Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तीर्थक्षेत्र कावनईत गुंजला शंखनाद

0
0

गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सिंहस्थ ध्वजारोहणाचा रंगला सोहळा; ६ सप्टेंबरला पर्वणी

म. टा. वृत्तसेवा, घोटी

"प्रभू श्रीरामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, भगवान कपिल मुनिकी जय, सब संतान की जय, श्रीनरेंद्रनाथ महाराज की जय, अशा जयघोषात गुरुवारी गुरू पुष्यामृतचा मुहूर्त साधत सिंहस्थाचे मूळक्षेत्र असलेल्या कावनई येथील कपिल धारातीर्थस्थानी सिंहस्थ सोहळ्याचा ध्वजारोहण सोहळा व जलपूजन साधू-संताच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यामुळे भाविकांचा आनंद द्विगुणीत करणारा पर्वकाळाचा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी कपिल तीर्थस्थानी गुरू पुष्यामृताचे पवित्र स्नान केले. ६ सप्टेंबर रोजी कपिलधारातीर्थ क्षेत्री पर्वणीस्नान होणार असल्याची घोषणा आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास महाराज यांनी यावेळी केले.

गुरू आणि रवी या ग्रहाच्या सिंह राशीच्या प्रवेशाला सुरुवात झाल्यानंतर गुरु पुष्यामृतच्या शुभपर्वावर गुरुवारी श्री क्षेत्र कावनई येथे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महंत ग्यानदास महाराज, श्रीसेवा संप्रदायाचे जगतगुरु रामानंदाचार्य, श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.

सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील हजारो भाविक, साधक सहभागी झाले होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, या भूमीत भक्तीचा सन्मान होतो. ज्ञान व वैराग्य हे भक्तीचे पुत्र असून, जो भक्तीचा साधक असेल तो ज्ञान व वैराग्याने परिपूर्ण असतो. मानवता हाच खरा धर्म असून, संप्रदाय कोणताही असो मानवतेची निष्ठापूर्वक जोपासना करा, असे आवाहन ग्यानदास महाराज यांनी यावेळी केले.

सोहळ्यास दिगंबर आखाड्याचे महंत क्रिश्नदासजी महाराज, महंत रामकिशोर दासजी महाराज, दिगंबर आखाड्याचे धर्मदासजी महाराज, निर्मोही आखाड्याचे महंत अयोध्यादासजी महाराज , चतु:संप्रदाय आखाड्याचे कृष्णचरण दासजी महाराज, आखाडा परिषदेचे प्रवक्ता श्रीमहंत भक्तीचरण दासजी महाराज, कावनई कपिलतीर्थ क्षेत्रचे रामनारायण फालहरी महाराज, महंत रामसुंदरजी महाराज, श्री वैष्णवदासजी महाराज आदी संत व साधूंच्या प्रमुख उपस्थितसह खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले आदी पदधिकारी सहभागी झाले.

सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास साधू-महंतांचे आगमन झाले. वाद्याच्या गजरात भगव्या ध्वजाची पताका डोलत व धर्माच्या घोषणा देत आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास महाराज व नरेन्द्रनाथ महाराज यांच्यासह शेकडो साधूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतकमानीपासून साधू-महंतांची मिरवणूक काढण्यात आली. ग्यानदास महाराज व नरेंद्र महाराज यांच्या हस्ते कपिलधारा तीर्थक्षेत्री विधीवत पूजन करून सकाळी ११ वाजून ६ मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जयजयकार करून पुष्पवृष्टी केली. पाठोपाठ कपिलधारा तीर्थक्षेत्राचे विधीवत जलपूजन केले. जलपूजन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांनी तीर्थस्नान करण्यासाठी एकच गर्दी केली. भाविकाच्या गर्दीमुळे कावनई परिसरातील वातावरण फुलून गेले होते.



पालकमंत्री, आमदारांची अनुपस्थिती

पालकमंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक आमदार निर्मला गावित यांनी सोहळ्याकडे पाठ फिरवली. याबाबत कपिलधारा विश्वस्त समितीने नाराजी व्यक्त केली. नाशिकच्या ध्वजारोहणाला पालकमंत्री जातीने हजर होते, मग कावनई तीर्थक्षेत्राला दुय्यम वागणूक का, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.



क्षणचित्रे

सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहण६ सप्टेंबर रोजी पर्वणी स्नानाचा मुहूर्त असल्याची घोषणासाधू-महंतांचे वाद्यांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजीने

शाही स्वागत

श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या साधक वर्गाकडून जयघोष व त्यांच्या नामाचा जयजयकार होत असल्याने सोहळ्याप्रसंगी श्री संप्रदायाची झालर असल्याचे जाणवत होते.

श्री संप्रदायाच्या साधकांनी विशिष्ट वेश परिधान करून या सोहळ्यात स्वयंसेवकाची सेवा दिली. महिलांनी भगव्या साड्यापरिधान करून सोहळ्याची शोभा वाढविली.

सोहळ्याचे सूक्ष्मनियोजन कपिलधाराचे विश्वस्त महंत उडिया महाराज, कुलदीप चौधरी, दीपक मंगे, सोमनाथ सूर्यवंशी, भरत पटेल, ज्ञानेश्वर भागवत आदींनी केले.

कपिलमुनींच्या दरबारात सिंहस्थ ध्वजारोहणासाठी तालुक्यात पावसाची जोरदार सलामी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुम्हालाही इतरांना आर्थिक बळ द्यायचंय!

0
0

तेजस आमलेचे 'मटा हेल्पलाइन'च्या विद्यार्थ्यांना आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती, मी रहात असलेले घर म्हणाल तर दहा बाय दहाची खोली. त्यातच स्वयंपाकघर, तेच बेड अन् तोच हॉल. दु:खात दिवस चालले असतानाच दहावीचे वर्ष आले. कसून अभ्यास केला, घरात लाईट नसल्याने घरासमोरच असलेल्या एका बांधकाम साईटवर जाऊन मी अभ्यास केला. दहावीत ८९.६४ टक्के गुण मिळवले...पण आता पुढे काय असा प्रश्न 'आ' वासून उभा राहिला. माझे तर मेकॅनिकल इंजिनीअर बनायचे स्वप्न होते. अशातच 'मटा' देवदूतासारखा धावून आला, माझी आर्थिक मदत केली. 'मटा' तुम्हालाही इतरांना मदत करण्यासाठी समर्थ बनवेन बघा!' तेजस आमले कहाणी सांगत होता.

तेजस आमले हा 'मटा हेल्पलाइन'चा पहिला विद्यार्थी. त्याच्यापासूनच हेल्पलाइन हा उपक्रम सुरू झाला. वडिलांना पगार दोन हजार रूपये...त्यातही पाचशे रूपये घराचं भाडं जाणार. घराला दहा ठिकाणी ठिगळं लावलेली...तरीही पाणी ठिबकतंच. पुस्तकासाठी शेजाऱ्यांनी मदत केलेली. घरात अठरा विश्वं दारिद्र्य पण आभाळाला गवसणी घालण्याची उमेद ठेवली तेजस आमलेनं. त्यात त्याच्या हुशारीला पारखलं 'मटा'ने. त्याला मदत करण्याचं ठरवलं आणि मग मदतीचा ओघ सुरू झाला. १ लाख ३० हजार रूपये त्याच्यासाठी जमा झाले.

