Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी प्राधिकरण

$
0
0

सहकार राज्यमंत्री भुसे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

बोगस सहकारी संस्था रद्द करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा बसावा आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावेत म्हणून राज्य सरकार प्राधिकरण स्थापणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी रविवारी येथे दिली.

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेतर्फे एटीएम कार्डव्दारे विविध सेवा सुरू झाल्या आहेत. त्यांचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पेखळे यांनी प्रास्तविक तर उपाध्यक्ष शाम चाफळकर यांनी स्वागत केले. शिवसेचे उपनेते बबनराव घोलप, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, जयंत जाधव, सीमा हिरे, बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, मनोहर कोरडे, रंजना बोराडे, रामदास सदाफुले, अजित बने, एकनाथ कदम, अर्बन बँक्स फेडरेशनचे संचालक भास्कराव कोठावदे, अजय ब्रम्हेचा आदी व्यासपीठावर होते.

पारदर्शी कारभाराच्या बळावर नाशिकरोड बँकेची प्रगती झाली आहे. असेच कार्य सहकार क्षेत्रात अपेक्षित असल्याचे सांगून भुसे म्हणाले की, मूठभर लोकांमुळे सहकार मोडकळीस आले आहे. राज्यात सव्वादोन लाख सहकारी संस्था आहेत. त्यांचे कामकाज तपासण्याची मोहीम सुरू झाली आहे. 15 डिसेंबरपर्यंत 50 हजार बोगस संस्था रद्द केल्या जातील. रायसोनीसारख्या मोठ्या संस्थेत ठेवीदारांचे सहाशे कोटी रुपये अडकले आहेत. सहकारी पतसंस्थांमधील ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी सरकार प्राधिकरण स्थापन करणार आहे. घोलप म्हणाले की, सहकाराचा स्वाहाकार झाला असताना नाशिकरोड बँकेने नियमांचे पालन करत तसेच संचालक मंडळ आणि कर्मचा-यांच्या बळावर नावलौकिक मिळवला आहे. अशा संस्थांमुळेच सहकार टिकला आहे. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. संचालक सुधाकर जाधव यांनी सूत्रसंचलन केले. संचालक मनोहर कोरडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन चिमुकल्यांसह मातेची आत्महत्या

$
0
0

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील विवाहितेने रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गावातीलच एका विहिरीत दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली. चंद्रभागा गोकुळ करवर (२४), दीपांजली गोकुळ करवर (३) आणि साई गोकुळ करवर (२) अशी मृतांची नावे आहेत. चंद्रभागा दोन्ही चिमुकल्यांना घेऊन सकाळी घराबाहेर पडल्या. गावालगतच्या विहिरीजवळ काही लोकांना चपला आढळल्या. त्यामुळे ग्रामस्थांचा संशय बळावला. विहिरीची पाहणी केली असता तेथे चंद्रभागा हिच्यासह चिमुकल्यांचे मृतदेह आढळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये बाईक अॅम्ब्युलन्सचा सायरन

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

भाविकांच्या गर्दीने ओसंडणाऱ्या अरुंद रस्त्यांवर अम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही. गल्ली बोळांमध्ये अडकलेल्या गरजू रुग्णांवर तत्परतेने उपचार करता यावेत यासाठी सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वरमध्ये बाईक अॅम्ब्युलन्स सेवा पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पर्वणीकाळात आठ बाईक्स रुग्णांना सेवा देण्यासाठी सज्ज असणार आहेत.

सिंहस्थ काळात भाविक आणि साधुमहंतांच्या सुरक्षेला प्रशासनाकडून सर्वाधिक महत्त्व दिले जात आहे. अनुचित घटना घडली तरी प‌ीडीतांना तात्काळ उपचार मिळावेत आणि ज‌विीत हानी टाळावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे वैद्यकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय विभागाने त्र्यंबकेश्वरमध्ये ११ ठिकाणी दवाखाने तर १३ फिरती वैद्यकीय पथके रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहेत. कुशावर्त, स्वामी समर्थ केंद्र आणि ब्रह्मा व्हॅली या ठिकाणी वैद्यकीय विभागातर्फे अतिदक्षता विभाग सज्ज ठेवण्यात येणार आहे. कुठल्याही हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात मिळतात त्या वैद्यकीय सेवा येथे उपलब्ध असणार आहेत. याखेरीज १०० खाटांचे त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय सज्ज असणार आहेच. मात्र, त्र्यंबकेश्वरमधील गल्ली बोळांमध्ये रुग्ण असेल तर तेथे चार चाकी अॅम्ब्युलन्स पोहचू शकणार नाही. म्हणूनच अशा ठिकाणी बाईक अॅम्ब्युलन्सची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा शल्य चिक‌त्सिक डॉ. एकनाथ माले यांनी घेतला आहे. या अॅम्ब्युलन्स समवेत एक तज्ज्ञ डॉक्टर, एक सहायक आणि प्रथमोपचार पेटी असेल.

रुग्ण तपासणीनंतर त्याला जवळच्या दवाखान्यात किंवा फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे आयसीयूपर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय हे बाईक अॅम्ब्युलन्सवरील डॉक्टर घेतील. चार बाईक त्र्यंबकेश्वरमधील ठराव‌कि भागांत तर अन्य चार बाईक त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको हॉस्पिटलमध्ये गैरकारभाराचा कुंभमेळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला असतानाही बिटको हॉस्पिटलमध्ये प्रभावी नियोजन झालेले नाही. नाशिकरोडचे सभापती केशव पोरजे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, वैशाली भागवत, विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे यांनी सोमवारी हॉस्पिटलचा दौरा केला असता अनेक त्रुटी उघड झाल्या.

पोरजे यांनी सांगितले, की महत्त्वाचा व महागडा औषधसाठा बिनादरवाजाच्या खोलीत ठेवल्याने संशय निर्माण झाला आहे. येथे सर्पदंशांची इंजेक्शन नाहीत. दोन दिवसापूर्वी सर्पदंशाच्या रुग्ण आला तेव्हा डॉक्टर झोपलेले आढळले होते. नंतर त्यांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित सुविधा नाही की पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. ९० टक्के डॉक्टर उशिरा येतात. ९० टक्के एक्सरे मशिन बंद आहेत. हॉस्पिटलच्या आवारात खासगी वाहने अस्ताव्यस्त उभी असल्याने रुग्णवाहिकांना अडथळा होत आहे.

