Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वादविवादांवर सरकारचे मौन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधू-महंत आणि आखाड्यांमध्ये विविध कारणांवरून सुरू असलेला वादविवाद हा त्यांचा अतर्गंत प्रश्न असल्याचे सागूंन पालकमंत्री गिरीश महाजन यांना या वादापासून दूर राहणेच पसंत केले. तसेच आखाडा परिषदेचा अध्यक्ष ठरवणे ही सरकारची जबाबदारी नसून तो, आखाड्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे स्पष्ट करून या वादावर मौन पाळणेच पसंत केले. साधू-महंतांच्या भेटीमागे भुजबळांचे कोणतेही राजकारण नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी अचानक नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील नाराज साधू महंतांची भेट घेतली. त्यामुळे पालकमंत्र्यांनी सोमवारी नाशिक गाठत साधू-महंतांची चाचपणी करत, त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना महाजन यांनी कुंभमेळ्यासाठी आवश्यक तयारी सरकारने पूर्ण केली आहे. साधू-महंताच्या अपेक्षा पूर्ण केल्या असल्याचा दावा त्यांनी केला. तर साधू-महंत आणि आखाड्यांमध्ये रंगलेल्या वादावर अधिक भाष्य करण्यात त्यांनी नकार दिला. साधू-महंतांचा वादविवाद हा त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. त्याचा सरकारशी काहीच संबंध नाही. सोबतच आखाडा परिषदेचा अध्यक्ष कोण असावा हे सरकार ठरवित नसून ती सरकारची जबाबदारी नाही. कोणते पद कोणाला द्यावे हा आखाड्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्यासाठी सर्वच जण प्रतिष्ठेचे असल्याचे सांगत अधिक बोलायचे टाळले. महापालिकेत मनसेची सत्ता असल्याने आखाड्यांचे ध्वजारोहण सोहळा पार पडण्याची जबाबदारीही त्यांचीच असल्याचे सांगून यात राजकारण नसल्याचे त्यांनी सांगितले. सिंहस्थासाठीची तयारी आम्ही पूर्ण केली असून काही त्रुटी असल्यास त्याही दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जागेची कमतरता असल्याने खासगी ठिकाणी राहणाऱ्या साधू-महंतानाही आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. सोबतच नाराज साधू महंतांचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांच्या भेटी घेणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.

भुजबळांच्या दौऱ्यानंतर धावपळ

सोयी सुविधांवरून नाशिकसह त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंत भाजप सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना रविवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वरमधल्या साधू-महंतांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता असतांनाच, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी तातडीने नाशिकमध्ये धाव घेतली. महंत ग्यानदास महाजारांसह सर्व साधू-महंतांची भेट घेवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सोबतच त्र्यंबकेश्वरमध्ये जावून हरिगिरीजी महाराजांसह सर्वच साधूंची भेट घेत, वादावर पडदा टाकण्यासाठी त्यांची दमछाक झाली.

तक्रारी अन् समाधानही

साधुग्राममधील विविध आखाड्यातील साधू-महंताशी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी संवाद साधला. यावेळी उपस्थित साधू-महंतांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. याउलट, सदैव प्रशासनावर तुटून पडणारे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी प्रशासनाच्या कामावर समाधान व्यक्त केले. आखाडे आणि ग्यानदास यांनी परस्परविरोधी भूमिका घेतल्याने सर्वच आलबेल सुरू नसल्याचे स्पष्ट होते.

आखाड्यांचे १९ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या वतीने साधुग्राममधील विविध कामांना गती देण्याचे काम सुरू आहे. याबाबत पालकमंत्री महाजन यांनी आखाड्यांना भेट देऊन माहिती घेतली. या दौऱ्यात तीन्ही प्रमुख आखाड्यांच्या महंतांनी पालकमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. सुमारे ५० ते ६० खालशांच्या जागा कमी पडत असल्याची खंत महंतांनी व्यक्त केली. काही आखाड्यांनी खासगी जागेत आपले काम सुरू केले आहे. याठिकाणी प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. साधुग्राममधील काही शौचालय व स्नानगृहातील नळ तोट्यांची अवस्था दयनीय झाली असून, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. कुंभमेळ्यात आखाड्यांच्या वतीने भाविकांसाठी भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. रेशनमध्ये गव्हाचे पीठ उपलब्ध करून द्यावे. साखरेचे भाव जास्त असल्याने साखर कमी दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

तसेच पोलिस प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठिकठिकाणी बॅरेकेड्स लावले आहे. त्यामुळे साधू-महंतांना वाहनांवरून प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्वरित आखाड्याच्या महंतांसाठी वाहन पास उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तीनही आखाडा प्रमुखांनी केली. यावेळी ना. महाजन यांच्या समवेत आमदार बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वादाला ‘बहुमत’ हेच उत्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नवनवीन वादाला तोंड फुटत असून, याचे केंद्रबिंदू आखाडा परिषदेचे अध्यक्षपद असू शकते. या वादांना वेळीच पायबंद घालण्यासाठी बहुमताने अध्यक्षांची निवड होणे अपेक्षित असल्याचे मत षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.

सनातन संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त महंत सागरानंद सरस्वती पंचवटीत आले होते. यावेळी त्यांना साधुग्रामची तयारी आणि सध्या सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता, त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रशासनाने मोठी मेहनत घेतली आहे. अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांना १०० टक्के यश मिळेल, असे नाही. साधू-महंतांनी सुध्दा समाधान मानून पुढे चालले पाहिजे, असे स्वामी सागरानंद सरस्वतींनी स्पष्ट केले. आपण आजच्या घडीला प्रशासनाच्या कामांबाबत समाधानी असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंत एकमेकांवर सातत्याने आरोप करीत असून, त्यामुळे बदनामी होत असल्याबाबत सागरानंद सरस्वतीकडे विचारणा केली असता, त्यांनी अध्यक्षपदाच्या वादाकडे अंगुलीनिर्देश केला. बारा वर्षापूर्वी महंत ग्यानदास यांना अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्षपद बहुमताने देण्यात आले होते. यानंतर, सहा वर्षांनी त्यांनी पद सोडून देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. हरिद्वार कुंभमेळा संपल्यानंतर पद सोडणार, असे ग्यानदास यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मात्र, ते गप्पच बसले. प्रयागला अगदी दोन दिवसांपूर्वी ते दाखल झाले होते. त्यामुळे या वादावर तोडगा निघू शकला नाही. आता तर ते पुन्हा पदावर दावा करीत असून, हे नियमाला धरून नाही. तेरा आखाड्यांपैकी ज्या व्यक्तिला बहुमत मिळते, तो अध्यक्षपदी विराजमान होतो. ग्यानदासांनी आपले बहुमत सिध्द करावे. तसे झाल्यास सर्व वादांना पूर्णविराम मिळेल, असे सागरानंद सरस्वती यांनी नमूद केले.

