Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ख्याल गायन स्पर्धेत रोहित, कौस्तुभ प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय ख्याल गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी झाला.

कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी नाट्य, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राचे अभ्यासक व कुसुमाग्रज प्रथम अभ्यासवृत्ती प्राप्त लेखक मुरलीधर खैरनार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. रोहित धारप (ठाणे) यांनी राग पुरियामध्ये शुध्दकल्याणमधील तराणा सादर केला. त्यानंतर कौस्तुभ कुलकर्णी (औरंगाबाद) यांनी ख्याल बिहाग सादर केला. मंगेश कुलकर्णी (आळे) यांचेही गायन झाले. त्यांना तबला नितीन पवार, संवादिनी दिव्या रानडे, संवादिनी कुलभूषण कहाळेकर व तबल्यावर प्रफुल्ल काळे यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाप्रसंगी तानसेन पुरस्कार प्राप्त लोकप्रिय ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ख्याल गायनात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विजेते रोहित धारप (ठाणे), कौस्तुभ कुलकर्णी (औरंगाबाद) यांना देण्यात आला. द्वितीय पुरस्कार रोहन गावडे (औरंगाबाद) यांना तर तृतीय पुरस्कार विभागून कुलभूषण कहाळेकर (औरंगाबाद) व निहिरा देहूकर (नाशिक) यांना देण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक मंगेश कुलकर्णी व केतकी भट यांना देण्यात आले. केतकी भट हिला परिस्थितीवर मात करून संगीत कलेप्रती आस्था दाखवल्याबद्दल हे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

ही पारितोषिके प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार व उत्तेजनार्थ १ हजारांचे अशी होती. सुगम संगीत स्पर्धेत मंगेश कुलकर्णी यांना प्रथम १० हजार रूपये, रोहन गावडे यांना द्वितीय ५ हजार तर संतोष देशमुख (राजगुरूनगर) यांना तृतीय ३ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र मकरंद हिंगणे यांनी सांभाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निफाड तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नापिकी व कर्जाला कंटाळून पालखेड (ता. निफाड) येथील शिवाजी शंकर काळे (६८) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. काळे यांनी शनिवारी दुपारी राहत्या घरी विष प्राशन केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांनी शनिवारी दुपारी घराचा दरवाजा बंद करून विषारी औषध सेवन केले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने निफाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी दुपारी एकच्यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नापिकी व शेतीवरील कर्जामुळे काळे अनेक दिवसांपासून त्रासले होते. आर्थिक कारणांमुळेच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला, असा दावा सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपस्थित नातेवाईकांकडून करण्यात आला. मागील आठवड्यात जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी तीन आत्महत्या एकट्या मालेगाव तालुक्यातील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’ करणार कॉलेजेसमध्ये कॅम्पेनिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेट आणि स‌ीटबेल्ट अभावी मृत्यूला जवळ करणाऱ्या तरुणाईचे प्रबोधन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने आता एक सुंदर गीताची रचना केली आहे. महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये उडत्या चालीचे हे गीत सादर होणार असून, त्यावर काही कलावंत नृत्यही करणार आहेत. या प्रयोगामुळे तरुणाई हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरास प्रोत्साहीत होईल, असा विश्वास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी व्यक्त केला.

वाढते अपघात आणि त्यामध्ये जाणारे बळी याबाबत सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. कोर्टाच्याच एका परिपत्रकाचा आधार घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाने शहरात हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्तीची मोहीम हाती घेतली आहे. मोहीमेंतर्गत आतापर्यंत सुमारे दीड हजार कारवाया करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दंडात्मक कारवाई हा उद्देश नसून स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापराबाबतचा आग्रह धरला जातो आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांचे पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात समुपदेशन करण्यात येत आहे. आतापर्यंत ५५० हून अधिक वाहनधारकांचे समुपदेशन करण्यात आले असून, सुमारे ४० टक्के वाहनधारक आणि हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करू लागल्याचा दावा उपप्रादेशिक प‌रिवहन अधिकारी कळसकर यांनी केला आहे. दिवाळीपूर्वी शहरात जोरदारपणे राबविण्यात येणारी ही मोहीम दिवाळीनंतरच्या काळात काहीसे मंदावल्याचे चित्र होते. मात्र दररोज रस्त्यावर उतरून कारवाईचा दंडूका उगारणे हा आमचा उद्देश नसल्याचे कळसकर यांनी स्पष्ट केले आहे.

समुपदेशनासाठी येणाऱ्यांसह अनेक संघटनांनीही वाहनधारकांची मानसिकता तयार होण्यासाठी त्यांना वेळ द्यायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार ा प्रबोधनावर येत्या काळात अधिक भर दिला जाणार आहे.

महाविद्यालयीन तरुणांमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण कमी असून, त्यांचे प्राधान्याने प्रबोधन करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, कळसकर आदींनी घेतला आहे. त्यासाठी कळसकर यांनी 'नवीन पोपट हा लागला मिटू मिटू बोलायला' या गाण्याच्या चालीवर हेल्मेट प्रबोधनाचे गाणे तयार केले आहे. हे गीत कळसकर यांनी लिहिले असून, चाल स्नेहा सोमन यांनी दिली आहे. मिल‌िंद मोहीते यांनी संगीत दिले असून, गणेश भगत यांनी हे गीत गायले आहे. मुंबईत खार येथील स्टुड‌िओमध्ये या गीताचे रेकॉर्डींग करण्यात आले आहे. शहरातील काही प्रोफेशनल कलावंत महाविद्यालयांमध्ये या गीतांवर नृत्य सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​अनुभवविश्व विस्तारण्यासाठी

