Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बांधकामासाठी आता प्री-पेड वीज मीटर

$
0
0

वीज बीलाच्या तक्रारी टाळण्यासाठी महावितरणतर्फे नाशिक शहरातही प्री-पेड मीटर चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र घरगुती ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने पहिल्या टप्प्यात बांधकामासाठी हे मीटर वापरण्यात येणार आहेत.

वीज बिलांच्या तक्रारी वाढल्याने राज्यात प्री-पेड मीटर सेवा सक्तीची करण्यात येणार असल्याच्या बातम्या सोशल मीड‌ियावरुन पसरत होत्या. मात्र घरगुती ग्राहकांना प्री-पेड मीटर्स सक्तीचे करण्यात आले नसून बांधकामासाठी वापरण्यात वीज कनेक्शनससाठी हे मीटर सक्तीचे करण्यात आले आहेत. ही योजना प्रथम पुणे विभागात राबविण्यात आली. तेथे नव्याने देण्यात येणाऱ्या वीज कनेक्शनसाठी हे मीटर सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र राज्याच्या इतर भागात याला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे इतर भागात प्री-पेड मीटर बांधकामासाठी सक्तीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेकदा बिल्डर्स बांधकामासाठी वीज मीटर घेतात वीज वापर झाल्यानंतर त्याचे थकित बील न भरल्याने त्या इमारतीत राहण्यास आलेल्या सभासदांकडून ते वसूल करावे लागते. त्यामुळे बांधकामांसाठी वापरण्यात येणारे मीटर प्री-पेड करण्यात आले आहे. घरगुती वापरासाठीही जे ग्राहक मागणी करतील त्यांना हे मीटर देण्यात येणार आहेत. प्री-पेड मीटर लावणाऱ्या ग्राहकांना वीज ब‌िलात पाच टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच वीज मीटर हे महावितरणकडून देण्यात येणार असल्याने याचा ग्राहकांवर बोजा पडणार नाही.

वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच वीज दराची आकारणी करण्यात येणार आहे. या मीटर सह कंझ्युमर इंटरफेस युनिट (सीआययु) हे उपकरण देण्यात येणार आहे.

यामध्ये ग्राहकांना वीजेचा वापर, भरलेली आणि शिल्लक रक्कम आणि रिचार्ज करण्याची पूर्वसूचना अशी माहिती मिळणार आहे. रिचार्ज केलेल्या रकमेनुसार कालावधीची मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. तसेच रात्री अपरात्री, सणाच्या व सुट्टीच्या दिवशीही मीटर्स रिचार्ज करता योणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडाळा-पाथर्डीरोडवरील अतिक्रमण जमीनदोस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक नगरचना विभागाकडून मंजुरी मिळालेल्या अतिक्रमणावर सोमवारी वडाळा-पाथर्डी रोडवरील निवासी रहिवासी क्षेत्रातील पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात आली. जेसीबी मशिन उपलब्ध न झाल्याने अखेर मोहीम थांबवित अतिक्रमण विरोधी पथक माघारी फिरले. अवघे दोन अतिक्रमण हाताने तोडण्यात आली. रहेमतनगर येथील एका वकिलाने बेकायदेशीररित्या बांधलेला गाळा तोडण्यात आला तर पखालरोडवरील सोसायटीच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण तोडण्यात आली. जेसीबी मशिन उपलब्ध झाल्यावर मंगळवारी, १ डिसेंबर रोजी पुढची अतिक्रमण तोडण्यात येणार आहे. पूर्व विभागातील वाढते अतिक्रमणाकडे नगररचना विभागाने व आयुक्त यांनी लक्ष केंद्रीत केल्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साक्षरतेसाठी प्रथम फाऊंडेशनचे ‘लाखात एक’

$
0
0

नाशिक : 'गांधीजींनी सतत २४ दिवस, तीनशे किलोमीटर चालून म‌ीठाचा सत्याग्रह केला. हजारो भारतीयांनी त्यांना साथ दिली आणि भारतात नवी क्रांती झाली. आज तुम्हाला ना मीठ उचलायचे आहे, ना २४ दिवस चालायचे आहे. एक पुस्तक उचला आणि गावातील काही मुलांबरोबर ते वाचा..' असा संदेश देत 'लाखात एक' या अभियानाद्वारे प्रथम फाऊंडेशन ही संस्था राष्ट्रस्तरावर साक्षरतेविषयी जनजागृती करीत आहे. नाशिक शहरातील १२० वस्त्यांमध्ये ते हे अभियान राबव‌िले जात आहे. संस्थेच्या सर्वेक्षणानुसार भारतात ९६ टक्के मुलांची शाळेत नोंदणी झाली आहे. त्यातील कित्येक मुलांना अद्यापही व्यवस्थित लिहिता-वाचता येत नाही. वजाबाकीची सोपी गणितेही त्यांना सोडवता येत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी कमी खर्चात मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न प्रथम फाऊंडेशन करते आहे. त्यासाठी भारतातील एक लाख वस्तीतील मुलांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. इयत्ता तिसरी ते आठवीच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे शैक्षणिक ज्ञान कितपत आहे, याची माहिती घेतली जाणार आहे.

