Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कायद्याचा पेपर एक अन् प्रश्नपत्रिका दुसरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठी अडचणींचे शुक्लकाष्ठ अद्याप जैसे थे आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीचा तिढा सुटतो न सुटतो तोच नव्या अनुभवाची भर या मालिकेत सोमवारी पडली. जनरल लॉ या पदविका अभ्यासक्रमाच्या पेपरला चक्क इन्कमटॅक्सची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती थोपवली गेली.

हाती पडलेली चुकीची प्रश्नपत्रिता तब्बल तासभर सोडविताना मनस्तापाची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढावली होती. अखेरीस विद्यार्थ्यांनी मागणीचा जोर लावल्यानंतर तब्बल तासाभराच्या अंतराने त्यांच्या हाती योग्य विषयाची प्रश्नपत्रिका देत ती सोडविण्यासाठी त्यांना वेळ वाढवून देण्यात आला. या प्रकाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विभागासंदर्भातील तक्रारी काही वर्षांपासून वाढीस लागल्या आहेत. पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याप्रश्नी लक्ष देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा. त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी घडलेल्या या प्रश्नपत्रिकेतील बदलाच्या अनुभवाने विद्यार्थी धास्तावले आहेत. विद्यापीठाने गोंधळलेला कारभार त्वरित सुधारावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कारभाराचा फटका बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भांडवली मूल्यावर मालमत्ता कर?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, घरपट्टी दरवाढीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी मुंबई व पिंपरी चिंचवड महापालिकांचा अभ्यास करण्यात आला असून, मुंबईच्या धर्तीवर भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी वसूल करण्यासंदर्भातील प्रस्तावावर सध्या विचार सुरू आहे. त्यामुळे घरपट्टीकरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील ३५ हजार मालमत्ताधारकांना महापालिकेने सूचनापत्र काढले असून, तत्काळ घरपट्टी कर भरण्याच्या सूचना केल्या आहेत. वेळेत कराचा भरणा केला नाही, तर मालमत्ता जप्तीची तयारी सुरू केली आहे.

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात पालिकेने घरपट्टीतून १२० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्मार्ट सिटी योजनेत सहभागासाठी उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. विशेषतः मालमत्ता कर व पाणीपट्टी कर अन्य महापालिकांच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे दरवाढीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. पालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी यासाठी नुकताच मुंबई व पिंपरी चिंचवड महापालिकेतील करसंकलनाचा अभ्यास दौरा केला. त्यात पिंपरी चिंचवडमध्ये रेटेबल तर, मुंबईमध्ये रेडिरेकननुसार मालमत्ता कर आकारले जातात. शहरात १९९९ पासून कोणतीही करवाढ झालेली नाही. त्यामुळे मालमत्ता करात किती वाढ करता येईल, याबाबत प्रशासन चाचपणी करीत आहे. मुंबईच्या धर्तीवर भांडवली मालमत्ता कर आकारणी केल्यास उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भांडवली मालमत्ता कर आकारण्याच्या बाजूने प्रशासन असले तरी, महासभेच्या निर्णयावरच त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे.

एकीकडे मालमत्ता करात वाढ करण्याच्या विचार सुरू असतानाच दुसरीकडे महापालिकेने सध्याच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडली आहे. दरवर्षी मार्चमध्ये होणारी वसुली प्रशासनाने ऑक्टोबरमध्ये सुरू केली आहे. त्यासाठी शहरात तब्बल ३५ हजार मालमत्ताधारकांना सूचना पत्र पाठविण्यात आली आहेत. सोळा नोव्हेंबरपासून ही सूचनापत्रे वाटली जाणार असून, पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

ऑक्टोबर अखेर ५१ कोटी वसूल

महापालिकेच्या करसंकलन विभागाने ऑक्टोबर अखेरपर्यंत ५१ कोटी ४३ लाखांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. गेल्या वर्षापेक्षा ही वसुली नऊ कोटींनी अधिक आहे. सवलत योजनेचा पालिकेला चांगला फायदा झाला आहे. उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलत आता विभागीय अधिकाऱ्यांवरही दबाव वाढवला आहे. तसेच, नगरविकास विभागाला सात इमारतीचे कम्पलीशन सर्टीफिकेट दिल्यानंतर करसंकलन विभागाला कळविणे बंधकारक करण्यात आले आहे.

बँक खातेही गोठवणार

महापालिकेने वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पंचवीस हजाराच्या वर थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्तीसोबतच बँक खातेही सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा थकबाकीदारांची यादीच तयार केली जात असून, मोठेपण मिरवणाऱ्या या बड्या थकबाकीदारांना महापालिका बडा झटका देण्याचा तयारीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळाराम अलंकारविनाच !

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : अयोध्येच्या अन् सुवर्णमयी लंकेच्या साम्राज्यावर क्षणार्धात पाणी सोडणाऱ्या श्री काळारामाच्या मंदिराभोवती कोंडाळे करून बसलेल्या विश्वस्त पदाधिकाऱ्यांनी मात्र याच काळारामास कलियुगातही दागिन्यांचा वनवास घडविला आहे. श्रींचे दागिने मोफत घडवून देण्यास नामांक‌ति सुवर्णकार तयार असले तरीही दागिने बनविण्याची सेवा कुणाला द्यायची यावर घमासान झाल्याने अध्यक्षांना हा प्रस्तावच गुंडाळावा लागला. त्यामुळे भक्तांच्या बळावर सुवर्णजडीत होण्याच्या तयारीत असलेला श्रीरामही विश्वस्तामुळे वेठीस धरला गेल्याने भक्तांमध्ये संतापाची भावना आहे.