$
0
0

विनोदिनी काळगी

अश्व या शब्दासाठी शब्दकोषात अनेक समानार्थी शब्द सापडतील पण त्याचे खरे आकलन होण्यासाठी मात्र तबेल्यातच जावे लागेल.' असे असेल तर आज आपण मुलांना शिक्षण म्हणून जे देतोय त्याचा पुनर्विचारच करावा लागेल. पुस्तकी माहिती लक्षात ठेऊन एखाद्या परीक्षेत चांगले गुण मिळतीलही. पण स्वत:च्या अनुभवांशी ताडून त्या माहितीचे ज्ञानात रुपांतर झाल्यावरच त्याचे उपयोजन शक्य होणार. त्यामुळेच अभ्यासात हुशार समजली जाणारी अनेक मुले बाहेरच्या जगात भांबावलेली आपण बघतो.
शाळेच्या किंवा घराच्या चार भिंतींमध्ये शिक्षण कोंडून ठेवले तर ते खुरटते. त्यामुळे या बांधापलिकडे मुलांना नेण्याचे काम करायलाच हवे. सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून ज्ञान मिळवण्याच्या मुलांच्या नैसर्गिक उर्मीला प्रोत्साहन द्यायचे असेल तर क्षेत्रभेटी व सहली हा उत्तम मार्ग आहे. क्षेत्रभेटींच्या जागा तर सर्व विषयांच्या शिक्षकांना विषय शिकवतांना आपोआप दिसू लागतात. मग परिसर, पर्यावरणाचे मुद्दे मुलांना निसर्गात फिरवूनच समजावता येतात. निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करणे, त्यातील गमती-जमती जाणून घेणे, त्याच्याशी मैत्री करणे या तर मुलांच्या आवडीच्याच गोष्टी. निसर्गाचे स्वत:चे खास व्यवस्थापन तंत्र असते ते लक्षात घेतले तर निसर्गाकडून माणसाची आणि माणसाकडून निसर्गाची होणारी हानी आपोआपच कमी होईल. या गोष्टी लहानपणीच रुजवल्या की अंगवळणी पडतात. भूगोल शिक्षकाला भूरुपांचा परिचय करुन देण्यासाठी डोंगर-दऱ्या दाखवाव्याशा वाटतात. समुद्र, डोंगर, किल्ले यांचे दर्शन मुलांना घडायला हवे. हा भव्यतेचा अनुभव त्यांच्या मनावर जो ठसा उमटवू शकतो ते काम पुस्तकातील वा चित्रपटातील चित्र बघण्याने होऊ शकत नाही.

साधी आठवडेबाजाराला भेट दिली तरी त्यातले अर्थशास्त्र समजते, समाजाच्या प्रत्यक्ष दर्शनातून सामाजिक ओळख रुंदावते. मोठ्या सहलींसाठीही मुद्दाम वेगळी ठिकाणे निवडता येतात. एखाद्या आश्रमशाळेत मुलांना नेले तर आपल्याच वयाच्या मुलांचे वेगळे जीवन त्यांना दिसतेच शिवाय आसपासच्या निसर्गाविषयी त्या मुलांना असलेले ज्ञानही वाटून घेता येते. त्यांची गाणी, नृत्य शिकता येते. हे जग जसे विविध रंगी आहे, वैविध्याने समृद्ध आहे तसेच समाजजीवनही आहे याचा अनुभव देणाऱ्या, मुलांचे अनुभवविश्व विस्तारणाऱ्या सहली हा शिक्षणातील एक महत्त्वाचा भाग आहे. सुदैवाने नाशिकच्या आसपास अशी अनेक ठिकाणे आहेत जी एका दिवसात किंवा जास्तीत जास्त एका मुक्कामात आणि अगदी कमी खर्चात दाखवता येतील.
अशा सहलीतून विषयांतील भिंती आपोआपच नाहीशा होतात. नंतर मुलांच्या लिखाणातून अनेक नव्या गोष्टी येतात. त्यांच्या मनावर उमटलेली ही भावचित्रे भाषेत, चित्रात दिसू लागतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांबद्दल आपुलकी निर्माण होते. केवळ मुलांनाच नाही तर अनेकदा शिक्षकांनाही हे दर्शन प्रेरणादायी ठरते. आपल्या चौकटीबाहेर पडून घेतलेला वेगळा अनुभव हा त्यांच्या प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग होतो.

असे सर्व असुनही या बहुगुणी सहलींचे आजचे चित्र काय आहे. अनेक शाळांनी या उपक्रमाला धंद्याचे रुप दिले आहे. वॉटरपार्क, एस्सेल वर्ल्ड, रामोजी फिल्मसिटी, सिसॉर्ट अशा ठिकाणी मुलांना नेण्याचे कंत्राट दलालांना देणे सुरू आहे. यातून मुलांना कोणते शैक्षणिक मूल्य मिळणार? हे खर्चिक तर आहेच शिवाय मुलांना चंगळवादाकडे नेणारे आहे. म्हणून आता पालकांनीच अशा सहलींना विरोध करायला हवा आणि स्वत:ही मुलांसाठी योग्य अशा क्षेत्रभेटींचे नियोजन करायला हवे.
(लेखिका आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका आहेत)



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध गौणखनिज वाहतुकीवर नजर!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाळू आणि तत्सम गौण खनिजांचे अवैध उत्खनन तसेच चोरटी वाहतूक रोखण्यासाठी समन्वय समिती नेमा, असे आदेश राज्य सरकारच्या महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. गौण खनिजांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी या समितीला महिन्यातून किमान एक बैठक घ्यावी लागणार आहे.

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नागरीकरणाचा वेग जास्त आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उभारणीसह गृहनिर्माण आणि अन्य विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वाळूची आवश्यकता भासते. वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळेच वाळूचे उत्खनन व वाहतूक क्षेत्रामध्ये अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. अवैधरित्या हा व्यवसाय करणाऱ्यांना 'वाळूमाफिया' असे संबोधले जात असून कारवाई करणाऱ्या महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्यातून अनेकदा जीवघेणे हल्लेही करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातही लोहणेर, कोपरगाव तसेच नंदुरबार परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहूतक होत असून त्यातून वाळूमाफिया स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याचे प्रकार वारंवार पुढे आले आहेत. वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतुकीशी संबंधित अनेक तक्रारी महसूल विभागाला प्राप्त होऊ लागल्या आहेत. अशा तक्रारींची तपासणी करून संबंधित अपप्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्याचे उपसचिव माधव काळे यांनी घेतला आहे.

