Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मनमाड चौफुलीवर अपघातात चार ठार

0
0

मालेगाव : मालेगाव शहरातील मनमाड चौफुली भागातील अमरफुरसेन परिसरानजीक सकाळी ट्रक व कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात जागीच चार जणांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मनमाडकडून मालेगावच्या दिशेने येणार ट्रक आणि मालेगावहून मनमाडच्या दिशेने जाणारा कंटेनर यांच्यात सामोरासमोर टक्कर झाली. या अपघातात दोन्ही वाहन चालकांसह अन्य दोन जणांचा मृत्यू झाला असून, अपघातातील एका जखमी व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरीही अकरावीच्या जागा रिक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशासाठी यंदा मेरीट लिस्टने उच्चांक गाठल्यानंतर प्रवेशासाठीची चुरस चांगलीच वाढली होती. मात्र, अंतिम टप्प्यात सुमारे दोन हजारावर जागा रिक्त राहिल्या आहेत. यंदा शिक्षण विभागाने अकरावीसाठी होणारी चढाओढ लक्षात घेता एकूण प्रवेश क्षमतेत दोन हजाराने वाढ केली होती.

शहरातील सुमारे ५३ ज्युनिअर कॉलेजेसमधील प्रवेशांसाठी यंदा २० हजार ८६० जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या जागांवर अद्यापपर्यंत साडेअठरा हजारांपेक्षाही जास्त प्रवेश निश्चित झाले आहेत. सुमारे दोन हजार जागा अद्यापही रिक्त असून अंतिम टप्प्यात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत सायन्स शाखेसाठी सुमारे साडेसहा हजार, आर्टससाठी सुमारे सव्वा चार हजार तर कॉमर्स शाखेसाठी सुमारे साडे सात हजार प्रवेश निश्चित झाले आहेत.

शहरातील सर्वच सायन्स कॉलेजेसमधील जागा भरल्या गेल्या आहेत. पाठोपाठ आर्टसमधील जागाही भरल्या जात आहेत. तीनही शाखांच्या तुलनेत कॉमर्स शाखेमध्ये झालेले प्रवेश कमी दिसत आहेत.

प्रवेश सेंट्रलाइज हवेत

काही वर्षांमध्ये अकरावी प्रवेशासाठी नाशिकमध्ये चुरस वाढीला लागली आहे. यामुळे कॉलेजेसचा प्राधान्यक्रमही मेरीटच्या विद्यार्थ्यांकडून ठरविला जातो आहे. राज्यात मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये अकरावीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविण्यात येते.

मात्र, नाशिकमध्ये ही प्रक्रिया कॉलेजेसवर अवलंबून आहे. नाशिकमधील काही कॉलेजेस ऑनलाइन प्रवेशानंतरही एकूणच प्रक्रिया सेंट्रलाइज नाही. परिणामी प्रवेशाचा असमतोल असल्याचे शहरातील मुख्य चित्रण दिसून येत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पध्दतीने राबविण्यात यावी. यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल, अशी मागणीही विद्यार्थी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

आर्टसलाही प्राधान्यक्रमाचा पर्याय

अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेशाच्या सुरुवातीच्या टप्प्यात चांगलीच चूरस दिसून आली. यंदा सायन्स शाखेसाठीच्या मेरीटने कळस गाठला. शहरातील सायन्स शाखेसाठी प्राधान्याच्या कॉलेजमध्ये पहिल्या तीनही मेरीट लिस्ट सुमारे ९३ टक्क्यांच्या खाली उतरल्या नाहीत. तर पाठोपाठ कॉमर्ससाठीही ८२ टक्क्यांपर्यंत कळस गाठला गेला. आर्टससाठी प्रवेश खुले असले तरीही विद्यार्थ्यांनी या ही कॉलेजेसमध्ये प्राधान्यक्रम लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थात मनुष्यबळाची टंचाई

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध शासकीय यंत्रणांना तीन महिन्यांसाठी हव्या असलेल्या तब्बल १०९२ रिक्तपदांवर प्रतिनियुक्तीसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. शासकीय कार्यालयांमध्येच सध्या रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने सिंहस्थासाठी प्रतिनियुक्तीवर मनुष्यबळ देण्यास अनेक विभागांनी असमर्थता दर्शवली आहे. मनुष्यबळ उपलब्ध होण्याची मुदत १ जुलै उलटली असली तरी, अद्याप एकही कर्मचारी उपलब्ध झालेला नाही. विशेष म्हणजे यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढूनही उपयोग होत नसल्याने महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालयाने हात टेकले आहेत. त्यामुळे सिंहस्थ नियोजनावर परिणाम होत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची मुख्य जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि महापालिकेवर आहे. विशेषतः अंमलबजावणीसारखी मोठी जबाबदारी ही महापालिकेवर असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेकडे जवळपास दीड हजाराच्या वर पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, अशी विनंती करण्यात आली आहे. यासाठी तीन महिन्यांसाठी आवश्यक असलेले १०९२ पदांची यादीच शिखर समितीकडे सादर करण्यात आली. त्यात शाखा अभियंत्यांपासून वाहनचालक ते डॉक्टरांचा समावेश आहे. राज्यातील संबंधित विभागांना हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी महापालिकेडून विनंती करण्यात आली. विशेषतः नाशिक विभागातील काही महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, जलसंपदा विभागांना पत्र पाठवून माणसे उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. सर्व मनुष्यबळ १ जुलैलाच उपलब्ध होणे आवश्यक होते. मात्र, अद्याप कोणत्याच विभागाने प्रतिनियुक्तीवर आपल्या विभागातील मनुष्यबळ देण्याची तयारी दर्शवलेली नाही.

विशेष म्हणजे विभागांचा प्रतिसाद मिळालेला नसल्याने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सहा जुलैला अधिकृतरित्या अध्यादेश काढला. त्यानुसार संबंधित विभागांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. हा आदेश निघाला असतानाही महावितरण कंपनीने माणसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एवढे मनुष्यबळ मिळण्यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

आम्हीच करतो आऊट सोर्सिंग

राज्य सरकारने नोकरभरती बंद केल्याने विविध विभागतच रिक्त पदांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विभागांचेच काम आऊट सोर्सिंगवर केले जाते. वीज वितरण कंपनीने या संदर्भातील लेखी नकार महापालिकेला कळवली असून, आम्हीच २६६ कर्मचारी सिंहस्थासाठी आऊट सोर्सिंगवर घेतल्याने तुम्हाला कुठून मनुष्यबळ देऊ, असा सवाल उपस्थित केला आहे. तीच स्थिती इतर विभागांचीही असल्याने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे. याचा सिंहस्थ नियोजनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राममध्ये रंगला ‘आखाडा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममधील मोक्याच्या जागा पटकावण्याच्या वादातून साधुमहंतांच्या आखाड्यांमध्येच 'आखाडा' रंगू लागला आहे. निर्वाणी आणि दिगंबर आखाड्यातील वाद अधिकच चिघळल्याने महंत ग्यानदास महाराज यांनी बुधवारी आखाडा परिषदेवरील पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला.

