Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शाहीमार्ग, रामकुंडावरील अतिक्रमणांवर उद्या हातोडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शाहीमार्ग आणि रामकुंडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडला आहे. सोमवारी शाहीमार्ग आणि रामकुंडासह घाटांजवळील अतिक्रमणांवर हातोडा चालणार आहे. यासाठी मोठा पोलिस फौजफाटा मागविण्यात आला आहे. पालिकेने नोटिसा बजावूनही अतिक्रमण काढले नसल्याने वाद होण्याची शक्यता आहे.

जुन्यासह नवीन शाहीमार्ग, रामकुंड आणि नदीच्या घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी पाहता रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे. सोबतच रामकुंडावर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणची सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर या सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, अतिक्रमण काढले जात नसल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही सर्व अतिक्रमणे हटवण्याची तयारी केली आहे. पोलिस विभागाने सोमवारी आ‍वश्यक फौजफाटा उपलब्ध करून दिल्याने अतिक्रमण काढण्यास मुहूर्त मिळाला आहे. रामकुंडावर हातगाड्यांसह पुरोहीत संघानेही अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण हटविण्याच्या सूचना अतिक्रमण उपायुक्त आर. ए. बहिरम यांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिंदे टोल नकोच!

$
0
0

शेतकरी, व्यावसायिकांचा विरोध; शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक-सिन्नर मार्गावर शिंदे येथे होणाऱ्या टोल नाक्याला तीव्र विरोध होत आहे. कोल्हापूरच्या टोल नाक्याप्रमाणेच हा प्रश्न पेटणार असल्याचे चित्र आहे. शिवसेनेने तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक-सिन्नर या २५ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम ३१ जानेवारी २०१३ रोजी चेतक एंटरप्राईझेसला मिळाले आहे. या कंपनीकडून टोल नाका उभारला जात असून, या टोलची मुदत १८ वर्षे आहे. हा कालावधी ३० एप्रिल २०१५ पासून सुरू झाला आहे. त्यातील दोन वर्षे बांधकामासाठी आहेत. नाशिक-पुणे दोनशे किमी मार्गावर शिंदेसह पाच टोल नाके अक्षरशः घाम फोडणार आहेत.

शिंदे गावच्या वीस किमी परिघात नाशिक महापालिका, सिन्नर पालिका व तीस-चाळीस खेडी येतात. पंधरा लाख लोक या टोलनाक्याने प्रभावित होणार आहेत. नाशिक-सिन्नरदरम्यान दररोज सुमारे दहा हजार व्यावसायिक, शेतकरी वाहनाने ये-जा करतात. सिन्नरला माळेगाव आणि मुसळगाव या दोन एमआयडीसी व इंडिया बुल्स सेझ प्रकल्प आहे. बहुतांश कामगार, उद्योजक नाशिकहून अपडाऊन करतात. संगमनेर, सिन्नर, शिंदे, पळसेतील शेतकऱ्यांचा फळ व भाजीपाला वाहनांद्वारे नाशिकला आणला जातो. टोलनाक्यामुळे वेळ, पैसा खर्ची पडेल.

जिल्ह्यातील व्यावसायिक वापरासाठी नोंदणीकृत वाहनांना शिंदे टोल नाक्यावर ५० टक्के सवलत असली तरी १८ वर्षे हा भार सहन करणे अशक्य आहे. शहराच्या सीमेवर टोलनाका नकोच.

- हेमंत गोडसे, खासदार

सिन्नरला कामगार, शेतकरी दररोज दोन चार वेळा ये-जा करतात. हा टोल नाका आम्हाला मान्य नाही. तो झाला तर सर्वांची मोट बांधून तीव्र आंदोलन छेडू.- जगन आगळे, शेतकरी

रस्ता प्रकल्प झालाच पाहिजे. नाशिक व सिन्नर तालुक्यातील स्थानिकांना टोल माफी किंवा सवलत दिल्यास उद्योजक व कामगारांना दिलासा मिळेल.

- आशिष नहार, उद्योजक, सिन्नर

टोल नाक्याला पर्याय

प्रकल्पाची किमत ३१२ कोटी असून, शासन १२०.५१ कोटी भांडवल देणार आहे. केवळ १९२.४५ कोटींसाठी नाशिकच्या वाहनधारकांवर बोजा टाकला जात आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी टोल नाक्याला पर्याय सुचविले आहेत.केंद्रीय रस्ते विकास मार्गातून टोलचे १९२ कोटी रुपये द्यावेत (बायबॅक करावा).शिंदे व शिवापूर मोशी प्रकल्प शासकीय निधीतून करावा किंवा हे दोन टोल नाके बंद करून चाळकवडी व हिवरगाव पावसा येथे टोल नाका करावा.शिंदे टोलचा भार संगनमेर टोलवर टाकावा.नाशिक लोकसभा मतदारसंघाचा १०३ कोटींचा एक वर्षाचा खासदार निधी रस्ते विकास निधी टोलसाठी वापरावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थाचे काम, तरुणांना मिळतोय दाम!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक जिल्ह्यात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त काम आल्याने शहर परिसर व ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शहरात रोजच कामासाठी ग्रामीण भागातील शेकडो तरुण येत असतांना ठेकेदाराकडून ट्रकने रोज ने-आण केली जाते. ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, गिरणारे, घो़टी आदी भागातील तरुणांची रोजच शहरात कामासाठी गर्दी होत आहे.

बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्ह्यात जोमाने बांधकामांची कामे सुरू आहेत. यात नाशिक शहरात देखील बांधकामाची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु, शहरात कामांसाठी कामगारांची संख्या कमी पडत असल्याने ग्रामीण भागातील तरुण कामगार रोजच कामासाठी शहरात दाखल होत आहेत. यात त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, गिरणारे, घोटी आदी भागातील तरुणांची शहरात कामासाठी दाखल होत आहेत. ग्रामीण भागातून शहरात आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था म्हणून ट्रक मधूनच ने-आण करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील तरुण कामगारांना शहरात काम उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.

ठेकेदार आम्हाला पंचवटी, आडगाव तसेच सिडको भागात विविध कामांसाठी घेऊन जातो. कमानीसाठी खड्डे खोदण्याचे कामही मिळाले आहे. अडीचशे ते तीनशे रुपये रोज मिळत आहे.

