Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

स्वरमयी भक्तीसंध्येने लागली ब्रम्हानंदी टाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अवीट गोडीच्या अभंगांमधून पाझरणारा भक्तीभाव... पखवाज आणि तबल्यामध्ये रंगलेली जुगलबंदी... टाळांच्या किनकिनाटानेही या जुगलबंदीत घेतलेली उडी... अन् हृदयात खोलपर्यंत उतरणाऱ्या संतवाणीमधून रसिकजनांची ब्रम्हानंदी लागलेली टाळी अशा भारावलेल्या वातावरणामुळे नाशिककर रसिकांची शनिवारची सायंकाळ रम्य ठरली. निमित्त होते पंडित चंद्रकांत नाईक यांच्या स्वरमय भक्तीसंध्येचे.

गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात संस्कार भारती आणि रवी नांदुर्डीकर यांच्या संयुक्त विद्यमाने संतवाणी या भाव भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जय जय राम कृष्ण हरीचा गजर झाला अन् टीपेला पोहोचलेल्या स्वराभिषकात रसिकमन न्हाऊन निघाले. पं. जितेंद्र अभिषेक यांचे शिष्य पं. चंद्रकांत नाईक यांनी मैफलीच्या श्रीगणेशातच रसिकांच्या मनाची पकड घेतली. त्यानंतर सादर झालेल्या प्रत्येक अभंगाने रसिकांना आनंदाची अनूभूती दिली. रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी या गीतावर रसिकांच्या माना न डोलतील तरच नवल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया या अभंगाला टाळ्यांच्या गजरात दाद देण्यात आली. ध्यान करू जाता मन हरपले हा अभंग गायला जात असताना रसिकांचीही ब्रम्हानंदी टाळी लागली. आम्हा न कळे ज्ञान कळे पुराण या अभंगानेही उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संतवाणीचा हा कार्यक्रम उत्तरोत्तर बहरतच गेला. नाईक यांना एच. सी. जाधव, भक्ती नांदुर्डीकर, समीर कटू या सहगायकांनी साथ केली. दिगंबर सोनवणे (पखवाज), दत्तात्रेय भावे यांनी साथसंगत केली. ८९ व्या वर्षात पदार्पण करूनही तरुणांनाही लाजवेल, अशा उत्साहाने टाळ वाजविणाऱ्या माऊली टाकळकर यांना रसिकांनी विशेष

दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयआयटीयन्स पेस’चे KVPI स्पर्धेत यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) या परीक्षेत यावर्षी आयआयटीन्स पेस नाशिक संस्थेचे सात विद्यार्थी निवडले गेले आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही पेस नाशिकने आपली यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेत आयआयटीयन्स पेस नाशिकचे इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा मानस बेदमुथा, अंकुर सोनवणे, साहिल रणदिवे, व इयत्ता ११ वी विज्ञान शाखेचा अनुपकुमार सोनार, ऋषभ डहाळे, वेद तांबट व मुलींमध्ये नाशिकची एकमेव वृंदा राठी या विद्यार्थीनीची निवड झाली आहे. इयत्ता अकरावीला फक्त नाशिक पेसचेच विद्यार्थ्यांचीच निवड झाली आहे. केव्हीपीवाय ही स्पर्धा ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, व वैद्यकिय क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून घेण्यात येते. ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येते. परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र या विषयावर लेखी परीक्षा घेण्यात येते.

या परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येते. मुलाखतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बीएस्सी, बीएससी स्टॅटिस्टिक्स, बीएस्सी, मॅथेमॅटिक्ससाठी दरमहा ५००० रू. शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आयआयटीयन्स पेस नाशिकचे संचालक प्रमोद पाटील यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषि टर्मिनल मार्केटला लवकरच मंजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिकमधील प्रस्तावित कृषि टर्मिनल मार्केटला राज्य कॅबिनेटमध्ये लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. या कृषि टर्मिनलच्या जागेचा प्रश्नही निकाली निघणार असून, नागपूर व ठाण्याप्रमाणेच विनामूल्य शंभर एकर जागा उपलब्ध होणार आहे. तसा प्रस्ताव मुख्य सचिवांकडून कॅबिनेट समोर येणार असल्याने टर्मिनल मार्गी लागणार असल्याचा दावा गोडसे यांनी केला आहे.

नाशिक येथे केंद्र शासनाच्या योजनेतून सुमारे ६० कोटी प्रकल्प किंमतीचे नाशिक टर्मिनल मार्केट सार्वजनिक व खाजगी भागिदारातून करण्यात येणार आहे. प्रस्तावित टर्मिनल मार्केट केंद्र शासनाच्या विहित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात येणार असून, त्यासाठी एकूण ६० कोटींचा खर्च आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक लिलावगृह, हाताळणी यंत्रणा, क्लिनींग, ग्रीडिंग, पॅकिंग, बँकिंग, प्रक्रिया व निर्यात सुविधा प्रस्तावित आहेत. या टर्मिनल मार्केटमध्ये ७० टक्के फळे, भाजीपाला, १५ टक्के अन्नधान्य व १५ टक्के मांस पोल्ट्री दुग्धजन्य पदार्थ इत्यादी हाताळणी अपेक्षित आहे. फळे व भाजीपाल्यांसाठी स्वतंत्र शीतसाखळी स्थापन करण्यात आलेली आहे. नाशिक विभागातील नाशवंत फळांसाठी व भाजीपाल्यासाठी वातानुकूलित वाहने, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग चेंबर इत्यादींचा आवश्यकतेप्रमाणे समावेश असलेल्या ७ शीतसाखळ्या स्थापन करण्यात येणार आहेत.