सीडीओ मेरी शाळेत शिकणारा तेजस, वर्गशिक्षिका ज्योती कुलकर्णी, विभांडिक सरांच्या मार्गदर्शनाने तो येथपर्यंत पोहोचला. तेजस म्हणतो की, 'मटा'ने मला मदत केली नसती तर मी येथपर्यंत येऊच शकलो नसतो. कविता रंजवे, अक्षता पवार, सोनल लोखंडे, शुभम गांगुर्डे, मंदार रोकडे, हर्षदा भामरे, मंगेश चौधरी, सौरभ वाघ, अनुराज ढोबळे आज 'मटा'ने तुम्हा नऊजणांना निवडले. नक्कीच 'मटा' तुमचे सोने करणार, तुम्हाला हवी ती मदत केल्यानंतर तुम्ही मात्र यश मिळवायचे आहे. उद्या तुम्हीही कुणाला तरी मदत करण्याच्या पात्रतेचे व्हायचे आहे, याची जाणीव तुम्ही ठेवा.'

आर्थिक अडचणींवर जिद्दीने मात करून दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक मार्क मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पैशांअभावी अडू नये, याकरिता 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे हेल्पलाइन उपक्रम राबविला जातो. गेल्या चार वर्षांत नाशिककरांनी या उपक्रमाला 'लाख' मोलाची मदत करीत मोठा प्रतिसाद दिला. निवडक विद्यार्थ्यांची यशोगाथा प्रसिद्ध करत आहोत. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करू इच्छिणाऱ्यांनी या विद्यार्थ्यांच्या नावे 'क्रॉस्ड चेक' द्यावेत.

चेक स्वीकारण्यासाठी पत्ते विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावाने द्यावेत. चेक गोळा करण्यासाठी 'मटा' ने या सेंटर्सशिवाय कोणाचीही नेमणूक केलेली नाही.

साईछत्र पान स्टॉल, हॉटेल शिल्पा डायनिंग हॉल शेजारी, वकिलवाडी कॉर्नर, एम.जी.रोड

माधवजीका बढिया चिवडा, पंचवटी कारंजा कॉर्नर, पंचवटी

भिंगे बंधू, १३६२, जुन्या सीबीएससमोर, शरणपूर रोड

गोविंद दंडे अॅण्ड सन्स, दत्तमंदिर चौक, नाशिकरोड

राजकमल पान स्टॉल, जुने बसस्थानक, देवळाली कॅम्प

निमा हाऊस, आयटीआय सिग्नलजवळ, सातपूर

अंजली प्लायवूड, नवरंग कॉम्प्लेक्स, द्वारका, नाशिक पुणे रोड

विधाते बंधू चिवडेवाले, चंद्रकांत विधाते,

त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक

सप्तश्रृंगी डेअरी, चार्वाक चौक, इंदिरानगर

भावे प्लॅस्टो, टर्ले चेंबर, शिवाजीनगर, जेलरोड

महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, काठीयावाड शो रूम समोर, डिसूझा कॉलनी, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटीला नगरसेवकांचा खो?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्मार्टसिटी योजनेत नाशिकचा समावेश करण्यासंदर्भातील ठराव शुक्रवारच्या महासभेत चर्चेला येणार आहे. मात्र, महत्वाचा विषय जादा विषयांमध्ये समाविष्ट करण्यावरून नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने हा धोरणात्मक विषय असल्याचे सांगून विशेष महासभा घेण्याची मागणी केली आहे. या योजनेच्या फायद्यातोट्यावरून नगरसेवकांमध्येच संभ्रमावस्था असल्याने हा विषय तहकूब होण्याची शक्यता अधिक आहे.

महापालिकेने स्मार्टसिटीचे निकष पूर्ण केले असले तरी शहराचा पहिल्या टप्प्यात समावेश होण्याची शक्यता धूसर बनली आहे. स्मार्टसिटीच्या समावेशासाठी आधी महासभेच्या ठरावाची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रशासनानतर्फे शुक्रवारच्या महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहराचे व्हिजन ठरविणारा आणि महत्वाचा विषय असतांनाही जादा विषयात तो ठेवण्यावर शिवसेनेने संशय व्यक्त केला. तर काँग्रेस व राष्ट्रवादीचीही भूमिका संदिग्ध आहे. महासभेवर प्रस्ताव येण्यापूर्वी नागरिकांचेही मत घेणे आवश्यक होते. मात्र, ही प्रक्रिया घेण्यात आली नसल्याचा दावा काही नगरसेवकांनी केला आहे. लोकांचे व तज्ञांचे मत घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे झाले नसल्याने प्रशासनासह सत्ताधाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे. यासोबत महापालिकेची आर्थिक क्षमता, एलबीटी रद्द केल्यास उत्पन्नाचे पर्यायी स्रोत काय, ५० कोटींचा दरवर्षी निधी कसा उभा करणार याबद्दल नगरसेवकच सांशक आहेत. योजनेचीच माहिती नगरसेवकांना नसल्याने काय बोलावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे अभ्यासासाठी नगरसेवकांकडून वेळ मागितला जाऊ शकतो. तर भाजपकडून हा प्रस्ताव रेटला जाऊ शकतो.

अधिकारांबाबत संभ्रमावस्था

स्मार्टसिटीसाठी स्वतंत्र स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन केले जाणार आहे. त्याचा कारभार प्राधिकरणासारखा राहणार असून, त्यावर नगरसेवकांचा कंट्रोल नसेल. स्वतंत्र सीईओ मार्फतच एसपीव्हीचा कारभार हाकला जाणार असल्याने त्यात महापालिकेचा फारसा हस्तक्षेप राहणार नाही. त्यापोटीच नगरसेवकांना त्यांच्या अधिकाराचीही चिंता सतावत आहे. त्यामुळे प्रशासनाने भूमिका मांडल्यानंतरच काही पक्ष सभागृहात आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने धरली भारताची वाट

0
0

अरविंद जाधव, नाशिक

पोलंडमधील ​शिक्षकाने विविध देशाच्या संस्कृती अभ्यासाचा विडा उचलला आहे. स्वतः जगभरात भ्रमंती करून हा तरुण शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिना जमा करतो आहे. थॉमस वॅरवस असे या शिक्षकाचे नाव असून सध्या तो नाशिकमध्ये मुक्कामास पोहचला आहे.

पोलंड या छोट्याखानी देशात थॉमस ​एका शाळेत सोशल सायन्सचे धडे विद्यार्थ्यांना देतो. सध्या पोलंडमध्ये सुट्यांचा मौसम सुरू आहे. पोलंडमधील शाळांचे शैक्षणिक सत्र १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबाबत माहिती देताना थॉमसने सांगितले, की मुलांना जगातील संस्कृतीचे परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. यात मी परिपूर्ण असावे, असे मला वाटते. याच दृष्टिकोनातून मी भारतात चार वेळा तर नाशिकला दोन वेळ येऊन गेलो. भारतच नव्हे तर जगातील वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीचा अभ्यास आजवर केल्याचे थॉमसने सांगितले. मी केलेल्या अभ्यासाचा, काढलेल्या फोटोग्राफचा विद्यार्थ्यांना शिकवताना निश्चित फायदा होतो, असा दावा थॉमसने केला.

थॉमस आठ दिवसांसाठी नाशिकमध्ये आला आहे. अतिशय अनुकल हवामान आणि त्यात धार्मिकतेचा पदोपदो येणारा अनुभव थक्क करणारा असल्याते तो सांगतो. यापूर्वी एकदा नाशिकला आलो होतो. त्यापेक्षा आताचे नाशिक बदलले आहे. वाराणसी, बिकानेर, मथुरा, अलहाबाद अशा अनेक ठिकाणांना भेट दिली. मात्र, त्यात नाशिक प्रगत होत आहे, असे निरीक्षण थॉमसने स्पष्ट केले. थॉमसला कुंभमेळ्याचे मोठे आकर्षण वाटते. कुंभमेळ्याचे शाहीस्नान पाहायचे राहून जाणार असल्याची खंत त्याने व्यक्त केली. २९ ऑगस्ट रोजी पहिल्या शाही स्नानाचा सोहळा पार पडेल. मात्र, १ सप्टेंबर रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी हजर राहणे आवश्यक आहे. त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी निघून पोलंड गाठणे अवघड असल्याने शाहीस्नानाला उपस्थित राहता येणार नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.

