Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सिंहस्थ कामांना मिळेना मजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा काळात लग्न सराईचा मुहूर्त निघत नसल्याने नाशिक शहर व जिल्ह्यात लग्नांचा धामधूम सुरू आहे. याचा परिणाम सिंहस्‍थ कामांवर झाला असून, मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. तसेच वेळेवर रोजंदारीचे पैसे न दिल्यामुळेही मजुरांनी सिंहस्‍थ कामांकडे पाठ फिरविल्याचे मजुरांकडून सांगण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्‍थ कामांची लगीनघाई सुरू आहे. रस्ता, निवारा शेड, टॉयलेट, आखाड्यांची कामे, पाइपलाइनची कामे, घाट बांधकाम आदी कामे वेगाने सुरू आहेत. या सर्व कामांना उशीर झाल्यामुळे एकाच वेळी सर्व कामे उरकण्याची प्रशासनाकडून घाई सुरू आहे. काही कामांना पंधरा मे पर्यंत तर काही कामांना या महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यामुळे सर्वच कामांना मजुरांची मोठी गरज भासत आहे. पावसाला सुरुवात झाल्यास सर्व कामांवर पाणी फिरू शकते याची प्रशासन व अधिकारी व ठेकेदारांना कल्पना आहे. यामुळे सर्वच जण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. लग्न सराईमुळे मजुरांवी वानवा जाणवत आहे.

कामानुसार मजुरीचे दर दिले जात आहेत. सर्वसाधारणपणे मजुरांना ३५० रुपये मजुरी दिली जात आहे. कारागीरला ७०० रुपये, आरसीसी काम करणाऱ्यास ६०० रुपये, महिला कामगारांना २०० ते २५० रुपये मजुरी दिली जात आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वांना मजुरीचे वाटप केले जाते.

पाणीटंचाईमुळे टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. एका टँकरसाठी ४०० रुपये तर एक ब्रास वाळूसाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. काही ठेकेदारांनी छोट्या ठेकेदरांना ठेका देऊन कामे उरकण्यावर भर दिला आहे. यामुळे मजुरांना मजुरी मिळण्यास दिरंगाई होत असल्याने अनेक मजुरांनी या कामांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छ गोदाघाटासाठी प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

गोदावरी नदीतील प्रदूषणाचा प्रश्न कायमचा निकाली काढला जाईल व गोदावरीचे पाणी पूर्ववत निर्मळ करण्यात येईल. स्वच्छ गोदाघाटासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असून, त्याचे परिणाम लवकरच समोर येतील, अशी अपेक्षा पालकमंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केली.

महाजन यांनी रविवारी सकाळी रामकुंड, लक्ष्मण कुंड, गांधी तलाव, य. म. पटांगण आदी परिसराची पाहणी केली. यावेळी पुरोहित संघातर्फे सतीश शुक्ल यांनी आपली बाजू मांडली. कुंभमेळा आणि रामकुंड यांचा थेट संबंध असून, प्रशासनाने सर्वात प्रथम या ठिकाणावरील मंदिरे व घाटांचे सुशोभीकरण करण्याची मागणी शुक्ल यांनी पालकमंत्र्यांकडे केली. चर्चेदरम्यान प्रदूषणाचाही मुद्दा समोर आला. त्यावेळी स्वच्छ गोदाघाटासाठी प्रशासन कटिबध्द असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोदावरीच्या सर्व कुंडाची व घाटांची दुरुस्ती, बांधकाम वेळेत पूर्ण होतील. तसेच, परिसरातील मंदिरांच्या सुशोभीकरणाचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमीत बग्गा, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, महापालिका आयुक्त प्र​वीण गेडाम, महापालिकेचे विभाग प्रमुख तसेच विविध आखाड्यांचे महंत हजर होते. यानंतर, महाजन यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत रामवाडी, तपोवनाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ कामांसाठी वाहनांना बंदी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकला सिंहस्थ नियोजनात रहदारीची आणीबाणी निर्माण झाली आहे. सिंहस्थ कामांना वेग यावा म्हणून स्थानिक आणि बाहेरची सर्व वाहने शहराबाहेर पार्क करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

नगरपालिका प्रशासनाने प्रारंभी ढिल दिल्याने आता एकाच वेळेस रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाला पंधरा तारखेपर्यंत कामे पूर्ण करावयाची असल्याने शहरातील सर्व वाहनांचा प्रवेश रोखण्यात आला आहे. दि. ८ मे २०१५ पासून प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी वाहतूक पोलिसांना सूचना देऊन वाहने शहरात सोडण्यास मनाई केली आहे. शहरात चारचाकी वाहनधारकांची संख्या मोठी आहे. यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांची वाहने, काळी पिवळी प्रवाशी वाहने यांचा विचार करता शहराबाहेरील वाहनतळ फूल झाले आहे. वाहनांच्या रांगा गजानन महाराज संस्थान शेजारील रस्त्यावर लागल्या. तसेच, हमरी-तुमरीचे प्रसंग देखील निर्माण झाले.

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उच्चपदस्थांच्या भेटी घेऊन प्रशासनावर दबाव टाकणे व याबाबत निर्णय फेरविचार करण्यासाठी दूरध्वनी ते प्रत्यक्ष भेटींचा सिलसिला सुरू झाला आहे. अर्थात कामे वेगाने आणि दर्जेदार करावयाची असतील, तर प्रशासनाला सहकार्य करा व शहराबाहेरून किमान एक दीड किलामीटर अंतर पायी चालावे, अशी बहुतांश नागरिकांची मानसिकता दिसून आली आहे. यामध्ये गावाबाहेर वाहने पार्क करण्यास नागरिक तयार आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या नागरिकांनी शहराबाहेर वाहने नेली आणि शहरात आणता न आल्याने संतप्त वातावरण निर्माण झाले होते. अर्थात असा निर्णय यापूर्वीच घ्यावयास हवा होता. नागरिक वाहने गावाबाहेर थांबवतील मात्र, ठेकेदारांच्या सोयीप्रमाणे असलेला कामांचा वेग वाढेल काय असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

शहरातील रस्ते काही महिन्यांपासून खोदले आहेत. कामांना विलंब का हा नागरिकांचा सवाल आहे. नव्याने सिमेंट ओतलेल्या रस्त्यावरून वाहने जातात तसेच, वाहनांच्या कोंडीने कामे करणे अशक्य होते, असा ठेकेदारांचा प्रतिवाद होता. त्यास प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी वाहने थांबवून कामांचा मार्ग मोकळा केला आहे. आता वेगाने आणि दर्जेदार काम होणे अपेक्षित आहे. त्यास कितपत यश येते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नियोजनासाठी होणाऱ्या बैठकांबाबत साधू, संतांसह नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे. दररोज आढावा आणि दररोजची हजेरी घेऊनही कामांचा ठावठिकाणा नाही. कागदी अहवाल आणि कामांची प्रगती यामध्ये ताळमेळ राहिलेला नाही. याबाबत साधुंनी कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत असे मत व्यक्त केले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळा

प्रशासनाने वाहने थांबविण्याचा निर्णय घेतल्याने त्यास सहकार्य करण्याचे बहुतांश नागरिकांना स्पष्ट केले आहे. परंतु, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे नगरपालिका, महसूल, पंचायत समिती, पोलिस प्रशासन आदी सर्व शासन यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचारी यांची खासगी वाहने शहरात प्रवेश मनाई करण्यात यावी, अशी रास्त मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर धरणाजवळ कारने घेतला पेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात कारने अचानक दुपारी पेट घेतला. सुदैवाने यात कुठलिही जीवित हानी झाली, नसली तरी गंगापूर धरण परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी काही मिनिटात दाखल होत आग विझवली.

