Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शनिवारीच साधली स्थानिकांनी पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रविवारी होणाऱ्या पर्वणीच्या काळात गर्दीचा त्रास नको म्हणून स्थानिक नागरिकांनी पिठोरी अमावस्या सुरू होताच रामकुंडावर स्नान करणे पसंत केले.

दर अमावस्येला गंगेवर स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते, असा भाविकांचा समज आहे. त्यामुळे पोळा आणि पिठोरी अमावस्या वर्षातला महत्त्वाचा सण असल्याने शहरातल्या नागरिकांनी शनिवारीच शाहीस्नान आटोपून घेतले. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना त्रास नको. आपली गर्दी झाल्याने त्यांना आंघोळ करता येणार नाही, त्याकरिता आपण पर्वणीच्या अगोदर किंवा नंतर आंघोळ केलेली बरी अशी नाशिकमधील नागरिकांची भावना होती. शहरातील जुने नाशिक पंचवटी, रविवार पेठ, भद्रकाली या भागातील नागरिक सकाळपासूनच आोघोळीकरता रामकुंडावर पोहचले होते. गर्दी नसल्याने हवा तितका वेळ त्यांना स्नान करता आले.

भोंगे वाजलेच नाही!

सिंहस्थातील शाहीस्नानासाठी येणाऱ्या भाविकांना शहरातील परिस्थिती समजावी यासाठी शहरात साडेतीन कोटी रुपये खर्च करून भोंगे लावण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक भोंगे सुरू नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्राऊड अन् सिक्युरिटी मॅनेजमेंटची कसोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडला दुसऱ्या पर्वणीच्या पूर्वसंध्येपर्यंत रेल्वे आणि पुणे रस्तामार्गे दीड लाख भाविक दाखल झाले. रविवारी (ता.१३) पर्वणीपर्यंत ही संख्या दोन लाखापर्यंत जाणे शक्य आहे. त्यामुळे रेल्वे व पोलिस प्रशासनाच्या सिक्युरिटी आणि क्राऊड मॅनेजमेंटची कसोटी लागणार आहे.

रेल्वेने आलेल्या भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्याचे (होल्ड अन्ड रिलिज) नियोजन पहिल्या पर्वणीत गर्दीमुळे कोलमडले होते. तेव्हा रेल्वेने ८० हजार भाविक आले. यावेळी दुप्पट भाविक येणार असल्याने प्रभावी नियोजन झाले आहे. येणाऱ्या गाड्या चौथ्या फ्लॅटफार्मवर तर परतणाऱ्या पहिल्या फ्लॅटफार्मवर थांबवण्यात येत आहेत.

सुरक्षाव्यवस्था कडक

नाशिकरोड, देवळाली, आणि ओढा स्थानकात रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस यांचे एक हजार जवान तैनात आहेत. नागपूर, भुसावळ, मुंबई आदी भागातून जवान आले आहेत. रायफलधारी जवान, बाम्बशोधक व दहा श्वानपथक सिन्नरफाटा, चौथा फ्लॅटफार्म, सुभाषरोड, मालधक्का, बुकिंग कार्यालय येथे गस्त घालत आहे. तपासणीसाठी बारा मेटल डिक्टेक्टर बसविण्यात आले आहेत. सव्वाशे तिकीट तपासनीस आले आहेत. पोलिस आयुक्त जगन्‍नाथन, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाप्रबंधक आर. पी. त्रिपाठी, पोलिस अधीक्षक अनंतकुमार रोकडे आदींनी कालच सुरक्षेचा आढावा घेतला.

रेल्वे अभियंत्यांचे पथक

कुंभ स्पेशल व अन्य रेल्वे गाड्यांचे इंजिन तपासण्यासाठी नऊ अभियंते, पन्‍नास कर्मचारी यांचे पथक, वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता डी. के. गजभिये, व्ही. टी. किर्तीकर आणि वरिष्ठ विभाग अभियंता एम. के. शिवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज आहे. भाविकांसाठी देवळाली आणि ओढा येथे २५ हजार लिटर तर नाशिकरोड स्थानक आणि चेहेडी येथे २५ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे.

प्रवेश फक्त मालधक्कामार्गेच

भाविकांना चार नंबर फ्लॅटफार्मवरून त्र्यंबकेश्वर आणि जेलरोडच्या तीन घाटावर सोडले जाईल. परतीच्या भाविकांना देवळालीगावातील गांधी पुतळ्यापर्यंत बसने सोडल्यानंतर मालधक्कामार्गेच रेल्वेस्थानकात प्रवेश मिळेल. नाशिक-पुणे रस्तामार्ग व रेल्वेने येणाऱ्या भाविकांना सकाळी सहानंतर मुंबई नाका महामार्ग व काठेगल्ली त्रिकोणी गार्डनपर्यंत बसने सोडले जाईल. भाविक लक्ष्मीनारायण घाटावर जातील. दसक घाटावर जाण्यासाठी पहाटे तीन ते सहापर्यंत सैलानी बाबा चौकापर्यंत बसने सोडले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस यंत्रणा सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थातील दुसऱ्या शाही पर्वणीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात तब्बल १८ हजार पोलिस बंदोबस्तावर असून, शहराला छावणीचे रूप आले आहे. शाही मिरवणूक आणि शाही पर्वणीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, ठिकठिकाणी पोलिसांचा खडा पहारा पहावयास मिळत आहे.

दुसऱ्या पर्वणीत गर्दीचे नियंत्रण आणि भाविकांची सुरक्षा यांना विशेष महत्त्व आहे. गत कुंभासारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून यंदा अधिक काळजी घेतली जात आहे. या पर्वणीसाठी ५० लाखांहून अधिक भाविक येतील, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. शाही मिरवणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दल, केंद्रीय सुरक्षा बल, एनडीआरएफ, होमगार्ड, बीडीडीएस पथके यांसह १८ हजार दलांची फौज सज्ज झाली आहे.

