Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हॅपी ख्रिसमस !

$
0
0

टीम मटा येशू जन्मोत्सवानिमित्त शहरातील चर्च विद्युत रोषणाईने झगमगली आहेत. तर मध्यरात्री ख्रिश्चन बांधवांमधून गुंजणारे सामूहीक प्रार्थनेचे स्वर , धर्मोपदेश, संगीत महाविधी, संगीत सहभागिता आदी उपक्रमांनी ख्रिसमस जल्लोषात साजरा करण्यात आला.

प्रभू येशूच्या स्वागतासाठी गुरूवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने शहरातील आसमंत उजळून निघाले होते. या वातावरणात मध्यरात्री गंभीर आवाजात कानावर पडणारे प्रार्थनेचे स्वर आणि सर्वत्र मंगल घडावे या उद्देशाने करण्यात आलेली सदभावना प्रार्थना यामुळे शहरातील वातावरण प्रफुल्ल‌ित बनले होते.

नाशिकरोड परिसरातील बाळ येशू गिरीजाघर, शरणपूर रोडवरील सेंट आंद्रीया चर्च, त्र्यंबक नाका येथील होली क्रॉस चर्च, नेहरू नगर परिसरातील बाळ येशू मंदिर, इंदिरा नगर परिसरातील जॉर्ज चर्च, वावरे लेन परिसरातील थॉमस चर्च आदी प्रार्थनास्थळांमध्ये येशू जन्मसोहळा साजरा झाला. गुरूवारी सायंकाळच्या सुमाराला ख्रिश्चन बांधवांचा बाप्तिस्मा विधी झाल्यानंतर शहरातील सुमारे ११ चर्चमध्ये येशू जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विविध चर्चमध्ये तेथील धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली 'मिस्सा' प्रार्थना करण्यात आली. यावेळी भेटवस्तू, चॉकलेट्स, केक चे वाटप करण्यात आले.

जागोजागी उभारले देखावे

नाताळ निमित्ताने शहरातील विविध ११ चर्चच्या परिसरात येशू जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहे. याशिवाय समाजबांधवांची महिला मंडळे, ज्येष्ठ नागरीकांची मंडळे, तरूणांचे संघटन, शाळा आदी माध्यमातून ख्रिस्त जन्मोत्सव नाट‌िकेचे सादरीकरण, नाटक, विविध स्पर्धा, कॅरॉल (नाताळची गाणी) यांचे सादरीकरण करण्यात आले.

खरेदीकडे कल

नाताळाच्या सुट्ट्यांमुळे व वातावरणातील वाढता गारवा याचा आनंद घेण्यासाठी नाशिककरांची पाऊले सध्या दिवाळीनंतरही खरेदीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकरीची कपडे, घराचे पडदे तसेच गृहपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठमोठ्या सेलमध्ये गर्दी होताना दिसत आहे. डोंगरे वस्तीगृह, सीबीएस, अंबड, सातपूर, शालीमार, मेनरोड तसेच विविध मॉलमध्ये क्रिसमसनिमित्त ऑफर सेलही भरविण्यात आला आहे.

मनोरंजन अन् पर्यटनही

नाताळाच्या सुट्यांमुळे शहरातील विविध चित्रपटगृह, कालिदास नाट्यमंदिर, परशुराम सायखेडकर आदी नाट्यगृहे हाऊसफुल्ल झाल्याचे दिसत आहेत. विविध फेस्टिव्हल व सांस्कृतिक मेजवानीमुळे सुटीचा आनंद द्विगुणित झाला आहे. तर थंडी व त्यातच नाताराळाच्या सुटीमुळे नाशिककर पर्यटनांसाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आठवणीतला चहा’ बनविणार नॉस्टॅल्जिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
चहा हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. त्याच्याभोवती अनेक आठवणी पेरून ठेवलेल्या असतात. चहा घेतानाच अनेकांची मैत्री जमलेली असते, तर चहा घेतानाच अनेकांची भांडणेही झालेली असतात. कॉलेजलाईफमध्ये तर हा चहा म्हणजेच सर्वस्व असतो. त्याच्याशी अनेक भावना निगडीत असतात. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आज 'जनस्थान' ग्रुपतर्फे 'आठवणीतला चहा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कॉलेज जीवन म्हटले की अनेकांना आठवते ती सलीम मामूची चहाची टपरी. अनेकजण या टपरीवर चहाचा आस्वाद घेत गप्पाबरोबर कडू गोड आठवणी शेअर करत होते. मग त्या प्रेमाच्या गोष्टी असो अथवा राजकीय, अनेकांनी या सलीमच्या चहाच्या आस्वादाने आपली स्वप्ने रंगवली आणि त्यात यशस्वी झाले, काहीजण अजूनही वाटचाल करीत आहेत.

याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आज, शनिवार २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत नाशिकमधील कलावंतांच्या व्हॉटसअॅप ग्रुपतर्फे हे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या आठवणीचा चहा घेण्यासाठी सकाळी ८ ते ११ या वेळेत विनामूल्य चहा देण्यात येणार असून, उपस्थित राहावे असे आवाहन जेष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, कवी किशोर पाठक, कवी कैलास पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, विनोद राठोड, स्वानंद बेदरकर, अभिनेत्री लक्ष्मी पिंपळे, पल्लवी पटवर्धन, प्रिया तुळजापूरकर, जनस्थान ग्रुपचे मुख्य अभय ओझरकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आर. जे. भूषण मटकरी यांची असून या आठवणीतल्या चहासाठी कुलकर्णी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि जी ९ कॅफेचे विशेष सहकार्य लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक @ ५.४ अंश

$
0
0

वर्षभरातील निचांकी तापमानाची नोंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

थंडीचा पारा दिवसेंदिवस घसरतच असून शुक्रवारी जिल्ह्यात अवघ्या ५.४ अंश सेल्सियसची नोंद झाली. विशेष म्हणजे वर्षभरातील सर्वात निचांकी तापमानाचा रेकॉर्ड आजच्या थंडीने ब्रेक केला. जिल्ह्यात ११ जानेवारी २०१५ रोजी ५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, शुक्रवारी निफाड तालुक्यात ५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे दिवसभर थंड हवा होत असल्याने थंडीचा हा कडाका एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांचा नाशिककडे ओघ वाढला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात होते आहे. थंडीचा कडाका शुक्रवारी देखील कायम राहिला. किंबहुना गुरूवारपेक्षाही एक अंश सेल्सियसने तापमान घसरल्याने नागरिकांना हुडहुडी भरली. जानेवारी २०१५ मध्ये नाशिक जिल्ह्यातील तापमान ६ अंश सेल्सियसच्या खाली घसरले होते. ११ जानेवारीला ५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, शक्रवारी हे तापमान त्याहूनही खाली घसरले. शहरात आणि जिल्ह्यात अवघ्या ५.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

निफाडमध्ये थंडीचा कहर

निफाडमध्ये तर थंडीने कहर केला असून शुक्रवारी ५ अंश सेल्सियसपर्यंत घसरलेल्या तापमानाने नागरिकांची परीक्षा पाहिली. जिल्ह्यात कमाल तापमानही घसरले असून २४.९ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. थंडीचा पारा घसरतोय तसे दाट धुके पसरत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. नाताळच्या सुट्या आणि थंडीचा कडाका यांमुळे नाशिक जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवती पोलिसाची टवाळखोराशी झुंज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड गर्भवती महिलेच्या असहायतेचा फायदा घेत मध्यरात्री एक रांगडा गडी तिच्या पुढे तिची छेड काढण्यासाठी उभा राहिला. गर्भवती महिलेची बहिण आणि बहिणीची दोन लहान मुलांचा प्रतिकार टवाळखोरासमोर केविलवाणा ठरला. गर्भावस्थेमुळे आलेल्या शारीरिक मर्यादांमुळे ती महिला शांत असते. मात्र टवाळखोराचा उपद्रव वाढल्याने तिच्यातील पोलिस उपनिरीक्षक जागी झाली अन् तिने त्याला अद्दल घडवित पोलिसांच्या ताब्यात देते. हा सर्व प्रकार घडला नाशिकरोड रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी मध्यरात्री. 'जेथे महिला पोलिस अधिकारीच सुरक्षित नाहीत तेथे सामान्य महिलांची काय कथा' असा प्रश्न या घटनेमुळे मात्र उपस्थित झाला आहे.

