Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

टीव्ही में देखते थे, अब दर्शन हुए...!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'आपको ट‌ीव्ही में देखते हे, आपको मिलने की बहुत इच्छा थी. आज आपके साक्षात दर्शन हुए' हे उद् गार कुण्या नेत्याचे साधू-महंताबाबतीत नसून, साधुग्रामधील महंताचे राज ठाकरेंच्या बाबतीतले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेल्या ठाकरेंनी बुधवारी साधू-महंताचा आशीर्वाद घेण्यासाठी साधुग्रामला भेटी दिली. मात्र यावेळी त्यांनाच साधू-महंतानी आश्चर्याचा धक्का दिला. साधू-महंताच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या ठाकरेंच्या दर्शनाची ओढ महंतामध्ये दिसून आली. निर्वाणी आखाड्याचे महंत धरमदास यांनी तर आपले दर्शन झाल्याचे सांगून ठाकरे घराण्याची महती विशद केल्याने उपस्थितही आवाक झाले.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी दुसरा दिवस हा धार्मिक पुजा विधीत व साधुग्राममधील साधू-महंतासोबत घालवला. निर्वाणी आखाड्यात जाऊन धरमदास महाराजांची भेट घेतली. धरमदास यांनी उभे राहून ठाकरेंचे स्वागत केले. 'आपको टीव्ही में देखते है, आपको मिलने की बहुत इच्छा थी, आज आपके साक्षात दर्शन हुये, ठाकरे परिवार बडा परिवार है' असे सांगत, ठाकरेंचीच स्तुती केली.

घडले महाराष्ट्र दर्शन

'महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याच महाराष्ट्रात कुंभमेळ्याच्या निमित्ताने आलेल्या साधुमहंतांच्या दर्शनाने कृतकृत्य झालो, कुंभमेळ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर अनेक साधू संत आले असल्याने महाराष्ट्र दर्शन झाले.' असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले.

राज ठाकरे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने बुधवारी साधुग्रामचा दौरा केला. यावेळी महापालिकेतर्फे देण्यात येत असेल्या सुविधांची पहाणी करुन साधु महंताशी चर्चा केली. त्यांच्या समावेत पत्नी शर्मिला ठाकरे याही उपस्थित होत्या.

राज ठाकरे हे ध्वजारोहणाला येतील अशी पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती मात्र या दिवशी न आल्याने कार्यकर्त्यांचा भ्रमनिरस झाला. सिंहस्थ कुंभमेळा मध्यावर आला असताना बुधवारी त्यांचे सपत्नीक नाशकात आगमन झाले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत साधुग्राममधील साधू महंताशी चर्चा करुन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्या आधी त्यांनी वणी येथील सप्तऋंगी देवीच्या दर्शन घेतले. साधुग्राममध्ये येताच त्यांनी अखिल भारतीय वारकरी संप्रदाय कुंभमेळा परिषदेच्या खालशाला भेट दिली. खालशात आगमन होताच प. पू. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनंतर आखाडी परिषदेचे महामंडलेश्वर काशीनाथदासजी महाराज यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रतील संत महात्म्याना भेटून आनंद झाला. एकाच व्यासपीठावर महाराष्ट्र दर्शन घडले. वारकरी सांप्रदायाची परंपरा मोठी असून, तीचे जतन करण्याचे काम महाराष्ट्रातील संत मंडळी करीत आहे. यावेळी राज ठाकरे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यानंतर शर्मिला ठाकरे यांचा देखील सत्कार करण्यात आला. तेथून ते निर्वाणी आखाड्यात जाऊन त्यांनी धर्म चरणदास यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लगेचच रवाना झाले.

यावेळी वारकरी सांप्रदायाचे महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर, महामंडलेश्वर अमृतदास जोशी महाराज, महामंडलेश्वर काशीनाथ दास महाराज, महामंडलेश्वर अनंतदास बोरसे महाराज, महामंडलेश्वर ईश्वरदास चर्हाटे महाराज, उपस्थित होते. आम्ही हरिभक्त परायण असलो तरी राज ठाकरे ही देशभक्ती परायण आहेत असे काशिनाथ दास महाराज म्हणाले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह मनमसेचे अनेक कार्यकर्ते अपस्थित होते.

ग्यानदासांकडे फिरवली पाठ

सिंहस्थ कुंभमेळ्यात वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे स्वयंघोषीत अध्यक्ष महंत ग्यानदास यांची भेट ठाकरेंनी टाळली. अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादामुळे त्यांच्यापासून सर्वच जण अंतर ठेवत आहेत. विहीपनेही ग्यानदासांवरील हात काढून घेतला आहे. त्यामुळे साधुग्रामच्या पाहणी दौऱ्यात ठाकरेंनी ग्यानंदासाना भेटणे टाळले. कोणाताही वाद नको म्हणून ते दोन हात दूर राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्येष्ठांची वाचन चळवळ

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

उपनगर येथील 'इच्छामणी जेष्ठ नागरिक संघा'तर्फे 'ग्रंथ तुमच्या दारी' या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या योजनेअंतर्गत असलेल्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नाट्यकर्मी सदानंद जोशी यांच्या हस्ते या ग्रंथपेटीचे उदघाटन करण्यात आले.

वाचन संस्कृती लयाला चालली आहे असे अपण नेहमी ऐकत असतो. पण त्यसाठी सर्वच थरातून प्रयत्न होताना दिसत नाहीत. आजची तरुणाई मोबाइल, इंटरनेट, अशा गोष्टीमध्ये अडकत चालली असल्याचे दिसून येते. आपल्या मातृभाषेतील पुस्तके वाचण्याचा ओढा कमी होत चाललेला दिसतो आहे. म्हणूनच या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याची माहिती या ज्येष्ठ नागरिक संघामार्फत देण्यात आली.

यावेळी ग्रंथापेटीचे जनक विनायक रानडे तसेच कैलास पाटील व सचिन शिंदे उपस्थित होते. हे वाचनालय सर्वच वाचकांसाठी मोफत असून यासाठी उपनगरमाधील वाचकांनी वाचनालयामध्ये अनिल सोमण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि वाचन चळवळीत सहभागी व्हावे असे कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग्य आहारातून पळवा आजार

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

'महाराष्ट्र टाइम्स' व 'रिवायवल हेल्थ सेंटर' यांच्या संयुक्त विद्यमाने 'दुर्धर रोगांना टाळा-औषधांविना : केवळ योग्य आहाराच्या मदतीने' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (५ सप्टेंबर) गंगापूररोड येथील 'कुसुमाग्रज स्मारका'त सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. आहारतज्ज्ञ संगीता पत्की यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

आहाराचे महत्त्व जाणून न घेता आजची पिढी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. यामुळेच ब्लडप्रेशर, ह्रदयाचे विकार, लठ्ठपणा यासारख्या आजारांचे प्रमाण लहान वयातच त्यांच्यात वाढलेले दिसते. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार नेहमीच उपयुक्त ठरत असतो. मात्र त्यावर योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. हे मार्गदर्शन मिळत नसल्यानेच चुकीच्या आहाराचे सेवन केले जाते.

