Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिष्यवृत्ती परीक्षांची बदलली ओळख

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिष्यवृत्ती परीक्षा चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवी इयत्तेत घेण्यात यावा, असा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आणि आता या परीक्षांचे नावदेखील बदलण्यात आले आहे. 'पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना' हे नाव बदलून आता या परीक्षा 'उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना' या नावाने ओळखल्या जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या कायद्यातील तरतूदी विचारात घेऊन राज्यात कार्यान्वित असलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर चौथीऐवजी पाचवी व सातवीऐवजी आठवीमध्ये करण्याची योजना राज्य सरकारमार्फत आखली गेली. प्राथमिकऐवजी उच्च प्राथमिक शाळांना ही योजना असावी, असे नियोजन होते. त्यानुसार आरटीई कायद्यानुसार प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक असे विभाग करण्यात आले आहेत. प्राथमिक विभागात पहिली ते पाचवी, उच्च प्राथमिक विभागात सहावी ते आठवी व माध्यमिक विभागात नववी व दहावी या इयत्तांचा समावेश असणार आहे. या बदलामुळे या परीक्षांच्या नावातही बदल करणे गरजेचा होता. त्यानुसार सरकारने परिपत्रकाद्वारे हा निर्णय कळवण्यात आला आहे.

केंद्रीय धर्तीवर होणाऱ्या अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेता मागील एक ते दीड वर्षांपासूनच या परीक्षा पुढच्या इयत्तांसाठी घेण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला. तसेच शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदींचाही विचार करून पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीसाठी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा सातवीऐवजी इयत्ता आठवीत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. या बदलामुळे या परीक्षांचे नाव बदलणेही अपरिहार्यच होते. त्यानुसार हा बदल केला गेला आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून ही पद्धती लागू केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संचालकाचा शोध संपेना!

0
0

व्यवसाय प्रशिक्षण विभागासाठी थेट तंत्रशिक्षणमधून 'बाबू' आयात

विजय महाले, नाशिक

'हुनर से रोजगार' म्हणत कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असतांनाच महाराष्ट्राच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला तीन वर्षांपासून कायमस्वरुपी संचालक देता आलेला नाही.

सध्याचे संचालक प्रमोद नाईक यांना तर तंत्रशिक्षण विभागातून आयात करण्यात आले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील सुमारे डझनभर सहसंचालक आणि त्यापेक्षा संख्येने अधिक सहाय्यक संचालक असतांना तंत्रशिक्षण विभागातून प्रभारी संचालक आयात केल्याने व्यवसाय शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. विशेष म्हणजे तंत्रशिक्षण विभागातील सर्वात ज्युनिअर सहसंचालक असलेल्या नाईक यांची व्यवसाय प्रशिक्षण विभागाच्या सर्वोच्चपदी वर्णी लागणे विभागातील अन्य सिनिअर मंडळींच्या जिव्हारी लागले आहे.

यापूर्वी मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक आर. आर. आसावा यांच्याकडे संचालकपदाचा तात्पुरता प्रभार देण्यात आला होता. आसावा यांच्या कार्यशैलीवर कर्मचारी, अधिकारी प्रचंड नाराज होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांच्या पाठीमागे विभागीय चौकशीचा सेसमिरा लागला. त्यामुळे वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी प्रत्येक कागद १० वेळा पाहूनच सही करू लागेल. त्यातूनच या विभागाची कामगिरी घसरली.

त्याआधी विजयकुमार गौतम या आयएएस अधिकाऱ्याकडे संचालकपदाचा प्रभार देण्यात आला होता. यापूर्वी, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेत आलेले गौतम यांना तांत्रिक विषयाचे पुरसे ज्ञान नव्हते. शिवाय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणात त्यांनी फारसा रसही दाखविला नाही. गौतम नको म्हणून आसावा आले आणि आसावा नको म्हणून विभागाबाहेरचा अधिकारी आयात करण्यात आल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचारी नाराज झाले आहेत.

कशी साधणार गुणवत्ता?

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती सहसंचालक अडवून ठेवतात तर या अधिकाऱ्यांची पदोन्नती मंत्रालय अडवून ठेवते. त्यामुळे या विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. कौशल्य विकासात आणि औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या विभागाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्राम स्वच्छतेचा ठेका वादात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यासाठी साधुग्रामच्या स्वच्छतेचा साडेपाच कोटींचा ठेका वादात सापडला आहे. ब्लॅकलिस्टेड असलेल्या वॉटर ग्रेस प्रोडक्टस् या वादग्रस्त कंपनीला ठेका देण्यात आल्याचा आरोप सदस्य कुणाल वाघ आणि राहुल दिवे यांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराने कागदपत्रांमध्ये फेरफार करीत महापालिकेला तब्बल सव्वा कोटींचा चूना लावल्याचा शासनाच्या लेखापरीक्षण अहवालाकडे कानाडोळा केल्याचे उघड झाले आहे.

प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची हातचलाखी आयुक्तांसह स्थायी समिती सभापतीच्या अंगलटआली असून, संबंधित ठरावावर सही करण्यास सभापतींनी नकार दर्शवला आहे. मंगळवारी स्थायी समिती सभेत जादा विषयात साधुग्रामध्ये वॉटर ग्रेस प्रॉडक्टस या कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास सभेत मंजुरीही देण्यात आली. मात्र, संबंधित कंपनीने महापालिकेची फसवणूक केली आहे. जैविक वैद्यकीय कचरा संकलन ठेक्यात २००१ मध्ये ९५ लाखांचे अधिकचे सेवाशुल्क घेतले आहे. या कंपनीने ही रक्कम महापालिकेला परत केलेली नाही. सोबतच करारनाम्यात चुकीच्या पद्धतीने फेरफार करण्यात आल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात आहे. फाळके स्मारकाचे सहा लाख थकविल्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीतही टाकण्यात आले होते. असे गंभीर आरोप असलेल्या ठेकेदाराला साधुग्राम स्वच्छतेचा ठेका देण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

प्रशासनातर्फे प्रस्ताव आणला जात असताना तो तपासण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. माझ्याकडे यासंदर्भात तक्रार आली असून, मी ठरावावर अद्याप सही केलेली नाही. आयुक्तांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल.

शिवाजी चुंभळे, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेप्युटी इंजिनीअरला लाच घेताना अटक

0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

येथील एमएसईबीचे कनिष्ठ इंजिनीअर विवेक मावडे याला बुधवारी २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

विंचूर येथील लॉन्समध्ये वीज कनेक्शन जोडणीसाठी मावडे याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार बुधवारी सायंकाळी २० हजार रुपयांचा पहिला टप्पा स्वीकारतांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुभाषिक युवक बांधणार संवादाचा सेतू

0
0

जितेंद्र तरटे , नाशिक

लाखोंच्या गर्दीत आपलं माणूस शोधताना त्यांच्या नजरा सैरभैर आहेत; पण यंत्रणेला शब्दांत आपल्या माणसाचं वर्णनच सांगता येत नाहीये... कुणाची तब्येत एकाकी बिघडलीय, पण डॉक्टरांना दुखणंचं सांगायला जमत नाही... परक्या राज्यात अन्याय वाट्याला आलाय पण पोलिसात शब्दांअभावी तक्रारही स्वीकारली जात नाहीये... या सर्व समस्यांचा अडसर एकाच मुळाशी आहे... भाषा! कुंभमेळ्यात संभाव्य समस्या असलेला भाषिक अडसर दूर करण्यासाठी काही युवक पुढे सरसावले आहेत.