समिती अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी

महसूल, पोलिस विभाग आणि परिवहन या तीन विभागातील अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. तर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांवर समितीच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

उपाययोजनांवर होणार चर्चा

जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून किमान एकदा किंवा गरज पडल्यास अधिक वेळा या समितीची बैठक बोलावणे आवश्यक आहे. त्यामध्ये गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतुकीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारी, निवेदन यांवर कोणती कारवाई झाली याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे. असे अवैध प्रकार रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावर या बैठकांमध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकवासीय सलाईनवर!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकवासीय साथीच्या आजाराने सलाईनवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा साथरोग नियंत्र पथक शहरात दाखल झाले असून, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात ठाण मांडलेल्या डायरियासदृश्य पोटाच्या आजाराचे कारण शोधण्यासाठी शासन यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. येथील उपजिल्हा रूग्णालय सज्ज ठेवण्यात आले आहे. अर्थात दोन दिवसांपासून दाखल रूग्णांची संख्या कमी होत आल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली आल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारी दवाखान्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे, तर खासगीत उपचार घेणारे त्यापेक्षा काही पटींनी अधिक असल्याचे दिसून येत आहे. जुलाबाचा आणि काही प्रमाणात उलट्या होण्याचा त्रास जाणवताच नागरिक दवाखान्यात धाव घेत असून, मला सलाईन लावा असे स्वतःच सांगत असल्याने त्र्यंबकवासीय सलाईनवर असे चित्र निर्माण झाले आहे. औषधांच्या दुकानातून पोटदुखीच्या औषधांची व्रिकी गत आठवड्यांपासून वाढली आहे. उलट्या व जुलाब थांबविणाऱ्या औषधांची मागणी वाढली आहे. साथ सुरू झाली त्यास आता आठवडा होत आला आहे. घरोघर असे रूग्ण आढळत आहे. पाण्याच्या शुध्दिकरणासाठी जीवन ड्रॉपची नावाचे औषध नागरिकांनी विकत घेण्यासाठी दुकानांमध्ये धाव घेतली आहे.

नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचे शुध्दिकरण झाले नसावे, या संशयाने नागरिकांनी जीवन ड्रॉप नावाचे रसायन विकत घेवून ते पाण्यात टाकण्यास सुरूवात केली आहे. याचा परिणाम पाण्यात क्लोरीनचा डोस जास्त होत आहे. क्लोरीनच्या अधिक वापराने आजार निर्माण होण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. शहरात पाण्याचे नमुने परीक्षणासाठी घेतले असता त्यात अशा प्रकारे क्लोरीन अधिक आढळले आहे. अर्थात पालिकेच्याद्वारे पुरवठा होत असलेल्या पाण्यात क्लाओरीन डोस अधिक झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे मत व्यक्त होत आहे.

त्र्यंबकेश्वरला तीन ठिकाणांहून पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये अंबोली धरणातून जुन्या पाणी योजनेतून हा आजार पसरल्याची वंदता शहरात आहे. शहरास अंबोली, अहिल्या आणि गौतमी बेझे या धरणांतून पाणीपुरवठा होतो. सिंहस्थ कालावधीत सुमारे ३० कोटी रूपये खर्च करून गौतमी बेझे योजना कार्यान्वित झाली आहे. या योजनेत सुसज्ज शुध्दिकरण यंत्रणा आहे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सध्या नियोजन पाहात आहे. या योजनेतून सर्व साधू आखाडे, स्वामी समर्थ गुरूकुलपीठ परिसरातील नवीन वस्ती आदि भागात पाणी पुरवठा होतो. तेथे आजारांची साथ नसल्याचे सांगण्यात येते. अहिल्या धरणातून शहरातील पाचआळी परिसरातील एका गल्लीस पाणी पुरवठा होतो. तेथेही साथ नसल्याचा दावा केला जात आहे. अंबोली धरणातून होणारा पाणी पुरवठा नगरपालीका स्वतः चालवत आहे. या धरणाचे पाणी शहरातील बहुतांश ग्रामस्थांना पुरवले जाते, तेथेच पोटाचे आजार साथीने पसरले आहेत.

शहरात पसरलेला आजार हा पाण्यापासून पसरल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे. त्यास नगरपरिषद पूर्णत: जबाबदार आहे. त्र्यंबक नगरपरिषद शहरातील १२ हजार ५०० नागरिक व येथे येणारे सुमारे २५ हजार भाविक यांच्या आरोग्याशी खेळत आहे. पाणीपुरवठा सारखा विभाग असा विना तंत्रज्ञ चालवला जातो, ही खेदाची बाब आहे.

- पुरूषोत्तम कडलग,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली एसटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

स्वातंत्र्य मिळून तब्बल सहा सात दशके उलटली तरी नांदगाव तालुक्यातील हिंगण देहेरे आणि पिंप्री हवेली या गावांमध्ये बससेवा नव्हती. मात्र, आता ६८ वर्षानंतर या गावात प्रथमच बस सेवा सुरू झाली आणि या गावातील ग्रामस्थांनी एकच जल्लोष करीत आपल्या मनातील आनंदाला वाट करून दिली. `आमच्या गावात ही आता एसटी येते`, असे आम्ही अभिमानाने सांगू शकतो आणि आमचा वनवास आता संपला, अशा प्रतिक्रिया या गावातून व्यक्त होत आहेत.

दोन्ही गावे वर्षानुवर्षे बस सेवेपासून वंचित होती. या गावांमध्ये बस यायची ती फक्त निवडणूक काळात, ते ही मतपेट्या घेऊन! त्या पलीकडे ग्रामस्थांना बसचे साधे दर्शन ही घडत नव्हते. बससेवेअभावी विद्यार्थी, महिला, नोकरदार अशा सर्वांचे हाल होत होते. वारंवार वर्षानुवर्षे मागणी करून पदरी निराशा होती. आश्वासनांपलीकडे ग्रामस्थांना काहीही मिळत नव्हते. गाव तिथे बस हे ब्रीद नावापुरते असल्याची या ग्रामस्थांची भावना होती. मात्र, आता या सर्वांची प्रतीक्षा संपून बस सेवेचा शुभारंभ झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसाकाचा बॉयलर पेटणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या शासन हमीपत्राचा अध्यादेश वित्तविभागाकडून प्राप्त झाल्याने वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विठेवाडी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार डॉ.राहुल आहेर हे विविध पातळीवर संघर्ष करीत होते. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वसाकाला कर्ज देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्य सहकारी बँकेने कारखान्याची मालमत्ता थकीत कर्जामुळे ताब्यात घेतलेली असल्याने राज्य सहकारी बँकेची सहमती नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला गरजेची होती. तसेच राज्य शासनाचे हमीपत्र आवश्यक होते.