२४ डिसेंबरच्या पहाटे अडीचला नंदीग्राम एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वेस्थानकात आली. अन्य प्रवाशांप्रमाणेच ही महिला पोलिस उपनिरीक्षक, तिची बहीण आणि दोन लहान मुले स्थानकावर उतरली. ही महिला परभणी पोलिस दलात आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये कामानिमित्त त्या नाशिकमध्ये आल्या आहेत. रेल्वेतून उतरल्यानंतर थंडीचा कडाक्यातून सुटकेसाठी ते सर्व चहा टपरीवर गेले. त्याचवेळी तेथे नेहरूनगर परिसरात राहणारा रंजन संजय पगारे (२५) हा टवाळखोर आला. त्याने गर्भवती महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न करू लागला. तिने त्याला एकदोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र 'ये अपना इलाका है' अशी डायलॉगबाजी करीत तो तिच्यावरच दादागिरी करू लागला. त्याने तिची छेड काढणे सुरूच ठेवले. या महिलेच्या बहिणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिला मारहाण केली. त्या सर्वांनी आरडाओरडा करून आसपासच्या नागरिकांची मदत मागितली. मात्र कुणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. अखेर गर्भावस्तेमुळे आलेल्या मर्यादा विसरून तिने त्याला प्रखर विरोध सुरू केला. तो तिला अधिकच त्रास देऊ लागला. मावशीला वाचविण्यासाठी त्या दोन लहानग्यांनी त्या टवाळखोराचे हातपाय पकडले. मात्र त्याने त्या लहानग्यांनाही लाथाडले. त्या महिला पोलिस उपनिरीक्षकाने त्याचे हात पकडले. त्याचवेळी ती लहान मुले रेल्वे स्थानकात गस्त घालणाऱ्या लोहमार्ग पोलिसांना घेऊन आले. पोलिसांना पहाताच पगारे त्या महिलेच्या हाताला झटका देऊन पळू लागला. मात्र त्याचवेळी पोलिसांनी त्याला पकडून नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी रंजन पगारे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्ह्याचा कुस्ती संघ जाहीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नाशिक जिल्हा कुस्ती संघातर्फे कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय चाचणी कुस्ती स्पर्धेतून नाशिक जिल्ह्याचा वरिष्ठ व कुमार गटातील कुस्ती संघ जाहीर करण्यात आला. संघात भगूरमधील सर्वाधिक २७ मल्लांचा समावेश आहे. नाशिकचा संघ नागपूर येथे ६ ते १० जानेवारीत होणाऱ्या ५९ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होईल. नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरक्षनाथ बलकवडे, राज्य कुस्तीगीर संघटनेचे प्रतिनिधी तथा उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी, तालीम संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव उत्तम दळवी, कार्याध्यक्ष दिनकर पाटील, तसेच स्थानिक आयोजक डॉ. भाऊसाहेब मोरे, बाळासाहेब जाधव आदी या वेळी उपस्थित होते. चेतक बलकवडे, विजय लोणारी, विशाल बलकवडे, पिंटू तांबोळी, वाळू नवले, अरविंद गवळी, लक्ष्मण डावरे, प्रवीण सूर्यवंशी, रामचंद्र पाळदे, गणपत चुंबळे, दीपक पाटील पंच होते.

नाशिक जिल्ह्याचा कुस्ती संघ

माती विभाग (वरिष्ठ) : ५७ किलो : प्रथम- कृष्णा भगत (भगूर), द्वितीय- श्याम बागूल (येवला) ६१ किलो : प्रथम- अविनाश सहाणे (भगूर), द्वितीय- तनवीर अन्सारी (येवला) ६५ किलो : प्रथम- धर्मा शिंदे (भगूर), द्वितीय- राहुल बेंडके (भगूर) ७० किलो : प्रथम- संजय आहेर (निफाड), द्वितीय- राहुल जाधव (भगूर) ७४ किलो : प्रथम- राहुल सदगीर (भगूर), द्वितीय- नवनाथ भोसले (मालेगाव) ८६ किलो : प्रथम- सचिन सोनवणे (भगूर), द्वितीय- सद्दाम रंगरेज (येवला) ९८ किलो : प्रथम- इम्रान खान (मालेगाव), द्वितीय- भूषण पाटील (मालेगाव) केसरी गट : प्रथम- रोहन लोणारी (येवला), द्वितीय- अनिल वाघचौरे (नांदगाव)

गादी (मॅट) विभाग (वरिष्ठ) : ५७ किलो : प्रथम- ज्ञानेश्वर नाठे (भगूर), द्वितीय- अशोक जाधव (मालेगाव) ६१ किलो : प्रथम- नितीन गायकर (भगूर), द्वितीय- प्रवीण बीडगर (भगूर) ६५ किलो : प्रथम- प्रशांत उगले (भगूर), द्वितीय- सागर माळोदे (भगूर) ७० किलो : प्रथम- रमेश कुकडे (भगूर), द्वितीय- हरीश बनसोडे (येवला) ७४ किलो : प्रथम- विजय सुरुडे (भगूर), द्वितीय- आसीफ सय्यद (मालेगाव) ८६ किलो : प्रथम- लक्ष्मण गवळी (येवला), द्वितीय- सचिन गायकर (इगतपुरी) ९८ किलो : प्रथम- हर्षवर्धन सदगीर (भगूर), द्वितीय- नीलेश मोरे (मालेगाव) केसरी गट : प्रथम- गौरव गणोरे (भगूर)

कुमार गटातील कुस्ती संघ ४२ किलो : प्रथम- चेतन गुंजाळ, द्वितीय- दिनेश बिडगर (भगूर) ४६ किलो : प्रथम- विकास मोरे (भगूर), द्वितीय- हर्षद काशीद (त्र्यंबकेश्वर) ५० किलो : प्रथम- मंगेश चव्हाण (भगूर), द्वितीय- शरद बिन्नर (भगूर) ५४ किलो : प्रथम- कुणाल वाडेकर (भगूर), द्वितीय- ज्ञानेश्वर नाठे (भगूर) ५८ किलो : प्रथम- संतोष भडांगे (त्र्यंबकेश्वर), द्वितीय- मनोहर लिलके (भगूर) ६३ किलो : प्रथम- राहुल कापसे (भगूर), द्वितीय- राहुल बेनके (भगूर) ६९ किलो : प्रथम- विशाल बनसोडे (येवला), द्वितीय- विनायक सांगळे (नांदगाव) ७६ किलो : प्रथम- राहुल जाधव (भगूर), द्वितीय- लखन सोमासे (नांदगाव) ७६ प्लस : प्रथम- रोहन लोणारी (येवला), द्वितीय- गणेश पिंगट (नांदगाव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौदागर बलकवडेने जिंकली सुकेण्यातली कुस्ती स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबे-सुकेणे

येथील राजे संभाजी मैदानावर सुरू असलेला स्वर्गीय माधवराव पहिलवान क्रीडामहोत्सव अंतिम टप्प्यात आला असून, कुस्ती स्पर्धेत भगूरच्या सौदागर बलकडवडेने विजेतेपद मिळवले. त्याला माधवराव पहिलवान केसरी किताबाने गौरविण्यात आले. महोत्सवात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा सुरू असून, स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी दुपारी साडेचार वाजता म्हाळसेची भूमिका करणारी अभिनेत्री सुरभी हांडे हिच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संयोजक बाळासाहेब जाधव यांनी दिली.

