Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गणेशोत्सवामध्ये चार दिवस दणदणाट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशभक्तांना देखाव्यांचा आनंद लुटता यावा यासाठी जिल्ह्यात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि वाद्य वाजविण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही प्रकारची वाद्ये वाजविण्यास मनाई आहे. मात्र गणेशोत्सवात गौरी-गणपती तसेच देखाव्यांचा आनंद लुटण्यासाठी नागरिक रात्रीच घराबाहेर पडतात.

देखव्यांमध्ये वाद्य व ध्वनीक्षेपकच अधिक रंगत आणतात. मात्र, त्यावरच निर्बंध असल्याने मंडळे आणि गणेश भक्तांवरही मर्यादा पडतात. मंडळांना रात्री दहापर्यंतच देखावे सुरू ठेवता येतात. गणेशभक्तांचा हिरमोड होऊ नये यासाठी सरकारने या अटी काही प्रमाणात शिथील केल्या आहेत. त्यानुसार सोमवार (दि. २१), बुधवार (दि. २३), शनिवार (दि. २६) आणि विसर्जनाच्या दिवशी (दि. २७) रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक तसेच वाद्य वाजविण्यास मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.

शहरामध्ये पोलिस आयुक्तांनी तर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत. ध्वनिक्षेपक तसेच वाद्य वाजविण्याची परवानगी देण्यात आली असली तरी त्याचा आवाज ४५ डेसीबलपेक्षा अधिक असू नये, ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांचे गणेश मंडळांनी पालन करावे, असे आदेशही देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाचे गणेश मंडळांकडून स्वागत होत आहे.

पावसामुळे लांबले मंडळांचे देखावे

सातपूर : गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सिडको व सातपूरमधील अनेक मंडळांचे देखावे अद्याप अपूर्णवस्थेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजासह सर्वसामान्य हवालदिल झाले होते. परंतु, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. गणपती उत्सवात पाऊस सुरू असल्याने सिडको व सातपूरमधील गणपती मंडळांचे देखावे देखील पूर्ण झालेले नाहीत. बहुतांश मंडळांनी दुष्काळाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. तर काही मंडळांनी गणपती उत्सावावर होणारा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बकरी ईद २५ सप्टेंबरलाच

$
0
0

जुने नाशिक : त्याग व बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद सण अर्थात 'ईद-उल-अज्हा' शुक्रवारी (दि. २५) साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा नाशिकचे खतिब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब अशरफी यांनी रविवारी केली.

बकरी ईदनिमित्त शहरातील ऐतिहासिक शाहजहाँनी ईदगाह मैदानावर सकाळी दहा वाजता खास सामूहिक नमाज पठण केले जाणार आहे. तत्पूर्वी आठ वाजता शहरातील मशिदीत हे नमाज होईल. अधिकाअधिक मुस्लिम बांधवांनी ईदगाहवर नमाज पठण करून पैगंबरांचे अनुकरण अदा करण्याचे आवाहन धार्मिक नेते अलहाज सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले आहे. दरम्यान, गोवंश हत्याबंदीमुळे भाकड बैल, गोऱ्हे यांची किमान ईदच्या काळात कुर्बानी देण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी काही मुस्लिमांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान अधिग्रहणास विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील नैतिक पतन रोखणारे शिक्षण बालपणापासूनच मिळायला हवे. असे शिक्षण देण्यासाठी वैदिक आणि आधुनिक शिक्षणाचा समन्वय साधणारे बोर्ड स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे, अशी माहिती स्वामी रामदेव बाबा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. देवस्थानांवर सरकारी प्रबंधक आले की तेथील अध्यात्मिक तत्व नष्ट होतात. म्हणूनच सरकारकडून होणाऱ्या देवस्थान अधिग्रहणाला आपला विरोध असल्याचे रामदेव बाबा यांनी स्पष्ट केले.

कुंभमेळ्यानिमित्त रामदेव बाबा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भेटीवर आले आहेत. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, धर्म आणि अध्यात्मासारख्या विषयांवर राष्ट्रीय स्तरावर मंथन करण्यासाठी सिंहस्थाचे व्यासपीठ आहे. आर्थिक, राजनैतिक अवस्थेचे मूल्यांकनही सिंहस्थात व्हायला हवे. राजनैतिक आणि नैतिक पतन देशावरील मोठे धार्मिक संकट आहे. केवळ समाजाचेच नव्हे तर साधू संतांच्या आचरणाचेही पतन होत असून परिणामी समाजातही संभ्रम निर्माण होत आहे. यासाठीच वैदिक आणि आधुनिक शिक्षणाची सांगड आवश्यक असल्याचे मत रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. प्रत्येक संप्रदायाची आचारसंहिता असावी. तिचे काटेकोर पालन व्हावे असे सर्वच आचार्यांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले.

देवस्थानांच्या सरकारी अधिग्रहणाला आपला विरोध असल्याचे रामदेव बाबा यांनी स्पष्ट केले. देवस्थांवरील खासगी ट्रस्टच्या कामकाजात त्रूटी असू शकतात. त्या दूर करता येतात. केवळ मंदिरांची भव्यता, सुशासन उपयोगाचे नाही. तेथील देवत्वही टिकायला हवे, असे परखड मत त्यांनी मांडले. राजकीय व्यक्ती, सरकारी अधिकाऱ्यांची देवस्थानांमधील घुसखोरी धोकादायक आहे. राजकीय व्यक्तींचे वर्तणूक राजकीय दृष्टीनेच अधिक कमजोर असते. तेव्हा त्यांच्या अध्यात्मिक दृष्टीबाबत खात्री कोण देणार असा टोलाही त्यांनी लगावला. समाजाचे नैतिक पतन टाळण्यासाठी शिक्षणाचे स्वदेशीकरण आवश्यक असून त्यामध्ये सायन्स, मॅथेमॅटिक्स, संस्कृत, हिंदी या विषयांसह वैदिक आणि अध्यात्मिक अभ्यासक्रमाचाही समावेश असेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, दुपारी तिडके कॉलनी येथील एसएसके हॉटेलमध्ये रामदेव बाबांनी भक्तांना संबोधित केले. यावेळी उपमहापौर गुरमित बग्गा तसेच शैलेश कुटे यांनी रामदेव बाबा यांचे स्वागत केले.

