Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शाळा प्रवेशासाठी तीन वर्षाची अट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नर्सरी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या वयाची अट २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून निश्चित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वय ३१ जुलैपर्यंत ३ वर्षे पूर्ण आहे त्यांनाच नर्सरीत प्रवेश दिले जातील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या वतीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, सर्व मंडळांशी संलंग्न असलेल्या शाळांना लागू असणार आहे. नर्सरीत प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत ३ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षात त्या विद्यार्थ्याला इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे.

तसेच इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्याचे वय ५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. २०१७-१८ साली ५ वर्षे व ४ महिने, २०१८-१९ साली ५ वर्षे ८ महिने तर २०१९-२० साली पहिली प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण असण्याचे निकष या निर्णयात लावण्यात आले आहे. गेल्या वर्षी आरटीईनुसार ६ वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीत प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे शिक्षकांनी आंदोलनेही केली होती. त्यामुळे मागील शासन निर्णयात दुरूस्ती करून सुधारित निर्णय जारी करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत निर्णय निष्प्रभ?

प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्यावतीने हे परिपत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत नर्सरीचे प्रवेश हे नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच झाले आहेत. त्यामुळे या निर्णयाचे अवलंबन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात कितपत होईल, असा प्रश्न शिक्षकांतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणांच्या टोळक्याची कॉलेजरोडला हाणामारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॉलेजरोडला तरुणांच्या दोन गटामध्ये सोमवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान तुफान हाणामारी झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी यांच्यामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कॉलेजरोडवरील डिसुझा कॉलनीमध्ये तरुणांच्या दोन गटामध्ये बाचाबाची झाली. एकमेकांना शिवीगाळ करणारी तरुण मंडळी नंतर हाणामारीवर उतरली. कमरेचे बेल्ट काढून दोन तरुणांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. या वादात अन्य तरुणांनी देखील तत्काळ सहभाग घेतला. काही तरुणांनी हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर एका तरुणाला पाच ते सात जणाच्या टोळक्याने बेदम चोप दिला.

हाणामारी सुरू असल्याची माहिती मॉडेल कॉलनी पोलिस चौकीला कळविण्यात आली. पोलिस येत असल्याचे कळताच एक गट कारमध्ये बसून फरार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाला सापडला मुहूर्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गतवर्षाच्या अखेरीस मोठा गाजवजा करीत मालेगाव मनपा प्रशासनाने अवैध नळजोडणी धारकांवर कठोर कारवाईसाठी दोन तारखेला प्रारंभ करणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र या कारवाईसाठी आता पालिकेला तीन दिवस विलंबाने का होईना अखेर मुहूर्त सापडला आहे. आजपासून (५ जानेवारी) चार प्रभागात ही कारवाई सुरू केली जाणार आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे.

शहरात पाणीप्रश्न गंभीर झालेला असताना दुसरीकडे मात्र अवैध नळजोडणी घेऊन सर्रास पाणी चोरी केली जात असल्याचे मनपातर्फे करण्यात आलेल्या एका खासगी संस्थेच्या पाहणीदरम्यान निदर्शनास आले. याबाबत अनेक नगरसेवकांनी वारंवार महासभेत देखील आवाज उठवला होता. महासभेत पाणी चोरी करणाऱ्या अवैध नळ जोडणीधारकांवर कठोर कारवाई करण्याचा ठराव देखील संमत केला आहे. तसेच, अवैध नळजोडणी करणाऱ्यांनी नळजोडणी अधिकृत करून घ्यावी यसाठी तीनवेळा मुदत देण्यात आली होती मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दोन जानेवारीपासून शहरातील चारही प्रभागात एकाचवेळी पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्त बोर्डे यांनी दिला होता. नव्या वर्षाच्या प्रारंभीच अशी कठोर कारवाई करून शहरवासीयांचा रोष नको म्हणून पालिका प्रशासनाने उदार धोरण स्वीकारत मंगळवारचा मुहूर्त शोधला आहे. याबाबत सोमवारी (दि ४) आयुक्त बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. आता या कारवाईकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

मनपा हद्दीतील नळजोडणी

अनधिकृत नळजोडणी-

११ हजार

महिनाभरात अधिकृत झालेल्या जोडणी - ५५०

मिळालेला महसूल - ३२ लाख

कारवाईनंतर अपेक्षित महसूल-

७ कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातंग समाजाचे धरणे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूरमध्ये मातंग समाजाच्या मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, मातंग समाजाला सर्व स्तरावर आरक्षण द्या, आण्णाभाऊ साठे महामंडळाचा कर्जपुरवठा त्वरित सुरू करा यांसह इतर मागण्यांसाठी नाशिक जिल्हा मातंग समाज कृती निवारण मंडळ समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले.

जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटल्यानुसार मातंग समाजाला आरक्षणाच्या अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी नांदेडच्या लोक स्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा नागपुरात पोहोचला तेव्हा तेथे पोलिसांनी आंदोलकांना अडवून त्यांच्यावर लाठीमार केला. त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली.

या घटनेचा नाशिकमध्ये निषेध करण्यात आला. लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी यावेळी बी. के. जाधव, दिनकर लांडगे, यू. के. आहिरे, अशोक आहिरे, अनिल निरभवने आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहस्थळी चोरट्यांची ‘दिवाळी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाहस्थळी असलेल्या लगबगीचा फायदा घेत चोरट्यांनी तीन ठिकाणी हात साफ करीत लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. यंदाची लग्नसराई सुरू झाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

चोरट्यांनी पंचवटीत दोन तर सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील मंगलकार्यालामधून महिलांचे दागिने ओरबोडून नेले. विवाहस्थळी चोरट्यांनी चोरी करण्याची पहिली घटना श्रध्दा लॉन्स पार्किंगमध्ये घडली. अमृतधाम परिसरातील चंदाई पार्कमध्ये राहणाऱ्या निकिता प्रवीण मुरकुटे (वय २५) हळदीच्या कार्यक्रमासाठी दोन जानेवारी रोजी लॉन्समध्ये आल्या होत्या. रात्री ११ वाजेच्या दरम्यान त्या पार्किंगच्या ठिकाणी पोहचल्या असता तिथे उभ्या असलेल्या चोरट्याने जवळ येऊन काही कळायच्या आत त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाचा राणीहार व मंगळसूत्र तोडले. मुरकुटे यांनी आरडाओरडा केला. मात्र, रस्त्यावर दुचाकीवर थांबलेल्या दुसऱ्या साथिदाराबरोबर त्याने धूम ठोकली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. या घटनेचा तपास सुरू होतो ना होतो तेच तीन जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास राका लॉन्स येथील विवाह समारंभा दरम्यान चोरट्यांनी नववधूच्या १५ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. रंजना अनिल गुंजाळ यांच्याकडे असलेली सोन्याची बॅग चोरट्यांनी हातोहात लंपास केली. या प्रकरणी अभय प्रमोद गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, याच दिवशी रात्रीच्या विवाहासाठी ठाणे येथून आलेल्या लक्ष्मी मधूकर मोरे (वय ४९) या महिलेचे ४८ हजार रुपये किमतीचे दागिने व कागदपत्रे चोरट्यांनी कारमधून चोरी केले. चोपडा लॉन्स येथे विवाह समारंभासाठी आलेल्या मोरे यांनी लॉन्ससमोरील रोडवर त्यांची स्विफ्ट कार पार्क केली होती. चोरट्यांनी साडेसात ते साडेआठ वाजेच्या सुमारास डिक्की अलगद उघडून कारमधील मुद्देमाल लंपास केला.

विवाहस्थळी सुरू असलेल्या लगबगीचा चोरट्यांना फायदा होतो. अशावेळी दागिने अथवा रोख पैसे सांभाळणाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. लॉन्स चालकांनाही सूचना देण्यात येत असल्याचा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काका बंदूक चालते कशी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिस दलाच्यावतीने २ ते ८ जानेवारी या कालावधीत रेझिंग डेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शहरातील सर्व पोलिस स्टेशन, पोलिस मुख्यालय येथे विविध कार्यक्रम होत आहेत. काका बंदूक कशी चालते, अशा विद्यार्थ्यांच्या साध्या प्रश्नांचे पोलिस समाधान करीत आहेत.

रे‌झिंग डे निमित्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोलिस दलाचे काम, कायदे, नियम याविषयी माहिती देण्यावर भर देण्यात आला आहे. उपनगर, आडगाव, सातपूर, अंबड यासह वेगवेगळ्या भागातील शाळांमधील विद्यार्थी पोलिस स्टेशनला भेट देत असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांना कामकाजाची सोप्या भाषेत माहिती देत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांना पोलिसांकडील बंदुकांबाबत विशेष आकर्षण असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जिज्ञासा यानिमित्ताने पूर्ण केली जात आहे. विद्यार्थ्यांना बंदूक कशी चालते, बुलेट म्हणजे काय, बंदुकींचे वेगवेगळे प्रकार याविषयी पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली जात आहे.

