Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अंडरपास पुन्हा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री इंदिरानगर अंडरपास येथील बॅरिकेटिंग हलवून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासूनच तो पुन्हा बंद केला आहे. हा बदल नागरिकांच्या सोयीसाठीच असून, सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील गोविंदनगर येथील अंडरपास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, यामुळे इंदिरानगरकडून येणाऱ्या वाहनधारकांना गोविंदनगर किंवा मुंबई नाक्याकडे थेट जाता येत नाही. त्यांना लेखानगरमार्गे जावे लागते. या पर्यायी मार्गामुळे नागरिकांना दीड ते दोन किलोमीटरचा फेरा पडत आहे. म्हणूनच त्यास भाजप, मनसे पाठोपाठ आम आदमी पार्टीनेही विरोध दर्शविला आहे. हा अंडरपास लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी संघटना तसेच नागरिकांकडून होत आहे.

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी अंडरपासजवळ एकत्रित जमून निदर्शने केली. दूरदृष्टी नसलेले लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या चुकांचे परिणाम जनतेने का भोगावे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. या चौकात त्वरित सिग्नल यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. इंदिरानगर अंडरपास येथील वाहतूक समस्येबाबत जनहीत याचिका दाखल करू, असा इशारा जिल्हा समन्वयक जितेंद्र भावे, जगबीर सिंग, राजू आचार्य आदींनी दिला आहे. या अंडरपासची संकल्पना ज्यांनी मांडली, ज्यांनी प्लॅन तयार केला तसेच हा प्लॅन ज्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात उतरविला त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी 'आप'ने केली आहे.

अर्जाबाबत आक्षेप

अंडरपासबाबतचा आक्षेप नोंदविण्यासाठी पोलिसांनी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी १५० ते २०० अर्ज उपलब्ध करून दिले. मात्र, या अर्जावर हो किंवा नाही या दोन पर्यायांव्यतिरिक्त अन्य पर्यायच उपलब्ध नसल्याने नागरिकांनी अर्जावरच आक्षेप घेतला आहे. सायंकाळी नगरसेविका दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या अंडरपासच्या परिसरात एकत्रित जमले होते. येथील वाहतूक पोलिसांकडून त्यांनी अर्ज घेतले. या पोलिसांकडे अर्ज आहे हे कुणाला माहितही नव्हते. विशेष म्हणजे हजारो वाहनधारकांसाठी केवळ दोनशे अर्ज देण्यात आले. अर्जावर नागरिकांचा अभिप्रायच घेतला नसल्याने या अर्जातून काय साध्य होणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांच्या हितासाठीच काही कालावधीसाठी अंडरपास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ प्रायोगिक स्तरावर सध्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे. या बदलामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली नाहीच तर अंडरपास पुन्हा सुरू करता येईल. परंतु, नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. प्रकाश पेट्रोल पंपप्रमाणेच येत्या १५ दिवसांमध्ये लेखानगर मार्गावरही यूटर्नची व्यवस्था करण्यात येणार आहे.

- पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्टसिटीचा मार्ग महासभेकडून प्रशस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश करण्याचा प्रशासनाच्या प्रस्तावाला खो घालण्याच्याप्रयत्नात असलेल्या नगरसेवकांवर आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महासभेत डाव उलटवला. `तुम्ही अगोदर दोन बसेस चुकविल्या आहेत, आता स्मार्टसिटीच्या बसमध्ये बसायचे असेल तर बसा` असा सरळ इशारा गेडाम यांनी दिला. त्यामुळे योजनेला विरोध करण्याच्या तयारीत असलेल्या

नगरसेवकांनी आपल्यावर खापर नको म्हणून प्रस्तावाला होकार दिला. सोबतच इतर शहरातील चांगली कामे पाहण्यासाठी सदस्यांचे अभ्यासदौरे काढण्याचा निर्णयही सभेत झाला.स्मार्टसिटीवरून नगरसेवकांमध्ये संभ्रमावस्था असल्याने आयुक्तांनी प्रथम स्पष्टीकरण दिले. त्यात कमी वेळ मिळाल्याचे सांगत, या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर महासभेची मान्यता आवश्यक असल्याचे सांगितले. सोबतच आपण याआधी शहराचे नुकसान केल्याचे सागूंन मुंबई-नाशिक एक्सप्रेस हायवे, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरमध्ये नाशिकचा समावेश न झाल्याने नाशिकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्मार्टच्या बसमध्ये आता बसून घ्या, नंतर त्यातून उतरता येईल असे सांगून सदस्यांची हवा काढून घेतली. आयुक्तांनी स्पष्ट इशारा दिल्यानंतर विरोधाच्या पवित्र्यात आलेल्या नगरसेवकांनी मवाळ होत जेएनयूआरएमच्या आड प्रशासनावर ताशेरे ओढले.

लक्षवेधी मनसेच्या अंगलट

ध्वजारोहण सोहळ्यात झालेल्या अपमाननाट्यावरून महासभेत नगरसेवकांनी गदारोळ घातला. मात्र, घडल्याप्रकारावर मनसेने मांडलेली लक्षवेधी त्यांच्याच अंगलट आली. महापालिका नोडल एजन्सी असतांना, कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेने का केले नाही, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. तर पुरोहित संघाच्या विरोधात भूमिका घेण्याऐवजी नगरसेवक एकमेकांनाच भिडले. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला. तब्बल तीन तास चर्चा होवूनही काहीही निष्पन्न झाले नाही. महापौरांनीच झाले गेले विसरत यापुढचे ध्वजारोहण महापालिकेच्या वतीने होणार असून, सगळ्यांना ग्रीन पासेस देवू असे सांगत वादावर पडदा टाकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरसूल, ठाणापाड्यातील बाजारपेठा अद्यापही बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ हरसूल

दंगलग्रस्त हरसूल व ठाणापाडा येथे बाजरापेठा अद्यापही बंद असून, वातावरणात तणाव कायम आहे. परिसरातील बाजारपेठाही बंद असल्याने हातावर जगणाऱ्या कुटुंबांना उपासमार सोसावी लागत आहे. काही कुटुंबांनी शहराकडे स्थलांतर केले आहे.

