Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिवंत अनुभवाचे ‘फूटपाथ’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित ५५ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळे प्रस्तूत 'फूटपाथ' हे नाटक सादर करण्यात आले.

महात्मा गांधी मार्गावरील फूटपाथवर बबन, सावित्री हे जोडपे शरद, दारुड्या, तुक्या व शिरपा हे एकत्रित रहात असतात. दिवसभर भीक मागून खाणे, रात्री फूटपाथवर झोपणे असा दिनक्रम सुरू असतानाच फूटपाथवर अतिक्रमण केले म्हणून काही अधिकारी यांना तेथून निघून जाण्याची नोटीस देतात. त्यातच सुमी नावाची एक मुलगी त्यांच्याकडे येऊन रहाते. गुंडापासून बबन व शरद तिची सोडवणूक करतात. हे फूटपाथच घर असलेल्या बबन-सावित्रीला मोठा प्रश्न पडतो की आता जायचे कुठे? दुसऱ्या अनेक जागांचा शोध ते घेतात मात्र कोठेही जागा मिळत नाही. हवालदार मात्र फूटपाथवर रहायचे असेल तर रोजच दहा रुपये मागतो. हे पैसे आणावे कोठून असे शरद, शिरपा यांना वाटते. हवालदाराच्या माराला कंटाळलेल्या या माणसांकडे एक मोठा नेता येतो व मला मते द्या, मी तुम्हाला रहायला चांगली घरे देतो असे आमिष दाखवतो. मात्र, त्याचा फक्त बोलाचाच भात व बोलाचीच कढी असे त्याला हे सर्व भुलतात. अशा आशयाचे फूटपाथ हे नाटक होते. नाटकाचे लेखन प्रा. अरविंद चौधरी यांनी केले. दिग्दर्शन सुजय भालेराव यांनी केले. निर्मिती विजय मंगळे यांची होती. या नाटकात कार्टीन खैरनार, शीतल थोरात, निकिता पवार, कुणाल खैरनार, राहुल मंगळे, संजय विसपुते, प्रसेनजित जगदेव, विशाल महाले, सिध्दांत मंगळे व अब्दुल अन्सारी, रोहित लोहार, पूजा कासार, राजेश बिऱ्हाडे, हर्षल सोनवणे, ऋचिका पांडे, शिवांजली सापे, सौरभ कासार, चैतन्य मोरे, सनी चव्हाण, अक्षय मालुसरे यांनी भूमिका केल्या. नेपथ्य राहुल मंगळे, प्रकाशयोजना हेमंत कोतवाल, संगीत जयवंत पाटील, रंगभूषा सुजय भालेराव, वेशभूषा सीमा महाजन व रंगमंच सहाय्य हर्षल सोनवणे आणि सनी चव्हाण यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुन्या नाशिकचा बदलणार चेहरा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अंतर्गत रेट्रोफिटींगमध्ये महापालिका जुन्या नाशिकची पुर्नबांधणी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या गावठाण भागाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी शुक्रवारी रेट्रोफिटींग अंतर्गत करावयाच्या रिडेव्हलपिंगचे सादरीकरण लोकप्रतिनिधींसमोर केले.

जुन्या नाशिकमधील नदीच्या दोन्ही बाजूकडील सातशे एकरचा परिसर पर्यटन व सांस्कृतिकदृष्ट्या विकसीत केला जाणार असून, त्यासाठी दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दुसरीकडे एवढ्या अवाढव्य प्रस्तावावर लोकप्रतिनिधीच सांशक झाले असून, त्यांनी आयुक्तांवर प्रश्नांचा भडीमार केला. वाढीव एफएसआय व पूररेषेतून हे शक्य असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या चार पर्यायांपैकी रेट्रोफिटींग हा एक पर्याय असून, यात शहरातील एका भागाची पुर्नबांधणी करण्याचा प्रस्ताव आहे. क्रिसीलने यासाठी जुन्या नाशिकची निवड केली असून, या भागाच्या करावयाच्या विकासाचे सादरीकरण महापौर, उपमहापौर, गटनेते व नगरसेवकांसमोर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

नदीकाठावरील सातशे एकरचा परिसर निवडून त्यात रिडेव्हलपिंग केले जाणार आहे. त्यासाठी वाढीव एफएसआयच्या प्रस्तावासह, हेरिटेज इमारतींचा पर्यटनासाठी विकास, नदीकाठावरील भागाचे राष्ट्रीय नदी पुर्नरुथ्थान योजनेअंतर्गत विकास करणे, नदी बाजूला सायकलिंग ट्रॅक, पादचारी मार्ग, मनपा इमारतीत म्युझियम, आनंदवल्ली ते टाळकुटेश्वर परिसरातील नदीकाठाचा पुर्नविकास करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आले. या भागातील नागरिकांना जादा एफएसआय देवून पुर्नविकास शक्य असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. त्यासाठी करवाढ करणेही आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आयुक्तांच्या सादरीकरणानंतर नगरसेवकांनी अरुंद रस्ते, इमारतीची उंची, वाड्यांचा वाद, भाडेकरूंचा प्रश्न, निधी कुठून आणणार अशा प्रश्नांची सरबत्ती लावली. क्लस्टरअंतर्गत हा विकास होवू शकतो असा दावा आमदार देवयानी फरांदे यांनी केला. तर वाढीव एफएसआयचा वापर या भागात करता येणे शक्य नसल्याचे उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनी सांगितले. पूररेषेत बांधकामे कसे होणार, असा सवालही लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर सर्व काही शक्य असल्याचा दावा आयुक्तांनी केला.

