Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

इंजिनीअरिंगच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर

0
0

अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक : पुणे विद्यापीठ आणि एमएसबीटीई यांच्यातील पुरेशा संवादाच्या अभावाच्या परिणामी इंजिनीअरिंगच्या पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. डिप्लोमानंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रविष्ठ विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीत सबमिशन्स आणि प्रात्यक्षिक परीक्षांना सामोरे जावे लागत असल्याने 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची स्थिती यंदाही आहे.

यंदाही महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ एज्युकेशन (एमएसबीटीई) च्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जून महिन्यात लागला. तोपर्यंत प्रथम वर्षाच्या केवळ निकालाअभावी डिग्रीचे प्रवेश सुरू झाले नव्हते. यानंतर ही प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबली. यातून शिल्लक राहिलेल्या जागांवर सप्टेंबर महिन्यात डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे थेट प्रवेश होऊन महिनाही उलटत नाही तोच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांच्या सबमिशन्स आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकच जाहीर केले. नवा अभ्यासक्रम समजावून घेण्याइतपतही वेळ विद्यार्थ्यांच्या हाती मिळत नाही तोच येऊन धडकलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या समस्येत भरच पडली आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना किमान कालावधी तरी मिळावा याकरिता पुणे विद्यापीठ आणि एमएसबीटीईने आपसात संवाद ठेऊन वेळापत्रकाची आखणी करावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांमधून व्यक्त होते आहे.

संख्येत तरीही भर

दहावीनंतर डिप्लोमा व त्यानंतर थेट सेकंड इयर डिग्रीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी भरच पडत आहे. दुसरीकडे मात्र डिप्लोमानंतर मोठ्या आशेने प्रवेश घेणाऱ्यांना मोठ्या दिव्यातून जावं लागत आहे. इंजिनीअरिंग डिग्रीसाठी पुणे, मुंबई, मराठवाडा अशी महाराष्ट्रभरात विविध विद्यापीठे सध्या कार्यरत आहेत. मात्र, डिप्लोमासाठी केवळ एमएसबीटीई बोर्ड कार्यरत आहे. डिप्लोमानंतर डिग्रीसाठी प्रवेशाला जास्त उशीर होत असल्याच्या तक्रारीत भरच पडते आहे.

परीक्षा १२ऑक्टोबरपासून

यंदाही अखेरचा कौन्सिलिंग राऊंड संपवून प्रवेश पूर्ण होण्यास यंदा सप्टेंबर उजाडला. कॉलेज सुरू होऊन केवळ महिना पूर्ण झालेला असताना विद्यापीठाने प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. या परीक्षा त्या १२ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत. यानंतर दरवर्षीप्रमाणे लगेचच लेखी परीक्षा ही सुरू होतील. तसेच, १२ ऑक्टोबरपूर्वी अनेक कॉलेजेसतर्फे ८ ऑक्टोबरपर्यंत सबमिशन करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. या परीक्षांचे आव्हान आता विद्यार्थ्यांसमोर कमी कालावधीत उभे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेपत्ता श्रीकांतचा मृतदेह नदीपात्रात सापडला

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

गणेश विसर्जनासाठी जातो असे सांगून घरातून गेलेल्या श्रीकांत शाम देशमुख (वय १९) रा. भगूर या मुलाचा दोनवाडे येथून वाहणाऱ्या दारणा नदीपात्रात मृतदेह आढळून आला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान दारणानदी काठी आंघोळीसाठी जातो असे सांगून गेला तो परतलाच नाही. पाण्यात बुडाल्याचा संशय येऊन त्यास देवळाली कॅम्प व भगूर येथील फायरब्रिगेडचे कर्मचाऱ्यांनी दिवसभर शोध घेतला होता. तरीही शोध न लागल्यामुळे हरविल्याची तक्रार दाखल केली होती. दोनवाडे येथून वाहणाऱ्या दारणा नदीपात्रात एका शेतकऱ्याला युवकाचा मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. मालेंना भोवले विद्यार्थिनीचे मृत्यूप्रकरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सातारा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. पी. जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अवर सचिव विष्णुदास घोडके यांनी याबाबतचे आदेश काढले. डॉ. जगदाळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पदभार स्वीकारणार आहेत. वर्षरातच त्यांची उचलबांगडी करण्यात आली.

डॉ. माले यांनी जुलै २०१४ मध्ये पदभार स्वीकारला होता. मात्र कामापेक्षा त्‍यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यामुळे त्यांची उचलबांगडी झाल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. आरोग्य उपसंचालकांना त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. माले यांची उस्मानाबादला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे डॉ. सुरेश जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या बुधवारी (दि.२३) परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील सुप्रिया माळी या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर संतप्त पालकांनी डॉ. माले यांना परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील गैरव्यवस्थेबाबत जाब विचारून मारहाण केली होती. या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदारांनी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली. डॉ. माले यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत सिव्हिल हॉस्पिटलमधील वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांनी यापूर्वी आंदोलने केली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या बदलीचा आदेश निघाल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांविरोधात महात्यागींचे बेमुदत उपोषण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोरीस गेलेला ऐवज मिळवून देण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत महंत श्री राम पदारथदासबाबा महात्यागी यांनी पोलिसांच्या विरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. चोरीस गेलेला ऐवज पोलिस मिळवून देत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा महात्यागी यांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना उपोषणाद्वारे दिला आहे.

आपली कार पंचवटीतील अॅक्सिस बँकेच्या रसवंतीजवळ थांबली असताना काही चोरट्यांनी गोळीबार करून सव्वादोन लाखांची रोकड, सोन्याची मूर्ती आणि हिरे असा तब्बल ३५ लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचा महंत महात्यागी यांचा आरोप आहे. आठ दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचा दावा महात्यागी यांनी केला असून, पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये यासंदभात तक्रारही केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रारींचा बंदोबस्त पडणार महाग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्मार्ट अॅपवर नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारी परस्पर बंद केल्या जात असल्याने या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित तक्रारी न सोडविता तक्रार सोडविल्याचा दावा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा प्रकार महागात पडणार असून, त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा विचार प्रशासनातर्फे सुरू आहे. त्यामुळे परस्पर तक्रारी बंद करणे महागात पडणार आहे.