हरसूल दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्यास भाग पाडणार असल्याचे विरोधी पक्ष नेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी हरसूल येथील जनतेस दिले. विखे पाटील यांनी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हरसूलला भेट दिली. दंगल आणि दगडफेक करणाऱ्यांवर दरोड्यासारखा अजामिनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. हे प्रकार थांबविले नाहीत तर आरोपींची संख्या वाढेल. त्यामुळे दंगल आणि लूटमार थांबवा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने परिसरातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच पोलिस पाटलांना केले आहे. शुक्रवारी परिसरातील ५८ गावांमधील सरपंच आणि पोलिस पाटलांची बैठकही बोलावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्रीजी हम यहाँ हैं!

$
0
0

खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक

'रहेने को घर नही, सोने को बिस्तर नही अपना खुदा है रखवाला' अशी काहीशी अवस्था अंगावरील कपड्यांवर जीव मुठीत घेऊन नाशिक येथे आश्रय घेतलेल्या हरसूल दंगलीत होरपळून निघालेल्या दंगलग्रस्तपीडीतांची असून, आपले जीव वाचविण्यासाठी मिळेल त्या साधनाने नाशिकला येऊन त्यांनी आश्रय घेतला आहे. मात्र या दंगलग्रस्त पीडीतांकडे लोकप्रतिनिधी, सरकारी यंत्रणाचे साफ दुर्लक्ष केले आहे.

सरकारी पातळीवर या पीडीतांची भेट कोणाही घेतलेली नाही. खिशात एक छदामही नसल्याने 'रहेने को घर नही, सोनेको बिस्तर नही' असा अवस्थेत जुने नाशिकमधील एका समाजमंदिरात तात्पुरती राहण्याची सोय झाली असली तरी चेहऱ्यावर दंगलीत सर्वकाही गमावून बसल्याची चिंता घेऊन भविष्यात कसे जगायचे या प्रचंड तणावाखाली आपल्या कुंटुंबियांसमवेत नाशिकला मुक्कामी आहेत. यंदाच्या रमजान ईद काळात आमच्यावर असे प्रसंग येईल, याची आम्ही कल्पनाही देखील केली नव्हती, अशी यातना हुंदके भरत आपल्या उजडे हुवे आशियानाची कहानी दंगलग्रस्तपीडीतांकडून ऐकावयास मिळत आहे.

शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहणारे व अनेकांना आर्थिक मदत करणारे हरसूलवासीय मुस्लिम बांधवांवर असा प्रसंग ओढावेल, अशी पुसटशी कल्पना कोणालाही नव्हती. नजरे समोरच उदारनिर्वाहची साधने व कष्टाच्या घामातुन साकारलेली घरे दगंलखोरांनी भस्मसात केली. महिला व लहान मुलांच्या मनात दगंलखोरांची इतकी दहशत घट्ट घर करुन गेलीय आहे की, ते हरसूलला पुन्हा न परतण्याचा ठाम निर्धार करुन घेतले आहे.

सरकारी पातळीवर व लोकप्रतिनिधींकडून त्यांचे सात्वन होऊन घरवापसीसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले असते तर दंगलग्रस्तांना थोडा का होईना धीर मिळाला असता; मात्र व्होट बँकला सदैव नजरे समोर ठेवून वावरणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी व त्यांच्या मर्जीप्रमाणे वागणारे सरकारी बाबूंना दगंलग्रस्तांचे अश्रू पुसण्यास कोण सांगणार. दंगल घडून चार दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी हरसूल व नाशिकमधील एकही लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेण्यात रस दाखविला नाही. पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी कुशवाह व खासदार हरीशचंद्र चव्हाण आदी हरसूलला शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेले; मात्र दगंलीत होरपळून निघालेला एकही मुस्लिम समाजतला सदस्य हरसूलमध्ये का नाही? असा सवालही त्यांचा दगंल पाहणी दौऱ्यात आला नाही.

त्यांच्या पुनर्वसनाबद्दल एकही शब्द न काढता दौरा अटोपता झाला हे चीड आणणारे आहे असे दंगलपीडीतांना वाटते. नुकसान भरपाई देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी हरसूल येथील दगंलग्रस्त बांधवांनी केली. 'पालकमंत्रीजी हम यहाँ है। हमे उजडे हुवे आशियाने मे कहाँ ढुंड रहे हो' अशी विनवणी करत मदतीला कोणी तरी येईल या प्रतिक्षेत दगंलग्रस्त पीडीत मुस्लिम नाशिक येथे मुक्कामी आहेत.

हृदयविकारामुळे दंगलपीडिताचा मृत्यू

हरसूल दंगलीत सर्वस्व गमावलेल्या ४० वर्षीय पीडिताचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे शुक्रवारी मृत्यू झाला. सय्यद सलाऊद्दीन जाऊद्दीन असे त्यांचे नाव आहे. हरसूलमधील दंगलीमुळे ते अडकून पडले होते तर त्यांचे कुटुंबीय नाशिकमध्ये आश्रयासाठी आले होते. समाजकंटकांनी नजरेसमोर सर्व काही लुटून नेल्यामुळे भविष्य अंधारात गेल्याने सय्यद दु:खात होते. यातच शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. नाशिकला त्यांच्या कुंटुबीयांना मृत्यूची माहिती देण्यात आली. कुंटुबीय हरसूलला रवाना झाले. सय्यद यांच्यावर हरसूल येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महासभेत रंगले अपमाननाट्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ध्वजारोहण सोहळ्यात झालेल्या अपमान नाट्यावरून महासभेत सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाल्याने त्यांनी चांगलाच गदारोळ घातला. पालकमंत्र्यांसह पुरोहित संघावर आगपाखड करीत विरोधकांनी थेट सत्ताधारी मनसेवरच या अपमानाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तब्बल तीन तासाच्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नसला तरी, नगरसेवकांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. अपमानाच्या विषयावर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, माकप आणि काँग्रेसच्या सदस्यांनी एकी करून सभागृहात भाजपला एकाकी पाडले. मनसेचेही बुमरँग झाल्याने महापौरांनी 19 ऑगस्टचे ध्वजारोहण महापालिकेच्या वतीने आयोजित करण्याची घोषणा केली.

