Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दिगंबर आखाड्याला सापत्न वागणूक

$
0
0

रामकिशोरदास महाराजांचा प्रशासनावर आरोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममधील प्रमुख तीन अनी आखाड्यांपैकी एक असलेल्या दिगंबर अनी आखाड्याला प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास महाराज यांनी केला आहे. यावेळी उपस्थित महापालिका अधिकारी आणि ठेकेदारावर महाराजांनी तोंडसुख घेतले.

दिगंबर आखाड्यावर जागा वाटपापासून अन्याय करण्यात आला. दिगंबर आखाड्यातंर्गत सात आखाडे येतात. मात्र, त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करणे अशक्य झाले आहे. झाडांची छाटणी करण्यात आली नाही. ज्या झाडांची छाटणी झाली, त्यांच्या काटेरी फांद्या आखाड्याच्या आवारात पडून आहेत. जागा लेव्हल करून देणार, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, त्याचाही विसर पडल्याने प्रशासन नेमके कोणाच्या दिमतीला गुंतले? असा प्रश्न रामकिशोरदास महाराजांनी ​उपस्थित केला आहे. आखाड्याला सतावणाऱ्या समस्यांचे गऱ्हाणे कोणाकडे मांडावे याबाबत सर्वच महंत आणि साधू अनभिज्ञ आहेत. अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता फिल्डवर असल्याचे सांगितले जाते. फिल्डवर शोधले असता ऑफीसमध्ये गेल्याचे उत्तर मिळते. सर्व व्यवस्था कोलमडून पडली असून, दलालीमुळे साधुग्रामला अवकाळा प्राप्त झाल्याचा आरोप महंत परमात्मा दास यांनी केला. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी होणे क्रमप्राप्त असून, गुरूपौर्णिमेपर्यंत हा सावळा गोंधळ संपण्याची आवश्यकता असल्याचे मत उपस्थित साधू महंतांनी व्यक्त केले.

ठेकेदार-अधिकारी घेतले फैलावर

जुन्या पत्र्यांना सिल्वर कलर देऊन नवे असल्याचे भासवले जात आहे. प्लॉटला नंबर देण्याचे काम रखडले असून, त्याचा फटका साधुमहंतांना बसत असल्याचे यावेळी रामकिशोरदास महाराजांनी स्पष्ट केले. दरम्यान, यावेळी साधुग्रामचे काम पाहणारा ठेकेदार आ​णि महापालिकेचे डेप्युटी इंजिनीअर सचिन जाधव हजर झाले. त्यांना रामकिशोरदास महाराजांनी फैलावर घेत प्रश्नांची सरबत्ती केली. जुनाट पत्रे, प्लॉट नंबरिंग, झाडांची छाटणी, जमीन लेव्हल करणे असे अनेक मुद्दे यावेळी मांडण्यात आले. लवकरच यावर मार्ग काढण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले.

व्हीआयपींचा पाठिंबा नाही

साधुग्राममध्ये प्रमुख तीन आखाडे आहेत. यातील निर्वाणी आखाड्याकडे आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांचे पाठबळ आहे. निर्मोही आखाड्यात व्हीआयपींची लगभग सुरू राहिल. मात्र, दिगंबर आखाड्यात हे चित्र दिसून येणार नाही. प्रशासन यामुळेच दिगंबर आखाड्याकडे दुर्लक्ष करीत असावे, असा खोचक टोला रामकिशोरदास महाराजांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी आत्महत्यांवर ‘आठवडा चिंतन’

$
0
0

केंद्रीय कृषिमंत्र्यांचे अजब तर्कट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकरी आत्महत्येच्या घटनांबाबत गांभीर्याने चिंतन करण्यासाठी आता प्रत्येक आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. जानेवारी ते जुलै २०१५ पर्यंत ३५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

गंगा म्हाळुंगी येथील भाऊराव पालवे या शेतकऱ्याने आत्महत्या करून गुरूवारी जीवनयात्रा संपविली. त्याच्या नातलगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मृतदेह ठेवला. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ १० हजार रूपयांची मदत करून पालवे यांच्या नातलगांची समजूत काढली. या महिन्यात सर्वाधिक १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने जिल्हा प्रशासनही हादरले आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यातच सरकारकडूनही ठोस मदत मिळत नसल्याने शेतकरी मृत्यूला जवळ करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्यांसंदर्भात होणारी आढावा बैठक आता दरमहा घेण्याऐवजी प्रत्येक आठवड्याला घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, आरोग्य विभागाचे अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मृत शेतकरी कर्जबाजारी होता का तसेच त्याच्या आत्महत्येमागील कारणे पडताळून पाहण्यात बराच विलंब होतो. तहसीलदार, संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी यांच्याकडून अहवाल प्राप्त होण्यातही वेळ जातो. परिणामी शेतकऱ्याचे कुटुंब मदतीसाठी पात्र ठरूनही मदत मिळण्यास विलंब होतो. या पार्श्वभूमीवर ‍प्रत्येक आठवड्याला बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर चिंतन करून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

सात महिन्यांतील आत्महत्या

नांदगाव - ६

निफाड - ६

मालेगाव - ६

बागलाण - ५

चांदवड - ३

दिंडोरी - २

नाशिक - २

देवळा - १

इगतपुरी - १

सिन्नर - १

येवला - १

त्र्यंबकेश्वर - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेसाठी एचएएलचा पुढाकार

$
0
0

नाशिक : नाशिकच्या विमानसेवेला चालना मिळावी यासाठी आता हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच विमानसेवा देणाऱ्या ऑपरेटर्सची एचएएलने येत्या १ ऑगस्टला बैठक बोलावली आहे. आगामी काळात ओझरहून विविध विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. नाईट लँडिंग, पार्किंग चार्जेस यासह विविध प्रकारच्या चार्जेसमध्ये एचएएलकडून सूट देण्याचीही घोषणा बैठकीत होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परिणामी, विमान ऑपरेटर्सकडून नाशिकला सेवा देण्याचा गांभिर्याने विचार होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका बदलणार वकील पॅनल?