नाशिक टर्मिनल मार्केटसाठी अंदाजे १०० एकर जमिनीची आवश्यकता होती. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने सदर प्रकल्पासाठी मौजे पिंप्री सैय्यद येथील गट नं. १६२१ व गट नं. १६५४ पैकी १०० एकर जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे सन २०१० पासून प्रलंबित होता. या प्रस्तावाबाबत खा. हेमंत गोडसे यांनी स्वतः लक्ष घालून महसूल, ग्रामविकास व वित्तविभाग येथे वैयक्तिकरित्या पाठपुरावा करून नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठीची ही जागा ठाणे व नागपूरच्या धर्तीवर विनामूल्य उपलब्ध करून देणेबाबत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे मागणी केली. त्याला क्षत्रिय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येऊन त्यास मंजुरी मिळणार आहे. नाशिकमधील शेतकऱ्यांना टर्मिनल मार्केटचा फायदा होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पेशल बीएड’ अपंगांसाठी महत्त्वाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'स्पेशल बीएड हा अभ्यासक्रम अपंगांच्या शैक्षणिक सत्रात अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरेल. अपंगांच्या विकासाच्या दृष्टीने व सामान्य शाळा-कॉलेजात नोकऱ्या उपलब्ध करुन देण्यास हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. अशी संधी अपंगांसाठी महाराष्ट्रात प्रथमच मराठी माध्यमातून उपलब्ध झाली असल्याने नॅब महाराष्ट्राच्या दृष्टीने हे प्रगतीचे एक पाऊल आहे', असे प्रतिपादन नॅब महाराष्ट्रचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी व्यक्त केला.

या अभ्यासक्रमाचा डॉ. सिंधू काकडे यांच्या हस्ते नॅबमध्ये प्रारंभ झाला. हेलन केलर व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद् घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी मुनशेट्टीवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी या अभ्यासक्रमाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना गौरवास्पद कामगिरी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, 'विद्यार्थ्यांनी श्रम व जिद्द मनात ठेवून अभ्यास केला पाहिजे. नॅब कॉलेजची ही पहिलीच बॅच असल्याने त्याचा गौरव वाढेल अशा रितीने हा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे.'

यावेळी उपस्थित शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्रृती बोबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,'पारंपरिक शिक्षण पद्धतीत अपंगांच्या संदर्भात त्यांच्या अपंगत्त्वानुसार शैक्षणिक तरतुदी असणे महत्त्वाचे आहे. त्यांचे भविष्य हे स्वावलंबी असावे, यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.' तसेच संपूर्ण डिग्रीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचा व नऊ दिवसाच्या संपर्कसत्र नियोजनाची थिअरी व प्रॅक्टीकल संदर्भातही त्यांनी यावेळी भाष्य केले.

डॉ. प्रा. सिंधु काकडे यांनी स्पेशल बीएडचे महत्त्व विषद केले. तर या अभ्यासक्रमाचे स्वरुप व प्रास्ताविक विनोद जाधव यांनी केले. चक्रधर जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक पोलिस पोचले राजस्थानला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक खोदकामात सापडलेले सोने स्वस्तात देतो, असे सांगून दीड लाखात एक किलो बनावट सोने देणाऱ्या टोळीतील साथीदारांचा अधिक तपास करण्यासाठी उपनगर पोलिस स्टेशनचे एक पथक नुकतेच राजस्थानला रवाना झाले आहे. याच गुन्ह्यात उपनगर पोलिसांनी तीन लोकांना अटक केली असून, त्यांचे काही साथीदार अद्याप फरार आहेत.

खोदकाम करताना काही किलो सोने हाती लागले. आम्ही गरीब असून, तुम्ही हे सोने निम्म्या किंमतीत विकत घ्या, अशा भूलथापा देत सर्वसामान्यांना गंडविणाऱ्या कानाजी सोळंकी, दलाराम राठोड आणि सुखराम वाघेला या तिघांना उपनगर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी शिताफीने अटक केली. त्यांचे आणखी साथीदार फरार असून, राजस्थानमध्ये याचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दुसरीकडे गंगापूररोड परिसरात राहणाऱ्या स्मिता कुलकर्णी या महिलेला राजस्थानमधूनच कॉल करून सोने घेण्यासाठी पाचारण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्रामचा तिढा सुटता सुटेना!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा कायमची अधिग्रहीत करण्याच्या शासनाच्या प्रयत्नाला शेतकऱ्यांनीच खो लावला आहे. राज्य सरकारने जागा मालकांना देवू केलेला एकास अडीचपट टीडीआर शेतकऱ्यांनी नाकारला असून, सरकारच्या अल्टीमेटमही झुगारून लावला आहे. टीडीआर घेवून जमीन देण्यास शेतकऱ्यांना नकार घंटा कळविल्यानंतर महापालिकेसह सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या वेळेप्रमाणेच पुढील सिंहस्थही कुंभमेळ्या भाडे कराराच्या जागेवरच भरण्याची वेळ येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील ३०० एकर जागा साधुग्रामसाठी कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्यासाठी २००२ पासून प्रयत्न सुरू आहेत. महापालिका व शेतकरी यांच्यात तडजोडीचा प्रयत्न सुरू आहे. या कुंभमेळ्यापूर्वी महापालिकेने ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जागा त्वरित पालिकेला ताब्यात द्यावी यासाठी विशेष म्हणून सध्याच्या अनुज्ञेय टीडीआरपेक्षा अधिक टीडीआर प्रोत्साहन म्हणून देण्याची तयारी करत महापालिकेच्या महासभेने एकास सहा टीडीआर देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. परंतु, त्याला यश आले नाही. त्यामुळे अखेरीस भाडेकरारावरच जागा घेवून सिंहस्थ साजरा करण्याची वेळ आली

होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी जागा कायमस्वरूपी अधिग्रहीत करण्याची घोषणा केली होती. कुंभमेळा आटोपल्यानंतर राज्य शासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी साधुग्रामच्या जागामालकांना एकास अडीच असा बोनस टीडीआर देण्याचा निर्णय घेतला. ४ डिसेंबरच्या अधिसूचनेनंतर पंधरा दिवसांच्या आत जागामालक स्वेच्छेने जागा देण्यासाठी येईल त्याला आणखी अर्धा टक्का बोनस म्हणजेच एकूण तीन टीडीआर देण्याचा निर्णय जाहीर केला होता. राज्य सरकारने दिलेली मुदत उलटली असून, एकाही शेतकऱ्याने या टीडीआर साठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे टीडीआरचा हा प्रस्ताव बारगळण्यातच जमा आहे. नगररचना विभागाकडे एकही अर्ज आला नसल्याने आता टीडीआरवर जागा घेण्याचे महापालिकेचे प्रयत्न फोल ठरले आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने पालिका ही जागा विकत घेवू शकत नाही. तर शेतकऱ्यांनी टीडीआरही नाकारला आहे. त्यामुळे साधुग्रामच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आता संपली असून, पुढील सिंहस्थही भाडेकराराच्या जागेवरच भरणार असल्याचे चित्र आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, पण कधी?

$
0
0

विनोदिनी काळगी

जगभरात हल्ली अनेक देशांच्या शिक्षणपद्धतींचा अभ्यास चालू आहे. प्रसार माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचतोही आहे. अमेरिका, इंग्लंड सारखे नावाजलेले देशही आता शालेय शिक्षणात मागे पडण्याच्या चिंतेत आहेत आणि फिनलंड, मलेशिया सारख्या छोट्या देशांकडून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काय आहे त्यांच्या शिक्षण पद्धतीत? मुख्य म्हणजे या देशांच्या शैक्षणिक धोरणाचा पाया आहे. शिक्षकांवरील विश्वास आणि मातृभाषेतून शिक्षण! या देशात उच्च शिक्षित आणि शिक्षकी पेशाची जाण असलेल्या व्यक्तींनाच शिक्षक होता येते. त्यांना समाजात मान आणि मानधनही चांगले असते, इतर कोणतीही नोकरी सोडून ध्येया लोक शिक्षक बनतात. त्यांना शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरुन बघण्याचे स्वातंत्र्य असते. नव्वद टक्के शाळा सरकारी असतात. समाजातील सर्व घटकांतील मुले याच शाळात जातात, त्यामुळे समाजाचे शिक्षणाकडे लक्ष असते. मग अर्थातच तिथल्या शिक्षणाचा दर्जा उत्तम असतो. असे सर्व एकमेकांवर अवलंबून असणारे घटक हे चक्र प्रगतीच्या दिशेने फिरवत असतात.

आता आपल्याकडचे चित्र बघू. आपण मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्वच जाणलेले नाही. त्यामुळे जिकडे तिकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पीक. त्यांचा दर्जा लक्षात न घेताच मुलांना त्यात घालण्याची पालकांची मानसिकता. सरकारी शाळेत फक्त अशिक्षितांची, कष्टकऱ्यांची मुले जातात. त्या शाळांकडे समाजाचे पूर्ण दुर्लक्ष. खाजगी इंग्रजी शाळातील बऱ्याच शाळा धंदेवाईक पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या आहेत. त्यामुळे दिखाऊ गोष्टींनाच महत्त्व. तर शिक्षणसम्राटांनी चालवलेल्या खाजगी मराठी शाळांचा अशैक्षणिक उद्देशच प्रभावी. स्वत:हून शिक्षकीपेशा स्वीकारणारे अपवादानेच. सर्वसाधारणपणे पाट्या टाकणारेच जास्त. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शिक्षणाचा घसरलेला दर्जा. मग अर्थातच समाजात घसरलेले स्थान. असा विचार करायला लागले की एकदम निराशाच मनात दाटून येते.

पण नुकतेच असे दोन प्रसंग समोर आले की मनाला थोडी उभारी आली. ठाण्याची IPH (Institute for Psychological Health) ही संस्था गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक मित्र या उपक्रमात दरवर्षी ३०-४० शिक्षकांचे मुलांशी भावनिक नाते दृढ करण्याचे शिक्षण देते. अशा सर्व शिक्षकांच्या मेळाव्यात मी सहभागी झाले होते. त्यावेळी सर्व शिक्षक या प्रशिक्षणामूळे आपल्या शिकविण्यात झालेल्या बदलांची, प्रयोगशीलतेची उदाहरणे देत होते. त्यावरुन त्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाल्याचे जाणवत होते. शिक्षकांमध्ये असा बदल होत राहणे हे खूप चांगले लक्षण आहे.

रविवारी नाशिक येथे 'वेध' नावाचा वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यात शहापूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा पाष्टीपाड्यावरील जिल्हा परिषदेतील शिक्षक संदीप गुंड यांची मुलाखत होती. त्यांनी प्रथम पाड्यावरील मोठ्या मंडळींचा विश्वास संपादन केला व त्यांना शाळेशी जोडून घेतले. त्यांच्या जिद्द व अथक प्रयत्नातून त्यांनी त्या शाळेचे रुप पालटून तिला 'डिजिटल' शाळा बनवले. आता त्यांना या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले असून डॉ. अब्दुल कलामांपासून अनेक जणांचे कौतुकही मिळाले आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन आता जिल्हा परिषदेच्या अनेक छोट्या शाळा असा प्रयत्न करीत आहेत. असे प्रयत्न वाढीला लागले तर आपल्याकडचे चित्रही पालटायला सुरुवात होईल.

