Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

व्होकेशनलच्या अस्तित्वासाठी प्रयत्नशील

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, नाशिक
व्यावसायिक अभ्यासक्रम (व्होकेशनल) या विषयातील शिक्षकांचे आणि सस्थांचे प्रश्न दिवसेंदिवस किचकट बनत आहेत. या प्रश्नांकडे आजवर वारंवार दुर्लक्ष होत आल्याने ते प्रश्न चिघळत गेले. मात्र यापुढील टप्प्यात व्होकेशनल अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना सरकार दरबारी न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन शिक्षक आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासमोर राज्यातील व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या सदस्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या शिष्टमंडळाने डॉ. हिरे यांची भेट घेऊन विविध प्रश्नांच्या संदर्भात गाऱ्हाणे मांडले. यावेळी शिष्टमंडळाने मांडलेल्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र कौशल्य विकास विकास व उद्योजकता विभागाचा २७ डिसेंबर २०१५ रोजी झालेला शासन निर्णय हा व्यावसायिक शिक्षणासाठी बाधक असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. स्वतंत्र व्होकेशनल कोडची निर्मिती करण्यात यावी, नव्या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करताना शिक्षकांना अतिरीक्त ठरविण्यात येऊ नये, विनाअनुदानित सेवा वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी ग्राह्य धरण्यात यावी, व्यवसाय शिक्षण कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरीत भरावीत, वैद्यकीय प्रतिपूर्ती बीलांची छाननी ठरवून दिलेल्या कालमर्यादेतच पूर्ण करण्यात यावी, राज्य सरकारच्या रिक्रुटमेंट रूलमध्ये व्होकेशनल अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात यावा, यांची मागणी प्रामुख्याने यावेळी करण्यात आली.

तसेच सैन्यदलातील भरतीसाठी व्होकेशनल अभ्यासक्रमाची पात्रता ग्राह्य धरण्यात यावी, इमारत देखरेखीच्या संदर्भातील शासकीय आदेशातील त्रुटी दूर करण्यात याव्यात, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकल पर्यवेक्षकाचा परवाना देण्यात यावा, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना व्हेइकल सर्व्हेअर अ‍ॅण्ड लॉस असेसरचा परवाना देण्यात यावा या मागण्यांचाही यात समावेश होता. या मागण्यांचे स्वरूप समजावून घेतल्यानंतर हिरे यांनी आंदोलनास पाठींबा देत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुखदेव विद्यामंदिरचा क्रीडा महोत्सव सुरू

$
0
0







म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रज्ञानाच्या युगात मैदानी खेळांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणले पाहिजे, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही या क्रीडा स्पर्धेचे आयोजन शाळेत करण्यात आले आहे. कबड्डी, खो-खो, लगोरी, क्रिकेट, लंगडी, धावणे अशा शरीराचा कस लावणाऱ्या तसेच संगीत खुर्ची, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत यासारख्या मनोरंजनात्मक खेळांचा समावेश क्रीडा महोत्सवात असणार आहे.

यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुखदेव एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस संजय काळे, मुख्याध्यापक नितिन पाटील, प्राचार्य बाबासाहेब खरोटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता ढगे यांनी तर आभार मनिषा शिंदे यांनी मानले. --

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाने श्रमप्रतिष्ठा जाणणे महत्त्वाचे

$
0
0





म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'इस्त्रायल या लहानशा देशाने श्रमाच्या बळावर मोठी प्रगती केली आहे. भारतात मात्र, आराम ही राम है ही प्रवृत्ती बळावली असून आपली कामे आपणच करावी, असे सांगायची वेळ आली आहे. आपल्या देशातील नागरिकांनीही श्रमाचे महत्त्व जाणल्यास आपली वाटचाल प्रगतीच्या दिशेने होईल', असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सुरेश पाटील यांनी केले. निफाडच्या कर्मवीर गणपत दादा मोरे कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिरात ते बोलत होते.

कुंदेवाडी गावातील स्वामी विवेकानंद विद्यालयात हे शिबिर सुरू असून ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'इस्त्रायल देशाशी तुलना केल्यास तेथील कार्यपद्धती ही अधिक प्रभावी आहे. प्रत्येक व्यक्ती स्वावलंबनावर भर देऊन कार्यरत असते. त्यामुळे एकाच कामात नैपुण्य मिळण्यापेक्षा सर्व कामात तेथील नागरिक तरबेज आहेत. आपल्याकडेही संत गाडगेबाबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी श्रमसंपन्न वारसा दिलेला आहे. त्यांच्या विचारांचे व कृतीचे आचरण करण्याची गरज आहे.'

कुंदेवाडी गावच्या सरपंच सरोज घेगडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेच्या शिबिराला गावाचा पूर्णतः पाठिंबा आहे. या शिबिरात स्वच्छ व स्वस्त भारत पर्यावरण संवर्धन, ग्रामस्वच्छता, महिला सबलीकरण यासाठी केलेल्या कार्याची माहिती आम्हालाही देऊन गावालाही दिशा द्यावी', असे त्या यावेळी म्हणाल्या. शिबिराचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी केले. यावेळी वैकुंठ पाटील, राजेश मोगल, शिवाजी ढेपले, प्रा. शशिकांत पाटील, प्रा. अभय वडघुले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्ञानाधिष्ठीत विद्यार्थी घडवावेत’

$
0
0



म टा प्रतिनिधी, नाशिक

'सध्याचा काळ हा ज्ञानाधिष्ठीत असून तशीच समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न मोठमोठी राष्ट्रे करीत आहे. आपल्याकडील प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू याची साक्षीदार आहे. ज्ञानाच्या जोरावरच जग प्रगती करीत असल्याचे यावरुन सिद्ध झाले आहे. त्यामुळे भारतीय शिक्षकांनीही आता पाठ्यक्रमाच्या बाहेर पडून प्रत्यक्ष शिक्षण देऊन ज्ञानाधिष्ठीत विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे', असे प्रतिपादन एमकेसीएलचे सीईओ विवेक सावंत यांनी केले.

पेठे विद्यालयाचे शिक्षक डी. एस. कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते 'एकविसाव्या शतकातील शिक्षकाची ज्ञानसाधना' या विषयावर बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'औद्योगिक क्रांतीचा काळ आता संपला असून ज्ञानक्रांतीचा काळ सुरू झाला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचाराने जगायला, कळीचे मुद्दे उपस्थित करायला, आव्हानांना सामोरे जायला शिकवले पाहिजे. या शिकविण्यात सातत्य ठेवून त्यांच्यात आत्मविश्वासाचा विकास केला पाहिजे.'