गंगापूर धरण परिसरात सुटीच्या दिवशी जणू काही यात्राच भरत असते. विशेष म्हणजे धरण परिसरात फिरणे कायद्याने गुन्हा असताना देखील बिनधिक्तपणे नागरिक याठिकाणी पार्टी करताना दिसतात. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला गंगावऱ्हे गावाच्या शिवारात शेर्वेलेट (क्रमांक एमएच-१५ डीसी-८०८२) चिखलात फसली होती. यावेळी चालकाने गाडीची रेस करीत गाडी काढण्याचा केविलवाना प्रयत्न केला. परंतु, गाडी चिखलात जाम अडकली असताना जास्त रेस दिल्याने मशिन गरम झाले व अचानक मशिनने पेट घेतला. याप्रसंगी गाडीत बसलेले सर्वजण तत्काळ गाडीच्या खाली उतरल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अश्निशमन

दलाचे अनिल जाधव, रवींद्र लाड, ए. पी. मोरे, व्हि. एम. निर्वाण घटनास्थळी दाखल होत गाडीची आग विझवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांस विक्रीची दुकाने हटवली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील व परिसरातील अनधिकृत मांस विक्रेत्यांचे दुकाने तसेच नाशिक - ताहाराबाद रस्त्यामधील पथदिपांच्या खांबावर व इतरत्र लावलेले अनधिकृत बोर्ड, बॅनर, झेंडे नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने काढण्यात आले. तसेच, सुमारे १३ अनधिकृत मांस विक्रेत्यांची दुकाने हटविल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिली.

नगरपरिषदेच्या वतीने ५५ कर्मचारी, दोन टॅक्ट्रर, हायड्रोलीक डम्पर प्लेसर, तसेच पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने शहरातील अनधिकृत मांस विक्रेत्यांचे दुकाने हटविण्यात आली. या मोहिमेमध्ये देवमामेलदार यशवंतराव महाराजांच्या मंदिरामागील सटाणा - मळगाव रस्त्यालगतचे तीन, पुष्पांजली थियटर समोरील तीन, नामपूर रस्त्यालगत दोन, चौगाव रस्त्यालगत एक, जिजामाता उद्यान ते अमरधाम रोड लगत एक, पोलिस चौकी ते अमरधाम रोड लगत एक असे १३ दुकाने हटविण्यात आली. यापुढे अनधिकृत मांसविक्री व होर्डिंग लावणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील मुख्याधिकाऱ्यांनी दिला.

पथदिपांच्या खांबावर व इतरत्र लावलेले अनधिकृत बोर्ड, बॅनर, झेंडे देखील काढण्यात आले. अतिक्रमण विभाग प्रमुख शालीग्राम कोर, रमेश धोंडगे, प्रशांत पाठक, हिरालाल कापडणीस, संजय सोनवणे, आंनदा सोनवणे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ गावांना टँकरने पाणीपुरवठा

$
0
0

बागलाण तालुक्यात आठ विहिरींचे अधिग्रहण; आवर्तनाची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यात पाणीटंचाईमुळे ११ गावांना पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. तालुक्यातील आठ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण केल्याने पाणीटंचाईवर प्रशासनाला काहीअंशी मात करता आली आहे. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा नदीपात्रातील पाणी आटल्याने केळझरचे आवर्तन सोडवून सटाणा शहरातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील अजमीर सौंदाणे, सुराणे, कातरवेल, रातीर, रामतीर, खिरमाणी, भाक्षी, सारदे, इजमाने, चौगाव, पिंपळदर या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी चार शासकीय व एक खासगी अशा पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर तरसाळी, नवेगाव, जुनी शेमळी, नवी शेमळी, किरायत वाडी, जामनवाडी व खमताणे या गावांचे टँकर सुरू करण्यासाठी शासनाला प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने तरसाळी व जुनी शेमळी या दोन गावांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.

तालुक्यातील आठ ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, यात दऱ्हाणे येथे परशराम पाकळे, भाक्षी येथे शशिकांत खैरनार, बिजोरसे येथे प्रवीण पवार, चौंधाणे येथे दगुबाई मोरे, नामपूर येथे वर्षा सावंत, कऱ्हे येथे सुनील जाधव, आराई येथे उपसभापती परशुराम अहिरे, तर सटाणा येथे कैलास खैरनार यांच्या विहिरी अधिग्रहीत करण्यात आली आहे. नामपूर, सटाणा व आराई येथील विहिरी

टँकर भरण्यासाठी असून, अन्य विहिरीवरून गावातील नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

दरम्यान, पाणीटंचाईवर प्रशासनाने मात केली असली तरीही भविष्यातील अंदाज घेत सुक्ष्मपणे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी दिली. गत पाच वर्षापेक्षा या वर्षी तालुक्यात टँकरची संख्या कमी असून, गत काळात कमी झालेल्या पावसाबरोबरच यंदाच्या अवकाळी व गारपिटीच्या परिणामामुळे पाणीटंचाई विशेषत्वाने जाणवली नसल्याचे दिसून येत आहे.

आमदार चव्हाण यांचे निवेदन

उन्हामुळे विहिरींनी तळ गाठल्याने बागलाण तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मे महिना असल्याने उष्णतेने सर्वत्र पाण्याची वणवण होत आहे. नागरिकांना दूरवरपर्यंत पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे हरणाबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, या मागणी बागलणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे. तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे हरणाबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाणी सोडल्यास मोसम नदी लगतच्या हरणबारी, मुल्हेर, अंतापूर, शेवरे, ताहाराबाद, पिंपळकोठे, भडाणे, जायखेडा, वाघळे, आसखेडा, द्याने, उत्राणे, राजापूरपांडे, नामपूर, मोराणे, खामलोण, अंबासन, ब्राह्मणपाडे आदी गावांचा पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे. यामुळे या परिसरातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबण्यास मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकरांच्या विचार प्रचंड तेज

$
0
0

दिग्दर्शक राजदत्त यांचे प्र‌तिपादन

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांचे विचार हे एक धगधगते अग्निकुंड आहे व त्याच्या ज्वाला विद्वत्ता, तेज आणि बुद्धिमता असून आपण त्यापासून प्रेरणा घेऊन सावरकरांची विचारधारा समाजात पसरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी केले.

भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था व अभिनव भारत मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भगूर येथील सावरकर विद्या संकुलात सावरकर प्रेमींच्या दोन दिवसीय अभ्यास कृती शिबिराचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधिनीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा निलिमा गोखले या होत्या. तर व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत सूर्यकांत रहाळकर, विश्व हिंदू परिषदेचे प्रांतध्यक्ष एकनाथ शेटे तर सचिव गणेश वढवेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात राजदत्त यांनी सांगितले, की सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टीकोन देशाला निश्चित महासत्तेकडे घेऊन जाईल. पण त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य देशातील तरुणांनी आपल्याकडे घेतले पाहिजे. सावरकरांच्या कार्याला उपयोगी पडल्याचा आपल्याला अभिमान वाटेल व देशातील इतर तरुणही सावरकरांच्या विचारांचा अंगिकार करण्यासाठी पुढे सरसावतील.