करवाढ नको

स्मार्ट सिटी हवी असेल तर सध्याच्या मालमत्ता करासह, पाणीपट्टी करात वाढ करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगून वास्तवतेचा विचार करावा असे आवाहन केले. पंरतु, पुढे निवडणुका असल्याने वाढ करण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्याऐवजी सध्याच्या कररचनेतील त्रुटी दूर करून करवाढ करावी अशा सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला संविधान दिन साजरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

संविधान गौरव दिनानिमित्त नाशिकरोड परिसरातील शाळा, कॉलेजेस, शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमापूजन झाले. संघटनांतर्फे रॅली काढून संविधानाचे वाचन करण्यात आले.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अप्पर आयुक्त आर. जी. कुलकर्णी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकात्मतेची प्रतिज्ञा दिली. उपायुक्त अनंत दहिफळे, सतिश

देशमुख, रावसाहेब बागडे, विकास शाखेचे नेमाने, तहसिलदार एस. डी. मोहिते, श्रीमती घाटगे, जी. के. पोटे, डी. एम. कासार, एस. एल. माळवे, ए. एम. चुंबळे आदी उपस्थित होते.

प्रेसमध्ये कार्यक्रम

प्रेसमध्ये एससी एसटी असोसिएशनतर्फे संविधान गौरव दिन साजरा झाला. सीएनपीचे महाप्रबंधक संदीप जैन, आयएसपीचे उपमहाप्रबंधक मुजुमूदार, सुनील दुपारे, अशोक अरोरा, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, संदीप विश्वास, नितीन चौधरी, देवीदास गोडसे, गोकुळ काळे, रामभाऊ जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. विजय जाधव यांनी प्रास्तविक केले. संस्थेचे सरचिटणीस प्रकाश पगारे, दिलीप बर्वे, विजय मोगरे आदींनी संयोजन केले.

मजदूर संघ कार्यालय

प्रेसच्या मजदूर संघ कार्यालयात संविधानदिन उत्साहात झाला. स्टाफ युनियनचे सरचिटणीस संदीप बिश्वास यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर, माधवराव लहांगे, सुनिल आहिरे, नंदू पाळदे, उत्तमराव रकिबे, जयराम कोठुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उल्हास भालेराव, रमेश खुळे, इरफान शेख, दिनकर खर्जुल आदींनी संयोजन केले.

बिटको कॉलेज

बिटको कॉलेजमध्ये संविधानदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, मराठी विभागप्रमुख डा. इंदिरा आठवले, उपप्राचार्या डा. अंजली गौतम, प्रा. राजेंद्र कुलकर्णी, प्रा. जयंत भाभे, जनरल सेक्रेटरी रोहन जाधव व्यासपीठावर होते.

रिपब्लिकनचे पुतळा पूजन

रिपब्लिकन पार्टीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, युवा जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, नगरसेवक सुनील वाघ, समीर शेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे नाशिकरोडला संविधान गौरव रॅली काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा डेपो बिल्डरच्या घशात?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मखमलाबाद येथील कचरा डेपोच्या ४१ हेक्टर जागा वाचवण्यासाठी प्रशासनाने धावपळ सुरू केली असतांना स्थायी समितीच्या सदस्यांनी विकासकामांना निधी मिळत नसल्याने कारण पुढे करत भूसंपादनाच्या आर्थिक मोबदल्याला खो लावला आहे. सदस्यांच्या दबावानंतर ३९ कोटी रुपये भरण्याचा प्रस्ताव स्थायीने फेटाळला आहे. त्यामुळे या जागेवरील आरक्षण आता व्यपगत होण्याची शक्यता असून त्याचा थेट फायदा शहरातील एका बड्या बिल्डराला होणार आहे. दरम्यान स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी या जागेवरील आरक्षण कायम रहावे म्हणून तिचा पर्पज बदलण्याच्या सूचना केल्या आहेत.

स्थायी समितीवर शुक्रवारी मखमलाबाद येथील कचरा डेपोसाठी आरक्षित असलेल्या सर्व्हे क्रमांक ३२५ मधील ४१ हेक्टर जागेच्या भूसंपादनासाठी ३८ कोटी ८५ रुपयांचा आर्थिक मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरण्याचा प्रस्ताव ठेवला होता. न्यायालयाने या जागेवरील एका जागा मालकाला जागा परत करण्याचा निर्णय दिल्याने प्रशासनाने जागा जावू नये स्थायीवर हा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, सदस्यांनी विकासकामे होत नसल्याने एवढा निधी देण्यास विरोध केला. रंजना भानसी यांनी प्रभागाचे काम होत नसल्याने आक्रमक होत 'पहिले नगरसेवकांची कामे करा', असे सुनावले. तसेच 'कोणत्या हेडखाली निधी देणार?' असा प्रश्न उपस्थित केला. इतर सदस्यांनाही तीच री पकडल्याने सभापतींनी हा विषय अखेर फेटाळण्याचा निर्णय घेतला.