सुदाम कोंबडे यांनी सादर केलेल्या लक्षवेधीवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपच्या सदस्यांनी थेट भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कोंबडे यांनी लक्षवेधीत वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दावरून भाजपचे संभाजी मोरूस्कर आणि सतीश कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. यावेळी दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला. माकपचे तानाजी जायभावे आणि सतीश कुलकर्णी यांच्यातही वाद झाला. सर्व नगरसेवकांनी या प्रकाराचे खापर पुरोहित संघावर फोडण्याचा प्रयत्न केला. पुरोहित संघावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी विलास शिदे यांनी केली. शिवाजी गांगुर्डे यानी पोलिस विभागावर याचे खापर फोडत बऱ्याच वर्षांनी भाजपला झेंडा फडकवण्याची संधी मिळाल्याचा टोला लगावला. कुणाल वाघ यांनी हा पोलिस अतिरेक असल्याचा आरोप केला. संभाजी मोरुस्कर यांनी विषयाचे भांडवल करू नका असे सांगत प्रशासनावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. प्रकाश लोंढे यांनी महापालिकेनेच ही प्रक्रिया राबवायला हवी होती असे सांगत नियोजनाचे खापर मनसेवर फोडले. तर, शिवाजी सहाणे यांनी आपली शेंडी पुरोहित संघाच्या हाता का दिली असा सवाल उपस्थित केला. आपल्याच नशिबी हा कुंभमेळा का असा सवाल करीत निधी देवूनही अपमान सहन करायचा का असा सवाल सुर्वणा मटाले यांनी उपस्थित केला.

एकच आंबा सडका

नगरसेवक शाहू खैरे यांनी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यावर निशाना साधला. आपल्याला निमंत्रण नसल्याचे सांगून पुहोरित संघ पूर्ण वाईट नाही. मात्र एका सडक्या आंब्यामुळे हा वाद झाल्याचे सांगितले. पर्वणीत आम्हाला घराबाहेर पडू नका, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आम्ही आता घरदार सोडून बाहेर रहायला जायचे का? असा सवाल केला. तुम्ही आम्ही नसणार तर सिंहस्थ कुंभमेळा काय कामाचा असा सवाल त्यांनी केला.

ठाकरेंचे अनुयायी!

शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी मनसेलाच आरसा दाखवला. सत्तेत असूनही आपल्याला आपलाच हक्क मागावा लागत आहे. स्वतःच्या सन्मानावर लक्षवेधी मांडणे दुर्दैवी आहे. तुम्ही आम्ही ठाकरेंचे अनुयायी आहोत. त्यामुळे सन्मानाची भिख मागायची नसते, ती मिळवायची असते असा टोला मनसेला लगावला. आपला निधी देवून वेळेवर आलेले टिकोजीराव आपल्याला शिकवणार का? असा सवाल त्यांनी केला. .

मनसेची संभ्रमावस्था

मनसेच्याच सुदाम कोंबडे यांची लक्षवेधी असताना गटनेते अनिल मटाले यांनी वेगळी भूमिका घेतली. मानापमान नाट्य सुरूच असल्याचे सांगून या वादावर पडदा टाका अशी भूमिका गटनेत्यांनी घेतली. महापौरांनीही हा विषय गंभीरतेने न घेता मानापमान राजकारण सुरूच असल्याचे सांगत लक्षवेधीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सफाई कर्मचारी भरती

महापालिका हद्दीतील साफसफाईची कामे करून घेण्यासाठी मानधनावर किंवा रोजदारींवर सफाई कामगारांची पदे भरण्याच्या यशवंत निकुळे यांचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आयुक्तांनी सादर करायला हवा, असा आग्रह सदस्यांनी धरला. मात्र आयुक्तांनाच असा प्रस्ताव सादर करायला सांगत स्थानिक भूमिपुत्रांचा यात समावेश करावा, अशी अट घातल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हा अशासकीय ठराव असल्याचे सदस्यांनी सांगूनही महापौरांनी या ठरावाला मंजुरी प्रदान केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदास दिनाची पुन्हा उपेक्षाच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद यांच्या संयुक्त विद्यामाने महाकवी कालिदास कलामंदिरात 'कालिदास दिन' साजरा करण्यात आला. मात्र, महापालिका प्रशासन, रसिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जीवन सोनवणे म्हणाले की, कालिदास कलामंदिर हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. ते व्यवस्थित कसे राहील, यासाठी प्रयत्न केले जातील. कलाकार आणि महापालिका यांच्यात समन्वय साधण्यासाठी महिन्यातून एकदा बैठक आयोजित केली जाईल. कार्यक्रमाची सुरुवात आर. एम. ग्रुपच्या कलाकारांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर राजेश शर्मा आणि तेजस्विनी गायकवाड या कलाकारांनी 'फायनल ड्राफ्ट' नाटकातील काही प्रसंग सादर केले. रेखा आणि अविनाश यांनी मराठी चित्रपटातील गाणी सादर केली. प्रशांत हिरे व त्यांच्या ग्रुपने नाट्यअभिवाचन सादर केले. यात प्रशांत हिरे, विजय जगताप, श्रीकांत वाखारकर, सुमित जाधव, पल्लवी पटवर्धन, लक्ष्मी पिंपळे, आसावरी वाणी यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला आयुक्त प्रवीण गेडाम, महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. नवनिर्वाचित व्यवस्थापक प्रकाश साळवे यांना दोन दिवस आधी कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी कसेबसे नियोजन केले.

अखेर फोटो लागला

कालिदास कलामंदिरात महाकवी कालिदासांचा फोटो नसल्याचे वृत्त मटाने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने गुरुवारी कलामंदिरात फोटो लावला. या वृत्तामुळे प्रशासनाला जाग आल्याची चर्चा रंगकर्मींमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीबाबत शासन तोंडघशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण समितीच्या निर्मितीवरून मागील दोन महिन्यांपासून शासन आणि महापालिकेत सुरू असलेल्या संघर्षाला हायकोर्टाने पूर्णविराम दिला आहे. शिक्षण समितीसंदर्भात राज्य सरकारने काढलेले दोन्ही आदेश रद्दबातल ठरवत तत्काळ निवडणूक घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सोबतच न्या. अभय ओक यांच्या पीठाने राज्य सरकारवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. कोर्टाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने राज्य सरकार तोंडघशी पडले आहे.

शिक्षण समिती सदस्य संजय चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.हायकोर्टात सुनावणी होत असताना शिक्षण समिती प्रकरणात अध्यादेश काढणे राज्य सरकारला चांगलेच महागात पडले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर शिक्षण समिती सभापतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असतांना ३ जुलै रोजी राज्य सरकारने आदेश काढत निवडणूक स्थगिती केली होती. तर ८ जुलैला पुन्हा नवीन आदेश काढत समिती गठीत करण्याचा आदेश निलंबित केला होता. नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढलेले आदेश न्यायालयाने गंभीरतेन घेत, निवडणूक प्रक्रिया सुरू असतांना स्थगिती देता येते का, असा सवाल राज्य सरकारला विचारला. सरकारी वकीलांना आपली बाजू मांडता न आल्याने अखेर ओक यांनी शिक्षण समिती सदस्य निवड आणि सभापती निवडीचा अनुक्रमे ६३ व ६४ क्रमाचे ठराव निलंबित करण्याचा नगरविकास विभागाचे आदेशच रद्दबातल केले आहे. सोबतच तत्काळ निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

शासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आतातायी निर्णयावरही कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना आदेश का काढले, असा सवाल करीत तुम्ही कोर्टाच्या निर्णयांना ओव्हरब्रिज का करता, असा जाब कोर्टाने विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणात शासनाची गोची झाली आहे. तर शिक्षण समिती सदस्यांना दिलासा मिळाला आहे.