आखाड्यांना जागा वाटप करण्यासंदर्भात सोमवारी जिल्हा प्रशासनाने बैठक बोलावली होती. परंतु, बैठकीत चर्चाच केली नाही. मंगळवारी आखाडा परिषदेचे महंत ग्यानदास यांनी जागा वाटपासंदर्भात तीनही आखाडे आणि त्यांच्या अंतर्गत अन्य आखाड्यांची बैठक बोलावली होती. २००३ नुसार आताही जागा वाटप करण्याचे सूत्र ठेवण्यात आले. मात्र, मोक्याच्या जागेवर कुणी थांबायचे व मागे कुणी जायचे यावरून वाद निर्माण झाले आहेत. निर्वाणी आणि दिगंबर अशा दोन्ही आखाड्यांनी साधुग्राममधील मोक्याच्या जागांवर हक्क सांगितल्याने वादाला तोंड फुटले. दोन्ही आखाड्यांमधील महंत आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याने हा वाद अधिकच विकोपाला गेला. त्यामुळे संतप्त झालेले महंत ग्यानदास महाराज यांनी आखाडा परिषदेच्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिल्याचे समजते. सायंकाळी उशिरापर्यंत हा वाद सुरू होता.

छोट्या गोष्टींवरून हट्टाला पेटणाऱ्या साधुंना साधुग्राममधील जागेचे वाटप करणे डोकेदुखी असल्याचे प्रशासनातील अधिकारी जाणून होते. म्हणूनच आखाड्यांनी स्वत:च आपापसात चर्चा करून जागावाटपाचा निर्णय घ्यावा, असे म्हणत प्रशासनाने या प्रक्रियेमधून अंग काढून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सावरापाडा’ ला वेध ३ ऱ्या नोकरीचे

0
0

फणिंद्र मंडलिक

सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून प्रसिध्द असणाऱ्या कविता राऊतने आपल्या सुवर्ण कामगिरीच्या बळावर नाशिकमध्ये रेल्वेत नोकरी मिळवली; 'ओएनजीसी'तील चांगल्या संधीमुळे कविता आता तेथे सेवेत आहे. मात्र काम आणि खेळ यांच्यात समन्वय साधला जात नसल्याने तिला नाशिकमध्ये राज्य सरकारच्या खात्यात नोकरी हवी आहे. मुक्त विद्यापीठात दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तिच्या नोकरीबाबतचा प्रस्ताव ती पदवीधर नसल्याने वेटिंगवर असल्याने तिला तिसऱ्या नोकरीसाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या नवीन क्रीडा धोरणाप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर विशेष कामगिरी केलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारच्या सेवेत वर्ग एक पदावर सामावून घ्यावे, असा अध्यादेश काढण्यात आला होता. यानुसार कविता राऊतने महाराष्ट्र सरकारकडे वर्ग एकच्या अधिकारी पदाची नोकरी मिळावी अशी मागणी केली. त्या आदेशाला अनुसरुन आदिवासी विकास भवन, जससंपदा विभाग किंवा कविताच्याच नावाने तयार होणाऱ्या खेल अकादमीत नेमणूक करावी अशी मागणी कविता राऊतने नाशिकच्या क्रीडा अधिकाऱ्यांकडे केली होती. नाशिकच्या क्रीडा अधिकाऱ्यांकडून हा अर्ज क्रीडा विभागाच्या पुणे कार्यालयाकडे देण्यात आला. तेथून तो मंत्रालयात पाठवण्यात आल्यानंतर आदिवासी विकास भवनमध्ये जागा रिक्त नसल्याचे कारण देत कविता राऊत यांची मागणी फेटाळण्यात आली. जागा नसल्यास पद तयार करण्यात येईल, असे माजी अदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी अश्वासन दिले होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपताच कविताची प्रतीक्षा वाढली.

नाशिकमध्ये रेल्वेत नोकरी मिळालेल्या कविताने रेल्वेची नोकरी सोडून मुंबईत ओएनजीसीत रूजू झाली आहे. तिचे पती मुंबईत महाजनको येथे इंजिनीअर पदावर आहेत. त‌िचे प्रशिक्षक विजेंद्रसिंग हे नाशिकला व ती मुंबईला असल्याकारणाने खेळाच्या सरावावर मर्यादा येऊ लागल्याने तिने राज्य सरकारने नाशिकमधील खात्यात नोकरीची मागणी केली आहे. मात्र पदवी नसल्याने तिच्या नोकरीचा प्रस्ताव रखडला आहे. कविता राऊत सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्यामुळे पदवी पूर्ण करण्यासाठी व नोकरीसाठी तिला आणखी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मला राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेतल्यास सरावासाठी अधिक वेळ देता येईल. त्यामुळे मुंबई-नाशिक होणारी दगदग वाचेल. अधिक चांगली कामगिरी करु शकेल असा विश्वास आहे. - कविता राऊत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजार चालकांच्या कुटुंबांची उपासमार

0
0

गौण खनिज वाहतूक बंदचा बसतोय फटका

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

जिल्हा प्रशासनाने दंडाची रक्कम पाच पटीने केल्याच्या निषेधार्थ गौण खनिज वाहतूकदारांनी बंद पुकारला आहे. मात्र, यामुळे जिल्हातील हजारो कुटुंबे संकटात सापडली आहेत. या व्यवसायात मुजरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. यावर गौण खनिज वाहतूकदार व महसूल विभागाने तत्काळ तोडगा काढत वाहने सुरू करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

जिल्हातील गौण खनिज वाहतूकदार मालक व चालक यांनी वाहतूकच बंद केली आहे. यामुळे जिल्हातील सुमारे एक हजारपेक्षा अधिक गाड्या जागेवर उभ्या आहेत. परंतु, यात सर्वात मोठा फटका बसतोय तो गौण खनिज वाहतूक करणारे चालक व गाडी भरण्याचे किंवा रिकामी करण्याचे काम करणाऱ्या मजुरांवर. गाड्यांचे चालक बेकार झाले आहेत. तसेच गौण खनिजावर काम करणारे मजूर व बांधकाम व्यवसायिकांकडे काम करणाऱ्या मजूरांवर देखील बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. एकिकडे सरकारने गौण खनिजमध्ये महत्त्वाचे असलेले वाळूचे लिलाव सुरू असतांना केवळ काही राजकीय हेतूपोटी गौण खनिज वाहतूक बंद केली असल्याचा संशय व्यावसायिकांनी केला आहे. यात केवळ अनधिकृतपणे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून पाच पट दंड आकारण्यात येत आहे. परंतु, महसूल विभागाने ठरवून दिलेल्या नियमानुसार गौण खनिजाची वाहतूक केल्यास पाच पट दंड वाहनांवर होणारच नसल्याने वाहतूकदारांनी यावर काळजी घेण्याची गरज असल्याचेही प्रामाणिक व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

तोडगा काढण्याची गरज

सरकारने गौण खनिज वाहतूक बंद केली असल्यावर आंदोलन करणे योग्य ठरले असते. परंतु, अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाने पाच पट दंड ठोठावला आहे. यात गौण खनिज वाहतूकदारांनी बंद ठेवण्याची गरज काय, असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. यात कुणी राजकारण न करता तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी काही व्यावसायिकांनी वाहतूकदारांना केली आहे.