या कार्यक्रमाबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, पोलिस जनता परिसवांद, गुन्हे प्रतिबंधक कार्यशाळा, विद्यार्थ्यांना पोलिसांकडील शस्त्र व पोलिसांच्या कामकाजाबद्दल माहिती, वाहतूक नियमांची माहिती देणे आदी कार्यक्रमांचे आयोजन रे‌झिंग डे सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचर्सपासून सावधानी बाळगा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

पत्ता विचारण्याच्या किंवा पाणी पिण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेण्याचे प्रकार शहर परिसरात घडू लागले आहेत. यामुळे महिलांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सटाणा पोलिसांनी केले आहे.

शहर व परिसरात अज्ञात युवक मोटरसायकलवर येऊन महिलांना पत्ता विचारण्याच्या किंवा पाणी पिण्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने ‌हिसकावून पळ काढत आहेत. यामुळे महिलांनी सतर्क रहावे. पोलिस यंत्रणा चोरांच्या शोधात कार्यरत आहेत. पोलिस प्रत्येक ठिकाणी हजर राहू शकत नाही. यामुळे जनतेने सावधानता बाळगावी, अनोळखी व्यक्तींना प्रवेश देवू नये. तसेच त्यांच्या मोटरसायकलीवर बसून जाऊ नये, दुपारच्या वेळी बँकेचा व्यवहार करताना किवा बाहेर जाताना जागृत रहावे, तसेच कॉलनी परिसरात सुरक्षा रक्षक नेमावे, महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, बाहेरगावी जाताना शेजारील व्यक्तींना माहिती द्यावी, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. संपर्कासाठी पत्रकावर पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक नखाते, पोलिस निरीक्षक पी.टी.पाटील व सटाणा पोलिस स्टेशन यांचे दूरध्वनी क्रमांक नमूद करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेटर खूनप्रकरणी संशयितास मालेगावात अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किरकोळ वादातून सहकारी वेटरची हत्या करणाऱ्या उदय भोला भारती (वय ५०) या संशयितास पोलिसांनी मालेगाव जवळील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना अटक केली. भारतीने रविवारी पहाटे आडगाव शिवारातील हॉटेलमध्ये त्याचाच सहकारी अनिल गोपालप्रसाद गुप्ता (वय ३२) याची लाकडी दांडक्याने हत्या केली होती. यानंतर फरार झालेल्या भारतीचा पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी मुंबई-आग्रा हायवेवरील सर्व हॉटेल्समध्ये शोध घेतला. मालेगाव शहरालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये संशयित आरोपी भारती असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अटक केली. पोलिसांना समोर पाहताच भारतीला रडू कोसळल्याचे पोलिसांनी सांगितेल. या घटनेचा तपास पीएसआय तुषार पाटील, एस. एस. होनमाने करीत आहेत.

उपनगरमध्ये घरफोडी

उपनगर परिसरातील आदित्य बंगला येथे राहणाऱ्या धनंजय पंढरीनाथ ढाकणे (वय ३९) यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने सुमारे ८८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ढाकणे ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान गावाला गेले होते. गावाहून परतल्यानंतर घरफोडीची घटना उघडकीस आली. चोरट्याने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, एलसीडी डीव्हीडी, चांदीची नथ असा ऐवज लंपास केला.

युवकाची आत्महत्या

सिडको परिसरातील फुले मार्केट येथे राहणाऱ्या मजहर शब्बीर पठाण (वय ३५) या युवकाने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महिलेची आत्महत्या

पोलिस वसाहतीत राहणाऱ्या मंदाकिनी मधुकर बैरागी (वय ५७) या महिलेने राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. बैरागी यांनी रविवारी दुपारी घरात विषारी औषध सेवन केले. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅमसन कंपनीविरोधात मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कॅलनोव्हा औषध वापरल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी देवेंद्र काजळे, माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. कॅमसन कंपनी बंद करा, अशा आशयाचे फलक घेऊन मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कंपनीवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून बनावट खते व औषधांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे शेतपिकांचे नुकसान होत आहे. कॅमसन कंपनीच्या कॅलनोव्हा या औषधाचा वापर केल्याने द्राक्ष उत्पादकांच्या तयार होत असलेल्या द्राक्ष मालावर काळे ठिपके पडले आहेत. देठ काळे पडू लागले असून, मणी टणक होऊ लागले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी करून कारवाईची मागणी केली होती. मात्र, कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने द्राक्ष उत्पादकांनी सोमवारी निफाड उपबाजार येथून देवेंद्र काजळे, माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.

