Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्हा बँकेचे नरेंद्र दराडे शिवसेनेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष भाजपला धक्का देत त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसह जिल्हा बँकेतील राजकारणाला कलाटणी दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील आठ नगरसेवकांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या दोन्ही प्रवेश सोहळ्याने जिल्ह्यातील राजकारणाचे गणिते बदलली आहेत.
येवल्यातून आमदारकी लढवण्यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा दराडे यांनी केला आहे. दराडे हे भुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. परंत, विधानसभा निवडणुकीपूर्वीच दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी ते यशस्वी होवू शकले नव्हते. त्यांचा प्रयत्न बुधवारी यशस्वी झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने जिल्हा बँकेतील राजकारण बदलले असून जिल्हा बँकेत उपाध्यक्षापाठोपाठ अध्यक्षही शिवसेनेचा राहणार आहे. त्यामुळे बँकेवर सेनेचा झेंडा फडकणार आहे. तर येवल्यातून शिवसेनेला तगडा उमेदवार मिळणार आहे. शिवसेनेच्या या चालीमुळे 'राष्ट्रवादी'ला मोठा धक्का बसला आहे. सोबतच त्र्यंबकेश्वरमध्येही भाजप, मनसे, काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याने या नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे.
अनेक दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा होती. येवल्यातून आमदारकी लढविण्याची इच्छा असून छगन भुजबळांमुळे राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढता येत नाही. त्यामुळे आता शिवसेनेतर्फे ही निवडणूक लढविणार आहे.

- नरेंद्र दराडे, अध्यक्ष, जिल्हा बँक आठ नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमधील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या नगरसेवकांनी समर्थकांसह कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर भेट घेवून भगवा झेंडा हाती घेतला. भाजपच्या तृप्ती धारणे, राष्ट्रवादीचे रवींद्र सोनवणे, अलका शिरसाठ, शकुंतला वाटाणे, अंजना कडलग तसेच काँग्रेसचे ललित लोहगावकर, रवींद्र गमे, सिंधू मधे यांचा या आठ नगरसेवकांमध्ये समावेश आहे. त्यांच्या सोबत पंकज धारणे (भाजप), सचिन दीक्षित, विशाल शेलार (मनसे) यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षाचे संपर्कप्रमुख अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, निवृत्ती जाधव, शहर प्रमुख अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, शिवराम झोले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भटक्यांनी ओढला ‘आसूड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वर्षानुवर्ष मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा भटक्या समाजाने अनोख्या पध्दतीने निषेध नोंदविला. कडकलक्ष्मींनी अंगावर आसूड ओढत स्वत:ला शिक्षा करवून घेतली. एकीकडे मागास प्रर्वगातील या घटकांनी अनोखे आंदोलन छेडले असताना औषध उद्योगातील परकीय गुंतवणुकीस विरोध करीत एमआरही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले. एकूणच बुधवारचा दिवस आंदोलनांनी गाजला.

भटक्या विमुक्तांना नेहमीच दुर्लक्षिले गेले आहे. त्यांना न्याय्य हक्कांपासून वंचित राहावे लागत असल्याच्या निषेधार्थ भटके विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. बुधवारी सकाळीच आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्रित जमले. आपला आवाज प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी पारंपरिक लोकजीवनाचा आधार घेण्यात आला. कडकलक्ष्मीने पाठीवर आसूड ओढून सरकार आणि प्रशासनाला साद घातली. तर वासुदेव, बहुरूपी यांनीही या अभिनव आंदोलनात सहभागी होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकार देते वचन पूर्ण पण करते अपूर्ण यांसारख्या घोषणा देण्यात आल्या.

रतन सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या या आंदोलनात मांगुलाल जाधव, सोमनाथ मोहिते, संजय चव्हाण, बाळासाहेब नळवाडे, गिरजा चौथे, रंजना जाधव, सुनीता वाव्हळ यासह अनके जण सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्याच्या मालकीची जमीन परस्पर विकणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

बनावट पॅनकार्ड तयार करून दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीची परस्पर खरेदी-विक्री करणाऱ्या प्रमुख आरोपीस सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे वर्षभर सदर संशयित फरार होता. मंगळवारी सकाळी त्याला अटक केली.

ठाणे जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक वासुदेव करुणाकर नंबियार यांच्या जमिनीची परस्पर खरेदी-विक्री करणाऱ्या प्रमुख आरोपीस सिन्नर पोलिसांनी अटक केली. धारणगाव शिवारातील आपली जमीन दुसऱ्याच व्यक्तीने परस्पर विकल्याचे व पुन्हा तिची विक्री झाल्याचे आढळून आल्यानंतर नंबियार यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी नंबियार यांच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणात सहभागी असलेल्या सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. तयार केलेल्या खरेदी खतावर अनोळखी व्यक्तीचा तीच व्यक्ती नंबियार असल्याचे भासवून फोटो चिटकवला व त्याच्याकडून स्वत:च्या नावावर सदर जमिनीची खरेदी केली होती. बनावट नंबियार यांची ओळख पटविण्यासाठी नाशिकच्या पंचवटी भागातील दोघांची ओळख घेतली होती. भगतसिंग शेळके याने त्यानंतर बनावट खरेदी खताच्या आधारे सदर जमीन ९ ऑक्टोबर २०१४ रोजी शिंदे (ता. नाशिक) येथील भारती विजय साबळे व मातोश्रीनगर उपनगर नाशिक येथील अरुणा बबन फडोळ यांना स्वत:च्या मालकीची असल्याचा बनाव करून पुन्हा दुय्यम निबंधक कार्यालयात कागदपत्रे करून विक्री केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायमस्वरुपी देणगीदारांची फसवणूक

