Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विधी विभागाची भूमिका संशयास्पद

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राम स्वच्छतेसाठी दिलेल्या साडेपाच कोटींच्या वादग्रस्त ठेक्याबाबत महापालिकेच्या विधी विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. उच्च न्यायालयाने महापालिकेला बाजू मांडण्यासाठी सोमवारची शेवटची मुदत दिल्यानंतरही सुनावणीला पालिकेचे मुख्य वकील उपस्थित नव्हते. या प्रकरणावर आज अंतिम सुनावणी होईल. दरम्यान, क्रिस्टल कंपनीनेही न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महापालिका प्रशासनाने सुमारे साडेपाच कोटींच्या ठेक्यासाठी वॉटर ग्रेस प्रॉडक्ट या कंपनीने सर्वांत कमी निविदा दर दाखल केला होता. परंतु, या कंपनीचा ठेकेदार हा काळ्या यादीत असल्याने तसेच त्याच्याकडे सुमारे ९५ लाख रुपयांची थकबाकी असल्याचा आरोप झाला. सभापतींनी या ठेकेदाराऐवजी द्वितीय न्यूनतम दर सादर करणाऱ्या क्रिस्टल कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्थायीच्या निर्णयाविरुद्ध वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ठेकेदाराने आपण काळ्या यादीत नसल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले. तर, ९५ लाखांच्या थकबाकीसंदर्भात महापालिका प्रशासनावरच ठपका असल्याचा दावा ठेकेदाराने केला. त्यामुळे उच्च न्यायालयाने पालिकेला बाजू मांडण्यासाठी सोमवारची मुदत दिली होती. त्यासाठी सोमवारच्या सुनावणीत पालिकेचे वकील जे शेखर त्यांनी गैरहजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधीबाबत राज ठाकरेंकडून दिशाभूल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार निधी देत नसल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेला आरोप खोटा असल्याचे समोर आले आहे. सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यांतर्गत राज्य सरकारने आतापर्यंत ४८७ कोटी रुपये नाशिक महापालिकेला दिल्याचे समोर आले आहे. महापालिकेने केवळ ५६ कोटी रुपयेच सिंहस्थावर खर्च केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

राज ठाकरेंनी सिंहस्थ निधीसाठी राज्य सरकारवर आगपाखड केली होती. राज्य व केंद्र सरकार मदत करीत नसल्याचा आरोप करीत महापालिकेनेच काम केल्याचा दावा केला होता. कुंभमेळ्यासाठी महापालिकेचा सिंहस्थ आराखडा हा १११९ कोटीपर्यंत पोहचला. त्यात २०० कोटी रुपये भूसंपादनाचे होते. त्यामुळे उर्वरित ९१९ कोटी पैकी राज्य सरकारचा वाटा ७५ तर महापालिकेचा वाटा २५ टक्के ठरला होता. त्यानुसार राज्य सरकारकडे महापालिकेचे घेणे हे ६८९ कोटी रुपये आहे. सिंहस्थामुळे महापालिकेला राज्य सरकारने

आतापर्यंत ४८७ कोटी १७ लाख रुपये दिले आहेत. यात आघाडी सरकारच्या काळात २२२ कोटी तर भाजप सरकारच्या काळात २६५ कोटी रुपये महापालिकेला मिळाले आहेत. राज्य सरकारडे अद्यापही २०२ कोटी रुपये येणे बाकी आहे.

केंद्राच्या निधीचा पत्ता नाही

कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने ४८७ कोटी दिले असले तरी, केंद्र सरकारच्या निधीचा अद्याप पत्ता नाही. केंद्र सरकारने १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र हा निधी मिळाला नसल्याचा आरोप मनसेतर्फे केला जात आहे. केंद्र सरकार निधीबाबतीत दुजाभाव करीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोभायात्रेने झाले कुंभपर्वाचे स्वागत

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

भारताच्या वैभवशाली परंपरेचा वारसा असलेल्या कुंभपर्वाच्या स्वागताची त्र्यंबकवासीयांनी काढलेली शेभायात्रा दिमाखदार आणि उत्साहाने भरलेली होती. अग्रभागी शुयमा ब्राह्मणसंस्थेची पालखी, वाद्यवृंद व महिलांचे लेझीमपथक आणि गरबा नृत्याने रस्ते फुलून गेले होते. निमित्त होते ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला काढलेली शोभायात्रा.

ध्वजपर्वाच्या पूर्वसंध्येला त्र्यंबवासीयांनी आखाडा परिषद, पुरोहित संघ, देवस्थान विश्वस्त, विविध सामाजिक संस्था आणि त्र्यंबक नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रा काढण्यात आली. महिलांनी काही दिवसांपासून अथक मेहनत घेत केलेले प्रयत्न सत्कारणी लागले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शोभायात्रेस कुशावर्त तिर्थापासून प्रारंभ झाला. सर्वात अग्रभागी शुयमा ब्राह्मणसंस्थेची पालखी होती. त्यापाठोपाठ विविध चित्ररथ सहभागी झाले होते. वाद्यवृंदाच्या शोभेच्या वाहनात ताम्र ध्वजा ठेवण्यात आली होती. तेथे महंत हरीगिरी आणि महंत नरेंद्रगिरी महाराज स्थानापन्न झाले होते. महिलांचे लेझीमपथक आणि गरबा नृत्याने रस्ते फुलून गेले होते. पुरोहित युवकांचे ढोलताशे तसेच मंगलवाद्य यांनी वातावरणात नादमयता निर्माण झाली. परशुरामाचा रथ, गंगागोदावरी आणि कुंभ, भव्य शंकाराची मूर्ती, संतसेना महाराज असा देखावा नयनमनोहरी होता.

