Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची फि‌ल्डिंग

$
0
0

येवला नगराध्यक्ष निवडणुकीसाठी हालचाली गतिमान

म. टा. वृत्तसेवा, येवला

आमदार छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शबानाबानो शेख यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याने आता, उर्वरित काळासाठी कुणाला संधी मिळते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

तेवीस सदस्य संख्या असलेल्या येवला नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, अपक्ष दोन व काँग्रेस एक अशी सत्ताधारी आघाडी असून, विरोधात भाजपचे तीन व शिवसेनेचा एक असे चार सदस्य आहेत. नगरपालिका राजकारणात अजून तरी आमदार छगन भुजबळ यांचाच शब्द अंतिम असल्याने भुजबळ सांगतील तोच नगराध्यक्ष होईल, असे चित्र आहे. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद सर्वसाधारण होते. यात प्रथम राजश्री पहिलवान व नंतर नीलेश पटेल यांना संधी मिळाली होती. नंतरच्या अडीच वर्षात नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भुजबळ यांनी मुस्लिम समाजाला अर्थात शबानाबानो शेख यांना संधी दिली होती.

शेख यांची दहा महिन्यांची टर्म संपल्याने इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाल्याने भुजबळ यांनी शेख यांना नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली. शेख यांच्या राजीनाम्यानंतर मात्र, गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मनमाड पालिका राजकारणातील बदलते नाट्य पाहता येवल्यात दगा फटका होऊ नये म्हणून यावेळी राष्ट्रवादीला काळजी घ्यावी लागणार आहे. नगराध्यक्षपदासाठी प्रदीप सोनवणे, मुश्ताक शेख, सरला निकम, जयश्री लोणारी, नीता परदेशी हे पाच इच्छुक असून, यापैकी कुणाला संधी मिळते याकडे शहरवासीयांचे अन् राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाणा बाजार समितीचे विभाजन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन सटाणा व नामपूर या दोन बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. सटाणा बाजार समिती कार्यक्षेत्रात ७७ गांवे तर, नामपूर बाजार समिती कार्यक्षेत्रात सर्वाधिक ९४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, शासननियुक्त प्रशासक मंडळात समावेश होण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे.

सटाणा बाजार समितीचे क्षेत्र बागलाण तालुका असून, तालुक्यात सुमारे १७१ गांवे व खेडी होती. सटाणा व नामपूर बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात असून, आजमितीस दोन्ही बाजार समितीकडे सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम शिल्लक असल्याने विकासकामांना मोठ्या प्रमाणात वाव मिळणार आहे. सटाणा बाजार समिती कक्षात सुमारे १३३९ तर, नामपूर बाजार समिती कक्षेत ३७९ अनुज्ञाप्ती धारक असणार आहेत. दोघा बाजार समितीकडे ३४ व २६ कर्मचारी वर्ग व आवश्यक बाबी आहते.

सटाणा कार्यक्षेत्र

सटाणा, अजमीर सौंदाणे, आराई, आव्हाटी, औंदाणे, कौतीकपाडे, कऱ्हे, कपालेश्वर, केळझर, तताणी, किकवारी, केरसाणे, दसाने, कंधाणे, खमताणे, चापापाडे, चौगाव, चौंधांणे, जोरण, ठेंगोडा, डोंगरेज, डांगसौंदाणे, तळवाडे दिगर, तरसाळी, तिळवण, करंजखेड, देवळाणे, दहिंदुले, दऱ्हाणे, इंदिरानगर, धांद्री, यशवंतनगर, नवेगाव, नवेनिरपूर, जुने निरपूर, निकवेल, पठावे, सावरगाव, पिंपळदर, ब्राह्मणगाव, बुंधाटे, भवाडे, भिलदर, भावनगर, मोरेगनर, मळगाव, तिळवण, मुंजवाड, मोरकुरे, मुळाणे, लखमापूर, वटार, वनोली, वाठोडा, साळवण, वीरगांव, विंचूरे, जुनी शेमळी, नवी शेमळी, सुराणे, साकोडा, वायगाव, सरवर, वाडी चौल्हेर, मळगाव खुर्द, पिसोरे, कोदमाळ, गांधीनग, रातीर, रामतीर, ढोलबारे, जाखोड, मुंगसे या गावांचा समावेश आहे.

नामपूर कार्यक्षेत्र

आनंदपूर, देवपूर, आखतवाडे, अलियाबाद, आसखेडा, अंतापूर, मोराणे दिगर, अंबापूर, हातनूर, मोहळांगी, अंबासन, इजमाने, उत्राणे, राजपूरपांडे, करंजाड, भुयाणे, दोधेश्वर, काकडगाव, कोटबेल, कातरवेल, खामलोण, खिरमाणी, गोराणे, गोळवाड, भिमनगर, चिराई, राहुड, जाड, गौतमनगर, जायखेडा, जामोटी, वडे दिगर, नरकोळ, वरचे टेंभे, खालचे टेंभे, तळवाडे भामेर, तांदुळवाडी, ताहाराबाद, रावेर, कठगड, तुंगण दिगर, दरेगाव, देवठाण, कोठराबाद, दसेवल, द्याने, नामपूर, निताणे, नांदीन, नळकस, पारनेर, पिंगळवाडे, पिपळकोठे, फोपीर, ब्राह्मणपाडे, बिजोटे, बिजोरसे, बोएरी, बिलपुरी, बोरदैवत, जैतापूर, बाभूळणे, भिलवाड, भडाणे, माळीवाडे, बहिराणे, मानूर, मुल्हेर, लाडूद, वाघंबा, विसापूर, अंजदे, खरड, जयपूर, श्रीपूरवडे, सोमपूर, साल्हेर या गावांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ हजार खांबांसाठी फक्त चार कर्मचारी

$
0
0

अतिरिक्त कार्यभारामुळे वायरमनची दमछाक

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागात असलेले १४ हजार विजेच्या खांबांसाठी केवळ चारच कर्मचारी आहेत. यामुळे कामाच्या अतिरिक्त भारामुळे विद्युत विभागात कार्यरत असलेल्या वायरमनची दमछाक वाढली आहे. कामाचा भार कमी करण्यासाठी सातपूर विभागात वायरमन वाढविण्याची मागणी केली जात आहे.

नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागात सात प्रभाग आहेत. सात प्रभागात १४ लोकप्रतिनिधींच्या विद्युत खांबांच्या समस्या सोडविण्यासाठी चार वायरमन व चार मदतनीस आहेत. सात प्रभागात तब्बल १४ हजार विजेचे खांब आहेत. परंतु, त्यासाठी केवळ चारच वायरमन आहेत. त्यामुळे अनेकदा विद्युत खांबांचे काम करतांना वायरमन व कर्मचाऱ्यांची दमछाक होते. त्यातच काही प्रभागात तर वायरमनची कामे मदतनीस कर्मचाऱ्यांनाच करावी लागत असल्याचे चित्र आहे. यात मदतनीस कर्मचारी खांबांवर काम करतांना अपघात झाल्यास वायरमनचे काम मदतनीसने का केले? असा देखील सवाल उपस्थित होऊ शकतो. परंतु, नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींकडून मांडण्यात आलेल्या समस्यांना महत्त्व देत मदतनीसकडून देखील विना वायरमन विद्युत खांबांची कामे केली जातात. महावितरण कंपनीच्या नियमानुसार ७०० खांबांंसाठी एक वायरमन व एक मदतनीस असतो. परंतु, सातपूर भागात एकाच वायरमनला दोन हजारपेक्षा अधिक विद्युत खांबांची कामे करावी लागत आहेत. यामुळे अनेकदा कामे करतांना वायरमन चांगलीच दमछाक होत असते.

तीन वर्षांपासून गणवेशच नाही

महापालिकेत नव्याने महापौर झाल्यावर प्रत्येक जण नवी कोरी ब्रॅण्डेड गाडी घेण्याचा विचार करतात. परंतु, विद्युत विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून गणवेशच देण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे साध्या कपड्यांवरच विद्युत कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.

मागणी प्रलंबित

लग्न किंवा घरगुती कार्यक्रमासाठी वायरमनने सुट्टी घेतल्यास इतर वायरमन व मदतनीसांवर कामाचा ताण पडतो. कामाचा वाढता ताण लक्षात घेता वायरमनची संख्या वाढविण्याची मागणी विद्युत अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांकडे वेळोवेळी केली आहे. परंतु, आजतागायत महापालिकेच्या सातपूर विद्युत विभागात वायरमनची संख्या वाढविण्यात आलेली नाही. महापालिका आयुक्तांनी किमान आठ वायरमन सातपूर विभागात वाढवून देण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालगुन्हेगारांची ढाल गेली

$
0
0

अरविंद जाधव, नाशिक

खून, बलात्कार, बॉम्ब पाठवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न अशा गुन्ह्यात सापडून देखील अल्पवयीन मुलांना शिक्षेच्या कचाट्यातून अलगद बाहेर पडता येणे यापुढे शक्य होणार नाही. बाल न्याय संरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांकडून हाकनाक बळी पडलेल्यांना यामुळे थोडातरी दिलासा मिळू शकणार आहे. या कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगार सापडला तर त्याच्यावर वयस्कांप्रमाणे खटला भरवण्यात येणार आहे.

गंभीर गुन्ह्यांमध्ये लहान मुलांची वाढती संख्या बघता, बाल गुन्हेगारी रोखण्यासाठीच्या कायद्यामध्ये लवकर बदल करण्याची विनंती सुप्रिम कोर्टाने सरकारला केली होती. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर बालगुन्हेगारीचे 'वास्तव' जगासमोर आले. बाल गुन्हेगारांबाबतचे कायदे मवाळ असल्याने अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये जरब बसत नाही. कायदा कडक झाला तर त्यामुळे समाजात योग्य तो संदेश जाईल, असे मत यामागे होते. यानुसार व्यापक चर्चेअंती केंद्र सरकारने लोकसभेत बाल न्याय संरक्षण कायदा पारीत केला. यामुळे गंभीर गुन्हा करणाऱ्या १६ ते १८ वयोगटातील अल्पवयीन आरोपींविरोधात वयस्कांसाठी असलेल्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यास मान्यता देण्यात आली. या विधयकाच्या उपबंध सातला ही कात्री लावण्यात आली. याच उपबंधानुसार अल्पवयीन आरोपीचे वय १८ इतके करण्यात आले होते. तसेच प्रत्यक्ष गुन्हा करताना १६ ते १८ वयोगटातील आरोपीस २१ व्या वर्षी अटक झाली तरी त्याला अल्पवयीन ठरवून गुन्हा दाखल करण्यात येत असे. आता मात्र गुन्ह्याचे स्वरूप निश्चित करण्यात येईल. गुन्ह्यांची परिणामकारता जास्त असेल तर १६ वर्षाच्या मुलांवर देखील वयस्काप्रमाणे खटला भरवण्यात येऊ शकतो. मात्र, तरीही, अल्पवयीन मुलास फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होणार नाही.

बाल गुन्हेगारांबाबत शहरातील दोन घटनांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. त्यातील एक घटना १२ वर्षापूर्वी देवळाली कॅम्प परिसरात घडली होती. यातील दोघा आरोपींना नुकतेच कोर्टाने दोषी ठरवत २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला. सध्या २६ ते २७ वर्षाचे असलेल्या या तरुणांनी ते १४ वर्षांचे असताना एका साडेचार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार केला. तसेच या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून तिचा खूनही केला. २००४ मध्ये देवळाली कॅम्प परिसरात झालेल्या या घटनेमुळे जिल्हा हादरला. पोलिसांनी बालगुन्हेगारांना ताब्यात घेतले. मात्र, त्यावेळी बाल न्यायालयच अस्तित्वात नसल्याने प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली नाही. आज न्याय मिळेल उद्या सुनावणीला सुरुवात होईल, अशा अपेक्षावर असलेल्या कुटुंबप्रमुखाला २०१५ च्या एप्रिल महिन्यात निकालपत्र हातात मिळाले. न्यायाधीशांची बदली, वकिलांची गैरहजेरी, कोर्टाच्या सुट्ट्या अशा तांत्रिक कारणांमुळे २००७ नंतर तब्बल आठ वर्षे खटला सुरू राहिला. झालेला प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट करीत कोर्टाने त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड सुनावला. अपहरण, बलात्कार आणि खून अशी गंभीर कलमे असलेल्या अल्पवयीन गुन्हेगारांना पहिल्यांदाच ​दोषी ठरवून आर्थिक दंड वसूल करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील हा पहिलाच निकाल त्यामुळे ऐतिहासिक ठरला.

काही महिन्यापूर्वी हिरावाडी भागातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याने पेट्रोल बॉम्ब तयार करण्याची कला अवगत केली. तसेच नंतर हा बॉम्ब राजीव गांधी भवनसमोरील व्यवसायिकाच्या ऑफीसमध्ये पाठवून दिला. बॉम्बचा धाक दाखवून विद्यार्थ्यांला मोठी खंडणी उकळयाची होती. मात्र, हा विद्यार्थी पोलिसांच्या हाती गवसला. खून, वाहनचोरी, बलात्कार, चोऱ्या अशा एक ना अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन तसेच १८ ते २२ या वयोगटातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढू लागला आहे. झोपडपट्टी भागातील मुलांबरोबर उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या समाजातील मुलेही गुन्हेगार म्हणून पुढे येत आहेत. मूलभूत गरजांसाठी पैसे नसणं ही समस्या नसणारी मुलं जेव्हा चोऱ्या करतात, जुगारात पैसे उडवतात, लाखांच्या खंडणीसाठी आपल्याच वर्गमित्राचा खून करतात, आपल्याहून लहान वयाच्या मुलींचा गैरफायदा घेऊन लैंगिक छळवाद मांडतात, तेव्हा या थरारातून जन्मणाऱ्या क्रौर्याची मुळं कुठे-कुठे पसरलेली असतील, या कल्पनेनं सुजाण नागरिकांच्या अंगावर शहारा येतो. काळ बदलत चालला तसे मुलांच्या पालन पोषणाकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टीकोन बदलत आहे. त्यातच किशोरवस्थेतील हिंसकतेला खतपाणी मिळाले तर सहजतेने गुन्हे घडण्यास मदत होते. अल्पवयीन मुलांच्या वर्तनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता कायद्याने बदलला आहे. त्यामुळे सहा​जिकच पालकांवर देखील मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या कडक कायद्याने कमी करण्यापेक्षा पालकांच्या किंवा समाजाच्या दायित्वाने कमी झाल्यास त्याचा फायदा चांगला होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ उन्हाळा कुठे गेला?