सर्व मुलांचे मुलभूत वाचन आणि गणिताच्या क्षमतांचे मूल्यांकन करणे, आई-वडील, शिक्षक आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी मूल्यांकनावर चर्चा करणे, ज्या मुलांना पायाभूत स्तरावर मदत हवी असेल त्यांना मदत करणे, आपल्या गावाच्या आजूबाजूच्या लोकांना अनुभव सांगा आणि अभियानात भाग घ्यायला प्रेरणा द्या, या चतुःसूत्र‌ीवर हे अभियान कार्यरत आहे. १५ डिसेंबरपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. त्यानंतर मुलांचा रिपोर्ट तयार करुन तो पालकांना, त्या परिसरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना दाखविला जाणार आहे. हा संपूर्ण डाटा मुंबईतील प्रथम फाऊंडेशनच्या मुख्य कार्यालयात जमा केला जाणार असून, अधिकाधिक मुलांना लिहिता-वाचता येण्यायोग्य करण्यासाठी उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.

त्यासाठी वस्तीप्रमुख व शैक्षणिक स्तरावर बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्याचे आवाहनही संस्थेतर्फे करण्यात आले आहे. नाशिकबरोबरच सोलापूर, मुंबई, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. तर सामाजिक भान जपत नाशिकमधील कॉलेजचे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक या अभियानात स्वयंसेवक म्हणून विनामूल्य काम करीत आहेत. स्वयंफूर्तीने ते या अभियानात सहभागी झाले असून, देशाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लब हाऊस नव्हे; घंटागाडी पार्किंग प्लेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष रामचंद्र निगळ यांनी सातपूर एमआयडीसीमध्ये क्लब हाऊस उभारले. मात्र, महापालिकेने योग्य लक्ष न दिल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले क्लब हाऊस जण कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांची पार्किंग करण्यासाठी आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अत्याधुनिक सुविधा असलेली ही कोट्यवधींची मालमत्ता धुळखात पडून आहे. याकडे महापालिकेने लक्ष घालण्याची मागणी सातपूर जॉर्गस क्लबने केली आहे.

सातपूर नगरपरिषद असतांना नगराध्यक्ष रामचंद्र निगळ यांनी जकात सुरु केली होती. यानंतर सातपूरकरांच्या आरोग्य सुविधेसाठी हक्काचे ठिकाण असावे म्हणून सातपूर क्लब हाऊसची संकल्पना आणली होती. दरम्यान सन १९९२ साली नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन नगरसेवक दिलीप निगळ यांनी सातपूर क्लब हाऊसला मूर्त स्वरूप दिले. क्लब हाऊसच्या पहिल्या टप्यात महिला व पुरुष जिम तसेच टेबल टेनिस व बॅडमिंटन हॉल निर्माण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात तरण तलावाची उभारणी महापालिकेने केली.

तिसऱ्या टप्प्यात जॉ‌गिंग ट्रॅक व ५० मीटर शुटिंग रेंजची निर्मिती महापालीकेने कोट्यावधी रुपये खर्च केले. मात्र सद्यास्थितीत क्लब हाऊसकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. महिला व पुरुष जिम अद्याप सुरू देखील करण्यात आलेल्या नाहीत. त्यातच बॅडमिंटन व टेबल टेनिसचा हॉल नावापुरताच आहे. यामध्ये केवळ शुटिंगसाठी असलेले दोन हॉल नाममात्र दराने महापालिकेने दिले आहेत. नऊ एकर जागेवर तयार करण्यात आलेल्या क्लब हाऊसमध्ये केवळ तरणतलावाचाच वापर मोठ्या प्रमाणावर होतांना दिसतो. तसेच जॉगिंग ट्रॅकवर सातपूर जॉगर्स क्लबच्या सदस्यांनी लोकसहभागातून वृक्षांची लागवड केली आहे.

मैदानाची दुरवस्था सातपूर क्लब हाऊसवर महापालिकेने भले मोठे मैदान बनविले आहे. परंतु, याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने मैदानावर चारही बाजूंनी कचरा साचला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर अगोदर साफसफाई करावी लागते. तसेच ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे खेळाडू हैराण झाले आहेत.

मद्यपींचा भरतो अड्डा महापालिकेने नऊ एकर जागेवर उभारलेल्या सातपूर क्लब हाऊसमध्ये अंधार पडल्यावर मद्दपींचा रोजच अड्डा भरतो. यात मद्यपींकडून काचेच्या बाटल्या फोडल्या जातात. मैदानात आणि ट्रॅकवर पडलेल्या या काचांचा सर्वाधिक त्रास जॉगिंग करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागतो. महापालिका व पोलिस प्रशासन यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूलभूत सुविधा मिळण्याची प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

महापालिकेच्या प्रभाग तीनमधील सर्वात जुन्या आणि नोकरदारांची सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या सिद्धिविनायक टाऊनशिपमधील सर्वच रहिवाशी अनेक वर्षांपासून अनेक मूलभूत सुविधांपासून अद्याप वंचित आहेत.

