Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

प्रेमीयुगुलाचा मित्रांनीच केला घात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिनाभरापूर्वी गंगापूर रोडवरून बेपत्ता झालेली अल्पवयीन कॉलेज विद्यार्थिनी शर्वरी फडकेसह तिचा मुंबईतील नालासोपाऱ्याचा मित्र अमन सिंग या दोघांचा अवघ्या लाखभर रुपयांसाठी खून झाल्याचे उघड झाले आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारातील कच नदी परिसरात ३० डिसेंबर रोजी दोघांचे मृतदेह आढळून आले होते.

घरातून फरार झाल्यानंतर हे प्रेमीयुगूल पुणे येथे गेले होते. तेथून ते संगमनेरमध्ये परतले. संशयित आरोपी पंकज सोनवणे आणि अमन सिंग हे चांगले मित्र होते. त्यामुळे घरातून पळाल्यानंतर शर्वरी, अमन आणि पंकज हे एकत्र पुण्याला गेले. अमन व शर्वरीने आपल्याकडील साडेचार लाख रुपये विश्वासाने पंकजकडे सोपवले. या पैशातूनच पंकजने नोव्हेंबर महिन्याअखेरीस नवीकोरी इटॉस कार खरेदी केली. मात्र, पंकजला या दोघा प्रेमीयुगुलाकडून आणखी एक लाख रुपये हवे होते. तो सातत्याने तशी मागणी करीत होता. २९ ते ३० डिसेंबरच्या दरम्यान याच कारणास्तव विजय काचे, राहुल गोतिसे यांना सोबत घेऊन पंकज संगमनेरला पोहचला. तिथे त्यांनी शर्वरीसह अमनला कारमध्ये बरोबर घेतले. आधी घेतलेले पैसे आणि नव्याने होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे तिघा संशयितांचे अमनसोबत वाद होताच आरोपींनी आपल्याकडील चॉपरने दोघांवर वार करून हत्या केली.

यानंतर नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोटा शिवारातील कच नदी परिसरात मृतदेहावर पेट्रोल टाकून तिघांनी धूम ठोकली. संगमनेरहून परतल्यानंतर अंबड परिसरात झालेल्या वाहनजाळपोळीच्या गुन्ह्यात राहुल गोतिसेला अटक करण्यात आली.

चेनने दाखवला मार्ग

मृतदेह आढळून आल्यानंतर संगमनेर पोलिस स्टेशनचे सिनीअर पोलिस इन्सपेक्टर अनिल नलावडे व पीएसआय मुख्तार शेख यांनी तपासाला सुरुवात केली. त्यात, घटनास्थळी एक सोन्याची चेन पोलिसांना सापडली. ही चेन पुण्यातील एका ज्वेलरीशॉप तयार झाल्याची खात्री पटल्यानतंर पोलिसांची एक टीम पुण्याला रवाना झाली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे संशयित आढळून आले. यानंतर पोलिसांनी वेळ न दडवता संशयितांचा पत्ता शोधून त्यांना जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाल कांदा आवकेत येवल्यात भरमसाट वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

काढणीला आलेला लाल कांदा शेतकऱ्यांकडून एकाच वेळी बाजार समित्यांमध्ये दाखल होत असल्याने जिल्ह्यातील बाजार समित्या चांगल्याच गजबजून गेल्या आहेत. गत सप्ताहात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोनही आवारात लाल कांद्याची एकूण एक लाख तीन हजार १३९ क्विंटल इतकी आवक झाली.

येवला बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात मागील आठवड्यात एकूण ६४ हजार ८३३ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. किमान ६००, कमाल १५६१ तर सरासरी १२५० रुपये असा बाजारभाव मिळाला. तर, बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात एकूण ३८ हजार ३०६ क्विंटल लाल कांदा आवक झाली. या आवारात किमान ६००, कमाल १५१६ तर सरासरी १२०० रुपये बाजारभाव मिळाला. लाल कांदा आवकेत दिवसागणिक वाढ होत गेल्याने कांदा बाजारभावात काहीसे उतार देखील गेल्या आठवड्यात पहावयास मिळाले. दरम्यान, देशांतर्गत कांद्याला चांगली मागणी होती, अशी माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना अनुदान

$
0
0

सटाणा : बागलाण तालुक्यातील सुमारे ५१७ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीकरिता सुमारे तीन कोटी ४६ लाख रुपये निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वर्ग करण्यात येणार आहे. ही माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

कांदा साठवणुकीसाठी उत्तमचाळींची निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यात आले. या अनुषंगाने सुमारे ५१७ शेतकऱ्यांनी यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर केले होते. राज्य शासनाकडून वेळोवेळी या प्रस्तांवाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात आला. यामुळे ५१७ शेतकऱ्यांसाठी समारे तीन कोटी ४६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतनगरमध्ये तणावपूर्ण स्थिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागेच्या वादातून रविवारी संध्याकाळच्या सुमारास भारतनगर झोपडपट्टीलगत असलेल्या नंदिनीनगर येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दगडफेकीसह गोळीबार झाल्याचाही आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. या भागात दंगल नियंत्रक पथकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हा जागेचा वाद नेमका काय आहे, हे तपासावे लागेल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सांगितले की, गोळीबार झाल्याची चर्चा सुरू असली तरी अद्यापपर्यंत कोणताही पुरावा समोर आलेला नाही. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे.