याबाबत मार्गदर्शन करण्यासाठीच या व्याख्यानानाचे आयोजन करण्यात आले आहे. आहाराच्या योग्य नियोजनामुळे कोणत्याही औषधांविना अनेक रोगांवर मात करता येते. आतापर्यंत अनेकांनी लठ्ठपणा, डायबिटीस, किडनीचे आजार, हृदयरोग, वंध्यत्व यावर योग्य आहारातून मात केली आहे. त्यांचे अनुभव प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून ऐकण्याची व खात्री करुन घेण्याची संधी या व्याख्यानामध्ये मिळणार आहे.

तसेच आरोग्यविषयक नवनवीन संशोधने, रेसिपी, दुर्धर आजारांवर मात करण्यास उपयोगी ठरलेली नविन उत्पादने, डाएट पाळताना येणाऱ्या अडचणी, डाएटविषयक शास्त्रशुद्ध माहिती यावेळी देण्यात येणार आहे. आरोग्य व आहार यावरील शंकांचे निराकरण यावेळी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपल्या ध्येयाकडे यशस्वीरित्या वाटचाल करणाऱ्या व्यक्तींचे मनोगतही ऐकण्याची संधी यावेळी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेची टांगती तलवार

$
0
0

गर्दी वाढल्यास स्थिती कायम राहण्याची शक्यता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पहिल्या पर्वणीत नियोजनात अपयशी ठरलेल्या प्रशासनाने परिस्थिती सावरण्यासाठी आपला बी प्लॅन लोकप्रतिनिधीं समोर सादर केला असला तरी गर्दी वाढल्यास पहिलाच प्लॅन कायम राहणार असल्याचेही सूतोवाच केले आहे. त्यामुळे पूर्वीची परिस्थिती कायम राहण्याची भीती व्यक्त केले जात असून सुरक्षेसाठी पहिला प्लॅन राबविला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. तर दुसरीकडे या बैठकीत पोलीसांच्या अतिरेकाच्या सुरस कहाण्या लोकप्रतिनिधींनी सांगितल्याने पालकमंत्रीही आश्चर्यचकीत झाले आहेत. आपल्या मतदारसंघात कुंभमेळा असतांनाही, आपल्यालाच प्रवेश दिला नसल्याचा धक्कादायक खुलासा आमदार निर्मला गावित यांनी केल्यानंतर पालकमंत्र्यांनाच धक्का बसला.

सिंहस्थाच्या फेरनियोजनाच्या बैठकीत लोकप्रतिनीधींनी आपल्या सूचना मांडता मांडता आपली आपबीतीही कथन केली. पोलिसांच्या अतिरेका फटका भाविकांनाच नव्हे तर, माध्यमे, लोकप्रतिनिधींनाही बसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा असतांनाही स्थानिक आमदार निर्मला गावित यांनाच त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहचू दिले नसल्याची आपबीती त्यांनी सांगितली. रस्त्यावर पोलीसांनी अडवल्यानंतर अधिकाऱ्यांना विनवण्या केल्यात. मी आमदार असूनही पोलिसांनी मला जावू दिले नाही. अखेर मी त्र्यंबकला न जाताच परत फिरल्याचे त्यांनी सांगितले. या कथनावर पालकमंत्र्यांना विश्वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी थेट पोलिस अधीक्षकांनाच विचारणा केल्यावर असे घडल्याचे समोर आले. त्यामुळे पालकमंत्रीही संतप्त होवून त्यांनी पोलिसांचीच कानउघाडणी केली. लोकप्रतिनिधीनाही पासेस द्या अशा सूचना त्यांनी केल्या.

या बैठकीत विभागीय आयुक्तांनी फेरनियोजन सादर करतांना भाविकांना थेट गावात आणणार असल्याचे नियोजन सादर केले. मात्र, गर्दी वाढल्यास पूर्वीच्याच पद्धतीने होल्ड अॅण्ड रिलीज सह पार्किंगपासून नागरिकांना पायपीट करावी लागेल असे स्पष्टीकरण दिले. फक्त गर्दी कमी असल्याच शहरात बसने प्रवेश दिला जाईल, असे सांगितल्याने पूर्वीची सुरक्षाच कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा वादविवादसह स्थिती कायम राहण्याची टांगती तलवार राहणार आहे.

पालकमंत्र्यांची टोलेबाजी

फेरनियोजनाच्या बैठकीत अंतर्गत कुजबूज करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधीनांही चांगलेच फटकारले. बैठक सुरू असतांनाच, या महिला लोकप्रतिनिधी आपआपसात चर्चा कर होत्या. त्यामुळे बैठकीत व्यत्यत येत होता. दोन तीन वेळा सागूंनही या महिला आमदारांसह इतर महिलांना दुर्लक्षित केले. त्यामुळे महाजना यांनी महिला एकत्रित आल्यानंतर अशी कुजबूज होत असल्याने पुढील बैठकीत सर्व महिलांना स्वतंत्र बसवा असे विनोदी फर्मान सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रीं’च्या मूर्ती महागल्या

$
0
0

किमतीत दहा टक्क्यांची वाढ; कच्च्या मालाची तीव्र टंचाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणरायाच्या आगमनाचे भक्तांना वेध लागले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट असून, डिझेल दरवाढ व कच्च्या मालाचे भाव वाढल्याने श्रीच्या मूर्तींच्या किमती सुमारे १० टक्क्याने महाग असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे. कच्च्या मालाचा तुटवडा व कारागिरांची टंचाई अशा दिव्यातून हा व्यवसाय मार्गक्रमण करीत आहे.

गणपती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्यामालात सातत्याने भाववाढ होत असल्याने यंदा श्रींच्या मूर्तींच्या किमतीत १० टक्के वाढ होणार आहे. प्रमुख्याने मूर्तीसाठी प्लास्टर व शाडूमातीचा वापर करण्यात येतो. परंतु, बाजारात शाडू माती नसल्याने अनेक मूर्तीकारांना ती जादा दराने विकत घ्यावी लागत आहे.

गणपती तयार करण्यासाठी लिक्वीड रबर साच्यांचा उपयोग केला जातो. प्रथम एक मूर्ती तयार करून त्या मूर्तीवर लिक्विड रबराच्या साह्याने मोल्ड तयार करण्यात येतो. या मोल्डसाठी लागणारे लिक्वीड रबर महाग झाले आहे. मागील वर्षी ७० ते ८० रुपये लिटर भाव असलेले रबर यंदा १८० रुपये लिटरने विकले जात आहे. तसेच प्लास्टरचा भाव ३५ किलोच्या गोणीसाठी ९० रुपये होता. त्यात वाढ होऊन १५० रुपये गोणी झाली आहे. तसेच रंगकामापूर्वी वापरला जाणारे इमल्शन २० लिटरच्या डब्ब्याला नऊशे रुपये भावावरून चौदाशे रुपये झाला आहे. तसेच रंगकामासाठी लागणाऱ्या एअर कॉम्प्रेसरची गन व रंग महाग झाले आहेत. तसेच ब्रशच्या किमतीतही ५० टक्क्यांनी वाढ झाली असून ४ ते ५ रुपयांना मिळणारा ब्रश ३५ ते ४० रुपयांना झाला आहे. गोल्डन पावडर हजार रुपये किलोवरून चौदाशे रुपये किलो झाली आहे. तसेच विजेचा सतत लपंडाव सुरू असल्याने जनरेटरची सोय करावी लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल लागत असून त्यामुळे किमतीत वाढ होत आहे.