क्रीडामहोत्सवात कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, मॅरेथॉन आदी स्पर्धा होत आहेत. स्वर्गीय माधवराव पहिलवान केसरी कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील मल्लांनी सहभाग घेतला. भगूरच्या सौदागर बलकवडेने स्वर्गीय माधवराव पहिलवान केसरी किताब पटकावला. त्याला चांदीची गदा व सात हजार रुपयांच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले.

जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत मखमलाबाद व भोसला मिलिटरी स्कूलच्या धावपटूंनी सर्वाधिक पारितोषिके जिंकली. धावपटू मोनिका आथरे हिच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. या वेळी बाळासाहेब जाधव, पिंपळगाव पोलिस ठाण्याचे पंकज भालेराव, भोसला मिलिटरीचे क्रीडाशिक्षक काळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुदाम जाधव, हरीश वाघ, अनुपमा जाधव आदी उपस्थित होते. छगन जाधव यांनी प्रास्ताविक केले. चिंतामण जाधव, अनिल जाधव, आनंदराव जाधव, विजय जाधव, शरद जाधव, सुधीर जाधव, सचिन टिपाले यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप प्रवेश सोहळ्याला ग्रहण

$
0
0

पायाला दुखापत झाल्याने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा नाशिक दौरा रद्द
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोठा गाजा वाजा करीत भाजपने रविवारी (२७ डिसेंबर) आयोजित केलेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याला ग्रहण लागले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पायाला दुखापत झाल्याचे कारण देत भाजपने हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आता हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे. भाजपातील अंतर्गत धुसफूसमुळे हा सोहळा रद्द झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपचा हा प्रवेश सोहळा स्थगित झाल्याने मनसेला मात्र, काही काळासाठी का होईना दिलासा मिळाला आहे.

महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला लागले असून, नाशिकमध्ये आता फोडाफोडीचे व पक्षांतराचे राजकारण सुरू झाले आहे. त्याची सुरुवात भाजपने केली असून, रविवारी भाजपतर्फे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात मनसे, काँग्रेसच्या काही नगरसेवकांसह अपक्षही पक्षप्रवेश करणार होते. या सोहळ्याची जय्यत तयारीही भाजपच्या वतीने सुरू होती. भाजपवासी झालेल्या मनसेतील एका नेत्याने मनसेला खिंडार पाडण्यासाठी मोठी रणनिती आखल्याने या प्रवेश सोहळ्याकडे इतर पक्षियांचेही लक्ष लागले होते.

या प्रवेश सोहळ्याचीही तयारी व आयोजनही पूर्ण झाले होते. एकीकडे या सोहळ्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे भाजपवासी झालेल्या या नेत्याचे वजन पक्षात वाढण्याच्या भीतीने भाजपमध्येही चलबिचल सुरू होती. त्यासाठी प्रवेशकर्त्या नगरसेवकांची यादीच बाहेर फोडण्यात आल्याने काही पक्ष सावध झाले होते. त्यामुळे प्रवेशकर्त्या नगरसेवकांची संख्या रोडावली होती. त्यातच शुक्रवारी हा प्रवेश सोहळाच स्थगित करण्याची घोषणा भाजपतर्फे करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना नाशिकचा दौरा पुढे ढकल्याचे कारण भाजपच्या नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे प्रवेशकर्त्या नगरसेवकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. या सोहळ्याचा सर्वात मोठा फटका मनसेला बसणार होता. मात्र दानवेंच्या दौरा रद्दमुळे काही काळासाठी मनसेला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

भाजपमध्येच शह-काटशह

रविवारी होणाऱ्या या प्रवेश सोहळ्यावरून भाजपमध्येच गटबाजी सुरू झाली होती. नगरसेवकांच्या या प्रवेश सोहळ्याने एका गटाकडून थेट एका आमदारालाच आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यावरून पक्षातील गटबाजी वाढून हा वाद थेट प्रदेश पातळीवरही पोहचला होता. त्यामुळे या प्रवेश सोहळ्याने वरिष्ठांचीही डोकेदुःखी वाढली होती. शुक्रवारी दानवेंनी पायाची दुखापत असतानाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत जालन्यात कार्यक्रम घेतला. मात्र, ऐनवेळी त्यांनी नाशिकचा दौरा रद्द केला. यामागे पक्षातील शह-काटशह असल्याची चर्चा पक्षांतर्गत रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जवसुलीवरून दराडेंची कोंडी

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी सोडून शिवसेनावासी झालेल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, सक्तीच्या कर्जवसुलीवरून अध्यक्षांना घेरण्याची तयारी केली आहे.

दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केल जात असल्याचा आरोप खुद्द माजी मंत्री छगन भुजबळ यांनीच विधानसभेत केला होता. मात्र, भुजबळांचा हा आरोप खोडून काढत असा प्रकार झाला नसल्याचा खुलासा दराडे यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादीने पुन्हा प्रत्युत्तर देत जिल्ह्यातील प्रत्येक विविध कार्यकारी सोसायटींमधील दहा शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी जप्ती पूर्वीच्या अंतिम नोटिसा दिल्याचे उघडकीस आणले आहे. त्यामुळे दराडे विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटला आहे.

दराडे यांनी राष्ट्रवादी सोडून नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. दराडे यांनी थेट भुजबळांनाच येवल्यात आव्हान देण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे राष्ट्रवादीनेही थेट दराडेंनाच टार्गेट करीत त्यांच्या जिल्हा बँकेतील सक्तीची वसुली थेट विधानसभेत गाजवली. त्याला दराडेंनीही उत्तर दिले. शेतकऱ्यांचे कर्ज थकले म्हणून कुठलीही जप्तीची कारवाई केलेली नाही. मध्यम मुदतीचे कर्ज थकलेल्या जुन्या थकबाकीदारांना केवळ नोटिसा पाठवून कर्जवसुलीसाठी पाठपुरावा केला जात असल्याचा खुलासा काल दराडे यांनी केला होता. मात्र, येवला तालुक्यातील शेतकऱ्याला दिलेली अंतिम नोटिसीची प्रतच त्यांनी निदर्शनास आणून देऊन दराडे यांचा दावा खोटा असल्याचे राष्ट्रवादीने दाखवून दिले आहे. जिल्हा बँकेतील निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी यांनी माहे डिसेंबर २०१५ या महिन्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक विविध कार्यकारी सोसायटीमधील दहा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व १९६१ चे नियम १०७(३) नुसार जप्ती पूर्वीची अंतिम नोटीस पाठवली आहे. जप्ती पूर्वीच्या अंतिम नोटिसा म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज वसुलीची सक्ती नव्हे काय? असा सवाल अॅड. रवींद्र पगार यांनी केला आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून सलगपणे दुष्काळ आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक व इगतपुरी तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये शासनाने यावर्षी दुष्काळ जाहीर केलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंकुर फिल्म फेस्टिव्हलला अनोख्या उद्‍घाटनाने प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंकुर फेस्टिव्हलचे उद्‍घाटन प्रसिद्ध माहितीपट आणि चित्रपट निर्माती निष्ठा जैन यांच्या हस्ते करण्यात आले. उद्‍घाटन अनोख्या पध्दतीने करण्यात आले. यामध्ये तरूण-तरुणींनी एकत्र येत उमलते कमळ दाखविले होते. ते कमळ जेव्हा उमलले त्यात अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या प्रथम वर्षीचे झाड चार वर्षाचे झालेले दाखविण्यात आले. त्यासमोर पणती पेटवून आणि त्यात झाडाला पाणी टाकून हे उद्‍घाटन करण्यात आले.