गायीला राष्ट्रीय पशू जाहीर करा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात दारुबंदी आणि गोहत्या बंदी लागू करावी यासाठी महात्मा गांधी सर्वप्रथम आग्रही होते. गांधींना सर्वच पक्ष आदर्श मानतात. मात्र, गोहत्या बंदी अजूनही होऊ शकली नाही. गायीला राष्ट्रीय पशू जाहीर केल्यास आपोआप गोहत्या बंदी लागू होण्यास मदत होईल. गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याबाबत माझ्यासह सर्व साधू महंतांचे एकमत आहे. देशी गायी झपाट्याने नष्ट होत आहेत. आहे त्या गायींवर तलवार लटकत आहेत. आपण अनेक धार्मिक ग्रंथ वाचले. परंतु, कुठेच गोहत्येचे समर्थन केलेले नाही. तरीही धा‌र्मिक ग्रंथांचा दाखला देऊन गोहत्या करणे चुकीचे आहे. जिथे हिंसेचा विचार मांडलेला असतो तो धार्मिक ग्रंथ होऊच शकत नाही, असेही ते म्हणाले.

जनसंख्येबाबत आदर्श धोरण हवे

देशात हिंदूंची लोकसंख्या कमी होत असून अन्य धर्मिंयांची लोकसंख्या वाढते आहे, याकडे रामदेव बाबा यांचे लक्ष वेधण्यात आले. जनसंख्येबाबत आदर्श धोरण असायला हवे.

जनसंख्या नियंत्रित करता येत

नसेल तर ते मोठे अपयश असते असे रामदेव बाबा म्हणाले. आयुर्वेदाच्या प्रसारासाठी केवळ मंत्रायल बनवून उपयोग नाही. आयुर्वेदाच्या क्षेत्रात सरकारला खूप काही करण्यासारखे असून शुन्यापासून सुरुवात करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

काळ्या धनाबाबत तोंडावर बोट

स्विस बँकामध्ये असलेला काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी रामदेव बाबा यांनी मोहीम उघडली होती. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यामूळे काळे धन भारतात परत येईल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या विषयाकडे सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रामदेव बाबांनी उघडलेली मोहीम थंडावल्याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र, त्यावर मौन पाळणेच रामदेव बाबांनी पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील टँकर्समध्ये घट

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाने दमदार पुनरागमन केल्यामुळे पाणीटंचाईचे संकट टळले असून, जिल्ह्यातील ३६ पाणी टॅँकर तत्काळ बंद करण्यात आले आहेत. पाऊस असाच सुरू राहिला तर आणखी काही टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी आणि टंचाईग्रस्त समजला जातो. या भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक गावांवरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. सिन्नर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या निम्म्यावर आली आहे. सिन्नर तालुक्यात शंभरहून अधिक वाड्या वस्त्यांना २९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. शुक्रवारच्या दमदार पावसामुळे १४ खासगी पाणीपुरवठा करणारे टॅँकर बंद करण्यात आले आहेत. तालुक्यात सध्या केवळ १५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येवला तालुकावासीही यावर्षी पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे तेथील २० पैकी १६ टॅँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. तेथे सध्या केवळ चार टॅँकरद्वारेच पाणीपुरवठा होत आहे. सोमवारी तालुक्यात पाहणी करण्यात येणार असून, टॅँकर बंद करायचे की सुरू ठेवायचे हा निर्णय घेतला जाईल.

नांदगावला नऊ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यापैकी एक टॅँकरचा पाणीपुरवठा बंद केला आहे. चांदवड तालुक्यात सात टँकरद्वारे टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा केला जात होता. त्यापैकी पाच टॅँकर बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी टॅँकर सुरू ठेवावेत की नाही, याबाबतचे पुनर्पाहणी करून अहवाल सादर करावेत, असे आदेश जि. प. प्रशासनाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेसाठी उचलली पावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच शाखांमध्ये दरोडा टाकून कोट्यवधी रुपये लंपास करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सुरक्षेवर महाराष्ट्र टाइम्सने वृत्त प्रकाशित केल्यानंतर बँकेच्या सुरक्षेसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखामध्ये लवकरच शस्त्रधारी सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्राँगरुमला सेन्सर बसविणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांची पुंजी सुरक्षित होणार आहे.

यावर्षी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या करंजाळी (ता. पेठ), अंदरसूल (ता. येवला), निमोण (ता. चांदवड), रावनड (ता. निफाड) व निमगाव (ता. मालेगाव) येथील शाखांमधून सुमारे तीन कोटी रुपये चोरट्यांनी लंपास केले. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमधील ठेवींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन महिन्याच्या अंतरात तीन शाखांवर दरोडा टाकण्यात आले. विशेष म्हणजे येवला शाखा सोडून इतर शाखांमधील दरोड्याचा पोलिसांना अद्याप छडा लावता आलेला नाही. अनेख बँक शाखांमध्ये सुरक्षारक्षक नसणे, सीसीटीव्ही कॅमेरे नसणे, स्ट्राँगरुमच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेणे, शस्त्रधारी सुरक्षा रक्षक नसणे, यावर मटाने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने दखल घेतली असून, लवकरच सर्व बँक शाखांची सुरक्षा वाढवली जाणार आहे.

लवकरच बंदूकधारी सुरक्षारक्षक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण २१० शाखा असून, त्यापैकी ३० शाखांमध्ये स्ट्राँगरुमच्या सुविधा आहे. या शाखांमध्ये बंदूकधारी सुरक्षारक्षक नियुक्त होईपर्यंत स्थानिक सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. बंदूकधारी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्थांकडून देकार मागविण्यात आले आहेत. यासाठी कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच बँकेच्या सर्व शाखांमध्ये रात्रपाळीसाठी रखवालदाराची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वसामान्याच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय योजण्यात आहेत, असे बँक प्रशासनातर्फे निवेदनाव्दारे कळविण्यात आले आहे.