स्वामी सागरानंद सरस्वती, डॉ. बिंदुजी महराज, उमानंद महाराज आणि साधुमहंत यात सहभागी झाले होते. तसेच त्र्यंबकमधील समस्त पुरोहितवर्ग देखील पारंपरीक वेशभूषेत उपस्थित होता. खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित आणि अभियंता रमेश गावित या शोभायात्रेसाठी उपस्थित होते. नगराध्यक्षा अनघा फडके, उपनगराध्यक्ष संतोष कदम, नगरसेवक धनंजय तुंगार, योगेश तुंगार आणि त्यांचे सर्व सहकारी, पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे, सदस्य त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना घराघरात पोहोचविणार ‘वंदे मातरम’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आजच्या युवक व बालकांना क्रांतिकारकांचा इतिहास माहीत व्हावा, या उद्देशाने उध्दव ठाकरे यांनी शाळांमध्ये टॅब वाटून त्यामध्ये वसंत पोतदार यांचा 'वंदे मातरम' हा कार्यक्रम ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल त्यांचे जनमानसात स्वागत होत असून, शिवसेना हा 'वंदे मातरम' कार्यक्रम आता घराघरात पोहोचविणार आहे.

सुप्रसिध्द लेखक, एकपात्रीकार वसंत पोतदार यांनी आयुष्यभर क्रांतिकारकांच्या गाथा जगभर सादर केल्या. त्यांच्या 'वंदे मातरम' या सशस्त्र क्रांतिकारकांच्या एकपात्री भारतभर लाखों तरुणांच्या मनात क्रांतीची बिजे पेरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वंदे मातरम हा कार्यक्रम जेव्हा ऐकला तेव्हा ते भारावून गेले व वंदे मातरम या कार्यक्रमाच्या कॅसेट विकत घेऊन त्य सर्वत्र वाटल्या. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने प्रयत्न सुरू असून या उपक्रमाचाच एक भाग म्हणून प्रारंभ मुंबईतील बालमोहन विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटून करण्यात आला होता. या शैक्षणिक टॅबमध्ये आठवीचा संपूर्ण शालेय अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. याच टॅबमध्ये वसंत पोतदार यांचा वंदे मातरम या कार्यक्रमाची क्लिप टाकण्यात आली आहे.

वसंत पोतदारांच्या 'वंदे मातरम' या प्रयोगाचा समावेश टॅबमध्ये केल्याबद्दल उध्दव ठाकरे यांना नाशिकच्या कलाभ्रमंती संस्थेतर्फे सन्मानचिन्ह देऊन रेखा पोतदार, शरद उगले, खासदार विनायक राऊत, आदेश बांदेकर, अजय बोरस्ते, राजेश लोथे आदी मान्यवरांनी सन्मानित केले. यावेळी ठाकरे यांनी 'वंदे मातरम' घराघरात पोहोचविणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांनी रात्रीच केली सफाई

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रविवारी कमला एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे अस्वच्छ झालेले रामकुंड महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या प्रयत्नामुळे सोमवारी स्वच्छ झाले. रामकुंडाच्या अस्वच्छेतेची माहिती मिळताच डॉ. गेडाम टीमसह गोदापात्रात उतरले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच साफसफाई मोहीम राबवून गोदापात्र स्वच्छ केले.

रविवारी कमला एकादशी असल्याने देशभरातील भाविक रामकुंडावर दर्शनासाठी आणि स्नानासाठी आले होते. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असल्याने सायंकाळच्या सुमारास गोदापात्र अस्वच्छ झाले. सगळीकडे निर्माल्य पसरल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली. सोमवारी शोभायात्रा असल्याने आणि मंगळवारी ध्वजारोहण सोहळा असल्याने आयुक्तांनी ही अस्वच्छता गंभीरतेन घेत महापालिकेची यंत्रणा साफसफाईसाठी नदीत उतरवली. केवळ यंत्रणाच उतरवली नाही तर, स्वतः आयुक्त गेडाम रामकुंडातील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. त्यांच्या या उत्साहामुळे अधिकारी आणि कर्मचारीही जोमाने कामाला लागले. जवळपास दीड तास अथक प्रयत्न केल्यानंतर व नदीपात्रात पाणी सोडल्यानंतर गोदापात्र स्वच्छ झाले. आयुक्तांचा उत्साह पाहून अधिकारी व पदाधिकारीही अवाक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संप मागे घ्या; अन्यथा कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी पुकारलेला संप पूर्णत: बेकायदेशीर आहे. वाहतूकदार संघटनांनी हा संप तत्काळ मागे घेतला नाही तर संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम १९०५ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने जिल्हा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनला दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेद्वारे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चुंभळे यांना ही नोटीस बजावली आहे. २४ तासांच्या आत या नोटीसचा खुलासा केला नाही तर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात महसूल आणि वन विभागाच्या १२ जून २०१५ रोजीचा अध्यादेश आणि ११ मे २०१५ रोजीच्या अधिसूचनेनुसार कारवाई करण्यात येत आहे. कारवाई नियमानुसारच होत आहे. याउलट संघटना बेकायदेशीररित्या संप पुकारून सिंहस्थासाठी लागणाऱ्या गौणखनिजांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सिंहस्थाशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी प्रशासनाच्या हाती राहिला आहे. अशा परिस्थितीत वाहतूकदार संघटनांनी ४ जुलैपासून पुकारलेल्या संपामुळे गौणखनिजांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी कामे मुदतीत पूर्ण करण्यास बाधा निर्माण झाली आहे. ही कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास भविष्यात त्यामुळे काही आपत्ती उद्भवून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच संघटनेविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम १९०५ च्या तरतुदीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न या नोटिसव्दारे उपस्थित करण्यात आला आहे. २४ तासांच्या आत याबाबत खुलासा करावा तसेच बेकायदेशीररित्या सुरू असलेला संप तत्काळ मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने संबंधितांना केले आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. ‌िंसंहस्थ कंुभमेळ्याचे पडघम वाजल्यानंतर वाहतूकदारांनी संप पुकारून प्रशासनाची पुरती कोंडी केली आहे. यामुळे कामांना खो बसला आहे.

