Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सुरक्षित वाहतुकीचे विद्यार्थी देणार धडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक फर्स्ट आणि वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा जागृती अभियानात शहरातील विविध शाळांमधील आठवी आणि नववीचे एक हजार विद्यार्थी बेशिस्त वाहनचालकांना वाहतूकीच्या नियमांचे धडे देणार आहेत. मंगळवारी सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत शहरातील सर्व मोठ्या चौकांत विद्यार्थी वाहतुकीचे नियमन करताना दिसतील.

१० ते २४ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा पंधरवड्याच्या निमित्ताने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून वाहतुकीच्या नियमनासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यांवर उतरविले जाणार आहे. चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये प्रशिक्षण पूर्ण करणारे आरएसपीचे एक हजार विद्यार्थी या अभिनव उपक्रमात सहभागी होतील. शहरात ३४ सिग्नल्स असून, त्यापैकी ३१ सिग्नल्सवर प्रत्येकी ३० विद्यार्थी उभे करण्यात येणार आहेत. त्यांच्या सोबतीला दोन वाहतूक पोलिस आणि एक शिक्षक असणार आहे. झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभ्या राहणाऱ्या, सिग्नलला न जुमानणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम पाळण्यास महत्त्व न देणाऱ्या वाहनधारकांमध्ये जनजागृतीचे काम हे लहानगे करतील अशी माहिती नाशिक फर्स्टचे संचालक अभय कुलकर्णी, पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. सकाळी सातला सीबीएस येथील सिग्नलवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या उपस्थितीत उपक्रमाला सुरूवात होईल.

नाशकात पहिल्यांदाच असा प्रयोग होत आहे.

एका दिवसाचा उतरवला विमा

वाहन चालविताना हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करा, मोबाईलवर बोलू नका, सिग्नलचा सन्मान करा, आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगा असे आवाहन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा एक दिवसीय विमा उतरविण्यात आला आहे. तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स प्रत्येक सिग्नल्सजवळ उपस्थित असणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना पोलिसांकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. नागरिकांना रस्त्यावरील सुरक्षेचे महत्त्व पटावे आणि अपघातांमधील मृत्यूंचे आणि जखमींचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याची माहिती कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धा

0
0

गोदाघाटावर दुपारी ४ ला रंगणार स्पर्धा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मी मुलुंडकर सांस्कृतिक कार्य प्रतिष्ठान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज, १० जानेवारी रोजी राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय पातळीवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोदाघाटावरील यशवंतराव देवलमामलेदार पटांगणावर ही स्पर्धा रंगणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याने २६ डिसेंबर रोजी या स्पर्धा पुन्हा जाहीर करण्यात आल्या. मात्र, कमी सहभागामुळे त्या दिवशीही स्पर्धा होऊ शकल्या नाही. त्यामुळे पुन्हा एकदा १० जानेवारी रोजी ही स्पर्धा होणार असल्याचे संचलनालयातर्फे जाहीर करण्यात आले. आज ही स्पर्धा होणार असून माऊली, साक्षी, ‌शिवमुद्रा यासह एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. या आठ संघातून अंतिमसाठी दोन संघ निवडले जाणार आहेत. अंतिमसाठी एकूण सात विभागातून चौदा संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धा विभागीय (प्राथमिक) व राज्यस्तरीय (अंतिम) अशा दोन टप्प्यात होणार असून अंतिम फेरी २१ जानेवारी रोजी रायगड महोत्सवाच्या सांगता समारोहाच्यावेळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे. यापूर्वी ज्या संघांनी या स्पर्धेसाठी आपली नावे नोंदवली आहेत, तेदेखील या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे.

प्राथमिक फेरीत प्रत्येक महसूली विभागातून दोन संघांची (प्रथम व द्वितीय) अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते संघ घोषित करण्यात येतील. या संघांना शासनाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय संघांना अनुक्रम २५ हजार, १५ हजार रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. अंतिम फेरीत‌ील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांना दीड लाख, एक लाख व ७५ हजार रूपये मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.



सहभाग घेणाऱ्यांसाठी अटी

प्रत्यक्ष वादनाची वेळ १५ मिनिटांची राहिल. वादक संख्या कमीत कमी २० आणि जास्तीत जास्त ५० असावी. यामध्ये कमीत कमी १५ ढोल वादक व ५ ताशेवादक असावेत. संघांना पारंपरिक वेशभुषेत वादन करावे लागेल. ध्वजधारी व इतर मदत करणारे यांची संख्या वादकांमध्ये धरली जाणार नाही. वादनासाठी ढोल ताशांबरोबरच झांजा, टाळ, हलगी, लेझिम, शंख, तुतारी या तालवाद्यांचा उपयोग करता येईल. वादनाच्या वेळेपूर्वी स्पर्धास्थानी एक तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. वादकांना प्राथमिक फेरीला स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे तर अंतिम फेरीसाठी प्रत्येक संघाला १० हजार रूपये देण्यात येतील. वादनासाठी शहरी, गावाकडची पथके व नाशिक बाजा पध्दतीचे किंवा अन्य प्रकारचे वादन असे तीन विभाग असतील. वादनासाठीची गुणपध्दती स्पर्धेपूर्वी सांगण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. एक वादक एकाच संघासाठी वादन करू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काचेपलिकडचं जग

0
0

वृंदा भार्गवे

तंत्रज्ञानाने या पिढीला व्यापले आहे. कानात हेडफोन घातलेली, आपल्याच विश्वात रमणारी ही पिढी अनेक स्तरावर विभागली गेली आहे. जगण्याच्या विविध पद्धती त्यांनी आत्मसात केल्या आहेत. मोबाइलप्रमाणेच मॉल हा त्यांचा आधार बनला. त्यांच्या जीवनशैलीचे अत्यंत महत्त्वाचे अंग. शहरीकरणात मॉल संस्कृती रुजली, ते साल होते १९९९. देशातील पहिला मॉल मुंबईतला. प्रथम चकित झालेला हा तरुण वर्ग काचेपलिकडचे जग पाहून भांबावला, सुखावला. भांबावण्याचे कारण आकर्षून टाकणारे इतके काही असू शकते, हे त्याला नव्याने उमगले. मिठापासून मशिनपर्यंत एका छताखाली सगळ्याच वस्तू मिळणारे हे ठिकाण.

मुलभूत गरजा हेच जगण्याचे सूत्र सांगणारे घर त्याच्या वाटेला आले होते. दिवाळीलाच आम्ही कपडे घ्यायचो, सण म्हणजे दिवाळी. वर्षभराची खरेदी तेंव्हा होणार, वाढदिवसाला गोडधोडाचे जेवण. चैन ही तेवढीच, हे सांगणारी घरातली अगोदरची पिढी. त्यांच्या त्या विचारातून स्वत:ला सोडवून घेणाऱ्या त्याच्या आईवडिलांनी दसरा-गुढीपाडवा वगैरे सणांना भेटवस्तू देण्याचे सत्र अवलंबिले. मात्र या तरुण मुलामुलींनी मॉल आपल्यात आत्मसात करायला सुरुवात केली कधी आणि कशी हे पाहणे मनोरंजक आहे.

आपले कुटुंब वाण्याकडून सामान आणण्याला प्राधान्य देते, हातातल्या पिशव्या, ती रांग, गिरणीतील पीठाने पांढरेफटक झालेले कपडे, याचा कदाचित अनुभव त्याने घेतला असेल. मात्र विकतचा आटा. जो पुरीसारखी फुगणारी पोळी देतो तो घेतला तर तुझे कष्ट वाचू शकतात, हे आईला सांगणारी मुले जागोजाग दिसू लागली. त्यामागे काळजी असली तरी होते या नव्या शैलीचे आकर्षण. इतर दुकानात घरच्यांबरोबर खरेदीसाठी गेले की आपली इमेज डाऊन होते, असे अनेकांचे म्हणणे.

