Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एसटी घडवतेय प्रवाशांना पायपीट

$
0
0

फणिंद्र मंडलिक, नाशिक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या बसेस मेळा स्टॅण्डवरून सोडल्या जात असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत ठक्कर बाजार येथे कोणतीही सूचना दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

पुणे येथे जाण्यासाठी महामंडळातर्फे दर अर्ध्यातासाला ठक्कर बाजार येथून विनावाहक बस सोडण्यात येतात. प्रवाशांची संख्या वाढल्याने व आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे जाणाऱ्या फक्त निमआराम बसेस मेळा स्टॅण्डवरून सोडण्यास सुरुवात केली. मात्र, ही सेवा सुरू करण्यापूर्वी याबाबतची माहिती प्रवाशांना काही दिवस आधी देणे गरजेचे असताना महामंडळाकडून तसे करण्यात आले नाही. त्यामुळे पुण्याला जाणारे प्रवासी ठक्कर बाजार येथे आल्यानंतर पुण्याच्या गाड्या मेळा स्टॅण्डवरून सुटत असल्याचे समजते. त्यानंतर पायपीट करीत त्यांना मेळा स्टॅण्डवर जावे लागत आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांना लहान मुलांसह तेथे जाणे अवघड होऊन जाते. ठक्कर बाजार ते मेळा स्टॅण्ड हा परिसर अत्यंत अस्वच्छ असतो. मधल्या मार्गाने प्रवाशांना पायी चालताना नाक दाबूनच जावे लागते. या मार्गावर खडबडीत रस्ता असल्याने वृध्दांना चालणेही कठीण होऊन जाते.

अनेकदा पुण्याहून गाडी नाशिकला पोहचल्यानंतर तिच गाडी नाशिकहून पुण्याला जाते. पुण्याहून येणारी गाडी उशिरा आल्यास येथून जाणारी गाडी रद्द करण्यात येते. अशा वेळेस प्रवासी साध्या एसटीतून पुण्याला जाणे पसंत करतात. साधी बस ठक्कर बाजार येथून जात असल्याने नागरिकांना पुन्हा ठक्कर बाजाराला जावे लागते. त्यामुळे नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागतात. पुण्याकडे जाणाऱ्या साध्या बसेस व निमआराम बसेस एकाच ठिकाणाहून सुटल्यास प्रवाशांना दोन्ही पर्याय उपलब्ध होतील.

सुविधांच्या नावाने बोंब

मेळा स्टॅण्डवर प्रवाशांना आवश्यक असलेल्या पुरेशा सुविधा देखील नाहीत. या ठिकाणी असलेल्या

स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्य़ा पाण्याची व्यवस्थाही चांगली नाही. पुण्यासाठी मेळा स्टॅण्डवरून गाड्या सोडण्यास नागरिकांचा विरोध नाही. मात्र, तर त्यामार्गावरच्या सर्व बसेस एकाच ठिकाणाहून सोडाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.

अधिकाऱ्यांची मनमानी

येणारा प्रत्येक अधिकारी हा प्रवाशांवर प्रयोग करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. पुण्याला जाणाऱ्या गाड्यांच्या अनेकवेळा जागा बदलण्यात आल्या. मात्र, आजपर्यंत एकही कायमस्वरूपी जागा ठेवण्यात आलेली नाही. नवीन आलेला अधिकारी आपल्या मनाप्रमाणे कार्यवाही करतो. तीन वर्षानंतर पहिल्या अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय दुसऱ्या अधिकाऱ्याला चुकीचा वाटत असल्याने तोही आपल्या मर्जीप्रमाणे जागा बदलतो.

पुण्याला जाणाऱ्या गाड्यांबाबत आजपर्यंत अनेकवेळा जागा बदलण्यात आल्या आहेत. पुणे मार्गावर जाणाऱ्या सर्व गाड्या एकाच ठिकाणाहून सोडाव्यात अर्ध्या गाड्या या स्थानकावरून, तर अर्ध्यागाड्या दुसऱ्या स्थानकावरुन सोडून महामंडळाचा काय फायदा होतो, असा सवालही केला जात आहे.

प्रवाशी संघटनांची अळिमिळी...

सध्या असलेल्या प्रवासी संघटना या राजकीय पक्षांच्या दावणीला बांघल्या गेल्याने प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेणे तर दूरच; परंतु त्याबद्दल चकार शब्दही काढले जात नाही. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

स्टॅण्ड बदलतांना प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष द्यायला हवे. निमआराम गाडी नसल्यास प्रवाशी साध्या बसने निघून जात होता. आता मात्र तसे करता येत नाही.

- सर्वेश सोनार,

प्रवासी

महामंडाळाचा मनमानी कारभार सुरू आहे. कधी ठक्कर बाजार, तर कधी मेळा स्टॅण्ड या ठिकाणाहून बसेस सोडल्या जात आहेत. पुण्याच्या मार्गावर जाणाऱ्या गाड्या एकाच ठिकाणाहून सोडाव्यात

- सुषमा पाटील, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अमरावतीलाही खंडपीठ

$
0
0

प्रसन्न जकाते, नागपूर

कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ मंजूर झाले. मात्र अमरावतीमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी दोन दशकांपासून मागणी होत आहे. अमरावतीत खंडपीठ स्थापन करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. लवकरच अमरावतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे फिरते खंडपीठ प्राप्त होईल, असे संकेत विधी व न्याय राज्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले आहेत.

'उच्च न्यायालयाने फिरते खंडपीठ कोल्हापूरला देण्याची तयारी आमच्याच सरकारने दाखवली आहे. पुण्यातही असे फिरते खंडपीठ मिळावे म्हणून मागणी होत आहे. त्यावर विचार सुरू आहे. लवकरच त्याचाही निर्णय होईल. पण, विदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे फिरते खंडपीठ अमरावतीला मिळेल यासाठी दोन दशकांपासून मागणी रेटली जात आहे. पूर्णवेळ खंडपीठाबाबत सांगता येणार नाही. परंतु फिरते खंडपीठ स्थापन करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे', असे डॉ. रणजित पाटील यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

अमरावतीत फिरत्या खंडपीठाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यापूर्वी चर्चा झाली आहे. याबाबत एक बैठकही मुंबईत बोलावण्यात आली होती. त्यात न्याय प्रक्रिया कशी सुलभ करता येईल यावर विचारमंथन झाले. उच्च न्यायालयांच्या खंडपीठांचे अंतर सध्या एकमेकांपासून जास्त आहे. तेथे दाद मागण्यासाठी येणारा आर्थिक ताण अशिलालाच सहन करावा लागतो. हा विचारही सरकारने केला. न्याय विभागावर जर कामाचा ताण पडत असेल तर त्यांनीही विभागणीचा प्रस्ताव देणे गरजेचे आहे. तसे प्रस्ताव येताच प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

अकोला मध्यवर्ती ठिकाणी

अमरावतीच्या तुलनेत अकोला हे वऱ्हाडातील पाचही जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या गावांनादेखील अमरावतीसाठी लांब अंतरावर पडते. त्या तुलनेत अकोला हे अमरावतीच्या तुलनेत सोयीस्कर ठरेल असे विधी जाणकारांचे मत आहे.

