Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आदिवासी बोलीभाषेचे गुरूजीही गिरवणार धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांच्या ओठांवर त्यांच्याच बोलीभाषेतून शिक्षणाची मात्रा रुजविण्याअगोदर त्यांच्या गुरूजींना या बोलीभाषेचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने बनविण्यात येणारे शैक्षणिक साहित्य आकाराला येत आहे. सद्यस्थितीत आदिवासी बोलीतील १० पु‌स्तिका तयार करण्यात आल्या आहेत.

राज्यामध्ये सुमारे १६ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण प्रभावी पध्दतीने मिळावे यासाठी परिषदेच्या माध्यमातून या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी आदिवासी बोलीभाषा अवगत असणाऱ्या जाणकारांच्या मदतीने या शैक्षणिक साहित्याच्या निर्मितीलाही सुरुवात झाली होती. या प्रयत्नांच्या परीणामी पहिल्या टप्प्यात 'खेळच खेळ' आणि 'ओढ्याकाठी' या दोन पुस्तिका आकाराला आल्या. यानंतर याच धर्तीवर १० पुस्तिका तयार झाल्या आहेत. संबंधित जिल्ह्यातील आदिवासी बोलीभाषेतील मुख्य वाक्य आणि त्यासमोर देवनागरीतील

त्याचे भाषांतर, अशा पध्दतीची या पुस्तकांची मांडणी आहे. शिवाय मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून शिकविताना अडचण जाणवू नये यासाठी आदिवासी बोलीभाषेतील शब्दकोश निर्मितीचेही काम सुरू आहे.

गळती रोखण्याचा उद्देश

आदिवासी भागांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांच्या पटसंख्या गळतीचे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत जास्त आहे. विविधांगाने या मुलांच्या शिक्षणावर भर देताना भाषिक दरी मिटवून अधिक सुलभ संवाद साधण्याचा प्रयत्न या प्रयोगातून करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची शालेय गळती रोखावी या उद्देशासाठी हा प्रयोग साकारला जातो आहे. १६ आदिवासी जिल्हे अन् १० बोलीभाषा

राज्यातील सुमारे ३६ पैकी १६ जिल्हे आदिवासी आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह चार जिल्ह्यांचा समावेश आहे. यात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातही हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. आदिवासी बोलीभाषांमध्ये वावरी, पावरी, भिलोरी, कोरकू, परधान, मावची, गोंडी, नहाली आणि कातकरी या भाषांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अरंगेत्रममध्ये प्रेक्षक झाले तल्लीन

$
0
0

रंगेत्रम' म्हणजे 'रंगप्रवेश' ही परंपरा भरतनाट्यम नृत्यशैलीचे वैशिष्टे आहे. एखाद्या धार्मिक विधीप्रमाणे ती सांभाळली जात असते. जाहीर कार्यक्रम करण्याइतकी किमान पात्रता म्हणजे पायाभूत अभ्यासक्रम झाला आहे, अशी गुरुची खात्री झाल्यानंतरच त्या शिष्याला गुरुकडून 'रंगप्रवेश' करण्याची अनुमती मिळते आणि त्यानंतरच शिष्य त्याचे कार्यक्रम सुरू करू शकतो. नाशिकच्या सुप्रसिध्द नृत्यांगणा मीरा गणपत्ये धानू यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीया व श्रृतीने ही पात्रता संपादन केली आहे. कालिदास कलामंदिरात नृत्यशारदातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवाला पुष्पार्पण करुन व आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रार्थना करीत पुष्पांजलीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तिस्रा तालातील 'अलारिप्पु', गणपतीची आराधना करणारे 'मुशिका' वाहना सादर करण्यात आले. कल्याणी रागातील व रुपकम तालाच्या संगतीने 'जातिस्वरम्' या नृत्यप्रकाराचे सादरीकरण या द्वयींनी केले. याशिवाय 'माझे माहेर पंढरी' या मराठी अभंगावर तसेच 'वारनम्', 'नटराज पदम'चे सादरीकरण करण्यात आले. श्रृती हिने 'ठुमका चलता रामा चंद्रा' या तुलसीदासांच्या भजनावर अरंगेत्रम सादर केले. मंगलम या नृत्यावर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाला शंकर नारायण (मृदंग), शक्तिधरण (मुरसिंग), मंगला वैद्यनाथन (व्हायोलिन) यांची संगीतसाथ लाभली. श्रीया व श्रृतीच्या गुरू मीरा गणपत्ये-धानू, संदीप फाटक, कविता फाटक आदी उपस्थित होते. श्रीया-श्रृतीची अदाकारी पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर सेलमधील ‘कॉर्डिनेशन’ वाढणार

$
0
0

म टा. प्रतिनिधी, ना​शिक

सायबर क्राइमचे गुन्हे हळूहळू डोके वर काढत आहे. राज्यात वर्षभरात दोन हजारापेक्षा जास्त गुन्हे घडत असून, नाशिकही त्याला अपवाद राहिलेले नाही. यापार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी काम करणाऱ्या टेक्निकल अॅनॅलिसीस विंग (टीएडब्लू) आणि सायबर सेलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासह त्यांच्या समन्यवयाचे काम एकाच अधिकाऱ्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इंटरनेटचा सर्वत्र झालेला प्रसार, सोशल नेटवर्किंगचे वाढते प्रस्थ, यामुळे सायबर गुन्हेही वाढत आहेत. त्यातच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न गुन्हेगार करतात. कोणाचे बनावट प्रोफाइल तयार करणे, अश्‍लील छायाचित्रे प्रकाशित करणे, बदनामी करणे, समाजात तेढ निर्माण करणे अशा अनेक गुन्ह्यांचा सायबर क्राइममध्ये समावेश होतो. याशिवाय, इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे गुन्हेही वारंवार घडत असतात. या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना संबंधित वेबसाइटकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहावे लागते.

