Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आदिवासींना इंग्रजी शाळांची नकारघंटा!

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

पूर्वापारपासून दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना राज्यातील नामांकित इंग्रजी शिक्षण संस्थांनी सुरूंग लावला आहे. यंदा २५ हजार आदिवासी मुलांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्प या संस्थांच्या प्रतिसादाअभावी बारगळणार आहे. २५ हजार मुलांसाठी ५०० शिक्षण संस्थाची गरज असतांना अवघ्या २१५ शाळांनी त्यास प्रतिसाद दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे यात नामांकित संस्थाचा समावेश नाही. शैक्षणिक शुल्काचे कारण त्यांनी पुढे केले असले तरी आदिवासी मुलांना प्रवेश दिल्यास शाळांच्या प्रवेशांवर परिणाम होत असल्यानेच या संस्थांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांसाठी आदिवासी मुले अद्यापही बहिष्कृतच असल्याचे चित्र आहे.

आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याने आदिवासी मुले मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने या मुलांना इंग्रजीचे शिक्षण देण्याचे धोरण अवलंबले आहे. आघाडी सरकारच्या काळात दरवर्षी ५ हजार मुलांना प्रवेश दिला जात होता. भाजप सरकारने यात बदल करून जास्तीत जास्त मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पच हाती घेतला. त्याअंतर्गत चालू वर्षी २५ हजार विद्यार्थ्यांना पहिली ते पाचवीच्या इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थाना विद्यार्थ्यामागे ५० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. एका शिक्षण संस्थेत ५० आदिवासी मुलांना प्रवेश दिला जातो. या प्रकल्पांतर्गत आदिवासी विभागाने २९ प्रकल्प कार्यालयांमार्फत इंग्रजी शाळांचे प्रस्ताव मागवले होते.

विदर्भातील संस्था आघाडीवर

नाशिकपाठोपाठ ठाणे, नागपूर आणि अमरावती या तीन पट्टयात आदिवासींचे प्रमाण जास्त आहे. मात्र, नाशिक वगळता या तीनही विभागातील इंग्रजी शाळांनी या प्रकल्पाबाबत स्वारस्य दाखवलेले नाही. नागपूर आणि ठाणे विभागातून अल्प प्रतिसाद मिळाल्याने विभागापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक मुलांची संख्या याच विभागातून राहणार असल्याने इथल्या मुलांना आता कुठे प्रवेश द्यावा असा प्रश्न पडला आहे.

मुदतीत केवळ २१५ शाळांनीच प्रस्ताव सादर केले आहेत. केवळ सात ते आठ हजार मुलेच शिक्षण घेवू शकतात. आणखी प्रस्तांवाची आम्हाला प्रतीक्षा आहे. - अरुण जाधव, उपायुक्त, आदिवासी शिक्षण विभाग

५० हजार रुपये शुल्क आम्हाला परवडत नाही. एकीकडे महागाई वाढत असताना शैक्षणिक खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शाळांचे ग्रेडेशन करून फी ठरविण्याची आवश्यकता आहे. राजाराम पानगव्हाणे - अध्यक्ष, शिक्षण संस्था फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुजबळ फार्मवर सापडले २३ हजार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील मालमत्तांवरील एसीबीचे धाडसत्र सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. बुधवारी एसीबीच्या दोन पथकांनी भुजबळ यांच्या नाशिकमधील संपर्क कार्यालयासह त्यांच्या मालकीच्या काही कंपन्यांची तपासणी केली. तर बुधवारच्या छाप्यांमध्ये भुजबळांच्या बंगल्यातून केवळ २३ हजार ५०० रुपये आढळून आले आहेत. भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यातील पाच मालमत्तांची किंमत एसीबीने १६० कोटी २० लाखांच्या आसपास काढली आहे. त्यामुळे भुजबळ सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये चर्चेचा विषय राहिले.

महाराष्ट्र सदनमधील घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळांच्या मालमत्तेवर लाच लाचलुचपत प्रतिंबधक विभागाने छापेसत्र सुरू केले आहे. भुजबळ फार्ममधील चंद्राई बंगला, भुजबळ पॅलेस, राम बंगला, येवल्यातील बंगला आणि कार्यालय, मनमाडमधील बंगला आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले असून, बुधवारी महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत केली आहेत. या कारवाईने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी भुजबळ फार्मवरील त्यांच्या संपर्क कार्यालयावर एसीबीच्या दोन पथकानी पुन्हा धाडी टाकल्या. त्यांचे संपर्क कार्यालय आणि गणेश बंगल्याची तपासणी दिवसभर करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा भुजबळ यांच्या आणखी दोन मालमत्तांवर छाप्यांची परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी संपर्क कार्यालय आणि गणेश बंगल्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पथकाच्या हाती काहीच सापडले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच भुजबळांच्या आर्मस्ट्राँग कंपन्यांची कागदपत्रेही एसीबीने तपासल्याची चर्चा आहे.

भुजबळांच्या चंद्राई बंगल्यातून २३ हजार ५०० रूपयांची रोकड पथकाला सापडली आहे. संपूर्ण तपासणी प्रक्रियेत केवळ २३ हजार ५०० रुपये सापडल्याने एसीबी पथकांच्या अधिकाऱ्यांनाही हसू आवरेनासे झाले होते. मंगळवारच्या पाच छाप्यांमध्ये मिळालेली कागदपत्रे आणि स्थावर मालमत्तेची किंमत एसीबी काढली असून, भुजबळ फार्मसह बंगले आणि कार्यालयांची एकूण किंमत १६० कोटी रुपये काढली आहे. छगन भुजबळ तसेच पंकज व समीर भुजबळ या तिघांनीही निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेची किंमत ४० कोटी दाखवली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, नाशिकचीच मालमत्ता १६० कोटींच्यावर गेल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार राहणार आहे.

कट्टर समर्थक रडारवर

एसीबीने आता भुजबळांच्या काही कट्टर समर्थकांनाही रडारवर घेण्याची तयारी सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. भुजबळांभोवती गोतावळा असलेल्या काही पदाधिकारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगांराच्या संपत्तीवर एसीबीने डोळा फिरवला आहे. त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्ताही तपासाच्या रडारवर आल्या आहेत. कमी कालावधीत धनाढ्य झालेल्या त्यांच्या कट्टर समर्थकांची माहिती एसीबीने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या समर्थकांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने नाशिकमध्ये नव्या चेहरा शोधण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भुजबळांची राजकीय कारकीर्दही आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'बाबुराव बागुल कथा पुरस्कारा'साठी आवाहन

$
0
0



मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या 'बाबुराव बागुल कथा पुरस्कारा'साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन नवोदित कथालेखकांना करण्यात आले आहे.