अधिकारी निरुत्तर

हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत फुलकर यांची भेट पथकाने घेतली. रुग्णांना वेळेत उपचार का मिळत नाही, वरिष्ठांना येथील त्रुटींची माहिती दिली का? कुंभमेळ्यासाठी किती स्टाफ मागविला? औषधे कोणती नाहीत अशी विचारणा करून कागदपत्रांची मागणी केली असता डॉ. फुलकरांना उत्तर देता आले नाही. मात्र, सहकारी डॉक्टरांची बैठक घेऊन योग्य नियोजन करू, वरिष्ठांच्या निदर्शनास त्रुटी आणून देऊ असे त्यांनी सांगितले.

आंदोलनाचा इशारा

पोरजे म्हणाले, की बिटको हॉस्पिटलमध्ये पुरेसा औषध साठा आणि आवश्यक सुविधा नसल्याचे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. त्यांनी कार्यवाही केली नाही तर शिवसेनेतर्फे आंदोलन केले जाईल.

महापौर भेटीची प्रतीक्षा

मनसेनेही महापौर अशोक मुतर्डक यांची हॉस्पिटलला सप्राईज व्हिझीट आयोजित केली होती. मात्र, महापौर साधूग्राममध्ये दुपारपर्यंत व्यस्त होते. त्यामुळे ते येऊ शकले नाही. तथापी, ते लवकरच हॉस्पिटलला भेट देणार असल्याची माहिती मनविसेचे शहर उपाध्यक्ष शाम गोहड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खत प्रकल्प उरला नावापुरताच

$
0
0

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून कचरा विघटन ठप्प

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

देवळाली परिसरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून आर्थिक प्राप्ती व्हावी या हेतूने कॅन्टोन्मेंट बोर्डाने स्टेशनवाडी भागात कचरा डेपोत जैविक खत प्रकल्पाची उभारणी केली. मात्र, तेथे बिल्कुल खत निर्मिती केली जात नसल्याने प्रशासनाने या प्रकल्पावर केलेला खर्च वाया गेला आहे.

सुमारे ६० एकर परिसरात असणाऱ्या कचरा डेपोमध्ये देवळाली कॅम्प परिसरातून दररोज १२ घंटागाड्या कचरा गोळा करून टाकला जातो. मात्र आणलेला कचरा अस्ताव्यस्त परसलेला आहे. गोळा केलेल्या कचऱ्याची ओला व सुका अशी वर्गवारी करणे, सुका कचरा जाळण्यात यावा व ओल्या कचऱ्यातून जैविक खत निर्मिती करण्यात यावी, असे अपेक्षित आहे. मात्र, असे कोणताही काम या खत प्रकल्पात केले जात नाही. त्याऐवजी सर्वच कचरा जाळण्याचा प्रकार सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून केला जात आहे.

कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यासाठी असलेले शोषखड्डे भरून गेले असून नव्याने शोषखड्डे निर्माण करण्याची गरज आहे. परंतु, कचरा डेपोमध्ये कचऱ्याच्या विघटनासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही. मृत पावलेली जनावरे देखील येथेच आणून टाकली जात आहेत. प्रत्यक्षात मेलेल्या जनावरांना पुरण्याची गरज आहे. मात्र, ती देखील सर्रासपणे उघड्यावर फेकून दिली जातात. या सर्व कामांसाठी उपलब्ध असलेली कर्मचारी संख्या वाढविल्यास तेथे कचऱ्याचे योग्य नियोजन केले जाऊ शकते.

आर्थिक उत्पन्नही घटले

३५ वर्षांपासून शेतखाना संबोधल्या जाणाऱ्या या कचरा डेपोतून पूर्वी हजारो रुपयाचे उत्पन्न मिळत असे. आज मात्र परिस्थिती बरोबर उलटी झाली आहे. पूर्वी या ठिकाणाहून जैविक खत घेण्यासाठी रांगा लागत असे. उर्वरित जागेमध्ये जनावरांच्या खाण्यासाठी मकाचे उत्पादन घेतले जात असे. परंतु, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. खत प्रकल्पच ठप्प झाल्याने उत्पन्नाचा ओघही आटला आहे.

डेपोला कंपाउंडची गरज

सुमारे ७० एकर परिसरात परसलेल्या या कचरा डेपोला प्रत्यक्षात कंपाउंड उभारण्याची गरज आहे. कचरा रस्त्यावर देखील पसरत आहे. त्याच बरोबर प्रवेश करण्यासाठी एका गेटची गरज असल्याने प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.

परप्रांतियांचा बनला अड्डा

कचरा डेपोला लागून असलेल्या जागेवर काही परप्रांतियांनी आपले बस्तान बसविले आहे. रात्री यापैकी काही लोक परिसरात खुलेआम मद्य प्राशन करीत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे गुन्हेगारी वाढीस लागली असून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

भर पावसाळ्यात रोगराईला आयते निमंत्रण

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचऱ्यामुळे डास, विविध प्रकारचे किडे निर्माण होत असून रोगराई फैलावण्याची शक्यता जास्त आहे. जुन्या स्टेशन वाडी भागात ये-जा करण्यासाठी नागरिक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे जुन्या स्टेशनवाडी भागात जातांना नाक दाबूनच जावे यावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैतागलेल्या महाराजांचे बेमुदत उपोषण

$
0
0

आखाड्यांचे अतिक्रमण, प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धार्मिक संस्थांच्या जागेवर झालेले अतिक्रमण आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे वैतागलेल्या महाराजांनी थेट उपोषणाचा मार्ग अवलंबला. आज, सोमवारी त्यांच्या उपोषणाचा पहिला दिवस असून, प्रशासनाने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर हे आंदोलन यापेक्षा तिव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.