सध्या शाळा तपासनीस शैक्षणिक उपक्रमांपेक्षा रेकॉर्ड तपासण्यावरच जास्ती भर देतात. त्यामुळे शिक्षकही उपक्रमांपेक्षा रेकॉर्ड तयार करणेच महत्त्वाचे समजतात. प्रत्यक्षात अनेक प्रयोगशील शिक्षक आहेत व त्यांचे विविध उपक्रम राज्यभर चालू आहेत. शिवाय त्यांनी अ‍ॅक्टिव्ह टिचर फोरम (ATF) असे व्यासपीठही निर्माण केले आहे. शिक्षण व्यवस्थेने याची दखल घेऊन शिक्षकांवर अधिक विश्वास दाखवला तर अनेक शिक्षक आपल्या पातळीवर असे प्रयोग करु शकतील.

(लेखिका आनंद निकेतनच्या संचालिका आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेले प्रेक्षक कुणीकडे?

$
0
0

संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेकडे प्रेक्षकांनी फिरविली पाठ; आयोजक हैराण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोठ्या जल्लोषात रविवारी सुरू झालेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेला केवळ पाच ते सहा प्रेक्षकच असल्याने या 'भरजरी भाषे'ला भविष्य आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला. हौशी राज्य नाट्य स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता व बाल नाट्याला प्रेक्षकांनी केलेली गर्दी पाहता संस्कृत नाटकांच्या वेळी 'प्रेक्षक गेले कुणीकडे?' असे विचारण्याची वेळ आयोजकांवर आली.

संस्कृत ही ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचिन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. महाकवी कालिदास हे संस्कृत भाषेचे आद्यकवी असून मेघदूत, ॠतुसंहार, रघुवंशम्, कुमारसंभवम् ही त्यांची खंडकाव्ये आणि दीर्घकाव्ये, तर विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम्, मालाविकाग्निमित्रम ही त्यांची नाटके संस्कृत भाषेतून त्यांनी लिहिली. त्यामुळे आजचे साहित्य खऱ्या अर्थाने श्रीमंत झाले. परंतु असे असताना संस्कृत भाषेतून होणाऱ्या नाटकांकडे नाशिककर प्रेक्षकांनी चक्क पाठ फिरवली. रविवारी सादर झालेल्या नाटकाला केवळ पाच ते सहा प्रेक्षकांची उपस्थिती होती. त्यामुळे गुरूवारपर्यंत होणाऱ्या २० नाटकांना प्रेक्षक येतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

नाट्य स्पर्धांचा

संस्कृतला फायदाच

पूर्वीच्या काळी नाटक हे रुढी परंपरा यांच्या विरोधात प्रबोधन करण्याचे साधन म्हणून वापरले जात असे. त्यामुळे नाटकातून प्रबोधन करता येते हे आतदेखील जनमानसावर ठसायला हवे. तसेच या नाट्य स्पर्धांचा संस्कृत भाषेला फायदा होत आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी व्यक्त केले. ५५ व्या राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की या स्पर्धांमधून भाषेचा अभ्यास होणे गरजेचे असून समाजाचे मनोरंजनही व्हावे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धा ३१ डिसेंबरपर्यंत स्पर्धा चालणार असून यात २० नाटके होणार आहेत.

उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम होते. तर व्यासपीठावर परीक्षक श्रीनंद बापट, अंजली पर्वते, तरंगिणी खोत, समन्वयक राजेश जाधव, मीना वाघ यांची उपस्थित होती. यावेळी प्रा. कदम म्हणाले की, रामायणासारखे नाट्य या भूमीवर झाल्याने नाशिक ही पहिली रंगभूमी असल्याचे त्यांनी सांगितले. वेदांग जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विद्याधर निरंतर, भगवान हिरे, अरुण गिते यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सुरेश गायधनी, माणिक कानडे, रोहित पगारे आदी उपस्थित होते. नाट्यस्पर्धेत सोमवारी (दि. २८) नदीसूक्तम, वक्रतुंड, ऐकक संघ, कथा वार्धक्यस्य इयम ही नाटके होणार आहेत.



'विशतिचक्रयोग:' नाटक सादर

स्पर्धेत सांगलीच्या संस्कारज्योती संस्थेच्या वतीने 'विशतिचक्रयोग:' नाटक सादर झाले. शालेय जीवनातील दोन मैत्रिणींपैकी एक भविष्यात शिक्षिका तर दुसरी वेश्या होते. या दोघींची अचानक भेट होते, एकमेकींची ओळख पटते; पण शिक्षिकेला आपली मैत्रीण वेश्या असल्याचे कळताच ती तिला 'यापुढे आपल्याला कधीच भेटू नको' सांगत निघून जाते. समाजातील स्थानापुढे मैत्रीचे बंधही कसे फिके पडतात, याचे चित्रण या नाटकात करण्यात आले. यतिन माझिरे लिखित व नम्रता इंगळे दिग्दर्शित या नाटकात योगिता पवार व नम्रता इंगळे यांनी भूमिका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यू इअर सेलिब्रेशनला हिंदू जनजागृतीचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाश्चात्यांच्या अंधानुकरणातून साजऱ्या होणाऱ्या नववर्ष सोहळ्याचे प्रतिकूल पडसाद समाजात उमटतात, असा मुद्दा उचलून धरत हिंदू जनजागृती समितीने ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनला विरोध केला आहे. समितीच्या वतीने ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्याविषयी रॅलीद्वारे प्रबोधन करण्यात आले.

संस्कृती रक्षणाच्या उद्दिष्टाखाली काही राजकीय पक्षांनी यापूर्वी व्हॅलेंटाईन डे सारखे इव्हेंट लक्ष्य केले होते. याच राजकीय पक्षांचा कित्ता चालवित हिंदू जनजागृती समितीने शहरातून घोषणा देत मोठी रॅली काढली. भोसला मिलीटरी स्कूल जवळून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या नावाखाली घालण्यात येणारा धुमाकूळ आणि पायी तुडविली जाणारी नीतीमूल्य समाजासाठी घातक असल्याने त्यास विरोधाची समितीची भूमिका आहे.