दोन दशकांपासून लढा

अमरावतीत खंडपीठासाठी सुरू असलेला लढा दोन दशकांपासून कायम आहे. वऱ्हाडातील विभागीय मुख्यालयाचे ठिकाणी असलेले अमरावती नागपूरनंतर महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे अमरावतीत खंडपीठ व्हावे यासाठी १९८८पासून पाठपुरावा होत आहे. अॅड. पी. एस. खडसे अमरावती जिल्हा वकील संघाचे सचिव असताना खंडपीठ व्हावे असा ठराव पहिल्यांदा घेण्यात आला. त्यानंतर पुन्हा १९९३मध्ये अॅड. एस. झेड. पाटील अध्यक्ष असताना दुसऱ्यांदा ठराव घेण्यात आला. १७ जुलै १९९३ रोजी वकिलांच्या कृती समितीने आंदोलनही केले. परंतु अद्याप खंडपीठ झालेले नाही.

निम्म्यावर खटले वऱ्हाडातील

नागपूर खंडपीठातील खटल्यांपैकी निम्म्यावर खटले अमरावती विभागातील असतात. नागपूर आणि वऱ्हाडातील गावांचे अंतर पाहता याचिकाकर्त्यांना नागपूर लांबच पडते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेदच्या वाढीव जागांना ग्रीन सिग्नल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयात एमडीएमस अभ्यासक्रमासाठी यंदाच्या वर्षापासून ४० जागा वाढविण्याच्या निर्णयला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने (डीएमईआर) ग्रीन सिग्नल दाखविला आहे. सध्या या महाविद्यालयात केवळ २१ विद्यार्थी विविध नऊ विषयांत 'एमडीएमस'चे शिक्षण घेतात. त्यात आता आणखी ४० जगांची भर पडणार आहे.

गेल्यावर्षीपासून आयुर्वेदच्या पदवी अभ्यासक्रमात ५० विद्यार्थ्यांची भर घालण्यात आली होती. त्यात आता पदव्युत्तर अभ्यासक्रमातही जागा वाढणार असल्याने चालू वर्षापासून या महाविद्यालयात आता पदवीचे १०० आणि पदव्युत्तरचे १०० प्रवेश होणार आहेत. या शिवाय अभ्यासक्रमात 'संस्कृत सिद्धांत संहिता' हा नवीन विषयदेखील समाविष्ट करून घेतला जाणार आहे.

राज्यात उस्मानाबाद, नांदेड, मुंबई व नागपूर या चारच ठिकाणी शासकीय आयुर्वेद महाविद्यालये आहेत. नागपूर महाविद्यालयात सध्या शल्य, चालाक्य, कायाचिकित्सा, निदान, वस्तवृत्त, अगततंत्र, रसशास्त्र, शारीरिक क्रिया व शरीररचना आदी एकूण नऊ विषय शिकविले जातात. या नऊ विषयांमध्ये सध्या केवळ २१ विद्यार्थीच 'एमडीएमएस'चे शिक्षण घेत आहेत. आयुर्वेद शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल पाहता 'एमडीएमएस'च्या जागा वाढवून मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. यात एकूण ८४ विद्यार्थ्यांची मागणी केली होती. परंतु, रुग्णालयात काही त्रुटी असल्याने शासनाने ८४ ऐवजी ४० विद्यार्थ्यांचा जागा १७ एप्रिल २०१५ च्या पत्रानुसार मंजूर केल्या आहेत.

२०१५-१६ या वर्षासाठी नवीन प्रवेशप्रक्रिया होणार आहेत. तत्पूर्वी जून व जुलै २०१५ मध्ये होणाऱ्या प्रवेशपरीक्षेत विद्यार्थ्यांना पास व्हावे लागणार आहे. त्यानंतर ऑगस्ट २०१५ पासून ४० विद्यार्थ्यांच्या नव्याने प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल.

त्रुटींमुळेच नाही मान्यता!

रुग्णालय प्रशासनाने द्रव्यगुण, बालरोग, स्त्रीप्रसूती व पंचकर्म या चार अभ्यासक्रमांसह 'एमडीएमएस' च्या ८४ विद्यार्थ्यांच्या मागणीचा प्रस्ताव सादर झाला होता. परंतु हे चार अभ्यासक्रम शिकविण्यासाठी चार प्राध्यापकांची जागा भरणे आवश्यक आहे. महाविद्यालयात प्राध्यापकांची कमी असल्याची त्रुटी काढून शासनाने नव्या अभ्यासक्रमांना मान्यता दिली नाही. केवळ 'संस्कृत सिद्धांत संहिता' या नवीन अभ्यासक्रमालास मंजुरी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेटला मिलिंद सोमण

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

मॉडेल म्हणून एक काळ गाजवलेला मिलिंद सोमण जर तुमच्यासमोर आला तर तुम्हाला किती आनंद होईल. असाच आनंद झाला होता डॉ. आनिता चांडक यांना. 'मटा'च्या फॅन नंबर वन स्पर्धेच्या विजेत्या ठरलेल्या अनितांनी मिलिंदशी दिलखुलास गप्पा मारल्या.

'मटा'मार्फत वाचकांना नेहमीच सेलिब्रेटीजना भेटण्याची संधी दिली जाते. अशीच संधी मिळाली डॉ. अनितांना. मिलिंदला पाहताच त्यांनी बुके देऊन त्याचे सहर्ष स्वागत केले. 'आजही तुम्हाला कुठे जाहिरात किंवा चित्रपटात पाहिलं की मेड इन इंडिया...' या गाण्याची आठवण येते हे अनिताने सांगताच मिलिंदचा चेहरा खुलला. जवळपास २२ वर्षांपूर्वी या गाण्याच्या शूटिंगदरम्यान झालेल्या गमती जमती त्याने डॉ. अनितांशी शेअर केल्या. माझ्या तरुणपणातील ती एक उत्तम संधी असल्याचे तो म्हणाला.

'मेड इन इंडिया...'मधला हँडसम मॉडेल मिलिंद सोमण आता अनुभवसंपन्न कलाकार असल्याचे जाणवत होते. तरी एक हँडसम मॉडेल म्हणून असलेली त्याची ओळख आजही रसिकांच्या मनावर ठसल्याचे डॉ. अनितांच्या गप्पांमधून जाणवले. अॅडव्हर्टायझिंग इंडस्ट्री, म्युझिक अॅल्बम, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील अनुभवांनी संपन्न असलेले मिलिंदचे व्यक्तीमत्व या गप्पांमध्ये सतत जाणवत ‌राहिले. अशा चंदेरी दुनियेत करिअर करताना आलेले काही अनुभवही त्याने डॉ. अनितांशी शेअर केले. तसेच आपल्या आगामी काही प्रोजेक्टसबद्दल माहिती त्याने दिली. मिलिंद सोमण आवडते व्यक्तीमत्व असल्यामुळे घर, मुलं, व्यवसाय यामधून खास वेळ काढून ही भेट घेतल्याचे डॉ. अनिता म्हणाल्या. त्यांनी या भेटीबद्दल 'मटा'चे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिळाला मेंदीचा कानमंत्र

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

मेंदी काढण्याची हौस असली तरी ती कशी काढायची याची तंत्रशुध्द माहिती नसल्यामुळे अनेकींना मेंदी काढताना अडचण येते. म्हणूनच 'मटा'मार्फत 'रंग मेंदीचा' या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. श्री रचना चित्रकला महाविद्यालयामध्ये झालेल्या या कार्यशाळेत महिलांना मेंदी काढण्याच कानमंत्र मिळाला.

