Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कचरा नव्हे, लूट टॅक्स!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

नागरिकांकडून घेतला जाणाऱ्या कचरा टॅक्सबाबत प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी देवळाली कॅम्प येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत घुगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पेंद्रसिंह यांना निवेदन देण्यात आले.

यापूर्वी नागरिक घंटागाडीत किंवा कचऱ्याच्या कुंड्यांमध्ये केर टाकत होते. मात्र, आज प्रशासनाच्या वतीने डोअर टू डोअर कचरा उचलण्यासाठी हा कर नागरिकांच्या घरपट्टीमध्ये आकाराला जातो. मात्र, प्रत्यक्षात कोणताही सफाई कर्मचारी घरी अथवा दुकानात जाऊन हा कचरा उचलत नाही. प्रत्यक्ष नागरिक घंटागाडीपर्यंत येऊन कचरा देत असल्यामुळे परिस्थिती जैसे थे असताना नागरिकांनी कचरा टॅक्स का द्यावा? असा सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. देशासह देवळालीत कॅन्टोन्मेन्ट बोर्डात देखील भाजपचीच सत्ता आहे. निवेदनावर अमोद शहाणे, प्रदीप गुरव, सचिन गुळवे, सोनू सचदेव, प्रमोद शेटे, संतोष मेढे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्थिकतेवरच समाजाची विभागणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धर्म किंवा जातीपेक्षाही भारतीय समाज आज आर्थिक निकषांवर सर्वाधिकपणे विभागला जात आहे. देशापुढील जागतिक आव्हानांकडे बघताना ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत विख्यात विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केली.

'एव्हरी चाईल्ड काऊंट्स' या मोहिमेंतर्गत आयोजित शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणार्पण सोहळ्यात ते बोलत होते. येस फाऊंडेशन, इस्पॅलिअर स्कूल, कामगार विभाग, मनपा शिक्षण मंडळ यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत शहरातील स्लम परिसरातून सुमारे ७०१ मुलांना नव्याने शिक्षण प्रवाहात आणण्यात आले आहेत. कामटवाडे परिसरातील इस्पॅलिअर स्कूलमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वासलेकर म्हणाले, पाश्चात्य राष्ट्र आणि भारत या दोन्ही देशांमधील शिक्षण पध्दतींमध्ये तुलना होण्याची गरज आहे. त्या देशांमधील शाळेत समतेचा नियम काटेकोरपणे पाळला जातो. या धोरणाचे सामाजिक परिणाम अत्यंत सकारात्मक आहे. या उलट आपल्याकडे पालकांच्या क्रयशक्तीनुसार शाळांच्या विभागणी होतात. अन् इकॉनॉमिक क्लासनुसार शिक्षण व्यवस्था विभाजीत होते. येथेच समाजाचे विभाजन व्हायला सुरुवात झालेली असते. यामुळे या शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल आणायला हवेत. या दिशेने वाटचाल करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, शैक्ष‌णिक क्षेत्रातील घटक यांसोबतच समाजाचेही योगदान तितकेच गरजेचे आहे. यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

भारतीय व्यवस्थेत एज्युकेशनल, इथिकल आणि इगो हे तीन क्रायसिस मोठा अडसर आहेत. या तिन्हींच्या मिलाफातून इन्स्टिट्यूशनल क्रायसिस तयार होतो अन् सर्व विकासाची दिशाच तो रोखून धरतो, असेही निरीक्षण वासलेकर यांनी यावेळी मांडले. आपला समाज आत्मकेंद्रित बनत चालला आहे. मी आणि माझे या पलिकडे तो बघण्यास तयार नाही. शिक्षणातून स्पर्धेऐवजी आपसातील सौहार्द आणि सहकार्याचा भाव वाढीला लागायला हवा. सृजनात्मक विचारसरणीला चालना मिळायला हवी, अशीही अपेक्षा यावेळी वासलेकर यांनी व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, कामगार उपायुक्त रा. सु. जाधव, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, डॉ. वसुधा कुरणावळ, प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे, इस्पॅलियर स्कूलचे संचालक सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’ची आज पेट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून पीएचडीसाठीची प्रवेश प्रक्रिया रविवारी राज्यभरात होत आहे. राज्यातील तब्बल १५ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, त्यासाठीची विद्यापीठाने तयारी केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानंतर बाहेरून पीएचडी करण्याचा अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठाकडून बंद करण्यात आला. आता या अभ्यासक्रमाची फेररचना करून विद्यापीठाने या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्याचे निश्चित केले. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याबाबतचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले. या परीक्षेसाठी राज्यभरातून १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले. पूर्णवेळ राबविल्या जाणाऱ्या या शिक्षणक्रमासाठीची २४ मे रोजी प्रवेश घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले. त्यानंतर ही परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आणि १ जूनला परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सांगण्यात आले. मात्र, विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे ही परीक्षा आणखीनच लांबणीवर पडली. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत होते. त्यातच हॉल तिकीट उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण होते.

पीएचडीसाठी रविवारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जवळपास राज्यभरातील प्रत्येक तालुक्यात एमकेसीएलच्यावतीने घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात १५० परीक्षा केंद्र आहेत. सकाळी ११.३० आणि दुपारी २.३० या वेळी परीक्षेला सुरुवात होईल. पीएचडीसाठी एकूण ४६ जागा असून त्यासाठीचे अर्ज विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. २०० गुणांची असलेली ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन होणार आहे. पहिला पेपर ५० तर दुसरा १५० गुणांचा असणार आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक अर्जून घाटोळे यांनी दिली. प्रवेशित विद्यार्थ्यांना आपले संशोधन कार्य विद्यापीठात संबंधित विद्याशाखेत पूर्णवेळ थांबून करावे लागणार आहे. त्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये दरमहा विद्यावेतन (फेलोशिप) दिले जाणार आहे. रविवारी लेखी परीक्षा झाल्यानंचर त्याचा निकाल ऑनलाइन घोषित होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल. अंतिम निवड यादी प्रसिद्ध होऊन निवड यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास विद्यार्ध्यांना आक्षेप नोंदवता येतील, असे विद्यापीठाने सांगितले आहे.

सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी ४

कम्प्युटर सायन्स ६

अॅग्रीकल्चरल सायन्स १०

कंटीन्यूइंग एज्युकेशन ६

कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट ८

एज्युकेशन ८

ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्स ४

एकूण ४६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालधक्क्याचे करायचे काय?

