Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

घरकुलांची परस्पर विक्री?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतर्फे शहरात उभारण्यात येणाऱ्या घरकुलांचे वाटप करण्यात प्रशासनाला अपयश येत असतांना महापालिकेच्या या घरांचीच आता परस्पर आर्थिक व्यवहार करून विक्री होत असल्याचे समोर आले आहे. आंनदवल्ली परिसरात नवी दिल्लीच्या इंदिरा गृहप्रकल्प योजनेच्या नावाखाली चक्का घरकुलांचे बुकींग करून त्यांच्या वाटपाचीही तारीख जाहीर करून टाकली आहे. महापालिकेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

झोपडधारकांसाठी महापालिकेतर्फे घरकुल योजना राबविली जा‌ते. महापालिकेतर्फे गरिबांना घरकुलांचे वाटप केले जाते. यासाठी रितसर प्रक्रिया असतांना आनंदवल्ली परिसरात काही व्यक्तींकडून घरकुलांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गृहप्रकल्प योजनेच्या नावाखाली काही व्यक्ती गरिबांकडून आर्थिक मोबदला घेवून त्यांना ही घरे परस्पर वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी संबंधित संस्थेकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र थेट अतिरिक्त आयुक्तांना पाठवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आनंदवल्ली परिसरात ८५ घरकुलांचे काम सुरू आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून पाच ते दहा हजारात घरे विकली जात असल्याची चर्चा आहे. महापालिकेन या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून या प्रमाणपत्र देणा-या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. संबंधितांवर फौजदारी कारवाईचा इशारा महापालिकेने दिला असून पीडितांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी विद्यार्थ्यांचा ठिय्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शैक्षणिक वर्ष सुरू होवून दोन महिने उलटले तरी आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आदिवासी आयुक्तालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आयुक्तालयात ठिय्या मांडत आयुक्तांच्या कार्यालयाच वेढा घातला असून तो रात्री उशीरापर्यंत सुरू होता. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला असून शासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बुधवारी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे.

राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश भत्ता तसेच शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. या संदर्भात विभागाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा बांध फुटला असून मंगळवारी सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी थेट आदिवासी आयुक्तालय गाठत, कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची धांदल उडाली. विद्यार्थ्यांनी थेट आयुक्त सोनाली पोंक्षे वायगंणकर यांच्या कार्यालयाचा आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाचाही ताबा घेतला. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसह शिक्षकही या आंदोलनात सहभागी झाले.

आदिवासी विकास परिषदेचे लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. आयुक्त मुंबईला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

आजच्या बैठकीनंतर ठरणार दिशा

विद्यार्थ्यांच्या आक्रमक आंदोलनाची आदिवासी विभागाने गंभीर दखल घेतली आहे. आदिवासी विकास मंत्र्याच्या दालनात बुधवारी (दि. ९) बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय झाले तरच आंदोलन मागे घेवू, अशी माहिती लक्ष्मण जाधव यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची पोत हिसकावली

0
0

नाशिक : पहिल्या पर्वणीला तपोवनात गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र महिलेने हिसकावून नेले. आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा हरिश्चंद्र चिंतामणी (३२, रा. बोधलेनगर) हे पत्नीसोबत तपोवनात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील ३८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीसोबतच घेतला जगाचा निरोप!

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पतीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासाने पत्नीचे निधन झाल्याची व एका घरातून दोन अंत्ययात्रा काढण्याची वेळ मुलांवर आली. मनाला चटका लावणारी ही घटना नांदगाव येथे घडली. पती वियोगाने पत्नीनेही जगाचा निरोप घेतला आणि पती-पत्नीच्या अतूट नात्याची चर्चा मंगळवारी नांदगावमध्ये होती.

नांदगाव येथील सुवर्णकार समाजातील निंबा फकिरा विसपुते (वय ६९) हे आजारी असल्याने त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पतीच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या पत्नी सुमन (वय ६५) यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. सुमन विसपुते यांना खासगी दवाखान्यात नेण्यात आले मात्र, दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली. पतीवियोगाने पत्नीने अवघ्या काही तासात जीवनयात्रा संपवली. विसपुते दाम्पत्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पतीच्या निधनानंतर लगेच पत्नीनेही जागचा निरोप घेतल्याने नांदगावात पती-पत्नीच्या अतूट नात्याची चर्चा झडत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसानंतर झाले बजरंगीदासांवर अंत्यसंस्कार