जागा भूसंपादनाचा आर्थिक मोबदल्याचा प्रस्ताव फेटाळल्याने संबंधित शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावून ही जमीन आरक्षणातून मुक्त करण्याचा धोका आहे. ही जमीन आरक्षणातून मुक्त झाल्यास महापालिकेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शहरातील एका बड्या बिल्डराने ही जमीन विकत घेतली असून आरक्षण रद्द झाल्यास शेतकऱ्यांचे नव्हे तर बिल्डराचेच भले होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही सदस्यांनी सभापतींनी परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर आरक्षण रद्द होवू देणार नसल्याचे सांगितले. संबंधित जागेवरील आरक्षणाचे पर्पज बदलून ती कायम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिनला मंजुरी

गोदावरी नदीतील पानवेली, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा साफ करण्यासाठी तीन महिन्यांसाठी फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिन भाडेतत्त्वावर घेण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थ निधीतील ही रक्कम असल्याने, ती व्यापगत होण्याची शक्यता असल्याने प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी आरोग्य अधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे सभापतींनी ९९ लाखाचा हा विषय मंजूर केला असून पानवेली वाढतील तेव्हाच गोदावरी स्वच्छतेचे काम या मशीनद्वारे होईल, असे आश्वासन आरोग्याधिकाऱ्यांनी दिले आहे. या कामासाठी दिवसाला एक लाख १० हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे ठेकेदाराला ९९ लाख रुपये भाडे देण्याचा प्रस्ताव आहे. सिंहस्थात याच मशीनद्वारे स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे त्याचा मोबदला आहे का असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

पेठरोडवरील आदिवासी विकास विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात सुनंदा चिरू भोये (वय २१) या विद्यार्थिनीने शुक्रवारी आत्महत्या केल्याचे समोर आले. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुनंदाने वसतिगृहाच्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सुनंदाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थिनी वसतिगृहात खळबळ उडाली आहे. सुनंदाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

जुगार अड्डा उद्‍ध्वस्त

अंबड पोलिस स्टेशन हद्दीतील शांतीनगर येथील पंपिंग स्टेशनजवळ सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उद्‍ध्वस्त केला. पोलिसांनी दुपारच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकून मुख्य संशयित अनिल कांबळे याच्यासह कमलेश कांबळे, संदीप पवार, अनिल कांबळे, किशोर शिंदे, इम्तियाज अन्सारी यांना अटक केली. सर्व संशयित गरवारे परिसरातील झोपडपट्टीत राहतात. पोलिसांनी या संशयितांकडून सहा मोबाइल, २४ हजार ८४० रुपयांची रोकड, सहा दुचाकी असा २ लाख ८३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या भागातील जुगार अड्ड्यांवर छापे मारण्याचे काम सुरू असून, पंचवटीत ही कारवाई केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चेकद्वारे फसवणूक

कंपनीच्या नावे दिलेल्या चेकमध्ये स्वतःचे नाव टाकून ९९ हजार ८८० रुपयांची फसवणूक करणाऱ्या योगेश धनराज बच्छाव या संशयिताविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई येथे राहणाऱ्या सलिल शशीधर मेन्नुर यांनी अनमोल पॅकेजर्स प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावे चेक दिला होता. सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर येथे राहणाऱ्या योगेश बच्छावने मात्र, या चेकमध्ये आपले नाव टाकून खात्यातील पैसे काढून