गणेशदास महाराज असे या महाराजांचे नाव आहे. मूळ अयोध्याचे असलेल्या या महाराजांच्या तीन संस्था असून, त्यात भुतेश्वर मेंन्शन, शिवधाम हनुमान मंदिर आ​णि श्री हनुमान मंदिर यांचा समावेश आहे. या तीन संस्थांसाठी सलग प्लॉट मिळावेत म्हणून आपण तीन मार्च रोजी प्रशासनाकडे अर्ज केला होता. याबाबत वेळोवळी पाठपुरावा देखील केला. मात्र, प्रशासनाने प्लॉट देताना एका संस्थेसाठी डी सेक्टरमधील ४२८ क्रमाकांचा प्लॉट दिला. तर, दुसऱ्या दोन संस्थासाठी २ एफ सेक्टरमध्ये ७७७ आणि ८०२ क्रमांकाचे प्लॉट उपलब्ध करून दिले. यामुळे येणाऱ्या भक्तांसाठी सुविधा पुरवायच्या तरी कशा, असा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यातच आज पावसास सुरूवात झाली. पुढील तीन महिने पाऊस पडणार हे नि​श्चित असून, पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था येथे उपलब्ध नसल्याची तक्रार गणेशदास महाराज यांनी केली. प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही कोणीच दाद देत नसल्याने उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महाराजांनी दिला.

मेळा अधिकारी लक्ष्य

या सर्व दुर्देशेसाठी प्रशासनाच्या जागेवर आखाड्यांनी केलेले अतिक्रमण आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे मेळा अधिकारी महेश पाटील जबाबदार असल्याची टीका गणेशदास महाराजांनी केली. कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात पाटील सक्षम नसून, त्यांनी स्वतः राजीनामा देऊन या कामापासून दूर व्हावे किंवा प्रशासनाने त्यांना हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाच्या जागेत आखाड्यांचे अतिक्रमण होऊ नये म्हणून कोणतीही यंत्रणा राबवण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साधुग्राममध्ये उद्भवणाऱ्या सर्व समस्यांना मेळा अधिकारी महेश पाटील जबाबदार आहेत. त्यांनी सक्षमपणे कारभार हाकला नाही. त्यांच्यामुळे विस्कळीत प्लॉट मिळण्याचे प्रकार होत आहेत. ३ मार्चपासून पाठपुरावा करूनही सलग प्लॉट मिळाले नाहीत. प्लॉटमध्ये पाणी साचण्याचा प्रकार घडला असताना याकडे कोणी ढुंकूनही पाहिलेले नाही. - गणेशदास महाराज, उपोषणकर्ते

महाराजांनी एकदाही लेखी कळवलेले नाही. प्लॉटचे वाटप आताच झाले नसून इतक्या दिवसांनी महाराज तक्रार का करीत आहे, हे उमगत नाही. प्रशासन ज्या सुविधा पुरवू शकत नाही, त्याच पुरवण्याची मागणी त्यांनी सातत्याने केली आहे. एका संस्थेला नियमबाह्य मदत केल्यास तशीच मदत सर्वांना करावी लागेल. - महेश पाटील, मेळा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहीस्नानाला सर्वसमान!

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

सिंहस्थ काळात तुम्ही व्हीआयपी पासेसच्या माध्यमातून स्नानाची पर्वणी साधू पाहणार असाल तर आताच विसरा! तुम्ही व्हीआयपी असलात तरीही शाहीस्नानाच्या वेळी तुम्हाला अन्य भाविकांप्रमाणे गर्दीतून वाट काढत पायीच फिरावे लागणार आहे. पर्वणी काळात व्हीआयपी पासेस दिले जाणार नसल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

व्हीआयपींच्या सुरक्षेचा पोलिसांवर पडणारा भार आणि सर्व कामे सोडून अधिकाऱ्यांना त्यांच्यामागे फाईल्स घेऊन पळावे लागत असल्याने व्हीआयपींना आवरा असे साकडे जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना घातले. सिंहस्थाच्या नियोजनाचे गांभीर्य लक्षात घेऊन व्हीआयपींच्या दौऱ्यांना कात्री लागणार असल्याचेही गत आठवड्यातच स्पष्ट झाले आहे. आता प्रशासनाने नियोजनाच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे. सिंहस्थ पर्वणी काळात व्हीआयपी पासेसचे वाटप केले जाणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पासेसच्या वाटपावरून उडणारा गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठीच प्रशासन निर्णयापर्यंत पोहोचले आहे. पर्वणी काळात आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरू आहे. कोणतीही आपत्ती घडून सोहळ्याला गालबोट लागू नये या चिंतेने प्रशासनातील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे नियोजनाचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ जुलै रोजी पुरोहित संघाने आयोजित केलेल्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी नगरसेवकांना प्रवेश न मिळाल्याने मानापमान नाट्य रंगले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी पर्वणीकाळात पास वितरणाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पासेस वितरणासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. तेव्हाच जिल्हाधिकाऱ्यांकडून या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.

राजमुंद्रीचा दौरा करणार

आंध्र प्रदेशात राजमुंद्री येथे चेंगराचेंगरीत २९ भाविकांचा, तर जगन्नाथपुरीत दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनांच्या अभ्यासासाठी जिल्हा प्रशासनाचे पथक जगन्नाथपुरी येथे गेले आहे. लवकरच राजमुंद्री (गोदावरी पुष्करालू) येथेही पथक जाणार आहे. सिंहस्थाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा जीव महत्वाचा आहे. दुर्घटना टाळण्यासाठीच नियोजन केले असून त्याची प्रशासनाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. आम्ही सक्तीने वागत आहोत असे वाटून आमच्यावर अनेक घटकांकडून टीकाही होऊ शकते. मात्र, भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचे कुशवाह यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये पोलिसांची दैना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्रामच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना आताच 'ब्रह्मांड' दिसू लागले आहे. स्ट्रीट लाईट लागल्यानंतर मिळणारी वीज, चौकीमध्ये जेवणासाठी कमी पडणारी जागा, दिवसभर कोसळलेला पाऊस यामुळे पोलिस कर्मचारी आतापासूनच वैतागले आहेत.