कुंभमेळ्यात शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांसमोरील संवादाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक बहुभाषी युवकांची एकसंध मोट बांधली जात आहे. शहरातील युवामंच या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बहुभाषिक युवक एकत्र येत आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यातील पर्वण्यांसाठी कोटीपेक्षाही मोठा जनसागर नाशिकमध्ये येणार आहे.

देशाच्या विविध प्रांतामधून येणाऱ्या या नागरिकांसमोर भाषेचेही मोठे आव्हान आहे. अनेक राज्याच्या तळागाळातून येणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या बोलीभाषेपलिकडे दुसरी भाषाही येत नाही. अशी लाखो कुटूंब पर्वणीत स्नानाची संधी साधण्यासाठी नाशिकमध्ये येणार आहेत. कोटींच्या जनसमुदायात आपल्या माणसांसह वाट काढताना हरविणे, गर्दीत होणारा दगा फटका, अचानक उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न, स्थानिक सुविधांच्या शोधासाठी सुरू असणारी धडपड कमी करण्यासाठी युवामंच या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या माध्यमातून शहरातील बहुभाषिक मंडळे आणि प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या युवकांना संघटीत केले जात आहे. आतापर्यंत युवामंचच्या आवाहनाला प्रतिसाद देत २० पेक्षा अधिक सदस्यांची नोंदणी झाली आहे. यात सहभागी होणाऱ्या बहुभाषिक नागरिकांचा आयडेंटी प्रूफ आणि बाकीचा तपशील युवामंचकडे उपलब्ध राहणार आहे. नागरिक किंवा प्रशासन यांच्या स्तरावर भाषिक अडसराच्या माध्यमातून झालेल्या समस्येवर तोडगा काढण्याचे काम ही टीम करणार आहे. या टीमची यादीही प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संस्था, पोलिस, डॉक्टर्स आणि कुंभाच्या कामातील स्वयंसेवकांना देण्यात येणार आहेत.

कुंभमेळ्यात प्रादेशिक भाषा बोलणारे लाखो नागरिक नाशिकमध्ये येतील. त्यांना शहरात भाषिक अडसराचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागणार आहे. या नागरिकांना भाषिक आव्हानातून गंभीर समस्या सतावत असल्यास युवा मंचचे बहुभाषिक स्वयंसेवक तेथे पोहचून तो प्रश्न सोडवतील.

भूषण काळे, संस्थापक अध्यक्ष, युवामंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विणकरांना ओळखपत्र

0
0

पैठणी विणकरांना योजनांचा मिळणार लाभ

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य शासनाच्या वस्रोद्योग मंत्रालयाचे प्रादेशिक उपसंचालक यांच्या स्वाक्षरीसह कार्यालयाच्या शिक्क्याने नोंदणीकृत केले गेलेल्या आणि विणकरांची अधिकृत ओळख दर्शविणाऱ्या ओळखपत्रांचे वाटप येवला शहरातील पैठणी उत्पादक विणकर बांधवांना करण्यात आले. शहरातील गंगादरवाजा भागातील श्री संताजी मंगल कार्यालयात हा ओळखपत्र वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित विणकरांना ओळखपत्राची माहिती व फायदे याबाबत मार्गदर्शन केले गेले.

येवला शहरातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक जेष्ठ भाजपा नेते श्रीकांत गायकवाड हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रांतिक सदस्य प्रमोद सस्कर, भाजपा नगरसेवक बंडू क्षीरसागर यांची उपस्थित होती. भाजपा तालुका सरचिटणीस आनंद शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विणकरांची अधिकृत ओळख दर्शविणाऱ्या ओळखपत्रामुळे येवल्यातील पैठणी उत्पादक विणकर बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतांना उपयोग होणार असल्याची माहिती कार्यक्रमात आनंद शिंदे यांनी दिली. आनंद शिंदे यांनी येवल्यातील विणकरांची कागदपत्रे जमा करत व रितसर फॉर्म भरुन घेत ते शासनाच्या संबंधित विभागाकडे जमा केले होते. त्यानंतर प्राप्त ओळखपत्रांचे कार्यक्रमात सामूहिक वाटप केले. सदर ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी अर्जदाराला विणकाम करता येणे हीच गोष्ट महत्वाची असून त्या विणकामाची तपासणी अधिकाऱ्यांमार्फत केली जाते.

योजनांची माहिती एसएमएसद्वारे

विणकरांना पुढील शासकीय योजनांची माहिती 'एसएमएस' द्वारे कळविण्यात येण्याची सुविधा दिली जाणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकात गणेश खळेकर यांनी ओळखपत्राच्या वापरा बाबत माहिती दिली. यावेळी प्रमोद सस्कर,नगरसेवक बंडु क्षिरसागर,श्रीकांत गायकवाड आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानकीदास वैष्णव यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल क्षीरसागर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याने वाहनचालकांचा केला वांदा

0
0

टीम मटा

कांद्याचे निर्यातमूल्य रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्हाभरात तालुक्यांच्या ठिकाणी प्रमुख मार्गांवर काही वेळेसाठी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. काही ठिकाणी लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिक तालुक्यात नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळ आंदोलन करण्यात आले.

कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द न केल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिला आहे. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी करून कांद्यावरील किमान निर्यातमूल्य संपूर्णपणे रद्द केले होते. परंतु केंद्रात सतांत्तर झाल्यानंतर नव्याने आलेल्या मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसतांना देखील किमान निर्यात मूल्य ४२५ डॉलर प्रती मे. टन करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. किमान निर्यात मूल्य वाढवून अघोषित निर्यात बंदी करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप अॅड. रविंद्र पगार यांनी केला आहे.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक तालुक्यातील शिंदे (नाशिक), सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर येथील कृषी उत्पन बाजार समिती समोर (सिन्नर), मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगांव येथील टेहरे चौफुली (मालेगांव) तसेच राज्य महामार्गावरील दाभाडी (मालेगांव), मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर (इगतपुरी), मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील निफाड तालुक्यातील पिंपळगांव बसवंत (निफाड) तसेच राज्य महामार्गावरील निफाड व कांद्याची मोठी बाजारपेठ असलेले लासलगाव (निफाड), मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड चौफुली (चांदवड), नाशिक-जव्हार राज्य महामार्गावरील त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा (त्र्यंबकेश्वर), सटाणा येथील राज्य महामार्गावरील शिवाजी पुतळ्याजवळ (सटाणा), राज्य महामार्गावरील कळवण चौफुली (कळवण), राज्य महामार्गावरील देवळा येथे पाचकंदील चौफुली (देवळा), राज्य महामार्गावरील येवला- विंचूर चौफुली (येवला), मनमाड-औरंगाबाद राज्य महामार्गावरील मनमाड चौफुली (नांदगांव), नाशिक-वणी राज्य महामार्गावरील पालखेड चौफुली (दिंडोरी), नाशिक-सापुतारा राज्य महामार्गावरील बोरगांव (सुरगाणा), नाशिक-धरमपूर राज्य महामार्गावरील कचरे चौफुली (पेठ) आदि ठिकाणी शेतकऱ्याना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे तसेच निफाड तालुक्यातील पिंपळगांव बसवंत येथे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. पिंपळगांव बसवंत येथे नायक तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’संगे आज बनवा चटकदार चायनीज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजकाल चायनीज पदार्थ ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवड बनली आहे. त्यामुळेच शहरातील काही प्रसिध्द चायनीज स्पॉट्सवर सतत गर्दी पाहायला मिळते. पण हेच चटकदार चायनीज तुम्ही घरच्या घरी बनवू शकता 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मदतीने.