महापालिकेच्या स्मार्ट नाशिक अॅपवर तक्रारींचा ओघ वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असल्या तरी, त्या तक्रारी न सोडविताच त्या परस्पर बंद केल्या जात आहे. संबंधितांना तक्रार सोडविण्यात आल्याचा मेल परस्पर पाठवला जात आहे. त्यामुळे तक्रारदारांची निराशा होत आहे. तक्रार न सोडविताच तक्रार बंद केले जात असल्याने संबंधित विभागाचे काम चांगले दिसत आहे. मात्र, संबंधित नागरिकांनी आता अशा प्रकारच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तक्रार न सोडविताच ते बंद करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. स्मार्ट अॅप विभागाचे प्रमुख दोरकुळकर यांनी अशा कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा विचार केला जात असल्याची माहिती दिली. तसेच, तक्रारी सोडविल्या की नाही, याची खात्री करण्यासाठी पथक नियुक्त करण्याचाही विचार केला जाणार आहे. त्यामुळे तक्रारी परस्पर बंद करणे आता महागात पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूचा धाक दाखवून घरफोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभून दिसणारी चोरीची घटना सातपूरमधील अशोकनगरच्या निलकंठेश्वर नगरमध्ये घडली. घरातील वृध्दाला गावठी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून खुर्चीला बांधून ठेवत रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने घेऊन दोघांनी पोबारा केला. मंगळवारी भरदुपारी हा प्रकार घडला. रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे चाळीस हजारांची चोरी झाली.

सातपूर भागात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. निलकंठेश्वर नगर भागातील श्रीकुंज बंगल्याचे मालक शंकर निंबा बोरसे हे एक वाजता जेवणासाठी बसले होते. त्याचवेळी एक मुलगा व मुलीने काही न सांगता बंगल्यात प्रवेश केला. काही कळण्याच्या आतच त्यांनी बोरसे यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत किचनमध्ये खुर्चीला बांधून ठेवले. यानंतर बेडरूममधील कपाट उघडून रोख रक्कमेसह सोने, चांदीचे दाखिने घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार होत असताना बोरसे यांच्या बंगल्याच्या वर भाड्याने राहणाऱ्या जयदीप बिरारी व प्रमोद बच्छाव यांना शंका आली. बंगल्यात खाली येऊन बघितल्यावर बोरसेंना चोरट्यांनी बांधून चोरी करीत पोबारा केला होता.

चोरट्यांनी घरफोडीत रोख रक्कमेसह सोन व चांदीचे दागिने पळविले आहेत. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ बोरसे यांच्या बंगल्यात येऊन पाहणी केली. चोरट्यांनी दोन दिवस टेहळणी करून डाव साधला.

कॉलेजमधून घरी आल्यावर एका चोरट्याला बोरसेंच्या गच्चीवर पाहिले. परंतु, त्यांच्याकडे कुणी पाहुणे आले असतील म्हणून आम्ही दुर्लक्ष केले. परंतु, पुन्हा मात्र घरातून आवाज आल्यावर आम्हांला शंका आली. यानंतर खाली येऊन पाहिल्यावर बोरसेंना चोरट्यांनी बांधून घरफोडी केली होती.

- प्रवीण बच्छाव, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेत वादळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद् घाटन झालेल्या प्रकल्पाविरोधात थेट पक्षाच्याच जिल्हाध्यक्षाने आक्षेप घेतल्याने मनसेतील अतंर्गत धूसफुस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. वसंत गीतेंच्या बंडानंतर शांत झालेल्या मनसेतील अशांतता पुन्हा उफाळून आली असून, गटबाजीच्या राजकारणाने जोर धरला आहे. पक्षातील समन्वयाअभावी पक्षाच्याच अडचणी वाढत आहेत. तर दुसरीकडे तथागत संस्थेच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या सुदाम कोंबडेच्या अडचणीतही वाढ झाल्याची चर्चा मनसेत सुरू आहे.

माजी आमदार वसंत गीतेंच्या बंडानतर पक्षातील अशांतता बऱ्यापैकी थांबली होती. मात्र पक्षात ज्युनिअर असलेल्या पदाधिकाऱ्यांना मोठी पदे दिली गेल्याने पक्षात पुन्हा धूसफुस पुन्हा उफाळून आला आहे. त्यातच या पदाधिकाऱ्यांचा उत्साह आणि व‌रिष्ठांना डावलून मोठे होण्याच्या महत्त्वाकांक्षेने पक्षासह पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे व‌रिष्ठाकडून नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनाच डावलले जात असल्याने पक्षात जेष्ठ व कनिष्ठ असा नवा संघर्ष उभा राहिला आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठांना डावलून थेट, पक्ष प्रमुखांनीच उद् घाटन केलेल्या प्रकल्पाविरोधात भूमिका घेण्याची हिंमत पदाधिकाऱ्यांमध्ये वाढली आहे. अगोदरच पक्षाच्या नगरसेवकांमध्ये कामे होत नसल्याने अशांतता आहे. त्यातच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्येही धूसफुस सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे. तर दुसरीकडे काही तथागत व्यक्ती आणि संस्थाच्या पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याने काम करणे सुदाम कोंबडे यांना चांगलेच महागात पडले असून, पक्षनेत्याची वक्रदृष्टी त्यांनी स्वःतावर ओढवून घेतली आहे. त्यामुळे ते एकाकी पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब... १० लाख तासांचे डॉक्युमेंटेशन