गौण खनिज वाहतूक बंद असल्याने वाहनचालक बेकार झाले आहेत. यावर गौण खनिज व्यवसायिक व महसूल विभाग यांनी तोडगा काढण्याची गरज आहे.

- मंगेश गुरव

गौण खनिज वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचे आरोग्य धोक्यात

0
0

शहरात डेंग्यूचा फैलाव; महापालिकेकडून धूर फवारणीला फाटा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या आरोग्य विभागाने धूर फवारणीसंदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याने सिंहस्थापूर्वीच डेंग्यूने डोके वर काढले आहे. सिंहस्थात काळात धूर फवारणीसारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत गंभीरता न दाखवता काम चलावू ठेकेदाराकडून काम केले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीने कामचलावू ठेकेदाराला मुदतवाढ दिली असतांनाही, केवळ प्रशासकीय अडवणुकीमुळे शहरात आठ दिवसापासून धूर फवारणी बंद आहे. प्रशासकीय उदासीनतेचे गंभीर परिणाम आता नाशिककरांसह येणाऱ्या भाविकांना सोसावे लागणार आहेत.

गेल्या वर्षी डेंग्यूने नाशिकमध्ये थैमान घातले होते. पावसाळ्यात ३० पेक्षा अधिक लोकांना प्राण गमावावे लागले होते. विशेष म्हणजे सत्ताधारी मनसेच्या नगरसेविकेच्याच पतीचा डेग्यूंमुळे बळी केला होता. त्यामुळे चालू वर्षी महापालिकेचा आरोग्य विभाग काळजी घेईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. सिंहस्थ कुंभमेळा असल्याने लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे मच्छर, चिलटे यांची निर्मिती होणार नाही याची काळजी घेणे अपेक्षित होते. मात्र, आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आता समोर आले आहे. या ठेक्याची मुदत संपणार असतांनाही कामचलावू ठेकेदाराकडून काम करून घेण्याची भूमिका घेतली आहे.

शहरात आठ दिवसांपासून धूर फवारणी बंद आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी आरोग्य विभागाची कानउघाडणी केली असून, तातडीने कामाची सुरुवात केली आहे. मात्र, आता त्याला बराच उशीर झाला आहे.

कंत्राटी कामगारांवर धुरा

सिंहस्थासाठी सफाईसाठी ३३०० सफाई कर्मचारी भरती केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना तीन महिने वेतन द्यावे लागणार असल्याने, त्याचा शहरातील स्वच्छतेसाठीही वापर करण्यात यावा असे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेला अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध होणार आहे. मात्र या कर्मचाऱ्यांचा वापर करता येईल काय, याबद्दल अधिकाऱ्यांमध्येच संभ्रमावस्था आहे.

ऐनवेळी धावाधाव!

शहरात डेंग्यूचे सात संशय‌‌ति रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. त्यामुळे प्रशासनाने रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धूर फवारणी केली जात आहे.





महापालिकेकडून अॅक्शन प्लॅन

नाशिक शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सत्ताधाऱ्यांनी गुरुवारी तातडीने आरोग्य विभागाची बैठक घेत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. डेंग्यू व मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाला तीन दिवसात अॅक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी व दक्षता घेण्यासाठी गुरुवारी महापौर अशोक मुर्तडक यांनी आरोग्य विभाग आणि स्वच्छता निरीक्षकांची तातडीने बैठक घेतली. उपमहापौर गुरूमीत बग्गा, स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी चुंभळे, अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत आरोग्य विभागाने आपल्या व्यथा मांडल्यात. आरोग्य उपाययोजनांसाठी दर आठवड्याला महापालिकेला अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले. आरोग्य विभाग आणि वैद्यकीय विभागाने एकत्रित काम करून तीन दिवसात उपाययोजनांचा अॅक्शन प्लॅन तयार करावा, त्यानंतर १५ जुलैपासून त्या प्लॅनची अंमलबजावणी करावी, प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना व अन्य संस्थाना सोबत घेवून डेंग्यू व मलेरिया संदर्भात जनजागृती करावी, नागरिकांच्या घरात असलेले मनीप्लान्ट तोडणे, घरातील टायर फेकून देण्याचे आवाहन करावे अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत. शहरात तत्काळ पथकांची स्थापना करून खाजगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या रुग्णांची तातडीने नोंद करावी, असे आदेशही महापौरांनी दिले आहेत. मलेरिया विभागाचे कर्मचारी काम करत नसल्याचा आरोप यावेळी स्वच्छता निरिक्षकांनी केला. त्यामुळे तातडीने धूर फवारणी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.











मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी प्रश्नांची सरबत्ती

0
0

जनता दरबारात नागरिकांचा सक्रीय सहभाग

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी संकल्पनेत नाशिकचा समावेश व्हावा यासाठी नाशिककर उत्सूक असल्याची प्रचिती पहिल्या जनता दरबारात आली. पाणी, पथदीप, आरोग्य आदी प्रश्नांची नागरिकांनी अक्षरशः सरबत्ती केली. उत्तरे देताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले.

प्रभाग ३२ चे नगरसेवक शैलेश ढगे यांनी जेलरोडच्या दुर्गा मंदिरात जनता दरबार भरविला. जनता आणि प्रशासकीय अधिकारी आमने-सामने आले. समस्या मार्गी लावण्यावर चर्चा झाली. महापालिकेच्या विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे, पाणीपुरवठा उपअभियंता नितीन पाटील, बांधकाम उपअभियंता विशाल गरुड, नगररचनाचे संजय पाटील, विद्युतचे श्री. जगदाळे, ड्रेनेज विभागाचे श्री. गोरडे, श्री. गीते, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, उद्यान विभागाचे विजय गायकवाड, घरपटी व पाणीपट्टी विभागातील मंगला फड आदींनी नागरिकांचे शंका-समाधान केले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेमप्लेटने बदलले भावविश्व

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

आपला एक सुंदर बंगला नसला तरी चालेल परंतु, आपली शानदार नेमप्लेट मात्र असावी असे प्रत्येकाला वाटते. नेमप्लेटमुळे घराला वेगळीच शोभा येते, घरच्या धन्याला वजन प्राप्त होते. इमेज सुधारते. घरच्या घरी नेमप्लेट कशी तयार करायची, व्यवसाय कसा करायचा याचा मंत्र आज 'मटा'च्या वाचकांना मिळाला.