शिबिरात कोठारी कन्या शाळा येथे भेट व विविध मान्यवरांचे सावरकरांवरील विचार व्याख्यान व मार्गदर्शन झाले तर दुसऱ्या दिवसाची सुरवात आठ जिल्ह्यांमधून आलेल्या प्रतिनिधी व सावरकर प्रेमींची सकाळी भगूर येथील सावरकर स्मारकास भेट देऊन झाली. त्यानंतर सावरकरांच्या जीवनावर आधारित माहितीपटांच्या ध्वनीचित्र फितीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शिक्षणतज्ज्ञ सूर्यकांत रहाळकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. आठ जिल्ह्यांमधून आलेल्या प्रतिनिधींचे विचार विनिमय सत्रानंतर शिबिराचा समारोप झाला. यावेळी गिरीश पिंपळे, विलास कुलकर्णी, रामदास आंबेकर, जितेंद्र भावसार, मनोहर आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वितेसाठी सतीश भावे, सुनिता मोगल, दिनेश देवरे, प्रतापराव गायकवाड, सुशील सहस्रबुद्धे, मनोज कुंवर, प्रशांत लोया, योगेश बुरके आदी प्रयत्नशील होते. शाम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. मृत्यूंजय कापसे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुस्लिम आरक्षणासाठी प्रयत्न’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

राज्यातील भाजप शिवसेना सरकारच्या काळात रद्द झालेले मुस्लिम आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी नव्याने प्रयत्न करणार असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान आश्वासन दिले आहे. ते नुकतेच नाशिकच्या दौऱ्यावर आहे होते.

काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. खान अख्तर-उल-इमान व उपाध्यक्ष डॉ. इजहार खान यांनी खान यांची दौऱ्यादरम्यान भेट घेतली. मुस्लिमांचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा लागू करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत आयोगाचे अध्यक्ष खान यांनी राज्य सरकारला मुस्लिमांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीची संपूर्ण माहिती करून देत मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची सरकारकडे शिफारस करू, असे आश्वासन दिले.

राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने देऊ केलेले पाच टक्के मुस्लिम आरक्षण युती सरकारच्या काळात हिरावले गेले. त्यामुळे मुस्लिमांचा आर्थिक व सामाजिक विकासाचे दरवाजेच बंद झाले आहेत. यामुळे समाजापुढे विविध समस्यांचा उभ्या आहेत, असे डॉ. खान अख्तर-उल-इमान यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिवर्तनवाद्यांविरोधात षडयंत्र

$
0
0

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे परिवर्तन साहित्य परिषदेत प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगात तत्त्वज्ञानाची गरजच उरलेली नाही. जो तो 'विकत घेऊ शकतो'च्या भूमिकेत आहे. आयपीएलच्या खेळाडूंपासून प्राध्यापकांपर्यंत सर्व विकत घेता येते. अशा पध्दतीने परिवर्तनवाद्यांची ताकद कमी करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. खरेदी हा परिवर्तनवाद्यांच्या ताकद कमी करण्यातला एक महत्त्वाचा घटक होऊ पहात आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.

सामाजिक प्रबोधन चळवळीत सक्रिय असणाऱ्या त्रैमासिक परिवर्त जनता परिवाराच्या वतीने रविवारी परिवर्त साहित्य परिषद झाली. कॉ. गोविंद पानसरे साहित्य नगरी असे नाव कार्यक्रम स्थळाला देण्यात आले होते. या परिषदेचे उदघाटन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गंजमाळ येथील रोटरी क्लबला हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर कवी सुधीर भगत, प्रा. मंगला खिंवसरा, कवी अविनाश गायकवाड, जयेश कर्डक, सुनील तिरमारे, डॉ. पद्माकर तामगाडगे, प्राचार्य बी. बी. प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक सुधाकर गायकवाड होते.

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, की सत्ता कशासाठी वापरायची याचे भान सध्या राहिलेले नाही. न्यायदेवतेचा तराजू वंचितांच्या दिशेने कधीच झुकत नाही अशी परिस्थिती पुन्हा एकदा उदभवली आहे. १९०१ नंतरचे जग समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसे झाल्यास दलित साहित्य कळण्यासाठी मदत होणार आहे. राजकीय व सामाजिक वातावरण सध्या कोठे नेणार आहे हा संभ्रम निर्माण झाला आहे व तो दूर करण्याचा प्रयत्न एकही राज्यकर्ता करीत नाही. पूर्वी समाजावर परिवर्तनवाद्यांचा दबाव होता. परंतु, तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे; त्यामुळेच डॉ. दाभोळकर पानसरे बळी गेले आहे. पुढे ही यादी लांबतच जाणार आहे. राजकारणातून परिवर्तन होते. गांधी, नेहरू व बाबासाहेब राजकारणातच होते तेथूनच दिशा बदलता येते, असेही डॉ. कोत्तापल्ले म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात सुधाकर गायकवाड म्हणाले, की आंबेडकरी तत्त्वज्ञानाची मांडणी योग्य पध्दतीने झालेली नाही. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान आपल्या साहित्यिकांनी समजूनच घेतलेले नाही. त्यामुळे त्यातला जगण्याचा विचार पुढे मांडताच आलेला नाही. आम्ही वेदना व दु:खाचे गीत गात राहिलो परंतु गायल्यावर त्याचा संबंध बाबासाहेबांच्या साहित्याशी लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. खरे ते आधी व्हायला पाहिजे होते असेही गायकवाड म्हणाले. त्यांचे साहित्य मांडू शकलो नाही हा आमचा दोष आहे. हा दोष पुढे भिनत राहिल्याने दलित साहित्यात वेगवेगळे प्रवाह येत गेले.

परिषदेच्या सुरुवातीला डॉ. नरेंद्र दाभोळकर ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन मुंबई येथील प्राचार्य डॉ. बी. बी. प्रधान यांनी केले. यावेळी परिवर्त विशेषांकाचे प्रकाशन झाले. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना महाकवी वामनदादा कर्डक वादळवारा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता; परंतु कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान कवी अरुण नाईक (सिंधुदुर्ग) व संतोष कांबळे (मालेगाव) यांना अरुण काळे स्मृती अजातशत्रू काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

परिवर्तन चळवळीत महिलांचा सहभाग धूसर

तिसऱ्या सत्रात 'परिवर्तनाच्या चळवळीत महिलांचा सहभाग धूसर झाला आहे' या विषयावर प्रा. मंगला खिंवसरा (औरंगाबाद) यांचे व्याख्यान झाले. त्या म्हणाल्या की, महात्मा गांधींनी सुरू केलेल्या लढ्यामध्ये अनेक स्त्रीयांचा सहभाग होता. त्या उच्चकुलीन होत्या. नंतर मात्र या स्त्रीया घरातच राहिल्या. त्यांना निवडणुकीतही नेतृत्त्व करता आले नाही. मात्र, आंबेडकरांच्या चळवळीत स्त्रीया तेव्हाही लढत होत्या व बाबासाहेबांच्या निर्वाणानंतरही लढत राहिल्या.

या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे होते. महापारेषणचे कार्यकारी अभियंता सुनील तिरमारे, इंदिरा आठवले, भगवान हिरे व काशिनाथ वेलदोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दौलतराव घुमरे, नाट्यलेखक भगवान हिरे, चंद्रभागा भरणे, सुरेश भवर, कवी काशिनाथ वेलदोडे यांना नाशिक जिल्हा वाङमयीन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अंजन घालणारे कविसंमेलन

गझलकार गौरवकुमार आठवले यांनी घणाघाती आशयाची गझल सादर केली. चौथ्या व अखेरच्या सत्रामध्ये प्रसिध्द साहित्यिक किशोर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिध्द गीतकार सुधीर भगत, अविनाश गायकवाड, कवी-समीक्षक डॉ. पद्माकर तामगाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कवींचे कवीसंमेलन झाले. यावेळी कैलास पगारे, विनायक पाठारे, दयाराम गिलाणकर, संतोष कांबळे, किरण भावसार, अरूण नाईक, वंदना गायकवाड, शारदा गायकवाड, अॅड. अशोक बनसोडे, अरुण इंगळे यांसह कवींनी कविता सादर केल्या.

परिषदेस महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि साहित्यिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा. गंगाधर अहिरे, किशोर शिंदे, मधुकर पवार, रोहित गांगुर्डे, शाम बागूल,अशोक मोरे यांनी प्रयत्न केले.