0
0

नाशिक : अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागरात दोन दिवसापासून खितपत पडलेल्या बजरंगी दास (वय ६०) या साधूचे ठिकाण शोधण्यात पोलिसांना मंगळवारी यश आले. ओळख पटल्यानंतर बजरंगी दासांवर दोन दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेल्या साधूंपैकी तीन ते चार साधूंचा वेगवेगळ्या कारणाने नाशिकमध्ये मृत्यू झाला. भटके समजल्या जाणाऱ्या साधूंची ओळख पटवणे पोलिसांसमोर सर्वांत मोठे आवाहन ठरते. उपचार सुरू असताना बजरंगीदास मृत्युमुखी पडले. यानंतर, आडगाव पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली. बजरंगी दासांच्या मृत्यूनंतर तब्बल दीड दिवसांनी त्यांच्या राहण्याचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधून काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत बचत गटाच्या महिलांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देतो असे सांगून सिडकोतील १०० हून अधिक महिलांना सुमारे साडेआठ लाखांचा गंडा घालण्यात आला. महिलांनी अंबड पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
रविकांत रत्नाकर जोशी, गौरी रत्नाकर जोशी आणि अश्विनी शिवकुमार वाजपेयी अशी संशयितांची नावे आहेत. सन २०१२ ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत पाटीलनगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देतो, असे आश्वासन देऊन सभासद शुल्क म्हणून त्यांच्याकडून पैसे गोळा केले. मात्र, त्यांना कर्जच उपलब्ध करून देण्यात आले नाही. संशयित पसार झाल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत दहीहंडीवेळी पोलिसाला धक्काबुक्की

0
0

नाशिक : सिडकोतील राणाप्रताप चौकातील दहिहंडीच्या कार्यक्रमात झालेला वाद मिटविणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की करून त्याचा शर्ट फाडण्यात आला. सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दहीहंडीच्या कार्यक्रमात काही तरुणांची आपापसात भांडणे झाली. ही भांडणे सोडविण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यावेळी पोलिस शिपाई डंबाळे यांचा शर्ट फाडून सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मांतर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

0
0

नाशिक : कुवेत येथे नोकरीचे आमिष दाखवून नाशिकच्या युवकाचे अपहरण आणि धर्मांतर केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांकडे दाखल आहे. या प्रकरणाच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेने लक्ष घातले असून, नाशिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

गौरव संधानशिव (वय २८) या तरुणाचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांनी दाखल केला आहे. त्याचे धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली. ते म्हणाले, मंगळवारी दुपारपासून गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई गुन्हे शाखेनेही या प्रकरणात लक्ष घातले आहे. नाशिक गुन्हे शाखेचे पथकही मुंबईकडे रवाना झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेलभरोसाठी जनतेला साद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात दुष्काळाचे भयावह संकट असून, सरकारकडून कुठलेही ठोस नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह होत असलेल्या जेलभरो आंदोलनात जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी भवनात मंगळवारी दुष्काळ आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात १४ सप्टेंबर रोजी हे आंदोलन होत आहे. मात्र, दि. १३ सप्टेंबर रोजी नाशिक शहरात कुंभपर्वणीची गर्दी असल्यामुळे नाशिक शहरात १५ सप्टेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या राज्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. शासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना किंवा नियोजन होताना दिसत नाही. राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांची कर्ज, वीजबिल माफ करावे, बँकांनी व वीज मंडळाने सक्तीची वसुली थांबविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी चारा छावण्या प्रशासनाकडून सुरू करण्यात किंवा दावणीला चारा देण्यात यावा, दुष्काळी भागात मागणीप्रमाणे पाण्याचे टँकर देण्यात यावे, अन्नसुरक्षा योजना लागू करावी, शेतकऱ्यांना रोजगार हमी अंतर्गत कामे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना दुष्काळ मदत शासनाने जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील इतरही दुष्काळग्रस्त भागात मदत द्यावी असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

जलसंपदा विभागाने मनमाड, नांदगाव, येवला शहरासाठी आवर्तन सोडले आहे. परंतु, यापुढे आवर्तन मिळेल की नाही याबाबत प्रशासनाकडून साशंकता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी जपून वापरावे असा सल्ला देखील त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड, मालेगाव, बागलाणमध्ये पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुमारे दीड महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी निफाड, मालेगाव, बागलाण तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही हजेरी लावली. यामुळे बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला. मालेगाव तालुक्यात वीस मीमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. दिवसभराच्या प्रचंड उष्म्यानंतर पावसाने सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली. दुष्काळ आणि टंचाईच्या भीषण परिस्थितीला तोंड देत असतानाच मंगळवारचा दिवस तालुक्यातील शेतकरीपासून सगळ्यांसाठीच वरुणराजाच्या आगमनाने दिलासादायक ठरला. यामुळे पिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. रब्बीच्या पिकांसाठी परतीचा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ जाहिरात कंपन्यांना नोट‌िसा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात नियमबाह्यरित्या जाहिरातीची पर्वणी साधणाऱ्या बड्या कंपन्यांना महापालिकेने अखेर दणका दिला आहे. पोल‌सिांनी हात वर केल्यानंतर महापालिकेने केशकिंग, कोकाकोला, युनीनार, एक्स‌सि बँकेसह १२ बड्या कंपन्यांना नोट‌सिा काढून फौजदारी कारवाईचा इशारा दिला असून, २४ तासात जाह‌रिात काढून कंपन्याना खुलासा करण्याचे आदेश दिल्याने कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकारामुळे पोलिसांच्या परवानगीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 'मटा'ने सर्वप्रथम या कंपन्यांची बनावटगिरी उघडकीस आणली होती.