श्री काळाराम मंदिर संस्थानातील विश्वस्तांचा कारभार हा नेहमीच वादात राहिला आहे. विश्वस्तांमधील चढाओढीने संस्थाचा कारभाराचे अनेकदा धिंडवडेही निघाले आहेत. विश्वस्तांच्या अदलाबदली कारभारात बदल होईल, अशी अपेक्षा होती. अध्यक्षपदावर असलेले जिल्हा सत्र न्यायाधीशसुद्धा या विश्वस्तांमधील पोरकटपणाने व्यथ‌ति झाले आहेत. भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या सोन्यातून श्रीराम, लक्ष्मण व सीतेला सुवर्ण अलंकार करण्याचा निर्णय घेतला. विश्वस्तांच्या बैठकीत हा विषयही मंजूर करण्यात आला. त्यासाठी शहरातील नामांक‌ति सुवर्णकारांनी विनामूल्य सेवा देण्याची तयारीही दर्शवली. मात्र सुवर्ण अलंकार कोणत्या सुवर्णकाराकडून बनवायचे यावरूनच दोन विश्वस्तांमध्ये जुंपली. एका विश्वस्ताने पु. ना. गाडगीळ यांच्याकडून करावे असा आग्रह धरला, तर दुसऱ्या विश्वस्ताने गोविंद दंडे सराफ यांच्याकडून दाग‌निे करावेत असा आग्रह धरला.

सुवर्णकारांच्या निवडीवरील दोन विश्वस्तांमधील हे भांडण विकोपाला गेल्याने अध्यक्षांनी थेट हा प्रस्तावच गुंडाळला आहे. त्यामुळे काळारामाचे कल‌यिुगात सुवर्णजडीत होण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र आपल्या अहंकारामुळे थेट रामालाच दाग‌न्यिांचा वनवास करण्यास भाग पाडणाऱ्या विश्वस्तांबद्दल भक्तामध्ये तीव्र संतापाची लाट आहे. बडव्यांमधील या अंतर्गत हेवेदाव्यामुळे थेट रामाला वेठीस धरण्याच्या त्यांच्या कृतीचा निषेध त्यांच्यातीलच काही विश्वस्तांनी केला आहे.

भाविकांनीच दान केलेल्या दागिन्यातून अलंकार करण्याची काही विश्वस्तांची इच्छा असून, तसा ठराव बैठकीत झाला. मात्र काही विश्वस्तांनी तक्रार केल्याने अध्यक्षांनी तो तांत्रिक कारणामुळे आता रद्द केला आहे.

गिरीश पुजारी, विश्वस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलनास्त्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला. गंगापूर धरणातून जायकवाडीला प्रमाणापेक्षा अधिक पाणी सोडले जात असल्याचा आक्षेप घेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांना घेराव घालून राज्य सरकारचा निषेध केला. पाणी सोडू नये, या मागणीसाठी दारणा धरणावरही शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. दरम्यान, जायकवाडीला १.३६ टीएमसी पाणी सोडण्यास सुरूवात झाली असून, हे पाणी चार दिवस सोडणे सुरू राहणार आहे.

आंदोलनात भाजपची गोची

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या विरोधात जिल्ह्यातील भाजप वगळता सर्व पक्षीयांनी मोट बांधत,नागरिकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेत. मात्र दुसरीकडे नाशिककरांनी भरभरून मते देवून निवडून दिलेल्या तीन आमदारांनी नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. तर दुसरीकडे भाजप सरकारनेच हा निर्णय घेतल्याने विरोध कसा, करायचा अशा दुहेरी कोंडीत सापडल्याने भाजप आमदारांनी नॉटरिचेबल राहणेच पसंत केले.

आज घंटानाद; उद्या मोर्चा

नाशिककरांच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात पळविले जाऊ नये यासाठी एकीकडे सर्व पक्ष एकवटले असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार मात्र या आंदोलनापासून दूर राहीले आहेत. राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (३ नोव्हेंबर ) सकाळी भाजप आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी रामायण बंगल्यावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बुधवारी (४ नोव्हेंबर ) शहरातून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असून, पालकमंत्र्यांना जिल्हा प्रवेश बंदी करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

नाशिकमधील गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती द्यावी, ही मागणी हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आता नाशिककरांनी न्यायासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. खासदार हेमंत गोडसे आणि जलचिंतन संस्थेने सुप्रीम कोर्टामध्ये सोमवारी विशेष याचिका (स्पेशल लिव्ह पिटीशन) दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी दुपारपर्यंत सुनावणी अपेक्षित आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात सुनावणी होईपर्यंत पाणी सोडले जाऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ हजार मालमत्ताधारकांना सूचनापत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, घरपट्टी दरवाढीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी मुंबई व पिंपरी चिंचवड महापालिकांचा अभ्यास करण्यात आला असून, मुंबईच्या धर्तीवर भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी वसूल करण्यासंदर्भातील प्रस्तावावर सध्या विचार सुरू आहे. त्यामुळे घरपट्टीकरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील ३५ हजार मालमत्ताधारकांना महापालिकेने सूचनापत्र काढले असून, तत्काळ घरपट्टी कर भरण्याच्या सूचना केल्या आहेत. वेळेत कराचा भरणा केला नाही, तर मालमत्ता जप्तीची तयारी सुरू केली आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात पालिकेने घरपट्टीतून १२० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्मार्ट सिटी योजनेत सहभागासाठी उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. विशेषतः मालमत्ता कर व पाणीपट्टी कर अन्य महापालिकांच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे दरवाढीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. पालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी यासाठी नुकताच मुंबई व पिंपरी चिंचवड महापालिकेतील करसंकलनाचा अभ्यास दौरा केला. त्यात पिंपरी चिंचवडमध्ये रेटेबल तर, मुंबईमध्ये रेडिरेकननुसार मालमत्ता कर आकारले जातात. शहरात १९९९ पासून कोणतीही करवाढ झालेली नाही. त्यामुळे मालमत्ता करात किती वाढ करता येईल, याबाबत प्रशासन चाचपणी करीत आहे. मुंबईच्या धर्तीवर भांडवली मालमत्ता कर आकारणी केल्यास उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भांडवली मालमत्ता कर आकारण्याच्या बाजूने प्रशासन असले तरी, महासभेच्या निर्णयावरच त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे.
एकीकडे मालमत्ता करात वाढ करण्याच्या विचार सुरू असतानाच दुसरीकडे महापालिकेने सध्याच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडली आहे. दरवर्षी मार्चमध्ये होणारी वसुली प्रशासनाने ऑक्टोबरमध्ये सुरू केली आहे. त्यासाठी शहरात तब्बल ३५ हजार मालमत्ताधारकांना सूचना पत्र पाठविण्यात आली आहेत. सोळा नोव्हेंबरपासून ही सूचनापत्रे वाटली जाणार असून, पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

बँक खातेही गोठवणार
महापालिकेने वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पंचवीस हजाराच्या वर थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्तीसोबतच बँक खातेही सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा थकबाकीदारांची यादीच तयार केली जात असून, मोठेपण मिरवणाऱ्या या बड्या थकबाकीदारांना महापालिका बडा झटका देण्याचा तयारीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींसाठी सरसावले पोलिस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

गडचिरोलीमधील आदिवासी बांधवांचे हलाखीचे जीवनमान उंचविण्यासाठी येवला शहर पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमाला शहरातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. विशेष म्हणजे मुस्लिम समुदायातील कित्येकांनी आदिवासींची दिवाळी साजरी होण्यास पुढाकार घेत नवीन कपडे बूट आणून दिले आहेत. या अभिनव उपक्रमासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी केले आहे.

