Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वाढीव पाणीकपात तूर्तास टळली!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पाणीकपात १५ टक्क्यांवरून ३० टक्के करण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रशासनाने मंगळवारी लोकप्रतिनिधींच्या दबावानंतर घुमजाव केले. पाणीकपात अजून लागू केली नसल्याचा खुलासा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्याने प्रशासनातील गोंधळही चव्हाट्यावर आला. वाढीव पाणीकपातीची चाचपणी केली जात असली तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच निर्णय घेवू, असे आश्वासन गेडाम यांनी दिले. त्यामुळे तूर्तास तरी वाढीव पाणीकपातीपासून नाशिककरांची सुटका झाली आहे.

सोमवारी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शहरातील पाणीकपात १५ टक्क्यांवरून ३० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महसूल आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनुसार व उपलब्ध काळात पाणीपुरवठा पुरविण्यासाठी पाणीकपात लागू करण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली. पाणीपुरवठा विभागाने परस्पर कपातीचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, या निर्णयाची माहिती महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनाही देण्यात आली नाही.

महापौर, उपमहापौरांसह शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्तांच्या हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर आपण कपातीचे आदेश दिलेच नसल्याचा खुलासा त्यांनी केला. सध्या शिल्लक साठ्याचे जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू असून, त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धान्य घोटाळ्यातील संशयितांच्या कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धान्य घोटाळ्यात चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आठपैकी सात संशयितांच्या कोठडीत विशेष मोक्का कोर्टाने २६ तारखेपर्यंत वाढ केली. एका संशयिताला १९ तारखेला पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, सरकारी धान्य थेट गोडावूनमधूनच
गायब करण्यात येत असल्याचे पुरावे समोर येत आहेत. यातून निर्माण झालेल्या आर्थिक हितसंबंधाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अजय मिसर यांनी केला.

सिन्नर येथील रेशन धान्य अपहारप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत मोक्कान्वये गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात आतापर्यंत संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, रतन पवार व रमेश पाटणकर, मुंबई येथील व्यापारी लक्ष्मण पटेल, काशिनाथ सदाशिव पाटील आणि ज्ञानेश्वर दशरथ घुले यांच्यासह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. या सर्व संशयितांची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपुष्टात आल्याने त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. यातील लक्ष्मण पटेलच्या कोठडीत १९ तारखेपर्यंत तर उर्वरीत संशयितांच्या कोठडीत २६ तारखेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय विशेष मोक्का कोर्टाने दिला. कोट्यवधी रुपयांचे धान्य वितरीत होताना अनेकांचे आर्थिक हितसंबंध जोडले गेले असून, आजवर संशयितांनी तयार केलेल्या १२ बोगस कंपन्या समोर आल्या आहेत. यामुळे त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील अजय मिसर यांनी केली. मिसर यांनी मांडलेले १७ मुद्दे कोर्टाने ग्राह्य मानत वरील निर्णय दिला.

गुटखा जप्त

दिडोंरीरोडमार्गे सिन्नरकडे जाणारा गुटख्याचा साठा पंचवटी पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी कैलास बाबू ठोंबरे या ट्रक चालकास (एमएच १५ इजी ०७२९) अटक केली. ट्रक, गुटखा व इतर साहित्य असा १४ लाख मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामुळे गुटखा बंदी असूनही शहरात विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

दोन लाखाचा मुद्देमाल लंपास

बसमध्ये घुसत असलेल्या महिलेच्या पर्समधील दोन लाख सहा हजार रुपये सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सोमवारी संध्याकाळी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास मेळा बसस्थानकात घडली. फिर्यादी महिला ओझर येथे जाण्याकरिता बसमध्ये घुसत असताना गर्दीचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्या मोठ्या पर्समध्ये ठेवलेली छोटी पर्स लंपास केली. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

गावठी कट्ट्यासह गुन्हेगारास पकडले

अंबड पोलिसांची गुन्हेगार धरपकड मोहीम जोमाने सुरू आहे. यामध्ये नवीन नाशिक सिडकोतील स्टेट बँक चौकाच्या बाजूला असलेल्या औंदुबर बसस्टॉप येथे सराईत गुन्हेगार विकास तिवडे यास गावठी पिस्तूलसह गस्त पथकाने रात्री ताब्यात घेतले.

सोमवारी रात्री औंदुबर बसस्टॉप येथे अंबड पोलिस गस्त घालत असताना त्यांना संशयित व्यक्ती आढळून आली. त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला. यानंतर पकडलेल्या आरोपीची चौकशी केली असता, तो सराईत गुन्हेगार असून पिंपळगाव बहुला येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिनेश बर्डीकर व त्यांच्या सहकार्याने सराईत गुन्हेगारास ताब्यात घेतले.

दरम्यान, सोमवारी अंबड पोलिसांनी कामगारांना लुटणाऱ्या दोघांना अटक केली होती. यानंतर तिसरा आरोपी फरार झाला होता. दरम्यान, त्याचाही शोध पोलिसांना लागला असून, इम्रान खान असे त्याचे नाव आहे. त्यालाही अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंट ‘सीईओं’ना नागरिकांचा घेराव

0
0

स्टेशनवाडी रहिवाशांची पुनर्वसन करण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

स्टेशन वाडी परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांना प्रशासनाने घरे खाली करण्याची नोटीस बजावली असून येथील रहिवाशांनी एकत्र येत प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विलास पवार यांना घेराव घालत निवेदनाद्वारे आमचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाला वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जागा खाली करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. प्रशासकीय स्तरावर येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये येत असलेल्या भूखंडावर गेल्या ५० वर्षांपासून रहिवाशी असलेल्या नागरिकांना निर्वासित करण्यात येत आहे. त्याला विरोध म्हणून नागरिकांनी रेस्ट कॅम्प रोडवर मूकमोर्चा काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, या रहिवाशांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाबाहेर जमा होत बोर्डाचे सीईओ यांना निवेदन देत राजीव गांधी घरकुल योजना, इंदिरा आवास योजनेअंतर्गत जागा उपलब्ध करून देत निर्वासित होण्यापासून वाचवावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

देशपातळीवर सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डांना रक्षा मंत्रालयाने सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत. कॅन्टोन्मेंट अॅक्ट, पब्लिक प्रिमायसेस अॅक्टमध्ये तरतूद आहे. त्यानुसार आम्ही कार्यवाही करत आहोत.