$
0
0

>> प्राजक्त देशमुख

आपण लहानपणी दोन कारणांसाठी उन्हाळ्याची वाट पहात रहायचो. एक म्हणजे आंबा आणि दुसरं म्हणजे शाळेची सुटी. विकत घेण्यापेक्षा गरम झळा खात, कानशीलामागून एक गारट घामाची धार अनुभवत आंब्याच्या झाडाखाली उभं राहून अर्जून होण्यातली मजा, बाजारात जाऊन नुसता वास घेत 'कशी दिली पेटी?' यात नाही. आताशा लाईफस्टाइलमध्ये सुट्या त्याच ज्या शनिवार-रविवारला जोडून येतात. बाकी कामाच्या गुऱ्हाळ्यात जुंपलेल्या आयुष्याला सिनेमा किंवा मॉलच्या घुंगरांची तेवढी करमणूक. पण तरी अशा उन्हाळात ऑफिसमधल्या लंचटाईमला एखाद्या तुम्हा-आम्हाला एक प्रश्न दरवेळी पडतो की 'तो' उन्हाळा कुठे गेला?

उन्हाळा आला की सुटी आणि सुटी असली की गाव हे समीकरण पक्कं होतं. मग शेण सारवलेल्या अंगणात उन्हाळ्याची वाळवणं दिसायची. पावसात डबकी चुकवत चालवं तसं ऐन उन्हाळ्यात वाळवण चुकवत उड्या मारत शेवटी दाराला आधार घ्यावा लागायचा. दारावरची साखळीकडी खडडखट्ट करत लाकडी दारावर वाजायची. मग आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात माळ जपत बसलेली म्हातारी घोंगडी ओरडणार 'कोण खेळतंय रे कडी-कोयड्याशी? अशी खटखट नाही करू रे,कटकट होते मग तितक्यात तसाचसा खटखट आवाज लंचटाईमला डब्बा उघडता उघडता होतो, तंद्री तुटते. प्रश्न उरतो 'तो' उन्हाळा कुठे गेला?

मग तुम्ही डबा उघडतात. खालच्या पोळीत लोणच्याच्या पोळीची गुंडाळी असते. हळद मसाल्याच्या घमघमत्या वासांनी परत तुमचं मन अंगणात रमतं. जात्याचा भरारा, कैऱ्यांच्या चार खापा करताना धारदार विळ्यावर आजीचा बांगडीमिश्रित दणका. त्या कच्च्या कैऱ्यांमध्ये एखादा पिकलेला आंबा असायचा मग तो आपल्या झोळीत यायचा. घसा कोरडा झाल्यावर कोणीतरी पाणी आणायला लावायचं. काळ्याकुट्ट मडक्यामध्ये पितळी तांब्या चूबकन बुडवायचा. एकदा त्याच तांब्यामध्ये उंदीर सापडला म्हणून सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. नंतर पोटातली कळ लपवत लपवत प्रत्येक जण सांगत होता की तो उंदीर नाही वाळा आहे. ऑफिसात ठणका बसेल इतकं गार पाणी घशाखाली घरंगळताना वाळ्याच्या निथळत्या चवीची आठवण विचारत राहते की 'तो' उन्हाळा कुठे गेला?

हात धुऊन रुमाल ओला करुन तोंडावरून फिरवल्यावर भर उन्हात कामाची भगभग जरा कमी होईल असं वाटत रहातं तेव्हा नदीवर तासभर डुंबून सुस्तावलेले नदीकाठचे आपण स्मरत राहतो. आपल्या घरातल्या आया-बायका धुणी पिळून खांद्यावर घेऊन निघतात. तेव्हा धुतलेल्या पिळ्यातून चुकून एखादं खाली पडलेलं उपरणं नदीत बुचकाळून आणायचा हुकूम आपल्याला दिला जातो आणि आपण उपरणं घेऊन नदीच्या प्रवाहात उतरतात. वडाखाली वाट पहात असलेल्या आपल्या आयाबायका कपाळी पालथा हात लाऊन, किलकिल्या डोळ्यांनी, आवाज दिल्यावर आपण भानावर येतो आणि उपरणं पिळून गळ्याभोवती लपेटून उन्हाच्या झळा कापत झपाझपा चालू लागतो. ओल्या उपरण्याची पिळ आणि रुमालाची ओल, मानेभोवतीची ओली रेष विचारत राहते कि 'तो' उन्हाळा कुठे गेला.

ऑफिसचा पंखा भरभरू लागतो, कागदं फडफडतात. त्यांना शांत ठेवण्यासाठी काचेचे गारट 'पेपरवेट' तुम्ही आम्ही कागदावर टेकवतो. तेव्हा आठवतो कोतुळेश्वराच्या टेकडीखाली पिंडीखालचा जिवंत झरा आणि आठवतो शिवाईच्या पाणथळीजवळ खोलेश्वरच्या पन्नास फुटी खोल गाभाऱ्यातला पिंडीवरचा गारवा. तेव्हा अंगावर शहारा उभारत तो गारवा विचारत राहतो कि 'तो' उन्हाळा कुठे गेला.

त्याच उन्हाळ्यात आंब्याच्या झाडावर काठी मारल्यानंतर सुकलेल्या बुंध्यावरून एक पोपडा खाली पडतो आणि त्यामागून सैरावैरा पळणाऱ्या मुंग्या दिसतात. अगदी तसं सुटतं मग ऑफीस. 'त्या' सुट्यांमध्ये घडतं असं खूप काही नसतं पण तरी काहीतरी अविरत चालू असायचं असं आता वाटतं.