- पवन शिंदे, कामगार

कन्ट्रक्शन साइट ठप्प

सध्या मंदीची लाट असल्याने कन्ट्रक्शन साइट ठप्प पडलेल्या आहेत. तसेच इतर कामेही ठप्प आहेत. शेतीतही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मजुरांच्या हातांना पुरेसे काम मिळत नव्हते. मात्र, सिंहस्थाच्या निमित्ताने आता त्यांच्या हातांना रोजगार मि‍ळू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिकास : मिनिमल इन्वेजीव सर्जरी

$
0
0

पुराणातील रामभक्त हनुमंताची गोष्ट आपल्या माहितच असेल. हनुमान हिरे फोडून त्यात राम शोधत होता. राम दिसत नाही म्हणून हिरे निकामी म्हणून फेकून देत होता. तुझ्यात राम आहे का असे विचारता त्याने छाती हाताने उघडून प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन आपल्या अंतरंगात घडवून दिले. बायपास सर्जरीच्या पेशंटना गंमतीने आम्ही नंतर सांगतो की, तुमचा हनुमान केला. आत्तापर्यंत बायपाससाठी दोन्ही बाजूच्या बरगड्या जोडणारे हाड म्हणजेच उरोस्थी चिरून छाती उघडली जायची. त्यामुळे ह्रदयापर्यंत पोचून रक्तवाहिन्यांवर शस्त्रक्रिया करणे सोपे जायचे. मात्र, त्याठिकाणी कायमस्वरूपी व्रण निर्माण होत असल्यामुळे आणि तो सहज दिसत असल्यामुळे, या व्यक्तीची ह्रदयशस्त्रक्रिया झाली आहे हे न सांगता कळे. विशेषत: जन्मत: ह्रदयविकार असलेल्या मुलींना यामुळे खूप मोठी अडचण निर्माण होते. जरी शस्त्रक्रियेनंतर आजार पूर्णत: बरा झाला असला, तरी त्यांचे विवाह जुळणे कठीण होत. परंतु मनुष्य हा सृजनशील प्राणी असल्यामुळे कुठल्याही अडचणीवर मात केल्याशिवाय तो स्वस्थ बसत नाही.

न्यूयॉर्क येथील डॉ. जोसफ मॅकगिन हे असेच एक सृजनशील शल्यविशारद आहेत. २१ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी उरोस्थी न चिरता डाव्या बाजूच्या दोन बरगड्यांमधील जागा फाकवून बायपासची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत अनुभवी व कुशल शल्यविशारद आवश्यक असतो. ह्रदयापर्यंत पोहचण्यासाठी कमी जागा उपलब्ध असल्यामुळे विशेष उपकरणांचा वापर करावा लागतो. आजमितीस, जगात फारच थोडया ठिकाणी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. याला मिनिमली इन्व्हेसिव्ह करोनरी आर्टरी सर्जरी म्हणजे 'मिकास' असे संबोधले जाते. चौथ्या आणि पाचव्या बरगडीच्यामध्ये ५ ते ७ सेमींचा छेद घेतला जातो. रिट्रॅक्टरच्या सहाय्याने हा छेद फाकविला जातो. त्यामुळे ह्रदयाची दृष्यता वाढून शस्त्रक्रिया करणे सुलभ होते. सहाव्या आणि सातव्या बरगड्यांमध्ये विशेष उपकरणांसाठी एक छिद्र केले जाते. तसेच रक्ताचा निचरा होण्यासाठी उरोस्थीच्या खाली एक छिद्र केले जाते. मात्र विशारद जसाजसा अनुभवी होतो, तसा तसा या अतिरिक्त छिद्रांशिवायही शस्त्रक्रिया करू शकतो. रुग्णाचा रक्तदाब कमी करून क्रिया करू शकतो. रुग्णाचा रक्तदाब कमी करून तो १०० मिमि. मर्कयुरीवर स्थिर ठेवावा लागतो. त्यामुळे महारोहिणीवरचा ताण कमी होतो, तसेच रक्तस्त्रावही कमी होतो. पूर्वी ह्रदयाची स्पंदने औषधांद्वाता बंद करून ह्रदयस्थिर झाल्यानंतरच शस्त्रक्रिया केली जायची. या नवीन पध्दतीच्या शस्त्रक्रियेत मात्र ह्रदयाचा आवश्यक तेवढाच भाग स्थिर केला जातो. त्यासाठी स्टॅबिलायझर या उपकरणाची वापर केला जातो. ह्रदयाचा उर्वरित भाग आपले काम करत रहातो. त्यामुळेच याला ब‌िटिंग हार्ट सर्जरी असे म्हणतात.

उरोस्थी न चिरता, छातीच्या पिंजऱ्याच्या डाव्या बाजूला छेद घेऊन ह्रदयरोहिणी शस्त्रक्रिया (बायपास सर्जरी), मायट्रल व्हॉल्व दुरूस्ती (झडप बदलणे), मायट्रल व्हॉल्व बदलणे (झडप बदलणे), एओर्टिक व्हॉल्व बदलणे, कर्णिकांमधील पडद्याचे छिद्र बंद करणे (एट्रियल सेपट्ल डिफेक्ट) या प्रकारच्या शस्त्रक्रिया पार पडतात.

मिश्र शस्त्रक्रिया : मिकासद्वारा डाव्या बाजूच्या प्रमुख रक्तवाहिनीस छातीच्या स्नायूंना पुरवठा करणारी रक्तवाहिनी जोडली जाते व इतर एक किंवा दोन ठिकाणी अँजियोप्लास्टी करून स्टेन्ट बसविण्यात येतो. यामुळे रूग्णाचे आर्युमान वाढते व मोठी शस्त्रक्रिया टाळता येते. सर्वसाधारण बायपासनंतर रूग्णाला सात दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागते. याउलट मिकास शस्त्रक्रियेनंतर रूग्णास चौथ्या दिवशी घरी पाठविले जाते. त्यामुळे रूग्णालयात होणाऱ्या जीवाणूसंसर्गाची शक्यता कमी होते. ऑपरेशननंतर दुसऱ्याच दिवशी रूग्ण चालू फिरू शकतो. याआधी त्याला ४ दिवस अंथरूणाला खिळवून रहावे लागत असे. कृत्रिम श्वास ऑपरेशन टेबलवरच थांबविला जातो. त्यामुळे फुफ्फुस लवकर सक्षम बनतात. दोन आठवडयात रूग्णाला आपली कामे सुरू करता येतात. उरोस्थी न चिरल्यामुळे, हालचालींवर मर्यादा येत नाहीत. बायपासच्या काही रूग्णांमध्ये हाड न जुळ्ल्यामुळे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मिकासमध्ये ही भीती नसते. शस्त्रक्रियेनंतर वेदनाही कमी होतात. या शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव कमी होतो. रूढ बायपास शस्त्रक्रियेत रक्त देण्याची गरज पडू शकते. मिकासमध्ये ही शक्यता कमी होते. आसीयू तसेच रूग्णालयात कमी दिवस रहावे लागल्यामुळे, तसेच इतर रूग्णांपेक्षा लवकर सुरूवात केल्यामुळे रूग्णाची मानसिकता सकारात्मक बनते. आजाराचे शस्त्रक्रियेचे दडपण कमी होते व नैराश्य येण्याची शक्यता कमी असते.