- विलास पवार, सीईओ, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देवळाली

गेल्या ५० वर्षांपासून आम्ही या भागात राहतो. आम्ही प्रशासनाला वेळेवर सर्व कर भरला असून तरीही वरिष्ठ पातळीवर काही तोडगा निघू शकलेला नाही. आमची घरे वाचवावीत किंवा निदान पुर्नवसन तरी करावे.

- कल्पना पवार, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दातार जेनेटिक्सतर्फे कॅन्सरवर मुक्त परिसंवाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दातार जेनेटिक्स लिमिटेडतर्फे कॅन्सर पेशंट, कॅन्सर आजारातून बाहेर आलेले, आणि कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी उद्या (१७ डिसेंबर) एकदिवसीय मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कॅन्सर आजाराविषयी तथ्य आणि गैरसमज या विषयांवर ऑन्कोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

कॅन्सर आजार म्हटला की, मनात भीती येते की, हा आजार झाला म्हणजे मृत्यू हा येणारच. सर्वप्रथम कॅन्सर हा आजार कसा होतो?, कॅन्सरचे प्रकार किती?, या आजाराची तीव्रता किती? आणि त्यानुसार त्याचे उपचार पध्दती कशी? त्याचप्रमाणे कॅन्सर आहे की नाही याची तपासण्याचे विविध पातळ्या कोणत्या? या विषयीची संपूर्ण माहिती सर्वसामान्य जनतेला नसते. अशावेळेस पेशंटला मनोधैर्य देऊन त्याच्या नातेवाईकांनी खंबीरपणे पेशंटचा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी कशा पध्दतीने कॅन्सरशी लढा द्यायला पाहिजे, याकरिता एकदिवसीय मुक्त संवादाचे आयोजन केले आहे.

हा मुक्त परिसंवाद यशवंतराव चव्हाण अॅकेडमी ऑफ डेव्हलपमेंट अॅडमिनिस्ट्रेशन (यशदा), राजभवन कॉम्प्लेक्स, बाणेर रोड, पुणे येथे सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत होणार आहे. या परिसंवादात अचूक कॅन्सर निदान करणाऱ्या नवीन पध्दती, कॅन्सर उपचाराचे नियोजन आणि अचूक औषोधोपचार या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या परिसंदाविषयी दातार जेनेटिक्सच्या डॉ. अश्विनी घैसास यांनी सांगितले की, कॅन्सरशी निगडीत पेशंट्सना त्यांना कोणत्या प्रकारचा कॅन्सर झाला आहे हेच माहित नसते. त्यामुळे हे निदान करण्यासाठी भरपूर वेळ निघून जातो. अचूक निदान झाले म्हणजे कॅन्सर पेशंटला लवकर रिकव्हरी मिळू लागते. रक्ताच्या सॅम्पलने केलेल्या तपासण्यामुळे मूळच्या गुणसुत्रातून कॅन्सरचे अचूक निदान करणे आता सहज शक्य आहे. यात निडल बायोप्सी आणि लिक्विड बायोप्सी या तपासणीतून कॅन्सरचे लवकरात लवकर निदान करणे सोपे झाले आहे. दातार जेनेटिक्सच्या कॅन्सर ट्रॅकच्या माध्यमातून आम्ही कॅन्सर पेशंटला नुसतेच कोणत्या प्रकारचा कॅन्सर झाला हे सांगत नाही तर तो कॅन्सर किती तीव्रतेचा आहे आणि त्यावर कोणत्या प्रकारच्या औषधांनी मात करता येईल याची माहिती देता येते.

पुणे शहरात होत असलेल्या या मुक्त परिसंवादात टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे एक्झिक्युटिव्ह हेड डॉ. पुर्वीश पारिख यांचे कॅन्सर आजाराचे तथ्य आणि गैरसमज या विषयावर, इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अॅण्ड पेडियाट्रिक ऑन्कोलॉजीचे अध्यक्ष अनंतभूषण रानडे यांचे कॅन्सरची अॅक्टिव्हिटी, मॉनटरिंग, लिक्विड बायोप्सी अॅण्ड कन्फर्मेशन या विषयावर, हैदराबाद अपोलो हॉस्पिटलचे सिनियर ऑन्कोलॉजीस्ट डॉ. एस. व्ही. एस. एस. प्रसाद यांचे अचूक औषधोपचार या विषयावर माहिती देणार आहेत.तसेच, ऑन्कोलॉजीस्ट डॉ. अमित भट्ट आणि सिनिअर पॅथोलॉजिस्ट डॉ. दर्शना पाटील यांचे देखील मार्गदर्शन लाभणार आहेत.
या परिसंवादाचे मॉलिक्यूलर ऑन्कोलॉजी सोसायटी आणि अपोलो हॉस्पिटल एज्युकेशनल अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन हे नॉलेज पार्टनर आहेत. तर 'द टाइम्स ऑफ इंडिया', 'द इकॉनॉमिक्स टाइम्स' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' हे मीडिया पार्टनर आहेत. या परिसंवादात सहभागी होण्यासाठी +९१ ७७६७९७१८८८ या क्रमांकावर मिस्ड कॉल करून रजिस्ट्रेशन करायचे आहे. या परिसंवादात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी
केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाट्यकला घडविते व्यक्तिमत्वाचा विकास’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाट्यकला व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणते. विद्यार्थ्यांच्या अभिनय गुणांना वाव देणाऱ्या पुरोहित करंडक स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे. या स्पर्धेने डॉ. गिरीश ओक, दिवंगत दिग्दर्शक राजीव पाटील यांच्यासारखे उत्तम कलाकार दिले. यावरूनच स्पर्धेचे श्रेष्ठत्व सिद्ध होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी किरण समेळ यांनी केले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये ३८ व्या कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर समेळ बोलत होते. संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य मधुकर जगताप, सचिव गजानन होडे, खजिनदार ज्ञानेश्वर कुलकर्णी, ऋषिकेश पुरोहित, परिक्षक सनी क्षत्रिय, सुधीर कुलकर्णी, वर्षा जोशी व्यासपीठावर होते. स्पर्धाप्रमुख सुधीर फडके यांनी स्वागत केले. प्रफुल्ल कुलकर्णी व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. प्रास्तविकात गजनान होडे म्हणाले, की शालेय विद्यार्थ्यांमधील नाट्यगुणांना वाव देण्यासाठी अशी स्पर्धा आयोजित होणारी महाराष्ट्रातील ही एकमेव स्पर्धा आहे. संस्थेच्या २०१७-१८ मधील शतकी महोत्सवात ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित केली जाईल. प्रा. वैजयंती पवार, हेमंत देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वृषाली भट यानी सूत्रसंचलन केले. पी. पी. कुलकर्णी, जयंत मोढे, मीनाक्षी गोळे, माजी प्राचार्य नलिनी पुरोहित, प्राचार्य प्र. ला. ठोके, छाया वाणी, डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज, मंगला गोविंद, उपप्राचार्या रेखा टर्ले आदी उपस्थित होते. पारितोषिक वितरण गुरूवारी (दि. २४) दुपारी तीन वाजता होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोज कपात, डोक्याला ताप