शहर पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत बोलतांना गडचिरोलीमध्ये कर्तव्यावर असतांना आदिवासीच्या जीवनाचे झालेले दर्शन व तेथील अनुभव डॉ. खाडे यांनी सांगितले. अंगावर पुरेसे कपडे नाहीत. घरामध्ये आवश्यक भांडी व इतर साहित्य नाही. अत्यंत हालाखिचे जीवन विनातक्रार आदिवासी जगत आहेत. शहरामधील नागरिकांनी उत्सवांमधील व इतर वेळीही अनावश्यक खर्च कमी करून आपल्याकडील जुने, शक्य असेल तर नवीन कपडे, भांडी व इतर साहित्य पोलिसांकडे जमा करावे. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविले जाईल, आपली छोटीशी मदत हजारो आदिवासींचे जीवनमान उंचावू शकेल, असे आवाहन खाडे यांनी या बैठकीत केले.

येवला शहरातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी जुनी, नवी कपडे, चप्पल,बुट व इतर साहित्य जमा केले आहे. हे सर्व साहित्य लवकरच गडचिरोली भागातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. ८ नोव्हेंबर पर्यंत हे सामान गोळा केले जाणार असून ते ९-१० नोव्हेंबर रोजी गडचिरोलीला पाठविण्यात येणार असून, ज्यांना शक्य असेल त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडलाही बसपास द्या!

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

सध्या चांदवड तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्चाअभावी प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे शैक्षणिक बस पासेस दुष्काळग्रस्त शेतकरी तसेच गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क करण्याचे निवेदन आधार फाऊंडेशनतर्फे नायब तहसीलदारांना देण्यात आले.

बसपाससाठी पैसे नसल्याने लातूर येथील स्वाती नामक विद्यार्थिनीने आत्महत्या केली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालयं. हलाखीच्या परिस्थितीमुळे खेडोपाड्याहून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ये-जा करण्यासाठी पुरेसे पैसे देखील नसतात. यामुळे राज्य सरकारने स्वाती अभय योजनेची सुरूवात केली. यात दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात येणार आहे. याच योजनेचा लाभ चांदवड तालुक्याला मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष वैनतेय आहेर तसेच अक्षय मातुले, नितिन जाधव, भूषण घंघाळे, गोकुळ ठाकरे, आबा आवारे, सुरेश गांगुर्डे आणि तरूण वर्ग आदी उपस्थित होते. यावेळी स्वाती अभय योजना चांदवड तालुक्यात त्वरित लागू करावी अशी मागणी आधार फाऊंडेशनकडून करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कादवाचा बॉयलर पेटला

$
0
0

उसाची लागवड करण्याचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

अनेक नामवंत कारखान्यांपेक्षा कादवाचा हमीभाव (एफआरपी) जास्त राहिला असून, अत्यंत अडचणीतही जास्तीत जास्त एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाही कादवा जास्त भाव देण्यासाठी प्रयत्नशील असून, ऊस उत्पादकांनी ऊस तोडणीसाठी घाई न करता परिपक्व ऊस गाळपासाठी द्यावा व आगामी काळात विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्पासाठी जास्तीत जास्त ऊस लावावा, असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले आहे.

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याहस्ते उसाची मोळी टाकून संपन्न झाला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्रीराम शेटे बोलत होते. ते म्हणाले, की यंदा पाऊस उशिरा चालू झाल्याने व कमी झाल्याने मागच्या वर्षा इतके उसाचे उत्पादन निघेल का? याविषयी शंका आहे. कादवाने तीन लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्टे ठेवले असून, ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कमी रिकव्हरीचा ऊस तोडून आणू नका, परिपक्व झालेला ऊसच गाळपाला आणावा म्हणजे उसाला योग्य भाव देणे शक्य होईल. कारखान्यावर झेपेल तितकेच कर्ज असल्याने तसेच कारभारात काटकसर असल्याने गेल्या वर्षी ऊसाला चांगला भाव देणे शक्य झाले. वीज बचतीसाठी आधुनिक यंत्रणा बसवून काटकसरीचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, जी यंत्रे खराब झाली त्या ठिकाणी अतिरिक्त क्षमतेची यंत्रसामुग्री बसवण्याचे काम सुरू आहे यामुळे आधुनिकीकरण, विस्तारीकरण करणे शक्य आहे.

उसाला हमीभाव देण्याचा शासनाने काढण्याचा फतवा काढल्याने आर्थिकदृष्ट्या सर्व साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. भाववाढ न होऊ देण्याची झळ फक्त शेतकऱ्यांनाच सोसावी लागते अशी टीकाही त्यांनी शासनावर केली. दिंडोरी-चांदवडच्या शेतकऱ्यांनी उसाचे उत्पन्न वाढवले, तर कादवाला इथिनॉलचे उत्पादन करणे शक्य होईल. त्यासाठी ऊस लागवड वाढवावी, उसाला योग्य भाव देता येईल यासाठी साखरेचे भाव धोरण आखण्याची गरज असल्याचे शेटे यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर कादवाने गळीत हंगामाचा शुभारंभ साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला तो अभिनंदनीय आहे, आमदार झिरवाळ यांनी सांगितले. मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार तथा कादवाचे उपाध्यक्ष उत्तम बाबा भालेराव यांनी केले. तर सूत्रसंचलन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रह्मगिरी पर्वताचा मार्ग होणार सुकर!