सिद्धिविनायक टाऊनशिपमधील मुख्य मार्गासह अन्य अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खड्ड्यात गेले आहेत. पादचारी आणि वाहनचालक यांना दररोज खड्ड्यांचा आणि चिखलाचा सामना करावा लागत आहे. यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. अनेक वर्षांपूर्वी रस्त्यांचे खडीकरण करण्यता आले. मात्र, पावसामुळे सर्वच खडी निघाली असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

सिद्धिविनायक मंदिराजवळील कॉलनीची दुरवस्था झाली आहे. ड्रेनेज फुटले आहेत. पथदीप नाहीत. ज्या ठिकाणी पथदीप आहेत त्यांच्यावर दिवेदेखील नाहीत. मुलांना खेळण्यासाठी उद्यान नाही. महापालिकेची उद्यानासाठी आरक्षित जागा आहे. मात्र, तेथे मैदानाला कंपाऊंड करण्यापलिकडे अन्य काहीही काम करण्यात आलेले नाही. रोड नीट नसल्याने आणि झाडी खूपच वाढल्याने रात्री ये-जा करतांना भीती वाटते. रस्तांचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलामुळे स्थानिकांचा जीव धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

विहितगाव व देवळाली गाव या दोन गावांमध्ये असलेल्या वालदेवी नदीवरील नवीन पुलामुळे अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा नवीन पूल स्थानिक नागरिकांच्या अडचणीचे कारण बनला आहे.

वालदेवी नदीवर महापालिकेच्या वतीने सिंहस्थ निधीमधून नवीन पूल उभारण्यात आला. या पुलाला विहितगावच्या दिशेने वळविण्यात आले आहे. नेमक्या याच कारणामुळे या ठिकाणी वाहने चालविणे जिकरीचे बनले आहे. देवळाली गावातून वाहनधारकांना विहितगावकडे मुख्य रस्त्याला येतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुलाजवळील जागा ताब्यात घेऊन महापालिका प्रशासनाने रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. तेव्हाच हा प्रश्न निकाली निघू शकेल ही बाब वारंवार ‌लक्षात आणून दिल्यानंतरही कुठलीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्रवेशद्वारासमोर अपघात

विहितगावच्या बाजूला या पुलाला नेमके गावात प्रवेश करणारा रस्ता असल्याने बाहेर पडणारे आणि जाणारे वाहनचालक या पुलावरून येत-जात असतात. मागच्या बाजूने येणारे वाहनधारक वाहनांची गती कमी करत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून या भागात अपघात वाढले आहेत. विशेष म्हणजे या भागात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या घरातील बच्चे कंपनीला घराबाहेर पाठविणे धोक्याचे झाले आहे. भरधाव येणारी वाहने यामुळे अपघात होण्याची कायम भीती येथील नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे.

गतिरोधक उभारण्याची मागणीही रखडली

गावातील रहिवाशांनी पुलामुळे निर्माण होणारी अडचण लक्षात घेत महापालिका प्रशासनाकडे या रस्त्यावर त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने यासाठी खासदारांचे पत्र आणा असे सांगत नागरिकांची मागणी धुडकावून लावली आहे. त्यामुळे आता दाद मांडावी तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टर्मिनलसाठी दिग्गज इच्छुक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओझर विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनलच्या देखभालीसाठी दिग्गज कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळेच ख्यातनाम कंपन्यांनी सोमवारच्या बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला त्याचा अधिक फायदा होणार आहे.

येत्या फेब्रुवारीत एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरची विमानसेवा सुरु होणार आहे. याची दखल घेत हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) टर्मिनलचा सांभाळ करण्यासाठीचे टेंडर काढले आहे. या टेंडरला दिग्गज कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. राजधानी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या टर्मिनलचा सांभाळ जीएमआर ही कंपनी सध्या करीत आहेत. तर, मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अत्याधुनिक टर्मिनलचा सांभाळ जीव्हीके ही कंपनी करीत आहे. या दोन्ही कंपन्यांनी ओझर येथील टर्मिनलच्या देखभालीसाठी इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यामुळेच या दोन्ही कंपन्यांचे अधिकारी ओझर टर्मिनलमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीला हजर होते. त्याशिवाय रिलायन्स आणि सोव्हिका समुह यांच्या अधिकाऱ्यांनीही उपस्थित लावली आहे. त्यामुळे यापैकी कुठल्याही कंपनीला देखभालीचे कंत्राट मिळाले तर त्याचा फायदा ओझरच्या विमानसेवेलाच होणार आहे. येत्या जानेवारीपर्यंत एचएएलकडून टेंडरची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे जानेवारीपासूनच टेंडरमध्ये निवड होणाऱ्या कंपनीकडे टर्मिनलचा ताबा दिला जाणार आहे. दरम्यान, येत्या फेब्रुवारीत सेवा सुरु करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ओझर विमानतळाला भेट दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेट टॉप बॉक्ससाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन

$
0
0

नाशिक : जिल्ह्यात २८ ठिकाणांच्या नागरी वस्त्यांमध्ये केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनसाठी जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर २०१५ ही 'डेडलाईन' दिली आहे. प्रत्येक केबल जोडणी धारकाला सेटटॉप बॉक्स लावणे अनिवार्य असुन, मुदतीत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास त्या भागातील अ‍ॅनलॉग सिग्नल बंद करण्यात येणार आहे. केबल चालकांनी ग्राहकांना तत्काळ सेट टॉप बॉक्स उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश करमणुक कर विभागाने दिले आहेत.