$
0
0


अरविंद जाधव, नाशिक

क्षमतेपेक्षा जास्त भाविक नाशिकरोड रेल्वे स्टेशनला पर्वणी दरम्यान दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची कशी, असा यक्षप्रश्न रेल्वे प्रशासनाला सध्या सतावतो आहे. देवळाली रेल्व स्टेशन परिसर तसेच नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यांचा 'होल्डिंग एरिया' म्हणून वापर करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. मात्र, सलग दोन ते तीन दिवस मालधक्का बंद ठेवल्यास व्यापाऱ्यासह रेल्वेलाही मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

रेल्वे प्रशासनाच्या अंदाजानुसार प्रत्येक पर्वणीला सुमारे तीन लाख भाविक रेल्वेमार्गे नाशिकला येण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत रेल्वेची इतक्या मोठया प्रमाणावर प्रवासी वाहतुकी​ची क्षमता नसल्याचे दिसून येते. रेल्वेने नवीन प्लॅटफॉर्मची उभारणी केली असली तरी स्थानकावर येणाऱ्या भाविकांची गर्दीचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. प्रशासनाने नाशिकरोड ऐवजी देवळाली, अस्वली स्टेशन, ओढा, घोटी, इगतपुरी या स्टेशनचा पर्यायी थांबा म्हणून वापर करण्याचे नियोजन केले आहे. भाविकांना याठिकाणी उतरण्याचे आवाहन प्रशासन करणार आहे. मात्र, प्रशासनाचे हे आवाहन भाविकांच्या कितपत पचनी पडेल याविषयी शंका व्यक्त होते आहे. गत कुंभमेळ्यात हा प्रयोग फसला होता. सावधगिरी म्हणून मालधक्क्यांचा प्रवाशांच्या सोयीसाठी वापर करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे. पर्वणी काळात रेल्वे मालधक्यावरील रेल्वे लाईनचा वापर अतिरिक्त गाड्याकरीता करण्यात येणार आहे. या मार्गावरून सुमारे ११ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तर नियमित मार्गावरून अप आणि डाउन मार्गावर प्रत्येकी ५९ गाडयांची वाहतूक नियमीतपणे होईल. त्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर मोठया प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाला वाटत आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनसाठी दोन मालधक्के वापरले जातात. हे दोन्ही मालधक्के ४ हजार ५०० स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त मोठे आहेत. मालधक्क्यावर युरिया, सिमेंट, लोखंड, बिल्डींग मटेरीयल, सरकारी धान्य यासह इतर मालाची आवक-जावक होत असते. कोट्यवधी रूपयांचा माल येथून ने-आण केला जातो. सलग दोन ते दिन दिवस मालधक्का बंद ठेवल्यास बुकिंग झालेला माल कोठे

उतरवयाचा असा प्रश्न रेल्वेला सतावातो आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवगळता जवळपासच्या स्टेशनवर ही सुविधा उपब्लध नाही. त्यातच पावसाळ्यामुळे रेल्वेच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या या प्रश्नावर भुसावळ डिव्हीजनचे वरिष्ठ अधिकारी खलबत करीत आहेत. दोन्ही मालधक्क्यांचा वापर करायचा काय? किंवा एकच मालधक्का बंद ठेवयाचा याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनला दोन मालधक्के असून, त्यांचा होल्डिंग एरिया म्हणून कसा वापर करायचा याविषयी वरिष्ठ निर्णय घेतील. स्थानिक पातळीवर याबाबत काहीच माहिती ना​ही. - एम. बी. सक्सेना, स्टेशन मॅनेजर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉकड्र‌िल दरम्यान गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपत्तकालीन परिस्थितीला विविध विभाग कशाप्रकारे समोरे जातात, हे तपासण्यासाठी शनिवारी सकाळी रामकुंड परिसरात मॉकड्र‌िलचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यातून सर्वत्र सावळा गोंधळ असल्याचे दिसून आले. अनेक विभागांना मॉकड्र‌िलबाबत शेवटपर्यंत माहितीच मिळाली नाही. विशेष म्हणजे यात पोलिस दलाचाही समावेश होता.

जिल्हाप्रशासनाने आपत्तकालीन परिस्थितीत नेमके काय घडू शकते अन् त्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी मॉकड्रिलचे आयोजन केले होते. मात्र यातून प्रशासनासमोर अडचणींचा डोंगर उभा असल्याचे समोर आले. ज्या विभागांना मॉकड्र‌िलबाबत कल्पना होती, ते वेळेआधीच हजर झाले होते. तर पोलिसांना याबाबत कल्पनात नसल्याची स्थिती होती. त्यातच एकाच वेळी एकाच अधिकाऱ्याच्या मोबाइलवर सातत्याने कॉल्स सुरू झाल्याने नेटवर्क जॅम झाले. प्रशासकीय रस्त्याचा न झालेला वापर, पब्ल‌िक अँड्रेस सिस्टीमकडे दुर्लक्ष, अधिकाराबाबत अधिकारी अनभिज्ञ, परस्पर सहकार्याचा अभाव, महत्त्वाच्या मोबाइल क्रमाकांची उपलब्धता, सिव्ह‌िल हॉस्पिटलसह महत्त्वाचे हेल्पलाईन नंबरवरील अतिरिक्त ताण, अशा अनेक त्रुटी यातून समोर आल्या.

दुधाची तहान ताकावर

मॉकड्र‌िलमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वातावरणाचा फिल जाणवलाच नाही. हे मॉकड्र‌िल पर्वणीचा दिवस डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आले होते तर पोलिस बंदोबस्त कुठे होता, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला. किंबहुना मॉकड्र‌िलबाबत १२ वाजेपर्यंत पोलिसांना कल्पनाच नव्हती. तसेच सकाळी मॉकड्र‌िल दरम्यान व दुपारच्या बैठकीला पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन हजर नव्हते. यामुळे अजुनही प्रशासन व पोलिसात समन्वय साधला जात नसल्याची चर्चा बैठकी दरम्यान सुरू होती.

पर्वणीत मोबाइल 'नॉट रिचेबल'

पर्वणी दरम्यान मोबाइलचा वापर वाढून सर्वांचा संवाद खंड‌ित होण्याची शक्यता महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी व्यक्त केली. पर्वणीच्या महत्त्वाच्या दिवशी अशी परिस्थिती उद्भवल्यास नियोजनाचे तीन तेरा वाजण्याची भीती व्यक्त करीत वॉकी टॉकीसारख्या पर्यायाचा वापर वाढवावा लागणार असे त्यांनी सांगितले. पर्वणी दरम्यान मोबाइल सेवा खंड‌ित होऊ नये म्हणून भारत संचार निगम लिमीटेडतर्फे विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते पुरसे नाहीत. खासगी ऑपरेटर्सने यापूर्वीच हात वर केले असून, यामुळे पर्वणी दरम्यान एकमेकाशी संवाद साधण्यासाठी मोबाइल हे महत्त्वाचे साधन ठरणार नाही, असे गेडाम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिमंद चेतनची भरारी

$
0
0


जितेंद्र तरटे , नाशिक

त्याचा जन्म झाला तेव्हा तो रडलाच नाही. पुढे तर आवाजालाही तो योग्य प्रतिसाद देईनासा झाला. डॉक्टरांनी सांगितलं तो गतिमंद आहे. त्याला असाच सांभाळा. पण आईचं वेडं ह्रदय सांगत होतं... 'तो गतिमंद नाही. हे एक दिवस नक्कीच सिध्द होईल...' या वेड्या आशेसाठी तिनं दीड दशक वाट बघितली. विशेष शाळेतून यंदा चेतन दहावी उत्तीर्ण झाला. डॉक्टरांचा अभ्यास इथं हरला अन् आईची उमेद अन् चेतनचे परिश्रमच जिंकले.

