाय, भाविकांनाही त्रास सहन करावा लागत होता. या मोहिमेत सप्तश्रृंग देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा रोपवे लगतची वॉल कम्पाउंड (दहा बाय दोन मीटरची भिंत) जमीनदोस्त करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण मोहीम राबविली गेल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले, तर अतिक्रमण धारक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. अतिक्रमणहटाव मोहिमेत उपअभियंता किशोर केदार, ए. बी. पगारे, शाखा अभियंता एन. सी. आहेर यांनी सहभाग घेतला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरटा सीसीटीव्हीत कैद

$
0
0

सातपूर : शिवाजीनगर येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालत गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेराचा स्क्रिन व कपाटातील रोख ८०० रुयांची चोरी केली असल्याची तक्रार मुख्याध्यापक नवले यांनी गंगापूर पोलिसांकडे दिली आहे. शिवाजीनगर भागात नेहमीच भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गंगापूर पोलिस पेट्रोलिंगच करत नसल्याचा आरोप नगरसेवक दिनकर पाटील यांनी केला आहे. वेळोवेळी चोऱ्या व टवाळखोरांबाबत गंगापूर पोलिसांनी माहिती देऊन देखील कारवाई होत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक पाटील यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’कडे उद्योगांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने सुरु केलेल्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाकडे खासगी उद्योगांनी पाठ फिरविली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी सामाजिक बांधिलकीतून (सीएसआर) ४६ कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अवघा ३ कोटी रुपयांचाच निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला आहे.

दुष्काळ निवारण आणि पाण्याची साठवणूक या दोन्ही उद्देशाने राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही मोहीम हाती घेतली आहे. राज्याच्या सर्वच भागात या मो‌हिमेच्या माध्यमातून बहुविध प्रकल्प साकारले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातही अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. खासगी संस्था, उद्योग, देवस्थान यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन राज्य सरकारने केले. याअंतर्गतच प्रत्येक जिल्ह्याला ठराविक उद्द‌िष्ट देण्यात आले. नाशिक जिल्ह्यालाही ४६ कोटी ९ लाख रुपयांचे उद्द‌िष्ट निश्चित करण्यात आले. मात्र, नाशिक जिल्ह्यातील विविध उद्योग, वित्तीय संस्था, देवस्थान यांच्याकडून त्यास भरघोस प्रतिसाद लाभू शकलेला नाही.

जलयुक्त शिवार अभियानाद्वारे दुष्काळ निवारणाचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. अजूनही खासगी संस्था, उद्योग, संघटना यांना या अभियानासाठी सीएसआर निधी देता येईल. इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा.

- गोरक्षनाथ गाडिलकर, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्युझियम ऑन व्हील्स’ची तळेगावच्या आश्रमशाळेस भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातर्फे खास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ' म्युझियम ऑन व्हील्स' या उपक्रमातील बसमध्ये तयार करण्यात आलेल्या फिरत्या म्युझियमने नुकतीच तळेगाव (ता. इगतपुरी) येथील संजीवनी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेस भेट दिली.

आश्रमशाळेतील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांसह तळेगावची जिल्हा परिषद शाळा, न्यू इंग्लिश स्कूल तळेगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या बसमधील म्युझियमला भेट देऊन प्राचीन संस्कृतीविषयी आणि तत्कालीन लोकजीवनाविषयी वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून माहिती जाणून घेतली. ग्रामीण भागातल्या सगळ्याच मुलांना मोठ्या शहरात जाऊन वस्तुसंग्रहालय पाहण्याची संधी मिळत नाही. अशा मुलांनाही म्युझियमविषयी जाणून घेण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक आणि संजीवनी आश्रमशाळेचे अध्यक्ष जितेंद्र गोस्वामी यांनी यावेळी सांगितले. आश्रमशाळेच्या सरचिटणीस प्रमिला गोस्वामी आणि विश्वस्त विशाल भारती आदी यावेळी उपस्थित होते. म्युझियम ऑन व्हील्सचे व्यवस्थापक अजय साळुंखे यांच्यासह डेल साजन, स्निग्धा काटकर, विनीत काजरोळकर, प्रदीप तळेकर, गौरव मोहिते आणि शिवाजी देवरे आदींनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गौण खनिज वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक सातपूर मंडल अधिकाऱ्यांनी पकडल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून पाचपट दंड आकारणी करण्यात येणार असल्याचे मंडल अधिकारी प्रकाश तावडे यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले.