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विविध खटल्यांमध्ये जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले वकील पॅनल बदलण्याची तयारी महापालिकेने केली आहे. वकिलांवर लाखो रुपये खर्च करूनही बहुसंख्य खटल्यामंध्ये पालिकेच्या विरोधात निकाल जात असल्याचा अनुभव प्रशासनाला आला आहे. त्यामुळे नव्या दमाच्या वकिलांकडे बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

महापालिकेच्या पॅनलवर सर्वोच्च न्यायालयात दोन, उच्च न्यायालयात ८ आणि जिल्हा न्यायालयात ११ वकील कार्यरत आहेत. या सर्वांवर महापालिकेच्या विरोधातील विविध खटल्यांमध्ये बाजू मांडण्याची जबाबदारी आहे. तातडीच्या खटल्यांमध्ये पालिकेची नामुष्की टाळण्याची कामगिरी त्यांना बजवावी लागते. मात्र, अलीकडे महापालिकेच्या विरोधात दाखल असलेल्या फौजदारी व दिवाणी खटल्यामंध्ये बाजू भक्कम असतांनाही पालिका हे खटले हरली आहे. त्यातून पालिकेचे आर्थिक नुकसान तर होतेच, ठेकेदारांनाही भरपाई द्यावी लागते. पेलिकन पार्क, विविध कर संकलन, मिळकत विभागातील खटले, १२७च्या नोटीसा, खत प्रकल्पासह अनेक विषयांमध्ये बाजू भक्कम असतांनाही पालिका खटले हारली आहे. वकीलांवर अतिरिक्त भार असल्याने अनेकदा हे वकील न्यायालयात अनुपस्थित असतात. त्यामुळेही खटले जिंकता येत नाहीत. साधुग्रामच्या स्वच्छता ठेक्यांमध्येही असाच प्रकार घडला आहे. वकिलांच्या अनुपस्थितीमुळे दोनदा निकाल लांबला.वकील पॅनलवर नियुक्ती मिळावी यासाठी विधी विभागाकडे ६५ अर्ज आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा ३० ते ४० रुपये किलो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाल्याने उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट होऊन दर गगनाला भिडू लागले आहेत. विशेष म्हणजे कांद्यावरील निर्यातमूल्य वाढवूनही कांद्याचे दर वाढतच आहेत. नाशिक येथील लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कमाल दर तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचले असून, सरासरी दर २५०० रुपयांपर्यंत आहेत. किरकोळ बाजारात कांदा ३० ते ४० रुपयांनी विकला जात आहे.

लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात तेजी आली असून, चालू हंगामात उन्हाळ कांद्याने प्रथमच अडीच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, लासलगाव, मनमाड, येवला, सटाणा, नांदगाव या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर सरासरी २५०० रुपयांपर्यंत स्थिरावले. जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मंदावल्याचा हा परिणाम आहे. यंदा गारपीटमुळे जिल्ह्यातील जवळपास चौदा हजार हेक्टरवरील कांदा खराब झाला आहे. यामुळे उत्पादनात घट झाली आहे. मार्च-एप्रिल महिन्यात साठवलेला कांदा सध्या बाजारात येत आहे. सध्या कर्नाटकातूनही कांद्याची आवक होत नसल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने १७५ रुपये डॉलरने निर्यातमूल्य वाढवून ४२५ रुपये ‌केले. पावसाने ओढ दिल्याने लाल कांद्याच्या लागवडीवरही परिणाम होणार आहे. यामुळे कांद्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे.

गारपीटमुळे कांदा उत्पादनात घट झाली. यामुळे शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिलमध्ये कांदा विकायला काढला होता. यामुळे तीस टक्केच कांदासाठा शिल्लक आहे. लाल कांद्याचीही लागवड लांबणार आहे. कांद्याचा स्टॉक कमी झाल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. - ‌हिरामण परदेशी, व्यापारी

साठवलेल्या कांद्यापैकी फक्त तीस टक्के कांदा चांगला असून बाकी खराब झाला आहे. आधीच गारपीटमुळे उत्पादन कमी झाले होते. साठवलेल्या कांद्याचे वजनही कमी भरत आहे. यामुळे भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. उगाच भाववाढीचा फुगा फुगवला जात आहे. - रामनाथ सुरासे, शेतकरी

मार्च महिन्यात साठवलेला कांदा सध्या बाजारात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे रिजेक्शन होते. फक्त तीस टक्के साठवलेला माल विकण्याजोगा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात फार काही पडत नाही. ग्राहकांना कांदा स्वस्त दरात पाहिजे. मात्र, शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा दरात फार वाढ झालेली नाही. - नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांना ई-लर्निंगचे धडे

$
0
0

अश्विनी कावळे, नाशिक

ए फॉर अॅपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट.. अल्फाबेट्सची ओळख करून देण्यासाठी लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या खेळणी, प्राणी आदींची मदत घेतली जायची. परंतु, तंत्रज्ञानाचा वाढता वापर व वाढती गरज लक्षात घेत शाळेतील विद्यार्थी ए फॉर अॅरोज्, बी फॉर बटन्स, सी फॉर सीपीयू अशा तांत्रिक गोष्टींच्या माध्यमातून अल्फाबेट्स व त्यानुसार कम्प्युटरची माहिती करून घेत आहेत. हे चित्र आहे के. व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील.