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

नाशिक शहरात पाणीकपात १५ टक्के पाणीकपात सुरू असताना आता ती ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. रोज नियमितपणे यानुसार पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. मात्र, या कपातीने अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दररोज पाणीकपात करण्याऐवजी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा, अशी मागणी आता पुढे आली आहे. सिडकोत सर्व नगरसेवकांच्या सुचनेनुसार सभापती कांचन पाटील आयुक्तांना एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव सादर करणार आहेत.

गंगापूर धरणाचे पाणी मराठवाड्यास सोडण्यात आल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. ज्या ठिकाणी दोन वेळचा पाणीपुरवठा होता, तो एकच वेळ करण्यात आला होता. तसेच, १५ टक्के पाणीकपातही एकवेळ पाणीपुरवठ्यात करण्यात आली होती. आता पुन्हा महापालिकेने ३० टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र, सिडको भागात कमी अधिक प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी केला. तसेच, रोज होणाऱ्या पाणी कपातीपेक्षा आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवा अशी सूचना सुर्यवंशी यांनी मांडली. त्यांच्या सुचनेला सर्वच नगरसेवकांनी

सहमती दर्शविल्यानंतर सभापती पाटील यांनी प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दर्शवली. रोज पाणीकपात न करता आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करणार आहेत. आठवड्यात एक दिवस म्हणजे मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.

पालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर!

तीन महिन्यानंतर सभापती पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकित सर्वच नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सर्वच विभागातील अधिकारी नगरसेवकांच्या तक्रारी सोडवत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. बांधकाम, विद्युत, आरोग्य, स्वच्छता, मलेरीया व ड्रेनेज या विभागांच्या कामकाजावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

नगरसेविका सुर्वणा मटाले यांनी विद्युत विभागाचे अधिकारी देवरे यांना पोलांवर दिवे का बसविण्यात येत नाहीत, असा सवाल करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीतूनच दुरध्वनी करून विचारणा करण्यास सांगितले.

विद्युत विभागाचे देवरे यांनीही वरिष्ठांना फोन करून `मटाले ताई उपोषला बसल्या आहेत. काम कधी होणार, अशी विचारणा केली. नगरसेवक सुधाकर बडगूजर, लक्ष्मण जायभावे, अरविंद शेळके, उत्तम दोंदे, नगरसेविका हर्षा बडगुजर, सुजेता भामरे, कल्पना पांडे, कल्पना चुंबळे, विभागीय

अधिकारी राजेंद्र गोसावी यांसह महापालिकेचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित हल्लेखोरांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी बस डेपोत घुसून दोघा कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सहाजणांना पंचवटी पोलिसांनी अटक केली. यातील चार संशयित अल्पवयीन असून, अद्याप एक संशयित फरार आहे. संशयितांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना १८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

डेपोचे सुरक्षारक्षक एस. एच. गाढवे यांनी पंचवटी पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी मोहन भास्कर गायकवाड आणि सचिन भास्कर गायकवाड या दोघा भावांना अटक केली. तसेच, चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. एक संशयित अद्याप फरार असून, त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी सांगितले. या वादाची सुरुवात संध्याकाळच्या सुमारास सीबीएस ते मेहेर सिग्नल या प्रवासा दरम्यान झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयित आरोपी मोहन गायकवाड निमाणी ते सीबीएस आणि सीबीएस ते बिटको असा दररोजचा प्रवास करतो. सोमवारी संध्याकाळी तो सीबीएसवरून एका बसमध्ये बसला. त्यावेळी पास वैध नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत संबंधित वाहकाने त्याला मेहेर सिग्नलवरच उतरवले. यानंतर मोहन दुसऱ्या बसमध्ये बसला. त्यावेळी सदर वाहकाने त्याच्या पासबाबत कोणतीही हरकत घेतली नाही. त्यामुळे पहिल्या वाहकाची तक्रार करण्यासाठी मोहन पंचवटी डेपोमध्ये पोहचला. तिथे त्याने आपला भाऊ सचिनला बोलावून घेतले. रात्री अधिकारी भेटणार नसल्याचे सुरक्षारक्षक गाढवे यांनी सांगताच या दोघांनी शिवीगाळ सुरू केली.

गायकवाड बंधूच्या मदतीला त्यांचे पाच साथिदार आले. त्यांनी थेट चाकूनेच गाढवे तसेच बसचालक नितीन जाधव यांच्यावर हल्ला चढवला. या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात सचिन गायकवाड जखमी झाला. पंचवटी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली असून, त्यांना कोर्टाने १८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, वाघाडीमधील उनाड मुलांचा सातत्याने त्रास होतो. त्यामुळे परिसरातील सुरक्षा वाढवण्याची मागणी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्होकेशनल टीचर्सना वेतनश्रेणी मंजूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील अशासकीय अनुदानित शाळांमधील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील पूर्णवेळ शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येणार आहे. १ जानेवारी १९९६ पासून ही सुधारित वेतश्रेणी लागू करण्याचा आदेश पारीत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रा. जयंत भाभे यांनी दिली.