चायनीज पादार्थांची क्रेझ लक्षात घेत 'मटा' व 'नूफोर्म सलोन अॅण्ड अॅकॅडमी' प्रस्तुत 'चटकदार चायनीज रेसिपी' या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. भांडी बाजारातील मुरलीधर मंदिर लेनमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर महिला मंडळामध्ये शुक्रवारी (दि. ३) दुपारी १२ ते ३ या वेळेत हा वर्कशॉप होणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर महिला मंडळ या वर्कशॉपचे व्हेन्यू पार्टनर आहेत. वर्कशॉपमध्ये आरती ताहिलियानी आणि ममता ठक्कर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

मनचॉव सूप, स्वीट कॉर्न सूप, मोमोज्, स्प्रिं रोल्स, मन्चुरियन, पनीर चिल‌ी, फ्राईड राईस, हक्का नूडल्स, चायनीज भेळ, चायनीज भेळ इंडियन स्टाईल अशा विविध चायनीज डिशेश यावेळी शिकविल्या जाणार आहेत. या वर्कशॉपमध्ये कृतीसह चायनीज पदार्थ शिकविले जाणार आहे. तसेच पदार्थांच्या रेसिपीच्या नोट्सही इथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहते. हे वर्कशॉप कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत असून अन्य व्यक्तींसाठी १०० रुपये फी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बाटली आडवी’साठी सातपूरमध्ये मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील श्रमिकनगर, शिवाजीनगर व ध्रुव्रनगर भागात असलेले देशी, विदेशी व इतर दारूचे अड्डे बंद करण्याची मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. त्या अनुशंगाने येत्या ११ व १२ जुलै रोजी प्रभाग १७ मध्ये दारूविक्रीच्या बंदीसाठी मतदान घेतले जाणार आहे. यात राज्य उत्पादन शुल्क विभाग दोन दिवस महिलांचे मतदान घेणार असून शिवाजीनगरच्या इंदिरा गांधी विद्यालयात मतदान होईल.

प्रभाग १७ मधील देशी, विदेशी व इतर दारूंचे अड्डे हटविण्यात यावे, अशी अनेक दिवसांपासून महिलांची मागणी होती. यात प्रभागाचे नगरसेवक दिनकर पाटील, लता पाटील यांनी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्कातील अधिकाऱ्यांना निवेदन देखील दिली. परंतु, याकडे फारशी दखल घेण्यात आली नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान दोन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने दारू दुकानाला क्लिनचिट मिळाल्याचे नगरसेवक पाटील यांनी सांगितले. परंतु, येत्या ११ व १२ जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्काने पारदर्शकपणे मतदान घेण्याचे नगरसेवक पाटील म्हणाले.

सामाजिक सुरक्षितता धोक्यात

परिसरातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. दारूच्या दुकानांमुळे अनेक तरुण व्यसनाधिन होऊन महिलांची छेड काढण्याचे प्रकार होतात. तसेच दारूच्या व्यसनात अडकलेले तरुण पैसे नसल्यास भुरट्या चोऱ्यांही करतात. यासाठी महिलांची दारूची दुकाने व परमिटरुम बंद करण्याची अनेक वर्षांची मागणी येत्या ११ व १२ जुलै रोजी मतदान करून पूर्ण होणार आहे. यात राज्य उत्पादन शुल्काकडे मतदानाची नोंदणी केलेल्या महिलांनी मतदानासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन नगरसेवक पाटील यांनी केले आहे.

दारुबंदीसाठी प्रचार सुरू

मतदानाची माहिती संपूर्ण प्रभागाला असावी यासाठी माहिती करणारी वाहने प्रभागात फिरविली जात आहेत. यात दारू सोडण्याबाबतचे गाणेही वाजविले जात आहे. यामुळे प्रभाग १७ मध्ये मद्यसेवन करणारे विशेष म्हणजे पहाटेपासूनच देशी दारूच्या अड्ड्यांवर ठाण मांडणारे धास्तावले आहेत. सरकारने दारूंची दुकाने बंद केल्यावर येथील महिला आनंद उत्सव साजरा करणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
परिसरातील महिलांची दारूबंदीची जुनी मागणी आहे. यात दोन वर्षांपूर्वी तांत्रिक त्रुटींमुळे अनेक महिलांना मतदानात भाग घेता आला नाही. परंतु, आता होणाऱ्या मतदानात महिलांनी शंभर टक्के मतदान करण्याचा निर्धार केला आहे. - अनिता कदम, रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कशी होणार गोदा निर्मळ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना पंचवटीमधील रामकुंड आणि प‌रि‌सरातील गोदावरी नदीचा काठ अद्यापही अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेला आहे. महापालिकेसह जिल्हा प्रशासन अस्वच्छता पसरविणाऱ्या काही नागरिकांमुळे हैराण झाले आहेत.

कुंभमेळा येत असल्याने गोदावरी घाट कायम निर्मळ आणि स्वच्छ कसा राहील असा प्रयत्न जिल्हा व महापालिका प्रशासनासह विविध समाजसेवी आणि धार्मिक संघटनांकडून केला जात आहे. मात्र, काही नागरिकांना त्याचे काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. गोदावरी घाटावरील विविध ठिकाणचा कचरा व सडलेल्या भाजीपाल्याची घाण पाहून दिसत आहे. वारंवार साफसफाई केली जात असतांना आपण त्याच ठिकाणी पुन्हा घाण कशी करावी याचा विचार काही लोक करीत नाहीत का असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत कडक धोरण आखण्याची गरजेचे आहे, असेही मत जागरुक नागरिक आणि भाविकांनी व्यक्त केले आहे.

नदीमध्ये केरकचरा व निर्माल्य टाकू नये अशा सूचना देणारे फलक महापालिका प्रशासनाने गोदावरी काठी ठिकठिकाणी लावलेले आहेत. तसेच कचरा आणि निर्माल्य टाकले जाऊ नये यासाठी ठिकठिकाणी निर्माल्य कलश देखील ठेवण्यात आले आहेत. परंतु, काही नागरिक मुद्दामच कलशाच्या बाहेरच कचरा आणि निर्माल्य टाकतांना दिसून येतात. अधिकारी व संबंधित कर्मचारी वर्गाने यावर लक्ष ठेवून ठोस कायदेशीर कारवाई करावी किंवा पुन्हा अशी चूक करणार नाही याचा धडा मिळण्यासाठी जबर दंड वसूल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोहिमेचा उपयोग काय?

