Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अदखलपात्र गुन्हा होतो दखलपात्र

$
0
0

अरविंद जाधव । नाशिक

कॉलेज कॅम्पस, रहिवाशी भागातील कट्टा, छेडछाड किंवा वर्चस्ववाद या सारख्या किरकोळ कारणातून होणाऱ्या छोट्या-मोठ्या हाणामारीच्या घटनांमध्ये अनेकदा पोलिस स्टेशनमध्ये तडजोड केली जाते. फारतर अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद होऊन दोन्ही पार्ट्यांना सोडले जाते. मात्र, हे अदखलपात्र गुन्हे हत्येच्या कारणांचे मूळ ठरत असून, त्याची पोलिसांना गंभीर नोंद घ्यावी लागणार आहे.

शहरात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्याच्या काळात झालेल्या ३८ हत्यांच्या घटनांमध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून १० जणांचा बळी घेतला गेला आहे. यातील बहुतांश गुन्ह्यातील आरोपी आणि मयतांच्या पूर्वीच्या भांडणाबाबत पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होती, हे महत्त्वाचे. पूर्व वैमनस्यातून होणाऱ्या हत्येच्या घटनांमध्ये अटक केलेल्या आरोपींमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरूणांचा सर्वाधिक समावेश आहे. बळी गेलेल्यांमध्ये याच वयोगटातील मुलांचा संबंध आहे. यंदा एकूण हत्यांच्या घटनांपैकी सरासरी २६ टक्के हत्या पूर्वीच्या भांडणामुळे झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करणाऱ्या पोलिसांची जबाबदारी कैकपटीने वाढली आहे.

झोन दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, खुनाच्या घटनांमध्ये क्षणिक राग आणि नातेसंबंध यांचा सर्वाधिक संबंध असतो. नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर, इंदिरानगर, सातपूर आणि अंबड या नाशिक परिमंडळ दोनमध्ये ३८ पैकी २० हत्या झाल्याची नोंद आहे. यातील, ७ खुनाचे प्रकार पती-पत्नीशी संबंधीत होते. ४ हत्यांच्या घटनांमध्ये नातेवाईकांना अटक झाली. तर सर्वाधीक म्हणजे ९ खून पूर्वीच्या भांडणाची कुरापत काढून करण्यात आले. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी यापुढे अदखलपात्र गुन्हा नोंदवताना विशेष काळजी घेतली जाईल, असेही उपायुक्त धिवरे यांनी स्पष्ट केले. हाणामारी किंवा दमदाटीसारख्या प्रकरणांमध्ये सीआरपीसी १५१ नुसार अटक करणे उचित ठरू शकते. तसेच, अदखलपात्र गुन्हा दाखल होणाऱ्या संशयितांची पार्श्वभूमी काय? त्याच्यावर यापूर्वी किती गुन्हे दाखल आहेत, याचा अभ्यास करूनच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय यापुढे घ्यावा लागेल. अल्पवयीन किंवा युवकांमध्ये असे प्रकार सर्वाधिक असून जनजागृतीच्या आधारे हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे, असे आवाहन उपायुक्त धिवरे यांनी केले.

यंदा खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी बहुतांश गुन्ह्यातील आरोपींना लागलीच अटक झाली. यात, नातेवाईक आणि मित्र परिवाराचा सर्वाधिक समावेश होता. पूर्वीच्या भांडणामुळे होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी काही प्रतिबंधक उपाययोजना राबवणे शक्य असून, त्यावर अंमलबजावणी केली जाईल. - श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापतीपदी खैरे बिनविरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाआघाडीत सहभागी असूनही महिपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसला महिला काँग्रेस सभापतीपदाच्या रूपाने प्रथमच स्थान मिळाले आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरे, तर उपसभापती मनसेच्या शीतल भामरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या नंदिनी जाधव यांनी सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

महापालिकेत मनसे, राष्ट्रवादी,काँग्रेस व अपक्षांची महाआघाडी असली तरी, सत्तेत काँग्रेसला अद्याप वाटा मिळालेला नव्हता. अनेक वेळा काँग्रेसने यासाठी मनसे राष्ट्रवादीवर दबाव वाढवला होता. शिक्षण समितीवरच काँग्रेसने दावा केला होता. मात्र, अपक्षांनीच बाजी मारली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी होती. महिला व बालकल्याण समितीवरही काँग्रेसने दावा सांगितला होता. अखेरीस मनसे व राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेत वाटा देण्याचे कबूल करीत, समितीचे सभापतीपद देवू केले. या समितीसाठी काँग्रेसने वत्सलाताई खैरे यांनी संधी दिली होती. तर उपसभापतीपद मनसेनेच आपल्याकडे ठेवले होते. मनसेच्या वतीने शीलत भामरे यांना संधी देण्यात आली होती.

बुधवारी समितीची निवडणूक पार पडली. सभापतीपदी वत्सलाताई खैरे, तर उपसभापती पदासाठी शीतल भामरे यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या वतीने नंदिनी जाधव यांनी दोन्ही पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी बुधवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बागडे यांनी खैरे व भामरे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यावर कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. समितीच्या ९ सदस्यांपैकी ८ सदस्यांनीच निवड प्रक्रियेत सहभाग घेतला. आरपीआयच्या सुनील वाघ यांनी निवडणूक प्रक्रियेपासून अंतर राखले होते.