कारागीरांचा तुटवडा

नाशिकमधील गणेशमूर्तींना चांगली मागणी असते. सुमारे १० इंच ते सात फुटांपर्यंतच्या मनमोहक मूर्ती ६० रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत किमतीत उपलब्ध होतात. मात्र, महागाईबरोबरच कारागिरांची कमतरता हे संकट मूर्तिकारांसमोर आहे. अनेक कारागिरांनी स्वत:च छोटे-मोठे कारखाने सुरू केले आहेत, तर काहींनी अन्य व्यवसाय स्वीकारले. राज्यभरातून गणेशमूर्तीची मागणी वाढत असून पुरेसे कारागीर नसल्याने बाहेरील शहरांतून होणारी मागणी पूर्ण कशी करावी? असा प्रश्न मूर्तिकारांना भेडसावत आहे. कारागिरांना वर्षभर रोजगार नसल्याने अनेक कारागिर दुसऱ्या व्यवसायाकडे वळत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून भावात सातत्याने वाढ होत आहे. आमच्याकडील ग्राहक वर्षांनुवर्षे आमच्याकडे येत असल्याने सध्या ७५ टक्के मूर्तींची बुकिंग झाले आहे. - भूषण विसपुते, मूर्तीकार, देवळालीगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रँडिंगमध्ये उज्जैनची बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैश्विक सोहळा असलेल्या कुंभमेळ्यासाठी अधिकाधिक भाविकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश सरकारकडून सुरू आहे. साधुग्राममध्ये मध्य प्रदेश सरकारने स्वतंत्र स्टॉल उभारला असून त्याद्वारे पुढील वर्षी आयो‌जित होणाऱ्या कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले जाते आहे. याउलट नाशिकची परिस्थिती असून ब्रँडिंगमध्ये महाराष्ट्र सरकार पिछाडीवर पडले आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या उज्जैनच्या कुंभमेळ्याचे शंभर देशांत शंभर प्रतिनिधींद्वारे ब्रँडिंग करण्यात येते आहे. देशांतर्गत ब्रँडिंगसाठी मध्य प्रदेश सरकारने स्वतंत्र पथक तयार केले असून ते वेगवेगळ्या शहरांना भेटी देऊन कुंभमेळ्याचे आमंत्रण देत आहेत. साधुग्राममध्ये मध्य प्रदेश सरकारने उज्जैन कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करण्यासाठी एका स्टॉल उभा केला असून त्यात उज्जैन कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पर्यटनाच्या दृष्टीने मध्य प्रदेश यांची माहिती दिली जाते आहे. कुंभमेळ्यातील गर्दी हा निकष पाहून भाविक कुंभमेळ्याला आले नाही तरी त्यांना पर्यटनांच्या दृष्टीने या स्टॉलमध्ये माहिती पुरविण्यात आली आहे. आज ना उद्या मध्य प्रदेशात येताना महाराष्ट्रातील पर्यटकांना त्याचा फायदा होईलच, असा दावा या स्टॉलवर थांबलेल्या एका कर्मचाऱ्याने केला. सध्या महाराष्ट्रच नव्हे तर वेगवेगळ्या प्रातांतील भाविक पर्यटक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतात, असेही या कर्मचाऱ्याने सांगितले. मध्य प्रदेश त्यांच्या राज्यात होणाऱ्या कुंभमेळ्याची जोरदार ब्रँडिंग करीत असल्याचे चित्र दिसते. उज्जैनच्या धर्तीवर नाशिकच्याही कुंभमेळ्याचे ब्रँडिंग जगभर करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह शासनाला प्रस्ताव पाठविणार होते. मात्र, त्यास अंतिम स्वरूप मिळालेच नाही.



महाराष्ट्र सरकारला उशिरा जाग

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या ९ दिवस आगोदर महाराष्ट्र सरकारने ब्रँडिंगसाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला. इतक्या कमी कालावधीत मिळालेल्या पैशांच्या जोरावर काय ब्रँडिंग करायचे असा प्रश्न उपस्थित झाला असून टेक्नोसेव्ही मानले जाणारे प्रशासन ब्रँडिंगच्या कामात मात्र पिछाडीवर असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघनखांची खुले आम विक्री

$
0
0

वनविभागाला मागमूसही नाही

bhavesh.brahmankar @timesgroup.com

नाशिक : राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाची संख्या धोक्यात आली असल्याने चिंतेचे वातावरण असले तरी वाघनखांची मात्र साधुग्राममध्ये खुलेआम विक्री होत आहे. विशेष म्हणजे, हजारो रुपये किंमतीची वाघ नघे हवी तेवढी पुरविण्याचा दावा विक्रेते करीत असल्याने या साऱ्या प्रकारातून वनविभागासमोर मोठे आव्हानच उभे झाले आहे.

सिंहस्थाच्या निमित्ताने वैविध्यपूर्ण आध्यात्मिक वस्तू आणि साधनांची साधुग्राममध्ये प्रचंड विक्री होत आहे. साधुग्राममध्ये रस्त्याच्या दुतर्फा विक्रीस असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्यांमध्ये बंदी असलेल्या वस्तूंचीही मोठी उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या बाजारात सध्या वाघनखांच्या खरेदी-विक्रीनेही सध्या जोर पकडला आहे.

मार्जार कुळातील प्राणी असलेला वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघ धोक्यात आल्याने विविध पातळ्यांवर वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनावर पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळेच वाघांच्या शिकारीवर तसेच वाघाच्या अवयवांच्या खरेदी-विक्रीवरही बंदी आहे. हे सारे असतानाही साधुग्राममध्ये वाघनखे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अमराठी विक्रेत्यांकडून साधुग्रामच्या रस्त्यांवर ग्राहकांना आकर्षित करून विक्रेते वाघ नखांचे मार्केटिंग करीत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात वाघ नखांना प्रचंड मागणी असल्याने या साऱ्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

किंमत हजारो रुपये

साधुग्राममध्ये विक्रीस असलेल्या वाघाच्या एका नखाची किंमत किमान पाच हजार रुपये आहे. वाघ नखांची जोडी घेतली त्याची किंमत दहा हजार रुपये. त्यातही काही विक्रेते तर २० हजार रुपयांनाही नखांची जोडी विक्री करीत आहेत.

काय सांगतो विक्रेता?