शहरात खाजगी अथवा शासकीय जाहिरात करावयाची असेल तर, त्यासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र असे असतानाही टचवुड एजन्सीज, बँक ऑफ बडोदा, वोडाफोन, एक्स‌सि बँक, युनीनार, इंटेक्स, कोकाकोला, केशकिंग, उषा, माझा, एअरटेल, व्हिडीओकॉन या कंपन्यांनी पोल‌सिांच्या मदतीने शहरात जाहिराती लावल्या. पोल‌सिांना परवानगी देण्याचा कोणताही अधिकार नसतांना, पोल‌सिांना केलेल्या प्रतापाचे पितळ 'मटा'ने सर्वप्रथम उघडीस आणले.

दबावतंत्राचा वापर सुरू

टचवुड एजन्सीजच्या मोहजालात अडकलेल्या या कंपन्याचे कारवाईच्या भीतीने धाबे दणाणले आहे. बड्या अधिकाऱ्यांनी आता मिटवामिटवीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईतल्या एका बड्या राजकीय नेत्यांच्या मदतीने पोल‌सिांसह पालिकेवर दबाव टाकला जात आहे. तर तक्रारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीआरटीएस-मेट्रोची गरज

0
0

Vinod.Patil@timesgroup.com

नाशिक : नाशिक शहराची वाटचाल महानगराकडे होत असून, शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता प्राधान्यक्रमाने सर्वात आधी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याचे मोठे आव्हान आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी, पार्किंग, प्रदूषण, वेळ आणि पैशाचा अपव्यय या सर्वांवर परिणामकारक उपायासाठी मेट्रो किंवा बीआरटीएस एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी नाशिकमध्ये त्याची चाचपणी होणे गरजचे आहे. मेट्रोची उभारणी महागडी असल्याने शहरासाठी मेट्रोपेक्षा बीआरटीएस हा सक्षम उपाय आहे. आयडीडीपी संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार नाशकात बीआरटीएसला वाव असून, तीन मार्गावर पहिल्या टप्प्यात ही योजना राबवली जाऊ शकते. यासाठी एक हजार कोटी रुपये उभारण्याचे मोठे आव्हान आहे.

शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, सन २०४१ मध्ये लोकसंख्येचा आकडा ५२ लाखांच्या वर जाणार आहे. सध्याचे रस्ते आणि वाहतूक व्यवस्था एवढ्या वाढीव लोकसंख्येचा भार सहन करू शकत नाही. शहरातील प्रमुख्य रस्त्यांच्याही मर्यादा असल्याने वाढत्या लोकसंख्येचा सामना करण्यासाठी आताच सक्षम वाहतूक व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून बीआरटीएस अर्थात बस रॅपीड ट्रान्झिट सिस्टीम. बीआरटीएस ही प्रणाली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी रस्त्यांवरील वाहनांसाठी लागणाऱ्या जागेच्या योग्य विभाजनाचे सूत्र मांडणारी पद्धती आहे. वाहतुकीची कोंडी कमी करून परिवहन व्यवस्था गतिमान करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे कार्य या प्रणालीद्वारे केले जाते. बीआरटीएसची मेट्रो रेल्वेशीही तुलना केली जाते. मात्र मेट्रो रेल्वेच्या तुलनेत बीआरटीएसच्या उभारणीला खर्च कमी येतो. शिवाय कमी खर्चात गतिमान, सुरक्षित प्रवास ही या प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत. यासाठी महापालिकेची स्वतःची परिवहन सेवा असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बससेवा स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