आयुक्तांची कबुली

अवैध व्यवसायाचे केंद्र बंद असल्याचे मला सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी केली असता येथे देहविक्री व्यवसाय सुरू असल्याचे दिसते. पोलिस कर्मचारी अशा व्यावसायिकांना पाठीशी घालतात काय? असा प्रश्न उपस्थित केला असता त्याची सविस्तर चौकशी केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

अवैध धंद्याच्या केंद्रावर कारवाई

नंदिनीनगरमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसाया केंद्राला नागरिकांनी लक्ष्य केले. या इमारतीत देहविक्री व्यवसाय सुरू असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. हा अड्डा फुल्याबाई उर्फ आक्का उर्फ फिलोमन शर्मा चालवत असल्याचे पुरावे नागरिकांनी पोलिसांना दिले. या केंद्रावरून पोलिसांनी १० पेक्षा जास्त मुलींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे सखोल चौकशी केली जाईल, असा दावा पोलिस आयुक्तांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगावला वेटरचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दारूच्या नशेत एका वेटरने दुसऱ्या वेटरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आडगाव शिवारात असलेल्या हॉटेलमध्ये रविवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वेटरचे नाव ​अनिल गुप्ता असून, तो आडगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गालगत प्रताप हॉटेलमध्ये कामाला होता. या हॉटेलमध्ये बिहार राज्यातील तरूण कामाला असून, रविवारी पहाटे दोन-अडीचच्या सुमारास हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला पाटणा येथील अनिल गोपाळप्रसाद गुप्ता (वय ३२) व प्रेम खुशीलाल पासवान (वय २६) हे झोपलेले होते.

हॉटेलचे काम संपवून त्यांचा अलाहाबादा येथील एक साथीदार उदय भारती उर्फ बाबा हा दारुच्या नशेमध्ये गुप्ता आणि पासवान झोपले होते त्या रूममध्ये पोहचला. त्याने मागील भांडणांची कुरापत काढून दोघांनाही लाकडी दांडक्याने मारण्यास सुरुवात केली. दांडक्याच्या मारामुळे सावध झालेला पासवान येथून पळण्यात यशस्वी झाला. मात्र, ​अनिल गुप्ताला वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अनिल गुप्ताकडून आपल्याला

कोणताही प्रतिकार होत नसल्याचे पाहून संशयित आरोपी उदय भारतीही फरार झाला असून, प्रेम पासवान याच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पंचनामा करीत पोलिसांनी लाकडी दांडका जप्त केला. फरार उदय भारतीचा शोध सुरू असून, पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, आडगाव पोलिस स्टेशनचे सिनीअर

इन्सपेक्टर अनिल पवार पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘होली वॉटर डिप्लोमसी’ ठरणार दुष्काळात वरदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रात दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फार्मस फर्स्ट संस्थेच्या वतीने होली वॉटर डिप्लोमसी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी वेदमंत्रोच्चारात पवित्र तीर्थाने भरलेला कुंभ राज्याला अर्पण करण्यात आला. या उपक्रमाद्वारे कुंभमेळा पर्वणी काळातील कुशावर्त व रामकुंडातील तीर्थ जमा करुन ते आयएसआय कंपनीद्वारे शुध्द करण्यात आले. हे तीर्थ राज्यातील अती महत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणार असून, या तिर्थाचे महत्त्व ज्याप्रमाणे तुमच्या देवघरात आहे त्या प्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यासाठी मोलाचा आहे, असे आवाहन करण्यात येणार आहे.

प्रत्येक व्यक्तीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, गावागावात बंधारे बांधावेत, शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलावा, गावे दत्तक घ्यावीत, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुंभ मेळ्यातील परमोच्च बिंदू म्हणजे संत महंतांचे गोदावरीतील शाहीस्नान. या शाहीस्नानाने पवित्र झालेल्या गोदावरीच्या पाण्यात स्नान करण्याची आस घेऊन कोट्यवधी भाविक येत असतात. या भाविकांना ज्या प्रमाणे पाण्याचे महत्त्व असते, त्या प्रमाणे शेतकऱ्यांनाही पाण्याचे महत्त्व असते. शेतकऱ्यांचे शिवार जलयुक्त राहिले तर त्यांच्या जगण्याचा कुंभ आनंदाने भरलेला रहातो.

फार्मस फर्स्ट या संस्थेने जो उपक्रम हाती घेतला आहे. तो उपक्रम शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निश्चितच प्रभावी ठरणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी वॉटर डिप्लोमसी उपक्रमात सहभागी होऊन शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी डॉ. राजेश मोरे यांच्यासह मुकूल कानेटकर, अरुण देसाई, राजेंद्र देसाई, किशोर चौधरी, डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मविप्र मॅरेथॉनचा विराट उत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मराठा विद्या प्रसारक समाजाच्यावतीने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय व आठव्या राज्यस्तरीय एमव्हीपी मॅरेथॉनमध्ये बंगळूरू येथील गिरीषचंद्र तिवारी याने ४२. १९५ किलोमीटर गटात प्रथम क्रमांक मिळवला. त्याला आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर नरसिंह यादव याच्या हस्ते रोख एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन कुस्तीगीर नरसिंह यादव याच्याहस्ते ध्वज फडकावून करण्यात आले. त्यानंतर विविध गटांना क्रमवारीने मॅरेथॉनसाठी सोडण्यात आले. यावेळी वरिष्ठांच्या स्पर्धेत कर्नाटकचा गिरीषचंद्र तिवारी याने ४२.१९५ किलोमीटर गटात २ तास २७ मिनिटे व ४ सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. उत्तराखंडचा कमल दर्शन सिंग याने २ तास २७ मिनिटे व ४३ सेकंद वेळ नोंदवून दुसरा क्रमांक मिळवला तर पुण्याच्या किशोर दगडूबा गव्हाणे याने २ तास २८ मिनिटे ३९ सेकंद वेळ नोंदवून तिसरा क्रमांक मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या कमल याला ७५ हजार रुपये देऊन, तर तृतीय क्रमांकावर आलेल्या गव्हाणे याला ५१ हजार रुपये देऊन नरसिंह यादव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