गत सप्ताहात राज्य सहकारी बँकेने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहमतीपत्र दिले होते. तर दि. ५ रोजी वित्त विभागाच्या अवर सचिव मिनल पेडणेरक यांनी शासन निर्णयानुसार वसाकाला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज देण्याबाबत शासन हमीपत्र देण्यात येत असल्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेकडून लवकरच वसाकाला अर्थसहाय्य मिळून चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठी वसाकासाचा बॉयलर पेटण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या निर्णयामुळे वसाका कार्यक्षेत्रातील शेतकरी, ऊस उत्पादक, कर्मचाऱ्यांध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातात CRPF जवानाचा मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिक येथे ट्रक अपघातात सीआरपीएफ जवानासह तिघांचा मृत्यू झाला असून या अपघाताबाबत अद्याप अधिक तपशील मिळालेला नाही.

उपनगरातील चौफुली येथे रविवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये जवानासह एक ३० वर्षीय महिला व ८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. मृत जवान नेहरू नगर येथील होता. मृतांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.

दरम्यान, अपघातावेळी पथदिवे गेलेले असल्याने मदतकार्यात मोठे अडथळे येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाचनामुळे मेंदूचा विकास

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक 'वाचनामुळे मेंदूचा विकास होतो, त्यामुळे वाचनाची आवड जोपासली गेली पाहिजे. वाचन प्रेरणा दिन हा उपक्रम न राहता महाराष्ट्राची ती सवय झाली पाहिजे. या दिवसाच्या औचित्याने निबंध स्पर्धेतील सहभागही मराठी विकासाच्या दृष्टीने उत्स्फूर्त आहे', असे प्रतिपादन राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी केले. निबंध स्पर्धेच्या बक्षिस ‌वितरण समारंभात ते बोलत होते.

दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने वाचन प्रेरणा दिवस म्हणून घोषित केला आहे. या दिवशी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शनिवारी संस्थेच्या पुरुषोत्तम हायस्कूलमध्ये पार पडला. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा निबंध स्पर्धेत नाशिककरांचा सहभाग उल्लेखनीय असून जिल्ह्यातील ३ हजार ३६ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्य विद्यार्थ्यांच्या भविष्याला विकासाकडे नेणारे आहे.' याबरोबरच त्यांनी मराठी भाषेच्या विकास व पुढील उपक्रमांची माहिती यावेळी दिली. मुंबईच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे राज्यात १ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा पंधरवाडा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीतजास्त शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनील कुटे यांनी वाचनाने देशाचा आत्मा घडत असतो. ज्या देशातील नागरिक ग्रंथालयात जपतात त्या देशांचा विकास जलदगतीने होतो, असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सेक्रेटरी गजानन होंडे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. निबंध स्पर्धेचा अहवाल प्रा. सुनील हिंगणे यांनी सादर केला. सूत्रसंचालन डॉ. प्राची सराफ व प्रा. प्रतिभा पंडित यांनी केले.



स्पर्धेचे विजेते शहरी विभाग (शाळा) : गौरव महाले, श्रृती जमदाडे, अनिषा गवारी, प्रिती आहेर, ऋतुजा पाटील ग्रामीण विभाग : हर्षल वाघ, ऋची वाले, शुभम वाकचौरे, कांचन हिंगे, गायत्री सोनवणे, शहरी विभाग (कॉलेज) : नेहा सावंत, सीमा मांडे, हेमलता भामरे, पुष्पा पांडे, अश्विनी महाजन ग्रामीण विभाग : गणेश बोरसे, सागर सोनवणे, शुभांगी ताजनपुरे, लता चौधरी, निकिता काटे खुला गट : अमृता कविश्वर, अलका चंद्रात्रे, अश्विनी सोनवणे, मंगेश भणगे, रेखा महिरे, मनोहर घोडे, नितीन ठुबे, विशाल शेवाळे, प्रथमेश चव्हाण, शितल सरोदे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचपीटी’चे दुसरे सत्र १४ पासून

$
0
0



सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

एचपीटी कॉलेजमध्ये सुरू असलेल्या सिनिअर कॉलजेच्या प्रथम सत्र परीक्षा ९ डिसेंबर रोजी संपत आहेत. या परीक्षा संपल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये म्हणजेच १४ डिसेंबरपासून पहिल्या ते शेवटच्या वर्षाचे वर्ग सुरू होणार आहेत.
प्रथम सत्रात पंच्याहत्तर टक्के हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांनाच परिक्षेसाठी हॉल तिकीट देण्यात आले होते. हाच नयम दुसऱ्या सत्रासाठीही कॉलेजमार्फत राबविला जाणार आहे. त्यामुळे १४ डिसेंबरपासून नियमितपणे कॉलेजमधील लेक्चर्सना उपस्थित राहण्याचे आवाहन कॉलेजमार्फत करण्यात आले आहे. विद्यापीठ नियमानुसार परीक्षेला बसण्यासाठी पंचाहत्तर टक्के उपस्थिती असणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती एकूण लेक्चर्सच्या तुलनेत ७५ टक्क्यांपेक्षा कमी असेल त्यांना परीक्षा अर्ज भरता येणार नसल्याचे कॉलेज प्रशासनाने एका नोटीसमध्ये म्हंटले आहे.