आमदारांचा आग्रह नडला

नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या हट्टामुळे या प्रकरणात शासनावर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. सानप व संजय चव्हाण यांच्याअतंर्गत भानगडीत शासनाने थेट सानप यांच्या सांगण्यानुसार निर्णय घेतले. त्यामुळे या प्रकरणात राजकारण असल्याच्या निर्णयाप्रत कोर्ट पोचले. त्यातून चव्हाण यांना दिलासा मिळाला. तर दोघांच्या भानगडीत शासन व अधिकाऱ्यांनाही कोर्टाचे ताशेरे सहन करावे लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडीचा वाढता त्रास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्रिमूर्ती चौक माध्यमिक विद्यालय, पवननगर चौक, शिवाजी चौक त्याचबरोबर उत्तमनगर महाविद्यालय व शाळेलगतच्या भागात शाळा सुटण्याच्या वेळी ट्रॅफीकची समस्या डोके वर काढते. लहान मुले रस्त्यावर सैरावैरा धावतातच परंतु, रस्त्यात मोकाट जनावरेही ठाण मांडून बसलेली असल्याने अपघाताच्या शक्यतेत भरच पडत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी तरी पोलिस असावा अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

सिडको परिसराचा विस्तार पाहता या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील प्रत्येक चौकात सध्या वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांबरोबरच महापालिका, सिडको प्रशासन यांनी पुढाकार घेऊन परिसरातील चौकाचौकातील वाढलेल्या अतिक्रमणालाही आळा घालण्याची गरज आहे. पवननगरसारख्या चौकात रोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होते. पवननगर स्टॉप ते दिव्या अॅडलॅब या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफीक जॅम असते. पवननगर भाजीबाजाराच्या बाहेर असलेले वाहनतळ, फेरीवाले यांच्यामुळे वाहतुकीची अधिक कोंडी होते. दुसरीकडे रस्त्यात मधोमध उभ्या असलेल्या रिक्षांमुळेही वाहतुकीस खोळंबा होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मानवी नात्यात उतरली शिरखुर्म्याची गोडी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

पारंपरिकच पण नवाकोरा पोशाख... सर्वत्र चैतन्य पेरणारा त्यावरील अत्तराचा दरवळ... मानवी नात्यात उतरलेली शिरखुर्म्याची गोडी अन् ईद मुबारकच्या शुभेच्छांनी भारून गेलेले अबालवृध्द अशा प्रसन्न आणि उत्साहप्रिय वातावरणात शनिवारी रमजान ईद साजरी करण्यात आली.

ईद उल फित्रनिमित्त सामूहिक नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची पावले सकाळपासूनच एतिहासिक शाहजहॉनी ईदगाहकडे वळू लागली. सकाळी सव्वादहाच्या सुमारास ईद-उल-फित्रचे शहराचे खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब अशरफी यांच्या नेतृत्तवाखाली (इमामत) सामूहिक नमाज पठण झाले. सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी त्याचे सूत्रसंचालन केले. ईदचा खुतबा, दरुद व सलामचे मुख्य धार्मिक कार्यक्रम यावेळी उत्साहात पार पडले. यावेळी देशाची प्रगती, एकात्मता वाढ आणि पावसासाठी विशेष दुवा पठण करण्यात आले. अल्लाहताअलाने ही दुवा मान्य करावी यासाठी बांधवांनी आमिन-आमिन शब्द उच्चारून साकडे घातले. शत्रुत्वाला मित्रत्वात परावर्तीत करण्याचे सामर्थ्य रमजान ईदमध्ये आहे. म्हणूनच अबोला असलेल्या व्यक्तिला ईद मुबारकचे अलिंगण देऊन प्रेमभावना वाढीस लावण्याची प्रेरणा बांधवांना मिळाली.

धर्मगुरूंचा मानवतेचा संदेश

इस्लाम धर्म मुस्लिमांपुरता मर्यादीत नसून, समस्त मानवजातीच्या कल्याणसाठी आहे. इस्लामला भेदभाव मान्य नसून सर्वसमान असल्याची भावना रुजवितो. तुम्ही ज्या देशात राहतात तोच देश तुमचा मानून देशप्रेम व भक्तीची शिकवण इस्लाम देतो. मुस्लिमांनी इस्लामची मानवतेची शिकवण आचरणात आणून गोरगरीब, निराधारांना सदैव मदतीचा हात देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, असा संदेश मुस्लिम धर्मगुरुंनी दिला. शहरातील हजारो मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.

नमाज पठणानंतर बांधवांनी एकमेकांना अलिंगण देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाहवरून घरी परतणाऱ्या बांधवांनी गोरगरिबांना आर्थिक दान केले. शहरातील दरगाह शरीफ व कब्रस्तानात जाऊन दुवा पठण केले. लहान मुलांना मोठ्यांकडून रोख स्वरुपातील ईदी मिळाली तर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मानवतेच्या दुतांना शिरखुरम्याचा आस्वाद मिळाला. नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहासह शहरातील विविध मशिदीतही ईदचे नमाज पठण झाले.

महापालिकेतर्फे शुभेच्छा

ईदगाह मैदानावर महापालिका तसेच प्रशासनाच्या वतीने महापौर अशोक मुर्तडक, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, आमदार देवयानी फरांदे यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

तपासणीनंतरच प्रवेश

शाहजहॉनी ईदगाहवर कडक सुरक्षा व्यवस्थेत नमाज पठण झाले. ईदगाहच्या प्रवेशद्वारावरच व्हिडियो शूटिंग केले जात होते. प्रत्येकाची कसून तपासणी करूनच त्यास मैदानावर सोडण्यात येत होते. २०१४ च्या रमजान ईदवेळी एक दिवस आधीच अतिवृष्टी झाल्याने ईदगाहवरील नमाज पठण रद्द करण्यात आले होते. मात्र यावेळी पावसाने हजेरी लावण्याची शक्यता गृहीत धरून पत्र्याचे शेड असलेला मंडप उभारण्यात आला होता.