याप्रसंगी नरसिह यादव याने स्पर्धकांचे अभिनंदन केले. मविप्र संस्थेने मॅरेथॉन स्पर्धेसाठी खेळाडूंना चांगले वातावरण व संधी उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा विश्वासही यादव याने व्यक्त केला. याप्रसंगी हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत स्पर्धेचे शानदार उदघाटन झाले. मॅरेथॉन आयोजन समितीच्या अध्यक्षा नीलिमा पवार यांनी 'मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊया अशी घोषणा केली व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अ‍ॅथलेटीक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक विजय बेंगाळे उपस्थित होते. या वर्षापासून दोन गट वाढविण्यात आले होते. एकूण १६ वेगवेगळया गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

साडेतीन हजार स्पर्धक

या स्पर्धेत एकूण ३५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. अर्ध मॅरेथॉन खुल्या पुरूष गटात २१.०९७ किमी मॅरेथॉनमध्ये व अर्ध मॅरेथॉन खुल्या महिला गटात एकूण ३०० स्पर्धेकांनी सहभाग घेतला. या व्यतिरिक्त १३ गटांमध्ये ३२०० स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेसाठी भारतातून उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली तसेच महाराष्ट्रातून, मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, नागपूर, सांगली, कराड, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, रत्नागिरी, अमरावती, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, धुळे, सेनादल, तामिळनाडू, कर्नाटक, व नाशिक जिल्ह्यातून विविध

गटातील खेळाडू सहभागी झाले.

खेळाडूंचा सत्कार

याप्रसंगी नरसिंग यादव याचा सरचिटणीस नीलिमा पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर क्रीडाधिकारी संजय सबनीस, अनिल वाघ, हरिभाऊ ढोली, दुर्गा देवरे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार टाईम्स ऑफ इंडियाचे दीपक ओढेकर यांना देण्यात आला. पाच हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. केटीएचएम कॉलेजमधील कु. लखन रहाडे, कु. कोजागिरी बच्छाव, कु. संदेश चव्हाण, कु. रोषनी मुर्तडक, कु. शंतनु पाटील, कु. ऐश्वर्या गोवर्धने या मविप्र संस्थेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सात लाखांची पारितोषिके

स्पर्धेत विविध १६ गटातील विजयी खेळाडूंना रोख पारितोषिके, आकर्षक ट्रॉफी व मुकूट देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत एकूण ७ लाख १४ हजार ५०० रूपयांची रोख पारितोषिके देण्यात आली.

राष्ट्रीय विकासासाठी खेळा

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर, नरसिंह यादव याने खेळाडूंना मार्गदर्शन केले. तो म्हणाला, की मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धा भरवून शतक महोत्सवी वर्षात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आजपर्यंत मी बघितलेल्या व प्रमुख अथिती म्हणून सहभागी झालेल्या सर्व स्पर्धांच्या तुलनेत ही स्पर्धा भव्यदिव्य स्वरूपाची व मोठ्या संख्येची असून, सर्वोत्तम आहे. संस्थेचा कार्यकर्तृत्वाचा त्यांनी मनापासून गौरव केला. खेळाच्या माध्यमातून भारताचे नाव उज्वल करायला संधी आहे. राष्ट्रीय विकासासाठी खेळाचे महत्त्व मोठे आहे. स्पर्धेत भाग घ्या व आरोग्य उत्तम ठेवा असेही यादव म्हणाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोरांचा आदर्श घेऊनच समाजकार्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करणाऱ्या आजच्या परिस्थितीत फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रेरणादायी मार्गावर चालण्याची गरज आहे. देवदासी या प्रथेचा सामना करीत बालपण खर्ची झाले. पण ही प्रथा बंद करण्यासाठी मी अशाच थोरांचा आदर्श घेऊन समाजासाठी कार्य केले, असे प्रतिपादन कर्नाटकातील धारवाड येथील बंडखोर कवयित्री सुकन्या मारुती यांनी केले.