घेतले. हा प्रकार १९ सप्टेंबर २०१५ रोजी कॅनडा कॉर्नर येथील ओरिएंटल बँकेत घडला. सरकारवाडा पोलिसांनी बच्छावविरोधात कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पीएसआय पवार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अन्यथा मीच टाकेल प्रभाग सभेवर बहिष्कार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक महापालिकेच्या सातपूर प्रभागाची तब्बल तीन महिन्यांनी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वच नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांवर तक्रारींचा पाऊस पाडला. नगरसेवकांची कामे न केल्यास प्रभाग सभेवरच बहिष्कार टाकण्याचा इशारा देत सातपूर प्रभाग समिती अध्यक्षा उषा शेळके यांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या कुठल्याच विभागातील अधिकारी नागरी समस्या सोडवत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. पाण्याची बिले वेळेवर दिली जात नसल्याचा आरोपही यावेळी नगरसेवकांनी केला. सभेत फक्त दोन विषय मंजुरीवरून देण्यात आली. नगरसेवक दिनकर पाटील यांनी सर्वच विभागातील अधिकारी कामे करत नसून केवळ सह्याजीराव म्हणून महापालिकेत येत असल्याचे म्हणाले. तसेच नागरी समस्या महापालिका अधिकाऱ्यांना सांगितल्यावर त्याकडे टाळाटाळ करत असल्याचा आरोप नगरसेवक पाटील यांनी केला. नगरसेवक मते यांनी पाणी मिटरचे कनेक्शन देण्यासाठी रहिवाशांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याचे सांगितले. तर घंटागाडी ठेकेदाराला आरोग्य विभाग पाठिशी घालत असल्याने घंडागाडी अनियमित प्रभाग येत असल्याचा आरोपही नगरसेवक मते यांनी केला. सातपूरमध्ये महापालिकेचे अधिकारी मनमानी कारभार करत असून नागरी समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप नगरसेविका नंदिनी जाधव यांनी केला. नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी देखील कामचुकार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई का करू नये, असा सवाल उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायनान्स कंपनी लुटणारे दोघे कर्मचारी ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने मित्राच्या सोबतीने कंपनीतील १२ लाख ६६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले असून, चोरीच्या पैशांमधून संशयितांनी विकत घेतलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये सचिन लक्ष्मण टेकाळे (वय २२) आणि अतुल बापुराव निकम (वय २१) या दोघांचा समावेश आहे. यातील टेकाळे हा रथचक्र, इंदिरानगर येथील तर निकम हा फ्लोरा टाऊन अंबड येथील रहिवाशी आहे. मुंबई-आग्रा हायवेवरील सिडकोतील राणेनगर येथे इक्विटॉस मायको फायनान्स कंपनी असून, यातच हे दोघे कामाला होते. फायनान्स कंपनीची आर्थिक उलाढाल होत असल्याने राणेनगर येथील शाखेतील तिजोरीत नेहमीच पैसे ठेवले जातात. दि. ९ ते १० नोव्हेंबर या कालावधीत देखील कंपनीच्या तिजोरीत १२ लाख ६६ हजार रुपये ठेवण्यात आले होते. सर्व कर्मचारी संध्याकाळच्या सुमारास घरी परतल्यानंतर दोघा संशयितांनी कंपनीची तिजोरीतील पैसे लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी या घटनेची वाच्यता झाली. या चोरीबाबत कंपनीच्या व्यवस्थापनातील अधिकारी सोनल साखळे यांनी कर्मचाऱ्यांकडे अनेकदा विचारपूस केली. मात्र, याबाबत कोणत्याही कर्मचाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. दरम्यानच्या काळात टेकळे आणि निकम यांनी दोन चारचाकी वाहने खरेदी केली. यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावला. सोनल साखळे यांनी लागलीच दोन्ही संशयिताविरोधात अंबड पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसानी अधिक चौकशी केली असता चोरीची घटना उघडकीस आली. संशयितांनी खरेदी केलेली वाहने, स्मार्टफोन व इतर रक्कम जप्त करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

0
0

म टा. प्रतिनिधी, ना​शिक

पोलिस आयुक्तालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना काढून दुसऱ्या कर्मचाऱ्यांना घेण्याच्या हालचाली सुरू असून, यामुळे कार्यरत असलेल्यांवर अन्याय होणार असल्याचा दावा, या सफाई कर्मचाऱ्यांनी केला. याबाबत सफाई कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

पोलिस आयुक्तालयात सहा कर्मचारी असून यात सुनील खोकरे, सुमनबाई जाधव, मंदाबाई वाघमारे, शोभा खरे, जयश्री पाठक, कलाबाई शेंडगे यांचा समावेश आहे. हे कर्मचारी पोलिस आयुक्त बंगला, पोलिस आयुक्त कार्यालय, उपायुक्त बंगला आदी ठिकाणी कार्यरत आहेत. साधारणतः १९९० ते १९९७ या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले. अवघे बाराशे रुपये वेतन देण्यात येत असल्याची तक्रार संबंधित कर्मचाऱ्यांनी केली​ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंतर्गत रस्त्यांसाठी २५० कोटींचा निधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाप‌ालिका ‌निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या असतांना प्रभागांमध्ये कामे होत नसल्याची सत्ताधाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच हा प्रस्ताव दिला असून त्यास आयुक्तांकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने त्यासाठी लवकरच विशेष महासभा घेतली जाणार आहे. मात्र, हा गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. तर सभापती शिवाजी चुंभळे यांनी सर्व नगरसेवकांना निधी मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या

आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत रस्त्याच्या विषयांवरून सदस्यांनी आक्रमक होत 'निवडणूका डोक्यावर आल्या आहेत, तरीही रस्त्यांची कामे होत नाहीत,' अशी तक्रार केली. स्थायीत दोन कोटी ४० लाखाच्या डांबरीकरणाचे प्रस्ताव ठेवले होते. त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला. मात्र, ही कामे नगरसेवक निधीचेच असल्याचे अधीक्षक अभियंता सुनील खुने यांनी सांगितले. सोबतच सदस्यांच्या निधीव्यतिरिक्त शहरातील अंतर्गत कॉलनी रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे खुने यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आयुक्त व महापौरांची बैठक झाली असून त्यात शहरातील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्याचे आदेश ठाकरेंनी दिले आहेत. शहरातील सर्व कामांसाठी जवळपास ५०० कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २५० कोटीची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे खुने यांनी सांगितले. या निधीतून शहरातील रस्त्यांचे सर्व्हेक्षण करून रस्ते कामे घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी विशेष महासभा घेतली जाणार असून त्यात हा विषय मार्गी लागणार असल्याचे खुने यांनी सांगितले. त्यामुळे नगरसेवकांचे कामे होतील असा दावा त्यांनी केला आहे.