अनेक हॉस्पिटल्समध्ये मिकास शस्त्रक्रियेनंतर, त्याच्या निकालांशी रूढ बायपास ऑपरेशनशी तुलनात्मक शोध निबंध प्रसारीत झाले आहेत. त्यामध्ये असे आढळ्ले की, मिकास ही एक बायपास इतकीच परिणामकारक व फायदेशीर आहे. मात्र मिकासमध्ये रूढ बायपासपेक्षा फार कमी कॉम्प्लिकेशन होतात व रूग्ण लवकर बरा होतो व त्याच्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो.

श्री सार्इबाबा हार्ट इन्स्टिटयूट येथे शल्यविशारद डॉ. स्वप्निल कर्णे व भूलतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर खैरनार व त्यांच्या चमूने मिकास ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. नाशिकमध्ये ही शस्त्रक्रिया नियमित झाल्यामुळे अनेक रूग्णांना त्याचा लाभ होर्इल व ह्रदयशस्त्रक्रियेची भीती कमी होर्इल. स्त्रियांना दर्शनी भागात व्रण निर्माण होणार नसल्यामुळे त्यांना याचा फायदा अधिक आहे. सारांश काय तर ह्रदयशस्त्रक्रियेसाठी आता हनुमान होण्याची गरज नाही. उलटपक्षी मिकासचे फायदेच अधिक आहेत.

(लेखक प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकनगरी भरला वारकऱ्यांचा मेळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे हजारोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी सोहळा अविस्मरणीय भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. अठरा वर्षानंतर त्र्यंबकेश्वरी हा अपूर्वयोग साधून आला.

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने नवनियुक्त विश्वस्तांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली. ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता व ग्रंथपूजन विश्वस्तांच्या हस्ते झाले. या प्रसंगी वारकरी वैष्णवांनी समाजात वाढत्या व्यसनाधीनतेच्या विरोधात पखर लढा द्यावा तसेच, आपल्या हातून दुसऱ्याचे नुकसान होऊ नये, कोणीही दुखावू नये असा संकल्प केला. त्यानंतर संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महारज नामदास यांनी केलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी प्रसंग आपल्या कीर्तन निरूपणात सांगतांना उपस्थित वारकऱ्यांना गहिवरून आले.

नामदास महाराज यांनी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव यांच्या समाधी प्रसंगाचे वर्णन करतानाच मुक्ताबाईचे लुप्त होणे या प्रसंगाचा वेध घेतला. शेवटी समाधीचा प्रसंग सांगतांना उपस्थित वारकऱ्यांनी पुष्पवृष्टी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजचे होणार सिक्युरिटी ऑडिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता हे हल्ले रोखण्यासाठी आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे ऑडिट होणार आहे. राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजचे ऑडिट करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे.

सेंट्रल मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी निवासी डॉक्टरांची सुरक्षा

आणि त्यांच्या इतर समस्यांबाबत चर्चा झाली. या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना तावडे म्हणाले की, निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरक्षाविषयक पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे ऑडीट केले जाईल. शासकीय महाविद्यालयांत महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याबाबतही आढावा घेऊन याबाबत कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आगामी काळात डॉक्टरांसाठी आरोग्य संपन्न कक्ष तयार करणे, निवासी डॉक्टरांचे राहणीमान कसे सुधारता येईल यासाठी पुढील तीन वर्षांसाठीचा आराखडा तयार करणे, तसेच मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत नियमित बैठक घेणे, निवासी डॉक्टरांना आवश्यक असलेल्या सुट्ट्या, निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन अशा विविध विषयांबाबत कृती आराखडा करण्यात यावा अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय खरेदीला उधाण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शनिवारच्या सुटीची संधी साधत पालकांनी मुलांच्या शालेय साहित्याची खरेदी करण्याला प्राधान्य दिले. मेनरोड, शालिमार, कानडे मारुती लेन अशा शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा यामुळे खरेदीसाठी गजबजलेल्या दिसत होत्या. एकीकडे मॉल व मोठमोठ्या ब्रॅण्डेड वस्तूंची दुकाने उघडली असली तरीही मेनरोडवरील गर्दी कायम असल्याचे चित्र यंदाही दिसून येत आहे.

शनिवारी जवळपास सर्वच औद्योगिक वसाहतींनी सुटी असल्याने खरेदीसाठी हा दिवस अनेकांनी निवडला. पालक व मुलं सहकुटूंब शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल झाले होते. दप्तर, गणवेश, बूट, डबा, बाटली, वह्या-पुस्तकं, कंपासपेटी, रेनकोट या सर्वच शालेय वस्तू आवश्यक असल्याने दुकाने गजबजलेली दिसत होती. नवीन काय मिळतंय, वाजवी किंमतीत वस्तू कुठे मिळत आहेत, याची शोधाशोध करत अनेकजण या परिसरात फिरत होते. शालेय साहित्याचे भाव काही प्रमाणात वाढल्यामुळे या वस्तूंच्या खरेदीत अनेकजण तडजोडही करत होते. महागाईमुळे आपल्या खरेदीवर बंधने येत आहेत, यामुळे काही मुलांच्या उत्सुकतेला ग्रहण लागत होतं. तर काही ठिकाणी हवं ते मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात होता.

प्रत्येक विषयाला स्वतंत्र वही आवश्यक असल्याने मुलं कार्टून, गाड्या, खेळाडू अशा आपल्या आवडत्या चित्रांच्या वह्या घेण्यात दंग होते. आपल्याला आवडतंय तेच खरेदी करण्याला मुलांनी प्राधान्य दिलंच शिवाय विक्रेत्यांनीही मुलांच्या आवडीचा पुरेपूर विचार केला होता. दुकानात आलेला ग्राहक खरेदी न करता जाऊ नये, याची काळजी त्यांच्याकडून घेतली जात होती.