नवोदित कथाकाराच्या प्रथम प्रकाशित उत्कृष्ट कथासंग्रहास बाबुराव बागुल पुरस्कार देण्यात येतो. यंदा जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ या काळात प्रकाशित झालेल्या कथासंग्रहाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. नवोदित कथाकारांनी किंवा त्यांच्या प्रकाशकांनी या कालावधीत प्रकाशित झालेल्या कथासंग्रहाच्या पाच प्रती, प्रकाशित कथासंग्रह पहिलाच संग्रह असल्याच्या प्रतिज्ञापत्रासह ३१ जुलैपूर्वी विद्यापीठाकडे पाठवाव्यात. कथासंग्रह पाठविण्याचा पत्ता : डॉ. माधवी धारणकर, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गोवर्धन, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२ २२२.

पुरस्कारासाठी पाठविण्यात आलेले कथासंग्रह विद्यापीठामार्फत परत पाठवण्यात येणार नाहीत. निवडप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्या लेखकांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. शिवाय वृत्तपत्रातून निकाल घोषित करण्यात येईल. इच्छुकांनी ०२५३- २२३०१२७ अथवा ९४२२२४७२९१ या क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी dir_dsw@ycmou.digitaluniversity.ac या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाँड्रीवरच्या विद्यार्थ्यांसाठी कौन्सिलींग

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

कित्येक विद्यार्थ्यांच्या घरात ते नापास झाल्याच दु:ख असतं. पण काही विद्यार्थ्यांच्या घरात मात्र विद्यार्थी पास झाल्याचं दु:ख आहे. त्याला कारणही तसचं आहे. भोवतालच्या रॅट रेसमध्ये काही कुटुंबातील पाल्य आकडेवारीच्या तुलनेत चक्क उत्तीर्ण निकषांच्या बाँड्री लाईनवर ढकलले गेले आहेत. अशा विद्यार्थ्यांमध्ये स्वत:ला कमी लेखणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करण्याचा वसा व्दारका परिसरातील नगरसेविका अर्चना थोरात यांनी घेतला आहे.

उत्तम मार्क्स मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे ज्यावेळी भोवताली पार पडत होते त्यावेळी केवळ पास होऊन हिरमुसलेल्या चेहऱ्यांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. हीच बाब हेरून व्दारका परिसरातील नगरसेविका अर्चना थोरात आणि त्यांचे पती चंद्रकांत थोरात यांनी हातातली सर्व कामे बाजूला सारत प्रभागातला परिसर पिंजून काढला अन् केवळ पास होऊन न्यूनगंड बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौन्सिलींग सुरू केले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमास बोलता बोलता यश मिळत गेले अन् अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे १०० विद्यार्थ्यांचे कौन्सिलींगही थोरात दाम्पत्यासह कार्यकर्त्यांनी केले.

अवघ्या ३५ ते ४० टक्क्यांच्या कात्रीत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील भविष्याची उमेदही त्यांनी जागविली. मुलांचे गुण बघून पालकांच्या मनात बसलेला रूसवा काढण्यासाठी प्रसंगी पालकांशीही संवाद साधावा लागला अन् 'तुमच्या मुलाला किती मार्क्स पडले ?' अशा कुतुहलाने विचारणाऱ्या शेजाऱ्यांचेही कौन्सिलींगही त्यांनी केले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण हलका झाल्याचे थोरात यांनी सांगितले.

मिळाली उमेद

हाती पडलेल्या निकालानंतर नाराज झालेल्या काही विद्यार्थ्यांनी घराचे दार लावत स्वत:ला कोंडून घेतले होते. बाहेरून पालकांचीही चिडचिड सुरू होती. आतल्या खोलीतून हिरमुसलेल्या विद्यार्थ्याचे कानावर पडणारे हुंदके अन् केवळ पास झाल्याने निकालाचा झालेला बेरंग अशा वातावरणात झगडणाऱ्या कुटुंबासाठीच हा उपक्रम आशादायी ठरला आहे.

३५ टक्केवाल्यांचाही सत्कार

आयुष्य केवळ मार्क्सच्या स्पर्धेवरच अवलंबून नाही, असे सांगत ३५ टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही या उपक्रमात शाल, श्रीफळ अन् पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पाठीवर उमेदीची थाप देत त्यांनाही पेढा भरविण्यात आला. यातील बहुतेक विद्यार्थी कष्टकरी कुटुंबातील आहेत तर अनेक विद्यार्थी स्वत: कुठेतरी काम करून शिक्षण घेणारे आहेत. कष्टाची जाणीव असलेल्या विद्यार्थ्यांच्या जगण्यालाही उमेदीची बळ मिळावे यासाठी या उपक्रमाने शंभरावर विद्यार्थ्यांच्या मोडक्या पंखात बळ भरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रमय गोदाघाट

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

गोदाघाटचा परिसर म्हणजे चित्रकारांसाठी उत्तम ठिकाण. कलेतील रंग शोधण्यासाठी गोदाघाट उत्तम निमित्त असते. असाच गोदाघाटचा चित्रमय प्रवास नाशिककरांना 'ग्लोरी ऑफ आर्ट' अनुभवता येणार आहे. नाशिकमधील प्रिया पाटील यांनी काढलेली चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. कुसुमाग्रज स्मारक येथील छंदोमयी हॉलमध्ये शनिवारपर्यंत (२० जून) सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

के. के. वाघ कॉलेजमध्ये फाईन आर्टसला शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या प्रिया पाटीलचे हे पहिलेच चित्र प्रदर्शन आहे. यामध्ये ऑईल, अॅक्रेलिक, अॅबस्ट्रॅक्ट आणि वॉटर कलरमधील जवळपास ५४ चित्रांचा समावेश आहे. यामधील वॉटर कलर पेंटिंग्ज गोदाघाट परिसरातील जीवन, मंदिरे, वाडे संस्कृती यांवर आधारित आहे. त्याचबरोबर अॅक्रेलिक आणि अॅबस्ट्रॅक्टमध्ये निसर्गचित्रांचा समावेश आहे. निसर्गचित्रांसोबतच या प्रदर्शनात व्यक्तीचित्रेही मांडण्यात आली आहेत. शुक्रवारी आर्किटेक्ट अरूण कबरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ झाला यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, योगेश चोपडे, संतोष बोडके हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनस्थान’तर्फे साजरा अभिनव वाढदिवस