याचसोबत 'एसवाय बीए'साठी 'पर्यावरण जाणीव समिती' हा विषय विद्यापीठाने अनिवार्य केला असून इतर सहा विषयांसोबतच या विषयातही उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यासाठीची लेक्चर्सदेखील १४ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी सकाळी ११:४५ ते १२:३५ या वेळेत मेन बिल्डिंग हॉल-८ मध्ये ही लेक्चर्स होणार आहेत. परीक्षेला बसण्यासाठी एसवायच्या विद्यार्थ्यांची या लेक्चर्सना १०० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास किंवा या विषयाच्या लेक्चर्सना अनुपस्थित असल्यास संबधित विद्यार्थ्याचा विद्यापीठाचा निकाल जाहीर करण्यात येणार नासल्याचे कॉलेज प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उजास’मधून उलगडले विविध कलाविष्कार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक ऑर्केस्ट्रा, नाटक, नृत्य, गीत अशा विविध कलागुणांचा आविष्कार दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बघण्यास मिळाला. निमित्त होते शाळेच्या 'उजास' या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे. रविवारी शाळेतच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात गीत सादरीकरणाने झाली. त्यानंतर ऑर्केस्ट्रातील प्रत्येक वाद्यविभागाने आपल्या कलेचे याठिकाणी सादरीकरण केले. गिटार विभागाने 'मेरा जूता है जपानी...', तबला विभागाने 'राग', तर ड्रम व किबोर्ड विभागाने 'थीम म्युझिक'चे सादरीकरण केले. घटम, चंडा, वॉटर, ड्रमिंग, मेलीडिका या विशिष्ट वाद्यांचा यामध्ये समावेश होता. शाळेतील दुसरीच्या विद्यार्थिनीने 'निरगम निराकार देव बाळ...' या गणेश उपासनेवर पाश्चिमात्त्य वाद्यांच्या साथीने स्वागत नृत्य सादर केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अल्लाउद्दिनचा प्रवास, जिनीने त्याला केलेली मदत, त्याचे लग्न याचे दर्शन घडविणाऱ्या नाटिकेचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य व धैर्य यावर आधारित 'द ग्लोरियस मराठा' यासह विविध नाटिकांचे सादरीकरण केले. या नाटकाचे प्रमुख आकर्षण म्हणजे 'शॅडो आर्ट'चा केलेला आकर्षक वापर.

याशिवाय 'उदे गं अंबे उदे...', 'शिवस्मृती...' यासारख्या गीतांवर नृत्य सादर करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा जोशी यांनी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीतावर 'गणनायका...' गाण्यावर नृत्य सादर केले. तसेच अरबी संस्कृतीची ओळखही विद्यार्थ्यांनी यावेळी करुन दिली. एकूण ३६० विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात सहभाग होता. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. पोलिस महानिरिक्षक जयजीत सिंग, पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅनॉलवर ‘स्लम सिटी’चा ठिय्या

$
0
0

महापालिकेची सन १९९२ साली स्थापना झाल्यानंतर गंगापूर धरणातून पाणी पुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. शिवाजीनगर येथे जलनगरी उभारून फिल्टर झालेले पाणी शहराला पुरविण्यात आले. यानंतर मात्र शहरवासियांना मोठ्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्याचा विचार पुढे आला. गंगापूर धरणाचा वापर नसलेला उजवा कालवा (कॅनॉल) जलसिंचन विभागाने ताब्यात देण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर सन १९९७ साली शहरवासियांची जलवाहिनी योजना राबवत महापालिकेने कॅनॉलमधून मुख्य जलवाहिनी टाकली. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कॅनॉलशेजारी आज ठिकठिकाणी झोपडपट्ट्या वसल्या आहेत. विविध व्यवसायिकांनीही कॅनॉललगत अतिक्रमण केले आहे.

सर्वाधिक झोपड्या नाशिकरोडला गंगापूर धरणापासून जेलरोड गंगावाडीपर्यंत शहरातून जाणाऱ्या कॅनॉलवर सर्वाधिक झोपडपट्ट्या वसल्या आहेत त्या नाशिकरोड भागात. विशेष महापालिकेच्या सातपूर, सिडको, मध्य, पश्चिम व नाशिकरोड अशा पाच विभागातून कॅनॉल गेला आहे. गंगापूर धरणापासून कॅनॉलवर झोपड्यांचे अतिक्रमण सुरू होते. यात धरणाच्या पायथ्याशी ४० झोपड्यांचे अतिक्रमण आहे. त्यानंतर संत कबिरनगर, दोंदेनगर तिडके कॉलनी, सिद्धार्थनगर, आम्रपालीनगर व सर्वात मोठी राजीव गांधीनगर आदी झोपडपट्ट्यांनी कॅनॉलवर अतिक्रमण केले आहे. हजारो झोपड्यांमुळे शहराच्या सौंदर्याला डाग लागला आहे. दरम्यान, सातपूर 'एमआयडीसी'ला लागून असलेल्या गणेशनगर भागात तर कॅनॉलवर टेनिस कोर्ट उभारण्यात आले आहे. त्यात टेनिसपटूंना काही फी घेऊन प्रशिक्षण दिले जात असल्याचे कळाले.

व्यावसायिकांचेही अतिक्रमण कॅनॉलवर झोपडपट्यांसह व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीची पार्किंगच कॅनॉलरोडवर केली आहे. तसेच ठिकठिकाणी असलेल्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे बकाल स्वरूप कॅनॉलरोडला आले आहे.

कॅनल झाला गायब शहरातून २५ किलोमटर लांबी आणि ४० मीटर रुंदीचा कॅनॉल काही ठिकाणी गायबच झाला आहे. गंगापूर येथून सुरू होणारा कॅनॉल कामगारनगरपर्यंत दिसतो. परंतु, पुढे ठिकठिकाणी झोपडपट्ट्यांचे अतिक्रमणे वाढल्याने ४० मीटरचा कॅनॉल गायब झाला आहे. तर काही ठिकाणी केवळ १० ते २० मीटरच कॅनॉल राहिला आहे. त्यातच काही ठिकाणी कॅनॉल दिसतच नाही.
जॉगिंग ट्रॅकमुळे नवे रुप शहरातून गेलेल्या कॅनॉलवर काही ठिकाणी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्ककतेमुळे झोपडपट्या बसल्या नाहीत. यानंतर नगरसेवकांनी महापाल‌िकेकडे कॅनॉलवर जॉगिंग ट्रॅक उभारण्याबाबत मागणी केली. यानंतर सर्वप्रथम इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला. यानंतर अशोका जॉगिंग ट्रॅक, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक, वि. वा. शिरवाडकर जॉगिंग ट्रॅक, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक व कामगारनगर जॉगिंग ट्रॅक यांचीही टप्प्याटप्प्याने उभारणी करण्यात आली. जॉगिंग ट्रॅकमुळे कॅनॉलरोडला एक नवे रुप मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण

$
0
0

देवळालीत सिंधी पंचायतीच्या वतीने गेल्या ११ वर्षांपासून आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी व कॅन्सर निदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक भगवान कटारिया, पंचायत उपाध्यक्ष हरिष कटारिया, हेमंत वजीरानी यांच्यासह डॉ. गणेश डहाळे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. स्वप्नील कुरकुरे, डॉ. भगवान केसवानी, डॉ. विजय चावला आदी तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासात नागरिकांनी तज्ज्ञांकडून आपापल्या समस्यांविषयी मार्गदर्शन मिळविले. सकाळी सुरू झालेल्या शिबिरात देवळाली परिसरातील अनेक नागरिकांवर कॅन्सर व विविध आजारांचे निदान व औषध उपचार करण्यात आले. बीएसएल, इसीजी, रक्तदाब, हाडांचा ठिसुळपणा, थायरॉइड आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबिरासाठी माजी अध्यक्ष नारायणदास चावला, कन्हैयालाल केवलरामानी, दिनेश अडवानी, गोवर्धनदास वासवानी, भरत दर्यानी, यांच्यासह देवळाली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी प्रयत्नशील होते.