नव्या शैक्षणिक वर्षात आपल्याकडे सर्व नवीन प्रकारच्या वस्तू असाव्यात, असा हट्ट मुलांचा दिसून येत होता. शाळा सुरू होण्यास केवळ एक दिवस उरला असल्याने आजही गर्दी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वस्त मंडळाचा वाद चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अध्यक्षपदावर मुरलीधर पाटील यांनी दावा केला असून, त्र्यंबकराव गायकवाड यांनी त्यांना विरोध केला आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिक धर्मदाय आयुक्त यांनी नवीन विश्वस्तांच्या नेमणुका केल्या तेव्हा काही वर्षांपासून सुरू असलेली कोर्टबाजी आता संपली म्हणून वारकरी भाविकांनी निःश्वास सोडला होता. तथापि, दोन दिवसापासून पुन्हा एकदा मी अद्याप अध्यक्षच आहे म्हणून मुरलीधर पाटील यांनी त्र्यंबक येथे ठाण मांडले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा झाला. तेव्हा प्रवेशद्वारी विश्वस्त मंडळांच्या अध्यक्षांचे दोन फलक पहावयास मिळाले. सन १९९१ मध्ये विश्वस्त मंडळ अस्तित्‍वात आल्यानंतर मुरलीधर पाटील हे अध्यक्ष झाले. त्यानंतर २५ वर्ष नव्याने नेमणुका झाल्या नाहीत. काही वर्षांपासून न्यायालयीन वाद सुरू होते. सर्व दावे डिसेंबर २०१४ मध्ये निकाली निघाल्यानंतर विश्वस्त मंडळाची नव्याने रचना करण्यात आली. यामध्ये १३ सदस्य घेण्यात आले. त्यानुसार मे २०१५ मध्ये विश्वस्त मंडळाची नेमणूक झाली. त्यामध्ये त्र्यंबकराव गायकवाड हे अध्यक्ष व इतर उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव अशा पदांची कार्यकारिणी सर्व नवनियुक्त विश्वस्तांनी एकत्र येऊन जाहीर केली. तसे फलकही लागले. दोन दिवसापूर्वी माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी दान पेट्यांची मोजदाद करून ती रक्कम बँक खात्यावर जमा केली. तसेच, काल समारंभाचे फलक लावले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आपण अद्यापही अध्यक्ष आहोत. चेंज ऑफ राईट अद्याप झालेले नाही. तसेच नव्याने विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणीबाबत समजले. मात्र, ते चुकीचे व ट्रस्टच्या घटनेला धरून नाही. यामध्ये अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, सहसचिव अशा प्रकारे पदांची नावे लावली आहेत. अशी तरतूद विश्वस्त मंडळाच्या घटनेत नाही. - मुरलीधर पाटील

सर्व काही कायदेशीर तरतुदी प्रमाणेच झाले आहे. आमची नेमणूक धर्मदाय आयुक्तांनी केली आहे. आम्ही पदांची वाटणी कामकाजाच्या सोयीनुसार केली आहे. शासनाच्या कागदोपत्री अध्यक्ष आणि सचिव हे दोन पदे आहेत. निष्कारण वाद वाढविणे योग्य नाही. - त्र्यंबकराव गायकवाड

वारकऱ्यांच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी विश्वस्त मंडळ आहे. त्यामध्ये राजकारण करू नये. हा प्रकार सर्वसामान्य वारकरी भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचवणारा आहे. - पुंडलिक थेटे, सहसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


`ते` हायटेक चोरटे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडला खासगी बँकेच्या एटीएममध्ये व्हायरस सोडून १६ लाख २० हजारांची रोकड चोरीस गेली होती. या प्रकरणात उपनगर पोलिसांनी सहा जणांना गुजरातमधील सूरत येथून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य सूत्रधार मात्र अद्याप फरार आहे.

मोहम्मद शोएब कमाल पाशा शेख (३२, भोईसर, जि. पालघर), शंभू उर्फ करणसिंग रामधर सहदेव झा (२८, बिहार), निजामुद्दीन फकरुद्दीन शेख (२५, अंधेरी, पश्चिम मुंबई), जहांगीर जमाल शेख (२६, विरार, मुंबई), बजरंगसिंग शामसिंग (३८, वसई, मुंबई), दुर्गाप्रसाद राघवेंद्रचंद्र ब्राम्हण (३०, अंधेरी, मुंबई). पहिल्या दोघांना ९ जूनला, तर उर्वरित चौघांना १० जूनला अटक करण्यात आल्याची माहिती उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी दिली. त्यांच्या पथकाने गुजरातमध्ये जाऊन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड हस्तगत करणे बाकी आहे.

१४ एप्रिल २०१५ रोजी रात्री साडेआठ ते साडेअकरा दरम्यान आरोपींनी दत्तमंदिर सिग्नलजवळील साई प्लाझा काम्पलेक्स येथील बँकेच्या एटीएममधील सीपीयू आणि कॅमेऱ्याची पीन काढून कॅमेरा सिस्टम बंद केली. नंतर एटीम मशिनमध्ये मालवेअर व्हायरस सोडून त्यात बिघाड केला व १६ लाख २० हजाराची रोकड पळवली. बँकेच्या संगणक तज्ञांनी महिनाभर विश्लेषण केल्यानंतर वरील आरोपींचे चेहरे कॅमेऱ्यात आढळले. नेटवरुन दोघांची नावे स्पष्ट झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांना द्या घाटांची माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यात प्रथमच विविध ठिकाणी घाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या स्नानासाठी तयार करण्यात आलेल्या घाटांची माहिती भाविकांना आगाऊ देण्यात यावी, अशी सूचना गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलिस विशेष महानिरीक्षक जे. जे. सिंग, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी उपस्थित होते. बक्षी यांनी कुंभमेळ्यातील विकासकामे, सुरक्षा व्यवस्था, भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधा, साधुग्राममधील व्यवस्था आदी विषयांचा आढावा घेतला. पोलिस बॅरेक्ससाठी कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. स्वयंसेवकांना ओळखपत्र आणि सेक्टरनुसार ओळखता येईल असा गणवेश देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीविषयी पूर्वसूचना मिळण्याबाबत यंत्रणा‍ विकसित करण्याविषयी प्रयत्न व्हावेत, असेही बक्षी म्हणाले. जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या नियोजनाविषयी त्यांनी समाधन व्यक्त केले. भाविकांची वाहतूक आणि मोबाइल यंत्रणेविषयी रेल्वे आणि ट्रायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भाविक आणि साधूंच्या सुरक्षेविषयी करण्यात येणाऱ्या नियोजनाची तसेच सेंट्रलाईज्ड पीए सिस्टीमची त्यांनी माहिती घेतली. बैठकीतनंतर बक्षी यांनी​ पोलिस आयुक्तालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला भेट देऊन माहिती घेतली. रामकुंड, नवा शाहीमार्ग, साधुग्राम आणि कन्नमवार घाट येथे भेट देऊन त्यांनी विकासकामांची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मिळणार वाढीव पीककर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालकांच्या पहिल्याच बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. द्राक्ष आणि डाळिंबाच्या पीककर्जात प्रशासक मंडळाने केलेली कपात रद्द करीत दोन्ही फळांच्या पीककर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विविध समित्यांच्या नियुक्तीचे अधिकार अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना देण्याचा निर्णयही संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे.