वारंवार स्वच्छता मोहीम घेवून नागरिक असेच वागत असतील तर नाशिककरांच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. गंगेवरील साईबाबा मंदिराच्या समोरच कचऱ्याचा खच नेहमी दिसून येतो. सडक्या भाजीपाल्याची दुर्गंधी परिसरात पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. महापालिकेच्या स्वच्छता विभागणे याकडे नीट काळजी पूर्वक लक्ष केंद्रीत करावे आणि परिसर निर्मळ करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासाअगोदरच साधुग्राममध्ये चोऱ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

कुंभमेळाच्या पार्श्वभूमिवर तपोवनात सर्व ठिकाणी कामे वेगात सुरू आहेत. मात्र, साधुंचे निवासासाठी आगमन होण्यापूर्वीच साधुग्राममधील विविध साहित्यांवर भुरट्या चोरांकडून डल्ला मारण्यास सुरूवात झाली आहे. यासंदर्भात साधुग्रामध्ये कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी तक्रारी केल्या आहेत.

साधुग्राममधील नळाच्या तोट्या, एल्बो दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री भुरट्या चोरांनी लंपास केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या काळात आता चोराचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहेत. वेळ कमी असल्याने कामे वेगात सुरू आहेत. त्यात पावसाने वेळ घेतला आणि आता चोरांनी भंडावून सोडल्याचे मत कंत्राटदारांनी व्यक्त केले आहे. भुरट्या चोरांमुळे प्रशासनासोबत ठेकेदार आणि कामगार यांनाही त्रस्त केले आहे. साधुग्राममधील नळ आणि पाईप चोरांनी कापून नेले आहेत. सध्या त्याठिकाणी अंधाराचे साम्राज्य आहे. याचाच फायदा भुरट्या चोरांनी उठविला आहे. यापूर्वी देखील अनेक वस्तू चोरांनी नेल्या आहेत. सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याने चोरांचे फावले आहे. सरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी अशीही मागणी केली जात आहे.

चोऱ्या रोखणे कठीण

साधुग्राममध्ये सध्या कोणीच रहात नसल्याने छोट्या मोठ्या चोऱ्यांना आळा घालणे कठीण असल्याचे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, चोऱ्या होऊ नये सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याबरोबरच पोलिसांची गस्त वाढविण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना द्या, कलेचे मोकळे आभाळ !

0
0

>> मकरंद हिंगणे

विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच कलेची गोडी लागावी म्हणून शालेय पातळीवर कला शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे, पण बारकाईने पाहीले तर शालेय पातळीवर कलेचे शिक्षण हे फक्त काही स्पर्धा आणि परीक्षांपुरतेच मर्यादित असल्याचे लक्षात येते. खरं तर चौथीपर्यंत अगदीच बालवय असते म्हणजे एखादी कला आपल्याला आवडते किंवा नाही हे कळण्याचे वय नसते. शिक्षणाचा आणि संस्कारांचा ठसा हा पाचवीनंतरच्या वयात उमटला जातो. म्हणजे १० वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनिवडीची जाणीव होऊ लागलेली असते. पण त्या आधीच्या अगदीच बालवयात आपण जे पाहतो, जे ऐकतो किंवा आपले पालक आपल्याला जे जे काही करायला भाग पाडतात त्या त्या सर्व गोष्टी मुलं करत असतात आणि आताच्या जमान्यात तर घरोघरी सतत चालू असलेल्या टीव्हीचाही मारा त्यांच्यावर होत असतो. नंतर मात्र शाळेत चित्रकला आणि संगीत असे विषय येतात. यातील चित्रकला हा विषय अनेक शाळांमधून उत्तम रितीने शिकवला जातो. पण याचा कालावधी पाचवी ते आठवी एवढाच मर्यादित असतो. त्यातही चित्रकलेतल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याऐवजी इंटरमिजिएट आणि इलेमेंटरी परीक्षांचा अभ्यास करून घेण्यातच जास्त वेळ जातो. नववीपासून १० वीच्या अभ्यासाची तयारी सुरू होते आणि चित्रकला बंद पडते. म्हणजे ज्या वयात कलेच्या शिक्षणाची खरी गरज असते त्यावयातच संगीत आणि चित्रकलासारख्या कलांचे शिक्षण बंद केले जाते आणि खरंतर इथेच आपण अनेक कलावंतांना गमावून बसतो कारण १० वी नंतर हे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मागे लागतात आणि कला मागे पडते किंवा ज्यांना कलेतच शिक्षण घ्यायचे असते त्यांची अत्यंत महत्त्वाची दोन वर्षे वाया जातात. अनेक शाळांमधून संगीत शिक्षक आहेत पण राष्ट्रगीतं, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीची गाणी आणि समूहगीत स्पर्धा एवढीच याची मर्यादा आहे. संगीत चित्रकलेचे शिक्षण १० पर्यंत देऊन बोर्डाने त्याचा पेपर घ्यायला काय हरकत आहे? बोर्डाच्या पातळीवर या विषयांचा विचार सुध्दा केला जात नाही हे खरोखर आश्चर्यकारकच आहे. म्हणजे जेव्हा या विषयांना बोर्डाच्या मान्यतेची गरज असते तेव्हाच या विषयांची परीक्षा न घेण्याचे बोर्ड ठरवते. सर्व शाळांमधील कला शिक्षकांनी १० वी मध्ये संगीत आणि चित्रकलेची परीक्षा घेण्याचा आग्रह धरला तर हळूहळू समाजामध्येही या विषयांची उत्सुकता वाढेल आणि पुढे जाऊन शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेण्याकडे कल निर्माण होईल. आता १० पर्यंत जे विषय आहेत त्याच विषयांमध्ये किंवा त्या विषयांचा आधार घेऊन विद्यार्थी आणि त्यांचे पालक पुढील शिक्षणाची दिशा ठरवतात. मग १० पर्यंत कला विषय ठेवले तर बोर्डाचे काय नुकसान आहे? उलट कला गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कला शिक्षणाकडे जाऊ नये असेच धोरण यातून दिसते. एक गोष्ट आपल्याकडे नेहमी सांगतली जाते की, खजिन्याच्या शोधात एक माणूस डोंगर फोडून पुढे जात असतो. बराच आत गेल्यावर शेवटी कंटाळून तो खजिन्याचा नाद सोडून माघारी फिरतो; पण जेथून माघारी फिरतो तिथे न कंटाळता एक घाव घातला असता तर भिंत पडली असती व रत्नांचे दालन उघडे झाले असते. असेच कला शिक्षणाचे झाले आहे. केवळ धोरण बदलले तर परिस्थिती बदलू शकते आणि नक्कीच कला क्षेत्राला शालेय पातळीवर चांगले दिवस येऊ शकतात.

कला क्षेत्रात शालेय विद्यार्थी जेवढे दिसतात त्यातले जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेच्या बाहेर कलेचे शिक्षण घेत असतात, अनेक खासगी शाळांमध्ये कलेचे स्वतंत्र विभाग आहेत त्यातून कलेची खूपच जागृती होत आहे, पण सरकारी आणि अनुदानित शाळांनी थोडेसे धोरण बदलले तर मोठा फरक पडेल निश्चितच.

(लेखक के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टचे प्राचार्य आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

किर्लोस्कर व वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कुसुमाग्रज फिल्म सोसायटी व विश्वास बँक यांच्या सहकार्याने ७ ते १० जुलह या दरम्यान होणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय महोत्सवादरम्यान दिल्या जाणाऱ्या वुसंधरा मित्र पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली.