का? तर दुकानदाराला तो सांगेल त्याची निम्मी रक्कम सांगणारे आईवडील, त्याच्यासमोरच हे कशाला हवे आहे, किंमत पहा, म्हणताना आर्थिक स्तर अधोरेखित करणारे, एखादा ड्रेस आवडला तर त्यांना त्याचा रंग, पोत आवडायचा नाही किंवा अमूक एका ड्रेसचा प्रकार त्यांना ठाऊक नसणे. ते आखूड असते ना ते किंवा ते पायघोळ, रंगबेरंगी असे शब्द वापरत कपड्यांची ऑर्डर ते देतात तेंव्हा या तरुणांना कानकोंडे व्हायला होते. बोहेमिअन ही स्टाईल असते, कॅज्युअल टी शर्टस, लेदर जॅकेट, स्कीन टाईट, अन्कल लेन्थ जीन्स, क्रॉप टॉप, ट्यूब टॉप, narrow bottom trouser, pencil bottom jeans घ्यायचे तर ही नावे त्यांना माहीतही नसतात. कपडे शिवणारा टेलर, अशी त्यांची व्याख्या. टेलर नव्हे हो, Fashion Designer अशी चूक दुरुस्त करावी लागते. कारण ही परिभाषा त्यांच्या ओठावर रुळत नसते.

त्यांचे तिथे न येणे याला कारण असते, आर्थिक. मात्र तरुणांचा ही शैली स्वीकारण्याचा उद्देश वागला असतो. सगळे खरेदी केलेच पाहिजे हा आग्रह इथे नसतो. तिथे कोणालाच तुम्ही काहीही न घेता, नुसतेच कपडे हाताळत राहिला याबद्दल तुमचा राग येत नाही. त्यांच्या डोळ्यात तुमची कणव नसते. मॉलमध्ये फिरता येते, कपडे ट्रायल रूममध्ये जाऊन घालता येतात. आपली ऐपत हे कपडे घेण्याची नाही हे कळले तरी मॉल त्यांना अनेक उपाय सांगतो. याच ट्रायल रूममध्ये जाऊन आवडेल ते कपडे अंगावर चढवायचे, सेल्फी हा तर रोजचा उद्योग. तर कधी तिथेच मैत्रिणीकडून फोटो काढून वेगवेगळ्या appsचा वापर करत पाठवायचे.

विंडो शॉपिंगचा हातचा मॉल या तरुणांना बहाल करतो. फक्त पहा. स्वप्ने दाखवण्याचा हा फंडा. हे घाला, ते काढा, हे वापरून पहा किंवा केवळ डोळ्यांनी अनुभवा. दागदागिने, कपडे, चपला, शूज, घराचे इंटेरिअर यापैकी काही गोष्टींसाठी आईवडिलांना येथे आणले पाहिजे ही त्यांना होणारी जाणीव. भले का ते घ्यायचे नाही पण त्यांना ते माहित करून द्यायचे. त्यांच्या विचारात बदल करायचा. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला ते प्रेझेंट आणायचे त्यांच्याच पैशाने. शाळकरी असो व महाविद्यालयीन विद्यार्थी. कडाक्याच्या उन्हाळ्यात मॉलइतका गारवा मिळणारी दुसरी जागा कोणती नसेल. हा मिटींग point स्वस्त. भेटायला जायचे असल्यास राजरोसपणे घरातून बाहेर पडून खरेदी करण्याच्या मिषाने त्याला वा तिला भेटता येते. कपडे आवडलेच नाही म्हणून काहीच खरेदी न करता सहवासाचा आनंद लुटता येतो. घरांमध्ये मैत्रीला विरोध असला तर असंख्य युक्त्या शोधल्या जातात. टाइमपास हा तर परवलीचा शब्द, तो सापडतो इथे.

आता घरदार बदलले आहे. मुलीबरोबर जाताजाता आईला मॉल आवडू लागलाय. कपड्यांचे लेबल कपडा हातात घेण्यापूर्वी प्रथम पाहण्यात कसली आलीये लाज? हा प्रश्न विचारत नीट आतबाहेर करत कपडे तपासले जातात. अमुक एक वस्तू महाग का, काही गोष्टी फार जुन्या वाटतात. खरोखर त्या हातमागाच्या आहेत, रेशमी वा अस्सल जरीच्या आहेत का असले प्रश्न विचारले जात नाहीत. आपण एका वेगळ्या जीवनशैलीचा अंगीकार केला असतो. जी आपली आर्थिक कुवत त्याप्रमाणे खरेदी करावयाची. ३९९ रुपयांपासून कपड्यांची किंमत सुरू होणार. हे मान्य करून तेवढे तरी रुपये पाकिटात ठेवणार. एस्कलेटर्स, लिफ्ट आणि एसीची किंमत आपण मोजतोय हे माहित झाले तरी आपण तक्रार करत नाही.

आता आपल्याला आपला आनंद व्यक्त करायचा असला तरी मॉल. दु;ख व्यक्त करायचे असले, एकटेपणा हवा असला तरी मॉल. काचेच्या आतले श्रीमंती जग न्याहाळायचे किंवा ज्यांना ही श्रीमंती कॅरी करता येते, त्यांच्याकडे पाहत राहायचे. त्यांचा attitude साठवता आला तर तसा प्रयत्न करायचा. मॉलमधली कॅरीबॅग घरात दर्शनी भागात ठेवायची. branded पिशव्या घेऊन बाहेर पडायचे. त्यातून आपल्या राहणीतला बदल दुसऱ्याला समजला पाहिजे. म्हणूनही आठवड्यातून एकदा तरी तिथे चक्कर मारायची. स्तर कोणताही असो भेदभाव न करता आपल्याला मान आणि भाव देणारी मॉलमधील कर्मचारी, स्टायलिश बनवणाऱ्या असंख्य accessories त्याची एक नशा असते. मात्र तेथे पुस्तकांचे दालन असते. ते बाहेरून पहिले जाते. क्वचित चक्कर मारली तर विकत घेण्याची इच्छा नसते. प्रश्न किमतीचा नसतो. टाइमपासचे इतरही ऑप्शन्स असतात. तेच पैसे मूव्हीसाठी वापरले जातात.

लाईफस्टाइल बदलवणारा मॉल असतो. बागबगिचे गेले, मोकळ्या जागा गेल्या. बच्चेकंपनीला कुठे न्यायचे या प्रश्नाचे उत्तर मॉलमध्ये हा पर्याय शोधला गेला त्याक्षणी टाइमपासची ही किल्ली हातात दिली गेली.

(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायन्सवाल्या आजोबांची भुरळ

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

परिकथेपासून ते भूताखेतापर्यंतच्या गंमती सांगणाऱ्या गोष्टी वेल्हाळ आजोबांची उपलब्धी तशी घरोघरीच. मात्र रोजच्या जगण्याची गणिते सुकर करणाऱ्या विज्ञानामागचे वैश्विक सत्य खेळणीद्वारे माडणारे आजोबा तसे विरळच. शिंगाडा तलाव परिसरातील भिडे आजोबा निर्मित वैज्ञानिक खेळणी आजोबांच्या संध्या छायेत नव्या पिढ्यांच्या मनात मात्र विज्ञानाच्या गोडीचा नवांकुर उमलवते आहे.