निष्ठा जैन यांच्या हस्ते अंकुरच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या 'सिग्नेचर फिल्म' स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात जयेश आपटे यांनी दिग्दर्शन आणि निर्मित केलेल्या 'दैनंदिन व्यवहारातील दुर्लक्षित घटक' या फिल्मने प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देवून गौरवण्यात आले. त्यानंतर विजेती सिग्नेचर फिल्म आणि प्रसिद्ध 'गुलाबी गँग' माहितीपट दाखविण्यात आला.

सकाळी ११ वाजता फिल्म्स स्क्रीनिंगला सुरुवात झाली. यावेळी नाशिक येथे बनलेली 'कावळा' ही फिल्म दाखविली गेली. यामध्ये अंधश्रद्धा आणि चुकीच्या धार्मिक रूढीवर भाष्य केले गेले. एका बाजूस भुकेने कासावीस लहान मुल, तर दुसरीकडे पिंडदान करण्यासाठी कावळ्याची वाट पाहणारे लोक दाखविले आहे.

'काव्यकल्लोळ' यामधून नवीन प्रयोग केला असून, कविता ऐकवत प्रेम समजावून सांगितले. 'जमिनीतून' या फिल्ममध्ये रासायनिक खते कसे जमिनीची कस घालवता आणि शेतकरी कसा फसविला जातो हे वास्तव दाखवून फक्त भारतात दरवेळी एक लाख टन पेस्टीसाईड वापरले जाते हे वास्तववादी चित्रीकरण दाखविले. नववर्ष म्हणजे फक्त मजा नाही हे मिशन थर्टीफर्स्ट या फिल्ममधून दाखविले आहे. यामध्ये नांदगाव येथील तरूण उबदार कपडे हे गरीब लोकांना वाटून नववर्ष साजरे करतात हे दाखविण्यात आले. रक्तानुबंध ही सिकलसेल वर आधारीत फिल्म आहे.

फेस्टिव्हलमध्ये आज

आज २६ रोजी सकाळी १० वाजता फिल्म दाखवण्यास सुरुवात होणार आहे. त्यात वेटिंग फॉर पवित्र गोदा, सिंहस्थ, पराठा, तिसऱ्याचा लाभ, पेन, कोप, आई माझी रेणुका, दुर्गा अवतरली, इक नवी दिशा, लिंबू, डिमांड बट व्हाय. दुपारी २ नंतर ए रिक्वेस्ट, वापसी, ओह मिस्टेक, वातावरण, बाजारू. सायंकाळी ५.३० नंतर टुगेदर, एलेफंट, द सलुट टू द लेजंड राम थत्ते, द सलुट टू द लेजंड झोया साहेब, इमाजिंग बॉम्बे, नटराज भोजपुरिया, सस्ते मी मस्त, गाली, वाल्किंग इन द स्काय, द्वारका, राईट टू वॉटर, इन द मेक ऑफ हिल या फिल्म दाखविल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यवसाय करायचा असेल तर मागेल तेव्हा हप्ता द्यावाच लागेल, अशी धमकी देऊन दुकानातून जबरदस्तीने रोकड हिसकावणाऱ्या संशयितांवर सरकारवाडा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला अटक करण्यास पोलिसांना यश आले असून, त्याचे नाव गणेश भीमनाथ (२६,रा. मल्हारखाण) असे आहे.

गिरीश दीपक इसराणी (२८, रा. कॉलेजरोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मेहेर सिग्नलजवळ त्यांचे ए वन कलर लॅब नावाचे दुकान आहे. संशयित गणेश व त्याच्या दोन साथीदारांनी बुधवारी (दि.२३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास इसराणी यांना धमकावण्यास सुरुवात केली. दुकानाच्या गल्ल्यातील दीड हजार रुपये त्यांनी जबरदस्तीने हिसकावून घेतले. इसराणी यांनी गुरुवारी रात्री सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन संशयितांविरोधात तक्रार दिली.

अपघातात महिलेचा मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावरील दत्तमंदिर समोर कारने धडक दिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. रंजना शंकर कडाळे (२५, रा. गोपाळपाडा, ता. सुरगाणा) असे त्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी आडगाव येथील दत्तमंदिरासमोर कारने कडाळे यांना जोरदार धडक दिली. राजाराम गोरक्षनाथ माळोदे (रा. आडगाव) यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये कारचालक दिलीप सखाराम दळवी (वय ४८) याच्याविरोधात तक्रार दिली आहे.

वृध्दाचा मृतदेह आढळला

वृद्धाश्रमातून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी दारणा नदीपात्रात आढळून आला. प्रदीप बच्चुभाई पारी (वय ७५,रा. लॅमरोड, देवळाली कॅम्प, मूळ रा. मुंबई) असे त्या वृद्धाचे नाव आहे. भावाला भेटण्यासाठी जातो असे सांगून पारी रविवारी वृद्धाश्रमातून बाहेर पडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुसमटलेलं वादळ

$
0
0

>>अपर्णा क्षेमकल्याणी

हवेतील गारठा अनुभवण्यासाठी मी अशीच दुपारची नुसतीच बाहेर पडते. दिशाहीन चालत राहते. खूप चालून दमल्यावर एका इमारतीच्या भिंतीला मी डोळे मिटून टेकून उभी असते. थकवा गेल्यावर मी डोळे उघडते आणि माझी नजर सहज पायाशी जाते ती तिथेच तशीच थबकते. ईsss मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यापाशी उभी असते.

नशिबाने कचरा कोरडा असतो. हवेच्या झोताबरोबर कचऱ्यातली रद्दीची पानं इतस्ततः उडत असतात. मला स्वच्छ भारतासाठी दिलेला नारा आठवतो मग मी तो कचरा आवरायचं ठरवून रस्ताभर विखूरलेले रद्दीचे कागद गोळा करते. ही छापील रद्दी नसून हस्तलिखित रद्दी आहे हे डोळ्यांना जाणवल्यामुळे माझ्यातील फाजील उत्सुकता जागृत होते. आधी मी ते सगळे कागद गोळा करते. मला ते वाचायचे असतातच मात्र चेहऱ्यावर तसा आविर्भाव न आणता मी कुणाचं माझ्याकडे लक्ष नाही याची खात्री करुन घेण्यासाठी इमारतीच्या खिडक्यांकडे नजर टाकते. खिडक्या गारठून सुस्तावलेल्याच भासतात. तितक्यात इमारतीवरची 'वर्किंग लेडिज होस्टेल'ची पाटी मला दिसते. मी मनात शीळ घालते. अधिक आतुरते. हातातल्या कागदांचा ऐवज घट्ट सांभाळत रस्ता ओलांडून मी समोरच्या दत्त मंदिराच्या बागेत जाते. पटकन टेकते. मंदिरासमोर बसल्यामुळे की काय पण दुसऱ्याचं 'खाजगी' चोरुन वाचण्याचा गंड माझ्या मनाला येतो. मात्र ही टोचणी मी शिताफीनं परतवते आणि कुणीतरी वाऱ्यावर सोडून दिलेल्या भावना वाचायला लागते. हे कागद सलग नसतात कुण्या एकीचेही नसतात मात्र.

कागद १

मला शहरात राहून खूप मोठ्ठं झाल्यासारखं वाटतंय. इथे सगळंच निराळं आहे. माझ्यावर मी सोडून कुणाचाच वचक नाहीये. मी आता बुजत नाही. घरी गेले की बुजेल मात्र.

कागद २

तारीख २४ डिसेंबर २०१४

झाली संपत आली कैद. निव्वळ दहा महिने आणि मी परत माझ्या मुलांपाशी जाणार आज बदलीची फाईल योग्य त्या हातात पडली. चिरीमिरी झालीये. थोडक्यात भागलं नाहीच अखेर, पण असूदेत दहा महिन्यांनी मी माझ्या घरात असेल. धन्यवाद देवा.