$
0
0

भाविकांच्या सोयीसाठी ६० लाख रुपयांची कामे मंजूर

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरीच्या उगमस्थानी दर्शनासाठी दर्शनार्थी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांच्या सुविधांसाठी शासनाने ६० लाख रूपयांची कामे नव्याने मंजूर केली आहेत. सिंहस्थ नियोजनात जवळपास पाच कोटी रुपयांची महत्त्वपूर्णकामे झाली व त्याचा भाविकांना खरोखरच चांगला फायदा झाला आहे.

भाविकांच्या गरजा लक्षात घेता नव्याने होत असलेली कामे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहेत. मंजूर आराखड्यातील कामे पूर्ण झाली. मात्र, काही कामे आवश्यक होती; परंतु पावसाळा सुरू झाल्याने डोंगरमाथ्यावर कामे करणे शक्य नव्हते. विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक गोविंदराव मुळे यांनी भाविकांची सुरक्षा आणि गरज लक्षात घेवून पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्र सादर केले. त्याचप्रमाणे आमदार सीमा हिरे यांनाही पत्र देवून त्याचा पाठपुरावा केला. आता सिंहस्थ संपन्न झाला आहे तरी देखील मागणी केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून, महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या कामांना प्रारंभ होत आहे.

रस्त्याचे काम पूर्ण

सिंहस्थपूर्व नियोजनात झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त होत असून, ब्रम्हसावित्री ते भातखळा धर्मशाळा असा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रस्ता पायऱ्यांनी बांधण्यात आला. मुख्य पायऱ्यांचा रस्ता दुरूस्ती करण्यात आली आणि रेलींग बसविण्यात आले. सिंहस्थ पर्वकाल असतांना नाशिक आणि त्र्यंबक येथे शाही पर्वणीच्या दरम्यान गोदावरीच्या उगमस्थानी जाण्यासाठी रांगा लागल्या होत्या. नव्याने झालेल्या पायऱ्यांनी प्रवास सुखकर झाला आहे. भाविकांना जाण्यास आणि येण्यास लागणारा वेळ कमी झाला आहे. तसेच सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक भाविकांनी येथे दर्शनासाठी हजेरी लावली. अर्थात पायऱ्यांचे काम झाल्याने अपघात टळले व कोणतीही दुर्घटना झाली नाही.

असे आहे कामांचे स्वरूप

भाविकांना दीर्घकाल पाणी उपलब्ध रहावे म्हणून ब्रहगिरी माथ्यावर ४ दगडी नालाबांध बांधले जाणार आहेत. ब्रहगिरी पर्वतावर गोदावरी उगमस्थानी आणि पायथ्याशी असलेल्या भातखळा धर्मशाळेजवळ असलेल्या दोन्ही ठिकाणाच्या विहिरींचे गाळ काढणे, दुरूस्ती, पुनर्भरण कामे होणार आहेत. आवश्यक अशा तीन ठिकाणी रेलींग तयार करणे अशा सर्व कामांची ५७ लाख ३१ हजार ९२१ रूपये तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.

शासनाने ब्रह्मगिरीच्या कामांबाबत वेळोवेळी केलेल्या सूचना व मागण्या मान्य केल्या आणि विकास कामे चांगली झाली. सिंहस्थात भाविकांची ब्रम्हगिरी पर्वतावर मोठ्या प्रमाणात उपस्थिती लागली व यापुढे देखील अधिक प्रमाणात भाविक येत आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन तसेच वनविभागाचे सर्व अधिकारी यांनी वेळोवेळी दखल घेवून चांगले काम केले आहे.

गोविंदराव मुळे, जिल्हा उपाध्यक्ष, विश्वहिंदू परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टासमोर मांडणार वृक्ष अडथळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

गंगापूररोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांबाबत नुकतीच कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थापन झालेल्या कृती समितीच्या बैठकित गंगापूररोडला अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या संदर्भात कृती समितीतर्फे बुधवारी, ४ नोव्हेंबरला कोर्टाला न्यायालयास पाच हजार पोस्टपत्रे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

गंगापूररोड कृती समितीच्या वतीने मते नर्सरी येथे नगरसेवक विक्रांत मते, के. जी. मोरे यांच्या उपस्थित बैठक झाली. यात गंगापूररोडवरील वृक्षांबाबत न्यायालयास समस्या पाठविल्या जाणार असून पाच हजार पोस्टपत्रे त्र्यंबकरोडवरील जनरल पोस्ट कार्यालयात दिले जाणार असल्याचे नगरसेवक मते यांनी सांगितले. गंगापूररोड रस्त्यास अडथळा ठरणारे वृक्षांची याचिका उच्च न्यायालयात दाखल असून पुढील कारवाई सुरू आहे. परंतु, वृक्षांची पर्यावरणासाठी अत्यंत गरज असते. मात्र, रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या वृक्षांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत.

यासाठी न्यायालयास रहिवाशांची वृक्षांबाबत असलेल्या अडचणींची माहिती होण्यासाठी पाच हजार पोस्टपत्रे ४ नोव्हेंबरला जनरल पोस्ट कार्यालयात दिली जाणार आहेत. गंगापूररोड वृक्ष कृती समितीच्या बैठकीस प्रकाश कटपाल, प्रकाश भंडार, विश्वास भानोसे, सचिन मोरे, शशिकांत टर्ले, तुषार ठाकरे, अनिल काकडे, रमेशे मते यांसह नागरीक उपस्थित होते.

वृक्ष हटविणार कोण?

गंगापूररोडवरील रस्त्यात येत असलेल्या वृक्षांबाबत सर्वांचीच अनेक वर्षांपासूनची ओरड आहे. त्यातच गंगापूररोडवरील बेंडकुळे मळ्यासमोर बाभळीचे वृक्ष काही दिवसांपासून मोडून पडलेला आहे. यामुळे रस्त्यांवरून वाहने चालवितांना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

नैसर्गिक आपत्तीतून मोडलेले वृक्ष हटविणार कोण असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत. महापालिकेचा उद्यान विभाग वृक्षांचा मुद्दा न्याय प्रविष्ठ असल्याचे कारण देत याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोपही वाहनचालकांनी केला आहे. नेहमीच वर्दळीचा असलेल्या गंगापूररोडवर मोडलेल्या वृक्षामुळे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हे रोखण्यासाठी रेल्वेची हेल्पलाईन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

धावती रेल्वे आणि रेल्वे स्टेशन परिसरातील गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलातर्फे प्रवाशांसाठी १८२ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. रेल्वेस्टेशन प्रमुख एम. बी. सक्सेना यांच्याहस्ते या हेल्पलाईनचे उदघाटन करण्यात आले.