$
0
0

जुन्नरे यांचे वसंत व्याख्यानमालेवर आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शतकी महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या स्मृती व्याख्यानांमध्ये हस्तक्षेप करून वाढीव रकमेच्या मागणीमुळे कायमस्वरुपी देणगीदारांची फसवणूक झाल्याचा आरोप व्याख्यानमालेचे माजी कार्यवाह रमेश जुन्नरे यांनी केला आहे. देणगीदाराने लाख रुपयांची देणगी न दिल्यास स्मृतीव्याख्यान रद्द करणार का? याचाही खुलासा करण्याचे आवाहन जुन्नरे यांनी केले आहे. मात्र, व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी हा आरोप फेटाळून लावत अद्याप या मुद्द्यावर निर्णय झाला नसल्याची माहिती दिली.

शहरातील विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मोठ्या व्यक्तींच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी व्याख्यानमालेस सन २००१ मध्ये कायमस्वरुपी देणगी दिली होती. ही देणगी तहहयात स्वरुपाची असतानाही २९ नोव्हेंबर २०१५ रोजी या देणगीदारांना श्रीकांत बेणी यांनी पत्र पाठवून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांची देणगी मागितल्याचे जुन्नरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कायमस्वरुपी देणगीदाराने यापूर्वी देणगी देताना त्याची नोंद तहहयात आहे. तरीही या तहहयात देणगीस चामत्कारिकरित्या अवघ्या पंधरा वर्षांची कालमर्यादा आखून देत बेणी यांनी आर्थिक घोटाळ्याचा घाट घातल्याचेही जुन्नरे यांनी पत्रकात म्हटले आहे. कायदेशीरदृष्ट्या वाढीव देणगी देण्याची आवश्यकता नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे. तर, वसंत व्याख्यानमालेच्या घटनाबाह्य व्यवहारांचे आणि आर्थिक घोटाळ्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने देणगीदारांनी वाढीव देणगी देऊ नये, असे आवाहनही जुन्नरे यांनी केले आहे.

जुन्नरे यांनी केलेला स्मृती व्याख्यानातील भ्रष्टाचाराच्या हेतूचा आरोप बेणी यांनी मात्र फेटाळला. व्याख्यानमालेच्या वाढत्या खर्चाचा समतोल साधण्यासाठी वाढीव रक्कम देण्याचा प्रस्ताव स्वत: देणगीदारांकडून आला असून, याबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. सर्वांच्या विचार विनिमयाअंती योग्य निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी मांडली.

पंधरा वर्षांपूर्वीच्या व्याजाच्या तुलनेत आज व्याजाची रक्कम घटली आहे. तुलनेने वक्त्यांची मानधनाची अपेक्षा आणि निवासासह प्रवासाची सुविधा यावर होणारा खर्च आव्हानात्मक बनला असल्याचे बेणी यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर देणगीदारांशी रीतसर चर्चा करून त्यांचे या विषयावर मत घेतले असता त्यांनी स्वेच्छेने एक लाख रुपये देणगी देण्याची तयारी दर्शविली. या बैठकीचे इतिवृत्तर गैरहजर देणगीदारांना पत्राव्दारे करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचीही मते जाणून घेतली जात आहेत. त्यांचेही आक्षेप विचारात घेतले जातील अद्याप याबाबत कुठलाही अंतिम निर्णय झाला नसून, संस्थेच्या हिताचाच निर्णय अखेरीला घेतला जाईल, अशी भूमिका मांडतानाच बेणी यांनी जुन्नरे यांना दोषारोपांनी नागरिकांना संभ्रमीत करण्याऐवजी संस्थाहिताच्या दृष्टीने योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआर’ही उतरले रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोदी सरकारच्या धोरणांविरोधात वैद्यकीय प्रतिनिधींनी संप पुकारला. औषध उद्योगामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित जपणाऱ्या सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो वैद्यकीय प्रतिनिधी एकत्रित आले. औषधांच्या किमती कमी कराव्यात, या व्यवसायातील शंभर टक्के परकीय गुंतवणूक बंद करावी अशा मागण्या यावेळी महाराष्ट्र सेल्स अॅण्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनच्या सदस्यांनी केल्या. राज्यातून तीन हजार तर जिल्ह्यातून शेकडो वैद्यकीय प्रतिनिधी या संपात आणि आंदोलनात सहभागी झाले.

वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटनेने शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गोळे कॉलनी येथून मोर्चाला सुरुवात झाली. रविवार कारंजा, एमजी रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसची धोरणेच भाजप पुढे रेटत असल्याचा आरोप करण्यात आला. परकीय गुंतवणुकीच्या धोरणामुळे औषध क्षेत्रातील भारताचे स्वावलंबन धोक्यात येऊ लागले आहे. यामुळे जनतेची लूट करण्याचा मार्ग कंपन्यांना खुला होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अमेरिकेच्या अन्न व औषध नियमन करणाऱ्या संस्थेस भारतात कार्यालय स्थापण्यास दिलेल्या परवानगीमुळे भारताच्या स्वदेशी औषध उद्योगांवर संकट आले आहे. सरकार पेट्रोलजन्य पदार्थांवर जसे निरनिराळे कर लावते तसे औषधांच्या उत्पादन किमतीवरही आकारले जात असल्याने औषधांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे उत्पादनाच्या किमतीवर आधारीत किमती कमी कराव्यात आणि त्या नियंत्रित ठेवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. लस उत्पादक कंपन्यांचे पुनर्जीवन करावे, रुग्णविषयक चाचण्यांवर कडक निर्बंध आणावे, भारतात अमेरिकेच्या औषध कायद्यांची अंमलबजावणी करू नये, भारतात व्यापार करणाऱ्या सर्व कंपन्यांना अत्यावश्यक औषध उत्पादनासाठी भाग पाडावे, ऑनलाइन औषध विक्रीवर औषध आणि सौंदर्य प्रसाधन अक्ट १९४० नुसार बंदी आणावी, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक रस्त्यावर हवे गतिरोधक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-त्र्यंबकेश्वर या चौपदरी रस्त्यावर गेल्या काही दिवसांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या रस्त्यावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन देण्यात आले. या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण करून वर्ष झाले आहे. या रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्र्यंबकेश्वर येथे देश-परदेशातून हिंदू भाविक व पर्यटक सुद्धा मोठ्या संख्याने येतात. तसेच या रोडवर अनेक नामांकित कॉलेज, शिक्षण संस्था असल्यामुळे हजारो विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय असल्यामुळे येणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रहदारी वाढत आहे. हा रस्ता नवीन व मोठा असल्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावतात. रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातांना आमंत्रण मिळते.

आतार्यंत त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशन व सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत लेखी माहितीनुसार ६० अपघात झाले आहेत. त्यात २१ जणांनी जीव गमावला आहे. अनेक जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. यामुळे विद्यामंदिर, वासाळी फाटा, बेलगाव ढगा फाटा, महिरावणी, तळेगाव फाटा, खंबाळे फाटा, वाढोली फाटा, बेझे फाटा, अंजनेरी फाटा, तळवाडे फाटा, पेगलवाडी फाटा आदी ठिकाणी गतिरोधक बसवून त्या ठिकाणी सौरऊर्जेचे विद्युत खांब बसावावे, अशी मागणी नागरिकांना केली.

याप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले, अॅड. प्रभाकर खराटे, राष्ट्रवादीचे दीपक वाघ, कैलास चव्हाण, तुकाराम दाते, ज्ञानेश्वर मोरे, कैलास मोरे, राजू बदादे, शंकर चव्हाण, नामदेव चव्हाण, मधुकर खराटे, रामदास दाते, यशवंत महाले, काशीनाथ खेटरे, बाळासाहेब डगळे, श्याम ढगे, एकनाथ खांडबहाले, नवनाथ कोठुले, उमेश मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचएएलच्या कंत्राटी भरतीला विरोध

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मध्ये होत असलेल्या कंत्राटी भरतीला एचएएल युनियनने तीव्र विरोध दर्शवला आहे. कायमस्वरुपी कामगार भरतीची पद्धत बदलून कंत्राटी पद्धतीने अनेक समस्या निर्माण होणार असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.

भारतीय हवाई लदासाठी लागणाऱ्या लढाऊ विमानांची निर्मिती एचएएलमध्ये केली जाते. ओझरच्या प्रकल्पात आजवर कायमस्वरुपी कामगारांची भरती केली जात असताना यंदा मात्र कंत्राटी भरती करण्याचा निर्णय एचएएलने घेतला आहे. चार वर्षे कालावधीसाठी कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिकल डिप्लोमा झालेले १८, आयटीआय (फिटर) शिक्षण असलेले ५२ आणि आयटीआय (इलेक्ट्रिशिअन) झालेले १५ अशा एकूण ८५ पदांसाठी एचएएलने अर्ज मागविले. त्यास भरघोस प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळेच फिटरचे १३०७, इलेक्ट्रिशिअनचे ३४१ तर डिप्लोमा इलेक्ट्रिशिअनचे ३०६ असे एकूण १९५४ इच्छुक मुलाखत देणार आहेत. येत्या २० डिसेंबरला सरस्वतीनगरमधील के. के. वाघ कॉलेजमध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मात्र, या कंत्राटी भरतीमुळे अनेक समस्या उद्भवणार असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. एचएएलमधील गोपनीय काम कंत्राटी भरतीमुळे राखले जाणार नाही. तसेच, येत्या काळात कंत्राटी विरुद्ध कायमस्वरुपी कामगारांचा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. शिवाय चार वर्षे काम केलेल्या कामगारांना भविष्यात कायमस्वरुपी करून घेतले जाणार नाही, अशी अट आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. म्हणून एचएएल प्रशासनाने कंत्राटी भरती रद्द करावी, अशी मागणी युनियनने केली आहे.