मनाला आनंद देणारे चित्र साधुग्राममध्ये दिसते. अध्यात्मिक व मानसिक शांती शोधण्यासाठी ही जागा महत्त्वाची ठरू शकते. अनेक प्रांताचे साधू महंत एकाच ठिकाणी पाहण्यास मिळतात. साधुंशी संवाद साधण्याचे कौशल्य सध्या आत्मसात करीत आहे.

- थॉमस वॅरवस, शिक्षक आणि पर्यटक, पोलंड



खरा साधू ओळखायचा कसा?

नाशिकमध्ये विशेषतः साधुग्राममध्ये फिरताना थॉमस आपल्या कॅमेरेने विविध साधू महंताचे फोटोग्राफ्स घेतो. मात्र, अनेकदा त्याच्याकडे पैशांची मागणी केली जाते. पैशांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीमुळे साधुंच्या पोशाखातील खरा साधू ओळखयचा कसा असा प्रश्न त्याला पडला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र अगच्छत् का‌लिदास:

0
0

व्यवस्थापनाकडे औषधालाही नाही कालिदासाची प्रतिमा

प्रशांत भरवीरकर, नाशिक

महाकवी कुलगुरू कालिदास हा सांस्कृतिक जगताचा अधिष्ठाता आहे. आषाढाचा पहिला दिवस हा त्याच्या नावे असतो. त्याच्या नावाने नाशिक शहरात असलेल्या मोठ्या नाट्यगृहात मात्र एक वेगळीच शोकांतिका डोके वर काढत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या कालिदासदिनाच्या दिवशी साधी पूजा करण्यासाठी सुध्दा नाट्यगृह व्यवस्थापनाकडे कालिदासाची प्रतिमा उपलब्ध नाही. व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही लाजीरवाणी बाब आहे.

कालिदास हा प्रेमाचा महाकवी कालीमाता प्रसन्न असल्याने तो प्रचंड प्रतिभावंत होता. जसं पाश्चात्यांचं शेक्सपीअरशिवाय पान हलत नाही तसेच पौर्वात्यांचं कालिदासाबाबत आहे. किंबहुना त्यापेक्षा काकणभर अधिकच कौतुक आहे. आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याने 'मेघदूत' नावाचं महाकाव्य लिहायला सुरूवात केली. अलकानगरीतील यक्षाच्या हातून झालेली एक चूक त्याला त्याच्या पत्नीपासून वर्षभर दूर ठेवते. शिक्षा संपत आलेली असताना आषाढ महिना सुरू होतो व तो एका मेघाला निरोप घेऊन तिच्याकडे पाठवतो अशा आशयाचं ते काव्य आहे. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाची घटना म्हणून मग त्याला 'आषाढस्य प्रथम दिवसें' असे संबोधन आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. इतिहास रममाण होणं बंद करा ही भावना दिवसेंदिवस बळावत चाललीय. त्याचाच प्रत्यय नाशिक महापालिकेने आणून दिला. कोणत्याही प्रशासनाला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक या बाजू सांभाळूनच शहराचा कारभार पहावा लागतो. नाशिकचे प्रशासन त्याबाबत कमी पडतं असं वाटायला लावणाऱ्या अनेक घटना नेहमीच घडत असतात. आषाढ मासारंभ ज्या दिवशी आहे, त्यादिवशी कालिदास दिन साजरा करण्याची प्रशासनाची पूर्वापार परंपरा आहे. 'आषाढस्य प्रथम दिवसें' याचा अर्थच मुळात असा आहे की त्यादिवशी कालिदास या महाकवीचं स्मरण व्हावं. परंतु प्रशासनाने त्याची थट्टाच चालवली आहे.

कालिदास नाट्यमंदिरामध्ये शिरताचक्षणी फोटो गॅलरी आहे. या गॅलरीमध्ये राम गणेश गडकरींपासून तर वामनदादा कर्डक यांच्यापर्यंत सर्व महान विभूतींचे फोटो आहे मात्र ज्याच्या नावाने हे नाट्यगृह आहे त्या कालिदासाचा फोटो येथे औषधालाही नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी कालीदास दिनाला पूजन करताना नटराजाच्या मूर्तीचे वगैरे पूजन होऊन त्यावरच काम भागविण्यात येते. परंतु एकाही वर्षी येथे कालिदासची प्रतिमा आणण्याचे दाक्षिणात्य महापालिकेने दाखवलेले नाही.

यंदा तरी महापौर येणार का?

कालिदासदिनाच्या कार्यक्रमाला प्रथम नागरिकाची उपस्थिती नेहमीच आवश्यक असते; परंतु आतापर्यंतचा अनुभव असा आहे की, कालिदास दिनाच्या या कार्यक्रमाला प्रत्येक महापौर नेहमीच दांडी मारत आले आहे. त्यामुळे यंदा तरी महापौर या कार्यक्रमाकडे फिरकणार का अशी चर्चा रंगकर्मींमध्ये रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझेल शवदाह‌िनीबाबत आज महासभेवर प्रस्ताव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या बेवारस मृतदेहांवर आता महालिकेच्या स्मशानभूमीत असलेल्या डिझेल शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. प्रशासनाच्या वतीने जिल्हा रुग्णालयाच्या विनंतीवरून शुक्रवारच्या महासभेत हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महासभेत त्याला मान्यता मिळणार आहे.

जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बेवारस मृतांचे आतापर्यंत महापालिकेच्या दफनभूमीत अत्यंसंस्कार केले जात होते. मात्र दफनभूमीत आता जागा नसल्याने या मृतांचे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावेत, असा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे.

महापालिकेनही आता जागा उपलब्ध नसल्याने या मृतदेहांच्या अत्यंसस्कारासाठी अमरधाममध्ये असलेल्या डिझेल शवदाहिनीचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव सादर केला जाणार असून, महापालिकेच्या डिझेल शवदाहिनीत अंत्यसंस्कार करावेत याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

मालपानीच्या ठेक्याला स्थगिती

दरम्यान, महापालिकेन स्मशानभूमीतील लाकडे पुरविण्याचे आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्याचा ठेका हिरवे ऐवजी मालपानी कंपनीला देण्याच्या स्थायी समितीच्या निर्णयाला जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

हिरवे या ठेकेदाराच्या तक्रारी असल्याने त्याच्याकडून काढून घेत, मालपानी कंपनीला देण्याचा ठराव स्थायीने केला होता. त्या विरोधात हिरवे या कंपनीने स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. आता न्यायालयानेच स्थायीच्या या आदेशाला स्थगिती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळ सदस्यांना लॉटरी!

0
0

शिक्षण समिती गठीत करण्याचा ठरावही निलंबित

विनोद पाटील, नाशिक

महापालिकेतील शिक्षण समितीतील सदस्य निवडीसोबतच आता शिक्षण मंडळाऐवजी शिक्षण समिती गठीत करण्याचा महापौरांचा ६३ क्रमांचा ठराव राज्य सरकारने निलंबित केला आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता बळावली आहे. महापौरांचा ठराव निलंबित केल्याबरोबरच शिक्षण मंडळ अस्तित्वात आल्याचा दावा खुद्द राज्य सरकारनेच केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी आणि भाजप सरकारमधील या संघर्षामुळे २०१२ मध्ये नियुक्त झालेल्या तत्कालीन १३ सदस्यांना पुन्हा लॉटरी लागली आहे.