शालेयस्तरावरील मुलांना विज्ञानाबरोबर इंजिनीअरिंगची गोडी लागावी, ज्ञान मिळावे यासाठी सतीश भिडे गेल्या वीस वर्षांपासून कार्य करताहेत. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून विज्ञान, भौतिक शास्त्रातील नवनवीन प्रयोग करुन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. वयाच्या सत्तरीत देखील त्यांच कार्य सुरू असून विविध महाविद्यालये शाळा येथे खेळातून विज्ञानाची ओळख हा विषय मुलांना ते सप्रयोग विनामूल्य शिकवतात.

सतीश भिडे हे मुळचे पुणे जिल्ह्यातील भोरचे, मात्र नोकरीनिमित्त त्यांचा बहुतांश कालावधी हा मुंबईतच गेला. मुंबईतील एल अॅन्ड टी, व्होल्टास अशा नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी मशीन डिझायनर म्हणून काम करुन निवृत्ती घेतली. आतापर्यंत केलेल्या कामातील अनुभवाचा उपयोग मुलांपर्यंत कसा पोहोचवायचा हा विचार सुरू असताना सायन्स प्रोजेक्ट तयार करण्याची कल्पना पुढे आली आणि त्यातून या कामाला सुरुवात झाली. नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर प्रत्यक्ष काम करण्यास सुरुवात केली. सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. साहजिकच विज्ञान प्रचंड गतिमान व स्पर्धात्मक बनले आहे. त्यातून आपली पाल्य तावून सुलाखून बाहेर पडावीत यासाठी पालक अक्षरशः धापा टाकत असतात. मुलांमध्ये प्रयोगशिलता असते ती वाढीस लागावी व यातून त्यांचा बुध्यांक वाढावा हाच या कार्यामागील उद्देश असल्याचे भिडे सांगतात.

आपल्या घरात असलेल्या वस्तुंचाच उपयोग करुन कमीत कमी खर्चात मुलांना हस्तकलेच्या वस्तू, वैज्ञानिक खेळणी, गणितांवर आधारित कोडी, भूमिती, चित्रकला इत्यादी विषय ते शिकवतात. स्वतःच्या बुध्दीमत्तेतून प्रोजेक्ट तयार करणे हा त्यामागचा उद्देश आहे. यातून मुलांच्या निरीक्षण शक्ती, ज्ञान, नीटनेटकेपणा, श्रम प्रतिष्ठा, वस्तुंची जपणूक यासारखे गुण वाढीस लागण्यास मदत होते. रिकाम्या बाटल्यापासून त्यांनी विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या आहेत. हवेच्या दाबाने उडणारा बाटलीतील चेंडू, सप्त रंगातून दिसणारा पांढरा रंग, विविध प्रकारचे आकाश कंदील, वैज्ञानिक घड्याळं, द्राक्षाच्या घडापर्यंत पोहोचणारे कोल्हे, पेन स्टॅँड, पाण्याचे ग्लास, मलनिस्सारण केंद्राच्या प्रतिकृती, बायोगॅस प्रकल्प, खत प्रकल्प. टाळी वाजताच चालू-बंद होणारा रेडिओ, वेइंग मशीन, सायन्स रुल ब्रेकिंग मशीन, जेसीबी मशीन इत्यादी प्रोजेक्ट त्यांनी तयार केले आहे. त्याच्याकडे असलेले प्रोजेक्ट शिकण्यासाठी फक्त शालेय नाही तर महाविद्यालयीन तरुणदेखील येत असतात. अनेक कॉलेजमधील शिक्षकांनाही काही प्रोजेक्टचा उलगडा होत नाही त्यासाठी शिक्षकांनाही विनामूल्य प्रशिक्षण देतात. कोणत्याही माध्यमातून विज्ञानाची गोडी लागावी यासाठी हे कार्य करीत असल्याचे भिडे याचे म्हणणे आहे. याकामासाठी त्यांनी विविध ठिकाणी व्याख्याने देखील दिली आहेत. पहाटे ४ वाजता सुरू होणारा त्यांचा दिनक्रम रात्री अकरा वाजता संपतो. अनेक मुलांना सायन्स प्रोजेक्टमधील शास्त्र जाणून न घेता आयते प्रोजेक्ट विकत हवे असतात. ते म्हणतात विद्यार्थी बना, परीक्षार्थी बनू नका शास्त्राच्या जितक्या जवळ जाल तितकी तुम्हाला गोडी लागेल विज्ञानावर प्रेम करा ते देखील निश्चित तुमच्यावर प्रेम करेल. त्यांनी केलेल प्रोजेक्ट पाहणे ही देखील वेगळी अनुभूती आहे. त्यांच्याकडे असलेले एकापेक्षा एक प्रोजेक्ट पाहण्यासाठी मुले येतात. हे काम करीत असताना कसलीही अपेक्षा ते बाळगत नाही. आजपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिले आहेत. चाकोरीबद्ध शिक्षण न घेता त्याच्याबाहेर जाऊन मुलांनी विविध प्रयोग करावे असा ते विद्यार्थ्यांना सल्ला देतात. मुलांनी शास्त्राचा अभ्यास न करता गणिताचा देखील अभ्यास करावा असे ते म्हणतात, प्रत्येक गोष्ट कशी तयार झाली आहे याचा साकल्याने विचार करावा. प्रयोगशिलता ही विद्यार्थ्यांमध्ये असावी त्यातूनच शास्त्रज्ञ तयार होतील असे ते म्हणतात.


ज्येष्ठ नागरिक म्हटलं की वयाचा उत्तरार्ध आणि त्यामुळे कमी झालेला अॅक्टीव्हनेस असाच बऱ्याचजणांचा समज असतो. पण अनेक ज्येष्ठ हे केवळ वयाने वृध्द असतात, त्यांचं मन मात्र तरुणच असतं. त्यांच्या कामातून, समाजेसेवेतून किंवा अन्य अॅक्टीव्हीटीजमधून ते आपण अजूनही तरुण आहोत हे दाखवून देतात. अशाच ज्येष्ठांसाठीचं हे व्यासपीठ म्हणजे आमचा 'यंग सिनियर्स' कॉलम. चला तर मग तुम्ही जर असे यंग सिनियर असाल तर थेट आमच्याशी संपर्क करा किंवा तुमच्या ओळखीत, पाहण्यात असं कोणी असेल तर त्यांचा नाव सुचवा. योग्य व्यक्तींना या सदरातून नक्कीच प्रसिध्दी दिली जाईल.