परशुराम साईखेडकर सभागृहात रविवारी कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार २०१६ चे आयोजन करण्यात आले होते. सुकन्या मारुती यांना यंदाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सोळावे वर्ष होते. रुपये ११ हजार रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. आपले अनुभवकथन करताना सुकन्या म्हणाल्या की, आई-वडिलांच्या नात्याला कायद्याचा आधार नसल्याने एका वेश्येची मुलगी म्हणून बालपणी सातत्याने हिणवले गेले. यामध्ये शिक्षकही पुढे होते. या लोकांना घाबरुन सुरुवातीला मागे फिरले. पण नंतर त्यांच्या विरोधात बंड पुकारले. सडेतोड उत्तरे देऊन उद्धटपणालाच माझ्या संरक्षणाची ढाल बनविली. देवदासी या प्रथेने समाज गांजलेला असताना वडिलांनी मात्र मला खंबीर पाठिंबा दिला. उच्च शिक्षणासाठी प्रेरणा दिली. समाजाने मात्र याला सातत्याने विरोध करुन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी रोवलेल्या समाजकार्याच्या बीजाला आज चांगली पालवी फुटली आहे. गेल्या ५५ वर्षांमध्ये एकही मुलगी देवदासी प्रथेत बांधली गेली नसल्याचे त्यांनी यावेळी अभिमानाने सांगितले.

अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी सुकन्या मारुती यांना आत्मचरित्र लिखाणासाठी आवाहन केले. सुकन्या यांचे आत्मचरित्र वंचितांना, सोशिकांना समाजातील अनाठायी रुढींविषयी लढण्याचे बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी धर्मचिकित्सा करणे आजच्या कालखंडात स्वतःवर गोळ्या घालून घेण्यासाठी आमंत्रण देण्यासारखे असल्याची खंत व्यक्त केली. तसेच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या मार्गावर चालणाऱ्या विचारवंतांना बळ देण्याची गरजही व्यक्त केली. यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, डॉ. हेमलता पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभा खरे यांनी व प्रास्ताविक डॉ. मनिषा जगताप यांनी केले.

शिक्षक पुरस्कार्थी

डॉ. शहा नुरे इ-लाही अमीर

प्रा. सरोज जगताप

प्रा. लता पवार

ज्योती चौधरी

विश्वास वाघमारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोंगी मुखवट्यांवर थिरकणार राजपथ

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

नाशिक : दिल्ली येथे होणाऱ्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा रथ सहभागी होत नसल्याने मराठी कलावंत व मराठी लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, अशातच नाशिकच्या काही आदिवासी तरुणांनी एकत्र येत बसवलेले 'सोंगी मुखवटे' हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या चित्ररथाची कसर भरून काढणार आहे. सांस्कृतिक रथ नसला तरी या लोकनृत्यानेच महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व होणार असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन राजपथ मार्गावरून होते. नौदल, पायदळ व वायुसेना हे वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे, क्षेपणास्त्रे यांच्या समवेत संचलन करतात. या फौजांची मानवंदना भारताचे राष्ट्रपती स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्ये आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठवतात. यात यंदाच्या वर्षी महाराष्ट्राचा चित्ररथही नाही. त्यामुळे तमाम महाराष्ट्राची जनता नाराज होती. राज्य सरकारच्या या नाकर्तेपणावर टिकास्त्र ओढले जात असतानाच नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ढाब्याचा पाडा येथील १६ जणांचा गट संचलनात 'सोंगी मुखवटे' हे लोकनृत्य सादर करून महाराष्ट्राच्या रथाची कसर भरून काढणार आहे.

नागपूर येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे २० पालिका शाळांमधील १५० विद्यार्थ्यांना या नृत्यासाठी तयार कण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्या समवेत नृत्य करण्यासाठी धाब्याचा पाडा येथील या १६ आदिवासी युवकांना पाचारण करण्यात आले. सोंगी मुखवटे हा उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी लोकांचा अतिशय लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. तो प्रामुख्याने होळी आणि चैत्र पौर्णिमा यादिवशी केला जातो.

यावेळी नर्तक मुखवटे धारण करून नृत्य करतात. काही दिवसातच युवकांनी हे नृत्य शिकवले. परंतु, त्यात काही बदल करण्यासाठी मुंबईहून कोरिओग्राफरही बोलाविण्यात आले. त्यात अरविंद राजपूत यांनी थोडे बदल करीत मुलांना नृत्य शिकवले. गेल्या चार महिन्यांपासून या दीडशे मुलांना शिकविणारे हे १६ जण त्यांना सोबत घेऊन नुकतेच दिल्ली येथे रवाना झाले आहेत. त्याठिकाणी वीस दिवस तालीम केल्यानंतर

संचलनामध्ये हे १६६ जण महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात थंडी परतली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात कमी झालेल्या थंडीचा जोर आता पुन्हा वाढू लागला आहे. रविवारी पुन्हा एकदा राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे. रविवारी ८.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका तर रात्री व पहाटे थंडीचा कडाका असा दुहेरी अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीही सतावू लागल्या आहेत.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात थंडीचा कडाका खूपच वाढला होता. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा परिणाम होऊन नाशिकमधील तापमापनातही कमालीची घट झाली होती. सातत्याने तीन ते चार दिवस नाशकात नीचांकी तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक थंडीचे ठिकाण म्हणून निफाड तालुकाही त्यामुळे चर्चेत आला. निफाडमध्ये ५ अंश सेल्सियस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्याचवेळी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तापमानही ५.४ अंशापर्यंत घसरले होते. मात्र, गेल्या रविवारपासून पुन्हा हे तापमान वाढत गेले. ३० डिसेंबरला ११.२. ३१ डिसेंबरला १० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नववर्षाच्या पहिल्या दोन दिवसांतही पारा अनुक्रमे १०. १ आणि १०.४ अंशावर होता. हेच तापमान रविवारी खाली उतरून ८.५ अंश झाले. नाशिक खालोखाल नांदेड येथे किमान तापमान ९.० अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे. पुणे आणि जळगाव १०.२, नागपूर ११.२, गोंदिया १२.८, सातारा १२.९, मालेगावमध्ये १३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रचलित असलेल्या महाबळेश्वरमध्येही किमान तापमान १४ अंशांवर पोहोचले आहे. एकिकडे किमान तापमान कमी होत असताना कमाल तापमान मात्र चांगलेच वाढले आहे. रविवारी जिल्ह्यात कमाल तापमान ३२.९ अंश नोंदविले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतनगरला दोन गटात धुमश्चक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जागेच्या वादातून र‍विवारी संध्याकाळच्या सुमारास भारतनगर झोपडपट्टीलगत असलेल्या नंदिनीनगर येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दगडफेकीसह गोळीबार झाल्याचाही आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. या भागात दंगल नियंत्रक पथकासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