नेमाडेंच्या विधानाचा समाचार

ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी जातीव्यवस्था राहू द्यावी अशा प्रकारचे उदगार काढले होते. त्याचा खरपूस समाचार डॉ. कोत्तापल्ले यांनी घेतला. ते म्हणाले, की डॉ. नेमाडेंना जातीव्यवस्था राहू द्या म्हणायला काय लागते. आम्ही त्यात पूर्णपणे पिचलेलो आहोत. ज्याची वेसन समाजाच्या हातात आहे, त्या घोड्याला लोखंडाचे चणे खाऊ घालण्यासारखी परिस्थिती असताना नेमाडे यांनी असे बोलणे बरे नव्हे, असेही कोत्तापल्ले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रॉम्प्टन ग्रिव्हजची कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या उद्योग वर्तुळातील अग्रेसर कंपनी क्रॉम्प्टन ग्रिव्हजमध्ये दोन वेगळ्या मात्र एकाच विचार धारेच्या युनियनमधील परस्पर विरोधी भूमिकेमुळे कंपनीचे मॅनेजमेंट कोंडीत सापडले आहे. या कंपनीत अलिकडील काळात स्थापन करण्यात आलेल्या सीटू प्रणित संघटनेने सोमवारपासून (दि. ११) बेमुदत संपाची भूमिका कायम ठेवली आहे. तर, हा संपच बेकायदेशीर असल्याने कामगारांनी भवितव्याचा विचार करुन कामावर हजर व्हावे. कामगारांना आयटक आणि कंपनी मॅनेजमेंटच्या वतीने संरक्षण पुरविण्यात येईल, असे आवाहन आयटक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

अंबडच्या औद्योगिक वसाहतीमध्ये क्रॉम्प्टन ही अग्रेसर कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. या कंपनीत पूर्वीपासून भालचंद्र कांगो यांची आयटक प्रणीत कामगार संघटना कार्यरत आहे. ही युनियन मान्यताप्राप्त असल्याने कंपनीने 'आयटक'शीच वेतनवाढीचा करार केला असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. गत दोन वर्षांपासून या कंपनीत सिटू प्रणीत कामगार संघटना क्रियाशील झाली आहे. या संघटनेकडे एकूण कामगारांपैकी सुमारे ९० टक्के सभासद असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संख्येच्या आधारावर सिटू प्रणीत कामगार संघटनेने कंपनीत संघटना स्थापनेचा प्रस्ताव कंपनी मॅनेजमेंटसमोर मांडून औद्योगिक न्यायालयाकडेही अर्ज केला होता. यामुळे कंपनीच्या मॅनजेमेंटने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत सिटू प्रणीत संघटनेसोबतच चर्चा करावी, अशी मागणी सिटू प्रणीत संघटनेने केली होती.

या पार्श्वभूमीवर 'आयटक'ने ठाणे न्यायालयात दाद मागितल्यानंतर मान्यताप्राप्त संघटनेशी कंपनीने कराराची बोलणी करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. या घडामोडींनंतर 'आयटक'सोबतच्या झालेल्या बोलणीवर सीटू प्रणित कामगार संघटनेने आक्षेप घेत संपाचे हत्यार उपसले आहे.

तर अगोदरच्या कामगार संघटनेनंतर नवी कामगार संघटना स्थापन केल्याच्या निर्णयामुळे कंपनीही कारवाईसाठी काही मोजक्या कामगारांना लक्ष्य करीत असल्याचे सिटू प्रणीत कामगार संघटनेचे म्हणणे आहे. तर न्यायालयाच्या निर्देशांनुसारच कंपनीचे निर्णय होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या स्थितीबद्दल कंपनीने कामगार उपायुक्तांशीही चर्चा केली असून १९ मे रोजी हा तिढा सोडविण्यासाठी बैठकही बोलविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ समन्वयात महापौर अपयशी

$
0
0

मनसेच्या आरोपांवर पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांचे प्रत्युत्तर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्यासारख्या महासोहळ्यास सामोरे जाताना प्रशासक, स्थानिक साधू महंत आणि पुरोहित संघ यांच्या समन्वयासाठी अपेक्षित भूमिका विद्यमान महापौरांकडून घेतली जात नसल्याचा दावा पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी रविवारी केला आहे. हा दावा करतानाच पंतप्रधानांच्या भेटीस जाण्याअगोदर महापौरांना तीन वेळा निमंत्रण दिले होते. यापेक्षा आणखी करावे? असा सवाल उपस्थित करीत मनसेच्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले.

सिंहस्थाची तिथी जसजशी नजिक येऊ लागली आहे तसतसा श्रेयवादाच्या मुद्याला उकळी फुटते आहे. याच श्रेयवादाच्या चढाओढीचा प्रत्यय मनसे आणि पुरोहित संघ यांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमधून येतो आहे. सिंहस्थाचे महत्त्व ज्या ठिकाणी आहे तेथेच यंदा अपेक्षित कामे झालेली नाहीत. आता पालकमंत्र्यांच्या भूमिकेमुळे ही कामे मार्गी लागतील असा विश्वास वाटतो. मात्र, यासाठी सुरुवातीपासूनच योग्य तो समन्वय विद्यमान महापौरांना साधता आलेला नाही, असा दावा शुक्ल यांनी 'मटा' शी बोलताना केला. गत कुंभमेळ्यात तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांनी पुरोहित संघ, स्थानिक साधू महंत आणि प्रशासनाच्या वारंवार बैठका घडवून आणल्या. परिणामी अपेक्षित कामांमध्ये सुसुत्रता आणि योग्य तो समन्वय दिसून येत होता. मात्र, यंदा या प्रकारच्या समन्वयापाशीच सर्व कामे अडताहेत, असेही शुक्ल म्हणाले.

कुंभमेळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याबाबतच्या मुद्यावर खुलासा करणारे पत्रकही शुक्ल यांनी प्रसिध्द केले आहे. या पत्रकात मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या मुद्याचे खंडन करण्यात आले आहे. आपण पंतप्रधानांच्या भेटी अगोदर महापौरांनाही सोबत चलण्यासाठी आग्रह धरला होता. त्यासाठी त्यांना दोन वेळा फोनच्या माध्यमातून तर एकदा प्रत्यक्ष भेटीतून संपर्क केला होता. या निमंत्रणास त्यांच्याकडूनच अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर मनसेकडून पुरोहित संघाच्या पंतप्रधान भेटीबाबतच्या विषयावर करण्यात आलेले वक्तव्य हे अत्यंत अपूर्ण माहितीवर आधारित असल्याने त्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असाही खुलासा शुक्ल यांनी केला आहे.

राज ठाकरेंचीही वेळ मागितला होता

महापौरांच्या सोबतीलाच या निमंत्रणाच्या वेळी आमदार बाळासाहेब सानप व आमदार देवयानी फरांदे यांनाही पंतप्रधान भेटीसाठी सोबत येण्याची विनंती केली होती. तर महापौर अशोक मुतर्डक यांना सोबत घेण्याची खासदार हेमंत गोडसे यांचीही इच्छा होती. याशिवाय याच भेटीसाठी मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांचीही वेळ मागण्यासाठी पदाधिकाऱ्यांना संपर्क केला होता, असा दावा शुक्ल यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनलक्ष्मी’कडे मतदारांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चार दशकांपासून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात परिचित असणाऱ्या जनलक्ष्मी बँकेच्या मतदानाकडे मतदारांनी पाठ फिरविली. बँकेच्या निवडणुकीसाठी सुमारे ३८ हजार मतदारांपैकी अवघ्या ३२०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बँकेच्या आवारातील इमारतीतच रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. समृध्दी आण‌ि परिवर्तन पॅनलमध्ये ही लढत होत आहे.