केंद्र व राज्य सरकारच्या महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. महापालिकेच्या बजेटमधून अधिकचा निधी मिळवून महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला जाईल. सर्वांना सोबत घेऊन विकासाला आपले प्राधान्य असेल. - वत्सला खैरे, सभापती महिला व बालकल्याण, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५० जणांचे सामूहिक तबलावादन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कापड पेठेतील बालाजी मंदिरात गुरुवारी दीडशे तबला वादकांच्या सहवादनाने वातावरण चैतन्यमय झाले होते. यावेळी 'अनुभूती' हा तबला सहवादनाचा आविष्कार सादर करण्यात आला. नाशिकमध्ये ५ हजारांहून अधिक मुले-मुली हे तबल्याचे शिक्षण घेतात. त्यामध्ये नाशिकमधील विविध नामांकित तबला क्लासेसची तब्बल १५० लहान मुले आणि ३५ तरुण मुला-मुलींनी 'त्रिताल' आणि 'झपताल' यांचे सुंदर पद्धतीने वादन केले. यावेळी 'अनुभूती' च्या सह‍वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. ऋग्वेद तबला अकादमी, अदिताल तबला अकादमी, पवार तबला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने

'अनुभूती' कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. हा कार्यक्रम कापड पेठेतील बालाजी मंदिरात झाला. कार्यक्रमात तीनही अकादमीच्या १५० वादकांनी सहवादन केले, सुरुवातीला ९० लहान मुलांचे तबला वादन झाले यात त्यांनी त्रिताल सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात कायदा पल्ट्यांच्या वादनाने झाली 'धाती धाती धाधा धीना' हा कायदा वाजवून आपल्या वादनाचे कौशल्य उपस्थितांसमोर पेश केले. त्यानंतर 'धाधा तिरकीट धाधा तूना' हा कायदा पल्टा वाजवला. पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात रेले, तुकडे यांचे वादन झाले. हा कार्यक्रम २५ मिनिटे सुरु होता. त्यानंतर मोठ्या मुलांच्या तबला सहवादनाला सुरुवात झाली. मोठ्या मुलांनी झपताल सादर केला. झपतालातील पारंपरिक बंदीशी सादर करीत उपस्थितांना ताल धरायला लावला. यात पेशकार, कायदा, रेला, तुकडे, मिश्र जाती कायदा तुकडे मुखडे चक्रदार सादर केले. तबला सहवादनाचा हा नववा कार्यक्रम होता. कार्यक्रमाची संकल्पना नितीन पवार व नितीन वारे यांची होती गिरीश पांडे, सुजीत काळे, गौरव तांबे, रसिक कुलकर्णी, दिगंबर सोनवणे, जयेश कुलकर्णी, अमित भालेराव, रुपक मैद, यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य काले. संध्याकाळी उशिरा पर्यंत सुरु असलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व रसिक उपस्थित होते.

बालाजी मंदिरात २०१३ मध्ये ५० मुलांच्या साथीने या प्रयोगाची सुरुवात झाली होती. त्यानंतर नाशिकमधील विविध मंदिरांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या अनुभूती कार्यक्रमांचे सादरीकरण व्हायला लागले. आता या मध्ये मुलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. विशारद, अलंकार उत्तीर्ण झालेली आणि विशारद परीक्षा देत असलेली मुले सहभागी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला प्रतीक्षा दोनशे कोटींची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात राज्य सरकारच्या वाट्यातील ६८९ कोटींपैकी पालिकेला अद्याप २०२ कोटींची प्रतीक्षा आहे. सिंहस्थ कामांचे आतापर्यंत ५७५ कोटींचे वाटप करण्यात आले आहे, तर ३५० कोटींची बिले कोषागरात येणे बाकी आहे. सोबतच मंजूर साडेतीनशे कोटींच्या कर्जापैकी पालिकेने ७० कोटींचीच उचल घेतली आहे. पालिकेची सध्याची परिस्थिती ठिकठाक असली तरी भविष्यात पालिकेच्या डोलाऱ्याला हादरा बसण्याची चिन्हे आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर आता ठेकेदारांची बिले सादर करण्याची लगीन घाई सुरू आहे. पालिकेची आर्थिक स्थिती डामडोल असल्याने पालिकेने ३५० कोटींचे कर्ज घेतले आहे. तर सिंहस्थ आराखड्यातील ९१९ कोटींपैकी २३० कोटींचा भार पालिकेला उचलायचा आहे. पालिकेने मंजूर केलेल्या सिंहस्थ आराखड्यातील कामांपैकी आतापर्यंत ५७५ कोटींची बिले ठेकेदारांनी काढली आहेत. तर शासनाकडून ४८७ कोटी रुपये आलेले असून, २०२ कोटी रुपये अद्याप येणे बाकी आहे. सिंहस्थासाठी मंजूर केलेल्या ३५० कोटींच्या कर्जापैकी पालिकेने आतापर्यंत ७० कोटींचे कर्ज उचलले असल्याची माहिती लेखा विभागाने दिली आहे.