पहिल्या पर्वणीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी बंदोबस्ताचा अतिरेक केल्याची ओरड नागरिकांकडून करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या पर्वणीत बॅरिकेडिंग शिथिल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्याचा ताण अधिक मनुष्यबळावर पडणार आहे. पोलिस आयुक्तांनी गृह विभागाकडे अतिरिक्त पोलिस मनुष्यबळ मिळावे, अशी मागणी केली होती. पहिल्या पर्वणीला सुमारे १२ हजार अतिरिक्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरात होता. या व्यतिरिक्त शहर पोलिसांकडे २९०० एवढे मनुष्यबळ आहे. असे पहिल्या पर्वणीत तब्बल १५ हजार पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर होते. मात्र आता हीच संख्या १८ हजारांवर पोहोचली आहे. प्राप्त झालेल्या अतिरिक्त मनुष्यबळामध्ये दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि राखीव दलांच्या तीन हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पहिली पर्वणी तुलनेने कमी मनुष्यबळामध्ये साजरी करण्यात आली असली तरी दुसऱ्या पर्वणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे अशी मागणी करण्यात त्याचवेळी करण्यात आली होती. ५० पोलिस निरीक्षक २ हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. महासंचालकांनी त्यांच्याकडील राखीव फोर्समधून ६०० पोलिस कर्मचारी, तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या जिल्ह्यातील ३०० शहर वाहतूक पोलिस कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव दल, रॅपीड अक्शन फोर्स, सीमासुरक्षा दल अशा १७ कंपन्या बंदोबस्तासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

पोलिस बंदोबस्त

पोलिस उपआयुक्त - १५

सहायक पोलिस

आयुक्त - ४५

पोलिस निरीक्षक - २२५

सहायक पोलिस निरीक्षक - ७३०

पोलिस कर्मचारी - ९ हजार ७२

बॉम्बशोधक पथके - १२

एसआरपी - १७ कंपनी

शीघ्र कृती दल - २ कंपनी

शहरातील अधिकारी व कर्मचारी - २९००

होमगार्डस : ५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राम हाऊसफुल्ल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अमावस्येची पर्वणी साधण्यासाठी देशभरातील किमान ८ ते १० लाख भाविक दुपारपर्यंत शहरात दाखल झाले. साधुग्राममध्ये तर शुक्रवारी रात्रीपासूनच अडीच लाखांपेक्षा अधिक भाविक मुक्कामी थांबले असून, शनिवारी हा आकडा चार लाखांच्या पुढे सरकू शकतो. पहिल्या पर्वणीला रजा घेतलेल्या पावसाने शनिवारी दमदार हजेरी लावल्याने नाशिकसह त्र्यंबकेश्वरमधील भाविकांची तारांबळ उडाली.

सूर्य, चंद्र आणि गुरू हे सिंह राशीत आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मीळ योग शनिवार सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांपासूनच सुरू झाला. या महापर्वादरम्यान स्नान करण्यासाठी राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये एकच गर्दी केली. शुक्रवारपासूनच भाविकांची गर्दी वाढत गेली. या दिवशी साधुग्राममध्ये तब्बल अडीच लाख भाविकांचा मुक्काम होता. यातील बहुतांश नागरिकांना रस्त्यावरच मुक्काम करावा लागला.

अचानक नो एंट्री झोन

अमावस्येच्या काळात स्नान करण्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांमुळे रामकुंड परिसरात एकच गर्दी झाली. सकाळी नऊ वाजता भाविकांची संख्या प्रचंड वाढल्याने पोलिसांनी साडेनऊ वाजता नो एंट्री झोनची अंमलबजावणी सुरू केली. याबाबत अनभिज्ञ असलेल्या स्थानिक नागरिकांना याचा फटका बसला. नो व्हेइकल झोनमध्ये जाऊ देत नसाल तर पर्यायी पार्किंगचे ठिकाण सांगा, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला गेला. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना पर्यायी पार्किंगची ठिकाणे माहितीच नव्हती. अनेक ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून स्थानिक नागरिकांवर अरेरावी झाल्याच्या तक्रारी समोर आल्या.

अनपेक्षित संख्या आणि पोलिसांची तारांबळ

शुक्रवारी शहरात दाखल झालेले भाविक परत निघतील, असा प्रशासनाचा होरा चुकला. शहरात आलेल्या भाविकांनी त्र्यंबकेश्वरची वाट धरण्यास सुरुवात केली. शनिवारी सकाळी भाविकांच्या गर्दीत वाढ होत गेल्याने सकाळी रात्री १२ वाजताच बाह्य पार्किंग सुरू करण्यात आले. पार्किंगची सर्व ठिकाणे दुपारपर्यंत ७० टक्क्यापेक्षा जास्त भरली होती. या भाविकांना घेऊन येणाऱ्या बसेस आणि शहरातंर्गत वाहतूक यामुळे द्वारका, मुंबई नाका, पंचवटी, औरंगाबाद हायवे, तपोवन, जुने नाशिक आदी भागात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाही पर्वणीवर पर्जन्य संकट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दक्षिण गंगा अर्थात गोदावरीच्या तिरावर आज, रविवारी कुंभमेळ्याची दुसरी शाही पर्वणी पार पडणार आहे. या पर्वणीचा योग साधत पावसानेही शनिवारी शहरासह जिल्हाभरात दमदार हजेरी लावल्याने नाशिककर सुखावले आहेत. मात्र पावसामुळे साधुग्राममध्ये पाणी साचल्याने साधूंसह भाविकांचे हाल झाले. यामुळे शाही पर्वणीवर पर्जन्य संकट निर्माण झाल्याचे चित्र साधुग्राममध्ये होते.

सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी पिठोरी अमावास्येची पर्वणी साधत देश-विदेशातून नाशकात दाखल झालेल्या हजारों भाविकांनी पवित्र रामकुंडात स्नान केले. पहिल्या पर्वणीचे अनुभव गाठीशी असल्याने पोलिसांकडून भाविकांप्रती यावेळी शिथिलता अनुभवण्यास मिळाली. पहिल्या पर्वणीचे अतिरेकी नियोजन यावेळच्या पर्वणीत पुरते बदलण्यात आले असून, जागोजागी भाविकांना रामकुंडापर्यंत तसेच लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास पावसामुळे प्रशासनासह भाविकांची त्रेधातिरपीट उडाली.

त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तावरही असेच वातावरण अनुभवायला मिळाले. दोन्ही ठिकाणी मिळून रविवारी होणारा हा १३ आखाड्यांच्या शाहीस्नानाचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरणार आहे. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणाही चोखपणे कर्तव्य बजावत आहे. शुक्रवारी सायंकाळपासूनच रामकुंडात स्नानासाठी हळूहळू गर्दी वाढली होती. शनिवारी दुपारनंतर ती अधिकच वाढली. 'सियावर रामचंद्र की जय' अशा जयघोषात लोक गोदावरीत डुबक्या मारत होते. आज, रविवारी सकाळी सहा वाजेपासून आखाड्यांच्या मिरवणुका आणि त्यांच्या शाहीस्नानाचा आखाडा रंगणार आहे. लाखो भाविक शाहीस्नानासाठी नाशिकमध्ये दाखल झाला आहेत.