अध्यापन करताना विद्यार्थ्यांना नाविन्याचा शोध घेण्याचे मार्गदर्शन करुन त्यांचा सर्जनशीलतेकडे कल निर्माण होईल, असे कार्य करण्याचा सल्लात त्यांनी दिला. शिक्षकांनी माहितीसाठा ही ओळख बदलून बाहेर पडण्याची वेळ असल्याची जाणीवही त्यांनी शिक्षकांना करुन दिली. शिक्षक उपसंचालक भगवान सूर्यवंशी यांनी यावेळी अध्यक्षीय भाषण केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद देशपांडे यांनी केले तर आभार महेश कुलकर्णी यांनी मानले. यावेळी साने गुरुजी कथामालेचे प्रमुख गिरीश नातू, डॉ. सुनील कुटे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघ कॉलेजमध्ये कंपन्यांचे चर्चासत्र

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

पंचवटीतील अमृतधाम येथील के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शहर व जिल्हाभरातील विविध नामवंत कंपन्याचे प्रमुख, सी. ई. ओ, प्रकल्प प्रमुख, व्यवस्थापक आणि तज्ज्ञ इजिनीअर्स यांचे एकदिवसीय चर्चासत्र झाले. चर्चासत्रात कंपन्यांना कशा प्रकारच्या इंजिनीअर्स व कामगारांची गरज आहे यावर चर्चा करण्यात आली.

मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल या विभागतील तज्ज्ञ या चर्चासत्राला उपस्थित होते. यावेळी नाशिकच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स शाखेचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी सांगितले कि, उद्योजकांना अपेक्षित असलेला विद्यार्थी घडविणेसाठी उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांची व्याख्याने वेळोवेळी घ्यावीत. महिंद्र आणि महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांनी यावेळी सांगितले कि, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी उद्योगातील प्रत्यक्ष ज्ञानाची सांगड घालून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कॉलेजेसनी वाढवायला हवा. यावेळी शारदा मोटरचे अतुल सेठ, बीएसएनएलचे महाप्रबंधक सुरेश बाबू प्रजापती, डेल्टा फिनोकेमच्या शरयू देशमुख, रिलायन्स कम्युनिकेशनचे मनीष आंबेवाडीकर, गिलबर्टचे प्रदीप देशपांडे यांनी आपले अनुभव सांगितले.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ के. एन.नांदूरकर यांनी केले. अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशिनाथ टरले, चांगदेव होळकर, अशोक मर्चंट, समीर वाघ यासह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळे भाडेवाढीला तूर्तास स्थग‌िती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेने राज्य सरकारच्या आदेशाचा आधार घेत, महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांची रेड‌िरेकनरनुसार अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता नगरसेवकही संतप्त झाले आहेत. त्यामुळे महापौरांनी भाडेवाढीच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देत, स्थायी समितीचा निर्णय महासभेवर ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे शहरातील दोन हजार गाळेधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

महापालिकेच्या मालकीच्या गाळयांना रेड‌िरेकनरनुसार भाडे आकारण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याचा आधार घेत, प्रशासनाने स्थायी समितीवर गाळ्यांचे लिलाव करण्याचे किंवा रेड‌िरेकनरनुसार दर आकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. गाळे हे मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी नसून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी असल्याचे सांगत स्थायी समितीने रेड‌िरेकनरनुसार दर आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गाळ्यांचे दर हे थेट २० ते ३० पटीने वाढले आहेत. छत्रपती शिवाजी मंडईत ४०० रुपये गाळ्यांना प्रतिमाह भाडे असताना रेड‌िरेकनरमुळे ते चक्क चार हजाराच्या वर गेले आहेत, अशीच स्थिती सर्वत्र झाल्याने या भाडेवाढी विरोधात गाळेधारक संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट लढा उभा केला असून, नगरसेवकही यामुळे कोंडीत पकडले गेले आहेत.

गाळे हे महापालिकेच्या उत्पन्नासाठी नसून, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी आहेत. गाळेधारक कमवतील काय आणि भाडे देतील काय असा प्रश्न करत गुरूवारी सभागृह नेते सलिम शेख यांनी या गाळ्यांच्या दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. या निर्णयामुळे दोन हजार गाळेधारकांचे कुटूंब रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे ही दरवाढ अवाजवी असल्याचे त्यांनी सांगीतले.

ही दरवाढ स्थायी समितीच्या ठरावाने झाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पंरतु महापालिकेने काय निर्णय घ्यावा हा पालिकेचा अधिकार असल्याचे शेख यांनी सांगीतले. त्यामुळे ही दरवाढ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर महापौरांनी स्थायी समितीचा हा ठराव पुन्हा महासभेवर ठेवण्याचे आदेश देत, तोपर्यंत कारवाई थांबवा असे आदेश दिले. त्यामुळे स्थायीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला महापौरांनी स्थगिती दिली आहे. एकत्रीत बसून निर्णय घेतला जाईल, असे सांगत, त्यांनी दोन हजार गाळेधारकांना तूर्तास दिलासा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे या अवाजवी दरवाढी विरोधात गाळेधारक न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेषा : कलेचा 'आत्मा' !

$
0
0





चित्रकाराच्या मनातील भाव प्रकट करण्यासाठी कायम त्याच्यासोबत असणारी आणि चित्रकलेच्या मूळ घटकांमध्ये प्रथम घटक असलेली ही रेषा आपणा सर्वांच्या परिचयाची आहे. अगदी लहानपणापासून ज्ञात आहे. शाळेत पेन्सिलच्या सहाय्याने पाटीवर अक्षरे गिरविण्याच्याही आधी लहान मुलांनी घराच्या भिंतीवर काढलेल्या रेघोट्यात ती दिसून येते. त्या रेघोट्यात त्या बालकाचे मुक्त विचार असतात. त्यात कधी डोंगर दिसतात, कधी झाडे असतात, तर कधी डोंगरासारखे उलट सुलट त्रिकोणी आकारात मगरीचे दात सुद्धा दिसतात. वेगवेगळ्या भावांचा आविष्कार या रेषांच्या सहाय्याने प्रकट होत असतो.

- संध्या केळकर
चित्रात, अक्षरलेखनात रेषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिला सौंदर्य आहे, जिवंतपणा आहे. तसेच स्वतंत्र असे अस्तित्व आहे. विविध भावदर्शन करण्यासाठी ही रेषा आपल्याला वेगवेगळ्या रुपात म्हणजे जाड, बारीक, लयदार जोरकस, सरळ, तिरकी, अशा विविध स्वरुपात दिसून येते. कधी खोदीव, कधी जमिनीवर किंवा वाळूत मारलेल्या रेषात, कधी भिंतीवर, कधी ब्रशच्या फटकाऱ्यात, कधी दोन रंगांच्या जोडणीत, कधी नखांनी काढलेल्या अंगावरील ओरखाड्यातसुद्धा ही रेषा दिसून येते.