सेल्फीची येथेही जादू

नवीन कपडे परिधान करून आलेली बच्चेमंडळी आणि तरुणाईला सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. नमाजपठणानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात असतानाच अनेकांनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.

सातपूरमध्येही उत्साह

सिडको अणि सातपूरमध्ये देखील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. त्यामध्ये बालगोपाळांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक अशा सर्वांनीच ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. सिडको व सातपूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरिक्षक दिनेश बर्डेकर, मनोज करंजे यांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

शिरखुर्म्याच्या आस्वादाचे आमंत्रण

स्नेहाचे नाते अधिक घट्ट व्हावे यासाठी मुस्लिम बांधवांनी परिचितांना शिरखुरम्याचा आस्वाद घेण्याकरीता निमंत्रित केले. त्यामुळे दिवसभर बांधवांच्या घरी परिचितांची ये-जा सुरू होती. येईल त्या प्रत्येकाला आग्रहपूर्वक शिरखुरमा तसेच गुलगुल्यांचा आस्वाद घेण्याची ‌विनंती केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाच्या मार्गात विहिरीचा अडसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

महापालिकेने बारा वर्षांपूर्वी सिहंस्थ कामात उंटवाडीजवळ गोविंदनगर, मुंबई-आग्रा हायवेकडे जाण्यासाठी पुलाची निर्मिती केली. गेल्या काही महिन्यांपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. गोविंदनगरकडे जाणाऱ्या पुलावरील दुसरी बाजू विहिरीच्या अडसरमुळे बंद आहे. यामुळे ही विहीर हस्तांतरीत करून पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

महापालिकेचे रस्त्यांची कामे अनेकविध कारणांनी गाजली आहेत. रस्त्यांमध्ये येणाऱ्या वृक्षांचीही मोठी अडचण होत आहे. महापालिकेने गेल्या सिंहस्थात मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाण्यासाठी उंटवाडीजवळ पुलाची उभारणी केली होती. त्यावेळी रस्त्यांसाठी जागा हस्तांतरीत नसल्याने पूल झाला परंतु, रस्ता झालाच नाही. यात गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेने गोविंदनगरकडे जाणारा पूल वाहनांसाठी खुला केला. परंतु, पुलाची दुसरी बाजू बंद आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूकडील भागात एक पडकी विहिरीचा काही भाग येतो. यामुळे पूल बंद स्थितीत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पुलाला लागून येत असलेली विहीर हंस्तातरीत करण्याचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. पुलाचे काम पूर्ण होतानाच बांधकाम विभागाने विहिरीचे हंस्तारण का केले नाही, असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत.

बारा वर्षांनंतर महापालिकेने मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाणारा उंटवाडी पूल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, विहिरीमुळे एक बाजू बंदच आहे. यात महापालिकेने विहिरीचे हस्तांतरण करून पुलाचे दुसरी बाजू देखील वाहतुकीसाठी खुली करण्याची गरज आहे.

- वैभव देवरे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याचे पाच लाख रुपये लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड येथील साखर व्यापाऱ्याची पाच लाखाची रोकड चोरीस गेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुभाषरोड येथील साखरेचे घाऊक व्यापारी सुनील कन्हैयालाल येवाणे यांच्या मालकीचे शिवम ट्रेडर्स हे साखरेचे दुकान आहे. त्यांनी १७ जुलैला दुकानातील मालाची विक्री करून आलेले पैसे स्वमालकीच्या स्कुटी गाडीच्या सीटखाली ठेवले आणि रात्री साडेआठच्या सुमारास ते घरी निघाले. त्यांनी गाडी नाशिकरोडच्या फेन्स प्रोव्हिजन किराणा दुकानासमोर उभी केली. किराणा घेऊन परतल्यावर डिकीतील पाच लाखाची रोकड चोरीस गेल्याचे उघड झाले. बॅग लिफ्टिंगचे प्रकार वाढीस लागल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌शिककरांनी साधली सुटीची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

शनिवार व रविवार अशी दोन दिवस सुटी जोडून आल्याने शनिवारी नाशिक येथे साधुग्राममध्ये भाविकांची विविध साधू आणि महंत यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. तसेच परिसरातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी गर्दी उसळली होती. साधुग्राम येथील हिमालय बाबांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या अखंड ज्योत पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी झाली होती. ही अखंड ज्योत भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

परिसरातील सर्वच हॉटेल व लॉज फुल झाली आहेत. पोलिस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्‍था राखण्यासाठी खूपच लक्ष द्यावे लागत आहे. रामकुंडावरील बारा वर्षांनी दर्शनासाठी खुले झालेले गंगा गोदावरी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. नाशिककरांना आता कुंभमेळा सुरू झाला याचा अनुभव येत आहे. परिसरातील कपालेश्वर, काळाराम मंदिर, सीतागुफा, भक्तिधाम, मुक्तिधाम, सोमेश्वर, बालाजी मंदिर आणि नवश्या गणपती आदी ठिकाणी भाविकांची चांगलीच गर्दी झाली आहे.

रामकुंड परिसरातील पार्किंग फुल्ल

नाशिकच्या रामकुंड परिसरातील वाहन पार्किंग फुल झाली होती. सकाळपासून स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गंगाघाटाला जणूकाही यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. साधुग्रामचे रस्तेही गर्दीने फुलले आहेत. लहान व मोठ्या दुकानदारांची मात्र चांगलीच चांदी झाली. विविध माळा, फुगेवाले आणि विविध वस्तू विकणाऱ्यांचा धंदा तेजीत आहे.

तपोवनात भाविकांचा मेळा

तपोवनात जागा ताब्यात घेणे आणि त्यावर तंबू उभारण्याचे साधुमहंताची काम जोरात सुरू आहे. साधुमंहताच्या या गर्दीत भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र शनिवारी दिसून आले. साधुग्रामला पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुटीची मजा लुटण्यासाठी फिरायला जायचे टाळून अनेक कुंटुबीयांनी तपोवन तसेच साधुग्राममध्ये धाव घेतली. रिकाम्या प्लॉटमध्ये बस्तान मांडलेल्या साधुमहंतांना बघण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः लहान मुलांसमवेत एकच गर्दी केली. स्वतःच परिसराची साफसफाई करणारे साधु, कोणी स्वयंपाक करणारे, तर कोणी अंगारे धुपारे देणारे साधु महंत बघण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारी भाविकांच्या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुरक्षा व्यवस्थेत समन्वय गरजेचा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कुंभमेळा काळात रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेत रेल्वेसुरक्षा दल आणि पोलिस यांनी योग्य समन्वय राखावा, एकाच ठिकाणी प्रवाशांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना रेल्वेसुरक्षा दलाचे महानिर्देशक आर. आर. वर्मा यांनी केली.

