Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हजयात्रेचे अनुदान जातयं कुठे?

0
0

खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक

दरवर्षी हज कमिटीमार्फत सौदी अरेबियातील पवित्र मक्का शरीफ येथे लाखोंच्या संख्येने मुस्लिम भाविक हजयात्रेसाठी जातात. या यात्रेसाठी केंद्र सरकारकडून अनुदान (सबसिडी) देखील दिले जाते. मात्र, विमान कंपनीकडून अव्वाच्या सव्वा दर आकारला जात असल्याने या अनुदानाचा भाविकांना लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. हजयात्रेसाठी दिले जाणारे अनुदान जाते तरी कुठे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पवित्र मक्का शरीफ येथे एका वेळी सुमारे वीस लाख भाविक जाऊ शकतात. यापैकी एक लाख ३६ हजार भाविक एकट्या भारतातून जातात. मागील वर्षी सरकारने वार्षिक अर्थसंकल्पात ६९१ कोटी रुपये हजयात्रा अनुदान म्हणून मंजूर केले. त्यानुसार हजयात्रेला जाणाऱ्या देशातील प्रत्येक भाविकाच्या वाट्याला ५०.८ हजार रुपये सबसिडी म्हणून आले.

हजयात्रेसाठी एका भाविकाला एक लाख ८० हजार रुपये द्यावे लागतात. त्यातून ३४ हजार रुपये (२१०० रियाल) भाविकाला व्यक्तिगत खर्चसाठी मक्का शरीफ येथे पोचल्यावर दिले जाते. १ लाख ८० हजारांमधून ३४ हजार कमी झाल्यामुळे १ लाख ४६ हजार रुपये हजयात्रेसाठी एक भाविकामागे केंद्र सरकारला प्रत्याक्षात अदा करावे लागतात.

मुबंई ते जेद्दाह परतीच्या विमान भाडे २५ हजार रुपयांपेक्षाही कमी आहेत. दुसरीकडे भाविकांना हजयात्रा पूर्ण होईपर्यंत जेवण, टॅक्सी, बस भाड्याचा खर्च व्यक्तिश: खर्च करावा लागतो. सरकारकडून हजयात्रेसाठी अदा करण्यात आलेल्या एक लाख ४६ हजार रुपयांतून होणारा खर्च देखील चकीत करणारा आहे. यात विमान प्रवासभाडे २५ हजार, मक्का शरीफ येथे २५ दिवस राहण्याचा खर्च ५० हजार, मदिना शरीफ येथे १५ दिवस राहण्याचा खर्च २० हजार आणि अन्य खर्च २५ हजार असा एकूण १ लाख २० हजार रुपये खर्च होतो.

एका भाविकाचा हजयात्रेचा संपूर्ण खर्च एक लाख ४६ हजार रुपये वसूल केला जातो. मात्र, प्रत्याक्षात एक लाख २० हजार रुपयेच खर्च होत असल्याचे दिसून आले आहे. सबसिडीचा एकही पैसाचा फायदा भाविकांना होत नाही. उलट एकेका भाविकाकडून सरकारला सुमारे २५ हजार रुपये अधिक दिले जात आहेत.

सत्य परिस्थिती वेगळीच

हजयात्रेचा संपूर्ण खर्च भाविकांना करावा लागत असेल तर हजयात्रेसाठी दिले जाणारे सरकारी अनुदान जाते कुठे? केंद्र सरकार तर दरवर्षी वार्षिक अर्थसंकल्पात कोट्यवधींचे अनुदान मंजूर करते व ती रक्कमही खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखविले जाते. मग ही रक्कम कुठे चखर्च केली जाते? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे मुस्लिम समाजाला हजयात्रेसाठी दिले जाणारे सरकारी अनुदानाविषयी काही पक्ष व संघटनांकडून टीकेचा सूर उमटतो. मात्र, सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


LBT ची बाराशे बँक खाती सीलच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुदत संपूनही एलबीटीचे विवरण सादर न करणाऱ्या शहरातील २,१४४ पैकी १,२३० व्यापाऱ्यांनी दंड भरला नसल्याने त्यांची बँक खाती ही तीन महिन्यापासून सील आहेत. तर ९१४ व्यापाऱ्यांनी एक कोटी सहा लाखाचा दंड भरला आहे. बँक खाती सील असूनही दंड न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात महापालिका आक्रमक झाली आहे. अभय योजनेतही या व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला नाही तर आता दंडासह एलबीटीच्या वसूलीसाठी बँक खाती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

एलबीटीचे विवरण पत्र सादर न करणाऱ्या २,१४४ व्यापाऱ्यांची बँक खाती महापालिकेन सील केली होती. कारवाईनंतर ९१४ व्यापाऱ्यांनी पाच हजार रुपये दंडाची रक्कम भरून आपली खाती कायम करून घेतली. तर काही व्यापाऱ्यांनी भीतीपोटी दंड भरल्याने महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी सहा लाखाची रक्कम जमा झाली होती. मात्र, बँक खाती सील होऊनही तब्बल १२३० व्यापाऱ्यांनी अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. त्यांचे बँक खाते अद्यापही सील आहेत. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे अशा व्यापाऱ्यांसाठी राज्य सरकारने अभय योजना सुरू केली आहे. या योजनेत अर्ज करून आपल्यावरील दंडात्मक कारवाई टाळली जावू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपड्यांमधील मुले शिक्षणाच्या प्रवाहात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाठीवर पोट घेऊन पायपीट करणाऱ्या अस्थिर कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी शहरातील काही संस्था सरसावल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षणापासून तुटू पाहणारी सुमारे हजार मुले पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या संस्थांची धडपड सुरू आहे. यासाठी शहरातील १२८ स्लम्स परिसरात कार्यकर्त्यांची पायपीट सुरू आहे.

'तुम्हाला कुठेही रस्त्यावर, वस्त्यांमध्ये, बांधकामाच्या ठिकाणी, गंगेवर, दुकानांमध्ये कुठेही लहानी मुलं दिसली तर त्यांना विचारा तुम्ही शाळेत जातात का? अन् उत्तर नाही असंच आलं तर त्वरित ८९८३३३५५५५ या क्रमांकावर संपर्क साधा. आम्ही त्यांना शाळेत दाखल करू', असे आश्वासन एव्हरी चाईल्ड काऊंट्स या संकल्पनेने दिले आहे.

शहराच्या विविध सेवावस्तींमध्ये शाळाबाह्य मुलं कुणालाही आढळून आल्यास त्याने हेल्पलाईनवर संपर्क साधावा अन् त्यानंतर या उपक्रमात सहभागी असणारे स्वयंसेवक त्या-त्या वस्तीमध्ये पोहचून मुलांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. यानंतर या मुलांना महापालिकेच्या शाळेत दाखल करण्यात येईल. शाळेच्या प्रवाहात आणल्यानंतर सलग पुढील सहा महिन्यांपर्यंत या त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल अद्यावत ठेवला जाईल.