दिपाली चव्हाण व धनश्री सोनगिरा यांनी उपस्थित महिलांना यावेळी मार्गदर्शन केले. मेंदिचे बेसिक शेप्स शिकवत त्यांनी या वर्कशॉपची सुरुवात केली. त्यानंतर फिलर म्हणून कशी व कोणती डिझाईन भरायची याची माहिती त्यांनी दिली. रेषा, चेक्स, बिंदू, अर्धवर्तुळ यांचा खुबीने वापर केल्यास मेंदी उठावदार दिसते असे त्यांनी सांगितले. शेडिंगचे प्रकार तसेच स्ट्रोक्सचे प्रकार त्यांनी यावेळी दाखविले. गजरा मेंदी, चुडी मेंदी, अरेबिक, इंडियन ब्राईड मेंदीचे प्रकार, कोयरीचे विविध प्रकार, बोटावरच्या डिझाईन्स कसे काढायचे हे त्यांनी प्रत्यक्षिकासह दाखवून दिले.

मेंदी कशी तयार करावी याची माहितीही त्यांनी दिली. मेंदी तयार करताना ती रंगण्यासाठी चहाचे पाणी व काथ यांचा वापर करावा असे त्या म्हणाल्या. कोन तयार करण्याची पध्दत त्यांनी शिकविली. ब्रायडल मेंदीसाठी बारीक तर अरेबिक मेंदीसाठी जाड कोन वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला. हाताला मेंदी लावल्यावर ती वाळू नये म्हणून लिंबू पाणी लावावे तसेच रंगण्यासाठी लवंगाची धुरी घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला. ब्लॅक व रेड अशा दोन रंगांमध्ये असणाऱ्या व पाच मिनिटामध्ये वाळणाऱ्या मॅजिक मेंदीची माहिती त्यांनी यावेळी दिली.

'मला खूप दिवसांपासून मेंदी शिकयची होती. पण क्लास वगैरे लावणे शक्य नव्हते. आज संधी मिळाली. कमी वेळात खूप उपयुक्त माहिती मिळाली. त्यामुळे आता मी मेंदीच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकते.'

- ऋतुजा अहिरे

'खूप सोप्या व छान पधदतीने माहिती मिळाली. मेंदी काढता यायची पण त्याचे डिटेल्स माहिती नव्हते. मेंदी भरगच्च दिसण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती मिळाली. तसेच अनेक प्रकारही पाहायला मिळाले.'

- श्रेया पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा रंगयोग पुण्यात

$
0
0

>>फणिंद्र मंडलिक

नाशिक मधील प्रसिध्द चित्रकार सुभाष वाघ यांच्या चित्रांचे 'रंगयोग' हे प्रदर्शन पुणे येथील हॉटेल 'मलाका स्पाईस' येथे होणार असून यात त्यांच्या विविध चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन १५ मे ते ३१ मे या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.

या 'रंगयोग' प्रदर्शनात विविध विषयाची चित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. धार्मिक चित्रांबरोबरच अध्यात्मिक व अॅबस्ट्रॅक्ट कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात निळकंठेश्वराचे चित्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्याबद्दल बोलताना सुभाष वाघ म्हणाले, 'ही एक वेगळी अनुभूती आहे. त्याचे रसग्रहण केल्यावरच ते समजते.' सुभाष वाघांचे हे ३५ वे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनातील चित्रांमध्ये शिवाची विविध रुपे साकारण्यात आली आहेत. त्यात शिवतांडवपासून शिवाच्या साधनेपर्यंतचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाची रुपे पाहून प्रेक्षक निश्चित भारावतील यात शंका नाही असे वाघ यांचे म्हणणे आहे.

सुभाष वाघांची चि‌‌त्रवेल जानोरीसारख्या खेड्यात बहरली आणि आज तिचे मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे. वाघ यांनी आतापर्यंत चित्रकलेचे विविध प्रकार हाताळले आहेत. त्यांच्या चित्रकलेची सुरुवात पुण्याच्या 'अभिनव कला महाविद्यालया'पासून झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. चित्रकलेचे पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तिथे ते कमर्शियल आर्ट पदविका उत्तमरित्या पास झाले. पुण्याच्या अॅड एजन्सीतून त्यांच्या कलाजीवनाची सुरुवात झाली. पुढे नाशिकमध्ये आल्यावर 'रंगमंथन' नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. १८ वर्षे एक यशस्वी कमर्शियल आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या वाघांनी वयाच्या चाळीशीत एक धाडस केलं आणि नाशिक सोडलं. २००५ साली दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईला पेंटिंगच्या निर्मितीत स्वतःला झोकून दिलं. भारतातल्या काही मोजक्या चित्रकारांपैकी एक असलेले हे चित्रकार आपली एक वेगळी छाप टिकवून आहेत.

सुभाष वाघ म्हणतात, 'कल्पना हा माझ्या चित्रांचा आत्मा आहे. रंग, रचना आणि शैलीनं माझं चित्र बहरतं. पांडुरंग नावाच्या चित्रात आपल्या संपत्तीचा, शक्तीचा, पदाचा सौंदर्याचा अथवा ज्ञानाचा गर्व असलेल्यांना पांडुरंग दिसणार नाही. तर जो अहंकाराचा त्याग करुन विठ्ठलचरणी नतमस्तक होईल त्यालाच पांडुरंग दिसेल.' त्यांच्या माता नावाच्या चित्रात ईश्वराला सर्वत्र जाता येईना म्हणून त्याने आईची निर्मिती केल्याची कल्पना साकारली आहे. माणसाला दोन माता असतात एक जन्मदात्री आई आणि दुसरी मातृभूमी असे सोशिकतेचे दुसरे प्रतिक नाही, असे या चित्रातून दाखविले आहे. सुभाष वाघ यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात १९९२ चा राष्ट्रीय पुरस्कार, १९९७ चा राज्य पुरस्कार हे उल्लेखनीय आहेत. सुभाष वाघ आपल्या चित्रांविषयी म्हणतात, 'कलाक्षेत्र रणांगणासारखं आहे. इथे तुम्हाला योध्दा होऊन लढायचं असतं. सतत धाडस आत्मविश्वास आणि कल्पनांच्या शस्त्रास्त्रांनी कर्मफळाची अपेक्षा न ठेवता रंगात रंगून जायचे आणि एक दिवस पांडुरंग होऊन जायचं'.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज-नितेश राणेंची बंद दाराआड चर्चा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी काल, गुरुवारी अचानक नाशिकला धावती भेट दिली. मात्र, याभेटीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने दिवसभर शहरात तर्कवितर्क लढविले जात होत. हॉटेल एक्स्प्रेस इनमधील या गोपनीय दौऱ्यात त्यांनी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्याशी गुफ्तगू केल्याच्या चर्चेने तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ख‍ळबळ उडाली आहे. राज ठाकरे नाशकात आले की नाही याचा दुजोरा मात्र महापौरांसह कोणीही देत नसल्याने याभेटीविषयीचे गूढ वाढले आहे.