अध्यक्षपदाचा वाद

सिंहस्थाला सुरुवात झाली असून शाहीपर्वणीचा काळही जवळ आला आहे. मात्र, अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा वाद अजूनही संपलेला नाही. प्रशासन व सरकारही नेमके अध्यक्ष कोण आहेत, याचे स्पष्टीकरण देत नाही. यामुळे सिंहस्थाला दोन अध्यक्ष लाभल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर बनतंय ‘पोलिसग्राम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ काळात कायदा आणि सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी तब्बल चार हजार पोलिस कॉन्स्टेबल्सचा फौजफाटा नाशकात दाखल झाला आहे. साधुग्राम जसे कुंभमय होतेय तसे मोठ्या संख्येने पोलिस दाखल झाल्याने शहरालाही छावणीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे.

पहिली शाहीपर्वणी १८ दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक पर्वणीला सुमारे एक कोटी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पेलण्यासाठी विविध जिल्ह्यातून १२ हजार पोलिसांचा फौजफाटा बोलावण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात चार हजार पोलिस कॉन्स्टेबल्स शहरात दाखल झाल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे आणि राजू भुजबळ यांनी दिली. राज्यातील सर्व प्रशिक्षण केंद्रांमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॉन्स्टेबल्सचा या बंदोबस्तामध्ये समावेश आहे. १२ किंवा १३ ऑगस्टला त्यांचा मेळावा घेऊन त्यांना सिंहस्थाच्या तयारीची माहिती देण्यात येणार आहे.

शहरात दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये १२८२ महिला आणि १३१८ पुरूष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महिला कर्मचारी नागपूर आणि खंडाळा प्रशिक्षण केंद्रातून येणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची ज्या मार्गावर नेमणूक असेल त्याच मार्गावरील मंगल कार्यालये, लॉन्समध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तेथेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. २५ सप्टेंबरपर्यंत हे कर्मचारी नाशिकमध्येच वास्तव्यास असणार आहेत. याखेरीज ३५० वाहनांचा फौजफाटाही शहरात दाखल झाला आहे. १५ ऑगस्टला उर्वरीत सर्व पोलिस कर्मचारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. एसआरपीएफच्या तीन प्लाटून शहरात दाखल झाल्या असून, आणखी सहा प्लाटून देखील लवकरच दाखल होणार असल्याची माहिती गोरे यांनी दिली. तीन हजार होमगार्डसदेखील मदतीला असतील.

लवकरच रंगीत तालीम

बंदोबस्तासाठी राज्यातील सर्व पोलिस प्रशिक्षण केंद्रांमधून नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलिसांना बोलावण्यात आले आहे. शहराची, शाहीमार्ग तसेच भाविक मार्गांची ओळख व्हावी यासाठी रंगीत तालीम दिली जाणार आहे. कोणत्या ठिकाणी थांबायचे आणि तेथे कोणते कर्तव्य पार पाडायचे याची माहिती या रंगीत तालमीत देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडावरील बॅरिकेडिंगचा भाविकांना त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने रामकुंड परिसरात येणाऱ्या रस्त्यावर जागोजागी लावलेल्या बॅरेकेडिंगमुळे स्थानिक भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कर्मचारी स्थानिक नागरिकांची वाहने जाऊ देण्यास मज्जाव करीत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पोलिस प्रशासनाकडून होणारी अरेरावीची भाषा व नागरिकांना होणारा त्रास यावर चर्चा करण्यासाठी चतु:संप्रदाय आखाड्यात स्थानिक नागरिकांची नुकतीच बैठकही झाली. त्यावेळी बैठकीत पोलिस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु, त्यासंदर्भात पुढे काहीही कार्यवाही झालेली नाही, असे परिसरातील नागरिकांडून सांगण्यात आले. पोलिस प्रशासनाने मालेगाव स्टॅण्ड, गंगाघाट परिसर, मालवीय चौक तसेच अन्य भागात बॅरेकेडिंग उभारून तटबंद ठेवल्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. पोलिसांना ओळखपत्र दाखवूनही घराकडे दुचाकी वाहने नेऊ दिली जात नाही. स्थानिक नागरिकांना दैनंदिन ये-जा करण्यासाठी प्रशासनाने ओळखपत्र द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा शाळांमध्येही सेमी इंग्रजीचे शिक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासह शाळांमधील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी सेमी इंग्रजीचा पॅटर्न सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण समितीचे नूतन सभापती संजय चव्हाण यांनी दिली आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक आणि पालकांचेही प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परिक्षांची ओढ बालपणापासून लागावी यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा वर्ग घेणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

शिक्षण समितीच्या सभापतीपदाचा पदभार घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी शिक्षण मंडळाचा कारभार सुधारण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. महापालिकेच्या शाळांमधले मुले ही खाजगी शाळांमध्ये जातात. त्यामुळे गळती होत असून विद्यार्थ्यांचे प्रमाण घटत आहे.त्यामुळे आता या शाळांमध्येच सेमी इंग्रजीचा पॅटर्न राबविण्याचा विचार सुरू आहे. पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण खाजगी शाळांप्रमाणेच दिल्यास गळती रोखली जाईल. सोबतच त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि पालकांचेही प्रबोधन करण्याचा आमचा मानस आहे. शिक्षकांच्या मदतीने अधिकाधिक विद्यार्थी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतील यासाठी प्रयत्न केले जातील. शाळांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील. महापालिकेच्या शाळांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