सात ठिकाणी वाजणार सायरन

बँकेच्या सर्व २१० शाखांच्या तिजोऱ्या व स्ट्राँगरूमला सेन्सर लावण्यात येत आहेत. तिऱ्हाईत व्यक्तीने तिजोरीस हात लावल्यास अगर चोरीचा प्रयत्न झाल्यास त्याचा पोलिस स्टेशनसह सात ठिकाणी सायरन वाजून आपोआप त्याची माहिती व जाणीव होणार आहे. यामुळे तत्काळ कारवाई करता येणे शक्य होणार आहे.

सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्व २१० शाखांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व सेन्सरच्या कामासाठी अनुभवी तज्‍ज्ञांची नेमणूक केली आहे. हे तज्ज्ञांनी सर्व शाखांना भेटी देऊन सीसीटीव्ही कॅमेरे व सेन्सर बसविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक स्मार्टच... मध्य प्रदेशने हेच करावे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा कुंभमेळा अद्वितीय होता. प्रशासनाने अतुलनीय कार्य केले. इथे प्रदान करण्यात आलेल्या सुविधा उच्च दर्जाच्या होत्या. याचे वर्णन करण्यासाठी शब्दही नाहीत. आता अशाच दर्जाच्या सुविधा पुरविण्याचे काम मध्य प्रदेश सरकारने करावे, असे आवाहन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केले.

उज्जैन येथे एप्रिल २०१६ मध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्याचे आमंत्रण देण्यासाठी मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहाण त्यांच्या पत्नी सुंदरबाई यांच्यासमवेत आज नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यांनी महंत ग्यानदास यांच्यासह निर्वाणी आखाड्याचे श्री महंत धर्मदास महाराज, निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास यांना कुंभमेळ्याचे आमंत्रण दिले. त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना महंत ग्यानदास यांनी प्रशासनाच्या कामांबाबत कौतुकाचे पुल बांधले. सिंहस्थाचे पडघम वाजू लागल्यापासून मी नाशिकला येत गेलो. येथील प्रशासनाने खूपच सुंदर नियोजन केले. साधू महंतांना शक्य त्या सुविधा पुरविल्या. कुंभमेळा कसा असावा, याचा आदर्श नाशिक प्रशासनाने घालून दिला असून, त्याचे अनुकरण चौहाण यांच्या सरकारने करावे, असा आग्रह महंत ग्यानदास यांनी धरला. मुख्यमंत्री यांनी आदाराने दिलेले निमंत्रण आपण स्विकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर चौहाण यांनी श्री पंच दिगंबर अनी आखाड्याचे श्री महंत कृष्णदास महाराज, श्री रामकिशोरदास शास्त्री आणि महामंत्री वैष्णवदास महाराज यांना भेटून आमंत्रण दिले.

दरम्यान, महंत ग्यानदास यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही चौहाण यांनी दिली. उज्जैन महाकुंभात आदर्श सुविधा प्रदान केल्या जातील. तसेच हा कुंभमेळा पर्यावरण पुरक, मानवी जीवनातील मुल्यांवर अधारीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर चर्चा करण्यासाठी साधू संतांना आमंत्रण देत असून, कुंभमेळ्यातून एक सकारात्मक संदेश आपण देऊ, असा विश्वास शिवराज चौहाण यांनी व्यक्त केले. नाशिककरांनाही उज्जैन कुंभमेळ्यासाठी आमंत्रण देत असल्याचे मुख्यमंत्री चौहाण यांनी सांगितले.

नाशिकमध्ये येऊन धन्य झालो. उज्जैनचा कुंभमेळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी संताचे आशिर्वाद घेतले. उज्जैन कुंभमेळ्याचे व्यापक स्वरूपात आयोजन केले असून, त्यात साधू महंतासमवेत नाशिककरांनी सहभागी व्हावे.

शिवराजसिंग चौहाण, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातन बंदीसाठी मोर्चा

$
0
0

नाशिक : धर्माच्या जोरावर राष्ट्र उभारणी करू पाहणाऱ्या सनातन आणि इसिससारख्या संघटनांवर कायमची बंदी घालावी या मागणीसाठी नाशिक शहरातील पुरोगामी संघटनांतर्फे बुधवारी (दि. २३) शिवाजी रोड, शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. हुतात्मा स्मारक येथे घेण्यात आलेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन सदस्यांनी समीर गायकवाड याचे वकीलपत्र घेण्यास नकार दिल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ही बैठक अध्यक्ष राम गायठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राजू देसले यांनी बैठकीचे प्रास्तविक केले. यावेळी श्रीधर देशपांडे, संजय जाधव, अॅड. दत्तात्रय वायचळे, अमित जोहरे, अॅड. राजपाल शिंदे, अॅड. दत्ता निकम, योगेश कापसे, संजय डुबे, योगेश तांबट, नीलेश सोनवणे, बाळासाहेब गाडे, राहुल गवारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णव आखाड्यांना वेगवेगळे निमंत्रण

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदास दिलेला पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयामुळे श्री पंच दिगंबर अनी आखाडा आणि निर्वाणी तसेच, निर्मोही आखाड्यात निर्माण झालेले वितुष्ट कमी झालेले नाही. या तंट्याचे परिणाम उज्जैन कुंभमेळ्यात होणार असल्याची प्रचिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना रविवारी आली.

नाशिकमधील तीन वैष्णव आणि त्र्यंबकेश्वरमधील १० शैव आखाड्यांना उज्जैन येथे एप्रिल २०१६ मध्ये आयोजित होणाऱ्या महाकुंभाचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री चौहान सपत्नीक नाशिकमध्ये आले होते. त्यांनी तीन वैष्णव आखाड्यांच्या श्री महंतांशी चर्चा केली. मात्र, यावेळेस निर्वाणी आणि निर्मोही एका बाजुला तर दिगंबर आखाडा दुसऱ्या बाजुला असल्याचे स्पष्ट झाले. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष म्हणून महंत ग्यानदास काम पाहत नाहीत, अशी भूमिका दिगंबर आखाड्याने घेतल्याने मुख्यमंत्री चौहान यांनी दिगंबर आखाड्यात समक्ष जाऊन श्री महंत कृष्णदास, रामकिशोरदास शास्त्री आणि महामंत्री वैष्णवदास महाराज यांच्याशी चर्चा केली.