नंदिनीनगरमध्ये १५ वर्षांपासून राहणाऱ्या सुमारे २० कुटुंबियांच्या घरावर आठ ते दहा संशयितांनी बुलडोझर फिरवल्याची घटना १ जानेवारीला घडली होती. यानंतर पीडित झोपडपट्टीवासीयांनी मुंबई नाका पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. घरांचे प्रचंड नुकसान झाल्याने जागेच्या बदल्यात जागा किंवा घराच्या बदल्यात घर देण्याची मागणी नागरिकांनी केली. पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून एकास अटक केली. या प्रकरणी नगरसेवक पुत्र आकाश संजय साबळे याचाही समावेश असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अटकपूर्व जामिनासाठी साबळेने कोर्टात धाव घेतली आहे. हे प्रकरण काहीसे शांत होत असताना आज दुपारी १०० ते दीडशे जणांचा जमाव नंदिनीनगरमध्ये चालून गेला. तक्रार दाखल करता काय, असे म्हणत त्यांनी स्थानिकांना धमकावण्यास सुरूवात केली. यावेळी परिसरातील ५०० ते ८०० नागरिक जमा झाले. त्यांनी समोरच्या गटाला विरोध केल्याने दगडफेक सुरू झाली. कीहू वेळातच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमरधाम परिसर सुविधांपासून उपेक्षित

$
0
0

अमरधाममध्ये मृतदेह जाळण्यासाठी एकूण ९ बेड आहेत. त्यापैकी ६ बेडची दुरवस्था झाली आहे. मृतदेह जाळण्यासाठी असलेल्या जाळ्या तुटलेल्या आहेत. त्यामळे चितेवर ठेवतांना आणि दहन करतांना मृतदेहाची हेळसांड होत असते. अनेक बेडच्या जाळ्या गंजल्या आहेत. अनेक ठिकाणची दिवेही बंद झाले आहेत. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी रोज पाच ते सहा मृतदेह जाळले जातात. मात्र, योग्य व्यवस्था नसल्याने मृतांच्या नातेवाईकांसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मृतदेह जाळल्यानंतर अस्थी गोळा करण्यासाठी देखील त्रास सहन करावा लागतो. अस्थी हातानेच गोळा कराव्या लागतात. तसेच पाण्याचे नळही खराब झालेले आहेत. बेडची दुरुस्ती दूर करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

पंचवटीतील अमरधाममध्ये अनेक सुविधांची कमी आहे. बेड तुटले आहेत त्यामुळे दहनासाठी येणाऱ्या मृतदेहाची हेळसांड होते. पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. - सुनीता पाटील, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरण ‘रामभरोसे’!

$
0
0

गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला टवाळखोरांचा अड्डा नेहमी जमतो. या प्रश्नी जलसिंचन विभागाकडे स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, कोणतीही कारवाई होत नाही. यामध्ये गंगावऱ्हे गावकऱ्यांनी ठराव करून धरणाच्या बॅकवॉटरचा रस्ता बंद केला. मात्र, अनेक ठिकाणी धरण परिसरात जाण्यासाठी रस्ते मोकळे आहेत. सुटीच्या दिवशी टवाळखोरांचे टोळकेच्या टोळके. बॅकवॉटर परिसरात येतात. यात धरणावरील सुरक्षारक्षकच जागवेर नसल्याने टवाळखोर मद्यप्रशसन करून तेथेच दारूच्या बाटल्या फोडतात. पोलिसांकडूनही परिसरात पेट्रोलिंग केले जात नसल्याने या टवाळखोरांचा वावर दिवसेंदिवस वाढला आहे.