कागद ३

दोन दिवसात मी सगळं आवरुन घेईन आई तू म्हणते त्याप्रमाणे घडू दे सगळं. मात्र त्यानंतर तू माझ्याशी आणि मी तुझ्याशी नजर मिळवू शकू का? आई, नेहमीप्रमाणे तू बोलणार नाहीस माहिती आहे मला. पण येतीये मी.

कागद ४

Every dogs comes his days! आलेत आलेत माझे दिवस आलेत. माझ्यावर हसतायेत मैत्रिणी.. हसू देत! रुसतायेत घरचे.. रुसू देत! कसे आले, कुणी आणले never mind.. मला एकच mind होतंय ते म्हणजे आजचा दिवस माझा आहे आणि यापुढचे दिवसही माझेच असतील... love you जिंदगी.

कागद ५

मी जाणार आहे. मी गेल्याचं कळेपर्यंत मी कुठल्याकुठे गेलेली असेल. माझ्यानंतर माझ्या सामानाचं.....

कागद ६

शिकणं गरजेचंच आहे का? नाहीतरी लग्नापर्यंत शिकून तू डोक्यावर पदर घेऊनच राहणार ना! मग कशाला सीएची एक सीट अडवतेस. मला कंटाळा आलाय या टोमण्यांचा. मी हुशार असणं xx जातीत जन्मणं आणि मला सीए करावसं वाटणं हे प्रमेय जुळण्यासारखं नाही का! कुणाशी बोलू?

कागद ७

हॉस्टेलमध्ये पेस्ट कंट्रोल करा.

कागद ८

मला फक्त बसून राहावसं वाटतं. अभ्यास होत नाही. कुणाशी बोलावं वाटत नाही. डिसेंबर महिना go back, home सिकनेस, go or come?

अंधार पडायला लागलाय... हे कागद एकत्र कुणी केले असतील? लिहिणारे हात आता कुठे असतील! त्यांना माहीत असेल का त्यांच्या भावनांना रस्त्यावर टाकून त्यांची वाट लावली गेलीये असंख्य प्रश्न आहेत. एकेक वादळ वाऱ्यावर सोडत मी दिशाहीन चाललीये.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल-ताशा स्पर्धेचाच वाजला ‘ढोल’

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

नाशिक : स्पर्धा समन्वयाचा अभाव आणि कमी सहभाग या कारणाने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेल्या नाशिक ढोलच्या माहेरघरात होणारी ढोल ताशांची स्पर्धा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली आहे. आज, २६ डिसेंबर रोजी होणारी ही फेरी आता पुढील वर्षी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे गणेशोत्सवात ढोल-ताशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, काहीच प्रवेशिका न आल्याने स्पर्धा रद्द करण्यात आल्या. या स्पर्धा आज, २६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा सहभाग कमी आल्याच्या नावाखाली स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावेळी मागील वेळेपेक्षा बक्षिसाची रक्कम वाढवून देण्यात आली तरीही सहभाग आला नाही. स्पर्धा समन्वयकांच्या म्हणण्यानुसार केवळ आठच एन्ट्री आल्याने या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या, तर स्पर्धेसाठी कार्यरत असलेल्या मुंबई कार्यालयात संपर्क साधला असता स्थानिक समन्वयाचा अभाव असल्याने स्पर्धा पुढे ढकलावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या स्पर्धेसाठी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बुक करण्यात आले होते. परंतु, तेथे फक्त क्रीडा स्पर्धाच होतील, असा नियम असल्याने ते ठिकाण नंतर रद्द करण्यात येऊन गुलालवाडी व्यायामशाळेत ही स्पर्धा होईल, असे जाहीर करण्यात आले. परंतु, गुलालवाडी व्यायामशाळेचे स्वत:चे ढोलपथक आहे व ते या स्पर्धेत सहभागी असल्याने आम्ही तेथे वाजविण्यासाठी येणार नाही असे इतर पथकांनी निक्षून सांगितले. त्यामुळे हे ठिकाण देखील रद्द करण्यात आले. आता ही स्पर्धा आठ जानेवारी रोजी गोदाघाटावर घेण्याचा निर्णय असल्याचे मुंबईहून सांगण्यात आले आहे.

भरघोस पुरस्कार असूनही प्रतिसाद मिळेना

प्राथमिक फेरीत प्रत्येक महसुली विभागातून दोन संघांची (प्रथम व द्वितीय) अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार होती. तसेच अंतिम स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते संघ घोषित करण्यात येणार असून, या संघांना शासनाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय संघांना अनुक्रम २५ हजार, १५ हजार रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार होते.

अंतिम फेरीत‌ील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना दीड लाख, एक लाख व ७५ हजार रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार होते. बक्षिसाची अशी भरघोस रक्कम असताना कोठे माशी शिंकली हे कळायला मार्ग नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहज अभिनयाने नटलेले ‘मॉन्टूकले दिवस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कित्येक वेळा म्हटले जाते, आयुष्य आनंदात जगायचं असेल तर आपल्यातले लहान मुल कायम जागे ठेवावे. पण रोजच्या जगण्यातल्या कटकटी, कामाचे ताणताणाव, आजूबाजूला घडणाऱ्या, मनाला त्रासदायक अशा गोष्टी, या साऱ्यात ते लहान मुल कुठे हरवून जाते कळतच नाही. पण, आजूबाजूला कोणी छोटा दोस्त मिळाला?, तर आयुष्यात किती बहार येईल हे 'मॉन्टूकले दिवस' मधून सांगण्यात आले.

मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संदेश कुलकर्णी लिखित 'मॉन्टूकले दिवस'चे अभिवाचन शुक्रवारी करण्यात आले. मोठे होताना आपल्यातले खूप कोवळे लहानपण घासून फेकून देत आपण मोठे होतो खरे पण, आपल्याच आत प्रत्येकाला एक 'मॉन्टू' हवासा असतो, ते असते आपलेच मूलपण. नैसर्गिकता, निरागसता, कोवळीक, सगळेच एकदम बेसिकमधे असण्याची मजा असते. तीन वर्षाचा मॉन्‍टू आणि त्याचा मित्र संदेश आणि मॉन्टूच्या दोन मैत्रिणी यांची ही झकास गोष्ट आहे.

तीन-साडेतीन वर्षाच्या मॉन्टूच्या मेंदूत वेगाने नवनवीन कल्पना जन्माला येत असतात. त्यातूनच त्याचे नवनवीन खेळ तयार होतात. कधी चाळीच्या जिन्याचा रेल्वेचा डबा होतो, अचानक कुठलीशी खिडकी तयार होते. त्यातून दिसणाऱ्या अफलातून जागेचे दर्शन घ्यायला मॉन्टूचे मित्रच व्हावे लागेल, असे संदेश कुलकर्णी सांगतात. वास्तविक वयात दसपटीहून जास्त फरक असूनही त्यांच्या मैत्रीचे धागे घट्ट विणलेले आहेत. टीव्हीवर दिसणाऱ्या कृष्णाला बघून मॉन्टूला स्वतः कृष्ण व्हायची कधीही हुक्की येई. प्रत्येकवेळी प्रसंग एकच, कालियामर्दन. त्यात मॉन्टू कृष्ण आणि गावकरी, यशोदा,

कृष्णाचे दोस्त, आणि टीव्ही बघणारा प्रेक्षक या साऱ्या भूमिका पार पडायला संदेशच असतो असे अभिवाचनातून लक्षात येते. दीपक मंडळ व द जिनियस ग्रुपतर्फे हा अभिवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. ग्रंथभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे हा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्तव्यापेक्षा सेवेची भावना ठेवा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

सेवा हमी कायद्यामध्येच सेवा शब्दाचा अंतर्भाव आहे. त्याअंतर्गत नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कटीबध्द व्हावे. कर्तव्यापेक्षाही सेवा भावनेने हे काम करा असे आवाहन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित सुशासन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर आयुक्त आर. जी. कुळकर्णी, प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.