आज पहिला मान निर्मोहीला

शाहीस्नानादरम्यान कोणत्याही चकमकी होऊ नये, वाद उदभवू नये यासाठी पोलिस प्रशासनाने आखाड्यांची क्रमवारी ठरवून दिलेली आहे. त्यानुसारच हे स्नान होणार आहे. दुसऱ्या शाही पर्वणीत निर्मोही आखाडा पहिल्या क्रमांकावर स्नान करणार असून, त्यांची मिरवणूक साधुग्रामपासून सहा वाजता निघणार आहे. त्यांना रामकुंडावर सात वाजता त्यांना स्नानाची वेळ देण्यात आलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिगंबर आखाडा असून, त्यांची मिरवणूक साडे सहा वाजता निघणार आहे. त्यांना साडे सात वाजता शाहीस्नानाची वेळ दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर निर्वाणी आखाडा स्नान करणार असून त्यांची मिरवणूक सात वाजता साधूग्राम येथून निघणार आहे. आठ वाजता त्यांनी रामकुंडावर पोहोचत स्नानाची वेळ साधायची आहे. या शाही मिरवणुका लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरू होणार असून, प्रत्येक आखाड्यांना शाहीस्नानासाठी तीस मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. सर्व आखाड्यांचे शाहीस्नान सकाळी १0 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून, त्यानंतर भाविकांसाठी रामकुंड खुले केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रुग्णांवर उपचार हे धर्मकार्यच’

$
0
0

नाशिक : रुग्णांवर उपचार करणे हे एक प्रकारचे धर्मकार्यच आहे. या लोकसेवेबरोबरच धर्माचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य वैद्य ह.भ.प. माधवानंद महाराज यांनी करावे, असे मत तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाडा व षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.

गुरुमाऊली आश्रमाचे संचालक वैद्य माधव महाराज यांना महंत श्री श्री १००८ आयुर्वेदाचार्य माधवादनंदजी सरस्वती या उपाधीने सन्मानित करण्यात आले. स्वामी सागरानंद सरस्वती यावेळी म्हणाले की, वैद्य माधवानंद यांनी वनऔषधींचा अभ्यास करून सामान्य रुग्णांची सेवाच केली असून, वनऔषधींचे असाधारणत्व एकप्रकारे अधोरेखीत केले आहे. पदवीदान सोहळ्याला उत्तर देताना वैद्य माधवानंद यांनी सांगितले की, आपण यापुढे रुग्णसेवेबरोबरच जनसेवा व ईश्वरसेवा, धर्मकार्यात निष्ठेने काम करू. यावेळी व्यासपीठावर धर्माचार्य सोमेश्वरानंद, गणेशानंद सरस्वती, गिरीजानंद सरस्वती उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाड्यांमध्ये गौडबंगाल!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतून रोज १७१ घंटागाड्याचें पेमेंट निघत असताना प्रत्यक्षात १२६ गाड्या सुरू असल्याचे वास्तव समोर आले. सुमारे ४५ गाड्या या धूळ खात पडल्या असतानाही त्यांच्या नावावर फेऱ्या दाखवण्यात येत आहेत. शहराच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या घंटागाडी योजनेला घरघर लागली असून, आरोग्य विभागाच्या बनवेगिरीमुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पालिकेच्या दप्तरी १७१ घंटागाड्या सुरू असताना प्रत्यक्षात १२६ घंटागाड्याच रस्‍त्यावर धावत आहेत. सुमारे ४५ घंटागाड्या बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे उर्वरित गाड्यांची अवस्था दयनीय असल्याचे समोर आले आहे. स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी घंटागाड्यांसह खत प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणीत धक्कादायक बाबी समोर आल्या. काही गाड्या जीर्ण झाल्या असून टायर फुटणे, ब्रेक फेल होणे, रस्त्यात गाड्या बंद पडणे या घटना नित्याच्या झाल्या आहेत. संबंधित ठेकेदाराकडे गाड्यांची देखभाल व दुरुस्ती असताना ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे संबंधित ठेकेदारावरच कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी यावेळी दिले. घंटागाड्यांची पाहणी करण्यासाठी निघालेल्या स्थायी समितीच्या शिष्टमंडळाला रस्त्यावरच घंटागाड्याची दैनावस्थेची जाणीव झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संदर्भ’मध्ये कंत्राटींना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइलमध्ये फोटो काढला अशी कुरापत काढून दोन महिलांसह अन्य काही कर्मचाऱ्यांनी संदर्भ सेवा रुग्णालयातील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केल्याने तणाव निर्माण झाला. अखेर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मध्यस्थी करून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्याकडे समस्या मांडल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

संदर्भ रुग्णालयात ठेकेदारामार्फत सुमारे १२० कंत्राटी कर्मचारी कामास आहेत. ते सीटू संघटनेशी संलग्न होत असल्याची पाटी रुग्णालयाबाहेर लावली होती. तेव्हापासून येथे वादाची ठिणगी पडली आहे. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी मोबाइलमध्ये फोटो काढल्याचा आरोप दोघा महिला कर्मचाऱ्यांनी केला. शनिवारी सकाळी त्यांच्याकडील मोबाइल काढून घेत त्यांना मारहाण केली. मारहाणीत भास्कर शंकर पालवे (वय ३०, रा. बोरगड, म्हसरूळ), प्रकाश नारायण गवळी आणि योगेश देवीदास गवळी हे कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले.

नगरसेवक तानाजी जायभावे, खासदार ह‌रिश्चंद्र चव्हाण यांनी मध्यस्थी केली. डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली. हे प्रकरण तात्पुरते मिटवले असले तरी कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यात या प्रकरणी कोणतीही तक्रार करण्यात आलेले नाही.

कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप

आम्हाला १३ हजार रुपये पगार असताना ठेकेदार केवळ सहा हजार रुपये हातात देतात, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आम्ही सात वर्षांपासून काम करीत आहोत. ठेकेदाराने नव्या कामगारांना घेऊन आमच्यावर अन्याय सुरू केला आहे. आम्हाला मारहाण होत असताना अधिकारी बघ्याची भूमिका घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकला बसेसची ‘धाव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहिल्या पर्वणी दरम्यान भाविकांनी पाठ फिरवल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या एसटी महामंडळास दुसरी पर्वणी फलदायी ठरणार आहे. नाशिक शहरातर्गंत, बाह्य पार्किंग ते अतंर्गत पार्किंग आणि त्र्यंबकेश्वर आदी मार्गावर बसेसचे नियोजन योग्य झाले. मुंबईनाका, नाशिकरोड तसेच मेळा बस स्थानकावरून दर १५ मिनिटाला एक बस त्र्यंबकेश्वरच्या दिशेने धावत होती.

पहिल्या पर्वणी दरम्यान नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांनी तुरळक हजेरी लावली. त्यातच नाशिकमधून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नव्हती. अनेक बाह्य पार्किंगला त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविक उपलब्ध होते. बसेसही हजर होत्या. मात्र, नियोजनच नसल्याने एकही बस शहरातून त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहचू शकली नाही. यातून धडा घेतलेल्या प्रशासनाने दुसऱ्या पर्वणीसाठी यात बदल केले. नाशिकमध्ये आलेले भाविक त्र्यंबकेश्वरला जाण्याची इच्छा ठेवतात. म्हणून मुंबई नाका, नाशिकरोड, मेळा बस स्थानकासह काही बाह्य पार्किंगवर त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून दिल्या. ही सेवा शनिवारी सकाळी सहा वाजेपासून सुरू केली.

बससेवा सुरू झाल्यापासून दर १२ ते १५ मिनिटांनी प्रवाशांनी पूर्ण भरलेली बस त्र्यंबकेश्वरला रवाना होत असल्याची माहिती मुंबई नाका येथे कार्यन्वित असलेल्या वाहतूक निरीक्षकांनी दिली. मुंबई नाका येथील संदीप हॉटेल शेजारील पार्किंगच्या ठिकाणावर त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या बसेस उभ्या केल्या आहेत. अहमदनगर येथून आलेल्या सुमारे १५० बसेस येथे असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दुपारनंतर पंचाईत

दुपारपर्यंत प्रवाशांच्या संख्येत सातत्य होते. मात्र, दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. याचा फटका एसटी महामंडळाला सुध्दा बसला. पाऊस संपल्यानंतर प्रवांशानी पुन्हा गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरनियोजनामुळे वाढली गर्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फेरनियोजनामुळे पर्वणीच्या आदल्या दिवशी शहरात चांगली गर्दी वाढली असून, ८० लाख भाविक पर्वणीला येणार असल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. शनिवारी महाजन यांनी रामकुंडासह, साधुग्राम आणि विविध ठिकाणी दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. भाविक मिळेल त्या मार्गाने नाशिकमध्ये येत असल्याने दुसरी पर्वणी यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

पहिल्या पर्वणीतील अपयशानंतर दुसऱ्या पर्वणीचे पूर्णता फेरनियोजन करण्यात आले. भाविकांना नाशिकमध्ये येण्याचे आमंत्रण करण्यात देण्यात आले. दुसऱ्या पर्वणीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शनिवारीच नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासह उपाययोजनांची माहिती यंत्रणेकडून जाणून घेतली. महाजन यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेन्द्रंसिह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत रामकुंड, साधुग्राम, शाहीमार्गाची पाहणी करीत उपाययोजनांचा आढावा घेतला. नागरिकांच्या सूचनेनुसारच आता फेरनियोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे भाविकांचा ओघ दोन दिवस आधीपासूनच वाढला आहे. अमावस्येची पर्वणी असल्याने जवळपास ८० लाख भाविक येतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. सर्व रेकॉर्डस तुटतील असे सांगत सुरक्षाव्यवस्था चोख असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ना. महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथील सुरक्षा व नियोजनाचाही अधिका-यांकडून आढावा घेतला आहे. यामुळे त्यांनी वरील दावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरणातील पाणी विसर्ग थांबवला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यातील दुसऱ्या शाही पर्वणीदरम्यान स्नान करण्यासाठी शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविक दाखल झाले. त्यातच दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग काही तास कोसळलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागाला तत्काळ थांबवावा लागला. पाऊस आणि गर्दी यामुळे नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनावर दबाव वाढल्याचे चित्र शनिवारी संध्याकाळी निर्माण झाले.

अमावस्येच्या महापर्वाचा लाभ घेण्यासाठी शुक्रवारपासून चार ते पाच लाख भाविक शहरात दाखल झाले. यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत आणखी वाढ झाली. एकीकडे गर्दीचा महापूर वाहत असताना दुपारी तीन वाजता मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले. साधुग्राम, शाहीमार्ग तसेच रामकुंड परिसरातील भाविकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला. द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊससमोर, राजीव गांधी भवन, गाडगे महाराज पूल आदी ठिकाणी मोठ्या स्वरुपात पाणी साचले. गाडगे महाराज पुलाखालील शाहीमार्गावर वाघाडी नाल्याचे प्रचंड पाणी वाहत होते. शाही मिरवणुकीदरम्यान असाच पाऊस कोसळल्यास मिरवणुकीचा बोजवारा उडू शकतो.

साधुग्राममध्ये पाणीच पाणी

दुपारी तीन वाजेपर्यंत शहरात ऊन पडलेले होते. रात्रीपासूनच भाविकांची तुफान गर्दी झालेल्या साधुग्राममध्ये भाविकांना उभे राहण्यास सुध्दा जागा नव्हती. त्यातच दुपारी तीन वाजेच्या सुमारास गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे साधुग्राममध्ये एकच धांदल उडाली. साधुग्राममधील सखल भागात पाणी साचल्याने साधू-महंतासह भाविकांना त्रास सहन करावा लागला. अशीच परिस्थिती रामकुंड परिसरात पाहण्यास मिळाली. सकाळपासून सुरू झालेली भाविकांची रिघ पावसामुळे कमी झाली.

पावसामुळे उडाली तारांबळ

भाविकांच्या राहण्याची सोय नसल्याने फजिती.

पावसाच्या तडाख्यानंतर रामकुंड झाले रिते.

नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ.

वाहतूक कोंडीमुळे भाविकांसह नाशिककरांचे हाल.