खासदारांना भेटणार

कंत्राटी भरतीबाबत खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण यांची येत्या शनिवारी भेट घेतली जाणार आहे. त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून कंत्राटी भरती रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे युनियनचे प्रवीण तिदमे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिफेन्स अकाऊन्टस’चा वेतन आयोगाला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

केंद्र सरकारने लागू केलेल्या सातव्या वेतन आयोगाची ऑल इंडिया डिफेन्स अकाऊंटस असोसिएशनने कडाडून विरोध केला आहे. याबाबत गिरणारे येथील जेपी फार्म येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष एस. एन. सफाई यांनी वेतन आयोगाने तुटपुंजी वेतनवाढ दिल्याचा आरोप करीत या पुढील आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी गुरुवारी (दि. १७) देशभरातील १२५ पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची म‌ा‌हिती दिली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेले वेतनवाढ ही कर्मचाऱ्यांना परवडणारी नाही. पुढिल दहा वर्षांसाठी करण्यात आलेल्या वेतनवाढीत ऑल इंडिया डिफेन्स अकाऊंन्टस असोसिएशनच्या तीस हजार कर्मचाऱ्यांना काहीच लाभ मिळणार नाही, असे सफाई यांनी सांगितले. सहाव्या वेतन आयोगाने जाहीर केलेल्या वेतनवाढीत मूळ वेतनाच्या ४० टक्के वेतनवाढ दिली होती. परंतु, सातव्या वेतन आयोगाने मात्र केवळ ३२ टक्केच वेतनवाढ दिली आहे. यामध्ये ३० वर्षांपासून सेवा देणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात केवळ आठ ते साडेआठ हजार रुपायांची वाढ होईल. यामध्ये विविध कर कापले गेल्यावर प्रत्यक्षात केवळ चार ते पाच हजार रुपयांची मिळणारी वेतनवाढ अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राने कर्मचाऱ्यांच्या सूचना न मानल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा सफाई यांनी दिला आहे. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस एच. बी. डावरे, उपाध्यक्ष लालचंद डांगी, एम. प्रभू, नाशिक विभागाचे अध्यक्ष चंदा देशपांडे व सतीश केळकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दिंडोरीतील सर्व १७ जागा जिंकण्याची शिवसेनेत क्षमता’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

दिंडोरी नगरपंचायतीच्या सर्व सतरा जागा स्वबळावर निवडून आणण्याची शिवसेनेत क्षमता आहे. गेल्या पाच वर्षात माजी आमदार धनराज महाले यांनी केलेली विकासकामे व कार्यकर्त्यांनी तयार केलेली एक पक्ष बांधणी शिवसेनेच्या विजयासाठी कामी येणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते व दिंडोरी-पेठ लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी केले.

दिंडोरी येथील राजे मंगल कार्यालयात शिवसेनेची नगरपंचायत निवडणुकीबाबत बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, माजी आमदार धनराज महाले, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रवीण जाधव, बंडूशेठ शिंदे, उपजिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख उत्तम जाधव, माजी तालुकाप्रमुख सतीश देशमुख, अरुण वाळके, शहरप्रमुख रमेश बोरस्ते आदी उपस्थित होते.

सुहास सामंत पुढे म्हणाले की, भाजपा-सेना युती व्हावी अशी कार्यकर्त्याची इच्छा आहे. मात्र, भाजपला कदाचित युती नको आहे, असे दिसते. आम्ही भाजपला पाचऐवजी सहा जागा देण्याची तयारी दाखवली असतानाही भाजप सकारात्मक प्रतिसाद देत नाही. शिवसेनेकडे सर्वाधिक इच्छुक असून, सत्तर कार्यकर्त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. सर्वच प्रभागात चार ते पाच इच्छुक आहेत. सर्वांकडे निवडून येण्याची क्षमताही आहे. मात्र, जर भाजपने युती केली तर ठिक नाहीतर सर्व जागा लढवून विजय मिळवू, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

माजी आमदार धनराज महाले म्हणाले की, दिंडोरीचे विद्यमान आमदार निवडून वर्ष झाले तरी कुठेही दृश्य असे काम दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतानाही दिंडोरीत कमी जागा घेतल्या. यावरून त्यांच्यात निवडूण येण्याची क्षमता व विश्वास नाही. आज काही मोजक्या प्रभागात नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विकास सुरू आहे. ही त्यांची कामाची पद्धत आजही सुरू आहे. आमदार हा सर्वच रहिवाशांचा असतो. मात्र, येथे ठराविक ठिकाणीच विकास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटशिक्षणा‌धिकाऱ्यांच्या बदलीसाठी उपोषण

$
0
0

सटाणा : बागलाण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. डी. पाटील यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी बागलाण पंचायत समितीच्या सदस्यांनी पंचायत समितीच्या आवाराबाहेर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.