साधुग्राममध्ये साधुमहंत आणि भाविकांचा वावर वाढल्याबरोबर पोलिस प्रशासनाने १०० ते २०० पोलिस कर्मचारी याठिकाणी तैनात केले. त्यांच्यासाठी प्लास्टीकच्या चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यात पायाभूत सु​विधा पुरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, यामुळे चौकीचा छोटा आकार आणखी कमी झाला. पोलिस चौकीसाठी अद्यापपर्यंत २४ तास वी​जपुरवठा करण्यात आलेला नाही. चौकीसाठी स्ट्रीट लाईटवरूनच कनेक्शन देण्यात आले असून, संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्ट्रीट लाईट लागले की चौकीत वीज मिळते. तोपर्यंत पोलिस कर्मचाऱ्यांना वीज मिळत नाही. परिणामी वॉकी टॉकीची बॅटरी चार्ज करण्यासाठी आडगाव पोलिस स्टेशन गाठावे लागत असल्याची खंत एका कर्मचाऱ्याने व्यक्त केली. संवादासाठी वॉकी टॉकी सुरू असणे गरजेचे आहे. बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास ही समस्या तीव्र बनू शकते, असा दावा एका महिला कर्मचाऱ्याने केला. प्रशासनाने बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांसाठी पोलिस चौकी एवढाच असारा उपलब्ध करून दिला आहे. बरेच पोलिस कर्मचारी बाहेर गावावरून आले असून जेवणासाठीही जागा मिळत नसेल तर काय बोलावे, असा प्रश्न एका कॉन्स्टेबलने उपस्थित केला.

सेक्टर ऑफिस वादाचे कारण

महापालिकेने १० ते १२ सेक्टर ऑफिससाठी जागा आरक्षित केली आहे. या ठिकाणी प्लंबर, वायरमन, स्वच्छता निरीक्षक अशा पायाभूत सुविधा पुरवणारे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. संबंधित सेक्टरमधून तक्रार आल्यास तिचे लागलीच निवारण व्हावे, असा प्रशासनाचा उद्देश आहे. हे सेक्टर ऑफिस सुरू होण्यासाठी अद्याप काही कालावधी लागू शकतो. सेक्टर ऑफिसप्रमाणे पोलिसांसाठी वेगळी व्यवस्था निर्माण होणे आवश्यक होते. पुरेसे जेवण आणि झोप नसल्यास बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडू शकतो, याचा प्रशासनाने विचारच केला नसल्याची खंत बहुतांश पोलिसांकडून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ई-निविदा प्रणालीला भ्रष्टाचाराची कीड

$
0
0

संगनमताने विशिष्ट ठेकेदारांनाच कामे

अशोक सूर्यवंशी, नाशिक

चिक्की घोटाळ्यामुळे सरकारी निविदा प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी ई निविदेचा अवलंब केला जात असला तरी त्यातही मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे पुढे येत आहे. म्हणूनच सरकारी निविदा प्रक्रियेचा पर्दाफाश करणारी ही मालिका आजपासून...

राज्य सरकारने तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या खरेदीसाठी ई-निविदा प्रणाली सक्तीची केली असली तरी प्रत्यक्षात ही सारीच प्रक्रिया भ्रष्टाचाराने बरबटलेली असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे ई निविदेचा दिखावा प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे विशिष्ट ठेकेदारांसाठी कुरणच बनला आहे.

सरकारच्या वेबसाईटवरील ई निविदांच्या नोंदीवरून या गोष्टी समोर आल्या आहेत. ई-निविदा प्रणालीसाठी त्यातील अज्ञानामुळे नवीन ठेकेदार निविदा भरण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे एकच ठेकेदार तीन वेगवेगळ्या नावाने निविदा भरून ते काम मिळवितो आणि त्यासाठी त्या वस्तुच्या मूळ किमतीच्या अनेक पटींनी रक्कम वसूल करीत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या दर कराराच्या पध्दतीतही अशाच प्रकारे तीन निविदा आवश्यक असतात. या निविदांच्या अटी शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांना आहे. मात्र, २०१२ नंतर उद्योग संचालनालयाच्या विकास आयुक्तांनी त्यात लक्ष न घातल्याने सचिव किंवा त्या दर्जाचे अधिकारी या निविदांमध्ये ठेकेदाराच्या हिताचे बदल करतात. यात या अधिकाऱ्यांचाही वाटा असतो, हे उघड सत्य आहे.

कारवाई नाही

उद्योग संचालनालयाच्या संकेतस्थळावर चार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे दिसून येते. मात्र, हेच ठेकेदार वेगळ्या नावाने पुन्हा निविदा सादर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक, सरकारची फसवणूक केल्याबद्दल या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई होणे आवश्यक होते. मात्र, अशी कुठलीही कारवाई न होता या ठेकेदारांचे सरकारबरोबर व्यवहार सुरूच आहेत.

नियमावली असावी

देशात टेंडर अॅक्ट किंवा प्रोक्युअरमेंट अॅक्ट नाही. मात्र, केंद्रीय दक्षता आयोगाने केंद्र सरकारचे खरेदी धोरण आपल्या वेबसाइटवर प्रसिध्द केले आहे. केवळ ई निविदा राबवून सरकारचे हित साधले जात नसल्याचे लक्षात आल्यानेच त्यांनी दर कराराची नियमावली प्रसिध्द केली आहे. ही नियमावली बंधनकारक नसली, तरी तिचा मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकार केला तरी अनेक खरेदी घोटाळ्यांना लगाम बसू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरात घसरण; खरेदीत उत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेअर बाजारात होत असलेल्या चढ-उताराने सोन्याचा भाव देखील चांगलाच खाली-वर होत आहे. गुरूपुष्यामृतच्या मुहूर्तावर भाव कमी झाला म्हणून ग्राहकांनी मुहूर्त साधत सोने खरेदी केली खरी परंतु, तीन दिवसाच्या सुटीनंतर सोन्याचा भाव २५ हजार ६०० रुपयांपर्यंत खाली आला. यामुळे सराफ बाजारात ग्राहकांनी खरेदी चांगलाच उत्साह दाखवला.