निफाड तालुक्यातील खेडे, कारसूळ, खडक माळेगाव, रौळस, दिंडोरी तास, गाजरवाडी, नैताळे, आहेरगाव, पालखेड, पाचोरा, लोणवाडी गावांतील द्राक्ष उत्पादकांनी कॅमसन कंपनीकडून भरपाई मिळालीच पाहिजे, बंद करा बंद करा कॅमसन कंपनी बंद करा, द्राक्ष उत्पादकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या.

मोर्चा तहसील कार्यालयासमोर येताच सभेत रूपांतर झाले. कॅमसन कंपनीच्या कॅलनोव्हा औषधामुळे झालेल्या नुकसानीची प्रचलित बाजारभावाने भरपाई मिळावी, कंपनीवर कठोर कारवाई करावी, नुकसानीबाबत शासनाने फौजदारी कारवाई करावी, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता उपोषण, रास्तारोकोसह तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन दिले. मोर्चात ज्ञानेश्वर ताकाटे, संजय थेटे, संजय सुराशे, कैलास शिंदे, प्रकाश पगार, सोमनाथ कुंदे, योगेश शंखपाळ, मच्छिंद्र शिंदे, भिका जाधव आदींसह तालुक्यातील शेकडो नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार सहभागी झाले होते. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, कृषी अधिकारी, पोलिस निरीक्षक आदींना देण्यात आल्या. पोलिस निरीक्षक दिलीप निघोट, उपनिरिक्षक उंबरकर आदींच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅनल निर्मितीसाठी हालचाली गतिमान

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने सर्वच नेते जोरदार तयारीला लागले आहेत.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २१ फेब्रुवारी २०१६ रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे व भाजपा युवा नेते डॉ. अद्वय हिरे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलची निर्मिती केली आहे. या पॅनलच्या माध्यमातून डॉ. अद्वय हिरे हे या उमेदवारी करीत आहेत. ते सोसायटी गटाच्या इतर मागास प्रवर्गामधून गुरुवारी (७ जानेवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजप नेते अद्वय हिरे हे स्वतंत्र पॅनल निर्मिती करून अर्ज दाखल करीत असल्यामुळे या निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढण्याचे संकेत मिळत आहेत. सहकार राज्यमंत्री दादा भुसे आणि बंडूकाका बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पॅनल निवडणूक रिंगणात असेल तर तिकडे काँग्रेस नेते तुषार शेवाळे, प्रसाद हिरे व राष्ट्रवादीचे गुलाबराव चव्हाण, राजेंद्र भोसले यांच्या देखील पॅनल निर्मितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढणार असून, सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगकर्मींना सुखद धक्का

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामगार कल्याण नाट्य स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत वाढ करीत कामगार कल्याण मंडळाने सर्व रंगकर्मींना सुखद धक्का दिला आहे. यात प्रथम ते तृतीयसह सादरीकरण व इतर परितोषिकांच्या रकमेतही वाढ करण्यात आल्याची घोषणा रविवारी करण्यात आली.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागातील ६३ व्या नाट्य महोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली. यावेळी उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात सहायक कल्याण

आयुक्त संजय धुमाळ यांनी वरील घोषणा केली.

गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम व प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी तत्कालिन कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्याकडे सादरीकरणाची रक्कम वाढविण्याची मागणी केली होती. त्यावर कार्यवाही होत सादरीकरण व पारितोषिकांच्या रकमेत वाढ करण्यात आली.

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सात हजाराहून १० हजार, द्वितीय पाच हजाराहून सात हजार तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक तीन हजाराहून पाच हजार करण्यात आले आहे. सादरीकरणासाठी नाट्यसंघाला मागील वर्षापर्यंत चार हजार रुपये देण्यात येत होते आता ती रक्कम पाच हजार करण्यात आली.

यासह उत्कृष्ट नाट्यलेखन, उत्कृष्ट नेपथ्य, संगीत, रंगभूषा अशा सर्वच पारितोषिकांच्या रकमांमध्ये वाढ करण्यात आली. ही वाढ यंदाच्या वर्षापासूनच देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्‍घाटन

नाट्य स्पर्धेचे उद्‍घाटन आमदार सीमा हिरे, नाट्य परिषद अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सहायक कल्याण आयुक्त संजय धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार हिरे म्हणाल्या की, नाटक समाजपरिवर्तनाचे मोठे माध्यम आहे. त्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळते. कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कामगार कल्याणचे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे.