उद्योजकांनीही घ्यावा पुढाकार

या प्रकल्पासाठी आगामी वर्षभरात सुमारे ८ लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठीही बससेवेची गरज पडणार आहे. यासाठी उद्योजक व कंपन्यांनी पुढाकार घेऊन प्रकल्पास पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपणही होऊ शकता सहभागी

या उपक्रमाच्या आयोजनासाठी इस्पॅलियर स्कूल, येस यंग एज्युकेशनल सोसायटी, मनपा शिक्षणमंडळ, कामगार विभाग आणि राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांचे पाठबळ लाभले आहे. तरीही यासाठी प्रत्येक नाशिककर नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. प्रायोगिक तत्वावर पुढील वर्षभरासाठी चालविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी विविध माध्यमातून नागरिकही योगदान देऊ शकणार आहेत. या उपक्रमाच्या प्रचारासाठी वितरित करण्यात येणाऱ्या साहित्यावर मदत करणाऱ्या संस्थेचे नाव, लोगो आदी बाबी छापण्यात येणार आहेत. याशिवाय उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वयंसेवकांना विविध कारणांसाठी येणाऱ्या खर्चातही नागरिकांना वाटा उचलता येईल, असेही आवाहन प्रकल्प समन्वयक हेमंत भामरे आणि शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसैनिकांच्या भेटीला येणार संपर्कप्रमुख

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नियुक्तीपासूनच तीन महिने गायब असलेले शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अजय चौधरी येत्या शुक्रवारपासून (दि. २२) दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. इगतपुरी, सिन्नर, देवळाली व नाशिक शहरातील तिनही विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षाच्या संघटनात्मक रचना व मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला होता. संघटनेतील वादविवाद आणि गटतट वाढले. त्यामुळे संघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि वादविवाद थंड करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर जिल्ह्यातील संपर्कप्रमुख बदलले. पूर्वीचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्याऐवजी नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी स्वतंत्र संपर्कप्रमुख दिले. नाशिकची जबाबदारी ठाणे जिल्ह्यातील शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे देण्यात आली. नियुक्तीनंतर चौधरींनी नाशिककडे ढुंकूनही बघितले नाही. नाशिकभेटीचे सोडाच, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी साधी फोनवरही विचारपूस केली नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत त्यांनी लक्ष घातले नाही. तसेच, सध्या सुरू असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. यासंदर्भात मटाने ८ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत चौधरींनी नाशिकच्या दौऱ्याचे नियोजन केले असून आता २२ आणि २३ मे असे दोन दिवस नाशिकला मुक्कामी येणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या संघटनेच्या कामाचा आणि राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहेत. दौऱ्याचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

चौधरी यांच्या दौरा नियोजनासाठी शिवसेना कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, महिला आघाडीच्या शामला दीक्षित यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

असा असणार दोन दिवसीय दौरा

चौधरी यांचे शुक्रवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता इगतपुरी येथे स्वागत होईल. तेथेच शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळावा होणार आहे. दुपारी ३ वाजता सिन्नर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आणि सायंकाळी ६ वाजता देवळाली येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळावा होणार आहे. नाशिक शहरातील पूर्व, पश्चिम व मध्य विधानसभा मतदारसंघात शनिवारी (दि. २३) बैठका होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनींच्या अपहरणाचा उद्देशच होईना स्पष्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चार वर्षीय नंदिनी शर्माच्या अपहरणकर्त्याचा कोणताही मागमुस पोलिसांना लागलेला नाही. सातपूर अंबड लिंकरोडवरील घराच्या अंगणातून चार दिवसांपूर्वी नंदिनीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी मागील चार दिवसात अपहरणाचा नेमका उद्देश पोलिसांना समजला नसून, त्यामुळे तपास कामाला खिळ बसली आहे.

अंबड-लिंकरोडवरील इस्सार पेट्रोलपंपाजवळील बापुशेट नागरगोजे यांच्या घरात भाडेकरून म्हणून राहणाऱ्या महेंद्र शर्मा यांच्या ४ वर्षीय मुलीचे १५ मे रोजी सकाळी अपहरण करण्यात आले. घटनेच्या दिवशी अपह्त मुलगी नंदिनी, तिची मोठी बहिण अंजली (वय ६) तसेच भाऊ कृष्णा खेळत होते. एका सफेद कारमधून आलेल्या आणि हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तिने नंदिनीचे तोंड दाबून कारमधून पळ‌विले. या घटनेस आता चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. पोलिसांनी तातडीने सहा पथके तैनात करून चौकशी सुरू केली. सर्व शक्यता गृहीत पकडून सहा पथकांच्या मदतीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली. शर्मा कुटुंबियांना त्रास देण्याचा उद्देश असता तर अपहरणकर्त्यांनी तेथेच खेळणाऱ्या कृष्णाला सोबत घेतले असते. मात्र, त्यांनी असे केले नाही. त्यामुळे हे प्रकरण वेगळे असू शकते. सध्या तपास सुरू असून समोर येईल त्या माहितीच्या आधारावर काम केले जात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेचा प्रस्ताव महासभेत गाजणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेची महासभा मंगळवारी महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली होत असून, प्रस्ताव‌ित २६६ कोटीच्या मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव ३६ कोटीच्या मंजुरीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिकेवर या योजनेमुळे तब्बल १०५ कोटीचा भार येणार आहे. तर ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद असून, या प्रकियेला शिवसेना आणि भाजप विरोध करणार आहे. सोबतच जकातीचे खाजगीकरणासह नासर्डीचे नंदीनी नामकरणाचाही प्रस्ताव सदस्यांच्या वतीने महासभेवर ठेवण्यात आला आहे.

महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महासभेत विकासकामांचे विविध विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. या महासभेत विशेषता नाशिक शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेच्या विषयावर चर्चा केली जाणार आहे. मुकणेच्या १८ किलोमीटर पाइपलाईन योजनेचे काम एल अॅन्ड टी या कंपनीला देण्याचा निर्णय झाला असून, ही निवीदा तब्बल ३६ कोटी रुपये वाढीव दराने देण्यात आली आहे.

जवाहरलाल नेहरू नागरी पुर्नरुथ्थान योजनेअंतर्गत २३० कोटी रुपये योजनेसाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र तांत्रिक मुल्यांकनात ही किंमत २९३ कोटीपर्यंत केली होती. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने या योजनेचे मुल्यांकन हे २६१ कोटीपंर्यत केले होते.

तडजोडी नंतर एल अॅन्ड टीने ही रक्कम २६६ कोटी रुपये निश्च‌ित केली आहे. या योजनेसाठी ५० टक्के निधी केंद्र, २० टक्के महापालिकेचा वाटा हा ३० टक्के आहे. त्यामुळे वाढीव ३६ कोटीच्या रकमेला प्रशासकीय मंजूरी मिळण्यासाठीचा प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात आला आहे.

सत्ताधारी मनसेची या योजनेला अनुकूलता असली तरी, शिवसेना भाजपचा मात्र या योजनेला विरोध आहे. राष्ट्रवादीनेही या योजनेला पा‌ठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सेना-भाजप या योजनेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे. निवीदा प्रक्रिया संशयास्पद असून, रक्कम वाढविण्यात आल्याचा आरोप शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.