दिल्लीहून आलेल्या वर्मा यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकातील कुंभमेळ्याच्या सुरक्षाव्यवस्थेचा शनिवारी आढावा घेतला. भुसावळचे आरपीएफचे अधिकारी सी. एम. मिश्रा यांनी त्यांना मानवंदना दिली. रेल्वेचे भुसावळचे डीआरएम महेशकुमार गुप्ता, मध्य रेल्वेचे महानिरिक्षक ए. के. सिंग, अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक प्रणव कुमार, नाशिकचे पोलिस आयुक्त एस. जग्गनाथन, उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, आरपीएफचे पोलिस अधिक्षक अनंतकुमार रोकडे, कुंभ अधिकारी देवदास दत्ता, सचिन गणेर, वरिष्ठ मंडळ अभियंता पवन पाटील, नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक एम. के. सक्सेना, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर भाबळ, बी. डी. इप्पर, नारायण न्याहाळदे आदी उपस्थित होते. कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या आणि १२० कॅमेऱ्यांचे संचलन करणाऱ्या टीव्ही कक्षाचे उद्घाटन वर्मा यांनी केले. या कक्षातून स्थानकात चोवीस तास लक्ष ठेवता येते. वर्मा यांनी अधिकाऱ्यांसमवेत सिन्नरफाटा भागातील सुरक्षेचा आढावा घेतला. पोलिस आयुक्त जग्गनाथन यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

रेल्वेसुरक्षा दलाच्या महानिर्देशकांच्या सूचना

मालधक्का येथे येणा-या जाणा-या प्रवाशांची विश्राम व्यवस्था करा. लाकडीएवजी जाळीचे संरक्षण कठडे उभारा. भाविकांच्या सुरक्षेशी तडजोड करू नका. कुंभकाळात सर्व पातळ्यांवर योग्य व प्रभावी समन्वय ठेवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजार भाविकांना मिळणार निवारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यासाठी शहरात आलेल्या भाविकांची राहण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी लायन्स क्लब ऑफ नाशिक (कार्पोरेट) ने पुढाकार घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या एक हजार भाविकांना लायन्स क्लबतर्फे निवारा उपलब्ध करून दिला जात आहे.

कुंभमेळा हा भाविकांबरोबरच व्यावसायिक, उद्योजक सर्वांसाठीच पर्वणीचा काळ आहे. अनेकांनी या काळात नवनवीन उद्योगव्यवसायात गुंतवणूक करून आपले खिसे भरण्यावर लक्ष केंद्रित केले असताना दुसरीकडे काही सामाजिक संस्था केवळ समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने व शहरात आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, याचा विचार करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक लायन्स क्लब ऑफ नाशिक(कार्पोरेट) म्हणता येईल. मागील कुंभमेळ्यातही या संस्थेमार्फत अशा प्रकारची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती.

शहरात येणाऱ्या सर्वच भाविकांना राहण्यासाठी हॉटेल्समधील रुम्स बुक करणे परवडत नाही. त्यामुळे ते रस्त्यावर राहतात. पैशांअभावी त्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. यातून पुन्हा आरोग्य, बदलते हवामान याचा परिणाम त्यांच्यावर दिसून येतो. हे टाळण्यासाठीही या संस्थेने पुढाकार घेतला आहे. आडगावरोडवरील काही बिल्डिंग्जमध्ये या भाविकांची राहण्याची सोय केली जाणार असून, त्यांना गाद्या, पाण्याची व्यवस्था आदी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संधीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी ९८२२०९३८१४ या क्रमांकावर सागर बोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या भाविकांचा विचार करून ही योजना राबविण्यात येत आहे. भाविकांसाठी ही योजना नक्कीच उपयुक्त असेल, अशी खात्री आम्हाला वाटते.

- चंद्रशेखर सोनवणे, अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ नाशिक कार्पोरेट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कुंभमेळ्यावर लोकराज्यचा विशेषांक

$
0
0

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याचे औचित्य साधून लोकराज्यने जुलै २०१५ चा अंक कुंभमेळा विशेषांक म्हणून प्रसिद्ध केलाआहे. यामध्ये नाशिकचे धार्मिक महत्त्व, कुंभमेळयाचे पौराणिक महत्त्व, नाशिक परिसरातील पर्यटनस्थळे, कुंभमेळाची तयारी, तपोभूमी नाशिक, आखाडे आणि खालसे, महापर्वातील शाहीस्नान यांचा समावेश केला आहे. तज्ज्ञ लोकांनी या अंकासाठी लेखन केले आहे. ७६ पृष्ठांचा हा अंक सर्वत्र उपलब्ध झाला असून, किंमत दहा रुपये आहे. जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत राज्यातील झालेल्या कामाची पाहणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्याचा विशेष वृत्तांत समाविष्ट करण्यात आला आहे. राज्यातील नागरी भागातील स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने विभागवार कार्यशाळा होत आहेत. त्याबाबतचा वृत्तांत समाविष्ट करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामसृष्टीवरून फरफट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामसृष्टीतील २५ खालशांच्या जागेवर अद्याप तोडगा निघालेला नाही. रामसृष्टी प्रकल्पात कोणतीही पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार नसल्याच्या मुद्द्यावर प्रशासन ठाम असून, रामसृष्टीतून स्थलातंरीत करणार असाल तर प्रशासनाच्या ताब्यातील प्लॉट खालशांसाठी देण्याची मागणी विविध आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