समाजऋण फेडण्याचा प्राम‌ाणिक प्रयत्न ज्या भूमीत आपण राहतो त्या भूमीचे ऋण देवळालीतील सिंधी बांधव कायम विविध आरोग्यशिबिरे व समाजपयोगी कार्यक्रम राबवित फेडण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या सोबत देवळालीचा विकास साधण्यासाठी त्यांचा सतत पुढाकार असतो. त्यामुळे सिंधी समाजाप्रती जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण होत आहे, असे गौरवोद्गार डॉ. किशोर म्हस्के यांनी काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्ट विभाग टाकतोय कात

$
0
0

पोस्ट विभाग टाकतोय कात
सोशल मीडियाच्या शिरकावामुळे टपाल सेवा कालबाह्य ठरलीय, असे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे. टपाल विभागाने नागरिकांचा विश्वास संपादन करीत प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. किंबहूना टपाल विभाग तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करीत कात टाकतो आहे. पारंपरिक पद्धती बाजूला सारून नेट बँकींग, पोस्टल बँकींग, एटीएम सेवा, आयटी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातूनही लोकांना सेवा पुरविण्याचा वसा टपाल विभागाने घेतल्याची माहिती महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मुख्य चीफ पोस्ट मास्टर जनरल ए. के. दास यांनी दिली.

टपाल विभाग कालबाह्य होतोय असे बोलले जाते, काय सांगाल?

टपाल विभाग कालबाह्य होतोय असे म्हणता येणार नाही. याउलट या विभागाचा कायापालट होतो आहे. टपाल विभाग त्याच्या पारंपरिक कार्यपद्धतीमध्ये परिवर्तन करतो आहे. आम्ही कोअर बँकींग, आयटी प्रोजेक्टस आणि नेट बँकींग सारख्या क्षेत्रात उतरलो आहोत. इ-कॉमर्स वाढते आहे. अशा सर्व सेवांमधून आम्हाला ६० टक्के महसूल मिळतो आहे. याउलट टपाल सेवांमधून मिळणारा महसूल ४० टक्क्यांवर आला आहे. आमचे आयटी प्रोजेक्टस सुरू आहेत. ५० टक्के टपाल कार्यालयांमध्ये कोअर बँकींगची सेवा पुरविली जात आहे. शिवाय नेट बँकींग लवकरच सुरू होणार आहे.

लोकांचा टपाल विभागावरील विश्वास जिवंत कसा ठेवणार?

टपाल सेवा ही खूप वर्षांपासून सुरू असून आमच्या विभागाने लोकांचा विश्वास जिंकला आहे. म्हणूनच कमर्शिअल बँकांप्रमाणेच आमच्याकडेही देशभरात ३६ करोड खातेदार आहेत. एकट्या महाराष्ट्रात ३ कोटी २० लाख खाती आहेत. देशभरात आमच्याकडे सहा लाख हजार करोडपेक्षा अधिक ठेवी आहेत. आम्ही तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत असलो तरी आमची नाळ सामान्यांशी जोडले गेलो आहोत. हे आमच्यावरील विश्वासाचेच प्रतीक आहे.

टपाल सेवेचा लाभ घेणारे कमी झालेत, असे का?

राज्यात १२ हजार पोस्ट ऑफिसेस आहेत. त्यामध्ये २ हजार २५० विभागीय कार्यालये आहेत. १० हजार ग्रामीण कार्यालये असून ६१ हेड पोस्ट कार्यालये आहेत. अशा सर्व कार्यालयांशी लाखो लोक जोडले गेलेले आहेत. सोशल मीडियामुळे व्यक्तीगत स्तरावर होणारे पत्रव्यवहार नक्कीच कमी झाले आहेत. मात्र डॉक्यूमेंटसचे टपाल व्यवहार लक्षणीयरित्या वाढले आहेत.

पोस्टमन दुर्लक्षित घटक ठरतोय, काय सांगाल?

पोस्टमन हा टपाल पोहोचविणारा दुवा आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? समस्या सर्वच ठिकाणी असतात. पोस्टमनलाही काही गैरसोयींचा सामना करावा लागत असेल. माझ्या माहितीप्रमाणे शहरात नाही पण ग्रामीण भागात पोस्टमनला अधिक समस्या आहेत. ग्रामीण भागात अडीच लाखांहून अधिक डाक सेवक आहेत. काही कायम आहेत तर काही कंत्राटी आहेत. त्यांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्यामुळे लवकरच परिस्थिती बदलेल.

टपाल विभागाच्या भरतीकडे सर्वांचेच लक्ष आहे, काय सांगाल?

आम्ही भरती प्रक्रिया राबविली होती. त्यास खूप चांगला प्रतिसादही मिळाला. निवड प्रक्रिया सुरू असून पुढील महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

टपाल विभागाच्या एटीएम सेवेचे काय झाले?

टपाल विभागाने एटीएम सेवा पुरविण्यास अलीकडेच सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही अकरा ठिकाणी एटीएम सेवा सुरू करणार आहोत. इतकेच नव्हे तर नोव्हेंबर २०१६ नंतर आमच्या पोस्टल बँकही सुरू होतील. देशात १ लाख ५५ हजार तर राज्यात १२ हजार टपाल कार्यालये आहेत. आणखी काही टपाल कार्यालये सुरू करावीत अशी मागणी होत आहे. तेथील गरज आणि व्यवसायाचा अंदाज घेऊन मंजूरीची कार्यवाही केली जाते.