'शेर के नाखून लोगे तो तुम्हारा शरीर शेर के जैसे होगा। मनभी शेर के जैसे होगा। धीरे धीरे तुम्हारी आँखे नही तो तुम्हारी द्रिष्टी भी शेर की जैसे होगी। सबसे बडा मौका आया हे जल्दी से लेलो। शेर के नाखून

कभी मिलते नही, असे सांगून वाघांच्या नखांची विक्री केली जात आहे.

मार्केटिंगची पद्धत

साधुग्राममध्ये आलेल्या साधू, महंतांचे फलक ठिकठिकाणी लागले आहेत. त्यातील एका साधू महाराजांच्या डोक्यावर वाघनखे असल्याचे पोस्टर साधुग्राममध्ये बहुतांश ठिकाणी आहेत. याचाच आधार घेत विक्रेते 'वो देखो साधू महाराज जिस के सिर पर नाखून. आप भी पहनो तो तुम्हारा भी भविष्य उज्ज्वल होगा' ग्राहकांना वाघनखांच्या खरेदीसाठी गळ घालत आहेत.

वनविभाग अंधारातच

वाघनखांची दिवसाढवळ्या विक्री होत असली तरी वनविभाग मात्र अंधारातच आहे. ही वाघनखे कुठून येतात, यात मोठे रॅकेट आहे का, असे सारे प्रश्न असल्याने वनविभागाने वाघनखांच्या विक्रेत्यांना तातडीने ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्या जोरावरच वाघ नखे विक्रीची मोठी साखळी गवसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियाच्या मदतीने शेती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्या तरुणांचा सर्वाधिक वेळ 'सोशल मीडिया'च्या वापरामध्ये जात असल्याची ओरड सुरू आहे. मात्र, त्याच 'सोशल मीडिया'चा योग्य वापर करून निफाड तालुक्यातील ज्ञानेश्वर बोरस्ते या तरुणानी द्राक्ष शेतीमध्ये लौकिक मिळवला आहे.

उच्चशिक्षित असलेल्या या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता पारंपारिक शेतीचे द्राक्ष बागेत रुपांतर केले. उत्तम गुणवत्ता आणि चमकदार द्राक्षाचे एकरी २५ टनापर्यंत विक्रमी उत्पादन घेऊन रशिया, युके आणि नेदरलँडपर्यंत पोहचवले. शेतीपासून दूर जाणाऱ्या तरुणासाठी ज्ञानेश्वरचे शेतीमधले 'करिअर' प्रेरणादायी ठरले आहे. द्राक्षाच्या उत्पादनासाठी काही अडचण आल्यास फेसबुकवर अडचण टाकून आपल्या मित्रांकडून त्याने सल्ले घेतले होते.

नैसर्गिक संकटाला तोंड देत उत्तम दर्जाचे उत्पादन घेतल्यानंतरही बाजारात योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी शेतीपासून दूर जात आहे. वडिलोपार्जित कितीही शेती असली तरीही शेतकऱ्यांची मुले नोकरीलाच पहिली पसंती देतात. मात्र, निफाड तालुक्यातील साकोरेच्या ज्ञानेश्वर बोरस्ते या ३० वर्षाच्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्धार केला. वडिलोपार्जित ६ एकर शेतीमध्ये द्राक्ष शेती करण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक शेतीला आधुनिकता आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन कमी खर्चात उत्तम शेती करण्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून तंत्र आत्मसात केले. पाण्याच्या कमी वापरासाठी शास्त्रोक्त ठिबक पद्धती शेतीमध्ये अमलात आणली. जमीन कसदार राहावी यासाठी सेंद्रीय आणि गांडूळ खताबरोबर शेण खताचा अवलंब केला.

फुलोरा, द्राक्ष वाढीच्या काळामध्ये बुरशी आणि आळी नियंत्रणासाठी ड्यूपॉन्ट कर्झेटचा वापर केला. द्राक्षांच्या आकारापेक्षा गुणवत्ता आणि चमककडे विशेष लक्ष दिल्याने परदेशामध्ये द्राक्षाला मागणी झाली. मागील २ वर्षामध्ये एकरी २५ टनापर्यंत विक्रमी द्राक्ष उत्पादन घेऊन चीनमधील शेतकऱ्यांनाही आचंबित केले आहे. यंदाही द्राक्ष उत्पादनाचा आणखी विक्रम करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहे.

मोबाइल बनला मार्गदर्शक

पदवीचे शिक्षण घेऊन शेतीमध्ये उतरल्यानंतर सुरुवातीला कृषी तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. मात्र, वारंवार कृषी तज्ज्ञांकडे न जाता ज्ञानेश्वरनी आपल्या मोबाइलला कृषी तज्ज्ञ केले. हवामानातील बदल, बदलानुसार द्राक्ष शेतीमध्ये करावयाची कामे, द्राक्ष बाग वाढ होत असताना घ्यावयाची काळजी आणि द्राक्ष बाजारातील स्थिती मोबाइल इंटरनेटच्या माध्यमातून घेत राहतो. फेसबुक, व्हॉटस अपच्या माध्यमातून जिभेला सारखेसारखा गोडवा देणारे द्राक्ष नातेवाईक, मित्र आणि बाजारापर्यंत पोहचवले.

परदेशातील मागणीनुसार निर्यात कशी करायची याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतली. शेतीमधले तंत्र आत्मसात केल्याने कमी खर्चात मी शेती केली. द्राक्ष शेती पाहण्यासाठी चीनमधील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेट दिले. आतापर्यंत रशिया, युके, नेदरलँडमध्ये द्राक्षाची निर्यात केली. - ज्ञानेश्वर बोरस्ते, द्राक्ष उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठाकरेंचे दुरूनच त्र्यंबकदर्शन

$
0
0

तासाभराच्या धावत्या दौऱ्यात कार्यकर्त्यांकडे केले दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

महाराष्ट्र नवनिर्माण (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी त्र्यंबकेश्वरला धावती भेट दिली. त्र्यंबकराजाचे दर्शन घेत मंदिर विश्वस्त कार्यालयात चहापान आणि जाताजाता निरंजनी आखाड्यात साधू महंतांची भेट असा निव्वळ तासाभराचा त्यांचा दौरा होता. यामध्ये राज यांचा देवदर्शन हाच एकमेव हेतू असावा, असे दिसून आले. मराठी अभिनेते विनोद येडेकर हे त्यांच्या सोबत होते.

राज यांनी कुंभमेळ्यात येण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले. तसेच त्यांनी साधुंशी चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या, अशी माहिती पक्षाचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे यांनी सांगितले. मनसेचे नगरसेवक पक्षातून बाहेर पडले असले तरी कायकर्ते आजही पक्षासोबत आहेत हे दौऱ्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून लक्षात आले, असेही त्यांनी सांगितले. राज यांच्या दौऱ्यात प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, अनिल मटाले आदींसह ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत, समीर पाटणकर, आदी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त सचिन पाचोरकर यांनी राज यांना येथील व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली.

मन दुखावल्याचा परिणाम!