आमचा पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डींग, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी कॉलेज रोड, ना‌शिक

समन्वय : फणिंद्र मंडलिक ९४२३१७४४९५

ई-मेल : fanindra.mandlik@timesgroup.com

(पाकीट आणि ई-मेलवर 'यंग सीनिअर्स' उल्लेख करावा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या लाखात स्वप्नपूर्तीचे आव्हान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसणाऱ्या वंचितांना जागा खरेदीसाठी अतिरिक्त अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. मात्र, जागा खरेदीसाठी केवळ ५० हजार रुपये एवढीच आर्थिक मदत मिळणार असल्याने गरीबांचे घरकुलाचे स्वप्नात उतरेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) भूमिहीन बेघर कुटुंब रस्त्यालगत राहून आला दिवस ढकलतात. इंदिरा आवास, रमाई आवास आणि शबरी आवास योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील घरकुल पात्र म्हणून नाव असूनही जागा उपलब्ध होत नसल्याने अनेकजण योजनांच्या प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत. या योजनेंतर्गत भूमिहीन कुटुंबांना जागा खरेदी करता यावी यासाठी केंद्र सरकारकडून १० हजार तर राज्य सरकारकडून ४० हजार रुपये एवढी मदत केली जाणार आहे. ५०० चौरस फुट एवढी जागा खरेदी करण्यास योजनेंतर्गत मान्यता दिली जाणार आहे. ग्रामपंचायत व शहराशेजारील ग्रामपंचायतींमध्ये जागांचे दर अधिक असल्याने एवढ्या माफक किमतीत जागा उपलब्ध होणार का असा सवाल वंचितांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

भूमिहीन चिंतातूर

स्थानिक प्राधिकरण बांधकाम नियमावलीनुसार दोन किंवा तीन लाभार्थींच्या संमतीने दोन किंवा तीन मजली इमारत बांधण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली आहे. या योजनेच्या नियंत्रणाचे काम ग्रामविकास विभागाकडे सोपविण्यात आले असून त्यासाठी जिल्हास्तरावर समितीही गठीत करण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत एक महिन्याच्या आत निधी लाभधारकांच्या खात्यामध्ये वर्ग करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जागेची उपलब्धता आणि त्यांचे गगनाला भीडलेले दर पहाता हे स्वप्न सत्यात उतरेल का अशी चिंता भूमिहीनांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो लिटर पाणी वाया

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रस्त्यावरून खळखळत वाहणारे पाणी बघून कोणालाही वाटेल की शहरात मुसळधार पाऊस झाला असावा. त्यामुळेच रस्ताही जलमय झाला असावा. पण, तसे काहीच झालेले नाही. मालेगाव शहराचा पाणीप्रश्न गंभीर झालेला असताना शहरातील नवे बसस्थानक भागातून जाणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शनिवारी सकाळी या भागातील रस्ते जलमय झाले होते.

शहराच्या पाणीप्रश्नांवरून सध्या वातावरण चांगलेच तापलेले आहे. मनपा प्रशासनाने तर पाणी चोरी करणाऱ्या अवैध नळजोडणीधारकांवर धडक कारवाई सुरू केली आहे. मात्र, शहरातील जलवाहिनी फुटल्याच्या आणि त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रशासनाला विसर पडला असावा. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातून जलवाहिनी फुटून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असताना प्रशासन अनभिज्ञ होते. याबाबत मनपाचे पाणीपुरवठा अभियंता जहीर अन्सारी यांना विचारणा केली असता त्यांनी सायने शिवारातील फिल्टर प्लांटमधून येणारी जलवाहिनी पेराडाईज शाळेच्या आवारात असलेल्या नव्या पाण्याच्या जलकुंभात जोडण्याचे काम सुरू असताना ही जलवाहिनी फुटल्याचे सांगितले. त्यामुळे दोन किमी असलेल्या जलवाहिनीतील पाणी बाहेर आले आहे. दुरुस्तीचे काम सुरू आहे लवकरच ते बंद होईल, असे सरकारी उत्तर दिले. मात्र, हजारो लिटर पाणी वाया जात असताना पाणीगळती रोखण्यासाठी कोणतेही उपाय योजना करण्याची तसदी देखील घेतली नाही.

शुक्रवारी ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम मनपा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, आधीच नादुरुस्त असलेल्या जलवाहिनीची दुरुस्तीचे काम देखील नीट न झाल्याने ही जलवाहिनी सकाळी फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया गेले असे याठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. मालेगाव मनपाच्या गलथान आणि बेजबाबदार कारभाराचा नमुना यानिमित्ताने समोर आला आहे. शहरात गेल्या आठवड्यात अवैध नळजोडणीधारकांवर सक्त कारवाईचा बडगा उगारताना आपल्याच कारभारातील गळती आणि गलाथानपणा या जलवाहिनी फुटल्याच्या प्रकाराने उघडकीस आल्याने मनपा पाणीपुरवठा विभागाची चांगलीच नाचक्की झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित मुलांच्या दारात ‘युवान’ची फुटपाथ शाळा !

0
0

नाशिक : ज्या इवल्याशा नाजूक पावलात स्कूल शूजच काय तर चपलाही नाहीत... त्यांच्या अंगावर युनिफॉर्मच काय तर अंग झाकण्यास पुरेसा कपडाही नाही... तर शाळेत त्यांची पावले पोहचतील कशी? अशा वंचित मुलांना एकत्रित करून त्यांना ज्ञानगंगेच्या मुळ प्रवाहात आणण्याचा वसा 'युवान' या युवकांच्या सामाजिक संस्थेने युवा दिनाच्या पाश्वभूर्मीवर 'फुटपाथ शाळा' हा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवारी (दि.१२) युवादिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी नाशिकच्या तरूणाईला या मोहिमेत सहभागी होण्यासाठी साद घातली आहे.

शहरातल्या सिग्नल-सिग्नलवर भिक मागणाऱ्या मुलांना शिक्षण देण्याचा संकल्प काही कॉलेजिअन्सच्या मनात डोकावला. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना साकारली ती 'युवान' ही संस्था. शहरातील वस्त्यांमध्ये पोहचून शाळेपर्यंत न पोहचणाऱ्या मुलांना शिक्षण देण्याच्या प्रयोगाला युवानच्या माध्यमातून सहा महिन्यांपूर्वी सुरूवात झाली. पेठ रोडच्या अंबिका नगरच्या सेवावस्तीत युवानच्या १५ सदस्यांनी प्रवेश करीत कचरा वेचण्यापासून तर बालमजूरी करणाऱ्यांपर्यंतच्या मुलांना गोळा करीत त्यांच्याशी संवादाला सुरूवात केली. खाऊ अन् खेळाच्या आशेने आठवड्यातून एकदा जमणाऱ्या या मुलांसमोर एक दिवस व्हाईट बोर्ड आला अन् त्या बोर्डवर मुळाक्षरे अन् अंक प्रगट व्हायला लागले. अक्षरांच्या अन् अंकांच्या गंमतीजमती समजावून घेताना आता या सेवावस्तीतील तब्बल ४० मुले लिहायला अन् वाचायला शिकली आहेत. मुलांमधला हा बदल बघून त्यांचे पालकही या उपक्रमाला प्रतिसाद देत आहेत.

कॉलेजेसमध्ये शिक्षण घेणारे १५ विद्यार्थी या उपक्रमात कार्यकर्ते म्हणून योगदान देत आहेत. प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी हे कार्यकर्ते सेवावस्तीत दुपारी पोहचून जागा मिळेल तेथे व्हाईट बोर्ड उभारून शाळा सुरू करतात. आता या शाळेची मुलांनाही सवय झाली आहे. ही मुलेही शाळेची आतुरतेने शाळेची वाट पाहतात. या कार्यकर्त्यांनी स्वत:चा पॉकेटमनी खर्च करून या फुटपाथ शाळेसाठी साधने खरेदी केली आहेत.

तरूणाईच्या सहभागातून फुलणाऱ्या युवानच्या या उपक्रमासाठी गरज आहे आणखी स्वयंसेवी कार्यकर्त्यांची. उद्याच्या युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर तरूणांनी या सामाजिक कामात सहभागी व्हावे, असे आवाहन युवानच्या वतीने समाधान भारतीय, अपूर्व इंगळे, ऐश्वर्या हुदलीकर, वैभव गुंजाळ, आदित्य अनवत, शुभम केल्ले, वीराज देवांग, गोपाळ माळी हे करतात.