$
0
0

सोशल मीडियाचा रंगकर्मींसाठी असाही उपयोग

नाशिक टाइम्स टीम

नाशिक म्हणजे मंत्रभूमी, तंत्रभूमी तसेच औद्योगिकभूमी. या भूमिला चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची भूमी म्हणूनही संबोधले जाते. याच भूमीतील सर्व रंगकर्मींना व्हॉट्सअॅपवर एकत्र आणत त्यांचा 'जनस्थान' या शीर्षकाने ग्रुप करून त्याद्वारे विविध उपक्रम केले जात आहेत. कलेचा जागर अशा पध्दतीने करण्याचा हा अभिनव प्रकार म्हणजे सोशल मीडियाच्या योग्य वापराचे द्योतक आहे.

आपल्या कलेच्या साधनेत रंगकर्मींना एकत्र आणून जनस्थान, जागर कलेचा या ग्रुपची स्थापना झाली. या ग्रुपला २४ जूनला एक वर्ष पूर्ण होणार असून, त्याच पार्श्वभूमीवर ग्रुपमधील सदस्य सचिन शिंदेंचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. पाश्चात्य संस्कृतीला फाटा देऊन आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आला. केक कापण्याऐवजी या ग्रुपमधील सदस्य चक्क सकाळी वासुदेवाला घेऊन शिंदेंच्या घरी गेले. ग्रुपमधील सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. वासुदेवाने आपला पारंपरिक ठेका धरला आणि आपल्या झोळीतून त्यांना पुस्तक भेट दिले.

या धावपळीच्या जीवनात सर्वांना एकत्र आणण्याचे काम व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून झाले आहे. नाट्य, गायन, साहित्य क्षेत्रातील सर्व मंडळी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने दादासाहेब फाळकेचा वसा जपण्याचे काम करत आहेत. व्हॉट्सअॅपवर असे काम करणारा हा पहिलाच ग्रुप असून, यामध्ये नाशिकच्या कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या वाढदिवसप्रसंगी सदानंद जोशी, कैलास पाटील, आनंद ढाकीफळे, विनायक रानडे, दत्ता पाटील, पंकज क्षेमकल्याणी, जयप्रकाश जातेगावकर, पल्लवी पटवर्धन, शाम लोंढे, विनोद राठोड उपस्थित होते. २४ जूनला असलेल्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर २३ जूनला सिडकोतील मॉडर्न हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छायाचित्रकार अभय ओझरकर यांनी हा ग्रुप स्थापन केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांच्या गुणवत्तेसाठी ‘इंटेलकी’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राथमिक शिक्षणाच्या स्तरापासून ढासळणाऱ्या शैक्षणिक गुणवत्तेवर उतारा शोधण्याचे काम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी मदत करण्यासाठी पुण्यातील 'इंटेलकी' या संस्थेने सॉफ्टवेअर डेव्हलप केले आहे. उपक्रमशीलतेतून व्यक्तिमत्त्व विकास ही संकल्पना घेऊन पुढे आलेले हे सॉफ्टवेअर नाशिक महापालिकेच्या शाळांमध्येही लवकरच कार्यरत होण्याची शक्यता आहे. बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर या संस्थेतर्फे सॉफ्टवेअरचे सादरीकरण करण्यात आले.

पुणे महापालिकेच्या काही शाळांसह कोकण पट्टयात या सॉफ्टवेअरचा उपयोग सुरू झाला आहे. या सॉफ्टवेअरमध्ये सुमारे १२ प्रकारच्या कौशल्यांचा समावेश करण्यात आला असून विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे २ हजार उपक्रमांची आखणी यात करण्यात आली आहे.

शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून अखिल भारतीय स्तरासाठी हे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आल्याची माहिती इंटेलकीचे संचालक मुकुंद भागवत यांनी दिली. इंटेलकी प्रणाली स्वीकारणाऱ्या शाळेसाठी केवळ एक कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन पुरेसे ठरते. प्रत्येक वर्गातील प्रमुख शिक्षकाचे लॉग इन करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. शिक्षकाने लॉग इन करताच संबंधित वर्गासाठी विशिष्ट काळासाठी नियोजित करण्यात आलेले उपक्रम मॉनिटरवर दर्शविण्यात येतात. पैकी विद्यार्थ्यांच्या क्षमता जाणणाऱ्या या शिक्षकांनाच उपक्रम राबविण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सुमारे १२ प्रकारची कौशल्य आणि चार स्तर तयार करण्यात आले आहेत. या स्तरांमध्ये प्रामुख्याने बौध्दीक, भावनिक, जीवन कौशल्ये आणि शारीरिक क्षमता या मुद्द्यांशी संबंधित उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या उपक्रमांची उत्पादकता मोजण्याचीही पध्दती या प्रणाल‌ित विकसित करण्यात आली आहे. या मुल्यमापनासाठीही चार स्तर विकसित करण्यात आले आहेत. यामध्ये शिक्षक, निरीक्षक, प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी या चार स्तरावरील घटकांना उपक्रमांची उत्पादकता मोजण्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्च कोटींचा; वापर शून्य

$
0
0

गोदावरी परिचय उद्यान चार वर्षांपासून बंद; पर्यटकांचा हिरमोड

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

जवाहरलाल नेहरु नागरी पुर्नरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनयूआरएन) महापालिकेने सोमेश्वरला गोदावरी नदीच्या किनारी गोदावरी परिचय उद्यानाची निर्मिती केली. परंतु, महापालिकेने उभारलेल्या कोट्यावधी रुपयांचे उद्यान पडून आहे. उद्यानाच्या निर्मितीसाठी तब्बल तीन कोटीहून अधिक रक्कम महापालिकेने उद्यानासाठी खर्च केली आहे. परंतु, चार वर्षांपासून बंद असलेल्या उद्यान पर्यटकांसाठी सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा महिनाभरावर येऊन ठेपला आहे. परंतु, गोदातीरी असलेल्या गोदावरी परिचय उद्यान महापालिकेकडून पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. यामुळे तीन कोटीहून अधिक रुपये खर्च करून उभारलेले हे उद्यान रामभरोसेच ठेवायचे का? असा सवाल उपस्थित होत आहे. 'जेएनयूआरएन' योजनेत घेण्यात आलेल्या मेट्रो सिटीमध्ये नाशिक शहराचाही समावेश करण्यात आला. परंतु, नाशिक महापालिकेला केंद्र सरकारच्या या योजनेचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा करून घेता आला नाही. याचेच उदाहरण म्हणजे 'जेएनयूआरएन' अंतर्गत उभारण्यात आलेल्या गोदावरी परिचय उद्यान.