सिंहस्थ कामे झालेल्या ठेकेदारांची बिले सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, सध्या कोषागारात जवळपास २० कोटींची बिले सादर आहेत. आर्थिक स्थिती बरी असल्याने ती देण्यास अडचण नाही. जवळपास अजून ३५० कोटींची बिले अद्याप सादर होणे बाकी आहे. टप्प्याटप्याने ही बिले सादर केली जातील. त्यानुसार कर्जाची उचल घेतली जाणार असल्याचे लेखा विभागाने स्पष्ट दिली. संपूर्ण बिले सादर झाल्यानंतर व कर्ज पूर्ण घेतल्यानंतर मात्र आर्थिक स्थिती डामडोल होण्याचे संकेत आहेत. एलबीटी कमी, उत्पन्नाचे स्रोतही कमी असल्याने कर्ज फेडण्यासह कर्मचारी व विकासकामांचे वेतन अदा करण्याचेही बळ पालिकेकडे राहणार नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सानुग्रह अनुदान ऐरणीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी तोंडावर येवून ठेपल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदानासाठी प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवला आहे. मनसेचे सभागृह नेते सलिम शेख यांनी कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तर पालिका कामगार-कर्मचारी संघटनेने २१ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे. तर मागील वर्षी जाहीर केलेले पूर्ण अनुदान कर्मचाऱ्यांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे थकीत सानुग्रह अनुदानासह रक्कम मिळावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

महापालिकेत साडेपाच हजार कर्मचारी असून, दरवर्षी या कर्मचाऱ्यांना दिवाळीत सानुग्रह अनुदान दिले जाते. गेल्यावर्षी प्रत्येकी १३ हजार रुपयांचे अनुदान जाहीर झाले होते. मात्र, आर्थिक स्थितीचे कारण देत, आयुक्तांनी केवळ ११ हजार रुपयेच मंजूर केले. उर्वरित दोन हजार रुपये अद्याप दिलेले नाहीत. चालू वर्षात सिंहस्थात महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे शाबासकी म्हणून २१ हजार रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या

वतीने करण्यात आली आहे. २० टक्के बोनससह ही रक्कम मिळावी अशी मागणी त्यांनी आयुक्त व महापौर यांच्याकडे केली आहे. तर सलिम शेख यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, रोजदांरी कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी मदतनीस, सेविका यांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान दिल्यास महापालिकेच्या तिजोरीवर १२ कोटींच्या वर भार पडतो. सध्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्याला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यातला घोडाबाजार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

हौसेला मोल नसते असे नेहमीच म्हटले जाते. देखणा अन् तगडा ऐटबाज घोडा असावा असं वाटणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही. येवला येथे घोडे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सहा हजारापासून दीड लाखापर्यंत घोड्यांना किमत मिळाली. दसऱ्यापूर्वी भरलेला हा बाजार लक्षवेधी ठरला.

महाराष्ट्रात विविध ठिकाणचे घोडा बाजार आजही आपली विशेषतः जपून आहेत. सारंगखेडा येथील प्रसिध्द घोडेबाजार वर्षभरातून एकदाच भरतो तो दत्त जयंती निमित्त. शिरपूर येथील घोडे बाजार दांडी पौर्णिमेला तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचा घोडे बाजार कार्तिकी एकादशीला. या सर्व ठिकाणच्या घोडा बाजाराला कालमर्यादा आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मंगळवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी भरणारा घोडे बाजार हा वर्षभर अगदी अव्याहतपणे चालत असतो, ही मोठी खासियत.

यंदाच्या दसरा सणाच्या अगोदर मंगळवारी भरलेला येथील घोडाबाजार सर्वांचेच लक्ष वेधणारा ठरला. एरवी आठवडे बाजारात जवळपास १०० च्या आसपास घोडे दाखल होत असतात. मात्र, यंदाच्या दसऱ्याच्या अगोदरच्या खास घोडा बाजारात ४५० च्या वर घोडे दाखल झाले होते. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत बाजार समितीचे आवार अगदी फुलून गेले होते. पंजाब, मारवाड, शिरपूर, काठेवाड, सिंधी, गावरान आदी जातींचे व देवमन, पंचकल्याण, चार पाय सफेद, अबलक, मुकरा अशा अनेक गुणांचे घोडे या मंगळवारच्या घोडा बाजारात दाखल झाले होते.

घोडे खरेदी-विक्री व्यवसायात आज आमची पाचवी पिढी कार्यरत आहे. आमचे पूर्वज म्हसू वाघ, पिराजी वाघ हे त्यांच्या काळात हा व्यवसाय करायचे. दर मंगळवारी भरणारा व वर्षभर चालणारा येवल्यातील घोडे बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. आजच्या मंगळवारच्या विशेष बाजारात अनेक जातींचे घोडे अगदी मोठ्या संख्येने दाखल होताना त्याची अनेकांनी खरेदी-विक्री केली. - पोपट वाघ, घोडे व्यापारी, पिंपळगाव जलाल

दीड लाखापर्यंत किमत

येवल्यातील मंगळवारच्या या घोडे बाजारात १० हजारांपासून चार लाखांच्या आसपास किमतीचे अनेक घोडे आले होते. या बाजारात झालेल्या सौदेबाजीत सर्वाधिक १ लाख ३४ हजार किमतीचा घोडा खरेदी केला गेला. एकूण ६० घोड्यांची खरेदी-विक्री झाली. येवला बाजार समितीत २ ते ३ लाख रुपये किमतीचे तगडे ऐटबाज घोड्यांची देखील आजपावेतो खरेदी विक्री झालेली आहे. प्रसिद्ध सिने अभिनेता निर्माता महेश मांजरेकर यांना देखील येथील घोडे बाजाराचा मोह आवरता आला नव्हता. वर्षांपूर्वी त्यांनी येवला घोडा बाजाराला भेट देत ऐटबाज घोडा खरेदी केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय

$
0
0

नाशिक : 'स्पा' व्यवसायाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. पोलिसांनी सहा संशयित तसेच १६ मुलींना ताब्यात घेतले आहे. कॉलेज रोड, गंगापूर रोड तसेच थत्तेनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ब्युटी पार्लर आणि `स्पा`च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मात्र गंगापूर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याचे समजते. सहायक पोलिस आयुक्त डॉ. भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी सकाळी अकरापासून गंगापूर रोड, थत्तेनगर आणि कॉलेजरोडवरील `स्पा`वर धाडी टाकल्या. पोलिसांनी तीनही ठिकाणांहून १६ मुलींना तसेच अन्य सहा जणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझर अखेर हवाई नकाशावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला हवाई वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने असलेला मोठा अडथळा दूर झाला आहे. ओझर विमानतळ हे आता हवाई नकाशावर आले आहे. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाला पत्र दिले आहे.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांना ठराविक ठिकाणच्या विमानतळाला पर्यायी विमानतळ हे हवाई नकाशावरच दिसून येते. शिवाय, काही अडचण असल्यास ही विमाने पर्यायी विमानतळाकडे जातात. आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या मुंबईला पर्यायी विमानतळ म्हणून ओझरचे नाव घेतले जात असले तरी प्रत्यक्षात हवाई नकाशावर ओझर उपलब्ध नसल्याची बाब हिन्दुस्थान एअरोनॉटिक्सलिमिटेड (एचएएल)ने दोन महिन्यांपूर्वी घेतलेल्या विमान कंपन्यांच्या बैठकीत उघड झाली. त्यानंतर ओझर विमानतळाला हवाई नकाशावर आणण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या. खासदार हेमंत गोडसे यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या सांगितली. त्यानंतरही विविध संघटनांनी याबाबत ठोस पाठपुरावा केला. अखेर नागरी विमान वाहतूक महासंचालक डी. सी. शर्मा यांनी एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षांना पत्र देवून ओझरला हवाई नकाशावर आणण्यासंदर्भातची मान्यता दिली आहे. त्यामुळे नाशिकहून प्रवासी वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अडथळ्यांची शर्यत पार

ओझरहून प्रवासी विमान वाहतूक सेवा उपलब्ध होण्याबाबत वारंवार विविध अडथळे समोर आले. पॅसेंजर टर्मिनलची अनुपलब्धता, हवाई नकाशावरील उपलब्धता, डीजीसीएची मान्यता आदींचा त्यात समावेश आहे. मात्र, आता हे सर्व अडथळे पार झाल्याने खासगी विमान कंपन्यांना सेवेसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने ठोस पाठपुरावा आवश्यक आहे.

ओझर हवाई नकाशावर यावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता ओझरहून हवाई सेवा सुरू होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. - हेमंत गोडसे, खासदार

मुंबईला ओझरचा पर्याय

मुंबईच्या जवळपास एकूण चार विमानतळ आहेत. त्यात गोवा, पुणे, ओझर आणि सुरत यांचा समावेश आहे. मात्र, हे चारही विमानतळ संरक्षण दलाच्या अधिपत्याखाली असल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना हवाई नकाशावर मुंबईला थेट अहमदाबाद विमानतळाचा पर्याय दिसतो. आता ओझर हवाई नकाशावर आल्याने मुंबई विमानतळाला जवळचा आणि सक्षम पर्याय निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खरेदीचा साधला मुहूर्त

$
0
0

रिअल इस्टेट, सोने, होम अप्लायन्स, टेक्नॉलॉजीला प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांनी बाजारपेठेतील विविध सोयी-सवलतींचा लाभ घेत बहुविध वस्तूंची खरेदी केली. त्यामुळेच विजयादशमीच्या निमित्ताने शहर परिसरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. मोबाइल लॅपटॉपसह ऑनलाईन बाजारपेठही तेजीत असल्याचे पहायला मिळाले.

१०० घरांचे बुकिंग

शहर परिसरात असंख्य गृह प्रकल्प कार्यरत आहेत. छोट्या अपार्टमेंटपासून मोठ्या गृह प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. वन बीएचके, टू बीएचके, थ्री बीएचके यासह लक्झुरिअस, लेव्हिश प्रकारच्या घरांना ग्राहकांची पसंती आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर घरांचे बुकींग करण्याला प्राधान्य होते. काही ग्राहकांना घराचा ताबा मिळाल्याने त्यांच्यातही अतिशय समाधानाचे वातावरण होते. ग्राहकांना हव्या असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देतानाच अत्याधुनिक दर्जा आणि संकल्पनांनी साकारणारे गृहप्रकल्प हे नाशिकचे वैशिष्ट्य असल्याचे मत बांधकाम व्यावसायिक अभय तातेड यांनी व्यक्त केले. दसऱ्याच्या निमित्ताने सॅम्पल फ्लॅट बघायला जाणाऱ्या ग्राहकांना विशिष्ट वाहनातून नेण्याची सोयही काही व्यावसायिकांनी गुरुवारी केली होती.

ग्राहकांची 'स्मार्ट' खरेदी

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर लॅपटॉप, स्मार्टफोन, नोटबुक, नोटपॅड सारख्या डिजिटल गॅजेटसची मोठी खरेदी केली. शहरातील नामांकीत शोरुम्स, मॉल्ससह मोबाईल दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मूळ किंमतीत सवलत तसेच विविध वस्तू फ्री दिल्या.

ब्रँडेड वस्तूंचे खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिल्याचे पहायला मिळाले.