शिक्षण समितीचा घोळ तीन-चार महिन्यांपासून सुरू आहे. सत्ताधारी मनसे आणि भाजपमधीलअंतर्गत धूसफूस आणि शहकाटशहाच्या राजकारणात ही समिती अडकली आहे. अनेक शासकीय पत्रोच्चाराची प्रक्रिया पार पाडल्यानंतर अखेरीस महापौरांनी आपल्या आदेशात शिक्षण समिती गठीत करीत, २७ एप्रिलच्या महासभेत शिक्षण समिती १६ सदस्यांची नियुक्तीही केली. मात्र तिचे शुक्लकाष्ठ अद्यापही संपलेले नाही.

महापालिका प्रांतिक अधिनियम १९४९ च्या ३० व ३१ (ब) प्रमाणे ही समिती महापालिकेतील अन्य समित्यांप्रमाणेच असल्याने यावर केवळ नगरसेवकांचीच वर्णी लावण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या शिक्षण मंडळावर असलेल्या सदस्यांनी या समितीविरोधात आक्रमक होत समितीच्या अस्तित्वाला विरोध करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून सुरू झालेला वाद हा आजतागत कायम आहे. शासनदरबारी वाद गेल्यानंतर सरकारने १६ सदस्यांच्या नियुक्तीचा ६४ क्रमांकाचा ठराव निलंबित केला होता. त्याविरोधात संजय चव्हाण यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

संभ्रमही कायम

राज्य सरकारने शिक्षण समितीसंदर्भात घातलेल्या घोळावर दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात होणार आहे. संजय चव्हाण यांनी राजकीय हेतून समिती बरखास्त केल्याचा आरोप करीत गोंधळ चुकीचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे न्यायालयात शुक्रवारी अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

यांची लागणार लॉटरी...

मुंबई शहर प्राथमिक शिक्षण, हैदराबाद सक्तीचे प्राथमिक शिक्षण व मध्य प्रदेश प्राथमिक शिक्षण अधिनियम २०१३ नुसार नाशिक महापालिकेचे शिक्षण मंडळ अस्तित्वात असल्याचा दावा सरकारने केला आहे. त्यामुळे २०१२ मध्ये गठीत शिक्षण मंडळ पुनरुज्जीवीत झाले आहे. यातून शर्वरी लथ, जय कोतवाल, मोहन भोर, बबलू पठाण, बाळू पाटील, बाळू कोकणे यांच्यासह १३ सदस्यांची पुन्हा लॉटरी लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांची बुकिंगसाठी प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या पूर्वभागात नवीन तिकीट बुकिंग कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तथापि, प्रवाशांमध्ये जागृती झाली नसल्याने त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

कुंभमेळ्याच्या विकासकामांचा भाग म्हणून सिन्नरफाटा भागात रेल्वेने अद्ययावत तिकीट बुकिंग कार्यालय उभारले आहे. याच भागात चौथा नवीन फ्लॅटफार्म तयार झाला आहे. पादचारी पूलही उभारण्यात आला आहे. कुंभमेळ्यात भाविकांच्या गर्दीचा ताण मुख्यस्थानकावर पडू नये, स्थानकाबाहेर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पूर्वभागात नवीन तिकीट बुकिंग कार्यालय १४ जुलैपासून सुरू झाले.

सकाळी आठला उद्घाटन झाल्यानंतर दुपारी बारापर्यंत केवळ सहा प्रवाशांनीच तिकिटाचे आरक्षण केले. या कार्यालयात चार काऊंटर आणि एक चौकशी कक्ष आहे. विशेष कर्मचारी व अधिकारी आहेत. त्याला लागूनच विशेष प्राथमिक उपचार केंद्रही कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रवाशांच्या वाहनांसाठी खुले पटांगणही आहे.

प्रवाशी अनभिज्ञ

पूर्व भागातून प्रवाशांना रेल्वेस्थानकात येणे सोयीचे व्हावे, म्हणून सिन्नरफाटा येथे अतिक्रमण हटविण्यात आली. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सिन्नर, संगमनेर आदी भागातून येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेस्थानकात पूर्वेकडून प्रवेश सोपा झाला आहे. मात्र, पूर्वभागात तिकीट बुकिंग कार्यालय सुरू झाल्याची माहिती बहुतांश प्रवाशांना नाही. आजही प्रवाशी मोठा वळसा घालून आंबेडकर रस्त्यानेच मुख्य स्थानकात येतात. त्यामुळे मुख्य स्थानकात गर्दी कायम आहे.

मुख्य स्थानकात कुंभसाठी तीन अतिरिक्त तिकीट बुकिंग काऊंटर सुरू झाल्याने काऊंटरची संख्या दहा झाली आहे. आरामात तिकीट मिळत असल्याने प्रवाशीही येथेच येतात. पूर्वेच्या बुकिंग कार्यालयाकडे फिरकण्याची तसदी घेत नाही. मालधक्का येथेही बुकिंग कार्यालय सुरू होणार आहे. पर्वणी काळात पूर्व भागातील बुकिंग कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळेल असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डायल १०८’ सेवा मदतीसाठी सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि 'बीव्हीजी इंडिया लिमिटेड' या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या सुसज्ज 'डायल १०८'च्या ३० रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथे १२ तर, नाशिक येथे १८ रुग्णवाहिका २४ तास सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत.

कंभमेळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्राण वाचविण्याच्या 'गोल्डन अवर्स'मध्ये तातडीचे उपचार देण्यासाठी 'डायल १०८'च्या रुग्णवाहिका मोलाची भूमिका निभावणार आहे. कुंभमेळ्यासाठी कार्यरत वाहनचालक, डॉक्टर, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, शासकीय सेवेतील डॉक्टर्स, प्रायव्हेट डॉक्टर्स आणि इतर प्रतिनिधी या सर्वांना 'गोल्डन अवर्स'मध्ये तातडीचे उपचार देण्यासाठीचे तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

'१०८' हा दूरध्वनी डायल केल्यानंतर महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या संचालनाची जबाबदारी 'बी.व्ही.जी. इंडिया लिमिटेड' या सेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनीकडे आहे. पुण्यातील 'औंध उरो रुग्णालयात' या सेवेचे प्रमुख केंद्र व 'रिस्पॉन्स सेंटर' आहे. कुंभमेळ्यात रुग्णवाहिकेसोबत वाहनचालक, डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी २४ तास मदतीसाठी असणार आहे. ही माहिती महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.

गो-टीमही सज्ज

कुंभमेळ्यासाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे तीन ठिकाणी 'नो व्हेईकल झोन' ज्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकणार नाहीत अशा ठिकाणी महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या वतीने पादचारी मार्गांवर ९० 'इर्मर्जन्सी गो-टीम' तैनात करण्यात आल्या आहेत. ही 'गो-टीम' आप्तकालीन कीटद्वारे रुग्णांपाशी जाऊन तातडीने मदत कार्य देते. या गो-टीममध्ये डॉक्टर, सहाय्यक, प्रथम उपचाराचे साहित्य आणि स्ट्रेचरसोबत असणार आहे. कुंभमेळ्यादरम्यान आरोग्य सुविधा तसेच तातडीचे वैद्यकीय उपचार देण्यासाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ही डॉ. गजानन पुराणिक यांनी दिली.