प्रा. रवींद्र कदम म्हणाले की, सादरीकरणाच्या खर्चाची निकड आम्ही मंत्री महोदयांना पटवून दिली होती. त्यानुसार कार्यवाही झाल्याचा आनंद आहे. काम करीत असताना कामगारामधील माणूस जिवंत रहावा यासाठी या स्पर्धा आहेत. त्यामुळे कामगारांच्या जीवनात आनंद फुलविला जाणार आहे.

यावेळी कामगार भूषण पुरस्कारानिमित्ताने नरेंद्र कलंकार व रामचंद्र शिंदे यांचा तसेच नाट्यस्पर्धेसाठी स्वत:च्या खर्चाने स्मृतिचिन्ह तयार करून देणाऱ्या सचिन चौघुले यांचा आमदार हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. भानुदास जाधव यांनी आभार मानले. यावेळी परीक्षक रोहिणी ढवळे, राजेंद्र तिडके व रघुनाथ ठोसर यांचा सत्कार करण्यात आला.

हयवदन नाटकाला पहिला मान

कामगार कल्याण मंडळ नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी गिरीश कर्नाड लिख‌ित 'हयवदन' या नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सोमवारी नाट्य स्पर्धेतील या पहिल्याच प्रयोगाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हे नाटक कामगार कल्याण केंद्र जोशी कॉलनी, जळगावच्या कलाकारांनी सादर केले. भागवत गुरूजींची कथा सुरू असतानाच हयवदन म्हणजे घोड्याचे मुख असलेला एकजण तेथे येऊन या प्रकारातून आपली सुटका करावी यासाठी भागवत यांची मनधरणी करतो. ते त्याला कालीमातेच्या मंदिरात पाठवतात. कथा पुढे सुरू करतात. कथेत देवदत्त व कपिलची मैत्री, देवदत्तचे पद्मिनीवरील प्रेम, तिचे दोन्ही पुरुषांमध्ये हरवणे अशा प्रकारे ही कथा फुलत जाते.

नाटकाचे दिग्दर्शन अमृता भावे यांनी केले. नाटकात हर्षा पाटील, विशाल जाधव, राजीव कुलकर्णी, दीपक भट, मानसी आठवले, सचिन भावसार, श्रावणी जोशी, श्रेयस शुक्ल, श्रध्दा पाटील, निखिल जगताप यांनी भूमिका केल्या. संगीत संयोजन : श्रीप्रसाद भावे, ढोलक : उल्हास ठाकरे, बासरी : संजय सोनवणे, प्रकाश योजना योगेश शुक्ल, नेपथ्य सचिन आढारे, रंगभूषा व वेशभूषा श्रद्धा पाटील, रंगमंच व्यवस्था अक्षय पाटील यांनी सांभाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरच्या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

मुंबई-आग्रा महामार्गावरील एका वळणावर कंटेनरच्या मागचा भाग (बॉक्स) घसरून पडल्याने महामार्गावरील वाहतूक सेवा सोमवारी सकाळी दोन तास विस्कळीत झाली. पर्यायी व्यवस्था म्हणून काही काळ वाहतूक एकेरी करण्यात आली. माणिकखांबच्या जानदेव बाबा मंदिराजवळ ही घटना घडली.

घोटीजवळ माणिकखांब व खंबाळे शिवारात महामार्गावर नाशिकहून-मुंबईकडे जाणारा कंटेनर (एम एच ४६ व ए एफ ९८३३) अडवा झाल्यामुळे तबल दोन तास महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. कंटेनरच्या लांबलचक भाग महामार्गावर घसरून पडल्याने येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर एक बाजूला हलविण्यात आला. यांनतर वाहतूक सुरळीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा दाखल होताच संशयित फरार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नंदिनीनगर येथील जागेच्या वादातून झालेल्या दंगलीनंतर नगरसेवक संजय साबळे यांच्यासह अन्य तिघांविरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा झाल्यानंतर संशयित फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे भारतनगरसह नंदिनीनगरला छावणीचे रूप आले असून, आणखी काही काळ हा बंदोबस्त कायम राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