जिल्हा बँकेच्या नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला उपाध्यक्ष सुहास कांदेंसह सर्व संचालक उपस्थित होते. बैठकीत जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळाच्या काळात झालेल्या निर्णयांचा आढावा घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष देसले यांनी प्रशासक मंडळाच्या कारकिर्दीत झालेल्या कामकाजी माहिती सादर केली. संचालक मंडळाने पहिल्याच बैठकीत प्रशासक मंडळाचा निर्णय बदलला आहे. त्यामुळे प्रशासक मंडळविरुद्ध संचालक मंडळात पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. यासोबतच जिल्हा बँकेत नियुक्त करण्यात येणाऱ्या समित्या आणि त्यावरील सदस्यांच्या नियुक्तीचे अधिकार दराडे यांना देण्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला आहे.

पूर्वीप्रमाणेच पीककर्जाची मर्यादा

बैठकीत द्राक्ष आणि डाळिंबाच्या पीककर्जात प्रशासकाने केलेली कपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता द्राक्षपिकाला एकरी ८५ हजारऐवजी पूर्वीप्रमाणेच एक लाख रुपये पीककर्ज मिळणार आहे. डाळिंबासाठी एकरी ३२ हजार ऐवजी ४० हजार रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परप्रांतीय संघटनांचा मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यात शहरात दाखल होणाऱ्या विविध राज्यातील भाविकांना मदत करण्यासाठी नाशिकमधील परप्रांतीय संघटना पुढे सरसावल्या आहेत. या संघटनांच्या प्रतिनिधींची नुकतीच पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी चर्चा झाली.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे निर्विघ्न आयोजन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्वच विभागाची कामे सुरू आहेत. परराज्यातील ​भाविकांना शहराची ओळख व्हावी, त्यांना विविध मार्ग, घाटांची माहिती मिळावी, यासाठी लवकरच वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सूचना फलक देखील लावले जातील. कुंभमेळा ही नाशिकची ओळख आहे. त्या दृष्टीने शहरात येणाऱ्या भाविकांना चांगली ट्रिटमेंट मिळावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परप्रांतीय व्यक्तींना शहराची ओळख नसते. त्यातच अनेकांना भाषेची अडचण येते. या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने परप्रांतीय नागरिकांच्या विविध संघटनांची बैठक शुक्रवारी संध्याकाळी आयोजित केली होती. या बैठकीस नाशिक मल्याळम कल्चरल असोसिएशन, नारायण गुरूदेव ट्रस्ट, तेलगू सेवा संघ, आयप्पा ट्रस्ट, हिंदी प्रसार संस्था, गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, याशिवया, तामीळ, गुजराथी, बंगाली आणि उत्तर भारतीय हिंदी भाषिक संस्थांचे ५६ पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीस पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पोलिस विभागामार्फत केलेल्या वाहतूक नियोजनाची सविस्तर माहिती दिली. बाह्य व अंतर्गत पार्किंगची ठिकाणे, भाविकांचे मार्ग याविषयी माहिती देऊन शंकाचे निरसन केले. याबरोबर, परप्रांतीय भाविकांना सहकार्य करण्यासाठी जास्तीत जास्त स्वयंसेवकांची नोंदणी करणे, दूभाषिक म्हणून पोलिसांना सहकार्य करणे, हरविलेल्या व्यक्तींच्या शोधकार्यात मदत करण्याचे आवाहन आयुक्त जगन्नाथन यांनी केले. परप्रांतीय संघटनांच्या सदस्यांशी भाविकांचा संपर्क आल्यास त्यांना आपलेपणाची भावना निर्माण होईल, असा उद्देश पोलिसांचा आहे. स्वंयसेवकांसाठी ओळखपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांच्या नोंदणीसाठी दोन फोटो व ओळखपत्र घेवून पोलिस स्टेशनमध्ये नोंदणी करावी. उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये, देवळाली कँम्प, नाशिकरोड व जेलरोड भागातील नागरिकांनी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये नोंदणी करावी. अंबड, इंदिरानगर, भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील स्वयंसेवकांसाठी भद्रकाली पोलिस स्टेशन, सातपूर व गंगापूर पोलिस स्टेशनहद्दीतील स्वयंसेवकांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तर सरकारवाडा, पंचवटी व आडगाव पोलिस स्टेशन हद्दीतील स्वंयसेवकांनी त्याच पोलिस स्टेशनमध्ये नोंदणी प्रक्रिया करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. बैठकीस पोलिस उपायुक्त एस. अंबिका, श्रीकांत धिवरे, पंकज डहाणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणीपूर्वीच हटणार अडथळे

$
0
0

गोदावरी माता मंदिराजवळील शेड हटविले; वस्त्रांतरगृहावरही मंथन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साधू-महंतांना पर्वणीकाळात ठरू शकतील, असे अडथळे दूर करण्यास पुरोहीत संघाने सुरुवात केली आहे. शनिवारी गोदावरी माता मंदिराजवळील पत्र्याचे शेड हटविण्यात आले. अन्य अडथळेही लवकरच दूर केले जातील, असे पुरोहीत संघाचे म्हणणे आहे. वस्त्रांतरगृह पाडण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्यामुळे गोदाघाटावरील जागा मोकळी करण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सुरू आहे.

