Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘गो हत्येमागे विदेशी कंपन्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांनीही गोवंश हत्याबंदी कायदा करणे आवश्यक आहे. गायींची कत्तल कुठला विशिष्ट धर्म करीत नाही. तर, गो हत्येमागे मोठ्या विदेशी कंपन्याचा हात असल्याचा आरोप स्वास्थ्य वैज्ञानिक उत्तम माहेश्वरी यांनी केला. नंदिनी गोशाळेतर्फे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंचगव्य चिकित्सेबाबत मार्गदर्शन केले.

गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुलातील डॉ. कूर्तकोटी सभागृहात गो माता या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दुसरे पुष्प माहेश्वरी यांनी गुंफले. 'काऊथेरपी' म्हणजेच पंचगव्य चिकित्सा. गायीपासून मिळणाऱ्या विविध पदार्थांवर आधारित नवीन चिकित्सापद्धती विकसित झाली असून, तीच पंचगव्य चिकित्सा असल्याचे त्यांनी सांगितले. या चिकित्सा पद्धतीने असाध्य आजारांवर मात मिळविता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्याक्त केला. गायीचे दूध पौष्टिक असण्याबरोबरच तूप, ताक, गोमूत्र, शेण, गायीच्या खुरांखालील माती देखील बहुगुणी आहे. बाजारात मोठ्या कंपन्यांकडून गाईचे तूप विक्री होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिन्नरमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने बुधवारपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे जेसीबीच्या साहायाने काढण्यास सुरुवात करण्यात आली. बुधवारी नाशिकवेस परिसरात ही मोहीम राबविण्यात आली.

नगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये रस्त्यावर, फूटपाथवरील विक्रेत्यांना सूचना देऊन दुकाने काढून घेण्यास सांगण्यात आले. नाशिक वेसमध्ये बसणारे भाजी विक्रेते, रस्त्यात हातगाडे लावून विक्री करणाऱ्यांना तंबी देण्यात येवून, पुन्हा याठिकाणी दुकाने लावल्यास कारवाई करण्याचे सांगण्यात आले. नाशिक वेस येथे नव्याने होत असलेले अतिक्रमित दुकान हटवण्यात आले. तसेच, देवी रोडवर असलेल्या फूटपाथवरील दुकानांचे बोर्ड काढून घेण्यात आली.

सिन्नर शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे असून, यामुळे रस्ता वाहतुकीला अडथळे होत आहेत. नगरपालिकेने सुरू केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, शहरात बोकाळलेली अतिक्रमणे कोणताही दुजाभाव न करता सर्वच अतिक्रमणे काढावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच भागातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरचा पोलिसावर असलेला बंदोबस्तचा भार पाहता एक जानेवारीपासून पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जात असून, एक दोन दिवसात पोलिस बंदोबस्त घेवून शहरात बोकाळलेले अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. यामध्ये रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात येतील. याबाबत नगरपालिकेतर्फे नोटिसा देण्यात आल्या आहेत.

- सुनील शिंदे, अतिक्रमण विभाग प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य खरेदी करा जागरुकपणे

$
0
0

बाजाराचा एक साधा नियम असा की ज्यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर माल येतो त्यावेळी किंमती उतरतात आणि बाजारातली मालाची आवक कमी झाली की किंमती वाढायला लागतात. मालाची आवक कमी झाल्यावर जास्त किंमतीत त्या वस्तू घेण्यापलीकडे सामान्य ग्राहक काहीच करू शकत नाही.
- सीमा देशपांडे
काही दिवसांपूर्वी तूरडाळीचे भाव गगनाला भिडले होते. जी डाळ गेल्या वर्षी किलोला सत्तर रुपयांच्या घरात होती ती दोनशेच्या घरात जाऊन पोहोचली आणि परिस्थितीचे बळी ठरण्यापलीकडे आपण काही करू शकलो नाही. पण ज्या ग्राहकांनी योग्य वेळी वर्षभरासाठीची बेगमी केलेली होती त्यांना काहीसा दिलासा मिळाला. म्हणजेच ज्या वस्तू आपल्यासाठी अत्यावश्यक असतात आणि ज्यांची बाजारातली आवक ठराविक काळात वाढून किंमती उतरत असतात, त्यावेळी जर अशा वस्तू आपण खरेदी करून ठेवल्या तर आपल्याला काहीसा दिलासा मिळू शकतो. आपल्यापैकी अनेकजण रोजच्या उपयोगाच्या वस्तूंची अशी बेगमी करीत असतात.