साधुग्रामसह शहरातील सखल भागात साचले पाणी.

परिस्थितीनुसारच निर्णय

दुसऱ्या शाही पर्वणीसाठी गंगापूर धरणातून ४०० ते ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्याचे काम शनिवारी सकाळी सुरू झाले. मात्र, दुपारी तीन वाजता शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास दोन तासांपेक्षा अधिक वेळ पाऊस पडला. पावसाचे पाणी थेट नदीपात्रात जमा होऊ लागले. धरणातील पाणी आणि पावसाचे पाणी यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी उंचावण्याची शक्यता होती. त्यामुळे पाऊस सुरू झाल्याबरोबर गंगापूर धरणातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला. परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेणार असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

''दुपारी चार वाजेपर्यंत गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे वातावरण होते. मात्र, तिथे पाऊस सुरू झालेला नव्हता. शहरातील पावसाचे प्रमाण पाहून गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला.''

- आर. एच. शिंदे, एक्झिक्युटिव्ह इं​जिनीअर, पाटबंधारे विभाग

''शनिवारी दुपारी नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला नाही. आजच्या पावसाचा पिण्याच्या पाण्यासाठी कोणताही उपयोग झालेला नाही.''

- प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीत १९४७ वेळा शंखनाद

$
0
0

नाशिक : शंखनादापासून निघणाऱ्या पवित्र ध्वनींची सकारात्मकता कुंभाच्या पर्वणीनिमित्त रामकुंडास भेट देणाऱ्या भाविकांसाठीही प्रासादीक ठरावी, या हेतूने हैदराबादेतील शंख वल्लभव्यासांनी दक्षिणवाहिनी गोदेच्या तटी अनोखाच संकल्प सोडला आहे. देशाला सन १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. या समीकरणानुसार पर्वणीच्या पूर्वसंध्येपासून तर शाहीस्नानाच्या मंगल प्रभात दरम्यान शंखवल्लभव्यास हे सलग १९४७ वेळा शंखनाद करून पर्वणीचा आनंदी द्विगुणित करणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा हा संकल्पांचा मेळा बनला असून, जगभरातील साधू-महंतासह लाखो भाविक आपल्या संकल्पपूर्तीसाठी नाशिकमध्ये येत आहेत. साधुत्वापासून तर सांसारीक माणसांपर्यंतच्या अनेक वल्लीचा त्यात समावेश आहे. साधुग्राममध्ये अशा अवलियांची मांदियाळीच भरली आहे. यापैकीच एक असलेले शंख वल्लभव्यास शनिवारी रामकुंडाच्या तटाचे आकर्षण बनले. रामकुंडावर आपल्या अनोख्या शंखनादातून सकारात्मक व पवित्र ध्वनीची निर्मिती करून रामकुंडाचा परिसर पवित्र व भक्तीमय करीत आहेत. या ध्वनीतून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा ही राज्यासह देशातील संकटे दूर करतील, असा दावा वल्लभव्यास करीत आहेत.

आपल्या तीन सहकाऱ्यांसमवेत त्यांनी गोदाकाठी १९४७ वेळा शंखनाद करण्याचा संकल्प अमावस्थेच्या प्रारंभापासून सुरू केला. सकाळपासून अन्न पाण्याविना त्यांनी दिव्य शंखनाद मोहिमेला सुरुवात केली. पर्वणीच्या सकाळच्या पर्वापर्यंत तो चालणार आहे. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानासह देशभरात सध्या सुरू असलेल्या गढूळ वातावरणात शुद्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी पवित्र अशा नाशिकच्या कुंभमेळ्याची निवड केली आहे. या कुंभमेळ्यातील ऊर्जा देशभर पसरत असल्याने पर्वणीच्या प्रारंभाला त्यांनी दिव्यशंखनादाला सुरुवात केली आहे. आपल्या पवित्र कार्याने देशभरातील संकटे दूर होऊन पूर्ण देशभर सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा त्यांचा दावा आहे.

२९ राज्यात करणार शंखनाद

कुंभमेळ्यानतर शंख वल्लभव्यास हे देशातील २९ राज्यांच्या राजधानीत जाऊन शंखनाद करणार आहेत. राज्यांसह देशावरील संकटे दूर करण्यासाठी आपण हा संकल्प केला असून, त्याची सुरुवात नाशिकमधून केल्याचे शंखवल्लभव्यास यांनी सांगितले. देशावरील प्रेमापोटीच आपण देशावरील संकटे दूर करण्यासाठी आपल्या परिने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षभरात हा संकल्प पूर्ण करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बर्फानी दादा एकमेव व्हीआयपी!

$
0
0

नाशिक : यंदाच्या सिंहस्थात लाखो साधू-महंत नाशकात येणार असले तरी महंत कायाकल्पी संत श्री १०११ योगीराज बर्फानी दादाजी महाराज हे एकमेव व्हीआयपी महाराज असणार आहेत. कारण, राज्य सरकारने साधू, महंतांपैकी केवळ बर्फानी दादा यांना राज्य अतिथीचा दर्जा बहाल केल्याने त्यांना आगामी पर्वणींसह नाशिक भेटीत व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जाणार आहे.

दर १२ वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा साधू, महंत आणि भाविकांचा वैश्विक सोहळा असल्याने साहजिकच लाखोच्या संख्येने हे सर्व जण दाखल होतात. अमावस्येला होणाऱ्या शाही पर्वणीविषयी साधू-महंत आणि भाविकांमध्ये प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक सिंहस्थात अमावस्येच्या पर्वणीला सर्वाधिक गर्दी पहायला मिळते. हीच पर्वणी रविवारी होणार असल्याने त्यासाठीची जय्यत तयारी झाली आहे. त्यातच आता राज्य सरकारने महंत कायाकल्पी संत श्री १०११ योगीराज बर्फानी दादाजी महाराज यांना राज्य अतिथी हा दर्जा देण्याचे जाहीर केले आहे. परिणामी, नाशकातील लाखो साधू-महंतांमध्ये केवळ बर्फानी दादा यांनाच सरकारी व्हीआयपी दर्जा बहाल झाला आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या शाही पर्वणीसाठी बर्फानी दादांना व्हीआयपी दर्जा देण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना दिले आहेत. याच आदेशाचा आधार घेत १९ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत राज्य अतिथी या दर्जाद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सोयीसुविधा प्रदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केले आहे. तहसीलदार गणेश राठोड यांची बर्फानी दादा यांचे संपर्क अधिकारी म्हणून नियुक्तीही केली आहे.