कुंभमेळ्यादरम्यान कोणतीही आपत्कालीन वैद्यकीय मदत लागली तर सुसज्ज रुग्णवाहिका १०८ क्रमांक डायल केल्यावर उपलब्ध असतील. त्यात व्हेंटीलेटर अशी आधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत. रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपत्कालीन उपचार करण्यासाठी प्रत्येक रुग्णवाहिकेत डॉक्टर आणि सहाय्यकही या रुग्णवाहिकेत असणार आहेत. मात्र रुग्णालयातून घरी सोडणे, अथवा खासगी रुग्णालयात दाखल होणे यासाठी ही रुग्णवाहिका सेवा देता येत नाही. ही सेवा २६ जानेवारी २०१४ रोजी सुरू झाली.

या सु‌विधा मिळणार

विनामूल्य सेवा. नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येते. अपघात, जळीत, विषबाधा, ह्दयविकार, अर्धांगवायू यासाठी मदत पुरवते. ९० 'इर्मर्जन्सी गो-टीम' तैनात २४ तास सेवेसाठी उपलब्ध

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री क्षेत्र करंजीकडे दुर्लक्ष

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

गेल्या सिहंस्थ कुंभमेळ्यात दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी येथे जाण्यासाठी सिंहस्थ निधीतून रस्त्याचे काम झाले होते. यंदा मात्र येथे मागणी करूनही कोणतेही काम न झाल्याने भाविकांबरोबरच येथे येणाऱ्या साधुमहंत यांनीही प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळ श्री क्षेत्र करंजी येथे कर्दमाश्रम असून, हे दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून ओळखले जाते. भारतातील पदमासनात असलेली एकमेव दत्तात्रेय यांची मूर्ती येथे असून, निसर्गसंपन्न परिसरात विविध मंदिरे आहेत. येथे दरवर्षी हजारो भाविक, साधुमहंत येत असतात. त्यातच पुरातन काळापासून निल आखाड्यातील साधुमहंत दर कुंभमेळ्याला येथे येऊन वास्तव्य करतात.

तसेच, सर्व पर्वणी काळात हजारो भाविक गंगामाईच्या स्नानाला येतात. येथील गंगामाईच्या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गत कुंभमेळ्याप्रसंगी जि.प. च्या तत्कालीन अध्यक्ष विद्या पाटील यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करीत येथे सिंहस्थ निधीतून पक्के डांबरीकरणाचे रस्ते मंजूर केले होते. मात्र त्यावेळी रस्त्याचे काम होऊन पुन्हा त्याचे नूतनीकरण झालेले नाही. परिणामी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

किमान या सिंहस्थात तरी नूतनीकरण होईल, अशी भाविकांना आशा होती, मात्र ट्रस्टने पाठपुरावा करूनही या कामास निधी मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. येथे साधुमहंत येऊ लागले असून, त्यांनीही रस्त्यांचे काम न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

कुंभमेळा हा केवळ नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे मर्यादित नसून, या निमित्ताने पुरातन काळापासून श्रीक्षेत्र करंजी येथे अनेक साधुमहंत येत असतात. तसेच पर्वणी काळात हजारो भाविक गंगामाईच्या स्नानाला येतात. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने येथे सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

- दत्तात्रय पाटील, सभापती, कृउबा दिंडोरी

करंजी तीर्थक्षेत्राला अध्यात्मिक वारसा असून, सिंहस्थ काळात साधुमहंत यांची राहण्याची व्यवस्था तसेच भाविकांना मोफत प्रसाद व भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानतर्फे येथे गो शाळा चालविण्यात येत आहे. या आश्रमात तीर्थक्षेत्री येण्यासाठी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

- महंत सुभाषगिरी महाराज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखाड्यांच्या नावातच गफलत

0
0

अनिल पवार, नाशिक

बारा वर्षांनी येणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाला प्रदीर्घ वेळ मिळवून कामांना गती देण्यात तसेच नियोजनात अपयश आले आहे. सिंहस्थासाठी जिल्हा प्रशासनाने वेबसाइट तयार केली आहे. त्याची लिंक नुकतीच एमटीडीसीच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांची नावेही व्यवस्थित देण्यात आलेली नाही. आखाड्यांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. दहापैकी धड चार आखाड्यांची नावेही व्यव‌स्थित दिलेली नाहीत.

जिल्हा प्रशासनाने Simhastha Kumbh Mela Nashik -Trimbakeshwar 2015 ही लिंक एमटीडीसीच्या वेबसाईटवर टाकली आहे. यामध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील एकूण तेरा आखाड्यांची माहिती दिली आहे. मात्र, तीन चार आखाड्यांची नावे वगळता इतर आखाड्यांची नावे चुकली आहेत. श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा असे नाव असताना वेबसाईटवर त्याचे नाव श्री शंभू पंच दर्शन जुना आखाडा असे टाकण्यात आले आहे. तसेच श्री शंभु पंचदशनाम आवाहन आखाड्याचे नाव श्री शंभू पंच अवन आखाडा, श्री पंचायती अटल आखाड्याचे श्री पंच दर्शन अटल आखाडा, श्री तपोनिधी आनंद आखाड्याचे श्री पंचायती आखाडा आनंद आखाडा असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा या दोन्ही आखाड्यांची नावे अनुक्रमे श्री बडा उदारिया आखाडा निर्वाण व श्री नया उदारिया आखाडा निर्वाण अशी नावे देण्यात आली आहेत. श्री पंचायती निर्मल आखाड्याचे नाव श्री निर्मय पंचायती आखाडा असे देण्यात आले आहे. यामुळे नियोजनासाठी प्रदीर्घ वेळ मिळवूनही जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. आधीच वेबसाइटची लिंक टाकण्यात उशीर झाला. ध्वजारोहणानंतर एमटीडीसीच्या वेबसाईटवर सिंहस्थाची लिंक टाकण्यात आली. त्यातही चुका दिसून येत आहेत. सिंहस्थाचा प्रसार व्हावा, ब्रॅण्डिंग व्हावे यासाठी हा प्रयत्न केला असला तरी त्यातील चुका दुरुस्त करणे गरजचे आहे. यामुळे भाविकांना अचूक माहिती तरी मिळू शकेल.

चुका टाळण्याची गरज

सिंहस्थाचे ब्रॅण्डिंग व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने सोशल मीडियाचा मोठा उपयोग करून घेतला आहे. यासाठी वेबसाईट, अॅप असो वा फेसबुक यावर सिंहस्थाची पेज तयार करण्यात आली आहेत. त्यावर इत्थंभूत माहिती दिली जात आहे. मग, ही माहिती अचूक व चांगल्या प्रकारे पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, जर त्याच्यातच चुका होत असतील तर ब्रॅण्डिंगचाही काहीही उपयोग होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये पाण्याचा वांधा कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने तीन दिवसांपूर्वी साधुग्राममध्ये पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, त्याचा पिण्याचे पाणी म्हणून कितपत वापर करावा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पाण्याला प्लास्टिकच्या टाक्यांचा तसेच मातीचा गंध असून, नळ उशाला असताना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची खंत साधुग्राममधील निवासी करू लागले आहेत.

महापालिका प्रशासनाने साधुग्रामसाठी स्वतंत्र पाणीपुरवठ्याची सुविधा निर्माण केली आहे. स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढवण्यात आली असून, तीन ते चार दिवसांपासून पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. नवीन पाइपलाइन बसवण्यात आली असून, पाण्याच्या टाक्या देखील नवीनच आहेत. यामुळे पाण्याला वेगळाच वास येत असल्याची तक्रार उपस्थित साधू तसेच सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते आहे. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडत असून पाण्याची मागणी कायम असल्याचे एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले. सध्या, पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. टाक्याद्वारे पुरवण्यात येणारे पाणी पिण्यासाठी वापरत नसल्याचे दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. साधुग्राममधील तपोवनाच्या रस्त्यालगत आखड्यात साधुमहंताचा मुक्काम आहे. इतर ठिकाणी सर्व प्लॉट रिकामे पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामसृष्टीतील जागा वाटपाचा वाद पेटणार!