दिगंबर आखाडा सर्वांत मोठा असून, त्यातंर्गत ४५० खालसे येतात. आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली असून, मध्य प्रदेश सरकारने त्यानुसारच काम करावे, अशी अपेक्षा कृष्णदास आणि रामकिशोरदास शास्त्री यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाल्यापासून वेगवेगळे वाद उभे राहिलेत. अगदी आखाड्यांचे ध्वज उतरवण्यावरून सुध्दा तिन्ही आखाडे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हा वाद आता उज्जैन कुंभमेळ्यात उभा राहील. तिथे वैष्णव-वैष्णव आणि शैव-वैष्णव अशी उभी फूट पडणार असून, तो सावरताना मध्य प्रदेश सरकारच्या नक्कीच नाकीनऊ येऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेथी, कोथिंबीर, मिरची महाग

$
0
0

आवक घटल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावत दुष्काळाचे संकट दूर केले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे मेथी, कोथिंबीर, मिरची यांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. मेथी व कोथिंबीर ४० ते ५० रुपये जुडी तर हिरव्या मिरचीचे भाव ६० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. यामुळे मेथी, कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर पालेभाज्यांचे दर आणखी कडाडण्याची शक्यता आहे.

गेल्या शुक्रवारी पावसाने जोरदार पुनरागमन केले. सलग तीन दिवस पाऊस पडत असल्याने त्याचा पालेभाज्यांवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मेथी, कोथिंबीर यांचे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात त्यांची आवकही घटली आहे. मेथी तर बाजारात दिसेनाशी झाली आहे. अत्यंत अल्प प्रमाणात मेथी बाजारात येत असून ४० ते ५० रुपये जुडी या दराने विकली जात आहे. कोथिंबीरचे दरही वाढले आहेत. गेल्या आठवड्यात तीस रुपये जुडी होती. त्यात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. मिरचीचे दरही शनिवारी ८० रुपये किलोपर्यंत गेले होते. मात्र, रविवारी वीस रुपयांनी दर कमी होऊन मिरची ५० ते ६० रुपये किलो दराने ग्राहकांना घ्यावी लागली.

भेंडी, कारले, गिलके, मुळा, शेपू-पालक, बटाटे, फ्लॉवर, कोबी यां भाज्यांचे दर जैसे थे आहेत. सरासरी तीस ते चाळीस रुपये किलोने या भाज्या मिळत आहेत. वांग्यांची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. वांगे वीस ते तीस रुपये किलो तसेच, वाटा पध्दतीने विकले जात आहेत. ढोबळी मिरचीचे दरही थोडे वाढले आहेत. वीस रुपयाला वाटा किंवा तीस रुपये किलो या दरोन ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. काकडी, टोमॅटोचे दर मात्र जैसे थे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संततधार सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. धुव्वांधार कोसळणाऱ्या पावसामूळे गिरणा आणि पालखेड धरण समूहातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. मालेगाव, सिन्नरसह निफाड, नांदगाव, बागलाण आणि येवल्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १६६.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात मात्र पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.

गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेनंतर दुसऱ्याच दिवशी मध्यरात्रीपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मालेगाव, सिन्नर या तालुक्यांमध्ये तर रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. सिंहस्थातील तिसऱ्या पर्वणीत (१८ सप्टेंबरला) जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. एकाच दिवसात गिरणा खोऱ्यातील धरणांमधील पाणी पातळीत तब्बल ४० टक्क्यापर्यंत वाढ झाली. गंगापूर धरण समूह आणि पालखेड धरण समूहातील धरणांमध्येही चार ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मात्र शनिवारी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला.

मालेगाव, सिन्नर, निफाड, नांदगाव, बागलाण आणि येवल्यात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची अधिकृत आकडेवारी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी आठ या कालावधीत सर्वाधिक ९२.२ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल पेठमध्ये २६.३ आणि इगतपुरीत २६.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वरमध्ये ७.०, नाशिक ६.३, कळवण २.२, दिंडोरीत २.०, चांदवड येथे १.० मिमी पाऊस झाला.

शहरात पावसाचा जोर कायम

शनिवारी मध्यरात्री शहरात पावसाचा जोर वाढला. रविवार दिवसभर शहरातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. रविवारी दिवसभर शहरवासियांना सूर्यनारायणाचे दर्शन होऊ शकले नाही. सिंहस्थाची तिसरी पर्वणी पार पडली तरीही नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांचा ओघ कायम आहे. असे भाविक आणि व्यावसायिकांची या पावसाने धांदल उडविली. सिंहस्थानंतर आता गणेशोत्सवाच्या तयारीला लागलेल्या गणेश भक्तांची या पावसाने परीक्षा पाहीली. अनेक ठिकाणी मंडळांनी मंडप उभारले असले तरी देखाव्यांची कामे अजूनही पूर्ण होऊ शकली नाहीत. तर काही ठिकाणी देखावे तयार झाले आहेत. देखाव्यांचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडण्याचे गणेश भक्तांचे नियोजन होते. मात्र या नियोजनावर पावसाने पाणी फेरले.

धरणांच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ

संततधार पावसामूळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा एक टक्क्यांनी वाढून ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमी गोदावरी धरणातील पाणी साठ्यात रविवारी दुपारपर्यंत प्रत्येकी एक टक्क्याने वाढ झाली आहे. मात्र पालखेड आणि गिरणा धरण समूहातील पाणी साठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पालखेड धरणातील पाणीसाठ्यात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पुणेगाव धरणातील पाणीसाठा ३७ टक्क्यांवरून ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. वालदेवी कालपर्यंत ६७ टक्के भरले होते. ते ७८ टक्के भरले आहे. कडवा धरणातील पाणी पातळीत नऊ टक्क्यांनी वाढ झाली असून, तेथील उपयुक्त पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. भोजापूर धरणातील पाणीसाठयातही दुपटीने वाढ झाली असून, हा साठा ३७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुमेहींना मिळणार मोफत इन्सुलिन

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

हालाखिच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मधुमेही योग्य ते उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या मदतीसाठी मोफत इन्सुलिन पुरविण्याचा निर्णय मधुमेह तज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेमार्फत नुकताच घेण्यात आला आहे.