योजनेला आमचा विरोध नसून, योजनेच्या प्रक्रियेला आमचा विरोध असल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे. त्यामुळे महासभेत शिवसेना या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. तर भाजपचीही हीच भुमिका राहणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना हा प्रस्ताव मंजूर करताना नाकीनऊ येणार आहे.

१०५ कोटीचा भार

मुकणेची ही मुळ योजना २३० कोटी रुपयांची आहे. या योजनेत महापालिकेचा वाटा हा ३० टक्के राहणार आहे. त्यामुळे ३० टक्के वाट्याप्रमाणे महापालिकेला ६९ कोटी रूपये आपल्या तिजोरीतून द्यावे लागणार आहेत. तर त्यात वाढीव ३६ कोटीचा अतिरिक्त भार येणार आहे. त्यामुळे महापालिकेला या योजनेसाठी तब्बल १०५ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. सद्यस्थितीत महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे १०५ कोटीचा निधी उभारताना नाकीनऊ येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगावकरांवर शोककळा...

0
0

हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत

पाच नामवंत डॉक्टर कोकणगावजवळ भीषण कार अपघातात जागीच ठार झाल्याने पिंपळगाव शहरावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर पिंपळगाव बसवंत येथील नागरिकांनी दिवसभर बंद पाळला.
नाशिक येथील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे पिंपळगाव बसवंत येथील डॉक्टरांसाठी कम्युनिक मेडिकल एज्युकेशन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारला उपस्थित राहण्यासाठी डॉ. चंद्रशेखर गांगुर्डे, डॉ. प्रताप शेळके, डॉ. सूरज पाटील, डॉ. उमेश भोसले, डॉ. वैभव पुस्तके व डॉ. अरुण गचाले हे सहा जण डॉ. सूरज पाटील यांच्या कारने नाशिकला आले होते. रात्री दोन वाजता डॉ. पुस्तके हे घरी पाहोचले. मात्र उर्वरित सहाही डॉक्टर तीन वाजेपर्यंत पोहोचले नव्हते. डॉ. श्रध्दा सूरज पाटील यांनी डॉ. पुस्तके यांना याबाबत विचारणा केली. या सहाही डॉक्टरांचे फोन लागत नव्हते. अपघातग्रस्त कारमधील डॉ. भोसले यांनी अपघाताची मा‌हिती दिली. यानंतर घटनास्थळी डॉक्टर व पोलिसांनी धाव घेतली.

कारचे दरवाजा कापून डॉ. भोसले यांच्यासह डॉ. चंद्रशेखर गांगुर्डे, डॉ. प्रताप शेळके, डॉ. सूरज पाटील, डॉ. संजय तिवारी यांना बाहेर काढण्यात आले. डॉ. भोसले यांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले. हे वृत्त गावात पसरताव नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. सकाळी दहा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यता आले. तेथे उपस्थित असणाऱ्यांना अश्रू आवरत नव्हते. गावावर शोककळा पसरल्याने दिवसभर गावातही शांतता अन् अपघाताची चर्चा होती.

सेमिनारला जाताना डॉ. सूरज पाटील यांच्या कारमधून गेलो होतो. परतातना डॉ. रोहन पोरे यांच्या कारमधून आलो. माझा पुनर्जन्म झाला असून, यापुढील आयुष्य बालरुग्णांसाठी समर्पित करणार आहे. जीवलग सहकाऱ्याचे अकाली जाणे आयुष्यभर बोचत राहील.

-डॉ. वैभव पुस्तके, बालरोग तज्ज्ञ

डॉक्टरांचा परिचय

डॉ. संजय तिवारी (एम डी) हे नामवंत ह्दयरोग तज्ज्ञ होते. संजीवनी हॉ‌स्पिटल ते चालवित होते. वीस वर्षांपासून वैद्यकीय सेवा करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. वडिलांच्या आजाराचे निदान न झाल्याने डॉक्टर बनण्याचा निर्धार केला. हजारो रुग्णांचे उपचार करून प्राण वाचविले.

डॉ. चंद्रशेखर गांगुर्डे एमबीबीएस होते. बालरोग तज्ज्ञ म्हणून १८ वर्षांपासून सेवा करीत हजारो बालकांना जीवदान दिले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ, बहिण असा परिवार आहे. पिंपळगावमध्ये त्यांचे चिरंजीव हॉस्पिटल आहे.

डॉ. सूरज पाटील (एमबीबीएस डीजीओ) हे स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती तज्ज्ञ होते. वडिल सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. पत्नी डॉ. श्रध्दा पाटील या सोनोग्राफी व एक्स रे तज्ज्ञ आहेत. भाऊ संदेश पाटील हे डॉक्टर आहेत. पिंपळगावमध्ये त्यांचे गिरीजा हॉस्पिटल आहे.

डॉ. कुंदन जाधव (एमबीबीएस डीजीओ) हे प्रसूती व फर्टीलरी सेंटर चालवायचे. पत्नी डॉ. कविता जाधव या स्त्री रोग तज्ज्ञ आहे. त्यांचे पिंपळगावला गायश्री हॉ‌‌स्पिटल आहे. डॉ. कुंदन जाधव यांच्या पश्चात पत्नी, आई, वडिल, मुलगी असा परिवार आहे. पाच वर्षांपासून ते वैद्यकीस सेवा करीत होते.

डॉ. प्रताप शेळके (एमबीबीएस डीजीओ) हे स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ म्हणून सेवा करीत होते. त्यांच्या पत्नी डॉ. विजया शेळके या पॅथॉलॉजिस्ट आहेत. अठरा वर्षांपासून डॉ. शेळके हे वैद्यकीय सेवा बजावत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. पिंपळगावमध्ये त्यांचे शेळके हॉस्पिटल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४.५ महिन्यांत अपघाती मृत्यूची शंभरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असून, गेल्या साडेचार महिन्यांत विल्होळी ते पिंपळगाव बसवंत मार्गावर २० जणांनी जीव गमावला आहे. विशेष म्हणजे शहरातील रस्त्यांवर याच कालावधीत ८५ जणांनी जीव गमावला. रस्ते प्रशस्त होत असले तरी वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन आणि वेगमर्यादा पाळली जात नसल्याने बहुतांश अपघात झाल्याची माहिती पुढे येत आहे.

'अति घाई संकटात नेई' असे म्हटले जात असले तरी वाहनचालक वेगमर्यादा पाळत नसल्याचे वास्तव अनेक घटनांवरून सातत्याने समोर आले आहे. सोमवारी पहाटे मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणजवळ झालेल्या अपघातात पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला. दोनच दिवसांपूर्वी घोटी येथील जनसेवा बँकेचे चेअरमन मिलिंद वालतुले यांचे देखील महामार्गावरील उड्डाणपूलावर अपघाती निधन झाले. गेल्याच आठवड्यात पाथर्डी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात पत्रकार प्रियंका डहाळे हिच्यासह तिघांनी जीव गमावला. महामार्गावर अशा अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र याबाबत ठाोस ‌विचार हाोताना ‌दिसत नाही.