0
0

pravin.bidve@timesgroup.com

ना‌शिक : कुंभमेळ्याचे मायक्रो प्लॅनिंग करताना तावून सुलाखून निघालेले पोलिस २०२७ मधील कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत. सिंहस्थात संकलित सीसीटीव्ही फूटेज, डाटा, फोटोग्राफ्सची मेगा लायब्ररी तयार करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. तब्बल १० लाख तासांच्या महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटेशनची जपणूक केली जाणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील पर्वण्या निर्विघ्न पार पडल्या. मुख्यमंत्री, आखाडा परिषदेसह वैष्णव आणि शैव साधूंनी प्रशासनाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सिंहस्थात गतवेळेपेक्षा अधिक भाविकांनी भेट देऊनही चेंगराचेंगरी किंवा तत्सम दुर्घटना घडली नाही. कुशावर्त, रामकुंडावरील जागेच्या मर्यादा, पावसाळा अन् कोट्यवधी भाविकांच्या गर्दीची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी मायक्रो प्लॅनिंग केल्याने हा सोहळा निर्विघ्न पार पडला. विशेष म्हणजे २००३ च्या सिंहस्थातील नियोजनाचे बारीकसारीक तपशील हाती नसल्याने पोलिसांना शुन्यापासून नियोजनाची सुरुवात करावी लागली. क्राऊड मॅनेजमेंटच्या आवाहनाला डोळ्यासमोर ठेऊन केलेले मायक्रो प्लॅनिंग यशस्वी ठरल्याने शहर आणि ग्राम‌ीण पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र निश्चिंत न होता त्यांनी संकलित डाटा, फूटेजच्या डॉक्युमेंटेशनला प्राधान्य दिले आहे.

सिंहस्थात नाशिकमध्ये ४०० तर त्र्यंबकेश्वरमध्ये २५० सीसीटीव्ही कॅमेरे गेले दोन अडीच महिने कार्यरत होते. त्यामुळे एकट्या त्र्यंबकेश्वरमधील तब्बल चार लाख ७५ हजार तासांचे फूटेज ग्रामीण पोलिसांकडे आहे. शहर पोलिसांकडे त्याहून अधिक फूटेज आहे. या महत्त्वपूर्ण डाटाबँकेची अमूल्य मालमत्ता म्हणून जपणूक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. हा डाटा हार्ड डिस्क व सीडीवर घेतल्याने गरजेच्यावेळी ठरावीक दिवसाचे, ठरावीक वेळेचे फूटेज तपासने सोपे होणार आहे.

सिंहस्थ नियोजनाशी संबंधित डाटा, फूटेजच्या डॉक्युमेंटेशनला सुरुवात केली आहे. हे डॉक्युमेंटेशन एखाद्या आपत्तीत नष्ट होऊ शकते. म्हणूनच ते नाशिकबाहेर राज्यात आणखी काही ठिकाणी सुरक्षित ठेवणार आहोत.

जयजीत सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

पोलिसांचे अनुभव होणार शद्बबद्ध

नाशिक पोलिस अधीक्षक कार्यालयात यापुढेही स्वतंत्र सिंहस्थ कक्ष कार्यान्वित राहील. हे सर्व डॉक्युमेंटेशन तेथे सुरक्षित ठेवले जाईल. पोलिस अधिकाऱ्यांना प्रत्येक पर्वणीत येणारे अनुभव वेगवेगळे होते. त्या-त्या वेळी निदर्शनास येणाऱ्या त्रूटी लक्षात घेऊन पुढील पर्वणीत त्या दूर केल्या जात होत्या. त्यामुळे नियोजनही बदलत होते. अधिकाऱ्यांच्या या सर्व अनुभवांचेही लिखित स्वरुपात डॉक्युमेंटेशन होणार आहे. हे काम १५ दिवसांत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीजतार तुटल्याने नागरिकांत भीती

0
0

कळवण : शहरातील मेनरोड वर महाराजा चौक येथे बधुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक मुख्य वीजवाहक तार तुटून रस्त्यावर पडली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. आठवडे बाजार तसेच शाळा सुटण्याच्या वेळीच ऐन गर्दीच्या वेळी मेनरोड येथील महाराजा चौकात संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मोठा आवाज होऊन मुख्य वीजवाहक वाहिनी असलेली तार पडली. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या तारेपासून स्थानिक नागरिकांनी बेसावध लोकांना सावध केले. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित वीजपुरवठा खंडित केला व तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांनीही घेतला खड्ड्यांचा अनुभव

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

सिन्नर महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून, वाहनधारक वैतागले आहेत. या रस्त्याप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला. अधिकारी दौऱ्यावर येताच इगतुपरी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला. यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच अडवूनच रोष व्यक्त केला.

सिन्नर महामार्गाची खड्ड्यांमुळे उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याबाबत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करून त्वरित महामार्गाची पाहणी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार बुधवारी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे फौजफाटा घेऊन सिन्नर ते घोटी दरम्यान पडलेल्या खड्ड्यांचा प्रत्यक्ष गाडी रस्त्यावर फिरवूनच अनुभव घेतला. यावेळी या अधिकाऱ्यांच्या पथकाला वाहनचालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

या पाहणी दौऱ्यात मुख्य अभियंता साळुंखे, अधीक्षक अभियंता केडगे, कार्यकारी अभियंता पवार, इगतपुरीच्या उपअभियंता नलावडे, शाखा अभियंता देशमुख सहभागी होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिन्नर व इगतपुरीच्या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल चांगलेच सुनावले. कामाबाबतीत त्वरित दखल घेण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, या पाहणी दौऱ्याबाबत उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांना समजताच त्यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वैतागलेल्या नागरिकांनी ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना अडवून रोष व्यक्त केला.