शहर तसेच आसपासच्या नागरी भागात डिसेंबर २०१५ पर्यंत तर ग्रामीण भागात डिसेंबर २०१६ पर्यंत केबलचे ड‌िजिटायझेशन पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर केबल टेलीव्हिजन नेटवर्क अधिनियिम, १९९५ नुसार अपर जिल्हाधिकाऱ्यांवर अधिकृत अधिकारी म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारक असले तरी त्याचा भुर्दंड ग्राहकांनाच सहन करावा लागणार आहे. जिल्ह्यातील मालेगाव महापालिका, सुरगाणा,सटाणा, नांदगाव, मनमाड, चांदवड, त्र्यंबकेश्वर, भगुर, इगतपुरी, सिन्नर, येवला, पेठ, कळवण, निफाड, दिंडोरी, व देवळा या नगरपंचायतीमध्ये तसेच दयाने, सोयगाव, संगमेश्वर, मालधे, देवळाली, सामनगाव, एकलहरे, घोटी बु., ओझर, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, संसारी या शहरी भागात समाविष्ट गावांमध्येही ३१ डिसेंबर अखेर सेटटॉप बॉक्स बसवावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मुंडेवार यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दप्तराची आज होणार तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक विद्यार्थ्याच्या पाठीवरील जड ओझे ३० नोव्हेंबरपर्यंत कमी व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने शाळांना आदेश दिले होते. त्यानुसार अनेक शाळांमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या गेल्या. या उपाययोजना कितपत सफल ठरल्या, याची शहानिशा आज महापालिका शिक्षणमंडळाकडून केली जाणार आहे.

दप्तराचे ओझे हे विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, याची जबाबदारी शिक्षकांनी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. ओझे कमी झाले नाही, तर मुख्याध्यापक व शाळेच्या संचालकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. महापालिका शाळांमध्ये यावर 'मित्र योजना', 'दुहेरी पुस्तक सेट योजना' राबविल्या जात आहेत. मित्र योजनेमध्ये एका बाकावर बसणाऱ्या दोन मुलांपैकी एका दिवशी एकानेच पुस्तक आणून त्याचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुहेरी पुस्तक योजनेत शाळेतील जुनी पुस्तके वापरात आणली जात आहेत. तसेच काही शाळांमध्ये बाकाच्या खालीच वह्या, पुस्तके ठेवण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, पालकांच्या म्हणण्यानुसार दप्तराचे ओझे 'जैसे थे' च असून केवळ घोषणाबाजीमुळे या निर्णयाला रंग चढला आहे.

प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत होईल, यावर काही पालकांनी शंका उपस्थित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधोपचारांसाठी ‘त्यांच्या’ नश‌िबी मुंबईच्या वाऱ्या

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

ना‌शिक : एचआयव्ही पॉझ‌िटीव्हच्या धक्क्याने हादरलेल्या महिलांनी नंतरच्या टप्प्यात धैर्य बाळगून स्वत:ला सावरलेही. परंतु औषधोपचारांसाठी त्यांच्या नशिबी मुंबईच्या वाऱ्या पडल्या आहेत. हे वारीदिव्य टळावे आणि विना दगदगीत नाशिकमध्येच औषधोपचार मिळण्याची अशी आशा एचआयव्ही बाध‌ित महिला व्यक्त करतात.

एचआयव्ही या असाध्य आजाराला धैर्याने सामोरे जातानाही महिलांनी कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी नेटाने संघर्ष सुरू ठेवला आहे. आप्तांच्या आणि समाजाच्या अवहेलना करणाऱ्या नजरा चुकवित त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य केवळ पोटच्या करांसाठी जगण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या संकल्पाला महिन्द्र अॅण्ड महिन्द्र कंपनी आणि यश फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे पाठबळ मिळाले.

एचआयव्हीग्रस्त समदुखींना एकत्रित आणण्याचे आणि त्यांना धीर देण्याचे काम यश फाऊंडेशनकडून निरंतर सुरु आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणाबरोबरच रोजगाराची संधीही उपलब्ध झाल्याने या महिला स्वावलंबी जीवन जगू लागल्या आहेत. एकीकडे अशा प्रकारे दु:ख बाजूला सारून आनंदवाटा शोधणाऱ्या या महिलांचा औषधे हाच जगण्याचा आधार आहे. मात्र यापैकी अनेक महिलांना औषधे घेण्यासाठी थेट मुंबईला जावे लागत असल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

धोक्याच्या उंबरठ्यावर नसलेल्या एचआयव्हीग्रस्त महिलांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्येच औषधे मिळतात. मात्र ज्या महिला धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत त्यांना केवळ मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल किंवा औरंगाबाद येथेच औषधे दिली जातात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांना औषधे घेण्यासाठी मुंबईला जावेच लागते. मात्र अनेकदा तेथेही आवश्यक ती सर्व औषधे मिळत नाहीत. त्यामुळे केवळ औषधे घेण्यासाठी मुंबईला महिन्यातून दोन किंवा तीन चकरा माराव्या लागतात, अशी कैफियत त्यांनी व्यक्त केली आहे. औषधांच्या सेवनात सातत्य आवश्यक आहे. मात्र सरकारी अनास्थेमुळेच ते राहात नसल्याचे या एचआयव्ही बाधितांचे म्हणणे असून, त्यामूळे औषधांच्या सेवनातही खंड पडतो आहे. त्याचा विपरात परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होतो आहे. हे औषधोपचार नाशिकच्या सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये मिळावेत अशी या सर्वांची मागणी आहे.