जागेच्या वादातून रविवारी संध्याकाळी भारतनगर झोपडपट्टीलगत असलेल्या नंदिनीनगर येथे तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी, अस्लम शेख अब्दुल करीम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नगरसेवक संजय साबळे, त्यांचा मुलगा आकाश साबळे, फुलेबाई आ​णि मिनाबाई यांच्यावर दंगल करणे तसेच आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होताच संजय साबळे फरार झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. साबळेसह इतर संशयितांच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून, लवकरच सर्व संशयित जेरबंद होतील, अशी अपेक्षा पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नंदिनीनगर येथे १५ वर्षांपासून राहणाऱ्या सुमारे २० कुटुंबीयांच्या घरावर आकाश साबळे, फुलेबाई यांच्यासह १० ते २० संशयितांनी बुलडोझर फिरवल्याची घटना १ जानेवारी रोजी घडली होती. याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात आकाश साबळे तसेच फुलेबाई यांनी अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र दंगलीसंदर्भात नव्याने गुन्हा दाखल झाल्याने साबळेसह इतर संशयितांना केव्हाही अटक होऊ शकते. वार्ड क्रमांक २८ मधून प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक साबळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत.

भारतनगरमध्ये तणावपूर्ण शांतता

भारतनगर झोपडपट्टीलगत असलेल्या नंदिनीनगरमध्ये रविवारी रात्रीपासून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी सातत्याने भेट देऊन नागरिकांना विश्वास देत असल्याचे चित्र आज दिसून आले. संध्याकाळी पोलिस उपायुक्त एन. अंबिका, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन, प्रकाश सपकाळे यांनी नागरिकांशी चर्चा केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

देहविक्री व्यवसायप्रकरणी तिघांवर गुन्हा

दंगलीदरम्यान स्थानिक नागरिकांनी नंदिनीनगरमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचे केंद्र नागरिकांनी लक्ष्य केले होते. हा अड्डा फुल्याबाई ऊर्फ आक्का ऊर्फ फिलोमन शर्मा चालवत असल्याचे पुरावे नागरिकांनी पोलिसांना दिले. त्यानुसार पीएसआय सरीता अनिल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी फिलोमिना (फुलेबाई) ओमप्रकाश शर्मा, आकाश शर्मा, मिना ऊर्फ सायरा अशा तिघांविरोधात पीटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या ठिकाणाहून १२ मुली तसेच महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांची रवानगी महिला आधार आश्रमात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वसाकाला गतवैभव प्राप्त करून द्या’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कसमादेचा भाग्य विधाता विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना उर्जितावस्थेत आणण्यासाठी कसमादेचे सुपुत्र आहेरद्वयींनी केलेल्या प्रयत्नांचे सोने करणे सभासद व ऊस उत्पादकांच्या हाती आहे. सभासदांनी वसाका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करून गतवैभव प्राप्त करून द्यावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस संजय वाघ शिरसमणीकर यांनी केले आहे.

एकेकाळी सोन्याचा धूर निघणारा हा कारखाना डबघाईस गेला. यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक व कामगारांच्या संसारावर वरवंटा फिरवला. यांचे मोठे दु:ख सर्वांना आहे. मात्र देवळा-चादंवडचे आमदार डॉ. राहुल आहेर व जिल्हा बँकेचे संचालक केदा आहेर यांनी मोठ्या आत्मविश्वासाने हे शिवधनुष्य हाती पेलले आहे. यामुळे वसाका कार्यक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळात वसाका पुन्हा गतवैभवाचे दिवस दाखविण्यासाठी ऊस उत्पादक बांधव, शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करून वसाका समृद्ध करावा, असे आवाहन संजय वाघ शिरसमणीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

ऊसपुरवठा करून कारखान्याचे हित जपा

कळवण : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या स्वमालकीचा आहे. या भावनेतून शेतकऱ्यांनी वसाकाला ऊसपुरवठा करून वसाकाचे हित जोपासावे, असे आवाहन कळवण तालुका काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती अशोक पगार यांनी केले. वसाकाचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक, शेतकरी व सभासदांच्या दौऱ्याप्रसंगी पगार बोलत होते. गेल्या तीन वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या हालअपेष्टा व शेतकऱ्यांच्या भेडसावत असलेल्या मजूर हा प्रश्न सोडवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊसपुरवठा करावा. नवीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

यावर्षी पौषवारीस श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मंदिर विश्वस्त मंडळाने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देत त्यांना उपस्थित राहण्याचे साकडे घातले.