जगात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिक सोळाव्या क्रमांकावर आहे. शहराच्या नियोजनबद्ध विकासात सक्षम सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळेच सक्षम सार्वजनिक वाहतूक-परिवहन व्यवस्थेसाठी शहरातील काही सामाजिक, स्वयंसेवी संस्था, आर्किटेक्ट, इंजिनीअर्स पुढे सरसावले आहेत. सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी बीआरटीएस प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटीडीपी या संस्थेने सर्व्हेक्षण करून महापालिकेसमोर सादर केला आहे. गुजरातमधील अहमदाबादच्या धर्तीवर हा प्रकल्प नाशिकमध्ये राबविता येऊ शकतो, असा अहवाल महापालिकेला सादर केला आहे. त्यासाठीची तयारीही तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी चालवली होती. मात्र, काही पक्षांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव थंड बस्त्यात पडला. सार्वजनिक बससेवेसाठी अहमदाबादसह इंदूरच्या बससेवेचाही अभ्यास करण्यात आला. गेल्या चार वर्षांपासून या प्रस्तावावर नुसतीच चर्चा सुरू आहेत. आयटीडीपी संस्थेने महापालिकेला दिलेल्या प्रस्तावानुसार नाशिक शहरात ६४ कि.मी. लांबीचा बीआरटीएस प्रकल्प राबविण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात नाशिकरोड ते सीबीएस तसेच सीबीएस ते त्र्यंबकरोड व सीबीएस ते गंगापूररोड या दरम्यान २३ कि.मी. लांबीच्या प्रकल्प साकारला जाऊ शकतो. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी अभियानांतर्गत हा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे.

महामंडळाचा विरोध

सद्यस्थितीत शहरातील वाहतूक सेवेचा भार हा राज्य परिवहन महामंडळावर आहे. बससेवा शहरात चालवली जात असली तरी त्यांना सर्वाधिक फायदा हा बीआरटीएसच्या तीन मार्गांवरच आहे. महामंडळ हे नफ्याचे मार्ग सोडणार नाही. उर्वरीत तोट्याच्या मार्गांवर महामंडळ सेवा सुरू ठेवण्यास नकार देईल. पालिकेने अगोदरच जेएनयुआरएम अंतर्गत बससेवा चालविण्यासाठी महामंडळाला ना हरकत दाखला दिला आहे. महापालिकेला केवळ बीआरटीएस ऐवजी पूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था चालवावी लागणार आहे. त्यामुळे बीआरटीएससाठी महामंडळाच्या विरोधाचाही सामना करावा लागू शकतो.

निधीची अडचण

बीआरटीएस प्रकल्प तीन मार्गावर सुरू करण्यासाठी किमान एक हजार कोटींची आवश्यकता आहे. यासाठीची ७० टक्के रक्कम केंद्र आणि राज्य सरकार देणार असले तरी, उर्वरीत ३० टक्के म्हणजे ३०० कोटींचा निधी उभा करण्याचे खडतर आव्हान आहे. नाशिक महापालिकेची सध्याची आर्थिक अवस्था ही अत्यंत बिकट आहे. तीनशे कोटींचा निधी उभा करणे महापालिकेला शक्य नाही. जकात आणि एलबीटी बंद झाल्याने पगाराचेही वांधे होणार आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकावरच्या निधीवरच हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकणार आहे. सध्याची स्थिती पाहता एवढा निधी उपलब्ध होणे शक्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडनेरगेट रस्ता १८ मीटरच राहणे शक्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या हरकतींवर नगररचनाचे सहसंचालक प्रकाश भुक्ते आणि नियोजन समितीच्या सदस्यांपुढे सुनावणी झाली. वडनेर गेटचा रस्ता १८ मीटर कायम ठेवण्याच्या आणि चेहेडीच्या शासकीय जमिनीतून नदीलगत १८ मीटरचा रस्ता करण्याच्या मागणीला भुक्ते यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

चेहेडी नदीलगत रस्ता झाल्यास चाडेगाव ते सिन्नरफाटा अंतर तीन किलोमीटरने कमी होणार आहे. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, अॅड. नितीन ठाकरे, उन्मेष गायधनी, अॅड. सुनील बोराडे, गजानन शेलार, मधुकर गायकवाड, हरपालसिंग बाजवा, अॅड. तानाजी जायभावे, नितीन निगळ, शिवाजी म्हस्के, अॅड. जे. टी. शिंदे, अॅड. भास्कर निमसे, संजय माळोदे, अर्जुन काठे आदी उपस्थित होते.