तंत्रज्ञानाकडे झुकणारी शिक्षणपद्धती, प्रत्येक बाबतीत घेतला जाणारा तंत्रज्ञानाचा आधार यामुळे तंत्रज्ञानाचे स्थान सर्वांच्याच जीवनात महत्त्वाचे झाले आहे. परंतु, याच तंत्रज्ञानाचा लाभ आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहू नये व तेदेखील तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावेत, यासाठी या शाळेत 'कम्प्युटर व ई-लर्निंग कक्ष' चालवला जात आहे.

प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनच्या सहकार्याने शाळेत या कक्षाची स्थापना करण्यात आली असून, पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येतो. कम्प्युटरसंबंधित ज्या काही बाबी असतात. त्या विद्यार्थ्यांना अल्फाबेट्सच्या माध्यमातून समजावून सांगण्यासाठी या कक्षात 'ए टू झेड' पर्यंत अल्फाबेट्सची कम्प्युटरच्या बाबींशी जुळवणी केली आहे. कम्प्युटरच्या वापराबाबत अधिकाधिक खुलेपणा येण्यासाठी 'कॉम्प्युटर सफारी' हे पुस्तकदेखील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पुरविण्यात आले आहे. फळा, वही, पेन या वस्तूंऐवजी मॉनिटर, माऊस, की-बोर्डच्या माध्यमातून शिकण्यास मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

शाळेत अनेक गरीब घरातील विद्यार्थी आहेत. या मुलांच्या घरी कम्प्युटरसारख्या अत्याधुनिक वस्तू नाहीत. मात्र यामुळे ते कुठेही मागे पडू नये म्हणून शाळेत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

- कल्पना धात्रक, मुख्याध्यापक, नूतन मराठी प्राथमिक शाळा

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कम्प्युटर शिक्षण ही काळाची गरज आहे. या शिक्षणापासून स्लम एरियातील किंवा गरीब घरातील मुले उपेक्षित राहतात. त्यांना याचे ज्ञान मिळावे म्हणून हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.

- अर्चना यादव, जिल्हाप्रमुख,

प्रथम एन्फोटेक फाऊंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारकार्डसाठी पालकांची वणवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सामान्य माणसाचा अधिकार म्हणून आघाडी सरकारच्या काळात मोठ्या धूमधडाक्यात आधारकार्ड नोंदणीचा शुभांरभ करण्यात आला होता. मात्र, तेव्हा शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्डची सक्ती करण्यात आली नव्हती.

मात्र, आता राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे केल्याने आधारकार्ड काढण्यासाठी पालकांची वणवण सुरू झाली आहे. वेळ व पैसा खर्च करूनही गर्दीमुळे पाल्यांची आधारकार्ड मिळत नसल्याने पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाळेतच आधारकार्डची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

भारतात कुठल्याही ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीची ओळख केवळ एकाच नंबरवरून मिळावी या हेतूने आधारनोंदणी केंद्र शासनाने सुरू केली होती. अनेक अडचणींना तोंड देत आधार नोंदणीचे काम सुरू होते. काही ठिकाणी आधार नोंदणी केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार झाल्याने नोंदणीचे काम बंद झाले. यानंतर काही सेतू केंद्रावर आधारकार्ड नोंदणीची मान्यता जिल्हाधिकारी यांनी दिली.

परंतु, संबंधित ठिकाणी सेतू केंद्र चालक त्याच्या मनमानी कारभारानेच आधार नोंदणीचे काम करत असतो. सिडकोत गेल्या वर्षभरापासून आधारनोंदणीचे केंद्रच नसल्याने सिडकोवासियांना राजीव गांधी भवन येथे यावे लागते. तर सातपूर कातकाडे नगर येथे सेतूत आधार नोंदणीचे केंद्र आहे. मात्र, केंद्राचे चालक असलेले जोर्वेकर ग्राहकांना दादागिरीची भाषा वापरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना सक्तीचे असलेले आधारकार्ड काढण्यासाठी पालकांची चांगलीच वणवण होत आहे. जिल्हाधिकारी यांनी सिडको व सातपूर भागात सरकारी व निमसरकारी शंभरच्यावर असलेल्या शाळांमध्ये आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

विशेष म्हणजे मोठ्य़ा शाळांमध्ये पाच हजारच्यावर विद्यार्थ्यांची संख्या आहे. एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करणार कुठे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांची आधार नोंदणीची सोय झाल्यास पालक व विद्यार्थ्यांचे वेळ, श्रम व पैशाचीही बचत होणार आहे.

पहाटेपासूनच लागतात रांगा

सातपूरला कातकाडेनगर येथे आधार नोंदणीचे काम होत असते. परंतु, केंद्र चालक जोर्वेकर केवळ शनिवारीच आधार नोंदणीचे काम करतो. यात शनिवारी आधार नोंदणी करण्यासाठी आलेले ग्राहक पहाटे सहा वाजेपासूनच नंबर लावत केंद्राबाहेर उभे असतात. केंद्र चालक त्याला वाटेल त्यावेळी केंद्रावर येत असतो. त्यातच विद्युत पुरवठा खंडीत झाला की पुढील शनिवारी या, असे दरडावून सांगितले जाते. अशा केंद्र चालकांवर कारवाई करून जिल्हा प्रशासनाने योग्य सुविधा असलेल्या ठिकाणी आधार नोंदणी सुरू करण्याची मागणी पालक वर्गाकडून होत आहे. सर्वसामान्यांचा आधारकार्डनेच पालकांना निराधार केले आहे. एकीकडे शाळेतील शिक्षक आधार नोंदणीची सक्ती करीत असतांना दुसरीकडे आधारनोंदणीचे केंद्रच सिडको भागात नाही. यामुळे पालकांचे मोठ्या प्रमाणावर वणवण करण्याची वेळ येत आहे. जिल्हा प्रशासनाने शाळेतच आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याची गरज आहे.