अनेकदा गंगापूर धरण परिसरात फेरफटका मारण्यासाठी आलेले तरुण, तरुणी मौज मजा म्हणून पाण्यात उतरतात. यात पाण्याचा अंदाज आला नाही तर अनेकदा तरुणाईला जीव गमावला लागतो. मात्र, या प्रश्नाकडे ना प्रशासन गांभीर्याने बघते ना लोकप्रतिनिधी, असा स्थानिकांचा आरोप आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जलसिंचन मंत्री गिरीश महाजन या प्रश्नाकडे लक्ष कधी घालणार, असा नागरिकांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्री महाजन यांनी गंगापूर धरण परिसरात सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

तैनात कर्मचारी कुठे? गंगापूर धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले अधिकारी व कर्मचारी आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धरणावरील कार्यालयातील एक अधिकारी तब्बल १०० किलोमीटरवरून अपडाऊन करीत असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजतले. अधिकारी व कर्मचारी यांचा धरण परिसरात गस्त नसल्याने टवाळखोरांचे प्रमाण वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गाळाचे साम्राज्य काही वर्षांपूर्वी भुजबळ फाऊंडेशनच्या वतीने गंगापूर धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यात जिल्ह्यातील इतरही धरणातील गाळ काढण्यासाठी अनेक संस्था, संघटना आणि शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, यानंतर धरणातील गाळ काढला न गेला नाही. त्यामुळे धरणातील २३ टक्के भागात गाळ साचला असल्याचे नाव न सांगता अधिकारी व कर्मचारी सांगितले. कश्यपी धरणात गाळचे प्रमाण कमी असतांना त्या ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यात गंगापूर धरणातून गाळ काढण्यास का विलंब केला जात आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

वाहनांचा मुक्त संचार पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गंगापूर धरण परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांचा सर्रासपणे वावर सुरू असतो. धरणाच्या बॅकवॉटरमधील गाळात गाड्या अडकून यापूर्वी अनेकदा अपघात देखील झाले आहेत. तसेच पाथर्डी परिसरातील चारचाकी गाडी या भागात जळण्याचा प्रकार घडला होता. यात जलसिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी केवळ नावालाच आहेत काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला सुटीच्या दिवशी टवाळखोरांची नेहमीच गर्दी असते. याबाबत अनेकदा पोलिस व जलसिंचन विभागाकडे तक्रार केली. मात्र, कोणतीही कारवाई केली जात नाही. - अशोक गोतावणे, रहिवाशी, सावरगाव

गंगापूर धरणातील पाणी पळविल्यावरून राजकारण होतांना दिसते. मात्र, या धरणाच्या सुरक्षेबाबत राजकीय पक्ष एकत्र येतांना दिसत नाही. या प्रश्नी कुणी आवाजही उठवित नाही. - पंडित गायकर, रहिवाशी, गंगावऱ्हे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिवांनाही ‘फिल्डवर्क’ची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईतच बसून यंत्रणेद्वारे कार्यवाही करवून घेणाऱ्या सचिव व तत्सम उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना जिल्हानिहाय क्षेत्रीय दौरा करून सरकारी योजनांचा आढावा घ्यावा लागणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तसेच तिसऱ्या शुक्रवारी आणि शनिवारी हे दौरे केले जाणार आहेत. आपल्या विभागाशी संबंधित शहरी, ग्रामीण कार्यालयांना भेटी देऊन कामकाज आणि योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे त्यानुसार अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यांकन होणार आहे. या निर्णयामुळे सुस्तावलेली यंत्रणा नववर्षात झपाटून कामाला लागल्याचे पहावयास मिळणार आहे.

राज्य सरकार अनेक लोकोपयोगी आणि कल्याणकारी योजना राबवित असले तरी तरी क्षेत्रीय स्तरावर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतेच असे नाही. मंत्रालयात झालेला निर्णय त्या त्या विभागांच्या सचिवांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, महापालिका,जिल्हा परिषद आणि तत्सम प्रशासकीय यंत्रणांपर्यंत पोचतो. त्यानुसार कार्यवाहीचा प्रयत्न होत असला तरी अनेकदा सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचतच नसल्याची ओरड लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांकडून होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांनी क्षेत्रीय दौरा करून एकूणच आपल्या विभागाच्या कामकाजाचा आढावा घ्यावा, असे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागणार आहे. या दौऱ्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना, राज्य सरकारच्या फ्लॅगशीप योजना, विशेष घटक योजना, आदिवासी विकास योजनांच्या भौतिक व आर्थिक प्रगतीसह सर्व सरकारी योजनांचा विस्तृत आढावा अधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. सचिवांना सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागणार आहे. तसेच नागरिक, योजनांचे लाभार्थी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या तक्रारींचे निराकरणही करावे लागणार आहे. विशेष म्हणजे योजनांचा आढावा घेतल्यानंतर अंमलबजावणीचा प्रगती अहवाल मुख्य सचिवांकडे सादर करावा लागणार आहे. योजनांचे स्वरूप आणि अंमलबजावणीत काही सुधारणा करणे आवश्यक असेल तर तसा उल्लेखही अहवालात करावा लागणार आहे.

मंत्रालयातील बैठकांवर नियंत्रण

सचिव आपल्या विभागाशी संबंधित क्षेत्रीय कार्यालये, ग्रामीण व शहरी भागात स्वत: भेटी देऊन सरकारी योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पहाणी करणार आहेत. योजनांना गती देण्यासाठी दौरे उपयुक्त ठरतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. दौऱ्यांमध्ये सातत्य राहावे यासाठी या ठराविक दिवसांमध्ये मंत्रालय स्तरावर शक्यतो बैठका घेऊ नयेत असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.