यंदाचा वसुंधरा मित्र पुरस्कार सुप्रिया आगाशे, संदीप चव्हाण व शिवकार्य गडकोट मोहीम यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार महोत्सवात डॉ. अनिल अवचट, शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जाणार आहे. वसुंधरा मित्रांचा सत्कार ८ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे होणार असून, या कार्यक्रमानंतर डॉ. अनिल अवचट यांच्याशी आजची 'पर्यावरणीय आणीबाणी' या विषयावर संवाद साधण्यात येणार आहे. तर १० जुलै रोजी गोदावरी पुनरूज्जीवन व शिरपूर पॅटर्न या विषयावर सुरेश खानापूरकर विवेचन करणार आहेत. हा महोत्सव ७ ते १० जुलै दरम्यान चालणार आहे. प्रवेशिका विश्वास बँकेच्या सर्व शाखांमध्ये तसेच कुसुमाग्रज स्मारक आणि किर्लोस्कर कंपनी, अंबड येथे उपलब्ध आहेत.

सुप्रिया आगाशे

गेली दहा वर्षे स्वत:च्या घरातील कचरा कुजवून खत करता करता सुप्रिया आगाशे आता नाशिक महापालिकेचा कचरा मागवून घेतात. त्याचे आपल्या परसात खत करून दर आठवड्याला २०० किलो कचऱ्याचे व्यवस्थापन करतात. निर्माण झालेले खत वापरून वेगवेगळ्या भाज्या लावतात. त्याचबरोबर गेली काही वर्षे जुन्या साड्या, कपडे यापासून पिशव्या बनवून दुकानांमध्ये अत्यल्प किमतीत ठेवून प्लॅस्टिक पिशवीला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

संदीप चव्हाण

शहरी शेती आणि टेरेस गार्डन या विषयात गेली १० वर्षे काम करीत आहेत. घरच्या घरी कचरा आणि विविध तंत्रे वाकरून अत्यंत कमी खर्चात रोजचा भाजीपाला तयार करण्याचे सोपे तंत्र ते शिकवतात.

शिवकार्य गडकोट मोहीम

शिवकार्य गडकोट मोहीम ही नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले संवर्धनाची चळवळ आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून २५ मोहिमा पूर्ण केल्या असून, त्या अजूनही सुरूच आहेत. किल्ल्यांवरील प्लॅस्टिक व इतर कचरा संस्थेच्या माध्यमातून साफ केला जातो. त्यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच सुशोभिकरणही होते. विविध तलावातील गाळ काढून झरे मोकळे होऊन उन्हाळ्यात किल्ल्यांवर पाणी उपलब्ध होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘न हि वैरेन वैरानि’ म्हणजे शांतीदूत !

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वैराने फक्त वैर वाढत जाते, त्यापेक्षा शांतीचा अवलंब करून सुख व समाधान दोन्ही मिळवता येते हे साधे व सोपे तत्त्वज्ञान मांडणारे 'न हि वैरेन वैरानि' नाटक गुरूवारी महाकवी कालिदास कलामंदिरात लोकहितवादी मंडळातर्फे सादर करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय नाट्यमहोत्सव गुरूवारी सुरू झाला. या महोत्सवात पाच राज्यस्तरीय विजेत्या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. 'खुनाचा बदला खून' हा विचार बळावत गेल्यावर होणारी शोकांतिका, त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या मुखीयाची चाललेली धडपड, त्यांच्या विरोधात अनेकांना पेटवून खून करण्यास प्रवृत्त करावयास लावणारी वृत्ती परंतु अंतिमत: विजय मात्र बुध्दाच्या शांततेचाच होतो अशा आशयाचे हे नाटक होते.

वेरमणी बेटावर सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यांचा मुखीया रावत प्रत्येकाकडे काळजीपोटी लक्ष देऊन आहे. रावत नंतर त्याची गादी सांभाळणारा दलाम हादेखील रावतच्या बोलण्यानुसार चालणारा आहे, तो जरा तापट स्वभावाचा असल्याने रावत त्याला वेळोवेळी समजही देतो. मात्र एकदिवस दलामचा भाऊ गदाना याचा खून होतो. पाठीवर बाण लागलेल्या अवस्थेत गदाना वेरमणी बेटावर येऊन पडतो व तेथे दलामच्या मांडीवर जीव सोडतो; मात्र जाताना दारूण बेटावरच्या लोकांनी आपली हत्या केल्याचे सांगून जातो. तेव्हापासून दलाम सुडाने पेटलेला आहे. इकडे रावत मात्र सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतात. त्या बेटावर दारूण बेटावरच्या मुखीयाने अजानने पाठवलेली गुप्तहेर पिपिलीका खबरबात काढण्याच्या उद्देशाने येते व त्यांच्या तावडीत सापडते मात्र चलाखी करून तेथून ती निसटते. पुन्हा अजानकडे येते. तेव्हा तो कोवळ्या पोरांना दहशतवाद पसरवण्याचे धडे देत असतो. तेथेही एक नाट्य घडते. दारूण बेटावरचे काही तरूण एका मुलीवर बलात्कार करून तिच्या प्रियकराला बेदम मारतात त्याला हा अजान उकसवतो की ते तरूण वेरमणी बेटावरचे आहेत परंतु तो प्रियकर त्यांचे म्हणणे ऐकत नाही व जीवाला मुकतो. अजान तरूणांना भडकवत असतो व रावत मात्र शांतीचे धडे देतो यात विजय शांतीच्या तत्त्वज्ञानाचा होतो. अशा आशयाची कथा या नाटकात होती.

नाटकाचे दिग्दर्शन मुकुंद कुलकर्णी यांचे होते. प्रकाशयोजना विजय रावळ यांची, नेपथ्य किरण समेळ यांचे तर संग‌ीत प्रसाद भालेराव-निषाद हलकर्णी यांचे होते. रंगभूषा माणिक कानडे यांची होती. प्रकाश संयोजन रवी रहाणे यांचे तर संगीत सहाय्य जुईली सातभाई हिचे होते. वेशभुषा अपूर्वा शौचे यांची होती. नाटकात अरूण गिते, हेमंत देशपांडे यांच्यासह ३५ जणांनी काम केले. नाटकाचे निर्मिती प्रमुख जयप्रकाश जातेगावकर होते.

५४ व्या हौशी राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत लोकहितवादी मंडळाचे भगवान हिरे लिखित आणि मुकुंद कुलकर्णी दिग्दर्शित 'न हि वैरेन वैरानि' या नाट्यकलाकृतीने सर्वाधिक आठ वैयक्तिक पुरस्कार पटकावून निर्मितीचा ३ लाख रुपयांचा प्रथम क्रमांक मिळवला होता. नाटकाच्या सुरूवातीला महोत्सवाचे उद् घाटन लेखक देवेंद्र यादव, लेखक पी. डी. कुलकर्णी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष रविंद्र कदम, भरत लहांगी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले.