या निवडणुकीत समृध्दी पॅनल विरोधात उर्वरित पाच उमेदवार अशी लढत झाली. ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वाशीसह नाशिक, मालेगाव आणि जळगाव या ठिकाणी ३९ मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. तर नाशिक शहरासाठी पाच केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. बँकेच्या मतदानासाठी मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही.

नाशिकमध्ये सकाळच्या सुमाराला मतदार केंद्रांमध्ये गर्दी दिसून आली. मात्र, उन्हाच्या चढत्या पाऱ्यासोबतच गर्दीचा वेग मंदावत गेला. शहरात सारडा कन्या विद्यालय, पंचवटी परिसरासाठी पेठरोडचे उन्नती विद्यालय, कॉलेजरोड, सातपूर आणि गंगापूर रोडसाठी शरणपूर रोड येथील रचना विद्यालय, सिडको व अंबडसाठी त्रिमूर्ती चौकातील पेठे विद्यालय आणि नाशिकरोड परिसरासाठी कोठारी कन्या विद्यालय या केंद्रांवर मतदान झाले. सर्व केंद्रांवर मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. मावळे यांनी दिली. एकूण प्रक्रियेसाठी ३९ केंद्रांवर ३४४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण मतदार संख्या ३७ हजार ३४५ होती. यापैकी अवघ्या ३२०७ उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजाविला. या अगोदरच रमेश चांदवडकर आणि उत्तम उगले यांची निवड करण्यात आली आहे.

आज होणार मतमोजणी

सर्वसाधारण गटातून समृध्दी पॅनलच्या वतीने माधवराव पाटील, उत्तम कांबळे, जयंत जानी, रामरतन करवा, श्रीकांत रहाळकर, संजय चव्हाण, संदीप नाटकर, रवींद्र अमृतकर, सतीश सोनवणे, भालचंद्र पाटील, तर महिला राखीव गटातून अनुराधा केळकर, स्वप्ना निंबाळकर आणि अनुसूचित गटातून शरद गांगुर्डे हे रिंगणात आहेत. तर परिवर्तन पॅनलकडून महिला राखीव गटातून मधून शर्मिला मेहता, अनुसूचित जाती जमाती या गटातून अशोक लोखंडे, तर सर्वसाधारण गटातून विजय देशमुख आणि रॉय दाम्पत्य निवडणूक रिंगणात आहे. सोमवारी (दि. ११) होणाऱ्या मतमोजणीत या उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्साहाने फुलला कॉलेजरोड

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

एरवी धूम बाइकर्स आणि तरुणाईच्या गर्दीने फुलणारा कॉलेजरोडवर रविवारी महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित हॅपी स्ट्रीट अबालवृध्दांच्या उत्साहाने फुलला होता. विविध अॅक्ट‌िव्हिटीजच्या ठिकाणी तोबा गर्दी करीत तेथील कलाकृतीचा मनसोक्त आनंद नागरिकांनी लुटला.

गेले कित्येक रविवार 'हॅपी स्ट्रीट्स'चा आनंद लुटण्यात तरबेज झालेले नाशिककर या रविवारीही (१० मे) ति‌तक्याच उत्साहाने 'महाराष्ट्र टाइम्स'च्या या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. गेम्स, डान्स, सेल्फी आणि एग्झिबिशन्समध्ये रममाण होत नाशिककरांनी या हॅपी संडेची धमाल लुटली. कॉलेजरोडवरील मॉडेल कॉलनी सर्कल ते बिग बझार सर्कलदरम्यानचा रस्ता 'मटा'ने खास नाशिककरांसाठी राखिव ठेवला होता. त्यामुळे सकाळी सात वाजताच इथे सुरू झाली लगबग 'हॅपी स्ट्रीट्स'मध्ये सहभागी होण्याची. हळूहळू करत शेकडोंच्या संख्येने जमा झालेले नाशिककर वाट पाहात होते ती अॅक्ट‌िव्हीटीज सुरू होण्याची. स्टेजवर बॉडी स्क्लप्टिंगची सुरुवात होताच केवळ दुरुन पाहणारे प्रेक्षकही यामध्ये सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या कित्येक डान्सनी नाशिककरांना ठेका धरायला लावला.

स्टेजवर हा माहोल असतानाच रोडवर सुरू झाल्या विविध अॅक्टिव्हीटीजमुळे टॅटू काढण्यापासून व्हॉलीबॉलपर्यंत असं बरचं काही नाशिककरांना अनुभवता आलं. लहानग्यांपासून वृध्दांपर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही या ठिकाणी होते. त्यामुळे प्रत्येकाचाच उत्साह वाखाणण्यासारखा होता. मॅस्कॉटबरोबर केलेली धमाल, टॅटूज, स्केटिंग आनंदाचं निमित्त बनले होते. हे सगळे क्षण संस्मरणीय करण्यासाठी साथ मिळत होती ती सेल्फीची. नऊ वाजल्यानंतर उन्हाचा पारा चढू लागला तरी नाशिककरांनी हा आनंदोत्सव भरभरुन उपभोगला. सकाळी सात वाजल्यापासून साडे नऊ वाजेपर्यंत रंगलेल्या या 'हॅपी स्ट्रीट्स'ने पुन्हा एकदा नाशिककरांना रिफ्रेश केले.

सुजोक थेरपीचाही लाभ

सांधेदुखी व तत्सम आजारांनी अनेकजण बेजार असतात. सुजोक थेरपी हा त्यावर प्रभावी उपाय असल्याचा दावा डॉ. वृषाली रायबागकर यांनी केला. सांधेदुखी व्यथीत असलेल्यांना त्यांनी सुजोक थेरपीच्या मोफत प्रात्यक्षिकांद्वारे दिलासा दिला.

डान्सचा तडका

नाशिककरांचा प्रत्येक रविवार फ्रेश करणाऱ्या हॅपी स्ट्रीटच्या स्टेजवर डान्ससोबतच आरोग्य सांभाळण्याचे धडेही देण्यात आले. प्रज्ञा थोरात यांच्यातर्फे बॉडी स्क्लप्टिंगचे मार्गदर्शन केले गेले. संगीताच्या माध्यमातून बॉडी स्क्लप्टिंग कसे करावे? हे यावेळी शिकवण्यात आले. यामध्ये सर्वच वयोगटातील व्यक्तींनी सहभाग घेतला आणि आपली सकाळ हेल्दी बनवली. यानंतर उपस्थितांमध्ये उत्साह भरण्याचे काम श्रद्धा जोशी आणि त्यांच्या ग्रुपने केले. राजस्थानी फोक डान्स सादर करत त्यांनी सर्वांनाच थिरकायला भाग पाडले. या डान्स परफॉर्मन्सने वातावरणात अधिकच फ्रेश केले. त्यानंतर आलेल्या शाश्वत नृत्य कला केंद्रच्या कलाकारांनी कथक फ्युजन सादर केले. हिंदी गाण्यांवर कथकमधील स्टेप्स सादर करत त्यांनी सर्वांचीच मने जिंकली. 'चिटियाँ कलाईयाँ वे' या गाण्यावर सादर केलेल्या फ्युजनने उपस्थितांची मने जिंकली. या सर्व अॅक्टिव्हीटीजनंतर स्टेजवर बच्चापार्टीने कब्जा मिळवला. हिंदी, इंग्रजी गाण्यांवर चिमुकल्यांचीही पावले थिरकली. त्यामुळे या डान्सच्या तडक्याने हॅपी स्ट्रीटवरील क्षण अधिक स्मरणीय केले.