होम अप्लायन्सेस जोरात

फुड प्रोसेसर, मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशिन, फॅन, एसी, ओव्हन, ड्रायर यासारख्या बहुविध होम अप्लायन्सेसला मोठी मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आकर्षक आणि अधिक कार्यक्षम अशा उत्पादनांची दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. म्हणूनच या उत्पादनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचे या क्षेत्रातील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दसऱ्याच्या निमित्तानेही ग्राहकांनी होम अप्लायन्सेसला पसंती देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

ऑनलाइन बाजारपेठ तेजीत

काही वर्षांपासून ऑनलाइन बाजारपेठेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. दसऱ्याच्या दिवशीही फ्लिपकार्ट, मिंत्रा, स्नॅपडील, अमेझॉन यासारख्या विविध ऑनलाईन वेबसाईटवरील ऑफर्सचा लाभ घेत ग्राहकांनी खरेदी केली. तसेच, काही दिवसांपूर्वी केलेल्या खरेदीची पोहोच ग्राहकांना दसऱ्याच्या दिवशी मिळाल्याने ग्राहकांमध्ये मोठे समाधान होते. त्यामुळेच शहरातील अनेक भागात डिलेव्हरी बॉय ठिकठिकाणी दृष्टीस पडत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रत्येक घरात खंडेराय जन्मतो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

खंडेराय प्रत्येकाच्याच घरी जन्माला येत असतो. त्याला घडविण्याचे कार्य आपल्याला करावे लागते. व्यायामाने मान अभिमान गळून पडतो. प्रत्येकाने नियमित व्यायाम करा, व्यसनांपासून दूर रहा, असे प्रतिपादन टीव्हीवरील जय मल्हार मालिकेत खंडेरायाची भूमिका करून प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवणारे अभिनेते देवदत्त नागे यांनी केले.

जेलरोड येथील दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्या लकी ड्रॉ स्पर्धेतील विजेत्यांना नागे यांच्याहस्ते पारिषोतिक वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. योगेश जोशी यांनी नॅनो कार, ही बी. पी. जोगारे यांनी सीडी डॉन तर कृष्णकांत भामरे यांनी प्लेजर गाडी जिंकली. नगरसेवक व संयोजक शैलेश ढगे यांनी नागे यांचे स्वागत केले. आवडत्या खंडेरायाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने सायखेडा रोडची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. चंद्रशेखर सरोदे यांनी प्रास्तविक केले. प्रशांत बाळापुरे यांनी सूत्रसंचलन केले, राजेंद्र तुपे यांनी आभार मानले. सुनील ढगे, कैलास ताजनपुरे, प्रमोद फडोळ, कैलास कानमहाले, नितीन शार्दुल आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी उपोषणाला महिलांचाही पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

सिडकोतील प्रभाग क्रमांक ५२ मध्ये पाच दिवसांपासून पाणी पुरवठाच्या विरोधात सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला महिलांनी देखील पाठिंबा देत आपला सहभाग नोंदवला. महापालिका व लाच लुचपत प्रतिबंधक विभाग महापालिकेच्या पाणी पुरवठाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे अनिल गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

नवीन नाशिक सिडकोतील पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक ५२ मध्ये पाणी पुरवठ्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या विरोधात जनजागृती अभियान केंद्राचे जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. लाचलुचपत विभागाने महापालिकेच्या संबधित भ्रष्टाचारी असलेल्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे गायकवाड यांनी केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाच्या खालीच गायकवाड आपल्या सहकाऱ्यांसह उपोषणाला बसले आहेत. पाच दिवसांपासून उपोषणला बसलेल्या कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी महिलांनी सहभाग नोंदविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरूच राहणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांची कारवाई सुरूच राहील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, रिक्षा व्यवसायाची प्रतिमा उंचावण्यासाठी रिक्षाचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त श्रीकांत धीवरे यांनी केले.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात रिक्षाचालकांच्या बैठकीत ते बोलत होते. सहाय्यक आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, अशोक भगत, वाहतूक शाखेचे हनुमंत गाडे, गंगाधर देवडे, भीमराव गायकवाड तसेच शिवसेनेचे शिवाजी भोर, डॉ. गिरीष मोहिते, शशी उन्हवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रिक्षाचालकांचा संसार उघड्यावर आणण्यासाठी नाही तर या व्यवसायात शिस्त आणण्यासाठी ही कारवाई सुरुच राहील असे सांगून धीवरे म्हणाले, की रिक्षा परवाना, परमिट, बिल्ला, ड्रेसकोड नसणाऱ्या, प्रवाशांना लुटणाऱ्या, अमानुषपणे प्रवाशी कोंबणाऱ्या, गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई सुरूच राहील. स्क्रॅप रिक्षा, गुंड प्रवृत्तींच्या रिक्षाचालकांची माहिती व फोटो ९०७५०११२२२ या मोबाइलवर व्हॉटसअॅप पाठवा. रिक्षाचालक दोन पावले पुढे आल्यास आम्ही चार पावले पुढे येऊ, असाही इशारा त्यांनी दिला. पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे म्हणाले, की रिक्षाचा नंबर इंग्लिशमध्येच हवा. भाडे नाकारणे, प्रवाशांची फसवणूक, मुलींची छेडछाड करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरणतलावांवर संक्रात

$
0
0

पाणीकपातीमुळे दुसऱ्या सत्रात बंद ठेवण्याचा महापालिकेचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

ऐन पावसाळ्यात पावसाने मारलेली दडी तसेच नाशिकची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणातील मर्यादित जलसाठा या पार्श्वभूमिवर नाशिक महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचे धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका शहरातील जलतरण तलावांनाही बसला आहे. तरणतलाव दुसऱ्या सत्रामध्ये बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

नाशिक शहरातील असलेल्या जलतरण तलाव दुसऱ्या सत्रात बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यात शहरातील दोन वेळेसचा पाणी पुरवठा बंद करून एकवेळ करण्यात आला आहे. जलतरण तलावांना देखील पाणी कपातीसाठी दुसऱ्या सत्रात बंद ठेवण्याचे आदेश मिळाल्याचे सातपूर जलतरण तलावाचे व्यवस्थापक सुनील देशपांडे यांनी सांगितले. याबाबत जलतरण तलावावरील सूचना फलकांवर माहिती देण्यात आली आहे.