नाट्यमहोत्सवात आज

राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवात आज, शुक्रवार ३ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात चंद्रपूरच्या नवोदिता संस्थेचे हेमंत मानकर लिखित व डॉ. जयश्री कापसे-गावंडे दिग्दर्शित 'चिंधीबाजार' हे नाटक होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलांची उद्यापासून गणना

0
0

सर्व्हेक्षणात शौचालयांचीही होणार मोजदाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतर्फे येत्या शनिवारपासून (४ जुलै) शहरातील शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, या सर्व्हेक्षणात शहरातील किती घरांमध्ये शौचालय आहेत, याचीही माहिती गोळा केली जाणार आहे. या सर्व्हेक्षणासंदर्भातील महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून, सहा विभागात तब्बल साडेतीन हजार प्रगणक यात सहभागी होणार असल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली. यासाठी शहरात १३५ झोन आणि २७९२ ब्लॉक तयार करण्यात आले आहेत.

शहरात नामांकित आणि ग्लॅमरस शाळांच्या संख्येत भर पडत असतांना दुसरीकडे शाळाबाह्य मुलांचा आलेखही तेवढाच उंचावतो आहे. महापालिका हद्द‌ीत शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शहराच्या हद्दीत असलेल्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने शहरातील शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या ४ जुलै रोजी महापालिकेच्या वतीने साडेतीन हजार प्रगणकाच्या मदतीने ६ ते १४ या वयोगटातील मुलांचे डोअर-टू-डोअर सर्व्हेक्षण केले जाणार आहे. या मुलांची नोंदणी करून त्यांना शाळांमध्ये दाखल करून घेतले जाणार आहे. शहरात साडेतीन लाख घरांची संख्या आहे. प्रत्येक शंभर घरामागे एक प्रगणक नियुक्त केला करण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षकही मदतीला दिले जाणार आहेत. १३५ झोन, २७९२ ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. शाळाबाह्य मुलांना आठ दिवसाच्या आत आधार कार्ड देण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगीतले.

मोहिमेतील प्रगणाकाकंडे एक अतिरिक्त फॉर्म दिला जाणार असून, संबंध‌ित कुटुंबाकडे शौचालय आहे की, नाही याची माहिती भरून घेतली जाणार आहे. त्यामुळे शहरात शौचालयांची नेमकी संख्या किती, याचा अंदाज येणार असून, स्मार्ट सिटीसाठी त्याचा उपयोग होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कुटुंबियांना आता शौचालयाचीही माहिती द्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशासनाला आंदोलनांचा दणका!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सद्यस्थितीत शैक्षणिक प्रवेशांचा मुद्दा प्राधान्यावर असताना या प्रक्रियेतील अडसरांविरोधात विविध संघटनांच्या वतीने आंदोलने छेडण्यात आली आहेत. या आंदोलनांच्या दणक्याच्या परिणामी काही प्रमाणात ढिम्म प्रशासकीय यंत्रणेलाही चालना मिळते आहे.

अन्यायाच्या विरोधात एकवटणाऱ्या या आंदोलनांनाही काही प्रमाणात यश मिळते आहे. निफाड तालुक्यातील बेकायदेशीर फी वसुलीबाबत आम आदमी पक्षाच्या (आप) तक्रारीहून समाजकल्याण विभागाने तब्बल ३३ कॉलेजेसची चौकशी सुरू केली आहे. तर धन्वंतरी मेडिकल कॉलेजविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मनविसे आणि युवासेनेने छेडलेल्या आंदोलनाच्या परिणामी या विद्यार्थ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाले आहे. तर आयएमआरटी मॅनेजमेंट आणि एनबीटी लॉ कॉलेजच्या ७५ विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांपासून प्रलंबित फी प्रश्नी राष्ट्रावादी विद्यार्थी काँग्रेसने समाजकल्याण विभागात ठिय्या दिला. या विद्यार्थ्यांनाही पुढील आठ दिवसांच्या कालावधीत प्रलंबित शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासनही समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात आले.

निफाड तालुक्यातील ज्युनिअर आणि सिनीअर कॉलेजेसच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर शुल्क वसुल केले जात असल्याची तक्रार 'आप'च्या वतीने समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांकडे करण्यात आली होती. या मुद्याची दखल घेत समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी निफाड तालुक्यातील या सर्वच्या सर्व ३३ कॉलेजेसची तपासणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने शुल्क आकारणीचे रेकॉर्डस तपासले जाणार असल्याच्या आदेशांमुळे या कॉलेजेसचे धाबे दणाणले आहे. ६ ते १० जुलै या चार दिवसांच्या कालावधीत संबंधित सर्वच्या सर्व कॉलेजेसनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फी वसुली संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचनाही समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी दिल्या आहेत.

मिळणार प्रलंबित स्कॉलरशीप?

मविप्रच्या आयएमआरटी कॉलेजमधील एमबीएच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व फ्री शीप आहे. तर एनबीटी लॉ कॉलेजच्या सुमारे ७५ विद्यार्थ्यांची फ्री शीप व शिष्यवृत्ती दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या विद्यार्थ्यांचा प्रश्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने समाजकल्याण विभागात मांडण्यात आला. आगामी आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आल्याची माहिती संघटनेचे चिन्मय गाढे यांनी दिली.

'धन्वंतरी'कडून मागण्या मान्य

कामटवाडा परिसरातील धन्वंतरी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन छेडल्याच्या परिणामी त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर आणि जाचक अटींच्या ‌विरोधात शहरातील काही विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येत हे आंदोलन छेडले होते. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पुढाकार होता. कॉलेजमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांचा अभाव, कॉम्प्युटरसारख्या ज्या सेवांचे शुल्क घेतले जाते त्या सेवांची अनुपलब्धता, लॉकर्सची सक्ती, तीन-तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती, वसतीगृहाला नसणारी सिक्युरिटी, वसतीगृहाची अतिरीक्त फी वाढ, स्वच्छतागृहांची अपूर्ण संख्या व अस्वच्छता आदी मुद्दे या मागण्यांमध्ये होते. या मागण्या पूर्ण करण्यास सुरुवात झाल्याची माहितीही विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्टीहिनांनाही अनुभूती सृष्टीची

0
0

अश्विनी कावळे, नाशिक

सृष्टीचे विविधरंगी आविष्कार अनुभवण्यास पारखे झालेल्या दृष्टीहिनांसाठी नाशिकमध्ये साकारणारे महाराष्टातील पहिले संवेदना उद्यान वरदायी ठरत आहे. दृष्टीहिनांसाठी नॅबच्या माध्यमातून साकारलेला हा राज्यातील पहिलाच प्रकल्प वंचितांच्या या समूहाला सृष्टीच्या बहुरंगी आविष्कारांची अनुभूती देणारे माध्यम बनला आहे. हैदराबाद पाठोपाठ हा देशातील दुसराच प्रकल्प ठरला आहे.