रामकुंडाजवळील वस्त्रांतरगृहाची इमारत पाडावी, अशी मागणी महंत ग्यानदास महाराज यांनी पुन्हा एकदा केली आहे. पालकमंत्र्यांकडेही त्यांनी या मागणीच्या पूर्ततेसाठी हट्ट धरला असला तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पर्वणी काळात ध्वज उभे करण्यात या वस्त्रांतरगृहामुळे अडचण निर्माण होणार आहे. तसेच, सिंहस्थासाठी येणाऱ्या साधू आणि भाविकांची मोठी संख्या पाहता वस्त्रांतरगृहामुळे त्यांची कोंडी होण्याची भीती महंत ग्यानदास महाराज यांनी व्यक्त केली आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी खबरदारी म्हणून ही इमारत पाडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वस्त्रांतरगृहाचा मुद्दा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आला तेव्हा पुरोहीत संघाने ही इमारत पाडण्यास कडाडून विरोध दर्शविला होता. आताही महालिकेतील राजकीय पदाधिकाऱ्यांचा ही इमारत पाडण्यास तीव्र विरोध आहे. त्यामुळे वस्त्रांतरगृहाबाबत प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

महंतांची मनधरणी

या सर्व पार्श्वभूमीवर पुरोहीत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री महंत ग्यानदास महाराज यांची भेट घेतली. वस्त्रांतरगृहाची इमारत पाडली जाऊ नये, यासाठी त्यांच्या मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. इमारत न पाडताही साधू महंतांसाठी अधिकाधिक जागा कशी उपलब्ध करून देता येईल, यावर यावेळी चर्चा झाली. येत्या दोन तीन दिवसात या इमारतीबाबत काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास पुरोहीत संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी व्यक्त केला आहे.

रामकुंड परिसर घेणार मोकळा श्वास

रामकुंडाजवळील अडथळे दूर करण्यास पुरोहीत संघाने प्राधान्य दिले आहे. शनिवारी गोदावरी माता मंदिराजवळील पत्र्याचे शेड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मंदिराच्या मागील बाजूकडील भिंतही काढण्यात येणार आहे. रामकुंड आणि वस्त्रांतरगृहाजवळील अडथळा ठरणाऱ्या जाळ्याही काढण्यात येणार असल्याची माहिती शुक्ल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडीवरून तू तू मैं मैं !

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आणि एलईडी ठेकेदार यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. शहरात एलईडी दिवे बसविण्यासाठी महापालिका परवानगी देत नसल्याचा आरोप करत ठेकेदाराने एलईडी दिवे बसव‌िण्यासाठी महापालिकेला नोटीस बजावली होती. आता प्रशासनाने या नोटिशीला जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू केली असून, निकृष्ट दर्जाचे साहित्य असल्याचा दावा करीत ठेकेदारालाच नोटीस ‌दिली जाणार आहे. त्यामुळे एलईडीवरून महापालिका आणि ठेकेदार यांच्यातील वाद नव्याने रंगण्याची चिन्हे आहेत. तरी हा वाद पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

महापालिकेने शहरात ६९ हजार एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय घेतला होता. एलईडी दिवे बसवण्यासाठी ठेकेदाराला ऑगस्ट २०१४ ची मुदत दिली होती. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी बसविण्याचा विषय असताना, पालिकेतील काही कर्तबगार मनसबदारांनी ४८ कोटींची ही योजना तब्बल २०२ कोटींपर्यंत नेऊन ठेवली. त्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत, उपमहापौर गुरूमित बग्गा आणि नगरसेवक संजय चव्हाण यांनी या विषयाला थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले होते. मात्र, अधिकारी आणि पालिकेतील काही पदाधिकारी या योजनेच्या पाठीशी अर्थपूर्णपणे उभे राहिल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईने शहरात ६९ हजार ४४५ एलईडी दिवे बसवण्याचे काम हैदराबादच्या कंपनीला देण्यात आले. या विषयात अनेकांनी आपले हात ओले करून घेतल्याने ठेकेदाराची अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या डिमांड पूर्ण करण्यातच दमछाक झाली होती. मुदतीच्या आत केवळ ७० दिवे बसविण्यात आले. वादामुळे ठेकेदाराला दिलेली मुदत उलटल्याने स्थायी समितीच्या आदेशान्वये ठेकेदाराला नऊ महिन्यांपूर्वीच नोटीस दिली होती. त्यामुळे ठेकेदाराचे काम थांबले होते. मात्र बँक गँरटी मिळाल्यानंतर ठेकेदाराने दिव्यांची खरेदी करीत, एलईडी दिवे बसवण्याची परवानगी माग‌ितली होती. मात्र महापालिकेने ती देण्यास नकार दिल्याने ठेकेदाराने महापालिकेला नोटीस बजावली होती.

आता ठेकेदाराने एलईडी दिवे बसविण्यासंदर्भात दिलेल्या नोटिशीला महापालिका उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी एलईडी दिव्यांच्या गुणवत्तेच्या मुद्दयावरून ठेकेदाराला हेरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी कायदेशीर सल्ला मसलत सुरू असून, पुढील तीन दिवसात ठेकेदाराला नोटीस बजाव‌िली जाईल, असे समजते. दिव्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर हा ठेका रद्द करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी ठेकेदाराला प्रथम नोटीस दिली जाणार आहे. त्यामुळे ठेकेदार आणि महापालिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.

कार झाडावर आदळून चार भाविकांचा मृत्यू

नाशिक : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार झाडावर आदळून गुजरातमधील चार भाविकांचा मृत्यू झाला. पेठ रोडवरील पिंगळे पॉली हाउससमोर शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. गुजरातमधील वापी, बलसाड येथील चार तरूण नाशिक आणि शिर्डी दर्शनासाठी कारमधून नाशिककडे येत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास चालक अतिक समद शेख (२८, रा. वापी) याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार पिंगळे पॉली हाउससमोरील झाडावर आदळली. त्यात कारचालक शेख याच्यासह जय किशोरभाई प्रभाकर (वय २३), पंकज भिकनराव मोरे (वय ३१) यांचा जागीच मृत्यू झाला.तर गंभीर जखमी झालेल्या वीरल रमेशभाई पटेल (वय २८) यास हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावात वीज पडून एक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाचं पहिलं नक्षत्र रोहिणी असले तरी बळीराजाला आस असते मृग नक्षत्राची. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट मृग नक्षत्रातच अनुभवायला मिळते. मृग नक्षत्राच्या सुरुवातीस पावसाने जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथे वीज पडून एका सतरा वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला. सुनील हरिदास माळी असे त्या तरुणाचे नाव आहे.

मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर, सटाणा, इगतपुरी, चांदवड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दोन दिवसापासून नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी, बिरोळा, पळाशी, सावरगाव, वेहळगाव, रणखेडा आदी गावात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. समाधानकारक पाऊस पडल्याने बाजारपेठेत बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे.

मालेगाव तालुक्यातील कळवाडी व परिसरातही जोरदार पाऊस झाला. कळवाडी येथे मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पाणी आले आहे. यामुळे दोन गावांचा संपर्कही तुटला होता.पुरात अडकलेल्या नागरिकांना मानवी साखळी तयार करून पाण्यातून मार्ग काढावा लागला. तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अडकलेल्या नागरिकांना पाण्याचा ओघ कमी होण्याची वाह पहावी लागली. मालेगाव शहर व परिसरात हलक्या सरी कोसळल्या.