रेषेमुळे बांधल्या जाणाऱ्या आकारात रंग, पोत काही नसून सुद्धा केवळ मूळ आकाराच्या साधर्म्यामुळे आपणास त्या वस्तूचे सर्व गुणधर्म समजू शकतात. उदा. सफरचंदाचा बाह्य रेषाकार. या आकारामुळे आपल्याला सफरचंदाची जाणीव होते.

चित्राकृतीमध्ये आकारांच्या बांधणीमधून रेषा जशी डोळ्यांना दिसते तशी, म्हणजे वास्तविक, तर ती कधीकधी सूचक किंवा अदृश्य असते. म्हणजे दोन व्यक्तींच्या दृष्टी संवादात जाणवते. तर कधी रेषांमुळे दृष्टीभ्रम निर्माण होतो. रेषांच्या एकमेकांजवळच्या सरळ उभ्या मांडणीतून आकाराची उंची वाढल्यासारखी वाटते. तर आडव्या मांडणीमुळे आकार आडवा झाल्याचा भास होतो. हाच दृष्टीभ्रम लक्षात घेऊन ड्रेस डिझाईनर लठ्ठ व्यक्तीला उभ्या रेषा असलेले कपडे परिधान करावयास सांगतात.

रेखाचित्रामुळे तयार होणाऱ्या आकारात अनेक गोष्टी दडलेल्या असतात. विशेषत: व्यक्तीरेखाटनात शारीरिक हालचाल, तिचे व्यक्तीमत्व दर्शनाकरिता लयदार रेषांचे सहाय्य होतेच त्याचबरोबर त्यातून एक कमनीयता निर्माण होते. जी बघणाऱ्याला आनंद देते. काही चित्रामध्ये छेदक किंवा तिरक्या रेषांच्या मांडणीतून अस्थिरता किंवा गती निर्माण केलेली असते. अशी जाणीव एखाद्या युद्धप्रसंगाच्या चित्रणात विशेषतः जाणवते. पाण्याच्या लहरी आडव्या लयदार रेषातून सहज दिसतात आणि क्षितिजाच्या रुपात दिसणारी आडवी रेषा मनाला शांती आणि स्वास्थ देते.

कलाकार आशयानुसार कधी रंग गुणांना तर कधी रेषा गुणांना महत्त्व देऊन चित्रनिर्मिती करतात. त्यातही विविध प्रकार दिसून येतात. स्थिरचित्र, व्यक्तीचित्र, निसर्गचित्रात वैशिष्ट्य दर्शविण्यासाठी दिसून येणारी रेषा, एखाद्या कथानकाच्या विशदिकरणात्मक रेखाटनात (Illustrative) भाव व्यक्त करणारी रेषा, वास्तुविशारदाच्या आरेखनात आपल्याला आपल्या घराचे स्वप्न दाखवणारी रेषा, आणि एखाद्या व्यंगचित्रात समाजिक परिस्थितीवर वा राजकारणावर टिप्पणी करणारी रेषा. अशा विविध चित्रप्रकारातून रेषांचे भाव दिसून येतात. जाहिरात क्षेत्रात, कॉमिक्सच्या व्यक्तीचित्रणात तिला विशेष स्थान आहे. पाश्चात्य चित्रकार सरा याने सप्रयोग सिद्ध केले की अधोमुखी रेषा दु:ख, खिन्नता व उदास भाव दर्शवितात आणि ऊर्ध्वमुखी रेषा उल्हास, चैतन्य व आनंदाचे दर्शन घडवितात.

रेषा तिने बांधलेल्या आकारांना गुणवत्ता व भाव संपन्नता प्राप्त करून देते. त्यात रेषेचा रंग सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो. गडद रंगाच्या रेषेची भूमिका आलंकारिक चित्रणात म्हणजे साड्या, पडदे, क्रॉकरी अशा विविध सजावटीच्या वस्तूंवरील डिझाईनमध्ये महत्त्वाची असते. तिच्यामुळे अलंकारणाला अधिकच उठाव मिळतो.

कला इतिहासाचा अभ्यास करता असे लक्षात येते की पाश्चात्य कलाकारांपेक्षा पौर्वात्य म्हणजे भारत, जपान, चीन, तिबेट या भागांमध्ये चित्र पद्धतीत रेषीय रेखाटन विशेषत्वाने झालेले दिसून येते. त्यामुळे रेषा ही पौर्वात्य कलेचा मुख्य

आधार म्हणता येईल. त्यात नैसर्गिक किंवा मानवनिर्मित वस्तूंचे वैशिष्ट्य तसेच मानवाकृतीचे चित्रण विशेषत्वाने दिसून येते. नेमके सौंदर्य पकडण्यासाठी लयदार रेषांच्या माध्यमातून एक सुंदर लय आणलेली दिसते. त्याचबरोबर अध्यात्मिक भावदेखील त्यातून व्यक्त होताना दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजिंठ्याची चित्रे होत.

अशी ही रेषा कळत नकळत, कधी प्रत्यक्ष, तर कधी रंगात मिसळणारी अप्रत्यक्ष, निसर्गात स्वतंत्र मात्र कधीच दिसत नाही. ती पानांच्या शिरास्वरुपात असते किंवा गवताच्या पातीस्वरुपात असते. त्याला अपवाद म्हणजे ढगात चमकणारी वीज ही होय. प्रत्यक्ष रेषेने दिसणाऱ्या वस्तूचे आरेखन हा मानवाने निर्माण केलेला एक संकेत आहे. त्याच्या निर्मितीचा पाया आहे आणि कलेचा 'आत्मा' आहे.

(लेखिका कला अभ्यासिका आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला आजपासून योग संमेलन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योग विद्येचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा यासाठी योग विद्या गुरुकुलतर्फे नवव्या राष्ट्रीय योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १८ ते २० डिसेंबर रोजी विश्व योग दर्शन आश्रम तळवाडे (ता. त्र्यंबकेश्वर) येथे होणार असून संपूर्ण भारतातून येथे साधक येण्यास सुरुवात झाली आहे.