तांदूळ, गहू व डाळी यासारख्या धान्यांशिवाय आपले रोजचे जेवण होऊच शकत नाही. ही धान्ये वर्षाच्या ठराविक हंगामात तयार होतात. ज्यावेळी नवी धान्ये बाजारात येतात त्यावेळी त्यांची किंमत सर्वात कमी असते. अशावेळी ती खरेदी करावीत आणि नीट साठवून वर्षभर वापरावीत हे आपण पिढ्यानपिढ्या पाहत आलो आहोत. मात्र अशा वर्षभरासाठीच्या साठवणुकीसाठी आपण खरेदी करीत असलेल्या धान्यांचा दर्जा आणि किंमतीबद्दल खात्री असणे आवश्यक असते. खरा आणि नकली बासमती यातला फरक आपल्या लक्षातही येत नाही. जी डाळ खूप चांगली आणि चकचकीत दिसते ती घरी नेल्यावर नीट शिजत नाही असे आढळते. आपल्यापैकी अनेकजण आर्थिकदृष्ट्या अवघड असूनही धान्याची वर्षभराची साठवणूक करतात. त्यामुळे त्यात आपली फसवणूक होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते.

नाशकात यासाठी जवळपास गेली एकोणतीस वर्षे ग्राहक पंचायत काम करीत आहे. ग्राहकांच्या हितासाठी एकत्रित खरेदी आणि वितरण योजना राबवून त्यांना वर्षभरासाठी लागणारे दर्जेदार तांदूळ रास्त भावात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्राहक पंचायत, नाशिक व ग्राहक शिक्षण आणि संशोधन संस्था, नाशिक संयुक्तपणे दरवर्षी तांदूळ महोत्सवाचे आयोजन करीत असतात. जवळ जवळ ना नफा ना तोटा या तत्वावर ग्राहकांना तांदूळ विकले जातात. ग्राहकांच्या नियमितपणे संपर्कात राहावे अशीही एक संकल्पना या आयोजनामागे असते. तांदूळ व डाळी यांची विक्री करणे हा काही ग्राहक पंचायतीचा व्यवसाय नाही. पण बाजारात रास्त किंमत प्रस्थापित व्हावी आणि ग्राहकांना चांगल्या व दर्जेदार धान्याची खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठीच हा उपक्रम हाती घेतला जातो.

धान्य हा आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. पण बऱ्याचदा आपण अन्य वस्तूंच्या तुलनेत या खरेदीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे या धान्याचा दर्जा, त्याचा टिकाऊपणा यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. ऑरगॅनिक वस्तूंच्या नावाखाली आजकाल अनेकजण कमी दर्जाचा मालही विकतात. या गोष्ट थेट आपल्या आरोग्याशी निगडित आहेत. त्यामुळे ग्राहकाने धान्य खरेदी करतानाही सजग राहणे आवश्यक आहे.

(लेखिका ग्राहक पंचायतीच्या सहसंघटन मंत्री आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाम धरण प्रकल्पग्रस्तांचे सखल भागात पुनर्वसन करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी जवळच काळुस्ते शिवारात नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत भाम धरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत काळुस्ते, दरेवाडी, बोरवाडी व सारुक्तेवाडी येथील प्रकल्पबाधित कुटुंबांचे पुनर्वसन धरणापासून जवळच तीन किमी अंतरावर सपाट जागेवर करून मिळावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे केली आहे.

भाम प्रकल्पग्रस्त काळुस्ते, दरेवाडी, सारुक्तेवाडी, बोरवाडी येथील शिष्टमंडळाने जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. भाम धरण परिसर हा डोंगराळ भाग आहे. या भागात पुनर्वसन झाल्यास अतिवृष्टीमुळे भविष्यात माळीण प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माळीणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाम धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन जवळच सपाट जागेवरच करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सपाट जागेवर पुनर्वसन न झाल्यास धरणाचे उर्वरित काम होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असते. यामुळे डोंगरीभागातील पुनर्वसन धोकेदायक ठरू शकते. माळीणसारखी दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण राहील. यामुळे जागा बदलून मिळावी, अशी मागणी करण्यात आली. काळुस्ते-दरेवाडी-बोरवाडी-सारुकतेवाडी येथील उपसरपंच गोविंद घारे, सदस्य मारुती कोवे, मंगळू गावंडा, शिवराम घारे, दामू गावंडा, काळू गावंडा, शंकर सावंत, अमृता सारूकते, संजय घारे, ज्ञानेश्वर घारे, विजय घारे, एकनाथ घारे, काळू गावंडा आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटी भाजप शहराध्यक्षपदी जगन भगत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

घोटी शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी घोटी मर्चंट बँकेचे संचालक जगन मधुकर भगत यांच्या नावावर एकमत झाले. शहराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली.

घोटी शहराच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रमुख पदाधिकारी व क्रियाशील कार्यकर्त्यांची बैठक घोटी येथील वाचनालयाच्या सभागृहात घेण्यात आली. या वेळी पक्षनिरीक्षक म्हणून महेश श्रीश्रीमाळ, कैलास चौधरी उपस्थित होते. प्रमुख पदाधिकारी म्हणून माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष पांडूरंग बऱ्हे, घोटीच्या सरपंच कोमल गोणके, मोहन भगत, रमेश परदेशी, नंदलाल गाढवे, अण्णासाहेब डोंगरे हे होते.