राज्य व केंद्रातील सत्ताबदलानंतर हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका आक्रमक होते आहे. रविवारी शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या प्रबोधन फेरीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष साजरे करावे, असे आवाहन करण्यात आले. या रॅलीमध्ये शशीधर जोशी, जयंत भातंब्रीकर, प्रवीण सोनवणे, शिवाजी उगले, दीपक बैरागी, शैलेश कादवे आदींनी सहभाग घेतला.

नाशिककरांना आवाहन

३१ डिसेंबरच्या दिवशी सेलिब्रेशनच्या नावाखाली रिचवले जाणारे कोट्यवधींचे मद्य, बेधुंदपणे वाहन चालवून होणारे अपघात, या दिवशी वाढणारे गुन्हेगारीचे प्रमाण यासारख्ये नकारात्मक मुद्दे आकडेवारीसह मांडत चुकीच्या पध्दतीने हे सेलिब्रेशन करू नये, असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने नाशिककरांना करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्र विकासासाठी युवाशक्ती आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

युवकांची शक्ती हा फार मोठा ऊर्जास्रोत आहे. ही शक्ती राष्ट्र उभारणीच्या व राष्ट्र विकासाच्या कामी उपयोगी आणल्यास देश निश्चितपणे महासत्ता होईल, असा विश्वास प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी व्यक्त केला. नागलवाडी येथील केटीएचएम कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागलवाडीचे सरपंच लक्ष्मण पोटींदे होते. प्राचार्य धोंडगे पुढे म्हणाले, 'युरोप अमेरिकेतील खेडीही अतिशय स्वच्छ व सुंदर आहेत. तशी स्वच्छ, सुंदर खेडी भारतात निर्माण व्हायला हवीत. भारतात महात्मा गांधी, विनोबा भावे, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, बाबा आमटे या थोर पुरुषांनी स्वच्छतेचे काम केले व काम करण्याची प्रेरणा दिली.

आपण सर्वांनी ती प्रेरणा घेऊन स्वच्छतेचे काम करायला हवे', अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वीच या गावातील श्रमसंस्कार शिबिरात स्वयंसेवकांनी सुमारे १५० शोषखड्डे खोडून ग्राम स्वच्छतेचे काम उभारले. केंद्राने या कमाची दखल घेत गावाला स्वच्छता विषयक पुरस्काराने सन्मानित केले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक प्रा. अशोक सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते शांताराम भोर, उपप्राचार्य डी. जी. गायकवाड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर जागेचा प्रश्न मार्गी

$
0
0

किरकोळ वाद वगळता नाईक संस्थेची सभा शांततेत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूरजवळील हिजडवाहळ जागेच्या सुरू असलेल्या न्यायालयीन वादावर तोडगा काढत किरकोळ वाद वगळता व्ही. एन. नाईक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. संस्थेच्या प्रांगणात रविवारी संस्थेची सभा झाली. दरवर्षी गदारोळ होणारी ही सभा शांततेत झाल्याने संचालक मंडळानी सुटकेचा सुस्कारा सोडला.

सभेत सर्व्हे नंबर ७१७/१अ/२ हिजडवाहळ जागेचा प्रश्न केंद्रस्थानी होता. संस्थेने २६ कोटी रुपयांना विकलेल्या या जागेचे सव्वा दोन कोटी रुपये अद्यापही संस्थेला मिळालेले नाहीत. ही जागा विकल्यानंतर काही घटकांनी त्यावर आक्षेप घेतल्याने तसेच सरकारी वटहुकूमामुळे खरेदीदाराचे नाव या जागेवर लागण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, जागेचे राहिलेले पैसे वसूल करण्यास संचालक मंडळ हतबल ठरले. त्यामुळे संचालक मंडळ व सभासद यांच्यात यावेळी जुंपली होती. 'हे पैसे कधी व कसे मिळवणार?' असा जाब पंढरीनाथ मोरे यांनी विचारला. तर मनोज बुरकुल यांनी 'एवढी मोठी सवलत देण्याची गरज नव्हती', असे मत मांडत संचालक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले. त्यावर संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी 'हा पैसा व्याजसकट मिळवून आणू', असे आश्वासन दिले. यावरून हा वाद निवळला. अॅड पी. आर. गिते यांनी 'संचालक मंडळ संस्थेच्या हितासाठी कार्य करते की निविदाधारकांच्या हितासाठी?' असा प्रश्न उपस्थित केला. निविदाधारकांसंबंधी व होणाऱ्या करारासंबंधी कायदेशीर बाबी तपासून अंतिम निर्णय घेण्याची सूचना त्यांनी यावेळी संचालकांना दिली. तसेच कोणत्याही कारणाने संस्थेचे नुकसान होता कामा नये, याची खबरदारी घेण्याची सूचना दिली.

तसेच किशोर सूर्यवंशी शाळेसमोर असलेली जागा कॉलेजसाठी विकत घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच कॉलेजसाठी सिन्नर येथील जागा सुचविण्यात आली. सर्व सभासदांच्या संमतीने ही जागा पाहून निश्चित करायचे सभेत ठरले. याशिवाय इंग्लिश मी‌डियम पब्लिक स्कूल सुरू करणे, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज सुरू करणे, संस्थेच्या माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध करुन देणे. शहरालगत नवीन जागा खरेदी करणे आदी योजनांना मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मागील सभेचे इतिवृत्त वाचून यावेळी मंजूर करण्यात आले. अशोक कातकाडे, रामनाथ कातकाडे यांनीही सभेत सहभाग घेतला. नगरसेवक दामोदर मानकर यांनी संस्थेचे कार्य पारदर्शकपणे सुरू असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगरसेवक तानाजी जायभावे, संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५३ सहकारी संस्था बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सहकार खात्याने केलेल्या सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात एकूण २०३ संस्थांपैकी एकूण ५३ सहकारी संस्था कागदावर किंवा बंद असल्याचे आढळून आले आहे. लेखापरीक्षण न झालेल्या व अनेक दिवसांपासून कामकाज बंद असणाऱ्या कळवण तालुक्यातील या बंद संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली आहे.