बी. डी. पाटील हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून शिक्षकांना धमकावून माया जमवित आहेत. या आशयाच्या अनेक तक्रारी आल्याने पंचायत समितीच्या दि. १६ नोव्हेंबर रोजीच्या मासिक सभेत गटशिक्षणाधिकारी यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी सर्व सदस्यानी एकमुखी केली होती. या आशयाचा ठराव देखील संमत करण्यात आला होता. त्यांची बदली करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ सतीश विसपुते, भास्कर बच्छाव, वीरेश घोडे, सोमनाथ सूर्यवंशी यांनी उपोषणास प्रारंभ केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक, त्र्यंबकवर आता शिवसेनेचा भगवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शिवसेना व भाजपमधील पक्ष विस्ताराची स्पर्धा आता शिगेला पोहचली आहे. शिवसेनेने मराठवाड्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा उत्तर महाराष्ट्राकडे वळवला आहे. नाशिकपासून त्याची सुरुवात करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांचे समर्थक, राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांचा प्रवेश करून घेत शिवसेनेने राष्ट्रवादीला धक्का दिला. तर भाजपाच्या ताब्यातील त्र्यंबक नगरपालिकेतही फोडाफोडी करीत सत्तेच्या दिशेने शिवसेनेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

जिल्हा बँकेत शिवसेनेपेक्षा भाजपचे संचालक जास्त आहेत. त्यामुळे शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करण्यासाठी वादग्रस्त कारकीर्द असलेल्या नरेंद्र दराडे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनात अडकविले. दराडेंच्या रुपाने आता जिल्हा बँकेवरच शिवसेनेचा झेंडा फडकवला आहे. सहकार राज्यमंत्री दादा भुसे हे शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे जिल्हा बँक ताब्यात घेवून भाजपसह राष्ट्रवादीलाही शह देण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपच्या ताब्यातील त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील भाजपसह, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांना शिवसेनेने पक्षात ओढले. त्यामुळे तेथे सेनेचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार!

भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती सेनेने आखली आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी आणि शासनाच्या योजनांच्या पाहणीसाठी शिवसेनेच्या तीन मंत्र्यांसह २२ आमदार शनिवारी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते तालुकास्तरावर जावून शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. तळागाळापर्यंत योजना पोहचत आहेत का, याची चाचपणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज यांचे `गार्डन सिटी`चे स्वप्न कोमेजणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिकला गार्डन सिटी करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वप्न मनसेच्या या सत्ताकाळात तरी पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाहीत. शहरातील २८६ गार्डन्सची देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने काढलेल्या निविदांना बचत गटांचा प्रतिसादच मिळत नाही. गार्डन्सची देखभाल व दुरुस्तीचे डॉकेट ठेकेदारांनी डोळ्यासमोर बनवले असतांना कामे मात्र बचतगटांना देण्याचा ठराव झाला. या कामांच्या निविदा प्रक्रियेतील अटी-शर्ती बचतगटांना पूर्ण करणे शक्य नसल्याने चार महिन्यांपासून निविदांना प्रतिसाद मिळत नाहीत. केवळ ३७ बचत गट पुढे आल्याने गार्डन्सची देखभाल व दुरूस्तीचे करायचे काय, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर आहे.

शहराला गार्डन सिटी करण्याचा मानस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच चौक व रिकाम्या जागांचे सुशोभिकणाचे काम महापालिकेने खाजगी कंपन्यामार्फत सुरू केले आहे. मात्र, पालिकेच्या मालकीचे असलेले ४७० गार्डन्स देखभाल व दुरूस्तीअभावी कोमजले आहेत.

त्यामुळे खाजगीकरणामार्फत या गार्डन्सच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी महासभेवर ठेवण्यात आला होता. त्यातील अटी-शर्ती मात्र प्रशासनानेच तयार केल्या आहेत.

गार्डन्स संदर्भातील अटी-शर्ती या बडे ठेकेदार डोळ्यासमोर ठेवूनच तयार करण्यात आल्या होत्या. त्यात कुशल मनुष्यबळासह निधी, देखभालीसाठी यांत्रिक साहित्य, औषध फवारणीचा समावेश आहे. डॉकेट ठेकेदारासाठी बनले असले तरी सभागृहाने कामे बचतगटांना देण्याची मागणी केली. त्यामुळे बचतगटांना ही कामे देण्याचा ठराव झाला. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबवली गेली. मात्र, या निविदांना तीन महिन्यांपासून प्रतिसाद मिळत नाही. अवघे ३७ बचतगट पुढे आले आहेत. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. गार्डन्सची देखभाल दुरूस्ती सध्याच्या अटी-शर्तींमध्ये होणे शक्य नाही. त्यामुळे ठराव बदलण्याशिवाय पर्याय प्रशासनासमोर नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्यांचा आज पगारवाढीसाठी संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एसटी बसेसचालक वाहकांसह कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसशी संलग्न चालक वाहक गुरुवारी (१७ डिसेंबर) संपावर जाणार आहेत. मनुष्यबळाची पर्यायी व्यवस्था केल्याने आम्ही प्रवाशांची गैरसोय टाळण्यात यशस्वी होऊ, असा दावा महामंडळ प्रशासनाने केला आहे.