आपत्ती निर्माण होऊन जीवित अथवा वित्त हानी झाल्यास आम्हाला जबाबदार धरण्याचा इशारा प्रशासनाने देऊन आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही जबाबदारी सर्वस्वी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांवरच असणार आहे. वाहतूकदार स्वत:च्या मालकीच्या वाहनांनी गौण खनिजांची ने-आण करतात. सिंहस्थाचे ठेकेही आम्ही घेतलेले नाहीत. त्यामुळे कायद्याची भीती दाखवून आम्हाला नाहक यामध्ये ओढण्याचा प्रयत्न होत आहे. आम्हाला काम करण्याची इच्छा असून प्रशासनाने वरिष्ठ स्तरावर चर्चा करून शहराचा व या सोहळ्याचाही नावलौकीक वाढवावा.

- शिवाजी चुंभळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इनक्रेडिबल इंडिया’त नाशिक सिंहस्थ दूरच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्राचीन भारताची ओळख जपणारा सिंहस्थ कुंभमेळा अन् नाशिकनगरीला इनक्रेडिबल इंडिया या शासकीय वेबसाइटमधून हद्दपार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रीलिजियस हबमध्ये नाशिकचा समावेश असतांनाही जागतिक स्तरावर सिंहस्थाचे ब्रॅन्डिंग करण्यात केंद्र सरकारअपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे भौगोलिकदृष्ट्या नाशिकपेक्षा लहान असलेल्या उज्जैनच्या कुंभमेळ्याचा समावेश असतांना नाशिकला मात्र वेबसाइटपासून दूर ठेवण्यात आले आहे. याबाबत राज्य सरकारही उदासीन असल्याचे समोर आले आहे.

नाशिकमध्ये उज्जैनच्या आधी एक वर्ष सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सांस्कृतिक, धार्मिक व पौराणिकदृष्ट्या नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा आगळावेगळा आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याला वेगळेच महत्त्व व संदर्भ आहेत. मात्र, असे असतांनाही, केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट वर (w.w.w.incredibleindia.org) नाशिकला स्थान देण्यात आलेले नाही. उज्जैनमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याचे सविस्तर पानच वेबसाइटमध्ये तयार करण्यात आले आहे. नाशिकचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही. भौगोलिकदृष्ट्या विचार करता उज्जैनचे क्षेत्रफळ ९५ स्केअर किमी आहे, तर नाशिकचे क्षेत्रफळ २५९ स्केअर किमी म्हणजे उज्जैनच्या मानाने बरेच मोठे आहे. उज्जैनची लोकसंख्या ६.५ ते ७ लाख, तर नाशिकची लोकसंख्या १७ ते १८ लाख म्हणजे उज्जैनच्या मानाने फारच मोठी आहे. उज्जैनसाठी निधींची तरतूद १६०० कोटी, तर नाशिकसाठी भौगोलिक, लोकसांख्यिक सर्व बाबी मोठ्या प्रमाणावर असतांनाही नाशिकवर दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप लेनकर यांनी केला आहे.

निधीबाबतही सापत्न वागणूक

आजच्या तांत्रिक युगात कुंभमेळ्यानिमित जागतिक पातळीवर नाव झळकण्याची जी संधी आहे, त्यात महाराष्ट्राचे व नाशिकचे नाव नसावे ही मराठी माणसासाठी अत्यंत खेदजनक व दुर्दैवी बाब असल्याचा आरोप लेनकर यांनी केला आहे. संकेतस्थळावर कुंभमेळ्याविषयी उज्जैनला प्राधान्य देवून नाशिक दुर्लक्षित केलेच आहे. मात्र, सिंहस्थ निधी मदत बाबतीतही शासनाने दुजाभाव करून महाराष्ट्र व नाशिकच्या जनतेवर अन्याय केला आहे. सिंहस्थाच्या ब्रॅन्डिंगसाठी एकीकडे कोट्यवधींची उधळपट्टीची तयारी सुरू असतांना राज्य सरकारलाही याचा विसर पडलेला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचेच सरकार असतांना नाशिकच्या सिंहस्थाचा या वेबसाईटमध्ये समावेश झालेला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनौषधींसाठी स्वतंत्र महामंडळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतात आयुष मिशनअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयुर्वेद हॉस्पिटल आणि आयुर्वेद संशोधनकेंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. सोबतच आदिवासी भागातील दुर्मिळ वनौषधी खरेदी करण्यासाठी आयुष मंत्रालय स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. मात्र, यासाठी राज्य सरकारांनी पाठपुरावा करायला हवा असे सांगत, आयुष मंत्रालयाने सहा महिन्यांत २६ टक्के खर्च केल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना श्रीपाद नाईक यांनी भारतात जशी आयुर्वेदाला मान्यता आहे, तशीच मान्यता जगभर मिळावी यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. नाईक पुढे म्हणाले, की मॅगीसारख्या घटना टाळण्यासाठी भारतीय जीवनशैलीचे खाद्यपदार्थ असावेत यासाठी एक धोरण तयार करण्याचा विचारही केंद्र सरकार तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी कुटूंब नियोजन उपक्रम यशस्वीपणे सुरू असून, ३६ पैकी २४ राज्यांमध्ये प्रभावी काम झाले आहे. आयुष मंत्रालयाच्या कामकाजाला गती दिली असून, मंत्रालयाचा खर्च २६ टक्के झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पाकसाठी गनिमी कावा

पाकिस्तानचे पतंप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीमुळे नरेंद्र मोदींवर टीका होत असली तरी आम्ही शिवाजी महारांजाच्या धोरणानुसार राजकारण करत आहोत. दोन पावले मागे जाणे म्हणजे तो गनिमी काव्याचा भाग असल्याचा दावा नाईक यांनी केला.

राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा

नाशिकमध्ये आयुर्वेद संशोधन केंद्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयुर्वेदाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला तर तत्काळ मंजुरी देवू, असे आश्वासन त्यांनी दिले. संशोधन केंद्र व अभ्यासक्रम हवे असल्यास राज्य सरकारकडून तसा प्रस्ताव यावा लागतो. असा प्रस्ताव आल्यानंतरच आयुष मंत्रालयातर्फे मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुगारवाडीत तरुण बुडाला

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याजवळ रविवारी सायंकाळी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह त्र्यंबकेश्वर पोलिस व अग्निशमन दलाला सोमवारी सकाळी मिळाला. दुर्गेश अनिल सुबंध (वय १८) असे त्याचे नाव आहे. सिडकोतील शिवाजी चौकात भाजी मार्केटजवळ तो राहत होता. दुर्गेश हा अस्वली येथे दर्गावर दर्शनासाठी जातो, असे सांगून घरातून गेला होता. दर्शन आटोपल्यानंतर तो मित्रांसमवेत दुगारवाडीला फिरण्यासाठी गेला होता. गेल्याच आठवड्यात सिडकोतील सावतानगरमधील एक तरुण दुगारवाडी धबधब्यात बुडाल्याची घटना घडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज फडकणार ध्वजा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारा वर्षे प्रतीक्षा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आज, मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. सगुण-निगुर्णाची साक्ष देणाऱ्या सिंहस्थ मेळ्यामुळे गोदा घाटाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असून, त्याची प्रचिती नाशिककरांना सोमवारच्या मिरवणुकीदरम्यान आली.

मागील दोन वर्षांपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. साधुग्राम, रस्ते, पथदीप, नदी घाट अशा प्रत्येक घटकांवर बदलाची चुणूक देणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. पुरोहित संघातर्फे मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा पार पडेल. या मुहूर्तावर गुरूचा सिंह राशीत प्रवेश होणार असून, यानंतर पुढील वर्षभर सिंहस्थ कुंभमेळ्यातील विविध पर्वण्या साधू-महंतांसह भाविकांना घेता येईल. साधू-महंतांच्या आखाड्यांच्या ध्वजारोहणाच्या तारखा वेगळ्या असून, ३० जुलै रोजी होणाऱ्या गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर साधू महंतांच्या संख्येत भर पडणार आहे.

कडेकोट बंदोबस्त

रामकुंडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी शहर पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. तब्बल ५०० पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी नियुक्त केले जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिली. ध्वजारोहणाचा कार्यक्रम पहाटे होणार असला तरी रात्रीपासूनच पोलिसांनी घाटाकडे येणारे रस्ते बंद करून बंदोबस्तात वाढ केली. या सोहळ्याच्या निमित्ताने घाटाच्या क्षमतेची चाचणी प्रशासनाला करता येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

ध्वजारोहण कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राजनाथसिंह सोमवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले आहेत. गृहमंत्री राजनाथसिंग, पकंजा मुंडे त्र्यंबकेश्वर येथे तर उर्वरित मंत्री नाशिकमधील कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कुंभपर्वाचा शंखनाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बारा वर्षे प्रतीक्षा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आज, मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात झाली. सगुण-निगुर्णाची साक्ष देणाऱ्या सिंहस्थ मेळ्यामुळे गोदा घाटाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असून, त्याची प्रचिती आधीच म्हणजे काल सोमवारच्या मिरवणुकीदरम्यान नाशिककरांनी अनुभवली.

मागील दोन वर्षांपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनाची तयारी सुरू होती. साधुग्राम, रस्ते, पथदीप, नदी घाट अशा प्रत्येक घटकांवर बदलाची चुणूक देणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात अखेर मोठ्या उत्साहात झाली आहे. पुरोहित संघातर्फे मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा पार पडला. या मुहूर्तावर गुरूचा सिंह राशीत प्रवेश झाला असून, पुढील वर्षभर सिंहस्थ कुंभमेळ्यातील विविध पर्वण्या साधू-महंतांसह भाविकांना घेता येईल. साधू-महंतांच्या आखाड्यांच्या ध्वजारोहणाच्या तारखा वेगळ्या असून, ३० जुलै रोजी होणाऱ्या गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमानंतर साधू महंतांच्या संख्येत भर पडणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

ध्वजारोहण कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. राजनाथसिंह सोमवारी सायंकाळीच शहरात दाखल झाले. गृहमंत्री राजनाथसिंग, पकंजा मुंडे त्र्यंबकेश्वर येथे तर उर्वरित मंत्री नाशिकमधील कार्यक्रमाला हजर आहेत.

कडेकोट बंदोबस्त

रामकुंडावर शहर पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. तब्बल ५०० पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. घाटाकडे येणाऱ्या रस्त्यांवरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र ‘आखाड्या’साठी साध्वींचा ‘एल्गार’!