शहरातील विविध भागात राहणाऱ्या महिला रोजगारासाठी जुना गंगापूर नाका परिसरात येतात. प्रत्येक महिलेला प्रवास खर्चापोटी दररोज ३० ते ५० रुपये मोजावे लागतात. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या महिलांना हा खर्चही पेलवेनासा होतो आहे. एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात सवलत मिळावी, अशीही त्यांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिल्हा कोर्टासाठी पर्यायी जागा शोधा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा कोर्टाला आहे ती जागा अपूरी ठरत असून, त्यांना अतिरिक्त पाच एकर जागा हवी आहे. पोलिस मुख्यालयाने त्यांची जागा देण्यास नकार दिला असून, 'कोर्टासाठी जागेचा शोध घ्या' अशा सूचना राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. महापालिका क्षेत्रात एवढी जागा उपलब्ध नसल्याने जागा शोधायची कोठे हा प्रश्न प्रशासनाला सतावू लागला आहे.

१९८५ मध्ये नाशिकमध्ये कोर्ट सुरू झाले. त्यावेळी मुबलक असलेली कोर्टाची जागा आता मात्र अपुरी ठरू लागली आहे. वकील आणि पक्षकारांना वाहने उभी करण्यासाठीही पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या नाशिक शाखेने कोर्टासाठी प्रशस्त जागेची मागणी केली आहे. पोल‌िस मुख्यालयातील पाच एकर जागा कोर्टासाठी द्यावी, अशी मागणी होत असली तरी या जागेमध्ये चांगल्या स्थितीतील पोलिस वसाहत असल्याने पोलिस प्रशासनाने ही जागा देण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे कोर्टासाठी आता पर्यायी जागेचा शोध घेण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत सोमवारी प्रधान सचिवांनी व्हीडीओ कॉन्फरन्स घेतली. जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर पोलिस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कोर्टासाठी पाच एकर जागेची मागणी आहे. सद्यस्थितीत कोर्टाच्या पश्चिमेकडील पोलिस प्रशासनाची जागा मिळावी, यासाठी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. क. का. घुगे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर योग्य मार्ग काढण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असले तरी या प्रश्नाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. कोर्टासाठी जागा अपुरी ठरत असून, कुटुंब न्यायालय, मोटार वाहन न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय शहरात वेगवेगळ्या ठिकाणी काही अंतरावर भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. त्यामुळे वकिलांची गैरसोय होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुनी तांबट लेनमध्ये दोन लाखांची घरफोडी

$
0
0

नाशिक : जुने तांबट लेनमधील बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरातील २ लाख २७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जुनी तांबट लेनमधील गजानन कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या मनोज दिनेशकुमार गुप्ता (३६) यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली असून, संध्याकाळच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होता. दरम्यान, गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर लिप‌िकास तीन वर्षाचा कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहाव्या वेतन आयोगानुसार प्रस्ताव तयार करून तो शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर करण्यासाठी १ हजार १०० रूपयांची लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिप‌िकास कोर्टाने दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरी व अडीच हजार रूपये दंड ठोठवला. २०१० मध्ये अंबड पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या या गुन्ह्याबाबत आज, सोमवारी कोर्टाने आपला निर्णय सुनावला.

बाळासाहेब वाल्मिकराव बोरसे असे या शिक्षा झालेल्या लिप‌िकाचे नाव असून, त्यास ३० मार्च २०१० रोजी अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी सिडको परिसरातून लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले होते. तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून, त्यांचा सहाव्या वेतन आयोगानुसार प्रस्ताव तयार करून त्यावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी घेऊन तो प्रस्ताव ​अहमदनगर येथील शिक्षणाधिकाऱ्याकडे सादर करण्याचे काम बोरसेने करणे अपेक्ष‌ित होते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील न्यु हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील निवृत्त शिक्षकाचा प्रस्ताव पुढे सरकवण्यासाठी बोरसे याने पैशांची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सिडको परिसरात राहणाऱ्या बोरसेला पैसे घेताना अटक केली. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे के. एन. निंबाळकर यांनी बाजू मांडत सबळ पुरावे कोर्टासमोर सादर केले. हे पुरावे ग्राह्य मानून कोर्टाने बोरसेला शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंगलांच्या अतिक्रमणामुळे बिबटे शहराकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानवाने जंगलांवर केलेले प्रचंड अतिक्रमण, वृक्षतोड, पिण्याच्या पाण्याची कमतरता, आदींमुळे बिबट्या शहराकडे येऊ लागला असून उसाची शेती हे त्याचे आश्रयस्थान बनले आहे, असे मत नाशिकचे लेपर्ड मॅन आणि वन विभागाचे आरएफओ सुनील वाडेकर यांनी व्यक्त केले. नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे आयोजित 'निसर्ग कट्टा' या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर जेष्ठ पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ, पशु वैद्यकीय सहायक आयुक्त डॉ संजय गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा आदी उपस्थित होते. आनंद अकाउंटन्सी क्लासेसच्या किंगफिशर सभागृहात हा कार्यक्रम झाला. वाडेकर पुढे म्हणाले की, 'बिबट्या शहरात आल्यानंतर गर्दी करू नये व त्याला पकडण्याचे धाडसदेखील करू नये. तो अतिशय शक्तिशाली वन्य प्राणी असून असे धाडस करणाऱ्या अनेक लोकांना त्याने जखमी केले आहे.'