कौशल्य विकास व उद्योजकता विभगाच्या नियंत्रणाखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालयांतर्गत अशासकीय अनुदानित शाळांमधील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थेतील पूर्णवेळ शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगानुसार सुधारित त्रिस्तरीय वेतनश्रेणी १ जानेवारी १९९६ पासून लागू करण्यात आली आहे. १ जानेवारी १९९६ रोजी सेवेत असलेल्या व सुधारित वेतनश्रेणीचा विकल्प स्वीकारलेल्या शिक्षकांना या आदेशाचा लाभ मिळणार असल्याचेही प्रा. भाभे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुकणेची साडेसाती संपली!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठ वर्षांपासून विविध वादात अडकलेल्या व नाशिकसाठी महत्त्वाकांक्षी अशा मुकणे पाणीपुरवठा योजनेमागील साडेसाती अखेर संपली आहे. मंगळवारी स्थायी समितीने २६६ कोटींच्या या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्याने आता प्रत्यक्षात कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. सन २००८-०९ पासून अधांतरी लटकलेल्या या योजनेला २०१५ च्या अखेरीस अंतिम मंजुरी मिळाली आहे. वाढीव ३६ कोटींच्या खर्चालाही स्थायीने मंजुरी दिल्याने आता एल अॅण्ड टी कंपनीला काम देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेचा २०२१ मधील पाणीप्रश्न मिटणार आहे.

जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय नागरी पुनर्निमान अभियानाअंतर्गत मुकणे धरणातून १८ किलोमीटरच्या पाइपलाइने थेट नाशिकमध्ये पाणी आणण्याचा प्रस्ताव २००८-०९ मध्ये मंजूर झाला होता. यात केंद्र सरकार ५० टक्के ,राज्य सरकार २० तर महापालिकेचा ३० टक्के वाटा असणार आहे. २००९ मध्ये या प्रकल्पाची किंमत २३० कोटी होती. ऑगस्ट २००९ मध्ये महासभेने त्याला मान्यताही दिली होती. मात्र, काही तांत्रिक कारणावरून हा प्रस्ताव तब्बल साडेसात वर्षे लटकला होता. जेएनयूआरएमची मुदत संपल्यानंतर या प्रकल्पाला मुदतवाढही देण्यात आली होती. अनेक वादामुळे हा प्रकल्प वादात अडकून पडला होता. परंतु, सन २०१३ पासून या प्रकल्पाला पुन्हा चालना देण्यात आली. मात्र, महागाईमुळे या प्रकल्पाची किमंत ही २३० कोटींवरून २७० कोटींपर्यंत गेली. वर्तमान आयुक्तांनी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून सर्वात कमी निविदा ही लार्सन अॅन्ड टुब्रो कंपनीची २६९ कोटींची आली होती. मात्र या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेवून हा वाद थेट मंत्रालयात गेला होता. त्यामुळे या प्रस्तावाची अंमलबजावणी लांबली होती. अखेरीस राज ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतर नगरविकास विभागाने हा स्टे उठवला होता. तर एल अॅन्डटीने किमंत कमी करत ती २६६ कोटींवर नेली होती.

वाढीव ३६ कोटींच्या खर्चाला महासभेनेही मान्यता दिल्यानंतर मंगळवारच्या स्थायी समितीवर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. राहुल दिवे यांनी सिंमेट व स्टिलच्या किमती कमी झाल्याने किंमतीवर फेरविचार करण्याची मागणी करीत विषय मंजूर करण्याची विनंती केली. त्यामुळे सभापती शिवाजी चुंभळे यांना या विषयाला मंजुरी दिल्याने आता एल अॅन्ड टी कंपनीला काम देण्यातील अंतिम अडथळाही दूर झाला आहे. त्यामुळे थेट कामाला सुरूवात होणार आहे. महापालिकेशी करार झाल्यानंतर आता कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे नाशिकच्या पाण्याची संभावित ताण भागणार आहे. या प्रकल्पातून पाच वर्षानंतर महापालिकेला दररोज ४०० दशलक्ष लिटर्स पाणी उपलब्ध होणार असल्याने नाशिककरांची तहान भागणार आहे.


सावानाचे शुक्लकाष्ठ संपेना
माजी कार्यवाह कर्नल देशपांडेंना १०० रूपये दंड
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयामागील मागील कोर्टकचेरीचे शुक्लकाष्ठ अद्यापही संपण्याची चिन्हे नाहीत. न्यायप्रविष्ठ असलेल्या एका प्रकरणामध्ये माजी कार्यवाह कर्नल आनंद देशपांडे यांना २ हजार ऐवजी १०० रूपये दंड भरण्याची सूचना मुंबई हाय कोर्टाने केली आहे. कर्नल देशपांडे यांनी आपल्याला झालेल्या दंडाबाबत हायकोर्टात दाखल केलेल्या रिट याचिकेत ही सुनावणी झाली आहे.

श्रीकांत बेणी यांनी २०१२ मध्ये केंद्रीय माहितीच्या अधिकारांतर्गत सावानाकडे अर्ज करून विविध विषयांची माहिती वेळोवेळी मागितली होती. परंतु सावानाचे तत्कालिन कार्यवाह व जनमाहिती अधिकारी कर्नल आनंद देशपांडे यांना ही माहिती देण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे बेणी यांनी प्रथम अपिलीय अधिकारी सावाना अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्याकडे अपील केले. मात्र, त्यांनीही त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे याविरोधात राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे व सहायक ग्रंथालय संचालकांकडे तक्रार करण्यात आली. संचालकांनी यावर निर्णय देत अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना केली, तर खंडपीठाने तत्कालिन कार्यवाह यांना एकूण ६ प्रकरणांमध्ये प्रत्येकी २ हजार रूपये दंड केला.