तरी दरवर्षी आपण परत परत वाट पहात राहतो उन्हाळ्याची. परत परत आठवतं की आपण लहानपणी दोन कारणांसाठी उन्हाळ्याची वाट पहात रहायचो. त्या उन्हाळ्याच्या शोधातलं उतारावरचं पाणी एका उत्तरावर येऊन थांबत की नंतर हळूहळू उन्हाळा भीषण होत गेला. नंतर हळूहळू आपण मोठे होत गेलो, आंबे महाग होत गेले आणि सुट्या कमीकमी होत गेल्या इतकंच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्री घेणार सिंहस्थाचा आढावा

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

गारपिटीने ग्रासलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या हंगामात दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय पूर्वतयारी केली आहे, याचा आढावा पालकंमत्री गिरीष महाजन घेणार आहेत. त्यासाठी ते शनिवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, सिंहस्थ आढावा बैठकीबरोबरच पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या अंमलबजावणीचा शुभारंभही त्यांच्या हस्ते होणार आहे.

नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबरोबरच कुंभमेळा मंत्रीपद सोपविण्यात आल्याने सुरुवातीच्या काळात महाजनांचे नाशिकमध्ये दौरे वाढले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काही बैठका त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून महाजन यांच्या नाशिक भेटी कमी झाल्या. त्यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरविल्याची नागरिकांची भावना होऊ लागली. मात्र, शनिवारी दिवसभर ते नाशिकमध्ये असणार आहेत. सकाळी सातला ते मुंबई येथील शासकीय निवासस्थानावरून नाशि‌ककडे निघतील. सकाळी दहाला ते येथील शासकीय विश्रामगृहावर पोहोचतील. दुपारी बाराला त्यांच्या मुख्य उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम पूर्व बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी तीनला शासकीय विश्रामगृहावर सिंहस्थासंबंधी आढावा बैठक ते घेणार आहेत. त्यास विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नाशिक महापालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक असे काही मोजकेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेपाचला केंद्र शासनाची पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना व अटल निवृत्तीवेतन योजनेच्या जिल्ह्यातील अंमलबजावणी संबंधीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात होणार आहे. त्यानंतर ते जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे रवाना होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षणास निधी मंजूर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक - पुणे प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने एक कोटी तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. या निधीतून लवकरच रेल्वेमार्गाच्या कामाचे सर्व्हेक्षण सुरू होणार आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंना रेल्वेच्या समस्यांसंदर्भात नाशिकमध्ये बैठक घेण्याची विनंती गोडसे यांनी केली आहे.

नाशिक - पुणे या २६५ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या मार्गाच्या मंजुरीवरून माजी खासदार समीर भुजबळ आणि गोडसे यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. महामार्ग मंजूरच झाला नसल्याचा दावा गोडसेंनी केला होता. आता हा मार्ग अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसू लागली असून, या मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने निधीची तरतूद केली आहे. नवीन रेल्वेलाइनच्या सर्व्हेक्षणासाठी एक कोटी तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गाचे सर्व्हेक्षणही लवकरच सुरू होणार असल्याचा दावा खासदार गोडसेंनी केला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात रेल्वेची भूमिका महत्वाची असली तरी, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गोडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र दिले असून, सिंहस्थासाठी रेल्वेच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभुंनी नाशिक येथे येऊन सिंहस्थापूर्वी बैठक घेऊन रेल्वेची समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांचा मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर जगभरातून तिथे मदतीचा ओघ सुरू आहे. या मदत कार्यात खारीचा वाटा म्हणून काही नाशिककरांनीही योगदान दिले आहे. नाशिककरांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात तेथे प्रत्यक्ष मदतीसाठी गेलेल्या नागरिकांमध्ये येथील संमोहन तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड आणि त्यांचे बंधू रत्नदीप गायकवाड यांनीही नेपाळी बांधवांचे मनोबल वाढविण्याचा उपक्रम राबविला.

यापूर्वीही उत्तराखंडमध्ये आलेला प्रलय, माळीण दुर्घटना या भीषण दुर्घटनांनंतरही डॉ. गायकवाड यांनी प्रत्यक्षात मदतकार्यात सहभाग घेतला होता. विदर्भ वैभव न्यासचे अध्यक्ष देविसिंग शेखावत व प्रमुख अशोक गोरे यांच्या सहकार्यामुळे गायकवाड बंधूंना थेट नेपाळ येथे जाऊन मदत कार्य करण्याची संधी मिळाली. या कार्यात नाशिकमधील इतर नागरिकांचेही सहकार्य त्यांना मिळाले. येथील सी. ए. आनंद मुथा, स्वप्नील पानसरे, संतोष तांबट यांच्याकडून डिस्पोजीबल कॅप्स, फेस मास्क्स, डॉ. आनंद बक्षी यांच्याकडून कडून ग्लोव्हज, शीतल भामरे यांचाकडून मास्क्स, ग्लोव्हज, दिनेश परदेशी यांनी सर्जिकल मटेरियल, रोटरी क्लबचे सदस्य चंदन सोनी यांनी काठमांडूमधील रुग्णालयांकडून गरजेच्या वस्तूंची यादी मिळविली. प्रशांत शिंदे यांनी आवश्यक साहित्य जमा करून काठमांडू येथे रवाना केले. कलायतन कुरिअरचे कैलाश नारायण रावत यांनी सर्व साहित्य विनामूल्य नेपाळपर्यंत पाठवले. या कामी सचिन बोधले यांनी मोलाचे सहकार्य केले.

डॉ. शेखावत यांचा पत्रकाच्या सहाय्याने डॉ. गायकवाड यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याची संधी मिळाली. हजारो माक्स नाशिककरांच्या वतीने नेपाळी बांधवांना मोफत वाटण्यात आले. भारत, चीन, जपान या देशांकडून मदत म्हणून तंबूंचे वाटप होत आहे. लवकरच नेपाळमधील एखादया पूर्ण गावाला पूरेशी तंबूंची मदत देण्याचे कार्य डॉ. गायकवाड व त्यांचे सहकारी करणार आहेत. नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांचे स्वीय सचिव रमेश शर्मा भंडारी यांनी संमोहनतज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांना आपत्तीकाळात नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी पुनःश्च नेपाळला येण्याचे आवाहन केले.

मतदकार्याचे आवाहन

या महिन्याच्या अखेरीस डॉ. गायकवाड आणि त्यांचे सहकारी पुन्हा मदतकार्यासाठी अधिक तयारीनिशी जाणार आहेत. नाशिककरांनीही नेपाळी बांधवांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.गायकवाड यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तत्काळ उपचारासाठी सुक्ष्म नियोजन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

कुंभमेळ्यात साधुग्राम आणि भाविकमार्ग परिसरात त्वरित आरोग्य सुविधा उपलब्ध होतील त्या दृष्टीने आरोग्य व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.

कुंभमेळ्याची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी झाली. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, आमदार डॉ. राहुल आहेर, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, पोलिस आयुक्त एस. जग्गनाथ, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. बी. डी. पवार आदी उपस्थित होते.