गाजर दाखवू नका

सध्या नगरसेवकांची २ लाखांची सुद्धा कामे मंजूर होत नाही. त्यामुळे खुने यांनीही थेट २५० कोटी मिळणार असल्याने सदस्यामध्येही हास्याचे फवारे पसरलेत. सदस्यांना शांत करण्यासाठी हे गाजर दाखवले जात असल्याचा आरोप रंजना भानसी यांनी केला. मात्र, ही कामे खरंच होणार असल्याचा दावा खुने यांनी केल्यानंतर सदस्य शांत झाले.

सर्व्हेक्षण करून मिळणार निधी

विशेष महासभा घेवून निधीला मंजूरी घेतल्यानंतर शहरातील रस्त्यांचा सर्व्हेक्षण केले जाणार आहे. ज्या ठिकाणी ७० टक्केच्या वर लोकसंख्या असेल तिथली खडीकरण व डांबरीकरणाची कामे घेतली जाणार असल्याचे खुने यांनी सांगितले. विशेषत: कॉलनी अंतर्गत असलेल्या रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार असून सर्वच सदस्यांच्या प्रभागातील कामे घेतले जातील असे त्यांनी सांगितले.

वृक्षारोपणास मंजुरी

महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी साडेचार कोटींचे वृक्षरोपण केले जाणार आहे. या प्रस्तावाला पाहणी करून मंजुरी देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. सुमारे २२ हजार रोपांची शहरातील विविध भागात लागवड केली जाणार आहे.

पैसा कुठून येणार?

शहरात २५० कोटीची खडीकरण व डांबरीकरणाची कामे घेतली जाणार असले तरी यासाठी निधी कुठून येणार असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. महापालिकेन अगोदरच सिंहस्थासाठी कर्ज काढले आहे. तर महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. त्यामुळे पुन्हा कर्जरोखे काढावे लागणार आहे. त्यामुळे निधीचा प्रश्न कायमच राहणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक नियमांसाठी पोलिसांची कसरत

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

वाहतूक नियमांचे वाहनचालकांकडून पालन व्हावे, यासाठी वाहतूक पोलिसांकडून कसरत सुरू आहे. झेब्रा क्रॉसिंग, मद्यपी वाहनचालक, लेन कटिंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासह जनजागृती करण्याचे काम काही दिवसांपासून वाहतूक विभागाने हाती घेतले आहे.

या मोहिमेमध्ये सिग्नल तोडणे, रेती, दगड, वाळू इत्यादी वाहतूक करणे, सिटबेल्ट न लावता वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, नियमापेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक, धोकादायक स्थितीत वाहने उभी करणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे न करणे आदी कारवाईवर भर देण्यात आला असून, वाहनचालकांच्या प्रबोधनाला महत्त्व देण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वाहनचालकांवर सातत्याने कारवाई होत असून, वानचालकांनी देखील त्यास प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे मत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. गर्दीच्या परिसरात मोठी वाहने नेणे, बाजारपेठांमध्ये वैयक्तिक खरेदीसाठी चारचाकी वाहनाचा वापर टाळणे, झेब्रा क्रॉसिंगचा नियम पाळणे आदी बाबींकडे वाहनचालकांनी लक्ष दिल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांनी व्‍यक्त केली. दरम्यान, रात्रीच्या सुमारास मद्य प्राशन करून वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण परिषद रविवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोल्हापूर आणि नांदेड येथे झालेल्या मराठा आरक्षण परिषदेनंतर आता नाशिकमध्ये परिषद घेतली जाणार आहे. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि. २९) दुपारी १२ वाजता परिषद होणार आहे. यावेळी स्वाभिमान संघटनेचे नेते आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मराठा समाजाला सन २०१४ साली १६ टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले होते. परंतु, राज्य सरकारकडून अद्यापही आरक्षणाविषयी सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याने राज्यभर मराठा आरक्षण परिषदा घेतल्या जात आहेत. या परिषदेसाठी नाशिकमधील सुमारे ३० मराठा संघटना एकत्र आल्या आहेत. राज्यभरातून सुमारे पाच हजार कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेब पोर्टलद्वारे मालाची खेरदी-विक्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल साकारण्यात आले आहेत. या प्रदर्शनातील पोर्टल मंडी ही वेबसाइट शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून, या माध्यमातून शेतकरी आपला माल तसेच कृषी उत्पादनांची विक्री कुठल्याही मध्यस्थाशिवाय थेट करू शकत असल्याने या स्टॉलवर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.