सर्व खरेदी ऑनलाइन

शिक्षण विभागाच्या बजेटमध्ये तातडीने गणवेशासाठी तरतूद करणार असून समितीच्या सर्व खरेदी आता ऑनलाइन पद्धतीनेच निविदा मागवून करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. खाजगी संस्थाच्या मदतीने महापालिकेच्या शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करणार आहे. शिक्षक संघटनांचे राजकारण कमी करून जिथे आवश्यक असेल तिथे शासनाच्या नियमाप्रमाणे बदल्या करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजारोहणाला व्हीआयपी; शाहीस्नानाला मात्र बंदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण सोहळा वगळता सर्व पर्वण्यांमध्ये कोणीही व्हीआयपी येणार नसल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ध्वजारोहण सोहळ्याला व्हीआयपी येणार असले तरी त्यांना सरकारने नव्हे तर आखाडा परिषदेने आमंत्रित केले आहे. शाहीस्नान व सर्व पर्वण्यामंध्ये व्हीआयपी म्हणून येण्यास बंदी राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांना महाजनांनी ध्वजारोहण सोहळ्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह पाच मंत्री येणार असल्याचे सांगितले. परंतु, या मान्यवरांना जिल्हा प्रशासनाने नव्हे तर आखाडा परिषदेने आमंत्रित केल्याचा दावाही त्यांनी केला. ध्वजारोहणाला गर्दी राहणार नसल्याने या नेत्यांना आमंत्रित केले. मात्र, सर्व पर्वण्यामध्ये कोणालाही व्हीआयपी म्हणून येता येणार नाही. व्हीआयपीमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण पडतो. ज्याला कोणाला यायचे असेल त्यांनी व्हीआयपीचा बडेजाव न घेताच यावे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसरा महाजच्या नगरसेवकावर हल्ला

$
0
0

मालेगाव : शहरातील तिसरा महाजचे नगरसेवक मोहम्मद अमीन मोहम्मद फारूक यांच्यावर धारधार शास्त्र्याने हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

मोहम्मद अमीन शहरातील जाफरनगर भागातील नगरसेवक असून, ते तिसरा महाजकडून निवडून आले आहेत. एका जमीन व्यवहार प्रकरणात मध्यस्थी म्हणून त्यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. आझादनगर पोल‌िस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॉक्सकॉनच्या गुंतवणुकीसाठी सरकारला ‘निमा’चे साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेम‌ीकंडक्टर मॅन्युफॅक्चरींग उद्योगातील अग्रगण्य फॉक्सकॉन व जनरल मोटर्स या बड्या उद्योगांना नाशिकमधील गुंतवणुकीस प्रोत्साहन द्यावे, ही मागणी घेऊन आज 'निमा'चे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तैवानमधील फॉक्सकॉनच्या माध्यमातून महाराष्ट्रात आगामी पाच वर्षांमध्ये ५ बिलीयन डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे. राज्यात होणाऱ्या उद्योगातील गुंतवणुकीपासून नाशिकला नेहमीच उपेक्षित ठेवले जात असल्याचे गाऱ्हाणेही यावेळी मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांच्या कानावर घालण्यात येणार आहे.

जनरल मोटर्स व फॉक्सकॉन या प्रकल्पांतर्गत फक्त पुणे-मुंबईचा पट्टा हाच गुंतवणुकीसाठी देण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फॉक्सकॉनचे अध्यक्ष टेरी गोऊ यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईत गुंतवणुकीबाबत एमओयू करार करण्यात आला. आजवर नाशिकला या बड्या गुंतवणुकीपासून दरवेळी दूर ठेवण्यात आले आहे. नाशिकमध्ये मुबलक प्रमाणात मनुष्यबळ आणि पुरेशी धरणे यासारख्या मुलभूत सुविधा असतानाही राजकीय भूमिकांमुळे उपेक्षितपणाच वाट्याला येतो. फॉक्सकॉनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सिन्नर परिसरातील सेझसाठी आरक्षित जमिनीपैकी १५०० एकर जमिनही उपलब्ध करून देणे सरकारला शक्य आहे.

या कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीचे केंद्र म्हणून नाशिकचा विचार करण्यात यावा. जमीन, पाणी, कुशल मनुष्यबळ, इतर शहरांशी असलेल्या दळणवळणाच्या सुविधांशिवाय अलीकडेच एमआयडीसीने अधिग्रहीत केलेल्या जमिनी या अनुकूल बाबींचा विचार करता नाशिक हे गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल स्थान आहे. या सारख्या गुंतवणुकीमुळे शहराच्या औद्योगिक विकासास निश्चित गती मिळेल अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निमाच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. याप्रसंगी नाशिकचे सर्व आमदार व खासदार भेटी दरम्यान चर्चेत सहभागी होणार आहेत. निमाच्या वतीने निमा अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मनिष कोठारी, निमा आयात निर्यात समितीचे अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर, मनिष रावल, ज्ञानेश्वर गोपाळे आदी उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्र्यांचीही घेतली भेट

यापूर्वीही नाशिककला कायम विकास आणि गुंतवणुकीपासून डावलत असल्याची भावना उद्योजकांमध्ये आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्र‌ियल कॉरिडॉर (डीएमआयसी) सारख्या प्रकल्पातूनही नाशिकला दूर ठेवण्यात आले. बोईंग मेन्टेनन्स, रिपेअर प्रोजेक्टही नागपूर येथे हलविण्यात आला, व्होल्क वॅगनचा प्रकल्पही राजकीय दबावापोटी नाशिऐवजी पुण्यास हलविण्यात आला. यासारकी उदाहरणे सातत्याने घडत असल्याने औद्योगिक विकास प्रक्रियेत नाशिक पिछाडीवर राहते आहे. या शहराच्या औद्योगिक विकासात मोलाची भर घालण्यासाठी सद्यस्थितीत जनरल मोटर्स आणि फॉक्सकॉन या दोन्हीही महत्त्वकांक्षी प्रकल्पांना नाशिकमध्ये गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही सोमवारच्या भेटीत निमाच्या वतीने करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेस्थानकाचा श्वास मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

अनेक वर्षांपासून कळीचा ठरलेला रेल्वे आणि बसस्थानक आवारातील अतिक्रमणाचा प्रश्न सोमवारी निकाली निघाला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जुना जकात नाका, महापालिकेचे सोळा गाळे, दहा अनधिकृत टपऱ्या हटवल्या. त्यामुळे रेल्वेस्थानक आणि बसस्थानकाने प्रथमच मोकळा श्वास घेतला. मोहिमेबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाडेकर, शहर अभियंता सुनील खुने, कार्यकारी अभियंता प्रमोद गायकवाड, उपअभियंता शैलैश साळी, विभागीय अधिकारी कुसूम ठाकरे, सात पोलिस अधिकारी, पन्नास पोलिस तसेच महापालिकेचे शंभर कर्मचारी असा मोठा फौजफाटा सोमवारी सकाळीच रेल्वेस्टेशन परिसरात दाखल झाला. चार जेसीबी, एक पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने सकाळी नऊला अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली.