तत्कालीन नगरसेविका इंदुमती काळे यांनी तत्कालीन महापौर विनायक पांडे यांच्या हस्ते चार वर्षांपूर्वी उद्यानाचे भूमिपूजन केले. तीन कोटींहून अधिक रक्कम खर्च करून महापालिकेने उद्यनाची उभारणी केली. परंतु, अनेक वर्षांपासून उद्यान बंद असल्याने तो खर्च महापालिकेचा वाया तर नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण तीन वर्षांहून अधिक दिवसांपासून उद्यान बंद अवस्थेत पडलेले आहे.

पर्यटकांना प्रतीक्षा

याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारले असता त्यांनी उद्यान लवकरच महापालिका किंवा खाजगी विकसकाकडून चालविण्यात देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यातच सोमेश्वर धबधब्यावर रोजच पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. यामुळे धबधब्यावर येणारे पर्यटक देखील गोदावरी नदीच्या परिचयाबाबत उद्यानात माहिती घेण्यासाठी येतील. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेले गोदावरी परिचय उद्यान महापालिकेने पर्यटकांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे.

केंद्र सरकारने 'जेएनयूआरएम' अंतर्गत सोमश्वर धबधब्या शेजारी नदीकाठी गोदावरी परिचय उद्यानाची निर्मिती केली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उद्यान महापालिकेकडून अनेक वर्षांपासून बंद आहे. उद्यान खुले झाल्यास पर्यटकांची नक्कीच त्याठिकाणी गर्दी होणार आहे. - दीपाली देशमुख, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रसिकांसाठी उद्या मेजवानी

$
0
0

'दि जिनियस'तर्फे दोन एकांकिका; 'डेड पॅन कॉमेडी' चित्रपटाचाही आस्वाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विक एंड म्हटला की कुटुंबीयांसह चित्रपट किंवा नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी नाशिककर आसुसले असतात. अशीच संधी शहरातील रसिकांनासाठी उपलब्ध झाली आहे. गंगापूररोडवरील क्लब हाऊससह स्पॅनिश चित्रपटासह परशुराम सायखेडकर नाट्यगृहात दोन एकांकिकांचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे.

सावानाच्या १७५ व्या वर्षानिमित्त प. सा. नाट्यगृहात नाट्ययज्ञाच्या श्रृंखलेत शनिवार (दि. २०) सायंकाळी साडे सहा वाजता दोन एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. नाशिकमधील सांस्कृतिक चळवळीला गती देण्याचा वसा स्वीकारणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाने स्थानिक धडपड्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पसा नाट्ययज्ञाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत वर्षभरात बारा दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. यात दि जिनियस संस्थेतर्फे 'स्थलांतर' व 'माझे आभाळ' या दोन एकांकिका होणार आहेत.

मे २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. त्यामध्ये एकांकिका, दीर्घांक, नृत्यनाटक, संगीत नाटक, संस्कृत नाटक तसेच दोन अंकी नाटक तसेच बालभवनतर्फे होणाऱ्या कै. रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेतील प्रथम तसेच द्वितीय एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.

नाटकाचा पहिलाच प्रयोग सादर करणाऱ्या संस्थांना या महोत्सवात प्राधान्य देण्यात येणार आहे. नाट्यसंस्थांना नाट्यगृहाबरोबरच प्रकाशयोजना पुरविण्यात येणार आहे. नाट्ययज्ञामध्ये नोंदणीकृत संस्थांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक सादरकर्त्या संस्थेला प्रयोगासाठी एक हजार रुपये शुल्क भरणे अनिवार्य आहे. तसेच रसिकांना प्रत्येक प्रयोगासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. वार्षिक सभासद शुल्क ५०० रुपये घेण्यात येणार असून त्यामध्ये ११ नाट्यप्रयोग पहाता येणार आहे. त्यातील ५० टक्के रक्कम नाट्यप्रयोग सादर करणाऱ्या संस्थांना दिली जाणार आहे. गेल्या वेळी अश्वमेध थिएटर्सच्या वतीने आयोजित 'कहाणी' ही एकांकिका आणि 'दो बजनीये' हा दीर्घांक सादर करण्यात आला.

क्लब हाऊसमध्ये 'व्हिस्की'

सुप्रसिद्ध दिग्दर्शक जुआन पाब्लो रेबेलो (उरुग्वे) यांचा 'व्हिस्की' हा स्पॅनिश भाषेतील चित्रपट शनिवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता दाखविण्यात येणार आहे. गंगापूररोडवरील सावरकर नगर येथील क्लब हाऊसमध्ये हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विश्वास को-ऑप.बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने 'सिनेमा कट्टा' उपक्रमांतर्गत रसिकांसाठी दर महिन्याला जागतिक व भारतीय भाषेतील अभिजात व कलात्मक चित्रपट दाखविण्यात येतात. त्या अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उरुग्वेच्या राजधानीत माँटेव्हिडीओमध्ये राहणारा जॅकोब व एक छोटीशी मोज्यांची फॅक्टरी चालवितो. तो आणि त्याच्याकडे काम करणारी मध्यमवयीन मार्था दोघेही शांत, गंभीर व एकलकोंडे आहेत व कंटाळवाण्या एकसुरी जीवनक्रमात अडकलेले आहेत. एक दिवस जॅकोबचा धाकटा भाऊ हरमन ब्राझीलहून परत येतो. तो खरंतर त्यांच्या मृत आईच्या काही धार्मिक संस्कारांसाठी. हरमन जॅकोब आणि मार्था ह्यांचे वैयक्तिक जीवन त्याने ढवळून निघते. जॅकोब व मार्थाचा स्वतःलाच शोधण्याचा व आत्मनिरीक्षणाचा हा काळ संमत विनोदी प्रसगांना जन्म देतो, अशी ही 'डेड पॅन' कॉमेडी आहे. हा चित्रपट बघण्यासाठी अधिकाधिक रसिकांनी यावे, असे आवाहन विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक अजित मोडक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सारीका देशपांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर तालुक्यात २५० उद्योग बंद