शहराध्यक्ष पदासाठी जगन भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. तसेच, घोटी शहर सरचिटणीस म्हणून सईद रंगरेज यांचाही एकच अर्ज आल्याने ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर घोटी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

पुढील काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व राहील यासाठी रचनात्मक बांधणी व संघटन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीस बाळासाहेब सुराणा, मोहन भगत, नंदू गाढवे, मदन रुपवते, देवीदास काळे, कैलास कस्तुरे, संदीप शहाणे, मधुकर रुपवते, मंगेश काळे, विशाल शिंदे, अरुण शेलार, अनिल काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ हजार स्वयंसेवकांची नोंदणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुणे येथे आयोजित शिवशक्ती संगम या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून २५ हजार स्वयंसेवक जाणार आहेत. नाशिक शहर, ग्रामीण व मालेगाव या तीन विभागातून २५ हजार स्वयंसेवक नोंदणीचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. ही माहिती नाशिक जिल्हा संघचालक कैलास साळुके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने तीन जानेवारी रोजी पुणे येथील मारुजीगाव, हिंजवडी या ठिकाणी शिवशक्ती संगम या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश, कार्यक्रमातील स्वयंसेवकांचा सहभाग, रुपरेषा, तयारी याबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नाशिक जिल्हा संघचालक कैलास साळुंके, जिल्हा प्रचारक, दिगंबर देवरकुंड, तालुका कार्यवाह आनंद मोरे, तालुका संघचालक नितीन आंबेकर आदी उप‌स्थित होते. कैलास साळुंके पुढे म्हणाले की, संघाचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्याच्या हेतूने शिवशक्ती संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघाचे सरसंचालक मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातून एक लाख साठ हजार स्वयंसेवकांनी नोदणी केली आहे. याशिवाय इतर साठ हजार नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ तयार तयार करण्यात आले असून, व्यासपीठावर दहा हजार मान्यवरांची आसन व्यवस्था करण्यात आली. दोनशे एकर जागेत वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र पार्किंग असणार आहे. प्रत्येक प्रवेशव्दाराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे नाव देण्यात आले आहे. प्रवेशव्दारावर त्या त्या किल्ल्यांची प्रतिकृती असेल. दोन हजार स्वयंसेवकांचे घोषपथक तयार करण्यात आले आहे. एक लाख स्वयंसेवक सांघीक गीत सादर करतील. तीन जानेवारीला विविध गीत सादर होतील. परतीच्या प्रवासासाठी एक लाख स्वयंसेवकांना भोजन शिदोरी देण्यात येणार आहे. पुण्यातील एक लाख घरांमध्ये शिदोरी तयार करण्याचे काम सुरू आहे, असे साळुंके यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यघटनेतील तत्त्वांना धर्मांकडूनच धोका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भारत हा बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक आणि बहुभाषिक देश आहे. भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्त्वांना सर्वात मोठा धोका धर्मांकडून आहे. प्रतिपादित धर्म आणि प्रत्यक्षातील धर्म यात असलेल्या तफावतीमुळे असहिष्णुता वाढत आहे. त्यामुळेच संविधानाचे सर्वश्रेठत्व, परस्परांचा आदर करणे आणि शांततामय सहजीवन यांचे पालन आपण केले पाहिजे, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत 'मुस्लिम समाज सुधारणा : स्थिति आणि गती' या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह होते. तांबोळी पुढे म्हणाले की, मुस्लिम समाजसुधारणांचे सुफीसंत परंपरा, धार्मिक अंगाने विचार करणारी मौलाना आजाद ते अजगरअली इंजीनिअर ही परंपरा आणि निखळ विवेक आणि बुद्धिवादावर आधारित हमीद दलवाईकृत मुस्लिम सत्यशोधक परंपरा असे तीन प्रमुख प्रवाह आहेत. इस्लाममधे पैगंबरांनी वाचन (इकरा) आणि शिक्षण (इल्म) यांना अतिशय महत्त्व दिले आहे. एवढेच नव्हे तर इस्लामिक न्यायशास्त्रात कुराण, हदीस, इस्तेहाद आणि कयास या चार मार्गदर्शनांमधे विवेकवादालाच (कयास) महत्त्वाचे मानले आहे.

ज्याप्रमाणे सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता अशा अनिष्ट प्रथा, परंपरा इंग्रज सरकारने पुढाकार घेऊन संपविल्या. तशा मुस्लिम समाजातील अनिष्ट बाबी शासनाने पुढाकार घेऊन संपविल्या पाहिजेत, अशी भूमिका सर्वप्रथम हमीद दलवाईंनी मांडली. त्यांनी उभारणी केलेल्या बुद्धिवाद, विवेकवाद आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाच्या पायावर आजही मुस्लिम सत्यशोधक मंडळ कार्यरत आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितिमुळे, शिक्षणामुळे सुधारणांच्या कार्याला मुस्लिम समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. इस्लामच्या नावाने दहशतवाद पसरविणाऱ्यांपासून सर्वात जास्त धोका मुसलमानानांच आहे, असे ते म्हणाले.

वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह यांच्या हस्ते प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांचा आणि त्यांच्या पत्नी डॉ. बेनझिर तांबोळी यांचा शोभा बडवे यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेतील समारोपाचे हे व्याख्यान मालेगाव मर्चंट को. ऑप. बँकेने प्रायोजित केले होते. बँकेचे संचालक गौतम शाह बँकेतर्फे उपस्थित होते. ग्रंथालय सप्ताह आणि व्याख्यानमालेचा समारोप करताना अध्यक्ष अजय शाह यांनी सर्व वाचक, सभासद, प्रायोजक, देणगीदार, व्याख्याते आणि श्रोते, वाचनालयाचे पदाधिकारी आणि कर्मचारी सहकाऱ्यांचे कृतज्ञापूर्वक आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात यात्रोत्सवाची जोरदार तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या १२८ वा पुण्यतिथी सोहळा व यात्रोत्सव समारंभ पाच जानेवारीपासून साजरा होत असून, देवस्थान समितीने यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू केली आहे. पोलिस प्रशासनाने देखील कायदा व सुवव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.

या यात्रोमहोत्सवास मार्गशीर्ष एकादशी दिवशी पहाटे ४ वाजता बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, अध्यक्ष भालचंद्र बागड व नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण या तिघांच्या हस्ते महापूजा होऊन पुण्यतिथी सोहळा व यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. दु. ३ वाजता शहरातून देवमामलेदार यांच्या रथमिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ११ ते १ च्या दरम्यान कीर्तन व पुढे नामस्मरण जागरण होणार आहे. दि. ६ ते ९ दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, शनिवार दि. ९ रोजी दु. २ वा. आरम नदीकाठी भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे. सांयकाळी ६ वा. दहीकाला व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर परिसर देखील स्वच्छ व नीटनेटका करण्यात आला आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येऊन यात्रा परिसरात दुकाने, स्टॉल्स सजू लागली आहेत. यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त अध्यक्ष भालचंद्र बागड, उपाध्यक्ष दादाजी सोनवणे, चिटणीस धर्मा सोनवणे, खजिनदार गंगाधर येवला, विश्वस्त अ‍ॅड. विजय पाटील, रमेश देवरे, कौतिक सोनवणे, राजेंद्र भांगडीया, रमेश सोनवणे, बाबुराव सोनवणे, सुनील मोरे, हेमंत सोनवणे प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शौचालय बांधणीला मिळतोय प्रतिसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहरात स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील जनतेला शौचालय बांधण्याचे व त्यासाठी अनुदान दिले जाणार असल्याचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी जाहीर केले होते. या अभियानास शहरात प्रतिसाद मिळत असून, शहरात २०० नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण केल्याने त्यांना अनुदानाचा शेवटचा हप्ता अदा केला जाणार आहे.

या अभियानांतर्गत मनपातर्फे चार हजार तर राज्य शासनातर्फे १२ हजार शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. शहर हागणदारीमुक्त व्हावे असा संकल्प आयुक्त किशोर बोर्डे यांनी केला आहे. शहरात एक हजाराहून अधिक लोकांनी वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी अर्ज केले असून, बांधकाम देखील सुरू झाले आहे. त्यांना अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून सहा हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. शहरात या अभियानांतर्गत दहा हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. या अभियानास शहरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल्सकडून ‘क्रीएटीव्ह थीम’वर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या वर्षात राज्यभरात असणाऱ्या दुष्काळाचा प्रभाव हॉटेल इंडस्ट्रीवरही काही प्रमाणात जाणवत असला तरीही शहरातील बड्या हॉटेल्सने क्रीएटीव्ह थीम्सच्या सादरीकरणातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. बड्या सेलिब्रेशनसाठी अद्यापपर्यंत विशेष परवानगी घेणाऱ्या हॉटेल्सची संख्या मर्यादित असली तरीही छोटी हॉटेल्सही ग्राहकांच्या अगत्यासाठी सजली आहेत.

थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी दरवर्षी शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये विशेष नियोजन केले जाते. यंदाही काही हॉटेल्सने पाश्चात्य देशातून आधुनिक डीजे आणि स्वतंत्र म्युझिक सिस्टीम या सेलिब्रेशनसाठी मागवली आहे. यंदा तापमानाच्या बाबतीत नाशिकने महाबळेश्वरसारख्या पर्यटन केंद्रासही मागे टाकले. शहराच्या चुहूबाजूला नव्याने रूजणारे हॉटेल्स अन् त्यांच्याकडून ग्राहकांना सरत्या वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या खास ऑफर्स यांच्या परिणामी यंदाही शहरात सेलिब्रेशनचा माहोल असला तरीही या स्पर्धेतील हॉटेल्सची संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत. थर्टी फस्ट तोंडावर येऊन ठेपला असतानाही हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या परवानग्यांसाठी कलेक्टर ऑफीसकडे विनंतीपत्र आली होती. शहरातील सुला विनियार्डस आणि त्र्यंबकेश्वरातील अंजना रिसॉर्ट यासारख्या हॉटेल्सच्या परवानग्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. तर, त्र्यंबक परिसरातील ब्रह्मगिरी रिसॉर्ट, खंबाळे येथील ग्रेप काऊंटी आणि गंगावऱ्हे येथील सिओना रिसॉर्टस कडूनही कलेक्टर ऑफिसच्या करमणूक विभागाला परवानगीसाठी अर्ज प्राप्त झाले होते. सेलिब्रेशनच्या नावाखाली गुन्हेगारी प्रवृत्तींकडून होणारा गोंधळ, नासधूस यासारख्या काही अनुभवांमुळे काही हॉटेल्स सेलिब्रेशनपासून दूरच राहणार आहेत.