प्राथमिक इयत्तेत मुलं शिकत असताना त्यांना रंग, आकार, पक्षी-प्राणी यांची ओळख चित्रांच्या माध्यमातून करून दिली जाते. निसर्गाच्या सुंदर आविष्काराची जाणीव त्यांना शाळेच्या पहिल्या टप्प्यातच होते. परंतु, ज्या मुलांच्या डोळ्यासमोर कायमचाच अंधार दाटला आहे, त्यांना या गोष्टींची ओळख होणे स्वाभाविकच अवघड जाते. पण स्पर्श व गंध या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्गसौंदर्याचे ज्ञान करून देण्यासाठी हे उद्यान अतिशय परिणामकारक ठरले आहे. गुलाब, मोगरा, बोगनवेल, बदाम अशा अनेक प्रकारची झाडे-झुडपे या उद्यानात लावण्यात आली आहे. शाळेचे तास संपले की मुले येथे येतात आणि फुला-पानांच्या गंधांच्या साहाय्याने त्या झाडाची स्वतःशी ओळख करून घेतात. या मुलांना ही झाडे इतकी आपलीशी झाली आहेत की ते या झाडांच्या गंध आणि स्पर्धातून पटकन त्यांची नावं सांगतात. तसेच येथे त्रिकोण, चौकोन, गोल अशा भौमितीय आकारांचे लाकडी ठोकळे लावण्यात आले आहेत. गणित विषयाशी निगडीत आकार नेमके कसे असतात, याचे ज्ञान यामार्फत विद्यार्थ्यांना दिले जात आहे.

काय आहे या उद्यानात?

पाणी खळाळण्याचा आवाज, बोगद्याची ओळख, शहाबादी फरशा, लहान-मोठ्या आकाराचे दगड, गोट्या, रेती, फुलं-झाडं, लॉन्स, अंकओळख होण्यासाठी उठावदार अक्षरे या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी विविध टप्प्यांवर उद्यानात यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वस्तूंना स्पर्श करुन त्याची अनुभूती येथील विद्यार्थी घेतात. या दरम्यान 'नॅब'चे शिक्षक त्यांना या वस्तूंचे स्पष्टीकरण देत असतात. व्यंगाचा कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास दृढ व्हावा, यासाठी उद्यानातच एक स्टेज व समोर प्रेक्षकांसाठी जागा बनवण्यात आली आहे. त्यांच्या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन येथे केले जाते. गाणे, नृत्य याचे सादरीकरण येथे केले जातात. विद्यार्थ्यांच्या संवेदनांना जागरुक करण्यासाठी हे उद्यान लाभदायक ठरत आहे. नॅशनल ट्रस्ट नवी दिल्ली, बॉश ग्रुप ऑफ इंडिया, नाशिक व नॅब इंडिया, मुंबई यांच्या सहकार्याने हा प्रकल्प येथे तयार करण्यात आला आहे.

अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला या उद्यानामुळे मोठा हातभार लागत आहे. निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव अंध विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी हे उद्यान मोलाची भूमिका बजावत आहे.

- शाम पाडेकर, चेअरमन, जनसंपर्क समिती, नॅब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधुग्रामला कुंपणाचे ‘कवच’

0
0

अरविंद जाधव, नाशिक

तब्बल ३५० एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या सुरक्षेसाठी जाळ्यांचे कुंपण उभारले जाणार आहे. या कामाची सुरूवात दोन दिवसात होणार असून, यामुळे भुरट्या चोऱ्यांना आळा बसण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तीन लाख २० हजार साधुमहंताच्या निवासस्थानासाठी प्रशासनाने तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्याचे काम हाती घेतले आहे. अतिशय भव्य स्वरूपात साधुग्रामचे निर्माण होत असून, यामुळे सुरक्षेचा मुद्दाही समोर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून साधुग्राममध्ये पायाभूत कामे सुरू आहेत. याठिकाणी ९ हजार ९३२ बाथरूम व ९ हजार १७८ तात्पुरते टॉयलेटस तयार केली जात आहेत. बाथरूममध्ये पाच नळांचे टॅब देण्यात आले असून, टॉयलेटसमध्ये सुद्धा अशीच सुविधा देण्यात आली आहे. बाथरूमसाठी प्रशासनाला तब्बल ४९ हजार ६०० नळ पुरवावे लागणार आहेत. तर टॉयलेटसाठी हीच संख्या ४५ हजार ८९० इतकी आहे. दोन्ही मिळून ९५ हजार ४९० नळ प्रशासनाला पुरवावे लागणार आहेत. हे काम सुरू करण्यापूर्वीच भुरट्या चोरट्यांचा फटका साधुग्रामला बसू लागला आहे. यामुळे साधुग्रामच्या सुरक्षेत वाढ होणे गरजेचे आहे. साधुग्राममध्ये राहणाऱ्या साधु-महंताकडे स्वतःची वाहने असतात, तसेच घोडे-हत्ती अशी जनावरे सुध्दा असतात. याबाबत महापालिकेच्या सिंहस्थ सेलचे एक्झ‌िक्युटीव्ह इंजिनीअर जी. एम. पगारे म्हणाले, 'साधुग्राममध्ये अपरिचीत व्यक्तींना येण्यासाठी वाव आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असून, दोन दिवसातच ३५० एकर जमिनीवर कुंपण घालण्याचे काम सुरू केले जाणार आहे. बल्ली व जाळ्यांच्या सहाय्याने हे काम पूर्ण होणार असून, यामुळे भुरट्या चोऱ्यांना आळा बसेल असे पगारे यांनी स्पष्ट केले.

साधुग्रामच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिन्याभरापासून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. दिवसा तसेच रात्री गस्त केली जाते. आजपर्यंत भुरट्या चोऱ्या किंवा इतर गुन्हा झाल्याची तक्रार आलेली नाही. कुंपणामुळे सुरक्षेत वाढ होईल. - अविनाश बारगळ, पोलिस उपायुक्त

कुंपणाचे काम दोन दिवसात सुरू होईल. साधुग्राममध्ये प्रमुख दोन ते तीन रस्ते येतात. भाविकांची वर्दळ सुरू असते. कुंपणामुळे सुरक्षेत वाढ होईल. - जी. एम. पगारे, एक्झीक्युटीव्ह इंजिनीअर, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीत एकी; महाआघाडीत बेकी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती पदासाठी सात उमेदवारांचे नऊ अर्ज तर उपसभापती पदासाठी पाच उमेदवारांचे सहा अर्ज दाखल झाले आहेत. महाआघाडीतल्या मनसेसह, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने सभापतीपदाची चुरस वाढली आहे. तर शिवसेना, भाजपनेही एकी करून निवडणुकीत उडी घेतल्याने महाआघाडीची धाकधूक वाढली आहे. तर काँग्रेसमधील बेकीचे राजकारण या निवडणुकीतही कायम आहे.

शिक्षण समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरूवार शेवटचा दिवस होता. सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान सभापती पदासाठी ९ अर्ज तर, उपसभापती पदासाठी ६ अर्ज दाखल झाले. त्यात सभापतीपदासाठी अपक्ष संजय चव्हाण, मनसेचे मिना माळोदे, राष्ट्रवादीच्या सुनिता निमसे, काँग्रेसच्या वत्सलाताई खैरे, योगिता आहेर, शिवसेनेच्या हर्षा बडगुजर, भाजपच्या ज्योती गांगुर्डे यांनी अर्ज दाखल केले आहेत, तर उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या योगिता आहेर, शिवसेनेच्या हर्षा बडगुजर, काँग्रेसच्या वत्सलाताई खैरे, भाजपच्या ज्योती गांगुर्डे, मनसेच्या गणेश चव्हाण यांनी अर्ज दाखल केले.