मानसिक अपंगांसाठीच्या शाळेतून यंदा दहावीच्या वर्गात एकमेव उत्तीर्ण झालेल्या चेतन रत्नपारखीची ही संघर्षमय कहाणी. चेतनच्या जन्मानंतर त्याच्या मानसिक विकलांगतेमुळे नवं आव्हानचं त्याच्या आई-बाबांसमोर उभं ठाकलं होतं. अनेकांनी त्यांना वेगवेगळे सल्ले दिले. या मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांचे पर्यायही सुचविले. पण हे सर्व प्रवाह नाकारत या लेकराची आई ढाल बनून राहिली. त्याच बोट धरत तिनं त्याला पंडित कॉलनीतील प्रबोधिनी ट्रस्टच्या शाळेत दाखल केलं. या संस्थेच्या संस्थापिका व ज्येष्ठ समाजसेविका रजनी लिमये आणि त्यांच्या संस्थेतील टीमलाही चेतनचा लळा लागला अन् या शाळेतून तो दोन वर्षांपूर्वी इयत्ता आठवी उत्तीर्ण झाला. चेतनचा शिक्षणास मिळणारा प्रतिसाद बघून त्याच्या आई-बाबांचीही उमेद वाढीला लागली. मग त्याला पुन्हा मानसिक विकलांगांसाठीच्या सातपूर येथील प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करण्यात आलं. इथल्याही नव्या मित्रांसोबत तो रमला. लिखाणात त्यानं गती घेतली. कॉम्प्युटरही शिकला. त्याची प्रगती बघून संस्थेने त्याला यंदा दहावीच्या परीक्षेस बसविले.

परीक्षेसाठीचा मर्यादीत वेळ अन् गतीची सांगड घालण्यासाठी त्याला परीक्षा विभागाने लेखनिकही दिला. चेतनला साथ देण्याची लेखनिकाची जबाबदारी सीडीओ मेरी हायस्कूलचा विद्यार्थी जितेंद्र महाजन याने उत्तम सांभाळली.

संघर्षाला सुरुवात

चेतनचा प्रवास हा पालकांच्या ढालीआड झाला. पण त्याचा खरा संघर्ष आता सुरू झाला आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडणारे पालक त्याच्या आयटीआय प्रवेशासाठी आकाशपाताळ एक करत आहेत. आर्थिक परिस्थितीचा मेळ बसविताना होणारी त्यांची दमछाक, नॉर्मल मुलांच्या संस्थेतील प्रवेशासाठी गेल्यानंतर इतरांच्या विस्फारणाऱ्या नजरा आणि मानसिक विकलांगांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये अपुरी पडणारी व्यवस्था या स्तरावर चेतनच्या संघर्षाचे नवे पर्व सुरू झाले आहे. त्याला त्याच्या पायावर उभे करण्यासाठी त्याच्या आई-बाबांनीही चंग बांधून समाजालाही विधायक संदेश दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे बजेट रखडले

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

महापालिकेचे सन १०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रक दुरूस्तीसाठी सभापतींना वेळ मिळत नसल्याने ते चार महिन्यांपासून रखडले आहे. पदाधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे तब्बल २ हजार १८६ कोटींच्या अंदाजपत्रकाची चार महिन्यांपासून अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नागरी सुविधांची कामे लटकली आहेत. त्याचबरोबर सिंहस्थाची कामे वगळता इतर प्रकल्पांनाही `ब्रेक` लागला आहे.

प्रशासनाकडूनही केवळ सिंहस्थाच्या कामांनाच प्राधान्य दिले जात असल्याने नगरसेवकांनाही पैसा उपलब्ध होत नाही. त्यातूनच विकासकामांवरून नगरसेवक व अधिकाऱ्यांमध्येच संघर्ष होत आहे. अंदाजपत्रक स्थायीकडून महासभेकडे येण्याला आणि महासभेत मंजूर होण्याच्या प्रक्रियेला अजून किमान महिन्याचा कालावधी लागणार असल्याने नगरसेवक व नागरिकांची चिंता वाढली आहे.

महापालिका आयुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीचे तत्कालीन सभापती राहुल ढिकले यांना २,१८६ कोटी २३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर स्थायीला सादर केले होते. आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर आठवडाभरातच सभापती राहुल ढिकलेंसह आठ सदस्य निवृत्त झाले. ढिकले यांनीच या अंदाजपत्रकावर चर्चा होवून त्यात दुरूस्त्या आणि नवीन कामे सूचवून ते वर्तमान सभापतीच्या संमतीने महासभेला सादर करणे आवश्यक होते. परंतु, तसे घडले नाही. स्थायीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे शिवाजी चुंभळे आरूढ होऊन आता साडेतीन महिने लोटले तरीही अंदाजपत्रकावर चर्चा झालेली नाही.

तत्कालीन सभापती राहुल ढिकले यांचे वडीलांचे निधन झाल्याने मध्यंतरीच्या काळात अंदाजपत्रकावर चर्चा होऊ शकली नव्हती. त्यानंतर चुंभळे आणि ढिकले पुन्हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अडकले. त्यामुळे अंदाजपत्रकावर दोघांमध्ये चर्चा होवू शकली नाही. ढिकले रिकामे झाल्यानंतर शिवाजी चुंबळे हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गुंतले आहेत. ही प्रक्रिया आणखी महिनाभर चालणार असल्याने अंदाजपत्रकाचा मुहूर्त लांबणार आहे. तोपर्यंत महापालिकेचे कामकाज बजेटविनाच सुरू राहणार आहे.

..........

चार महिने लोटले तरी अंदाजपत्रक मंजूर झाले नसल्याने केवळ प्रशासकीय स्ततरावरूनच आर्थिक गाडा हाकला जात आहे. निधीची तरतूद नसल्याने नगरसेवकांच्या दोन ते पाच लाखांच्या किरकोळ फाइल्सही मंजूर होत नाहीत. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत दिवे दुरूस्ती, पाइपलाइन दुरूस्ती, गार्डन, तसेच अंतर्गत रस्ते दुरूस्ती अशी कामे होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. त्यांच्याकडून टिकेचा भडीमार होत असल्याने नगरसेवकही महापालिकेवर संतापले आहेत. अंदाजपत्रकच मंजूर नसल्याचे अधिकारी हे नगरसेवकांच्या फाइल्स परतावून लावत आहेत. त्यामुळे स्थायी आणि महासभेत अधिकाऱ्यांवरील असंतोष वाढत चालला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीतून घुमणार ऑलिम्पिक गीत

$
0
0

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त २३ जूनला 'मविप्र'तर्फे दौड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जागतिक ऑलिम्पिक डेनिमित्त दरवर्षी ऑलिम्पिक गीत इंग्रजीतून सादर होते. मात्र, नाशिकमध्ये हे गीत प्रथमच मराठीतून सादर होणार आहे. मविप्र संस्थेतर्फे २३ जून रोजी होणाऱ्या ऑलिम्पिक दौडमध्ये हे गीत मराठीतून सादर केले जाणार असून, महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी दिली.