महापालीकेने पिण्याच्या पाण्याचा अंदाज बघता एकवेळ शहरात पाणीपुरवठा ठेवला आहे. त्यातच शहरातील असलेल्या जलतरण तलावांवर देखील पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. यात आता केवळ एकच वेळ जलतरण तलाव सुरू राहणार आहेत. यात दुपारच्या सत्रात जलतरण तलाव बंद राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

प्रतीक्षा पाणी वाढण्याची

महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने पाणी कपातीचे संकट नाशिककरांवर ओढावले असतांना जलतरण तलाव देखील एकवेळच सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गंगापूर धरणात पाणीसाठी वाढल्यास पुन्हा दोनवेळ जलतरण तलाव सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, पावसाळा सरल्याने पाणीसाठा वाढणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे हायवेचे भिजत घोंगडे

$
0
0

रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-सिन्नर-पुणे या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या विचारात घेता अरुंद रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. दररोज होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागत आहे. रस्त्याची सध्याची दुरवस्था पाहता दुभाजकासह चौपदरी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कुंभमेळ्यामुळे रखडलेले नाशिक-पुणे महामार्गाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण चव्हाणके, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता आर. एस. सोमवंशी यांना यासंबंधी निवेदन देण्यात आले आहे. हे काम जलदगतीने मार्गी लावून प्रवाशांसह उद्योजकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० चे काम नाशिक येथील कुंभमेळ्यामुळे गर्दीचा विचार करून बंद ठेवण्यात आले होते. सिंहस्थ संपल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने विनाविलंब हे काम सुरू करणे अपेक्षित आहे. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर असलेल्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीच्या ४१० एकरावर ३७० उद्योग कार्यरत आहेत.

नाशिक-सिन्नर या प्रवासासाठी जवळपास दीड तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे उद्योजक, कर्मचाऱ्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रासास सामोरे जावे लागते. याशिवाय अरुंद रस्त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी स्टाईस पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.

ठेकेदाराला आदेश द्या!

यामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या विचारात घेता अरुंद रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. दररोज होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागत आहे. रस्त्याची सध्याची दुरवस्था पाहता दुभाजकासह चौपदरी रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागणे अपेक्षित आहे. संबंधित ठेकेदारास राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने काम सुरू करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष अरुण चव्हाणके यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफडीए नक्की काय करते?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात राजरोसपणे भेसळयुक्त खाद्यपर्थांची विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) नक्की काय करते आहे, असा संतप्त सवाल जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी विचारला. अखेर याची दखल घेत भेसळयुक्त अन्न पदार्थांची तपासणी करण्याची सूचना एफडीएला यावेळी करण्यात आली.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अशासकीय सदस्यांनी विविध प्रश्न आणि समस्यांवर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ग्राहक संरक्षणाशी संबंधीत प्राप्त झालेल्या विविध प्रकारच्या तक्रारींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पतसंस्थेतील गैरकारभार, ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याबाबत सूचना, रेशन धान्य दुकानांवरील वितरण नागरिकांना वेळेत करणे आदी विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. बैठकीस परिवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

रिक्षाचे दर कसे कळणार?

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे रिक्षाचे भाडे सातत्याने वाढत आहे. मात्र, पेट्रोल किंवा डिझेलचे दर कमी झाले तरी रिक्षा भाडे तसेच राहते. यामुळे ग्राहकांची मोठी आर्थिक पिळवणूक होते. यासंदर्भात कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न ग्राहकांना आहे. शिवाय अनेकदा रिक्षाचालक ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देतात. अधिक रक्कम घेऊन अशाप्रकारे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षा सेवेवर अंकुश ठेवावा, अशी जोरदार मागणी अशासकीय सदस्यांनी केली. तसेच, प्रत्येक रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा भाडेचे दरपत्रक लावण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार रिक्षासंघटनांना तसे कळविले जाईल, अशी ग्वाही प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अॅटोमोबाईल क्षेत्राला दसऱ्याचा ‘बूस्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी अॅटोमोबाईल क्षेत्राला चांगला बूस्ट मिळाला. दुचाकी तसेच कार विक्रीमध्ये आजच्या दिवशी समाधानकारक विक्री झाली आहे. वर्षाच्या सरासरीच्या दृष्टीने मात्र हे प्रमाण मात्र कमीच आहे. यात सुधारणा होण्याची प्रतीक्षा विक्रेत्यांना असून, सर्वांचे लक्ष आता दिवाळीकडे लागले आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यात दुचाकी विक्रीचा जोर राहिला. कार विक्रीमध्ये काही प्रमाणात घट झाली. यापार्श्वभूमीवर अॅटोमोबाईल क्षेत्राचे लक्ष दसऱ्याच्या खरेदीकडे लागले होते.