टॅटूची क्रेझ कायम

वन एट वन टॅटूजचा स्टॉल नागरिकांचे लक्ष वेधणारा ठरला. तेथे भेट देईल त्याच्या हातावर मोफत टॅटू काढण्यात आले. अनेकांनी हवे तसे टॅटू काढून घेतले. लहान्यांसाठी पेंटिंग एग्झिबिशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पहिली ते आठवीच्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र काढली. एचपीटी कॉलेजसमोरील भिंतीवर हे प्रदर्शन मांडण्यात आले होते. नागरिकांनी या लहानग्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. चिंतामण पगार यांच्यातर्फे एचपीटी कॉलेजसमोर कॅल‌िग्राफी सादर करण्यात आली. एनबीटी लॉ कॉलेजसमोर द गराजतर्फे सेल्फ डिफेन्स डेमो दाखविण्यात आले. तसेच दीपाली शिंपी यांच्यातर्फे क्राफ्ट एग्झिबिशन मांडण्यात आले होते. क्रिएटीव्ह हॉबी क्लासेसतर्फे ड्रॉइंग कॉम्पिटीशन घेण्यात आली. आपल्या आवडीच्या विषयातील चित्र यावेळी काढण्यात आली. एसके रेनबो लॅबसमोर ही स्पर्धा झाली.

तारेवरची कसरत

डोंबाऱ्याच्या कसरतीप्रमाणे लहान मुलांनी दोरीवरून चालण्याचा अनुभव घेतला. चैतन्य अमृतकर, भूपेश पाटील, भूषण पांढारकर, शिवा आहेर यांच्या ग्रूपने ही क्लाइनिंगची संधी लहान मुलांना उपलब्ध करून दिली होती.

ढोलवर थिरकली पाऊले

तालबद्ध ढोल वाजविणाऱ्यांचा जोश पाहून तो ऐकणाऱ्यांचे पावलेही थिरकू लागली. ढोलचा थरार जस जसा रंगात येत होता, तसे त्याचा आनंद घेणाऱ्यांमध्येही चैतन्य स्फुरत असल्याचा अनुभव नागरिकांनी हॅपी स्ट्रीटमध्ये घेतला. डॉन बॉस्को स्कूलजवळ विघ्नहरण ढोल पथकातर्फे हे ढोल थरार सादर करण्यात आला.

सेल्फी विथ मॉम

हॅपी स्ट्रीट आणि मातृदिन असा दुग्धशर्करायोग जुळून आल्याने अनेकांनी आपल्या आईसमवेत हॅपी स्ट्रीटवर हजेरी लावून हा रविवार अनोख्या पध्दतीने सेलिब्रेट केला. जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे खास मातृ दिनानिमित्त 'सेल्फी विथ मॉम' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी आपल्या आईसोबतचा सेल्फी पाठवले होते. या हटके स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. बेस्ट सेल्फीला जेएसजी ग्रुपच्या वतीने आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे.

म्युझिकची जादू

कॉलेजरोडवरील अंजली स्टोअर्ससमोर राहुल्स म्युझिक अॅकॅडमीच्या वतीने किबोर्ड, ड्र्म्स यासारख्या विविध वाद्यांचे वादन करण्यात आले. इस्ट अँड वेस्ट अॅकॅडमीतर्फे गिटार वादन आणि नागरिकांच्या फर्माइशीनुसार गायन सादर करण्यात आले. हल्लीच्या पिढीला साद घालणाऱ्या गीतांचा तरुणाईने मनमुराद आनंद लुटला. म्युझिक आणि डान्सचा अनोखा मेळ हॅपी स्ट्रीटवर साधण्यात आला.

बीवायकेसमोर व्हॉलीबॉल

बीवायके कॉलेजच्या ‍गेटसमोर नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनतर्फे व्हॉलीबॉलचा खेळ रंगला. निखिल पंडित यांच्यातर्फे फोटोग्राफी एग्झिबिशनमध्ये नाशिक व परिसरात काढलेल्या सापांचे फोटो हे विशेष आकर्षण ठरले.

मेहंदी आणि नेल आर्टला पसंती

श्रीरचना महाविद्यालयातर्फे एचपीटी कॉलेजसमोर मेहंदी आणि नेल आर्ट काढून घेण्याची संधी नाशिककरांनी साधली. सायली आचार्य यांच्यातर्फे कॅल‌िग्राफी एग्झिबिशन झाले. तर बिग बझार सर्कलसमोर आयोजित अनेक स्पर्धांमध्ये लहान मुलांनी सहभाग घेतला. प्रेमा दांडेकर यांच्यातर्फे वारली आर्ट एग्झिबिशन, प्राईड ग्रुपतर्फे बॉल‌िवूड हंगामा आणि बिग बँगतर्फे सेल्फी स्टँड, गोल पोस्ट, डान्स पर्फॉर्मन्स, मॅस्कॉट असणार आहे.

गेस द वर्ड स्पर्धेने आणली धम्माल

हेनरी सरदार यांच्यातर्फे इंग्लिश गेस द वर्ड स्पर्धा घेण्यात आली. कॉलेजरोड पोलिस चौकीसमोर ही स्पर्धा झाली. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत धम्माल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमेरिकेत हापूसचा घमघमाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

भारतीय हापूस आंब्याची अवीट चव चाखण्यासाठी अमेरिकन बाजारपपेठा आतुरतेने वाट पाहत असतानाच कोकणचा हापूस आंबा अमेरिकेत जाण्यासाठी सज्ज झाला आहे. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात हापूस आंब्यावर प्रक्रिया पूर्ण झालेल्या पहिल्या कंटेनरने अमेरिकन बाजारपेठेकडे कूच केली आहे.

अमेरिकेत गेल्यावर्षी सुमारे पावणे तीनशे मेट्रिक टन हापूस आंब्याची भारतातून निर्यात करण्यात आली होती. यंदा मात्र गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसल्याने निर्यातक्षम आंब्याच्या एकरी उत्पादनात घट झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी गेल्या वर्षीचे टार्गेट पूर्ण होईल, अशी आशा भाभा अणु संशोधन केंद्राचे प्लांट इन्चार्ज प्रणव पारीख यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेला निर्यात करण्याअगोदर हापूस आंब्यावर लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात विकिरण प्रक्रिया केली जाते. या हंगामातील पहिल्या ७ मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण होऊन अमेरिकेला रवाना झाला आहे. यामध्ये मुख्यत्वे हापूस व केशर आंब्याचा समावेश आहे. यासह दशरा, बेंगणपल्ली, लंगडा यांनाही अमेरिकेत चांगली मागणी आहे.

गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने अमेरिकेत भारतीय हापूस आंब्याला हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून पणन मंडळाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण केली जात होती. मात्र यंदा पणन मंडळाचा करार संपुष्ठात आल्याने आता हा प्रकल्प मुंबई येथील अग्रो सर्च या कंपनीने भाडे तत्त्वावर घेतला आहे. विकिरण प्रक्रिया पूर्ण झालेला आंबा आता अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यूजर्सी, शिकागो, कॅलिफोर्निया, ह्युस्टन, सॅन फ्रान्सिको आदी शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. याकामी कोकणातून निर्यातक्षम हापूस आंब्याचे कंटेनर विकिरण करण्यासाठी लासलगावमधील बीआरसीमध्ये दाखल झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री ठोकणार तळ

$
0
0

सिंहस्थाची कामे मार्गी लावण्यासाठी मुक्काम वाढविला

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

गोदावरी स्वच्छतेच्या मुद्यावरून न्यायव्यवस्था मानगुटीवर बसल्याने राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. गोदावरी स्वच्छतेचे आव्हान आणि मुदत संपुनही कुंभमेळ्याशी संबंधीत कामे पूर्ण होत नसल्याने पालकमंत्र्यांनी शनिवारी नियोजित कार्यक्रम रद्द करून नाशिकमधील मुक्काम वाढविला. वेळ पडल्यास नाशिकमध्ये तळ ठोकण्याची तयारी पालकमंत्र्यांनी दर्शविल्याने प्रशासनावरील दबाव वाढला आहे.