पगारवाढ व्हावी यासाठी महामंडळाच्या ५३ हजार ५०३ कर्मचाऱ्यांनी व्यक्तिगत निवेदने देऊनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. न्याय्य हक्कासाठी कामगारांनी मोठ्या संख्येने संपात सहभागी व्हावे, असे आवाहन इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केले आहे. सामान्य प्रवासी वर्गाचे संपामुळे हाल होऊ नयेत यासाठी आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेत आहोत, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी स्पष्ट केले.

संप दिशाभूल करणारा

इटंक युनियनची संपाची घोषणा एस.टी कामगारांची दिशाभूल करणारी आहे, असा आरोप अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. हे आंदोलन म्हणजे सत्ता गेल्यानंतर उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीकाही या पदाधिकाऱ्याने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे जिल्हा अजिंक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई आणि फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट, नाशिक याच्या संयुक्त विद्यमाने पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या १४ वर्षांआतील मुलांसाठी राज्यस्तरीय सबज्युनियर फुटबॉल स्पर्धेत पुणे संघ अजिंक्य ठरला.

बुधवारी सकाळी पुणे व मुंबई संघादरम्यान अंतिम सामन्याला सुरुवात झाली. सामन्याच्या अगदी सुरुवातीलाच मुंबईने अप्रतिम गोल नोंदवत पुणे संघावर १ गोलची आघाडी प्रस्थापित केली. या दरम्यान पुणे संघाने मुंबईच्या गोलपोस्टवर जोरदार आक्रमण करून आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईच्या अभेद्य अशा बचावाने पुणे संघ जेरीस आला, मात्र पुणे संघाने आणखी जोरदार आक्रमण करून सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये एक गोल करून सामन्यात बरोबरी साधली.

अखेर हा सामना टायब्रेकरच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. टायब्रेकरमध्ये मुंबईच्या खेळाडूंनी दोन संधी गोलपोस्टच्या बाहेर बॉल मारून वाया घालवल्या तर पुण्याच्या गोलरक्षकाने एक गोल अडवून मुंबई संघास फक्त दोनच गोल करण्याची संधी दिली. पुणे संघाच्या खेळाडूंनी पाच संधींपैकी तीन संधींचे गोलात रूपांतर केले आण‌ि पुणे संघाला ४ विरुद्ध ३ गोलच्या फरकाने विजयश्री मिळवून दिली.

बक्षिस वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुभळे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी साऊटर वाझ, खजिनदार प्यारेलाल चौधरी, बी. एन गोयश्ल ट्रस्टचे के. जी. गुप्ता, संदीप गोयल, फुटबॉल असो. ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष डॉ. धर्माधिकारी, जनरल सेक्रेटरी अर्जुन टिळे, कार्याध्यक्ष शरद आहेर, उपाध्यक्ष गुलजार कोकणी, खजिनदार सुनिल ढगे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी विजयश्री चुभळे यांनी विजयी संघाला शुभेच्छा देताना फुटबॉल संघटनेच्या या कामामुळे नाशिकमधील ग्रामीण भागातील खेळाडूंनाही चांगले व्यासपीठ मिळू शकेल, अशी आशा व्यक्त केली. तर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी साऊटर वाझ यांनी नाशिक जिल्ह्याने आयोजित केलेल्या स्पर्धेचा दर्जा अतिशय उत्तम असल्याचे नमूद करत भविष्यात नाशिकमध्ये जास्तीत जास्त सामने आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. संघटनेचे अध्यक्ष डॉ. धर्माधिकारी यांनी फुटबॉल खेळाच्या विकासासाठी नाशिक जिल्ह्याच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी कटीबद्ध असल्याचे नमूद केले.