योग शास्त्राचे आद्य प्रवर्तक योग महर्षी पतंजली यांनी पतंजल योग दर्शन या ग्रंथामध्ये ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. आधुनिक विज्ञानही याबाबत फारसे प्रगत नाही या संमेलनात या विषयावर जास्त प्रमाणात अभ्यास होणार आहे. संमेलनाचे उदघाटन आज (१८ डिसेंबर) सकाळी दहा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, आयुषचे संचालक कुलदीपराज कोहली, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू अरुण जामकर यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी साडेबारा या कालावधीत पुणे येथील चिन्मय मिशनचे स्वामी सिध्देशानंद यांचे 'उपनिषदातील ध्यान' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी दोन ते साडेतीन या कालावधीत योग संशोधन मार्गदर्शक आशाताई वेळूकर, नंदिनी बेंडाळे, रमेश भगत यांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच शनिवारी (१९ डिसेंबर) रोजी 'प्राणायाम' या विषयावर विश्वास मंडलिक, 'ध्यान व प्रात्यक्षिक' या विषयावर श्रीकृष्ण व्यवहारे, 'उपनिषद' यावर स्वामी माधवानंद, 'भावातीत ध्यान परिचय' या विषयावर डॉ. रमेश बोंडाळे, भीष्मराज बाम, 'ओंकार ध्यान' या विषयावर पौर्णिमा मंडलिक यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार (२० डिसेंबर) योगाचार्य विश्वास मंडलिक हे प्राणायाम प्रात्यक्षिके करून घेणार आहेत. तसेच यादिवशी 'ध्यान समाधान' विषयावर रामचंद्र ढेकणे यांचे व्याख्यान होणार असून, डॉ. ईश्वर आचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन दिवसीय योग संमेलनाचा समारोप होणार आहे.

संमेलनस्थळी पोहोचण्यासाठी व्यवस्था

संमेलनस्थळी पोहोचण्यासाठी सीबीएसवरून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस सुटतात. तुपादेवी फाट्यावर उतरून संमेलनस्थळी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अस्वच्छतेमुळे डेंग्यूची धास्ती

$
0
0

सोसायटीत फुटपाथ तयार केलेले नाहीत. शेजारील दयामई अपार्टमेंटला जोडणारा रस्ता झालेला नाही. निशिगंधा अपार्टमेंटच्या जलवाहिनी बदलून देण्याची मागणी पूर्ण झालेली नाही. या कॉलनीतील दिनेश व मीनाक्षी ढवळे यांच्या बंगल्याशेजारील प्लॉट अनेक वर्षांपासून अविकसित आहे. तेथे रोपे व गवत फोफावले आहे. प्लॉटला कचराकुंडीचे स्वरुप येऊ लागले आहे. घुस, सापांचा वावर वाढल्यामुळे मुलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी परिसरात चोरी केल्यानंतर चोर या प्लॉटमध्ये लपून बसले होते. कॉलनीत चोऱ्या होण्याची संख्याही वाढली आहे. प्लॉटमध्ये स्वच्छता केली जात नसल्याने डेंग्यूच्या डासांची निर्मिती होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात दोन ज्येष्ठ नागरिक व एका मुलाला डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे प्लॉटधारकावर कारवाईची मागणी केली जात आहे.

मालकाने २००५ मध्ये प्लॉटच्या चोहोबाजूंनी भिंत उभारली आहे. त्यानंतर त्याने स्वच्छता केलेली नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांनी फ्लाटचा सातबारा उतारा, मालकाचा फोन नंबर मागितला. नागरिकांनी तो देऊनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिलेला आहे.

कॉलनीला नावच नाही उपनगरमध्ये शांतीपार्क समोर काठेनगर आहे. त्याच्या शेजारी असणाऱ्या या कॉलनीला नाव द्यावे, अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली आहे. परंतु, त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. बाहेरगावच्या व्यक्तीला येथील पत्ता सापडता सापडता नाकीनऊ येतात. त्यामुळे कॉलनीचे नामकरण करणे आवश्यक आहे. नगरसेवक प्रा. कुणाल वाघ प्रयत्न करत आहेत. परंतु, प्रशासन त्यांना जुमानत नाही असे नागरिकांनी सांगितले. सध्या टिळक नगर हे नाव नागरिकांनी ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघडा पीएफचे युनिव्हर्सल अकाऊंट !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सर्व व्यवहार आता ऑनलाइन केले आहेत. यामध्ये सर्वाधिक अडचण होती ती युनिव्हर्सल अकाऊंट नंबरची (UAN). यासाठी पीएफ कार्यालयानेच आता युएएन नंबर सर्वांसाठी खुला केला असून, यात कामावर लागण्या अगोदरच संबधित व्यक्तीला युएएन नंबर ऑनलाइन काढता येणार असल्याने पीएफचे फायद्या कामगारांना पहिल्या दिवसापासून मिळू शकतात, अशी माहिती पीएफ आयुक्त जगदीश तांबे यांनी सांगितले. यातून कामात सुटसुटीतपणा येणार आहे.

कंपनीत किंवा विविध आस्थापनात कामावर लागल्यानंतर संबधित कर्मचाऱ्याचा पीएफ पहिल्या दिवसांपासून सुरु करावा असा निमय आहे; परंतु काही मालकांकडून कंत्राटी व रोजंदारी कामगारांची माहितीच पीएफ कार्यालयाकडे कळवत नसतात. त्यातच माहिती कळविली तर अनेकदा त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे कामावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा युएएन निर्माणच होत नसल्याने तो पीएफपासून वंचित राहत असे.

यासाठी पीएफ कार्यालयाने त्यांच्या epfindia.com या वेबसाईडवर ऑनलाइन युएएन चे खाते खोलण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. वेबसाईड उघडल्यावर फॉर जनरल यावर क्लिक करून सोप्या पद्धतीने युएएनचे खाते सर्वांनाच उघडता येणार असल्याचे आयुक्त तांबे यांनी सांगितले. यात पीएफच्या कामात सुटसुटीतपणा यावा व सर्वानांचा पीएफचा लाभ मिळावा या हेतूने ऑनलाइन युएएनचे खाते उघडण्याचा निर्णय पीएफ कार्यालायने घेतला असल्याचे आयुक्त तांबे 'मटा'शी बोलतांना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिहा तुमच्या सांताबद्दल!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ख्रिसमस हा सण जसजसा जवळ येऊ लागतो, तसं आपल्यासमोर लाल कपड्यांमधला, लांब दाढी असलेला अन् पाठीवर गिफ्ट्सची पोटली घेतलेल्या सांताचे रुप समोर येऊ लागते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा अशीच ओळख आपल्या मनात सांताबद्दल ठसलेली असते. प्रत्येकाच्या आयुष्यातही असाच एक खराखुरा सांताही असतो. जो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो, आपल्या मागण्या पूर्ण करतो. ख्रिसमसच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातील सांताबद्दल शेअर करण्याची संधी 'महाराष्ट्र टाइम्स' घेऊन आले आहे. तुमच्या आयुष्यातला सांता कोण? या स्पर्धेद्वारे.