बहुतांश सोशल नेटवर्किंग साइउटचे सर्व्हर देशाबाहेर आहेत. सायबर क्राइममध्ये गुन्हे करणाऱ्यांना मोकळीक आणि तपास यंत्रणेला अनेक मर्यादा अशी स्थिती, यामुळे निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर पारंपरिक पध्दतीने तपास करणाऱ्या पोलिसांच्या हातात काही पडत नाही. सायबर गुन्ह्यांचा तपास करणारी यंत्रणाही गतिमान होणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारांना शोधण्यासाठी काही वर्षापूर्वी स्थापन झालेल्या सायबर सेलने काही प्रमाणात हातभार लावला असला तरी त्यास अनेक मर्यादा आहेत. कुशल मनुष्य बळाची कमतरता, अत्याधुनिक साहित्यांचा तुटवडा आणि त्याचा वापर करण्याची मर्यादा, अशा बाबींमुळे सायबर सेलचे काम मोबईल कॉल ट्रेकींग किंवा मोबाईल चोरांना शोधण्यापुरते रा​हिले आहे. यापार्श्वभूमीवर सायबर सेल व टीएडब्लूमधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे व त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय शहर पोलिस प्रशासनाने घेतला आहे. या विभागासाठी इच्छूक असलेल्या कर्मचाऱ्यांना नुकतेच सायबर तज्ज्ञ विकास नाईक यांनी प्रशिक्षण दिले. या दोन्ही विभागावर नियंत्रण ठेवण्याचे काम पीआय राजेंद्र कुटे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. यामुळे गुन्ह्यांचा तपास जलद होण्यास मदत मिळू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीतल्या तरुणांकडून प्रबळ, कलावंतीणची चढाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा घोटी
नाशिक, औरंगाबाद याबरोबरच कोकणातही निसर्गाची वेगळी खाण आहे. या जिल्ह्यांमध्ये गड व किल्ले यांचा खजिना आहे. या भागात निसर्गाची विपुल अशी संपत्ती आहे. त्यात ऐतहासिक व खडतर किल्ल्यांचाही समावेश आहे. घोटीतील ट्रेकिंगवीरांनी दिवाळीच्या कालावधीत आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोकणातील प्रबळ व कलावंती या दोन ऐतिहासिक किल्ल्यावर ट्रेकिंगची मोहीम राबविली. या खडतर मोहिमेमुळे या ट्रेकिंगवीरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

प्रबळ व कलावंतीण हे दोन्ही किल्ले तसे खडतर. शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला व त्यांनी जिंकलेल्या किल्य्यांपैकी ते एक. अशा या ऐतिहासिक किल्ल्यावर घोटीच्या ट्रेकिंगवीराच्या साहसी चमूने या किल्याला भेट देऊन इतिहास जाणून घेतला. इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील या ट्रेकिंगवीरांनी यापूर्वी रायगड, कळसुबाई शिखर, अलंग, मदन, हर्ष, त्रिंगलवाडी, विश्रामगड़ देवगिरी आदी जवळपास डझनभर किल्ल्याची तसेच गडांची सफर यशस्वी केली आहे. या मोहिमेत भगीरथ मराडे यांच्यासह गणेश सूर्यवंशी, नीलेश पवार , प्रशांत येवलेकर, अशोक हेमके, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, प्रशांत जाधव, महेंद्र आडोळे, गजानन चव्हाण, विनायक कडु ,सुरेश डावखर मोहिमेत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषीथॉन हा वैभवशाली उपक्रम

$
0
0

महापौर अशोक मुर्तडक यांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषीथॉन - २०१५ प्रदर्शनात त्यांच्या शेतीतील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन लाभणार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करणारे पाठबळ मिळणार आहे. तसेच शेतीत जिल्ह्याला प्रयोगशील म्हणून नव्याने गती देण्यासाठी कृषीथॉन प्रदर्शन हे वैभवशाली उपक्रम ठरणार आहे, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले.

त्र्यंबकरोड येथील ठक्कर्स डोम येथे ह्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषीथॉन - २०१५ या कृषी प्रदर्शनाप्रसंगी महापौर मुर्तडक बोलत होते. यावेळी प्रास्तविकात करतांना आयोजक संजय न्याहारकर यांनी सांगितले, की अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होणे नित्याचे झाले आहे. त्यामुळे यंदाच्या कृषी प्रदर्शनात नैसर्गिक अडचणींनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यावर उपाययोजना आणि त्यांचे प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शनाचे चर्चासत्र ही संकल्पना राबविली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्य आणि देशातील शेतकऱ्यांना कृषीथॉनमधून उभारी मिळणार आहे. राज्यातील ३५० तालुक्यातील प्रयोगशील युवा व महिला शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या विचारांपासून दूर करण्यासाठी प्रबोधन केले जाणार आहे. सध्या नाशिकला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळावा म्हणून महापालिकेतर्फे जोरदार कॅम्पेन सुरू आहे. परंतु, जिल्ह्यातील कृषी क्षेत्र प्रयोगशील आणि प्रगत आहे की कृषी क्षेत्राच्या अनुशंगाने 'स्मार्ट अॅग्रो सिटी' म्हणून या प्रदर्शनातून जोरदार प्रचार करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांनी कृषीथॉन - २०१५ प्रदर्शनाची पाहणी केली.