सहकार विभागातर्फे जून ते ऑक्टोबर या कालावधीत सहकारी संस्थांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये ज्या संस्थांचे लेखापरीक्षण झालेले नाही, तसेच ज्यांचे अनेक दिवसांपासून कामकाज बंद आहे, अशा ५३ संस्था आढळून आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश आहे. त्या संस्थांच्या अनेक उघडकीस आल्या आहेत. काही संस्थांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये, तर काहींच्या

खात्यात काहीच रक्कम शिल्लक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील या ५३ सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. त्यांना अवसायनाच्या अंतरिम नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर या सहकारी संस्थेने सहकार खात्याकडे उत्तर सादर करायचे आहे.

बंद ५३ संस्थांचे अंतरिम आदेश काढले आहेत व २० संस्थांचे अंतिम आदेश काढण्यात आले आहेत. उर्वरित संस्थांचे अंतिम आदेश काढण्याचे काम चालू असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सविता शेळके यांनी दिली. राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी यापूर्वीच बंद संस्थावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. राज्यातील हजारो संस्था बंद अवस्थेत असल्याने ही कार्यवाही केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सांसद आदर्श ग्राम योजनेला निधी द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत केली.

सांसद आदर्श ग्राम योजना महात्मा गांधी यांच्या विचारधारेतून व पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेली आहे. मोदी यांनी योजनेची घोषणा जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीला (११ ऑक्टोबर २०१४) केली. गावातील नागरिकांचा वैयक्तिक, सामाजिक व आर्थिक विकास करणे हा योजनेचा उद्देश आहे. खासदार गोडसे यांनी अंजनेरी गावाची निवड या योजनेसाठी ५ नोव्हेंबर २०१४ ला केली. १५ जून २०१५ ला झालेल्या बैठकीत ग्रामविकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये १८१ गावे समाविष्ट होती. गेल्या पाच डिसेंबरला झालेल्या बैठकीत १८१ पैकी काही कामे एकत्रित करण्यात आली व काही कमी करण्यात आली. १८१ पैकी ८० टक्के कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या नव्हत्या. त्याबद्दल सरकारकडून सांगण्यात आले की, या योजनेसाठी संबंधित विभागाकडे निधी नाही.

त्यामुळे या योजनेंतर्गत केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने निधी उपलब्ध करावा अशी मागणी खासदार गोडसे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-भाजपात चुरस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी आज होत असलेल्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले शिवसेना-भाजप मित्रपक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे सेनेच्या एका सदस्याचे मत निर्णायक ठरणार आहे.

शिवसेनेने अंजना मधुकर कडलग आणि सिंधू दत्ता मधे असे दोन अर्ज दाखल केले आहेत. तर, भाजपने विजया दीपक लढ्ढा यांचा अर्ज दाखल केला आहे. सेना गटात आठ सदस्य आहेत, तर भाजप गट नऊ सदस्यांसह सहलीला गेला आहे. यामध्ये बहुमतासाठी असलेले सेना सदस्य संतोष कदम हे भाजपच्या गोटात आहेत. यामुळे ते त्यांच्या सोबतच राहणार असा ठाम विश्वास समर्थक व्यक्त करीत आहेत.

शिवसेनेने ही लढत प्रतिष्ठेची केली असल्याचे दिसून येत आहे. भाजप गटासमवेत असलेल्या संतोष कदम यांच्यासाठी खासदार हेमंत गोडसे हे जिल्हास्तरीय नेत्यांसमवेत ठाण मांडून बसले आहेत. अर्थात संतोष कदम यांनी आपण पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीपासून विरोधात असलेल्यांसोबत जाणार नाही असे वारंवार स्पष्ट केल्याने पेच निर्माण झाला आहे. भाजपातील सदस्य देखील सहा महिन्यापूर्वी भाजपाच्याच उमेदवाराचा पराभव करून सत्तेत आल्याने त्यांच्याबाबत भाजपास ममत्व नसल्याचे जाणवतेे. दोन्ही पक्षातील जिल्हास्तरीय नेत्यांनी पस्परांना शह देण्यासाठी ही निवड प्रतिष्ठेची केली आहे. सहा महिन्यापूर्वी मनसे आणि राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष नेस्तनाबूत झाले. सेना-भाजपचे संख्याबळ वाढले. मात्र, यामुळे सेना आणि भाजप दोन्ही पक्षात अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. आज त्र्यंबक पालिकेवर भगवा फडकणार की भाजपची सत्ता कायम राहणार याचीच उत्सुकता लागली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या संघर्षाची नांदी झाली होती.

पोलिस यंत्रणा सज्ज

नगराध्यक्षांची आजची निवडणूक चर्चेची झाली असून, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. नगरपालीका परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच बॅ‌रिकेडिंग केले आहे. जास्तीची कुमक मागविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा निर्यातमूल्य कमी करण्यास उशीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कांदा निर्यातमूल्य कमी करण्यास आपणास उशिरा यश आले असले तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण नेहमीच संसदेत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आगामी काळात देखील शेतकरी हाच केंद्रबिंदू नजरेसमोर ठेवून केंद्र शासनाच्या माध्यमातून कामकाज करण्यासाठी आग्रही भूमिका घेऊ, असा आशावाद खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

येथील कसमादे कृषी प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपा जेष्ठ नेते सुरेश पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, भाजपा नेते डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विलास बच्छाव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड, संजय सोनवणे उपस्थित होते.