'सरकारची बाजू समाजापुढे मांडणे, सरकारी तरतुदींचे वाचन करणे आणि सेवा हमी कायद्याविषयी जनजागृती करणे हा सुशासन दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. सुशासन दिवस हा केवळ एक दिवस साजरा करण्यासारखा उपक्रम नसून ती सतत चालणारी प्रक्रिया आहे,' असे प्रतिपादन डवले यांनी केले.

डवले म्हणाले, 'समाजातील शेवटच्या माणसाला न्याय देणे आपले कर्तव्य असला तरी सेवा हमी कायद्यांतर्गत कालमर्यादेच्या आत ती दिली जाणे आवश्यक आहे. आपण तत्पर सेवा देऊ शकलो तर त्यातून कार्य संस्कृतीचा विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सेवा हमी कायदा राबविताना केवळ कर्तव्यापेक्षा सेवेची भावना ठेवा' असे आवाहन त्यांनी यावेळी केली. तहसीलदार बी. पी. काकड यांनी सेवा हमी कायद्यासंदर्भातील माहिती पीपीटी प्रेझेंटशनद्वारे दिली.

जिल्हा माहिती कार्यालयात कार्यक्रम

सरकारी कर्मचारी आणि जनता यांच्यामधील अंतर मिटवून प्रशासनाबद्दल विश्वासाची भावना निर्माण करण्याचे आव्हान आपणा सर्वांसमोर आहे. सुशासन दिनासारख्या उपक्रमांमुळे या कार्याला बळकटी मिळेल, असा विश्वास नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सुशासन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालयात हा कार्यक्रम झाला. त्यावेळी लळीत बोलत होते.

ते म्हणाले, 'सामान्य जनता आणि प्रशासकीय यंत्रणा यांचा या ना त्या निमित्ताने एकमेकांशी संपर्क येतो. मात्र यंत्रणेबाबत बहुतांशवेळा जनता खुश नसते. नियमांची चौकट, दप्तरदिरंगाई, कर्तव्याप्रती उदासीनता यामुळे प्रशासकीय यंत्रणेबद्दल चांगले ऐकायला मिळत नाही. यातूनच जनता आणि प्रशासनातील दरी वाढते आहे. प्रशासनात कार्यरत प्रत्येकाने आपले काम जनसेवेचे महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे समजून केल्यास खऱ्या अर्थाने सुशासन दिन साजरा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येकाने कामकाजात तप्तरता दाखवून आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.

सरकार दरबारी केलेल्या अर्जाचे नेमके काय झाले, याची माहितीच नागरिकाला मिळत नव्हती. यातूनच माहितीचा अधिकार या क्रांतिकारी अधिनियमाचा जन्म झाला. खरेतर नागरिकांवर माहितीच्या अधिकाराचा वापर करण्याची वेळच येणार नाही, असा प्रयत्न प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने केला पाहिजे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.



'सरकारी सेवा मुदतीत द्या'

सरकारी कामात दिवसेंदिवस पारदर्शकता आणि तत्परता येत आहे. सरकारची वाटचाल ई-गव्हर्नन्सच्या दिशेने सुरू असून नागरिकांना मुदतीत सेवा देणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे मुदतीत सेवा देण्याचे तयारी ठेवा असे समाज कल्याण विभागातील वरिष्ठ लेखाधिकारी देवराम म्हस्के यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक यांच्यावतीने सामाजिक न्याय भवन संकुलात सुशासन (good governance) दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक संचालक (लेखा) हेमंत जाधवर होते. विशेष अधिकारी देविदास नांदगांवकर, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. म्हस्के म्हणाले, 'सरकारने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून काही सेवा मुदतीत देणे क्रमप्राप्त केले आहे. त्यामुळे सरकारी सेवेतील प्रत्येक घटकाची जबाबदारी वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सरकारने सेवा मुदतीत मिळण्यासाठी दिलेला हक्क प्रशासनाप्रती जनतेचा विश्वास दृढ करणारा ठरेल', असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सेवा हक्काच्या माध्यमातून कामाची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही याचे सनियंत्रण करण्यासाठी विभाग व राज्यपातळीवर लोकसेवा आयुक्तांचे पद निर्माण करण्यात येणार असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले.



'सरकारी सेवा मुदतीत द्या'

सरकारी कामात दिवसेंदिवस पारदर्शकता आणि तत्परता येत आहे. सरकारची वाटचाल ई-गव्हर्नन्सच्या दिशेने सुरू असून नागरिकांना मुदतीत सेवा देणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे मुदतीत सेवा देण्याचे तयारी ठेवा असे समाज कल्याण विभागातील वरिष्ठ लेखाधिकारी देवराम म्हस्के यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक यांच्यावतीने सामाजिक न्याय भवन संकुलात सुशासन (good governance) दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक संचालक (लेखा) हेमंत जाधवर होते. विशेष अधिकारी देविदास नांदगांवकर, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. म्हस्के म्हणाले, 'सरकारने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून काही सेवा मुदतीत देणे क्रमप्राप्त केले आहे. त्यामुळे सरकारी सेवेतील प्रत्येक घटकाची जबाबदारी वाढली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सरकारने सेवा मुदतीत मिळण्यासाठी दिलेला हक्क प्रशासनाप्रती जनतेचा विश्वास दृढ करणारा ठरेल', असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सेवा हक्काच्या माध्यमातून कामाची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही याचे सनियंत्रण करण्यासाठी विभाग व राज्यपातळीवर लोकसेवा आयुक्तांचे पद निर्माण करण्यात येणार असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलशिवार योजनेला राज्य सरकार देणार गती : पंकजा मुंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील कै. गोपीनाथ मुंडे जलकुंभाचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते संपन्न झाला. मुंडे यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलशिवार योजनेला गती देणार असल्याचे या वेळी सांगितले. मराठवाडा व विदर्भापेक्षा नाशिक विभाग सर्वगुण संपन्न असून, या भागात आमची मुलगी दिली असल्याचेही त्या म्हणाल्या. महापौर अशोक मुतर्डक यांनी सिंहस्थ कामात महापालिकेने केलेला खर्च महाराष्ट्र शासनाने द्यावा, अशी आग्रहाची मागणी ग्राम विकास मंत्री मुंडे व कामगार मंत्री मेहता यांच्याकडे केली.

लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे जलकुंभाचा लोकार्पण सोहळा गंगापूर गाव शिवारातील धृवनगर येथे संपन्न झाला. यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ व गंगापूररोड बारदान फाटा ते त्र्यंबकेश्वररोड समृद्धनगर रोडला आत्मा मालिक जंगलीदास महाराज असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी ग्राम विकास मंत्री पंकडा मुंडे, कामगार मंत्री प्रकाश मेहता व महापौर अशोक मुतर्डक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनीही नाशिकच्या विकासाचे कौतुक केले. जनसामान्यांमध्ये धडपड करणाराच नेता होतो, असे सांगतानाच मेहता यांनी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर मुर्तडक यांनी सिंहस्थ कामात महापालिकेने केलेला खर्च महाराष्ट्र शासनाने द्यावा अशी विनंती सौ. मुंडे व मेहता यांच्याकडे केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगरसेवक पाटील यांनी सर्व धर्म समभाव म्हणून विकास कामे करत असल्याचे सांगितले. नव्याने विकसीत होत असलेल्या धृवनगर भागातील रस्तांची कामे अर्धवट असून, त्यासाठी महापालिकेने निधी द्यावा अशी मागणीही नगरसेवक पाटील यांनी केली. याप्रसंगी उपमहापौर गुरुमीत बग्गा, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, विक्रांत चांदवडकर, नगरसेविका लता