'बाबूं'च्या कामाचेही होणार मूल्यांकन दौऱ्याच्या निमित्ताने क्षेत्रीय कार्यालयांच्या समस्या सचिवांपर्यंत पोचणार असून सचिव स्तरावरून त्या सोडविणेही शक्य होणार आहे. या दौऱ्यांमध्ये केलेल्या कार्यवाहीच्या अहवालावरून सचिव व तत्सम अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन केले जाणार आहे. ही कार्यवाही जिल्हा पालक सचिवांच्या वार्षिक कार्यमूल्यांकनाचा अहवाल समजण्यात येणार आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या फलनिष्पत्ती क्षेत्राचे (केआरए) मूल्यांकन करतानाही त्याचा विचार होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी सोडण्याबाबत नियोजन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांमध्ये ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवडसह अनेक तालुक्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत काटेकोर नियोजन करावे, असे आदेश सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार, समाज कल्याणच्या सहाय्यक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धरणांमध्ये पाणीसाठा खूपच कमी असल्याने जून, जुलैपर्यंत सर्व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करता येईल, त्‍यावर लक्ष केंद्रित करा अशी सूचना ना. भुसे यांनी केली. यंदा पाऊस कमी झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. त्यातच मराठवाड्याला जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले.

त्यामुळे नाशि‌क शहर आणि जिल्हावासीयांवरच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे. पाण्याचे ऑडिट, प्रत्येक थेंबाचा हिशेब यानुसार एप्रिलनंतरच पिण्यासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होईल की नाही याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. हीच स्थिती जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांचीही आहे. बैठकीत मात्र आगामी धोरणाबाबत कुठलाच निर्णय झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशकात थंडी परतली

$
0
0

शहरात ८.५ अंश नीचांकी तापमानाची नोंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात कमी झालेल्या थंडीचा जोर आता पुन्हा वाढू लागला आहे. रविवारी पुन्हा एकदा राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे. रविवारी ८.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका तर रात्री व पहाटे थंडीचा कडाका असा दुहेरी अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीही सतावू लागल्या आहेत.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात थंडीचा कडाका खूपच वाढला होता. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा परिणाम होऊन नाशिकमधील तापमापनातही कमालीची घट झाली होती. सातत्याने तीन ते चार दिवस नाशकात नीचांकी तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक थंडीचे ठिकाण म्हणून निफाड तालुकाही त्यामुळे चर्चेत आला. निफाडमध्ये ५ अंश सेल्सियस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्याचवेळी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तापमानही ५.४ अंशापर्यंत घसरले होते. मात्र, गेल्या रविवारपासून पुन्हा हे तापमान वाढत गेले. ३० डिसेंबरला ११.२. ३१ डिसेंबरला १० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नववर्षाच्या पहिल्या दोन दिवसांतही पारा अनुक्रमे १०. १ आणि १०.४ अंशावर होता. हेच तापमान रविवारी खाली उतरून ८.५ अंश झाले. नाशिक खालोखाल नांदेड येथे किमान तापमान ९.० अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे. पुणे आणि जळगाव १०.२, नागपूर ११.२, गोंदिया १२.८, सातारा १२.९, मालेगावमध्ये १३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रचलित असलेल्या महाबळेश्वरमध्येही किमान तापमान १४ अंशांवर पोहोचले आहे. एकिकडे किमान तापमान कमी होत असताना कमाल तापमान मात्र चांगलेच वाढले आहे. रविवारी जिल्ह्यात कमाल तापमान ३२.९ अंश नोंदविले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केबलधारक कारवाईला सहा आठवड्यांची स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेटटॉप बॉक्स न बसविणाऱ्या राज्यातील केबल जोडणीधारकांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. राज्यात सेटटॉप बॉक्स उपलब्ध नसल्याने डिजिटलायझेशनला सहा आठवड्यांची स्थगिती देण्याचा महत्त्वूपूर्ण निर्णय सोमवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २८ नागरी वस्त्यांमधील २६ हजार केबल जोडणीधारकांना केबलद्वारे प्रक्षेपित कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.

केबल कराची चोरी रोखण्यासाठी सरकारने डिजिटलायझेशनचा निर्णय घेतला. मेट्रो सिटीज्, महानगरांमध्ये त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर नगरपरिषदांच्या हद्दीत त्यासाठी ३१ डिसेंबर २०१५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. १ जानेवारीपासून तेथे केबलचे प्रक्षेपण बंद करण्यास सुरूवात झाली. मात्र, सेटटॉप बॉक्सच उपलब्ध नसल्याने केबल व्यावसायिकांनी मुदवाढीची मागणी केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या आदेशान्वये शनिवारपासून जिल्ह्यातील मालेगाव, सुरगाणा, सटाणा, नांदगाव, मनमाड, चांदवड, त्र्यंबकेश्वर, भगूर, इगतपुरी, सिन्नर, येवला, पेठ, दिंडोरी व देवळा या नगरपंचायती, तसेच द्याने, सोयगाव, संगमेश्वर, मालधे, देवळाली, सामनगाव, एकलहरे, घोटी, लासलगाव, संसरी या भागांतील काही ठिकाणचे केबल प्रक्षेपण बंद करण्यात आले. नाशिकच्या केबल व्यावसायिक संघटनेने दीड महिन्यांपूर्वी माहिती आणि प्रसारण खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत सेटटॉप बॉक्स उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. संघटनेने केबल कनेक्शन बंद करण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी सुरू केली होती. तेलंगण आणि सिक्कीम राज्याने केंद्राच्या या निर्णयाला स्थगिती दिल्याने हा निर्णय महाराष्ट्राला लागू व्हावा अशी व्यावसा‌यिकांची प्रमुख मागणी होती. हायकोर्टातील खंडपीठाने आज सेटटॉप बॉक्स संबंधीच्या कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे पुढील किमान सहा आठवडे जोडणीधारकांना कारवाईशिवाय केबल प्रक्षेपणाचा आनंद घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत फिरविणार भाकरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत वर्षानुवर्ष एकाच टेबलावर बसून असलेल्या 'बाबूं'ना धक्का देण्याची तयारी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सुरू केली आहे. महापालिकेत भाकरी फिरवण्याची तारीख निश्चित केली असून ११ जानेवारीपर्यंत आपल्या खात्याची व टेबलाची जंत्री एकत्रित ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे या 'बाबूं'चे धाबे दणाणले आहे.