दोन वा जास्त आरक्षण पडलेल्या शेतकऱ्यांचे एकच आरक्षण ठेवावे अशी मागणी समितीने केली. नगररचनाच्या कलम ३७ अंतर्गत आरक्षण उठवण्याबाबत महापालिकेने प्रस्ताव सादर केल्यानंतर निर्णय घेण्याची कालमर्यादा एक वर्षाची करण्यासाठी कायद्यात बदल करणार असल्याचे भुक्ते यांनी सांगितले. अल्पभूधारकांना भूमीहिन करता येत नाही अशी घटनेत तरतूद आहे. अल्पभूधारकांच्या जमिनाचा वापर धान्य पिकविण्यासाठीच करावा, असे अन्न सुरक्षा कायद्यात म्हटले आहे. याबाबतचे पुरावे कृती समितीने नियोजन समितीला दिले व आरक्षण रद्द करण्याची मागणी केली. ट्रक टर्मिन्सबाबत महापालिकने दुटप्पी धोरण ठेऊ नये, पाथर्डीचा वाढीव कचरा डेपो रद्द करावा, नाशिक पूर्व हा साठ मीटरचा बाह्य वळण रस्ता तीन तुकड्यात खंडीत होतो तो रद्द करावा, जुना आग्रा रस्त्याला गोल्फ क्लब शेजारून पर्यायी रस्ता करावा, जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालय विस्तारीकरणासाठी जुन्या पोलिस हेडक्वार्टरची पडिक जागा द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका आयुक्त, कंपनी मालकावर गुन्हे दाखल करा

0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

साईश कंपनीतील सेफ्टी टँकमध्ये कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंपनी मालक, सुपरवायझर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा सूचना केंद्रीय सफाई आयोगाच्या सदस्या लता महातो यांनी पोलिसांना दिल्या आहेत. एमएसआर कायद्यान्वये महापालिकेच्या आयुक्तांवरही गुन्हा दाखल करण्यासाठी आयोग आग्रही राहील, अशी माहिती महातो यांनी बुधवारी दिली.

साईश कंपनीत सेफ्टी टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या विनोद माधव मारू (३२) व मजूर दिपक रामचंद्र माळी (२५) या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेला चार दिवस उलटूनही पोलिसांनी केवळ अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेची दखल घेऊन केंद्रीय सफाई आयोगाच्या सदस्या महातो नाशिकमध्ये दाखल झाल्या. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मृताच्या नातलगांचीही भेट घेतली. घटनास्थळावर अक्षम्य हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या, की अशा घटना घडणे नाशिक सारख्या महानगरासाठी शरमेची बाब आहे. सुरक्षा साधनांशिवाय कर्मचाऱ्यांना अशा जोखमीच्या कामांना पाठविणे गुन्हा आहे. सोमेश्वर येथील घटनेनंतर याबाबतच्या स्पष्ट सूचना आयोगाने दिल्या होत्या. मात्र तरीही पुन्हा अशी घटना घडली. सफाई आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

मृतांच्या वारसांना महिनाभरात रुजू करा

शाळा, पोलिस स्टेशन आणि बँकांसारख्या ठिकाणी सफाई कामगारांची पदनिर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवावा अशी अशा सूचना महातो यांनी नाशिक दौऱ्यात संबंधित विभागांना दिल्या आहेत. मृत सफाई कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर एक महिन्याच्या आत कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्ह्यातील नगरपालिकांना दिल्या आहेत. महिन्यानंतर पुन्हा याबाबतचा आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी सफाई कामगारांच्या संघटनांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांसाठी प्रेसतर्फे एक कोटी

0
0

नाशिकरोड : नाशिकरोडच्या प्रतिभूती आणि चलार्थपत्र मुद्रणालयाचे कामगार यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. कामगारांच्या एक दिवसाच्या पगारापोटी जमा होणारी सुमारे एक कोटीची रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गाडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अशोक आहिरे, संदीप बिश्वास, अण्णा सोनवणे, सुनील दुपारे, नितीन चौधरी, पदमा जॅकसन, रोहित बापट, देवीदास गोडसे, प्रकाश पगारे आदी उपस्थित होते. गोडसे म्हणाले, की प्रेसमध्ये साडेपाच हजार कामगार आहेत. यंदा राज्यातील दुष्काळीची परिस्थिती पाहून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हरित कुंभ लोकसहभागामुळेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रशासनाकडून सूत्रबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जात असले तरी, विविध पातळ्यांवर मिळत असलेल्या लोकसहभागाद्वारेच हरित कुंभ साकारला जात असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले. हरित कुंभ संकल्पनेवर आधारीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन उंटवाडी येथील अशोका हॉलमध्ये मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मध्यप्रदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एन. पी. शुक्ला, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (नेरी) मुख्य शास्त्रज्ञ राकेशकुमार, हरीत कुंभ समितीच्या तांत्रिक सल्लागार डॉ. प्राजक्ता बस्ते आदी उपस्थित होते. हरित कुंभसाठी त्रिसूत्री पद्धतीने काम होत असल्याचे डवले यांनी सांगितले. त्यात प्लास्टिक बॅगचा वापर बंद करणे, स्वच्छ नदी घाट आणि पुरेशा स्वच्छतागृहांच्या सुविधा यांचा समावेश आहे. सिंहस्थानंतरही तंत्रज्ञान आणि स्वच्छतेविषयीची जागरुकता या दोन्ही बाबींद्वारे गोदावरीला स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न केले जातील, असे डवले यांनी स्पष्ट केले.