कृषीथॉन प्रदर्शनात कृषी औजारे, कृषी बी-बियाणे, किटकनाशके, खत, नर्सरी, अशा विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन देखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रयोगशील युवा आणि महिला शेतकऱ्यांचा शुक्रवारी (दि. २७) सत्कार तसेच पाच जिल्ह्यातील अॅग्रो डिलर्ससाठी मार्गदर्शन शिबिर शनिवारी (दि. २८) होणार आहे. उदघाटन सोहळाप्रसंगी उपमहापौर गुरूमित बग्गा, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, नाशिक बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, कृषी सहसंचालक कैलास मोते, आत्मा प्रकल्पचे संचालक सुभाष नागरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिखलीकर दांपत्याविरोधात अखेर चार्जशीट दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

लाचखोरीच्या प्रकरणात अवघ्या महाराष्ट्राच्या चर्चेत आलेल्या सतीश चिखलीकर व जगदीश वाघ यांच्यापैकी चिखलीकर दांम्पत्याविरोधात अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) आज, गुरूवारी चार्टशीट दाखल केले. वाघ दांम्पत्याविरोधात पुढील चार ते पाच दिवसात चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झालेल्या रायते ते काकडवळण या रस्त्याच्या केलेल्या कामाचा ३ लाख ६९ हजार रूपयांचा मोबादला देण्यासाठी मंजुर बिलाच्या ६ टक्क्याप्रमाणे २२ हजार रुपये लाचेची मागणी करून ती इंजिनीअर जगदीश मगन वाघ याच्यामार्फत स्विकारणाऱ्या ​चिखलीकरला ३० एप्रिल २०१३ रोजी सांयाकाळी ४ वाजता पकडण्यात आले. एसीबीने ही कारवाई नाशिक कार्यालयातच केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीने चिखलीकरच्या शासकीय निवासस्थानाची तसेच त्याची पत्नी स्वाती यांच्या लॉकरची झडती घेतली. यात चिखलीकर दांम्पत्याकडे १४ कोटी ६६ लाख १७ हजार ६४६ रूपये इतकी मालमत्ता असल्याचे उघड झाले. दिनांक १ सप्टेंबर १९८९ ते ३० एप्रिल २०१३ या कालावधीत चिखलीकरने स्वतःच्या व कुटुंबियाच्या नावे उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा १३ कोटी ९१ हजार २१ हजार ५८९ रूपयांची म्हणजे ३८३ टक्के अपसंपदा गैरमार्गाने संपादीत केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चिखलीकरवर एसीबीने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये २८ जून २०१३ रोजी गुन्हा दाखल केला होता. चार्टशीट दाखल करण्यासाठी सक्षम मंजुरी मिळाल्यानंतर आज, नाशिक येथील विशेष कोर्टात दोन हजार पानी चार्टशीट दाखल करण्यात आले. या प्रकरणात जगदीश वाघ याचा समावेश होता आणि त्याच्या कुंटुंबियाकडे अपसंपदा आढळून आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खात्यातून ६५ लाखांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक नेटबँकिंगसाठी वापरला जाणाऱ्या रजिस्टर मोबाइल क्रमांकाचा वापर करीत एका हॅकरने राका कॉलनीत राहणाऱ्या व्यावसायिकाच्या बँक खात्यातील ६५ लाख १० रुपयांवर डल्ला मारला आहे. सरकारवाडा पोलिसांनी आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिसांचे दोन पथक या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात गुंतले आहेत. राका कॉलनीतील पूनम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दिनेश प्रकाश बदलानी (३७) यांच्या बँक खात्यात तांत्रिक हेरफार करीत संशयितांनी ६५ लाख १० हजार रुपये काढून घेतले. नेटबँकिंगसाठी रजिस्टर मोबाईल नंबरचा वापर केला जातो. बदलानी यांनीही ९३७३९०११९१ हा मोबाइल नंबर बँकेकडे रजिस्टर केला होता. आरोपींनी हाच नंबर सुरुवातीस बंद करून तोच नंबर पुन्हा मिळवला. या मोबाइल नंबरच्या मदतीने चोरट्यांनी पासवर्ड व इतर माहिती हॅक करण्यास सुरूवात केली. चोरट्यांनी आयसीआयसीआय बँक सांताक्रुझ, मुंबई, विजया बँक मुंबई, तसेच एचडीएफसी बँक गोमतीनगर, उत्तरप्रदेश या बँकांचे पासवर्ड एकएक करीत हॅक केले. पासवर्ड हॅक केल्यानतंर चोट्यांनी बदलानी यांच्या खात्यातील ६५ लाख १० हजार रूपये वरील तीन खात्यात वर्ग केले. दरम्यान, बदलानी यांनी बँकेचे व्यवहार तपासले असता मोठी रक्कम इतर खात्यात वर्ग झाल्याचे निर्दशनास आले. त्यांनी तत्काळ ही माहिती बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला कळवली. हा चोरीचा प्रकार असावा, याची जाणिव झालेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी बदलानी यांना तत्काळ पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. खाते हॅक करून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम लंपास होण्याची ही पहिलीच घटना शहरात घडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नी सोमवारी विशेष महासभा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातून महापालिकेला मिळणाऱ्या पाण्यात कपात झाल्याने उर्वरित काळात पाणीपुरवठा करणे कसोटीचे ठरणार आहे. पाणीप्रश्न बिकट होत असतांना उर्वरित पाण्याच्या नियोजन व चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. ३०) विशेष महासभा बोलवण्यात आली आहे. पाणीप्रश्नावरील महासभेतही भाजपला घेरले जाण्याची शक्यता असल्याने भाजप त्याचा कसा सामना करते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