गंभीर समस्या सुटली

बसस्थानकातून बाहेर पडताना एसटीचालकांना अतिक्रमणाचा मोठा त्रास होत असे. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनाही याचा त्रास होत होता. अतिक्रमणाबरोबरच दोन्ही स्थानकांना रिक्षा, टॅक्सीचालकांचा वेढा पडला आहे. कुंभमेळा काळात याचा मोठा अडथळा होणार असल्याने प्रशासनाने ठाम निश्चयाने अतिक्रमणे हटवली. आता परिसरात गर्दीचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

आज निवेदन देणार

पावसाळ्यात अतिक्रमणे हटवू नये, असा नियम आहे. व्यावसायिकांचे पुनर्वसन केल्यानंतरच अतिक्रमण हटवायला हवे होते. याप्रश्नी उद्या महसूल आयुक्तांना निवेदन देणार आहे, अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकनचे नेते शशी उन्हवणे यांनी नाशिकरोड हॉकर्स समितीच्या वतीने दिली. येथे चाळीस वर्षांपासून चिवडा, बेदाणा, फळ, पुस्तके आदी व्यावसायिकांची दुकाने होती. त्यांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी एक दिवस अगोदरच आपले सर्व साहित्य हलविले. तासाभरात मोहीम संपली. अतिक्रमण हटविले जात असताना व्यावसायिकांना गहिवरून आले होते.

रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविल्यामुळे कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे जाणार आहे. अतिक्रमण हटविल्या जागी उद्यापासून सिमेंट काँक्रिटकरण केले जाणार असून, परिसर स्वच्छ ठेवण्यात येणार आहे.

- नीलेश साळी, महापालिका उपअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिगर्दी भाविकांसाठी जीवघेणीच!

$
0
0

१३ वर्षांत ३ हजार दुर्घटना; २२४३ भाविकांचा मृत्यू

अरविंद जाधव, नाशिक

मोठ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी जमा होणारी भाविकांची गर्दी त्यांच्याच जीवावर उलटण्याचे प्रकार देशभरात वाढत आहेत. २००१ ते २०१३ या कालावधीत देशभरात जवळपास तीन हजारांवर चेंगरचेंगरीच्या घटना घडल्या असून, यात २ हजार २४३ भाविकांचा मृत्यू झाल्याची नोंद नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे आहे. चेंगराचेंगरीच्या घटनांमध्ये आंध प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो.

कुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून वारंवार स्पष्ट करण्यात येते आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनाने गती पकडल्यापासून राजमुंद्री (आंध्र प्रदेश), जगन्नाथपुरी पाठोपाठ झारखंडमध्ये भाविकांना प्राणास मुकावे लागले. या घटनांचा दबाव प्रशासनावर असून, सूक्ष्म नियोजनाचा प्रशासनाला सातत्याने फेरआढावा घ्यावा लागतो आहे.

२००३ मध्ये कुंभमेळ्यात सरदार चौक येथील उतारावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत २९ भाविकांना प्राणास मुकावे लागले होते. तर, २००५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मांढरा देवी येथे ३०० पेक्षा जास्त भाविक आपल्या प्राणास मुकले होते. आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील घटनेत २७ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. अशा दुघर्टनांमुळे गर्दी नियोजनाचे महत्त्व अधोरेखित होते. एखाद्या व्यक्तीचे गर्दीमध्ये पडणे, मोठ्या आपत्तीस निमंत्रण देऊ शकते. देशात २००१ ते २०१३ या कालावधीत २ हजार ९८७ चेंगराचेंगरीच्या घटना घडल्यात. यात २ हजार २४३ भाविकांना आपल्या प्राणास मुकावे लागल्याची नोंद आहे. उपरोक्त कालावधीत आंध्र प्रदेशात सर्वाधिक ३५५ तर खालोखाल महाराष्ट्रात ३५२ भाविक चेंगराचेंगरीत सापडले.

सूक्ष्म नियोजनावर भर

देशातील प्रमुख धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांचा व तेथील दुर्घटनांचा स्थानिक प्रशासन अभ्यास करीत आहेत. प्रशासनाने एक पथक वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन गर्दी नियोजनाचा अभ्यास करीत आहे. 'होल्ड अॅण्ड रिलीज' सारख्या उपायांचा सूक्ष्म अभ्यास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेच्या ठेक्याला पुन्हा स्थगिती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममधील साडेपाच कोटीच्या स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद पुन्हा चिघळला असून, क्रिस्टल कंपनीला काम देण्याच्या स्थायी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने पुन्हा स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा ही स्थगिती दिली असून, स्थायीवर कोरडे ओढल्याचा दावा वॉटर ग्रेसचे संचालक चेतन बोरा यांनी केला आहे. महापालिकेला येत्या सोमवारी लेखी म्हणणे सादर करण्याचे न्यायालयाने सांगितल्याने स्थायी समिती तोंडघशी पडण्याची शक्यता आहे.

आखाड्यांचा ध्वजारोहण सोहळा तोंडावर आला असतानाही स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद मिटत नसल्याचे चित्र आहे. वॉटर ग्रेसला डावलून क्रिस्टल कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्याच्या स्थायी समितीच्या निर्णयाला दुसऱ्यांदा हायकोर्टाच्या न्या. अभय ओक यांच्या पिठाने सोमवारी स्थगिती दिली आहे. गेल्या गुरूवारी स्थायीने दुसऱ्या क्रमांकाच्या क्रिस्टलला देण्याचा ठराव केला होता. त्याला वॉटर ग्रेसन पुन्हा आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने हा निर्णय घेतल्याने स्थायीला पुन्हा चपराक बसली आहे. यापूर्वीही असाच प्रकार होऊनही स्थायीने वॉटर ग्रेस डावलून क्रिस्टलला देण्याच ठराव केला होता. त्यावेळीही न्यायालयाने हा निर्णय बेकायदा ठरवत नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. तरीही स्थायीने पुन्हा क्रिस्टललाच ठेका दिला.