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

महिलांना समान अधिकार मिळण्याची 'लढाई' आता कुंभमेळ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. नाशिकमध्ये आजपासून सुरु झालेल्या कुंभमेळ्यात हे चित्र पाहायला मिळाले. साधूंना मिळणा-या सुविधा साध्वींनाही मिळायला हव्यात अशी मागणी साध्वींकडून करण्यात आली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, साधूंचा आखाडा जसा आहे, त्याप्रमाणे साध्वींचा आखाडा असायला हवा, यासाठी साध्वींचा एक गट प्रयत्नशील आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानाला अन्यसाधारण महत्व असल्याने साध्वींसाठी स्नानांसाठी राखीव वेळ ठेवण्यात यावी, यावेळी केवळ महिलाच नदीत डुबकी मारु शकतील, अशी मागणी साध्वींकडून करण्यात आली आहे. साध्वींचा वेगळा आखाडा असायला हवा यासाठी कलेक्टरपासून मंत्र्यापर्यंत जाऊन आले परंतू मला केवळ आश्वासनच देण्यात आल्याची माहिती एका साध्वीने दिली.

कुंभमेळ्यातील धार्मिक कार्यक्रमात महिला मोठ्या श्रद्धेने सहभाग घेत असल्याने त्यांना साधूसमान सुविधा मिळायला हव्यात. साध्वींना जर साधूप्रमाणेच सुविधा मिळाल्या तर आपण १५ हजार इतर साध्वींना नाशिकच्या कुंभमेळ्यात आमंत्रित करु असा दावा अलाहाबादमधूम आलेल्या एका साध्वीने केला. कुंभमेळ्यात १३ आखाडे समानतेसाठी संघर्ष करीत असतील तर साध्वींना सुविधा मिळायला हव्यात असे त्या साध्वीने सांगितले.

साध्वींच्या मागण्या

साध्वींसाठी १० एकर जमीन राखीव हवी

२०x२५ फुटांच्या २५ विशेष खोल्या असायला हव्यात

१०x१५ फुटांच्या साधारण ५० खोल्या असायला हव्यात

सत्संगासाठी विशेष मंडपाची व्यवस्था हवी

सर्व खोल्यांमध्ये बाथरुम आणि वीजेची सुविधा हवी

४ विश्रांतीगृह, इतर ५० बाथरुम आणि ५० खुर्च्या हव्यात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तांचा उत्साह शिगेला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ध्वजारोहण समारंभासाठी भाविकांचा उत्साह दांडगा होता. अनेक भाविकांनी सोमवारी मध्यरात्रीपासून मिळेल त्या ठिकाणी आसरा घेत सकाळी स्नानासाठी गर्दी केली. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी नाशिकच नव्हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक उपस्थित होते. नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करून रामकुंडाकडे प्रयाण केले. पहिल्या पर्वणीला होणारी गर्दी लक्षात घेता अनेक भाविकांनी मंगळावारीच स्नान केले. रामकुंडाकडे येणारे सर्व मार्ग गर्दीने फुलून गेले. लहान-मोठे ज्येष्ठ नागरिक १२ वर्षांनी येणारा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी आतूर झाले. मंहत ग्यानदास महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होताच आपण या घटनेचे साक्षीदार असल्याचे समाधान नागरिकांच्या चेहऱ्यावर होते. ध्वजारोहणाच्यावेळी रामकुंडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हा क्षण अनेकांनी मोबाइलमध्ये टिपला. तसेच आपल्या सोबत आलेल्या ज्येष्ठांचे पाय धुऊन त्यांचे आर्शिवाद घेण्यात येत होते. पूर्वजांना शांती मिळावी यासाठी दक्षिण गंगा असलेल्या रामकुंडावर अनेकांनी श्राध्दविधी केले.

पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

रामकुंड परिसरात सकाळी दुकाने बंद होती. त्यामुळे भाविकांना पाणी मिळणे देखील कठीण झाले. मालेगाव स्टॅँड किवा पंचवटी कारंजापर्यंत पाण्यासाठी भाविकांना पायपीट करावी लागली. मोबाइल टॉयलेट नसल्याने अनेकांचे हाल झाले. त्यामुळे सोहळा संपल्यानंतर जागा मिळेल तेथे नागरिकांनी प्रात:विधी उरकले. स्टेजच्या बाजुला असलेल्या शौचालयात गर्दी झाल्याने नागरिकांना दीर्घाकाळ प्रतीक्षा करावी लागली. पर्वणी काळात पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ झाल्याने त्र्यंबकनगरीत भाविकांनी गर्दी केली होती. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे लुबाडले. त्र्यंबकेश्वर ते नाशिक प्रवासासाठी प्रवाशांकडून ५० रुपये शुल्क आकारण्यात येत होते. बसचे प्रवास भाडे ३२ रुपये असताना वाहनचालक बसभाड्यापेक्षा पाच रुपये अधिक घेत असल्याचे सांगत प्रवाशांची दिशाभूल करीत होते. ध्वजारोहणाच्या निमित्ताने प्रवासी वाहतूकदार पैसे कमावण्याची पर्वणी साधत असल्याचे पहावयास मिळाले.

आरोग्य सेवा तत्पर

सिंहस्थ काळात अनुचित घटना घडल्यास भाविकांना तत्काळ सेवा पुरविता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने आपले वैद्यकीय पथक सज्ज ठेवले होते. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १२५ जणांचे मनुष्यबळ भाविकांवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एकनाथ माले यांनी दिली. सोमवारी सायंकाळी कुशावर्त, मंदिर परिसरात धूर फवारणी करण्यात आली होती. कुशावर्त, मंदिर तसेच त्र्यंबकेश्वर मार्गावर फिरते दवाखाने भाविकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आले होते.

पोलिसांनीही लुटला आनंद

सातत्याने बंदोबस्ताच्या तणावाखाली असणाऱ्या पोलिसांनीही ध्वजारोहण सोहळ्याचा आनंद लुटला. हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी, ताम्र ध्वज स्तंभावर चढविला जात असतानाचे क्षण त्यांच्याकडून कॅमेऱ्यात चित्रबध्द करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.