0
0

अरविंद जाधव, नाशिक

तपोवनातील रामसृष्टी प्रकल्पात आखाडा परिषदेने २० ते २५ खालशांसाठी जागा निर्धारीत केली आहे. साधुमहंतांनी येथे मुक्कामही ठोकला आहे. या ठिकाणीही सर्व सुविधा देण्याची मागणी या साधुमहंताकडून होत असून, प्रत्यक्षात या जागेचा प्रशासनाने विचार केलेला नाही. साधुमहंत आणि आखाडे आपल्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे हा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

साधुग्रामसाठी जागेचा विस्तार २०० एकर वरून ३५० एकर इतका झाल्याने प्रशासनाने नियोजन करताना तपोवनातील रामसृष्टी प्रकल्पाचा विचारच केला नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने बाथरूम, टॉयलेट, ​वीज, ड्रेनेज अशा सुविधा पुरवलेल्या नाहीत. मात्र, प्रशासनाने विकसित केलेल्या साधुग्राममधील जागा वाटपाचे काम अखिल भारतीय आखाडा परिषदेकडे येताच महंत ग्यानदास यांनी रामसृष्टी प्रकल्पातील मोकळ्या जागांचे विविध खालशांसाठी वाटप केले. जागा मिळालेल्या साधुमहंतांनी १४ दिवसांपासून येथे तळ ठोकला आहे. येथे सुविधांसाठी प्रशासनाकडे त्यांचा पाठपुरवा सुरू आहे.

याबाबत माहिती देताना मेळा अधिकारी ​महेश पाटील यांनी सांगितले की, रामसृष्टी प्रकल्पासमोरची जागा पूररेषेत येते. गत कुंभमेळ्यात या ठिकाणी पाणी भरले होते. त्यामुळे यंदा या जागेवर कॅम्प बसवण्यात येणार नाही. तसेच, सुविधा पुरविणे अशक्य असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रशासन आणि साधुमहंत आपल्या मतांवर ठाम असल्याचे सध्यातरी दिसते. रामसृष्टीची जागा साधुग्राममध्ये येते. त्यामुळे याठिकाणी थांबलेल्या साधुमहंतांना प्रशासनाला सुविधा पुरवाव्या लागतील, असे दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज यांनी स्पष्ट केले.

तीन आखाड्यांचे प्रमुख, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष यांनी ही जागा नि​श्चित केली असून, जागा दिलेल्या साधूंना तेथून हटवण्यात येणार नाही, असे वैष्णवदास महाराज यांनी म्हटले आहे. प्रशासन आणि साधूंच्या या भूमिकेमुळे जागेचा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वो तो व्याभिचार केंद्र बना है

रामसृष्टीच्या जागेचा वापर साधुग्रामसाठी अपेक्षित आहे. महापालिकेने परस्पर या ठिकाणी रामसृष्टी प्रकल्प उभा केला. आता तो व्याभिचाराचा केंद्र बनला आहे. नवीन आरक्षित जागेत सुध्दा असेच काम सुरू राहिले तर एक हजार एकर जागाही कमी पडू शकते, असा दावा, दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री वैष्णवदास महाराज यांनी केला.

सुविधा पुरवणे अशक्य

रामसृष्टीत खालशांसाठी आखाडा परिषदेने जागा पुरवली असली तरी पायाभूत सुविधा निर्माण करणे अशक्य बाब आहे. या ठिकाणी लाख दोन लाख भाविक येऊ शकतात. त्यांच्यासाठी बाथरूम, टॉयलेट उभे करण्यासाठी मोठी पाइपलाइन टाकावी लागेल. उतारामुळे ते शक्य होणार नाही. तसेच वाढीव खर्चाची मंजुरी घेऊन प्रत्यक्ष काम संपेपर्यंत सर्व पर्वण्या संपू शकतात, असा दावा एका अ​धिकाऱ्याने केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साध्वींसाठी अखेर जागेची तरतूद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वतंत्र घाटाच्या मागणीबाबत मात्र अडचण असल्याने त्यावर विसबूंन न राहण्याचा सल्लाही कुशवाह यांनी दिला.साधुग्राम परिसरात हक्काची जागा मिळावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वेश्वरी महादेव वैकुंठधाम मुक्तिद्वार आखाड्याच्या (परी) पीठाधिश्वर त्रिकाल भवंता यांच्या मागणीला जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी शुक्रवारी हिरवा कंदिल दर्शवला.

गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्र जागेसाठी भांडणाऱ्या साध्वींनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात कुशवाह यांनी त्र्यंबकेश्वर तसेच नाशिकमधील प्रशासनाकडील दोन प्लॉटबाबत माहिती दिली. या दोन प्लॉटमधील कोणतीही जागा घेऊ शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परी आखाड्यात १२ ते १५ हजार साध्वी असून, त्यांना राहण्याच्या दृष्टीने कोणता प्लॉट सोयीस्कर आहे, ते पाहून आपण निर्णय घेऊ असे साध्वी भवंता यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बैठकीत स्वतंत्र घाटाबाबत तसेच वेळेबाबत चर्चा झाली. त्यावर, स्नानाच्या वेळेबाबत आखाडा परिषदेचा निर्णय अंतिम असून त्यात आपण हस्तक्षेप करू शकणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. स्वतंत्र घाटाबाबत विचार होऊ शकतो. मात्र, तसे कोणतेही आश्वासन आपण देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी महंत ग्यानदास यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीबाबत भवंता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी केली. असेच प्रकार कुंभमेळ्यादरम्यान घडू नये म्हणून प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. झालेल्या घटनेबाबत आपण लेखी तक्रार करा, अशी सूचना कुशवाह यांनी साध्वींना केली. कुंभमेळ्यात येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने व्यापक सुविधा निर्माण केल्या असून, एका घटनेचा संबंध सुरक्षा प्रणालीशी जोडू नये, अशी भूमिकाही कुशवाह यांनी मांडली.

ग्यानदासांपासून जीवाला धोका

ध्वजारोहणाच्या दिवशी आपल्याला महंत ग्यानदास यांनी धक्काबुक्की केली. त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्रिकाल भवंता यांनी पुन्हा स्पष्ट केले. त्या घटनेची आपण लेखी तक्रार करणार असल्याचे भवंता यांनी स्पष्ट केले. महंत ग्यानदास यांच्याविरोधात पोलिसांनी विनयभंगाची तक्रार दाखल करावी, अशी मागणी भवंता यांनी केली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा किंवा शनिवारी सकाळी आपण लेखी तक्रार करणार असल्याचे भवंता यांनी सांगितले. दरम्यान, आपल्याला सुरक्षा रक्षक पुरवावे, अशी लेखी मागणी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे केली असल्याचे भवंता यांनी सांगितले.

संरक्षणासाठी हवेत २३ पोलिस

त्रिकाल भवंता यांचे पत्र पोलिस प्रशासनाला प्राप्त झाले आहे. महंत ग्यानदास यांच्यापासून जीवाला धोका असल्याने आपल्याला १० पुरूष, १० महिला पोलिस कर्मचारी, दोन शस्त्रधारी तसेच एक स्पेशल कमांडो असा तगडा बंदोबस्त पुरवण्याची मागणी भवंता यांनी केली आहे. त्रिकला भवंता यांना एवढा मोठा बंदोबस्त कसा पुरवायचा असा प्रश्न पोलिस प्रशासनासमोर पडला आहे. सध्या, एक महिला पोलिस कर्मचारी भवंता यांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आली असून, गरजेनुसार कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागत कमान उभारणार कधी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

शहरात सिंहस्थाच्या निमित्ताने अनेक जुनी रखडलेली कामे नव्याने सुरू करण्यात आली आहे. मात्र, नाशिकरोडकडून देवळाली कॅम्पकडे जाण्याच्या मार्गावर लामरोड येथे असलेल्या महापालिका हद्दीतील स्वागत कमान अद्याप अपूर्णावस्थेत आहे. ही कमान सुमारे दोन वर्षांपूर्वी पडली होती.