- विजय पाटील, रहिवासी, सिडको

शाळेत एकाच छताखाली हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना माहिती असतांनाही बाहेरून आधार नोंदणी करा असा हट्ट करण्याचे कारण काय? शाळेतच आधार नोंदणीची सुविधा शाळा संचालक का उपलब्ध करुन देत नाही? आधार नोंदणीचे काम शाळेनेच शाळेतच केले पाहिजे.

- सुवर्णा जाधव, रहिवासी, सातपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामटवाडेत वाजेना घंटागाडीची घंटा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कामटवाडे परिसरात घंटागाडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तीन दिवसांनंतर एकदाच गाडी येत असल्याने कचरा साठून रहातो. सध्या पावसाचे दिवस असल्याने कचऱ्याची विल्हेवाट लागली नाही तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

कामटवाडे परिसरात डीजीपीनगर, महालक्ष्मीनगर, आनंद नगर, वृंदावन नगर तसेच शिवाजी नगर, विठ्ठल नगर हा भाग येतो. सिडको परिसरातील अनेक भागात घंटागाडी येत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच पावसाचे दिवस सुरू असल्याने कचरा साठून रहातो व दुर्गंधी पसरते. घंटागाडी तीन दिवसांपेक्षाही अधिक अंतराने येत असल्याने काही जण कचरा सरळ रस्त्यावर आणुन टाकतात. त्यावर पावसाचे पाणी पडल्याने व कचराच साठतच गेल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. गाडी वेळेवर येत नाही हा प्रश्न तर आहेच परंतु त्यातही तिची येण्याची वेळ फिक्स नसल्याने मोठी अडचण होऊन बसते. नोकरदारांना तर गाडीची वाट पहात ताटकळत रहावे लागते. कचरा टाकणे गरजेचेच असल्याने एखाद्या दिवशी कामाला विश्रांती देऊन घरी थांबावे लागण्याबाबत नोकरदार खंत व्यक्त करतात. सिडको परिसरात महापालिकेने एक घंटागाडी कायम करावी, विशेष म्हणजे तिची परिसरात येण्याची वेळ नक्की करावी अशी मागणी होत आहे.

डासांचा प्रादुर्भाव

कामटवाडे परिसरात अनेक ठिकाणी कचरा पडून असल्याने व या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने धूरफवारणी करण्याची मागणी होत आहे. साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढते, तसेच कामटवाडे झोपडपट्टीचे लोक रस्त्यावरच घाण टाकत असल्याने येथे दुर्गंधी सुटते. महापालिकेने त्वरित डासप्रतिबंधक धूर फवारणी करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राख उपशाला अखेर परवानगी

$
0
0

नाशिकरोड : एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील राखेचा उपसा आणि वाहतूक सुरू करण्यास केंद्राच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. या वीज केंद्रात वीज तयार झाल्यानंतर कोळशाची राख बंधाऱ्यात पडते. गेल्या वीस वर्षांपासून तिचा मोफत उपसा सुरू आहे.

तिचा वापर विटा व बांधकामासाठी केला जातो. मात्र, पाऊस नसल्याने राख ट्रकमध्ये भरताना ती उडून आपले आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. त्यानतर केंद्राने बंधाऱ्यातील राख उपशाला प्रतिबंध केला होता. त्यामुळे ट्रकचालकांना कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले होते. या व्यवसायातील कामगार, मजूर यांचे संसार उघड्यावर पडले. बांधकाम व्यावसायिकांचीही कोंडी झाली होती. शनिवारी एकलहरे येथे या प्रश्नी बैठक झाली. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, केंद्राचे उपमुख्य अभियंता गजेंद्र पुराणिक, कार्यकारी अभियंता राहुल नाळे, राख मालवाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पाऊस सुरू झाल्याने राख हवेत पसरणे थांबली आहे. त्यामुळे राख उपशाला परवानगी देण्याची सूचना गोडसे व घोलप यांनी केली. असे प्रश्न पुन्हा निर्माण होऊ म्हणून परिसरातील शेतकरी, लोकप्रतिनिधी, वीज केंद्रातील अधिकारी, वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी यांची समिती नेमण्याची सूचना गोडसे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रिटींग्जमधून पालकांप्रती भावनांना मिळाली वाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आई-वडील आणि मुलं यांच्या नात्यात कितीही प्रेम असलं तरी अनेकदा ते शब्दांतून व्यक्त होत नाही. आपले पालक आपल्यासाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग करतात, तडजोडी करतात. हे आपल्याला समजत असूनही अनेकदा ते बोलून दाखवले जात नाही. याच भावनेला ग्रिटींग्जचा आधार घेऊन व्यक्त करण्यात आले. आज (२६ जुलै) साजरा केला जाणाऱ्या 'पॅरेन्ट्स डे'निमित्त महाराष्ट्र टाइम्सने ग्रिटींग कार्ड स्पर्धेचे आयोजन केले होते. ग्रिटींग्जच्या माध्यमातून आपल्या पालकांना थँक्यू म्हणण्याची संधी यातून मिळाली.

पालक आणि पाल्य यांच्यात असलेल्या प्रेमाला शब्दांच्या माध्यमातून या स्पर्धेतून वाट करून देण्यात आली. पाचवी ते दहावीतील मुलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. आईवडिलांविषयी असलेल्या भावना, प्रेम त्यांनी आपल्यासाठी केलेल्या अनेक गोष्टी मनात असतात मात्र ते योग्य शब्दांत मांडता येत नाही.

त्यासाठी ही ग्रिटींग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये मुलांनी आईवडिलांसाठी स्वतः एक ग्रीटींग कार्ड बनवले होते. त्यावर छानसे संदेश लिहून त्यांनी 'मटा'ला पाठवले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत.