जागतिक फुटबॉल स्पर्धेपेक्षा चांगले आयोजन नाशिक कुंभमेळ्याचे झाले असल्याचे कौतुकोद्गार डॉ. शुक्ला यांनी काढले. नर्मदा प्रदूषणमुक्त होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. भौगोलिक रचनेमुळे आणि गोदावरी नदीला बारमाही पाणी नसल्यानेही प्रदूषण नियंत्रणात अडचणी येत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले. गोदावरीच्या स्वच्छतेसाठी यापुढेही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी कुशवाह यांनी हरित कुंभचा संकल्प सर्वांच्या सहकार्याने पूर्ण हेात असल्याचे सांगितले. हरित कुंभसाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे केलेले प्रयत्न यापुढे देखील मार्गदर्शक ठरतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. बस्ते यांनी 'ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गोदावरी' हे सादरीकरण केले.

माहितीपट विजेते

हरित कुंभच्या माहितीपट स्पर्धेचे विजेते असे, सर्वोत्कृष्ट माहितीपट - प्रथम क्रमांक : 'माझं नाशिक, माझी गोदावरी' निर्माता रुद्राज गोसावी आणि विशाल पाटील, यश कम्युनिकेशन. द्वितीय क्रमांक : विभागून 'एहसास' निर्माता शंतनु चंद्रात्रे आग्नेय क्रिएशन व 'गोदावरीचं भविष्य, हे आपलंच कर्तव्य' निर्माता प्रवीण पाटील. तृतीय क्रमांक : 'गंगा माता का दर्द' निर्माता प्रसाद देशपांडे.

सर्वोत्कृष्ट संहिता - प्रथम : दिप्ती चंद्रात्रे माहितीपट 'एहसास', द्वितीय क्रमांक : सुनेत्रा महाजन आणि प्रविण पाटील माहितीपट 'गोदावरीचं भविष्य, हे आपलंच कर्तव्य'. सर्वोत्कृष्ट चित्रीकरण : प्रथम- सी.डी. सोनवणे माहितीपट 'मानो तो मै गंगा माँ हूँ', द्वितीय क्रमांक- किरण जोशी पुणे माहितीपट 'हरितकुंभ'.

वेबसाइटचे उद्घाटन

विभागीय आयुक्त डवले यांच्या हस्ते हरित कुंभ या वेबसाइटचे अनावरण यावेळी करण्यात आले. www.haritkumbh.org या वेबसाईटवर हरित कुंभ आणि विविध प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्षवेधी गंगापूजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर अशा तीनही आखाड्यांतील साधू-महंतांच्या उपस्थितीत नरेंद्राचार्य महाराजांनी बुधवारी रामकुंडावर गंगापूजन केले. यावेळी हजारो भाविकांनी हिंदू धर्माचा जयघोष केला. यावेळी चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पर्यावरण रक्षणाचा संदेशही शोभायात्रेतून देण्यात आला. नरेंद्राचार्य महाराजांचे औक्षण करण्यासह पुष्पवृष्टी करण्यात आली.

तिन्ही आखाड्यांचे साधू-महंत, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त, पारंपरिक वाद्यांचा गजर, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील स्थानिक लोकसंस्कृतीचा जागर, हिंदू धर्माचा जयघोष, अशा भव्यदिव्य वातावरणात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची शोभायात्रा बुधवारी सकाळी साधुग्राम येथून निघाली. आठ वाजता उत्सवमूर्ती जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज त्यांच्या रथावर आरूढ झाले. त्यांच्यापाठोपाठ महंत ग्यानदास महाराज, डाकोर इंदौर खालसा मंगल पीठाधिश्वर माधवाचार्यजी महाराज, याशिवाय तीनही अनी आखाड्यांचे रथ आणि चतुःसंप्रदाय सहभागी होता. दिगंबर, निर्मोही, निर्वाणी अनी आखाड्यांचे रथ, १८ अनी उपआखाडे, सप्त खालसे सहभागी झाले होते. शोभायात्रेत सर्वात अग्रभागी चार अश्व होते. त्यानंतर आखाड्यांचे बँड पथक, छडीवाले (मोठी निशाने), आखाड्याची तीन निशाणे, मोती भाला, त्यामागे श्रीसंप्रदायाचे काही चित्ररथ होते. त्यामागे सांधू-महंतांचा सहभाग होता. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व अन्य मान्यवर साधू-महंतांचे रथ होते.