शहरातील विविध फॅमिली रेस्त राँ मध्येही आर्केस्ट्रा, फास्टफूड, डिनरसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सुला विनियर्डसच्या वतीने न्यू इयर्स इव्ह (एनवायई) २०१६ ही थीम मांडण्यात आली आहे. सुलाच्या अम्पी थिएटर परिसरात हे सेलिब्रेशन होणार असून 'बॉलिवूड ट्रॅक्स' हा इव्हेंट या सेलिब्रेशनची रंगत वाढविणार आहे. तर, हॉटेल व्हाईट लिलिमध्ये स्टारनाईट ही संकल्पना मांडण्यात आली आहे. येथील सेलिब्रेशनला सिने डिजेची साथ असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑफर्सची धमाल

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षाअखेर आणि नवीन वर्षाचे स्वागत असा दुहेरी लाभ लक्षात घेत ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजारपेठ विविध ऑफर्सच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करीत आहे. दिवाळीनंतर जवळपास दीड महिन्यांनी आलेल्या या ऑफर्समुळे ग्राहकही या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे.

एण्ड ऑफ सिझन, काऊंट डाऊन बिगिन्स, हॉलिडे सिझन, एण्ड ऑफ रीझन अशा नावांखाली विविध ऑनलाइन शॉपिंग साईट्स ५० ते ७० टक्के ऑफ अशा ऑफर्स घेऊन आल्या आहेत. अनेक शॉपिंग साईट्सवर ख्रिस्टमसपासूनच ऑफर्सचा धमाका सुरू आहे. कपड्यांपासून चपलांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश यामध्ये आहे. काही शॉपिंग साईट्सनी गिफ्ट कार्डस तसेच आपल्या मोबाइल अॅप्लिकेशनवरही खास ऑफर्स देऊ केल्या आहेत. विशिष्ट ब्रँड्सवरही खास ऑफर्स दिसून येत आहेत.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील मॉल्स, हॉटेल्स, गिफ्ट शॉप्सही सज्ज झाली आहेत. डिस्काऊंट ऑफर्ससह अन्य ऑफर्सही इथे उपलब्ध आहेत. याचबरोबर शहरातील फूड स्पॉट्स, रेस्ताराँज्, हॉटेल्स यांनीही हे औचित्य साधत पार्टीच्या माध्यमातून विविध ऑफर्स देऊ केल्या आहेत. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनची क्रेझ लक्षात घेता ५० टक्के ऑफ, एकावर एक फ्री, विविध सरप्राईझ गिफ्टस अशा ऑफर्स प्राधान्याने दिल्या जात आहेत.

नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आजकाल सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम म्हणजे मोबाइल फोन. त्यामुळे विविध मोबाइल कंपन्यांनी मेसेज, फोन कॉल्स, इंटरनेट पॅक या सुविधांवरही मोठ्या प्रमाणावर ऑफर्स दिल्या आहेत. फ्री कॉल्स, फ्री मिनिट्स, ठराविक डाटा फ्री अशा ऑफर्सचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागतासाठी विनयार्डस् सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाची वाइन कॅपिटल असलेल्या नाशिकमध्ये विनयार्डसनी नववर्ष स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. वाइन टेस्टिंग, ग्रेप्स क्रशिंग आणि म्युझिक कार्यक्रम अशा तिहेरी माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न विनयार्डसकडून केला जात आहे.

हिरवळ आणि जलाशयांचे सान्निध्य असल्याने विनयार्डसमधील सेलिब्रेशनचा माहोल काही निराळाच असतो. गेल्या काही वर्षांपासून विनयार्डसमध्ये आर्केस्टा, बँड किंवा शाही पार्टीचे आयोजन करण्याचा ट्रेंड हिट झाला आहे. त्यास उत्तम प्रतिसाद लाभत असल्याने अनेक सेलिब्रेटीही त्यात सहभागी होत आहेत. देशाच्या विविध भागातून न्यू इअर सेलिब्रेशनसाठी विनयार्डमध्ये गर्दी होत असल्याने नाशकातील वाइन पर्यटनाला बहर आला आहे. त्यामुळे वाइनच्या उत्पादनाबरोबरच वाइन पर्यटन आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या ट्रेंडने वाइन उद्योगाला झळाळी मिळाल्याचे वाइन उत्पादक राजेश जाधव यांनी सांगितले. विनयार्डमध्ये न्यू इयर सेलिब्रेशनचे आयोजन करण्यासाठी इव्हेंट कंपन्यांनाही कंत्राट दिले जात आहे. तसेच, या आयोजनाचे ब्रँडिंग देशाच्या विविध भागात करण्यासाठीही विनयार्डसमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. वाइन द्राक्षांची लागवड, वाइनची निर्मिती, वाइन टेस्टिंग करण्याच्या बहुविध पद्धती, गुलाबी थंडी, खाण्याचे नानाविध पदार्थ आणि रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम असा नजारा असल्याने विनयार्डमधील सेलिब्रेशनाकडे कल वाढला आहे.
विनयार्डस आणि न्यू इअर सेलिब्रेशन असे अनोखे नाते गेल्या काही वर्षात तयार झाले आहे. नागरिकांना वेगळा आनंद मिळतानाच वाइन उद्योगासाठी ही बाब अतिशय मोलाची ठरली आहे.