विजेत्यांची नावे

प्रथम - ऋषिकेश शिरसाठ

द्वितीय - मिहीत कांकरिया

तृतीय - साक्षी चौधरी

उत्तेजनार्थ - नमिता जाधव, दिव्या भामरे, जयेश चव्हाण, ज्ञानदा पवार, अक्षया झंवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडाची तब्बल ३८०० घरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्यावतीने येत्या काही वर्षांत नाशिकमध्ये तब्बल ३८०० घरे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. खासकरुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना या घरांचा अधिक फायदा होणार आहे.

नाशिक म्हाडाच्यावतीने सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करुन दिली जातात. येत्या का‍ळातही आम आदमीला घरे मिळावीत, यादृष्टीने म्हाडाने कामकाज सुरू केले आहे. विनावापर असलेल्या सरकारी जमिनी मिळविण्यासाठी म्हाडाच्यावतीने प्रयत्न सुरु झाले असून, नाशिक शहर परिसरातील ४.४४ एकर जागा उपलब्ध करुन द्यावी, असा प्रस्ताव म्हाडाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. याशिवाय खासगी जागाही म्हाडाकडून विकत घेतल्या जात आहेत. त्यामुळे या जागेवरही येत्या काळात घरे साकारण्याचे म्हाडाने निश्चित केले आहे.

शहरातील तब्बल २८ जागांची निवड म्हाडाने केली असून त्या मिळल्यास म्हाडाचे प्रकल्प साकार होऊ शकणार आहेत. त्यात सातपूर, पाथर्डी, आडगाव, चुंचाळे, देव‍ळाली या परिसरातील जागांचा समावेश आहे. दर्जेदार आणि सर्वसामान्यांना परवडू शकतील, अशा प्रकारची घरे उपलब्ध करुन देण्यावर आमचा भर असल्याचे म्हाडाने सांगितले आहे. सद्यस्थितीत पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, म्हसरुळ याठिकाणी अपार्टमेंटमधील घरे उपलब्ध करुन दिली आहेत. मात्र, त्यास मोठा प्रतिसाद लाभू शकलेला नाही. रोहाऊस, डुप्लेक्स, बंगलो अशा प्रकारच्या घरांची मागणी नागरिकांकडून म्हाडाकडे करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात फ्लॅटऐवजी अशा प्रकारच्या घरांची निर्मिती म्हाडाकडून होण्याची शक्यता आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर तेथे कशाप्रकारच्या घरांना मागणी लाभू शकते, याचा विचार म्हाडाकडून केला जाणार आहे. त्यानंतरच एकत्रित प्रस्ताव तयार करुन त्याला मंजुरी घेतली जाणार आहे. सद्यस्थितीत म्हाडाने एकूण ३८०० घरे निर्माण करता येईल, अशा प्रकारचा प्रस्ताव प्रायोगिकरित्या तयार केला आहे.

अर्बन लँड सिलिंग (युएलसी) अंतर्गत असलेल्या अनेक जमिनी कुठल्याही वापराविना पडून आहेत. त्या जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न असून, त्या मिळाल्यास नवीन प्रकल्प साकारले जाणार आहेत, असे म्हाडाक्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या बदलांमुळे महापालिका जात्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य कणा असलेली स्थानिक संस्था कर (एलबीटी) प्रणालीत केलेल्या बदलांमुळे पालिकेचा आर्थिक कणाच मोडला जाणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नात तब्बल चारशे कोटींनी घट होणार असून, थेट विकासकामांवरच त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे धास्तावलेल्या सत्ताधारी मनसेने एलबीटीची सध्याची प्रणाचीच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, विशेष महासभा घेण्याची तयारी सुरू केली आहे.

व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने एक ऑगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा अर्थमंत्री मुनगुंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. एलबीटी थेट रद्द करण्याऐवजी त्याच्या जाळ्यातून बहुतांश व्यापाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी उलाढालीची मर्यादा पाच लाख रुपयांवरून ५० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. नगरविकास विभागाने शुक्रवारी त्याची अधिसूचना काढली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे उत्पन्नाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. एलबीटीतील उलाढालीची रक्कम वाढविताना, स्थानिक संस्थांचे नुकसान कसे भरून देणार, याबद्दलची भूमिका सरकारने स्पष्ट केलेली नाही.

मिळणार अवघे ३२५ कोटी

पन्नास कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या नाशिकमध्ये केवळ ९१ कंपन्या आहेत. त्यातून केवळ ३२५ कोटींच्या आसपास रक्कम मिळणार आहे. या खर्चातून प्रशासकीय खर्चही पूर्ण होणार नाही. आर्थिक डोलारा सांभाळण्यासोबतच विकासकामांनाही निधीची उपलब्धता करावी लागणार आहे. सोबत स्मार्टसिटीचे स्वप्न सुद्धा अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. एलबीटीतून पालिकेला सध्या वर्षाला सातशे कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र आता मध्येच एलबीटीत दुरूस्ती झाल्याने ही रक्कम निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. त्यामुळे पालिका पूर्णपणे आर्थिक जात्यात अडकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच दिवशी ६७ ‘आऊट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांनी डोके वर काढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, यासाठी पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी रात्री राबविलेल्या या मोहिमेत ६७ गुन्हेगार तपासून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ, एन. अंबिका तसेच श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे, अतुल झेंडे, विजयकुमार चव्हाण, ११ वरिष्ठ पोलिस निराक्षक, २२ उपनिरीक्षकांनी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ही मोहीम राबविली. शारी‌रिक हानी पोहचविल्या संदर्भात गुन्हे दाखल असलेल्या तसेच कारागृहातून सुटून आलेल्या गुन्हेगारांची यादी त्या त्या पोलिस स्टेशनने तयार करावी, असे आदेश पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांना देण्यात आले होते. त्यानुसार अशा आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांचा शोध घेण्यात आला. ते सध्या काय करतात, कोणासोबत राहतात, त्यांच्यावर अन्यत्र काही गुन्हे दाखल आहेत का, अशी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. तसेच त्यांनी कोणताही उपद्रव करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये यासाठी त्यांच्यावर कलम १०७, कलम ११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