तपोवनातील रामसृष्टी प्रकल्पात आखाडा परिषदेने २० ते २५ खालशांसाठी जागा नि​श्चित केली आहे. जागा ताब्यात मिळताच खालसा प्रमुखांनी आपापल्या जागांच्या सिमा ​निश्चित केल्या असून, इतर ठिकाणी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा रामसृष्टी प्रकल्पात देण्यात याव्या, अशी मागणी केली जात आहे. याबाबत माहिती देताना महापालिकेचे मिळकत विभागाचे व्यवस्थापक बी. यू. मोरे यांनी सांगितले की, ही जागा पूररेषेत येते. तसेच या जागेचा साधुग्राममध्ये समावेश नसल्याने इथे कोणत्याही सुविधा पुरविल्या जाणार नाहीत. प्रशासनाने योग्य नियोजन करून सर्व प्लॉट विकसित केले असून, निर्धारीत केलेल्या जागेतच खालशांना स्थलांतरीत व्हावे लागेल. याबाबत त्यांनी कुंभमेळ्याचे व्यवस्थापक विश्वभंरदास महाराज यांच्याशी चर्चा केली. या जागा सदर खालशांना कोणी दिल्या ते पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे विश्वंभरदास महाराज यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आखाड्याचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. रामसृष्टीतील जागा सोडून खालशांनी जायचे कोठे असा प्रश्न निर्मोही अनी आखाड्याचे महासचिव शामसुंदरदास महाराज यांनी उपस्थित केला. प्रशासनाने प्लॉटची संख्या वाढवली. तसे प्रेझेंटेशन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ४०० प्लॉट प्रशासनाने स्वतःच्या ताब्यात ठेवले. निर्मोही आखाड्याशी संबंधित ६० खालसे असून, त्यातील २८ खालशांना अजून जागा मिळालेली नाही. त्यातच रामसृष्टीतील २५ आखाड्यांना स्थलांतरीत करण्यात आले तर त्यांना बसवायचे कोठे असा प्रश्न शामसुंदरदास यांनी उपस्थित केला. आखाड्यांना कुंभमेळ्यात महत्त्वाचे स्थान असते. तेच यापासून दूर झाले तर, कुंभमेळ्याची फजिती उडण्यास वेळ लागणार नाही, असा दावा त्यांनी केला. रामसृष्टीतील खालशांना स्थलांतरीत करायचे असल्यास प्रथम प्रशासनाने त्यांच्या ताब्यातील २०० प्लॉट आम्हाला द्यावे, अशी मागणी महासचिव शामसुंदरदास यांनी केली.

अद्यापपर्यंत १२५ खालशांना जागेचे वाटप होऊ शकलेले नाही. दुसरीकडे प्रशासनाकडे पुरेशी जागा उपलब्ध असल्याचे दिसत नाही. झाडांची झाटणी झाली नसून, आखाड्यांसमोरच तंबू उभारण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

गुरुपौ​र्णिमेच्या आतच प्रशासनाला यावर तोडगा काढावा लागेल.

- वैष्णवदास महाराज, महासचिव, दिगंबर अनी आखाडा

या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही कुंभमेळा व्यवस्थापकासह इतर महंताना याविषयी विनंती केली असून, त्यांनी निर्धारीत जागेतच खालशांनी स्थलांतरीत होणे अपेक्षित आहे.

- बी. यू. मोरे, मिळकत व्यवस्थापक, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशोभीकरण कामांना ‘हायपॉवर’ची प्रतीक्षा

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

केशरी रंगाचे स्वागत स्तंभ तसेच, लक्ष्मीनारायण पुलाची आकर्षक सजावट अशी साधुग्रामशी संबंधित महापालिकेची सुमारे ६० लाख रुपये खर्चाची सुशोभीकरणाची कामे प्रलंबित आहेत. आजवर जवळपास ११०० कोटी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेला उच्चाधिकार समितीची बैठक पार पडल्याशिवाय या कामांना सुरुवात करता येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये तीन लाख २० हजार साधुमहंत दाखल होणार आहेत. भाविकांचा आकडा तर एक कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तपोवनातील ३२५ एकर जागेत साधुग्राम वसवले असून, यातील अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. कुंभमेळा काळात भक्तिमय वातावरण असावे, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी कलादिग्दर्शक आनंद ढाकीफळे यांच्याकडून स्वागतस्तंभाचे डिझाईन तयार करून घेतले होते. हे स्वागतस्तंभ साधुग्रामसह शाहीमार्गाच्या दुतर्फा उभे केले जाणार आहेत.

रामकुंड परिसरात सुध्दा ढाकीफळे यांनी डिझाईन केलेल्या कलाकृती साकरल्या जात आहेत. ढाकीफळे यांनी तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलासह मंदिरासमोरील चौकाच्याही सुशोभीकरणासाठी नेटकी डिझाईन तयार करून दिले आहे. ६१२ स्वागतस्तंभ आणि पुलाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ६० लाख रुपये खर्चाचे प्राकलन तयार करून प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. साधुग्राम व तपोवनातील मुख्य रस्ता, तसेच औरंगाबादरोडकडून संत जनार्धन स्वामी आश्रमाजवळ आणि पुणेरोडकडून येणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीनारायण पुलाजवळ २० फूट उंचीचे प्रवेशद्वार उभे करण्याचे काम सध्या सुरू आहे.

महापालिकेने सुशोभीकरणाच्या कामांचा पाया रोवला असला तरी या कामास अद्याप उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळालेली नाही. समितीची बैठक पार पडून मंजुरी मिळण्याची महापालिकेला अपेक्षा आहे. मात्र, ही प्रक्रिया कधी पार पडणार याबाबत उच्चपदस्थ अधिकारी सुध्दा अनभिज्ञ आहेत.

सुशोभीकरणाची दोन कामे आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, उच्च अधिकार समितीची मंजुरी मिळाल्यानंतर लागलीच वर्कऑर्डर देण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. सुशोभीकरणाच्या कामांना अद्याप उशीर झाल्याचे वाटत नाही.

- जी. एम. पगारे, सिंहस्थ कक्ष, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डी सेक्टर’मध्ये प्लॉट?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वरसह नाशिकच्या साधुग्राममधील जागेची​ साध्वी त्रिकाल भवंता यांनी पाहणी केली. साधुग्राममध्ये डी २ सेक्टरमधील ५४८ क्रमांकाचा प्लॉट प्रशासनाने देऊ केला असून, त्र्यंबकेश्वर की नाशिक यातील कोणता प्लॉट ताब्यात घ्यायचा याबाबत शनिवारी संध्याकाळपर्यंत भवंता यांचा निर्णय होऊ शकला नाही.