आपल्या इच्छा कळत-नकळत पूर्ण करणाऱ्या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे काही ना काही कारणाने राहून जाते. जर त्यांच्या विषयी लिहून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली तर स्वतःबरोबरच आपल्या सांतासाठीही तो क्षण अविस्मरणीय ठरेल. त्यामुळे 'मटा'ने दिलेली ही संधी न दवडता तुमचा सांता कोण? त्याच्या सोबतचं तुमचं नातं काय? त्याने तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण केल्या? हे सगळं बिनधास्त सांगा. स्पर्धकांनी १०० शब्दांत प्रतिक्रिया लिहून २४ डिसेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत 'मटा'च्या तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर पाठवाव्यात किंवा events.mata@gmail.com या ई-मेल आयडीवर मेलही करू शकता. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून विजेत्यांच्या प्रतिक्रिया 'मटा'मध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचम निषादतर्फे ‘स्वर नृत्य उत्सव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक पंचम निषाद मुंबई आणि फ्रेंड्स सर्कल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने २० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता कालिदास कलामंदीरात शास्त्रीय नृत्यावर आधारीत 'स्वर नृत्य महोत्सावा'चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती मंत्रा फाऊंडेशनची असून, विविधतेतून एकता ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. २००५ पासून मंत्रा फाऊंडेशन कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. या अगोदर मंत्रा फाऊंडेशनने पं. हरिप्रसाद चौरसिया (बासरी), उस्ताद रईस खान (सितार), अनिंदो चटर्जी (तबला), सतिष व्यास ( संतुर), निलाद्री कुमार ( सितार), जयतीर्थ मेवंडी (गायन), अर्चना जोगळेकर (नृत्य), मंदीरा मनिष (नृत्य) यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये स्वर नृत्य उत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षातला हा शेवटचा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमातून संगीत, गायन, नृत्य, अभिनय योगा अशा भारतीय कलांची विविध अंगे रसिकांसमोर सादर होणार आहेत.

२० डिसेंबर रोजी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात मंदिरा मनिष यांचे भरत नाट्यम सादर होणार आहे. यात त्या सर्व प्रथम गणेश वंदना त्यानंतर संत तुकारांमाचे अभंग भरतनाट्यमच्या माध्ययमातून सादर करणार आहे. यात 'पाय जोडोनी विटेवरी कर ठेवूनी कटेवरी' हा अभंग सादर करणार आहे. त्याच प्रमाणे 'मधुराष्टकम स्तोत्र', 'अधरम मधुरम' हे भजन, 'घालीन लोटांगण' त्याच प्रमाणे हिंदोळा रागातील तिल्लाना सादर करणार आहेत. त्यानंतरच्या सत्रात दिग्गज सतार वादक बुधादित्य मुखर्जी नाशिककरांसोमर आपले वादन सादर करणार आहेत. त्यांना सौमेन नंदी तबल्याची साथ करणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ५ ते ८.३० या कालावधीत कालिदास कलामंद‌िर येथे उपलब्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचा संप, प्रवाशांना कंप!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी गुरुवारी पुकारलेल्या राज्यव्यापी 'एसटी बंद'चे नाशिक शहर व जिल्ह्यात जोरदार पडसाद उमटले. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)ने पुकारलेल्या संपाचा फटका प्रवाशांनाच बसला. शहरात रिक्षाचालक, तर ग्रामीण भागात खासगी वाहनांनी मनमानी दर आकारून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले. प्रवाशांची दमछाक झाली ती वेगळीच. या संपाला इतर कर्मचारी संघटनांच्या सदस्यांनी छुपा किंवा प्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने एसटी महामंडळाचे कामकाज ठप्प झाले. उद्या, शुक्रवारी हे आंदोलन सुरूच राहू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

इंटकचे आंदोलन मोडून काढण्यात प्रशासनाला अपयश आले. महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना, कास्ट्राईब, कामगार संघटना, महाराष्ट्र मोटार कामगार संघटना अशा इतर कामगार संघटनांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे बोट दाखवत आंदोलनकर्त्यांना छुपा पाठिंबा दिला. दिवसभरात एखाद-दुसरी बस रस्त्यावर धावल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबईकडून येणाऱ्याअनेक बस नाशिकपर्यंत धावल्या. येथे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी रोखल्याने संबंधित चालकाने बस पुढे जाणार नाही, अशी भूमिका घेतली. आंदोलनकर्त्या कामगारांनी गुरूवारी पहाटेच डेपो क्रमांक एकमधील २२ बसेसच्या चाकांमधील हवा सोडली. डेपो क्रमांक दोनवर सुध्दा हेच चित्र होते. बस चालवण्यासाठी पुढे आलेल्या एका चालकास मारहाण झाल्याची चर्चा होती. मात्र, तसा कोणताही गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल नव्हता.

सहा डेपो ठप्प
शहरात बससेवेच्या १८५ पैकी ६५, तर दुपारच्या सत्रात १८५ पैकी ४० फेऱ्या झाल्या. जिल्ह्यातील सहा डेपो पूर्ण बंद होते. तर उर्वरित डेपोंमध्ये अशंतः सेवा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून झाला जिम्नॅश‌ीयमचा जिर्णोध्दार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अनेक व्यायामशाळा या धूळ खात पडल्या असून, त्यातील साहित्य चोरीला गेले आहे. तर ज्या ठिकाणी व्यायाम साहित्य आहे तेथे ते वापरण्याजोगे राहिलेले नाही. मात्र नाशिक महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावालगत असलेल्या जिम्नॅशीयमचा जिर्णोध्दार कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता तेथील व्यायामप्रेमींनी केला आहे.

नाशिक महापालिकेतर्फे ३० वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली. त्याचवेळी तेथे जिम्न्यॅशीयमचा हॉल बांधून अद्यावत करून व्यायामाचे साहित्य बसव‌िण्यात आले. त्यावेळी हे शहरातील अद्यावत जिम्नॅशीयम होते. मात्र गेल्या काही वर्षापासून महापालिकेचे या जिम्नॅशीयमला उतरती कळा लागली. येथील व्यायामाचे साहित्य जीर्ण झाले. अनेक साहित्य खराब होऊन निकामी झाले. त्यामुळे व्यायामप्रेमींना या ठिकाणी व्यायाम करणे मुष्कील झाले. याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा करण्यापेक्षा येथील व्यायामप्रेमींनी वर्गणी काढून जिर्णोध्दार करण्याचे ठरवले व पैशाची जुळवाजळव केली. या ठिकाणी २० वर्षात भिंतींना तडे गेले होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी झिरपत होते. तसेच एका खोलीतील स्लॅब कोसळला होता. व्यायामासाठी असलेल्या साहित्याचे रोप, पुली स्टेशन देखील तुटले होते. अनेक साहित्याच्या स्प्रिंगा तुटून खराब झाल्या होत्या. हॅन्डलचे प्लेटिंग गेले होते. व्यायामासाठी बसायच्या बाकांचे कुशन गेले होते. याठिकाणी खराबा साहित्यामुळे दोन युवकांचा जीव जाता जाता वाचला होता.