रेल्वे स्टेशन परिसरात व धावत्या रेल्वेत मद्यपान, नशापाणी, प्रवाशांना त्रास देणे, महिलांची छेडछाड, चोरी, लुबाडणूक आदी प्रकार सातत्याने घडत असतात. बहुतांश प्रवासी दुसऱ्या राज्यातील असल्याने तक्रार करण्यास टाळाटाळ करतात.

गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वेच्या भुसावळ मंडळातर्फे हेल्पलाईनचा उपक्रम राज्यभरात राबविला जात आहे. धावत्या रेल्वेत गैरप्रकार घडल्यानंतर प्रवाशांनी आपल्या मोबाइलवर तक्रार केल्यास संबंधित रेल्वे स्टेशनवर पोलिस पाठवून कारवाई केली जाईल. रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षांवर हेल्पलाईन नंबरचे स्टीकर लावण्यात आले. यामाध्यमातून प्रवासी आणि नागरिकांना जागरुक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

आरपीफचे निरीक्षक बी. डी. इप्पर, सहाय्यक निरीक्षक नितीन पवार, उपनिरीक्षक एल. के. सिंग, एस. बी. गांगुर्डे, राजश्री आहेर, विनोद सुरवाडकर, विलास चौधरी, वाल्मिक राऊत, रिक्षा संघटनेचे किशोर खडताळे, विजय निरभवणे, रवींद्र गजरमल, इम्तियाज खान, भानुदास कदम, पाराप्पा घुगरे, काशिनाथ कटारे, दत्तू कुलथे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांकडून ‘स्मार्ट’ सूचनांचा पाऊस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश करण्यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्याच्या महापालिकेच्या मोहिमेला चांगले यश आले. स्मार्ट सिटीच्या संकल्पना सूचविण्यासाठी लहान मुलांपासून ते अबालवृद्धानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, महापालिकेला आपल्या सूचना सादर केल्यात. जॉगिंग ट्रॅक, शाळा व शहरात ठिकठिकाणी बुथ उभारून महापालिकेने नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या. या मोहिमेत नगरसेवकांसह विविध भागातील मंडळेही सहभागी झाली.

'स्मार्ट सिटी' योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश झाला असून आता अंतिम वीस शहरांमध्ये नाशिकचा समावेश व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी डिसेंबरमध्ये नाशिकचा आराखडा राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी नाशिककरांकडून 'स्मार्ट सिटी'बाबतच्या सूचना घेतल्या जाणार असून, त्याचा अंतर्भाव या सूचनांमध्ये केला जाणार आहे. त्यासाठी वीजपुरवठा, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, गोरगरिबांना घरकुले, आरोग्य-शिक्षण माहिती तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटलायजेशन, आयटी, ई-तंत्रज्ञानाचा वापर आणि लोकसहभाग, पर्यावरण समतोल, महिला, मुले, ज्येष्ठांची सुरक्षितता आदींचा प्राधान्यक्रम ठरविला जात आहे. त्यासाठी नागरिकांच्या सूचना जाणून घेतल्या जात आहेत. त्या सूचनांसाठी महापालिकेच्या वतीने शहरात 'स्मार्ट सिटी'चा जागर केला गेला.

शहरातील जॉगिंग ट्रॅक, शाळा, मंडळे, गल्लीबोळात जावून नागरिकांकडून सूचना घेण्यात आल्या. नागरिकांनाही त्याला चांगला प्रतिसाद देत आपल्या सूचना सादर केल्या आहेत. 'स्मार्ट सिटी'च्या जागृतीसाठी महापालिकेतर्फे, सायकल रॅली, प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही नागिरकांना चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये शहरातील सर्व जॉगिंग ट्रॅकवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. सोबतच विविध चौक, मंडळे, शाळा या ठिकाणी जाऊन 'स्मार्ट नाशिक' योजनेची माहिती देऊन नागरिकांकडून विहित नमुना माहिती अर्ज भरून घेतले. त्यामुळे महापालिकेचा जागर यशस्वी झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आमदारांच्या घरासमोर घंटानाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीसाठी नाशिकमधील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात भाजप सरकारला जागे करण्यासाठी सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने मंगळवारी भाजपच्या दोन आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आला. आमदार सीमा हिरे यांनी यात सहभागी घेत आंदोलनाची धार कमी केली.

नाशिककरांची नाळ ओळखत हिरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या सुरात सूर मिळवित, पाणी सोडण्याला विरोध केला. तर बुधवारी मुख्यमंत्र्याची भेट घेवून पाणी सोडण्यासंदर्भात वस्तुस्थिती पटवून देवू असे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांच्या घरासमोर आंदोलनाऐवजी चर्चा झाली.

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधातील आंदोलनात भाजप वगळता सर्व पक्षीयांनी सहभाग घेतला होता. शहरात भाजपचे तीन आमदार असूनही पाणी आंदोलनात सहभागी होत नसल्याने व मुख्यमंत्रीही ऐकत नसल्याने कृती समितीच्या वतीने मंगळवारी भाजपच्या आमदारांच्या घरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार होते. त्यासाठी तयारी एक दिवस अगोदरच करण्यात आली. सकाळी अकरा वाजता महापौरांच्या रामायण या बंगल्यावर बैठक होवून आमदार बाळासाहेब सानप यांच्या घराकडे आंदोलकांनी मोर्चा वळवला. पंचवटीतल्या सानप यांच्या घरासमोर सर्वपक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येवून घंटानाद आंदोलन केले. सानप यांनी मात्र त्यापूर्वीच धूम ठोकली होती. महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, आमदार अनिल कदम, जयंत जाधव, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, शिवसेना महानगप्रमुख अजय बोरस्ते, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादी काँग्र‍ेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांच्यासह सर्वांनी सानप यांच्या घरासमोर घंटानाद करत भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलकांनी आपला मोर्चा आमदार देवयानी फरांदे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. मात्र फरांदे परदेशात असल्याने आंदोलकांनी त्यांच्या घराबाहेर आंदोलन करत भाजप विरोधी घोषणाबाजी केली. यानंतर आंदोलकांनी मोर्चा सीमा हिरे यांच्या सावरकरनगरमधील निवासस्थानाकडे वळवला. हिरे यांनी घंटानाद आंदोलन सुरू होण्यासाठी आंदोलनाला पाठींबा जाहीर केला. पाणी सोडण्याला आपला विरोध असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आंदोलकांनी घंटानाद न करता चर्चा केली. मुख्यमंत्र्याशी भेट घेण्याची विनंती आंदोलकांनी केली.