साध्वी त्रिकाल भवंता यांचा मान्यताप्राप्त आखाड्यांशी थेट संबंध नसून, त्यांना साधुग्राममध्ये कदापि जागा देणार नाही, अशी भूमिका आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी घेतली आहे. तर, साध्वींचा वेगळा आखाडा असून, प्रशासनाने त्यास जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्रिकाल भवंता यांनी लावून धरली. यामुळे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच महंत ग्यानदास आणि भवंता यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर, साध्वींसाठी वेगळी जागा देण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी साध्वी त्रिकाल भवंता यांच्याशी शुक्रवारी दुपारी चर्चा करून त्यांना त्र्यंबकेश्वर तसेच नाशिकमध्ये जागा देऊ केली. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आवडीनुसार प्लॉट उपलब्ध करून देण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार त्रिकाल भवंता यांनी त्र्यंबकेश्वर तसेच नाशिकमधील प्लॉटची पाहणी केली. नाशिकमध्ये डी २ सेक्टरमधील ५४८ क्रमाकांचा प्लॉट प्रशासनाने देऊ केला आहे. हा प्लॉट त्र्यंबकेश्वरच्या तुलनेत छोटा असल्याचे भवंता यांचे मत असून, अद्याप कोणता प्लॉट निश्चित करायचा या विषयी निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी दुपारी त्या प्लॉटवर येणार होत्या. मात्र, अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खासगी दवाखान्यात हलवण्यात आले.

महंत ग्यानदास यांची प्रकृती ढासळली

महंत ग्यानदास यांनी शनिवारी मोजक्याच भक्तांना भेट दिली. त्यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती त्यांच्या भक्तांनी दिली. साध्वी प्रकरणानंतर महंत ग्यानदास महाराज मीडियाला टाळू लागले असून हा वाद ते कसा हाताळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साध्वींच्या जागेला विरोध कायम

साधुग्राम प्रकल्पावर प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. साधुग्राम नावातच सर्व येते. यावर प्रथम आखाडा परिषदेचा अधिकार असून, प्रशासनाने साध्वींना येथे जागा देण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासनाची जागा असली तरी त्यावर आखाडा परिषदेचा अधिकार असून, प्रशासनने चूक केल्यास साधुमहंतांचा राग अनावर होईल, असा इशारा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आखाड्याचे व्यवस्थापक विश्वंभरदास महाराज यांनी दिला. महंत ग्यानदास यांच्यावर गलिच्छ आरोप करणाऱ्या साध्वी भवंता यांनी प्रथम महंत ग्यानदास यांची जाहीर माफी मागावी. त्यानंतरच जागेचा विचार करावा, असेही विश्वंभरदास यांनी स्पष्ट केले. हा वाद फक्त जागेचा राहिला नसून साध्वींनी आमच्या महंतांवरच नको ते आरोप केले आहेत. त्यांना त्र्यंबकेश्वरचा मार्ग मोकळा असून त्यांनी तिकडे गेलेले चांगले होईल, असेही कुंभमेळा व्यवस्थापकांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी बँकेकडून आता एटीएम कार्डव्दारे सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या एटीएम कार्डव्दारे विविध सेवा देणाऱ्या सुविधांचा उद्घाटन सोहळा रविवारी (ता.१९) दुपारी चारला उत्सव मंगल कार्यालयात होणार आहे. ही माहिती अध्यक्ष डॉ. दत्तात्रय पेखळे आणि उपाध्यक्ष शाम चाफळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, बाळासाहेब सानप, जयंत जाधव, राज्य अर्बन बँक्स फेडरेशनचे संचालक भास्कराव कोठावदे, अजय ब्रह्मेचा, विभागीय सहनिबंधक एम. एम. आरीफ प्रमुख पाहुणे असतील. उत्कृष्ट सेवेबद्दल नऊ पुरस्कार मिळवणाऱ्या तसेच १९ शाखा, ६२,५६४ सभासद आणि ३६६ कोटी ठेवी असलेल्या या बँकेने स्वतःचे डाटा सेंटर उभारले आहे. आता एटीएम कार्डाव्दार कोणत्याही व्यापार संकुलातून ५० हजारापर्यंत खरेदी करता येईल. पेट्रोलपंप, हाटेलमध्येही कार्ड स्वॅप करून पेमेंट करता येईल.

मोबाइल रिचार्ज, मोबाइल क्रमांक बदलाची तसेच बँक अकाउंट स्टेटमेन्टची विनंती, डीटीएच रिचार्ज, एफडी आणि चेक बुकची विनंती, निधी हस्तांतर आदी सुविधा एटीएम कार्डव्दारा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सेवेचा प्रारंभ रविवारी होणार आहे. पत्रकार परिषदेवेळी संचालक निवृत्ती अरिंगळे, दत्ता गायकवाड, मनोहर कोरडे, रंजना बोराडे, डॉ. प्रशांत भुतडा, अशोक चोरडिया, जग्गनाथ आगळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडित, पगारे नाशिकमधील ‘ग्रीन टेररिस्ट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक शहरात सध्या पर्यावरणाच्या नावाखाली राजेश पंडित आणि निशिकांत पगारे असे 'ग्रीन टेररिस्ट' तयार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन महाजन यांनी केला आहे.

शहराच्या सौंदर्यीकरणाला चार पाच डोकी आडकाठी घालत असून, त्यांच्या पदव्या काय असा सवाल त्यांनी महासभेत उपस्थित केला आहे. या ग्रीन टेररिस्टना अधिकारी मानसन्मान का देतात असा, आक्षेप त्यांनी घेतला आहे.

महासभेत स्मार्ट सिटीवर चर्चा करताना नगरसेवक सचिन महाजन यांनी शहरातील काही राजेश पंडित आणि निशिकांत पगारेंसारख्या

काही पर्यावरणवाद्यांकडून नाशिकची बदनामी केली जात आहे. एका वृत्तवा‌हिनीवर चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला.

आयुक्तांनीच या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित माध्यमाला बातमी काढण्यास भाग पाडल्याचा दावा करीत आपण या ग्रीन टेररिस्ट का पोसतो असा सवाल केला आहे. गोदावरीत जाणारे मलमूत्र

अडविण्यात आल्यानंतरही माध्यमांना चुकीची माहिती दिली जात आहे. त्यामुळे अशा लोकांच्या पदव्या काय, त्‍यांचे शिक्षण काय आपण तपासले का असा सवाल करीत त्यांना अधिकारी मानाचे स्थान का देतात यावर महाजन यांनी आक्षेप घेतला आहे.

शहर सुंदर होऊन रस्ते चकचकीत झाले आहेत. तरीही काहीजण पालिकेची बदनामी करीत आहे. अशा लोकांना विविध समित्यांवर नेमून मानाचे स्थान दिले जात आहे. त्यामुळे यांना आवर घालून त्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी महाजन केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images