पोर्टल 'मंडी ५' ही शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेली एक खास वेबसाइट आहे. या वेबसाइटवरून शेतकरी शेतमाल तसेच कृषीविषयक उत्पादनांची खरेदी-विक्री कुठल्याही मध्यस्थाशिवाय करू शकतो. थोडक्यात 'मंडी ५' हे शेतकरी आणि व्यावसायिक यांच्यातील एक थेट माध्यम तयार झाले आहे. शेतकरी आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून प्रयत्न करीत असतो. तर, शेतमाल विकत घेणारे व्यापारी त्यांच्या गरजेनुसार शेतमाल शोधत असतात. 'मंडी ५' यामुळे या दोघांचा अनावश्यक खर्च आणि वेळ वाचून त्यांना घरबसल्या उत्तम व्यवहार या माध्यमातून करता येणार आहे. या व्यवहारासाठी 'मंडी ५' ला कुठलेही कमिशन द्यावे लागणार नाही. शेती विषयक दोन गरजवंत एकत्र यावेत आणि त्यांच्यात सुसंवाद होऊन व्यवहार व्हावा इतकीच 'मंडी ५' ची भूमीका आहे. या वेबसाइटवर टाकलेली जाहिरात सर्वत्र दिसत असल्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या माध्यमातून विचारांचे आदान-प्रदान झाल्याने अनेक समस्यांवर मात करता येऊन प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासही मदत ठरणार आहे. या माध्यमातून कृषी संबंधित सर्व साधन सामग्रीची खरेदी-विक्री सहज करता येणे शक्य होणार आहे. या वेबसाइटद्वारे सर्व प्रकारच्या भाज्या, कांदे बटाटे, फळे, कडधान्य, धान्य, कापूस, ऊस, सर्व प्रकारचे मसाले, बी बियाणे, फुले, सुकामेवा, शेतीविषयक यंत्रे, उपकरणे, शेतीसंबंधी सर्व साहित्य खरेदी-विक्री करता येणार आहे. अशा अनेक प्रकारचे स्टॉल कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना माहिती देत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकाच्या कृषी विषयक सोयी सवलती देखील यात मांडण्यात आल्या आहेत. कृषी प्रदर्शनाला जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी भेट देत आहेत.

'मंडी ५' ठरणार वरदान

या वेबसाइटद्वारे माहिती प्राप्त केल्यानंतर ट्रेडर्स थेट संपर्क साधून आपल्या गरजेनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही कुठलाही शेतमाल उत्पादन विकत घेऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना या वेबसाइटवर आपल्या उत्पादनाची जाहिरात करायची आहे, अशांना अवघ्या ९९ रुपयात जाहिरात करण्याची सोय देखील यात उपलब्ध करून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्जुन टिळे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती

0
0



नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश चिटणीसपदी माजी शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली असून नियुक्तीचे पत्रही त्यांना देण्यात आले आहे. पक्षाच्या शहराध्यक्षपदी काम करतांना पक्षाची ध्येयधोरणे राबविली, पक्ष मजबुतीकरणावर लक्ष केंद्र‌ीत केले. समाजातील उपेषित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दाखल घेत प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती केली. पक्षाच्या विस्तारासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीला हवी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रतिकूल वातावरणातही आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर नफ्यातील शेती केली जाऊ शकते, याचा आदर्श इस्त्राइलने घालून दिला आहे. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांनी देखील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन प्रगतशील युवा शेतकरी बाळासाहेब दराडे यांनी केले.

ह्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या विद्यमाने आयोजित कृषीथॉन - २०१५ या कृषी प्रदर्शनात सुमारे ३५० प्रयोगशील युवा व महिला शेतकऱ्यांचा सत्कार दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन तर, नितीन डांगे, कृषीथॉनचे संयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, अश्विनी न्याहारकर आदी उपस्थित होते.

दराडे पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षात आपल्याकडे नापीक जमीन, अवकाळी पाऊस, दुष्काळ परिस्थिती सारख्या कारणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. याउलट इस्त्राइलसारख्या देशात शेतीसाठी प्रतिकूल वातावरण असतानाही तेथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाची बाजारपेठ काबीज करीत आहेत. भारतामध्ये मुबलक पाणी, पिकांसाठी पोषक हवामान असताना देखील त्यांचे योग्य नियोजन करण्यात आपण कमी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान, व्यवस्थापन यांची सांगड घालून नफ्यातील शेती करणे आवश्यक असल्याचे दराडे यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन म्हणाले, गेल्या काही वर्षात शेतीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. मात्र, शेती हा एकमेव व्यवसाय देशाला समृध्दीकडे घेऊन जाणारा आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याला शेतीचीच वाट धरावी लागणार आहे. याचा विचार करून तरुणांनी शेती व्यवसायाकडे आले पाहिजे. यावेळी प्रतिकूल परिस्थितीतही यशस्विरित्या शेती करणाऱ्या राज्यातील सुमारे ३५० प्रयोगशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये ४५ महिला शेतकऱ्यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर अपघात टळला