आज दिवसभरात विविध कंपन्यांच्या ६०० कार विक्रीस गेल्याच्या वृत्तास शोरूम चालकांनी दुजोरा दिला. यात ६ मर्सिडीज आणि एका ऑडी कारचा समावेश आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल २ हजार २०० दुचाकींची विक्री झाली. २०१४ मध्ये हेच प्रमाण कारसाठी ४५० तर दुचाकीसाठी १ हजार २०० इतके होते. या फरकावरून कार विक्रीमध्ये यंदा ३५ टक्के, तर दुचाकी विक्रीमध्ये तब्बल ८० टक्के वाढ झाल्याचे दिसते. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर विक्री झालेल्या वाहनांमधून साधारणतः ४३ कोटी रूपयांची उलाढाल झाली. अॅटोमोबाईल क्षेत्रासाठी दसरा फळाला आला असला तरी यंदा दुष्काळजन्य परिस्थिती व वाढलेल्या महागाई निर्देशांकामुळे दुचाकी वगळता वाहन विक्री व्यवसायात काहीशी मरगळ आलेली दिसते.

प्रादेशिक परिवहन विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार मोपेड (गेअर नसलेल्या दुचाकी) विक्रीमध्ये गत वर्षाच्या तुलनेत यंदा १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत नाशिक आरटीओ कार्यालयात विक्री झालेल्या २३ हजार ५५६ मोटारसायकलचीं नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी ९ हजार ७०३ स्कुटर्स वा मोपेडची

विक्री झाली होती. यंदा हे प्रमाण वाढून हा आकडा ११ हजार २३३ पर्यंत पोहचला. तुलनात्मकदृष्ट्या पहिल्या सहामाहीत कार विक्रीचे प्रमाण ४ टक्क्यांनी घटले आहे. यंदा, आरटीओकडे ५ हजार ७७८ नूतन कारची नोंदणी नाशिक आरटीओकडे झाली असून गेल्या वर्षी हेच प्रमाण ६ हजार १५ इतके होते.

लक्झरी आणि टूरिस्ट कार विक्रीचे प्रमाण मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही वाढले आहे. शहरातंर्गत प्रवाशी वाहतूक करणाऱ्या तसेच टूरिस्ट सेवा देणाऱ्या नवनवीन कंपन्या शहरात दाखल होत असून त्यामुळे हा आकडा वाढत असल्याचे आरटीओतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या वर्षी सर्व प्रकारच्या एकूण ४८ हजार ७१० वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा हेच प्रमाण ४६ हजार ३८० पर्यंत घसरले असून, नवीन वाहनांची विक्रीमध्ये ३. ८५ टक्क्यांनी घट झाली आहे. ती कसर दसरा आणि दिवाळी दरम्यान भरून निघेल, अशी अपेक्षा सर्वांना लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची नाळ जुळणार बोस्टनशी

$
0
0

एमआयटीत घोषणा होण्याची शक्यता bhavesh.brahmankar

@timesgroup.com

नाशिक : जागतिक पातळीवर वेगाने विकसीत होणाऱ्या शहरांमध्ये अग्रेसर असलेले नाशिक हे अमेरिकेतील बोस्टन या शहराची सिस्टर सिटी होण्याची दाट शक्यता आहे. तशी घोषणा मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मध्ये पुढील आठवड्यात होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले नाशिक शहर हे विविध आघाड्यांवर पुढे जात आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन शहरात सिंहस्थ कुंभमेळाही नुकताच पार पडला आहे. हा वैश्विक सोहळा अतिशय शांततेत आणि सूत्रबद्धतेने पार पडल्याने त्याची दखल एमआयटीने घेतली आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने केलेले नियोजम यशस्वी ठरल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी घडली नाही. म्हणूनच हा कुंभमेळा यशस्वी कसा झाला, याचा पट उलगडण्यासाठी एमआयटीने नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर, पोलिस आयुक्त आदींना निमंत्रित केले आहे. पुढील आठवड्यात बोस्टन या शहरातील एमआयटीच्या कॅम्पसमध्ये हा समारंभ होणार आहे.

याच समारंभात नाशिकसाठी आणखी एक गुडन्यूज मिळणार आहे. बोस्टन या शहराची सिस्टर सिटी म्हणून नाशिकची घोषणा होण्याची शक्यता एमआयटीतील सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात बोस्टन शहरातील वैविध्यपूर्ण संस्कृती, तंत्रज्ञान, प्रथा, परंपरा आदींची देवाणघेवाण नाशिकला तर नाशिकच्या वैविध्यपूर्ण बाबींची बोस्टनला आदान-प्रदान होणार आहे. परिणामी, नाशिक आता स्मार्ट सिटी होणार असल्याने येत्या काळात या साऱ्या बाबींचा मोठा फायदा होणार आहे.

नाशिकचे ब्राऊशर, व्हिडिओ

नाशिक शहरासह जिल्ह्याची माहिती तसेच कुंभमेळ्यातील काही क्षणचित्रे यावर आधारीत विशेष ब्राऊशर (माहितीपत्रक) आणि व्हिडीओ सध्या जलदगतीने तयार केला जात आहे. महापालिकेच्यावतीने ब्राऊशरचे काम हाती घेण्यात आले असून, हे ब्राऊशर बोस्टनच्या समारंभात वितरीत केले जाणार आहेत.

तर नाशिकची महती सांगणारा व्हिडीओ तेथील समारंभात उपस्थितांना दाखविला जाणार आहे. या दोन्ही बाबींमुळे बोस्टनवासियांना तसेच त्या समारंभात उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांना

नाशिकचे महत्त्व कळणार असून, येत्या काळात हे सारे जण नाशिकला भेट देण्याची शक्यता आहे. यातूनच नाशिकच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किडनीस नाशिककराची लाइफलाइन !