पाणीवाटपात नाशिकला गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी कमी मिळाले आहे. महापालिकेन या अगोदरच शहरात पाणीकपात केली असतांना त्यात पुन्हा कपात करावी लागणार आहे. तर दारणा धरणातून पाणी उचलण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. सध्याच्या आरक्षित पाणी ऑगस्टपर्यंत वापरण्यासाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ महापालिकेवर येणार आहे. त्यामुळे उर्वरित काळात पाणीनियोजन करण्याची गरज असल्याने विशेष महासभा बोलविण्याची मागणी शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केली होती. सत्ताधारी मनसेने त्याची दखल घेत, स्थायी समितीच्या चार सदस्यांच्या पत्राआधारे तातडीने विशेष महासभा आयोजित केली आहे.

यशवंत निकुळे, सुरेखा भोसले, मेघा साळवे, रत्नमाला राणे या सदस्यांनी महापौराना पत्र लिहून सभा घेण्याची मागणी केली. त्यामुळे ही तातडीने महासभा बोलविण्यात आली असून त्यात उर्वरित काळात पाणीवाटप कसे करायचे यावर खल केला जाणार आहे. पाण्याचे काटकसरीने वापर करण्यासह, अनधिकृत पाण्याचा वापर थांबवणे, नियमावली सक्त करणे यासह विविध उपाययोजनावर चर्चा केली जाणार आहे.

स्थायीची आज सभा

महापालिकेच्या स्थायी समितीची शुक्रवारी (दि. २७) सभा होत असून त्यात मखमलाबाद येथील कचरा डेपोचे आरक्षण वाचवण्याचा बदल्यात ३९ कोटीचा आर्थिक मोबदला देण्याच्या विषयांसह, वृक्षारोपण व गोदावरी स्वच्छतेच्या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीची सभा होत आहेत. त्यात मखमलाबाद येथील ४१ हेक्टर कचरा डेपोची जागा वाचवण्यासाठी भूसंपादन मोबदला म्हणून ३९ कोटी रुपये अदा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सोबतच साडेचार कोटी रुपये खर्च करून शहरात वृक्षारोपण करण्याचे प्रस्ताव ठेवण्यात आले तर गोदावरी नदीतील पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा साफ करण्यासाठी महापालिका तीन महिन्यांच्या कालावधीसाठी फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिन भाडेतत्त्वावर घेणार आहे. यासाठी दिवसाला एक लाख १० हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे ठेकेदाराला ९९ लाख रुपये भाडे देण्याचा प्रस्ताव आहे. या तीनही प्रस्तांवावरून वादळी चर्चा होणार आहे.

भाजपची पुन्हा कोंडी

पाणीप्रश्नावर यापूर्वी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी भाजपची कोंडी केली होती. त्यावेळी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. तर आताही शिवसेनेचीच मागणी होती. त्यामुळे या सभेतही भाजपची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजपचे सरकार असल्याने आज ही परिस्थिती ओढावल्यानेच भाजपला सर्वपक्षीयांकडून घेरले जाण्याची शक्यता आहे. मनसे आणि शिवसेनेकडून भाजपला पुन्हा आव्हान दिले जाईल. त्यामुळे भाजपला महासभेत होणारा हल्ला रोखण्यासाठी रणनीती तयार करावी लागणार आहे. आमदारांसह नगरसेवकांना अभ्यास करूनच महासभेचा सामना करावा लागणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पेंटावॅलंट’ लसीकरणास प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

लहान वयातील बालकांना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी व लहान मुलांचे मृत्यूदर कमी करण्यासाठी पाच रोग प्रतिबंधकांचा समावेश असलेली पेंटावॅलंट लस देण्यास प्रारंभ झाला. ही लस मोफत देण्यात येणार आहे. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात (डीपीटी), हिपॅटायटिस-बी या पूर्वीच्या लसींबरोबर आता नव्याने 'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप-बी' या आजाराच्या लशीचा समावेश केला आहे.

पाच आजारांना प्रतिबंध करणारी ही पेंटावॅलंट लस नोव्हेंबरपासून राज्यभरात सर्वत्र देण्यात येणार असल्याची बातमी 'मटा'ने सर्वप्रथम दिली होती. 'पेटावॅलंट' ही पाच आजारांना रोखणारी लस आहे. राज्यातील २१ लाख बालकांना ही लस मोफत दिली जाईल. पूर्वी चार आजारांपासून रक्षण करणाऱ्या दोन लशींचे तीनदा डोस द्यावे लागत होते. त्यासाठी सहा वेळा सुई टोचली जात होती. आता पाच आजारांसाठी एकदाच सुई

टोचावी लागणार आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी 'मटा'ला दिली. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा हॉस्पिटल; तसेच महापालिकेच्या हॉस्पिटलमध्येही लस उपलब्ध होणार आहे. केंद्राकडून

२१ लाख डोसेस उपलब्ध करण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षातून तीन वेळा लस

'पेंटावॅलंट' लस ही दीड महिना, अडीच आणि साडेचार महिन्याच्या बालकांना वर्षातून तीनदा दिली जाईल. लहान मुलांमध्ये न्यूमोनिया, मेंदूज्वर ही मृत्यूची कारणे समजली जातात. मुलांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी 'पेंटावॅलंट' लस उपयुक्त ठरणार आहे. न्यूमोनिया; तसेच मेंदूज्वराचा आजार तसेच मृत्यू रोखण्यासाठी 'हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप' ही लस अंत्यत फायदेशीर आहे,' अशी माहिती आरोग्य परिमंडळाच्या पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी दिली.