$
0
0

कोट्यवधींची मशिनरी, मालमत्ता पडून

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १०५ प्लॉटवर ९२ उद्योग व माळेगाव शासकीय औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १५० उद्योग वर्षानुवर्षे बंद आहेत. तालुक्याचा विचार करता जवळपास २५० उद्योग वर्षानुवर्षे बंद आहेत. या उद्योगांमधील कोट्यवधी रूपयांची मशिनरी, त्या उद्योगांच्या कारखाना इमारती, गोडाऊन इत्यादी मालमत्ता देखील वर्षानुवर्षे धूळखात पडून आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यात आज हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक डेडस्वरुपात धूळखात पडून आहे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारे बंद उद्योगामध्ये हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक

असलेली मालमत्ता डेड स्वरुपात पडून आहे. याचा शासनाकडून गांभीर्याने विचार करून बंद उद्योगाबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सिन्नर तालुका सहकारी ओद्योगिक वसाहतीचे माजी व्यवस्थापक नामकर्ण आवारे यांनी केली आहे.

सिन्नर तालुक्यात ४२५ एकरावर मुसळगांव येथे राज्यातील सर्वांत मोठी एक सहकारी औद्योगिक वसाहत आहे. माळेगांव येथे साधारण एक हजार एकरावर एक शासकीय औद्योगिक वसाहत आहे. सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १०५ प्लॉटवर ९२ उद्योग व माळेगांव शासकीय औद्योगिक वसाहतीमध्ये साधारणपणे १५० उद्योग वर्षानुवर्षे बंद आहेत.

अशा बंद उद्योगांपैकी बहुसंख्य उद्योग घटकांकडे एमएसएफसी, राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांच्या कर्जाची हजारो कोटी रूपये वर्षानुवर्षे थकीत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व सोलापूर ह्या मोठ्या औद्योगिक शहरातील बंद उद्योगांचा विचार केल्यास आज हजारो कोटी रूपयांची गुंतवणूक डेडस्वरुपात पडून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण

$
0
0

महापालिका राबविणार विशेष मोहीम

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात नामांकित आणि ग्लॅमरस शाळांच्या संख्येत भर पडत असतांना दुसरीकडे शाळाबाह्य मुलांचा आलेखही तेवढाच उंचावतो आहे. या विरोधाभासात समतोल साधून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेकडून आता सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. येत्या ४ जुलै रोजी शहरातील शाळाबाह्य मुलांचे एकाच दिवशी डोअर टू डोअर सर्व्हेक्षण केले जाणार आहे.

महापालिका हद्दीत शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शहराच्या हद्दीत असलेल्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने शहरातील शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ जुलै रोजी महापालिकेच्या वतीने साडेतीन हजार प्रगणकाच्या मदतीने डोअर-टू-डोअर सर्व्हेक्षण केले जाणार आहे. वय वर्षे ६ ते १४ या वयोगटातील मुलांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. या मुलांची नोंदणी करून त्यांना शाळांमध्ये दाखल करून घेतले जाणार आहे. शहरात साडेतीन लाख घरांची संख्या आहे. प्रत्येक शंभर घरामागे एक प्रगणक नियुक्त केला जाणार आहे. त्यामुळे साडेतीन हजार प्रगणक नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी शिक्षकही कामाला लावले जाणार आहेत.

आर्थिक बाजूही तपासणार

सर्व्हेक्षणाची मोहीम एका दिवसातच पूर्ण केली जाणार आहे. या सर्व्हेक्षणात आढळून आलेले मुलांना महापालिका शाळांमध्ये दाखल करून घेतले जाणार आहे. या मुलांच्या आर्थिक बाबी तपासून त्यांच्यावर असलेला कुटुंबाचा भार देखील हलका करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. शाळाबाह्य मुलांचे प्रमाण शुन्यावर आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार महापालिकेने व्यक्त केला आहे. त्यासाठी तयारी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मासा’ची प्रक्रिया अद्यापही सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व आर्किटेक्चर कॉलेजांनी 'डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन'च्या (डीटीई) केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याबाबतचा अध्यादेश सरकारमार्फत ११ जूनला काढण्यात आला होता. तसेच 'महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्कूल ऑफ आर्किटेक्चर'च्या (मासा) माध्यमातूनच प्रवेश प्रक्रिया न करण्याची सूचनाही कॉलेजांना देण्यात आली होती. मात्र, कॉलेजांनी 'मासा'मार्फतच प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. या माध्यमातून राज्यभरातील आर्किटेक्चरच्या अडीच हजार जागांसाठी चार हजार अर्ज दाखल झाले आहेत.

राज्य सरकारने अचानक अध्यादेशामार्फत दिलेल्या या सूचनेमुळे राज्यातील आर्किटेक्चर कॉलेजांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, कॉलेजांनी चार दिवसांपासून 'मासा'ची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली. सोमवारपर्यंत या प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यभरातील ५० कॉलेजमधील अडीच हजार जागांसाठी जवळपास चार हजार अर्ज दाखल झाले आहेत.

संबंधित अध्यादेशाबाबत चर्चा करण्यासाठी 'मासा'चे पदाधिकारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेण्यासाठी गेले. काही कारणांमुळे ही भेट होऊ शकली नाही. मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान नाही

सरकारने अध्यादेश जारी केला असला तरी विद्यार्थ्यांनी कॉलेजेस ही 'मासा'ची प्र‌‌क्रिया राबवत आहेत. सरकारमार्फत कोणतेही अनुदान न मिळणाऱ्या कॉलेजेसना ही प्रवेश प्रकिया राबविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचा दावा आयडिया कॉलेजचे संचालक विजय सोहोनी यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा शेकडो; अर्ज हजारो

$
0
0

अकरावीसाठी मिशन अॅडमिशन सुरू; आजपासून अर्जांची छाननी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावीच्या प्रवेशांसाठी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी मध्यवर्ती कॉलेजेसमध्ये हजारो अर्ज दाखल झाले आहेत. यंदा गुणवत्तेच्या झालेल्या फुगवट्यामुळे अकरावी प्रवेशाची स्पर्धा गतवर्षीच्या तुलनेत अधिक तीव्र बनल्याचे चित्र आहे.