- शिवाजी आहेर, माजी अध्यक्ष,

ऑल इंडिया वाइन प्रोड्यूसर्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेते, पदाधिकारी नॉट रिचेबल

$
0
0



नाशिक : नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारीही मागे नसल्याचे चित्र आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी उत्साही पदाधिकारी व नेते मंगळवारपासून नाशिकच्या बाहेर गेले असून, अनेक जण नववर्षाचा मूडसाठी नॉट रिचेबल झाले आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी कुटुंबासह कोकणाची निवड केली आहे. उत्साही पदाधिकारी व नेत्यांना नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनला गोव्याला प्राधान्य दिले आहे. तर, बाहेर जाऊ न शकणारे काही स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातील धरणांचा आसरा घेतला आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पक्षीय गटतट विसरून अनेकांनी एकत्रित येत सहलींवर जाणे पसंत केले आहे. विशेषतः नगरसेवकांचे गटच नववर्ष सेलिब्रेशनसाठी गोवा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशच्या सहलीवर रवाना झाले आहेत. सेलिब्रेशनसाठी महिला पदाधिकारीही पिछाडीवर नसून, एकत्रित येऊन मुंबईकडे प्रयाण केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्टी फर्स्टसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करताना रस्त्यांवरही नागरिकांचा उत्साह ओसांडून वाहण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उत्साहाच्या भरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही परिस्थिती वेळीच हाताळण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे. मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. रात्री १० नंतर हातगाडे बंद ठेवण्यात येणार आहेत.

सरत्या वर्षाला आनंदाने अलविदा करण्याची आणि नवीन वर्षाचेही तेवढ्याच उत्साहाने स्वागत करण्याची पध्दत आपल्याकडे चांगलीच रूजली आहे. नाताळच्या सुट्या सुरू होण्यापूर्वीच अबालवृध्दांना थर्टी फर्स्टचे वेध लागले आहेत. कुटुंबीय, नातलग आणि मित्र परिवारासमवेत या दिवसाचा आंनद लुटण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून, दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी शहरातील हॉटेल्स, बार, विनियार्डस येथे नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे सेलिब्रेशन दरम्यान मद्याचे पेग रिचवून बेदरकारपणे वाहने चालविण्याचे प्रकारही शहरातील रस्त्यांवर घडू लागले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा गुरुवारी दुपारनंतर रस्त्यावर उतरणार आहे. १९ पोलिस निरीक्षक, १६ सहायक पोलिस निरीक्षक, २०५ पुरुष पोलिस कर्मचारी, निभऱ्या पथकातील ३० महिला पोलिस कर्मचारी, शीघ्र कृती दलाची दोन पथके, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक कार्यरत राहणार आहे. वाहतूक पोलिसही कारवाईसाठी रस्त्यावर सज्ज राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनस्थळे गजबजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरत्या वर्षाला अलविदा करतानाच नववर्षाचेही आनंदाने स्वागत करण्यासाठी अबालवृध्द सज्ज होत आहेत. कुटुंब आणि मित्रपरिवारासह शहरातील आणि शहराबाहेरील पर्यटनस्थळांवर जाण्याचे प्लॅनिंग तयार झाले असून, जवळच्या तिर्थक्षेत्रांवर जाण्यासाठीही पसंती दिली जात आहे.

वर्षअखेर आणि गुरुवार असा सुंदर योग जुळून आल्याने शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक असणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही पर्यटकांच्या गर्दीची शक्यता गृहीत धरून गर्दीच्या मार्गांवर पुरेशा बसेस पुरविण्याची तयारी ठेवली आहे. गेले महिनाभर संरक्षक जाळ्यांच्या कामांमुळे वणीच्या गडावर प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. मात्र २६ डिसेंबरपासून गड भाविकांसाठी खुला झाल्याने तेथे देखील जादा बसेस सोडण्याची तयारी महांमडळाने केली आहे. सिंहस्थातील महत्त्वाच्या पर्वणी संपल्या असल्या तरी अजूनही कुंभमेळा सुरू आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला त्र्यंबकेश्वरमध्येही वेळ घालविण्यास पर्यटकांकडून पसंती दिली जाणार आहे.