त्यामधील एका प्रकरणात कर्नल देशपांडे यांनी मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल करून राज्य माहिती आयोगाच्या निर्णयाला आव्हानही दिले होते. याचिकेत म्हटले होते की, सार्वजनिक वाचनालयाला पुरेसे अनुदान मिळत नाही. त्यामुळे माहितीचा अधिकार कायदा लागू होत नाही. तसेच कोणतेही मानधन न घेता आपण काम करीत असल्याने हा दंड रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. सावाना माहिती अधिकाराच्या कक्षेत येते हे सिध्द झाल्याने व आनंद देशपांडे हे लष्करी सेवेत होते. त्यामुळे कॉस्ट कमी करावी किंवा उच्च न्यायालय लायब्ररीस देणगी देण्यास सांगावे मात्र दंड करू नये असा युक्तीवाद देशपांडे यांच्या वकीलाने केल्याने न्यायालयाने देशपांडे यांच्या लष्करी कामाचा आदर करून २ हजार ऐवजी त्यांना १०० रूपये दंड आकारला असून, तो चार आठवड्यांमध्ये राज्य सरकारला भरण्याची सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन्नईतील पूरग्रस्तांना कल्की समितीतर्फे मदत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कल्की मानवसेवा समितीतर्फे चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह गरजू वस्तूंचा ३० पोती पुरवठा करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला. नाशिकसह मुंबई, पुण्याच्या शाखेतर्फे ही मदत देण्यात आली आहे.

कल्की मानवसेवा समितीने नाशिकमधील कुंभमेळ्यातही स्वच्छता मोहीम राबवून लक्ष वेधले होते. आताही चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठीही कल्की समितीने मदतीचा संकल्प केला आहे. समितीचे नाशिक येथील शक्ती टर्ले, संजय वाणी, संगीता भिसे, नेहा केशरकर आदींनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंची तब्बल ३० पोती भरून मदत रवाना करण्यात आली आहे.

तांदूळ, गहू, गव्हाचे पीठ, साखर, मैदा, तूरडाळ, मसूरडाळ, चहा पावडर, तेल, मीठ, लाल मिरची पावडर, बिस्किटांची पुडे आदी वस्तूंचे संकलन करण्यात आले आहे. याशिवाय टॉवेल, ब्लँकेट, कपडे, साबण, कंगवे, आगपेटी आदी मदतीचे सुमारे २०० कार्यकर्त्यांनी संकलन केले. ही मदत चेन्नईला रवाना करण्यात आली असून, आणखी मदत पाठविण्याचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधना ट्रस्टचे कांबळे, चांदगुडे यांना पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अमेरिकास्थित महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने मराठी साहित्य व समाजकार्य या दोन क्षेत्रातील व्यक्तींना दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आले. साहित्य पुरस्कारांमध्ये एक जीवनगौरव, तीन ग्रंथ व एक नाट्य पुरस्कार आहे. या पुरस्कारांचे संयोजन पुणे येथील साधना ट्रस्ट यांच्यावतीने केले जाते.

ज्येष्ठ पत्रकार व वैचारिक कादंबरीकार सुरेश द्वादशीवार (नागपूर) यांना दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह हा साहित्य जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. शरद बेडेकर यांच्या 'समग्र निरिश्वरवाद' या पुस्तकाला वैचारिक ग्रंथ पुरस्कार, नितीन दादरावाला यांच्या 'प्रतिमा आणि प्रचिती' या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार तर रवींद्र रूक्मिणी पंढरनाथ यांच्या 'खेळघर' या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार दिला जाणार आहे. जुन्यापिढीतील नाटककार रा. शं. दातार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा नाट्य पुरस्कार अजित देशमुख यांच्या 'सुस्साट' या नाटकाला दिला जाणार आहे. हे तीन ग्रंथ व एक नाट्य पुरस्कार प्रत्येकी २५ हजार रुपयांचे आहेत.

समाजकार्य क्षेत्रात एकूण पाच पुरस्कार आहेत. त्यात विद्या बाळ यांना दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील समाजकार्य जीवनगौरव तर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार दिला जाणार आहे.

कार्यकर्ता पुरस्कारांमध्ये भीम रासकर यांना प्रबोधन या विभागातील, कृष्णा चांदगुडे यांना सामाजिक प्रश्न या विभागातील तर पल्लवी रेणके यांना असंघटित कष्टकरी या विभागातील पुरस्कार दिला जाणार आहे. हे तीनही कार्यकर्ता पुरस्कार प्रत्येकी ५० हजार रुपयांचे आहेत.

९ जानेवारीला वितरण

या पुरस्कारांसाठी अर्ज मागविले जात नाहीत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शिफारशी मागविल्या जातात. एका बाजूला गोपनीय व दुसऱ्या बाजूला पारदर्शक पध्दतीने ही निवड प्रक्रिया चालते. पुरोगामी विचारधारेचा पुरस्कार करीत भारतीय राज्यघटनेला सुसंगत भूमिका घेत विषमता व वैरभाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लेखकांना व कार्यकर्त्यांना हे पुरस्कार दिले जातात. या सर्व पुरस्कारांचे वितरण पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानाचे शुक्लकाष्ठ संपेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सार्वजनिक वाचनालयामागील मागील कोर्टकचेरीचे शुक्लकाष्ठ अद्यापही संपण्याची चिन्हे नाहीत. न्यायप्रविष्ठ असलेल्या एका प्रकरणामध्ये माजी कार्यवाह कर्नल आनंद देशपांडे यांना २ हजार ऐवजी १०० रूपये दंड भरण्याची सूचना मुंबई हाय कोर्टाने केली आहे. कर्नल देशपांडे यांनी आपल्याला झालेल्या दंडाबाबत हायकोर्टात दाखल केलेल्या रिट याचिकेत ही सुनावणी झाली आहे.

श्रीकांत बेणी यांनी २०१२ मध्ये केंद्रीय माहितीच्या अधिकारांतर्गत सावानाकडे अर्ज करून विविध विषयांची माहिती वेळोवेळी मागितली होती. परंतु सावानाचे तत्कालिन कार्यवाह व जनमाहिती अधिकारी कर्नल आनंद देशपांडे यांना ही माहिती देण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे बेणी यांनी प्रथम अपिलीय अधिकारी सावाना अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांच्याकडे अपील केले. मात्र, त्यांनीही त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे याविरोधात राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे व सहायक ग्रंथालय संचालकांकडे तक्रार करण्यात आली. संचालकांनी यावर निर्णय देत अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना केली, तर खंडपीठाने तत्कालिन कार्यवाह यांना एकूण ६ प्रकरणांमध्ये प्रत्येकी २ हजार रूपये दंड केला.