शहरातील पोलिस स्टेशन्समध्ये झालेल्या नोंदीनुसार गेल्या साडेचार महिन्यांमध्ये ८५ हून अधिक जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मोटरसायकलस्वार तरूणांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही २५ मृत्यू गेल्या दीड महिन्यात झाले आहेत. बेदरकारपणे तसेच मद्य पिऊन वाहने चालविणे हे अशा अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याची माहिती पुढे आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अशा अपघाती मृत्यूंमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. रस्त्यांचे रूंदीकरण तसेच डागडूजी झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढल्याचे पहावयास मिळते आहे.

गेल्या साडेचार महिन्यांत सुमारे २२५ अपघात झाले असून, त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची तसेच जखमींची संख्या २७५ हूनही अधिक झाली आहे. अशा अपघातांमध्ये १२५ जण गंभीर जखमी झाले असून, ६० हून अधिक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेच्या धडकेने बिबट्या ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

भगूर-लहवित रोडवरील रेल्वे लाईनवर सोमवारी पहाटे मुंबईकडे जाणाऱ्या पोल नं. ६०/६२, १७७ किलोमीटरवर प्रवासी रेल्वे गाडीला धक्का लागल्यामुळे सुमारे ६ वर्षाचा बिबट्या मृत्युमुखी पडला. उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत असल्याने २ महिन्यांपासून देवळालीच्या बार्न्स स्कूल परिसरात लष्कराच्या हद्दीतील जंगलात बिबट्यांचा वावर वाढला असल्याची माहिती मिळाली होती. बिबट्याने १५ मे रोजी चौधरी यांच्या मळ्यात शेळी व डुक्कर फस्त केले होते. परिसरातील नागरिकांनी आरडओरडा करताच बिबट्याने पळ काढला होता. मध्यरात्री पाण्याच्या शोधार्थ बिबट्याने दारणा काठी गेला. तिकडून परतत असतांना भगूर-लहवित रस्त्यावर डोंगरे यांच्या मळ्यालगत रेल्वे लाईन ओलांडून बिबट्या जात होता. रेल्वेचा अंदाज न आल्याने त्याचा चेहरा व कपाळावर गंभीर मार लागला. बिबट्याचा जागीज मृत्यू झाला. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप भामरे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, वनपाल एम. एस. गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. दारणाकाठ परिसरातील देवळालीसह भगूर, पांढुर्ली, वंजारवाडी, लोहशिंगवे, लहवित, दोनवाडे, शिवडा आदी गावांमध्ये बिबट्यांचा वावर असल्याने कांही गावांमध्ये वनविभागाने पिंजरा देखील लावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याला कोणी जुमानेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आमच्याकडे पाहून का हसला?' किंवा 'खून्नस का दिली?' तसेच प्रेमप्रकरणावरून खून होण्याच्या एकामागून एक घटना शहरात घडत आहेत. चालू वर्षात आजवर १८ खूनाच्या घटना घडल्या असून, यातून पोलिस तसेच कायद्याची धास्तीच नागरिकांच्या मनातून कमी होताना दिसते आहे.

हसण्याच्या किरकोळ कारणावरून चौघाजणांनी कार्बन नाक्याजवळ एकाचा खून केला. संतोष प्रमोद सिंग (२८) असे मयताचे नाव आहे. कार्बन नाक्यासमोर वडापाव गाडीजवळ उभे असताना 'आमच्याकडे पाहून का हसला' अशा किरकोळ कारणावरून संतोषवर चौघाजणांनी हल्ला केला होता. विशेष म्हणजे संशयित आरोपीं​चा पूर्व इतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा नाही. या घटनेपूर्वी मुलीच्या प्रेमसंबंधातून चौघा जणांनी मिळून आनंद संजय खणके या वीस वर्षीय तरूणाचा खून केला. पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरातील ओमकार किरणा दुकानाजवळ ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी योगेश राजाभाऊ जाधव, राष्ट्रपाल विलास नरवडे व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच दोघा संशयितांना अटक केली. मयत व संशयित आरोपी हे मित्र होते. अनेक वर्षापासून मित्रत्वाचे संबंध असताना किरकोळ कारणातून आनंदला ​जीव गमवावा लागला. मागील महिन्यात सातपूरमधील फाशीच्या डोंगराजवळ संतोष नामदेव कसबे (३०) या रिक्षा चालकाचा निघृण खून करण्यात आला. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच अमोल मोहिते या तरूणाचा तिघा संशयितांना खून केला.

जेलरोड, देवळालीगाव आदी ठिकाणी खूनाच्या घटना घडल्या आहेत. प्राणघातक हल्ले व दुखापतीच्या घटनांमध्ये देखील शहरात वाढ होते आहे. याबाबत बोलताना झोन दोनचे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले की, खूनाच्या अनेक घटना तत्कालीन कारणातून घडतात. परिचीत, नातेवाईक, मित्र यांच्याकडूनच खूनाच्या घटना घडण्याचे प्रकार घडत आहेत. अगदी दोन मिन‌िटांचाही कालावधी खून करण्यास पुरेसा ठरतो. झोपडपट्टी, बेकारी, स्थलांतरीत असे प्रश्न यामागे असून, पोलिस आपल्यापरीने काम करीत असल्याची पुष्ठी पाटील यांनी दिली. अशा घटनांना रोखण्यासंदर्भांत नागरिकांनी पुढाकार महत्त्वाचा ठरतो. त्यांच्याशी संवाद साधला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन राबवले जाते. तसेच इतर उपाययोजना सुरू असल्याचा दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात त्याने कोणताही फरक पडत नसल्याचे दिसून येते. यापूर्वी, पोलिसांचा सकारात्मक दबाव तयार झाला होता. त्यात माजी पोलिस आयुक्तांसह सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तांच्या कामाचा वाटा महत्वपूर्ण होता. मोबाइल तसेच वाहनचोरीच्या गुन्ह्यांची नोंदच होत नसल्याने कुंभमेळ्यापर्यंत कायदा व सुव्यवस्था अधिक बिकट होण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रामसडक’ची ८० टक्के कामे ठप्प!

0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

पंतप्रधान ग्रामसडक योजनेला निधी देण्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने आखडता हात घेतल्याने जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात ही कामे ठप्प होऊ लागली आहेत. आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक कामे निधीअभावी बंद पडली आहेत. पावसाळ्यापूर्वीच कामे रखडल्याने ग्रामीण भागात दळणवळणाचा बोजवारा उडत आहे.

खेडोपाड्यातील रस्त्यांना एकमेकांशी तसेच मुख्य मार्गांशी जोडणारी पंतप्रधान ग्रामसडक योजना ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना देण्यासाठी संजीवनी ठरली. १४ वर्षांपासून अखंडीतपणे योजना कार्यान्वित असल्याने ग्रामीण भागातील रस्ते कात टाकू लागले आहेत. योजनेंतर्गत प्रस्तावित कामांसाठी सरकारकडून १०० टक्के ‌निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने ठेकेदारांनाही कामाच्या गुणवत्तेची हमी द्यावी लागते. राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान २० ठेकेदार या योजनेंतर्गत कामांचे टेंडर घेतात. वेळवर पैसे मिळत असल्याने ठेकेदारही टेंडर घेण्यास उत्सुक असत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ठेकेदारांना बिलेच मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे यंदाही सुमारे अडीच हजार कोटींची कामे प्रस्तावित असताना केंद्रातील ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी केवळ तीनशे कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे स्पष्ट केल्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. पूर्वीचेच पैसे येणे असल्याने त्यांनी ही कामेच न करण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. म्हणूनच आहे त्या परिस्थितीत कामे थांबविण्यात आली आहेत. जिल्ह्यापुरतेच सांगायचे तर येथील ४५ हून अधिक कामे ठप्प आहते.