पौष वद्य एकादशीस म्हणजे दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा होत आहे. या यात्रेस देशभरातून सहा ते सात लाख वारकरी भाविक उपस्थिती लावतात. सुमारे चारशे ते पाचशे दिंड्या पायी येत असतात. दशमीच्या मध्यरात्रीला श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान यांची महापूजा असते. त्यानंतर एकादशीच्या पहाटे नगरपालिका शासकीय महापूजा करीत असते.

यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड आणि यांनी व्यक्त केली आहे. चांदीच्या रथाचे लोकार्पण त्र्यंबकेश्वर येथून आषाढवारीस पंढरपूरला श्री संत निवृत्तीनाथांची पालखी जाते. हा रथ चांदीचा असावा म्हणून लोकसहभागातून विश्वत मंडळाने तब्बल सत्तर लाख रुपये किमतीचा चांदीचा रथ तयार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यात आजपासून यात्रोत्सवाला सुरुवात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या १२८ वा पुण्यतिथी सोहळा व यात्रोत्सवास आज (५ जानेवारी) पासून प्रारंभ होत आहे. आरम नदी किनारी भरणाऱ्या या यात्रोत्सवास विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून, करमणुकीच्या साधनांनी जागा व्यापली आहे.

बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, विश्वस्त अध्यक्ष भालचंद्र बागड व कांतीलाल चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होऊन पुण्यतिथी सोहळा व यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. दुपारी ३ वाजता शहरातून देवमामलेदार यांच्या रथमिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या रथाचे पूजन विभागीय पोलिस अधिकारी अशोक नखाते व सटाणा पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या मिरवणुकीमध्ये लेझीम पथक, बॅण्ड पथक, भजनी मंडळी, आदिवासी नृत्य यांचा समावेश आहे. रथ मिरवणूक सालाबादाप्रमाणे मार्गाक्रमण करीत रात्री ११ वा. मंदिरात आरती होऊन रथ मिरवणुकीची सांगता होईल. रात्री ११ ते १ च्या दरम्यान कीर्तन व पुढे नामस्मरण जागरण होणार आहे. ६ ते ९ जानेवारीदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी (दि. ९) दु. २ वाजता आरम नदीकाठी भव्य कुस्ती दंगल होणार आहे. सांयकाळी ६ वाजता दहीकाला व कीर्तनाचे आयोजन केले आहे. यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६ जानेवारीपर्यंत शहर होर्डिंगमुक्त करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील अनधिकृत होर्डिंग २६ जानेवारीपर्यंत काढून टाकण्याचे आदेश हायकोर्टाने महापालिकांना दिला आहे. हायकोर्टाचे आदेश सोमवारी महापालिकेला प्राप्त झाले असून, पालिकेने २६ जानेवारीपर्यंत शहर होर्डिंगमुक्त करण्याची तयारी केली आहे. राजकीय पक्षांना पत्र पाठविण्यासह विभागीय आयुक्तांना तातडीने कारवाई करण्यासाठी आदेशीत करण्यात आले आहे. शहर होर्डिंगमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासह त्या कायमस्वरूपी ठेवण्याचे आदेशही हायकोर्टाने दिल्याने होर्डिंगमुक्त शहर दृष्टीपथास पडण्याची शक्यता आहे.

महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगच्या मुद्द्यावर हायकोर्टात याचिका दाखल असून न्या. ओक यांच्या पीठासमोर त्याची सुनावणी सुरू आहे. होर्डिंगमुळे शहरे बकाल होत असून, ही अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते. त्याची प्रभावी अमंलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे हायकोर्टाने त्याची गंभीर दखल घेत आता २६ जानेवारीची डेडलाईन दिली आहे. राज्य सरकारने महापालिकेला पत्र पाठवून या आदेशाने तातडीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने २६ जानेवारीपूर्वीच

शहर होर्डिंगमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

सोमवारी आदेश प्राप्त होताच, विभागीय अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच महापालिकेने राजकीय पक्षांना पत्र लिहून तातडीने होर्डिंग काढण्याच्या सूचना केल्या आहेत. २६ जानेवारीनंतर शहरात अनधिकृत होर्डिंग्ज दिसल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीसाठी २० कोटींची तरतूद