त्यामधील एका प्रकरणात कर्नल देशपांडे यांनी मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल करून राज्य माहिती आयोगाच्या निर्णयाला आव्हानही दिले होते. याचिकेत म्हटले होते की, सार्वजनिक वाचनालयाला पुरेसे अनुदान मिळत नाही. त्यामुळे माहितीचा अधिकार कायदा लागू होत नाही. तसेच कोणतेही मानधन न घेता आपण काम करीत असल्याने हा दंड रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. सावाना माहिती अधिकाराच्या कक्षेत येते हे सिध्द झाल्याने व आनंद देशपांडे हे लष्करी सेवेत होते. त्यामुळे कॉस्ट कमी करावी किंवा उच्च न्यायालय लायब्ररीस देणगी देण्यास सांगावे मात्र दंड करू नये असा युक्तीवाद देशपांडे यांच्या वकीलाने केल्याने न्यायालयाने देशपांडे यांच्या लष्करी कामाचा आदर करून २ हजार ऐवजी त्यांना १०० रूपये दंड आकारला असून, तो चार आठवड्यांमध्ये राज्य सरकारला भरण्याची सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुजा साने यांचे मुंबईत चित्रप्रदर्शन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कल्पनाशक्तीच्या माध्यमातून क्षितीज दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चित्रकार अनुजा साने यांच्या चित्रांचे "IMAGINATION DECODED" हे प्रदर्शन सोमवारपासून (दि. २१) सुरू होत आहे. कमलनयन बजाज आर्ट गॅलरी नरिमन पॉइंट येथे रविवार, २७ डिसेंबरपर्यंत कलाप्रेमींना हे प्रदर्शन मोफत पहावयास मिळणार आहे.

अनुजा साने यांनी निसर्गरम्य अब्स्ट्रॅक्ट लॅण्डस्केप अशा चित्र प्रकारांमध्ये चित्रे काढली आहेत. साने यांची चित्रांमधील रंगसंगती आणि त्यांची शैलीमुळे त्यांची अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग खूपच वास्तववादी वाटतात. त्यांच्या चित्रातील रंगांचा वापर, छटा तसेच चित्रांचा पोत त्यामुळे चित्रांना नैसर्गिकरित्या आंतरिक सौंदर्याची जोड मिळते. त्यामुळे दर्शक चित्रांमध्ये मंत्रमुग्ध होऊन जातात. साने यांनी आतापर्यंत अनेक आखिल भारतीय स्तरावर अनेक प्रसिद्ध ग्रुप शो मध्ये सहभाग घेतला असून जसे लोकमंगल फाऊंडेशन जहांगीर कला दालन येथे, अमेरिकन सांस्कृतिक केंद्र दिल्ली येथे 'रे ऑफ होप शो', ८१ वा अखिल भारतीय कला प्रदर्शन अमृतसर आणि अशा बऱ्याच शो मध्ये सहभाग घेतला आहे. "IMAGINATION DECODED" हा त्यांचा पहिलाच एकल शो आहे.

सर्व चित्रांना 'अनटायटल्ड' नाव ठेवणे हा एक वेगळा प्रयोग आहे. मला वाटतं कलाप्रेमींनी माझी चित्रे येऊन पहावीत आणि अनुभव घ्यावा. माझे काम आधुनिक तंत्र, स्ट्रोक आणि दोलायमान रंग यांचे संयोजन आहे. रंग, डिझाइन, सर्जनशीलता नेहमी माझी शक्ती राहिली आहेत व चित्रकला माझी आवड आहे.

-अनुजा साने, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`एमआर`चा आज संप

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
केंद्र सरकारच्या औषधी धोरणात बदल करावा आणि औषधांच्या किंमती कमी कराव्यात या मागणीसाठी देशभरातील वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) बुधवारी (१६ डिसेंबर) संपावर जाणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ३ हजारांहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनने अखिल भारतीय संघटनेच्या आंदोलनात सहभाग घेतला असून, बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी ११ मागण्यांद्वारे हा संप केला जात असल्याचे संस्थेचे राज्य सदस्य हर्षल नाईक यांनी सांगितले आहे. औषध धोरणात बदल करणे आवश्यक आहे. तसेच, औषधांच्या किंमती कमी करण्याची नितांत गरज आहे, असे संस्थेने म्हटले आहे. आहे. उत्पादनाच्या किंमतीवर आधारीत सर्व व अत्यावश्यक औषधांच्या किंमती कमी करून दर नियंत्रित ठेवण्याचे आवाहनही संघटनेने केले आहे. सरकारने औषधांच्या एमआरपीवर अबकारी कर लावण्याऐवजी तो औषधांच्या उत्पादन किंमतीवर लावावी. त्यामुळे औषधे दिवसेंदिवस अधिक महाग होत असून लवकरच सर्वसामान्यांनाही औषधे खरेदी करता येणार नाही. त्यामुळे सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील औषध उत्पादन करणाऱ्या व लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या संपामुळे नव्या औषधाची माहिती डॉक्टरांपर्यंत पोहचणार नाही, असेही संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचारी रस्त्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अरूंद रस्ते आणि त्यावर झालेले अतिक्रमण यामुळे चालकांना बस चालवणे मुश्किल झाले आहे. अगदी जीव मुठीत धरून बसचालक काम करतात. त्यात गुंड प्रवृत्तींकडून एसटी कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो. मंगळवारी तर प्राणघातक हल्ला झाला. यापुढे एसटी कर्मचाऱ्यांवर असा हल्ला झाला तर तत्काळ चक्काजाम आंदोलन छेडले जाईल. कर्मचाऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिला.