कुंभमेळ्याच्या प्रारंभी मनसे नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करून ठाकरे यांना दुखावले. त्यामुळे ठाकरे यांनी त्र्यंबकला अधिक वेळ दिला नाही, अशी चर्चा शहरात गुरुवारी सुरू होती. दौऱ्यात नगराध्यक्षा अनघा फडके स्वागतासाठी आल्या. मात्र, ठाकरे आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विशेष आस्था दाखविली नाही. त्र्यंबक नगरपालिकेत सत्तांतर घडतांना नगराध्यक्षा फडके यांच्यासह मनसेच्या ६ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रतीक्षा अन् कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग

राज ठाकरे येणार म्हणून आदल्या दिवसापासून कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. गुरुवारी सकाळपासून कार्यकर्ते थांबले होते. मात्र, ठाकरे दोन तास उशिरा आले. त्यांनी मंदिरात दर्शन घेतले. विश्वस्तांनी त्यांना सत्कार चहापानासाठी कोठी संस्थान कार्यालयात नेले. तेथे जवळपास अर्ध्या तासापेक्षा अधिक काळा ठाकरे थांबले याकाळात कार्यकर्ते मंदिराच्या बाहेर उन्हातच थांबले होते. ठाकरे कोणत्या आखाड्यात जाणार याची कल्पना नसल्याने सर्व वाहनांचा ताफा शिवनेरी चौकात उभा होता. ठाकरे निलपर्वत जुना आखाडा येथे जातील असा अंदाज होता. परंतु, त्यांनी निरंजनी आखाड्यात जाणे पसंती केले. दुपारची वेळ असल्याने तेथे साधुंचे जेवण सुरू होते. ठाकरे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत आत जात साधूंची विचारपूस केली. बाहेर आले आणि गाडीत बसून नाशिकला निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ साध्वींवर गुन्हा दाखल व्हावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी जीवनभर खस्ता खाणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना सापडवण्यासाठी साध्वी शिवानी दुर्गा यांनी अघोरी तंत्र मंत्राचे सहाय्य घेतले. अंनिस (अंधश्रध्दा निर्मूलन समिती) कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का असून साध्वी शिवानी दुर्गा यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येते आहे.

अंधश्रध्देविरोधात लढणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे शहरात हत्या करण्यात आली. या हत्याकांडातील मारेकरी व सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. यापूर्वी पुणे शहराचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी प्लँचेट केल्याचे समोर आले होते. त्यावेळी अंनिस कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन केले. राज्य सरकारने त्यांची बदली केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. आता, त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्यास असलेल्या साध्वी शिवानी दुर्गा डॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी प्लँचेट करीत असल्याची बाब समोर आली आहे. तंत्रमंत्राच्या सहाय्याने गुन्हेगार पकडून देणार असल्याचा दावा शिवानी दुर्गा यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील घनदाट जंगलात विधी सुरू असल्याचे दुर्गा यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

अंनिस कार्यकर्त्यांना ही बाब समजताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिवानी दुर्गा यांचे हे कृत्य जादुटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. यांची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. अठरा महिन्यात मारेकऱ्यांना पकडून देण्याचा दावा करणे, याचा अर्थ शिवानी दुर्गा यांना मारेकऱ्यांबाबत माहिती असू शकते. त्यामुळे या प्रकाराची चौकशी होणे महत्त्वाचे असल्याचा दावा संघटनेचे कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह सुधीर धुमाळ, शहर कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे, शहर अध्यक्ष व्ही. टी. जाधव, सिन्नर शाखेचे सचिव दिलीप गोसावी यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.

तर दुर्गा यांना २१ लाखांचे बक्षिस

'अंनिस' ही विवेकवादी संघटना आहे. शांतता व संविधानुसार अहिंसेच्या मार्गाने ती जनप्रबोधन करते. अ​वैज्ञानिक दाव्यांना संघटनेकडून नेहमीच आव्हान दिले जाते. अंनिसच्या प्रतिआव्हान प्रक्रियेनुसार शिवानी दुर्गा यांनी त्यांचे दावे सिध्द केल्यास त्यांना लोकवर्गणीतून जमा झालेले २१ लाख रुपये बक्षिस देऊन ही चळवळ बंद केली जाईल, असे 'अंनिस'ने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाकडून जनतेची मनधरणी

$
0
0

पहिल्या पवर्णीत चूक झाल्याची पालकमंत्र्यांची जाहीर कबुली

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ आपणा सर्वांचा आहे. आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे आणि सर्वांच्या सहकार्याने संपन्न करायवयाचा आहे असे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या बैठकीत उपस्थित नागरीकांच्या सहकार्याची आपेक्षा व्यक्त केली आहे. पहिल्या शाहीस्नानाच्या पर्वणीस चूक झाली असे जाहीर कबूल केले. पहिल्या शाहीस्नानाकडे भाविकांनी पाठ फिरविल्याने हादरलेल्या प्रशासनाने आता नागरिकांची मनधरणी सुरू केली आहे.

त्र्यंबकमध्ये झालेल्या बैठकीस व्यासपिठावर पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसींह कुशवाह, विभागीय पोलिस आयुक्त जे. जे. सिंग, ‌पोलिस अधीक्षक संजय मोहिते, नगराध्यक्षा अनघा फडके आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीत नागरिकांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली.

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी त्र्यंबकमधील घाटांना ड्रेनेजेचे पाणी असतांना तेथे नागरिकांनी स्नान करावे, अशा अपेक्षा तुम्ही ठेवू नका, आम्ही घाटावर अंघोळ करणार नाही. तसेच परिसरातील ग्रामीण जनतेला वेठीस धरू नका

असे बजावले.

सिंहस्थात बाय चान्स, बाय ड्युटी आणि बाय बर्थ अशा पद्धतीने व्यक्ती सहभागी होत असतात. आम्ही बाय बर्थ आणि बाय हार्ट येथे असतांना आमचा प्रथम अधिकार आहे तेव्हा सर्वात प्रथम आम्हाला येथे सिंहस्थ अनुभवण्याचा अधिकार द्या, अशी मागणी विशाल जोशी या तरुणाने केली. आम्हाला बाहेरच्या जनतेला बोलवणे शक्य होणार आहे तसेच स्वयंसेवक म्हणून ओळखपत्र व काम करण्याची संधी दिली आहे; मात्र पोलिस अधिकारी आम्हाला हुसकावून लावतात हे थांबवा, अशी मागणीही त्याने केली.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यादवराव तुंगार, विश्वस्त अॅड. श्रीकांत गायधनी, युवा कार्यकर्ता कल्पेश कदम, माजी उपनगराध्यक्ष गिरीश जोशी, सभापती शांताराम मुळाणे, मंगेश धारणे, धनंजय तुंगार, उपनगराध्यक्ष संतोष कदम आदींसह आणखी काही नागरिकांनी मनोगत व्यक्त केले आणि मौलिक सूचना केल्या.