राज ठाकरे गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास नाशकात आले व दोन-तीन तास थांबून त्यांनी प्रयाण केले, असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. नाशकातील काही कंपन्यांमधील कामगार करारासंदर्भात नेमके त्याचवेळी आमदार नितेश राणे हेही आपल्या समर्थ कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये होते. तेथेच राज ठाकरे हेही असल्याचे कळल्यानंतर राणे त्यांना भेटायला गेले. दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. राज ठाकरे यांनी नारायण राणेंचीही विचारपूस केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तथापि, राज ठाकरे नाशकात असल्याची मनसेच्या कोणालाही कानोकान खबर नसल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता समजले. सभागृह नेते शशिकांत जाधव यांनीही आपणास काहीच माहिती नसल्याचे सांगितले. डॉ. प्रदीप पवार यांनी फोन उचलला नाही. तथापि, मनसेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांकडे दिवसभर माध्यम प्रतिनिधींनी याबाबत विचारणा केल्याने अनेकांनी नंतर तर मोबाईल घेणेच बंद केल्याचे आढ‍ळून आले. पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या वनउद्यानाचा विकास करण्याचा राज ठाकरे यांचा गोदापार्क सारखाच ड्रीम प्रोजेक्ट असून, त्याच्या काही कामासाठी ते नाशकात आल्याचेही सांगितले जाते. तथापि, महापौरांसह कोणालाही त्यांनी त्याची साधी खबरही लागू न देणे पटत नाही. त्यामुळेच या कथित भेटीविषयी कमालीचे गूढ निर्माण झाले.

राज आणि राणे यांच्या भेटीनंतर मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून या कथित भेटीची विचारणा केली. मात्र, दस्तुरखुद्द पदाधिकारीही या भेटीबद्दल अंधारात असल्याने कार्यकर्त्यांचा संभ्रम आणखी वाढला.

आज मी दिवसभर लग्न समारंभात बिझी होतो. राजसाहेब आले किंवा नाही हे मला सांगता येणार नाही. ते आले असते तर आम्हाला कळलेच असते. माध्यमांच्याच प्रतिनिधींनी दिवसभर याबद्दल विचारणा करून हैराण केले आहे. - अशोक मुर्तडक, महापौर

गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास राणेसाहेब लंचसाठी आले असता त्यांना राज ठाकरेदेखील येथेच असल्याचे कळले. त्यांनी लागलीच हॉटेलच्या प्रेसिडेन्ट सूटमध्ये थांबलेल्या राज ठाकरेंना भेटण्यासाठी प्रयाण केले. दोघांमध्ये काय चर्चा झाली ते मात्र क‍ळू शकले नाही. - प्रत्यक्षदर्शी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थाची माहिती एका क्लिकवर

$
0
0



'महाकुंभ अॅप'ची निर्मिती; मोबाइलद्वारे संपर्क साधणे शक्य

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना मोबाईलद्वारे मार्गदर्शन व्हावे यासाठी नाशिकच्या अपूर्व मुठे व हर्षल पगारे यांनी महाकुंभ अॅप - २०१५ ची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे शहरात आलेल्या भाविकांना हॉटेल्सपासून ते एटीएमपर्यंतची सर्व माहिती मोबाइलवर उपलब्ध असणार आहे.

महाकुंभ अॅपमध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या माहितीमध्ये पर्वणीचे दिवस, तारखा, ठिकाण यांच्या बरोबर नाशिकमधील हॉटेल्स, बस व रेल्वे बुकींग, नकाशे, स्वतःचे लोकेशन, बातम्या, रहाण्याची व्यवस्था, रस्ते, अग्निशमन केंद्राचे फोन नंबर, हॉस्पिटल्स व डॉक्टरांचे नंबर, पार्किंगच्या जागा, महत्त्वाची पर्यटन स्थळे याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आपण काढलेले फोटो या अॅपच्या माध्यमातून लोड करता येणार आहे. तसेच व्हिडीओ देखील आपल्या मित्रांबरोबर शेअर करता येणार आहे. हे अॅप कोणत्याही अॅन्ड्रॉइड फोनवर मोफत डाऊनलोड करता येणार आहे.

करंट लोकेशनची माहिती

अॅपमध्ये आपले करंट लोकशन समजणार असून आपल्याला ज्या ठिकाणी पोहचायचे आहे त्या ठिकाणाचा उल्लेख केल्यास तिथपर्यंतचा मार्ग हे अॅप दाखवणार आहे. भारतातून येणाऱ्या रेल्वेची माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. या अॅपमध्ये रेडबसच्या माध्यमातून खासगी गाड्यांचे बुकींग देखील करता येणार आहे. या अगोदर झालेल्या बहुतांश सिहस्थ कुंभमेळ्याचे फोटो व माहीती उपलब्ध होणार आहेत. शहरातील प्रमुख वृत्तपत्रे देखील या मोबाइल अॅपद्वारे वाचता येणार आहेत. तसेच यात टाकलेले फोटो एकमेकांना शेअर करता येऊ शकतील.

इमर्जन्सी कॉन्टॅक्टही उपलब्ध

शहरात कोठेही दुर्घटना घडल्यास त्या भागातील दूरध्वनी क्रमांक, आपत्कालीन व्यवस्थेचे नंबर, अॅम्ब्युलन्स इत्यादीची माहिती या अॅप्सची माहिती मिळणार आहे. याशिवाय शहरातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर देखील या अॅपवर उपलब्ध असतील. या महाकुंभ अॅपमध्ये क्यू आर कोड स्कॅन करण्याचे फिचर देण्यात आले आहे. या अॅपचा उपयोग भाविक तसेच शहरातील नागरिकांना होणार आहे.

भाविकांना शहरातील अधिकाधिक माहिती कशी उपलब्ध करून देता येईल. हे अॅप डाऊनलोड करणे तसेच वापरणे अगदी सोपे आहे. त्यामुळे लोकांचा निश्चित चांगलाच प्रतिसाद मिळेल. - अपूर्व मुठे

सिंहस्थासाठी येणाऱ्या भविकांना हे अॅप वरदान ठरणार आहे. तसेच नाशिकमधील नागरिकांना देखील याचा उपयोग होणार आहे. या अॅपच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. - हर्षल पगारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिंपळगावचा टोलनाका पुन्हा वादात

$
0
0


स्थानिक कामगारांना काढले कामावरून

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

स्थानिक सुरक्षा कामगारांना शुक्रवार(ता.१५)पासून कामावरून कमी करण्याचा निर्णय टोल प्रशासनाने गुरूवारी जाहीर केल्यानंतर पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त टोलनाक्यावर टोल प्रशासन व कामगार यांच्यातील वाद चिघळला आहे. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कामगारांनी जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करीत टोलनाका बंद पाडला. त्यामुळे गुरूवारी दुपारनंतर टोल वसुली ठप्प होऊन वाहनांचा मुक्त प्रवास सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत वाहनांना टोल आकारण्यात आला नाही.