'सत्य शिवाचा सुंदरतेचा विशालतेचा निर्माता, प्राचीन तू रे तूच अमर रे कलंकहीन तू परमात्मा' अशा या ऑलिम्पिक गीताच्या मराठीतील ओळी आहेत. ऑलिम्पिक गीताचा मराठीत अनुवाद मिलिंद गांधी यांनी केला असून, त्याला प्रशांत महाबळ यांचे संगीत लाभले आहे. महाराष्ट्रात प्रथमच ऑलिम्पिक गीत मराठीत अनुवादित करून ते सादर केले जाण्याचा महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग असेल.

'मविप्र' ऑलिम्पिक डे करणार वेगवान

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतर्फे (मविप्र) जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त २३ जून रोजी सकाळी सात वाजता एक किलोमीटरची 'ऑलिम्पिक दौड' होणार आहे. संस्थेचे विद्यार्थी, खेळाडू, कर्मचारी, तसेच नाशिकमधील नागरिक यात सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक दौडचे हे दुसरे वर्ष असून, आरोग्याचा संदेश, क्रीडासंस्कृतीचा प्रसार हा उद्देश असल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

मविप्र मॅरेथॉन चौकापासून ही दौड सुरू होणार असून, क्रांतिवीर व्ही. एन. नाईक सर्कलला वळसा घालून कॅनडा कॉर्नरमार्गे पुन्हा मॅरेथॉन चौकात समारोप होईल. ऑलिम्पिक खेळाडू कॅप्टन कासम खान, महापौर अशोक मुर्तडक, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अर्जुन पुरस्कारप्राप्त कविता राऊत, क्रीडाधिकारी संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक जे. पी. अधाने आदी प्रमुख पाहुणे असतील. स्पर्धेत संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, प्रा. एस. के. शिंदे, जनसंपर्क अधिकारी सी. डी. शिंदे सहभागी होणार आहेत. संस्थेचे क्रीडाप्रमुख हेमंत पाटील या वेळी उपस्थित होते.

खेळाडूंच्या हस्ते उद्घाटन

मविप्र संस्थेतर्फे होणाऱ्या ऑलिम्पिक दौडचे उद्घाटन राजकीय व्यक्तींऐवजी खेळाडूंच्याच हस्ते करण्याचा निर्णय घेतला असून, ऑलिम्पिक खेळाडू कॅप्टन खान यांच्यासह संस्थेचे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, तसेच प्रशिक्षक या अभियाना हिरवा झेंडा दाखवतील. या खेळाडू, प्रशिक्षकांमध्ये नौकानयनचे मार्गदर्शक जितेंद्र कर्डिले, क्रीडा कार्यकर्ता संजय होळकर, तलवारबाजी खेळाडू शरयू पाटील, तसेच संस्थेच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये रोलबॉलचा हर्षवर्धन गावित, खो-खोपटू स्वप्निल चिकणे, श्वेता जाधव, अमोल बोराडे, वैशाली तांबे, उत्तरा खानापुरे यांचा समावेश आहे.

मॅरेथॉन चौकाचा शुभारंभ

मविप्र संस्थेतर्फे केटीएचएम कॉलेजजवळील चौकाला मॅरेथॉन चौक असे नामकरण करण्यात आले असून, या चौकाला महापालिकेकडून गुरुवारी अधिकृत मान्यता मिळाली. ऑलिम्पिक डेनिमित्त या चौकाचे उद्घाटन २३ जून रोजी होणार आहे.

मॅरेथॉन मार्ग कायम

मविप्र संस्थेतर्फे दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग मॅरेथॉन चौक ते दोंडेगाव असा घेण्यात येतो. हाच मार्ग भविष्यातही कायम राहणार आहे.

धावपटूचे शिल्प वाढणार

मॅरेथॉन चौकात उभारण्यात आलेले धावपटूचे शिल्प आणखी वाढवण्याचा निर्णय मविप्र संस्थेने घेतला आहे. हे शिल्प ब्राँझ धातूचे असल्याचा समज आहे. मात्र, ते चुकीचे असून, या शिल्पाला ब्राँझ धातूचा मुलामा देण्यात आल्याचे सरचिटणीस पवार यांनी स्पष्ट केले. हे शिल्प पुढील मॅरेथॉन स्पर्धेपर्यंत नऊ फुटांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासींचा सच्चा रुग्णसेवक

$
0
0

- फणिंद्र मंडलिक

ज्यांच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो, जयंत बेलगावकर या माणसाने आपलं अवघं जीवन जनसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने झिजवलं. तळागाळातला माणूस केंद्रस्थानी मानून ७१ व्या वर्षी त्यांच काम आजही अव्याहतपणे सुरू आहे. अदिवासींना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी ते काम करीत असून १५ वर्षापासून पेठ तालुक्यातील पिठूंदीच्या आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळत आहे.

स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आलेली पिढी ही चिवट कष्टाळू आहे, यात शंकाच नाही. जयंतरावांचा जन्म १९ जानेवारी १९४६ ला अहमदनगर येथे झाला. काही कालावधीनंतर ते नाशिकला स्थायिक झाले. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने आईने दुसऱ्याच्या घरात स्वयंपाकाची कामे करून पाच मुले व एक मुलगी असा कुटुंबाचा गाडा ओढला. जयंतरावांनी नाशिकच्या न्यू हायस्कुलमध्ये शिक्षणास सुरुवात केली. घरात हालाखीचे परिस्थिती असल्याने या काळात शिक्षक व इतर लोकांकडे ते वार लावून जेवत असे. शिक्षणाचं आणि देशप्रेमाचं वेड असलेल्या जयंतरावांवर विद्यार्थी दशेतच संस्कार घडले. नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात २५ वर्ष नोकरी केल्यानंतर १९९६ पासून त्यांनी पूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेतलं. २००१ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर रातूर रस्त्यावर असलेल्या लाहोरा येथे भूकंपग्रस्तांसाठी त्यांनी आपल्या पत्नीसह ग्रामस्वच्छता, जनजागृती, मुलांचे संस्कारवर्ग, शिक्षणाबाबत जनजागृती असे मोठे काम उभे केले. त्यानंतर सन २००३ मध्ये गोवा येथे विश्व हिंदू परिषद अंतर्गत अनाथ मुलांच्या वसतीगृहात व्यवस्थापक म्हणून सेवा दिली. परंतु, पत्नीच्या आजारपणामुळे त्यंना नाशिकला परतावे लागले.

सन २००४ मध्ये गुजरात सीमेवरील पेठ तालुक्यातील पिठूंदी आरोग्य केंद्राची जबाबदारी जयंतरावांनी स्वीकारली. आसपासच्या पाड्यांवरून ३०० ते ३५० रुग्णांना सेवा देण्याचं काम इथं चालतं ते काम आजही सुरू आहे. रोज सकाळी दोन डॉक्टर, दोन मदतनीस व जयंतराव अशी पाच माणसे पिठूंदी येथे जातात व आदिवासींना वैद्यकीय सुविधा देतात. यात प्रामुख्याने इंजेक्शन देणं, ड्रेसिंग करणं, औषधं देणं, याबरोबरच मुलांचे संस्कारवर्ग घेऊन त्यांना वाईट सवयींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरु करण्याचे काम जयंतराव करतात. रोज सुमारे १५० पेशंटवर येथे विनामूल्य उपचार केले जातात. हाच आकडा पावसाळ्यात ३५० च्यावर जातो. येथे येणाऱ्या रुग्णांच्या शरीराची स्वच्छता शिकवण्याचेही काम जयंतराव करीत असतात. सरकार आम्हाला या कामाचे पैसे देते असा काही वर्षापूर्वी आदिवांसींचा गैरसमज होता. मात्र, त्यातील सत्यता पडताळून तो दूर झाला. या ठिकाणी कुणाकडून काहीही घेतले जात नाही. जेवणाचे डबे देखील सर्वजण आपापल्या घरूनच नेतात. थंडी, ताप, सर्दी याचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात त्याच्यावर देखील येथे उपचार करावे लागतात. अवघड केस असेल तर जयंतराव रुग्णाला स्वतः घेऊन नाशिकच्या श्री गुरुजी रुग्णालयात किंवा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करतात.