नाश्त्याचे दरही वाढले

ध्वजारोहणासाठी भाविकांनी गर्दी केल्याने नाश्‍त्याचे दरही वाढले होते. प्रत्येक पदार्थामागे दोन ते पाच रुपये वाढविण्यात आले होते. यामुळे भाविकांना जादा पैसे मोजावे लागले.

रिक्षा व्यवसाय बहरला

एरवी प्रवासी मिळविण्यासाठी चढाओढ करणाऱ्या रिक्षाचालकांना मंगळवारी चांगलीव मागणी वाढली होती. कुशावर्त ते बस स्टँड या मार्गावर दहा ते वीस दर आकारत रिक्षावाल्यांनी चांदी करून घेतली. दिवसभरात नेहमीपेक्षा दुप्पट कमाई झाल्याचे रिक्षाचालकाने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे मंगळसूत्र लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पुण्याहून आलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गांधी ज्योत येथे सकाळी पाऊणेसात वाजेच्या सुमारास घडली. ललिता रमेश हिंगे असे या महिलेचे नाव आहे.

त्या ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्यासाठी पुणे येथून आल्या होत्या. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या बहिण असलेल्या हिंगे पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास गांधी ज्योत येथे आल्या तेव्हा गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बंदोबस्तासाठी उपस्थित पोलिसांना याची तत्काळ माहिती दिली. मात्र, मंगळसूत्राचा तपास लागू शकला नाही. गर्दीतील चोर भामट्यांना रोखण्यासाठी पोलिसांना आखणी प्रयत्न वाढवावे लागतील, असे या घटनेमुळे स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रथमच दोन दिवसांचे ध्वजारोहण

0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

सिंहस्थ कुंभाची धर्मध्वजा अवकाशात फडकविताना यंदा प्रथमच दोन दिवस ध्वजारोहणाचा सोहळा रंगला. एरव्ही कुंभपर्वाच्या सुरुवातीचा शंखनाद करण्यासाठी एकमेव दिवस भाविकांच्या हाती येतो. सन् २००३ च्या कुंभमेळ्यात ध्वजारोहणाचा मुहूर्त ११.३० वाजता होता. त्यामुळे तपापूर्वीचा सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा तेव्हा दिवसभरासाठीच होता. यंदा ध्वजारोहणाच्या लवकरच्या मुहूर्तामुळे शोभायात्रेचे नियोजनही बदलावे लागले.

आठवणीतल्या कुंभाला उजाळा देणाऱ्या ज्येष्ठांमध्येही कुंभपर्वाचा ध्वजारोहण सोहळा एकदिवसीय असल्याच्या आठवणी आहेत. भल्यापहाटे ध्वजारोहणाचा मुहूर्त असणारी वेळ यंदा अनेक वर्षांनी आली. यामुळे हा सोहळा भाविक अन् प्रशासन दोहोंचाही आनंद वाढविणारा दुग्धशर्करा योगच घेऊन आला आहे. श्री काळाराम मंदिरातून धर्मध्वजा आणि प्रतिकात्मक अमृत कलशाचे विधीवत पूजन होऊन पालखीतील गंगामातेच्या मूर्तीसह शोभायात्रा दक्षिणवाहीनी गोदेच्या काठावर पोहचते. अन् गुरूच्या सिंह राशीतील प्रवेशासोबतच नव्या कुंभपर्वाचा शंखनाद गोदेच्या संथ पाण्यावर तरंग उमटवितो. यंदा याच परंपरेनुसार सिंहस्थाची धर्मध्वजा फडकली. पण, गुरूच्या सिंह राशीतील प्रवेशाचा मुहूर्त यंदा सूर्योदयाच्या वेळीचा असल्याने ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येलाच शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले.

दोन वाजता निघणार होती शोभायात्रा

जाणकारांनाही कुंभमुहूर्त यंदा लवकर असल्याचा अनुभव नवीन होता. पहाटे ६.१६ वाजता असणाऱ्या या मुहूर्तामुळे शोभायात्रा अन् ध्वजारोहण या दोन्हीही सोहळ्यांची सांगड कशी घालावी, यातील सहभागी व्हीव्हीआयपींचे नियोजन, दोन्हीही सोहळ्यातून फुलणाऱ्या गर्दीचे नियोजन असे प्रश्नचिन्ह श्री गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघासमोर होते. मध्यरात्री दोन वाजता शोभायात्रा काढण्याचाही एक पर्याय संघासमोर होता. मात्र प्रथा आणि धार्मिक संदर्भांनुसार सूर्यदर्शन झालेल्या दिवसाला महत्त्व देत पूर्वसंध्येला ही शोभायात्रा काढण्यात आली. परिणामी प्रशासनावरील भार हलका होण्यासोबतच यंदा प्रथमच मिळालेल्या दोन दिवसीय सोहळ्यामुळे भाविकांचाही आनंद व्दिगुणीत झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथेही याच पध्दतीने यंदा हा सोहळा दोन दिवसांसाठी रंगला.

गत कुंभमेळ्यात ध्वजारोहणाचा मुहूर्त साडेअकरा वाजता असल्याने त्याच दिवशी शोभायात्रा पार पडली होती. यंदा मात्र लवकरच्या मुहूर्तामुळे हा सोहळा दोन दिवसात विभागला गेला. भाविक आणि प्रशासन या दोहोंच्याही दृष्टीने ही बाब सकारात्मक झाली.