सत्ताधारी एकमेकांसमोर

भाजप आमदार सानप यांच्या घरासमोरील आंदोलनात शिवसेना अनिल कदम सहभागी झाले. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील भाजप आमदारांच्या घरासमोर शिवसेना आमदारांनी केलेली घोषणाबाजी चर्चेचा विषय बनली होती.

मी जागरुक आमदार : हिरे

दोन आमदारांच्या घरावर आंदोलन करून निघालेल्या आंदोलक आमदार हिरेंच्या घरासमोर येताच आश्चर्यचकीत झाले. आमदार हिरेंचे पती महेश हिरे हे स्वतः आंदोलकांच्या स्वागताला बाहेर आले. त्यापाठोपाठ आमदार हिरेही बाहेर आल्या. आपला पाणी सोडण्याला पूर्वीपासून विरोध होता असे सांगत आपण थेट रामकुडांत जावून मेधा पाटकरसारखे आंदोलन करू असे सांगत आम्ही जागृत आमदार असल्याचा टोला आंदोलकांसह आपल्या पक्षातील अन्य आमदारांना लगावला. नाशिककरांच्या भावनांशी आपण सहमत असून मुख्यमंत्र्यांकडे जावून भूमिका मांडू, असे सांगत आंदोलकांना शांत केले. त्यामुळे आदोलकांना आंदोलनाऐवजी चहापान करून माघारी जावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकांच्या घरासमोर निदर्शने करणार

$
0
0

बीएचआरच्या ठेवीदारांचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था (बीएचआर) अवसायनात निघाल्याने संचालकांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा निर्णय ठेवीदारांच्या बैठकीत घेण्यात आला. पतसंस्थेवर आता प्रशासकाची नियुक्ती झाल्याने ठेवी परत मिळणार असल्याचा विश्वास यावेळी उपस्थितांना देण्यात आला.

हुतात्मा स्मारकात जनसंग्राम संघटनेच्या राज्य ठेवीदार संघटनेची बैठक झाली. त्यावेळी ठेवीदारांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे, राज्य संघटक श्रीकृष्ण शिरोडे, जिल्हा समन्वयक एस. व्ही. पानधरे, राजेंद्र नानकर, साहेबराव म्हसे, विना चंदावरकर, झेड. एम. गुंजाळ आदी उपस्थित होते. पतसंस्थेच्या नियंत्रणासाठी अवसायक नियुक्ती करावी, अशी संघटनेने वारंवार मागणी केली. हक्काच्या ठेवींची १०० टक्के रक्कम परत मिळावी, यासाठीच समितीची स्थापना करण्यात आली आहे. ठेवीदारांनी घाबरून जावू नये. सहकार कायदा १९६० च्या कलम १०५ नुसार प्रशासक हे ठावी देण्याचा निर्णय स्वतःच घेवू शकतात, असे शिरोडे यांनी सांगितले. संचालकांची मालमत्ता २१ हजार कोटी रुपये एवढी आहे. तर, पतसंस्थेतील ठेवींची रक्कम १३०० कोटी आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील २६ कोटी रुपयांच्या ठेवींचा समावेश असल्याचे ते म्हणाले. पतसंस्थेच्या २६४ शाखा असून त्यातील ८० टक्के शाखा या स्वमालकीच्या जागेत आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी संयम ठेवावा, असे आवाहन शिरोडे यांनी सांगितले.

पतसंस्थेच्या विरोधात एमपीआयडी कायद्याने दाखल गुन्ह्यात सर्व फिर्यादी व सहतक्रारदार यांना मालमत्ता विकून ठेवी परत मिळण्याचे प्रावधान आहे. संचालक मंडळ वर्षभरापासून पोलिस कोठडीत असल्याने संस्थेवर नियंत्रणासाठी अवसायक नियुक्ती झाली आहे, असे ठाकरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे सिंहस्थ पॅकअप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा गुंडाळण्याचे काम पोलिस प्रशासनाने सुरू आहे. पोलिस चौक्या, वॉच टॉवर यासह बॅरिकेड इत्यादी वस्तूंचे वाटप युध्द पातळीवर सुरू असून राज्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला हे साहित्य वितरित केले जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य पोलिस दलाकडून शहर आणि ग्रामीण पोलिसांसाठी कोट्यवधी रुपयांचे साहित्य देण्यात आले. यापैकी पक्के बॅरकेडींग, पोलिस चौक्या, वॉच टॉवर इत्यादी पायाभूत सुविधा पोलिस प्रशासनाने स्वतः खरेदी केल्यात. नाशिकमधील कुंभमेळ्याचे काम आटोपल्यानंतर हे साहित्य राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोचविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. पोलिस आयुक्तालय, महाराष्ट्र पोलिस अकादमी किंवा ग्रामीण पोलिस दलाकडून पोलिस महासंचालकांकडे या साहित्यासाठी सतत पाठपुरवा होत असतो. पोलिस महासंचालकांकडे येणाऱ्या एकूण मागणीपैंकी आवश्यक ठिकाणी सध्या साहित्य पाठवण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वॉच टॉवरसाठी मुंबई आणि पुणे येथील फोर्स वन आग्रही होते. त्यामुळे वॉच टॉवर फोर्सवनला देण्यात आले.

शहरात जवळपास २० पोलिस चौक्यांची आवश्यकता होती. त्या वगळता इतर पोलिस चौक्या राज्याच्या वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला पाठवण्यात येत असून उर्वरित काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. शहर पोलिसांसाठी एक हजार बॅरकेडींग ठेवण्यात आले असून उर्वरीत १७ ते १८ हजार पक्के बॅरेकेडींग ट्रक तसेच रेल्वेद्वारे रवाना करण्यात येत आहे.