मधुमेहावर योग्य ते उपचार न घेता येण्याची परिस्थिती अनेकांवर येते. पैशांअभावी निर्माण होणाऱ्या या समस्येचा अनुभव बालमधुमेहींच्या बाबतीत अनेकदा येतो. त्यामुळेच मधुमेहतज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेच्या बैठकीमध्ये याबाबत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नाशिक डायबेटीस असोसिएशनमार्फत देण्यात आली. भारतातील मधुमेहींना मोफत सन्सुलिन पुरविण्याच्या योजना या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत आखण्यात आली. या योजनेची सुरुवात १५ वर्षाखालील मधुमेहींपासून करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

नाशिक परिसरातील मधुमेहींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक मधुमेह संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजित कुमठेकर यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या महिनाअखेरीपूर्वी नाव नोंदणी करावी लागणार आहे. नावनोंदणीसाठी पेशंटचे नाव, जन्मतारीख (पुराव्यासह), पत्ता व फोन नंबर ही माहिती पुरवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व या योजनेचा लाभ घेण्यासाठी गंगापूररोडवरील मविप्र समाज संस्थेच्या आयएमआरटी कॉलेजसमोर असलेल्या सुमती मधुमेह सल्ला केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बंद उद्योगांबाबत निर्णय घ्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

महाराष्ट्र शासनाच्या सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत डब्ल्यूएमडीसी व डीआयसी यांच्याकडून फायदे घेणारे उद्योग घटक बंद पडले असल्यास, असे उद्योग घटक दुसऱ्या उद्योग घटकाच्या नावे हस्तांतर करता येत नाही. अशा बंद उद्योगाबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण चव्हाणके व तज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी सदिच्छा भेट दिली असता ही मागणी करण्यात आली. ना. भुसे यांना दिलेल्या निवेदनात अन्य मागण्याही मागण्या करण्यात आल्या. संस्थेच्या एरियात आज साधारणपणे १०५ प्लॉटवर ९२ उद्योग व माळेगाव शासकीय औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १५० उद्योग वर्षानुवर्ष बंद आहेत. असे एकूण सिन्नर तालुक्यात जवळजवळ २५० उद्योग वर्षानुवर्ष बंद असल्याने त्या बंद उद्योगांमधील कोट्यवधी रुपयांची मशिनरी, त्या उद्योगांच्या कारखाना इमारती, गोडाऊन इत्यादी मालमत्ता देखील वर्षानुवर्ष धूळखात पडून आहेत. त्यामुळे सिन्नर तालुक्यात आज हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक डेड स्वरुपात धूळखात पडून आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे बंद उद्योगांमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली मालमत्ता डेडस्वरुपात पडून आहे. याचा शासनाकडून गांभीर्याने विचार करून बंद उद्योगाबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सिन्नर तालुका सहकारी ओद्योगिक वसाहतीच्या वतीने करण्यात आली.

तसेच, संस्थेच्या कार्यक्षेत्रात उद्योगांना पाणीपुरवठा कमी पडत असून, सध्या १५०० घनमीटर पाणी पुरवठा होत असून, यामध्ये ५०० घनमीटर पाणी वाढवण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. या औद्योगिक क्षेत्राच्या बाजूला संस्थेने ६ हे. १६ आर ही जमीन खरेदी केली आहे. सध्या ही जमीन जिरायत झोनमध्ये समाविष्ट झाली आहे. सदर जमीन जिरायत झोनमधून औद्योगिक वापरासाठी बदल करून मिळावा. त्याचप्रमाणे संस्थेच्या कार्यक्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये रस्ते तयार करण्यासाठीच्या प्रस्तावात असेलेल्या जाचक अटी रद्द कराव्या, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, चेअरमन अरुण चव्हाणके, व्हा. चेअरमन पंडित लोंढे, तज्ञ संचालक नामकर्ण आवारे, प्रभाकर बडगुजर, अविनाश तांबे, किशोर देशमुख, मीनाक्षी दळवी, रामदास दराडे, सुनील कुंदे, संदीप आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, सुरेश उगले आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवामध्येच अंधाराचे साम्राज्य

$
0
0

पथदीप दुरुस्तीची देवळालीकरांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

नाशिकरोडहून देवळाली कॅम्पमध्ये प्रवेश करतांना मार्गात लागणाऱ्या लामरोड भागात गेल्या आठवडाभरापासून अनेक पथदीप बंद आहेत. या बंद पथदीपांबाबत वारंवार मागणी करूनही दुरुस्ती करण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या पथदीपांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या कार्यालयात लामरोड भागातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी याबाबत तक्रार नोंदविली आहे. गणेशोत्सवात तरी हे पथदीप सुरू व्हावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नव्या जुन्या सर्वच प्रकारच्या पथदीपांची नियमित तपासणी केली जात नसल्याने अनेक भागात पथदिपांवर वेलींचे साम्राज्य पसरले आहे. तसेच विविध ठिकाणी वृक्षांच्या फाद्यांची अडचण पुरेसा प्रकाश पाडण्यात अडथळा निर्माण करीत आहे. त्यातच लामरोड डांबरीकरण करण्यात आल्याने या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी वाहने सुसाट धावत असतात. यातच मार्गात जागोजागी गतिरोधक आहे. मात्र, अंधारामुळे गतिरोधक दिसून येत नाहीत. यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी चोऱ्यांच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. दोन दिवसापूर्वी महालक्ष्मी मंदिर परिसरातील खाजगी सोसायटीमध्ये अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासनाने पथदीपांच्या देखभालीसाठी खाजगी ठेका दिला असल्याने ते याबाबत लक्ष घालत नसल्याने समस्या गंभीर बनली आहे. लामरोडसह परिसरात विविध गणेशमंडळे असून भाविक या भागात देखावे व आरास पाहण्यासाठी गर्दी करतात. मात्र, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचे फावणार तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

देवळालीच्या महत्त्वाच्या रस्त्यांवरील पथदीपांचे काम करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. लवकरच पथदीप सुरू करण्यात येणार आहे. - आशा गोडसे, नगरसेविका

तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण झाल्या असून आम्ही त्या सोडविण्याकामी प्रयत्नशील आहोत. शहरातील सर्वच पथदीप सुरळीत सुरू होतील. - विलास पाटील, अभियंता, नगररचना विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काची सुटी मिळणार कधी?