जिल्ह्यात पेठ येथे आठ, सुरगाण्यात आठ, इगतपुरीमध्ये सहा, मालेगाव, चांदवड, येवला आणि सिन्नरमध्ये प्रत्येकी दोन, सटाण्यात तीन, देवळ्यात एक तर अन्य काही तालुक्यांमधील कामे बंद पडली आहेत. अहमदनगरसह जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. नगर जिल्ह्यातील ठेकेदारांचे शासनाकडे गेल्या सहा महिन्यांपासून ३० कोटी रूपये अडकले आहेत. अकोले, राहाता, राहुरी, कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूरसह जिल्ह्यातील काही भागात ७० कोटींची कामे सुरू होती. त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक कामे बंद पडल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या जिल्ह्यात काही कामांचे केवळ डांबरीकरणच बाकी होते. निधीअभावी ते होऊ न शकल्याने या रस्त्यांवरील मुरूम बाहेर येऊ लागला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर असे प्रकार घडू लागल्याने रस्त्यांची अधिकच दुरवस्था होणार असून त्यासाठी केलेला खर्चही पाण्यात जाण्याची शक्यता बळावली आहे.

विमानतळाचाही मार्ग खडतर

सुरगाणा तालुक्यात उंबरठाण, भूशी, राशा व चूली असा साडेसात किलोमीटरचा रस्ता गेल्या ७० वर्षांत बनू शकलेला नाही. अतिदुर्गम भाग, अंगावर येणारी चढण, चढ उताराचा रस्ता यामुळे येथे पोकलेन, जेसीबीसह अवजड मशिनरी वापरावी लागणार असल्याने हे काम स्वीकारण्यास कुणीही तयार नव्हते. आठ वेळा टेंडर काढूनही ठेकेदार तिकडे फिरकत नव्हते. अखेर गेल्यावर्षी एका ठेकेदाराने चार कोटी ९० लाख रुपयांचे टेंडर स्वीकारले. रस्त्याचे काम सुरू झाले मात्र ठेकेदाराची लाखो रुपयांची बिलं सहा महिन्यांपासून थकल्याने हे कामही थांबविण्यात आले आहे. जानोरी गावाजवळील विमानतळापर्यंत घेऊन जाणाऱ्या दिंडोरी-अक्राळे या दहा किलोमीटर रस्त्याच्या रूंदीकरणासही निधीअभावी ब्रेक लागला आहे. तीन मीटर रुंदीचा हा रस्ता साडेपाच मीटर रूंदीचा करण्यात येत होता. मालेगाव तालुक्यातील दोन रस्त्यांची कामेही बंद पडली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणे पाणीपुरवठा योजनेला स्थगिती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहराला पाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेला नगरविकास राज्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. निविदा प्रक्रियेतील अनियमिततेसंदर्भात नाशिकमधील आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सोमवारी या योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

महत्त्वाचे म्हणजे मंगळवारी या योजनेच्या वाढीव ३६ कोटींच्या निधीसाठी महासभा होत आहे. त्यामुळे ही योजना आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. या योजनेसाठी राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना तसेच भाजपने केलेला आहे. निविदाप्रक्रियेत अटी शर्ती बदलण्यात आल्या असून, योजनेची किमंतही जास्त दाखविण्यात आली आहे. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याने शिवसेना खासदार हेमंत गोडसे, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, आमदार बाळासाहेब सानप यांनी या प्रक्रियेबद्दल आक्षेप घेतला होता. नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आमदार सानप यांच्या पत्राच्या आधारे योजनेला स्थगिती दिली आहे. महापालिका आयुक्तांना स्थगितीचे आदेश मिळाले आहेत. त्यामुळे योजनेचे काम थांबणार आहे. मुकणे धरणातून पाणी उचलण्यासाठी थेट धरणातून पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.जवाहरलाल नेहरू नागरी पुर्नरुत्थान योजनेअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २३० कोटी रुपयांची ही योजना मंजूर केली आहे.त्यात केंद्राचा वाटा ५० टक्के,राज्याचा २० तर महापालिकेचा ३० टक्के वाटा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच डॉक्टरांवर वेगाचा घाला

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

मुंबई-आग्रा हायवेवर कोकणगाव फाट्याजवळ सोमवारी पहाटे तीन वाजता झालेल्या भीषण अपघातात पिंपळगाव बसवंत येथील पाच नामवंत डॉक्टर जागीच ठार झाले, तर डॉ. उमेश भोसले गंभीर जखमी झाले. डॉ. संजय तिवारी (वय ४७), डॉ. चंद्रशेखर भास्करराव गांगुर्डे (वय ४५), डॉ. प्रताप शेळके (वय ४६), डॉ. सुरज साहेबराव पाटील (वय ४०) व डॉ. कुंदन जाधव (वय ३४) अशी मृतांची नावे आहेत. डॉ. भोसले यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

शहरातील पाच नामवंत डॉक्टरांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण परिसर हेलावून गेला. सोमवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील एक सेमिनार आटोपून वरील सहाही जण डॉ. सुरज पाटील यांची महिंद्र एसयूव्ही (एमएच १५ ईपी ०८७१) ने पिंपळगाव बसवंतकडे येत होते. कोकणगाव फाटा येथे गतिरोधक असल्याने एसयूव्ही कारच्या पुढे असलेल्या लक्झरी बसने ब्रेक दाबत वेग कमी केला. ही बाब गाडी चालवत असलेले डॉ. शेळके यांच्या लक्षात न आल्याने त्यांची भरधाव वेगात असलेली एसयूव्ही कार बसच्या मागील बाजूवर आदळली. धडक इतकी भीषण होती, की कारचा चक्काचूर होऊन पाच डॉक्टर जागेवर ठार झाले, तर कारच्या मागील भागात बसलेले डॉ. भोसले जखमी झाले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरच्या सहाय्याने कारचे दरवाजे कापावे लागले. ड्रायव्हर सीटवर असलेल्या डॉ. शेळके यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तास लागले.

एसयूव्हीचा वेग अधिक असल्याने भीषण अपघात घडला. अपघाताचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत ऐकू गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शहरातील पाचही नामवंत डॉक्टरांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पिंपळगाव शहरातील नागरिक, व्यापारी यांनी दिवसभर बंद पाळला. डॉ. तिवारी, डॉ. पाटील, डॉ. शेळके, डॉ. जाधव यांच्यावर पिंपळगाव बसवंत येथे, तर डॉ. गांगुर्डे यांच्यावर सोग्रस (ता. चांदवड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेऊन गेला.