शोभायात्रा भव्यदिव्य अशी होती. चार किलोमीटर यात्रेची रांग होती. यात्रा पाहण्यासाठी नाशिककर व कुंभमेळ्यासाठी आलेल्यांनी प्रचंड गर्दी केली. दुतर्फा लोक औत्सुक्याने सारा अनुभव घेत होते.

घोषणांनी परिसर दुमदुमला

शोभायात्रेत वाद्ये वाजू लागली, चित्ररथावरील लोकसंस्कृतीचे दर्शन सुखावून गेले. घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. जय सियाराम, हिंदू धर्म की जय, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या. सर्व आखाड्यांनी शोभायात्रेचे जोरदार स्वागत केले. त्यांनी जगद्गुरू नरेद्राचार्य महाराजांचे औक्षण केले. फुले उधळली. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेमापोटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे भक्त, शिष्य सोहळ्यात सहभागी झाले होते.

मिरवणुकीचा शाहीमार्ग

शोभायात्रा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नगर, लक्ष्मीनारायण मंदिर, दिगंबर आखाडा, पंचमुखी हनुमान मंदिर, गणेशवाडी, गाडगेमहाराज पुलावरून धुमाळ पॉर्इंट, मेनरोड, भगवंत मिठाई, रविवार कारंजा, व्हिक्टोरिया ब्रिज, मालेगाव स्टँड, अशी रामकुंडावर पोहोचली. यांनतर तेथे उपस्थितांसमवेत गंगापूजन करण्यात आले.

चित्ररथ मुख्य आकर्षण

प्रत्येक जिल्ह्याची लोकसंस्कृती दाखवणारे चित्ररथ या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. बाहेरच्या राज्यातील चित्ररथदेखील सहभागी होते. त्यामध्ये वाशिमचे लेझीम व मल्लखांब, ढाण्याचे ढोल पथक, धुळ्याचे शिपली नृत्य, पालघरचे भजन व कोळी नृत्य, नांदेडचे लेझीम पथक, नागपूरचे भिल्ल व पट्टेरी वाघ पथक, नगरचे लेझिम पथक, औरंगाबादचे बँडपथक, पुण्याचे ढोलपथक, गोवा, उत्तर कर्नाटकचे रोमटा पथक, मुंबईचे लेझीम पथक, परभणीचे बंजारा पथक सहभागी होते.

वासुदेवाचे आकर्षण

अमरावतीचे स्वच्छता अभियान, छत्तीसगडचे डान्स पथक, सिंधुदुर्गचे दशावतार, मध्यप्रदेश गायन, नृत्य पथक, रत्नागिरीचे जाकडी नृत्य, यवतमाळ बंजारा नृत्य, गुजरातचे आव्हादांग आदिवासी नृत्य, सांगलीचे सनई पथक, नृत्यांची अनेक पथके सहभागी होती. श्री हुनमानाची वेशभूषा केलेला, वासुदेव यांचे मोठे आकर्षण होते. कोल्हापूरच्या कलावंतांचे लावणी नृत्य दाद घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्जा राखण्यावर विद्यापीठाचा भर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात दर्जेदार समान वैद्यकीय शिक्षण देण्याचे आरोग्य विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. केंद्रीय परिषद व विद्यापीठाच्या मानकांनुसार सर्व अटी व नियमांची पूर्तता करणाऱ्या संस्थानांच नवीन कॉलेज सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर यांनी दिली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी नव्या कॉलेजेसची सुरुवात, पदव्युत्तर अभ्याक्रम सुरु करणे, संलग्नित कॉलेज व अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढ यासाठीच्या या प्रक्रियेबाबत इच्छुक संस्थाचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन बैठकीचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. जामकर, प्रतिकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन गंगणे, डॉ. मिलींद देशपांडे, नियोजन विभागाचे प्रभारी संचालक महेंद्र कोठावदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे आदी उपस्थित होते.

डॉ. जामकर म्हणाले, की विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार वैद्यकीय शिक्षणाचे राज्यात समान वाटप होण्यासाठी नियोजन केले जात आहे. यासाठी विद्यापीठाकडून दर पाच वर्षांना बृहत आराखडा तयार करण्यात येतो. संस्थाचालकांनी प्रस्ताव सादर करताना या बाबींचा विचार करावा, असेही आवाहन यावेळी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेली विविध आरोग्य विज्ञान शाखेच्या महाविद्यालयात प्रवेश किती होतात, शिक्षक आदींबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. यानंतरच केंद्रीय परिषदा व विद्यापीठाच्या मानकांनुसार सर्व अटी व नियमांची पूर्तता करूनच प्रस्ताव सादर करावा, असेही डॉ.जामकर म्हणाले.

कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ म्हणाले, की सादर होणारे नवे प्रस्ताव अचूक असावेत यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नियोजन विभागाचे प्रभारी संचालक महेंद्र कोठावदे यांनी दृकश्राव्य सादरीकरण करुन विद्यापीठाच्या बृहत आराखडयानुसार विद्याशाखा निहाय, जिल्हा निहाय सुरू करण्यात येणारे कॉलेजेस, पदवी आणि पदव्युत्तर कॉलेजेस सुरू करणे, वाढीव प्रवेश क्षमतासाठी आकारण्यात येणारे शुल्क, नवीन प्रस्ताव सादर करण्यासाठी नियम, अटी, कागदपत्रे याबाबत अधिक माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.

या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रस्ताव सादर करतांना लागणारे कागदपत्रे, संलग्नीकरण शुल्क, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शुल्क तसेच केंद्र सरकार, केंद्रीय परिषदा, राज्य सरकार आणि विद्यापीठ यांच्या नवीन कॉलेजेस, अभ्यासक्रम, वाढीव प्रवेश क्षमता याबाबत असलेले नियम, जिल्हानिहाय नवीन विविध आरोग्य शाखांची कॉलेजेस सुरू करता येईल याची माहिती, प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत, विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला बृहत आराखडा व त्यातील नवीन समावेश करण्यात आलेल्या बाबी, निकष याबाबत अधिक माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडावर प्रवेश हा भाविकांचा हक्क!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ शहरातूनच नव्हे तर देशातून येणाऱ्या भाविकांना रामकुंडावर सहज प्रवेश मिळायला हवा. पोलिस प्रशासनाने योग्य नियोजन केल्यास प्रत्येक भाविक रामकुंडावर स्नान करून सुखरूप परतू शकतो असा विश्वास निवृत्त पोलिस अधिकारी मंडालेश्वर काळे यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी भाविकांना अन्य घाटांवर नेण्याचा हट्ट सोडून रामकुंडावर जाण्याचे मार्ग जाहीर करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काळे यांनी याबाबतचे पत्रक प्रसिध्दीसाठी दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २००३-०४ मध्ये २५ ते ३० लाख भाविक रामकुंडावर स्नान करून सुखरूप परत गेले होते. सरदार गल्ली अरुंद असल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली होती. आता तर शाही मिरवणूकीचा मार्ग बदलल्याने रस्ताही रुंद आहे. त्यामुळे रामकुंडावर सोडण्याबाबत निर्बंधांचा अतिरेक होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी असे काळे यांची सूचना आहे. भाविक धार्मिक भावनेने देशभरातून या सोहळ्यासाठी येतात त्यांचा हक्क न डावलता नवीन नियोजनात बदल करावेत अशी त्यांची मागणी आहे. भाविकांना काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिरात दर्शनाची ओढ असते. मात्र, पोलिसांनी भाविकांना या मंदिरांकडे फिरकूच दिले नाही. त्यामुळे नाराजीचा सूर उमटला होता.

उज्जैनचा आदर्श घ्या

मध्ये प्रदेशातील उज्जैन येथेही कुंभमेळा भरतो. त्या ठिकाणी श्री महांकालेश्वर मंदिर बंद केले जात नाही. भाविकांना दर्शन घेता येते. भाविकांना दर्शनापासून परावृत्त का ठेवले जाते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. भाविकांनी रामकुंडाकडे जाण्याचे आणि परतीचे मार्ग आधीच जाहीर करावे असेही काळे यांनी सूचविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी ठोकले आयुक्तालयाला टाळे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विविध मागण्यासांठी आदिवासी आयुक्तालयात ठाण मांडून बसलेले विद्यार्थी बुधवारी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आयुक्तालयास टाळे ठोकून सरकारचा निषेध केला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा गुरुवारी (दि. १०) नाशकात येण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू होवूनही आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. गणवेश भत्ता तसेच शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. मंगळवारी सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी थेट आदिवासी आयुक्तालय गाठत, कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी सुरू झालेल्या आंदोलनाने बुधवारी आक्रमक रुप घेतले. विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्तालयालाच टाळे ठोकत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनाही आत कोंडून ठेवले. अखेर सांयकाळी कर्मचाऱ्यांनी मागच्या दाराने सायंकाळी बाहेर पडावे लागले.

आदिवासी लोकप्रतिनिधी दूर

शैक्षणिक सुविधांसाठी सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची आदिवासी खासदार, आमदार, नगरसेवकांनी अद्याप दखल सुद्धा घेतलेली नाही. दोन दिवसापासून मुक्कामी असलेल्या या विद्यार्थ्यांना जेवणच काय पिण्याचे पाणी सुद्धा मिळालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images