$
0
0

सिंहस्थाच्या बंदोबस्तासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सहा महिन्यापासून कुंभमेळ्याचा ताण झेलणाऱ्या पोलिसांना आता गणशोत्सवाची ड्युटी लागली आहे. पाठोपाठ नवरात्र सुरू होणार असल्याने सुटी केव्हा मिळणार? असा सवाल पोलिस कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जातो आहे. कुंभमेळ्यातील ११ सप्टेंबरची सुटी अधिकृत की अनाधिकृत याबाबतही त्यांच्यात संभ्रम आहे.

कुंभमेळ्यातील १३ सप्टेंबरच्या दुसऱ्या पर्वणीला विक्रमी गर्दी झाली होती. पोलिसांना १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीतील साप्ताहिक सुट्या रद्द करून कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या कालावधीत ज्यांची साप्ताहिक सुटी होती त्यांना सुटीचे पैसे किंवा बदली सुटी मिळणार आहे. कुंभमेळ्यामुळे पोलिसांनी अठरा तास ड्युटी केली. १२, १३ आणि १४ सप्टेंबर या तीन दिवसांतील सुटी रदद् झाल्यानंतरही पोलिस आयुक्त कार्यालयाने पोलिसांना ११ सप्टेंबरला कुंभमेळ्याच्या रंगीत तालीमसाठी पहाटे चारपासून बोलावले होते. त्यामुळे ती साप्ताहिक सुटीही रद्द झाली. ही सुटी अधिकृतपणे रद्द झाली असेल तर बदली सुटी मिळेल किंवा पैसे मिळतील का असा सवाल पोलिस कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होतो आहे.

पूर्व परवानगीचे काय?

मुंबईत वाकोला पोलिस ठाण्यात रजा नाकारल्याने एका पोलिसाने वरिष्ठांची हत्या केली होती. तेव्हापासून पटावरील संख्या बघून आठवड्यातून एकदा पोलिसांना साप्ताहिक सुटी द्यावी. साप्ताहिक सुटी किंवा रजा रद्द करायची असल्यास पूर्व परवानगी घ्यावी, असे निर्देश पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. नाशिकमध्ये स्थानिक व बाहेरगावचे सतरा हजार पोलिस कर्मचारी आणि अधिकारी कुंभच्या बंदोबस्ताला होते. त्यापैकी सुमारे तीन हजार जणांची ११ सप्टेंबरची सुटी रद्द झाली आहे. पोलिसांना १२ किरकोळ, ३० अर्जित रजा असतात. परंतु, मंत्र्यांचे दौरे, कायदा सुव्यवस्था आदींमुळे त्या पूर्ण उपभोगता येत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक कारखाना सुरू करा

$
0
0

वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांची एकमुखी मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कामगारांसह चार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा जगण्याचा आधार असलेला नाशिक साखर कारखाना (नासाका) सुरू करण्याची एकमुखी मागणी कारखान्याच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी केली.

पळसे येथे कारखाना कार्यस्थळावर सभा झाली. मुख्य प्राधिकृत अधिकारी बी. एस. बडाख अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार देवीदास पिंगळे, अॅड. माणिकराव कोकाटे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, बाबा सदाफुले, तानाजी गायधनी, सुनील आडके, दिनकर आढाव, विजय करंजकर, बबनराव कांगणे, सुभान शेख, अॅड. सुभाष हरक, अशोक खालकर, विष्णूपंत म्हैसधुने, भाऊसाहेब शिंदे, निलेश दिंडे, बी. डी. करंजकर, भाऊसाहेब गडाख, शिवाजी गायधनी, नारायण मुठाळ, बाळासाहेब कासार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यशवंत शिरसाठ यांनी सूत्रसंचलन केले. विष्णूपंत गायखे व सभासदांनी कारखाना सुरू करण्याचे १९ प्रस्ताव दिले.

सभेचे अध्यक्ष बडाख म्हणाले, की माझी नियुक्ती सहा महिन्यासाठी आहे. त्यातील दोन महिने शिल्लक राहिले आहेत. कारखाना सहकारी तसेच खासगी तत्वावर चालविण्यास देण्याचे प्रयत्न मी केले. मंदी असल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मतदारयाद्या तयार असल्या तरी आवश्यक आठ लाखाचा निधी नसल्याने निवडणूक घेणेही अवघड आहे.

देवीदास पिंगळे म्हणाले, की एनीपीएमध्ये असलेल्या संस्थाना व्याजाची आकारणी होत नसतानाही जिल्हा बँक कारखान्याकडून व्याज आकारत आहे. त्यामुळेच कारखाना बंद आहे. खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून मी कारखाना कर्जाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव दिला असल्याचेही पिंगळे यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी मदतीची ग्वाही दिली. माजी अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी कारखाना त्वरित सुरू करण्याची गरज व्यक्त केली.

दिनकर आढाव म्हणाले, की मागील संचालक मंडळाच्या चुकांमुळे बंद असलेला कारखाना त्वरित सुरू करावा, अशी सभासदांची भावना आहे. अनेकांनी कारखाना सुरू करण्याची मागणी केली.

संतू पाटील, मधुकर सातपुते, अशोक जाधव, नामदेव गायधनी, लिलाबाई गायधनी, जन्याबाई दाते, लक्ष्मणराव सांगळे, अंबादास ताजनपुरे, रतन जाधव, शिवाजी म्हस्के, गणपत गायधनी, संजय तुंगार, नवनाथ गायधनी, दिलीप थेटे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कुंभमेळ्यासाठी हवे विकास प्राधिकरण’

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

एखाद्या घटनेस १२ वर्षांचा काळ लोटणे ही मोठी बाब आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनात हीच बाब डोकेदुखी ठरत असून त्यावर मार्ग काढण्यासाठी कुंभमेळा राष्ट्रीय विकास प्राधिकरणाची स्थापना होणे आवश्यक असल्याचे मत गोवर्धन पीठाधिपती शंकराचार्य स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ महाराज यांनी व्यक्त केले.