मटा कल्चर क्लबतर्फे गुरुवारी नाशिकरोडच्या ऋतुरंगमध्ये नेमप्लेट बनविण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. सायली मोहाडीकर आणि प्रियंका पवार यांनी प्रक्षिणार्थींना सोप्या भाषेत मोलाच्या टिप्स दिल्या. त्यांच्याकडून नेमप्लेट तयार करवून घेतल्या. आपण तयार केलेल्या आपल्याच नावाच्या नेमप्लेट पाहताना प्रशिक्षणार्थी हरखून गेले. महिलांबरोबरच पुरुषही नेमप्लेट तयार करताना रंगून गेले.



नेमप्लेट... एकदम इझी

नेम प्लेट बनवण्यासाठी एमडीएफ (नावाची कोरी पाटी), टिशू पेपर, शिल्पकार (एमसील), चार नंबरचा ब्रश, फेव्हीकॉल, कलर एवढंच साहित्य लागते. प्रथम एमडीएफवर टिशूचे तीन लेअर लावा. फेव्हिकॉल जास्त व पाणी कमी घेऊन मिश्रण करा. ब्रशच्या सहाय्याने एमडीएफवर टिशू चिकटवा. दोन तास वाळल्यानंतर हार्ड व साफ्ट शिल्पकार मिक्स करा. व्हाईट होईपर्यंत मळल्यानंतर त्याचे गोळे करून पोळीसारखे पसरवा. रोल करून गोळे केल्यानंतर नेमप्लेटच्या आपले नाव डिझाईन करून चिकटवा. नेमप्लेटच्या कोपऱ्यावर लावण्यासाठी फुले, गणेश, कृष्ण, बासरी आदी तयार करा. अॅक्रेलिक कलरने ते रंगवा, त्यांना फेव्हिकॉलच्या सहाय्याने चिकटवा. या सगळ्यांना वार्निशचा हात मारा. झाली आपली नेमप्लेट.



माझी बारावीची परिक्षा झाली आणि नवीन घरात आम्ही राहायला गेलो. मी तयार केलेली नेमप्लेट दरवाजावर लावणार आहे. तो पाहताना वेगळा आनंद मिळणार आहे. मटामुळेच हे शक्य झाले. थॅक्स मटा.

- अनघा उपासनी

नेमप्लेटचा वर्कशॉप अगदी हटके होता. नवीन कला आम्हाला मिळाली. शिकवण्याची पद्धत सोपी असल्याने कमी वेळेत चांगली नेमप्लेट तयार केली आहे. आता मी ती दरवाजावर लावणार

आहे.

- राखी सुराणा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारी पेटणार महाकुंभ ज्योत

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

मुंबई येथील श्री जय गोपाल गायत्री सिद्धपीठ व पुणे येथील मोहर ग्रामविकास शिक्षण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तपोवन परिसरात उभारण्यात आलेल्या अखंड महाकुंभ ज्योतीचे प्रज्ज्वलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येणार आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हस्ते इंद्रध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती गायत्री समुपासक श्री श्री १००८ हिमालय बाबा यांनी दिली.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण येत्या मंगळवारी (दि. १४) मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत होणार आहे. महाकुंभ ज्योत प्रज्ज्वलन सोहळ्याप्रसंगी मुख्य संयोजक माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, उद्योजक कुमार पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. ही ज्योत सलग १०८ दिवस प्रज्ज्वलित राहणार आहे. लक्ष्मीबाग येथे हिमालय बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा बनविण्याचे काम सुरू आहे. अष्टधातूचा हा दिवा असणार असून तो कायम तेवत राहावा यासाठी तेलाचा अखंड पुरवठा केला जाणार आहे. या दिव्याची क्षमता ५ हजार लिटर तेल सामावून घेण्याची आहे. दिव्यासाठी लागणारी वात कोल्हापूर येथे बनविण्याचे काम सुरू आहे. विश्वशांती आणि लोककल्याणासाठी ही महाकुंभ ज्योत असेल, अशी माहिती हिमालय बाबा यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटप्रेमींसाठी उद्या ‘इव्हन द रेन’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विश्वास को-ऑप बँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्यातर्फे 'सिनेमा कट्टा' उपक्रमांतर्गत शनिवार (दि. ११) जुलै सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक इशियर बोलेन यांचा 'इव्हन द रेन' हा स्पॅनिश भाषेतील चित्रपट दाखविला जाणार आहे. हा चित्रपट क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकर नगर, गंगापूर रोड, येथे दाखविण्यात येणार आहे.

दिग्दर्शक इशियर बोलेन यांचा 'इव्हन द रेन' हा भेदक व वेधक असा राजकीय चित्रपट आहे. हा खरा बोलिव्हीयन चित्रपट नाही; परंतु कथानक बोलिव्हीयातील कोचाबांबा शहरात घडते. कोस्टा हा स्पॅनिश दिग्दर्शक ऐतिहासिक चित्रपट बनविण्याच्या मिषाने बोलिव्हीयात येतो. त्याला चित्रपट कमी बजेटमध्ये बनवायचा असतो. त्याला स्थानिकांचे सहकार्य अपेक्षित असते. त्याच सुमारास बोलिव्हीयन सरकारने त्या शहराला पाणी पुरविण्याचे हक्क एका अमेरिकन कंपनीला विकल्याने मोठा वाद निर्माण झालेला असतो. कोस्टाला त्याच्या चित्रपटातून पाचशे वर्षांपूर्वी आलेला कोलंबस व स्पॅनिशांनी केलेल्या स्थानिकांवरील अत्याचाराची कहाणी सांगायची असते. 'इव्हन द रेन' अशा प्रकारे परकीय आक्रमणाने ५०० वर्षांच्या अंतराने होणाऱ्या स्थानिकांच्या शोषण व दमनाची व त्यातून उडालेल्या संघर्षाची कहाणी सांगतो. अशा दुहेरी पातळीवर चाललेली कहाणी 'सिनेमा इन सिनेमा' पद्धतीने मांडली आहे. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या या रंगीत चित्रपटाचा कालावधी १०५ मिनिटांचा आहे. चित्रपट बघण्यास अधिकाधिक रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजेसकडून निकष धाब्यावर

0
0

अकरावी प्रवेशप्रक्रियेत गोंधळ; सामाजिक कार्यकर्ते मागणार दाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कळीचा मुद्दा ठरणारी अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ठरवून दिलेले निकष धाब्यावर बसविले असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रवेश प्रक्रियेत खोट आढळल्यास ही प्रक्रिया पुन्हा राबविण्यात यावी, अशी मागणीही आम आदमी पक्षाने (आप) केली आहे.