गैरसमज दूर करण्यासाठी खटाटोप

व्यासपिठावरील खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित आदींनी सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी माध्यमांद्वारे भाविकांना आवाहन करावे. पायपीट होते हा समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना केल्या. या सूचनांचा परामर्श व्यासपाठावरील जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते आणि जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी केला. येथे सुयोग्य नियाजन होईल नागरिकांना त्यात सहभाग मिळेल तसेच गर्दीचा ओघ पाहून बाहेरील वाहनतळांचा निर्णय घेता येईल, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासन, पालकमंत्री अखेर जमिनीवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुरक्षेच्या अतिरेकामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन पावले मागे येत गुरूवारी लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सोपस्कार पार पाडले. पालकमंत्र्यांसह पोलिस आणि प्रशासनावर तुटून पडण्याची संधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी साधली. जमिनीवर आलेल्या प्रशासनाने `बी प्लॅन` सादर करून लोकप्रतिनिधींची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या नाराजीनंतर पालकमंत्र्यांनी परिस्थिती सावरत पुढील पर्वण्यांचे फेरनियोजन करीत, भाविकांची पायपीट कमी करण्यासह शहरातील व्यवहार सुरळीत राहतील, असे आश्वासन दिले.

पहिल्या पर्वणीत अपयश आल्यानंतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने नव्या नियोजनाची मांडणी प्रथम केली. लोकप्रतिनिधींनी अपयशाचे खापर पोलिस आणि प्रशासनावर फोडले. त्यांनी प्रशासन व पोलिसांच्या चुकांची जंत्री मांडत, नव्या सूचना केल्या. सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, खासदार हेमंत गोडसे, जयंत जाधव, अजय बोरस्ते, गुरूमीत बग्गा, शिवाजी चुंभळे, विजयश्री चुंभळे, तानाजी जायभावे, दिनकर पाटील, संजय चव्हाण यांनी तक्रारी करतानाच सूचनाही केल्या.

भारत-पाकसारखी स्थिती नको

पालकमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांचे कान उपटले. पोलिसांनी सुरक्षेचा अतिरेक केल्याचे सांगून नागरिकांना त्रास दिल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी लोकांना घरातील लाईटही बंद करण्यास भाग पाडले. ओट्यावरही येवू दिले नाही. जणू भारत-पाकिस्तानचे युद्ध सुरू असल्याचे वातावरण तयार केल्याचे सांगून पोलिसांचा अतिरेक चव्हाट्यावर आणला. लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवण्याचे सांगून नागरिकांना त्रास होणार नाही, असे नियोजन करण्याचे फर्मान सोडले.



प्रशासनाचे आश्वासन

> पहिल्या पर्वणीनंतर फेरनियोजन, वाहतूक व्यवस्थेतही बदल

> भाविकांना जास्तीत जास्त दीड ते दोन किलोमीटर पायपीट

> शहर बससेवा सुरू राहणार

> शहरात सर्व व्यवहार सुरू ठेवणार, हॉटेल्सचाही समावेश

> आखाड्यांच्या मिरवणूकस्थळी भाविकांना परवानगी



लोकप्रतिनिधींच्या सूचना

> पोलिसांच्या बॅरिकेड्सचा केलेला अतिरेक कमी करा

> शहरातील अतंर्गत वाहतूक कायम ठेवून व्यवसाय व हॉटेल्स सुरू ठेवा

> भाविकांची पायपीट कमी करून थेट गावात प्रवेश करू द्या

> भाविकांसाठी दररोज शंभर क्युसेक पाणी सोडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ आवरा, दुष्काळ सावरा!

$
0
0

भाजप आमदाराचा पालकमंत्र्यांना घरचा आहेर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कुंभमेळ्याच्या आयोजनात गुंतल्याने ऐन दुष्काळात वाऱ्यावर सोडले गेलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथांना भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पालकमंत्र्यांच्या भर बैठकीत वाचा फोडली. साहेब, जरा सिंहस्थ बाजूला ठेवा, जिल्ह्यातील दुष्काळाकडे लक्ष घाला, शेतकऱ्यांचे हाल बघा, अर्धी यंत्रणा दुष्काळाकडे वळवा, असे खडे बोलच आहेर यांनी सुनावले अन् उपस्थिततही सुन्न झाले.

पालकमंत्र्यांनी सिंहस्थ हा जागतिक उत्सव असल्याचे सांगून टाळाटाळ करताच, डॉ. आहेर व पालकमंत्र्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर टंचाईच्या मुद्यावर दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.कुंभमेळ्याचा पुढील पर्वण्यांच्या नियोजनासाठी महाजन यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत सिंहस्थावर जोर असणारे पालकमंत्री यांना प्रशासनाला आमदार आहेर यांनी जिल्ह्यातील तीव्र दुष्काळाची जाणीव करून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्या कंपन्यांसाठी नाशिक पोलिसांचा कायदेभंग!

$
0
0

Vinod.patil @timesgroup.com

नाशिक : कुंभमेळ्यात नागरिकांना रामकुंडापासून लांब ठेवणाऱ्या पोलिसांनी काही मल्टिनॅशनल कंपन्यांना रामकुंडासह शहरातील मुख्य रस्त्यांवर जाहिरात करण्याची थेट परवानगीच देऊन टाकली आहे. यानिमित्ताने पहिल्या पर्वणीत सुरक्षेचा अतिरेक करणाऱ्या पोलिसांनी चक्क महापालिकेच्या अधिकारावरच अतिक्रमण केले. सोबतच लाखो रुपयांच्या उत्पन्नावर घाला घातला आहे. पोलिसांच्या वर्तनाने महापालिका आयुक्त संतापले असून, त्यांनी थेट पोलिस आयुक्तांनाच पत्र लिहून पोलिसांच्या अधिकारांची जाणीव करून दिली आहे. दिलेल्या परवानग्या रद्द करण्यासाठी दबाव वाढवल्याने महापालिका आणि पोलिसांतच जुंपणार आहे.

शहरात कोणतीही जाहिरात लावायची असेल तर त्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. कोणत्याही शासकीय कार्यालयालाही जाहिरात करावयाची असेल तर, त्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. स्थायी समिती आणि महासभेच्या परवानगीनंतरच पुढील सोपस्कार पार पडतात. महापालिकांना आर्थिक उत्पन्न मिळावे असा या मागचा शासनाचा उद्देश आहे. पालिकेने सिंहस्थानिमित्त शहरात जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवायचे ठरवले आहे. त्यासाठी अनधिकृत जाहिरात करणाऱ्या कंपन्या व व्यक्तींवर कारवाई करीत आहे.

आर्थिक उत्पन्नाची पर्वणी साधण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असतांना दुसरीकडे पोलिसांनी पालिकेच्या या अधिकारावरच गदा आणली आहे. कुंभमेळ्यादरम्यान जाहिराती लावण्यासाठी कंपन्याना परवानगी देण्याचा कोणताही अधिकार नसतांना, पोलिसांनी व्होडाफोन, एअरटेल, केशकिंग, इंटेक्स, नवरत्न, माझा या बड्या कंपन्यांना जाहिरातीसाठी परस्पर परवानगी दिली आहे. रामकुंडासह शहरातील मुख्य रस्त्यांवरही या कंपन्यांना पोलिसांच्या परवानगीचे कारण देत, जाहिराती लावल्याने पालिकेचे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या या अतिरेकीपणाची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पालिकेच्या अधिकारात अतिक्रमण केल्यावरून थेट पोलिस आयुक्तांनच विचारणा केली आहे. आयुक्तांनी आपल्या अधिकारावर अतिक्रमण झाल्याचे सांगून खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.