खासदार चव्हाण पुढे म्हणाले की, तालुकास्तरावर उभारण्यात आलेले कृषी प्रदर्शन अत्यंत सुंदर आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे व शेती उपयुक्त तंत्रज्ञान ग्रामाीण पातळीवर उपलब्ध करून देण्याचा संयोजकांचा मानस निश्चितपणे कौतुकास्पद आहे. यामुळे शेतक-यांना एकाच छताखाली विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन मिळाले.

याप्रसंगी डॉ. विलास बच्छाव, संजय चव्हाण, लालचंद सोनवणे यांची भाषणे झाली. यावेळी कसमादे परिसरातील गुणवंत शेतकऱ्यांना गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संयोजक नंदकुमार शेवाळे, भूषण निकम यांनी स्वागत व आभार व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरकरांच्या कॅलेंडरची ‘गुगल’ने घेतली दखल

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

चित्रकार नयन नगरकर यांनी आपल्या रेखाचित्रातून गुगल नावाच्या मानवाकृती बरोबर सरमिसळ करून 'इन्वोलमेंट विथ गुगल' या संकल्पनेवर आधारित निवडक १२ रेखाचित्रांचे कॅलेंडर तयार केले आहे. याची दखल गुगल कार्यालयाने घेतली आहे. त्यांचे कॅलेंडर गुगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

वाढत्या वयाबरोबर काहीतरी चांगले करण्याची संकल्पना प्रत्येक कलाकाराच्या मनात असते. अशीच एक संकल्पना घेऊन पर्यावरणप्रेमी चित्रकार नयन नगरकर प्रत्येक चित्रातून निसर्गाला जपता यावे यासाठी प्रयत्न करीत असतात. पर्यावरणाचे संवर्धन कसे करावे यासाठी ते विविध ठिकाणी सादरीकरण करतात.

या वेळी त्यांनी ही १२ रेखाचित्रे तयार केली आहेत. या कॅलेंडरचा उद्देश येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये माणसाने निसर्ग जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा हा आहे. हे कॅलेंडर नव्या वर्षामध्ये निसर्गाला हानी पोचवणाऱ्या वस्तूंचा वापर टाळण्याचा विचार देणार आहे. मानवाकृती छटा आपल्या संकल्पनेतून साकारल्या आहेत. यात महत्त्वाचे सण-उत्सव तारखेजवळ न दाखवता स्वतंत्रपणे दाखविण्यात आले आहेत. या रेखाचित्रांचे तसेच कॅलेंडरचे प्रदर्शन गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे भरविण्यात आले आहे. नाशिककरांना या प्रदर्शनाचा लाभ सोमवारपर्यंत (दि. २८) घेता येणार आहे.

माणसाने निसर्गासाठी काहीतरी करावे ही इच्छाशक्ती जोपर्यंत कृतीत उतरत नाही तोपर्यंत निसर्गाचा ऱ्हास थांबणार नाही. गरजेपेक्षा जास्त कमवून राजा होण्यापेक्षा निसर्गाला जपून निसर्गराजा होऊ या.

- नयन नगरकर, पर्यावरणप्रेमी चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतमालाचे पैसे आडत दुकानातच द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व्यापाऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, कांदा विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना आडत दुकानातच देण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

कळवण बाजार समितीत कांदा विक्रीचे पैसे ३० नोव्हेंबरपासून २०१५ रोख स्वरुपात मिळत असले तरी कांदा व्यापाऱ्यांचे खळे, आडत दुकान यातील अंतरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांना विक्री केलेल्या कांद्याचे पैसे घेण्यासाठी नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. काही व्यापारी बाजार समितीच्या शेतकरी निवासात अदा करतात, तर काही व्यापारी बाजार समितीच्या कार्यालयात अदा करतात. त्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसते. तसेच, शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जातो. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कांदा व्यापाऱ्यांनी आडत दुकानातच पैसे अदा केल्यास सर्वांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच, किरकोळ कारणावरून अर्ध्यावर कांद्याचे लिलाव व्यापारी कोणतीही

पूर्वसूचना न देता बंद करीत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. तरी ठोस कारणाशिवाय लिलाव बंद ठेवू नये व निर्धारित वेळेत नियमित कांद्याचे लिलाव करण्यात येऊन शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळावे. याबाबत बाजार समितीच्या व्यवस्थापनाबरोबरच जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक यांनी वेळेत लक्ष घालावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे.

कळवण बाजार समितीचा कारभार सुधारला असला तरी काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. शेतक-यांची हेळसांड होऊ नये, यासाठी रोख पैसे बाजार समितीतीच मिळतील, अशी व्यवस्था करायला हवी. तसेच शेतकरी व शेतमालाच्या सुरक्षेबाबतही उपाय योजण्याची गरज आहे, असे पगार यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कलाकार काल्पनिक पात्रात जगतो'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलाकार हा खोटे आयुष्य जगणारी व्यक्ती असतो. तो नेहमी खोटे पात्र व खोट्या विश्वात रमलेला असतो, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था व समाज सहाय्यक संस्थेच्या ४३ व्या वर्धापन समारंभ परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकचे सन्मार्ग मित्र या मुखपत्राचे पाहुण्यांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या वतीने वैदिक परंपरा क्षेत्रातील भालचंद्र शास्त्री गोडसे,संगीत क्षेत्रातील रामाकांतजी परांजपे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.मीनाताई बापये, सामाजिक क्षेत्रातील शैला उघाडे यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.

याप्रसंगी सदगुरु श्रीराम महाराज यांची प्रमुख उपस्थित होती. या पुरस्कारांचे माझ्या हस्ते वितरण म्हणजे हा माझा सत्कार आहे, असे मनोगत पोंक्षे यांनी व्यक्त केले.