पाटील, सभागृहनेते सलिम शेख, एन. एम. आव्हाड यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गारठे ओसरले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या चार दिवसांपासून नाशिककारांना हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा जोर शनिवारी काहीसा ओसरला. शुक्रवारी पाच अंशांपर्यंत खाली उतरलेला थंडीचा पारा दोन अंशाने वाढून ७.४ अंशापर्यंत पोहोचला. निफाड तालुक्यात मात्र अजूनही थंडीचा जोर कायम असल्याचे पहावयास मिळते आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा उत्तर महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. गेल्या चार दिवसांपासून केवळ नाशिकचाच नव्हे तर अहमदनगर, जळगाव, धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा खाली उतरला. विशेष म्हणजे राज्यात सातत्याने सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमध्येच झाली. द्राक्ष बागायतदारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाडची राज्यात सर्वाधिक थंडीचा तालुका म्हणून ओळख अधोरेखित झाली. शुक्रवारी निफाडमध्ये या वर्षातील सर्वात निचांकी ५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मात्र शनिवारी येथे ५.२ अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले. शहरात आणि निफाड वगळता जिल्ह्यातील अन्य भागात थंडीचा जोर ओसरल्याचे पहावयास मिळते आहे. येथे किमान ७.४ अंश सेल्सियस, तर कमाल २६.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील किमान तापमान ७.४ अंश सेल्सियस होते. बुधवारी ते घसरून ६ अंश सेल्सियसवर स्थिरावले. गेले दोन दिवस थंड हवा चालत असल्याचा अनुभव नागरिक घेत होते. मात्र आज हवेचा जोरही कमी झाल्याचे पहावयास मिळाले. नाताळपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असला तरी तो नाताळ सणानंतर उतरत जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. वातावरणातील तापमान घटून थंडीचा पारा हळहळू वाढू लागल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० ठिकाणी रंगणार ‘न्यू इयर सेलिब्रेशन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नववर्षाच्या स्वागताला अवघे तीन दिवस उरले असून, २०१५ सालाची 'गोड' सांगता करण्याची जोरदार तयारी सध्या शहरात सुरू आहे. त्यातच सलग सुट्यांमुळे सेलिब्रेशनचा डबल धमाका पाहण्यास मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, शहरातील विविध ५० पेक्षा जास्त ठिकाणी नाशिककरांना रंगारंग अनुभवता येणार आहे.

नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईला गती दिली आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, ट्रिपल सिट, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून, सोमवारनंतर त्यात वाढ केली जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. कोर्टाने घालून दिलेल्या वेळेच्या बंधनाचा नियम प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून, ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसेल त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक परवानगी घेऊनच नियोजन आखावे, असे आवाहन पाटील यांनी केले. नववर्षाच्या स्वागतावेळी पहाटे पाच वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मुभा असून, त्याबाबतची मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्यावर्षी साधारणतः ५० ते ५५ कार्यक्रमांना मंजुरी देण्यात आली होती. यंदाही तसाच ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या कार्यालयीन सुट्या असून, सोमवारनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे उपायुक्त पाटील म्हणाले. गत वर्षांनी बोटवर मोजता येईल, इतक्या हॉटेल्सने पहाटे पाच वाजेपर्यंत कार्यक्रमांच्या आयोजनाची मंजुरी घेतली होती. इतरांनी फारतर दोन वाजेपर्यंतची वेळ मागितली होती. रात्री एक ते दोन वाजेपर्यंत शहरात शांतता पसरली होती. आपल्या शहरात लेट नाईट लाईफची संकल्पना अस्तित्वात नाही. नागरिक सुद्धा सहकार्याच्या दृष्टीने पोलिसांना मदत करीत असल्याचा दावा पाटील यांनी केला. दरम्यान, कायदेशीर मंजुरी असलेल्या कार्यक्रमाव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी होणारे इतर कोणत्याही कार्यक्रमाचे प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला. शहर वाहतूक शाखेमार्फत बेशिस्त वाहनचालकांवर, तर पोलिस स्टेशनकडून टवाळखोरांवर सातत्याने कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पैसे न मिळाल्याने चाकूहल्ला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भाशय मुखाचा कर्करोग

$
0
0

गर्भाशयाच्या मुखाला होणारा कॅन्सर हा गर्भाशय मुखाच्या पेशी जास्त वाढल्याने होतो. या पेशी आजूबाजूच्या अवयवांपर्यंत पोहचू शकतात. सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढला तर लक्षणं दिसायला लागतात. हा कॅन्सर ह्युमन पॅपीलोमा व्हायरस या इन्फेक्शनमुळे होतो. धुम्रपान करणाऱ्या महिला, शारीरिक संबंध कमी वयात येणे, एका पेक्षा जास्त व्यक्तीशी शारीरिक संबंध असणे, जास्त प्रसूती होणे, गर्भरोधक गोळ्या जास्त वर्ष घेणे. साधारणपणे ४० ते ५० वयाच्या दरम्यान या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. गर्भाशयमुखाचा कॅन्सर होण्यापूर्वी १० ते २० वर्ष तो होण्याच्या स्थितीमध्ये असतो.

गर्भाशयमुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त, गर्भाशयाचा व स्त्रीरोग बिजाचाही कॅन्सर होऊ शकतो. गर्भाशयमुखाच्या कॅन्सरनी मृत्यू होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण, इतर कर्करोगापेक्षा जास्त आहे. अजूनही बऱ्याच भारतीय स्त्रिया या स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. अज्ञान व लाज यामुळे डॉक्टरकडे जायची टाळाटाळ करतात. अती झाल्यावरच वैद्यकीय तपासणी करायला तयार होतात, अशावेळी कर्करोग हा शेवटच्या स्टेजला असू शकतो व त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. पण हा कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळखता आला तर पूर्ण बरा होऊ शकतो. या रोगाचा शोध घेण्यासाठी पॅप स्मिअर नावाची सोपी अशी चाचणी आहे. ही टेस्ट गर्भाशयमुखाचा कर्करोग पुढील दहा वर्षात व्हायची शक्यता आहे किंवा नाही याविषयी माहिती देऊ शकते. अशा तऱ्हेने लवकर निदान झाल्यास साध्या उपचारांनीही हा आजार बरा करता येतो म्हणुन सर्व विवाहित स्त्रियांनी पॅप स्मिअर नावाची टेस्ट नियमितपणे करून घेणे आवश्यक आहे. या टेस्टमध्ये कर्करोगाचा संशय आल्यास आणखी काही तपासण्या करून निदान पक्के केले जाते. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी त्याला काल्पोस्कोपी म्हणतात. यावेळी गर्भाशायचा तुकडा काढून तपासला जातो.

कर्करोग अगदीच प्राथमिक अवस्थेत असेल तर छोट्या शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात. गर्भाशय काढून टाकणे, योनी मार्गाचा वरचा भाग काढणे व आजूबाजूचे आवरण काढणे हे केले जाते. काहीवेळा शस्त्रक्रिये ऐवजी रेडीयोथेरपीचा उपयोग केला जातो. कुठल्या स्टेजला कर्करोगाचे निदान झाले यावरून ती व्यक्ती पुढे किती दिवस जगू शकते हे ठरते. गर्भाशयमुखाचा कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अप्रगत देशात जास्त आहे. प्रगत देशामध्ये जागरूकता व लवकर उपचार करून घेणे यामुळे गर्भाशयमुखाचा कर्करोग खूप कमी झाला आहे. या कर्करोगाची लक्षणे म्हणजे बऱ्याच वेळेला काहीच त्रास होत नाही. नियमित तपासणी केली तर त्या तपासणीमध्ये कॅन्सर आढळून येतो. इतर लक्षण म्हणजे रक्तस्त्राव होणे, पांढरे पाणी जाणे, शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे, ओटीपोटात दुखणे, कधी कधी गर्भाशयाच्या मुखाला मोठी गाठ असणे, व त्यातून रक्तस्त्राव होणे, असेही दिसून येते. कॅन्सर जास्तच वाढला असेल तर तो इतर अवयवांपर्यंत पोहचतो. तेव्हा भूक न लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे, ओटीपोटात दुखणे, कंबर पाठ दुखणे, पाय दुखणे, पाय सुजणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे, तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे, अशी लक्षणे दिसून येतात.