गोदावरीचे पाणी प्रदूषित असून, कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने लोक आल्यास ती अधिकच प्रदूषित होईल, अशी भीती व्यक्त करीत गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुंभमेळा काळात गोदावरीचे प्रदूषण आणखी वाढू शकते हे गृहीत धरून राज्य सरकारने नेमलेल्या समितीने ठोस उपाययोजना मांडाव्यात असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र तसे न झाल्याने न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे. समितीने २२ मे पर्यंत आमच्यासमोर योजना मांडाव्यात, अन्यथा आम्हाला कुंभमेळ्यादरम्यान गोदास्नानावर बंदीचा आदेश काढावा लागेल, अशी तंबी मुंबई हाय कोर्टाने राज्य सरकारला दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. शनिवारी नाशिकमध्ये आलेल्या कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी कुठल्याही परिस्थितीत जून अखेरपर्यंत गोदावरी प्रदूषणमुक्त करू, असा निर्धार व्यक्त केला होता. त्यासाठीचे आमचे नियोजन पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी केला.

शनिवारी ‍त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात काही मोजक्याच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कामांमधून कुंभमेळ्याची वातावरण निर्मिती होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. घाटांची कामे तसेच सुशोभीकरण अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. मुदत संपूनही कामे का पूर्ण झाली नाहीत, अशी विचारणा करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दोन महिन्यांवर आला असला तरी लोकांना कामे सुरू असलेल्या तयारीवरून जाणवू द्या, अशी सूचना त्यांनी केली आहे. शनिवारी महाजन नाशिक येथील दौरा आटोपून जामनेरला जाणार होते. मात्र सिंहस्थ कामांची पाहणी करण्यासाठी त्यांनी नियोजित दौरा रद्द करीत त्यांनी नाशिकमध्येच मुक्काम केला.

रविवारी सकाळी पालकमंत्र्यांनी रामकुंड, साधुग्राम तसेच पंचक व टाकळी येथील एसटीपी प्रकल्पाची पाहणी करीत सूचना दिल्या. नदी प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी परिसरातील जुन्या मंदिराची रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे तातडीने करा, नदीपात्रातील कारंजाचे सुशोभिकरण करा, नदीपात्रात कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घ्या, परिसर स्वच्छ व सुंदर दिसेल यादृष्टीने उपाययोजना करा, पावसाळ्यामुळे साधुग्राम कामाच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्या, पत्र्याच्या शेड मजबूत करण्यासाठी आवश्यक सुधारणा करा, स्नानगृहातून पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी अतिरिक्त चारी तयार करा, पाण्याचा उतार बाहेरच्या दिशेने राहील याची दक्षत घ्या आदी सूचना पालकमंत्र्यंनी अधिकाऱ्यांना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामांचा दर्जा घसरल्यास कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत म्हणून विविध विभागांचे अधिकारी पालकमंत्र्यांच्या रोषाचे धनी ठरले आहेत. कामे लवकरात लवकर पूर्ण करणे हीच डेडलाईन ठेवण्यात आली असून, ती न पाळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या कामांची गुणवत्ता राखणे बंधनकारक असून, तसे न करणाऱ्या ठेकेदारांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी दिला आहे.

पालकमंत्र्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत कामांना दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. मुदत संपूनही कामे पूर्ण होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. लवकरात लवकर कामे पूर्ण करा, असे आदेश देण्यात आले आहेत. १५ मे पर्यंतची मुदत देण्यात आली असली तरी २५ मे पर्यंत मुदत द्यावी, अशी अधिकाऱ्यांची मागणी आहे. परंतु, डेडलाईन हा विषयच आता मागे पडला असून लवकरात लवकर कामे पूर्ण करणे हीच डेडलाईन ठरविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे कामे मुदतीत पूर्ण करतानाच त्याची गुणवत्ता ढासळणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान आहे. ही कामे ज्या ठेकेदारांकडे सोपविण्यात आली आहेत, त्यांचीही गय केली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी कुशवाह यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंहस्थानिमित्त होणाऱ्या कामांमध्ये त्रूटी आढळल्या तर त्याची जबाबदारी अधिकारी आणि ठेकेदार अशी दोन्हींवर निश्चित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परमेश्वर सर्वांना सुखी ठेवो’

$
0
0

त्र्यंबकेश्वरच्या दहाही आखाड्यांची परंपरा वेगवेगळी आहे. तसेच, प्रत्येक आखाड्यांच्या उपासना देवताही वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक आखाडा हिंदू धर्म, संस्कृतीचे रक्षण करण्याबरोबरच देशात एकता व अखंडता टिकून राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नया उदासीन आखाड्याचा मूळ उद्देश हा हिंदू सनातनची रक्षा करणे हाच आहे. या आखाड्यातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. नया उदासीन आखाड्याची स्थापना श्री चंद्राचार्य महाराज यांनी केली. भारतभर या आखाड्याच्या २९ शाखा आहेत. या आखाड्याचे मुख्यालय उत्तराखंडमधील कनखल येथे आहे. 'परमेश्वर सर्वांना सुखी ठेवो' ही या आखाड्याची विचारधारा आहे. लंगरसाठी हा आखाडा मुख्यत्वे ओळखला जातो.

प्रत्येक आखाड्याचा नगरप्रवेश सोहळा व ध्वजारोहण वेगवेगळ्या तारखांना होत असतो. यासाठी आपल्या देशभरातील साधू, महंतांना आंमत्रित केले जाते. नया उदासीन आखाड्याचे ध्वजारोहण २४ ऑगस्ट रोजी तर नगरप्रवेश सोहळा हा २५ ऑगस्ट २०१५ रोजी होणार आहे. यासाठी आखाड्यातर्फे जोरदार तयारी सुरू आहे. माहिती पत्रक, निमंत्रण पत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. आखाडा दानधर्मातही आघाडीवर आहे. आखाड्याची स्वत.ची जवळपास सहाशे, सातशे एकर जमीन आहे. अहिल्या धरणावर बांधण्यात आलेल्या घाटासाठी आखाड्याने काही जमीन दिली आहे. महंत जगतार मुनीजी, महंत त्रिवेणीदास महाराज, विचारदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आखाड्यातील कामे सुरू आहेत.

निवारा शेडचे काम खूपच संथ गतीने सुरू आहे. काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही. स्वच्छतागृहात जायला रस्ता नाही मग, बांधलेच कशाला? प्रशासनाने काम लवकर पूर्ण करावे. - विचारदास महाराज



आखाड्याचे उद्देश

भाविकांची सेवा करणे, भोजन (लंगर) देणे.

देशात काही आपत्ती आल्यास सहकार्य करणे.

संस्कृत विद्यालय चालविणे.

मोफत आयुर्वेदीक औषधे पुरविणे.

संस्कृतीची रक्षा करणे.

धर्म रक्षा व धार्मिकतेची स्‍थापना करणे.

हिंदू सनातनची रक्षा करणे.

शांती प्रस्थापित करणे.

पर्यावरण रक्षणासाठी यज्ञ, अनुष्ठान करणे.