सिंहस्थ पर्वकाळात जिल्ह्यातील पर्यटन व तीर्थस्थळे यांचा विकास झाला. मात्र, सिन्नर-घोटी-सिन्नर-शिर्डी महामार्ग असतानाही बांधकाम विभागाने या मार्गाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. लोकप्रतिनिधींनीही याबाबत बांधकाम विभागाला जाब विचारला नाही. या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल पाठपुरावा केला नाही. घोटी-सिन्नर-शिर्डी या राज्यातील महत्त्वाच्या मार्गाची अशी स्थिती असेल तर याबाबत न बोललेलेच बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे. माजी जि. प. सदस्य बाळासाहेब गाढवे, पांडूरंग गाढवे, समाधान गाढवे, अशोक गाढवे, सुरेश क्षीरसागर, बजरंग गाढवे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.

वाहनचालकांनी बदलले मार्ग

घोटी-सिन्नर या साईमार्गाची अक्षरशः चाळण झाल्याने महामार्गच नव्हे तर वाहने व प्रवाशांची हाडेही खिळखिळी झाली. वास्तविक राज्यातील हा महत्त्वाचा मार्ग असतानाही याकडे बांधकाम विभाग डोळे बांधून होता. अखेर वाहनचालकांनी निषेध म्हणून की काय या महामार्गावरून प्रवास करण्याऐवजी प्रवासाची दिशाच बदलली. घोटीवरून शिर्डीला या मार्गाने जाण्याऐवजी नाशिकमार्गे वाहने धावू लागली. तसेच घोटी-भगूर जाणारी वाहने घोटी-मुंढेगाव-अस्वली-भगूर मार्गाने जात आहेत. घोटी-संगमनेर हा प्रवास राजूर मार्गे झाला.

बांधकाम विभागाचे अधिकारी रस्त्याची पाहणी करणार असल्याने सतर्कता दाखवत इगतपुरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लगेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात केली होती. घाईघाईने रस्त्यावर जेसीबी मशीन, खडी डम्पर, डांबर फवारणी केली जात होती. त्यामुळे हा केवळ वरिष्ठ आधिका-यांसमोर देखावा करण्यात आला.

- पांडूरंग वारुंगसे, उपसभापती, पंचायत समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ पर्वकाळानंतर त्र्यंबकमध्ये शुकशुकाट

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पर्वकाळाात चोवीस तास गजबजलेली आणि काही किलोमीटर अंतरावर पोहचलेली त्र्यंबकेश्वर मंदिराची दर्शनबारी आता सुनसुनी झाली आहे. एरवी पितृपंधरवड्यात श्राध्द विधीसाठी गर्दी उसळायची ती देखील झालेली नाही. यामुळे सर्वत्र सामसूत दिसत आहे.

‌सिंहस्थ पर्वकाळानंतर शेवटचे काही दिवस मंदिर चोवीस तास खुले ठेवण्याचा व मध्यरात्रीनंतर एक ते तीन असे अवघे दोन तास दर्शन थांबविण्याचा निर्णय व्यवस्थापनाला घ्यावा लागला होता. कुंभमेळ्यात दर्शनासाठी आठ किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे हजारो भाविक सात आठ तास उभे राहूनही दर्शनापासनू वंचित राहिले. बहुतेक भाविकांनी रस्त्यावर मुक्काम ठोकून पुन्हा पहाटे दर्शनबारीस भिडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. आलेल्या भाविकांची आकडेवारीबाबत शासन आणि इतर अनुभवी व्यक्ती यांच्यात मतभेद असेल तरी तिसरे शाहीस्नान आणि त्या दरम्यानचे दिवस या कालावधीत व्रिकमी गर्दी झाली होती.

अहोरात्र तुडूंब भरलेली दर्शनरांग गोदावरी-अहिल्या बाजूने ब्रह्मगीरी पायथा आणि तेथून निवृत्तीनाथ मंदिराकडे गेलेली दर्शनबारीवर आता मात्र शुकशकाट आहे. दर्शनबारी सामसूम झाली आहे.

दिवाळीची प्रतीक्षा

सिंहस्थात अपेक्षित व्यवसाय झाला नाही आणि पितृपंधरवड्यात गर्दी झाली नाही म्हणून व्यावसायिकांमध्ये मंदिचे वातावरण आहे. दरवर्षी श्राध्दविधीसाठी पितृपंधरवडा गजबजेला असतो. त्यामुळे लॉजिंग बोर्डिंगसह सर्व व्यवसाय तेजीत असतात. मात्र यावर्षी पहिल्या आठवड्यात व्यवसाय थंड दिसून येत आहे. कदाचित पुढील आठवड्यात काही प्रमाणात भाविक वाढतील. मात्र त्यानंतर लगेच येत असलेले नवरात्र आणि परीक्षांचा हंगाम पाहता यापुढे भाविकांसाठी दिवाळीच्या सुटीची प्रतीक्षा करावी लागणार असे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटी टोलचे कर्मचारी संपावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

घोटी टोल नाक्यावरील ८० कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ न मिळाल्याने बुधवारी सकाळपासून संप पुकारला आहे. यामुळे महामार्गावरील सर्व आपत्कालीन सुविधा बंद झाल्या असून, वेतनवाढ मिळत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. याविषयी कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

एम.एन.ई.एल या कंपनीने टोल नाक्यावरील कंत्राट टी.एम.एस. आणि एफ.के. या दोन ठेकेदारांना दिला आहे. कंपनी कराराच्या नियमानुसार दरवर्षी एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांची वेतनवाढ होत असते. मात्र, एप्रिल महिन्यापासून व्यस्थापनास विनंती करूनही एफ. के. या ठेकेदाराकडील जवळपास ८० कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळाली नाही. मात्र, टोल प्रशासनाने टी.एम.एस.च्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची एप्रिल महिन्यातच पगार वाढ करण्यात आली.

फरक देण्याचीही मागणी

टोल प्रशासनाचे व्यवस्थापाक नेहमी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संपावर जावे लागले. चालू वर्षाची पगारवाढ आणि एप्रिल ते सप्टेंबर २०१५ या सात महिन्यातील पगाराचा फरक मिळत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. संपामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन आदी सुविधा बंद करण्यात आल्या आहेत.