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंस्र बिबट्याला माया, प्रेम देखील असते हे सांगणारा लघुपट दाखविण्यात आला. बिबट्या एका वानर मादीची शिकार करतो पण तिच्याजवळ असलेल्या पिल्लाला तो नखदेखील लावत नाही, उलट त्याचा सांभाळ करतो हे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारेच उभे राहिले. या कार्यक्रमात निसर्ग कट्ट्याविषयी माहिती देतांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा म्हणाले की, 'या कट्ट्यावर निसर्ग घडामोडींची चर्चा घडवून आणली जाणार असून निसर्गाशी संवाद साधण्याची संधी यामुळे मिळणार आहे.' शहरात मोठ्या प्रमाणात बिबटे येत असल्याने लेपर्ड सफारी हा प्रकल्प वन विभागाने राबवावा असे पक्षीमित्र अनिल माळी यांनी सुचविले. पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांनी नदी जवळ होणाऱ्या सिमेंटच्या जंगलांच्या अतिक्रमणामुळे वन्य जीवन धोक्यात येत असल्याचे सांगितले तर रमेश वैद्य यांनी वन विभागाने जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट ही योजना प्रामाणिकपणे राबविण्याची सूचना केली तसेच बिबट्या शहरात आल्यावर गर्दी टाळणे, तो परिसर रिकामा करून देणे, अफवा पसरवू नये, बिबट्याशी मस्ती करू नये किंवा त्याला छेडू नये अशा सूचना देखील या वेळी करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक बोरा यांनी केले. सूत्रसंचालन सलोनी वाघमारे यांनी केले. आभार प्रा. कुणाल कुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश नागरे, सागर बनकर, दर्शन घुगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोरपडे बंधुंसह चौघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशन धान्य घोटाळ्यात अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या घोरपडे बंधुसह चौघांना विशेष मोक्का कोर्टाने ९ डिसेंबरपर्यंत पोल‌िस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील संशय‌‌ित लक्ष्मण पटेल शनिवारीच कोर्टात शरण आला होता. त्यालाही ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रेशन धान्य घोटाळ्यामधील संशयित संपत नामदेव घोरपडे, विश्वास नामदेव घोरपडे (रा. गोविंदनगर, नाशिक), मगन रतन पवार, रमेश सोमनाथ पाटणकर (दोघेही रा. शिवशक्ती चौक, सिडको) हे चौघे रविवारी वाडीवऱ्हे पोलिसांना शरण आले. तत्पूर्वीच लक्ष्मण धरमसी पटेल (रा़. कल्याण वेस्ट, मुंबई) हा शनिवारी कोर्टात शरण आला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अरुण नामदेव घोरपडे याच्यासह अन्य तिघेजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी कोर्टात युक्तिवाद केला. ते म्हणाले, घोरपडे बंधुंनी संघट‌ितपणे सरकारी धान्याचा काळा बाजार केला असून, प्रचंड संपत्ती कमावली आहे. काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी बोगस कंपन्या स्थापून सुमारे १६५ कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत. या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली पद्धती, कुटुंब‌ियांच्या नावे केलेल्या संपत्तीचा शोध तसेच सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणेच अन्य कुणी आरोपी या प्रकरणात सहभागी आहेत का? याचा शोध घेण्यासाठी २० दिवसांची पोलिस कोठडी द्यावी.

संशयितांचे वकील अ‍ॅड. भानोसे, देशपांडे, भाटे यांनी मात्र पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद केला. संशयितांनी तपासात पोलिसांना सहकार्य केले आहे. संशयित फरार झाले नव्हते तर जामिनासाठीच्या कायदेशीर तरतुदी पूर्ण करण्यात त्यांना वेळ लागल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. त्यावर अ‍ॅड. मिसर यांनी पुन्हा युक्तीवाद केला. संशयित फरार होते म्हणूनच कोर्टाने अटक वॉरंट तसेच मालमत्ता जप्तीचे आदेश काढले.

संशयितांवर विविध पोलिस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल असून, आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. विशेष मोक्का कोर्टाच्या न्यायाधीश उर्मिला फलके जोशी यांनी संशयितांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शेती समस्यांवर करावे कृषी विद्यापीठांनी संशोधन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बाराही महिने शेतकरी वर्गाच्या पुढ्यात ठाकणाऱ्या कृषी समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहेत. यावर दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. हे उपायांच्या संशोधनाची भिस्त कृषी विद्यापीठांवर आहे, अशी अपेक्षा राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

ह्युमन सर्व्हीस फाऊंडेशन आणि मीडिया एक्झीबिटर्स यांच्या वतीने आयोजित कृषीथॉन प्रदर्शनाच्या समारोपाच्या दिवशी ते बोलत होते. त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम मैदानावर प्रदर्शन झाले. यावेळी थोरात म्हणाले, की कृषीशी संबंधित प्रत्येक घटक दिवसेंदिवस सजग होत आहे. कृषीविषयक अद्यावत माहिती मिळविणे, संशोधन, मार्गदर्शन आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बदलांसदर्भात अद्यावत राहणे ही शेतकऱ्यांना महत्त्वाची गरज वाटते. हे कृषी क्षेत्रासाठी सकारात्मक लक्षण आहे. राज्यातील कृषी विद्यापीठ आणि सरकारने संयुक्तपणे शेतीसमोरील समस्या सोडविण्यावर भर द्यायला हवा.