गुरूपुष्यामृत आणि विशेष सणवारांच्या दिवशी गुंजाभर का होईना ग्राहक सोने खरेदी करतात. १६ जुलैच्या गुरूपुष्यामृताच्या मुहूर्ताच्या दिवशी एक तोळा सोन्याचा भाव २६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होता. परंतु, सलग तीन दिवस सुटी आल्यानंतर शेअर बाजार बंद होता1 त्यामुळे बाजारात सोन्याच्या चढ-उतार फारसा आढळून आला नाही. मात्र सोमवारी सकाळी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याचा भाव कमीच होत गेला आणि दिवस अखेरीस सोन्याचा भाव २५ हजार ५६०च्या दरम्यान झाला. त्यामुळे शहरातील सराफ बाजारात सोने खरेदीला ग्राहकांचा चांगला उत्साह दिसून आला. काही ग्राहकांनी सोन्याचे दागिने खरेदी केले तर काही गुंतवणूकदारांनी सोन्याची वेढनी किंवा क्वॉईन खरेदी केली.

लग्नसराई संपल्यानंतर अधिकमासात चांदिच्या दागिना आणि भांड्यांच्या खरेदीत ग्राहकांनी चांगलीच खरेदी केली. तीन दिवसाच्या सुटीनंतर सोन्याचा भाव २५ हजार ४०० च्या जवळपास आल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. - योगेश नागरे, सराफ व्यावसायिक

गुरूपुष्यामृताच्या दिवशी ग्राहकांनी सोने खरेदीत चांगला उत्साह दाखविला होता. सोमवारीही ग्राहकांनी दागिन्यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद दिला. येत्या काही दिवसात असाच प्रतिसाद मिळेल असे वाटते आहे. - कन्हैय्या आडगावकर, सराफ व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुलैत डेंग्यूचे ३३ संशयित रुग्ण

$
0
0

दूषित पाणीपुरवठ्याने साथीचे आजारही बळावले; अतिसाराचे ६५४ रुग्ण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातील तळाच्या पाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया होत नसल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. यामुळे साथीचे आजार बळावले असून, दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान, डेंग्यूनेही डोके वर काढले असून, पंधरा दिवसात शहरात ३३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर, अतिसाराचे ६५४ रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात अनेक भागात होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्यामुळे साथीच्या आजारात वाढ झाली आहे. गंगापूर धरणाने तळ गाठल्याने मातीमिश्रित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. या पाण्यावर पुरेशी प्रक्रिया होत नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गढूळ पाणीपुरवठ्यामुळे १ ते १८ जुलैदरम्यान शहरात ६५४ अतिसाराचे रुग्ण आढळून आले आहेत. तापाचे ४३ तर काविळचे १० रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूनेही डोके वर काढले असून, १८ जुलैपर्यंत शहरात डेंग्यूचे ३३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १७ रुग्णांचे अहवाल आले असून, त्यात सात रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही धोक्यांची घंटा मानली जात आहे.

पाणीपुरवठा आणि वैद्यकीय विभाग मात्र आकड्यांमध्येच खेळत आहे. दवाखाने रुग्णांनी फुल झाले आहेत. असे असताना शहरात दूषित पाणीपुरवठा होत नसल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. अद्याप साथीच्या आजारांचा धोका नसल्याचा दावा वैद्यकीय आणि आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड, नाशिक साखर कारखान्यावर ‘टाच’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक पतपुरवठा अभावी संकटात आलेल्या नाशिक सहकारी साखर कारखाना आणि निफाड सहकारी साखर कारखान्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सहकारी बँकेने या कारखान्यांकडे असलेल्या थकबाकीपोटी मालमत्ता जप्त करून विक्री करण्याचा ठराव केला आहे. या दोन्ही कारखान्यांकडे जिल्हा बँकेचे १९० कोटींची थकबाकी असल्याने बँकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

निसाका आणि नाशिक कारखान्याचे ऊस गाळप आर्थिक पतपुरवठा अभावी वर्षभरापासून बंद आहे. जिल्हा बँकेचे निसाकाकडे १०५ कोटी तर नाशिक कारखान्याकडे ८४ कोटीची थकबाकी आहे. बँकेने दिलेले कर्ज फेडण्याची आर्थिक क्षमता दोन्ही कारखान्यांनी गमावली आहे. आर्थिक पत ढासळल्याने राज्य सरकारने सुद्धा जिल्हा बँकेच्या कर्जाला हमी नाकारली होती. त्यामुळे बँकेने नवीन कर्ज देण्यास नकार दिला होता. जिल्हा बँकेत सत्तांतर झाल्याने या दोन्ही कारखान्यांची अडचणी आणखी वाढल्या आहेत. सोमवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बँकेने वसुली वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या असून, त्यात या दोन्ही कारखान्यांकडे असलेले १९० कोटींची थकबाकी वसुलीचा विषय चर्चेला घेतला. त्यात सद्यस्थितीत कारखान्याकडून कर्जाची परतफेड होणे शक्य नसल्याने मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. बहुमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता या दोन्ही कारखान्यांची मालमत्ता जप्त करून ती विकण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या अडचणींत भर झाला आहे.

जिल्हा बँकेने एकीकडे या मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला असताना, बँकेने दुसरीकडे ऊस उत्पादकांच्या कर्जपुरवठा रकमेत वाढ केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता एकरी २५ हजारांऐवजी ३५ हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. यासंदर्भातील ठरावही मंजूर करण्यात आला. सोबतच संचालक माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर दूध संघाला सात कोटींचे कर्ज पुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

पुन्हा खरेदीचा घाट

खरेदीमुळे वादग्रस्त ठरलेल्याचा अनुभव असतानाही नव्या संचालक मंडळाने दीड कोटीत २१३ शाखांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी, नोटा मोजण्याचे मशीन खरेदी करणे अशा वादग्रस्त विषयांना हात घातला आहे. संचालक मंडळाने हे दोन्ही विषय एकमताने मंजूर केला आहे. तर जिल्हा बँकेच्या शाखांना रोकड कॅश पुरवठा करण्यासाठी स्वतःच वाहने खरेदीचा प्रस्तावही पुढील बैठकीत चर्चेला येणार आहे. त्यामुळे खरेदीवरून जिल्हा बँकेत पुन्हा रणकंदन पेटण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर बरसला वरुणराजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक दिवसांपासून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याला पावसाने सोमवारी सुखद दिलासा दिला. शहरातही दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठपर्यंत २२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान मुंबई-आग्रा हायवेवरील रासबिहारी शाळेजवळील बसस्टाॅप वाऱ्यामुुळे कोसळला.