स्थानिक नेते सतीश मोरे, अरूण मोरे, सुभाष होळकर, किरण लभडे, प्रशांत घोडके, बाळासाहेब आंबेकर, महेंद्र साळवे आदिंनी टोलनाक्यावर उपस्थित राहून निदर्शने करीत आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी कामगारांना पाठिंबा व्यक्त केला. जोपर्यंत स्थानिक कामगारांना सेवेत सामावून घेतले जात नाही तोपर्यंत टोल वसुली करू दिली जाणार नाही, असा इशाराच त्यांनी टोलप्रशासनास दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव बसवंत येथील टोल प्रशासनाने टॉप्स सिक्युरिटी मुंबई यांच्यामार्फत दोन वर्षासाठी सुरक्षा कामगारांनी भरती केली होती. या कामगारांबाबत टॉप्स सिक्युरिटी बरोबर झालेला दोन वर्षांचा करार डिसेंबर २०१३ मध्येच संपला होता. मात्र, कामगारांच्या मागणीनुसार, साधरण दीड वर्ष सुरक्षा कामगारांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता कामगारांना मुदतवाढ देण्यास टोल प्रशासनाने नकार दिला आहे. या कामगारांना शुक्रवारपासून कमी करण्याचा फतवा काढण्यात आला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गुजरातमधील कामगारांना टोलनाक्यावर आणण्यात आले आहे. या प्रकाराने स्थानिक कामगार संतापले असून, त्यांनी स्थानिक राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या मदतीने टोल वसुली थांबवत टोलनाका प्रशासनाची कोंडी केली आहे. स्थानिक नेते, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी टोल प्रशासनाशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने कामगार व टोल प्रशासन यांच्यातील वाद चिघळल आहे. भारतीय मजदूर संघाच्या पाठिंब्याच्या जोरावर कामगार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेपाच हजार पानांचे आरोपपत्र

$
0
0



सुरगाणा धान्य घोटाळा; झेरॉक्ससाठी लाखभर रुपये खर्च

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित सुरगाणा धान्य घोटाळ्यामधील सर्व साक्षीपुरावे तपासणी करून १३ संशयितांवर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी अंतिम ५ हजार पाचशे पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक लाख ५ हजार रुपये खर्च झाले, हेही विशेष.

जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला सुरगाणा येथील धान्य वितरण घोटाळा जानेवारी महिन्यात उघडकीस आला. यांसदर्भात ज्ञानेश्वर जवंजाळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अधिकृतरित्या सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता कळवण येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संचिन गुंजाळ यांच्याकडे गुन्ह्याचा तपास देण्यात आला.

३० सप्टेंबर २०१४ ते १९ डिसेंबर २०१४ ह्या कालावधीत सुरगाणा गावातील शासकीय धान्य गोदामात हा गैरव्यवहार झाला असल्याचे निदर्शनास आले. गोदामपाल, शासकीय धान्य वाहतूक प्रतिनिधी, पुरवठा निरीक्षक, तहसीलदार, गोदामातील सफाई कामगार आदींसह धान्य खरेदी करणारे हे मुख्य संशयित आहेत. दारिद्र्य रेषेखालील आदिवासी, लाभार्थी तसेच आश्रमशाळा, अंगणवाडी, विद्यालय, प्राधान्य कुटुंब योजना, अन्नसुरक्षा योजना, अंत्योदय योजना, आश्रमशाळा नारी निकेतन योजना, अंगणवाडी योजना अंतर्गत प्राप्त होणारे व वितरण व्यवस्थेतील अनुदानित गहू, तांदूळ व साखर हे धान्य सुरगाणा शासकीय धन्य गोदामाची क्षमता ३५०० क्विंटल एवढी असतांना संशयितांनी ३० हजार ६०९ क्विंटल धान्य शासकीय किंमत रुपये ९५ लाख ७ हजार ४६४ दाखवून त्याच्या खोट्या नोंदी केल्या तसेच अभिलेखावरील नोंदी हेतुपुरस्सर अपूर्ण ठेवल्या, तसेच २३/१२/२०१४ ते २७/१२/२०१४ या कालावधीत रुपये १४ लाख ०४ हजार ०५५ चा भरणा केला आहे. सदर भरणा करण्यासाठी ५२८ परवाने तयार करण्यात आले आहे, अशी माहिती दोषारोपपत्रात नमूद करण्यात आली आहे.

सुरगाणा धान्य घोटाळ्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक सचिन गुंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या किचकट प्रकरणाचा खोलवर तपास करीत शेकडो साक्षीदार नोंदवून घेत १३ संशयितांवर भक्कम असे दोषआरोपपत्र अवघ्या ९७ दिवसात तयार करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ५ हजार ५०० पाने असणाऱ्या ह्या दोषारोपपत्राच्या झेरॉक्स प्रतिंसाठी एक लाख ५ हजार रुपये खर्च झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समितीमध्ये नगरसेवक संतप्त

$
0
0



कामांच्या खोळंब्यामुळे कानउघडणी

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नागरी कामे होत नसल्याने अनेक नगरसेवकांनी प्रभाग सभापती उषा शेळके यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. वर्षांनुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. सातपूर प्रभागाचा आढावा घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत सर्वच नगरसेवकांनी नागरी कामे होत नसल्याने संताप व्यक्त केला.

अनेक महिन्यांपासून सातपूर प्रभागात नागरी कामे होत नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. प्रभाग सभापती शेळके यांनी आढावा बैठक सातपूरच्या सभापती कार्यालयात बोलावली होती. याप्रसंगी नगरसेवक विलास शिंदे यांनी आरोग्या विभागाकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असल्याचे सांगितले. तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित असल्याने रोजच प्रभागातील नागरिकांची बोलणी खावे लागत असल्याचे सांगितले. सभागृहनेते सलिम शेख यांनी देखील महापालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचारी त्यांचे काम योग्य प्रकारे होत नसल्याचे म्हणाले.

महापालिकेतील बांधकाम, ड्रेनेज, पाणीपुरवठा, उद्यान इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांनी आठ तास वेळेवर काम केल्यास कुठलाही नगरसेवक तक्रार करणार नसल्याचेही म्हणाले. नगरसेवक प्रकाश लोंढे, विक्रांत मते, सविता काळे, उषा आहिरे यांनी कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी केल्या.

अन्यथा आयुक्तांकडे तक्रार करणार

सभापती शेळके यांनी अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. कामात सुधारणा न झाल्यास आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे म्हणाले. बैठकीला विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे, बांधकामचे उप अभियंता रमेश पाटोळे, विद्युत विभागाचे अफसर खान, उद्यानचे व्ही. एम. मोगल, पाणी पुरवठ्याचे ए. व्ही. जाधव उपस्थित होते.

प्रभागातील कामे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वेळेवर होत नसल्याने सामान्य नागरिकांचा रोष सहन करावा लागतो. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आपली कामे वेळेवर केल्यास कुणाचीच तक्रार राहणार नाही. परंतु, मोजकेच कर्मचारी काम करीत असल्याने नागरी समस्या वाढल्या आहेत. - सलिम शेख, सभागृहनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय इथले संपत नाही...

$
0
0



रोकडोबावाडीतील गुंडांच्या दहशतीमुळे सामान्यांचे जगणे मुश्कील

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

सुतार काम करणाऱ्या गरीब सलीम शेख यांनी आंबेडकर जयंतीला वर्गणी दिली. मात्र, एका लग्नाच्या आर्केस्ट्रॉसाठी हजाराची वर्गणी दिली नाही म्हणून त्यांचा काकडे टोळीने खून केला. त्यामुळे रोकडोबावाडीतील गुंडांची दहशत, दारूचे बेकायदेशीर धंदे, त्यांना पोलिस आणि नेत्यांचे असलेले संरक्षण ही समस्य पुन्हा एरणीवर आली आहे.

प्रभाग ६० मध्ये देवळालीगावाशेजारी असलेली रोकडोबावाडी झोपडपट्टी ही आठ हजाराची वस्ती आहे. सर्व जाती धर्माचे लोक तेथे राहतात. भंगारविक्री, सुतार, पेंटींग, गवंडी काम करणाऱ्यांची ही वस्ती आहे. सकाळी लवकर निघून चार पैसे कमावले तरच घरात चूल पेटते. त्यामुळे लोकांना डोकं वर काढायला वेळच नाही तर प्रतिकाराला वेळ कोठून मिळणार.