कॉलेजेसकडे उपलब्ध शेकड्यातील जागांसाठी हजारो अर्ज दाखल झाले आहेत. मध्यवर्ती कॉलेजेसमध्ये आलेल्या प्रवेश अर्जांनी तब्बल १० हजारांचा टप्पाही ओलांडल्याने आता उंचावणाऱ्या मेरीट लिस्टवर विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शुक्रवारपासून (दि. १९) आलेल्या प्रवेश अर्जांच्या छाननीला सुरुवात होणार आहे. तर सोमवारी (दि. २२) दुपारी ४ वाजता पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर होणार आहे. या लिस्टमधील विद्यार्थ्यांना २५ जूनपर्यंत प्रवेश देण्यात येतील. यानंतरच्या टप्प्यात ३० जूनपर्यंत पुढील कट ऑफ लिस्टनुसार रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येतील. ३० जूननंतरही रिक्त राहणाऱ्या जागांवर उपसंचालकांच्या आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दि. ७ जुलैपर्यंत ही प्र्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

कॉलेजेसच्या नफेखोरीला आळा

शहरातील काही कॉलेजेसमधून यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळीच शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे अवास्तव प्रवेश अर्जांची खरेदी अन् वाया जाणारे शुल्क या कचाट्यापासून विद्यार्थी सुटले आहेत. कॉलेजेसच्या नफेखोरीलाही यामुळे काही प्रमाणात आळा बसला आहे.

कट ऑफ ९२ टक्क्यांवर?

यंदाच्या वर्षी अकरावी प्रवेशांसाठी स्पर्धा तीव्र बनली आहे. आलेल्या प्रवेश अर्जांमधील टक्केवारी आणि या अर्जांची वाढलेली संख्या बघता सायन्स आणि कॉमर्स शाखेसाठी शहरातील प्रमुख कॉलेजेसमध्ये पहिली कट ऑफ लिस्ट ९२ टक्क्यांवर जाण्याची शक्यता प्राचार्यांच्या वर्तुळातून व्यक्त केली जाते आहे. हव्या त्याच कॉलेजमध्ये पाल्याला प्रवेश मिळविण्यासाठी पालकांकडूनही हरप्रकारे फिल्डींग लावली जाते आहे.

'मविप्र'कडे ४० हजार अर्ज

अकरावीच्या प्रवेशासाठी मविप्रच्या जिल्ह्यातील विविध कॉलेजेसमध्ये एकूण ३९ हजार ३१६ अर्ज दाखल झाले. यात सायन्ससाठी १८ हजार ७३८, कॉमर्ससाठी १४ हजार ७१ अर्ज तर आर्टसाठी ६ हजार ५०७ अर्ज दाखल झाले. शहरातील प्रातिनिधीक तीन कॉलेजेसमध्ये तीनही शाखांसाठी दाखल झालेल्या अर्जांची संख्या सुमारे २५ हजारांच्या घरात आहे. तर शहरात ११ वीच्या प्रवेशासाठी एकूण जागा सुमारे २१ हजारांच्या घरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काल‌िदास कलामंदिर टाकणार कात

$
0
0

तीन टप्प्यात होणार आधुनिकीकरण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिरातील ढिसाळ व्यवस्थापन व ढासळलेल्या नियोजनाचा मुद्दा पुढे आल्याने महापालिका प्रशासनाने आता या कलामंदिराचे आधुनिकीककरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन टप्प्यात कालिदासचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, त्याची प्रशासकीय जबाबदारी सहायक उपायुक्त वसुधा कुरणावळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासाठीची आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली आहे. दरम्यान, निलंबित व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांनी महापौरांसह प्रशासनाकडे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

कालिदासच्या व्यवस्थापनाबद्दल अभिनेते भरत जाधव यांनी नुकतीच महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे तक्रार केली होती. कालिदास कलामंदिराच्या बेजबाबदार व्यवस्थापनाबद्दल याआधी अभिनेते प्रशांत दामले यांनी महापालिका आयुक्तांकडे रितसर तक्रार केली होती. परंतु नेहमीप्रमाणे त्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले होते. रंगमंचासह सर्व व्यवस्थाच तोडकी असल्याने व्यावसायिक नाटककारांना अनेक अडचणी येत होत्या. या सर्व परिस्थितीला जबाबदार धरून काल व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांना निलबिंत करण्यात आले होते. या सर्वांपासून धडा घेत प्रशासनाने आता कालिदास कलामंदिराचे रुपडे पालटण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन टप्प्यात या कलामंदिराचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रंगमंच दुरूस्ती, खराब झालेल्या वस्तू बदलणे आणि साफसफाईवर भर देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण खुर्च्याची अदलाबदली केली जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण कलामंदिर एसी करणे, आकर्षक रंगरगोटी करण्यात येणार आहे. सोबतच तिकीट बुकिंगची जागा गेटवर आणण्यात येणार आहे. सोबतच तारीख आरक्षणामध्ये सुसूत्रता आणली जाणार असल्याची माहिती जीवन सोनवणे यांनी दिली आहे. कालिदासची प्रशासकीय जबाबदारी उपायुक्त वसुधा कुरणावळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