वॉटर ग्रेसच्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने स्थायी समितीवर ताशेरे ओढल्याचा दावा बोरा यांनी केला आहे. आपल्या अधिकारात काहीही निर्णय घेऊ नका असे कोर्टाने सुनावले असून, सोमवारपर्यंत प्रशासनाने याबाबत लेखी म्हणणे सादर करावे असे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती बोरा यांनी दिली. सिंहस्थाची घाई दाखवण्याऱ्या पालिकेच्या वक‌िलांनाही न्यायालयाने फटकारले आहे.

दरम्यान, स्थायी समितीने क्रिस्टलला ठेका तातडीने देण्याचा आदेश देऊन पाच दिवस उलटूनही अद्याप ठेका दिल्या नसल्यावरून सभापती शिवाजी चुंभळे यांनी प्रशासनाला विचारणा केली. त्याला प्रशासनानेही तातडीने उत्तर देत, काही गोष्टींचा खुलासा करण्याचे आवाहन करत समितीलाच कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले आहे. वॉटर ग्रेसच्या इतर ठरावांचे काय करायचे अशी विचारणा करत, वकील बदलण्यांसंदर्भातील उल्लेख ठरावात आला नसल्याचे म्हटले आहे. या पत्रात सदस्यांचा क्रिस्टलला ठेका देण्यासंदर्भात फार मोठा पाठपुरावा सुरू असल्याचा दावा करत, पत्रात सदस्यांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. ठरावाची कारवाई संदर्भात समितीलाच मार्गदर्शन करण्याचे सांगण्यात आल्याने एकमेकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासनाने वॉटर ग्रेस संदर्भात दिलेल्या पत्राच्या आधारावरच आम्ही क्रिस्टल कंपनीला काम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आमची काहीच चूक नाही. आम्ही निर्णय घेऊन पाच दिवस झाले; परंतू त्यावर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आयुक्तांनीच काय तो निर्णय घ्यावा.

शिवाजी चुंभळे, सभापती, स्थायी समिती

राष्ट्रवादीचा आटापिटा का?

शिवसेनेने या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस भूमिकेवर आक्षेप घेतला असून, स्थायी समिती बेकायदेशीर काम करत असल्याचा आरोप गटनेता अजय बोरस्ते यांनी केला आहे. कायद्यात दुसऱ्या क्रमांकाच्या ठेकेदाराला असा ठेका देता येत नसतानाही ठेकेदार केवळ राष्ट्रवादीचा असल्याने हा आटापिटा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सिंहस्थात स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या विषयावरून शहराला पूर्ण वेठीला धरले जात असताना सत्ताधारी मनसे मात्र राष्ट्रवादीसमोर नतमस्तक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्थायीचा कारभारच बेकायदेशीर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोनाफाईडसाठी मोजा पैसे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

विद्यार्थ्यांसाठी आधार नोंदणी अत्यावश्यक केल्याने विद्यार्थ्यांसह पालकही हैराण झाले आहेत. आधार नोंदणीसाठी शाळेकडून लागणाऱ्या बोनाफाईड सर्टिफिकेट घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी काही शाळांकडून केली जात आहे. या प्रश्नी जिल्हा प्रशासन आणि ‌शिक्षण विभागाने लक्ष घालण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने सर्वच शालेय विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे शाळांना आदेश दिले आहेत. शिक्षण विभागाने केलेल्या आदेशावरून शाळांनी देखील विद्यार्थ्यांना आधार नोंदणीचा नंबर देण्यासाठी तगादा लावला आहे. परंतु, शहरातील बहुतांश आधार नोंदणीचे केंद्र बंद झाल्याने सुरू असलेल्या मोजक्याच केंद्रांवर पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यामुळे अनेकदा सुरू असलेल्या केंद्रांवर देखील वाद होत आहेत. या वादांमुळे काही केंद्र बंद करावे लागत आहेत. याबाबत पालकांनी शाळांनीच आधार नोंदणीचे केंद्र सुरू करू नये, अशा सूचना मांडल्या.

जिल्हा प्रशासनानेही शाळांमध्येच आधार नोंदणीचे सुरू करण्याचे आदेश दिले. परंतु, अनेक शाळांनी आधार नोंदणी सुरू करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत आधार नोंदणी करतांना विद्यार्थ्यांकरिता आवश्यक असलेल्या बोनाफाईड सर्टिफिकेटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसै मागितले जात आहेत. दुसरीकडे शिक्षण विभागानेच सर्व शाळांना आधार नोंदणी करतांना विद्यार्थ्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट शाळेनेच उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत. मात्र, काही शाळा पालक विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा धडाका लावला आहे. बोनाफाईड सर्टिफिकेश तत्काळ मिळावे यासाठी पालकांना पैसे मोजावे लागत आहे.

विद्यार्थ्यांना आधार नोंदणीची सोय शाळेतच करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले होते. आधार नोंदणीबाबत सर्व शाळांना महापालिकेने आदेश दिले आहेत. यात बोनाफाईड सर्टिफिकेट आधार नोंदणी करतांना शाळेनेच उपलब्ध करून दिले पाहिजे. बोनाफाईड सर्टिफिकेटसाठी कुणीही पैसै घेत असल्यास त्या शाळेवर कारवाई केली जाईल.

- उमेश डोंगरे, प्रशासन अधिकारी महापालीका शिक्षण मंडळ

आधार नोंदणी शाळेने सक्तीची केल्याने पालकांची वणवण सुरूच आहे. अशातच काही शाळा मुलांना रोजच आधार नोंदणी क्रमांक द्या, असा तकादा लावत असतात. यामुळे पालक बोनाफाईड सर्टिफिकेटची मागणी शाळेकडे केल्यावर पैशांची मागणी केली जाते. यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

- दिग्विजय ठाकरे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाडीमुळे शाहीमार्गात आडकाठी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याची पहिली शाही पर्वणी अगदी १९ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, प्रशासनाने अजूनही वाघाडी नाल्याची अद्याप साफई केली नसून, मध्यम स्वरूपाचा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास शाही मार्गात मोठी आडकाठी निर्माण होऊ शकते.