प्रशासनाने केलेल्या आरोग्यविषयक सूक्ष्म नियोजनाचे सादरीकरण डॉ. पवार यांनी केले. नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी येथील आरोग्य सुविधांचा आढाव मंत्र्यांनी घेतला. त्र्यंबकेश्वर येथे ब्लड स्टोरेज युनिट ठेवणे तसेच गरजेच्यावेळी खासगी रुग्णालयांच्या सुविधा घेण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. ना. सावंत म्हणाले की, जिल्हा रुग्णालय परिसरातील दोनशे खाटांच्या विस्तारीत इमारतीचे काम त्वरित पूर्ण करावे. वैद्यकीय सुविधांच्या दृष्टीने या ठिकाणी महत्वाची कामे करावीत.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधुग्राम परिसरात कुंभमेळा कालावधीत दररोज फॉगिंग करावे, नाशिक परिसरातील धार्मिक स्थळांना भाविक भेट देणार असल्याने या मार्गावरील रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज ठेवावीत. रुग्णवाहिकेसाठी मार्ग निश्चित करावेत तसेच पर्यायी व्यवस्थाही ठेवावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्डीओग्राम सुविधा देण्याची तसेच संसर्गजन्य आजाराबाबत दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यापूर्वी कामे संपवा

$
0
0

विभागीय आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथील कामे वेळेत पूर्ण होणार की नाहीत याची धास्ती आता प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच वाटू लागली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांचा वेग पहाता पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून त्यासाठीच विभागीय आयुक्तांनी गुरुवारी उशिरापर्यंत येथील कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या सिंहस्थाच्या आढावा बैठकीत कामे मुदतीत पूर्ण होत नसल्याचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या निदर्शनास आले होते. ठेकेदार दाद देत नाहीत, अशी कैफियत मांडणाऱ्या सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली होती. ३१ मे पर्यंत मुदतवाढ देतानाच या मुदतीतही कामे पूर्ण झाली नाहीत तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या बैठकीला एक दिवस लोटतो न लोटतो तोच विभागीय आयुक्तांनी गुरुवारी त्र्यंबकेश्वरमध्ये धाव घेतली. तेथे सुरू असलेल्या विविध कामांच्या सद्यस्थितीची पाहणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने साधू महंत तसेच भाविकांच्या सोयीसाठी गोदाकाठावर उभारण्यात येत असलेल्या घाटांच्या कामांची पाहणी करण्यात आली. डवले यांच्यासमवेत जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, महेश पाटील, पीडब्लूडी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, त्र्यंबकेश्वर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

घाटांची कामे अपूर्णावस्थेत असून, तीन आठवड्यांत ती कशी पूर्ण करणार अशी विचारणा संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली. कामांची गुणवत्ता ढासळू न देता ही कामे मुदतीत पूर्ण करा, असे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याखेरीज अपूर्णावस्थेत असलेली पाणीपुरवठा योजना, वाहनतळांची पाहणी करण्यात आली. प्रलंबित सर्व कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'एनडीएसटी’त निवडणुकीचे वाजले पडघम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

नाशिक शहरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मुख्य अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या आणि सतत वेगवेगळ्या कारणांनी गाजत असणाऱ्या एन.डी.एस.टी. सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक जवळ आल्याने वातावरण तापू लागले आहे.

निवडणुका जवळ आल्याने सर्व इच्छुक शिक्षक व शिक्षिका आपल्या सर्व सहकारी मित्र- मैत्रिणींच्या मुला-मुलींच्या व नातेवाईकांच्या विवाहास सर्व कार्यकर्ते स्वत:च्‍या गाडीत घालून नेऊन आपले शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर सध्या रमाबाई आंबेडकर विद्यालयात नाशिक विभागीय मंडळाने १२ व २४ वर्ष सेवा झालेल्या सेवाजेष्ठ शिक्षक व शिक्षिका यांच्यासाठी ६ व १० दिवसाचे प्रशिक्षण सुरू असल्याने प्रशिक्षण स्थळीही इच्छुक मंडळी रोज आवर्जून हजेरी लावत आहेत. जवळच्या परंतु, मतदार असलेल्या मित्र व मैत्रिणींना प्रशिक्षणासाठी कसे जोडता येईल, असा प्रयत्नही करतानाही दिसत आहेत.

इच्‍छुक वर्गावर्गात जाऊन वेळ मिळाला की गाठी-भेटी घेऊन अप्रत्यक्ष प्रचार करीत आहेत. वास्तविक पाहता याठिकाणी शासनाने खूप वेगळ्या हेतूने हे प्रशिक्षण सुरू केले आहे, त्यातही ही मंडळी प्रामाणिकपणे अध्ययन करू पाहणाऱ्या लोकांचे सतत लक्ष विचलित करीत आहेत. निवडणुकीपासून खूपच लांब असणाऱ्या सर्वच लोकांना व सर्व गोष्टींचा आयोजन व नियोजन करणाऱ्या व्यवस्थापकिय मंडळीना खूप त्रास होत आहे. अधिकारी वर्गाने यांना पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविणारी ही मंडळी प्रशिक्षणात एक प्रकारचा अडथळा निर्माण करू पाहत आहे, असेच दिसत आहे. या प्रकाराला अटकाव घालणे गरजेचे आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, अशी अपेक्षा आहे.

गत निवडणुकीत प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक प्रचंड मतांनी विजयी झाले होते. सोनवणे यांनी कायम शिक्षकांचे हित जोपासले आहे. न्याय व हक्कासाठी लढा दिला आहे. आगामी निवडणुकीत सोनवणे यांच्‍या बाजूच्या सर्व उमेदवारांना सभासद पाठिंबा देतील आणि पुन्हा बहुमत मिळवतील, असा विश्वास आहे.- प्रा. पुरुषोत्तम रकिबे, आपलं पॅनल

विद्यमान संचालक मंडळ ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले अशा नेत्यांनी एकतर्फी म्हणजेच आपला फायदा करून घेतला, असे लक्षात येताच आपल्याच नेत्याची सुज्ञ संचालकांनी हकालपट्टी केली. आपला फायदा न पाहता सभासदांचा फायदा कसा करता येईल असे विचार करणारे संचालक व पदाधिकारी निवडून देणे गरजेचे आहे. - प्रा. के. के. अहिरे, प्रगती पॅनल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोड आणि पंचवटी परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका चार वर्षीय बालकासह वृध्देचा मृत्यू झाला. सरकारवाडा व पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची पहिली घटना गंगापूररोडवरील आंनदवली परिसरातील हनुमान मंदिराजवळ घडली. शरद तांदळे यांचा चार वर्षाचा मुलगा ओम सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घराजवळील मंदिरासमोर खेळत असताना भरधाव वेगात आलेल्या लाल रंगाच्या यामाहा मोटरसायकलने त्याला जोराची धडक दिली. शरद तांदळे यांनी तातडीने ओमला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच ओम मृत्युमुखी पडला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी यामाहा मोटरसायकल चालकाविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला.