चांदवड तालुक्यात शनिवारी पावसाचे आगमन झाले. राहुड येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने सहा शेळ्या ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरासह तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

मृगचा हर्षोल्हास

हिंदू पंचांगानुसार वर्षभरात २७ नक्षत्रांपैकी ९ नक्षत्रं ही पावसाची असतात. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी 'रोहिणी' नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा 'मृग' नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. सामान्यत: ७ किंवा ८ जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असं मानलं जातं. नक्षत्रांची वाहन बदलत असतात. यावेळी मृग नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाटेवर एकदाच विजय मिळतो!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही लाटेत एकदा विजयी होता येते. दुसऱ्यांदा निवडून यायचे असेल तर कष्ट करण्याची तयारी ठेवून चांगले काम करावे लागते, असा टोला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या आमदारांसह पक्षकार्यकर्त्यांना लगावला.

महाजन यांच्या उपस्थितीत रम्मी राजपूत आणि त्यांच्या समर्थकांचा भाजपात प्रवेश झाला. यावेळी महाजन यांनी भाजपला एक नंबरचा पक्ष करायचा असेल तर, पक्षाला रम्मी राजपूतसारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे. पक्षात जुना नवा असा कोणताही भेद नसतो. काँग्रेसपेक्षा आमचा पक्ष वेगळा आहे. निर्णय चुकला तर, तुम्हाला शेवटपर्यंत भटकावे लागते. त्यामुळे आता तुम्ही चांगल्या पक्षात आले आहात असे सांगून लाटेवर निवडून येण्याचे दिवस आता राहिले नसल्याचा टोला त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना लगावत कामे करा असा सल्ला दिला.

वादामुळे शिंदेची दांडी

राजपूत यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी गृहराज्यमंत्री राम शिंदे येणार होते. मात्र, राजपूत यांची वादग्रस्त कारकीर्द असल्याने वाद नको म्हणून ऐनवेळी शिंदेनी कार्यक्रमापासून दूर राहणे पंसत केले. कार्यक्रमापासून लांब राहू पाहणाऱ्या महाजन यांना ऐनवेळी प्रमुख पाहुणा व्हावे लागले. या प्रवेश सोहळ्याला वाद नको म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दूर राहणेच पसंत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेचा उद्या टेक ऑफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसाठी प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेली विमानसेवा सोमवारी (१५ जून) टेक ऑफ घेणार आहे. मेहेर कंपनीच्या नाशिक-पुणे सेवेमुळे पुणे शहर नाशिकशी कनेक्ट होणार असून, नाशिककरांना अवघ्या ५० मिन‌िटात पुणे येथे पोहचणे शक्य होणार आहे. दिवसातून दोन फेऱ्या पुण्यासाठी तर पुण्याहून नाशिकसाठी राहणार आहेत.

मेरिटाईम एनर्जी हेलि एअर सर्व्हिस लि. (मेहेर) या कंपनीने नाशिक ते पुणे ही सीप्लेन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी (१५ जून) सकाळी ९.४५ वाजता पुणे सेवेचे टेक ऑफ ओझर विमानतळावरुन होणार आहे. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे हे सुद्धा सीप्लेनद्वारे पुण्याला जाणार आहेत. नाशिक ते पुणे सेवेसाठी ५ हजार ९९९ रुपये तिक‌िटाचा दर जाहीर करण्यात आला आहेत. मात्र, या सेवेला अधिक प्रतिसाद मिळावा यासाठी रिटर्न तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांकडून ११ हजार ९९८ रुपये घेण्याऐवजी ८ हजार ९९९ रुपये घेण्याचे मेहेर कंपनीने शनिवारी जाहीर केले. त्यामुळे या सेवेला अधिक प्रतिसाद मिळू शकेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या रिटर्न तिक‌िटासाठी वेळ आणि दिवसाचे बंधन घालण्यात आलेले नाही. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस पुणे विमानसेवा राहणार आहे. ओझरहून सकाळी ९.४५ आणि दुपारी ४.३० वाजता पुण्यासाठी सेवा असणार आहे. तर, पुण्याहून नाशिकसाठी सकाळी ११.०० आणि संध्याकाळी ६.०० वाजता सेवा असणार आहे. या सेवेच्या निमित्ताने नाशिककरांना पुणे येथे अवघ्या ५० मिनीटात पोहचता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या येवल्यातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वादामध्ये येवला तालुक्यातील रुग्णांची हेळसांड होत आहे. शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे या रुग्णालयातील अनेक गैरप्रकारांना चक्क रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यानेच आरोपाच्या फैरी झाडत वाचा फोडल्याने खळबळ उडाली आहे.

रुग्णालयात दाखल एका महिलेच्या बाळंतपण करून घेण्यावरून डॉक्टर अन् एका परिचारिकेत वादाची ठिणगी पडली. त्या परिचारिकेकडून बेकायदेशीरपणे गर्भपात केला जात असल्याच्या डॉक्टरच्या आरोपाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. शनिवारी येवला तालुक्यातील तळवाडे येथील रामनाथ किसन आरखडे हे आपली गर्भवती मुलगी मनीषा मिननाथ जाधव (रा.वाईवोथी ता. येवला) यांना बाळंतपणासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार यांनी मनीषा हीचे आधीचे रिपोर्ट तपासणीसाठी मागविले. या रिपोर्टमध्ये एचआयव्ही टेस्ट चा रिपोर्ट नसल्याने ड्युटीवर असलेल्या अधिपरिचारिका अनिता चहाळसे यांना डॉ. योगश पवार यांनी एचआयव्ही टेस्ट करण्यास सांगितले. परंतु, मनीषा हीस जास्त कळा येत असून आधी बाळंतपण करू मग टेस्ट करू असे अधिपरिचारिका अनिता चहाळसे यांनी डॉ. पवारांना सांगीतले. यावरून डॉ. पवार व अधिपरिचारिका चहाळसे यांच्यात वाद निर्माण झाला.