डिजिटल वायरलेस सेट रवाना

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहर पोलिसाना ६३४ डिजिटल वायरलेस सेट देण्यात आले होते. राज्यातील काही पोलिस आयुक्तालय आणि नाशिक ग्रामीणसह इतर ठिकाणी डिजीटल वायरलेस सेट वापरले जातात. नाशिक शहर पोलिसांकडे अद्याप अॅनालॉग पध्दतीचे वायरलेस सेट असल्याने सर्व डिजीटल वायरलेस सेट परत पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून येणाऱ्या आदेशाप्रमाणे साहित्याचे वाटप केले जात आहे. काही पोलिस चौक्यांमधील वीज पुरवठा खंडीत करायचा असून तो झाल्यानंतर त्याही काढून घेण्यात येतील. साहित्याचे वितरण करण्यासाठी रस्त्यासह रेल्वे मार्गाचा वापर होतो आहे. शहर पोलिसांना आवश्यकतेनुसार साहित्य उपलब्ध आहे.

- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाट्य परिषदेकडून मर्जीतल्यांनाच पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमीदिनानिमित्त जाहीर झालेले विविध पुरस्कार म्हणजे आपल्या मर्जीतीलच कलावंतांना खिरापत वाटण्याचा प्रकार असून पुरस्कारपात्र असे वयोवृध्द रंगकर्मी असतांनाही भलत्यांनाच पुरस्कारमूर्ती करण्याचा घाट नाट्य परिषदेने घातला असल्याचे काही ज्येष्ठ रंगकर्मींचे म्हणणे आहे.

नाशिकमधील अनेक ज्येष्ठांना डावलून अलिकडच्या रंगकर्मींना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची तक्रार काही रंगकर्मींकडून करण्यात आली आहे. नाट्य परिषदेने जाहीर केलेल्या पुरस्कारांना वादाचा इतिहासच आहे. गेल्याच वर्षी श्याम दशपुत्रे यांना संगीतातील दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देऊन परिषदेने वाद ओढावून घेतला होता. तसेच रंगभूषेचा पुरस्कार जाधव यांना देण्यात आल्यानेही बरेचसे वादंग उठले होते. असे असताना नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये परिषदेचे खजिनदार असलेल्या रवींद्र ढवळे यांना पुरस्कार देऊन नवा वाद परिषदेने उभा केला आहे. ढवळे यांचे दिग्दर्शनातील काम मोठे असले तरीही ते परिषदेवर असल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाच कसा असा रंगकर्मींच्या आक्षेपाचा आक्षेप आहे.

पूर्वी लोकहितवादी मंडळ, लोकरंजन, नाट्य संघाच्यावतीने राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नाटके सादर केली जात असत. त्यात डॉ. काशिनाथ तथा बाळ घोलप, नीलमताई किर्लोस्कर, इंदूमती शर्मा, श्यामला नाडगौडा आदींनी तात्यासाहेबांच्या अनेक नाटकांतून प्रभावी भूमिका केलेल्या आहेत. आज या सर्व कलावंतांची आयुष्याची सायंकाळ सुरू आहे. अशातच नाट्य परिषदेतर्फे सहा स्मृती पुरस्कार जाहीर केले जातात, मात्र त्यात यातील एकही वयोवृध्द रंगकर्मी नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. १९८४ मध्ये 'कट्यार काळजात घुसली' चा प्रयोग परशुराम सायखेडकर नाट्यगृहात करण्यात आला होता. त्यात खाँसाहेबांची भूमिका करणारे वयोवृध्द ज्येष्ठ रंगकर्मी यशवंतराव खाडीलकर या पुरस्काराच्या निकषात बसले नाहीत काय, असा सवाल नाट्य परिषदेला करण्यात आला आहे.

पार्श्वसंगीतासाठी पुरस्कार नाहीच

पुरस्कारांमध्ये संगीत विषयाचा समावेश केला गेलेला नाही. दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय स्त्री-पुरूष, रंगभूषा, प्रकाश योजना असा सहा पुरस्कार दिले जातात. रवींद्र अग्निहोत्री, नवीन तांबट यासारखे ज्येष्ठ संगीतकार असताना संगीतासाठी नाशिकमध्ये एकही नाव परिषदेने निश्चित करू नये यासारखी शोकांतिका आणखी कोणती याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय तपासणी नको रं ‘दादा’…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हायपर टेन्शन, मधुमेह, ह्रदयविकारासंबंधित विविध आजार समोर आले तर विभागाची नसती कटकट मागे लागेल, अशा भितीपोटी पोलिस कल्याण विभागातर्फे आयोजित वैद्यकीय तपासण्यांना पोलिस कर्मचाऱ्यांकडून सातत्याने पाठ दाखवली जाते आहे.

पोलिस कल्याण विभागाकडून पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यात वैद्यकीय तपासणीचा सुध्दा सहभाग असतो. चालू वर्षात जून महिन्यापासून पाच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये या तपासण्या घेण्यात आल्या. कोलेस्ट्रॉल, मधुमेह यांसह इतर फिटनेससंबंधी तपासण्यांचा यात अंतर्भाव असतो. समोर आलेल्या चाचण्यांच्या अहवालानुसार पोलिसांना आपल्या जीवनशैलीत बदल करणे अपेक्षित असते. दुर्दैवाने या वैद्यकीय चाचण्यांकडे पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून सर्रास दुर्लक्ष केले जाते आहे. चालू वर्षात तीन हजार पोलिस कर्मचाऱ्यांपैकी अवघ्या २३७ पोलिसांनी वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. शहरातील पाच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील दोन हॉस्पिटलमध्ये जून महिन्यापासून हे काम सुरू असून गत पाच महिन्यात अवघ्या १५० पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण केल्यात. याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, पोलिसांचे काम फिटनेसवर अवलंबवून असते. कामांच्या वेळा आणि खाण्यापिण्याची पथ्ये पाळणे शक्य होत नाही. परिणामी, अनेक कर्मचारी निवृत्तीच्या खूप पूर्वी अनफिट होण्याची शक्यता असते. अशा अनफिट कर्मचाऱ्याबाबत पोलिस विभाग काय निर्णय घेईल, अशी चिंता असल्याने अनेकदा कर्मचारी वैद्यकीय तपासण्यांकडे दुर्लक्ष करतात, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी कर्मचाऱ्यांना नव्या अध्यादेशानेच वेतन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घंटागाडी कर्मचाऱ्यांना सन २०१५ च्या किमान वेतन अध्यादेशाप्रमाणेच किमान वेतन देण्याचे आदेश कामगार आयुक्तालयाने दिले आहे. २०१० चा अध्यादेश नजरचुकीने दिला गेल्याची कबुली कामगार विभागाने दिल्यानंतर पालिकेने तातडीने ठेकेदारांना पत्र देवून दोन दिवसांत घंटागाडी कर्मचाऱ्यांना नवीन अध्यादेशाप्रमाणे किमान वेतन देण्याचे आदेश दिले आहेत.