शहरात मंगळवारपासून सेवा

'पेंटावॅलंट' लसीकरणास नाशिक महापालिकेकडून येत्या मंगळवारपासून म्हणजेच एक डिसेंबरपासून सुरुवात केली जाणार आहे. यासाठी शहरात १७ केंद्र निवडण्यात आले आहेत. याशिवाय नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, पंचवटीमधील इंदिरा गांधी रुग्णालय, जुने नाशिकमधील डॉ. जाकीर हुसेन रुग्णालय आणि मोरवाडीमधील स्वामी समर्थ रुग्णालयात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार, बुधवारी व शुक्रवार लसीकरण केले जाणार आहे, अशी ल महापालिकेच्या प्रमुख हॉस्पिटलसह प्रभागांमधील महत्त्वाच्या आरोग्य केंद्रांमधून बालकांना या लसी दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक बी. आर. गायकवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णजडीत काळाराम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वर्षानुवर्षे काळ्या पाषाणात‌ील दागिन्यांनीच सुशोभित दिसणारा काळाराम आता सुवर्णालंकारांनी मंडित झाला असून, दर्शनाचे अभिलाषी असणाऱ्या भाविकांची 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' अशी भावविभोर अवस्था झाली आहे. देवदिवाळीचा मुहूर्त साधत कृतिका नक्षत्रावर हे दागिने तिन्ही मूर्तीना अर्पण करण्यात आले. सुवर्णजडीत काळारामाचे हे रूप अनेक उत्सवांमधून भाविकांच्या मनाचा वेध घेणारे ठरणार आहे.

काळाराम मंदिरात अनेक भाविक दान करीत असतात. यात चोख सोने, बिस्किटे याचा समावेश असतो. हे सोने तिजोरीत पडून न राहता प्रत्यक्ष रामरायाच्या आणि लक्ष्मण व सीतामातेच्या अंगावर त्यापासून घडविलेले दागिने असावे अशी कल्पना विश्वस्त मंडळाने मांडली होती. या कल्पनेला प्रतिसाद देत रामरायासाठी दागिने घडविण्यात आलेले आहेत. रामासाठी १० तोळ्याचा गळाहार, सीतामातासाठी ११ तोळ्याचा नेकलेस आणि लक्ष्मणासाठी भरजरी हार तयार करण्यात आला. राम व सीतेसाठी कोलकाताच्या कारागिराकडून हार तयार करून घेण्यात आले असून लक्ष्मणाचा हार मात्र गुरव अॅण्ड सन्स यांनी बनवला आहे. भारतीयांचा मुख्य सण असलेल्या दिवाळीमध्येच हे दागिने रामरायाला अर्पण करण्याची सर्वांची इच्छा होती; परंतु कारागिराकडून ते दागिने तयार न होऊ शकल्याने अर्पण करण्याची तिथी लांबली असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले.

दागिने बनविण्याची कल्पना विश्वस्त पांडुरंग बोडके, अॅड. अजय निकम, गिरीश पुजारी, वैभव पुजारी, मंदार जानोरकर, मंडालेश्वर काळे, ओमप्रकाश लोहिया, डॉ. अतुल वडगावकर, डॉ. एकनाथ कुलकर्णी यांची होती. रामरायाला हे दागिने अर्पण केल्यानंतर विश्वस्तांनी गाभाऱ्यात महापूजा केली.

रामरायासाठी अनेक भाविक सोन्याच्या चीजवस्तू दान करीत असतात. त्यात चोख सोने, दागिने आणि बिस्किटांचा समावेश असतो. या सोन्याचा उपयोग करून मूर्तीसाठी कलाकुसर असलेले दागिने बनविण्यात आले असून रामराया, सीतामाता व लक्ष्मण यांच्या मूर्तीला अधिक झळाळी त्यामुळे प्राप्त झाली आहे. - पांडुरंग बोडके, विश्वस्त, काळाराम मंदिर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यक्षमताच पालिकेच्या मुळावर !

$
0
0

अधिकच्या एलबीटी वसुलीने अनुदान कपातीचे संकट म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या एलटीबी धोरणात बदल होऊनही पूर्ण कार्यक्षमतेने एलबीटीची वसुली करण्याऱ्या नाशिक महापालिकेची कार्यक्षमता त्यांच्या मुळावर आली आहे. प्रशासनाच्या चांगल्या नियोजनामुळे अंदाजापेक्षा शंभर कोटी अधिक एलबीटी वसुली होणार आहे. मात्र शासन ७५० कोटीच्या उत्पन्नावरच अनुदान देणार असल्याने जानेवारीपासून पालिकेच्या अनुदानात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च हे तीन महिने महापालिकेसाठी कसोटीचे ठरणार आहेत.