यासर्व बाबी लक्षात घेऊन डॉ. संजय मुंदडा, बाळासाहेब घुगे, श्रीकांत जाधव, डॉ. दिनेश ठाकरे निखील साळुंके यांनी जिर्णोध्दार केला आहे. यातील प्रत्येक साहित्य नव्याने तयार करण्यात आले असून, त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मल्ट‌िपर्पज साह‌ित्य देखील लावण्यात आले आहे. तसेच भिंतींना रंग देण्यात आला असून नवीन आरसे देखील लावण्यात आले आहेत. तसेच खिडक्यांची दुरूस्ती करून त्यांना रंगरोगोटी करण्यात आली आहे.

नेहमी प्रशासनाकडून आपेक्षा करण्यापेक्षा गेल्या २० वर्षापासून जेथे आपण बलोपासना करतो त्याचा जिर्णोद्दार आपणच करावा, असे मनात आले आणि आम्ही सर्वांनी याची दुरुस्ती केली. असे उपक्रम इतरांनीही हाती घ्यायला हवेत.

- डॉ. संजय मुंदडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून पेटला संघर्ष

$
0
0

नगरसेवक, प्रशासन आमने-सामने; आयुक्तांचे मानकाकडे तर नगरसेवकांचे ल‌िकेजवर बोट
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाणी प्रश्नावरून शहरात सुरू असलेल्या राजकारणाचे पडसाद सलग तिसऱ्या महासभेतही पहायला मिळाले. पाणीकपातीवर प्रशासन राजकारण करीत असून, नगरसेवकांना कोंडीत पकडले जात असल्याचा थेट आरोप नगरसेवकांसह पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असा संघर्ष महासभेत पहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय मानकानुसार पाण्याचे नियोजन केले जात असल्याचा दावा आयुक्तांनी केल्यानंतर 'आम्हाला गल्लीबोळात फिरायचे आहे' असा टोला मनसेनेच आयुक्तांना लगावला. त्यामुळे पाणी प्रश्नावर प्रशासनविरुद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष रंगला.

विकासकामांच्या मंजुरीसाठी आयोजित केलेली महासभा अपेक्षेप्रमाणे पाणी प्रश्नावर गेली. दोन दिवसापूर्वी अचानक लागू केलेल्या वाढीव पाणीकपातीवरून नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. महासभेने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची अमंलबजावणी करण्याऐवजी प्रशासनाने तीस टक्के पाणीकपात कोणाला विश्वासात घेऊन केली, असा प्रश्न उपस्थित केला. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी पाणीकपातीवर सविस्तर निवदेन केले. सद्यस्थितीत ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचा तुटवडा असल्याचे त्यांनी सांग‌ितले. पालिकेच्या आरक्षण गंगापूर धरणात २२२३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहिले आहे. ते सध्याच्या पुरवठ्यानुसार २२७ दिवस पुरविणे शक्य नाही. तर दारणातून केवळ ३०० दशलक्ष पाणीच आपण उचलू शकते. त्यामुळे जवळपास ४७ दिवसाचा शॉर्टेज पडत असल्याचे त्यांनी सांग‌ितले. प्रशासनाच्या या आकडेवारीमुळे भाजपला कोंडीत पकडण्याची संधीच पुन्हा नगरसेवकांना मिळाली. तर आयुक्तांनीही उर्वरीत काळात पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही जलकुंभ निहाय नियोजन करत असून, आंतरराष्ट्रीय मानकानुसार प्रतिमानसी १५० लिटर पाणी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांग‌ितले. त्यामुळे आयुक्त शासनाचीच बाजू मांडत असल्याचे बघून नगरसेवकांनी मग प्रशासनावरच मोर्चा वळला.

प्रशासन भाजपविरुद्ध इतर पक्षांमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी केला. जनतेला वस्तुस्थिती कळू द्या, असे सांगत 'आम्हाला पापाचे धनी करू नका' असे त्यांनी सांग‌ितले. सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर आक्षेप घेत, 'राजकारण करू नका' असा सल्ला आयुक्तांना दिला. आयुक्त शासनाचे प्रतिनिधी असल्याने ते शासनाचीच 'री' ओढत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. '१५० लिटरचा साक्षात्कार प्रशासनाला आताच का झाला' असा सवाल अजय बोरस्ते यांनी केला. वस्तुनिष्ठ अहवाल प्राप्त करून लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचे आवाहन नगरसेवकांनी केले.

पाण्याचे फेरनियोजन

दरम्यान, महासभेत आयुक्तांनी शहरातील पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन केले जात असून, पाण्याची चाचपणी केली जात आहे. जलकुंभनिहाय किती पाणी लोकांपर्यत जाते याचा अभ्यास केला जात असून, आंतरराष्ट्रीय मानकाकडून १५० लिटर पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्तांनी सांग‌ितले. सद्यस्थितीत २२७ लिटर प्रतीमानसी पाणीपुरवठा करत आहोत. त्यात गळती धरल्यास १९४ लिटर पाणी जाते. त्यामुळे पुरवठा कमी झाला तरी, त्याला पाणी कपात म्हणू नये, अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 'पाणी कुठे मुरतेय हे कळायला हवे' असे सांगून तपासणी मोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांग‌ितले. मात्र त्यावरही सभागृहाचे समाधान झाले नाही.

असे प्रकार टाळा; महापौरांचे आवाहन

पाणीकपातीत लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेणाऱ्या प्रशासनाला नगरसेवकांसह महापौरांनी खडे बोल सुनावले. 'या पुढे जे काही कराल ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच करा आणि मगच प्रसारमाध्यमांना माहिती द्या' असे त्यांनी आयुक्तांना निर्देशीत केले. 'अशा घटना वारंवार घडायला नकोत.' याची काळजी घेण्याचा सल्लाच त्यांनी आयुक्तांना दिला. अशा घटनांमुळे द्वेष निर्माण होतो. त्यामुळे असे प्रकार टाळण्याचे आदेश महापौरांनी दिले.

पवारांवर कारवाई करा; भाजपाची मागणी

भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर यांनाही प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पाणी पुरवठा विभाग एकीकडे ३५ टक्के पाणी गळती असल्याचे सांगत, असताना स्मार्ट सिटीच्या डॉकेटमध्ये मात्र साडेबारा टक्केच पाणी गळती दाखवत आहे. त्यामुळे नेमकी स्थिती काय असा प्रश्न उपस्थित करत आर. के. पवार यांच्यावर कारवाईची मागणी केली. लोकप्रतिनिधी व पालकमंत्र्यांना एकत्र‌ित आणून पाणीप्रश्नी अखेरचा तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.