पंचवटी डेपोतील सुरक्षारक्षक एस. एच. गाढवे आणि बसचालक नितीन जाधव यांच्यावर एका टोळक्याने सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्रांसह हल्ला चढवला. यात दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची घटना समजाताच एस.टी. कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, पंचवटी पोलिस व लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद मंगळवारी सकाळी पुन्हा उमटले. पंचवटी डेपोच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह पंचवटी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी एसटी महामंडळाचे जनरल मॅनेजर आर. आर. पाटील, रिजनल मॅनेजर मिलिंद बंड, ​जिल्हा व्यवस्थापक यामिनी जोशी, प्रमोद भालेकर, विजय पवार, सुभाष जाधव, शाम सांगळे, बाबा वाघचौर, योगेश लिंगायत, भूषण पाराशेर, गणेश बोडके, तुषार लाटकर यांच्यासह पंचवटी बस डेपोतील २०० ते २५० कर्मचारी हजर होते. संबंधित संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच दंगलीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी दिली.

सकाळच्या सत्रात प्रवाशांचे हाल

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. या घटनेचे पडसाद मंगळवारी सकाळी उमटले. सकाळच्या सुमारास डेपोचे अडीचशे ते तीनशे कर्मचारी डेपोमध्ये जमा झाले. तेथून त्यांनी पंचवटी पोलिस स्टेशनपर्यंत मोर्चा काढला. सर्वच कर्मचारी आंदोलनात गुंतल्याने पंचवटी डेपोतून सुटणाऱ्या बसेस उभ्या राहिल्यात. याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागला. सकाळाच्या सुमारास बस नसल्याने प्रवाशांची हाल झाली. दुपारी १ वाजेनंतर सर्व कर्मचारी डेपोत परतल्यानंतर शहरांतर्गत वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली.


स्मार्ट सिटीमधून वाहतूक सुरळीत करा

एसटीचे आकारमान तुलनेत मोठे असते. बसचा टर्निंग रेडियस मोठा असून निमाणी, रविवार कारंजा, शालिमार, नाशिकरोडसह शहरातील इतर भागातील रस्ते तुलनेत अरूंद आहेत. त्यावर अतिक्रमणे असून, रिक्षाचालकही दमदाटी करतात. बसचालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास इतर वाहनचालक कट मारल्याचा आरोप करतात. वस्तुस्थिती मात्र भिन्न असते. गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून, याचा ताण बसचालकांवर पडत आहे. यासाठी किमान बसस्थानकावरील अतिक्रमणे काढून रिक्षाचालकांना २०० मीटर परिसर सोडून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी एसटीच्या अधिकाऱ्यांनी केली. स्मार्ट सिटी योजनेत याचा योग्य तो विचार व्हावा, यासाठी लवकरच पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी संयुक्त बैठक घेण्याची मागणी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंजनेरी मंदिरांसाठी १७ कोटींची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

अंजनेरी गावालगतच्या १६ हेमाडपंथी मंदिरांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. या कामासाठी १७ कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

जैन, वैष्णव व शैव समाजाची ही मंदिरे सुमारे हजार वर्षांपूर्वीची असून त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मंदिरांचे जतन केंद्रीय पुरातत्व विभागातर्फे केले जाते. अनेक वर्षांपासून मंदिरे दुलर्क्षित आहेत. खासदार गोडसे यांनी या मंदिराचे नूतनीकरण करण्याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांना तीन महिन्यांपूर्वी पत्र दिले होते. केंद्रीय पुरातत्व विभागाने येऊन पाहणीही केली. नाशिक जिल्हा हा औरंगाबाद विभागा समाविष्ट होतो. या विभागाचे संचालक चव्हाण यांनी हा नूतनीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय पुरातत्व विभागाकडे पाठविला. यामध्ये १६ मंदिराच्या नूतनीकरणासाठी आठ गट स्थापन केले आहेत. या कामासाठी सतरा कोटीचा निधी केंद्राकडे मागितला आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाला तुटपुंजी वार्षिक तरतूद मिळते. हा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा म्हणून खासदार गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा व पुरातत्व विभागाचे महासंचालक तिवारी यांची भेट घेऊन वार्षिक निधीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्ट कारभाराच्या मुद्यासह स्वच्छता, पाणीप्रश्न गाजणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महानगरपालिकेच्या आज (१७ डिसेंबर) होणाऱ्या महासभेत स्वच्छता, भ्रष्ट कारभाराचा मुद्दा आणि पाणीप्रश्न गाजण्याची शक्यता आहे. तसेच गैरव्यवहाराविरोधात उपोषण सुरू केल्याने याबाबतही जनता दल आक्रमक प‌वित्रा घेण्याची शक्यता आहे.

महापौर हाजी मोहम्मद इब्राहीम यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होणार आहे. महासभेत विषयपत्रिकेवरील एकूण आठ विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. यात शहराचा पाणीप्रश्न, स्वच्छता आणि आरोग्य तसेच, भ्रष्ट कारभार हे विषय महासभेत असणार आहेत. गेल्या काही दिवसात मालेगाव शहराचा पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. शहरात सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात पाणीकपातीचा देखील निर्णय घ्यावा लागू शकतो. मात्र, पाणीप्रश्न बिकट होत असताना शहरातील संगमेश्वर कलेक्टर पट्ट्यातील काही भागात दिवसातून चार वेळा पाणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नगरसेवक सखाराम घोडके यांनी अशा बेजबाबदार ढिसाळ पाणी नियोजनावर आक्षेप घेतला आहे. प्रस्तावाच्या माध्यमातून पालिका सभागृहात चर्चेसाठी आणला आहे. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा असताना संगमेश्वर महात्मा ज्योतिबा फुले चौक ते मोतीबागपर्यंत कलेक्टर पट्ट्याच्या बाजूने जुना आग्रा रोडलगत संगमेश्वरसाठी मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, या मुख्य जलवाहिनीवर नळजोडण्या दिल्याने काही भागात चार ते पाच वेळा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी कलेक्टरपट्टा संगमेश्वरच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होता. त्यामुळे मनपाच्या पाणीपुरवठ्याच्या या ढिसाळ नियोजनाबाबत थेट महासभेत चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच, नगरसेवक घोडके यांनीच शहरात एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम अंतर्गत घरकुल योजनेची कामे सुरू असून, अद्याप ती पूर्ण झालेली नाहीत. या कामांची गती अत्यंत संथ असल्याने त्यासंबंधी सभेत चर्चा करून चौकशी करण्याचा प्रस्ताव देखील ठेवला आहे. नगरोत्थान योजनेंतर्गत नगरसेवक मदन गायकवाड यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केलेल्या मागणी वरून सदस्यांनी सुचविलेल्या कामांचा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार असून, त्यात मनपाने ५० टक्के हिस्सा देण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्यासचा प्रस्ताव चर्चेत असणार आहे. दरम्यान, सत्ताधारी तिसरा महाजला याबाबत जनता दल व अन्य सहकारी पक्ष कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून महासभेत खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.