घंटागाडी कर्मचाऱ्याच्या अध्यादेशासंदर्भात महापालिका व कामगार उपायुक्तामंध्ये टोलवाटोलवी सुरू होती. अखेरीस कामगार उपायुक्त कार्यालयाने फेब्रुवारी २०१५ च्या अध्यादेशाप्रमाणे किमान वेतन द्यावे लागेल, असा खुलासा केला. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा करीत, ठेकेदारांना नव्या आदेशाप्रमाणे किमान वेतनचे देण्याचे आदेश काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस स्टेशन सीसीटीव्हीच्या ‘टप्प्यात’

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : शहरातील ११ पोलिस स्टेशनमध्ये लवकरच सीसीटीव्ही बसविण्यासाठी सर्व्हे सुरू झाला आहे. पोलिस कोठडीत असताना संशयितांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, याची गंभीर दखल घेत सहा महिन्यांमध्ये पोलिस स्टशेनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश हायकोर्टाने गृह विभागाला दिले आहेत.

पोलिस स्टेशनमधील कार्यपध्दतीबाबत सर्वसामान्य नागरिकांची नेहमीच ओरड असते. त्यातच पोलिस कोठडी सुनावल्यानंतर चौकशीदरम्यान पोलिसांच्या मारहाणीत संशयितांचे मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक पध्दतीने वाढले आहे. नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डच्या आकडेवारीत हे स्पष्ट झाले. याची गंभीर दखल घेत मुंबई हायकोर्टाने राज्यातील पोलिस स्टेशनमध्ये सहा महिन्याच्या कालावधीत सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्याच्या पोलिस महासंचालकांनी पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना आदेशाची पूर्तता कळवण्याबाबत कळवले आहे. नाशिक शहरात ११ पोलिस स्टेशन असून, प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये किती सीसीटीव्ही असावेत, त्यांची कनेक्टिव्हीटी कशी असेल याचा सर्व्हे सुरू झाला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली. ज्या पोलिस स्टेशनमध्ये कस्टडीची सुविधा आहे, त्यांनाच सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश आहेत. मात्र, नाशिक शहरात अवघे ११ पोलिस स्टेशन असून, सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे विजय पाटील यांनी स्पष्ट केले.

पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसावेत, अशी खूप जुनी मागणी आहे. यामुळे फिर्याद देण्यासाठी येणाऱ्या सर्वसामन्य नागरिकांना नेमकी काय वागणूक मिळते, याचा पुरावा उपलब्ध होऊ शकतो. चार भिंतीतील आर्थिक तडजोडी सुध्दा सीसीटीव्हीच्या टप्प्यात येऊ शकतात. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बऱ्याच वर्षे यासाठी प्रयत्न केला. मात्र, तो सफल झाला नाही. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दोन ते तीन वर्षापूर्वी सीसीटीव्ही लावण्यात आले होते. मात्र, ते काही महिने चालले नाही. या पार्श्वभूमीवर नव्याने बसवण्यात येणारी यंत्रणा प्रभावी ठरण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच कडक धोरण स्वीकारणे आवश्यक आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यात सीसीटीव्ही कार्यान्वित होतील. शहरातील सर्वच पोलिस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

- विजय पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात चेन स्नॅचर पुन्हा सक्रिय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वेगवेगळ्या भागात चेन स्नॅचर्स अधून-मधून स्त्रीधनाची लूट करीत आहेत. गत दोन दिवसात स्नॅचर्सने सरकारवाडा आणि उपनगर पोलिस स्टेशन हद्दीत दोन महिलांच्या गळ्यातील अनुक्रमे ३५ आणि ४० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र तोडून पोबारा केला.

स्नॅचिंगची पहिली घटना त्र्यंबकरोडवर टीएनटी कॉलनी येथे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मिरापार्क येथे राहणाऱ्या कल्पना प्रकाश शिंपी (५३) या आपल्या मुलीसोबत पायी जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र तोडून पोबारा केला. स्नॅचिंगची दुसरी घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता चोपडा लॉन्स येथील रस्त्यावर घडली. पंचवटी कारंजा परिसरातील मिना एकनाथ काळे (४६), चोपडा लॉन्स येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये सोन्याची पोत हातोहात लांबवली. या दोन्ही घटनांची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.

दुचाकीस्वाराचा मृत्यू भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेटचालकाने डिव्हायडरला धडक दिल्याने यात बुलेटचालक श्रावण बाळुजी पवार (५३) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास श्रमीकनगर परिसरातील महादेव मंदिराजवळील अंकित सोसायटी येथे घडली. उत्तम बारकु पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

कारची चोरी

आडगाव शिवारातील रामनाथनगर येथील नवकार रो हाऊस येथे राहणाऱ्या दादा रायसिंग सोळंके (४१) यांची घरासमोर पार्क केलेली अल्टो कार (एमएच १५ पी ४२७३) चोरट्यांनी चोरी केली. ही घटना ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत घडली.

अपहरण आणि मारहाण

आर्थिक कारणावरून अंबड परिसरातील तानाजी चौक येथे राहणाऱ्या शांताराम दशरथ जगताप (४२) यांचे पाच जणांनी अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी जितेंद्र कुटे व त्याच्या चार साथिदारांनी अशोका मार्गावरील सिध्दीविनायक सोसायटी येथे फिर्यादीस बोलावले. तिथून एमएच १५ डीएम ५५९५ रा कारमध्ये बसवून फिर्यादीस शिर्डी, त्र्यंबकेश्वर, नांदूरनाका येथे नेऊन मारहाण केली. हा प्रकार पोलिसांना सांगितला असता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>