जिल्ह्यातील काही कॉलेजेसच्या विरोधात कारवाईसाठी पाठपुरावा केल्यानंतर शहरातील भ्रष्ट शैक्षणिक संस्था आता 'आप'च्या कार्यकर्त्यांच्या रडारवर आहेत. शहरात राबविण्यात आलेली अकरावीची प्रवेश प्रक्रियाच कॉलेजस्तरावर संशयास्पद असल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आहे.

अकरावीच्या मेरीट लिस्टसाठी विविध कॉलेजेसकडे आलेल्या अर्जांची संख्या, पहिल्या तीनही मेरीट लिस्टचा तपशील, दोन प्रवेश फेऱ्यांदरम्यान कॉलेजेसने नफेखोरी करीत धुडकावलेले शिक्षण विभागाचे निकष या तपशीलातून पुढे येऊ शकतील, असा आशावाद 'आप'चे जिल्हा समन्वयक अॅड. प्रभाकर वायचळे यांनी व्यक्त केला. कॉलजेसने या प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर डोनेशन्स लाटल्याचाही पक्षाचा आरोप आहे.

..अन्यथा करा जनसुनवाई

१३ जुलै रोजी निफाड तालुक्यातील ३३ कॉलेजेसच्या चौकशीचा अहवाल तक्रारदारांच्या हाती पडणार आहे. या अहवालावर आक्षेप घेण्यायोग्य संदर्भ आढळल्यास तहसीलदारांकडे जनसुनवाईची मागणी केली जाणार आहे. त्यात तहसीलदारांकडे प्रसंगी थेट शैक्षणिक संस्थांच्या विरोधातील तक्रारी सादर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही 'आप'ने विद्यार्थी व पालकांना केले आहे.

शहरातील कॉलेजेसकडून अकरावी प्रवेशातील नियमबाह्यता व नफेखोरी या मुद्यांचा आम्ही पाठपुरावा सुरू केला आहे. अकरावी व बारावीत मुलींचा मोफतप्रवेश, आदिवासी व समाजल्याण विभागाकडील विद्यार्थ्यांच्या तक्रारी व समाज कल्याण विभागाने ३३ कॉलेजसची लावलेली चौकशी हे सर्व मुद्दे आमच्या अजेंड्यावर आहेत.

- अॅड. प्रभाकर वायचळे,

जिल्हा समन्वयक, आप



नफेखोरीसाठी कायदाच पथ्यावर ?

गतवर्षी सन् २०१४ मध्ये शैक्षणिक संस्थांमधील शुल्क वसुलीसंदर्भात नव्या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती. या कायद्याची अंमलबजावणी यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. हा कायदा मुळात विद्यार्थ्यांच्या बाजूने असतानाही याचा नफेखोरीसाठी हवा तसा अन्वयार्थ लावून शुल्क वसुलीची कुऱ्हाड विद्यार्थ्यांवर घातली जाते, अशीही या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. या संदर्भातही पुढील टप्प्यात दाद मागण्यात येणार आहे.





आदिवासी आणि समाजल्याणचाही पाठपुरावा



काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते आणि 'आप'च्या तक्रारीनंतर निफाड तालुक्यातील सुमारे ३३ कॉलेजेसची चौकशी सुरू झाली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क लुबाडण्यात आल्याचा मुद्दा समाजकल्याण विभागाकडे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता. याची चौकशी शुक्रवारी (दि. १०) रोजी पूर्ण होणार असून १३ जुलै रोजी अहवाल हाती पडणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या फी संदर्भातील मुद्यांचा पाठपुरावाही समाजकल्याण आणि आदिवासी विकास विभागाकडे केला जाणार आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांची ‘लाइफलाइन’ कोमात

0
0

अनियमित बससेवेमुळे हैराण; अपघाताचा धोका वाढला



कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

शहर बससेवा ही प्रवाशांबरोबरच विद्यार्थ्यांची लाइफलाइन असली तरी गेल्या काही दिवसांपासून ही लाइफलाइन कोमात असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अपुऱ्याबसेसमुळे अनेकदा विद्यार्थ्यांना लटकत प्रवास करावा लागत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवही धोक्यात आला आहे.

अनेक दिवसांपासून शहरातील कॉलेज तरुणांच्या बस प्रवासासंदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. जुना आडगाव नाका नजिक असलेले के. के. वाघ कॉलेज, नवीन आडगाव नाका नजिक असलेले मेडिकल कॉलेज आणि मेट भुजबळ नॉलेज सिटी येथील विद्यार्थ्यांना सध्या मोठा त्रास होतो आहे. महामार्गानजीक असलेल्या कॉलेजसाठी नियोजित बससेवेचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जात नाही. शिवाय काही महिन्यांपासून या मार्गावरील काही बसेस बंदही करण्यात आल्या आहेत. याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांना सकाळी स्टॉपवर तासनतास बसची प्रतीक्षा करताना दिसतात. बहुतांशी वेळा हेच तरुण बसला लटकत प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरी बससेवेचं नियोजन व्हावं, अशी आशा तरुण व्यक्त करत आहेत.

महामार्गानजीक असलेल्या कॉलेजची विद्यार्थी संख्या अंदाजे प्रत्येकी १० हजाराच्या घरात आहे आणि यातील ७० ते ८० टक्के विद्यार्थी बसने प्रवास करणारे आहेत. बससेवेच्या अनियोजित कारभारामुळे अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये वेळेवर पोहचू शकत नाहीत. त्यामुळे एकीकडे बस मिळावी म्हणून तरुणांना संघर्ष करावा लागतो आहे तर दुसरीकडे कॉलेजमध्ये पोचायला उशीर होत असल्याने पहिल्या लेक्चरला त्यांना मुकावं लागतं.

बससेवा बंद का?

गेल्या वर्षी मेट भुजबळ नॉलेज सिटीला सकाळ-सायंकाळ ये-जा करणारी निमाणी मार्गे श्रमिकनगर बस बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ओसंडून वाहत असलेल्या यासारख्या बसेस बंद का झाल्या यामागील कारण अजून ही गुलदस्त्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यानंतर महंतांचे मनोमिलन

0
0

अयोध्याला जाण्याचा महंतांचा ड्रामा संपुष्टात; हंसदेवाचार्यांची मध्यस्थी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधुग्राममधील जागा वाटपावरून सुरू असलेल्या दोन आखाड्यांमधील महंतांचा वाद अखेर संपुष्टात आला. गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून सुरू झालेला 'ड्रामा' संध्याकाळी संपल्याचे आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांनी सांगितले.