0
0



सातपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी नाक्याजवळ गॅस टँकरला एका गाडीने अचानक कट मारला. चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात टँकर नेला. मात्र, वेग कमी केल्यामुळे संभाव्य अपघात टळला. यानंतर क्रेनच्या सहाय्याने गॅस टँकरला खड्ड्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वनजमीन हस्तांतरणासाठी सॅटेलाइटची घेणार मदत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षानुवर्षे रेंगाळलेले वनजमिनींचे हक्क आदिवासींना हस्तांतरीत करण्यासाठी जिल्हा प्रशासन २००५ मध्ये सॅटेलाइटद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा आधार घेणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

वनजमिनींच्या प्रश्नांवर आदिवासी बांधव आणि विविध संघटनांनी आवाज उठविल्याने २००५-०६ मध्ये वनहक्क कायदा आणण्यात आला. त्यानुसार 'कसेल त्याची जमीन' हे धोरण अवलंबिण्यात आले. मात्र, ही जमीन आपणच कसत होतो याचा कोणताही पुरावा अनेक आदिवासी बांधवांजवळ नसल्याने या जमिनींवर त्यांचा हक्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. परिणामी अजूनही वन विभागाकडेच जमिनींची मालकी असल्याने आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. वन विभागाने कधीकाळी त्यांच्याकडून आकारलेल्या दंडाच्या पावत्या हा देखील ग्राह्य पुरावा मानला जाणार असला तरी असाही पुरावा अनेकांकडे नाही. त्यामुळे या जमिनींचे कोणत्या निकषाच्या आधारे वाटप करायचे असा पेच जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. आदिवासींची आर्थिक विवंचना टाळण्यासाठी लवकरात लवकर या जमिनी देण्यात याव्यात, आदिवासींना त्या जागांवरून हटविण्याचा प्रयत्न करू नये आणि वन विभागाने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये अशा मागण्या वारंवार करण्यात आल्या आहेत. मात्र हा प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही. हा प्रश्न निकाली लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बैठक बोलावली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर बैठकीला उपस्थित होते.

जमिनींचे न्याय्य वाटप करताना २००५ मध्ये सॅटेलाईटद्वारे काढण्यात आलेल्या छायाचित्रांचा आधार घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. एकाच जमिनींवर अनेकांनी हक्क सांगितल्यामुळे तसेच काहींनी जास्त क्षेत्रावर दावा केल्याने अनेक प्रकरणे रेंगाळली आहेत. या चित्रांमुळे तत्कालीन परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती प्रशासनाला प्राप्त होऊ शकणार आहे. त्याचा आधार घेऊन जमिनी कसण्यासाठी देता येतील का, याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती खेडकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्ये संविधान दिन साजरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सी. डी. ओ. मेरी शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यादव आगळे होते.

यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापिका आशा डावरे, पर्यवेक्षक कृष्णा राऊत उपस्थित होते.

यावेळी सहावी ई मधील सर्व मुलांनी वर्गशिक्षिका भरती हिंडे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सादर झाला. यावेळी विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलेंचा वारसा चालविण्याचे कार्य अभिमानास्पद

0
0

आमदार देवयानी फरांदे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे शिक्षणाच्या वाटा खुल्या झाल्या. त्यांच्या कार्याचा वारसा चालविण्याचे कार्य महात्मा फुले समाज शिक्षण संस्था करीत आहे, हे उल्लेखनीय आहे', असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

महात्मा फुले समाज शिक्षण

संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेचे उद् घाटन आमदार फरांदे यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सहकार महर्षी गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूल असे या शाळेचे नामकरण यावेळी करण्यात आले.

फरांदे म्हणाल्या, 'सामाजिक देणग्यांवर शाळा चालविण्याचे कार्य अवघड आहे. संस्थेचे अध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी संस्थेला २१ लाख रुपयांची देणगी देऊन आदर्श घालून दिला. त्यांचा आदर्श समाजातील इतरांनीही घ्यायला हवा. तरच समाजात चांगल्या संख्या निर्माण होती.', असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर समाजासाठी झटणाऱ्या संस्थांना समाजाने पाठिंबा द्यायला हवा. यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत फरांदे यांनी व्यक्त केले. तर महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेला आमदार निधीतून मदत करू असेही आमदार फरांदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीचे संपादक शैलेन्द्र तनपुरे उपस्थित होते.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशा आशयाचे निवेदनही संस्थेतर्फे आमदार देवयानी फरांदे यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मधुकर बच्छाव व निवृत्ती कमोदकर यांनी केले. आभार प्रा. नामदेव पाटील यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर, कार्याध्यक्ष भाऊराव बच्छाव, मुख्याध्यापक सुनील शेवाळी, मोहन माळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्लक्षामुळे उद्याने अडचणीत