रविवारी रात्रीपासून शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाने चांगला जोर पकडला. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले. पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे नागरिकांना वाटू लागल्याने आडबाजूला ठेवलेल्या छत्र्या आणि रेनकोट पुन्हा बाहेर काढण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. रविवारी सकाळी आठपर्यंत सुरगाण्यात सर्वाधिक ७२ मि.मी., इगतपुरीत ६७ मि.मी., पेठ येथे २९ मि.मी., त्र्यंबकेश्वर येथे २४ मि.मी., दिंडोरी येथे १६ मि.मी. तर नाशिकमध्ये ५. ५ मि.मी. पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला आखाड्यांचे स्वतंत्र ध्वजारोहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साध्वी त्रिकाल भवंता यांनी त्यांच्या आखाड्याच्या स्वतंत्र ध्वजारोहण कार्यक्रमाचे नियोजन आखले आहे. प्रमुख आखाड्यांच्या ध्वजारोहणाच्या एक दिवस आगोदर म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती भवंता यांनी दिली.

साध्वींना अंघोळीसाठी तसेच राहण्यासाठी वेगळी जागा देण्याची सातत्याने मागणी करणाऱ्या सर्वेश्वरी महादेव वैकुंठधाम मुक्तिद्वार आखाडा (परी)च्या प‌‌ीठाधीश्वर त्रिकाल भवंता यांनी आखाड्याचे स्वतंत्र ध्वजारोहण करणार असल्याचे जाहीर केले. प्रमुख अनी आखाड्यांचे ध्वजारोहण १९ ऑगस्ट रोजी असून त्यापूर्वी एक दिवस आगोदर म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे भवंता यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी उद्या मुंबईला जाणार असल्याचे भवंता यांनी सांगितले. ध्वजारोहण कार्यक्रमाचे निमंत्रण सर्वांना मिळणार आहे. यात प्रमुख आखाड्यांचाही समावेश असल्याची माहिती भवंता यांनी​ दिली. निमंत्रण दिल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून स्वागत केले जाईल, असे भवंता यांनी स्पष्ट केले. वेगळ्या घाटाच्या मागणीबाबत प्रशासन सकारात्मक विचार करीत आहे. साध्वींसाठी शक्य त्या सुविधा उपलब्ध करण्याकडे प्रशासनाचा कल असल्याचेही भवंता म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ रुपयांत होते कुंभमेळ्याचे आयोजन

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रशासन कोट्यवधी रूपये खर्ची घालते. वाढत्या आकड्यांमुळे सर्वसामान्यांना गरगरायला होते. आकड्यांचा हा आलेख चढता असला तरी आजही कुंभमेळ्याचे आयोजन अवघ्या २५ रूपयांत होते, असे सांगितले तर कोणालाही खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. देशभरात विखुरलेल्या साधूमहंतांना एकत्रित येण्यासाठी कोणतेही निमंत्रण नसते. संबंधित साधूमहंत २५ रूपयांत पंचाग खरेदी करतात. ग्रहदशांची परिस्थिती पाहून कुंभमेळ्याच्या ठिकाणांकडे कूच करतात. अगदी प्राचीन काळापासून सुरू असलेली ही पद्धत आजही विनासायस वापरली जाते.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये १३ आखाडे आ​णि शेकडो खालसे दाखल होतात. त्यांच्या मदतीला धार्मिक संस्थाही असतात. आखाडे, खालसे आणि धार्मिक संस्था मिळून किमान सात ते आठ लाख साधू-महंत एकाच ठिकाणी, एकाच वेळी जमा होणार आहेत. विशेष म्हणजे येथे येण्यासाठी त्यांना कोणतेही निमंत्रण धाडले जात नाही. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वदूर भागात पोहचलेले हे साधूमहंत फक्त पंचागाच्या आधारे एकत्र येतात. नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि अलाहाबाद असा हा प्रवास अनादी काळापासून सुरू आहे. यात कधीही खंड पडल्याचा इतिहास नाही. याबाबत माहिती देताना निर्मोही आखाड्याशी संबंधित कपिलदेवजी महाराज यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी किती पैसा खर्च होतो, असे विचारले असता गंमतीने म्हटले जाते की २५ रूपये. पूर्वी ही रक्कम २ पैसे होती. २ पैशांच्या ताकदीबाबत अनेक परदेशातील व्यक्तिंना आश्चर्य वाटत असल्याचे कपिलदास महाराजांनी सांगितले. आधुनिक विज्ञान, पॉश राहणीमान यांचा कितीही ढिंढोरा पिटला जात असला तरी ही संस्कृती आजही मजबूत होत असल्याचा दावा त्यांनी केला. १९७१ च्या कुंभमेळ्यात ६९ खालसे होते. ९१ मध्ये ही संख्या १५० इतकी होती. २००३ च्या कुंभमेळ्यात हा आकडा ३५० पर्यंत पोहचला तर आज ६५० पेक्षा खालसे आहेत. साधूमहंतांत इंजिनीअर, डॉक्टरांचा समावेश होत असून, यापेक्षा वेगळे काय सांगावे, असा दावा कपिलदास महाराज यांनी केला.

शस्त्र व शास्त्राचे ज्ञान

नागा म्हणजे सैनिक. हा सैनिक कोणत्या आखाड्याशी संबंधित आहे, हे महत्वाचे नसून तो अनादी काळापासून फक्त धर्म रक्षणासाठी झगडत आहे. आधुनिक काळात तुम्ही यास किती महत्त्व देता, हा भाग अलहिदा. मात्र, आमचे सैनिक लढले. आम्ही शस्त्र आणि शास्त्रात निपुण होतो, म्हणूनच तुम्ही टिकले आणि आपली संस्कृती सुध्दा. यातून कुंभमेळ्याचे महत्त्व आपण ध्यानात घ्यावे, असे आवाहन साधुग्राममध्ये वास्तव्यास असलेले कपिलदास महाराज करतात. नागा म्हणजे निर्वस्त्र नाही.