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले. मात्र, शाहीमार्गात अडथळा ठरू शकणाऱ्या वाघाडीच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. अतिक्रमणांमुळे वाघाडीचा मार्गच बदलण्यात आला असून, गोदावरीत जाणाऱ्या वाघाडीचा शेवटचा भाग अत्यंत निमुळता करण्यात आला आहे. त्यामुळे मध्यम किंवा जास्त पाऊस झाल्यास वाघाडातील पाणी थेट पेशवे कुंडाकडे वाहू लागते. येथेच म्हणजे गाडगे महाराज पुलाखाली खड्डे खोदून शाही मिरवणुकीचा मार्ग तयार केला जात आहे. याठिकाणी वाघाडीचे पाणी भरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच पावसाचा जोर वाढल्यास वाघाडीतील पाणी तीव्रगतीने गोदापात्रात झेपावते. अशा वेळी मिरवणुकीला मोठी बाधा निर्माण होऊ शकते, असा दावा या परिसरातील नंदकुमार मुठे यांनी केला.

वाघाडीकडे दुर्लक्ष त्रासदायक ठरू शकते, याची कल्पना आली. विजय साखंला आणि विजय अग्रवाल या आर्किटेक्टला भेटून यावर काय मार्ग काढता येऊ शकतो, याची विचारणा केली. त्यांनी याबाबत काम करण्यास सहमती दर्शविल्याने वाघाडीची पाहणी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी दिली. आर्किटेक्टकडून येणाऱ्या अहवालाची माहिती महापालिका आयुक्तांना देण्यात येईल. कुंभमेळ्यात स्थानिक म्हणून शक्य ती मदत करण्याचा परिसरातील नागरिकांचा प्रयत्न असून, त्यातीलच हा भाग असल्याचा दावा जानी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी दीड हजार जवान

$
0
0

नाशिकरोड : रेल्वेचे अतिरिक्त मुख्य सुरक्षा आयुक्त प्रणवकुमार यांनी कुंभमेळ्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांची नुकतीच पाहणी केली. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त

राजेंद्र रुपनवार, आलोक बोहरा त्यांच्या समवेत होते. स्थानक प्रमुख एम. बी. सक्सेना यांच्याशी त्यांनी चर्चा केली. कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त दीड हजार जवान व पोलिस रेल्वे स्टेशन परिसरात तैनात असणार आहेत. त्यांची व्यवस्था, भाविकांची सुरक्षा, गर्दीचे व्यवस्थापन आदींवर सखोल चर्चा झाली. मालधक्का, पूर्व भागात नव्याने केलेल्या प्लॅटफार्म क्रमांक चारवर येणाऱ्या भाविकांसाठीची शेड, सुभाषरोड भागातील नवीन मार्ग, पादचारी मार्ग आदींची या पथकाने पाहणी केली. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी. डी. इप्पर, शकील खान आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांयुक्त तंबूचा भावनगर ते साधुग्राम प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैराग्यपण जपलेले साधू अशी ओळख आता नामशेष झाली असून, कालौघात साधू-महंत सुध्दा हायटेक झाले आहेत. 'मॅनेजमेंट'चा चांगला धडा साधू-महंत सर्वांना सहज देतात. गुजरातमधील सूरत येथील शंकादिक जसलोक शिबिर या संस्थेने सुध्दा साधुग्राममध्ये एक अत्याधुनिक 'तंबू' तयार केला आहे. पंधरा लाख रुपये खर्चून तयार झालेला साठा थेट भावनगर येथून साधुग्राममध्ये आणला आहे.

साधुग्राममध्ये आखाडे, खालसे, धार्मिक संस्था तसेच जगदगुरूमार्फत वेगवेगळ्या कलाकृती साकारल्या जात आहेत. फुले, धार्मिक चित्रे अशा विविध कलाकृती आकारास येत आहेत. अर्थात, यासाठीचा खर्च संबंधित खालशांना तसेच धार्मिक संस्थांना करावा लागतो. यात सूरत येथील शंकादिक जसलोक शिबिर या संस्थेचाही सहभाग आहे. एखाद्या व्यावसायिक आस्थापानाला शोभेल, अशी व्यवस्था याठिकाणी पाहण्यास मिळते. याबाबत माहिती देताना संस्थेचे श्री महंत महामंडलेश्वर आनंददासजी महाराज यांनी सांगितले की, जागेच्या उपलब्धतेनुसार भावनगर येथेच सदर साहित्याची निर्मिती करण्यात आली. यासाठी तब्बल १५ लाख रुपये खर्च आला. पावसाचे दिवस लक्षात घेऊन किती रूम्स हवे, स्वयंपाकगृहासाठी किती जागा लागेल, त्यानुसार अगदी बारकाईने पत्र्याचे शेडस तयार करण्यात आले. भावनगरमध्ये तयार झालेला सांगडा वाहनाने साधुग्राममध्ये आला. यानंतर भक्तांनी एक पैसाही न घेता तो उभा केला. याठिकाणी दररोज एक हजार भक्त अन्नक्षेत्रात येणार असून, त्यांच्या सुविधांचा विचार केला असल्याचे आनंददासजी महाराजांनी स्पष्ट केले. प्रशासनाने पुरविलेल्या सुविधा उत्तम असून, स्वयंपाकगृहाचा वेगळा विचार होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. पावसाचे प्रमाण वाढल्यास स्वयंपाकगृहात पाणी जाण्याची ​भीती आहे. आम्ही स्थानिक नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्ट मिळवण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे प्रशासनाने शक्य त्या सुविधा पुरविताना संबंधितांशी चर्चा करणे अपेक्षित असल्याचे मत आनंददासजी महाराजांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठेक्याचा लागेना निकाल!

$
0
0

स्वच्छता ठेक्याच्या निविदा प्रक्रियेवरही परिणाम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममधील स्वच्छतेच्या ठेक्यावरून स्थायी समिती आणि प्रशासनात वाद सुरू असताना आता आखाड्यांच्या ध्वजारोहणासह व पर्वणीची तारीख जवळ येऊन ठेपल्याने त्याचा निविदा प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयात लवकर निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याने उर्वरित ठेकेदारांकडूनच काम करून घेण्याचा प्रशासनानाचा कल आहे. त्यामुळे आता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ होण्याची शक्यता आहे.