टोल प्रशासनाचा हुकूमशाही रीतीने कारभार सुरू आहे. एका ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करायची आणि दुसऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची अडवणूक करायची. यामुळे कर्मचाऱ्यांमधे दुजाभाव निर्माण होत आहे.

- भास्कर गुंजाळ, विधानसभा अध्यक्ष, काँग्रेस

टी.एम.एस या ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली. त्याप्रमाणे एफ. के मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करावी. वेळेवर वेतनवाढ केल्यास संपाची गरज नाही.

- उमेर शेख, एफ. के. कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट जनावरांचा मेरी कॉलनीत त्रास

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

दिंडोरी रोडवरील मेरी कॉलनी परिसरात मोकाट जनावरांचा दिवसेंदिवस वावर वाढला आहे. या मोकाट जनावरांमुळे परिसरातील रहिवाशी नागरिक आणि वाहनचालक त्रासले आहेत. त्यांना दररोज रस्त्यावर थांबणाऱ्या गायी आणि अन्य जनावरांचा सामना करावा लागत आहे.

भर रस्त्यात अतिक्रमण किंवा रास्ता रोको करणाऱ्या या जनावरांना हटवायचे कुणी? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. मेरी कॉलनी परिसरात शाळा असल्याने दिवसभर अनेक विद्यार्थ्यांची सतत वर्दळ सुरू असते. अशा वेळी जनावरे रस्त्यात थांबली की विद्यार्थी भीतीने सैरभैर होतात. यामुळे छोटे -मोठे अपघात देखील होत आहेत. मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे. मोकाट कुत्र्यांचाही सुळसुळाट वाढला असून त्यांचाही त्रास वाढला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.

मेरी कॉलनीत शाळा आहे. तीन हजारपेक्षा आधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. यात मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. महापालिकेने या प्रश्नी लक्ष द्यावे.

- किरण काकड, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळलेल्या वृक्षांचा धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

वृक्ष ही पर्यावरणाची रक्षक आहेत, त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी वृक्षांची तोड करण्यास नागरिकांचाच पुढाकार असतो. मात्र, गंगापूर रोड येथे ठिकठिकाणी वाळलेली झाडे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या मार्गावरील झाडांना हटविण्याचा मुद्दा कोर्टप्रकरणामध्ये अडकलेला असल्याने पायी किंवा वाहने चालवितांना नागरिकांना कोणत्याही क्षणी रुक्ष आणि निर्जिव झालेली झाडे कोसळण्याच्या दहशतीखाली वावरावे लागत आहे.

शहरातील वेगाने विकसित असलेला परिसर म्हणून गंगापूररोडचा उल्लेख केला जातो. या भागात रस्ता रुंदीकरणात अनेक वर्षांपासून वृक्षांमुळे अडथळा निर्माण झालेला आहे. वृक्ष ह‌टविण्याची मागणी नागरिकांसह काही विकासकांकडून केली जात आहे. तर पर्यावरणप्रेमींना त्यास कडाडून विरोध केला आहे. हा मुद्दा अनेक वर्षांपासून कोर्टाच्या तारखांच्या चक्रांमध्ये फसला आहे. कोर्टानेही पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीची दखल घेत वृक्षतोडीवर बंदी घातली आहे. अशी परि‌स्थिती असतांना सद्यास्थितीत गंगापूररोडवर मात्र वाळलेली वृक्ष कोसळून पडण्याचा धोका वाढला आहे. या वाळलेल्या वृक्षांच्या फांद्या कोणत्याही क्षणी खाली कोसळत आहेत. त्यामुळे अपघात देखील होत आहेत. महापालिकेने या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची मागणी वाहनचालक व स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

अपघाताची टांगती तलवार

गंगापूररोडच्या जेहान सर्कलपासून ते बेंडकुळे मळ्यापर्यंत ३० पेक्षा अधिक झाडे वाळलेली आहेत. यामुळे रस्त्यावरून वाहन जात असतांना या वाळलेल्या झाडांच्या भल्या मोठ्या फांद्या तुटून पडल्याने अपघात होत आहेत. गेल्याच आठवड्यात भोसला मिलिटरी स्कूल व कॉलेजच्या संरक्षक कुंपणाजवळ असलेले वृक्ष वाऱ्याने उन्मळून पडले होते. परंतु, झाडाखाली कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. झाडाखाली विद्यार्थी अथवा वाहने उभी असती तर अपघात झाला असता. यात एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याचाही शक्यता व्यक्त केली जात आहे. भविष्यात या वाळलेल्या वृक्षांमुळे कुणाची जीव गेल्यास त्यास जबाबदार कोण राहील, असा प्रश्न वाहनचालक व रहिवाशी यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांना घरपोच कर्ज देण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपंग बांधवांनी स्वत:चा रोजगार सुरू करून स्वावलंबी बनावे यासाठी त्यांना कर्जप्राप्तीत येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. त्यांच्या शारिरीक मर्यादा लक्षात घेऊन कर्जमंजुरीचे धनादेश घरपोच करण्याबाबत प्राधान्याने विचार करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी बुधवारी दिली.

अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. मुंबई येथील अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्थान व राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये बुधवारी सकाळी या दोन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव स्मिता रानडे, अपंग वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक उषा सावंत, महामंडळाचे महाव्यवस्थापक नंदकुमार फुले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यशाळेत काही अपंग लाभार्थींना धनादेश प्रदान करण्यात येणार होते. त्यासाठी त्यांची नावे पुकारण्यात आली. धनादेश घेण्यासाठी व्यासपीठाकडे येत असलेल्या एका अपंग व्यक्तीचा तोल गेला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लाभार्थी बांधवांना त्यांच्या जागेवर जाऊन धनादेश प्रदान केले. या सर्व प्रकारानंतर मनोगत व्यक्त करताना कुशवाह यांनी जिल्हा प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथे अपंग बांधवांना वाटप केलेल्या साहित्याबाबतच्या उपक्रमाची मा‌हिती दिली. धनादेश घेण्यासाठी बँकांमध्ये जाताना अपंग बांधवांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल याचा अंदाज आहे. म्हणूनच अशा लाभार्थींचे धनादेश त्यांच्या घरी पोहोच करणे शक्य होऊ शकेल का याचा अंदाज घेऊ. लाभार्थींचे धनादेश त्यांच्या घरीच पोहोच करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यशाळेंतर्गत विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. अपंगांना कर्ज मिळविण्याची प्रक्रिया, स्वयंरोजगाराच्या विविध पर्यायांची माहिती मान्यवरांच्या व्याख्यानांमधून मिळणार आहे. एमआयडीसीतील अनेक कंपन्या सीएसआरमधून अपंगांना मदत करू शकतात. मात्र, याबाबत अपंगांना माहितीच नसते. अशा स्वरुपाची माहिती देण्याचे काम या कार्यशाळेतून होणार असल्याची माहिती फुले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औषध विक्रेत्यांचे प्रश्न सोडविणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

देशातील औषध विक्रेत्यांनी १४ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन फार्मसी विरोधातील प्रस्तावित बंद मागे घ्यावा. या विक्रेत्यांचे प्रश्न आपण सरकारकडे मांडून सोडवू, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

लोकसंकल्प हेल्थ अन्ड सोशल फाऊंडेशनच्या जागतिक औषध दिन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सुधीर तांबे, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, अन्न प्रशासनाचे सह आयुक्त दुष्यंत भामरे, जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष गोरख चौधरी, उपेंद्र दिनानी, औषध निरीक्षक राजेश बनकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष महेंद्र शहा व्यासपीठावर होते. शिवाजी हांडोरे यांनी स्वागत तर अमित कवडे यांनी प्रास्तविक केले. यावेळी २० फार्मासिस्टचा सत्कार करण्यात आला. उपेंद्र दिनानी यांनी आदर्श औषध दुकान कसे असावे? याविषयी मार्गदर्शन केले.

आमदार सुधीर तांबे म्हणाले, की औषध विक्रेत्यांनी नव्या बदलांना सामोरे जावे. क्लिनिकल एस्टाब्लिशमेन्ट अॅक्ट हा कायदा झाल्यास आरोग्य सेवा महाग होतील. सरकारने विक्रेत्यांशी चर्चा करूनच हा कायदा करावा. दुष्यंत भामरे म्हणाले, की समाजाच्या अपेक्षा औषध विक्रेत्यांनी पूर्ण कराव्यात. नागरिकांचा विश्वास संपादन करावा. गोरख चौधरी म्हणाले, की ऑनलाइन फार्मसीमुळे स्त्रीभ्रूण हत्या, बनावट प्रिसक्रिप्शन, युवक नशेच्या आहारी जाणे आदी गंभीर समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे ऑनलाइन फार्मसीच्या विरोधात देशातील औषध विक्रेत्यांनी १४ ऑक्टोबर रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे.

संजय चकोर यांनी आभार मानले. अरुण माळवे, चेतन सोनकुळे, विनायक पावगी, मंगेश पगार, संजय बागूल, अतुल दिवटे, देवीदास उदावंत, प्रवीण शिरोडे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालवाहतूकदारांचा बेमुदत चक्काजाम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संपूर्ण भारतात अडथळा विरहीत वाहतूक व्हावी, मालवाहतूक गाड्यांना टोलसाठी थांबवण्यात येऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार काँग्रेसने गुरुवारपासून बेमुदत चक्काजाम आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे संपूर्ण भारतातील एक कोटी वाहनांद्वारे होणारी माल वाहतूक ठप्प होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरील वाहतूक अडथळा विरहीत व्हावी, यासाठी मालवाहतूकदारांनी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेला फारसे यश आले नाही. या अवैध धंद्यात अनेक मोठ्या धेंडांचे हात बरबटले असल्याने सरकारने या मागणीकडे हेतूपुरस्सर कानाडोळा केला, असे माल वाहतूकदारांचे म्हणणे आहे. ही वाहतूक अडथळा विरहीत व्हावी, अशी मालवाहतूकदार संघटनेची मागणी आहे. टोलच्या नावावर मालवाहतूकदारांकडून नाक्या नाक्यांवर अनेक प्रकारच्या वसुली केल्या जातात. या वसुलीमुळे व्यावसायिकांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जातो. त्याकरिता संपूर्ण भारतात अडथळा विरहीत वाहतूक व्हावी, या प्रमुख मागणीसाठी मालवाहतूकदारांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे. हा संप सकाळी सहापासून सुरू होणार असून, त्यात राज्यातील व जिल्ह्यातील सर्व मालवाहतूकदार सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे मालवाहतूकदारांच्या बिलांवर टीडीएस आकारण्यात येऊ नये, अशी देखील मागणी मालवाहतूकदारांनी केली आहे.

संपूर्ण भारतात माल वाहतुकीद्वारे टोल नाक्यावर अंदाजे १४ कोटी रुपयांची वसुली होते. या वसुली होण्याच्या किमतीच्या दुप्पट रक्कम मालवाहतूदार संघटना सरकारला देण्यास तयार आहे. मात्र, व्यवसायातील अडथळा दूर करावा, अशी मागण्यात करण्यात येत आहे. या संपात नाशिक शहरातील भाजी विक्रेते, पेट्रोल वाहतूकदार तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हा संप जास्त दिवस चालल्यास रोजच्या जीवनमानावर परिणाम होणर असून औद्योगिक उत्पादनावर देखील परिणाम होणार आहे. मालवाहतूकदारांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला असून, लवकरात लवकर याबाबत तोडगा काढावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शालेय वाहतूक बंद नाही