सुमारे दीड महिन्यापूर्वी एका आदिवासी युवकाच्या पायाला कुऱ्हाडीचा घाव बसल्याने मोठी जखम झाली होती. जखमेत किडे झाले झाल्याने चार लोकांनी त्याला बाजेवर आरोग्यकेंद्रात आणले. जखम पहाताच त्याला नाशिकला हलवू असे जयंतरावांनी सल्ला दिला. मात्र, पेशंटने नाशिकला येण्यास नकार दिल्याने जयंतरावांनी त्याच्यावर पिठूंदीत उपचार करण्यास सुरुवात केली. दोन दिवसात त्याच्या पायातील जखमेत फरक दिसून आला व आठ दिवसांनी युवक आपल्या पायाने चालत गावाकडे गेला. तेरा वर्षात अशी अनेक उदाहरणे देण्यासाठी निरंतन रुग्णसेवा त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसीबाबत उद्या मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगाने विस्तारणाऱ्या फार्मसी क्षेत्रामधील करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी (दि. २३) गोखले फार्मसी कॉलेजमध्ये उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फार्मसी क्षेत्रात बारावीनंतर करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन सत्र खुले आहे. कॉलेजरोडवर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आवारात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या उपक्रमाचे मीडिया पार्टनर आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना पूर्ण करावी लागणारी प्रक्रिया, कॅप राऊंड, कौन्सिलिंग राऊंड, निकष, कागदपत्रांची उपलब्धता, कॉलेजची निवड करताना उपलब्ध पर्याय, योग्य कॉलेजची निवड, तंत्रशिक्षण विभागाचे कॉलेजेससाठी असणारे निकष आदी मुद्यांवर यावेळी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च येथे हा उपक्रम होईल. बीवायके कॉलेज नजीकच्या पेट्रोलपंपासमोरील प्रवेशव्दारातूनही विद्यार्थी व पालकांना या सत्रासाठी प्रवेश देण्यात येईल.

फार्मसीतील अभ्यासक्रम

डिप्लोमा इन फार्मसी (डीफार्म - कालावधी : २ वर्षे), बॅचलर ऑफ फार्मसी (बीफार्म - कालावधी : ४ वर्षे), मास्टर ऑफ फार्मसी (एमफार्म - कालावधी : २ वर्षे) आणि पीएचडी हे औषधनिर्माणशास्त्रातील प्रमुख अभ्यासक्रम आहेत. फार्म डी हा सहा वर्षे कालावधीचा नवीन अभ्यासक्रम प्रचलित आहे. हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी, क्लिनिकल फार्मसी आदी विषय यात आहेत.

औषध कंपन्यांमुळे चालना

बारावी सायन्सनंतर पॅरामेडिकल अभ्यासक्रमांमध्ये फार्मसी शाखा आघाडीवर आहे. आयटी पाठोपाठ विकसित झालेले फार्मसी हे दुसरे क्षेत्र मानले जाते. सद्यस्थितीतील उद्योग विषयक धोरणांमुळे औषध कंपन्यांच्या गुंतवणुकीलाही चालना मिळत आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कौशल्याधिष्ठीत मनुष्यबळाचीही मागणी वाढते आहे. परिणामी करिअरसाठी अनुकूल असणाऱ्या या क्षेत्रामधील संधी आणि आव्हाने या मुद्यांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.



फार्मसीच्या पदवीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. उत्तम नोकरीपासून ते सक्षम व्यवसायाच्या उभारणीपर्यंत हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना साथ देतो. - संजय अमृतकर, प्राचार्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कष्टाला यशाची सोनेरी किनार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुटुंबाची जबाबदारी, पोट भरण्याची चिंता, आजूबाजूला असलेली व्यसनाधीनता.. अशा वातावरणात शिक्षणाचं ध्येय गाठता येत नाही, या विचारावर संत कबीरनगर झोपडपट्टीतील मिलिंद साळवे याने मात केली आहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाईट हायस्कूलमधून त्याने वयाच्या ३३ व्या वर्षी दहावीची परीक्षा देत शाळेत दुसऱ्या क्रमांकाने पास होण्याचा मान मिळवला.

शिक्षणाचा गंधही नसलेल्या संत कबीर झोपडपट्टीसारख्या भागात मिलिंद लहानाचा मोठा झाला आणि स्वतःबरोबरच कुटुंबीयांचेही भविष्य घडवायची स्वप्न मिलिंदनी पाहिली अन् रात्रशाळेच्या माध्यमातून त्याचा पहिला टप्पा यशस्वीही करुन दाखविला. १९९७ साली मिलिंदनी सातवीचं शिक्षण पूर्ण केलं. पण परिस्थितीमुळे शिक्षण थांबवून त्याला नोकरीची वाट धरावी लागली. शिक्षणाची आवड, भविष्य घडवण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे टेलरिंगच्या दुकानात काम करता करता मिलिंदने शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं आणि २०१२ साली रात्रशाळेत प्रवेश घेतला. रोज पहाटे साडे चार वाजता उठून मेडिटेशन करून अभ्यासाला सुरुवात करायची. नोकरीला प्राधान्य देऊन कुटुंबीयांची जबाबदारी त्याने लक्षपूर्वक पाळली. त्याची पत्नीही चार घरची धुणी-भांडी करून संसाराला हातभार लावत होतीच. झोपडपट्टीतील बाकीची अनेक मुलं ही संगतीमुळे व्यसनांच्या अधीन झाल्यामुळे त्यांचे भविष्य दिशाहीन झाले आहे. हीच परिस्थिती त्यांच्या मुलांवर ओढावू नये, म्हणून मिलिंद या मुलांसाठी परिसरात संस्कारवर्ग चालवतो. विपश्यना, पंचशीलाचे महत्त्व, भविष्यासाठी शिक्षणाचे महत्त्व त्यांना वेळोवेळी समजावून सांगून त्यांना अभ्यासाविषयीही मार्गदर्शन करतो.