- सतीश शुक्ल, अध्यक्ष, श्री गंगा गोदावरी पंचकोठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडाकडे जाणारे रस्ते बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्यामुळे रामकुंड परिसराकडे जाणारे मार्ग मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.
रामकुंडावर होणारी गर्दी लक्षात घेता सोमवारी दुपारपासूनच बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. कोणते मार्ग आपत्कालीन परिस्थितीत सुरू ठेवायचे व कोणते मार्ग बंद करायचे याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. सकाळी ६.१६ वाजता ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात होणार असल्याने रामकुंडाकडेकडे जाणारे मार्ग रात्री १२ नंतर बंद करण्यात आले. मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड, इंद्रकुंड ते रामकुंड, मतेवाडापासून कपालेश्वरकडे जाणारी वाहने, काट्यामारुती ते सरदार चौक व काट्या मारुती ते गजानन चौक, पुढे मालवीय चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. या काळात स्थानिक नागरिकांना पंचवटी कारंजा ते मालवीय चौक ते मतेवाडा ते इंद्रकुंड हा एकेरी मार्ग वापरण्यासाठी खुला ठेवण्यात आला. तसेच काट्यामारुती ते नागचौक ते गजानन चौक ते सेवाकुंज ते दिंडोरीनाका हा मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला. रामकुंडाकडे येणाऱ्या भाविकांनी आपली वाहन अमरधाम रोड, आयुर्वेदिक कॉलेजमार्गे रोकडोबा पटांगण, श्रद्धा लॉन्स, अमरधाम रोडच्या दोन्ही बाजूच्या लेनवर पार्क केली होती. तेथून पायी रामकुंडावर भाविक येत होते. परतीसाठी गौरी पटांगण, देवी चौक, गणेशवाडी, काट्यामारुती चौक किंवा गौरी पटांगण अमरधाम या मार्गे जाण्याचा मार्ग आखण्यात आला होता. त्याच प्रमाणे रविवार कारंजाकडून बोहरपट्टी कडे येणारी वाहतूक रविवार कारंजावरच आडवण्यात आली होती बोहरपट्टचीकडे फक्त टुव्हीलरला परवानगी देण्यात आली होती. सराफ बाजारातील मारुती मंदिरापासून रामसेतूपर्यंत पूर्णतः वाहतूक बंद करण्यात आली होती. तर चांडवडकर गल्लीकडून गौरी पटांगणावर जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. तसेच छोट्या गल्ल्यांमध्येही वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक भडकले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन व्हावे, म्हणून महापालिका प्रयत्नशील आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनात महापालिकेचा सिंहाचा वाटा असताना नगरसेवकांना प्रशासनातर्फे तुच्छ वागणूक दिली जात असून, कुंभमेळा कार्यक्रम भाजपाने हायजॅक केल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. दरम्यान, नगरसेवक आणि पोलिसांमध्ये प्रवेशावरून बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

रामकुंड परिसरात मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत बग्गा, सभागृहनेते सलिम शेख, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेविका योगिता आहेर, पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती सुनीता शिंदे, गटनेते तानाजी जायभावे, नगरसेवक विलास शिंदे, अशोक सातभाई यांच्यासह इतर नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांना वगळता इतर नगरसेवकांना पोलिसांनी रोखले. यानंतर, सभेच्या ठिकाणी नगरसेवकांना जाऊ देण्यात आले नाही.

नगरसेवकांनी आयडी कार्ड दाखवल्यानंतरही पोलिसांनी हुज्जत घातल्याचा आरोप संबंधित नगरसेवकांनी केला. एवढेच नव्हे तर महिला नगरसेवकांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप नगरसेविका योगिता आहेर यांनी केला. एवढेच नव्हे तर अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना सुध्दा पोलिस प्रशासनाने रोखले. आम्ही विनंती केल्यानंतरच पोलिसांना त्यांना सभास्थळी सोडल्याचे नगरसेवक तानाजी जायभावे यांनी सांगितले.

पक्षीय राजकारणाने डोके काढले वर

कुंभमेळ्याचा कार्यक्रम भाजपाने हायजॅक केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अपक्ष आघाडी, शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. ध्वजारोहण कार्यक्रमात महापौरांचा अव्हेर करण्यात आला. सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवण्यात आल्याचा आरोप सर्व नगरसेवकांनी केला. सुरक्षेच्या दृष्टीने ज्या खबरदारी आखणे आवश्यक होते.

पालकमंत्र्यांनी मागितली माफी

कार्यक्रम सुरू असताना या प्रकाराची कुणकुण आमदार देवयानी फरांदे यांना लागली. त्यांनी तत्काळ सर्व नगरसेवकांची भेट घेऊन सभेला येण्याची विनंती केली. मात्र, संबंधित नगरसेवकांनी ही विनंती फेटाळून लावत पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची भेट घेतली. तसेच, असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची दक्षता घेऊ असे आश्वासन देऊन माफी मागितली.

लोकप्रतिनिधींना अवमानकारक वागणूक देणे चूक आहे. शेवटी कुंभमेळ्याचे नियोजन महापालिकाच करीत आहे. याबाबत पालकमंत्र्यांना रितसर निवेदन सादर करून प्रशासनाच्या भूमिकेत बदल करण्याची विनंती करण्यात येईल.

- अशोक मुर्तडक, महापौर

प्रशासन व सरकारने लोकप्रतिनिधींना डावलणे चूक आहे. ध्वजारोहण कार्यक्रमात सर्व मान महापौरांना मिळणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. प्रशासनाने आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही तर महासभेची विशेष बैठक आयोजित करून पुढील रणनिती आखली जाईल. झालेल्या कृत्याचा निषेध करतो.

- गुरुमीत बग्गा, उपमहापौर

कुंभमेळ्याच्या आयोजनात १२२ नगरसेवक सहभागी आहेत. याचे सरकारने तसेच प्रशासनाने भान ठेवावे. राजकीय पक्षांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेऊन कुंभमेळ्याकडे पहावे. चुकीची प्रथा पाडण्याचा प्रयत्न होत आहे. प्रशासनाचा निषेध करावा तितका थोडा आहे.