0
0

पंचवटीतील साईनगर, शिवकृपा नगर आणि कलानगरच्या विविध भागात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून परिसरातील रहिवाशी नागरिकांसाठी उद्याने साकारली आहेत; परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानांच्या देखभालीकडे लक्ष न दिल्याने उद्यानांची अवस्था बिकट झाली आहे. साईनगर हे पंचवटीतील अमृतधाम परिसरातील सर्वात जुने व मोठे नगर आहे. परिसरातील महिला, ज्येष्ठ व लहान मुलांना खेळायला उद्यान हेच एकमेव ठिकाण आहे. अनेक ज्येष्ठ फेरफटका मारण्यासाठी उद्यानात येतात. मात्र उद्यानात गवत वाढल्याने तसेच बैठकीच्या जागांवर अस्वच्छता असल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसते. उद्यानांमध्ये जंगली गवताचे साम्राज्य असून, त्यामुळे साप आणि इतर प्राणी कायमच उद्यानात वावरताना दिसतात. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना जीवमुठीत घेऊन यावे लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. उद्यानातील पेव्हिंग ब्लॉक निघाले आहेत.
शिवकृपा नगरातील खेळण्यांची मोडतोड झाली आहे. झोके आहेत पण त्याचे फक्त खांब उभे आहेत आणि घसरगुंडी आहे तर ती ठिकठिकाणी तुटली आहे. उद्यानातील हिरवळ दुर्लक्षामुळे खराब झाली असून रानटी गवत वाढले आहे. पाण्याचा हातपंप खराब झाला आहे. उद्यानातच स्वामी समर्थाचे मंदिर आहे पण त्याचीही नीट काळजी घेणे गरजेचे आहे. कलानगर येथेही त‌ीच परिस्थिती आहे आणि अभिजित नगर येथीलही परिस्थिती दयनीय आहे. महापालिकेने या उद्यानांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुमाकूळ घालणारे चेन स्नॅचर्स गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात मशगुल असलेल्या शहर पोलिसांसमोर चेन स्नॅचर्सच्या टोळीने शनिवारी आव्हान उभे केले. सुदैवाने पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या सतर्कतेमुळे शहरातील सर्वच पोलिस रस्त्यावर उतरले आणि अगदी सिनेस्टाईल पध्दतीने दोघा चोरट्यांना जेरबंद करण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेला हा प्रकार दुपारी दोन वाजेच्या सुमारास संपुष्टात आला.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत व इतर शहरांच्या मानाने शहरातील चेन स्नॅचिंगच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसला आहे. मात्र, अधूनमधून भामटे हात साफ करीतच असतात. शनिवारीही असेच काही करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी आपला खाक्या दाखवला. इराणी म्हणून प्रसिध्द असलेले हे भामटे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील स्थायीक आहेत. सराईत म्हणून कुप्रसिध्द असलेल्या चौघा जणांच्या टोळीने शनिवारी सकाळी एकापाठोपाठ एक चेन स्नॅचिंग करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील एका स्कूलजवळून चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून पोबारा केला. जेम्स आडनाव असलेल्या या महिलेसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती वायरलेसवरून इतर ठिकाणी कळवण्यात आली. सरकारवाडा पोलिस या प्रकरणाची माहिती घेत असतानाच पंचवटी व पाठोपाठ उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत स्नॅचिंगच्या घटना घडल्या. याचीही माहिती वायरलेसवर देण्यात आली. या घटनांबाबत सातत्याने माहिती घेणाऱ्या पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांचा धीर तिसऱ्या घटनेनंतर सुटला. त्यांनी लागलीच वायरलेसद्वारे सर्व पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कडक शब्दात समज दिली. शहरातील पोलिस कुठे आहेत, बीट मार्शल काय करतात? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांनी सर्वच पोलिस अधिकारी व बीट मार्शलला रस्त्यांवर येण्याचे आदेश सोडले. यानंतर सर्वत्र नाकाबंदीस सुरुवात झाली. याच दरम्यान, अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर व सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे वेगवेगळ्या दोन पथकांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेत होते. यातील बर्डेकरांचे पथक ज्या दोघांच्या मागावर होते, त्यांच्याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांचा संशय बळावला. उंटवाडी जवळील कालिका पार्क येथे अगदी सिनेस्टाईल पध्दतीने पोलिसांनी त्यांच्या दुचाकीला वाहन आडवे घालून पाडले. यानंतर त्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. रियाज फय्याज इराणी (वय ३२) आणि मुस्लिम यासीन खान इाराणी (वय २६) अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चेन आणि एक अंगठी असा मुद्देमाल जप्त केला.

परजिल्ह्यातील हे गुन्हेगार सापडणे दुरापास्त असते. अनेकदा चोरी केल्यानंतर इराणी स्नॅचर्स दुचाकीवरच शर्ट बदलतात. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल होते. आज त्यांची कोणतीही मात्रा चालली नाही. त्यांचे दोन साथीदार फरार झाले असावेत. या दोघांच्या मदतीने त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेतला जाईल.

- दिनेश बर्डेकर,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images