'स्वतःचे इगो जपू नका'

विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी पाण्यावरून अडीच मह‌िने शहराचे वातावरण दूषित करणाऱ्या भाजपच्या आमदारांवर टीका केली. स्वतःचा इगो जपण्यासाठी आमदार शहराला वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'सभागृहाच्या अधिकारावर अतिक्रमण करून नगरसेवकांना चुकीचे ठरविले जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु लोकांना सगळे समजते. ते तुम्हाला तुमची जागा दाखवतील,' असा टोला आमदारांना लगावत 'तुमची भूमिका सभागृहात येऊन मांडा' असे आवाहन त्यांनी भाजप आमदारांना दिले.



तर आयुक्तांच्या घरावर मोर्चे

शासनाची बाजू घेणाऱ्या आयुक्तांवर शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी आक्षेप घेत, उपरोधिक अभिनंदन केले. नाशिकमध्ये मानांकन चालत नसल्याचा टोला त्यांनी आयुक्तांना लगावला. 'लोकप्रतिनिधी राजकारण करतेय' असा समज जनतेत जातोय. त्यामुळे तुमची कातडी वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधींना अडकवू नका असा सल्ला देत परस्पर निर्णय घेऊन नगरसेवकांना अडचणी आणू नका. 'नाहीतर आम्ही तुमच्या घरावर मोर्चे काढू' असा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेशन दुकानांसाठी स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन दुकानांच्या कामकाजात अमुलाग्र बदल आणत त्यांना आदर्श बनविणारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या एप्रिलपर्यंत प्रत्येक तालुक्यात किमान ५ रेशन दुकान आदर्श करण्याचे ध्येय असल्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले आहे.

जिल्ह्याचा पुरवठा विभाग आणि धान्य वितरण व्यवस्थेवर भ्रष्ट कारभाराचा डाग लागल्यामुळे ही व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच रेशन दुकानदारांना विश्वासात घेऊन आदर्श रेशन दुकान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तशी घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील रेशन दुकानाचे कामकाज अतिशय चांगले असल्याने याच धर्तीवर ही स्पर्धा होणार आहे. रेशन दुकानांचे पारदर्शक कामकाज, ग्राहकांना दिली जाणारी सेवा, सर्व प्रकारच्या नोंदी, उपलब्ध साठ्याचा तपशील, दुकानातील निटनेटकेपणा, धान्य उपलब्ध झाल्याची माहिती लाभधारकांपर्यंत पोहचविणे, सर्व लाभार्थ्यांना धान्य मिळवून देणे अशा विविध निकषांवर ही स्पर्धा होणार आहे. या दुकानांना ५ हजार रुपयांपर्यंतची मदतही केली जाणार आहे.

११ दुकानांचे परवाने रद्द

जिल्ह्यात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आजवर रेशन दुकान तपासणीची मोहीम राबविण्यात आली. त्यात ९४७ दुकाने दोषी आढळली आहेत. यातील ११ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. ३२ दुकानांचे निलंबन आणि चौकशी सध्या सुरु आहे. ४५ दुकानांची १०० टक्के तर ३२५ दुकानांची अनामत ५० टक्के अनामत रक्कम जप्त केली आहे. ४०९ दुकानांना नोटिशीद्वारे ताकीद देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसाकाचा बॉयलर अखेर पेटला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळाने ७ कोटी रुपये कर्ज मंजूर केले असून, आगामी काळात को-जनरेशनच्या कामासाठी सुमारे ४ कोटी रुपये कर्ज मंजूर करीत असल्याची घोषणा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांनी शुक्रवारी येथे केली.

विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या २९ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ चेअरमन नरेंद्र दराडे, व्हाइस चेअरमन सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी दराडे बोलत होते. ते म्हणाले की, जिल्हा बँक आणि साखर कारखान्याचे समीकरण अत्यंत अवघड झाले आहे. यामुळे कामकाज करतांना अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांकडे सुमारे ९०० कोटी रूपयांचे पीककर्ज थकीत असून, ते वसूल करण्यासाठी संचालक मंडळ गावोगावी दौरे करू लागले आहे.

महाराष्ट्रात वसाकाला पुनर्गठन योजनेतून कर्ज देण्याचा पहिलाच प्रयोग असून, राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या थक हमीच्या जबाबदारीवर कर्ज देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर को. जनरेशनसाठीही सुमारे ४ कोटी रूपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची घोषणा यावेळी चेअरमन दराडे यांनी केली. आमदार आमदार डॉ. राहुल आहेर म्हणाले, की राज्याच्या कारखानदारी दहाव्या क्रमांकावर असलेला वसाका अखेरच्या घटका मोजत होता. मात्र कसमादेचा हा कोहिनूर परत मिळविण्यासाठी आपण केंद्र व राज्य शासनासह राज्य बँकेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून वसाकाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी कटीबध्द आहोत. मुख्यमंत्री व सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचे यासाठी मोलाचे योगदान आहे. यामुळेच नववर्षाच्या पहिल्याच सप्ताहात वसाकाचा गळीत हंगाम शुभारंभास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री नामदार चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दादा भुसे व पालकमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती असणार आहे.

वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादकांनी वसाकाला ऊस देवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. वेळ प्रसंगी गेटकेनचा ऊस मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. यंदाच्या गळीत हंगामात दीड ते दोन लाख उसाचे गळीत करण्याचा संकल्प असून, कर्जाचा परतावा करतांना जिल्हा बँक व राज्य बँकेच्या दायित्व कदापि विसरता येणार नसल्याचेही आमदार डॉ. राहुल आहेर यांनी स्पष्ट केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर होते. व्यासपिठावर शासनाचे प्राधिकृत अधिकारी माळवे, जिल्हा बँकेचे संचालक केदा आहेर, धनजंय पवार, माजी चेअरमन अ‍ॅड. शशिकांत पवार, मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक देसले, नारायण पाटील, अनिल पाटील, बाळासाहेब बिरारी, वसाकाचे माजी अध्यक्ष व संचालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतर्गत रस्त्यांची झाली चाळणी

$
0
0



अंबड एमआयडीसीमध्ये ७०० पेक्षा अधिक लघू, मध्यम व मोठे उद्योगांमध्ये विविध भागांतून येणार कामगार काही कंपनीत दोन शिफ्ट तर काही कंपन्यामध्ये तीन शिफ्टमध्ये काम करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे तो रस्त्यांचा.

महापालिकेने कुंभमेळ्यात अंबड एमआयडीसीतील केवळ मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण केले. मात्र, अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांमुळे खड्डयांनी व्यापलेल्या रस्त्यांवरून गाडी चालविणे वाहनचालकांना कठीण झाले आहे.