तुम्हाला काय बनायचयं ?

या सेवावस्तीत पहिल्यांदा शाळेचा श्रीगणेशा झाल्यानंतर या मुलांना तरूण कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला होता 'मोठे होऊन तुम्ही काय बनाल ?' यावर खूप खूप कचरा वेचण्याच्या स्वप्नापासून तर खूप खूप भंगार गोळा करण्यापर्यंत सारख्या आशयाची उत्तरे मिळाली. आता सहा महिन्यांच्या या शाळेनंतर हीच मुले शिक्षक अन् पोलिस बनण्यासारखी नवी स्वप्न मांडायला शिकत आहेत. त्यांच्यातील हा सकारात्मक बदलच सेवाकार्य विस्तारण्याची प्रेरणा देऊन जातो, असा अनुभव 'युवान'चे शिलेदार 'मटा' शी बोलताना सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएसआर फंडातून अनाथालयांना करा मदत

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कंपन्यांचे सामाजिक दायित्व अर्थात सीएसआर फंडातून औद्योगिक जगताने बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योगांनी बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत असलेल्या अनाथालयांना मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बालगृह चालक संघाचे कार्याध्यक्ष रवींद्रकुमार जाधव यांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने २५ स्वयंसेवी बालगृहे कार्यरत आहेत. यात सुमारे दोन हजारावर अनाथ, निराधार व काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके निवासी स्वरूपात राहतात. या संस्थांना शासन प्रतिदिन प्रती बालक अवघे २१ रुपये पोषण अनुदान देते. गत दोन वर्षांपासून अनुदानही मिळाले नसल्याने ही बालगृहे जर्जर झाली आहेत. उधार-उसणवारीवर गुजराण होत असताना काही ठिकाणी उधारी थकल्याने पुरवठा बंद होऊन बालकांच्या उपासमारीचे संकट बालगृहांच्या डोक्यावर घोंगावत आहे. अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाचा सीएसआरचा आदेश मरनासन्न संस्थांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी उच्च न्यायालयाचा आदेश प्रमाण मानून आपल्या कंपनीच्या सीएसआर फंडातून तत्काळ बालकांच्या संस्थांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन करणारे निवेदन उद्योग मंत्री आणि आयुक्त आयकर विभाग यांना पाठवण्यात आले असल्याचे बालगृह चालक संघाचे कार्याध्यक्ष रवींद्रकुमार जाधव, उपाध्यक्ष संजय एच. गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्यातील उद्योगांनी कमकुवत संस्थाची यादी मिळविण्यासाठी ९६५७२५६१७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टंचाई आढावा बैठकीत खडाजंगी

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील पाणी व चाराटंचाईसह महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांसदर्भात येवला पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठक खडाजंगी झाली. पाणी टँकर सुरू करण्यासंदर्भात पंचायत समितीकडे तालुक्यातील किती गावांचे प्रस्ताव आले आहेत, यावर विचारणा करताना गटविकास अधिकारी व संबंधित प्रमुखांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी चांगलेच सुनावले.

येवला प्रांताधिकारी वासंती माळी यांच्या अध्यक्षतेखाली येवला पंचायत समितीच्या सभागृहात झालेली येवला तालुक्याची टंचाई आढावा बैठक लक्षवेधी ठरली. या आढावा बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न चांगलाच गाजला. तालुक्यातील किती गावांना पाणी टँकर सुरू आहेत, किती गावांकडून पाणीटँकर सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव आले आहेत, असा प्रश्न पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी प्रशासनाला केला. त्यावर गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी सहा गावांचे तर खातेप्रमुखांनी १७ गावे अशी विसंगत उत्तरे दिली. टंचाईग्रस्त गावांची पाहणी करण्याची जबाबदारी कुणाची असते असे विचारल्यावर तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांची सामूहिक जबाबदारी असते असे उत्तर गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. मग, आपण का पाहणी केली नाही, असा सवाल पवार यांनी करीत प्रशासनाला कोंडीत पकडले.

पालखेड डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावे वगळता तालुक्यातील उर्वरित ४४ गावांच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना आवश्यकता असताना या गावांना क्रीटीकल झोनमध्ये भूजल सर्वेक्षण कार्यालयाने टाकले. याबाबत ठराव करण्याची मागणी संभाजी पवार यांनी केली. मात्र, प्रांताधिकारी वासंती माळी यांनी आपणाला याबाबत ठराव करण्याचा अधिकार नसून, तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे स्पष्ट केले.

आढावा बैठकीत प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी मिळालेली कामे तातडीने सुरू करण्यासह मजुरांचे आधारकार्ड नोंदणी करण्याचे ठरविण्यात आले. २२ डिसेंबरपर्यंत तालुक्यात ज्या गावांमध्ये ग्रामसभा झाल्या अशा ग्रामसभांमध्ये २ हजार ८०१ मजुरांनी कामाची मागणी केली असून, या मजुरांचे नमुना क्रमांक चारमध्ये काम मागणीचे अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी केले. या काम मागणीचे अर्ज तालुकास्तरावरील विविध यंत्रणांना पाठवून कामे सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रांताधिकारी वासंती माळी यांनी दिल्या.

आढावा बैठकीला तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, सभापती प्रकाश वाघ, उपसभापती भारती सोनवणे, माजी सभापती संभाजी पवार, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब गुंड, साईनाथ मोरे, हरिभाऊ जगताप, पोपट आव्हाड, राधिका कळमकर, रतन बोरनारे, शिवांगी पवार, शकुंतला कोंढरे, जयश्री बावचे आदींसह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटकासाठी कौटुंबिक पाठबळ आवश्यक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्याला हवे तसे जगायचे असेल तर कौटुंबिक पाठबळ आवश्यक असते. कुटुंबाची साथ मिळाल्यानेच मी येथपर्यंत येऊ शकलो आहे, बाबा चिटणीसलाही कुटुंबाची साथ मिळाल्याने तो मनासारखी नाटके लिहू शकला, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी केले.

ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश चिटणीस लिखित व अक्षरबंध प्रकाशनातर्फे प्रकाशित अंधारून आलंय, वसा, अपूर्णांक, सेझ आणि सुवाक या पाच पुस्तकांचे प्रकाशन रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून उपेंद्र दाते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बाबाच्या डोक्यात सतत नाटक हा विषय घोळत असतो. नाटकाचे वेड डोक्यात ठेऊन राहणारा हा माणूस आहे, असेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अभिनेते दीपक करंजीकर म्हणाले की, आयुष्यात ज्याला मोर म्हणून नाचता येते तो खरा कलावंत. बाबा चिटणीस याच जातकुळीचा आहे. नाटकाविषयी बोलताना ते म्हणाले की, मी शेक्सपीयरपेक्षा कानेटकरांना मोठा नाटककार मानतो, कारण कानेटकरांकडे नाट्यलेखनाचे तंत्र होते. शेक्सपीयरकडे फक्त ट्रॅजेडी होती व तिचा प्रचंड प्रमाणात प्रचार प्रसार झाला. कानेटकरांचा तितका होऊ शकला नाही.