आपले आद्य देव निर्वस्त्र कधी फिरल्याची नोंद नाही. मग, आपण का निर्वस्त्र फिरणे योग्य नसल्याचा दावा त्यांनी केला. आखाडे उभारण्याचे काम स्वामी बालानंद यांनी केले. परकीय आक्रमणे रोखणे आ​णि साधूमहंतांना शस्त्रविद्येत निपूण करण्याचे काम त्यांनी केले. प्राचीन काळापासून सुरू झालेली ही परंपरा आजही सुरू असून, साधूमहंत शास्त्र आणि शास्त्रात निपुण असतात, असे कपिलदास महाराजांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन दिवसांचा अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रशासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या आणि नियोजनानुसार नसल्याच्या निषेधार्थ उपोषणास बसलेल्या गणेशदास महाराज यांनी प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आज दुसरा दिवस असून, दिलेल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सिंहस्थ सेलला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा महाराजांनी दिला.

धार्मिक संस्थांच्या जागेवर आखाड्यांकडून अतिक्रमण झाले. त्याची प्रशासनाने योग्य काळजी घेतली नाही. प्लॉटचे वाटप करताना कोणतेही निकष पाळले गेले नाहीत. तसेच आम्ही दिलेल्या सूचनांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत गणेशदास महाराज सोमवारी सकाळपासून उपोषणास बसले आहेत. गणेशदास महाराजांच्या भुतेश्वर मेंन्शन, शिवधाम हनुमान मंदिर आ​णि श्री हनुमान मंदिर अशा तीन संस्था असून, त्यांच्यासाठी सलग प्लॉट मिळावेत म्हणून अर्ज करण्यात आला. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून प्लॉट देताना एका संस्थेसाठी डी सेक्टरमधील ४२८ क्रमाकांचा प्लॉट दिला. तर, दुसऱ्या दोन संस्थासाठी २ एफ सेक्टरमध्ये ७७७ आणि ८०२ क्रमांकाचे प्लॉट उपलब्ध करून दिले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांसह आयोजक म्हणून आम्हाला त्रास होणार आहे. याबाबत प्रशासनाशी अनेकदा पत्रव्यवहार करूनही उपयोग झाला नसल्याने आपण उपोषणाला बसल्याचे गणेशदास महाराज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रशासनाकडून करण्यात येणारे आरोप महाराजांनी फेटाळून लावलेत. प्रशासनाला सलग प्लॉट देण्याबाबत लेखी कळवल्याचे पुरावे आपल्याकडे असून स्वतःची चूक झाकण्यासाठी अधिकाऱ्यांकडून हे प्रकार होत असल्याचा आरोप गणेशदास महाराजांनी केला.घडल्या प्रकारास सिंहस्थ सेल व त्याचे काम पाहणारे अधिकारी जबाबदार आहेत. उपोषणासाठी आपण तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधला नसून, तीन दिवसांनतर विश्व हिंदू परिषद किंवा आरएसएस सारख्या संस्थाच्या मदतीने आपण सिंहस्थ सेलला टाळे ठोकू, असा इशाराही महाराजांनी दिला आहे.

शॉप्सचा लिलाव

तपोवन परिसर आणि साधुग्राम परिसरात भाविकांच्या सुविधांसाठी उभारलेल्या शॉप्सचा लिलाव २९ जुलै रोजी करण्यात येणार आहे. साधुग्राम तसेच तपोवन परिसरामध्ये खाद्यपदार्थ, थंडपेय विक्रीचे, फळे, फुले विक्रीचे शॉप तयार करण्यात आले आहे. १ अॉगस्ट ते ३० ऑक्टोबरपर्यंत ही शॉप्स दिली जाणार आहेत. २९ जुलै रोजी महापालिकेत सकाळी ११ वाजता महापालिका सिंहस्थ कक्षात लिलाव प्रक्रिया राबवली जाणार असून, इच्छुकांनी महापालिकेच्या वेबसाईटवर जावून अटी-शर्ती वाचून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळा एक्सप्रेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्य अधिकाऱ्यांच्या डोक्यातील कुंभमेळ्याचे प्लॅनिंग दुसऱ्या फळीतील अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्याशिवाय, प्रशासनाला यश मिळवणे अवघड असून, त्याची खास जाणीव झालेल्या प्रशासनाने कुंभमेळा दौऱ्याचे आयोजन केले. एसटी महामंडळाची हरित बसच यासाठी आरक्षित करण्यात आली.

भाविकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यासह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे आदी उपस्थित होते. राजुरबहुला, विल्होळी, मुंबई-आग्रा महामार्गावरील ट्रक टर्मिनल, महामार्ग बसस्थानक, शाहीमार्ग, दिंडोरी वाहनतळ, निलगिरीबाग अंतर्गत बसस्थानक, आडगाव नाका वाहनतळ आदी विविध भागांना भेटी देऊन आढावा घेतला. मोठ्या वाहनतळाच्या भागात वैद्यकीय पथकासोबत दोन खाटांची व्यवस्था करावी. तसेच पाणी, वीज, टॉयलेट आदी सर्व सुविधा ३१ जुलैपर्यंत पूर्ण कराव्यात, असे डवले यांनी यावेळी सांगितले. दिंडोरी वाहनतळ परिसरात पाण्यासाठी पाईपलाइन आणि विद्युत खांब उभारण्याचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वाहनतळ व बसस्थानाच्या भागात भाविकांना सुलभतेने हालचाल करता यावी आणि त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही यादृष्टीने चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी कन्नमवार घाटासही भेट दिली. घाट परिसर स्वच्छ व सुशोभित करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, राज्य परिवहन महामंडळ, महावितरण, महानगरपालिका, पोलिस आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूर यात्रेसाठी जादा बसेस

$
0
0

मालेगाव : राज्य परिवहन आगारातर्फे मालेगाव येथून पंढरपूर यात्रेसाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस नव्या बसस्थानकावरून दररोज सोडण्यात येणार आहेत. पंढरपूरसाठी प्रवासभाडे प्रौढांसाठी ३९७ रुपये तर मुलांसाठी १९९ रुपये आहे. गावाच्या सरपंचांनी पुरेसे प्रवासी उपलब्ध करून दिल्यास आगारातर्फे त्या गावातून बसेस सोडण्यात येतील. मालेगाव शहर व तालुक्यातील सर्व भाविकांनी या यात्रा बसेसचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. तसेच, भाविकांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहंनांनी प्रवास करू नये, असे आवाहन आगार प्रमुख शेखर कापसे, स्थानक प्रमुख हेमंत पगार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा महागला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दरात तेजी आली असून, चालू हंगामात उन्हाळ कांद्याने प्रथमच अडीच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी कांद्याला कमाल २ हजार ६५२ रुपये प्रती क्विंटलचा उच्चांकी भाव मिळाला. सरसरी दर २ हजार ४०० रुपयांपर्यंत स्थिरावले.