शब्दांकन : प्रवीण बिडवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळी महाराज मंदिर जीर्णोद्धार शनिवारी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन जागृत देवस्थान 'श्री बळी महाराज' यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिराचा जीर्णोद्धार शनिवारी (१२ डिसेंबर) होणार आहे. यानिमित्त होमहवन आणि विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात शनिवारी (१२ डिसेंबर) सकाळी सवाद्य भव्य मिरवणूक निघणार आहे. तसेच रविवारी (१३ डिसेंबर) महायज्ञ आणि सोमवारी (१४ डिसेंबर) मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलश रोहन सोहळा आणि महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. हे सर्व विधी आचार्य वेदमूर्ती अमोल नंदकुमार जोशी करणार आहेत.

यावेळी उदघाटक म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, आयुक्त प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमित बग्गा, खा. हेमंत गोडसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन बळी महाराज मित्र मंडळ व सदस्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसएमआरके’त सुगम संगीत स्पर्धा

$
0
0

एसएमआरके कॉलेजमधील संगीत विभागात ही स्पर्धा रविवारी घेण्यात आली. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे व उपप्राचार्य मोहिनी पेटकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या स्पर्धेचे यंदा १५ वे वर्ष होते. के. के. वाघ, बीवायके, एनडीएमव्हीपी, केटीएचएम, एसएमआरके आदी कॉलेजमधील २० जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला. भावगीते, भक्तीगीते, अभंग, गझल आदी गीतप्रकारांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मुंबई येथील संगीतकार कमलेश भडकमकर व विनय रानडे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धेला रसिक कुलकर्णी व सौरभ शिंदे (तबला), प्रसाद गोखले (संवादिनी) यांची संगीतसाथ लाभली. संगीत विभागप्रमुख नीलम बोकिल यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेत सणी वाघ, हर्षद वडजे, सिद्धी मुंदडा, नेहा मूर्ती, चारुकेषी नारायणी या स्पर्धकांनी यश मिळवले. तर ऋषिकेश शेलार, गायत्री तांबे व गौरी तांबे या स्पर्धकांची निवड झाली आहे. निवड झालेल्यांना गायनाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बगाटे यांच्या मुलाचा पुण्यात अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटून ती झाडावर आदळून नाशिक येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मुलाचा मृत्यू झाला. सूस-लवळे रस्त्यावर सिम्बायोसिस कॅम्पसजवळ सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

दिग्विजय कान्हूराज बगाटे (वय २०, रा. राजप्रसाद सोसायटी, भोसलेनगर) असे अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र अनीश नेलुटला (वय २०, रा. बावधन) गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच दिग्विजयचे वडील व नाशिक जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुण्याकडे धाव घेतली. वाकड येथील शाहू महाविद्यालयात दिग्विजय सिव्हिल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तो आणि अनीश रविवारी रात्री सूस येथे मित्राकडे गेले होते. मित्राकडून पहाटे तीनच्या सुमारास परतत असताना सिम्बायोसिस कॅम्पसजवळ दिग्विजय याचे मोटारीवरील (एमएच ४३ एएल ९४९४) नियंत्रण सुटले. मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दिग्विजय आणि अनीश दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दिग्विजयचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. चतुःश्रुंगी आणि पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बगाटे कुटुंबीय मूळ पाबळजवळील फुटाणवाडी येथे राहणारे आहे. दिग्विजयला एक छोटा भाऊ असून, तो अकरावीत शिकत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर नाका बनला मृत्युचा सापळा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नाशिक-पुणे रोड येथील उपनगर नाक्यावर रविवारी अपघातात माय लेकांचा मृत्यू झाला होता. हा चौक म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघात होत असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. अजून किती जीव गेल्यानंतर प्रशासन लक्ष देईल, असा सवाल आता नागरिक करत आहेत.

उपनगर नाक्यावर अपघात ही नित्याची बाब झाली आहे. या ठिकाणी अपघात झाला नाही असा एकही दिवस जात नाही. अपघात झाल्यानंतर काही दिवसांपुरती येथे पोलिसाची नेमणूक केली जाते अन् पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण होते. जय भवानी रोड आणि पुण्याहून येणारी वाहने याच चौकात एकत्र येतात. उपनगरहून नाशिककडे जाणारी व नाशिकरोडहून उपनगरमध्ये जाणारी वाहने याच चौकात येत असल्याने येथे नेहमीच वाहतूक कोंडी असते. त्यातच चौकातच बस थांबा आहे त्यामुळे बसमध्ये चढणाऱ्या उतरणाऱ्या प्रवाशांची गर्दी येथेच होते. रस्त्याच्या तुलनेत नागरिकांची संख्या जास्त असल्याने येथे अपघात जास्त प्रमाणात होतात.

नाशिकहून जयभवानीरोडला जाण्यासाठी प्रशासनाने सेंट झेव्ह‌ियर येथून जागा करुन दिली आहे; मात्र वाहनचालक सेंट झेव्हियरकडून न जाता उपनगर चौकातूनच उलट्या दिशेने उपनगर चौकातून जयभवानी रोडकडे वळतात. त्यामुळे देखील वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी वाहतूक सुरळीत व्हावी, या साठी अनेकदा निवदने देण्यात आली. मात्र नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस खाते मुग गिळून आहेत.

दुभाजक दिसत नाही

काही ठिकाणी दुभाजक नव्याने तयार करण्यात आले आहेत. मात्र जुने दुभाजक त्याच स्थितीत आहेत. जुने दुभाजक उंचीला लहान असल्याने ते दिसत नसल्याने अपघात वाढल्याची त्रकार नागरिक करतात. छोटे दुभाजक अंधारात दिसत

नसल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे येथे पथदीप लावण्याची गरज आहे. पुणेरोडवर अनेक पथदीप बंद अवस्थेत पडून आहेत.

नाक्यावर पोलिस हवेच

बंद सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी व वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. नाशिक-पुणे मार्गाच्या रुंदीकरणाला अजून मुहूर्त सापडलेला नाही. विविध राजकीय पक्षांनी या चौकाच्या व नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. लवकरात लवकर उपनगर चौकाचे विस्तारीकरण व रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांसाठी १९२ कोटी मंजूर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील खराब रस्त्यांच्या डांबरीकरणासह सर्फेसिंग व कॉलनीतील अंतर्गत रस्त्याचे खडीकरणासाठी १९२ कोटीच्या कामांना महासभेने सोमवारी मंजुरी दिली आहे. मात्र, प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या डॉकेटवर बहुसंख्य सदस्यांनी आक्षेप घेतल्याने महासभेत गदारोळ झाला.