संप काळात संपूर्ण महाराष्ट्रातील शालेय वाहतूक बंद राहणार आहे. मात्र, नाशिक शहरातील शालेय वाहतूकदारांनी संपात सहभाग घेतला नसल्याने ती सुरुळीत सुरू राहणार असल्याचे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे जनसंपर्क अधिकारी कृष्णा शर्मा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉटधारकाची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बनावट सही व पतसंस्थेत दिलेल्या फोटोचा गैरवापर करून भगूरमधील एका प्लॉटमालकाची फसवणूक करण्यात आली. फर्नाज शेख (३५, रा़ राजवाडा, समतावाडी, भगूर) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप गवळी (रा. भगूर), मनीषा बस्ते (देवळाली कॅम्प), आनंदा सासरे (भगूर) व सायरा शेख (संसारी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी संगनमत करून फर्नाज शेख यांचा भगूर येथील सर्व्हे नंबर २५/०९/०२ नंबरचा प्लॉट बनावट दस्तऐवज व खोट्या सह्यांद्वारे नोंदवून घेतल्याची त्यांची तक्रार आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कारमधून बॅग लंपास

जिल्हा परिषद कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारमधून लॅपटॉपसह रोकड चोरीस गेली. मंगळवारी (दि २९) दुपारी ही घटना घडली. उपनगर परिसरात राहणारे सचिन जयराम खापरे (वय ४५, रा परिजातनगर) यांनी आपली कार (एमएच १५, बीव्ही ९९९१) ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर उभी केली होती. चोरट्यांनी त्यांच्या कारमधील बॅग चोरून नेली. बॅगमध्ये सॅमसंग कंपनीचा लॅपटॉप व वीस हजार रुपयांची रोकड असा ३८ हजारांचा मुद्देमाल होता. खापरे यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

सोनसाखळी लंपास

रामकुंडावर स्नानासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली. कमल पांडूरंग गायकवाड (वय ५८, स्वामी विवेकानंद नगर, सिडको) तिसऱ्या पर्वणीला पहाटे चारच्या सुमारास रामकुंडावर स्नानासाठी आल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जीवघेणा हल्ला

मागील भांडणाची कुरापत काढून एकावर धारदार हत्यारासह कोयत्याने वार केल्याची घटना पंचवटीतील फुलेनगरमध्ये सोमवारी (दि २८) रात्री घडली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. साईबाबा मंदिराजवळील विजय चौकातील रहिवाशी राणी लोखंडे यांचे पती प्रवीण मोटरसायकलवरून घरी येत होते. त्यावेळी संशयित संतोष नरेश जाधव, सुनील नरेश जाधव, विनोद नरेश जाधव (सर्व रा. फुलेनगर) यांनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण केली. संशयितांपैकी एकाने धारदार हत्याराने तर दुसऱ्याने कोयत्याने लोखंडे यांच्यावर वार केले. पंचवटी पोलिसांनी संतोष या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, संतोष जाधव यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार टेरेसवर पुतण्याचा वाढदिवस साजरा करीत असताना संशयित प्रवीण लोखंडे, संदीप लोखंडे व संदीप पगारे यांनी दगड फेकला. त्या बाबत विचारणा केली असता तिघांनी चाकूने डाव्या हातावर तर विनोद जाधव यांच्या मानेवर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बलात्काराची फिर्याद

लग्नाचे आमिष दाखवून अडीच वर्षांपासून बलात्कार केल्याची फिर्याद एका पीडितेने पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. शैलेंद्र अरुण कुलकर्णी (वय ३९, स्नेहनगर, दिंडोरी रोड, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. त्याने विवाहाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केले. फसवणूक करून दमदाटी व शिवीगाळ केल्याची पीडितेची फिर्याद आहे. पंचवटी पोलिसांनी कुलकर्णी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

लॅपटॉप चोरीस

बंद घराच्या बाल्कनीचा दरवाजा उघडून चोरट्यांनी लॅपटॉपसह विविध वस्तू चोरून नेल्या. पंचवटीतील राजपाल कॉलनीत हा प्रकार घडला. गौरव अपार्टमेंटमध्ये राहणारे मंदार श्रीनिवास कुलकर्णी कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या बाल्कनीचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना सभेत प्रमुख विषयांनाच बगल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लाखो रुपयांच्या अग्निशमन यंत्रणेच्या मुद्द्याचा साधा उल्लेखही न होता मासिक वर्गणी १० वरून २० रुपये करीत सावानाची २०१३ ते २०१५ ची वार्षिक सर्वसाधारण वादविवाद पार पडली. सावानाचे सभासद करून घेणे ऑडिटमुळे काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते, हा मुद्दा ऐरणीवर आणत जुन्या सभासदांनी नव्यांना सभासदत्वासाठी वेटिंगवर ठेवू नये, त्यांना तत्काळ सभासद करून घ्यावे, अशी एकमुखाने मागणी केली. या मागणीला कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी संमती दर्शवित लवकरच सभासदत्व देणे सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

सावानाच्या स्व. माधवराव लिमये सभागृहात ही सर्वसाधारण सभा झाली. राष्ट्रगीताने सभेची सुरुवात झाली. सर्वप्रथम नरेश महाजन यांनी दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर अभिजीत बगदे यांनी इतिवृत्त वाचन केले. या वाचनानंतर सभासद वसंत खैरनार यांनी सरकारवाड्याच्या जागेचा मुद्दा सभेपुढे ठेवत ही जागा अखत्यारणाबाबत काय झाले, अशी विचारणा केली. त्यावर कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी 'ही जागा आता पुरातत्त्व खात्याच्या मालकीची झाली आहे. आमचे प्रयत्न थकले आहेत. दिल्लीत ओळख असेल त्यांनी आपले वजन वापरून ही जागा वाचनालयाला मिळवून द्यावी, असे आवाहन केले. त्यानंतर सभासदत्त्वाचा मुद्दा मुख्यत्वाने पुढे आला. त्यावर कार्यवाहांनी संगणक बंद अवस्थेत आहेत ते सुरू झाले की सर्व कामाला व्यवस्थित सुरूवात होईल, असे सांगितले.