सर्व सत्कारार्थींनी त्यांच्या अनोख्या शैलीत संस्थेचे आभार मानले. गोडसे यांनी वैदिक पद्धतीने, परांजपे यांनी अनोख गीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय भाषणात गणेश गोखले यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. स्वतंत्रते भगवती या कलाविष्काराचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. स्वागत उदय कुमार मुंगी यांनी केले. आभार अजित चिपळूणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद गांधी, सचिन दीक्षित, भालचंद्र दाते आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅटरी चोरांना रोखण्याचे आव्हान

$
0
0

गेल्या आठवड्यात पांडवलेणी परिसरात एकाच रात्री २० पेक्षा अधिक गाड्यांच्या बॅटरींची चोरी झाली होती. आता गंगापूर शिवारातील शिवाजीनगर भागात एकाच ठिकाणी पाच बॅटरी चोरट्यांनी लांबविल्या आहेत. यामुळे शहरात ठिकठिकाणी सक्रीय झालेल्या बॅटरीं चोरांवर पोलिसांनी अंकुश घालण्याची मागणी वाहनचालक व मालकांनी केले आहे. दरम्यान, गंगापूर पोलिस ठाण्यात बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको व सातपूर भागात गंगापूर-गोवर्धन, आनंदवली, कामगारनगर, सातपूरगाव, पिपंळगाव बहुला, अंबडगाव, चुंचाळे, कामटवाडे, मोरवाडी, पार्थडी गावांच्या शिवारातील शेतजमिनींवर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वसली आहे. त्यातच रेती, मुरुम, डबरचे व्यावसाय करणारे बहुतांश शेतकरी कुंटुंबातील आहेत. सध्या हे व्यावसायिक गाड्यांमधून चोरी जाणाऱ्या बॅटरीमुळे हैराण झाले आहेत. यात मालवाहतूक करण्यासाठी अनेकांनी स्वतः व्यवसाय म्हणून चारचाकी ट्रक घेतले आहेत. मोकळ्या जागेत किंवा घराजवळ लावण्यात येणाऱ्या ट्रकच्या बॅटरीजची चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे. सिडको, सातपूरच्या कामगार वस्तीत भुरट्या चोऱ्या रोजच होत असतात. पंरतु, आता बॅटरीजच्या देखील चोरी होत आहे. त्यामुळे या चोरट्यांवर अंकुश ठेवणार कोण असा सवाल गाडीचालक, मालक यांनी उपस्थित केला आहे. गेल्या महिन्यात पाथर्डी, पांडवलेणी परिसरात २० पेक्षा अधिक गाड्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लांबविल्या होत्या. आता गंगापूर शिवारातील शिवाजीनगर भागात काही महिन्यांपूर्वी चार गाड्यांच्या बॅटरी चोरट्यांनी चोरल्या. आता पुन्हा त्याच ठिकाणी उभ्या असलेल्या तीन गाड्यांच्या एकूण पाच बॅटरी चोरट्यांनी चोरी केल्याचे उघड झाले आहे. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात गाडी चालक रंगनाथ पुराणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

बॅटरी चोरट्यांचे रॅकेट? महागड्या गाड्यांमधील बॅटरी चोरून त्याची अन्यत्र विक्री करणाऱ्या टोळीचे मोठे रॅकेट सिडको आणि सातपूरमध्ये कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी ट्रकचालक व मालक यांनी केली आहेत.

गंगापूर, शिवाजीनगर पाझर तलावाच्या शेजारी अनेक वर्षांपासून ट्रक उभ्या केल्या जातात. तेथे कधी काही चोरी केले नाही. मात्र, आता तीन गाड्यांमधील पाच बॅटरीजची चोरी झाली आहे. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते. - रंगनाथ पुराणे, ट्रकचालक

अनेक शेतकरी रेती, खडी, डबर, बांधकाम साहित्य वाहतूक करतात. मात्र, ट्रकमालकांना बॅटरी चोरट्यांनी हैराण केले आहे. शहरात पोलिसांनी लक्ष देत बॅटरी चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. - संदीप बाहुले, ट्रकमालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण विद्यार्थ्यांना हवे योग्य मार्गदर्शन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शालेय जीवनातील विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती भरपूर असते. शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी खरे संशोधक म्हणून पुढे येथील, असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष बी. के. देवरे यांनी केले.

तिसगाव (ता. देवळा) येथील एल. व्ही. एच विद्यालयात देवळा तालुकास्तरीय चौदाव्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती केदा शिरसाठ, पंचायत समितीचे सदस्य अशोक बोरसे, बाजार समितीचे माजी सभापती कान्हू जाधव, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी, शिक्षण विस्तार अधिकारी सतीश बच्छाव, नंदू देवरे, विजया फलके, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जे. डी. सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, केंद्रप्रमुख हिरामण रौंदळ आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाचे प्रास्ताविक पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांनी केले.

विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष विनीत पवार यांनी मागील वर्षी शासन स्तरावरून विज्ञान प्रदर्शन आयोजनासाठी निधीची उपलब्धता लोकप्रतिनिधिंनी करावी, अशी सूचना मांडली होती. जिल्हा परिषदेतील देवळा तालुक्यातील लोकप्रतीनिधिंनी एक लाख रुपये विशेष निधी म्हणून मंजूर केला. मात्र तो चुकून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाला. त्यामुळे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी हा निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या वर्षापासून तालुकास्तरावर विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. तसेच यावर्षी जिल्ह्यातून पहिलीच विज्ञान अविष्कार पुस्तिका अध्यापक संघाने तयार केली असल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले. विज्ञान प्रदर्शन आयोजनासाठी गावाने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images