डांबरीकरणाच्या नावाखाली ठिगळ पावसाळ्यानंतर महापालिकेने अंबड एमआयडीसील काही रस्त्यांचे दुरुस्तीची कामे केली. मात्र, रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामात डागडुजी करतांना डांबर व दगडांचे ठिगळच लावण्यात धन्यता मानल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. यामुळे रस्ते ओबड-धोबड झाले असून कंबरदुखीचा त्रास कामगारांना सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन कोटींचा रोबो; सव्वा कोटीची दुरूस्ती

$
0
0

बॉम्ब शोधक पथकाला हवा नवा सहकारी

arvind.jadhav

@timesgroup.com

नाशिक : बॉम्ब शोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) दोन दशकापूर्वी सहभागी झालेला रोबोट आता कालबाह्य झाला आहे. नव्या यंत्राची किंमत दोन कोटी रूपयांच्या आसपास असून, जुन्या यंत्राच्या दुरूस्तीसाठी सव्वा कोटी रूपयांपर्यंत खर्च येणार आहे. 'चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला', असा हा प्रकार झाला. या पार्श्वभूमीवर नवीन यंत्र खरेदीचा प्रस्ताव तयार झाला. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्यापासून तो वरिष्ठ पातळीवर रखडला आहे.

नाशिक शहरासाठी कार्यरत असलेल्या बीडीडीएस पथकात पीआय, ११ टेक्निशियन, चार प्रशिक्षीत श्वान, त्यांचे हॅण्डलर तसेच ५ चालक आहेत. यामध्ये १९९१ मुंबई पोलिसांकडून नाशिकला आलेल्या एका रोबोटचाही समावेश आहे. त्यावेळच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला देण्यात आलेल्या रोबोटची कामगिरी सर्वांना आश्चर्यचकीत करणार होती. मात्र, कालातंराने या यांत्रिक मानवाला सांभाळणे जड होऊ लागले. देखभाल दुरूस्ती करताना जुन्या तंत्रज्ञानाची अडचण निर्माण झाली.

यामुळे २०१५ च्या कुंभमेळ्याची तयारी करताना जुनाट रोबोचा मुद्दा समोर आला. मुंबई पोलिसांची सेवा बजावून नाशिक शहरात आलेल्या रोबोच्या दुरूस्तीसाठी तब्बल एक कोटी १० लाखापर्यंतच खर्च करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने सिंहस्थापूर्वी सुमारे दोन कोटी रूपयांचे नवीन मशिन खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र, सिंहस्थ संपल्यानंतरही त्याच्यावर काहीच निर्णय झालेला नाही. याबाबत बीडीडीएचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ म्हणाले,'बॉम्ब शोधणे व त्याचा नाश करणे यात यांत्रिक मानवाचे महत्त्व असते. यामुळे मनुष्यहानीचा धोका टळू शकतो. सध्या, आमच्याकडे पुरेशी यंत्रसामुग्री आहे.'



४५ किलो वजनाचा सूट दीड तास सराव

बीडीडीएस पथकामार्फत बॉम्ब शोधण्याचे व त्याचा नाश करण्याचे काम केले जाते. हे काम करताना मनुष्यहानी होणार नाही, याची दक्षता घेत कर्मचाऱ्यांना 'केवलार' या पदार्थापासून व विशिष्ट धातूपासून तयार केलेला सुट देण्यात येतो. हा सूट ४५ किलो वजनाचा असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला इतक्या वजनाचा सूट घालून काम करता येणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना त्याची सवय असावी म्हणून दररोज दीड तास तो परिधान करून कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतली जातात. बॉम्ब तंत्रज्ञानाबाबत प्रत्येक कर्मचाऱ्याचे ज्ञान अपडेट असावे, यासाठी प्रत्याक्षिक व व्याख्यांनाचे आयोजन होते. विशेष म्हणजे यात दररोज वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्या पुन्हा कडाडल्या!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने एकीकडे सर्वसामान्यांना अगोदरच चिंतेत टाकले असतांनाच आता गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात विविध प्रकारच्या भाज्या अन् पालेभाज्या चांगल्याच कडाडल्याने सामान्य गृहिणींची चिंता वाढली आहे. मंडईत पावले टाकत हा भाजीपाला खरेदी करताना पूर्वीच्या तुलनेत गेल्या चार-पाच दिवसांत मोठे दाम मोजावे लागत असल्याने गृहिणींपुढे पेच निर्माण झाला आहे. येवला शहरातील शनी पटांगणातील भाजी मंडईत गेल्या काही दिवसांत सर्वच भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम विविध प्रकारच्या भाज्या अन् पालेभाज्या यांच्यावरही झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत भाजी मंडईतील किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे भाव वर सरकल्याने सर्वसामान्य ग्राहकांना अधिकचे दोन पैसे मोजावे लागत आहेत. मेथीची जुडी २० रुपयांवर पोहोचली आहे, तर एक आठवड्यापूर्वी ४० रुपये किलो असलेली
वांगी ६० रुपये किलो झाली आहे. कोबीचा एक गड्डा १० रुपयांवरून २० रुपये झाला असून, जो फ्लॉवर चार दिवसांपूर्वी २० रुपये होता, तो ३० रुपये झाला आहे. गिलके ३० रुपयांवरून ४० रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहे. दोडका भावाच्या बाबतीत चार दिवसांतच डबल भरारी मारली असून, २० रुपये किलोचे दोडके गुरुवारी ४० रुपये किलोवर गेले होते. सिमला मिरचीनेही २० रुपयांवरून ३० रुपये किलो असा भाव गाठला आहे. नव्याने बाजारात दाखल झालेला हिरवा वाटाणा येवला मंडईत ६० रुपये किलो असा होता.
नव्याने मार्केटमध्ये येणाऱ्या लाल कांद्याची निघालेली कांदा पातही आता चांगलाच भाव खाऊ लागल्याचे दिसत आहे. प्रारंभी अवघ्या ५ रुपयाला मिळणारी कांदा पातची एक जुडी आता १५ रुपयाला मिळत आहे. वाल व गवार यांच्या भावाचा आलेख देखील गेल्या चार-पाच दिवसांत वर सरकला असून, २० रुपये किलो असलेली वालाच्या शेंगा आता ४० रुपये झाल्या आहेत. गवारने तर भावाच्या बाबतीत आता मोठी उंची गाठली असून, काही दिवसांपूर्वी असलेली गवार तब्बल ८० ते ९० रुपये किलोवर पोहोचल्याने सर्वसामान्य गृहिणींच्या उरात धस्स झाले आहे. जेवणात चटक आणणारी व भाजीत हमखास लागणारी हिरवी मिरची देखील ३० रुपयांवरून ४० रुपये किलोवर पोहोचली आहे. तर कोथिंबीरची अगदी छोटी जुडी १० रुपये झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images