विजेते पुणे व उपविजेत्या मुंबई संघांना चषक देऊन गौरविण्यात आले तर या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक गोल केलेल्या साताऱ्याच्या यशवर्धन मोरे, सर्वोत्कृष्ट गोल रक्षक म्हणून मुंबईच्या चिन्मय शिर्के तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुण्याच्या प्रणव काळे या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉगिंग नव्हे, समस्यांचा ट्रॅक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंदिरानगर परिसरात उभारण्यात आलेला जॉगिंग ट्रॅक सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. हा ट्रॅक ओबडधोबड बनला असल्याने त्यावर चालणे आणि धावणे मुश्किल बनले आहे. जमिनीचा समतोलपणा टिकून राहण्यासाठी वेळोवेळी मुरुमाचा भराव टाकून रोलरच्या सहाय्याने त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक असते. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे जॉगिंग ट्रॅकची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

सपाटीकरणासाठी आणलेल्या मुरुमाचे ढीग जॉगिंग ट्रॅकवर जागोजागी आहेत. मात्र, त्या मुरुमाचा वापर करून जॉगिंग ट्रॅकचे सपाटीकरण कधी होईल याची नागरिक वाट पहात आहेत. दरम्यानच्या काळात वर-खाली असलेल्या जमिनीमुळे पाय मुरगळणे, लचक भरणे, धावतांना पडून किरकोळ जखमा होणे यासारख्या दुखापतींना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य जपण्यासाठी उभारलेला जॉगिंग ट्रॅक लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. जॉगिंग ट्रॅकवर गवत वाढले असून, त्याचबरोबर कचऱ्याचे ढीगही जमले आहेत.

जॉगिंग ट्रॅकभोवती बसविलेले कंपाऊंड अनेक ठिकाणी तुटले आहे. काही नागरिक आपली वाहने जॉगिंग ट्रॅकमध्ये पार्क करीत असतात. त्यामुळे याला पार्किंगचे स्वरूप आले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे ग्रीन जीम बसविण्यात आली. मात्र, येथे येणाऱ्या नागरिकांना तो अजिबात पुरेसा नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिरायू उपउपांत्य फेरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोंडाजी नामदेव दुधारे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आणि महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन व नाशिक जिल्हा फेन्सिंग महासंघाच्या सहकार्याने पंचवटी येथील नवरंग मंगल कार्यालयात पहिल्या मिनी गटाच्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या चिरायू ब्रह्मेचाने उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.

उद्‍घाटनानंतर झालेल्या फॉइल प्रकारात नाशिकच्या अशोका युनिव्हर्सल शाळेच्या चिरायू ब्रह्मेचा याने रत्नागिरीच्या सर्वेश झोटेचा ५-२ असा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेचा समारोप १७ डिसेंबरला नाशिकचे सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते होईल. स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना पदकासह रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तलवारबाजी या खेळात अशा प्रकारची रोख बक्षिसे देणारी ही पहिलीच स्पर्धा आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातून २३५ खेळाडू सहभागी झाले आहेत.

स्पर्धेचे उद्‍घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक आनंद खरे यांच्या हस्ते झाले. या वेळी भारतीय तलवारबाजी महासंघाचे सचिव अशोक दुधारे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तलवारबाजीची आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल विधाते, नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन उपाध्यक्ष नितीन हिंगमिरे, सचिव राजू शिंदे, भूषण जाधव (ठाणे), डॉ. दुखंडे (मुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आनंद खरे म्हणाले, लहान वयात खेळाडूंना स्पर्धेचा सराव मिळाल्यास ते पुढे चांगली कामगारी करू शकतात, त्यामुळे अशा स्पर्धेचे वारंवार आयोजन होणे आवश्यक आहे असे नमूद करून या लहान खेळाडूंनी नियमित सराव करून स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

अशोक दुधारे यांनी हे खेळाडू एशियाड आणि ऑलिम्पिकपर्यंत जाण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असून ही स्पर्धाही त्यातलाच एक भाग आहे, असे सांगून पुढील काळात त्याची प्रचीती येईल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन नितीन हिंगमिरे यांनी केले तर स्नेहल विधाते यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिक रन’ ९ जानेवारीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी सुरू झालेली 'नाशिक रन' यंदा शनिवारी, ९ जानेवारी रोजी महात्मानगर क्रीडांगणावर होणार आहे. १४व्या नाशिक रनमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही २० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत.

फ्लोरल आणि सौमित्र भट्टाचार्य यांच्या पुढाकाराने २००३ मध्ये 'नाशिक रन'ची स्थापना करण्यात आली. नाशिक आणि परिसरातील वंचितांना मदतीचा हात द्यावा तसेच निरोगी सुदृढ जीवन शैलीचा मंत्र समाजापर्यंत पोहचावा हा उद्देश या मागे होता. विविध उद्योग समूहाकडून देणग्या प्रायोजकत्व घेऊन व दौडमध्ये सहभागी होणाऱ्या नाशिककरांनी नोंदणी केलेल्या रकमेतून यासाठी निधी उभारला जातो. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना यंदाही टीशर्ट दिले जाणार आहे.