थेट कनेक्शन

बर्फानी दादा यांनाच का राज्य अतिथीचा दर्जा देण्यात आला, याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्फानी दादा यांचे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्या जोरावरच त्यांना हा दर्जा देण्यात आला आहे. याविषयी चर्चा होत होती.

मिरवणुकीत 'शाही' दर्जा

दुसऱ्या आणि तिसऱ्या शाही पर्वणीतील शाही मिरवणुकीसाठी बर्फानी दादा यांच्यासह त्यांच्या जवळपास एक हजार भाविकांना राज्य अतिथी या दर्जा अंतर्गत शाही ट्रिटमेंट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, मिरवणुकीत लाखो साधू सहभागी होणार असले तरी केवळ बर्फानी दादाच अशा प्रकारच्या शाही दर्जाचे मानकरी राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोरदार पावसाने साधुग्रामची वाताहत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनिवारी शहरात झालेल्या दमदार पावसाचा मोठा फटका साधुग्राम परिसराला बसला. पावसाने साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पालिका प्रशासनासह विविध आखाडे आणि खालशांचीही चांगलीच दमछाक झाली. चिखलमय बनलेल्या या परिसरातून वाट काढणे भाविकांनाही मुश्किल झाले होते. शिवाय साधुग्राममधील तंबूत शिरलेल्या पावसाच्या पाण्याचे जीवनावश्यक वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

पहिली पर्वणी अपेक्षित गर्दी आणि पावसाशिवाय पार पडली. याऊलट चित्र दुसऱ्या पर्वणीदरम्यान आहे. शनिवारी दुपारनंतर अचानक पावसाने जोर धरल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी पडझड झाली. काही ठिकाणी जुन्या भिंती तर काही ठिकाणी विजेच्या तारांचा निभाव लागला नाही. साधुग्राममध्ये विविध आश्रम, आखाडे आणि खालशांच्‍या वतीने उभारण्यात आलेल्या कमानीही मोडकळीला आल्या. अनेक ठिकाणी तंबूही खचले.

या परिसरातील साधूंच्या निवास स्थानातील किचेन परिसरातही मोठा बोजवारा उडाला. स्वयंपाकाच्या चुलींसह भोवतालच्या जीवनावश्यक वस्तूंवरही पाणी फेरले गेले. तंबूंमध्येही गुडघाभर पाणी साचल्याने शाही पर्वणीच्या पूर्वसंध्येला मात्र या व्यवस्थेवर साधू-महंतांना लक्ष केंद्रित करावे लागले. शहरात येणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने उड्डाणपुलाच्या खाली आश्रय घेतला.

दरम्यान, गंगापूर धरणाच्या साठ्यातही वाढ झाल्याने रामकुंडातही पाण्याची पातळी वाढविण्यात आली होती. अमावस्ये निमित्ताने या परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्तही कडक करण्यात आला होता.

साधू-महंतांची नाराजी

या पावसाने साधुग्राम परिसरात पुरविलेल्या सेवांचा पुरता बोजवारा उडाला. परिणामी विविध आखाड्यांच्या साधू आणि महंतांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. दूरच्या राज्यांमधून येणाऱ्या भाविकांसाठी संबंधित साधू-महंतांचे पेंडाल्स मोठे आश्रयस्थान आहेत. या ठिकाणी बहुसंख्य भाविकांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात येते. मात्र, पावसानंतर सर्वच व्यवस्था विस्कळीत झाल्याने रात्रीतून पुन्हा पावसाचे अशीच हजेरी लावल्यास साधूंसमोर निवासाचा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीतील पाणी वैज्ञानिकदृष्ट्या पवित्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीतील शाहीस्नान हे वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षित असल्याचा निष्कर्ष कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मा व्हॅली आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेजमध्ये मेक इन ब्रह्मा व्हॅली उपक्रमाच्या माध्यमातून कॉलेजच्या प्राध्यापकांनी संशोधन करून काढला आहे.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शाहीस्नानापूर्वीचे व शाहीस्नानानंतरचे गोदावरीतील नमुने घेऊन त्याचे रासायनिक विश्लेषण केले होते. या विश्लेषणात त्यांना कोणतीही प्राणघातक रसायने सापडली नसल्याने हे पाणी शाहीस्नानासाठी सुरक्षित असल्याचे या निष्कर्षातून समोर आले असल्याचे सांगण्यात आले. पाणी वाहते असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे मर्क्युरी कॅडमियम यासारख्या हानिकारक धातू या पाण्यात आढळले नसल्याचे उल्लेख या संशोधनात करण्यात आला आहे.

या कॉलेजचे विज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. वैभवी पाटील व केमिस्ट्री विभागप्रमुख प्रा. निलेश जाधव यांनी प्राध्यापकांचा ब्रह्मोत्सवात गौरव केला. संशोधनासाठी संस्थेचे संस्थापक राजाराम पानगव्हाणे व प्राचार्य डॉ. बापूराव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांचा हट्ट अन् पोलिसांची भंबेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीन प्रमुख अनी आखाड्यांचे शाहीस्नान आटोपून खालशांचे साधू महंत स्नानासाठी येत असतानाच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यशवंतराव महाराज पटांगणावरील भाविकांना रामकुंडावर येऊ द्यावे, असा आदेश उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना दिला. चक्क पालकमंत्र्याचा आदेश आल्याने पोलिस अधिकारी चक्रावले. मात्र, एका तासाच्या अंतराने ठरलेल्या नियोजनाप्रमाणेच पोलिसांनी भाविकांना सोडण्याचा निर्णय घेतला.