त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोन ट्रक डबर व एक ट्रक माती मिश्रित मुरुम घेऊन चालले असल्याची माहिती सातपूर मंडल अधिकारी तावडे यांना मिळाली.

यानंतर तावडे यांनी तत्काळ पाठलाग करत सातपूर काॉलनी सर्कलवर तीन ट्रक पकडले. यावेळी वाहतुकीचा कुठलाच परवाना संबंधित गाडी चालकांकडे नसल्याने तीनही ट्रक जप्त करुन तहसील कार्यालयात जमा केले. यात तीन गाडी मालकांकडून अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी पाचपट दंड आकारणी केला जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. संबंधित गाडी मालकांनी दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही तावडे म्हणाले.

कारवाईच्या वेळी सातपूरचे तलाठी जितेंद्र क्षिरसागर, पिंपळगाव बहुलाचे तलाठी राजेंद्र साळी, कोतवाल समाधार आहिरे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरारी नगरसेवक सापडेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दंगलप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरसेवक संजय साबळे त्यांचा मुलगा आकाशसह फरारी झाले आहेत. चक्क १० ते ११ दिवसांपासून त्यांचा मागमुस सापडला नसून, वार्डातील मतदार आणि शहर पोलिस त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात गर्क आहेत.

जागेच्या वादातून भारतनगर झोपडपट्टीलगत असलेल्या नंदिनीनगर येथे नववर्षालाच तुंबळ हाणामारी झाली होती. याप्रकरणी, अस्लम शेख अब्दुल करीम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी नगरसेवक संजय साबळे, त्यांचा मुलगा आकाश साबळे, फुलेबाई आ​णि मिनाबाई यांच्यावर दंगल करणे तसेच आर्म अॅक्टनुसार तीन जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होताच संजय साबळे आपला मुलगा आकाशसह फरार झाले. पोलिसांनी आतापर्यंत त्यांचे भारतनगर येथील कार्यालय, काठेगल्ली येथील घर तसेच पाथर्डी फाटा येथील एका इमारतीतील फ्लॅटवर छापा मारीत साबळेंचा शोध घेतला. आकाश व संजय साबळेंचा जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला असून, त्यांना शरण आल्याशिवाय पर्याय नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. शहर पोलिसांचे एक पथक साबळे पिता पुत्रांच्या मागावर आहेत.

मुलींची सुटका

दंगली दरम्यान स्थानिक नागरिकांनी नंदिनीनगरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसाचे केंद्र नागरिकांनी लक्ष केले होते. पोलिसांनी लागलीच या वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्दवस्त करीत १२ मुलींची सुटका केली होती. या मुलींना महिला आधार आश्रमात ठेवण्यात आले. आज त्यांना हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांची मुक्तता केली.

संशयित पोलिस निलंब‌ि‌त

नाशिक : खंडणी प्रकरणात सहभागी असल्याच्या संशया​वरून गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला पोलिस कॉन्स्टेबल विजय म्हैसधुणेला निलंब‌ित करण्यात आले आहे. म्हैसधुणेला ८ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणात अडीच लाख रूपयांपैकी ९ हजार रूपयांची रिकव्हरी करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, मुख्यसुत्रधार सुरेश रघुभाई थोरात मात्र अद्याप फरारच आहे.

संशयित विजय म्हैसधुणेने काही महिन्यापूर्वी गंगापूररोड येथील समीर दत्ताजीराव वंडेकर (४२) यांच्याकडून २५ लाख रूपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील अडीच लाख रूपये म्हैसधुणेने घेतले होते. वंडेकर यांचा वापी येथे राहणारा मित्र सुरेश रघुभाई थोरात याने वंडेकरांना एक वस्तू दिली होती. ही वस्तू अतिशय मौल्यवान असल्याचे सांगत थोरात वंडेकरांकडून १४ लाख रूपये घेतले. मात्र, सदर वस्तू थोरातने परत घेतली नाही. तसेच हातउसने घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ केली. वस्तूचे आवारण काढल्यास रेडीयएशन होईल, अशी भीती थोरातने घातल्यामुळे वंडेकरांनी ती घरातच सुरक्ष‌ित ठेवली.