सत्ताधाऱ्यांनी सुडाच्या भावनेने सावानाचे माजी कार्यवाह श्रीकांत बेणी, माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, हेमंत देवरे व श्रीकृष्ण शिरोडे यांचे सभासदत्त्व रद्द केले आहे. त्यांना पुन्हा सन्मानाने घ्या, अशी एकसुरात मागणी काही सभासदांनी केली. त्यावर प्रचंड गदारोळ झाला. कार्यवाह यांनी घटनेचा आधार घेऊनच त्यांचे सभासदत्त्व रद्द केल्याचे सांगत सभा पुढे नेली.

सावानासाठी खासदार व आमदार निधीतून ५० हजार रुपयांची पुस्तके मिळतात. परंतु, सावानाने कधीच अशा पुस्तकांसाठी पत्र पाठवलेले नाही. सध्याची कार्यकारिणी ही पाठपुरावा करण्यात कमी पडते, असे सांगत सभासदांनी चांगलेच कोरडे ओढले. त्यावर कार्यवाहांनी एकाच विषयावरील पुस्तके मिळत असतात, पुस्तक निवडीचे स्वातंत्र्य नसते असे सांगितले. पां.भा. करंजकर यांनी पोलिस संरक्षण का मागितले, अशी विचारणा केली तर हंसराज वडघुले यांनी काही सभासदांना कोणत्या घटनेच्या आधारे काढले असे प्रश्न विचारले. संविध इन्फोटेक कंपनीने सावानाला स्मार्ट कार्ड बनवून दिले होते, त्याचे काही पेमेंट बाकी असल्याचा मुद्दा मनोज चव्हाणके यांनी उपस्थित केला. परंतु, हा मुद्दा वैयक्तिक असल्याने सावाना कार्यालयात येऊन मिटवावा, असे कार्यवाहांनी सांगितले. वसंत खैरनार यांनी कार्यकारिणीवर आरोप केला की प्रदर्शनासाठी सूडबुध्दीने हॉल दिला नाही. परंतु, त्यावर कार्यवाहांनी काहीही प्रतिक्रिया न देता सभा पुढे नेली. यावेळी व्यासपीठावर कार्यवाह मिलिंद जहागिरदार, अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रा. विनया केळकर, नरेश महाजन, अभिजीत बगदे यांची उपस्थिती होती.

सभासदांच्या प्रमुख मागण्या

नव्यांना तत्काळ सभासद करून घ्यावे.

कर्मचाऱ्यांचा पगार वाढविण्याचा विचार करावा.

कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड असावा.

सर्वांसाठी दप्तरे खुली करून द्यावीत.

सभासदांना पत्राऐवजी एसएमएस पाठवावेत.

खासदार-आमदारांना पत्र लिहून पन्नास हजारांची पुस्तके मिळवावीत.

राज्यघटनेवर आधारित पुस्तके सावानात वाढवावीत.

यशवंतराव चव्हाण यांच्या नावाची कोनशिला वर बसवावी.

यशवंतराव चव्हाण यांचा फोटो दर्शनी भागात लावावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एल अॅण्ड टी’चा अल्टिमेटम झुगारला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुकणे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात ३० सप्टेंबरचा एल अॅण्ड टी कंपनीचा अल्टीमेटम सत्ताधाऱ्यांनी झुगारून लावला आहे. आम्ही मुकणे संदर्भात सरकारशी बांधील आहोत असे सांगत, कंपनीचा अल्टिमेटम अमान्य आहे. मुकणे पाणीपुरवठा योजनेचा निर्णय विशेष महासभेतच होणार असल्याचे स्पष्टीकरण महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले आहे. त्यामुळे 'एल अॅण्ड टी'ला मोठा झटका बसला आहे.

मुकणे पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ ३० सप्टेंबरच्या आत देण्याचा अल्टीमेटम 'एलअॅण्डटी'ने महापालिकेला दिला होता. २६६ कोटीच्या महत्त्वाकांक्षी मुकणे पाणीपुरवठा योजनेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. योजनेसंदर्भात शहरातील आमदारांनी तक्रारी केल्यामुळे चार महिन्यापासून हा प्रक्रिया रखडली होती. 'एलअॅण्डटी' कंपनीची सर्वाधिक

निविदा आल्याने त्यांना काम दिले जाणार होते. मात्र, वादामुळे कंपनीला वेळेत वर्कऑर्डर मिळाली नाही. गेल्या १० सप्टेंबरला कंपनीने किंमती वाढल्याने आणि उशीर झाल्याने प्रकल्पाची किंमत वाढत असून ३० तारखेच्या आत निर्णय घेण्याचा अल्टीमेटम आयुक्तांना दिला होता. त्यामुळे आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांना महासभा घेवून निर्णय घेण्याचे पत्र दिले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

कंपनीची डेटलाईन मंगळवारी (दि. २९) संपल्याने निविदा प्रक्रिया अडचणीत सापडली आहे. मात्र, पत्रकारांशी बोलतांना, मुर्तडक यांनी कंपनीचा अल्टीमेटम आम्हाला बंधनकारक नाही. आम्ही सरकारशी बांधील आहोत कंपनीशी नाही, महासभेत निर्णय घेतल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कंपनीकडून येणारा दबाव

महापौरांनी झुगारून लावल्याने कंपनीलाही झटका बसला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेत राहायचे की नाही याचा निर्णय आता कंपनीलाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मुकणे योजनेचा चेंडू आता कंपनीच्याच कोर्टात आहे. कंपनीचा अल्टीमेटम की मुदत वाढवते की प्रक्रियेतूनच बाहेर पडते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

स्थायी समितीची आज सभा

सिंहस्थामुळे अनेक दिवसांपासून होवू न शकलेली स्थायीची सभा गुरूवारी (दि. १ ऑक्टोबर) सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सिंहस्थ कामांचा गोषवारा या सभेत घेतला जाणार आहे. आयुक्तांकडून सिंहस्थ कामांचा अहवाल स्थायी समितीला सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images