आम्ही रात्री तीन वाजता अपघातस्थळी पोहचलो. गाडीच्या मागील बाजूच्या काचा तोडून जखमी अवस्थेतील डॉ. भोसले यांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून कटरच्या सहाय्याने पत्रा कापून इतर डॉक्टरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अज्ञात वाहनाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमद बेग, एएसआय, ओझर पोलिस ठाणे

१८ मे

मालेगाव-चांदवड मार्गावर युवक ठार, ९ जण जखमी

१५ मे

पाथर्डी फाट्याजवळ जनसेवा बँकेचे (घोटी) चेअरमन मिलिंद वालतुले ठार, तीन जखमी

कळवण-नांदुरी रस्त्यावर २ ठार, सहा जखमी

१२ मे

मुंबई-आग्रा हायवेवर उड्डाणपुलावर पत्रकार प्रियंका डहाळेसह तिघे ठार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांच्या जिल्ह्यात गावे तहानलेली

0
0


प्रवीण बिडवे, नाशिक

सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून शेखी मिरविणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील १०२ गावे आण‌ि १६९ वाड्या तहानेने व्याकूळल्या आहेत. या गावकऱ्यांची तहान शमविण्यासाठी जिल्ह्यात ६९ टँकर फेऱ्या मारत आहेत. राज्यात पाणीटंचाईच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यातही नाशिक अव्वल आहे. शहरातील काही भागांतही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या २७१ ठिकाणी जिल्हा प्रशासन ३३ सरकारी आणि ३६ खासगी अशा ६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. सर्वाधिक भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना नांदगाव तालुक्याला करावा लागतो आहे. तेथील ११ गावे आणि ६४ वाड्यांना सध्या पाणीटंचाईने त्रासले आहे. त्याखालोखाल सिन्नरमध्ये नऊ गावे आणि ५९ वाड्यांमधील रहिवाशी पाणी टंचाईमुळे होरपळून निघाली आहेत. सर्वाधिक ३१ टंचाईग्रस्त गावे येवला तालुक्यामध्ये आहेत. फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाली असून टँकरच्या संख्येत गेल्या दोन महिन्यांत झपाट्याने वाढ झाली आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास संस्थेतर्फे जिल्ह्यातील २०३ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत भूजल पातळी सरासरी ७.०१ टक्के होती. परंतु, त्यात घट झाली आहे. नुकतीच मान्सूनपूर्व भूजल चाचणी करण्यात आली. जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाली आहे. चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर येथील भूजल पातळी सरासरी ०.१४ ते १.९४ या प्रमाणात घटली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील १६३ गावे अतिशोषित असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात २३ धरणे असून, त्यामध्ये १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. अर्थात गतवर्षीही याच प्रमाणात पाणीसाठा शिल्लक होता, असा प्रशासनाचा दावा आहे. नाशिक शहर आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मात्र अजूनही ४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा त्यामध्ये सहा टक्क्यांनी घट झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

भूजल सर्व्हेक्षण आणि विकास संस्थेतर्फे जिल्ह्यातील २०३ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत भूजल पातळी सरासरी ७.०१ टक्के होती. परंतु, त्यात घट झाली आहे. नुकतीच मान्सूनपूर्व भूजल चाचणी करण्यात आली. जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील भूजल पातळीत घट झाली आहे. चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर येथील भूजल पातळी सरासरी ०.१४ ते १.९४ या प्रमाणात घटली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील १६३ गावे अतिशोषित असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात २३ धरणे असून, त्यामध्ये १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. अर्थात गतवर्षीही याच प्रमाणात पाणीसाठा शिल्लक होता, असा प्रशासनाचा दावा आहे. नाशिक शहर आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मात्र अजूनही ४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा त्यामध्ये सहा टक्क्यांनी घट झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मचारींचा आखाडा

0
0

त्र्यंबकेश्वरमध्ये दहा आखाडे असले तरी श्री पंचअग्नी आखाडा हा इतर आखाड्यांपेक्षा काही बाबतीत वेगळा आहे. श्री पंचअग्नी आखाडा हा ब्रह्मचारींचा आखाडा आहे. या आखाड्याची स्थापना संवत ११९२ वि. आषाढ शुक्ल एकादशी इ. स. ११३६ मध्ये झाली. या आखाड्याच्या ब्रह्मचाऱ्यांना चार्तुनाम्ना असे म्हटले जाते. या आखाड्याची उपासक देवता ही सर्व संहारक अग्निदेव व गायत्री माता आहे. श्री पंचअग्नी आखाड्याचे मुख्य कार्यालय हे वाराणसी (काशी) येथे आहे. त्र्यंबकेश्वर येथे हा आखाडा ‌संत निवृत्ती महाराज समाधीस्थळ मार्गावर व गंगासागर तलावाजवळ आहे.

आखाड्याच्या शाखा

श्री पंचअग्नी आखाड्याच्या शाखा या ‌हरिव्दार, नाशिक, बरेली, उज्जैन, जालना, अहमदाबाद, त्र्यंबकेश्वर, जुनागढ आदी ठिकाणी आहेत. जुना आवाहन आखाडा व अग्नी आखाड्याची शाही पर्वणी एकाचवेळी असते.

आखाड्याचे उद्देश

इतर आखाड्यांप्रमाणे धर्म व संस्कृतीचे रक्षण करणे हे आखाड्याचे उद्देश आहेत. सध्या हा आखाडा श्री पंचअग्नी आखाडा या नावाने ओळखला जात असला तरी काही ठिकाणी हा आखाडा श्री दशनाम पंच अग्नी आखाडा या नावाने ओळखला जातो. जुना आवाहन आखाड्यानंतरचा हा सर्वात जुना आखाडा आहे.

आखाड्याची रचना

इतर आखाड्यांप्रमाणेच या आखाड्याची रचना आहे. गोपालानंद ब्रह्मचारी हे सभापती आहेत. श्रीमहंत दुर्गानंद ब्रह्मचारी हे ठाणापती आहेत.

सिंहस्थ कामे

श्री पंचअग्नी आखाड्यात सिंहस्थाची कामे संथ गतीने सुरू आहेत. निवारा शेडचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. यामुळे या महिन्याअखेरपर्यंत तरी कामे पूर्ण होणे अशक्य दिसत आहे. भिंती उभारण्यात आल्या असल्या तरी प्लास्टर व पत्रे टाकणे बाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रामकुंड परिसराला अतिक्रमणाचा विळखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने रामकुंड परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणाकडे कानाडोळा केला आहे. आगामी सिंहस्थात रामकुंड परिसरात असलेले अतिक्रमण भाविकांना त्रासदायक ठरणार आहे.