आखाड्याच्या शाखा

इलाहाबाद उत्तर प्रदेश

अलीगढ उत्तर प्रदेश

वाराणसी उत्तर प्रदेश

उज्जैन मध्य प्रदेश

अमरावती महाराष्ट्र

वाशिम महाराष्ट्र

नाशिक महाराष्ट्र

नागपूर महाराष्ट्र

अमृतसर पंजाब

पतियाला पंजाब

आरा बिहार

डूमराव बिहार

कुरुक्षेत्र हरियाणा

मझाडा हरियाणा

सिलसिला हरियाणा

डेहरादून उत्तराखंड

बिशनपूर उत्तराखंड

कंकरखाता उत्तराखंड

बाखरपूर उत्तराखंड

कीर्ती नगर नवी दिल्ली



आखाड्यातील सोयीसुविधा

सिंहस्थानिमित्त सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. निवारा शेड, स्वच्छतागृह, रस्ते आदी कामे करण्यात येत आहेत. आखाड्यात करण्यात येत असलेल्या कामांवर मात्र साधू, महंतांनी नाराजी व्‍यक्त केली आहे. करायचे म्हणून काम केले जात असल्याचा आरोप आखाड्यातर्फे करण्यात येत आहे. सिंहस्थ तोंडावर येऊन ठेपला असताना ही कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

स्वच्छतागृह रस्त्याविनाच

स्वच्छतागृह रस्‍त्याच्या कडेला बांधण्यात आले आहे. स्वच्छतागृहापेक्षा रस्ता किमान तीन ते चार फूट उंच आहे. स्वच्छतागृहात जाण्यासाठी पायऱ्याही बांधण्यात आलेल्या नाहीत. या कामावर आखाड्यातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आखाड्यात वीस बाय ऐंशी फूटचे दोन निवारा शेड बांधण्यात येत आहेत. काम सुरू होऊन कित्येक दिवस झाले तरी काम सुरूच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थासाठी हवा मुबलक पाणीपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा पाऊस एक जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र पावसाची सरासरी नेहमीच्या तुलनेत कमी असू शकते, असा काहीसा चिंतेत टाकणारा इशाराही आहे. यामुळे सिंहस्थात पाणीटंचाईची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावात थोडेच पाणी शिल्लक आहे. यामुळे पाऊस मुबलक झाला नाही तर शाहीस्नानाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

गेल्या वर्षी पावसाला वेळेत सुरुवात झाली होती. मात्र, नंतर पावसाने दडी मारली होती. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या कुशावर्ताचे रंगरंगोटीचे काम सुरू आहे. गंगासागर तलावात अजून बऱ्यापैकी साठी असला तरी शाहीस्नानापूर्वी हा तलाव भरणे गरजेचे आहे. तसेच शहरात सध्या मिनरल वॉटरच्या बॉटलचेही भाव वाढले आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पाण्याचा धंदाही चांगलाच तेजीत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैठकांमध्ये जातोय अधिकाऱ्यांचा वेळ

$
0
0

नाशिक : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामासाठी पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. कोणते काम कुठपर्यंत आले यासाठी बैठकांवर बैठक व पाहणी दौरे होत आहेत. कामपेक्षा अधिकाऱ्यांचा विविध बैठकांमध्येच वेळ जात आहे.

सिंहस्थ जवळ येऊ लागल्याने आठवड्यातून एखाद दुसऱ्या मंत्र्यांचा नाशकात दौरा सुरू आहे. कामांची फक्त तोंडी व कागदोपत्री माहिती सादर केली जात आहे. पाहणी दौरा करून कामांची पाहणी केली जात आहे. जवळपासच सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत.

सिंहस्थ कामांसाठी अल्टीमेटमही देण्यात आला आहे. वर्षभर टंगळमंगळ करणारे अधिकारी आता कामे उकरण्यावर भर देत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याचा प्रश्न अधांतरी

$
0
0

त्र्यंबकेश्वरला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरमध्ये कचरा टाकायचा कोठे अशी समस्या सिंहस्थ कालावधीत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून केलेली विकासकामे 'सगळ मुसळ केरात' या म्हणी प्रमाणे शब्दश: केरकचऱ्यात जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्र्यंबकेश्वर शहरात कोट्यवधी भाविक येतील. त्यांच्या माध्यमातून हजारो टन टाकावू घटकांचा कचरा तयार होईल. त्याची विल्हेवाट लावणार कशी याबाबत कोणीही बोलायला तयार नाही.

साठ वर्षांपासून येथे असलेल्या कचरा डेपोवर प्रक्रिया करून त्याचे खत आणि माती तयार करण्याचा अद्भूत प्रयोग राबविण्यात आला. त्यास तब्बल ४० लाख रुपये खर्च आला. ही माती आणि खत म्हणे सर्वांना खूप आवडल्याने त्यांनी त्याची वारंवार मागणी केली. अनेकांनी बागायतीसाठीही वापर केला. अर्थात काही शेतकऱ्यांनी मात्र यात खताची मात्रा कमी आणि काच, राळ आदी जास्त असल्याने हे फुकटचे खत वाहून नेण्यास नापसंती व्यक्त केली. ४० लाख रुपये खर्चाने १२ हजार मेट्रिक टन कचरा विघटीत झाला असे सांगण्यात येते.

सिंहस्थात घाट बांधतांना उपसण्यात आलेला कचरा पुन्हा डोंगर होऊन उभा ठाकला आहे. त्याच्यावर पुन्हा प्रक्रियेचा उतारा वापरयाचा तर त्यास तीन आठवडे पाहिजे. परंतु, त्या दरम्यान पाऊस झाला तर आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. यावर खल सुरू झाला आहे. अर्थात या करिता पुन्हा दहा ते पंधरा लाख रुपये लागणार हे निश्चित झाले आहे. एकूणच त्र्यंबकचा कचरा असा दिवसेंदिवस अधिकाधिक खर्चिक होत चालला आहे.

त्र्यंबकचा कचरा डेपो हा तसा जुना विषय आहे. काही वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. येथून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या पहिने ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कोजुली शिवारात कचरा डेपोसाठी शासनाने तीन हेक्टर जागा निश्चित केली. त्यानंतर न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली. न्यायालयाने निवाडा दिल्यानंतर ग्रामसभा तसेच ग्रामस्थांचा पुणे येथे पाहणी दौरा आदी सोपस्कार होत राहिले.

डिसेंबर २०१४ मध्ये त्यास महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रक मंडळाने हिरवा कंदील दिल्यानंतर ४ डिसेंबर २०१४ रोजी तातडीने पोलिस बंदोबस्तात मोजणी केली. त्यानंतर पहिने ग्रामपंचायतीने हरित लवादात दावा दाखल केला आणि १८ फेब्रुवारी २०१५ रोजी कचरा डेपोची जागा फेरी मार्गावर असून वैतरणा, बाणगंगा या नद्यांच्या प्रदूषणास हा डेपो कारणीभूत होऊ शकतो या मुद्यावर हरित लवादाने ही जागा रद्द केली.

त्र्यंबक येथे दररोज पाच ते सहा टन ओला व सुका कचरा निर्माण हातो. सिंहस्थ कालावधीत यात कित्येक पटीने वाढ होणार आहे. ओला कचरा हॉटेल तसेच भाजीबाजार आणि घरगुती वापराचा आदी तयार होतो. मात्र, तीर्थक्षेत्र असल्याने प्लास्टिक आणि तत्सम अविघटनशील कचरा येथे मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. यात्रा कालावधीत हजारो टन निर्माण होणार आहे. वस्ती वाढत गेल्याने आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा डेपो नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहचविणारा ठरत आहे.

बायोगॅस प्रकल्पाची उभारणी

त्र्यंबक पालिकेने हरित लवादाच्या निर्णयानंतर बॉयोगॅस प्रकल्प उभारणी हाती घेतली आहे. येथून जवळच असलेल्या सापगाव शिवारात दोन गुंठे जागेवर हा प्रकल्प काही दिवसात कार्यान्वित होईल. तेव्हा त्यात दोन मेट्रिक टन ओला कचरा विघटीत करता येणार आहे. त्र्यंबक येथे ओला आणि सुका कचरा स्वतंत्र करण्यात येऊन ओला कचरा बायोगॅस मिथिनेशन प्लॅन्टवर पाठविण्यात येईल. मात्र, सुका कचऱ्याचे काय करणार हा सवाल कायम राहिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images