0
0

संसरी नाका येथे झालेल्या संसरी नाका ते संसरी रेल्वे गेट व संसरी नाका ते डेअरी फार्म (आनंद रोड) पर्यंतच्या रस्ते कामाचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने ६० लाख रुपयांच्या रस्ते कामास सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. माजी खासदार राजाभाऊ गोडसे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून शीतलदास बालानी, एम. आय. खान, संजय भालेराव आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे, विश्वनाथ काळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास नगरसेवक बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, भगवान कटारिया, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, कावेरी कासार, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खडसे वसुलीतच व्यस्त’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक 'राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे हे राज्यातील महसूलातील वसुलीत गुंतल्याने कृषीमंत्रीपद आपल्याकडे असल्याचेही विसरले आहेत.' अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी नाशिकमध्ये केली. त्यांच्या महसूलातील अतिव्यस्ततेमुळे राज्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडला गेल्याची टीकाही त्यांनी केली. विखेंच्या या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

गोदावरी कालव्याच्या पाणीवाटप बैठकीनंतर नाशिकमध्ये पत्रकांराशी बोलतांना विखेंनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. उत्तर महाराष्ट्रातील केळी उत्पादकांना राज्य सरकार अद्याप दिलासा देऊ शकले नाही. केळी उत्पादकांवर आलेल्या संकटाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असून, ते कृषी मंत्र्यांचे अपयश आहे. राज्यातील यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने केळी निर्यातीच्या दृष्टीकोनातूनही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. पण राज्याला स्वतंत्र कृषीमंत्री नाही. कृषीमंत्री असलेले खडसे महसूल मंत्रीही आहेत. ते शेतकऱ्यांवर लक्ष देण्याऐवजी महसूलीच्या वसूलीतच अधिक व्यस्त असल्याने शेतकरी वाऱ्यावर सोडला गेल्याचे त्यांनी सांगीतले.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीशिवाय पर्याय नाही, हे आम्ही वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. सरकार सावकारांचे कर्ज माफ करायला तयार होते; पण शेतकऱ्यांवर असलेले बँकांचे कर्ज माफ होत नाही, हे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्जमाफीचा प्रश्न शासनाने अधिक प्रतिष्ठेचा न करता शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे निकष ठरवून तत्काळ कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही ऑपरेटरच गायब

0
0

नाशिकची जीवनवाहिनी म्हणून गंगापूर धरणाकडे पाहिले जाते. परंतु, गंगापूर धरण परिसरात 'कुणीही या आणि धिंगाणा घाला' अशीच परिस्थिती झाली आहे. गंगापूर धरण परिसराला धोका असल्याचा मुद्दा तत्कालीन आमदार नितिन भोसले यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. याबाबतचा तसा अहवाल देखील पोलिसांनी सरकारकडे दिला होता. यानंतर सरकारने २५ लाख रुपये खर्च करून गंगापूर धरण परिसराला सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. यात १५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गंगापूर धरणाच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसविले होते. मात्र, कॅमेरे ऑपरेट करण्यासाठी कुशल आणि जबाबदार कर्मचारीच उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. सद्यस्थितीत धरणाच्या प्रवेशद्वारावरील चौकीदार कॅमेऱ्याचे फुटेज चेक करतात. यात बहुतांश वेळा कॅमेऱ्यांचे टीव्हीच बंद असल्याचे कर्मचारी सांगतात. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे धरणाच्या चारही बाजूंनी स्पष्टपणे छायांकन होते. मात्र, कॅमेरे टिपत असलेल्या गोष्टी बघण्यासाठी ऑपरेटच नसल्याने सीसीटीव्हीची बसविण्यात आलेली यंत्रणा धुळखात पडून आहे. जलसिंचन विभागाने धरण परिसरात कॅमेऱ्यात पाहून नक्की काय चालले याची माहिती मिळताच पुढील कारवाई करता येणार आहे. परंतु, धरणावरील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनाच धरणाच्या सुरक्षेबाबत काही घेणे देणे नाही का असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी यांनी उपस्थित केला आहे.

अपघातांची वाढती संख्या काही तरुण मंडळी धरणाच्या पाण्याजवळ कार आणि बाईक घेऊन जातात. यातून अनेकदा अपघात होतात. यापूर्वी नाशिकमधील पार्थडी फाटा येथील एका तरुणाची कार बॅकवॉटरज‍वळ गाळ्यात फसली. गाळातून कार काढण्याच्या प्रयत्न सुरू असतांना गाडीने अचानक पेट घेतला होता. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, कार जळाली होती. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत पेटत्या कारवर पाणी आणि माती टाकली. त्यामुळे आग विझली. अशा घटना सीसीटीसव्ही कॅमेऱ्यात टिपल्या जाण्याची शक्यता आहे. अशा घटनांपासून बोध घेत वाहनचालकांना वेळीच अटकाव घातला तर संभाव्य धोके आणि अपघात टळू शकतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images