राज्य सरकारने १ ऑगस्टपासून एलबीटी धोरणात बदल करत, ५० कोटीवर उत्पन्न असलेल्या उद्योग व व्यापाऱ्यांनाच एलबीटी लागू केली आहे. महापालिकेची बुडणारी एलबीटी सरकार अनुदान म्हणून महापालिकेला देते. महापालिकेचे वार्षिक उत्पन्न ७५१ कोटी गृहीत धरून सध्या सरकार ४६ कोटीचे अनुदान दरमहा देत, तर महापालिका दरमहा सरासरी ३० ते ३५ कोटी एलबीटी वसुली करत आहे. एलबीटी विभागाने कार्यक्षम पद्धतीने वसुली करत आपल्या वाट्यातील उत्पन्नात भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे मार्चपर्यंत महापालिकेचे उद्दिष्ट हे ८२५ ते ८५० कोटीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा तब्बल ७५ ते १०० कोटी रुपये अधिकचे वसूल होणार आहेत. मात्र महसूल वसुली चांगली होणार असली तरी, त्याचा फटका पालिकेलाच बसणार आहे. उद्दिष्टापेक्षा चांगली वसुली झाल्यास सरकार अनुदानापोटी दरमहा देत असलेल्या ४६ कोटींच्या अनुदानात कपात करणार आहे. जानेवारीपासून ही कपात लागू होण्याची शक्यता असल्याने महिन्याला सरासरी फक्त २० कोटीच्या आसपासच अनुदान मिळणार असल्याने पालिकेच्या विकासकामे व अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. चांगली वसुली करूनही महापालिकेला व नाशिककरांना याचा फटका सहन करावा लागणार असल्याचे दिसते.

महापालिकेची तीन महिने कसोटी

जानेवारी ते मार्च असे तीन महिने हे पालिकेसाठी आर्थिक उलाढालीचे असतात. त्याच काळात शासनाच्या अनुदानात मोठी कपात होईल. तर बिलांची उलाढाल याच काळात सर्वाधिक असते. अनुदानातील कपात ही आर्थिक डोलारा कोसळण्यावर होण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे हे तीन महिने कसोटीचे ठरणार असून, महापालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हटके गिफ्ट रॅपिंगचे धडे

$
0
0

गिफ्ट उघडण्याआधी त्याच्या पॅकिंगकडेही लक्ष आकर्षिले जाते. हटके गिफ्टसोबतच त्याचं पॅकिंगदेखील हटके करता यावं यासाठी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. क्राफ्ट एक्सपर्ट शुभांगी बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागींनी आकर्षक गिफ्ट रॅपिंगचे धडे गिरवले. यावेळी 'गिफ्ट रॅपिंग कसे करावे' याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सॅटीन, रिबीन, उली पेपर, हॅन्डमेज पेपर, पतंगीचा पेपर, न वापरलेले कापड, फुले, पीसे, नेट, गिफ्ट रॅपर यांचा वापर करून आकर्षक गिफ्ट रॅपिंग कसे करता येईल याविषयी सांगण्यात आले. यामध्ये टेडी बेअर, चॉकलेट यांसाठी कसे गिफ्ट रॅपिंग करावे हे शिकविण्यात आहे. गिफ्टच्या आकारप्रकारानुसार डेकोरेशन करण्याचे तंत्र यावेळी शिकविण्यात आले. गिफ्ट रॅपिंगच्या नवनवीन कल्पनादेखील सहभागींना या वर्कशॉपमध्ये पाहायला मिळाल्या. काडीपेटी, सुतळी, पिंपळपान यांचा डेकोरेशनसाठी वापर कसा करावा याविषयीच्या टिप्स वर्कशॉपमध्ये मिळाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा शहरवासीयांना तीन दिवसाआड पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारे गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने शहरात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सटाणा नगरपरिषदेने तीन दिवसाआड नळपाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रात चणकापूर व पुनद धरणातून पाणीपुरवठा होत असतो. गत पावसाळ्यातील गणेशोत्सव कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे चणकापूर व पुनद धरण वाहू लागले होते. यामुळे गिरणा नदीतील पाणी ऑक्टोबरपर्यंत सुरू होते. यानंतर गिरणा नदीपात्रातील विहिरीतील जलस्त्रोत टिकून असल्याने शहराला पाणीपुरवठा होत होता. मात्र, गिरणा नदीपात्र कोरडे होऊन पाणीपुरवठा करण्यास गैरसोय झाली आहे. यामुळे आगामी काळात चणकापूर अथवा पुनदचे आर्वतन मिळाल्यास गिरणानदी वाहू लागल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. ऐन हिवाळ्यात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास पालिका प्रशासनाने प्रारंभ केला आहे. यामुळे शहरवासीय संताप व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्णा मंदिर परिसराला पर्यटन विकासाची प्रतीक्षा