सकाळी रामकुंड परिसरात शाहीस्नान सुरू असताना भाविकांचा एक मोठा लोंढा गांधी तलावाच्या बाजूने रामकुंडाच्या दिशेने पुढे सरकला. पोलिसांनी तत्काळ त्यांना मागे सरकावरले. यशवंतराव महाराज पटांगणावर भाविकांचे स्नान सुरू असले तरी त्यांना रामकुंडावर यायचे होते. सकाळी ११ वाजता आखाड्यांचे शाही स्नान आटोपल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी य. म. पटांगणांवरील भाविकांना रामकुंडावर सोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनी पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांना याबाबत विचारणा केली. मात्र, वरिष्ठांचा आदेश नसल्याचे सांगत अंबिका यांनी त्यास नकार दिला. तरीही पालकमंत्र्यांनी आपला आग्रह कायम ठेवत पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. यानंतर, पालकमंत्री तिथून निघून गेले. या घटनेनंतर तब्बल अर्धा ते एक तासाच्या अंतराने भाविकांना रामकुंडावर प्रवेश देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् टळली जीवितहानी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामकुंडावर शाहीस्नानाचा उत्साह ओसंडून वाहत असताना गांधी तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोघा मुलांचा जीव धोक्यात गेला. होमगार्डसह जीवरक्षक दलातील मुलांनी तातडीने पाण्यात उड्या मारून बुडणाऱ्या मुलास बाहेर काढले. वेळ आली पण काळ आला नव्हता अशीच काही प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली.

दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील गायकवाड नगर येथे राहणारा महेश बेंडाळे (१७) आणि त्याचा एक साथिदार गांधी तलावत पोहण्यासाठी उतरले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांनी गंटागळ्या घाण्यास सुरूवात केली. हे पाहून तिथे कर्तव्यावर असलेल्या जालना जिल्ह्यातील होमगार्ड राजेंद्र मधुकर पालवे (२२) याने पाण्यात उडी मारली. मात्र, बुडण्याची भीती असलेल्या बेंडाळेसह त्याच्या साथिदाराने राजेंद्रलाच पाण्यात ओढले. यातून निर्माण झालेल्या आरडाओरड्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी बुडणाऱ्या तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. राजेंद्रसह महेशच्या साथिदाराला बाहेर काढण्यात आले. मात्र, महेश पाण्याच्या प्रवाहाबरोबर गांधी तलावाच्या मोरीतून पुढे सरकला. याची कल्पना आलेल्या यशवंतराव महाराज पटांगणावरील जीवरक्षकांनी लागलीच पाण्यात उड्या मारून वाहत जाणाऱ्या महेशला पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने प्राथिमक आरोग्य केंद्रावर आणण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास यशवंत महाराज पटागंणावरील भाविकांनी रामकुंडावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरले. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची अॅम्ब्युलन्स होळकर पुलाजवळच अडकून पडली.

अॅम्ब्युलन्सला वाट मोकळी

मुलांच्या बुडण्याच्या घटनेनंतर भाविकांसह अॅम्ब्युलन्सला रामकुंडापर्यंत वाट मोकळी करून देण्यात आली. पहिल्या पर्वणी दरम्यान देखील गांधी तलावत असाच प्रकार घडला होता. त्यामुळे गर्दी काळात गांधी तलावला बॅरकेडिंग करावेत, अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अलोट गर्दीत हरवले 'साधू'

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : साधुग्राममध्ये जमलेल्या लाखो भाविकांना शाही मिरवणुकीत सहभागी होता आले. भाविकांचा लोंढा एवढा प्रचंड होता की यात साधू, आखाडे आणि खालसे यांची उपस्थिती काही वेळ नगण्य ठरली. साधुग्राम, शाहीमार्ग रामकुंड याठिकाणी मिळेल त्या जागेवर भाविक रात्रभर थांबले. सकाळी शाही मिरवणूक गौरी पटागंणावर आली असता शेकडोंच्या संख्येने भाविक यात सहभागी झाले. भाविकांच्या प्रचंड गर्दीत काही हजार साधू हरवल्याचे दिसून आले.

पहिल्या शाही मिरवणुकीत साधूंची उपस्थिती फारच कमी होती. त्यामुळे साधुग्रामवर झालेला खर्च आणि त्या अनुषंगाने उदभवणारे अनेक प्रश्न निर्माण झाले. दुसऱ्या पर्वणीदरम्यान साधूंची संख्या वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या पर्वणीप्रमाणे यावेळेस सुद्धा अंदाजे ४० ते ५० हजार साधू महंतांनी हजेरी लावली. नाशिकचे कुंभमेळ्यात साधूंची संख्या घटण्याचे नेमके कारण मात्र मिळू शकलेले नाही. तिसऱ्या पर्वणीला साधूंची संख्या यापेक्षा कमी होऊ शकते.

दरम्यान, शनिवारी सकाळपासून साधुग्रामसह, रामकुंड, गौरी पटांगण, शाहीमार्ग आदी ठिकाणी भाविकांची रीघ लागली होती. शनिवारी रात्री सुमारे ४ ते ५ लाख भाविक या परिसरात बसले होते. रात्री दोन वाजेपर्यंत भाविक रामकुंडावर तळ ठोकून होते. मात्र, यानंतर पोलिस प्रशासाने भाविकांना रामकुंडासह गौरी पटांगणावरून बाहेर काढण्यास सुरुवात केली. बहुसंख्य भाविकांनी मग गणेशवाडी भाजी बाजारात आसरा घेतला. साधुग्राममधून आलेले भाविक मात्र मिरवणुकीसोबत थेट रामकुंडापर्यंत पोहचले.

प्रेशर पॉईंट ठरला त्रासदायक

साधुग्राममधून येणारे लाखो भाविक शाहीमार्गाने किंवा नवीन शाहीमार्गाने गौरी पटागंणावर पोहचत होते. या भाविकांना पोलिस शाही मार्गावरून गौरी पटागंणावर काढत होते. मात्र, सकाळी ८ वाजेच्या सुमारास श्री पंच मोही निर्मोही आखाड्याची मिरवणूक येथे पोहोचल्याबरोबर एकच धांदल उडाली. साधूबरोबर मोठ्या संख्येनी भाविक सुद्धा शाहीमार्गावर घुसू लागले. या ठिकाणी बोटावर मोजता येईल इतके पोलिस असल्याने गर्दी आवरणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे शाही मिरवणुकीत साधूपेक्षा भाविकांची संख्या मोठी झाली. दुसऱ्या शाही मिरवणुकीचा सोहळा भाविकांना पहाता यावा यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात बदल केला होता. त्याचा चांगला परिणाम यावेळेस जाणवला. रामकुंड ते गौरी पटागंण या भागात रस्त्याच्याकडेला भाविक बसले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांची लगबग अन् गोंधळही!

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : शहरातील डोंगरे वसतिगृहावरून अंतर्गत पार्किंगमधून शहरात अन्यत्र व विशेष करुन त्र्यंबकेश्वर येथे जाण्याची सोय केली असल्याने येथे दिवसभर भाविकांची लगबग दिसून आली. येथे भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागले.