येत्या १४ जुलैपासून ध्वजारोहणाने सिंहस्थाला सुरुवात होणार आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी देश, परदेशातून महनीय व्यक्ती येणार असून, भाविकांचा ओघही मोठ्या प्रमाणात असणार आहे. रामकुंड परिसरात असलेल्या अतिक्रमणाने त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. रामकुंडाकडे जाणारे सर्व मार्ग लहान मोठ्या टपऱ्यांनी व्यापले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या व्यापाऱ्यांनीही दुकानाबाहेर अतिक्रमण केले आहे. भाविक केंद्रस्थानी ठे‍वून अनेक घरांमध्ये लहानमोठे व्यवसाय सुरू झाले आहेत. या व्यवसायामुंळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन चिंचोळ्या गल्लीबोळातून वाहने येण्या-जाण्यास त्रास होतो. घराघरात चालणारे व्यवसाय बंद करावे, त्याचप्रमाणे रामकुंड परिसरात दुकानदार हॉटेल व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

रामकुंडाच्या ज‍वळच असलेल्या चतुःसंप्रदाय आखाडा येथे पार्किंगच्या जागेत अनेक टपऱ्या आहेत. या ठिकाणी त्यांना अनेकदा विनंती करूनही महापालिकेच्या आदेशाला जुमानण्यास टपरीधारक तयार नाहीत. त्याचप्रमाणे वस्त्रांतरगृहाच्या समोर पांडे मिठाई शेजारी अनेक टपऱ्या आहेत. त्यामुळे देखील भाविकांना येण्या-जाण्यास त्रास होतो. अहिल्याराम व्यायामशाळेकडून वस्त्रांतर गृहाकडे येणाऱ्या मार्गावर लहान मोठे व्यावसायिक धार्मिक वस्तुंची विक्री करीत असतात. त्यांच्या देखील या भागात टपऱ्या आहेत. अहिल्याराम व्यायामशाळेच्या मार्गावर अनेक हॉटेलधारक दुकानदारांनी आपला माल रस्त्यावर ठेवला आहे. त्यामुळे या भागातून टू व्हीलर जाण्यास त्रास होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव बांठीया यांनी रामकुंड परिसराला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. या परिसरातील कामे तातडीने हाती घ्या, असे आदेश दिले होते. मात्र, त्यांची पाठ वळताच याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यात तीन आखाडे तर त्र्यंबकेश्वर येथे १० आखाडे प्रत्येक सिंहस्थात येतात. मागील सिंहस्थात ४४८ कोटींच्या निधीतून विकासकामे करण्यात आली होती. २०१५-१६ च्या सिंहस्थासाठी २५०० कोटींची काम होत आहे. अपर जिल्हाधिकारी स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली सिंहस्थ कामांचे नियोजन व नियंत्रण केले जात असून, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली आहे. याच कामासाठी जिल्ह्यातील महत्वाच्या खात्यांमध्येही स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साधूग्रामच्या जागेवरील, शाही मार्गावरील व रामकुंड परिसरातील अतिक्रमण तत्काळ हटविण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने मुख्य सचिवांच्या भेटी दरम्यान सांगितले होते. मात्र, अधिकाऱ्याची पाठ वळताच परिस्थिती जैसे थे आहे. गंगा, गोदावरी मंदिराला लागून फूल विक्रेत्यांनी छोट्या टपऱ्या आणून ठेवल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्या काढल्या होत्या.

राजकीय वरदहस्त

रामकुंड परिसरात वाढलेल्या अतिक्रमणास राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकाला राजकीय कार्यकर्त्याकडूनच दबाव टाकला जात असल्याने अनेकदा कारवाई थांबवली जाते. या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला मज्जाव करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तातडीने पावले उचलावीत

अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थासाठी रामकुंडाचा परिसर अतिक्रमण मुक्त करावा. त्यासाठी तातडीने पावले उचलावीत. या परिसरात अतिक्रमण होऊ नये म्हणून एका अधिकाऱ्याची नेमणूक करून जबाबदारी निश्चित करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापनाचे गिरवले धडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यात कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तरी तिचा नेटाने सामना करता यावा, यासाठी परदेशी पाहुण्यांकडून धडे देण्यास सुरुवात झाली आहे. सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा सक्तीची असून, सोमवारी पहिल्याच दिवशी ५४ अधिकारी त्यास उपस्थित होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात या तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यशाळेला सुरुवात झाली. यशदाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. युनायटेड स्टेट्स फॉरेस्ट सर्व्हिसेसचे स्टिव्ह हेल, जोसेफ रेयस आणि बालाजी सिंग चव्हाण या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांसह आरोग्य विभाग, एसटी महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, महावितरण अशा अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पहिल्या सत्रात 'इन्स्टिडन्ट रिस्पॉन्स सिस्टीम'च्या विविध पैलूंविषयी माहिती देण्यात आली. एखाद्या आपत्तीत कमी वेळात प्रतिसाद देण्यातील प्रमुख मार्गदर्शक बाबींची माहिती हेल यांनी दिली. केस स्टडिजच्या माध्यमातून दुर्घटना किंवा आपत्तीला प्रतिसाद देतांना प्राधान्यक्रम ठरविण्याविषयी विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. परिस्थितीनुसार कालबद्ध नियोजन केल्यास आपत्तीत तत्काळ प्रतिसाद देत उपाययोजना करता येते, असा विश्वास हेल यांनी व्यक्त केला.

दुसऱ्या सत्रात माहिती अधिकारी, संपर्क अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि आपत्तीच्या परिस्थितीत त्यांच्या भूमिकेविषयी माहिती देण्यात आली. प्रारंभी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते मार्गदर्शकांचे स्वागत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ म्हणजे विकासकामांची जंत्री

0
0

>> गोविंदराव मुळे

मला सन १९६७-६८ चा सिंहस्थ चांगला स्मरणात आहे. सन १९७९-८० च्या सिंहस्थ कुंभमेळ्याला विशेष गर्दी नव्हती. मी स्वतः ब्रह्मगिरी पर्वतावरील मूळ गोदावरी पूजक आहे. पूर्वीच्या सिंहस्थात शंभर ते सव्वाशे इंच पाऊस असायचा. अर्थात भरपावसात ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीच्या उगमस्थानी भाविक येत असायचे. सिंहस्थ पर्वकाल हा वर्षभर असतो. भाविकांनी ठराविक दोन महिन्यात गर्दी न करता वर्षभरात केव्हाही दर्शन, स्नान असे पर्वकालाचे पुण्य साधता येते. पूर्वीच्या सिंहस्थ पर्वकाळात नागरिक प्रतीक्षा कारायचे. सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन नाशिकसह मुंबई व परप्रांतातील प्रमुख शहरांच्या बसस्थानक व रेल्वेस्थानकात त्र्यंबकेश्वर सिंहस्थाबाबत मा‌हिती फलक लावले जायचे. सन १९९२ पासून पाहिजे त्या प्रमाणात सर्वांचा सहभाग राहिला नाही. सन २००४ च्या सिंहस्थाला व्रिकमी गर्दी झाली होती. सन १९९१-९२ आणि सन २००३-०४ या दोन सिंहस्थात नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. नियोजनात माझा सक्रिय सहभाग हाेता. सन १९९२ सिंहस्थात तत्कालीन जिल्हाधिकारी उमेशचंद्र सरंगी आणि तत्कालीन नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांनी व सहकाऱ्यांनी अथक प्रयत्नाने विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केले. अमृतकुंभ अतिथी निवास आणि अंबोली धरण पाणीपुरवठा योजना, नगरपालिका प्रशासकीय इमारत अशा महत्वाकांक्षी योजना शहरास मिळवून दिल्या. अहिल्या-गोदावरी संगम घाट विकास प्रस्ताव तेव्हाच तयार करण्यात आला होता. ही योजना सन २००३ च्या सिंहस्थात राबविण्यात आली. अर्थात पूर्वी नगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात तसेच, शासन-अधिकारी यांच्यात समन्वय होता. मात्र, अलीकडील कालावधीत तसे राहिले नाही. नागरिकांना पूर्वी विश्वासात घेऊन शासन विकासकामे करीत होते. आज त्याचा अभाव दिसून येत आहे. आजच्या परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर आला असतांना अधिकारी लोकप्रतिनिधींना बोलवत नाहीत, हे चित्र परस्परांमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट करणारे आहे. सन १९९१-९२ सिंहस्थात नगरपालिकेकडे तांत्रिकबळ नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कामे केली होती. या सिंहस्थ नियोजनात देखील तसे करावयास हवे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाह मुहूर्तांबाबत संभ्रम