शिवसेना भाजपने एकत्रीत येऊन अर्ज दाखल केले. त्यामुळे युतीत एकीचे दर्शन दिसत असून, शिवसेना सभापती तर भाजप उपसभापतीची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनीही स्वतंत्र अर्ज दाखल केले. त्यामुळे महाआघाडीत एकी नसल्याचे समोर आले आहे असे असले तरी, मनसे, राष्ट्रवादी आणि अपक्षांचा घरोबा पक्का असून, काँग्रेसचे मात्र तळ्यात मळ्यात असल्याचे चित्र आहे. महाआघाडीत झालेल्या समझोत्यानुसार गणेश चव्हाण सभापतीपदासाठी आणि गणेश चव्हाण उपसभापती अर्ज दाखल करणार होते. तरीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अर्ज आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तरीही भरला

राष्ट्रवादीच्या सुनिता निमसे या सव्वा बारा वाजता सभापती पदासाठी अर्ज घेण्यासाठी आल्या. मात्र अर्ज वितरणाची मुदत १२ वाजताच संपल्याचे नगरसचिवांनी सांगीतले. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. कोणाच्या नावावर खरेदी केलेला अर्जही चालेल असे सांगीतल्यानंतर निमसेंनी अर्जाची शोधाशोध सुरू केली. एका उमेदवाराने खरेदी केलेला अतिरिक्त अर्ज त्यांच्या मदतीला धावून आला. त्यामुळे घाई गडबडीत त्यांनी विरोधी पक्षनेत्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. अर्ज खरेदी केला नाही, मात्र तरीही त्यांनी अर्ज भरला.

मनसेतही धूसफूस

शिक्षण समितीतल्या उमेदवारीवरून मनसेतही धुसफूस सुरू आहे. उपसभापती पदासाठी मनसेच्या वतीने गणेश चव्हाण यांचा अर्ज दाखल झाला तर, सभापतीपदासाठी मिना माळोदे यांनी अर्ज भरला. मात्र मिना माळोदे यांच्या पतीने माळोदे यांचा उपसभापतीपदासाठीही अर्ज दाखल करावा असा आग्रह धरला. मात्र मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी त्यांचा अर्ज हिसकावून घेत, आपल्या जवळ ठेवला. मनसेच्या वाट्याला उपसभापती पद येणार असल्याने आपल्याला माघार घ्यावी लागणार याची कल्पना माळोदे यांना होती. म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त करत, दबाव टाकू नका असे सुनावले.

काँग्रेसला शिवसेना सूचक

शिक्षण समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या योगिता आहेर यांच्या उपसभापती पदाच्या अर्जावर चक्क शिवसेनेच्या विलास शिंदे यांनी सूचक म्हणून सही केली आहे. अर्ज भरताना काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने त्यांच्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांची सही घेण्याची वेळ आली.

काँग्रेसची पुन्हा फरफट

काँग्रेसचा घोळ आणि गटबाजी शिक्षण समितीच्या निवडणुकीतही कायम आहे. वत्सलाताई खैरे आणि योगीता आहेर यांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केले आहेत. पक्षातील एकही सदस्य त्यांच्यासोबत फिरकला नाही. एवढेच नव्हे तर खैरे आणि आहेर यांनी एकमेकींनाच अंधारात ठेवत अर्ज भरले. गटनेते उत्तम कांबळे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय दोघांनीच घ्यावा असे सांगत आपले हात झटकून घेतले आहेत. तर, आहेर यांनी यावेळी धोका होऊ नये यामुळे अगोदरच दक्षता घेतल्याचे सांगीतले आहे. विशेष म्हणजे आहेर यांच्या उपसभापती पदाच्या अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेच्या विलास शिंदे यांची सही आहे. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीचे पुन्हा दर्शन झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेत्या महाजन बंधूंचे जंगी स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेस अॅक्रॉस अमेरिका ही अत्यंत खडतर व तेवढ्याच जागतिक प्रतिष्ठेची सायकल स्पर्धा पूर्ण करणारे हितेंद्र महाजन व महेंद्र महाजन यांचे गुरुवारी नाशिकमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.

संध्याकाळी सायकल सर्कल येथे ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मॉडेल कॉलनी चौक येथून कॉलेज रोड, बिग बाजार, कॅनडा कॉर्नर, गंगापूर नाका मार्गे रावसाहेब थोरात सभागृहाजवळ विसर्जित झाली. रावसाहेब थोरात हॉलमध्ये महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. महाजन बंधुंच्या यशात सहभागी असणारी ट‌ीमही या मिरवणूकीत सहभागी झाली होती.

मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत

'रेस अॅक्रॉस अमेरिकेच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भारताचा झेंडा अटकेपार रोवून आलेल्या महाजन बंधूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ही स्पर्धा पूर्ण करून भारतीय टीम बुधवारी मध्यरात्री मायदेशी परतली. मुंबई विमानतळावर त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे व नाशिक येथून सायकलप्रेमी आले होते.

हत्तीवरून ‌मिरवणूक

गुरूवारी पहाटे ना‌शिकमध्ये आगमन होताच आप्त व मित्र मंडळी त्यांचे स्वागत केले. सकाळी ७ वाजता पाथर्डी फाटा येथे विजयी वीरांची ढोल ताशाच्या गजरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. पुढे दोन ओपन जीपमध्ये साथीदार टीम उभी राहून सगळ्यांचे अभिवादन स्वीकारत होती.

टीमचे यश

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत नऊ दिवसांत सुमारे ४८६० किलोमीटर इतके अंतर हा प्रवास होता. या स्पर्धेदरम्यान शारीरिक स्पर्धकांची शारीरिक कसोटी तर होतीच मात्र त्यापेक्षाही जास्त मानसिक कसोटी होती. ही स्पर्धा पूर्ण करायची या निर्धाराने ही टीम भारतातून रवाना झाली होती. स्पर्धेत टिकून राहण्याची चिकाटी शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवण्यासाठी या टीमचे कॅप्टन डॉ. सुनील वर्तक यांच्या नेतृत्वाखाली व प्रशिक्षक मितेन ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रमाकांत पाटील, डॉ. राजेंद्र नेहते, डॉ. मिलिंद पिंपरीकर, मिलिंद वाळेकर, मोहिंदर सिंग, डॉ. श्याम चौधरी, सायकलिंग एक्सपर्ट पंकज मार्लेशा, अमेरिकेतील डॉ. सचिन गुजर, इंग्लंडमधील डॉ. अमोल तांबे, डॉ. संदीप शेवाळे यांच्या क्रूने मोठी मेहनत घेतली.

नागरी सत्कार

नाशिककरांतर्फे महाजन बंधुंचा गुरूवारी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर अशोक मुतर्डक म्हणाले,'महाजन बंधुंनी या स्पर्धेत सहभाग घेऊन नाशिककरांची मान उंचावली आहे. त्यांच्या मागणीनुसार लवकरच प्रत्येक जॉगिंग ट्रॅकच्या बाहेर सायकल पार्किंग तयार केले जाईल.' सत्काराला उत्तर देताना हितेंद्र महाजन म्हणाले,'ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.' महेंद्र महाजन म्हणाले,'आमच्या या यशात आमच्या टीमचा मोठा वाटा आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images