अनेक आरोपी न्यायालयाच्या आदेशानंतर कारागृहातून बाहेर येतात. अशा आरोपींकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. हे आरोपी सध्या कोठे राहतात, काय करतात याचा शोध घेण्यात आला. यापुढे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करणार नाही, असे हमीपत्र त्यांच्याकडून भरून घेण्यात आले. मल्हारखान झोपडपट्टी, फुलेनगर, स्वारबाबानगर, नाशिकरोड, सिडको, जुने नाशिक, भद्रकाली, पंचवटी परिसरात ही मोहीम प्राधान्याने राबविण्यात आली.

विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांकडून सिंहस्थात किंवा अन्यवेळीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा अनुचित प्रकारांना रोखता यावे यासाठी ऑपरेशन ऑल आऊट मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये शरीरविषयक गुन्हे असलेल्या तसेच कारागृहातून सुटून आलेल्या ६७ जणांची तपासणी करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.

- सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी ‘विहिंप’ सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सिंहस्थाचे नियोजन पूर्ण झाले असून, लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी नाशिकमध्ये चार ठिकाणी अन्नछत्र, दवाखाने, राहण्याची व्यवस्था इत्यादी बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे. ही माहिती विहिंपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष एकनाथ शेटे यांनी भगूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सिंहस्थ काळात विहिंपच्या वतीने रामकुंडाजवळील बालाजी कोट येथे अन्नछत्र, दवाखाना, काळाराम मंदिर रोडवर असलेल्या समाजमंदिरात अन्नछत्र, दवाखाना तसेच वाटसरूसांठी निवास व्यवस्था, तपोवनातील लहान लक्ष्मी नारायण मंदिर येथे एकावेळी ४०० लोक जेवण करतील एवढ्या मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचे आयोजन केले जाणार आहे. तपोवनातील अभ्यासिकेत भुलेभटके पांथस्थासाठी निवास व अन्नछत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी लागणाऱ्या भांड्यांची व्यवस्था अक्कलकोट येथील स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने करण्यात आली असून, दोन ट्रक धान्यही उपलब्ध करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या वतीने दोन ट्रक धान्य तर नाशिक जिल्ह्याच्या वतीने दररोजचा भाजीपाला, कर्मचाऱ्यांचा खर्च यासाठी सुमारे रोख एक कोटी रुपये (अंदाजे) उपलब्ध करण्यात येणार असून, राज्यातील इतरही दानशुरांच्या माध्यमातून ५० लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. यासाठीची सर्व तरतूद करण्यात आली असून, विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी स्वयंसेवक म्हणून पर्वणी काळात उपस्थित राहणार आहेत.

कार्यकारिणी मंडळाची सभा

५ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय कार्यकारणी मंडळाची सभा त्र्यंबकेश्वर येथील फरशीवाले बाबा यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेत होणार आहे. यासाठी कार्याध्यक्ष डॉ. प्रवीणभाई तोगडिया, मार्गदर्शक मंडळ सदस्य अशोक सिंगल, केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव, प्रसार मंत्री सरपोतदार, संघटन मंत्री भार्गवराम, प्रांत सदस्य नाना गोविलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

संत संमेलनाचे आयोजन

२६ सप्टेंबर रोजी जनार्दन स्वामी मठ, तपोवन येथे ६०० हून अधिक संतमहंतांच्या उपस्थितीत राष्ट्रीय संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिगंबर आखाड्यात अधिकाऱ्यांचा ‘मेळा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिगंबर आखाड्याला सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास महाराजांनी केल्यानंतर शनिवारी महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. इतकेच नव्हे तर लागलीच साफसफाई तसेच जमीन सपाटीकरण करण्याचे काम हाती घेण्याचे आश्वासन दिले.

साधुग्राममधील प्रमुख तीन अनी आखाड्यांपैकी एक असलेल्या दिगंबर अनी आखाड्याला प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप दिगंबर आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास महाराज यांनी शुक्रवारी केला होता. याबाबत 'मटा'मध्ये वृत्त प्रसिध्द होताच प्रशासनाने त्याची दखल घेतली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास मिळकत विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे, सिंहस्थ सेलचे जी. बी. पगारे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी रामकिशोरदास महाराजांची भेट घेतली. यात महाराजांनी झाडांची छाटणी, साफसफाई, जमीन सपाटीकरण, प्लॉटला नंबर देणे आदी मागण्या केल्या. बैठकीस संबंधित ठेकेदार सुध्दा उपस्थित असल्याने लागलीच मागण्यांनुसार कामे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी रामकिशोरदास महाराजांना दिले. प्लॉटला नंबर देण्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आश्वासन देखील यावेळी देण्यात आले. दरम्यान, दिगंबर आखाड्याप्रमाणे इतर आखाड्यांना काय अडचणी आहेत, त्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. लवकरच सब सेक्टर सुरू होणार असल्याने या अडचणी तत्काळ सोडवण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

प्रसिध्द झालेल्या वृत्तानंतर अधिकाऱ्यांनी भेट घेऊन सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. वेळ फार कमी असून, प्रशासनाने तातडीने सर्व काम हातावेगळी करणे गरजेचे आहे.