अपघाताची दुसरी घटना किशोर सूर्यवंशी मार्गावरील एस. टी. डेपोच्या पाठीमागील बाजूस दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पंचवटीतील नवीन जकात नाका परिसरातील ओमकारनगर येथील रहिवाशी असलेल्या सुमनबाई म्हस्के (वय ६५) आपल्या नातेवाईच्या दुचाकीवरून डबलशिट जात असताना भरधाव वेगात आलेल्या मारूती व्हॅनने (एमएच १५-एएस- ७९३५) त्यांना जोराची धडक दिरली. यात म्हस्के यांच्या डोक्याला जबर मार लागला. जखमी अवस्थेत एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. डॉक्टरांनी तपासून म्हस्के यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा जणांचे अपील फेटाळले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

थकबाकीदार संस्थेसह विविध तांत्रिक कारणांमुळे फेटाळण्यात आलेल्या नऊ अपील अर्जांवरील निकाल अपील अधिकारी राजेंद्र सुरावसे यांनी शुक्रवारी जाहीर केला. व्हि. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासह सहा जणांचे अपील सुरावसे यांनी फेटाळले आहे. त्यामुळे कोंडाजीमामांचा जिल्हा बँकेची निवडणूक लढण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. तर, विजय पिंगळेंसह नामदेव शिंदेंचे अपील मंजूर झाल्याने निवडणुकांच्या रिंगणात पुन्हा आले आहेत. शुक्रवारी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकांना शह देण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेऊन त्याला बाद करण्याचे प्रयत्न झाले. या सापळ्यात कोंडाजीमामा आव्हाडांसह आठ इच्छुक उमेदवार अडकले. छाननीत या सर्वांचे अर्ज फेटाळले गेले. त्यामुळे त्यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. कोंडाजीमामांसह, कमलाकर पवार, नामदेव शिंदे, उषा जेजुरे, भिमराव जेजुरे, विजय पिंगळे, चंद्रकात राजे, शिवाजी ढेपले यांनी अपील दाखल केले. त्यांच्या अर्जावर बुधवारी सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी या अपिलांचे निकालही जाहीर करण्यात आले. त्यात विजय पिंगळे आणि नामदेव शिंदे या दोघांचे अपील मंजूर करण्यात आले. तर, कोंडाजीमामा आव्हाडांसह कमलाकर पवार, उषा जेजुरे, भिमराव जेजुरे, चंद्रकात राजे, शिवाजी ढेपले यांचे अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे हे सर्वजण आता निवडणूक रिंगणातून जवळपास बाद झाले आहेत. त्यांनी सादर केलेले पुरावे अपील अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले नाहीत.

दरम्यान, शुक्रवारी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यात लिना आहेर, दीपक जोगड, तेज कवडे, प्रशांत देवरे, अशोक पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आतापर्यंत बारा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

न्यायालयाचा दरवाजाही बंद

अपील फेटाळलेल्या इच्छुकांना आता उच्च न्यायालयाचेही दरवाजे बंद झाले आहेत. सायंकाळी अर्ज फेटाळल्याची प्रत मिळाली असली, तरी अपिलासाठी त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा रस्ता जवळपास बंद झाला आहे. शनिवार आणि रविवार न्यायालयाला सुटी आहे, तर सोमवारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. त्यामुळे अपिलासाठी केवळ सकाळी ११ ते ३ चा वेळ असून, एवढ्या वेळेत अपील अधिकाऱ्याच्या निर्णयावर स्थगिती मिळविणे अशक्य आहे. त्यामुळे उमेदवारांना न्यायालयात जाण्याचा मार्ग बंद करण्याच्या हेतूनेच निकाल उशिराने जाहीर करण्यात आल्याची चर्चा बँकेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॉन अॅलोपॅथी डॉक्टरांना फार्माकॉलॉजीची मात्रा

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

युनानी, आयुर्वेद आणि होमिओपॅथीची प्रॅक्टीस करणाऱ्या राज्यभरातील हजारो डॉक्टरांसाठी गुडन्यूज आहे. अवघ्या एक वर्षांचा फार्माकॉलॉजीचा कोर्स करून या सर्व डॉक्टरांना जनरल प्रॅक्टीस करता येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयार केलेला हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागात आजही एमबीबीएस डॉक्टरांचा अभाव असल्याने त्यांच्या जागी युनानी, आयुर्वेद आणि होमिओपॅथीचे शिक्षण घेतलेले डॉक्टर रुग्णसेवा करीत आहेत. मात्र, या तिन्ही शाखेतील डॉक्टरांना अशा प्रकारच्या प्रॅक्टीसची परवानगी नाही. परिणामी, विधीमंडळाच्या गेल्या अधिवेशनात हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. त्याची दखल घेत या तिन्ही शाखेच्या डॉक्टरांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याचाच एक भाग म्हणून आता या डॉक्टरांसाठी एक वर्षाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

नॉन अॅलोपॅथी डॉक्टरांना पूर्णवेळ प्रॅक्टीस करण्यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले आहे. मॉडर्न फार्माकॉलॉजी नावाचा हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. होमिओपॅथी आणि अलोपॅथी यांच्यातील दुवा बनण्याचे काम हा अभ्यासक्रम करणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानंतर विद्यापीठाने एका समितीची स्थापना करुन हा अभ्यासक्रम तयार केला आहे. मेडिकल कौन्सिलच्या दिशा निर्देशांनुसारच हा अभ्यासक्रम असून, याचा मोठा फायदा राज्यभरातील हजारो डॉक्टरांना होईल, असा विश्वास डॉ. जामकर यांनी व्यक्त केला आहे. धुळ्याचे भाऊसाहेब हिरे सरकारी वैद्यकीय कॉलेज आणि मिरजचे सरकारी वैद्यकीय हॉस्पिटल आणि कॉलेज यांनी हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी इच्छा दर्शविली आहे.

युनानी, आयुर्वेद आणि होमिओपॅथीची प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना पूर्णवेळ जनरल प्रॅक्टीस करता यावी यासाठी नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून तो उपलब्ध होईल.

डॉ. अरुण जामकर, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक सिटी कनेक्टमध्ये टॅक्सी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सिटी कनेक्ट हे अल्पावधित लोकप्रिय झालेले अॅड्रॉइड अॅप असून १० हजारापेक्षा जास्त लोक या सेवेचा लाभ घेत आहे. या अॅपमध्ये नुकताच टॅक्सी सेवेचाही समावेश केला असून ग्राहकांना आपल्या मोबाइलद्वारे टॅक्सी बुक करण्याची सुविधा मिळणार आहे.