उपक्रमाचे संयोजक संजय न्याहारकर यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील संकल्पना मांडली. यंदाच्या नियोजनात शेतकरी वर्गाला भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून त्याच अनुषंगाने तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शोभा बच्छाव, काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, पोलिस उपायुक्त विजय पाटील, अॅड. जयंत जायभावे, नरेंद्र ठक्कर आदी उपस्थित होते. यावेळी कृषीथॉन स्टार प्लॅटीनम पुरस्काराने महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बीकेटी टायर्स, कलश सीड्स, नाबार्ड, मारुती सुझूकी यांना गौरविण्यात आले. कृषीथॉन स्टार गोल्ड पुरस्काराने ग्राम समृध्दी फाऊंडेशन, एक्स्प्रेस इन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि सन रायसिया रिसर्च लॅब यांना गौरविले.

कृषीथॉन सिल्वर पुरस्कार इंडिलूब, मल्टीमोल मायक्रो फर्टीलायझर, गरवारे वॉल रोप्स, सुविधा ट्रेडिंग एजन्सी, व्हीएनआर नर्सरी, वर्षा एन्टरप्रायझेस, बेदमुथा ग्रुप ऑफ कंपनीज यांना गौरविले. तर फ्रेंड ऑफ यंग फार्मर्स पुरस्काराने सॅमसोनाईट वनराई प्रोजेक्ट, फार्मेक्स अग्रो सायन्सेस आणि ठक्कर डेव्हलपर्स यांना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचपीटी’चा कट्टा होणार स्मार्ट

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

कॉलेजियन्ससाठी कट्टा म्हंटल की चेष्टा-मस्करी अन् कल्ला करण्याची जागा. कट्ट्यावर बसून कॉलेजियन्सचे ग्रुप्स अगदी सिनेमांपासून जागतिक स्तरावरच्या कोणत्याही विषयावर चर्चा रंगवतांना दिसून येतात. हाच कट्टा अधिक प्रगल्भ करण्यासाठी एचपीटी कॉलेज सज्ज झालयं ते 'स्मार्ट कट्टा' या नवीन संकल्पनेमधून.

'एचपीटी'च्या कट्टेकऱ्यांमध्ये हिट असलेला टकला कट्टा, म्हणजेच कॉलेजच्या लायब्ररी समोरच्या कट्ट्यावर आता स्मार्ट कट्टा सुरु होणार आहे. कट्ट्यावर होणाऱ्या ग्रुप्सच्या चर्चेमध्ये आपापसातील वैचारिक संवाद सर्वांसमोर यावा, तसेच कट्ट्यावर मनमोकळी होऊन बोलणाऱ्या तरुणाईने आपले विचार मांडावेत यासाठी ही संकल्पना राबविली जाणार आहे. 'स्मार्ट कट्टा' ही संकल्पना 'एचपीटी'च्या कलामंडळातर्फे आयोजित केली जाणार आहे. जर्नालिझम विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश नखाते, ऐश्वर्या गुजराथी, पुष्कर तिवारी, सागर गायकवाड, भक्ती आठवले हे ही 'स्मार्ट कट्ट्या'ची संकल्पना राबवणार आहेत.

सामाजिक, शैक्षणिक, चालू घडामोडी, क्रिडा, सांस्कृतिक अशा सर्वच विषयांबाबत या स्मार्ट कट्ट्यावर संवाद साधला जाणार असून तज्ज्ञांमार्फत विश्लेषणही करण्यात येणार आहे. यासाठी त्या विषयातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि यंगस्टर्स यांची मुक्त चर्चा इथे होणार आहे. कॉलेजियन्सनी जागरूक आणि संवेदनशील होत त्यांचा विविध विषयांवर सखोल अभ्यास व्हावा हा यासाठी ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

दहा डिसेंबरला सुरुवात

हा स्मार्ट कट्टा दहा डिसेंबर रोजी सुरू होत असून 'पेटंट आणि कॉपीराइट' या विषयवार इथे चर्चा होणार आहे. मृदुला बेळे यावेळी विशेष तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहणार असून प्रत्येक महिन्यात दोन वेळा हा कट्टा भरवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफडीप्रकरणी दोघाजणांना जाम‌ीन

$
0
0

नाशिकरोड : मुदत ठेव कर्ज घोटाळाप्रकरणी बिझनेस बँकेचे तत्काल‌ीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद बाबूलाल बलदेवा आणि मुख्य रोखपाल राजेंद्र चंद्रकांत शहाणे यांना पोलिसांनी आज अटक केली. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.

बिझनेस बँकेत असगर खान यांच्या मुदत ठेवीवर (एफडी) ६११ क्रमांकाचे खाते परस्पर उघडून दोन वेळा २५ लाख रुपये काढून पुन्हा भरल्याचा प्रकार ११ मे २००१ ते ११ मार्च २०१३ दरम्यान घडला होता. उपनगर पोलिस ठाण्यात खान यांनी तत्कालीन अध्यक्ष विजय संकलेचा, उपाध्यक्ष विजय चोरडीया, तत्कालीन संचालक वसंत नगरकर, अशोक तापडीया, सिद्धेश्वर नगरकर, वसंत गुरुनानी, डाॉ. पूनमचंद ठोळे, मोहन लाहोटी, छाया कपोते, सरीता टर्ले, तत्कालीन मॅनेजर प्रल्हाद बलदेवा, मुख्य रोखपाल राजेंद्र शहाणे आदी १७ जणांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केलेली आहे. संचालकांना न्यायालयाने सशर्त जाम‌ीन मंजूर केला आहे. सोमवारी बलदेवा व शहाणे यांना अटक केली व त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिथॉनमध्ये कोट्यवधीची उलाढाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या विद्यमाने आयोजित कृषीथॉन -२०१५ या आंतरराष्ट्रीय कृषि प्रदर्शनात शेती व शेतीपुरक यंत्रसामुग्री, बि-बियाणे, खते इत्यादीच्या खरेदी-विक्रीतून गेल्या पाच दिवसात कोट्यवधीची उलाढाल झाली आहे. त्यामुळे भविष्यात शेती व्यवसायाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास कृषिथॉन प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर यांनी व्यक्त केला.