गत सोमवारी प्रशासनाने साधुग्रामची जागा अखिल भारतीय आखाडा परिषदेकडे सोपवली. यानंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्या पुढाकाराने तीन प्रमुख अनी आखाडे आणि खालशांच्या जागांचे वाटप सुरू झाले. मात्र, रोड फ्रंट व रस्त्यातील झाडे यामुळे उपलब्ध जमिनीचा योग्य वापर होणार नसल्याची तक्रार साधू-महंतांनी करण्यास सुरुवात केली. मोक्याची जागा हवी, असा आग्रह आखाडा प्रमुखांनी धरल्यामुळे आखाडा परिषदेची पंचायत झाली. यातूनच दिगंबर आखाड्याचे महंत किशोरदास शास्त्री आणि महंत ग्यानदास महाराज यांच्यात वाद सुरू झाला. जागा वाटपावरून वाद वाढतच गेल्याने महंत ग्यानदास यांनी अयोध्येला परतण्याचा निर्णय घेतला. या वादावर पडदा पडावा म्हणून महंत हंसदेवाचार्य यांनी प्रयत्न केले. त्यांच्या मध्यस्थीने जागा वाटापाचा प्रश्न गुरुवारी संध्याकाळी निकाली काढण्यात आला. दरम्यान, महंत ग्यानदास परत जाणार असल्याचे समजल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी ​जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी साधुग्राम गाठले. सुमारे अर्धातास चर्चा केल्यानंतर हे अधिकारी परतले. तपोवनातील ग्यानदास महाराजांच्या निवासस्थानी दुपारी झालेल्या महंतांच्या बैठकीत सर्व मुद्दे बाजूला सारण्यात आल्याचे ग्यानदास महाराज यांनी जाहीर केले.



जागा वाटपात आर्थिक व्यवहार?

साधुग्राममधील जागा वाटपात आर्थिक व्यवहार होत असल्याच्या तक्रारी सध्या समोर येत आहेत. त्यात तथ्य असल्याचा दावा होत असून, थेट आखाड्याशी संबंधित नसलेल्या मात्र मोठा भाविक वर्ग असलेल्या महाराजांना, भटारखाना चालवणाऱ्या जमिनी भाड्याने देण्याचे सत्र सुरू आहे. याबाबत, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. जागा देताना आर्थिक व्यवहार होत असल्याचे कानावर आले आहे. मात्र, अजून प्रत्यक्ष तक्रार मिळालेली नाही. जर कोणाला याबाबत तक्रार असेल तर त्यांनी प्रशासनाकडे यावे, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे कुशवाह यांनी स्पष्ट केले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डौलात फडकणार ‘धर्मध्वजा’

0
0

पंकज चांडोले भगव्या रंगात १५ फूट लांब व ४.५ फूट उंच ध्वजा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंधरा फूट भगव्या वस्त्रावर एका बाजूने साकारण्यात येणारा सिंह व दुसऱ्या बाजूने साकारला जाणारा अमृतकुंभ हे सारे एम्ब्रॉयडरी केलेले, हाताला त्याचा स्पर्श होईल असे, सिंह म्हणाल तर त्याची मऊ आयाळ आपल्या हातांना सुखावेल अशी व कुंभ म्हणाल तर रंगबेरंगी धाग्यांनी तयार करण्यात आलेली एक अजोड कलाकृती. हे सारे पहायला मिळणार आहे धर्मध्वजामध्ये. गोदाघाटावर पुरोहित संघातर्फे मंगळवारी सहा वाजून १६ मिनिटांनी फडकणाऱ्या धर्मध्वजेचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारपासून पुढे वर्षभर

ही धर्मध्वजा डौलाने फडकणार आहे.

एक महिन्यापासून धर्मध्वजेची निर्मिती करण्यात कारागिर मग्न आहेत. पुरोहित संघाचा छोटा धर्मध्वज साडेसात फूट लांब व अडीच फूट रूंदीचा आहे. भगव्या रंगाच्या सृटीन सिल्कच्या कापडावर एका बाजूला अमृतकलश व श्रीराम ही अक्षरे आहेत. दुसऱ्या बाजूला गोदावरी मातेचे वाहन असणाऱ्या मगरीचे प्रतीक पॅचवर्कने चित्रीत केले आहे. या दोन्ही बाजूमध्ये कॉटन कापडाचे अस्तर असेल. चारही बाजूंनी ध्वजाला दीड इंच रूंदीची जरीलेस लावण्यात आली असून, ध्वजाच्या खालच्या बाजूला पाच घुंगरू, पाच रेशिमगोंडे व पाच पितळी घंट्या लावण्यात आलेल्या आहेत.

घुंगरू हे अंतर्नादाचे रेशिमगोंडे हे एकसंघतेचे एकात्मतेचे व घंटा हे ब्रह्मनादाचे प्रतीक असते. म्हणून त्यांचा वापर धर्मध्वजेत केला जात आहे. मोठा ध्वज १५ फूट लांब व साडे चार फूट उंच आकाराचा आहे. भगवा रंग त्यागाचे, भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. या ध्वजावर एका बाजूला सिंहाचे चित्र असेल सिंह हे देवांचे गुरू बृहस्पती यांचे वाहन आहे. त्याचे प्रतीक व शौर्याचे लक्षण म्हणून तो वापरण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूला प्रथम ॐ मध्यभागी अमतृकलश व शेवटी श्री हे शुभचिन्ह आहे.

एम्ब्रॉयडरी करून सजवलेला हा ध्वज जास्तीत जास्त टिकाऊ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. १४ जुलैपासून पुढे १३ महिने हे ध्वज संपूर्ण सिंहस्थ कुंभमेळा काळात डौलाने फडकत राहणार आहे.

या धर्मध्वजेची निर्मिती कापडबाजार येथील भाग्यश्री टेलर्सचे दुर्गेश खैरनार यांनी केली आहे. अवघ्या २४ वर्षे वयातच त्यांच्याकडे हे धर्मध्वजा बनविण्याचे काम आल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. या कामासाठी त्यांना २० हजार रुपये खर्च आला आहे.

आई वडिलांनी केलेल्या पुण्याईमुळे मला हे काम मिळाले, अशी माझी भावना आहे. मला ही संधी मिळाली असल्याने मी माझे कर्तृत्व सिध्द करून दाखवणार आहे. मला मिळालेल्या संधीचे सोने करणार असून, त्यासाठी कोणतीही कारागिरी मी घेणार नाही.

- दुर्गेश खैरनार, कारागिर







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ध्वजारोहणावरून प्रशासनाची पंचाईत

0
0

पुरोहित संघ-आखाड्यांमधील संघर्ष विकोपाला; अधिकारी सोसताहेत वादाचे चटके



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा जसा जवळ येवू लागला आहे, तसा पुरोहित संघ आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेतील संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. सिंहस्थाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पुरोहित संघाचा मुख्य, की आखाडा परिषदेचा मुख्य यावरून प्रशासनाची गोची झाली आहे. एकीकडे प्रशासनाकडून १४ जुलैला होणाऱ्या रामकुंडावरील ध्वजारोहण सोहळ्याची तयारी केली जात असतांनाच, आखाड्यांनी या ध्वजारोहणाशी आपला संबध नसल्याचे सांगून अंग काढून घेतले आहे. एवढेच नव्हे तर, या सोहळ्याला तुम्हीही जावू नका असा दम प्रशासनाला भरला जात असल्याने अधिकारी कोंडीत सापडले आहेत.

दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. येत्या १४ जुलै रोजी रामकुंडावर होणाऱ्या ध्वजारोहणाची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. मात्र, सिंहस्थापूर्वी वस्रांतरगृह, रामकुंडावरील अतिक्रमणावरून पुरोहित संघ आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्या संघर्ष उभा राहिला आहे. रामकुंडावरील पुरोहित संघाच्या हस्तक्षेपावरून ग्यानदास महाराजांनी केलेल्या अट्टाहासाचे चटके प्रशासनाला सहन करावे लागले आहेत. आता त्यात मुख्य ध्वजारोहण सोहळ्याची भर पडली आहे.

पुरोहित संघाचा ध्वजारोहण सोहळा १४ जुलै रोजी, तर आखाडा परिषदांचा ध्वजारोहण सोहळा १९ ऑगस्टला होणार आहे. प्रशासनाने पंरपरेप्रमाणे १४ जुलैच्या ध्वजारोहणाची तयारी सुरू केली असतांनाच आखाडा परिषदेन त्यात खोडा घातला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मंहत ग्यानदास यांनी ध्वजारोहणाचे शब्दच जिल्हाधिकाऱ्यांना मागे घ्यायला लावले होते. त्यावरून पुरोहित संघ आणि मंहतांमधील संघर्ष टोकाला पोहचल्याची चुणूक अधिकाऱ्यांना लागली.

महतांनी आपला १४ जुलैच्या ध्वजारोहणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगून त्यातून अंग काढून घेतले आहे. १९ ऑगस्टला तीनही आखाड्यांचे होणारे ध्वजारोहणच प्रमुख ध्वजारोहण असल्याचा दावा केला आहे. आखाडा परिषदेतील मंहत एवढ्यावरच थांबले नसून, प्रशासनाने १४ जुलैच्या ध्वजारोहणाला महत्त्व देवू नये असा दबाव टाकला जात आहे. त्यामुळे नेमके कुणाचे ऐकायचे असा यक्षप्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयासह, महापालिकेतील अधिकाऱ्यांना पडला आहे. वाद नको म्हणून प्रशासनाने दोघांनाही ध्वजारोहणासाठी सामुग्री उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र महंत आपल्या हट्टावर अडून असल्याने अधिकारी या वादापासून स्वतःला दूर ठेवत आहेत. पुरोहित संघ आणि मंहताच्या समोर न जाण्याची त्यांची भूमिका आहे.



नेतेही चार हात दूर...

पुरोहित संघ आणि आखाडा परिषदेतील या संघर्षाचे चटके प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींना बसत आहेत. अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींवरही दबाव टाकला जात आहे. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, खासदार आमदारांना कोणत्या ध्वजारोहणाला उपस्थित रहायचे असा प्रश्न पडला आहे. वाद नको म्हणून त्यांनी दोघांना होकार कळवत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी केंद्रीय तसेच राज्यातील मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले असून राजनाथसिंग, शिवराज चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला येण्याचे आश्वासन दिले आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालयाच्या नंबरवरून नाशिकमध्ये एकाची हत्या

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

शौचालयाला आधी कोणी जायचे यावरून झालेल्या वादातून नाशिकमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नाशिक शहरातील फुले नगर परिसरात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फुले नगरात राहणाऱ्या योगेश कुयते या तरुणाचा शौचालयाला जाण्याच्या नंबरावरून शेजाऱ्याशी वाद झाला. सुरुवातीला बाचाबाचीपर्यंत असलेले हे प्रकरण नंतर हातघाईवर आले आणि राग अनावर झालेल्या शेजाऱ्यानं योगेशची हत्या केली. क्षुल्लक कारणावरून वाद होऊन हत्या होण्याची गेल्या दोन दिवसांतील नाशिकमधील ही दुसरी घटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजारोहणाला वादाची किनार

0
0

त्र्यंबकमध्ये पुरोहित संघाच्या नियोजनात डावलल्याचा साधूंचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थाच्या ध्वजारोहणास वादाची किनार लाभली असून, नियोजनात साधुंना सहभागी करण्याऐवजी इतरच घटकांना प्राधान्य दिल्याने साधू-महंतांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अखाडा परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक दि. १२ जुलै रोजी दुपारी बारा वाजता स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमात होत आहे. या बैठकीत महत्त्वपूर्ण निणर्य घेण्यात येणार असून, त्याचे कुंभमेळ्यावर दुरगामी परिणाम होतील, असे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले.

साधू-महंतांच्या नाराजी मागे काही दिवसांपूर्वी ध्वजारोहणाच्या संदर्भात नगरपालिकेत झालेल्या बैठकीची चर्चा कारणीभूत ठरली. नगरापालिका अध्यक्षांसह सत्तारूढ गटाने सर्वांचा सहभाग असावा, पुरोहितांसह म्हणून विविध घटाकांना पाचारण केले होते. देवस्थान विश्वस्त आणि पुरोहित यांच्या संयुक्त बैठकीत मंदिर विश्वस्तांनी कुशावर्त हे देवस्थानच्या मालकीचे असून, तेथील नियोजन इतरांनी करायचे नाही, असे खडसावले होते. याचाच संदर्भ घेवून आनंद आखाड्याचे सचिव महंत शंकरानंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मंदिर आणि कुशावर्त याबाबत मालकी हक्क वारंवार निर्दशनास येत असल्याने त्यांनी खेद व्यक्त केला आहे. देवस्थान विश्वस्त अशा प्रकारे ध्वजपर्वासह सर्वच बाबतीत आपला हस्तक्षेप नोंदविणार असेल तर प्रत्यक्ष शाहीस्नानाच्या दरम्यान मालकी हक्क दाखवत पूर्वापरपरंपरेच्या नियोजनात बदल करणार काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विश्वस्त मंडळ आणि नगरसेवक परस्परांना शह देण्यासाठी आपली धुणी

कुंभमेळयाच्या घाटावर धुण्याचे काम करीत आहेत. याबाबत आपण नाराज असून संपूर्ण आखाडा परिषद याची दखल घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साधू-महंत अशा प्रकारे ध्वजपर्वाच्या पूर्वी नाराजीचा राग आळवत असताना पालिकेतील राजकरणाने मुख्याधिकारी यांना राजशिष्टाचाराचा भंग झाला म्हणून कारवाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचाराचा भंग झाला म्हणून मुख्याधिकारींना जिल्हा कार्यालयाकडून नोटीस निघाल्याची चर्चा आहे. त्र्यंबक पालिकेत नव्यानेच सत्तेत आलेले पूर्वाश्रमीचे मनसे आणि सध्या भाजपाचा गट तसेच त्यांना एका मताचे टेकू दिलेले शिवसेना नगरसेवक या वादास कारणीभूत ठरले आहेत.