0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

सिंहस्थ काळात विवाह मुहूर्त आहेत किंवा नाहीत, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सिंहस्थ काळात दीड वर्ष मुहूर्तच नसल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे. मात्र, पुरोहितांनी तसे काहीही नसल्याचे सांगतानाच सिंहस्थ काळात नोंव्हेंबरमध्ये मुहूर्त असल्याचे स्पष्ट केले आहे.

यंदा विवाहाचे एकूण ५४ मुहूर्त आहेत. अनेकांनी नोव्हेंबर, डिसेंबरच्या हिवाळ्यात मुहूर्त साधून घेतले, तसेच ज्या वधू-वरांचे सूत जुळले, अशांनी पुढील वर्षाची वाट न पाहता याच वर्षी लग्न करण्यावर भर दिला आहे. मेमध्ये सर्वाधिक १२ मुहूर्त असल्याने शहरात सध्या ठिकठिकाणी लग्नाच्या वराती पहायला मिळत आहेत. शहरातील सर्वच मंगल कार्यालये बुक झाल्याने कॉलनीत जेथे मोकळी जागा आहे, त्या ‌ठिकाणी विवाह सोहळे पार पडताना दिसत आहेत.

मुहूर्तांबाबत गोंधळच

यंदा नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे लग्नतिथी नसल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे यंदा आहे त्या लग्नतिथीलाच विवाह उरकण्याकडे पालकांचा कल आढळत आहे. मात्र, १२ जूननंतर थेट नोव्हेंबरमध्ये ते असल्याचे सांगितले.

एसटी, रेल्वेत गर्दी

सध्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. त्यामुळे एसटी, रेल्वेमध्ये नेहमी गर्दी होते. मात्र, सध्या लग्नसराईमुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नवीन बसस्थानक, रेल्वे स्टेशनवरही रात्रीच्या वेळी चांगलीच गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.

लग्न करा नाशिकबाहेर!

पुरोहित जोशी यांनी सांगितले, तर की सिंहस्थात १८ महिने विवाह नसल्याचे म्हटले जात असले तरी ते फक्त नाशिकपुरते मर्यादित आहे. सिंहस्थ ज्या ठिकाणी होत आहे, त्या ठिकाणी म्हणजेच नाशिकमध्ये सिंहस्थ सुरू झाल्यापासून १८ महिने विवाह होत नाहीत. ही परंपरा पूर्वीपासून आहे. मात्र, नाशिकव्यतिरिक्त इतर भागांत विवाह होऊ शकतात. १२ जूननंतर थेट कार्तिकी एकादशीनंतरच ‌‌विवाह मुहूर्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पा‌लिकेचे एक कोटीचे दान

0
0

९४ लाखांची कामे करणार, साधू-महंतांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तीन आखाड्यांसह काही धार्मिक संस्थाची नाराजी दूर करण्यासाठी महापालिकेने जवळपास एक कोटीचे दान या संस्थाना दिले आहे. या धार्मिक संस्थांच्या इमारतींची दुरुस्ती आणि निवासासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. यात कैलास मठाला २१ लाख तर, लक्ष्मीनारायण आखाडा आणि दिंगबर आखाड्याला प्रत्येकी १९ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या खासगी धार्मिक संस्थांच्या जागेवर महापालिका काम करून देणार आहे. दुसरीकडे नागरिकांच्या प्राथमिक सुविधांसाठी महापालिका पैसे नसल्याची ओरड करीत असल्याने खासगी संस्थावर उधळपट्टी का, असा सवाल नगरसेवकांनी केला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली आहेत. साधूग्रामसह विविध ठिकाणांच्या कामांनी वेग घेतला असतानाच महापालिकेन आता विविध आखाडे आणि धार्मिक संस्थांसाठीही आपली तिजोरी उघडी केली आहे. शहरातील आखाडे आणि महत्त्वपूर्ण धार्मिक संस्थाना त्यांच्या मंदिरे, इमारती आणि निवास व्यवस्थेसाठी महापालिका पैसे देणार आहे. या संस्थांना रंगरगोटी, विविध प्रकारच्या सुविधा महापालिका देणार आहे. विशेष म्हणजे खासगी जागांवरील कामांसाठी महापालिकेनेच चक्क निविदा काढली असून, या संस्थांना महापालिकेच्या तिजोरीतून ९४ लाख रुपये दिले जाणार आहेत. यात कैलास मठ- २१ लाख २५ हजार, लक्ष्मीनारायण आखाडा १९ लाख ४२ हजार,दिंगबर आखाडा १९ लाख ७५ हजार,पंचमुखी हनुमान मंदिर ९ लाख १० हजार, व्यंकटेश बालाजी मंदिर ५ लाख २० हजार, गोरेराम पूर्णाकृती मंदिर ५ लाख ८१ हजार, भोलादास मठ ५ लाख ७५ हजार, लक्ष्मीनारायण मंदिर ३ लाख ३६ हजार, नागचौक आखाडा ३ लाख ११ हजार, महालक्ष्मी माता मंदिर २ लाख ११ रुपये अशी एवढी रक्कम या संस्थावर महापालिकेतर्फे खर्च केली जाणार आहे. खासगी ठेकेदारामार्फत या संस्थांमधील कामे हाती घेतली जाणार आहेत. सिंहस्थापूर्वीच साधू, मंहताची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

विकासकामांसाठी नगरसेवकांचा टाहो

महापालिकेने एकीकडे सिंहस्थ कामांसाठी आपली तिजोरी उघडी केली असताना दुसरीकडे नगरसेवकांना दैनंदिन कामांसाठीही निधी मिळत नसल्याचे चित्र आहे. नगरसेवकांच्या ५० लाखांच्या कामांच्या फाईल्सही अद्याप मार्गी लागले नसल्याने नगरसेवक आक्रमक झाले आहेत. शहरातील एका विशिष्ट भागात सिंहस्थ होत असताना दुस-या भागावर अन्याय का असा सवाल नगरसेवकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे सत्ताधारीही उत्तर देताना नाकीनऊ आले आहेत. प्रभागातील प्राथमिक सुविधांसाठी नगरसेवक टाहो फोडत असताना खासगी धार्मिक संस्थांना निधी का, असा सवाल नगरसेवक करीत आहेत. त्यामुळे या निधीवरून नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images