येत्या काही दिवसात संपूर्ण भारतातून सिंहस्थासाठी नाशिकमध्ये भाविक येणार आहेत त्यांना विविध प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी नाशिक शहरातील युवकांनी एकत्र येऊन नाशिक सिटी कनेक्ट ही संकल्पना रुजवली मोबाईलमध्ये अॅप तयार करून त्याद्वारे युजर्सला मार्गदर्शन करण्यात येत असते. या अॅपमध्ये नुकताच टॅक्सी सेवेचा समावेश करण्यात आला आहे. ही सेवा टॅक्सी फॉर शुअर ही कंपनी देणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून भारतातील ५२ शहरामध्ये सेवा देण्यात येत आहे. त्यांनी या सेवेला नाशिकमध्ये नुकतीच सुरुवात केली आहे. या अॅ‌प्लिकेशनला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक नाशिककरांना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी टॅक्सी फॉर शुअरने नाशिक सिटी कनेक्ट सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेच्या माध्यमातून शहरात कुठेही शंभर रुपयांपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. या सेवेला केंद्र सरकारची मान्यता असून २४ तास ही सेवा कार्यरत असणार आहे. या सेवेत प्रत्येक ड्रायव्हरची पोलिसांकडे नोद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळांची सुरक्षा रामभरोसे

$
0
0

महापालिकेच्या ६४ इमारती सुरक्षारक्षकाविना; प्रशासनाकडे प्रस्ताव पडून

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक महापालिकेच्या शाळांच्या सुरक्षेची स्थिती अत्यंत नाजूक असून महापालिकेच्या ८४ पैकी ६४ इमारतींना सुरक्षारक्षकच नसल्याचे चित्र आहे. शिक्षण मंडळाकडे केवळ २० सुरक्षारक्षक असल्याने नवीन ६४ सुरक्षारक्षकांची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, ही मागणीही फाईल्समध्ये अडकली आहे. त्यामुळे शाळांची सुरक्षा आता रामभरोसे झाली असून शाळा गुंड व टवाळखोरांचा अड्डाच बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या १२८ शाळा असून त्या ८४ इमारतींमध्ये भरतात. काही शाळा या एकवेळ तर काही शाळा दिवसभर सुरू असतात. मात्र, शाळा सुटल्यानंतर याठिकाणी कुणीही वाली राहत नसल्याचे चित्र आहे. या शाळांमध्ये पत्ते खेळणारे टवाळखोर आणि गुंड फिरतांना दिसतात. महापालिकेने शिक्षण मंडळाला केवळ २० सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे केवळ २० शाळांचीच सुरक्षा सद्यस्थितीत होत असून ६४ शाळांची सुरक्षा रामभरोसे आहे. या शाळामंध्ये सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे शाळा संपल्यानंतर त्या परिसरातील टवाळखोरांच्या ताब्यात जातात. परिसरातील टवाळखोर मुले या शाळांच्या व्हरांड्यात पत्ते खेळतात. तर काही मुले उघड्यावर दारूचे सेवन करतांनाही दिसतात. काही ठिकाणी तर शाळा सुटल्यानंतर गुन्हेगार आपला अड्डाच स्थापन करतात. सुरक्षारक्षक नसल्याने टवाळखोरांचे शाळांमध्ये फावते. त्यामुळे शाळांमधील मुलांसह शाळाही असुरक्षित झाल्या आहेत. या शाळामंध्ये सुरक्षारक्षक द्यावेत अशी मागणी शिक्षण मंडळाने उपायुक्त दत्तात्रय गोतीसे यांच्याकडे केली. त्यांनी उर्वरित शाळांना सुरक्षारक्षक उपलब्ध करून द्यावेत असा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका शाळांच्या मुलासंह शाळाच टोळक्यांच्या हातात सापडल्या आहेत.

अनुचित घटनेची प्रतीक्षा आहे का?

महापालिकांच्या इमारतींमध्ये शाळांच्या साहित्यासह महत्त्वाची कागदपत्रे असतात. सुरक्षारक्षक नसल्याने या साहित्यासह कागदपत्रे सांभाळणे शिक्षक मुख्याध्यापकांना अवघड झाले आहे. सोबतच या इमारती रिकाम्या असल्याने या ठिकाणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेच्या इमारती रिकाम्या राहत असल्याने समाजकंटकांकडून या ठिकाणी वाईट कृत्य घडू शकते. त्यामुळे महापालिका अनर्थ घटनांची वाट पाहणार काय? असा सवाल शिक्षकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा कडाडणार!

$
0
0

व्यापा-यांकडून कांदा साठवणुकीस सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत परिसरातील कांदा व्यापाऱ्यांनी गावठी कांद्याची साठवण करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत हजारो टन कांदा चाळीत बंदिस्त झाला आहे. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी सर्व गोडावून भरले जातील, असा अंदाज आहे. तसेच व्यापाऱ्यांनी १४०० ते १९०० रुपयांनी कांदा खरेदी करून साठवण केल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव कडाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पिंपळगाव परिसरात कांद्याची साठवण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोडावून उपलब्ध आहेत. व्यापारी व मोठ्या शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीस सुरुवात केल्याने स्‍थानिक बाजारपेठेत मागणी इतका पुरवठा होत नाही. पर्यायाने किरकोळ बाजारात कांदा चांगलाच महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिंपळगाव बाजार समितीसह नाशिक, दिंडोरी, लासलगाव, कळवण, सिन्नर, देवळा, उमराणा, येवला आदी बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या कांद्यापैकी किमान पन्नास टक्के कांदा चाळीत बंदीस्त होत आहे. ऐन मागणीच्या दिवसात टंचाई भासणार असून, भावातही वाढ होणार आहे.

साठवणुकीबरोबरच काही प्रमाणात कांद्याची निर्यात होत असल्याने स्थानिक बाजारपेठेत दर्जेदार कांदा उपलब्ध नसल्याचे समजते. मे महिन्यात चाळीत साठवणूक होत असलेला कांदा किमान पाच महिने चाळीतच राहणार आहे. पुढील काळात होणारी कांद्याची संभाव्य भाववाढ व टंचाई लक्षात घेऊन कांदा सावणुकीवर मर्यादा आणावी, अशी ग्राहकांची मागणी आहे. दरम्यान, अनेक छोट्या मोठ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या कांदा चाळ अनुदानाचा लाभ घेत आपल्या शेतातच कांदा चाळी उभारल्याने गावठी कांदा उत्पादन हाती आल्यानंतर लगेच विक्रीसाठी न नेता साठवला आहे. बाजार समितीत कांद्याला तेजी आल्यास शेतकरी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी आणतात. यामुळे शासनाच्या कांदा चाळ योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लंडन पार्लमेंटवर मराठी ठसा!

$
0
0

>> फणिंद्र मंडलिक

नाशिकचे प्रसिद्ध चित्रकार शिशिर शिंदे यांना लंडन पार्लमेंटमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रात्यक्षिक सादर करण्याची संधी मिळाली आहे. २२ मे रोजी ते प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. लंडन पार्लमेंटमध्ये चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करणारे ते पहिले भारतीय चित्रकार ठरणार आहेत. शिंदे यांच्या चित्रांचे प्रदर्शनही २५ ते २९ मे या काळात पार्लमेंटमध्ये होणार आहे.