आर्थिक व्यवहाराची चर्चा?

पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्या सहीने थेट कंपन्यांना फलक उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. भाविकांवर वक्रदृष्टी टाकणारे पोलिस या कंपन्यावर कसे काय मेहरबान झाले, यात आर्थिक व्यवहार घडल्याचीही चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीने दुष्काळावर बोलूच नये!- राज

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असलेल्या राज्य सरकारवर आणि दुष्काळाच्या मुद्द्यावरून आंदोलनं करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज टीकास्त्र सोडलं आहे. १५ वर्षांत एकही सिंचन प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या राष्ट्रवादीला दुष्काळावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा सणसणीत टोला त्यांनी हाणला.

कुंभमेळ्यानिमित्त राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी त्र्यंबकेश्वरला धावती भेट देऊन साधू-महंतांशी संवाद साधला होता. त्यानंतर आज नाशकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारचे कान उपटले आणि राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा अजूनही जम बसलेला दिसत नाही. ते मांड ठोकून काम करताना दिसत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी भागाचे दौरे करण्यापेक्षा तिथल्या जनतेला मदत पुरवावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. मात्र त्याचवेळी, राज्य सरकारच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीचाही त्यांनी समाचार घेतला.

दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अलीकडेच रस्त्यावर उतरले होते. गेल्या महिन्यात उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीनं पवारांच्याच नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्यानंतर आता १४ सप्टेंबरपासून मराठवाड्यात जेल भरो आंदोलनाचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेवर राज यांनी सडकून टीका केली. १५ वर्षं सत्तेत असताना राष्ट्रवादीनं सिंचन प्रकल्प पूर्ण केले असले तर आज ही वेळ आलीच नसती. राज्यातील या दुष्काळी परिस्थितीला राष्ट्रवादीच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळावर बोलण्याचा आणि सरकारविरोधात आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही, असं त्यांनी सुनावलं. त्यामुळे आता पवार विरुद्ध राज यांच्यात शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शाही स्नानाच्या दिवशी नागरिकांना अडवणाऱ्या पोलिसांचं राज यांनी समर्थन केलं. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी ही खबरदारी घेतली होती, त्यात त्यांची काही चूक नाही, असं ते म्हणाले. नाशिकचं, कुंभमेळ्यांचं ब्रॅण्डिंग करण्याचा मनोदयही राज यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वयंसेवकांतील चोरट्यांना शोधणार कसे?

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांची लूटमार होत असल्याच्या घटना एव्हाना नाशिककरांसाठी सवयीच्या झाल्या आहेत. चोरटे पोलिस असल्याची बतावणी करतात की पोलिसही अशा घटनांमध्ये सामील असू शकतात हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. मात्र, बतावणी करणारे फारच कमी संशयित आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागू शकले आहेत. चोरटे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरतात याचाच अर्थ ते पोलिसांच्या तपास पद्ध्तीच्या एक पाऊल पुढे असल्याचे स्पष्ट होते.

सिंहस्थ काळात येणारे भाविक ही चोरट्यांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे. म्हणूनच रस्त्यांवर पोलिसांचा वावर वाढला असताना, साधुग्राम सारख्या परिसरात साधुंच्या वेषात पोलिस गस्त घालीत असताना आणि शहरातील कोअर एरिया सीसीटीव्हींनी कव्हर केला असतानाही चोरटे चोऱ्या, जबरी चोऱ्या करण्याचे धाडस करतात, याचाच अर्थ चोरांना पोलिसांचे आणि कायद्याचे भय वाटत नाही, हे स्पष्ट होते. अर्थात नाही म्हटले तरी पोलिस गुन्हे रोखण्यासाठी सक्रीय झाले असून चोरट्यांना पकडण्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येऊ लागले आहे. मात्र, या पोलिसांपुढे आता नवीनच आव्हान उभे ठाकले आहे. ते म्हणजे स्वयंसेवकांमधील चोरट्या प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना ओळखून त्यांना अद्दल घडविण्याचे.

पोलिसांनी सिंहस्थामध्ये बंदोबस्ताला मदत व्हावी यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रतिसादही भरपूर मिळाला. काही हजार स्वयंसेवकांना पोलिसांनी मदतीसाठी घेऊन त्यांना विशेष पास प्रदान केले. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी त्यांची मदत व्हावी हा त्यामागील मुख्य उद्देश होता. बहुतांश स्वयंसेवकांचा पोलिसांना फायदा झाला असला तरी अनेक स्वयंसेवकांनी भाविकांवर काठ्या उगारण्याचे प्रकार घडल्याच्या तक्रारी आता पोलिसांना प्राप्त होऊ लागल्या आहेत. ऑर्डरशिवाय पोलिस जेथे काठ्या उगारण्याची हिमंत दाखवित नाहीत तेथे स्वयंसेवकांकडून दिलेल्या अधिकाराचा गैरवापर होणे प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. ‍त्यामुळेच स्वयंसेवकांची संख्या कमी करण्याचा विचार पोलिस करू लागले आहेत.

भाविकांच्या लुटमारीतही काही स्वयंसेवकांनी हात धुऊन घेतल्याची पोलिसांची खात्री पटली आहे. सात ते आठ स्वयंसेवकांनी भाविकांजवळील वस्तू हातोहात लांबविल्याच्या घटना पहिल्या पर्वणीवेळी घडल्या असून पोलिसांनी त्याचीही गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पर्वणीत शिरकाव करणाऱ्या अशा विघ्नसंतोषी घटकांचा बंदोबस्त करणे पोलिसांपुढील आव्हान असणार आहे.

परकीय चलनावरही डल्ला

पंचवटी परिसरातून ८०० इस्त्रायली डॉलर, चेकबुक तसेच लॅपटॉप व तत्सम मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार इस्त्रायलमधून नाशिकमध्ये आलेल्या एका तरुणाने दिली आहे. परदेशी नागरिकांचा ऐवजही हातोहात लांबविला जाऊ लागल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांची नाचक्की होत आहे. ती टाळण्यासाठी पोलिसांनाच विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांना दुष्काळझळा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिडकोतील कामटवाडे शिवारात सध्या पाणीप्रश्न बिकट बनत चालला असून पाण्याअभावी रहिवाशांचे अत्यंत हाल होत आहे. वाटेल तेव्हा पाणीकपात होऊनही या भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने रोजचे पिण्याचे पाणीदेखील मिळू शकत नसल्याची तक्रार परिसरातून करण्यात येत आहे.