चंद्रकांत महामिने म्हणाले की, या पाच पुस्तकांचे प्रकाशन म्हणजे पाचामुखी परमेश्वर आपल्याशी बोलतोय असे वाचकाला वाटावे इतके ते स्तुत्य आहे. त्यामुळे अशा आणखी कलाकृती बाबांकडून निर्माण व्हाव्यात व इतर वाङमयप्रकारातले लिखाण प्रकाशकांनी प्रकाशित करावे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी छोटेखानी भाषण केले. याप्रसंगी चारूदत्त दीक्षित व बागेश्रीतर्फे नांदी सादर करण्यात आली. अबोली पंचाक्षरी यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांचे स्वागत अॅड. पदमावती चिटणीस यांनी केले. प्रारंभी मंगेश पाडगावकर व मुरलीधर खैरनार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. वैशाली चिटणीस यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकाचा खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर सातपूर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असताना र‌विवारी अंबड एमआयडीसीतील एका बंद कंपनीत ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. मृताच्या शरीरावर त‌िक्ष्ण हत्याराने वार झाल्याच्या खुणा असून, रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

देवा पावरा असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून, तो शिरपूर धुळे येथील रहिवाशी असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर युवकाचा मृतदेह रविवारी संध्याकाळी सरकारी वेअर हाऊसजवळील स्वरूप स्टील या बंद कंपनीत आढळून आला. घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांच्यासह पोलिस ​अधिकारी घटनास्थळी पोहचले. देवा पावराच्या नातेवाईक अंबड पोलिस स्टेशनमध्ये आले असून, पोलिस त्यांच्याकडे विचारपूस करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात घडणाऱ्या एका पाठोपाठ एक हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, सोश​ल मीडियावर देखील त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी नगरपंचायतीसाठी ८५ टक्के मतदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरीच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी ८५ टक्के शांततेत मतदान झाले असून, ९१ उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद झाले. आज (दि. ११) सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत पहिल्या निवडणुकीत सत्ता कुणाची याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश भोगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. सकाळपासूनच मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. शिवसेनेने ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली होती. माजी आमदार धनराज महाले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी विविध मतदान केंद्रांना भेट दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या यशासाठी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी दिवसभर तळ ठोकत व्यूहरचना आखली.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच शिवसेना-भाजपने आपल्याच पक्षाला बहुमत मिळण्याचा दावा केला असला तरी अपक्षांच्या भाऊ र्दीत मतदारांनी त्यांच्या मनाचा अंदाज कळू दिलेला नाही. त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते अपघातांना ‘वेग’

0
0

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्ते चकाचक झाले. रूंद आणि नव्या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा असताना २०१५ मध्ये २०१४ च्या तुलनेत रस्ता अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसते. गत वर्षात शहरात जीवघेण्या अपघातात २४३ जणांचा मृत्यू झाला. २०१४ च्या तुलनेत यात ६९ ने वाढ झाल्याचे स्पष्ट होते.

नाशिक शहराचे २५९ किलोमीटरचे परीघ असून, त्यात १ हजार ९०० किलोमीटरच्या रस्त्यांचे जाळे पसरले आहे. साधारणतः १८ ते १९ लाख शहराची लोकसंख्या असून, तेवढ्याच प्रमाणात शहरात वाहनांची दररोजी वर्दळ असते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने गत वर्षात शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आले. नवीन रस्त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. २०१४ मध्ये रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. मे २०१५ पर्यंत रस्त्याचे कामे पूर्ण झाली. रूंद रस्त्यांमुळे वाहनांना मोकळी जागा उपलब्ध होऊन अपघाताची संख्या घटणे अपेक्ष‌ित होते. मात्र, येथे वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये शहरात जीवघेण्या अपघातांच्या संख्येत लक्षण‌ीय वाढ झाल्याचे दिसते.

२०१४ मध्ये शहरात सर्व प्रकारचे ५४९ अपघात झाले. त्यात जीवघेण्या अपघातांची संख्या १६८ इतकी होती तर या अपघातांमध्ये १७४ जणांना आपला जीव गमवावा लागला. ४४६ वाहनस्वारांना गंभीर दुखापत झाली. २०१५ मध्ये सर्व प्रकारच्या अपघातांची संख्या ६१८ वर पोहचली. यात जीवघेण्या अपघातांची संख्या २९९ इतकी राहिली तर या अपघातात २४३ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले. एकंदरीत जीवघेण्या अपघाताच्या संख्येत ६१ इतकी वाढ झाली तर २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत ६९ इतकी​ वाढ झाल्याचे दिसते.

जिल्ह्यात यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. २०१५ मध्ये ग्रामीण भागात एकूण १ हजार ६७२ अपघात झाले. यातील ७२२ जीवघेणे अपघातात तब्बल ७८९ जणांना प्राणास मुकावे लागले. रस्त्यांची परिस्थिती सुधारली तरी वाहन चालकांचे नियमाकडे होणारे दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरते, असे दावा पोलिस सूत्रांनी केला. हायवे आणि अतंर्गत रस्त्यांवर वाहन चालवताना योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्यातच रस्त्याच्या मधोमध असलेली झाडे व इतर अडथळे अपघातांच्या वाढत्या संख्येला हातभार लावत असून, भरधाव वेग हे वाढत्या अपघातामागचे महत्त्वाचे कारण असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

२०१२-२०१३-२०१४-२०१५-एकूण

अपघात- ६०८ -६०५-५४९-६१८- दोन हजार ३८०

जीवघेणे अपघात- १६५-१२६-१६८-२२९- ६८८

मृत्युमुखी- १७५-१३०-१७४-२४३-७२२

जखमी- ५५६-५७२-४४६-३९९-एक हजार ९७३

शहरात दरवर्षी १० ते १५ हजार नवीन वाहनांची भर पडते. तसेच, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जात नाही. भरधाव वेगात अपघात झाला की मृत्युमुखी पडण्याची शक्यता तितकी वाढते. आजपासूनच आमचा वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू झाला असून युवकांचे प्रामुख्याने याच विषयावर आम्ही प्रबोधन करणार आहोत.

एम. एम. बागवान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल ताशा स्पर्धेत ‘विघ्नहरण’ प्रथम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मी मुलुंडकर सांस्कृतिक कार्य प्रतिष्ठान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ढोल ताशा स्पर्धेत विघ्नहरण संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक माऊली आणि तालरुद्र यांना विभागून देण्यात आला.

जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला होता. गोदाघाटावरील यशवंतराव देव मामलेदार पटांगणावर राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत साक्षी, तालरुद्र, माऊली प्रतिष्ठान, विघ्नहर, शिवतांडव, आणि वरद विनायक असे सहा संघ सहभागी झाले होते. या सहा संघातून अंतिमसाठी तीन संघ निवडले गेले. अंतिमसाठी एकूण सात विभागातून चौदा संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धा विभागीय (प्राथमिक) व राज्यस्तरीय (अंतिम) अशा दोन टप्प्यात होईल.अंतिमफेरी २१ जानेवारी रोजी रायगड महोत्सवाच्या सांगता समारोहाच्यावेळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे.प्राथमिक फेरीत प्रत्येक महसुली विभागातून दोन संघांची (प्रथम व द्वितीय) अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार होती मात्र, नाशिकमधून अंतिम स्पर्धेत तीन संघ सहभागी होणार आहेत. प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय संघांना अनुक्रम २५ हजार, १५ हजार रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याधिकारीविना अडला विकासाचा गाडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण ग्रामपालिकेचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले पण, अजूनपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नसल्याने विकासकामांना चालना मिळू शकलेली नाही. जनतेच्या समस्याही सुटू शकलेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने नगर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे मुख्याधिकाऱ्यांची कायमस्वरुपी नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

कळवणकरांचे नगरपंचायतचे स्वप्न पूर्ण झाले. पहिल्या नगराध्यक्षा म्हणून सुनीता पगार तर उपनगराध्यक्षपदी अनिता महाजन यांची निवड झाली. मात्र, कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा लागली आहे. मुख्याधिकारीविना कळवणच्या विकासाचा आणि जनतेच्या समस्यांचा गाडा अडला असून, नगरपंचायत नको रे बाबा, आपली ग्रामपंचायत बरी होती असे म्हणण्याची वेळ आता कळवणकरांवर आली आहे.

कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी शिवसेना व छावा क्रांतिवीर सेनेने यापूर्वी अनोखे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. नगरपंचायतचा कारभार पाहण्यासाठी शासननियुक्त अधिकारी वर्ग दाखल न झाल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व नगरसेवकांना जनतेला तोंड देताना नाकीनव येत आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने कुठलेही निर्णय घेता येत नाहीत. कळवणकर जनतेला बांधकाम परवानगी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. नाशिक येथील नगररचना विभागाकडून परवानगी आणण्याची सक्ती झाल्याने अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे. मुख्याधिकारी, लेखाधिकारी, अभियंता, आरोग्य विभाग आदी महत्त्वपूर्ण विभागाची यंत्रणा शासनाने तत्काळ नियुक्त करण्याची गरज असताना शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.शासनाने नगरपंचायतसाठी असलेल्या पदसंख्येला तत्काळ मंजुरी देऊन कायमस्वरूपी यंत्रणेची नियुक्ती करावी, अशी मागणी कळवणकर करीत आहेत. कळवण शहरातील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असलेली यंत्रणा कार्यान्वित असली तरी तिची अंमलबजावणी करणारी शासननियुक्त यंत्रणा कार्यान्वित नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

शहरातील वीज, पाणीपुरवठा व इतर महत्त्वाची कामे वेळेवर होत नसल्याने नगरपंचायत काय कामाची असा प्रश्न पडला आहे. सरकारने मुख्याधिकाऱ्यांसह इतर पदे लवकर भरून विकासकामांना गती द्यावी.

- दिनेश बस्ते, बसपा, शहराध्यक्ष

नगरपंचायत झाल्यामुळे विकासाची संधी चालून आली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून कळवण शहराचा सर्वांगिण विकास करण्याचे स्वप्न आहे. यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी, लेखाधिकारी, अभियंता आदी महत्त्वपूर्ण पदांची नेमणूक होणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.

- सुनीता पगार, नगराध्यक्षा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणखी दोघांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तडीपार अर्जुन महेश आव्हाड आणि सराईत गुन्हेगार निखिल विलास गवळी यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी प्रकाश लोंढे ग्रुपच्या फरार दोघा सदस्यांना पाथर्डी फाटा येथे अटक केली. आव्हाड आणि गवळीच्या खुनामागे आर्थिक कारण होते, अशी चर्चा सध्या सुरू असून सातपूर पोलिसांच्या भूमिकेविषयीही प्रश्न​चिन्ह उप‌स्थित केले जात आहेत.

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आव्हाड आणि गवळी खून प्रकरणात पीएल ग्रुपच्या प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार, सनी ऊर्फ ललित अशोक विठ्ठलकर आणि निखिल मधुकर निकुंभ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करीत शनिवारी विठ्ठलकर आणि निकुंभला अटक केली. या दोघांना रविवारी कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, हा खून सातपूर परिसरातील जगतापवाडी येथील पीएल ग्रुपच्या कार्यालयात झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

धन्वतरी कॉलेजसमोर राहणाऱ्या प्रिन्स चित्रसेन सिंग (वय २६) या संशयिताने ३१ डिसेंबर रोजी दोघा मृतांवर गोळ्या झाडल्याचे समोर आले असून, पोलिसांनी हालचाली सुरू करताच सिंग आणि दत्तनगर येथील वतन पवार (वय २७) फरार झाले होते. मुंबईच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सिंग व पवारला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाथर्डी फाटा येथून

रविवारी दुपारी शिताफीने अटक केली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेला प्रिंन्स सिंग हा सावकारी व पैसे वसूल करण्याचे काम करतो. तर, वतन पवार यांचे गोंदे एमआयडीसीत पावडर कोटिंगचे वर्कशॉप आहे. सहा कामगार हाताखाली असलेला पवार गुन्हेगारी मार्गावर कसा पोहचला, याचा तपास पोलिस करीत आहेत.

आर्थिक किनार

प्रिन्स सिंगच्या वाढदिवस पार्टीचे ३१ डिसेंबर रोजी आयोजन वैतारणा डॅम परिसरातील हॉटेल पिकनिक पॉइंट येथे करण्यात आले होते. तेथ मृत आणि संशयितांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर दोघांची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्‍न झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात, आव्हाड आणि गवळीसोबत झालेल्या आर्थिक व्यवहारातून हे हत्याकांड झाल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. या दोघांकडे कोठूनतरी एक ते दीड किलो वजनाचे सोने आले होते. हे सोने विकण्यासाठी त्यांनी सातपूर परिसरातील एका तथाकथित पुढाऱ्याकडे संपर्क साधला. मात्र, हा व्यवहार झाला नाही. नंतर पीएल ग्रुपच्या काही सदस्यांनी त्या सोन्याचा व्यवहार केला. मात्र, पैशांच्या देवाण-घेवाणीतून वाद उद्भवला आणि या दोघांची हत्या झाल्याचा संशय आहे.

सातपूर पोलिसांचे चाललेय काय?

सातपूर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कार्यालयात बंदूक चालली. विशेष म्हणजे यात एक तडीपार व फरार संशयित आरोपी मारले गेले. या घटनेतून सातपूर पोलिसांची कामगिरी काय ते उघडकीस आली असल्याची चर्चा सुरू आहे. अनेकदा सातपूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी पीएल ग्रुपच्या कार्यालयावर जाताना दिसतात. त्यांना मृत आव्हाड किंवा गवळी तसेच इतर सराईत गुन्हेगार कधीच नजरेस कसे पडले नाही, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय हे छोटेमोठे गुंड मोकाट फिरत नसल्याचे सिध्द होत असून, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ए फॉर अॅपल ऐवजी ए फॉर अॅन्टेना !

0
0

खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक अगदी लहान वयातच मुलांच्या हाती अँड्राईड स्मार्ट मोबाइल फोन येऊन डिजिटल जगाशी ते आपोआप जोडले जात आहेत. अगदी नर्सरीत प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांना संगणकीय प्रणालीची ओळख मिळावी व ती सुलभरित्या आत्मसात व्हावी, यासाठी आता इंग्रजी वर्णमालेचे स्वरूपच बदलले जात असून, या वर्णमालेतील अक्षरांची ओळख आता बदलली जात असल्याचे पहायला ‌मिळत आहे.

वर्णमालेतील ओळख ए फॉर अॅपल ऐवजी एअरटेल, अॅन्टेना, अँड्राईड असे धडे देण्यासाठी शैक्षणिक चार्ट तयार करून ते शाळांना पुरवठा करण्याचे काम खासगी प्रकाशकांनी हाती घेतले आहे. डिजिटल युगातील इंग्रजी वर्णमालेतील बललत्या स्वरूपातील हे वर्णमालेतील अक्षरांचा चार्ट बाजारात आणला आहे.

यात प्रचलित ए फॉर अॅपलला हद्दपार करत ते आता एअरटेल झाले आहे. बी फॉर बेबी, बॉल, बॅट या प्रचलित शब्दांच्या ऐवजी बी फॉर ब्राउजर झाले तर सी फॉर कॅट नव्हे तर चॅट होऊन डि फॉर डॉग ऐवजी डाउनलोड झाले आहे.