जवळच्या पर्यटन स्थळांवर जाण्यालाही पर्यटकांकडून पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. पर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने पुणे, मुंबईच नव्हे तर राज्यातील आणि देशातीलही पर्यटकांचा नाशिककडे वाढला आहे. आल्हाददायक वातावरण, तीर्थक्षेत्र म्हणून असलेला नाशिकचा लौकीक आणि जिल्ह्यात पर्यटनासाठी उपलब्ध असणारे अनेक पर्याय यांमुळे नाशिकमध्येही पर्यटकांचा ओघ वाढला आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर भटकंतीला प्राधान्य देत असले तरी शहरवासी मात्र जवळच्याच ठिकाणांवर थर्टी फर्स्ट एन्जॉय करण्याच्या तयारी आहेत. सायंकाळपर्यंत घरी परतता येईल, या दृष्टीनेच नियोजन करून पर्यटनस्थळ निवडण्यास पसंती ‌दिली जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भंडारदरा, भावली, नांदूरमध्यमेश्वर आणि सापुतारा अशा निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देण्याचे ‌नियोजन अनेकांनी पक्के केले आहे. तर, जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर हा दिवस मजेत घालविण्यास दुर्गप्रेमींकडून पसंती दिली जाणार आहे. याखेरीज शहरातील पांडवलेणी, सोमेश्वर, फाळके स्मारक, नवशा गणपती, बालाजी मंदिर अशा ठिकाणांवरही जाण्याचे प्लॅनिंग शहरवासीयांकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२७ वर्षांनंतरही मृतदेह जैसे थे!

$
0
0

कब्रस्तानात दफन करतेवेळी कबरीवर त्यातील दफन व्यक्तीचे नावसह मरण पावल्याची तारीख असलेली पाटी लावली जाते. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीला कबर शोधण्यास मदत होते. एका विशिष्ट कालावधीनंतर कबर पुन्हा दुसऱ्यास दफनविधीसाठी खोदली जाते. यावरून पूर्वीची कबर किती वर्षे जुनी आहे याचा अंदाज येतो. याच पध्दतीवरून खोदलेल्या कबरीचे अंदाज बांधण्यात आले. मात्र, त्यातील दफनविधी झालेल्या मृताचे नाव व ओळखीबद्दल गुप्तता पाळण्यात आल्याने अधिक तपशील समजू शकले नाहीत.

तीन वर्षातील दुसरा प्रकार तीन वर्षांपूर्वी जुने नाशिकच्या खडकाळी परिसरातील रसूलबाग कब्रस्तानात ८० वर्षांपूर्वीच्या कबरीतून मृतदेह जैसे थे अवस्थेत मिळून आले होते. तसेच जहाँगीर मशिद कब्रस्तानात अनेकवेळा तुटलेल्या कबरीतून असे मृतदेह दिसून येतात. मात्र, त्याची वाच्यता न करता कबर बंद करून दिली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किडनी विकार पूर्ण बरा होणे शक्य

$
0
0

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या रोटरी हेल्थ सोसायटी तर्फे रोटरी सभागृहात 'किडनी विकार : समज व गैरसमज' या विषयावर स्लाईड शोद्वारे व्याख्यान झाले. यावेळी डॉ. पटेल बोलत होते. सर्वसामान्य व्यक्तीनेही दिवसातून तीन ते पाच लिटर पाणी नियमित प्यावे. ज्यांच्या किडनी निकामी होत असल्याचे निदान झाले आहे त्यांनी नियंत्रित पाणी प्यावे. तसेच प्रोटीनयुक्त पदार्थांचे आहार टाळावेत. एक किडनी निकामी झाली असेल आणि ती शस्त्रक्रियाद्वारे काढली असेल तरी दुसऱ्या एकमेव किडनीच्या आधारावर रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो, असा विश्वास डॉ. पटेल यांनी व्यक्त केला. कमी वयात किडनी प्रत्यारोपण झालेल्या महिला गर्भधारणा करू शकतात. अक्युट किडनी आजार प्रकारात डायलिसीस केल्यावर तीन ते चार आठवड्यात किडनी पूर्वीप्रमाणे कार्यरत होते तर क्रोनिक प्रकारात मात्र तसे होत नाही. किडनी आजाराविषयी सत्य काय हे जाणून घेऊनच रुग्णाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून अचूक उपचारातील औषधे घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारकातून आशा-आकांक्षा दिसाव्यात

$
0
0

नाशिकरोड येथे पक्षाच्या सभेत ते बोलत होते. राहुल बागूल अध्यक्षस्थानी होते. जिल्हाप्रमुख राजाभाऊ गांगुर्डे, काशिनाथ निकाळजे, राजाभाऊ गांगुर्डे, संजय बोधणकर, राहुल बागूल, प्रमोद सहारे प्रमुख पाहुणे होते. आनंदराज आंबेडकर म्हणाले, की इंदू मिल येथे बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून आम्ही मोठा लढा दिला. स्मारकाचा आराखडा पारदर्शी नाही. स्मारकात बाबासाहेबांचा चारशे फुटी पुतळा असावा, तो समतेचा पुतळा म्हणून ओळखला जावा. राज्यात शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचे शासनकर्ते झाले पाहिजेत. त्यासाठी भीमसैनिक व बहुजन समाजाने एकत्र यावे. राज्यात बाबासाहेबांच्या विचारांचे सरकार आणण्यासाठी भीमसैनिकांनी जागे व्हावे. दलितांचे काही नेते व कार्यकर्ते स्वाभिमान गमावून बसले आहेत. त्यांना कोणी किंमत देत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. संजय दोंदे यांनी सूत्रसंचलन केले. विलास गांगुर्डे यांनी आभार मानले. सुयोग बागूल, बापू लोखंडे, रामा निकम, इंद्रिजत भालेराव, उन्मेश थोरात, संतोष बागूल यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिसी ग्राहकांची वणवण