सौभाग्य नगर परिसरात प्रशासनाने महापालिका हद्दीत प्रवेशसाठी स्वागत कमान उभारली होती; मात्र तिच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही स्वागत कमान पडली होती. या कमानीखाली प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा सापडली होती. दुर्दैवाने या घटनेत तीन बळीही गेले होते. या कमानीकडे पुन्हा महापालिका प्रशासनाच्या बांधकाम खात्याचे अद्याप लक्ष गेलेले नाही. त्यामुळे ती स्वागत कमान पुन्हा उभी राहणार की नाही असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. अपूर्णावस्थेत असलेली ही कमान नव्याने पक्क्या स्वरुपात बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नंदिनी पूल बनला धोकादायक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील जुन्या नंदिनी पुलाचे कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले असल्याने अपघात होत आहेत. रात्री येथे पथदीप नसल्याने वेगात असलेली वाहने नदीपात्रात कोसळू शकतात. कुंभमेळ्याच्या निमित्ताने कठडे दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुणे महामार्गावरून वाहतुकीसाठी पूर्वी एकच पूल होता. नंतर त्याला समांतर पूल उभारण्यात आला. तेव्हापासून एकेरी वाहतुक सुरू आहे. मात्र, जुन्या पुलाची दुरुस्ती करायला प्रशासनाला वेळ मिळालेला नाही. नव्या पुलाला लोखंडी कठडे केलेले आहेत. जुन्या पुलाला सिमेंटचे कठडे असून ते तुटले आहेत. तेही अपुरे आहेत. नाशिकहून येताना पुलाजवळ घातक वळण आहे. वेगात आलेली वाहने नदीपात्रात कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कठड्यालगत लोखंडी पाईप लावण्यात आला आहे. तो नसता तर वेगातील वाहनांनी कठडा एव्हाना तोडला असता. कुंभमेळ्याच्या निमित्ताने पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

कुंभमेळा काळात मोठ्या प्रमाणावर भाविक येणार आहेत. जुन्या नंदिनी पुलाचे कठडे दुरुस्त केले नाही तर अपघातही होऊ शकतो. त्या आधी जागे होऊन प्रशासनाने वेळीच कार्यवाही करावी.

- संजय हांडोरे

समांतर पुलावर दुभाजकाची गरज

सातपूर : सातपूर अंबडलिंकरोडवरील नंदिनी नदीच्या पुलाचे संरक्षक कथडे गायब झाले आहेत. तसेच नंदिनी पुलावर उभारण्यात आलेल्या शहिद भगतसिंग समांतर पुलाच्या मध्येही दुभाजक टाकण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

सातपूर व अंबड एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर नंदिनी नदीवर सन १९७८ मध्ये पुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे सातपूर व अंबड एमआयडीसीत मालवाहतूक करणे सोयिस्कर झाले. परंतु, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे जुन्या नंदिनी पुलाचे कथडेच गायब झाले आहेत. पुल अनेक ठिकाणी मोडकळीस आला आहे. त्यातच नव्याने नंदिनी नदीच्या पुलाला बांधण्यात आलेला शहिद भगतसिंग पुलाला रस्ता दुभाजकच टाकण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेकदा वेगाने धावणाऱ्या वाहनांचा अपघात होतो. विशेष म्हणजे पुलाची उभारणी केल्यापासून अद्याप एकदाही दुरुस्ती झाली नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. महापालिकेने दोन एमआयडीसींना जोडणाऱ्या नंदिनी नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींना जोडण्यासाठी नंदिनी नदीवरील पुलाची एमआयडीसीने उभारणी केली. परंतु, काही वर्षांपासून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या पुलावरील कठडेच गायब झाले आहेत.

- रुपेश वाघ वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर किंमत मोजावी लागणार

0
0

प्रवीण बिडवे

सिंहस्थ कुंभमेळा भाविकांसाठी आहे. हा सोहळा डोळ्यांत साठविण्याचा ते प्रयत्न करणारच. परंतु, केवळ सुरक्षेच्या कारणास्तव हा सोहळा मोजक्या लोकांपुरताच मर्यादीत ठेवला जाणार असेल तर भाविकांच्या संयमशिलतेचा उद्रेक का होऊ नये? ध्वजारोहणदिनी अशाच उद्रेकाची प्रचिती आली. सोहळा पाहण्यासाठी जाऊ न देता भाविकांना रोखणाऱ्या पोलिसाला जमावाने 'प्रसाद' दिला. अजून पर्वण्यांना सुरुवात होणे बाकी आहे. या काळात सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या नावाखाली भाविकांना रामकुंड किंवा कुशावर्तापर्यंत पोहोचू दिले नाही तर पोलिसांना त्याची किंमत मोजावी लागू शकते.

सिंहस्थ काळात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने पहिलेच जाहीर केले आहे. परंतु, ही जबाबदारी पार पाडत असताना प्रशासनाकडून माध्यमांसह सामान्य नागरिकांवर अनेक बंधने लादली जात आहेत. ही बंधने भाविकांना अतिरेकी वाटू लागली तर त्याचे परिणामही उफाळून येणारच. पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त परिसरात १४ जुलै रोजी ध्वजारोहण झाले. हा सोहळा सर्वांसाठी खुला असल्याचे सांगण्यात आले. तब्बल १२ वर्षांनी होणारा हा सोहळा नेत्रांमध्ये साठविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. परंतु, त्यांना रामकुंडाकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला. पोलिसांची भाषा सौजन्यपूर्ण असेल तेव्हा नागरिकही आपला तोल ढासळू देत नाहीत. त्यांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवितात. परंतु, पोलिसांकडून असा अनुभव वाट्याला येणारेही भाग्यवानच म्हणावे लागतील. तक्रार करण्यासाठी पोलिस चौक्यांमध्ये जाणाऱ्यांनाही पोलिसांच्या मग्रुरीचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. तक्रारदाराला आरोपीसारखी वागणूक देण्यात तर पो‌लिस तरबेज असतात. पोलिस चौकी आणि पोलिस स्टेशन्समध्ये दाखविली जाणारी ही मग्रुरी रस्त्यावर बंदोबस्त करतानाही पोलिस दाखवू लागले तर नागरिकांच्या संयमाचा कडेलोट झाल्याशिवाय कसा राहील. ध्वजारोहण सोहळ्याच्या आनंदापासून रोखणाऱ्या पोलिसाला नागरिकांकडून नाहक चोप बसला. आता त्यामध्ये तो पोलिस कर्मचारी कितपत दोषी होता हा वेगळा विषय आहे. परंतु, पोलिसांना क्राऊड मॅनेजमेंटचे नियोजन करताना जमावाची मानसिकता लक्षात घ्यावी लागेल. पोलिस प्रशासनाकडून लादल्या जात असलेल्या बंधनांचा राग त्या कर्मचाऱ्यावर काढण्यात आला. पर्वणी काळात भाविकांना आठ ते दहा किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागणार आहे. त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अपंग अशा समाजातील सर्वच घटकांचा समावेश असणार आहे. एकीकडे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व सुविधा पुरविण्याचा प्रशासनाचा दावा असला तरी प्रत्यक्षात भाविकांना पायपीट करावी लागणार आहे. तसेच स्नानासाठी ताटकळत थांबावे लागणार आहे. दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचे हे नियोजन असले तरी त्यामुळे सर्वाधिक हाल सामान्य नागरिकांचेच होणार आहेत. पोलिसांच्या या सक्तीला नागरिक जुमानणार नाहीत असे संकेत परवाच्या घटनेतून देण्यात आले आहेत. जमावाची मानसिकता लक्षात घेऊन पोलिसांनी नियोजन केले तरच असे प्रकार टाळणे शक्य होणार आहे. सरसकट सक्तीचा दंडुका उगारला तर जमाव नियंत्रणाबाहेर जातो हे एव्हाना अनेक घटनांवरून सिध्द झाले आहे. अजूनही पहिल्या पर्वणीला सव्वा महिन्यांचा अवकाश आहे. याकाळात पोलिसांनी क्राऊड मॅनेजमेंटचा सखोल विचार करीत भाविकांची गैरसोय टाळून योग्य नियोजन केले तर भविष्यात घडू शकणाऱ्या अनूचित घटना टाळता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थ्यांचे मूल्यमापन!