आवक मंदावल्यानेच सध्या कांद्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. कांद्याच्या दरात तेजी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेत असताना यंदा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने कांद्याच्या एकरी उत्पादन मोठी घट झाली होती. त्यातच शेतात तयार होताना उन्हाळ कांद्याला गारपिटीचा फटका बसला असल्याने त्याच्या टिकवण क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे.

त्यामुळेच जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मंदावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकीकडे कांद्याचे भाव वाढत असले तरी मात्र एकरी उत्पादनात झालेल्या घटीमुळे शेतकऱ्यांना याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. दरम्यान लासलगाव बाजार समितीत मंगळवारी उन्हाळ कांद्याला कमाल २ हजार ६५२ रुपये, कमाल १ हजार ५०० रुपये तर सरासरी बाजारभाव २ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल मिळाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी कांद्याला कमाल २४००, किमान १५०० तर सरासरी २२०० रुपये भाव मिळाला होता. सुमारे ८६४५ क्विंटल कांदा आवक झाली होती.

वजनात घट

सध्या जो काही कांदा बाजार समित्यांमध्ये विक्रीस येत आहे तो तीन ते चार महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेला आहे. वातावरणाने त्याच्या वजनात घट होऊन टिकवण क्षमतेवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणत खराब झाला आहे. चाळीत साठवणूक केलेल्या मालात तीस ते चाळीस टक्क्यांहून अधिक घट झाल्याने बाजारभाव वाढूनही शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होताना दिसणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत धरणसाठ्यात वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात १६७ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे पावसाने इगतपुरी तालुक्यात हजारी गाठली आहे. या दमदार पावसाने धरणसाठ्यांमध्येही भरीव वाढ झाल्याची नोंद झाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील अती पावसाच्या दुसऱ्या टप्यात जोरदार मुसंडी मारली. गेल्या चोवीस तासात घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळुस्ते, वैतरणापट्ट्यात जोराचा पाऊस झाल्याने या परिसरातील शेती जलमय झाली आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासात विक्रमी १६७ मि.मी. पावसाची नोंद झाली. आजपर्यंत १०७६ मि.मी. पाऊस झाला आहे.

यावरून पावसाने हजारचा टप्पा पार केल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे. एकूण सरसरीच्या पावसाच्या तुलनेत ३२.१९ अशी पावसाची टक्केवारी आहे. तालुक्यातील भावली धरण परिसरात सर्वाधिक १७१ मि.मी., इगतपुरी परिसरात १६१, घोटी परिसरात १४० तर दारना धरण परिसरात ५६ असा दमदार पाऊस झाला आहे.

मनमाड, चांदवडमध्ये हजेरी

मनमाड, चांदवडसह परिसरात मंगळवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. मनमाड शहरात दीड तास पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाचा जोर चांगला असल्याने वाहतूक ही काही काळ ठप्प झाली. चांदवडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. खूप दिवसांनंतर पाऊस आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पावसाने ओढ दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गाला पावसाने दिलासा देत त्यांची चिंता काहीशी कमी केल्याचे चित्र होते. मनमाडमध्ये मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. पाल्यांना शाळेतून घरी आणण्यास पालकांची शाळेत एकच गर्दी उसळली होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर पाऊस आला याचे मात्र समाधान सर्वत्र पसरले होते.

त्र्यंबकमध्ये साचले पाणी

त्र्यंबक शहरातील रस्त्यांवर जागोजाग पाणी साचत असून पाण्याचा निचरा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शाहीमार्गावर पर्वणीच्या काळात असा प्रकार घडल्यास सर्वखर्च व्यर्थ ठरण्याची शक्यता असून, अद्यापही प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्र्यंबक येथे पावसाची मुसळधार सुरू आहे. सोमवारी दिवसभरात ४३ मि. मी. पावसाची नोंद झाली. एकूण ४६५ मि.मी. इतका पाऊस झाला. सततच्या पावसाने शेतीकामाला वेग आला असून, शिवारात खोळंबलेल्या आवण्यांना सुरुवात झाली आहे. दुबार पेरणीचे संकट दूर झाले आहे. सिंहस्थ कामांना मात्र पावसाने अडथळा निर्माण केला आहे. अर्थात पावसाची मध्यंतरीची प्रदीर्घकाळ विश्रांतीमुळे प्रशासनास वेळ मिळाला. अंतिम टप्प्यातील कामांची पूर्तता करताना चांगलीच धावपळ होणार असल्याचे दिसून येत आहे.

पाणी तुंबले

इंद्रतीर्थ परिसरात गटारींची कामे झालेली नाहीत. पावसात या परिसरात तुडूंब पाणी साचले असून, मेनरोड येथील अकोलकरवाड्यात पाणी शिरले आहे. जवळपास दोन ते अडीच फूट उंच पाणी घरात साचले. मेनरोडवर गटारींचे पाणी रस्त्यावर येत आहे. असाच प्रकार शहारतील आणखी भागात घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा असून, कोट्यवधींचा खर्च करून देखील पाण्याचा निचरा करणे साधलेले नाही.

धरणसाठ्यात वाढ

इगतपुरी तालुक्यातील धरणांनी तळ गाठला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे धरणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. दारणा व भावली धरणात कमालीची वाढ झाली असून, चोवीस तासात दारणा धरणात ८६२ दलघफू तर भावली धरणात १३१ दलघफू पाणी जमा झाले आहे. यावरून ही दोन्ही धरणे अर्ध्याच्या वर भरल्याचे सांगण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images