$
0
0

सध्या बाजारात डझनभरापेक्षा अधिक विमा कंपन्या उपलब्ध असतांनाही सामान्य गुंतवणूकदारांकडून अजूनही एलआयसीला प्राधान्य दिले जाते. एलआयसीमध्ये पैसे गुंतविले म्हणजे योग्य मोबदला मिळतो, तसेच पैसे सुरक्षितही असतात, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. याच एलआयसीकडून गुंतवणूकदारांची उपेक्षा होतोय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण सध्या एलआयसीच्या गोळे कॉलनी, तिडके कॉलनी यासह अन्य कार्यालयांमध्ये पॉलिसी ग्राहकांची विम्याचा हप्ता भरण्यासाठी गर्दी होत आहे. तेथे पॉलिसी ग्राहकांना पैसे भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे. पॉलिसीचे हफ्ते भरण्यासाठी येणाऱ्या एजंटांसाठीही काऊंटर कमी आहेत. त्यामुळे एलआयसीने काऊंटर वाढविण्याबाबत सूचना करून देखील प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचे पॉलिसी ग्राहकांंचे म्हणणे आहे.

प्रतीक्षा नव्या जागेची एलआयसीत होणाऱ्या अडचणीबाबत सिनिअर मॅनेजर संजय साटम यांच्याशी चर्चा केली. त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अतिरिक्त जागेची मागणी केली असल्याचे सांगितले. तसेच गर्दीच्या वेळी पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तत्काळ अतिरिक्त काऊंटर देण्यात येत असल्याचे म्हणाले. एलआयसीने ग्राहकांना ऑनलाइन पैसे भरण्यासाठी अधिक जागरुक करण्याची गरज असल्याचेही मत जाणकारांनी मांडले आहे.

कार्यालय की कोंडवाडा? गोळे कॉलनीतील एलआयसीची सर्वात जुनी इमारतीत असलेल्या कार्यालयात तर पॉलिसीचे पैसे भरतांना कोंडवाड्यात आलो की काय, असा प्रश्न पॉलिसीधारकांना पडतो. सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० पर्यंत पैसे भरण्यासाठी कालावधी असतो. तो अपुरा पडत असल्याची पॉलिसीधारकांचे मत आहे. पैसे भरण्यासाठी काऊंटर वाढविण्याबरोबर कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

एलआयसी विमा ग्राहकांना हफ्ते भरण्यासाठी अनेकदा रांगेत उभे राहवे लागते. अधिक गर्दी झाल्यावर वेगळे काऊंटर सुरू करण्याची व्यवस्था केली जाते. सरकारकडे अतिरिक्त जागेची मागणी देखील करण्यात आली आहे. - संजय साटम, सिनिअर मॅनेजर, एलआयसी, गोळे कॉलनी कार्यालय

पॉलिसीग्राहक व एजंट यांना गोळे कॉलनीतील एलआयसी कार्यालयात पैसे भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. एलआयसीने अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. - संतोष गायके, पॉलिसीग्राहक



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीतील गाळ्यांना आग

$
0
0

मार्केट यार्डात याच भागात दर बुधवारी जनावरांचा बाजार भरतो. सकाळी जिल्हाभरातून अनेक ठिकाणाहून विविध जनावरे विक्रीसाठी आली होती. जनावरांच्या बाजारासमोरील गाळ्यांमधून अचानक आ‌ग आणि धूर येण्यास सुरूवात झाली. यात संतोष जयस्वाल (गाळा क्रमांक १३८), सोमनाथ कांबळे (गाळा क्रमांक १३९), राजेश ठक्क्कर (गाळा क्रमांक १४०) यांच्या मालकीच्या गाळ्यास आग लागली. अग्निशमन दलास तातडीने बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगात गाळ्यालगतची झाडे जळाली आहेत.

भाजीपाला जळून राख आगीत दुधीभोपळा, कोबी, फ्लावर आणि अन्य भाजीपाला जळाला. तसेच संबंधित ‌तिन्ही गाळ्यांमधील प्लास्टिकच्या जाळ्या आणि इतर साहित्य जळाले. यावेळी पंचवटी अग्निशमनच्या बंब बरोबरच पंचवटी विभागीय कार्यालयातील आणि शिंगाडा तलाव येथील २० बंब दाखल झाले. अग्निशमन अधिकारी आर. एम. बैरागी, जे. एस. अहिरे फायरमन डी. व्ही. दोंदे आणि सहकारी कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images