ग्रामीण रुग्णालयात सर्रास गैरव्यवहार चालू असून अधीक्षकांना कल्पना देऊनही काहीच कारवाई झालेली नाही. कर्मचाऱ्यांकडून रुग्णांकडे पैसे मागीतले जातात. साफसफाई केली जात नाही. साहित्य चोरले जाते. कापूसपासून इतर औषधेही चोरले जातात. हॅण्डग्लोव्हज देखील उपलब्ध नसतात. घाण साफ करण्याचे कामही डॉक्टरांनाच करावे लागते. घाण पुसण्यासाठी साड्यांचा वापर केला जातो. कपडे धुण्याचा लाखोचा निधी जातो कुठे? अशा गैरव्यवहाराने आपली येथे काम करण्याची इच्छा नाही, असे स्पष्ट करीत डॉ. योगेश पवार यांनी वैद्यकीय अधिकारीपदाचा राजीनामा दिला आहे.

पेशंटचे रिपोर्ट डॉक्टर पवार यांनी मागितले. त्यात एचआयव्ही रिपोर्ट नव्हता. पेशंटची परिस्थिती गंभीर आहे हे पाहून डिलिव्हरीसाठी लेबर रूममध्ये घेतले. डॉक्टरांनी एचआयव्ही टेस्ट रिपोर्ट असल्याशिवाय पेशंटला हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली. तरीही मी डिलिव्हरी केल्याने डॉ. पवार यांनी मला शिविगाळ केली.

- अनिता चहाळसे, अधिपरिचारिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंधारवाटेतून घेतली ‘आकाश’झेप

$
0
0

अश्विनी पाटील, नाशिक

दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर यश हमखास मिळवते, हे आपल्या कर्तृत्वातून आकाश चव्हाण या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. दृष्टीहीन असलेल्या आकाशने दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के मिळाले असून आदर्श माध्यमिक शाळेमध्ये दुसरा येण्याचा मान पटकावला आहे. अभ्यास आणि जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करत त्याने हे यश संपादन केले आहे.

सातपूर कॉलनीत राहणाऱ्या आकाशला अभ्यास करण्यासाठी वडिल दिलीप चव्हाण यांची मोठी मदत झाली. ते प्रिमीयम टूल्स कंपनीत कामगार तर आई कविता या गृहिणी आहे. सर्वसाधारण कुटुंबातील आकाशला हे यश मिळवण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. शाळा व क्लासेसमध्ये शिकवला जाणारा अभ्यास ब्रेललिपीमध्ये शिकण्यासाठी त्याला खडतर प्रवास करावा लागला.

चव्हाण यांनी आकाशचा अभ्यास घेता यावा यासाठी स्वतःदेखील अगोदर अभ्यास केला. आकाशचा अभ्यास घेताना वाचन करणे त्यानंतर त्याचे पाठांतर घेणे, उजळणी घेणे यासाठी नियोजन केले. त्यासाठी लागणारी पाठ्यपुस्तके मुंबईहून ब्रेललिपीत बनवून आणण्याची तयारी त्यांनी दर्शवली. नोकरी आणि मुलाचे वेळापत्रक सांभाळत त्यांनी त्याला खंबीर साथ दिली. पण हा संघर्ष अजुनही सुरू आहे.

चार महिन्यांचा असताना आकाशच्या डोळ्यांच्या आजाराविषयी पालकांना माहिती मिळाली. डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र पुढील दोन तीन वर्षात पुन्हा आजाराशी सामना सुरू झाला. एक डोळा निकामी झाल्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया केली. मात्र यापुढे डोळ्यांसमोर कायम अंधार असणार होता. डोळ्यांची नस कमजोर असल्याने त्याला याचा कायम संघर्ष करावा लागणार ही गोष्ट पालकांनी लक्षात घेत आकाशच्या शिक्षणासाठी पुढे पाऊल टाकले.

चौथीपर्यंत नॅबमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आकाशने आदर्श हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. या काळात शाळेतील विविध स्पर्धांमध्येही तो सहभागी होत राहिला. याच दरम्यान संगीतातील आवड जोपासण्यासाठी त्याने हार्मोनिअमही शिकण्याचा प्रयत्न केला. पुढे कॉमर्स शाखेत शिक्षण घेऊन बँकिंग किंवा प्रशासकीय सेवेत जाण्याची आकाशची इच्छा आहे. यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचीही त्याला कल्पना आहे. मात्र, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडनेर बायपासला विरोध करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

विकास आराखड्यातील ६० मीटरच्या प्रस्तावित वडनेर बायपास रस्त्याला मिळकतधारक आणि शेतकऱ्यांनी संकुचित दृष्टीकोन बाजूला ठेऊन कायदेशीर व तांत्रिक मुद्यांच्या आधारे जोरदार विरोध करावा, असे प्रतिपादन शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीचे सदस्य आणि वास्तू अभियंता उन्मेष गायधनी यांनी केले.

आरक्षणबाधीत शेतकरी आणि मिळकतधारकांचा वडनेरगेट येथे रविवारी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, मधुकर गायकवाड, नाशिकरोडचे सभापती केशव पोरजे, तानाजी जायभावे, शिवाजी म्हस्के, अर्जुन काठे, सोमनाथ बोराडे, संजय माळोदे, नितीन निगळ व्यासपीठावर होते.

संजय पोरजे यांनी स्वागत केले. माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे यांनी प्रास्तविकात शेतकऱ्यांऐवजी बिल्डरांवर आरक्षण घालण्याची मागणी केली. गायधनी म्हणाले की, वडनेरला १९६५ साली ग्रामपंचायत होती. तेव्हा मंजूर झालेला घरांचा लेआऊट अधिकृत असल्याने चिंता करू नये. १९९३ च्या आराखड्यात येथून बायपास गेला तेव्हाच शेतकऱ्यांनी १२७ कलमानुसार प्रशासनाला नोटीसा दिल्या पाहिजे होत्या. ग्रीन झोनमध्ये घरे असतानाही आक्षेप घेतला नाही. या नोटीसांना प्रशासनाने ११ वर्षात उत्तर दिले नाही तर कायनद्यानुसार आरक्षण वगळले जाते. नोटीसा देण्याची ही शेवटची संधी आहे. वडनेर बायपासवर टॉवरखाली घरे, रस्ता आहे. येथे अल्पभूधारक आहेत. त्यांना भूमीहीन करता येत नाही. हा रस्ता १८ मीटरच रहावा म्हणून आम्ही प्रशासनाकडे आग्रह धरला. मात्र, काही लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात जाऊन ६० मीटरचा रस्ता मंजूर करून घेतला. कायदेशीर मार्गाने वडनेरबायपासला तीव्र विरोध करा. बिल्डरांना जमिनी न विकता स्वतःच विकास करा. महेंद्र पोरजे यांनी आभार मानले. प्रभाकर पाळदे, शांताराम पोरजे, दत्तू पोरजे, संजय पोरजे, रामदास कर्डिले, डॉ. रुपेश संकलेचा आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images