साधुग्राममधील स्वच्छतेच्या साडेपाच कोटीवरून ऐन सिंहस्थात वादविवाद आणि संघर्ष सुरू आहे. वॉटर ग्रेसला डावलून क्रिस्टल कंपनीला ठेका देण्याचा स्थायी समितीचा निर्णय उच्च न्यायालयाने स्थगित केला आहे. त्यामुळे प्रशासन विरुद्ध स्थायी समिती असा थेट संघर्ष उभा राहिला आहे. वॉटर ग्रेसबाबत प्रशासन स्थायी समिताला दिशाभूल करीत असल्याचा सदस्यांचा आरोप आहे. एकीकडे वॉटर ग्रेस काळ्या यादीत असल्याचे सांगून दुसरीकडे संबंधित कंपनीला तातडीने कागदपत्र प्रशासनाकडून उपलब्ध केले जात आहेत. त्यामुळे प्रशासनाचा कारभारच संशयास्पद असल्याचा आरोप सदस्य प्रा. कुणाल वाघ यांनी केला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी येत्या १७ तारखेला होणार आहे. ध्वजारोहणाची तारीख १९ आहे, तर २९ ऑगस्टला पर्वणी आहे. त्यामुळे पंधरा दिवसांचाही अवधी नाही. न्यायालयीन वादामुळे हा निर्णय कधी लागतो याबाबत प्रशासनच साशंक आहे. त्यामुळे अन्य ठेकेदाराकडूनच ही कामे पूर्ण करून घेतली जाण्याची शक्यता आहे. आता निविदा काढायचा अ‍वधीही कमी झाला आहे. दुसरीकडे सिंहस्थ निधीची कामे आऊट सोर्सिंगद्वारेच करण्याचे फर्मान आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून ही कामे केली जाण्याची शक्यता कमी आहे.

वॉटर ग्रेसचे करारनामे द्या!

थेट न्यायालयात स्थायी समितीला आव्हान देणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीविरोधात स्थायी समितीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. आता काळ्या यादीच्या पत्रापाठोपाठ वॉटर ग्रेस कंपनीला दिलेल्या कामांची व त्यांच्यासोबत प्रशासनाने केलेल्या करारनाम्यांची माहिती स्थायी समितीने प्रशासनाकडून मागविण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात बुधवारी आयुक्तांना पत्र दिले जाणार आहे. वॉटर ग्रेस कंपनीला दिलेले ठेकेच रद्द करण्याचा स्थायी समितीचा पवित्रा असल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीस्नान क्रम निश्चित

$
0
0

पहिला मान श्री पंचदशनाम जुना आखाड्याला

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमात दहाही आखाड्यांचे प्रतिनिधींसोबत जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन शाहीस्नानाच्या क्रम आणि वेळेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.

षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, महामंत्री हरिगिरी महाराज आणि सर्व दहा आखाड्यांचे प्रतिनिधी, साधू-महंत यांच्या समवेत जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, मेळाधिकारी गावडे, महेश पाटील, उदय किसवे, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे तसेच मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आणि अन्य प्रशासकीय अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

प्रथम शाही पर्वणी (२९ ऑगस्ट) आणि तिसरी शाही पर्वणी (२५ सप्टेंबर २०१५) यावेळी पहिली मिरवणूक श्री पंचदशनाम जुना आखाडा, श्री पंचदशनाम आवाहन आखाडा, श्री पंचदशनाम आवाहन आखाडा अशी असेल. दुसरी मिरवणूक तपोनिधी श्री निरंजनी आखाडा व श्री आनंद आखाडा अशी असेल. तिसरी मिरवणूक श्री शंभू पंचायती अटल आखाडा व श्री शंभू पंचायती महानिर्वाणी आखाडा अशी असेल. या मिरवणुका कुशावर्तावर स्नान करून गेल्यानंतर वैष्णव आखाड्यांसाठी दोन तास राखीव असतात. त्यानंतर चौथी मिरवणूक श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, पाचवी मिरवणूक श्री पंचायती नया उदासीन आखाडा, सहावी मिरवणूक श्री पंचायती निर्मल आखाडा असा क्रम असेल. हा क्रम गत सिंहस्थातात निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये दुसरी शाहीपर्वणी मुख्य शाही स्नान या दिवशी पहिली मिरवणूक तपोनिधी श्री निरंजनी व तपोनिधी आखाडा श्री आनंद आखाडा यांची असेल आणि दुसरी मिरवणुक श्री पंचदशनाम जुना आखाडा,श्री पंचदशनाम आवाहन आखाडा,श्री पंचदशनाम आवाहन आखाडा अशी असेल व त्यानंतर निघणारी तिसरी मिरवणूक व पुढील सर्व सहाव्या मिरवणुकांपर्यंत सर्व मिरवणुकांचा क्रम वरील प्रमाणे असेल.

साधरणत: पहाटे चार वाजता पहिल्या मिरवणुकीतील साधू आखाड्यांतून निघतील व ठरलेल्या ठिकाणी जमा होतील आणि कुशावर्तावर ठरलेल्या वेळेत पोहचतील. स्नानकरून ते मंदिरात दर्शनासाठी जातील व पुन्हा आखाड्यात परत जातील. सर्वांत शेवटची मिरवणूक १२ वाजे पर्यंत आखाड्यात पोहचली म्हणजे भाविकांना स्नानासाठी वेळ देता येईल, अशी आपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

गॅजेटमध्ये नोंद

२००३ पूर्वी पहिली मिरवणूक पाच आखाड्यांची व दुसरी मिरवणूक दोन आखाड्यांची अशी होती. मात्र, वाढती गर्दी आणि सुनियोजनासाठी तीन, दोन आणि दोन अशी योजना करण्यात आली. त्यामध्ये तीन आखाड्यांना दोन शाहीस्नानात पहिला सन्मान देण्यात आला व दोन आखाड्यांना मधल्या म्हणजे दुसऱ्या शाहीस्नानात त्या दोन आखाड्यांना पहिला सन्मान दिला आहे. सर्वानुमते हे निश्चित करण्यात आले व शासन गॅजेट नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्वासने घेऊन ‘निमा’ माघारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हजारो कोटींच्या गुंतवणुकीतून उद्योग वर्तुळाची रयाच बदलून टाकणारे 'फॉक्सकॉन' आणि 'जनरल मोटर्स' हे महत्वाकांक्षी प्रकल्प अखेर पुण्यातच राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या गुंतवणुकीसाठी कंपनीने पुण्यालाच प्राधान्य दिल्याने भविष्यातील नव्या प्रकल्पांसाठी नाशिकचा विचार नक्कीच होईल, या आश्वासनावर 'निमा' च्या शिष्टमंडळाला मंगळवारी माघारी परतावे लागले.

निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, हर्षद ब्राह्मणकर, मनिश रावल, संदीप भदाणे, आयमाचे सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे शिष्टमंडळात सहभागी झाले होते. फॉक्सकॉनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी एअर कॉर्गोची नितांत आवश्यकता होती. कंपनीने नाशिकसह औरंगाबाद आणि नागपूर या शहरांच्या तुलनेत पुण्याचीच अखेर निवड केली. मोठ्या उद्योगातील गुंतवणुकीसंदर्भात नाशिकला कायमच डावलण्यात येत आल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. राहुल ढिकलेंना बढती

$
0
0

मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले यांना पक्षातर्फे थेट प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. माजी आमदार वसंत गितेंनी पक्ष सोडल्यानंतर राज्य पातळीवरील एकही नाशिकच्या नेत्याला वरिष्ठ पातळीवर स्थान नव्हते. ढिकले यांच्या रुपाने प्रथमच नाशिकला प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले आहे. आता शहराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

मनसेतर्फे मुंबईतून पक्षाच्यावतीने राज्यातील नव्या शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात नवीन कार्यकारिणीत नाशिकचे शहराध्यक्ष अॅड. ढिकले यांना थेट प्रदेशाध्यक्षपदासाठी बढती देण्यात आली आहे. नव्या नियुक्तीने नाशिकला थेट प्रथमच प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. माजी आमदार वसंत गिते आणि अतुल चांडक यापूर्वी पक्षाच्या सरचिटणीस पदावर होते. मात्र, गितेंनी पक्ष त्याग केला आहे, तर चांडकही पक्षापासून दूर आहेत. त्यामुळे नाशिक मनसेचा गड असूनही प्रदेश पातळीवर एकही नेता नव्हता. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसेत बदल करण्याचे संकेत राज ठाकरेंनी दिले होते. त्यासंदर्भात नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. मात्र, जिल्हाध्यक्षांची निवड वगळता काही बदल झाले नव्हते.

शहराध्यक्षपदाबाबत उत्सुकता

मुंबई आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पुन्हा फेरबदल करण्यास सुरूवात केली आहे. नाशिकला थेट उपाध्यक्षपद देवून नाशिकचेही वजन वाढविण्यात आले आहे. मात्र, त्याचवेळी माजी आमदार नितीन भोसलेंना कार्यकारिणीत डावलण्यात आले आहे. तर दुसरीकडे ढिकलेंची बढती झाल्याने शहराध्यक्षपदावर वर्णी लागण्यासाठी आता इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेची निवडणूक बघता नव्या दमाच्या नेत्याकडे हे पद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनेक नावे पक्षासमोर आहेत. मात्र, तूर्तास वाद नको म्हणून ठाकरे यांच्या आगामी दौऱ्यात यावर विचार केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीसाठी आठ नियंत्रण कक्ष

$
0
0

नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये अखंड वीज पुरवठ्यासाठी महावितरणची तयारी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने विविध उपाययोजना केल्या असून आठ ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारले आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध विद्युतीकरणाच्या कामांसाठी सिंहस्थ आराखड्यात सुमारे २४.५६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.नाशिक शहरासाठी साधारणपणे १६६ मेगावॅट तर त्र्यंबकेश्वरसाठी १३.०४ मेगावॅट इतका विद्युतभार अपेक्षित आहे. त्यात साधुग्राम, वाहनतळे, घाट परिसर, पोलिस बराकी, चौक्या, वॉच टॉवर्स आदींचा समावेश आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मिळून सध्याची विजेची क्षमता साडेपाचशे मेगावॅट असून अतिरिक्त क्षमता २५ मेगावॅट इतकी आहे. या दोन्ही ठिकाणी २४७ रोहित्र अस्तित्वात असून नव्याने नाशिकमध्ये ३८ तर त्र्यंबकेश्वर येथे २४ रोहित्र बसविण्यात आले आहेत. आहे. सध्या अस्तित्वातील ४६ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे.

नाशिक शहरात रामकुंड, गणेशवाडी, साधुग्राम येथे उपकेंद्र असून त्याशिवाय तपोवन आणि गणेशवाडी येथे ३३/११ केव्ही, १० एमव्हीए क्षमतेची दोन नवीन उपकेंद्रे कार्यन्वित करण्यात आली आहेत. तपोवनमधील उपकेंद्र हे भविष्यातील शंभर वर्षांचा विचार करून उभारण्यात आले असून याचा कुंभमेळ्यासाठीच कायमस्वरुपी वापर होणार आहे. या भागात पूर्वी गणेशवाडी, मेरी, टाकळी येथून वीजपुरवठा व्हायचा. तपोवन उपकेंद्रामुळे या भागाने विजेचा दाब योग्य राहण्यास मदत होणार आहे.

लक्ष्मीनारायण पूल ते कन्नमवार पूलादरम्यान गोदावरी नदीच्या घाटावर असलेल्या पाच उच्चदाब विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आलेल्या आहेत. साधुग्राम, शाहीमार्ग आदी भागातील गर्दी आणि वर्दळ लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणच्या उच्च व कमी दाब वीजवाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत, असे महावितरणचे अधिक्षक अभियंता आर. डी. चव्हाण यांनी सांगितले. रामकुंड परिसरात मेरी उपकेंद्रातून होणारा विद्युतपुरवठा खंडित झाल्यास गणेशवाडी येथील नवीन उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

येथे आहेत नियंत्रण कक्ष

वीज पुरवठा सुरळीत रहावा व वेळीच तक्रारींचे निरसन व्हावे यासाठी महावितरणतर्फे साधुग्राम सेक्टर १, तपोवन, मेरी, सिव्हिल, गणेशवाडी, टाकळी, त्र्यंबकेश्वर आणि खंबाळे येथे नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात आले आहे. अखंडीत वीज पुरवठ्यासाठी तपोवन आणि गणेशवाडीतील नवनिर्मित उपकेंद्रे कार्यन्वित केले आहे. भूमिगत वाहिन्यांच्या व्यवस्थापनासह वीजपुरवठ्याच्या अचानक उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ उपायांसाठी महावितरण सज्ज झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images