गरीबाला नाही कुणी वाली

रस्ते पाणी आणि वीज ऐवढीच या लोकांची गरज आहे. ती बऱ्यापैकी भागते. त्यामुळेच अरुंद रस्ते, कचरा, अनारोग्य अशा सानिध्यातही या लोकांना आनंदाने राहावे लागते. गटारी, सार्वजनिक स्वच्छता, गार्डन या सारख्या समस्यांकडे ना नागरिक लक्ष देतात ना लोकप्रतिनिधी. सुंदरनगर, रोकडोबावाडी येथे नदीकाठी शहराचा कचरा आणून टाकला जातो. याच रस्त्याने हजार विद्यार्थी ये-जा करतात. आर्टिलरी सेंटरचे शौचालयाचे चार नाले रोकडोबावाडी शेजारील वालदेवी नदीत सोडलेले आहे. दगडे टाकून चेंबर फोडल्याने मैला उघड्यावर आला आहे.

गुंडगिरी पाचवीला पुजलेली

रोकडोबावाडीला गुन्हेगारीची ५० वर्षाची परंपरा आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी अवैध धंद्यातून भालेराव खून प्रकरण घडले. त्यानंतर अवैध धंदे करणाऱ्यांवर लोकांनी हल्ला करून दुकान व घर उध्वस्त केले होते. वर्षभरापूर्वी प्रेमी युगलाला शेतात मारहाण करून सामूहिक बलात्काराचे प्रकरण राज्यात गाजले. आंतरजातीय विवाह केला म्हणून महिलेचा गर्भ लाथा घालून गेल्या महिन्यात पाडण्यात आला. गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांची छेडछेड केली जाते. जयभवानी रोडवरील पथदीप चेन स्नॅचिंगसाठी फोडण्यात आले आहेत. सलिम शेख यांचा खून करणाऱ्या काकडे गँगने पोलिसाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती. आठ दिवसांपूर्वी वऱ्हाडींनी पोलिसांना धक्काबुक्की केली. अमली पदार्थ विकणे भाईगिरी करणे, खंडणी मागणे या सारख्या सततच्या त्रासामुळे भेदरलेल्या चांगल्या लोकांनी येथून स्थलांतर केले आहे.

दारूमुळे अडीचशे बळी

रोकडोबावाडीत दारूचे विनापरवना चालणारे चार धंदे आहेत. दारू सारख्या 'स्लो पॉइझनिंग'ने गावातील अडीचशे जणांचे बळी घेतले आहे. शिवाजी पुतळा चौक म्हणजे दारुड्यांचा चौक झाला आहे. दिवसाही दारुडे पडलेले असतात. भंगारविक्रेत्यांच्या गाड्या सकाळी दारुच्या बाटल्यांनी भरून जातात.

पोलिस-गुंड भाईभाई

गुंडांच्या चार-पाच टोळ्या तलवारी घेऊन नंगानाच करत असतात. जयंत्यांचे दिवस म्हणजे खंडणीचे दिवस असतात. परवानी न घेता रस्त्यात मंडप उभारणी, कर्णकर्कश डीजे लावणे याकडे पोलिस दुर्लक्ष करतात. नागरिकांचे म्हणणे असे की, महिला पोलिसही हप्ता घेण्यासाठी येतात. पोलिसांना खबर दिल्यावर ते आमचेच नाव गुंडांना सांगतात. गुंडांना सांगून घरावर हल्ले करतात. वरिष्ठांना खोटी माहिती देऊन आम्हालाच खोट्या गुन्ह्यात अडकवतात.

पोलिस दाखवा; बक्षीस मिळवा

पोलिस इन्स्पेक्टर दाखवा आणि एक लाखाचे बक्षीस मिळवा, अशी योजना आम्ही जाहीर केली होती. साहेब येतच नाहीत. पोलिस चौकीसाठी माझी जागा देण्यास तयार असल्याचे एका जागरुक ना‌गरिकांना 'मटा'ला सांगितले. अवैध धंद्यावर छापा टाकतेवेळी पोलिसच गुन्हेगारांना टीप देतात. नंतर चौकात बोलावून हप्ता घेऊन जातात. खबर देणाऱ्याच्या घरावर हल्ला करण्यास पोलिसच गुंडांना सांगतात. दारुबंदीसाठी आंदोलन करणाऱ्यांची वाहने गुंडांनी जाळल्याचेही एका नागरिकांने सांगितले.

हातावर पोट असलेले लोक प्रत्येक जयंतीला हजार-दोन हजाराची वर्गणी कोठून देणार? दिली नाही तर गुंड मारण्याची धमकी देतात. महिला-मुलींना तर घराबाहेर पडण्याची सोयच नाही. - महिला नागरिक

येथे गुंडांच्या चार-पाच टोळ्या आहेत. तडीपार झालेले बाहेरचे भाई त्यांच्या मदतीने येथे धिंगाणा घालतात. पोलिसांना की नेत्यांना सांगायची सोय नाही. सगळ्यांची मिलीभगत आहे. - एक नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी सतर्क राहावे!

$
0
0



इंदिरानगर पोलिसांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरीकरणामुळे महिलांनी सदैव सर्तक राहणे आवश्यक आहे. मोबाईलवर येणारे व्हीडीओ, घरात येणारी तिऱ्हाईत व्यक्ती, एटीएममधून बाहेर पडताना तसेच दागिने घालून सार्वजनिक ठिकाणी महिलांनी जाताना सर्तक राहणे गरजेचे असल्याचे मत इंदिरनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी व्यक्त केले.

इंदिरानगर येथे प्रगती महिला मंडळातर्फे मातृदिनानिमित्त आयो​जित महिला सुरक्षा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एपीआय राजेश गवळी, नगरसेविका दिपाली कुलकर्णी यांच्यासह अनेक महिला हजर होत्या. ११ एप्रिल २०१५ रोजी प्रगती महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. महिलांचे आरोग्य, बचत व उद्योग हा उद्देश त्यामागे असल्याची माहिती कुलकर्णी यांनी यावेळी दिली. पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे मनोगत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. वाढत्या शहरीकरणात गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून महिलांनी घरात तसेच घराबाहेर सर्तक राहण्याचा सल्ला त्यांनी उदाहरणासहित उपस्थित महिलांना दिला. या कार्यक्रमानिमित्त डाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात मनिष कुलकर्णी, उमा राजूरकर यांच्या इशस्तवनाने झाली. जयश्री गोगटे व मीना वाघ यांचा कलाभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहल काळे, शिल्पा देशपांडे, मंजुषा पुजारी, शैला विसपुते, सुजाता कुलकर्णी, विदुला कुलकर्णी, मंजुषा जोशी आदी हजर होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरकतींवर निकाल पुढील आठवड्यात

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींवर पुढील आठवड्यात निर्णय दिला जाणार आहे. या हरकतींवरील सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी घेण्यात आली.

पंचवार्षिक निवडणूक घेण्यासाठी पणन सहकार विभागाने आदेश दिल्यानंतर मतदार याद्या तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार नाशिक आणि पिंपळगाव बाजार समितीच्या सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी हमाल मापारी मतदारसंघाच्या याद्या तयार करून ३० एप्रिलला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर ११ मे रोजीपर्यंत आक्षेप आणि हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली होती. या हरकतींच्या आक्षेपांवर गुरुवारी सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली.