शहराला वर्षभर पाणी पुरवठा व्हावा यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणकपातीचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला होता. त्यानुसार सिडकोतील आनंदनगर, वृंदावननगर, विठ्ठलनगर परिसरात पाणीकपात करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी ही पाणीकपात पूर्ववत करण्यात आली. परंतु, या भागात मात्र पूर्वीपासूनच कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवाशांचे हाल होत आहे. नोकरदार वर्ग तर मेटाकुटीला आला आहे कारण पाण्यासाठी दाबच नसतो. त्यामुळे दोन-दोन दिवस पाण्याविनाच जात असल्याचे चित्र आहे. या भागात मोटरने पाणी खेचणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पाणी आल्यानंतर अनेकांकडून मोटर सुरू करण्यात येते.

त्यामुळे शेजारच्या दोन ते चार घरांना पाणीच मिळत नाही. कमी दाबाने पाणी असल्याने मोटारीने पाणी ओढत असल्याचे उत्तर देऊन इतरांच्या वाट्याचेही पाणी पळवले जात आहे. त्यातच या भागात सर्वाधिक बांधकामे सुरू आहे. त्यामुळे इमारतींवर पाण्याचे लोट सोडले जातात. पिण्यासाठी पाणी नाही तर बांधकामांना पाणी मिळतेच कसे? असा संतप्त सवाल परिसरातून केला जात आहे.

मोटारीने पाणीउपसा

काही ठिकाणी पाणी भरून झाल्यानंतरही मोटारी सुरूच असतात. या प्रकारामुळे पाणी भरताना नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडते. प्रशासनाने या प्रश्नी गांभिर्याने लक्ष घालून पाण्याचा दाब वाढवावा, अशी मागणी सिडको भागातून केली जात आहे.

सिडकोतील पाणीस्त्रोतही आटले

परिसरात पूर्वी हापसा व बोअर सुरू असायचे त्यामुळे तेथून वापरासाठी पाणी मिळवणे शक्य होत असे. परंतु, आता हे पाण्याचे इतर स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणांहून पाणी मिळत नाहीत व कमी दाबामुळे घरातही पाणी यात नाही, अशा द्विधा अवस्थेत महिलावर्ग सापडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा दिवसांत ९,५०० रुग्णांवर उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानात गेल्या चौदा दिवसांत ९ हजार ५०० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. येथे सुरू असलेल्या आरोग्यसेवा उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून, संस्थानतर्फे समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज रुग्णालय व फिरता दवाखाना २४ तास कार्यरत आहे.

गेल्या १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत येथील ओपीडीत ४३०८ रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. डॉ. अरुण भगत येथे उपचार करीत आहेत. शिवाय येथे आरोग्य शिबिर घेऊन तिथे एक तज्ज्ञ डॉक्टर येऊन गंभीर आजारावर उपचार केले जात आहेत. अशा तज्ज्ञ डॉक्टरांकडून आत्तापर्यंत ९७९ रुग्ण तपासून उपचार करण्यात आले. येथे हृदयरोग, फिजीओथेरपी, वंध्यत्व व टेस्टट्यूब, नेत्ररोग तपासणी यासंदर्भातील रुग्णांवर उपचार करण्यात आले.

या दवाखान्यात आत्तापर्यंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत राणे (मुंबई), फिजीओथेरपीस्ट तज्ज्ञ डॉ. सौरभ फडकुले, डॉ. मृणाल कांबळे, वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. चंदशेखर साकोलीकर, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मगर, आदींनी तपासणी व उपचार केले. संस्थानने साधुग्राममध्ये एक फिरता दवाखाना सुरू केला आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तो जिथे जिथे थांबतो तिथे रांगा लागतात. यामध्ये डॉ. राम पांचाळ, त्यांचे दोन सहकारी डॉक्टर, दोन नर्स उपचार करीत आहेत. अशा तऱ्हेने या आरोग्यसेवेतून एकूण ९५०० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले.

संस्थानचा हा सेवाभावी उपक्रम कुंभमेळ्यात चर्चेचा विषय झाला आहे. साधुग्राममधील सर्व साधू-संत, येथे येणारे भाविक यांची यामुळे चांगली सोय झाली आहे. येथे उपचार घेतलेल्या रुग्णांच्या संख्येवरूनच या उपक्रमास मिळालेला प्रतिसाद लक्षात येतो. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, कृषी प्रदर्शन, अन्नछत्र, आरोग्य शिबिरे, धर्मजागृती, कीर्तन असे अनेक सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संजयची सुटका अन् साध्वी प्रज्ञासिंगला शिक्षा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साध्वी प्रज्ञासिंग यांची कायमस्वरूपी सुटका होणे अपेक्षित असून, संजय दत्तला एक न्याय आणि साध्वी प्रज्ञासिंगला दुसरा न्याय, असे दुहेरी धोरण निश्चितच खेदजनक असल्याची टीका षडदर्शन साधू मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत गरीबदास महाराजांनी केली.

लष्कर तसेच स्थानिक पोलिसांनी पकडलेल्या खऱ्या दहशतवाद्यांच्या माफींचा विचार होतो. मात्र, साध्वी प्रज्ञासिंग यांची अवहेलना केली जाते. गेल्या काही वर्षांपासून सरकारचे लक्ष मंदिर आणि मठांच्या उत्पन्नावर पडले आहे. दिसेल त्या मंदिरावर सरकार कब्जा करीत असून, मंदिरांची देखभाल करणे सुध्दा मुश्किल होत असल्याचे गरीबदास महाराजांनी सांगितले. यावेळी षडदर्शन साधू मंडळाचे मध्य प्रदेश राज्याचे अध्यक्ष कम्प्युटर बाब, महंत लक्ष्मण दास, महंत नृसिंह महाराज आदी उपस्थित होते. लाखो भाविक स्नान करीत असल्याने नदीपात्र तसेच पाणी तातडीने स्वच्छ करणे गरजेचे आहे. अन्यथा रोगराईला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. कम्प्युटर बाबांनीही प्रशासनाच्या धरसोड वृत्तीवर सडकून टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कुटुंबाला जेलरोडला मारहाण

$
0
0

नाशिकरोड : जमिनीच्या वादातून जेलरोडच्या मधुकर आढाव या शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी विशाल पवार, हेमंत केदारे, आबासाहेब चौधरी, किरण रसाळ, रणजित तालखे, शुभम आदमने, यश गरुड, देवीदास तोरणे यांना अटक केली. नाशिकरोड न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली. उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेसमधून निवृत्त झालेले शेतकरी मधुकर शिवराम आढाव यांचा मौजे दसक येथे प्लॉट आहे. ते मुलगा कैलास व श्रीकांतसह शेती करतात. त्यांच्या प्लॉटचा वाद कोर्टात प्रलंबित आहे. आढाव ३ सप्टेंबरला कोर्टातून घरी परतले. सायंकाळी संशयित वाहनांमधून फ्लाटवर आले आणि आढाव यांच्या नावाची पाटी काढून फेकून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images