महासभेपुढील विषय

नगरोत्थान योजनेंतर्गत कामांचा प्रस्ताव सादर करून निर्णय घेणे.

मनपा वाहन दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीच्या खर्चासह मुदतवाढ मिळणे.

घरकुल योजना कामांची चौकशी करणे.

डी.पी प्लॅनमधील पूररेषा काढणे. याबाबत शासनाकडे मागणी करणे.

पाणीपुरवठ्याबाबत नियोजन करणे.

जिमखाना नामकरण व कमानी गेट तयार करणे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना नेत्यांच्या दौऱ्याबाबत मार्गदर्शन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच, सेनेचे मंत्री, आमदार १९ व २० डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. याबाबत पूर्व नियोजन करण्यासाठी मालेगाव तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीत संजय दुसाने यांनी दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. दि १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता दौऱ्याला प्रारंभ होणार आहे. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड तसेच, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचा समावेश आहे. यासह अन्य शिवसेना आमदार देखील या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. तालुक्यातील झोडगे, सौंदाणे, वडनेर खाकुर्डी, कळवाडी गटातील विविध गावांना भेटी दिल्या जाणार आहेत. यात शासकीय योजनांचा आढावा घेतला जाणार असून, नागरिकांना त्याचा किती लाभ होत आहे, लाभार्थी किती आहेत, जलयुक्त शिवार योजना आदींची माहिती घेतली जाणार आहे. तसेच, तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदाप्रश्नी रास्तारोको

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

जिल्ह्यातील विविध बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत असताना मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत तुलनेत कमी भाव मिळाल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत थेट रस्त्यावर उतरून मनमाड-मालेगाव मार्गावर उत्स्फूर्त रास्तारोको आंदोलन केले. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली, तर १५ ते २० मिनिटे आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर दुपारी पुन्हा लिलाव सुरू झाले व कांद्याला सकाळच्या तुलनेत जास्त भाव मिळाल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

मनमाड बाजार समितीत बुधवारी कांद्याचे लिलाव सुरू झाले, त्यावेळी किमान ७००, कमाल ११०० व सरासरी ९०० रुपये भाव होता. इतर बाजार समितीत जास्त भाव असल्याने मनमाड बाजार समितीत कांद्याला कमी भाव का? असा सवाल विचारीत संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत थेट मालेगाव नाका येथे जाऊन रास्तारोको आंदोलन सुरू केले. मालेगाव व शिर्डीकडे जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची एकच रांग लागली. यावेळी कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, स्वाभिमानी संघटनेचा विजय असो, अशा घोषणा देत आंदोलक परिसर दणाणून सोडला. काही वेळानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर दुपारी पुन्हा लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळाल्याचे सांगण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणताही बडा नेता नेतृत्व करीत नसताना अचानक उस्फूर्तपणे शेतकऱ्यांनी केलेले रास्तारोको चर्चेचा विषय ठरले.

दरम्यान, मालेगाव बाजार समितीत तीनशे वाहनांमधून कांद्याची आवक झाली. कमाल भाव १२०० रुपये तर किमान भाव ५०० रुपये मिळाला. तर, सटाणा बाजार समितीत ४०० वाहने कांदा आवक झाली. कमाल भाव १४७० तर किमान भाव ३०० रुपये मिळाला. येवला बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी १०० ते १५० रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली. जवळपास १७ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होताना बाजारभाव मात्र घसरले गेले.येवला आवारात बुधवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान ७०० ते कमाल १३५० तर सरासरी एक हजार रुपये असा बाजारभाव मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उपोषण

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुका कृषी विभागांतर्गत सन २०१० ते २०१३ या कालावधीत तालुक्यात केलेल्या विविध कामांची तत्काळ चौकशी करण्यात यावी, या कालावधीत कार्यरत असणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांनी व तालुक्यातील एका संबंधित ठिबक सिंचन वितरक यांनी संगनमत करून ठिबक सिंचन योजनेत गैरव्यवहार केला आहे, त्याची चौकशी करावी, यासाठी येवल्यातील शिवसैनिकांनी मंगळवारी येवला तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

येवला तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने सन २०१० ते २०१३ या कालावधीमध्ये केलेल्या विविध कामे व योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत शिवसेनेचे तालुक्यातील युवा नेते तथा येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी आठ डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. कुठलीही कारवाई होत नसल्याने शिवसेनेकडून मंगळवारी सामूहिक उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. मंगळवारी सकाळी १० वाजता येवला तहसील कार्यालयाच्या आवारात या उपोषणाला सुरुवात झाली. दुपारी अडीचच्या सुमारास जिल्हा कृषी अधीक्षक टी. एन. जगताप, निफाडचे उपविभागीय कृषी अधिकारी सी. बी. कानवडे, येवला तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांच्यासह तहसीलदार शरद मंडलिक यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषण करणाऱ्या शिवसेना नेत्यांची भेट घेतली. दोन महिन्याच्या आत कृषी विभागाकडून वितरीत झालेल्या सर्व सिंचन अनुदान व इतर कामातील गैरव्यवहाराची चौकशी करू, असे लेखी आश्वासन कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

या उपोषणात येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, विठ्ठलराव शेलार, शिवसेना जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, माजी तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे, पंचायत समिती सदस्य दिलीप मेंगळ, रवि काळे, बाजार समिती माजी सभापती अरुण काळे, रिपाइंचे संजय पगारे, बाबासाहेब डमाळे, शिवसेना येवला शहर संघटक राहुल लोणारी, महिला आघाडीच्या कोमल वर्दे यांच्यासह शंभराच्यावर शिवसैनिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images