दरम्यान, ही माहिती म्हैसधुणेला समजताच त्याने वंडेकरांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुंबई नाका येथून अटक केलेल्या दोघा संशयितांच्या माहितीच्या आधारे ८ जानेवारीला म्हैसधुणेला अटक करण्यात आली. आजमितीस म्हैसधुणेवर निलंब‌ित करण्यात आले असून, या प्रकरणात ९ हजार रुपयांची रिकव्हरी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, फरार असलेल्या थोरातला पकडण्यासाठी दोन वेळा सापळे रचण्यात आले. मात्र, तो सापडला नाही. थोरातने अशा प्रकारे गुजराथसह महाराष्ट्रात काहीजणांना गंडा घातला असावा, अशी शक्यता पोलिस निरीक्षक रमेश यादव यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनधारकांना सुखद धक्का!

$
0
0

निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 'पीएफ'कडून पेन्शन मिळते. मात्र, अनेकदा पेन्शनधारकांकडून हयातीचा दाखला वेळीच जमा केला जात नसल्याने त्यांची पेन्शन अचानक बंद होते. मग आपली पेन्शन बंद का झाली याची माहिती घेण्यासाठी लाभार्थींची पीएफ ऑफिसमध्ये गर्दी होते. पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज फाटा आणि हयातीचा दाखल देण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागते. ही संभाव्य अडचण निर्माण होऊच नये यासाठी 'पीएफ' ऑफिसने लाभार्थींना आपला हयातीचा दाखला कार्यालयात देण्याबाबत आवाहन केले आहे.

९५ हजार जणांचे दाखले प्राप्त नाशिक विभागात एकूण १ लाख १८ हजार पेन्शनधारक आहेत. त्यापैकी १ लाख १३ हजार पेन्शनधारकांचे हयातीचे दाखले पीएफ ऑफिसने जमा करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. यात अद्यापपर्यंत ९५ हजार पेन्शनधारकांचे हयातीचे दाखले पीएफ ऑफिसकडे जमा झालेले आहेत, असे पीएफ आयुक्त तांबे यांनी सांगितले. पेन्शन लाभार्थींनी आपल्या हयातीचे दाखले पीएफ ऑफिसमध्ये तत्काळ जमा करावेत ‌किंवा ते ऑनलाइन जमा करावे, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी तालुक्यात उडणार ग्रामपंचायत निवडणुकांचा बार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी
दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाचे कवित्व सुरू असतानाच, दिंडोरी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०१६ यादरम्यान संपत आहे. त्यांच्या निवडणूकीपूर्वीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दिंडोरी तहसील कार्यालयाला आदेश दिले असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील कसबे वणीसह ननाशी, मोखनळ, देवपूर, देवठाण, तळ्याचा पाडा, पळस विहीर, नळवाडी, निगडोळ, देहरे, धागुर, कोचरगांव, रासेगांव, धाऊर, उमराळे बु, अंबानेर, भातोडे, कृष्ण गांव, मुळाणे, करंजवण, खेड्ले, देवपाडा, दहेगांव, फोफशी टिटवे, पिंपरखेड, माळेगांव काझी, जानोरी, वरवंडी, मोहाडी, अक्राळे, कोऱ्हाटे, जऊळके दिंडोरी, शिवनई, तळेगांव दिंडोरी, पिंपळनारे, मडकी जांब, खतवड, आंबेवणी, राजापूर व वरखेडा या ४१ ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने निवडणूक आयोगाने १४ जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र ग्रामपंयायत अधिनियम १९६६ मधील नियम व तरतुदीनुसार प्रक्रियेला अनुसरून सन २०११ च्या जनगणनेच्या लोकसंख्येप्रमाणे प्रभाग रचना, हरकती सोडत आरक्षण या सर्व प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक आहे. सदर प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करून ते प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखेतून तपासून घेण्याचे आदेश व सूचना निवडणूक आयोगाने दिंडोरी तहसील कार्यालयाला लेखी स्वरूपात कळविले आहे. संघाच्या हस्तक्षेपानंतर निष्ठावान कार्यकर्त्याला संधी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्ता सुरक्षेसाठी आंदोलन