देशातील विविध राज्यांमधून कुटुंबियांसमवेत आलेल्या भाविकांना थेट त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या पर्वणीत दर्शनही दुर्मिळ झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस येथे दिसून आल्याने भाविकांची सोय झाली. मात्र बसेसची संख्या तुरळकच असल्याने बराच वेळ भाविकांना रांगेत ताटकाळत उभे राहण्याची वेळ आल्याचे चित्र येथे होते. शिवाय, या बसेस कुठे जातात, कधी जातात याविषयीची चौकशी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चौकशी केंद्रातही कोणी नसल्याने भाविकांचा गोंधळ उडाल्याचे चित्र येथे दिसून आले.

चौकशी केंद्र ओस

शहरातील बसेसचे मार्ग, वेळ यांची माहिती भाविकांना मिळावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या 'सिंहस्थ कुंभमेळा चौकशी केंद्रा'त एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे भाविकांना माहिती मिळविण्यास अडचणींना सामोरे जावे लागत होते. भाविकांपर्यंत बसेसची माहिती पोहोचविण्यासाठी अॅम्प्लिफायरचीही कोणतीही व्यवस्था प्रशासनामार्फत पुरविण्यात आली नसल्याने ओरडून ओरडून घसा कोरडा पडण्याची वेळ आल्याचे एका कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यातच या केंद्रासमोरही मोठं होर्डिंग लावून ठेवल्याने याची एक बाजू पूर्णतः झाकोळली गेली होती. त्यामुळे केंद्रही या नजरेस पडण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. एकूणच दुर्दशेत सापडलेल्या या केंद्राचा कोणताही लाभ भाविकांना झाला नाही.

दवाखान्यांना प्रतिसाद

शहरातील वातावरण, ऊन-पावसातील अनियमितता यामुळे शरीराच्या लहान-मोठ्या तक्रारींवर येथील दवाखान्यात उपचार करण्यात आले. डोंगरे वसतिगृहावर तयार करण्यात आलेल्या डिस्पेन्सरीमध्ये दिवसभरात सुमारे दीडशे भाविकांनी सर्दी, खोकला, अंगदुखीवर तपासणी करून घेत उपचार करुन घेतल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

रिक्षाचालकांची मुजोरी

डोंगरे वसतिगृहात वाहने पार्क करण्यासाठी दोन प्रवेशद्वारांची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रवेशद्वारांजवळ रिक्षाचालकांनी ठाण मांडल्याने पार्किंगच्या कर्मचार्यांना व्यवस्था करता करता मोठी गैरसोय झाली. भाविकांच्या गाड्या प्रवेशद्वारापासून आत जाण्यासही मोठी अडचण त्यामुळे येत होती. भाविक आपल्या गाड्यांमधून येथे उतरले की, रिक्षाचालक त्यांना घेराव घालून 'कुठे जायचे?' विचारुन भंडावून सोडत होते.

मैदान भरलेच नाही

एसटी बसेसशिवाय दुपारी २ वाजेपर्यंत २२५ दुचाकी, ६२ चारचाकी व ६ टेम्पो येथे पार्क करण्यात आल्या होत्या. दुचाकीसाठी १० रुपये, चारचाकीसाठी २० रुपये तर टेम्पोसाठी ५० रुपये शुल्क येथे घेण्यात येत होता. रात्रीपर्यंत वाहनांची संख्या दुपटीवर जाईल, अशी शक्यता येथील कर्मचाऱ्यांनी वर्तविली होती. पहिल्या पर्वणीच्या तुलनेत यंदा ही संख्या तिपटीने वाढली असली तरी डोंगरे वसतिगृहाच्या प्रशस्त मैदानाचा २५ टक्केच भाग भरला असल्याचे प्रत्यक्ष चित्र बघता लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी धावली अहोरात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

भाविक व पर्यटकांची दुसरी शाही पर्वणी आनंदाची व सुकर व्हावी यासाठी पोलिस प्रशासन व एस. टी महामंडळाने आपल्या नियोजनात आमूलाग्र बदल केला होता. एसटीने थेट त्र्यंबक बसस्थानक तसेच जव्हार फाट्यापर्यंत बस सोडल्याने भाविकांची पायपीट वाचली. नाशिकहून त्र्यंबकसाठी बसच्या सुमारे दोन हजार फेऱ्या झाल्या.

त्र्यंबकला जाण्यासाठी शनिवारपासून भाविकांचा ओघ वाढला. दर पंधरा मिनिटाला बस सोडण्यात येत होती. भाविकांची संख्या पाहून फेऱ्यांमध्येही वाढही करण्यात आली होती. पायपीट करावी लागू नये म्हणून नाशिकहून बसने जाणाऱ्या भाविकांना थेट त्र्यंबक आऊटर बसस्थानक व जव्हारकडून येणाऱ्या भाविकांना जव्हार फाट्यापर्यंत सोडण्यात आले. प‌हिल्या पर्वणीला नाशिककडे येणाऱ्या भाविक व पर्यटकांना ब्रह्मा व्हॅली स्कूलपर्यंत पायपीट करावी लागली होती. यंदा मात्र 'देर आए दुरुस्त आए' म्हणत एसटी प्रवाशांसाठी धावली.

दुसऱ्या पर्वणीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची एसटी महामंडळाने खबरदारी घेतली. नाशिकहून दर पाच मिनिटाला एक बस त्र्यंबककडे धावली. खंबाळे पार्किंग येथे न थांबता थेट त्र्यंबकच्या द्वारी भाविकांना सोडले जात होते. सकाळी गर्दी वाढल्याने बसथांब्यात बदल करण्यात आला.

खंबाळेत थांबल्या १२५ बसेस

'होल्ड अॅण्ड रिलीज' पध्दतीनुसार गर्दी पाहूनच बसेस त्र्यंबकच्या दिशेने सोडल्या जात होत्या. त्र्यंबकमध्ये गर्दी वाढल्यानंतर खंबाळे पार्किंगजवळ प्रवाशांनी भरलेल्या सुमारे १२५ बसेस रोखून धरल्या होत्या. यामुळे गर्दी व वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे सोपे गेले. खासगी वाहनांना प्रवेश असूनही भाविकांनी एसटी बसने प्रवास करणे पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images