$
0
0

jiitendra.tarte@timesgroup.com

धावपळीच्या जीवनशैलीच्या परिणामी पक्षाघात आणि ह्रदयविकाराच्या अटीतटीच्या प्रसंगी मानवी किडनीवर नेमका काय परिणाम होतो अन् या संभाव्य धोके कसे टाळता येतील, या दिशेने मांडणी करणारे वैद्यकीय संशोधन अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या पथकाने जगासमोर नव्याने मांडले आहे. या पथकाचे नेतृत्व मुळचे नाशिककर असलेले डॉ. चारुहास विनय ठकार यांनी केले आहे. जगभरातील रूग्णांसाठी हे संशोधन उपकारक ठरणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकमधील विख्यात ह्रदयरोगविकार व मधुमेहतज्ज्ञ डॉ. विनय ठकार यांचे डॉ. चारूहास हे चिरंजीव आहेत. डॉ. चारूहास हे सध्या अमेरिकेतील सिनसिनाटी मेडिसन विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ नेफ्रॉलॉजी अँड हायपरटेन्शन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. जगभरातील किडनीविकार तज्ज्ञांसमोर आव्हान ठरणारे कोडे सोडविण्यासाठी त्यांचे संशोधन उपयुक्त ठरेल, अशी आशा या नव्या मांडणीमुळे जगभरात निर्माण झाली आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या 'स्ट्रोक' या मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन नुकतेच प्रसिध्द करण्यात आले आहे. पक्षाघात आणि ह्रदयविकारातील बहुतांश रूग्ण हे केवळ किडनी संदर्भातील आपत्कालीन समस्या उद्भवल्याने दगावतात, अशा आशयाचे निरीक्षण समोर आल्यानंतर डॉ. चारूहास ठकार आणि त्यांच्या संघाने अमेरिकेतील ४.६ मिलीयन रूग्णांच्या नोंदींचा अभ्यास केला. २००२ ते २०१२ या कालावधीतील नोंदींनी डॉ. चारूहास यांच्या निष्कर्षांना बळ देत आता मानवी किडनीची लाइफलाइन वाढविण्याचा आशावाद निर्माण केला आहे. वैद्यकीय परिभाषेत किडनीसमोरील आव्हानांमध्ये 'अॅक्युट किडनी इंज्युरी' आणि 'इंट्रा सेरेब्रल हॅमरेज' ही संकल्पना वापरण्यात येते. या संकल्पनेसंदर्भातील रूग्णांवर किडनी बचावासाठी प्रतिबंधात्मक उपायांच्या रचनेत हे संशोधन मैलाचा दगड ठरणार आहे.

किडनीच्या विकारांनी ग्रस्त अत्यवस्थ रूग्णांवरील उपचारांना तज्ज्ञांसाठी अमेरिकेत असणाऱ्या प्रोटोकॉलमध्येही डॉ. चारूहास यांच्या यापूर्वीच्या एका संशोधनाचा समावेश आहे. या आचारसंहितेत अमेरिकेत 'डॉ. चारूहास ठकार प्रोटोकॉल' अशा संदर्भाचाही समावेश तेथील वैद्यकीय प्रशासनाने यापूर्वी केला आहे. नाशिकमधील नाएसोच्या रंगूबाई जुन्नरे हायस्कूलमधून डॉ. चारूहास ठकार यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. पुण्यातील भारती विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी अमेरिका गाठली. विख्यात सिनसिनाटी विद्यापीठातील सर्वात तरूण प्राध्यापक आणि एका सर्वेक्षणातील तेथील शंभर किडनी विकार तज्ज्ञांमधून एक

डॉक्टर अशी ख्याती या नाशिककराने मिळविली आहे. मानवासाठी उपकारक नव्या संशोधनाने यात मानाचा तुरा खोवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकजवळ ट्रकने तिघांना उडवले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नाशिकजवळच्या वडाळी भोई येथे झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघांनी सब वेवरून उडी मारून प्राण वाचवले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

वडाळी भोई येथे एका सब वेवर सहा प्रवासी बसची वाट पाहत थांबले होते. यात कॉलेजचे तीन विद्यार्थी देखील होते. नाशिकवरून येणाऱ्या ट्रकने सब वेवर बसची वाट वाहणाऱ्या तिघांना उडवले. ट्रकची धडक इतकी जोरात होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघांनी सब वेवरून ३० फूट खाली उडी मारून स्वतःचा प्राण वाचवले. हे तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोहितच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोहित बाविस्कर खून प्रकरणात अटक केलेल्या संशयितांना फाशीची शिक्षा व्हावी, या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. तसेच, या हत्याकांडात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे काय याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मोहितच्या नातेवाईकांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी अशोक स्तंभ ते पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी आयुक्तालयासमोर मेणबत्या पेटवित मोहितला श्रध्दांजली वाहिली. यानंतर, मोहितच्या काही नातेवाईकांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेतली. या प्रकरणात आजवर झालेल्या तपासाबाबत आयुक्तांनी सर्वांना माहिती देत कसून तपास करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, तपासात ग्रामीण पोलिस दल आणि शहर पोलिस दलातील असमन्यवय समोर आला असून, संवदेनशिल प्रकरणात असे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली.

संशयितांना कोठडी

सौरभ चौधरीसह त्याच्या साथिदाराला शुक्रवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सौरभसह त्याच्या अल्पवयीन मित्राला पोलिसांनी १९ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images