$
0
0

देवळालीगावाजवळ रोकडोबावाडीत चार वर्षापूर्वी एक एकरमध्ये हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. देशात पॉण्डेचेरीनंतर नवग्रहांची मंदिरे फक्त येथेच आहेत. दाक्षिणात्य शैलीतील या मंदिरातील मूर्ती काळ्या पाषणातील आहेत. गणेशाची ४२ फुटांची चुतर्रमुखाची भव्य मूर्ती फक्त येथेच आहे. ऊन व पावसापासून संरक्षणासाठी या मूर्तीला सिमेंट व जर्मन पॉलिसीचा मुलामा देण्यात आलेला आहे. रुद्राक्ष महादेव, चामुंडादेवी कार्तिकेय तसेच दत्तगुरुंचेही मंदिर आहे. शिव परिवारातील सर्व सदस्य येथे एकाच ठिकाणी आहेत. चेन्नईच्या कारागीरांनी दोन वर्षात ही मंदिरे उभारलेली आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण नक्षत्रवनम एक एकरचा परिसर अत्यंत स्वच्छ असून अनेक वैशिष्ट्यपूर्ण फुलझाडे येथे आहेत. जास्वंदाची सर्व रंगातील फुलेझाडे, पिवळे, केसरी व पांढरे झेंडू, २१ गणेश पत्रींची झाडे, सोळा प्रकारची तुळस नवग्रहांची तसेच नक्षत्रांची २७ सर्व झाडे, औषधी वनस्पती येथे आहेत.

पार्किंग, कठडे हवेत कार्तिक पौर्णिमा, गणेश जयंती, अंगारकी चतुर्थीवेळी येथे भाविकांची गर्दी असते. शेजारीच वालदेवी नदी आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग अरुंद आहे. वाहने नदीत कोसळण्याचा धोका असल्याने येथे संरक्षण कठडे हवेत. पार्किंग व्यवस्था प्रशस्त करावी. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नदीच्या उतारावर लोकांनी कचराकुंडी केली आहे. पर्यटन विकसासाठी नाशिक दर्शनमध्ये या स्थळाचा समावेश केल्यास आणि महत्त्वाच्या ठिकाणी मंदिराचे फलक लावल्यास भाविकांचा ओघ वाढून रोजगार निर्मिती होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणुकानगर सोसायटीची रविवारी निवडणूक

$
0
0

सन १९८० साली निर्माण झालेली रेणुकानगर सोसायटीमध्ये तीन मजलीच्या एकूण २६ इमारती आहेत. यात साडे तिनशे फ्लॅट आहेत. जिल्हा परिषदचे तत्कालीन अध्यक्ष मधुकर सोनवणे यांनी ही सोसायटी उभारली आहे. महिला बँकेच्या डॉ. शशीताई अहिरे यांचे एकता पॅनल आणि विरोधकांचे विकास पॅनल निवडणूक रिंगणात आहे. सोसायटीत अतिक्रमणे वाढली असून विकासासाठी सत्तारुढ पॅनलने कोणतेही प्रयत्न केले काही. याउलट सोसायटीवर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला असल्याचा आरोप विकास पॅनलने केला आहे. रेणुकानगर सोसायटीचा विकास साधून सभासदांचे फ्लॅटचे खरेदीखत करून सातबारावर नावेनोंदणी करण्याचा आणि इमारतीनुसार स्वतंत्र सोसायटी नोंदणी करण्याचे आश्वासन विकास पॅनलने दिले आहे. तर गेल्या २५ वर्षांपासून संघर्ष करून विकास साधला आहे. यापुढेही विकासाची मालिका सुरू राहील, असा जाहीरनामा सत्ताधारी एकता पॅनलने मतदारांपुढे मांडला आहे. दरम्यान, रेणुकानगर सोसायटीत उखडलेले रस्ते, पाणीप्रश्न, तुटलेल्या सरंक्षक भिंती, अंधाराचे साम्राज्य, वाढत्या चोऱ्या, गुंडांचा हैदोस आदी समस्या असल्याचे रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेतीन लाखाचा ऐवज लुटला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

येथील स्टेशन रस्त्यावरील गुंजाळ पेट्रोल पंपासमोरील मे. जे. आर. ठाकूर या सराफी दुकानाची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांने सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले. यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुकानचालक नितीन शांताराम ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादी दिली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी (दि.२६) १० वाजता दुकान उघडले असता दुकानातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची वायर व एक कॅमेरा तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. दुकानामागील खोलीतील मागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करताच प्रथम सीसीटीव्ही फुटेजची वायर व एक कॅमेरा तोडून दुकानातील १०० ग्रॅम वजनाची सोन्याची मोड व काऊंटरमधील ड्रावरमध्ये ठेवलेले चांदीच्या तोरड्या, जोडवे, सरी, कडे असा १० किलो चांदीचा असा अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपयाचा ऐवज चोरी झाला आहे.

दुकानातील उर्वरित सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये पहाटे ३.३७ ला दुकानात शिरलेला २० ते २५ वयोगटातील अज्ञात चोरटा शरीराने मजबूत तरूण, तोंड बांधलेले तसेच हातात ग्लोज घालून मोबाइल बॅटरीच्या उजेडात काऊंटरमधील प्रत्येक कप्पे हाताळतांना दिसून आला. घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक आवारे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांनाही मायेचा फुटतो पाझर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

लहान मुलांमधील निरागसता आमच्यासारख्या कठोर प्रसंगांना सामोऱ्या जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना देखील मायेचा पाझर फोडते. लहान वयातच अशा प्रकारचे चांगले ज्ञान व चांगले संस्कार मिळणारे मुले खरोखरच भाग्यवान असल्याचे प्रतिपादन सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी केले.

येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्ट वतीने आयोजित साने गुरूजी कथामाला व संस्कार शिबिराच्या सांगता समारंभाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड होते. यावेळी पी. टी. पाटील म्हणाले की, संस्कार शिबिरात पूज्य साने गुरूजींचे संस्कारांचे बाळकडू आपण विसरायला नको. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा साने गुरुजींचा एकमेव मंच जो आपण सर्वांनी आचरणात आणला तरी या शिबिराची यशस्वीता झाली, असे म्हणता येईल असे ही उद्गार पाटील यांनी काढले.