- विलास शिंदे, नगरसेवक

आम्ही सात ते आठ नगरसेविका होतो. ध्वजारोहणाच्या ठिकाणी आडवण्यात आले. यानंतर सभेच्या ठिकाणी पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेचा तसेच पोलिस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो.

- योगिता आहेर, नगरसेवक

प्रशासनाने तसेच भाजपाने मग्रुरीचे दर्शन घडवले. हा प्रकार खपवून घेतला जाऊ शकत नाही. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सुध्दा रोखण्याचे काम करण्यात आले. कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही आज शांत बसलो. मात्र, या पुढे असे प्रकार सहन केले जाणार नाही.

- तानाजी जायभावे, गटनेता, माकप

सुरक्षेच्या दृष्टीने स्टेजवर किती व्यक्ती असाव्यात याचे नियोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्वच नगरसेवकांना स्टेजवर जायचे होते. त्यामुळे बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले.

- एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबा, कुंभ आज भी हमारा ही है।

0
0

प्रशांत भरवीरकर, नाशिक

'बाबा हम तो संन्यासी ठहरे, चकाचोंदसे हमे क्या लेनादेना? कुंभ आता है तो आने दो, हमारे सिवा थोडे ही वहाँ कुछ होगा. आज राजनैतिक लोग आए है बाबा, कल तो हमारी बारी है' हे उदगार आहेत सीताराम बाबाचे.

ध्वजारोहणाच्या प्रसंगी झालेली राजकीय पाहून यशवंतराव देवमामलेदार मंदिराच्या पुढील पट्टयात असलेल्या एका छोटेखानी मंदिरातील सीताराम बाबाला त्याचे फार कुतूहल वाटले. पाताळेश्वर मंदिराच्या समांतर उभ्या असलेल्या एका छोटेखानी मंदिरात तो राहतो. आता तेच त्याचे घर झालेले आहे. गंगा गोदावरी पंचकोठी संघाचे ध्वजारोहण आहे हे त्याच्या गावीही नाही, त्याला केवळ पर्वणीची आस लागून राहिली आहे. तो म्हणतो, 'पर्वणी तो अगले महिने है, तो फिर आजही ये मेला क्यूँ लगा है भाई? इतनी भीड देखकर मुझे तो लग रहा है आजहीसे पर्वणी शुरू हो रही है. बाबा, हम तो सिर्फ पहली पर्वणी के लिए रुका हूँ एकबार डुबकी लगाई की चला जाऊँगा फिर काशिविश्वेश्वर के दर्शन करने' त्याच्या बोलण्यात किती सत्यता.

सीताराम बाबासोबत बोलताना समजले, की परराज्यातून आलेले हे धुर्जटी महाराज गंगेच्या काठावर कोठेतरी मुक्काम ठोकून असतात. तेथेच खाण्यापिण्याची सोय होऊन जाते. बाहेरून कुणी येते, खाण्यासाठी काही देते, भाविक येतात, चहा पाजतात. काही रंगलेले लोक येतात. 'एक कश मारू' म्हणतात. सिताराम बाबाही कशाचाही परहेज न बाळगता प्लॅस्टिकच्या पिशवीतून गांजा काढतात व दुसऱ्या हाताच्या तळहातावर चोळून त्याची चिमूट चिलिममध्ये भरतात. स्वत: एक कश घेऊन समोरच्यालाही तो आनंद देतात. त्यांचे म्हणणे आहे, की कुंभ की पर्वणी हे तो यह आनंद तो बाँटना चाहीये. देवदयासे हमारा संसार तो कुछ नहीं, एक छाटी, एक कफनी, एक कमंडलू है और यह एक कश है इतनाही हमारा संसार. हम तो संन्याशी है, हमको भीड का आकर्षण नहीं हम तो अकेलेही रहना पसंत करते है'

योगीत्वामुळे वेगळेपण

एकीकडे ध्वजारोहणासाठी एकच भाऊगर्दी उडालेली असताना दुसरीकडे सीताराम बाबासारखा एखादा असतो जो या सर्वांपासून अलिप्त असतो. त्याला एखाद्या पर्वणीचे, एखाद्या स्नानाचे आकर्षण असेलही परंतु, मुळात तो आतून योगी असतो. ध्वजाला स्पर्श करायला मिळावा या स्वार्थापोटी आलेल्या राजकारण्यांच्या गर्दीपासून अलिप्त असलेला सीताराम बाबा भाव खावून जातो तो त्याच्या योगीपणामुळेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अस्ताव्यस्त पार्किंग

0
0

नाशिक : ध्वजारोहण सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली. नाशिक पुणे रोड वरून येणारी वाहने द्वारका मार्गे गौरी पटांगणावर येत होती. मात्र तेथील वाहनतळ काही वेळातच फुल्ल झाले. तसेच सातपूर, सिडको, मेरी, म्हसरुळ भागातून येणाऱ्या वाहनांचा ओघ रामकुंडाकडे येत असल्याने परिसर वाहनांनी फुल्ल झाला होता. अनेक नागरिकांना रस्त्यांची माहिती नसल्याने सराफ बाजार जुने नाशिक भागात वाहने अडकून पडण्याच्या घटना घडल्या. गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, तपोवन परिसरात वाहनधारकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला. अनेक ठिकाणी मार्गदर्शक फलक नसल्याने वाहने कुठे पार्क करायची याबाबत अडचण निर्माण झाली होती. वाहनधारक रामकुंडाजवळ वाहने कशी नेता येतील या प्रयत्नात होती. मात्र भाविक आणि पर्यटक त्यांचा प्रयत्न फसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images