प्रकाश साळवेंकडे जबाबदारी

दरम्यान, निलंबित कहाणे यांनी गुरूवारी महापौर अशोक मुर्तडक आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. तर त्यांच्या रिक्त पदावर आता प्रकाश साळवे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान कहाणेंच्या अडचणीत आणखीन भर पडणार असून, त्यांची डिग्रीही वादात सापडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल गेटस फाऊंडेशनचा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात स्वच्छतेबाबत आवश्यक व्यवस्था आणि जनजागृती करण्यासाठी बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशन सहकार्य करणार आहे. याबाबत प्राथमिक माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी विभाग‌ीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, गुरूवारी दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, फाऊंडेशन सिनिअर प्रोग्राम ऑफ‌िसर मधु कृष्णा, वॉश युनायटेड संस्थेच्या स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर जगप्रित सिंग चंद्रा व त्यांचे सहकारी, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी बिल आणि मिलिंडा गेट फाऊंडेशन प्रयत्नशील असून, कुंभमेळ्यात शहर आणि परिसर स्वच्छ रहावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी फाऊंडेशन पुढाकार घेणार आहे. साधुग्राम, भाविकग्राम, भाविक मार्ग आणि तेथील स्वच्‍छतेच्या व्यवस्थेबद्दल फाऊंडेशनच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. फाऊंडेशनतर्फे स्वच्छता सुविधेबरोबरच जनजागृतीवर भर दिला जाणार असून, त्यासाठी मेळा कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या गोदावरी स्वच्छता अभियानाचे प्रतिनिधींनी कौतुक केले. नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेच्या उकप्रमांना फाऊंडेशन निश्चितपणे सहकार्य करेल, असे कृष्णा यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता व वृक्षारोपण अभियानाची माहिती प्रतिनिधींना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


योगदिनासाठी आज सायकल रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स' व ना‌शिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाच्या प्रचारार्थ आज गोल्फ क्लब येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शहरातील मान्यवर सहभागी होणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन 'मटा' परिवार व नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने केले आहे.

भारत सरकारने जाहीर केलेल्या योग दिनाचा (२१ जून) प्रसार व्हावा यासाठी 'मटा' आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत आमदार देवयानी फरांदे. आमदार सिमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, जिल्हाधिकारी दिपेद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त प्रविण गेडाम यांच्या सह मान्यवर सहभागी होणार आहेत. या रॅलीत नाशिक सायकलिस्टचे सभासद तसेच जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व महापालिकेचे कर्मचारी तसेच औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था, स्थानिक प्रशासकीय अधिकारी राजकीय पक्षांचे पदाधिकारीही यात सहभागी होणार आहेत. त्याच प्रमाणे नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे सायकल‌िस्ट विविध प्रकारचा संदेश घेऊन रॅलीत सहभागी होणार आहेत.

रॉयल इनफिल्ड क्रुझीग जॉर्ज या संस्थेचे बुलेट स्वार देखील योग प्रचाराचा संदेश देणार आहेत. भारताच्या मार्गदर्शनाने जगाने स्वीकारलेला योग दिन अधिकाधिक देशवासीयांनी साजरा करावा असा संदेश या रॅलीतून देण्यात येणार आहे. ही रॅली नाशिक शहरातील प्रमुख मार्गावरुन व प्रमुख जॉ‌गिंग ट्रॅकवरून फिरणार आहे. या रॅलीत नाशिककरांनी योग दिनात सहभागी व्हावे असे अवाहन करण्यात येणार आहे. रॅलीला सकाळी ७ वाजता गोल्फ क्लब येथून सुरुवात होणार असून, जिल्हा परिषद, शालिमार, परशुराम साइखेडकर नाट्यगृह मार्ग महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, गंगापूर रोड, जेहान सर्कल, भोसला सर्कल, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन परत गोल्फ कल्ब ग्राऊंडवर येणार आहे. या रॅलीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन योगाचा प्रसार करावा असे आवाहन नाशिक सायकलिस्टचे विशाल उगले 'महाराष्ट्र टाइम्स' परिवाराने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलकांचे ‘बळ’ तोकडे

$
0
0

राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा पोल‌िसांपुढे विखुरला; कार्यकर्त्यांना अटक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांच्यावर राज्यसरकारतर्फे करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरूवारी समता परिषद आणि आरपीआयच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. मात्र पोल‌िसांनी बळाच्या जोरावर हे आंदोलन मोडून काढल्याने आंदोलन प्रभावी ठरले नाही. भुजबळांच्या गडातच आंदोलन अपयशी झाल्याची चर्चा दिवसभर रंगली होती.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसीबीने छगन भुजबळांच्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल करण्यासह धाडसत्र अवलंबले आहे. ही कारवाई सुडातून केली जात असल्याचा आरोप भुजबळांसह राष्ट्रवादीकडून केली जात आहे. राष्ट्रवादीने भुजबळांच्या समर्थनार्थ आंदोलन केल्यानंतर समता परिषदही भुजबळांच्या समर्थनासाठी गुरूवारी रस्त्यावर उतरली. येवल्यात केवळ शंभर सव्वासे कार्याकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे या आंदोलन कार्यकर्ते कमी आणि पोल‌िसच जास्त होते. पोल‌िसांनी सर्वांना अटक करून आंदोलन मोडीत काढले. तर मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका सर्कल येथे चार वाजेच्या सुमारास समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र अगोदरच दबा धरून बसलेल्या पोल‌िसांनी कार्यकर्त्यांना पोल‌िसांनी वेचून जेरबंद केले. त्यामुळे द्वारकेवरील आंदोलनही फुसकेच ठरले. त्यामुळे भुजबळांच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनाला समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचेच बळ मिळाले नाही. याचीच पोल‌िसांमध्येही चर्चा होती.

समता परिषदेचा रास्ता रोको

येवला : येवल्यातील समता परिषदेतर्फे गुरूवारी येवल्यातील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आले. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनात येथील समता सैनिक व राष्ट्रवादीतील भुजबळ समर्थकांनी राज्य मार्गावर ठाण मांडत राज्य सरकारचा निषेध केला.

द्वारकावर रास्ता रोको आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी द्वारकावर रास्ता रोको आंदोलन केले. व्दाराका सर्कलच्या चहूबाजुंनी आंदोलक येऊन रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी काही वेळ द्वारकेवरील वाहतुक ठप्प झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानास पात्र शाळांची दमछाक

$
0
0

आधारचा डेटा मिळविण्याचा सरकारचा ऐनवेळी अध्यादेश

जितेंद्र तरटे, नाशिक

सरकारच्या नाकावर टिच्चून नव्याने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शिक्षण विभागाच्या नव्या खेळीने पुन्हा जेरीस आणले आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नंबरचा डेटा तातडीने सरकारला पाठविण्याचे अवजड काम शासनाच्या एका अध्यादेशाने या नवशाळांच्या माथी आले आहे. हे आव्हान पेलताना आता पहिल्या टप्प्यातील हातची मुदतही निघून गेल्याने या मराठी शाळांच्या उरात मात्र कारवाईच्या भितीने धडकी भरली आहे.

