Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जात वैधतेबाबत अधिक्षकच अनभिज्ञ

0
0
श‌िक्षणाध‌िकाऱ्यांनी जात वैधतेबाबत सरकारचे आदेश केवळ स्वायत्त संस्थांच्या शाळांपर्यंतच पोहचविले आहेत. यामुळे जात वैधता पडताळणी करण्याबाबत खासगी संस्थांमधील श‌िक्षक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

वसाहतीला MIDC चा खोडा

0
0
नाकर्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कामकाज ग्रामोद्योगावरही परिणाम करणारे ठरत असल्याची बाब पुढे आली आहे. सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे प्रस्तावित असलेली ग्रामोद्योग वसाहत महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे कागदावरच आहे.

गणेशोत्सवानंतरही कांदा रडवणार

0
0
उन्हाळी कांदा उत्पादनाच्या सहा ते सात टक्केच शिल्लक राहिल्याने फक्त पंधरा दिवस मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी दिसणार आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरनंतर विक्रीस येणाऱ्या लाल कांद्यालाही तेजी राहील, अशी शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

पिछे कदम!

0
0
टोलसाठी अडवल्यामुळे महिला शिवीगाळ करणारे शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी शनिवारी आमदारकीचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला.

शिवसेना आमदाराचा राजीनामा

0
0
मुंबई-आग्रा हायवेवरच्या पिंपळगाव टोल नाक्यावर महिला कर्मचा-यांना शिवीगाळ करून त्यांना धमक्या देणारे निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांनी आज आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. टोल नाक्यावरचा उद्दामपणा अंगलट येण्याची चिन्हं दिसू लागल्यानंच त्यांनी ही सावध खेळी केल्याचं बोललं जातंय.

चौधरींची नजर पुन्हा जळगाववर

0
0
जमिनीच्या ले-आऊट मंजुरीत खंडणीप्रकरणी दोन वर्षे न्यायालयीन कोठडीत राहिलेले आणि नुकतीच सुटका झालेले भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांची नजर पुन्हा एकदा जळगाववर पडली आहे.

समाजाने संवेदनशीलता जपावी

0
0
देशाच्या क्रांतीच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणा-या महाराष्ट्रापासून अद्यापही कलेचे काही प्रांत दुर्लक्षित राहीले आहेत.

चौघे भामटे ताब्यात

0
0
आदिवासी विकास भवनच्या पोर्चमध्ये नोकरीचे दुकान मांडणा-या चौकडीला कर्मचा-यांनीच शिताफीने पकडले. त्यांची उलटचौकशी करताच भंबेरी उडालेल्या या चौकडीने शरणागती पत्करली.

नेमके कोणते खड्डे बुजविले?

0
0
शहरातील खराब रस्ते व खड्ड्यांमुळे चौफेर टीकेचा सामना करणाऱ्या मनसेकडून खड्डे बुजविण्याच्या मोहिमेवर कोट्यवधीचा खर्च केल्याचे दाखवले जात आहे. मात्र मनसेच्या नगरसेविका मीना माळोदे यांनी 'इतका खर्च केला तर माझ्या प्रभागातील रस्ते खराब का' असा सवाल महापालिकेला केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासमोर यक्षप्रश्न

0
0
टोलनाक्यावरील महिलांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणातून निफाडचे आमदार अनिल कदम यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी तो स्वीकारायचा की नाही हा यक्षप्रश्न उद्धव यांच्यासमोर असेल. कदम यांनी महिलांना केलेल्या शिवीगाळमुळे सेनेचे प्रतिमा मलीन झाली आहे.

काँग्रेस आघाडीची सत्ता उखडून टाका

0
0
शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिर्डीमध्ये अप्रत्यक्षपणे फोडला. खून, बलात्कार, घोटाळे घालणाऱ्या भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उखडून फेका, अशी गर्जना करत उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आदेश दिले.

अनिल कदम यांच्यावर गुन्हा दाखल

0
0
शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याविरुद्ध अखेर पिंपळगाव-बसवंत पोलीस ठाण्यात शिवीगाळ, विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पिंपळगाव टोलनाक्यावर महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप झाला होता.

उद्धव यांचा भुजबळांना आवाज

0
0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला नाशिकमध्ये जाऊन त्यांना जोरदार आवाज दिला आहे. शिवसेना आणि शिवसैनिक जीवाला जीव देणारे आहेत, विकले जाणारे नाहीत. हे भुजबळ यांनी ध्यानात ठेवावे, अशा शब्दांत उद्धव यांनी ललकारले आहे.

मोबाइल शॉपी लुटणा-या बालगुन्हेगारास अटक

0
0
लासलगावजवळील पिंपळगाव येथून १४ ऑगस्ट रोजी एका मोबाइलच्या दुकानातून सुमारे ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी मुख्य संशयित असलेल्या एका बालगुन्हेगाराला मुद्देमालासह पकडण्यात लासलगाव पोलिसांना यश आले आहे.

गोई काठच्या शेतक-यांचे उपोषण अखेर मागे

0
0
पालखेड डाव्या कालव्यातील अतिरिक्त पाणी गोई नदीला सोडण्यात यावे या प्रलंबित मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दिवसांपासून विंचूरला बेमुदत उपोषण सुरू केले होते.

आम्ही एकशे पाच आहोत !

0
0
माणूस जेव्हा त्वेषात येऊन बोलतो, तेव्हा वाक्याच्या सुसंगतीचा नियम तो विसरून जातो. अन् सार्वजन‌िक ठ‌िकाणी असे काही घडले की इतरांसाठी ती हास्याची पर्वणी व चेष्टेचा विषय ठरते. शुक्रवारी झालेल्या महापाल‌िकेच्या सभेत एका विषयांवरून वातावरण बरेच गरम झाले होते.

युवती ‘राष्ट्रवादी’चा घरचा आहेर

0
0
मुंबईतील सामूहीक बलात्कारप्रकरणी सत्ताधाऱ्यांविरोधात भाजप व श‌िवसेना आक्रमक असताना नाश‌िकमध्ये मात्र शिवसेना व भाजपपूर्वीच राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसने निषेध मोर्चा काढून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

घरकुलाच्या हिशेबाची ‘जुळवाजुळव’

0
0
घरकुल योजनेबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने महापालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेत या योजनेचा सर्व तपशील हायकोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी २० सप्टेंबरपर्यंतची मुदत महापालिकेला देण्यात आली असून महापालिकेने हिशेबाची जुळवाजुळव सुरू केली आहे.

महापालिकेचे रस्ते नकोच

0
0
एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते व पथदीप दुरूस्तीचे काम महापालिकेकडून काढून ‘एमआयडीसी’कडे देण्यात यावे अशी आग्रही मागणी नाशिक ​जिल्हा उद्योग व निर्यातदार संघटनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

स्पर्धांमुळे विश्वकोश कोशातून विश्वात आला

0
0
‘मराठी विश्वकोषाची जाडी पाहून तरुण त्याला हात लावण्याचे धाडस करीत नाहीत, शाळा-कॉलेजांमध्येही विश्वकोश फक्त शोकेसची शोभा वाढवीत आहे. अशा परिस्थितीत मंडळाने कन्याकोश व विश्वराजकोश या स्पर्धा सुरू करून कोशाविषयीची भीती सर्वसामान्यांच्या मनातून काढून टाकली.
Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images