- रामकिशोरदास महाराज,

श्री महंत दिगंबर आखाडा

पाण्याची समस्या कायम

नळांना गढूळ पाणी येत असल्याची तक्रार साधुमहंतांनी पुन्हा एकदा केली. दूषित पाण्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याचा दावा देखील साधुमहंतांनी केला. टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून, प्रशासनाने याची तत्काळ दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समितीसाठी आज मतदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी रविवारी (दि. २६) मतदान होत आहे. नाशिकसह, त्र्यंबकेश्‍वर व पेठ तालुक्यांमध्येही बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे. तेथे १५ ठिकाणी ३१ मतदान केंद्रांवर मतदान बूथ तयार करण्यात आले आहेत.

बाजार समितीवरील वर्चस्वासासाठी शेतकरी पॅनल, आपलं पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये जोरदार लढत होत आहे. जिल्हा बँकेप्रमाणेच याही निवडणुकीत मतदारांची पळवापळवी आणि हाणामारीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील गोदावरी हॉल येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी कांटे की टक्कर आहे. हमाल-माथाडी गटातून पिंगळे गटाचे चंद्रकांत निकम, हे यापूर्वीच अनौपचारिकरीत्या बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता १७ जागासांठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी ४ हजार ५३५ मतदार मतदान करणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी २०२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोसायटी व ग्रामपंचायत गटासाठी प्रत्येकी १४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तर व्यापारी गटासाठी १५०७ मतदार शहरातील आर. पी. विद्यालयात मतदानाचा हक्क बजावतील. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत गटासाठी १७८०, तर सोसायटी गटात १२४८ मतदार आहेत. सर्वसाधारण गटातील सात जागांसाठी २४ उमेदवार, महिला राखीव गटासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत गटाच्या चार जागांसाठी १७ उमेदवार, तर आर्थिक दुर्बल गट व व्यापारी व आडते गटासाठी प्रत्येकी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच इतर मागास प्रवर्गात तीन, तर भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या दोन्ही गटांत सरळ सरळ लढत होईल.

बाजार समितीतील माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या गेल्या २३ वर्षांतील सत्ता उलथवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक आणि महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी शेतकरी पॅनल मैदानात उतरवल आहे. तर पिंगळेंनेही चुंभळेना शह देण्यासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना सोबत घेवून आपलं पॅनल मैदानात उतरवलं आहे. यासोबतच भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी परिवर्तन पॅनलची स्थापना करून मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे तिंरगी लढत होत निवडणुकीत भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि अपहाराच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागातील गोदावरी हॉल येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. १४ टेबलांवर ही मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.

पोलिसांची दक्षता

जिल्हा बँक निवडणुकीत पिंगळे आणि चुंभळे यांच्या वादामुळे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मतदारांच्या पळवापळवीमुळे तणाव आणखी वाढला होता. बाजार समितीतही पिंगळे-चुंभळे यांच्यात लढत असल्याने वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या तीनही तालुक्यांतील मतदान केंद्रावर अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. सोबत गोंधळ घालणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याच्या सूचनाच पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्यांना जेलवारीची हवा खावी लागणार आहे.

सिन्नर, येवल्यातही रंगत

सिन्नर व येवला या बाजार समित्यांसाठी आज (दि. २६) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी मतदान होईल. विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटात बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी चुरस आहे. येवला बाजार समितीतही छगन भुजबळ यांनी 'प्रगती' पॅनल रिंगणात उतरवतांना त्यांच्यासमोर पवार-दराडे गटाने 'शेतकरी विकास' पॅनलच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले आहे. पिंपळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांकडून साधू-महंतांची मनधरणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह त्र्यंबकेश्वरमधील साधुमहंतांनी भाजप सरकारवर टीका करताच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी तातडीने भेट घेवून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. महंतांशी बंद खोलीत चर्चा करून महंतांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. सरकार शक्य होईल तेवढ्या सोयीसुविधा देत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सिंहस्थाच्या सुविधा आणि कामांवरून अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरीजी महाराज यांनी सरकार व पालकमंत्र्यांवर टीका केली होती. तसेच ग्यानदास महाराज यांनीही नाराजी प्रकट केली होती. यामुळे पालकमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वरसह नाशिकमधील साधुग्रामला भेटी देऊन पाहणी केली. साधुग्राममध्ये पायपीट करीत सोयीसुविधांची कमतरता नाहीत ना याची दक्षता घेतली. त्र्यंबकेश्वरमध्ये साधुमहंताशी चर्चा केल्यानंतर नाशिकमध्ये धाव घेतली. साधुग्राममध्ये येऊन त्यांनी श्री महंत धर्मदास महाराज, महंत ग्यानदास यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्यानदास महाराजांशी बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर ग्यानदास यांनी आम्ही समाधानी असल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ महाजनांनी स्वामीनारायण मंदिर गाठले. साधू महाराजांना त्रास होऊ देऊ नका, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सीसीटीव्हीची चौकशी

कुंभमेळ्यासाठी शहरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चित्र स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पालकमंत्र्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती दिली.

धार्मिक सरकारसे जादा अपेक्षा

महाजन यांनी निर्वाणी आखाड्याचे प्रमुख श्री मंहत धर्मदास महाराज यांची भेट घेतली. भाजपचे सरकार असल्याने आम्हाला जास्त सुविधा हव्यात, अशी मागणी धर्मदास महाराज यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'साधू-महंतांनी राजकारणात पडू नये'

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या केंद्र व राज्य सरकारवर टीका करणाऱ्या साधू-महंतांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी खडसावले. 'साधू-महंतांनी अवाजवी मागण्या बंद करून जास्त अपेक्षा करू नये. साधू-महतांचे काम तपस्या आणि ध्यानधारणेचे असल्याने त्यांनी राजकारणात पडू नये,' असा टोला पालकमंत्र्यांनी लगावला आहे. 'काँग्रेस चांगले, भाजपा वाईट हे म्हणण्यापेक्षा धार्मिक कार्यक्रमांकडे लक्ष द्या. आहे त्याच जागेत आता भागवावे लागेल' असे सांगत जास्तीच्या जागेची मागणी त्यांनी फेटाळून लावली.