नाशिक बाजार समितीच्या सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल व्यापारी गटातून १२ तर पिंपळगाव बाजार समितीच्या मतदारसंघातून १० हरकती आल्या. गेल्या मार्च महिन्यात काही विकास संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यानुसार या संस्थांवर नवीन संचालक आले आहेत. मात्र, या संचालकांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे हरकत नोंदवली आहे. अनेकांची नावे यादीत नाहीत. तर ज्या किरकोळ व्यापाऱ्यांकडे २ वर्षापासून परवाना आहे त्यांनाच मतदाना अधिकार दिला आहे. मात्र, काही व्यापारी २० महिन्यांपासून कार्यरत आहेत. त्यांनीही मतदानाचा हक्क मिळण्याची मागणी केली आहे. ८० किरकोळ व्यापारी मतदानापासून वंचित राहणार असल्याचे या हरकतीद्वारे सांगण्यात आले आहे.

२० मे रोजी अंतिम मतदार यादी

पिंपळगाव बाजार समितीअंतर्गत निफाड मधील ६९ गावांचे कार्यक्षेत्र आहे. सोसायटी गटात १३ जागा असून एक जागा आर्थिक दुर्बल दोन जागा महिला राखीव आहेत. अकरा जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत. ग्रामपंचायत गटात जागा आहेत. बाजार समितीत २३ सदस्यांचे संचालक मंडळ असेल. निवडणूक मात्र २० जागांसाठी होईल. स्थानिक ग्रामपंचायत पंचायत समितीतील सदस्य ठरावानुसार बाजार समितीत संचालक होणार आहे. तर अंतिम मतदार यादी २० मे रोजी प्रसिद्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यगृहांचा अहवाल होणार सादर

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील नाट्यगृहांच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी नाशकात आलेले पथक नुकतेच मुंबईकडे रवाना झाले. हे पथक सांस्कृतिक संचालनालयाकडे त्यांचा अहवाल सादर करणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व नाट्यगृहे देखभालीसाठी राज्य सरकार ताब्यात घेणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चार नाट्यगृहांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई येथील आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थी प्रांजल कन्सारा, सुजित पाठक, मुंबई नाट्य निर्माता संघाचे प्रणित बोडके यांचे पथक शहरात आले होते. या पथकाने महाकवी कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर नाट्यगृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह व पंडित पलुस्कर सभागृहाची पाहणी केली. संबंधित व्यवस्थापकांकडून नाट्यगृहाविषयीची सविस्तर माहिती घेतली तसेच ४० प्रश्न असलेली छापील प्रश्नावलीही भरून घेण्यात आली. या पथकाने नाट्यगृहांची छायाचित्रेही घेतली. हे पथक सांस्कृतिक संचालनालयाला अहवाल सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘संस्थाचालकांच्या मुसक्या आवळा’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खाजगी विनाअनुदानित महाविद्यालये शिक्षण शुल्क समितीकडे खोटी कागदपत्रे किंवा शपथपत्रे दाखल करून सरकार अन् जनतेच्या डोळ्यात धुळफेक करताहेत. याप्रकारे जनतेचे आर्थिक शोषण करणाऱ्या संस्थाचालकांच्या विरोधात पालक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. कायद्यानेही अशा दोषी संस्थाचालकांच्या मुसक्या आवळाव्यात. विद्यार्थ्यांची बाजू योग्य असल्यास शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे सहकार्य राहील, अशी भूमिका मंचने मांडली आहे.

येवल्याच्या जगदंबा शिक्षण संस्थेत स्नेहल गाडेकर या माजी विद्यार्थिनीचीच शिक्षक म्हणून खोटी व केवळ कागदोपत्री नेमणूक दाखविण्यात आली. फीवाढी संदर्भातील कागदपत्रांवर स्नेहल यांच्या खोट्या सह्या करून ती कागदपत्रे शिक्षण शुल्क समिती व सरकारच्या विविध मंडळांकडे दाखल करण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर स्नेहल यांनी संस्थाचालकांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचे मंचच्या वतीने स्वागत करण्यात आले. या प्रकरणी आता येवला न्यायालयाने आदेशांनुसार गुन्हे दाखल करण्याचे कर्तव्य पोलिस बजावतील अशीही अपेक्षा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

उच्च व तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात संस्था चालकांकडून फी संबंधित नियमांचे पालन होते आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी सरकारच्या वतीने गठीत शिक्षण शुल्क समितीची आहे. मात्र, दरवर्षी या समितीकडे येणाऱ्या सुमारे तीन हजारांवर प्रस्तावांच्या छाननीसाठी केवळ एक अर्धवेळ लेखापरीक्षक आहे. परिणामी या प्रकरणांची चौकशीही होत नाही.

खोट्या शपथपत्रांचा आधार

शिक्षण शुल्क समितीकडे महाविद्यालयांच्या वतीने सर्रासपणे खोटी शपथपत्रे सादर करून कोट्यवधी रुपयांची फी सामान्य जनतेच्या खिशातून संस्थाचालक ओरबडून घेत असल्याचा मुद्दाही यावेळी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला. संस्थाचालकांच्या नफेखोरीच्या विरोधात पालक व विद्यार्थ्यांनी एकजूट करावी, असे आवाहनही मंचच्या उपाध्यक्षा छाया देव, सचिव डॉ. मिलींद वाघ, अध्यक्ष श्रीधर देशपांडे, सचिन मालेगावकर आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासक नियुक्ती मुद्द्याला बगल

$
0
0



प्रचारात उमेदवारांकडून अवाक्षरही नाही; सोयीच्या राजकारणावर सगळ्यांचा भर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेतील अनागोंदी कारभारामुळेच राज्य सरकारला प्रशासकाची नियुक्ती करावी लागली. मात्र, हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात एकही नेता घेत नसल्यामुळे सोयीचेच राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. सत्तेवर आल्यावर पारदर्शी कारभाराची हमी देण्याचा वादा करणारी नेतेमंडळी गेल्या काही वर्षांतील आपल्या कार्यकर्तृत्वाला विसरले की काय असा सवाल सभासद करीत आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीनंतर तीनही पॅनलने वैयक्तिक गाठीभेटींबरोबरच जाहीर बैठकांवरही भर दिला आहे. बँकेतील जुन्याच पदाधिकाऱ्यांनी सवतासुभा मांडत स्वतंत्र पॅनल निर्मिती करीत केली आहे. या स्वतंत्र चुली मांडताना तीनही पॅनलच्या अजेंड्यावर आगामी काळातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भर दिला जात आहे. मात्र, बँकेच्या भूतकाळाविषयी अद्याप एकाही पॅनलने भाष्य केलेले नाही. परिणामी, आपसात विरोधात असणाऱ्या तीनही पॅनलमधून जिल्हा बँकेच्या गत वादग्रस्त कारभारावर पडदा टाकण्याचेच धोरण स्वीकारले आहे का? अशी चर्चा सभासदांमध्ये झडू लागली आहे.

बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अद्वय हिरे यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरे पॅनल निर्माण केल्यानंतर पाठोपाठ डॉ. सुनील ढिकले यांनी भूमिका स्पष्ट करीत त्यांच्या विरोधात दिवंगत उत्तमराव ढिकले पॅनलची ‌निर्मिती केली. यामुळे त्यांनी जुन्याच सहकाऱ्यांसमोर आव्हान उभे केले. यापाठोपाठ आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह माजी खासदार देविदास पिंगळे यांनी शेतकरी विकास पॅनलची मोट बांधली आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल दहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून येणाऱ्यांमध्ये सहकारावर वर्चस्व असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश असून, नेतृत्व मात्र भाजपकडे असल्याने आघाडीच्या नेत्यांची गोची झाली आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रथमच शिवसेना आणि मनसेची अवस्था क्षीण झाली आहे. सहकार राज्यमंत्री शिवसेनेचे असतानाही, त्यांचे दोनच उमेदवार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी बरेचसे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बिनविरोध निवडीत आघाडी घेतली आहे. २१ पैकी तालुकानिहाय १५ जागांपैकी १० जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या दहा पैकी काँग्रेसचे ३, राष्ट्रवादीचे ४, भाजपचे २ तर माकपचा एक उमेदवार निवडून आले आहेत. सद्यस्थितीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार हे वेगवेगळया तीन पॅनलचे असले तरी, यात आघाडीचा वरचष्मा आहे.

दुसरीकडे दोन पॅनलचे नेतृत्व हे प्रथमच भाजपकडे आहे. भाजपचे अद्वय हिरे आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे व सुरेश बाबा पाटील हे दोन स्वतंत्र पॅनलचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात भाजपला प्रथमच अच्छे दिन आले आहेत. शिवसेनेचे चार आमदार असताना बँकेत पक्षाने फारसा पुढाकार घेतलेला दिसत नाही. निवडणुकीच्या प्रचाराला आता खरी जोमाने सुरुवात झाली आहे. मात्र या निवडणुकीत सरकारने गैरकारभाराला वेसण घालण्यासाठी नेमलेल्या प्रशासक मंडळाबद्दल कोणी

अवाक्षर काढायलाही तयार नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वच पॅनल याबाबत चुप्पी का साधत आहेत याबद्दल मतदारांमध्ये संभ्रम आहे.

संचालक मंडळ सत्तेवर असतांना काही शे कोटीच्या तोट्यात बँकेला जावे लागले. परिणामी संचालकांना सरकारने घरी पाठविले. त्यानंतरच्या वर्षभरातच प्रशासक मंडळाने तोटा भरून काढत चक्क बँकेला ८६ कोटींच्या नफ्यात आणले. बँकेला उर्जितावस्थेत आणणाऱ्या या प्रशासकाबद्दलही प्रचारात कोणी तोंड उघडायला तयार नाही. या प्रकाराने सभासदांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निकृष्ट कामे जमीनदोस्त करू’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली बंधाऱ्याची कामे निकृष्ट झाल्याचे आढळून आले तर ती जेसीबीने उद्धवस्त केली जातील, असा सज्जड दम जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी कंत्राटदारांना दिला आहे. तसेच, विहित वेळेत ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

जलयुक्त शिवार अभियानाद्वारे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २६ गटांमध्ये एकूण १३० बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे येत्या दीड महिन्यात पूर्ण होतील की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या कामांचे कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदारांची बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. कंत्राटदारांच्या अडचणी काय आहेत, हे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतले. 'तुमच्या कामाची बिले काढण्यासाठी कुणी अधिकारी वा कर्मचारी पैशाची मागणी करीत असेल तर थेट मला फोन करा', असेही त्यांनी सांगितले.

येत्या दीड महिन्यात बंधाऱ्याची कामे पूर्ण करा. निकृष्ट दर्जाची कामे करण्याचे धाडसही करू नका. मुख्यमंत्री स्वतः या कामांची पाहणी करणार आहेत. ज्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून येईल ते जेसीबीने तोडण्यात येईल. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा दम जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना भरला. त्यामुळे जिल्ह्यातील बंधाऱ्याच्या कामांना येत्या काही दिवसात चालना मिळणार असून ते विहित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कामांना पावसामुळे ब्रेक!

$
0
0



त्र्यंबकेश्वरः त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थाच्या कामांना अवकाळी पावसामुळे गुरुवारी अचानक ब्रेक लागला. जिल्हा प्रशासनाने या कामांसाठी १५ मे रोजीपर्यंतच अल्टीमेटम दिला; मात्र पावसाने विकासकामांची चाके चिखलात रुतली आहेत. मेनरोड महत्त्वाचा शाहीमार्ग तसेच कुशावर्त चौक परिसर अशी महत्त्वपूर्ण कामे रांगळली आहेत. ती या आठवडाअखेर पूर्ण होणे अशक्य असल्याचे दिसत आहे.

शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेत गोदावरी संगम घाटावरील उद्यानात असलेले शेड काढण्यात आले. तसेच मंदिर ते ग्रामीण रुग्णालय या रस्त्यावरील उजव्या बाजुस असलेले अतिक्रमण काढण्यात आले. मंदिराचा कोट मोकळा करावा म्हणून मंदिर व्यवस्थापन प्रशासनाने येथील व्यवसायिकांना नोटीस बजावली असून मंदिर कोटा लगतचे १७ फुट अंतर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तेलीगल्ली चौकातील अतिक्रमण काढण्यासाठी आले असता पाऊस आल्याने ही मोहीम थांबविण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅनालिसिसचा पॅरालिसिस

$
0
0




म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी माणसाची निरीक्षणशक्ती अफाट आहे. त्यामुळे उद्योजक बननण्यासाठी सर्व गुण त्याच्याकडे नक्कीच आहेत. परंतु, त्याला अॅनालिसिसचा पॅरालिसिस झाल्याने त्याची ही अतिचिकित्सकता त्याला मारक ठरत आहे, असे प्रतिपादन अविनाश सिसोदे यांनी केले.

गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या ९४ व्या वसंत व्याख्यानमालेत 'उद्योजकता आणि मराठी माणूस' या विषयावर ते बोलत होते. हे व्याख्यान ग. ज. म्हात्रे यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आले होते. सिसोदे पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये एक उद्योजक दडलेला आहे. भारत जगाची आर्थिक सूपर पॉवर बनू शकतो, उद्योगाची राजधानी बनू शकतो. कारण आपल्या माणसांकडे उद्योजक बनण्यासाठीचे सर्व गुण आहेत. नेहमी म्हटले जाते की, मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो परंतु माझे पाय मात्र कोणत्याही मराठी माणसाने ओढले नाही, असेही ते म्हणाले.

मराठी माणसासारखा जिद्दी माणूस दुसरा कोणताच नाही, हे सांगतानाच सिसोदे म्हणाले की, उद्योजकता शिकविण्याची गरज नसते. कारण ती अंगभूत गुणांपैकी एक आहे. मराठी माणसावर सातत्याने काही न काही जोक करून त्यांची मानसिकता खालावण्यास कारणीभूत ठरते आहे. मराठी माणसाला काही सवयी वाईट आहेत. त्याला वाटते की सर्व सुरक्षित असावे परंतु उद्योगाच्या सुरूवातीला कोणताही नफा मिळत नाही. त्याशिवाय काम करण्याची तयारी दाखवावी लागते, असेही ते म्हणाले. त्वरित काहीच मिळत नसते, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी दाखवावी लागते, असे त्यांनी सांगितले. अरूण शेंदूर्णीकर यांनी ग. ज. म्हात्रे यांच्याबद्दल माहिती देऊन त्यांना अभिवादन केले. संजय गिते यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. तर वसंत व्याख्यानमालेचे विश्वास मदाने यांच्या हस्ते सिसोदे यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर स्वाती पाचपांडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images