$
0
0

शहरात वाहनचालकांचा प्रवास खडतर झाला आहे. रस्त्यात अडथळा ठरत असलेले वृक्ष व विना दुभाजक रस्ते हेच या अपघातांना कारणीभूत आहेत. काही दिवसांपूर्वीच उंटवाडी रस्त्यावर बोथरा आई व मुलाचा ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. या घटनेतून बोध घेत महापालिका प्रशासनाने वाहनचालकांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. उंटवाडीच्या म्हसोबा मंदिरापासून खेतवाणी लॉन्सपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी, रस्त्यांमध्ये अडथळा ठरणारी झाडे हटविण्यात यावी, गरजेनुसार उड्डाणपुलांची उभारणी करावी, अपघातात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप जिल्हाध्यक्षपदी देवळ्याचे दादा जाधव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक
भाजपच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदासाठी गुरूवारी झालेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निष्ठावान व सामान्य कार्यकर्ते दादा जाधव यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड गुरुवारी जाहीर करण्यात आली. पक्षात सुरू असलेल्या जुन्या व नव्या वादात, थेट संघाने हस्तक्षेप करीत सामान्य कार्यकर्त्याच्या बाजूने वजन टाकत निष्ठावान कार्यकर्त्यांचे बळ वाढवले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा प्रवास करणारे माजी आमदार माणिकराव कोकाटेना यांना पक्षाच्या निष्ठावान गटातून मोठा विरोध झाल्याने ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला.

गुरूवारी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने पार पडली. या पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष विकास देशमुखसह यांच्यासह माणिकराव कोकाटे, दादा जाधव, शंकर वाघ, डॉ. प्रशांत भदाणे, केदा आहेर, अद्वय हिरे यांच्यात चुरस होती. पक्षनिरीक्षक सुनिल बढे यांनी जिल्हा समन्वय समिती, तालुका मंडलचे मते जाणून घेतली. या पदासाठी अटीतटीची चुरस होती.

शेवटच्या क्षणी देवळ्याचे दादा जाधव आणि सिन्नरचे कोकाटे यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक कोकाटेंना संधी द्यावी अशी मागणी एका गटाकडून सुरू होती. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यालाच संधी मिळावी, असे म्हणत दुसरा गटही सक्रिय झाला. प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन करण्यात आले. अखेरीस संघातील काही पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून जाधव यांच्या बाजूने कौल देण्यास प्रदेशाध्यक्षांना भाग पाडले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या विरोधात बांधकाम मंत्रीही मैदानात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना सरकारने क्‍लीनचिट दिली नसल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अखेर गुरुवारी केला. मंत्रालयातील दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणातील भ्रष्टाचारप्रकरणी हायकोर्टाच्या निर्देशानुसार एसीबीने स्वतंत्र अहवाल राज्य सरकारकडे मागितला असता, मुंबई इलाख्याचे माजी मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि त्यांचे सहकारी अतुल चव्हाण यांनी अहवाल तयार केला. या अहवालात 'परफेक्‍शन' असा शब्द टाकला गेला. त्यानंतर अहवालावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्या केल्या. परफेक्‍शन या शब्दामुळे भुजबळ यांना क्‍लीनचिट मिळत असल्याच्या निष्कर्षाची चर्चा सुरू झाली. मात्र क्‍लीनचिट दिली नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी केला.

या प्रकरणात काही मुद्द्यांचा खुलासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे विचारला होता. मुख्य अभियंत्यांनी खुलाशात या प्रकरणाची केवळ वस्तुस्थिती न देता स्वतःचे मत प्रदर्शित केले होते. या मत प्रदर्शनामुळे संभ्रम निर्माण होणारे अर्थ काढले गेल्यामुळे देबडवार आणि चव्हाण यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. देबडवार यांनी अनावधानाने काही वाक्‍ये अहवालात टाकली गेल्याचे स्पष्टीकरण सरकारला दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुडकुडणाऱ्यांना, कोणी घर देता का घर?

$
0
0

प्रा. वसंत बोरस्ते यांनी नाशिकरोडच्या घंट्या म्हसोबा मंदिरामागे एका गाड्याखाली सात व आठ वर्षांची दोन भावंडे उपाशीपोटी थंडीत झोपली असल्याची माहिती कदम यांना दिली. कदम त्या लहान मुलांसाठी स्वेटर, जीन्स व चादरी घेऊन तेथे सकाळी साडेसहाला गेले. एकमेकांना बिलगून झोपलेल्या दोन निरागस मुलांच्या जवळ कपडे ठेऊन शेजारील हॉटेलवाल्याला त्यांना चहा नाश्ता देण्यास सांगितले. नंतर सकाळी संदीप कदम, राजू घोलप, मनोज इलग, संदीप इलग, दीपक लवटे हे कार्यकर्ते तेथे गेले. त्यांनी सेंट झेवियर्स समोरील दगडी पाटे व मूर्ती बनविणाऱ्या कुटुंबाकडे जाऊन त्या निराधार मुलांच्या पालकांचा शोध घेतला. जवळच असलेल्या झोपडीतील ती मुले असल्याचे त्यांना समजले.