कुंभमेळा हा राष्ट्रीय उत्सव आहेत. यासाठी केंद्र सरकार मोठ्या स्वरूपात निधी देते. देशाच्या चार प्रमुख राज्यांमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन होते. तसेच देशविदेशातील भाविक कुंभमेळ्याला हजेरी लावतात. हा राष्ट्रीय उत्सव असेल तर त्याचे नियोजन देखील तसेच होणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्र सरकारने त्वरित कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करणे आवश्यक आहे. या प्राधिकरणात त्या त्या राज्यातील अधिकारी, आखाड्यांचे साधू महंत, धर्मगुरू समाजसेवक यांचा समावेश करावा. याचे मुख्यालय मुंबई येथे करून तेथूनच चारही कुंभमेळ्याच्या तयारीचे नियोजन व्हावे, अशी मागणी अधोक्षाजानंद महाराजांनी केली. नाशिक कुंभमेळा व्यवस्थित पार पडला. मात्र, पहिल्या प​र्वणीला धांदला उडाली. किती भाविक येणार याची निश्चित माहिती कोणालाच नव्हती. त्यामुळे प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, प्राधिकरणातील अधिकारी एका पाठोपाठ एक येणाऱ्या कुंभमेळ्यांचे नियोजन करतील. त्यामुळे त्यांचा अनुभव वाढत राहिल. कुंभमेळ्याच्या आयोजनात रेल्वे, परराज्यातील पोलिस, परराज्यातील स्वयंसेवक असे कितीतरी घटक काम करतात. याचा सारासार विचार केंद्र सरकारने करावा, अशी अपेक्षा महाराजांनी व्यक्त केली. नाशिक कुंभमेळ्या दरम्यान केंद्र सरकारचा निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे आश्चार्य वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, फुटीरवादी नेत्यांशी सतत संपर्क झाला. मात्र, केंद्र सरकारने बोलाचालीसाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे नाशिकमध्ये हे संमेलन करणे शक्य झाले नाही. आता, उज्जैनमध्ये हे काम तडीस नेले जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंजाबचे निवडणूक आयुक्त कुंभमेळ्यात

पंजाब राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. के. सिंग यांनी सोमवारी कुंभमेळ्यात हजेरी लावली. त्यांनी सपत्नीक अधोक्षाजानंद महाराजांना भेटत दर्शन घेतले. यानंतर त्यांनी कुंभमेळ्याचे महत्त्व, या काळात केली जाणारी धार्मिक कार्ये याविषयी माहिती घेतली. रामकुंड येथे जाऊन त्यांनी स्नान केले. दरम्यान, उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई आणि तहसीलदार गणेश राठोड या दाम्पत्याने सुध्दा महाराजांचे आशीर्वाद घेत प्रसादाचा लाभ घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीमध्ये १७ साधू-भाविकांना ‘मोक्ष’

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील साधूग्राममध्ये ​पहिल्या पर्वणीपासून तिसऱ्यापर्वणीपर्यंत एकूण १७ साधू व भाविकांचा वेगवेगळ्या कारणाने मृत्यू झाला. यात वैयक्तिक स्वरूपाचे आजार कारणीभूत ठरले. ऐन पर्वणी काळात झालेल्या मृत्यूने मोक्ष मिळतो, अशी श्रध्दा साधू समाजात तसेच भाविकांमध्ये आढळून येते.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तिन्ही पर्वण्या मिळून नेमके किती भाविक दाखल होणार, याचा नि​श्चित आकडा स्पष्ट नव्हता. परिणामी, तो वाढवून सांगण्यात आला. प्रत्यक्षात तिन्ही पर्वण्यांमध्ये सुमारे ५० लाख भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला. कुंभमेळ्यात स्नानाने महापुण्य मिळते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती ओढवली तरी लहान-मोठ्यांची पाऊले कुंभामेळ्याच्या दिशेने निघतात. प्रचंड लोकसंख्येमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. नाशिकमध्ये हीच परिस्थिती पाहण्यास मिळाली. २९ ऑगस्ट रोजी पहिली पर्वणी पार पडली. तेव्हापासून १८ सप्टेंबर म्हणजे शेवटच्या पर्वणीपर्यंत त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये दाखल झालेल्या तब्बल १७ साधू आणि भाविकांचा हार्ट अटॅक, ताप किंवा इतर आजारांनी मृत्यू झाला. या काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींना मोक्ष मिळतो, अशी सर्वांची धारणा आहे.

साथीच्या रोगांवर नियंत्रण

प्रचंड गर्दीत सुध्दा स्वाईन फ्लू किंवा साथीच्या आजारांचा फैलाव झाला नाही. यासाठी आरोग्य विभागाची तयारी सुध्दा उपयोगी ठरल्याचा दावा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. होले यांनी केला. स्वाईन फ्लू अजूनही आटोक्यात असून आजच्या स्थितीला ६ संशयित पेशंट स्वाईन फ्लू वॉर्डात उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांत मृत्युमुखी पडलेल्या ६ संशयित पेशंटचे अहवाल नेगीटीव्ह आले असल्याचे डॉ. होले यांनी स्पष्ट केले. पर्वणी काळात मृत्युमुखी पडलेले साधू किंवा भाविक वेगवेगळ्या आजाराने त्रस्त होते. येथे आल्यानंतर आजार बळावल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. होले यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरघोडीचा खेळ सुरूच

$
0
0

दिगंबर-ग्यानदास वादात राधे बाबांची उडी

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

श्री दिगंबर अनी आखाड्याशी सलग्न असलेल्या राधे-राधे बाबा यांची मध्य प्रदेश सरकार आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कॉर्डिनेटर म्हणून नियुक्त करीत महंत ग्यानदास यांनी दिगंबर आखाड्यावर पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. दिगंबर आखाडा आपल्या भूमिकेवर ठाम असून अशा नियुक्तीबाबत माहिती नसल्याचे आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी स्पष्ट केले.