नियमितपणे शारीरिक तपासणी आणि पॅप स्मिअर केली तर कॅन्सरचे प्रमाण आणि परिणामी मृत्यूचे प्रमाण देखील कमी होईल. दर ३ वर्षांनी पॅप स्मिअर केल्यास ८० टक्के कॅन्सरचे प्रमाण कमी होईल म्हणून पॅप स्मिअर व नियमित तपासणी करणे गरजेचे ठरते. लिक्विड बेसड् सायटॉलॉजी ही अजून एक तपासणी आहे. यामध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सर चे निदान जास्त अचूक होते. शारीरिक संबंध ठेवतांना जर निरोध वापरला तर कॅन्सरचे प्रमाण कमी होऊ शकते. असं अभ्यासात दिसून आलं आहे. निरोधामुळे बाकीचे शारीरिक संबंधांमुळे होणारे आजारही टाळले जातात.

सध्या दोन प्रकारचे व्हॅक्सीन उपलब्ध आहे गार्डासील व सर्व्हीरीक्स. हे व्हॅक्सीन घेतले तर ९३ टक्के कॅन्सर होण्यापासून वाचू शकतो. या व्हॅक्सीनचे तीन डोसेस असतात व ते वयाचा ११ वर्षापासून ते ४५ वर्षापर्यंत दिले जातात. व्हॅक्सीन घेतले तरी नियमितपणे शारीरिक तपासणी आणि पॅप स्मिअर करणे गरजेचे आहे. भारतामध्ये गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग व बिजकोशाचा कर्करोग ही होऊ शकतो. उशिरा लग्न होणे, कुमारिका असणे, मुल न होणे, मुल उशिरा होणे, स्तनपान न करणे यामुळे स्तनांचा किंवा गर्भाशयाच्या आतल्या अस्तराचा कर्करोग ५० टे ६५ या वयात होऊ शकतो. ज्या व्यक्तीमध्ये मधुमेह, अतिरक्तदाब, आणि स्थूलता असते अशा स्त्रीमध्ये गर्भाश्याचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये पाळी जास्त दिवस येणे, अंगावर जास्त रक्तस्त्राव होणे, पाळी लवकर लवकर येणे, किंवा पाळी बंद झाल्यावरही अंगावर रक्तस्त्राव व्हायला लागणे, अशी लक्षणे दिसून येतात. अशावेळी शारीरिक तपासणी करून, सोनोग्राफी, क्युरेटिंग करून निदान करतात. सध्याच्या काळात नियमित तपासणी, जागरूकता, योग्य उपचार असतील तर गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकतो.

(लेखिका स्त्र‌ीरोग तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे न मिळाल्याने चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मखमलाबाद पाटाजवळील मारूती मंदिर येथून सायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न झाला. संबंधित व्यक्तीकडे पैसे नसल्याने तिघा अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्यावेळी सर्वसामान्यांना लुटण्याच्या अनेक घटना पंचवटीत होत असून, दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अशाच गुन्ह्यात कुमावतनगर येथील दोघांना अटक केली होती.

गणेश वसंत झिरवळ, असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ते २४ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मखमलाबाद येथे सायकलवर जात असताना तिघा भामट्यांनी त्यांना पाटाजवळ थांबवले. पैशांची मागणी करणाऱ्या संशयितांना झिरवळ यांच्याकडे पैसे सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी झिरवळ यांच्या हातावर तसेच पोटावर चाकू हल्ला करून पळ काढला. गेल्या काही दिवसांत पंचवटीमध्ये असे लुटीचे प्रकार सर्रास घडत असून, पोलिसांनी आरोपींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

प्रवासादरम्यान दागिन्यांची चोरी

हुबळी ते नाशिक प्रवासादरम्यान कनार्टक येथे राहणाऱ्या संगमेश रामचंद्र खताडे यांच्या बॅगेतील १ लाख ४६ हजार रूपये किंमतीचे सहा तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. २३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास खताडे यांनी आपला प्रवास सुरू केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास द्वारका येथे पोहचल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दीड लाखांचा ऐवज लंपास

बंद घराच्या खिडकीचे गज कापून आत घुसलेल्या चोरट्यांनी १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी मंगेश दिगंबर खोडदे यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. मंगेश व त्यांचे कुंटूंब ५ डिसेंबरपासून बाहेरगावी गेले होते. ते २५ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता परत आले. या काळात चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला होता.

नदीत बुडून एकाचा मृत्यु

खेकडे पकडण्यासाठी वालदेवी नदीपात्रात उतरलेल्या तुळशीराम झोंबाड (४०) यांचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास झोंबाड वालदेवी पात्रात उतरले होते. विहीतगाव येथे राहणारे झोंबड खोल पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यु झाला. याप्रकरणी संगिता तुळशीराम झोंबाड यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नाशिककरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सलीममामूंच्या चायटपरीवर झाली आठवणींची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सकाळची बोचरी थंडी... बऱ्याच दिवसांनंतर झालेल्या भेटी... सोबतीला वाफाळलेला चहा अन् आठवणींत रमलेली मित्रमंडळी... कॉलेजरोवरील सलीम चाय टपरीमध्ये शनिवारी हे चित्र साकारले होते. निमित्त होते, 'आठवणीतील चहा' या उपक्रमाचे. 'जनस्थान' या कलावंतांच्या व्हॉट्स अप ग्रुपतर्फे या उपक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते.

कॉलेज लाईफ अन् सलीम मामूंची चायटपरी हे कॉलेजरोडवरील प्रत्येकासाठीच गेल्या अनेक वर्षांपासून समीकरण झाले आहे. थंडीत तर या समीकरणाला चहासारखाच आकर्षक गर्द रंग चढलेला असतो. अनेकांचा कॉलेज ते राजकारण, नाटक, सिनेमा असा प्रवास आज झालेला आहे. काहींना येथेच गाणे सुचले तर काहींना नाटकाच्या कथा. या सर्वांच्या प्रवासाचा खरा साक्षीदार सलीम चायटपरीवरचा चहा ठरला. मित्रांसोबत आपली स्वप्न शेअर करण्याबरोबरच आयुष्यातील हळव्या बाजूही या टपरीवर व्यक्त केल्या गेल्या आहेत. परीक्षांमध्ये अभ्यासाच्या नियोजनाबरोबरच कॉलेजमधील गुलाबी आठवणींचीही साक्षीदार ही चायटपरी ठरली आहे. या सर्वच आठवणींची उजळणी या उपक्रमामुळे नव्याने झाली.

अनेक दिवसांनी झालेल्या या भेटीमध्ये एकमेकांविषयीच्या किती आठवणी सांगू अन् किती नको, अशी अवस्था प्रत्येकाची झाली होती. प्रत्येकाकडचा आठवणींचा खजिना यानिमित्त उघडला गेला. प्रत्येकाचे वेगळे ऋणानुबंध असलेल्या या टपरीशी आणखी एक अविस्मरणीय आठवण यानिमित्ताने जोडली गेली. नाशिकबरोबरच बाहेरगावांमधूनही सलीम चायटपरीच्या चाहत्यांनी या उपक्रमास हजेरी लावली होती. आरजे. भूषण मटकरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला होता. यावेळी जनस्थान ग्रुपचे मुख्य अभय ओझरकर, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, अतुल चांडक, सदानंद जोशी, शाहू खैरे, मनिष आंबेवाडीकर, विश्वास ठाकूर, गीतकार मिलिंद गांधी, कवी किशोर पाठक, नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम

यांसह अनेक मान्यवर, कॉलेजियन्स उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images