महाजन म्हणाले, 'साधू-महंतांच्या अपेक्षा जास्त आहेत, त्या आम्ही सर्व पूर्ण करू शकत नाही. साधूच्या मागण्या अवाजवी आहेत. भाजपकडून त्यांच्या अपेक्षा आहेत ते मान्य आहे, मात्र त्या पूर्ण करणे शक्य नाही. भाजप वाईट, काँग्रेस चांगले या वादात पडण्याऐवजी त्यांनी धर्म अध्यात्माकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्यांनी महाराजांसारखे रहावे, राजकारणात पडू नये,' असा प्रतिटोला त्यांनी हरिगीरीजी महाराज यांना लगावला. दरम्यान, सिंहस्थात सीसीटीव्हीसह इतर कामांची चौकशी करण्यात येईल, अशी माह‌िती महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसींच्या हक्कांसाठी पुन्हा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरकारने २०११ मध्येच जनगणना जाहीर केली. मात्र सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची आकडेवारी जाहीर केलेली नाही. ही माहिती देण्यास केंद्र सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असून, ओबीसींच्या न्याय्य हक्कासाठी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याची घोषणा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी रविवारी नाशिकमध्ये केली.

शालिमार चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर परिषदेने धरणे आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत जाधव, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, हेमंत धात्रक, छबू नागरे, दिलीप खैरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, महाराष्ट्र नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे, दिलीप तुपे, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघटनेचे अध्यक्ष भगवान थोरात, स्वकुल साळी समाजाचे गोरख निचळ, नामदेव शिंपी समाजाचे अजय देव्हारे, माळी सेवा परिषदेचे बाजीराव तिडके, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे अजमोद्दिन शेख, कविता कर्डक, रंजना पवार यांसह अनेकजण उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, १९३१ नंतर भारतात इतर मागासवर्गीयांची जातनिहाय जनगणना केली गेली नाही. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अल्पसंख्यांक प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना केली जाते. त्याआधारे मागास जातींसाठी राज्य आणि केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद आणि पंचवार्षिक योजनांचे नियोजनही होते. मात्र, देशात ५४ टक्क्यांहून अधिक असलेल्या मागास प्रवर्गासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जात नाही. त्यामुळे हा समाज मागासलेलाच आहे. महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, दिल्ली, गुजरात, झारखंड, हरियाना, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, यासह सध्या देशभर आंदोलने सुरू आहेत. जातनिहाय जनगणनेचे काम पूर्ण झाले असून सर्व आकडेवारी केंद्र शासनाकडे संकलित झालेली आहे. मात्र, ही आकडेवारी जाहीर करण्यास केंद्राकडून टाळाटाळ होत आहे.

जेटलींवर शरसंधा

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावर समिती नेमून काय जाहीर करावे व काय करू नये याचा अहवाल मागितला. ही देशातील इतर मागासवर्गीयांची फसवणूक असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. लपवेगिरीच्या सरकारचा या धोरणाचा निषेधही करण्यात आला. सरकारने लवकरात लवकर ओबीसींची आकडेवारी जाहीर केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेड दर्शन बंद करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने सुरू केलेले पेड दर्शन बंद करावे तसेच फुल-नारळ बंदीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, असे आवाहन जगदगुरू सूर्याचार्य कृष्णदेवानंदगिरी पिठाधिश्वर महाराज यांनी केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर मंदिरासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जुना पंचदशनाम आखाड्याचे आचार्य व सूर्यपीठ गुरूस्थान आश्रम द्वारका येथील जगदगुरू कृष्णदेवानंद महाराज यांनी निलपर्वत जुना आखाडा येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात मंदिर प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करून महाराजांनी हे निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी जुना आखाड्याचे विश्वस्त महंत प्रेमगिरी महाराज तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर आणि संत निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त ललिता शिंदे उपस्थित होत्या. पैसे घेऊन देवाचे दर्शन देत असल्याचे समजल्याने आपण व्यथित झालो. देवाच्या दारात अशा प्रकारे गरीब श्रीमंत हा भेदभाव नसावा असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येथे बेल, फूल, नारळ, दूध वाहण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा प्रकार भाविकांच्या श्रध्देशी खेळ करणारा असल्याचे त्यांनी म्हटले. पुरतत्व खात्याने दोनशे रुपये घेण्यास विरोध केला असून तसा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, मंदिर ट्रस्ट याबाबत दखल घेत नाही. तसेच नारळ बंदीसाठी एटीएसचा हवाला दिला जातो. प्रत्यक्षात एटीएसने तसे काही सुचविले नसल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर प्रवेशद्वारी जमा केलेले नारळ सरळ देवस्थान कार्यालयात जातात, तेथे सुरक्षेस बाधा येत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराजांवर हल्ल्याचा प्रयत्न

मुंबई महामार्गावर भिवंडी ते कसारा दरम्यान आपणावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा महाराजांनी केला. यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या बाळासाहेब गोऱ्हे हजर होते. महाराज असलेल्या वाहनाच्या मागेपुढे चार दुचाकीस्वार होते. त्यांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. वाहन थांबवून विचारणा केली असता त्यांनी 'पुढे जावू नका; अन्यथा कसारा घाटाच्या पुढे जावू देणार नाही. तेथेच संपवून टाकू', अशी धमकी दिल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. आंतराष्ट्रीय गोवंश रक्षण संघाचे आपण अध्यक्ष असून आपल्यावर यापूर्वी २००३ पासून १२ वेळा प्राणघातक हल्ला झाला असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images