प्रशासनाने एकीकडे १९२ कोटीच्या रस्त्यांच्या कामांचे डॉकेट ठेवून त्याच डॉकेटमध्ये स्मार्ट सिटी, अमृत, सिंहस्थाच्या खर्चाचा उल्लेख करत प्राधान्यक्रम ठरण्याची विनंती केल्याने सदस्यांमध्ये तीव्र संताप उमटलेत. शिवसेना व भाजपच्या सदस्यांनी या डॉकेटला विरोध केला. तर मनसेने डॉकेटचे समर्थन केल्याने महापौरांनी प्रशासनाचे विषय वगळून रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे.

शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण व सर्फेसिंगसाठी १९१ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यात कॉलनी अंतर्गत खडीकरणासाठी १६ कोटी १७ लाख, कॉलनी रस्ते डांबरीकरण ३० कोटी ६ लाख रस्त्यांचे सर्फेसिंग ६९ कोटी १६ लाख, मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण ६८ कोटी ७४ लाख, औद्योगिक वसाहतीतील रस्ते डांबरीकरण ७ कोटी २८ लाख रुपयांच्या कामांचा त्यात समावेश आहे.

विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी या विषयाच्या वैधतेवरच आक्षेप घेतला. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने हा प्रस्ताव आणल्याचा आरोप विरोधकांनी केला. हा निधी कधी मिळणार इथपासून ते लगेच कामे होणार आहेत का असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने स्मार्ट सिटी, नदी संवर्धन, अमृत सिंहस्थाचे दायित्व अशांचा उल्लेख केल्याने ही कामेच होणार नसल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्यांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी सभागृहात केला. प्रशासनाने कामे टाळण्यासाठी विविध कामांच्या दायित्वाचा उल्लेख सभागृहात केल्याचा आरोप उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी केला. महापौरांनीही प्रशासनाने या विषयात इतर विषय घुसविणे चुकीचे असल्याचे सांगितले. इतर योजनांचे विषय मंजूर नसतांना ते आले कसे असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. हे डॉकेटच बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी केला. मनसेच्या सदस्यांनी मात्र डॉकेटचे समर्थन केले. त्यामुळे महापौरांनी प्रशासनाचे विषय वगळून रस्त्यांच्या कामांच्या विषयाला मंजुरी दिली.

अन्यथा चालते व्हा...

महासभा अनधिकृत असल्याचा आरोप शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांनी केला. प्रकाश लोंढे यांनीही त्यांचे समर्थन केले. त्यामुळे महापौरांनी सतंप्त होवून 'सभेत कशाला बसला, सभेला येवू नका' असा टोला लावला. 'विरोधाचे लेटर द्या आणि चालते व्हा. तुम्ही न्यायालयातही जावू शकता,' असे महापौरांनी सुचवले. त्यावरून महापौर व बोरस्ते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अखेरीस सभा नव्हे हा विषय बेकायदेशीर असल्याचे बोरस्ते व लोंढे यांनी सांगितले. त्यानंतर तणाव निवळला.

विकास शुल्कावरून वादळ

महासभेत विकास शुल्कावरून सदस्य आणि प्रशासना जुंपली. विकास शुल्क ज्या भागातून घेतले जाते, त्याच भागातील रस्त्यांवर खर्च केले जाते काय? असा सवाल उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी उपस्थित केला. त्यावर, विकास शुल्काचे खाते स्वतंत्र असून प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावांना त्याच्यातून मंजुरी दिली जाते, असे लेखाधिकारी राजेश लांडे यांनी सांगितले. मात्र, तसे होत नसल्याचा आरोप सदस्यांनी केली. शिरीन मेडोज या उच्चभ्रू वसाहतीत मात्र विकास शुल्क घेवूनही रस्ते का केले नाहीत असा आरोप सदस्यांनी केला. तर विकास शुल्काचे कामे कुठेही करता येत असल्याचा दावा सुनील खुने यांनी केला. महासभेने मंजूर केल्यास विकास शुल्कातून कामे घेतली जातील असे त्यांनी सूचविले.

फूट पाडण्याचा प्रयत्न

प्रशासनाने १९२ कोटीचे कामे प्रस्तावित केले असले तरी त्यात सदस्यांचे विषय नसल्याने यावरून सदस्यांनी गदारोळ केला. यात भेदभाव करून सदस्यामंध्ये फूट पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप सदस्यांनी केला. यात सदस्यांकडून प्रस्ताव मागून विषय मंजूर केला असता तर बरे झाले असते, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. सिंहस्थामुळे पंचवटी व आऊटर भागात रस्त्यांची कामे झाले आहेत. तरीही या भागातील विषय घुसविण्यात आल्याचा आरोप काही सदस्यानी केला. सातपूर भागातून जास्त कर येत असून इथल्या नागरिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. एका भागाला जास्त निधी तर दुसरा भागावर अन्याय केला जात असल्याची भावना सदस्यांनी केली. त्यामुळे पाणी आंदोलनावर एकत्र असलेले नगरसेवक सोमवारी मात्र विभागाची भाषा करून एकमेकांवर बोलायला लागले. त्यामुळे प्रशासनाचा फूट पाडण्याचा डाव यशस्वी झाला.

प्रशासनाची चाल

प्रशासनाने रस्त्यांच्या विषयासोबतच स्मार्ट सिटी ५० कोटी, नदी सवंर्धन ५२१ कोटी, अमृतसाठी एक हजार कोटी, पाणीपुरवठा ४५ कोटी, सिंहस्थाचे दायित्व २१ कोटी, सातवा वेतन आयोग अशा दायित्वाच्या विषयांचा डोंगरच उभा केला. तर हे विषय घ्यायचे की रस्ते मंजूर करायचे याचा निर्णय सभागृहावर सोपवला. मात्र हा विषय सदस्यांची कोंडी करणारा असल्याचा आरोप सदस्यांनी केला. प्रशासनाला विषय मंजूर होवू द्यायचा नाही म्हणून तो आणल्याचा आरोप सदस्यांनी केला. एकीकडे रस्त्यांचा विषय आणायचा आणि दुसरीकडे मंजुरी न दिलेले विषयही पटलावर आणण्यामागे प्रशासनाचा डाव काय असा सवाल सदस्यांनी केला. तर पाच अधिकाऱ्यांच्या सहीचे प्रथमच डॉकेट आल्याचा दावा सदस्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images