दिगंबर आखाड्याशी सलग्न असलेल्या राधे राधे बाबांनी आपली नियुक्ती होताच इंदौर गाठले. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वादावर लवकरच पडदा पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तीन आखाड्यांनी मिळून आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी महंत ग्यानदास यांची नियुक्त केले. तीन प्रमुख म्हणजे अनी आखाड्यात १८ आखाडे समाविष्ट असून त्यातील १६ आखाड्यांचा आजही महंत ग्यानदास यांनाच पाठिंबा असल्याचा दावा राधे राधे बाबांनी केला. यावरून दिगंबर आखाड्यात फूट पडल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर उज्जैनमध्ये महंत ग्यानदास हेच अध्यक्ष म्हणून काम पाहतील, अशी पुष्टीही राधे राधे बाबांनी जोडली. दरम्यान, याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसून त्यावर मत व्यक्त करणे चुकीचे होईल. मी माहिती घेऊन सांगतो, असे दिगंबर अनी आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री यांनी सांगितले.

ग्यानदास महाराज आज अयोध्याला परतणार

नाशिक सिंहस्थात केंद्रस्थानी राहिलेले महंत ग्यानदास महाराज मंगळवारी (दि. २२) सकाळी अयोध्याला परतणार आहेत. मागील चार महिन्यांपासून महंत ग्यानदास नाशिकमध्ये मुक्कामी होते. एक महिना आयोध्या येथे थांबल्यानंतर ते थेट उज्जैन महाकुंभमेळ्याचे काम पाहण्यासाठी रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. नाशिकमध्ये महंत ग्यानदास यांचे प्रतिनिधी म्हणून भक्तीचरणदास यांनी काम पाहिले. आता ही जबाबदारी दिगंबर आखाड्याच्याच राधे राधे बाबा यांना सोपवण्यात आली असून उज्जैन येथे सर्व वादाचा सोक्षमोक्ष होईल, असा दावा संबंधितांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनविरोधी बंदीचे कुभांड

$
0
0

डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक समीर गायकवाड यांना कोणताही सबळ पुरावा नसतांना अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे सनातन संस्थेला लक्ष्य करून केलेली अन्याय्य कारवाई आहे. या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेला नाहक गोवून हिंदुत्ववादी संघटनांची मानहानी करण्याचे हे पुरोगाम्यांचे षड्यंत्र असल्याचे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त आफळे यांनी केले.

डॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या समीर निर्दोष असल्याचा दावा डॉ. आफळे यांनी केला. सनातनचे हिंदुत्वाचे कार्य जोमाने वाढत असल्याने पुरोगामी आणि निधर्मी यांचा वैचारिक पराभव झाला आहे. तो पचनी न पडल्याने 'मीडिया ट्रायल' करणारे, पुरोगामी मंडळी आणि कम्युनिस्ट, काँग्रेस आदी पक्षांनी पोलिसांची चौकशी आणि न्याययंत्रणेचे न्यायदान होण्याआधी सनातनविरोधी कुभांड रचून संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी नंदकुमार जाधव म्हणाले, की गायकवाड यांच्यावर अद्याप कुठलेही आरोपपत्र दाखल झाले नसतांना पुरोगाम्यांनी राईचा पर्वत करून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची केलेली मागणी अन्यायकारक आहे. काही पुरोगामी संघटनांच्या अपप्रकारांची सनातनने भांडाफोड केल्याने त्या पानसरे हत्याप्रकरणी एकत्रितपणे सनातनला लक्ष्य करू पाहत आहेत. सनातन संस्था समाजाला अध्यात्माचा प्रसार करणारी धर्मनिष्ठ संस्था आहे. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करून अनेक जण तणावमुक्त आणि व्यसनमुक्त झाले आहेत. अनेक जण राष्ट्रकार्यात सहभागी झाले. अशा संस्थेचे खरे कार्य समजून न घेता त्यावर टीका करणे, हा हिंदुत्वाचे खच्चीकरण करण्याचा पुरोगाम्यांचा प्रयत्न आहे. आम्ही तो सफल होऊ देणार नाही. संत आणि हिंदुत्ववादी संघटना सनातनच्या पाठीशी आहेत, असेही जाधव म्हणाले.

सनातनवरील बंदीच्या षड्यंत्राचा आणि सनातनचे समीर गायकवाड यांच्या अटकेचा हिंदू जनजागृती समिती, श्रीराम सेना यांच्यासह अन्य समविचारी हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला आहे. सर्व हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेच्या मागे भक्कमपणे उभे आहोत, असे जाहीर करण्यात आले. पत्रकार परिषदेला श्रीराम सेनेचे मारुती सुतार, हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट हे उपस्थित होते. सनातनच्या पत्रकावर जगदगुरू रामानुजाचार्य, महामंडलेश्वर, महंत, वारकरी संत यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्र न्यायाधीश दौलताबादकर यांचे निधन

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

जिल्हा व सत्र न्यायालयातील तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्यंकटेश अरविंदराव दौलताबादकर (वय ४६) यांचे आज, सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दौलताबादकर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देखील होते.

मूळचे परभणी जिल्ह्यातील असलेले दौलताबादकर यांनी सुरुवातीस परभणी जिल्हा न्यायालयात सुमारे १५ वर्षे वकिली केली. त्यानंतर २०१० मध्ये जिल्हा न्यायाधीशपदाची थेट परीक्षा देत ते न्यायीक सेवेत दाखल झाले. ९ जून २०१४ पासून ते नाशिकच्या जिल्हा न्यायालयात नियुक्त झाले. येथे त्यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशपदाची धुरा सांभाळली. दिवाणी व फौजदारी

दाव्यातील अपिलांचे काम त्यांच्या न्यायालयात सुरू होते. यापूर्वी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याविरोधातील खटल्यात त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यामुळे घोलप यांना निवडणूक लढवता आली नाही.

सोनई हत्याकांडाची सुनावणी देखील त्यांच्या न्यायालयात होती. आजच, सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होती. मात्र, सकाळच्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना सुरुवातीस खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. दौलताबादकर यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी उशिरा नाशिक अमरधाम येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी न्याय विभागातील विविध मान्यवर उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वरच्या देवस्थान ट्रस्टचेही ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाची बातमी त्र्यंबकमध्ये पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी ‌विविध पदाधिकारी यांनी ना‌शिक येथे हजेरी लावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images