अर्थातच डिजिटल युगाची ओळख इंग्रजी वर्णमालेच्या बदलत्या स्वरूपात करुन दिली जात आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये अंध संघटनेची निवडणूक ठरली लक्षवेधी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

निवडणुकीची धामधूम, उत्साह, गैरप्रकार ही काही नावीन्याची गोष्ट राहिलेली नाही. मात्र, रविवारी मनमाड येथे झालेल्या एका निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधले. डोळसपणे व शिस्तबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरे कसे जायचे याचा एक सहज, सुंदर वस्तुपाठ ही या निवडणुकीने घालून दिला. ही निवडणूक होती राष्ट्रीय पातळीवरील अंध संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीची. मतदार होते उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील अंध बांधव.

नॅशनल ब्लाइंड ऑर्गोनायझेशनच्‍या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठीची नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी मनमाड येथे रविवारी निवडणुका तसेच संघटनेचे दोन दिवसीय अधिवेशन झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत ब्रेल लिपीचा वापर करण्यात आला. मनमाडच्या हिरुभाऊ गवळी मंगल कार्यालयात अतिशय उत्साहात ही निवडणूक झाली. सुमारे १८३ अंध मतदारांनी ब्रेल लिपित मतदानाचा हक्क बजावला. आठरा जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात होते. तसेच, निवडणुकीसाठी तीन पॅनल होते.

ब्रेल लिपित मतपत्रिका असल्याने ती स्थानिक संयोजन समिती व निवडणुकीचा माहोल पाहण्यास आलेल्या सर्वासाठी उत्सुकतेची बाब ठरली. उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या १८३ अंध मतदारांनी मतदान केले. त्यात १३ मते बाद ठरली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. कल्पेश बेदमुथा, अंकुश जोशी यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्यासह रघुनाथ बारड, प्रवीण हेगडे, वसंत पाटकर या संघटना पदाधिकाऱ्यांनी यशस्वी संयोजन केले. नितीन पांडे यांनी मतमोजणी नंतर निकाल जाहीर केला. अंध असतानाही सहकार्य, शिस्त, परस्पर आपुलकी यांचे देखणे दर्शन घडविले. उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते वसंत गवळी यांचे अंध संघटना निवडणूक व अधिवेशनाला विशेष सहकार्य लाभले.

ब्रेल लिपी येत नसताना अंध संघटनेच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणे हे मोठे आव्हान होते. पण, मतमोजणीच्या दृष्टीने ब्रेल लिपीबरोबर देवनागरीचीही व्यवस्था असल्याने ते शक्य झाले. पोलिस बंदोबस्ताशिवाय आणि गोंधळ व वादविवादाशिवाय एखादी निवडणूक पार पडते हा एक मोठा अनुभव पदरी पडला.

- नितीन पांडे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेलतगव्हाण परिसरातील पांगिरेमळा येथे राहणाऱ्या प्राची जयराम पांगिरे (वय १५) या अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्राचीने शनिवारी संध्याकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास गळफास घेतला. ही माहिती कुटुंबीयांना समजताच त्यांनी तिला उपचारासाठी सिव्हिल हॉ​स्पिटलमध्ये आणले. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जखमी मुलीचा मृत्यू

स्टोव्हचा भडका उडाल्याने गंभीर भाजलेल्या पूजा दिलीप पागे (वय १६) या मुलीचा मृत्यू झाला. पेठरोडवरील शंकरनगर येथे राहणारी पूजा शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका होऊन गंभीररीत्या भाजली होती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महिला डॉक्टरचा विनयभंग

कॉलेजरोडवरून पायी जाणाऱ्या महिला डॉक्टरचा विनयभंग करण्यात आला. शनिवारी ही घटना घडली असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. द्वारका येथील महिला डॉक्टर कॉलेजरोडवरील अहिरराव फोटो स्टुडिओजवळून पायी जात असताना इनोव्हा कारमधील (एमएच १५ बीटी ४४) चार संशयितांनी त्यांचा पाठलाग केला. चौघांनीही महिलेकडे पाहत अश्‍लिल भाषा वापरली. तसेच, तिचा हात पकडून विनयभंग केला. घटनेनंतर चौघेही संशयित फरार झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सरकारवाडा पोलिसांनी गोरेवाडी येथील किरण आर. गाडे (वय २७) आणि नेहरूनगर परिसरातील लक्ष्मण भीमा पारिया (वय १९) यांना अटक केली.

पत्नीला मारण्याचा प्रयत्न

घरगुती भांडणाच्या वादात पतीने पत्नीच्या अंगावर डिजेल टाकून पेटवून दिले. गंभीररित्या जखमी झालेल्या रमा राष्ट्रपाल धाबो यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पांडवलेणी परिसरात राहणाऱ्या रमाचे पती राष्ट्रपालसोबत गुरुवारी रात्रीच्या सुमारास भांडण झाले. यानंतर राष्ट्रपालने रमाच्या अंगावर डिजेल ओतून पेटवून दिले. या प्रकरणी वसंता गोविंद बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी संशयित राष्ट्रपालविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित राष्ट्रपालला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रप्रदर्शनाने घातली कलाप्रेमींनी भुरळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सलग तीस तासाहून अधिक काळ मेहनत घेऊन काढलेले रांगोळीतील व्यक्तिचित्र असो किंवा कॅमेऱ्याच्या एका क्लिक सरशी टिपलेले आणि पाहणाऱ्याला थक्क करणारी छायाचित्र... कुंचल्यातून कागदावर रेखाटलेली निसर्गचित्र एकाच ठिकाणी पहायला मिळणे तसे दुर्मीळच. पण, रेझिंग डेच्या निमित्ताने मालेगावात आयोजित चित्रप्रदर्शनात या तीन वेगवेगळ्या प्रकारातील कलाकृतींचा आनंद मालेगावकरांना घेता आला.

शहरातील तरूण कलाकारांच्या कला आविष्काराला पाहताना मालेगावतील कलाप्रेमी मंत्रमुग्ध झाले. मालेगाव पोलिस प्रशासनाच्या वतीने रेझिंग डेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक सुनील

कडासने यांच्या संकल्पनेतून चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले. शहरातील सागर पवार, पाटनकर, वाईद सर, प्रमोद बेडेकर यांच्या या कुंचल्यातून साकारलेली निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, वस्तुचित्र, अमूर्त चित्रांनी बघणाऱ्यांना खेळवून ठेवले. मालेगाव शहरातील भुईकोट किल्ला, मोसम पूल, गाळाने किल्ला या चित्रांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. छायाचित्रकार मुकुंद थोरात यांनी आपल्याच आजूबाजूच्या सामाजिक वास्तव्यावर प्रकाशझोत टाकणारी, निसर्गाचे अनोखे आविष्कार टिपणारी आणि सामाजिक भाष्य करणाऱ्या छायाचित्रांना कवी कमलाकर देसले यांच्या कवितांची मिळालेली जोड देखील या प्रदर्शनात रसिकांची दाद मिळवून गेली.

प्रमोद आर्वी यांचे रांगोळी रेखाटन विशेष आकर्षण ठरले. शहारच्या संस्कृतिक जडण घडणीत अप्पर पोलिस अधीक्षक कडासने यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कारकीर्दीचा आढावा घेणारे रांगोळी रेखाटन त्यांनी केले. तीस तासापेक्षा अधिक काळ या रांगोळी रेखाटणासाठी त्यांनी मेहनत घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images