स्वत:सोबत परिसराचाही विचार

संत कबीर झोपडपट्टी परिसरातील मुलांच्या भविष्याला दिशा देण्याचे पुण्याचे काम मिलिंद स्वतःच्या शिक्षणाबरोबरच करतो आहे. त्याच्या कुटुंबीयांबरोबरच परिसरातील नागरिकांनाही त्याच्या यशाचा, कार्याचा अभिमान वाटतो. आता अकरावी आर्ट्सला अॅडमिशन घेऊन पुढे पत्रकारितेचं शिक्षण घेण्याची मिलिंदची इच्छा आहे. हे करतानाच तो राहत असलेल्या परिसरातही शिक्षणाचे बीज त्याला रोवायचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७८ विद्यार्थ्यांची ‘पेट’ला दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पीएच.डी.साठीची प्रवेश परीक्षा (पेट) रविवारी राज्यात शांततेत पार पडली. पीएच.डीसाठी विविध विद्याशाखांच्या ४६ जागांसाठी राज्यातील तब्बल १,४६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. अर्ज केलेल्यांपैकी ७८ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत नियमित व पूर्णवेळ पीएच. डी सुरू करण्यात आली असून त्याची ऑनलाइन प्रवेश परीक्षा आज सर्वत्र घेण्यात आली. पीएच.डीसाठी एमकेसीएलच्या सहकार्याने राज्यातील एकूण ७२ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून १,५४१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १,४६३ विद्यार्थ्यांनी रविवारी ऑनलाइन प्रवेश परीक्षा दिली. प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू केलेल्या नियमित व पूर्णवेळ पीएच. डी मुळे मुक्त विद्यापीठाच्या संशोधनाला चालना मिळणार आहे. आता उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रवेशित विद्यार्थ्यांना आपले संशोधन कार्य विद्यापीठात संबंधित विद्याशाखेत पूर्णवेळ थांबून करावे लागणार आहे. त्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये दरमहा विद्यावेतन (फेलोशिप) दिले जाणार आहे. अंतिम निवड यादी प्रसिद्ध होऊन निवड यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्थानकावर दहशतवादविरोधी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शनिवारची रात्रीची वेळ. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर काही प्रवासी गाढ झोपी गेलेले. काही डुलक्या घेत होते तर काही शतपावली करीत होते. खाद्यपदार्थ विक्रेते नेहमीप्रमाणे आरोळी मारत चालले होते. अचानक गोळीबाराचा आवाज येऊ लागला. दहशतवाद्यांनी प्रवाशांवर बेछूट गोळीबार सुरू केला होता. प्रवासी जखमी होत होते. माहिती मिळताच काही क्षणात पोलिस स्थानकावर पोहोचले. बराचवेळ सुरू असलेल्या चकमकीनंतर दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले.

कुंभमेळ्यात रेल्वेस्थानकावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून शनिवारी रात्री मॉकड्रील (प्रात्यक्षिक) करण्यात आले. दहशतवाद विरोधी पथक, राष्ट्रीय मदतकार्य पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच नाशिकरोड पोलिसांनी त्यामध्ये सहभाग घेतला. रेल्वेस्थानकात दहशतवादी हल्ला झाल्याचे कळताच पोलिसांनी रेल्वेस्थानक, सुभाष रोड, देवी चौक, शिवाजी पुतळा परिसरात संचारबंदी लागू केली. तेथील दुकाने व वाहतूक तातडीने बंद केली. सुरक्षापथकांनी स्थानकात प्रवेश केला.

प्लॅटफार्म क्रमांक एकवर बॉम्बहल्ला व बेछूट गोळीबार करीत चाललेल्या अतिरेक्यांना जवान निधड्या छातीने सामोरे गेले. त्यांनी ए.के.४७ रायफलीतून फायरिंग करीत दोन्ही अतिरेक्यांचा खात्मा केला. दरम्यानच्या काळात दुसऱ्या पथकाने चपळाई दाखवत जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले. हे थरारनाट्य रात्री अकरापासून साडेबारापर्यंत सुरू होते.

गोंधळलेल्या प्रवाशांना सुरुवातीला काहीच उमगले नाही. कारवाई संपताच त्यांनी जल्लोष केला. पोलिस आयुक्त एस. जग्गनाथ, उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय विद्यार्थ्याचा निघृण खून

$
0
0

पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आठवीत शिकणाऱ्या एका शालेय विद्यार्थ्याचा गंगापूर रोडसारख्या उच्चभ्रू वसाहतीत निघृण खून करण्यात आला. रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी असा अंदाज गंगापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोलू उर्फ विशाल शालीग्राम भालेराव (वय १३, रा. शिंदे चाळ, आसाराम बापू आश्रमाजवळ, सावरकरनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. डॉन बॉस्को शाळेलगतच्या दिव्यदान इन्स्टिट्यूट ऑफ फिलोसॉफीजवळ काम करणाऱ्या मजुरांनी सर्वप्रथम हा मृतदेह पाहिला. त्यांनी संस्थेतील वरिष्ठांना माहिती दिली. गंगापूर पोलिसांनाही याबाबत कळविण्यात आले. पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सचिन गोरे, गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर काळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकालाही बोलावण्यात आले. अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याची पॅन्ट आणि अंर्तवस्त्र घटनास्थळापासून काही अंतरावर आढळून आले. विच्छेदनासाठी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला आहे. मात्र अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती उपनिरीक्षक योगिता जाधव यांनी दिली. विशाल यास दगडाने ठेचून मारले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वमृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी परिसरात चौकशी केली. त्यावेळी मृतेदहाची ओळख पटली. तो कालपासून घरी नव्हता. कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली नव्हती. दोन दिवसांपूर्वी त्याचे काही मित्रांशी भांडण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य चौकातच मेळ बसेना!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील चौकातील रस्ता तयार करताना काही भाग जुनाच ठेवल्याने नवीन आणि जुना रस्ता यांची मिळवणी करताना दोन थर तयार झाले आहेत. जुना रस्ता उंच तर नवीन रस्ता खोलगट असा प्रकार येथे पहावयास मिळतो. यामुळे सिंहस्‍थ कामांवर नागर‌िकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोट्यवधी रुपये रस्ते आणि चौक तयार करण्यासाठी खर्च केले असताना प्रमुख चौकासाठी पाच दहा लाख वाचविण्याची चिंधीगिरी का, असा सवाल नागरिकांना पडला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ आराखड्यातून सुमारे चौदा कोटी रुपयांचे रस्ते काँक्रिटीकरण करण्यात आले. यामध्ये शाहीमार्ग, प्रशासकीय रस्ते अंतर्गत रस्ते व रिंगरोडचा समावेश आहे. या रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया झाल्यानंतर महत्त्वाचे अंतर्गत जोडरस्ते आणि गटारी राहून गेल्याचे लक्षात आले. तेव्हा सुमारे सोळा कोटींची कामे नव्याने मंजूर करण्यात आली. यामध्ये रस्ते आणि शेड यांना प्राधान्य देण्यात आले.

सिंहस्थ आराखडा आणि इतर कामे करण्यासाठी वास्तुविशारद कंपनी नियुक्त करण्यात आली असून, तिला जवळपास पाऊण कोटी रुपये अदा करण्यात येत आहेत. पालिका प्रशासनाकडे दोन इंजिनीअर आहेत. त्यात वास्तुविशारद कंपनी काम पाहते आहे. कामांची अंमलबजावणी करणे, त्यांचा दर्जा सांभळणे आणि वेळेत कामे पूर्ण करणे हे यामध्ये अभिप्रेत आहे.दोन वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला होता. यामुळे त्र्यंबक शहरात कंबरेपर्यंत पाणी साचले होते. यावेळी नवीन रस्त्यांमुळे घरांचे उंबरठे खाली आणि रस्ते वर अशी काही ठिकाणी स्थिती आहे. यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास घरात पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे.