0
0

अश्विनी कावळे, नाशिक

शालेय विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचे नियोजन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून आखण्यात आले आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्याची प्रक्रिया नुकतीच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या चाचण्यांची त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन करण्यासाठी या संस्थांच्या सहभागाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा त्रयस्थ संस्थेकडून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार असून ऑक्टोबर २०१५ व एप्रिल २०१६ मध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्रयस्थ संस्थेमार्फत होणारे मूल्यमापन हे त्रिपक्षीय स्वरुपाचे असणार आहे. यामध्ये त्रयस्थ संस्था प्रतिनिधी, अधिकारी व शिक्षक यांचा समावेशही असणार आहे. या मूल्यमापनाची विशेष बाब म्हणजे संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

असे होणार मूल्यमापन

मूल्यमापनासाठी प्रत्येक शैक्षणिक बीटमधून एक शाळा या पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शाळांमधील दोन इयत्तांची पटसंख्या ६० राहणार असून त्यापेक्षा पटसंख्या कमी असल्यास त्याच बीटमधील इतर काही शाळांची निवड करून दोन इयत्ता मिळून ६० विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. प्रत्येक बीटमधील शाळेची निवड राज्य अथवा जिल्हा स्तरावरून करण्यात येणार आहे. मूल्यमापनासाठी आवश्यक चाचणी प्रश्नपत्रिकांचा पुरवठा विभागाकडून करण्यात येणार असून राज्यभरात एकच प्रश्नपत्रिका वापरण्यात येणार आहे. त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन करण्यासाठी शिक्षण विभागांतर्गत शिक्षक, अधिकारी, अध्यापक, अध्यापक विद्यालयात शिकवणारे शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यांची मदत चाचणीसाठी घेण्यात येणार आहे.

विविध पातळीवर होणार विश्लेषण

मूल्यमापन अहवाल सादर करताना संकलन, विकसन, माहितीचे संगणकीकरण, विश्लेषण व अहवाल तयार करणे ही निवड केलेल्या संस्थेची जबाबदारी असणार आहे. माहितीचे विश्लेषण हे प्रामुख्याने इयत्तानिहाय, विषयनिहाय, शहरी, ग्रामीण, आदिवासी तालुके, मुले व मुली, माध्यमनिहाय व व्यवस्थापननिहाय करण्यात येणार आहे. विद्यार्थी चाचण्यांचे त्रयस्थपणे मूल्यमापन करण्याचा अनुभव असेल अशा संस्थांची निवड करणे, त्यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या संस्थेची राहणार आहे.

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे ही सध्याची गरजच आहे. मात्र, या मूल्यमापनातून शिक्षकांच्या शिकविण्याच्या पद्धतींची परीक्षा केली जाणार असेल तर ते बरोबर नाही. कारण विद्यार्थ्यांना शिकविण्यात शिक्षक हा केवळ एक घटक आहे. शिक्षणपद्धती ही खूप व्यापक आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती तपासण्यासाठी ही नक्कीच उपयुक्त ठरेल.

- मिलिंद वाघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला साहित्य संमेलन १९ जुलैला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शारदा बहुउद्देशीय संस्थेतर्फे १९ जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महिला साहित्य संमेलन हे ताराराणी हॉल, शाहू नगर, एलआयसी ऑफिसजवळ, नाशिकरोड येथे होणार आहे. या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वेदश्री थिगळे यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष भगूर नगरपालिकेचे नगरसेवक दीपक बलकवडे आहेत. संमेलनाचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सविता दलवानी, संगीता गायकवाड यांची उपस्थिती राहील.

संमेलनात सकाळी साडेनऊ वाजता नावनोंदणी, दहा वाजता उद्घाटन होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती लासूरकर करतील. सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात प्रिया धारूरकर (औरंगाबाद) लिखित व ठाण्याच्या संस्कृती प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 'घन दाटले स्वर' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी शांता पवार यांच्या दीर्घकाव्याचे प्रकाशनही होणार आहे.सकाळी अकरा वाजता कथाकथन सत्र आहे. यात सीमा सोनवणे (सटाणा), वसुधा देव (अहमदनगर), सरोज देशपांडे (परभणी) यांचा सहभाग असेल. कथाकथनानंतर प्रतिभा जाधव यांचा 'मी सावित्री' हा एकपात्री प्रयोग होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा जाधव-निकम व हर्षाली घुले करतील. दुपारी काव्यसंमेलन होणार आहे. सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा जाधव व जयश्री वाघ करतील. संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा शारदा गायकवाड, उपाध्यक्ष किशोर पाठक, सी. पी. मिश्र यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूकदार संघटनांचा संप मागे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गौण खनिजांची वैध वाहतूक करण्याची ग्वाही देत तसेच सिंहस्थाच्या कामांचा खोळंबा होऊ नये या हेतूने वाहतूकदार संघटनांनी संप मागे घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही अन्य जिल्ह्यातील दंडात्मक कारवाईच दर काय आहेत याबाबत माहिती घेऊन सकारात्मक तोडगा काढू, असे आश्वासन संघटनांना दिले आहे.

महसूल विभागाकडून अन्यायकारकरित्या दंड वसूल केल्याच्या निषेधार्थ वाळूसह अन्य गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी गेल्या काही दिवसांपासून बेमुदत बंदचे हत्यार उपसले होते. परिणामी साधुग्राम, वाहनतळे येथे मुरूम आणि अन्य सामग्री पोहोचणे बंद झाल्याने सिंहस्थाच्या कामांवर विपरीत परिणाम झाला होता. महसूल विभागाकडून वाळू वाहतूकदारांना होणारी दमबाजी, पंचनाम्याशिवायच केली जाणारी दंड वसुली, स्वत:च बाजारभाव ठरवून अन्यायकारकरित्या होणारी पाच पट दंड आकारणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवढी वाळू चोरीची तेवढ्याच ब्रासवर दंड आकारणी करावी, अशा मागण्यांसाठी हा संप करण्यात आला होता. मात्र हा संप बेकायदेशीर असल्याने जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांच्यासह वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कुशवाह यांची भेट घेतली. सखोल चर्चेनंतर संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी लेखानगर येथील मंगल कार्यालयात वाहतूकदारांची बैठक बोलावण्यात आली. अध्यक्ष शिवाजी चुंभळे, प्रकाश घुगे, दिनकर गांगुर्डे, गहिणू शिंदे, कैलास चुंभळे, अशोक चव्हाण, शरद म्हसके, राज चव्हाण यासह अनेकजण या बैठकीला हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images