गेल्या पाच दिवसापासून त्र्यंबकरोड वरील ठक्कर डोम येथे कृषिथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी न्याहारकर बोलत होते. या प्रदर्शनात देश-विदेशातील कृषि व कृषि सलग्न उत्पादने करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यात बि-बियाणांपासून ते अत्याधुनिक कृषि यंत्रे, औषधे, शेंद्रिय शेतीचे तंत्र, जैविक शेती आदी विषयक यंत्र सामुग्रीची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. प्रदर्शनाला केवळ राज्यातूनच नाही तर देशाच्या अनेक भागातून हजारो शेतकऱ्यांनी भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञानाची मा‌हिती जाणून घेतली तसेच खरेदी केली. प्रदर्शनातून शेतकऱ्यांना कमी खर्चातील शेती याबरोबरच ऊस, डाळींब, द्राक्ष या नगदी पिकांसाठी किफायतशीर शेती या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शनासाठी शेतीचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या इस्त्राइलसह सिंगापूर, मलेश‌िया आदी देशातील उत्पादन कंपन्यांनी सहभाग घेऊन भारतातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक कृषि यंत्रणा उपलब्ध करुन दिली होती. यावेळी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आयोजक संजय न्याहारकर यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सस्पेन्स थ्रीलरने परिपूर्ण असलेले ‘अघटीत’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सोवारी जगदंब प्रतिष्ठान, धुळे प्रस्तुत 'अघटीत' हे नाटक सादर करण्यात आले.

पुणे शहरात हे संपूर्ण नाट्य घडते. दहशतवादाच्या मुख्य टारगेटवर असलेल्या पुण्यात सुजाता पाटील, बंगला नंबर २४ मध्ये सुखाने वास्तव्य करीत असते. एक दिवस तिच्या दारावर एक सेल्समन पत्ता विचारत येतो व सरळ घरातच शिरतो. हा सेल्समनवजा व्यक्ती घरातून बाहेर निघायलाच तयार नसतो. सुजाता परोपरीने त्याला समजावून सांगते की तो ज्या व्यक्तीचा पत्ता शोधतोय ते हे घर नाही परंतु स्वत:ला सूर्यकांत म्हणवणारा हा माणूस घरातून जातच नाही आणि सुजाताला कळते की, तो दहशतवादी आहे. सूर्यकांत जेव्हा खिशातून पिस्तुल बाहेर काढतो तेव्हा सुजाता हादरूनच जाते. याचठिकाणी दुसरा दहशतवादीही येणार असल्याचे सूर्यकांत सांगतो. सुजाताचे घर आतंकवादी कारवाईचे ठिकाण म्हणून निवडले असून तिने आता केवळ गप्प रहायचे व या दोघांनाही मदत करायची असे ठरते; परंतु एका अनावधानाच्या क्षणी सुजाताला सूर्यकांतचे पिस्तुल मिळते व ती त्याला पिस्तुलाच्या सहाय्याने घराबाहेर काढते परंतु तितक्यात त्याचा मित्र येतो व तिचा हा डाव फसतो. सुजाताला दुसरा दहशतवादी पहिल्यापेक्षा कमी क्रुर वाटतो. त्यामुळे ती त्याला गुंडाळायचे ठरवते व आपण आपल्या पतीचा खून केलेला असून, जगातील सर्वात अभागी महिला आपण असल्याची ती बतावणी करते. तिच्या या भूलथापांना दुसरा दहशतवादी भुलतो व सूर्यकांतचा तिरस्कार करायला लागतो. इकडे सूर्यकांतला मात्र सुजाता आवडू लागते व तो तिला लग्नाची मागणी घालतो. मात्र त्यामुळे त्याचे व दुसऱ्या दहशतवाद्याचे भांडण होते. त्यात सूर्यकांतला गोळी लागते व तो मरतो. सुजाता शिताफीने दुसऱ्यालाही मारते व बक्षिसाची रक्कम, पत्रकारांना सर्व स्टोरी सांगण्याच्या तयारीला लागते. अशा आशयाचे हे नाटक होते. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन किरण लद्दे यांनी केले. नाटकात सोनाली साळुंके, जगदिश चव्हाण, सुमेध लोंढे, केदार नाईक, किशोरी सातभाई, विशाल बडगुजर यांनी भूमिका केल्या. नेपथ्य हर्षल परदेशी, जगदीश चव्हाण, प्रकाशयोजना किरण लद्दे, संगीत संयोजन अनिकेत मोहिते व रंगभूषा व वेशभूषा शीतल चव्हाण व कस्तुरी नाईक यांची होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images