विनाअनुदानित तत्वाचा मुखवटा घेऊन नंतर अनुदानासाठी सरकारच्या माथी बसणाऱ्या शाळांचा वारू रोखण्यासाठी सरकारकडूनही नवे फंडे वापरले जात आहेत. याच फंड्यांचा एक भाग म्हणून सरकारने नव्याने अनुदानित ठरलेल्या शाळांना आधारकार्डच्या गुगलीवर जेरीस आणल्याच्या प्रतिक्रिया या शाळांच्या वर्तुळातून उमटत आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा १५ जून रोजी सुरू झाल्या आहेत. या अगोदर सुटीचा आनंद घेणाऱ्या शिक्षकांची एका अध्यादेशाने धावपळ केली. १० जूनच्यापर्यंत नव्याने अनुदानित ठरलेल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नंबरचा डेटा सरकारला त्वरित कळविण्याचे आदेश देण्यात आले होते. अवघ्या आठ दिवस अगोदर येऊन धडकलेल्या या सूचनेपुढे या उभरत्या नवशाळा मात्र हतबल ठरल्या आहेत. बहुतांश शाळा सरकारला अपेक्षित असणारा विद्यार्थ्यांचा आधार डेटा अद्याप एकत्रित करू शकलेल्या नाहीत.

कारवाईचे निमित्त?

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचीही मोहीम अनेक ठिकाणी अद्याप सुरूच आहे. आता हा डेटा जमा करण्याची मुदत टळून गेल्याने नव अनुदानित शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निमित्त सरकारला मिळणार का? या प्रश्नाकडे शाळांचे लक्ष लागले आहे. किंबहुना कारवाईच्या जाचात अडकविण्यासाठीच आधारकार्डचा अध्यादेश काढण्यात आल्याचे काही शाळांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीत मॉकड्र‌िलची ‘पर्वणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

गंगापूर धरणातील ५०० दशलक्ष घनफुट पाण्याचा विसर्ग आज, गुरूवारी सुरू करण्यात आला. साधारणतः १२ ते १५ तासानंतर पाणी रामकुंडापर्यंत पोहचेल. पात्रात येणाऱ्या पाण्याचा उपयोग करुन नदी काठावर मॉकड्र‌िल घेण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी मॉकड्र‌िलमध्ये विविध विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी होतील.

साधारणतः ८० टक्के कामे पूर्ण झाल्यानंतर आपातकालीन परिस्थितीला तोंड कसे द्यावे, याचे विविध विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुदैवाने पाटबंधारे खात्याने गंगापूर धरणातून अहमदनगर जिल्ह्यासाठी पाण्याचे रोटेशन सुरू केले आहे. प्रत्यक्ष पाणी असताना काय अडचणी येऊ शकतील, याचा अनुभव यानिमित्ताने घेता येईल, असे ​जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले.

गंगापूर धरणातून ५०० तर दारणा धरणातून १ हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गंगापूर धरणामधून ५०० क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग होईल. साधारणतः १० दिवस पाणी सोडण्यात येईल. गंगापूर धरणात सध्या अडीच हजार दशलक्ष घनफुट पाणी साठा असून यातील ५०० दशलक्ष घनफुट पाणी गेल्यानंतर उर्वरीत दोन हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा कुंभमेळ्यासाठी आणि महापालिकेसाठी आरक्ष‌ित असणार आहे.

पाण्याचा वेग आणि मॉकड्रील

पाटबंधारे खात्याकडून ५०० क्युसेस इतक्या वेगाने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. ५०० क्युसेस वेगाने पाणी सोडल्यास नदीपात्रातील घाट कितपत पाण्यात जातात याचा प्रशासनाला अंदाज येईल. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत हाच मुद्दा जिल्हाधिकारी कुशवाह यांनी उपस्थित करीत पाण्याचा वेग वाढवणे शक्य आहे काय याची विचारणा केली. मात्र, उपलब्ध परिस्थितीत हे शक्य नसल्याचा खुलासा संबंधित विभागाने केला. त्यामुळे सध्यातरी ५०० क्युसेस पाण्यापेक्षा जास्त पाणी आल्यास काय परिस्थिती उद्भवू शकते, याचा प्रशासनाला अंदाज बांधणे शक्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीचे पाणी पिण्यासाठी धोकादायक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

गोदावरी नदीचे पाणी हे मोठ्या प्रमाणात दूषित असल्याने पिण्यासाठी अयोग्य असल्याची कबुली राज्य सरकारने गुरुवारी मुंबई हायकोर्टात दिली. मात्र, त्याचवेळी नाशिक शहराला पुरवले जाणारे पाणी हे प्रक्रिया केलेले असते, असेही सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. नदीच्या प्रदूषणावरील उपचारांबाबत कोणते उपाय केले जात आहेत, सरकारला आता मंगळवारी भूमिका मांडावी लागणार आहे.

कुंभमेळ्याच्या तोंडावर गोदावरी नदीचा प्रश्न गंभीर असल्याने राजेश पंडित यांनी केलेल्या जनहित याचिकेची न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. पंडित यांच्या वतीने अॅड. प्रवर्तक पाठक यांनी गोदावरीमध्ये उद्योग कारखान्यांतील पाणी हे 'नीरी' संस्थेच्या शिफारशीप्रमाणे आवश्यक प्रक्रिया न करताच सोडले जात असल्याकडे लक्ष वेधले. नदीचे पाणी पिण्याकरिता हवे असल्यास त्यातील 'बीओडी'चे (बायो केमिकल ऑक्सिजन डिमांड) प्रमाण हे पाचपेक्षा कमी असायला हवे. मात्र, कारखान्यांचे 'एसटीपी'मधील प्रक्रियेअंती सोडले जाणारे पाणी हे अक्षरशः ३० 'बीओडी'युक्त असते. कुंभमेळ्यादरम्यान हे पाणी धोकादायक होऊ शकते, असे त्यांनी अर्जाद्वारे निदर्शनास आणले. सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या विशेष समितीने 'नीरी'शी सल्लामसलत केली आहे का, हायकोर्टाचे पूर्वीचे आदेश विचारात घेतले आहेत का, अशी विचारणा खंडपीठाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images