५०० हून अधिक स्वयंसेवक 'नाशिक रन'ची तयारी करीत आहेत. तीन टप्प्यांमध्ये सहभागी व्यक्तींना दौडमध्ये सोडण्यात येते. सर्व प्रथम विशिष्ट अपंगत्व आलेल्या लहान मुलांसाठी, दुसऱ्या टप्प्यात लहान मुलांसाठी व तिसऱ्या टप्प्यात प्रौढांसाठी दौडमध्ये सोडण्यात येते. 'नाशिक रन'च्या प्रमुख मार्गावर सातहून अधिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी प्रत्येक वैद्यकीय केंद्राजवळ रुग्णवाहिका तैनात असेल. अनुभवी डॉक्टरांसह ५०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता पोलिसच उचलणार वाहने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक
वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांना रस्त्यावरून हटवण्यासाठी तीन टोईंग व्हॅन भाडेतत्त्वावर नेमण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी वाहने उचलून घेण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराची नियुक्ती केली होती. मात्र, हा प्रयोग अयशस्वी ठरला. असे काम करण्यास महापालिका पुन्हा तयार नसल्याने अखेर पोलिस विभागानेच तीन वाहने भाडेतत्वावर घेऊन बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे नियोजन आखले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात लावण्यात येणारी वाहने पोलिसांनी उचलावी की महापालिकेने असा दोन वर्षापूर्वी वाद उद्भवला होता. शेवटी महापालिकेच्या गळी हे काम उतरवण्यात आले. महापालिकेने एका ठेकेदाराची नियुक्ती करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठेकेदाराला सर्वच स्थरातून विरोध सहन करावा लागला. ठराविक भागातच कारवाई होत असल्याची ओरड होत गेली. महापालिकेने प्रथम पार्किंगसह इतर सुविधा पुरवाव्यात आणि मगच रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांना हात लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली. महापालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने कसेबसे दीड ते दोन वर्ष काम केले.

चिंचोळ्या भागाचा प्रश्न

एमजीरोडसह ​​गावठाण भागात रस्त्यावर वाहने पार्क होण्याचा प्रश्न मोठा आहे. मात्र, वाहन उचलण्यासाठी घेण्यात येणारी टोईंग व्हॅन आकाराने मोठी असल्याने अशा भागात पोहचत नाही.

एकीकडे शहरातील काही भागात वाहने उचलण्याची कारवाई सातत्याने होते. तर दुसरीकडे याच समस्येकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अरूंद असलेल्या ठिकाणांचा शोध घेऊन पोलिसांनी येथेही अशी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली जाते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोट्या व्हॉट्स अॅप पत्रकांचा शिक्षकांना गुंगारा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
व्हॉट्स अॅपमुळे माहितीची देवाणघेवाण वाढली असली तरी अफवांचे पेवही प्रचंड वाढले आहे. सध्या याचाच अनुभव शहरातील शिक्षकवर्गाला येत आहे. प्रशासनाने कोणतीही सुटी शाळांना जाहीर केली नसली तरी २६ डिसेंबरला सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे, अशा आशयाचे परिपत्रक शिक्षकांच्या मोबाईलवर येऊन धडकत आहे.

पुढील आठवड्यात २४ डिसेंबरला ईदची व २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुटी शाळांना आहे. त्यानंतर २६ डिसेंबर सोडल्यास पुन्हा रविवारची सुटी येत आहे. यामुळे केवळ २६ डिसेंबर या एकाच दिवशी शिक्षक व विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे. याही दिवशी सुटी मिळाल्यास सलग चार दिवसांची सुटी शाळांना मिळू शकेल. या हेतूने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेचे नाव घेत अनधिकृत परिपत्रक तयार करण्यात आले आहे. हे पत्रक शिक्षकांपर्यंत पोहोचवले जात असून, याद्वारे अफवा पसरविल्या जात आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

शिक्षकांचा संभ्रम दूर करण्यासाठी व ही अफवा दूर करण्यासाठी आता विद्या परिषदेमार्फत परिपत्रकजाहीर करण्यात आले आहे. सुटीबाबतचे कोणतेही पत्रक या कार्यालयाशी संबंधित नसून अशा प्रकारचे कोणतेही पत्रक पाठविले नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यापूर्वीही असे फसवे परिपत्रके पाठविण्यात आली असून, त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याच्या घटना घडल्या आहेत. तर शिक्षकांच्या मते हे एखाद्या शिक्षकाचेच काम असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शिक्षकांनी असले मॅसेच पुढे पाठवू नये, अशीही मते व्यक्त झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असंघटीत कामगारांना १८ हजार वेतन द्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर
केंद्र शासनाच्या सातव्या वेतना आयोगाने चतृर्थ श्रेणी कामगारांना १८ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, अशी शिफारस केली आहे.
यामध्ये आयोगाच्या शिफारशीनुसार सीटूने सरसकट सर्वच असंघटीत कामगारांना १८ हजार रुपये किमान वेतन देण्याची मागणी केली
आहे. सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या या कामगारांना त्याचा लाभ मिळेल, असे सीटूचे डी. एल. कराड यांनी सांगितले.

सातव्या वेतन आयोगाच्या समितीने केंद्र शासनातील चतृर्थ श्रेणी अकुशल कामगारांना १८ हजार रुपयांचे किमान वेतन जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कामगारांनाही हेच वेतन मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. बांधकाम, कारखाने, नगरपालिका, महानगरपालिका, शासनाचे सर्वच शासकीय विभाग अशा सर्वच श्रेत्रात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी सीटू आंदोलन छेडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images