पालकांंमुळे सोडले घर गरिबीमुळे वैतागलेले या मुलांचे आई-बाप या मुलांना सतत रागतात, मारतात म्हणून मुले वैतागून पळून गेल्याचे विक्रम कदम यांना समजले. त्यांनी मुलांच्या नातेवाईकांना घेऊन म्हसोबा मंदिर गाठले. आई-वडिल येण्याच्या भितीपोटी ही मुले पुन्हा गायब झाली. रिक्षाचालक शिंदे यांनी ती अंधशाळेच्या दिशेने गेल्याचे सांगितल्यावर विक्रम कदम यांनी शोधून काढले. आम्हाला घरी परत पाठवू नका, असे म्हणत त्यांनी गयावया केली. उपनगर पोलिस ठाण्यात ही मुले हरविल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

आता कुठे जाणार? गरिबीमुळे मुलांना सांभाळू शकत नसल्याचे पालकांनी सांगितल्याने समस्या निर्माण झाली आहे. महिला व बालविकास भवनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मुलांना आधारगृहात पाठविण्यास सांगितले. मॅग्नम हॉस्पिटलच्या संचालिका स्नेहा कुलकर्णी यांनीही मदतीची तयारी दर्शवली. निर्सगानंद जागर्स क्लब आणि स्व. राजाभाऊ कदम वाचनालयातर्फे मदत केली जात आहे. जेतवननगर आधारगृहात मुलांना चौकशी करून दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विक्रम कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी आता येणार दहा मिनिटे अगोदर

$
0
0

पंचवटीच्या २१ बोग्यातील टाक्यांमध्ये प्रवाशांसाठी पाणी भरले जाते. हे काम मनमाड येथे एका ठेकेदाराला देण्यात आले आहे. परंतु, तेथे पाणीटंचाई असल्याने नाशिकरोडला आल्यावर बोग्यांमध्ये पाणी भरले जात आहे. प्रशासनाला आर्थिक फटका बसत आहेच. त्याचबरोबर गाडीला दररोज पंधरा मिनिटे उशीर होत असल्याने प्रवाशाही संतप्त झाले आहेत. बोग्यांमध्ये पाणी भरण्यासाठी पंचवटी जादा वेळ थांबविली जात असल्याचे सविस्तर वृत्त महाराष्ट्र टाइम्सने नुकतेच प्रसिद्ध केले होते.

'मटा'चे वृत रेल्वेमंत्र्यांकडे 'मटा'मध्ये याबाबत सविस्तर वृत्त आल्यानंतर जागरुक प्रवाशांनी त्याचे कात्रण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना व्टिट केले. बुधवारी झालेल्या आंदोलनाचे 'मटा'मधील वृत्तही रेल्वेमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी पाणी भरण्यासाठी पंचवटी गाडी दहा मिनिटे अगोदर नाशिकरोडला आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी सध्या सकाळी ७. ०५ वाजता नाशिकरोडला येते. ती आता सकाळी ६.५५ वाजताच नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर येईल. भुसावळ विभागाने मुंबई मुख्यालयाला प्रस्ताव दिला आहे. त्याचा अभ्यास करून अमंलबजावणी करण्यास थोडा वेळ लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

पंचवटी दहा मिनिटे नाशिकरोडला अगोदर आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्याची अंमलबजावणी वेळ न दवडता व्हावी. - किरण बोरसे
पंचवटीत पाणी भरण्यासाठी नाशिकरोडला दहा मिनिटे जास्त वेळ जातो. गाडी लवकर आल्यानंतर पुरेसे पाणी भरले जाईल याची काळजी घ्यावी.- दिलीप सातपुते
काहीही करा, पण पंचवटी वेळेत मुंबईला पोहचवा. निर्णय लवकर अंमलात आणा. अन्यथा उद्रेक होऊन प्रवाशी पुन्हा आंदोलन करतील.- शरद चौधरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images