काकडे गुरूजी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रा. बी. जी. पगार, प्रा. बी. डी. बोरसे, किरण दशमुखे, सीमा सोनवणे, परचुरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास देवस्थानचे विश्वस्त बाबुराव सोनवणे, कौतिक सोनवणे आदी उपिस्थत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांना वाढीव अधिकार

$
0
0

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कामे लागणार मार्गी; वन व महसूल विभागाचा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाटबंधारे प्रकल्पांमुळे बाधितांचे पुनर्वसन करताना नवीन गावठाणात उपलब्ध करून द्यावयाच्या नागरी सुविधांच्या कामांना आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी प्रशासकीय मान्यता देऊ शकणार आहेत. एक कोटी रुपयांपर्यतच्या कामांना जिल्हाधिकारी तर १० कोटींपर्यंतच्या कामांना विभागीय महसूल आयुक्त मंजुरी देऊ शकणार आहेत.

राज्यात अनेकदा नवीन प्रकल्प हाती घेताना काहीवेळा संपूर्ण गावाचे तर, काहीवेळा गावांमधील काही भागांचे पुनर्वसन करावे लागते. बाधितांच्या पुनर्वसन अधिनियमानुसार मदत आणि पुनर्वसन विभागाकडून आराखडा बनविण्याचे आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडली जाते. पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांची कामे जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत केली जातात. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव आणि माहिती जलसंपदा विभागाकडून जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना पुरविली जाते. पुनर्वसनाचे काम मागणीनुसार पूर्ण न झाल्यास प्रकल्पग्रस्तांकडून प्रकल्पांची कामे रोखली जातात. परिणामी प्रकल्पही रेंगाळत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच पुनर्वसनाचे अधिकार त्या त्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल आणि वन विभागाचे कार्यासन अधिकारी प्रवीण मुंढे यांनी हा निर्णय १९ नोव्हेंबरला निर्गमित केला आहे.

त्यानुसार प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधांच्या प्रकल्प आराखडयातील एक कोटी रुपयांपर्यंतच्या कामांच्या अंदाजपत्रकास वित्तीय आणि प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना तर १० कोटींपर्यंतच्या कामांना मान्यता देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असणार आहेत. त्याहून अधिक रकमेच्या कामांना मात्र राज्य सरकारकडून प्रशासकीय मंजुरी आवश्यक असणार आहे. या निर्णयामुळे कामांना होणारी दिरंगाई टळू शकणार असली तरी निधीच्या उपलब्धतेवरच अंमलबजावणीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा महिन्यांनी मिळाले जिल्हा पुरवठा अधिकारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित रेशन धान्य घोटाळ्यात निलंबनाच्या कारवाईनंतर रिक्त झालेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर आर. एम निफाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहा महिन्यांनंतर जिल्ह्याला पूर्णवेळ जिल्हा पुरवठा अधिकारी मिळाले आहेत. निफाडकर यापूर्वी याच पदावर यवतमाळमध्ये काम पहात होते.

सुरगाणा येथे झालेल्या कोट्यवधींच्या धान्य घोटाळ्यामुळे केवळ जिल्हा पुरवठा विभागाचीच नव्हे तर जिल्हा प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर आली. पाच कोटींहून अधिक किमतीच्या धान्याच्या अपहाराचा विषय राज्यभर गाजला. त्याची दखल घेऊन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तत्कालीन जिल्हापुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांच्यासह नऊ तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद रिक्त होते. रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला होता. सुरगाणा धान्य घोटाळ्याची दखल थेट राज्य सरकारने घेतल्यामुळे या पदावर रूजू होण्यास कुणी फारसे इच्छुक नव्हते. या प्रकरणानंतर जिल्ह्यातील धान्य पुरवठा यंत्रणेवरही विपरीत परिणाम झाला. सुरगाणा घोटाळ्यात वाहतूक ठेकेदारावरही निलंबनाची

कारवाई झाल्याने वाहतूक व्यवस्थाही कोलमडली. सोमवारपासून ते पदावर रूजू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात दारूबंदीचा निर्णय तूर्त अशक्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बिहारच्या धर्तीवर राज्यात दारूबंदी करणे तूर्त शक्य नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे महसूल व राज्य उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले. राज्याला तब्बल वीस हजार कोटींचा महसूल हा दारूतूनच मिळत असल्याने राज्यात दारूबंदीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. हिवाळी अधिवेशनापूर्वीच राज्यमंत्री मंडळात फेरबदल केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सेना-भाजपात कुठलाही कलह नसल्याचा दावा त्यांनी केला.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना ना. खडसे म्हणाले की, बिहारने फक्त दारूबंदीची घोषणा केली. अजून दारूबंदी झालेली नाही. या धर्तीवर महाराष्ट्रात दारूबंदी हा निर्णय सध्यातरी शक्य नाही. दारूच्या महसुलातूनच राज्याला वीस हजार कोटींचा महसूल मिळतो. त्यामुळेच राज्यात दारुबंदी शक्य नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केलं. येत्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार हा होणारच असा दावाही केला. शिवसेना आणि भाजपात कुठलेही मतभेद नाहीत. उद्या उद्धव ठाकरे हे आपल्या मंत्र्यांसोबत मराठवाडा दौरा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images