उंबरठ्यापेक्षा रस्ते उंच

नव्याने मंजुरी घेऊन पुन्हा काही कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. जवळपास सर्व रस्ते तसेच ठेवून काँक्रीटचे थर देण्यात आले. यामुळे घर व व्यावसायिक दुकानांचे उंबरे खाली रस्ते वर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रस्ते क्युरिंग संपत नाही तोच तडे गेल्याने त्यावर आणखी एक थर देण्याचा अजब प्रकार करण्यात आला आहे. यामुळे घर व दुकानांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पहिल्याच पावसात पाण्याचा निचरा होत नाही हे लक्षात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सामान्य महिलांना शस्त्र परवाने द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांनी अन्य कुणाला शस्त्रपरवाने देण्याऐवजी सामान्य महिलांनाच शस्त्र परवाने द्यायला हवेत. महिलांच्या हातात शस्त्र आले तर त्यांची छेड काढण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असा विश्वास स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

स्वाभिमान संघटनेचा मेळावा आणि माय बहिण सुरक्षा मोहिमेचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते रावसाहेब थोरात सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. संघटनेचे नाशिकचे शहराध्यक्ष म्हणून डॉ. संदीप कोतवाल यांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यात आली. माय बहिणीची छेड काढताना कोणी दिसला तर त्याला अशी अद्दल घडवा की छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही स्वाभिमान संघटनेची आठवण व्हायला हवी, असे आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

छत्रपती शिवरायांच्या काळात छेडछाड करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जात असे. तशीच शिक्षा आताही दिली जावी म्हणजे असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असे ते म्हणाले. सरकारने महिलांना शस्त्र परवाना दिल्यास त्या स्वत:च स्वरक्षणासाठी सिध्द होतील, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकाल लागूनही पेच कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात भाजी बाजार हटवण्याबाबत जिल्हा कोर्टाने नुकतीच मंजुरी दिली. मात्र, भाजी बाजार संघटनेला अपिलात जाण्यासाठी १० दिवसांचा कालावधीही कोर्टाकडून देण्यात आला. संघटनेचे प्रतिनिधी देखील अपिलात जाण्याच्या तयारीत असून, बाजार स्थलांतरीत होण्याचा पेच सुटणार तरी कधी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गंगा घाटावरील भाजी विक्रेत्यांसाठी गणेशवाडीत दहा कोटी रुपये खर्चून इमारत बांधली आहे. या इमारतीत भाजीबाजार हलवावा यासाठी महापालिका अनेक वर्षांपासून प्रयत्नात होती. गेल्या सिंहस्थापूर्वी या भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली होती. नवीन इमारतीतील ओटे आणि भाजीविक्रेते यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याने व भाजी विक्रेत्यांनी नवीन इमारतीत न जाण्याचा निर्णय घेतल्याने महापालिका व भाजी विक्रेते यांच्यात वाद झाला होता. तत्कालीन आयुक्त विमलेंद्र शरण यांनी भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली होती. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून या भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा प्रयत्न केला गेला. पोलिसांचा लाठीमार सहन केल्यानंतरही भाजी विक्रेते स्थलांतरीत होण्यास राजी झाले नाहीत. भाजीविक्रेत्यांनी महापलिकेच्या विरोधात 'गंगामाई भाजीपाला' संघटनेच्या नेतृत्वाखाली २००५ साली दिवाणी न्यायालयात धाव घेतली. २०११ साली दिवाणी कोर्टाने महापालिकेच्या विरोधात निकाल होता. त्यानंतर महापालिकेने दिवाणी कोर्टाच्या निकालाविरोधात जिल्हा कोर्टात अपील दाखल केले. या दाव्यावर सुनावणी सुरू असताना सिंहस्थासाठी बाजार स्थलांतरीत करण्याचा मुद्दा समोर आला. याबाबत दाखल झालेल्या दाव्याबाबत कोर्टात सुनावणी होऊन बाजार स्थलांतरीत करण्याच्या निर्णयावर कोर्टाने शिक्कामोर्तब केले. तसेच, भाजी बाजार संघटनेच्या प्रतिनिधींना अपील करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली.

सिंहस्थापुरते स्थलांतरीत होण्यास आमचा विरोध नव्हता. कोर्टाचाही निकालही याचबाबत आहे. मात्र, आमचा मूळ दावा कायम असून अपिलात जायचे किंवा नाही, याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात येईल. - शांताराम क्षीरसागर, उपाध्यक्ष, गंगामाई भाजीबाजार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळातून इतिहासाला फुटणार बोल!

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

काळाच्या पडद्याआड लपलेल्या लेण्यांच्या इतिहासाला बोल फुटले तर, ही कल्पनाच रंजक वाटते ना! पण त्र्यंबकेश्वरच्या नाणी संशोधन केंद्रात सिंहस्थाचे निमित्त साधत हा नवा अन् इतिहासाचा दुवा बनणारा उपक्रम साकारतो आहे. त्र्यंबकेश्वरजवळील नाणी संशोधन केंद्राद्वारे 'लर्न विथ फन' या संकल्पनेतून पर्यटकांना यापुढे नाण्यांचीच नव्हे तर लेण्यांची माहितीही हसतखेळत मिळविता येणार आहे.

सातवाहन काळातील गुफांमागचे अनाकलनीय गूढ, लेण्यांमागील रहस्यमय कथा, देशातील लेण्यांचा विस्मयचकीत इतिहास अन् त्यातील थक्क करणारी शिल्पकलेची वैशिष्ट्ये यांसारखी माहिती मनोरंजक खेळातून देण्याचे नाणी संशोधन केंद्राने निश्चित केले आहे. नाणी संशोधन केंद्राचे (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्युमिसमेटीक स्टडीज) पर्यटकांना कुतुहल असते. सिंहस्थानिमित्त येणारे भाविक पर्यटनादरम्यान या केंद्रालाही मोठ्या संख्यने भेट देत असतात. एरवी पर्यटकांबरोबरच देश विदेशातील नाणे संशोधकांचा येथे राबता असतो. अर्वाचिन काळापासूनच्या देशातील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या काळातील नाणी येथे आहेत. त्यांची माहिती मनोरंजक पध्दतीने देण्यासाठी ५२ पत्त्यांचा मनोरंजक आणि ज्ञानवर्धक खेळ बनविण्यात आला आहे. हा खेळ पर्यटकप्रिय ठरला असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना देशविदेशातील लेण्यांची माहिती मिळविता येणार आहे.