महापालिकेच्या प्रशासन विभागाने सर्व खातेप्रमुखांना एक पत्र जारी केले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. या बदल्यांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सज्ज राहून आपआपल्या विभागाच्या संचिका, साधनसामुग्री याची लिस्ट तयार ठेवण्याचे आदेश दिले आहे. संबंधित टेबलावर दुसरा अधिकारी व कर्मचारी आल्यानंतर त्याला अडचण होवू नये म्हणून ते जसेच्या तसे हस्तांतरित करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. प्रशासन विभागाच्या या आदेशाने खळबळ उडाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कोणत्याही क्षणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदल्यांसाठी तयार राहण्यास सांगितल्याने महापालिकेत आता भाकरी फिरणार अशी चर्चा आहे.

पोलिस ठाण्यास भेट

नाशिकरोड : रेजिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना नाशिकरोड पोलिस ठाण्यातील कामकाज तसेच पोलिसांच्या शस्त्रांची माहिती देण्यात आली. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे, उपनिरीक्षक राकेश शेवाळे, पुनेम केदारे व सहकाऱ्यांनी उपक्रम राबविला. जेलरोड येथील गणेश धात्रक शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक मनीषा वराडे, वैशाली पाटील, महेश पाटील, राहुल सानप, संदीप भदाणे यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समन्यायी पाणीवाटपात सरकारने मध्यस्थी करावी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

राज्यातील समन्यायी पाणीवाटप कायद्याचा हेतू आता कालबाह्य झाला असून राज्य सरकारने या कायद्यातील बदलासाठी मध्यस्थाची भूमिका स्वीकारून यात संशोधन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या कायद्यान्वये शेतीव्यवस्था उध्वस्त होत असून पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहिले आहे. समन्यायीचे वास्तव समोर आले पाहिजे असे सांगत पाण्याबाबत आता कठोर धोरण अवलंबण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोदावरी कालवा पाणीवाटप बैठकीनंतर विखे पाटील म्हणाले, की आता पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्याने शेतीव्यवस्थाच उध्वस्त होत आहे. पाण्याचे संकट आहे. या कायद्यासंदर्भात राजकीय भूमिका घेतली जाते. मराठवाड्या सोबतच सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे. या कायद्यात अनेक त्रुटी आहेत. या कायद्याचा हेतू बदलला आहे. घाईगर्दीत तो मंजूर झाला. परंतु, त्याची आता वेगळ्याच कारणांसाठी अमंलबजावणी केली जाते. त्यामुळे या कायद्यात संशोधन करण्याची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील धरणांची साठवणक्षमता काय आहे हे सुद्धा सरकारने तपासले पाहिजे असे मत त्यांनी मांडले.

हे तर गृहमंत्र्यांचे अपयश

भाजप सरकारचा अजेंडाच वेगळा असून ते स्वत:च धर्माच्या नावाखाली माथी भडकाविण्याच्या कारवायांना छुपा पाठिंबा देत आहेत. इसीसच्या कारवाया सुरू असताना राज्याची गुप्तचर यंत्रणा काय करते? हे राज्याच्या गृहमंत्र्यांचे अपयश असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. सरकार अद्याप डॉ. दाभोलकरांचे मारेकरी शोधू शकलेले नाही. पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयिताला पाठबळ देण्याचे काम सरकारच्या कार्यकाळात सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मांडलेले मुद्दे चुकीचे नाहीत. त्यांनी सत्ताधाऱ्यांविरूद्ध काही विधाने केली म्हणून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी आयटीआय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इतर राज्यांच्या धर्तीवर अनुदान देण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता खात्याने योग्य तो निर्णय घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेतर्फे सोमवारी (दि. ११) आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर राज्यस्तरीय आंदोलन केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील ४१७ खाजगी आयटीआयचे कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणानुसार बारावी तांत्रिक कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाच्या अखत्यारित आणण्यात आले आहे. सरकारकडून विविध कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींना फी मिळणार आहे. परंतु, दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रशिक्षित करणाऱ्या खासगी आयटीआयसाठी कौशल्य विकासांतर्गत आणूनही त्यांना याचा लाभ देण्यात आलेला नाही. आयटीआयची प्रवेशप्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली; मात्र सरकारकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तरी सरकारने कर्नाटक व गुजरात राज्याप्रमाणे वेतन अनुदान लागू करावे, अशी मागणी यावेळी केली जाणार आहे. या आंदोलनाला शिक्षण महामंडळाचा सक्रीय पाठिंबा असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images