शिवसेनेच्या आग्रहापायी मुख्यमंत्र्यांच्या अगोदर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख झाल्याने प्रशासन अडचणीत सापडले आहे. त्र्यंबक पालिकेत सतरा नगरसेवक असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे सदस्य असलेले हे लोकप्रतिनिधी आपल्या नेत्यांच्या नावांसाठी आग्रही असतात. यामध्ये विविध उत्सवाच्या निमित्ताने निमंत्रण देताना, जाहिरात करताना सत्ताधारी गट विरोधकांना नामोहरम करण्यासाठी प्रोटोकॉलचा भंग झाला तरी चालेल अशा प्रकारे वागतात. हा अनुभव अनेक वर्षांपासूनचा आहे.

कुणाच्या मालकीचे कुशावर्त असेल तर तेथे शाहीस्नान कसे घडणार आणि यापूर्वी नगरपालिका शासनाचा घटक म्हणून कुंभमेळ्यात सहभागी असायची, अन्यथा कुंभमेळा हा केवळ साधुंचा आणि भाविकांचा आहे. त्यामध्ये इतर कोणत्याही संस्थांचा हस्तक्षेप नसावा, अशी रास्त आपेक्षा आहे.

- महंत शंकरानंद सरस्वती, आनंद आखाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ व्या वर्षापासून सुरुवात; संकल्प १०८ माळांचा

0
0

माळांचा छंद जीवाला लावी पिसे

अरविंद जाधव, नाशिक

साधूंच्या जटा, वेशभूषा, गंध लावण्याची विशेष पध्दत, त्यांची नखे, दाढी एवढेच नव्हे तर साधूंच्या तांत्रिक शक्तींमुळे अनेकदा भाविक अचंबित होतात. यामुळे कुंभमेळ्यासाठी शहरात दाखल होणारे साधू-महंत भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात. यावेळी दयाळदास महाराज यांच्या गळ्यातील माळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पंधरा वर्षांपासून माळा परिधान करणाऱ्या या अनोख्या साधूचा माळांची संख्या १०८ करण्याचा संकल्प आहे.

चुर्तसंप्रादयातील निर्वाणी आखाड्याशी संबंधित दयाळदास महाराज चार दिवसांपूर्वी साधुग्राममध्ये दाखल झाले. मुंगेर येथील गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलेल्या दयाळदास यांनी १५ वर्षांपासून गळ्यात माळा घालण्यास सुरुवात केली. मात्र, या माळा साध्या नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आज ते ५६ वर्षांचे आहेत. ज्या महंतांसोबत रा​हिलो, त्यांची सेवा केली आणि त्यांनी प्रसन्न होऊन ज्या माळा दान दिल्या. त्याच गळ्यात परिधान करीत आहे. आजवर ८५ महंत किंवा संतानी माळा दिल्या असून, त्या १०८ करण्याचा संकल्प असल्याचे दयाळदास महाराजांनी नमूद केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात माळा घालून फिरताना अडचण येते. मात्र, त्या अडचणींपेक्षा संतांचा आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यास मोठ्या संख्येने संत-महंत हजर होतील. त्यामुळे यावेळेस किती माळा वाढू शकतील, हे आता सांगता येणार नाही, असेही महाराजांनी स्पष्ट केले. तपोवनातील मुख्य रस्त्यागत चुर्तसंप्रादाय आखाड्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, त्यातील पहिल्याच प्लॉटमध्ये दयाळदास महाराजांचा मुक्काम आहे. कुंभमेळ्यासाठी तीन लाखांपेक्षा अधिक साधू-महंत येणार आहेत. यातील बहुतांश साधुंना कुठला तरी छंद असतोच. याचा अनुभव भाविकांना आनंदाची तसेच आश्चर्याची पर्वणी नक्की देऊ शकतो.



नाशिक बदला और टेक्नॉलॉजी भी

गत कुंभमेळ्यासाठीही दयाळदास महाराज आले होते. याबाबत विचारले असता त्यांनी ना​शिक शहर झपाट्याने बदलले असल्याचे सांगितले. अलाहाबाद किंवा इतर शहराच्या तुलनेत नाशिकमध्ये महागाई अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, कुंभमेळ्यादरम्यान टेक्नॉलॉजीचा वापर वाढला असल्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, टेक्नॉलॉजीचा वापर वाढत असून, साधूही अपवाद नाहीत. संवाद एवढेच आमचे ध्येय असून, त्यापुढे टेक्नॉलॉजीचा वापर केल्यास ते सर्वांच्या नुकसानीस कारणीभूत ठरू शकते असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये फडकणार ताम्रपटाची पताका

0
0

केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर

ध्वजारोहणानंतरच ख-या अर्थाने सिंहस्थास सुरुवात होत असते. त्र्यंबकेश्वरला चौदा जुलै रोजी पुरोहित संघाचे ध्वजारोहण होणार असून, यासाठी ताम्रपटाची पताका तयार करण्यात आली आहे.

ध्वजारोहणाचा थेट संबंध पुरोहित संघाशी येतो. यावेळच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण पर्वात त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ ताम्रपटाची भव्य पताका फडकवणार आहे. या तांब्याच्या ध्वजाची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे यांनी दिली.सिंहस्थ पर्वकालात कुशावर्तात देशभरातील सर्व तीर्थ, नद्या, देवदेवता स्नानासाठी येत असल्याची आख्यायिका आहे. तसे संस्कृत श्लोक प्रमाण आहेत. त्यांच्या स्वागतासाठी यापूर्वी कापडी ध्वजा उभारण्यात येत असायची.

यावेळेस ती तांब्याच्या पत्र्यापासून तयार केली आहे. जवळपास ४५ किलो वजनाच्या या ध्वजासाठी लोखंडी ध्वजस्तंभ तयार करण्यात आला आहे. संपूर्ण तांब्यात तयार करण्यात आलेली ही पताका ३ फूट रूंद आणि ५ फूट लांबीची आहे. साठ फूट लोखंडी पाइपवर फडकणार आहे. सिंहस्थ पर्वकालास अनुसरून या पताकावर सिंहारूढ गुरू, सूर्य, चंद्र तसेच गोदावरी वाहन मगर, दशदिशा आणि बारा राशी यांसह ओम ऱ्हीम स्वस्तिक यांची प्रतिके काढण्यात आली आहेत.

अशी वैशिष्ट्यपूर्ण ताम्रपटाची ध्वजपताका तयार करण्याचे व त्याच्या नक्षीकामाची जबाबदारी नाशिक येथील स्मृतिचिन्हकार सी. एल. कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या ध्वजासाठी दोन लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे. तो पुरोहित संघ आणि येथील कैलास नागरी पतसंस्था यांनी संयुक्तपणे केला आहे. जयंत शिखरे यांनी आपण स्वतः १९८०,१९९२ आणि २००३ या सिंहस्थात कापडी ध्वजा तयार केल्या होत्या, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images