प्रत्येक पत्यावर प्राचीन काळातील लेणीचे चित्र आणि मागील बाजूस लेणीविषयी माहिती असणार आहे. पर्यटकांना लेणीचे चित्र दाखवून तिच्याशी संबंध‌ति प्रश्न विचारले जातील. अचूक उत्तर सांगणाऱ्यास बक्षीस देण्याची संकल्पना आहे. उत्तर सांगता यावे यासाठी पत्याच्या मागील बाजूस क्लू दिले जातील. हे क्लू पर्यटकांना वाचून दाखविले जातील. मनोरंजनाबरोबरच ज्ञान देण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे.

आम्ही लर्न विथ फन संकल्पनेचा विस्तार करणार आहोत. नाण्यांप्रमाणेच देश विदेशातील लेण्यांच्या माहितीवर आधारीत ५२ पत्त्यांचा हा खेळ असेल. सिंहस्थ काळात येणाऱ्या पर्यटकांना तो नक्की आवडेल. - अमित झा, संचालक, नाणे संशोधन केंद्र, अंजनेरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावर टोळी गजाआड

$
0
0

तीन लाखांच्या बनावट नोटा

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंग गड ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व संदीप बेनके यांच्या जागरूकतेमुळे तालुक्यात बनावट नोटा चलनात आणणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. सुमारे तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा व लहान मोठ्या १४ संशयितांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

सप्तशृंग गड येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान शिवालय तलावावर दोन पुरूष, चार तरूण, चार महिला व चार छोटी मुले यांनी स्नान करून देवीच्या दर्शनासाठी जायला सुरुवात केली. वाटेत येणाऱ्या प्रत्येक दुकानात एखादी वस्तू, प्रसाद विकत घ्यायचा व एक हजार रुपयाची बनावट नोट द्यायची आणि आलेल्या चलनी नोटा जमा करायच्या असा प्रकार सुरू केला. त्यावेळी किरकोळ विक्रेत्यास ही नोट बनावट असल्याचा संशय आल्याने त्यांनी माजी उपसरपंच संदीप बेनके व ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना हा प्रकार सांगितला. एक बनावट नोट ताब्यात घेत ट्रस्टमधील बनावट नोटा तपासण्याच्या मशीनमध्ये तपासून पाहिली. त्यात ती नोट बनावट असल्याचे उघड झाले. यावेळी दहातोंडे व बेनके यांनी मुख्य रस्त्यावर शोध मोहीम हाती घेतली. पहिल्या पायरी समोरील दुकानात एका संशियतास ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ १० हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.

दहातोंडे व संदीप बेनके यांनी ताब्यात आलेल्या संशयितांना कळवण पोलिसात देण्यासाठी कळवण येथे निघाले असता नांदुरी येथे (एम एच २३ - ३३३३) गाडी क्रॉस झाली. ही गाडी आमची असल्याचे संशयितांनी सांगितले. यावेळी दहातोंडे व बेनके यांनी पाठलाग करून ही गाडी आठंबे येथे अडविली. या गाडीमध्ये दोन पुरूष, दोन तरूण मुले, चार महिला व चार छोटी मुले होती. यावेळी गाडीची चौकशी केली असता या गाडीमध्ये दोन लाख ७५ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या नोटा व संशयितांना पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ यांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कट ऑफ लिस्ट आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावीच्या प्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थी अन् पालकांसमोर या प्रवेशांचे चित्र पहिल्या टप्प्यात सोमवारी (दि. २२) स्पष्ट होणार आहे. नियोजनाप्रमाणे शहरातील सुमारे ५३ कॉलेजेसमध्ये अकरावीच्या प्रवेशाला सुरुवात होईल. स्पर्धेतील कॉलेजांकडून 'कट ऑफ लिस्ट'ही जाहीर होणार आहे. यंदा प्रवेशासाठी गुणवत्तेचा आकडाही उंचावणार असल्याचा अंदाज आहे.

गेल्यावर्षी शहरातील प्राधान्याच्या सायन्स कॉलेजेसमध्ये कट ऑफची आकडेवारी ९० टक्क्यांना भिडली होती. कॉमर्समधील चित्रही थोड्याफार फरकाने सारखे होते. यंदा मात्र विद्यार्थ्यांच्या टक्केवारीचा चढता आलेख बघता पहिल्या कट ऑफची उंची ९२ टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. यंदा प्राधान्याच्या कॉलेजांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रीया राबविली आहे. या प्रक्रियेचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर झाला असून कॉलेजेसच्या नफेखोरीलाही आळा बसला आहे.

शहरामध्ये ५३ ज्युनिअर कॉलेजेस असून यामध्ये अकरावी प्रवेशासाठी सुमारे २० हजारांवर जागा उपलब्ध आहेत. यंदा प्राधान्याच्या कॉलेजेसमध्ये आलेल्या प्रवेश अर्जांची संख्या उपलब्ध जागांच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे. गेल्या काही वर्षांच्या या कॉलेजेसकडे आलेल्या प्रवेश अर्जांची संख्या तुलनेने जास्तच आहे. शहरातील एकूण प्रवेश संख्येइतके प्रवेश अर्जच मध्यवर्ती कॉलेजेसमध्ये दाखल झाल्याचे प्रवेश अर्जांची एकूण आकडेवरी दर्शविते आहे. परिणामी आवडत्या कॉलेजमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमधील स्पर्धाही वाढीलाच लागणार असल्याचे चित्र आहे. यामुळे काही पर्यायी कॉलेजांचाही विचार करण्यास विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे.

रविवारपर्यंत अॅडमिशन

पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारपर्यंत (दि. २५) या यादीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. गुरुवारनंतर गरजेनुसार नवी गुणवत्ता यादी जाहीर होईल. या यादीतील विद्यार्थ्यांना रविवारपर्यंत (दि. २८) प्रवेश देण्यात येतील. यानंतर ७ जुलै पर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून उर्वरित प्रवेश प्रक्रिया शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार राबविण्यात येणार आहे.

सीबीएसईमुळे विद्यार्थ्यांवर टांगती तलवार

जून अखेर सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचीही प्रवेशासाठी युध्दपातळीवर तयारी सुरू आहे. दरम्यान, जेईईच्या पहिल्या पेपरचा निकाल लागला असला तरीही दुसऱ्या (मेन्स) पेपरचा निकाल अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती नाही. दरम्यान, आर्किटेक्चर सारख्या अभ्यासक्रमांसाठी कॉलेज असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे डीटीई (तंत्रशिक्षण संचलनालय) ला मात्र विद्यार्थ्यांच्या जेईई मेन्सच्या निकालाची गरज आहे. अशातच या अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक संबंधित संस्थांकडून जाहीर करण्यात आले आहे. जेईई मेन्सचा अद्याप न जाहीर झालेला निकाल आणि दुसरीकडे काही अभ्यासक्रमांचे जाहीर झालेले वेळापत्रक यामुळे सीबीएसईच्या कारभारावर पालकांकडून ताशेरे ओढले जात आहेत. यंदा नेट परीक्षेचा निकालही सीबीएसईकडे आहे. डिसेंबरमध्ये व्याख्यातापदासाठी पार पडलेल्या

नेट (नॅशनल इलीजिबीलिटी टेस्ट) परीक्षेचा निकालही सीबीएसई सहा महिन्यांनंत लावू शकलेली नाही. सीबीएसईच्या या कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशांवर सद्यस्थितीत टांगती तलवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images