२२ मे रोजी होणाऱ्या प्रात्यक्षिकात 'हे विश्वची माझे घर', 'वसुधैव कुटूंबकम' या विषयावर ते चित्रे रेखाटणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः निर्मिती केलेल्या शैलीत ११ चित्रांचे प्रदर्शनही तेथे भरविले जाणार आहे. ही चित्रे ४ बाय ६ आकारात असून, त्यात २१ व्या शतकातील स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न दाखवण्यात येणार आहे. बेटी बचाव, बेटी पढाव, मन की बात, चाय पे चर्चा, भारताच्या प्रगतीच्या पाऊलखुणा अशी चित्रेही साकारली जाणार आहेत. हे प्रदर्शन लंडन पार्लमेंटमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याशेजारी भरवण्यात येणार आहे.

शिशिर शिंदे यांनी यापूर्वीही सामाजिक विषयांवर चित्रे रेखाटलेली आहेत. भारतातील प्रमुख शहरांमध्ये त्यांचे प्रदर्शन भरवलेले आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरला भारतरत्न मिळाल्यानंतर त्यांचे रेखाटलेले चित्र आजही तेंडूलकरांच्या संग्रही आहे. इंदोर येथील भय्युजी महाराजांचे चित्र, सातारा येथील महाराणी गायत्रीदेवी यांचे चित्र, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदीया यांचे चित्र ही त्यांची आजपर्यंत अविस्मरणीय कलाकृती ठरली आहेत. दिल्लीत साकारलेल्या महाराष्ट्र सदनात, केंद्रीय कृषी मंत्रालयात शिंदे यांची चित्रे प्रदर्शित झाली आहेत.

सामाजिक विषयांवर चित्र रेखाटणे हा त्यांचा आवडीचा विषय असून, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या वेळीही आपली आगतिकता चित्रातून त्यांनी प्रकट केली होती. नवोदीत चित्रकारांसाठीही ते कार्यशाळा घेत आहेत. वारांगणांच्या मुलांसाठीही त्यांनी चित्रकला वर्ग घेतले आहेत. त्यांनी स्वतःची शैली आत्मसात केली आहे. स्पर्धेच्या चाकोरीत न अडकता चित्रे रेखाटण्याचे काम ते करीत आहेत.

सामाजिक विषयांची मांडणी

महात्मा गांधींच्या स्वप्नातला स्वच्छ भारत, स्वयंपूर्ण भारत मेक इन इंडियाच्या रुपाने वास्तवात येत आहे, तर दुसरीकडे स्वामी विवेकानंद यांच्या विचारातील भारत जो सर्व क्षेत्रात जागतिक राजकारण, शांतता, अध्यात्म, अर्थकारणात जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे, हे विषय प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब माझ्या चित्रातून सहजपणे जगासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. जेणेकरून मी या संपन्न संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार चित्रकलेच्या संपूर्ण जगात करू शकतो.

- शिशिर शिंदे, चित्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर गोदास्नानावर बंदी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई/नाशिक

कुंभमेळाच्या काळात गोदावरी नदीचे प्रदूषण आणखी वाढू शकते. मात्र, तसे होऊ नये यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना मांडलेली नाही. २२ मेपर्यंत समितीने तशी योजना आमच्यासमोर मांडावी, अन्यथा कुंभमेळ्यादरम्यान गोदास्नानवर बंदी आणण्याचा आदेश आम्हाला काढावा लागेल, अशी तंबी मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी राज्य सरकारला दिली.

गोदावरी प्रदूषणाविषयी राजेश पंडित यांनी अॅड. प्रवर्तक पाठक यांनी जनहित याचिका केलेली आहे. त्यावरील आधीच्या सुनावणीत नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक महापालिकेकडून तसेच सरकारकडूनही कोणतीच ठोस उपाययोजना होत नाही. शिवाय, नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाणीवर 'नीरी'ने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणारे मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याबाबत हयगय होत आहे, असे म्हणणे याचिकादारांनी मांडले. न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने ही वस्तुस्थिती गांभीर्याने घेऊन कुंभमेळ्यासाठी सरकारला ठोस उपाययोजना मांडण्यास सांगितले होते. मात्र, शुक्रवारी तशी कोणतीही योजना सरकारी वकिलांना सांगता आली नाही. त्यामुळे आगामी कुंभेमळाच्या काळात नदीचे आणखी मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढू शकते. त्याचा ताण नदीवर आणखी वाढेल आणि प्रदूषण रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, तेही निष्फळ होतील, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

दरम्यान, कोर्टाने एक हजार ३६१ झाडे तोडण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. सहाशे झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सुमारे आठशे झाडे तोडली जाणार आहेत.

झाडे तोडण्यास सशर्त परवानगी

कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिक शहर आणि परिसरात २८ रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेने हायकोर्टाकडे मागितली होती. त्यावर हायकोर्टाने याविषयी तज्ज्ञांची कमिटी नेमून अहवाल मागवला होता. त्यानंतर याविषयी सविस्तर सुनावणी घेऊन न्या. नरेश पाटील व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठाने शुक्रवारी निकाल सुनावला. त्यात कमिटीने म्हटल्याप्रमाणे पर्यायी झाडे आणि झाडांचे पुनर्रोपण केल्याशिवाय तसेच झाडांचे ऑडिटिंग केल्याशिवाय झाडे तोडता येणार नाहीत, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच कोणत्याही रस्त्यावरील वड, पिंपळ आणि जांभूळ या झाडांना हात लावायचा नाही, अशी तंबीही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जूनपर्यंत गोदावरी प्रदूषणमुक्त

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक

गोदावरी प्रदूषणप्रश्नी मुंबई हायकोर्ट विविध सरकारी विभागांना धारेवर धरल्याने कुठल्याही परिस्थितीत जून अखेरपर्यंत गोदावरी प्रदूषणमुक्त केली जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी नाशि‌कमध्ये दिली. एकीकडे सिंहस्थापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त करणे शक्य नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केले असताना, पालकमंत्र्यांनी मात्र महिन्याभरात प्रदूषणविरहीत गोदेची ग्वाही दिली आहे.

सिंहस्थाच्या आढावा बैठकीनिमित्त नाशिकमध्ये आलेल्या महाजन यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत माहिती दिली. कुंभमेळा काळात गोदावरी प्रदूषण आणखी वाढू शकते, तसे होऊ नये यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना मांडलेली नाही. २२ मे पर्यंत समितीने तशी योजना मांडावी, अन्यथा कुंभमेळ्यादरम्यान गोदास्नानावर बंदी आणण्याचा आदेश आम्हाला काढावा लागेल, अशी तंबी मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी सरकारला दिली होती.

या पार्श्वभूमीवर महाजन म्हणाले, शाही स्नानासाठी गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ रहाणे आवश्यक आहे. त्यासाठीचे नियोजन तयार आहे. नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, कंपन्यांचे रासायनिक पाणी रोखण्यासंबंधी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. मी स्वत: अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गोदावरीची पाहणी करणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी गोदावरीला प्रदुषणमुक्त केले जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. प्रदूषणविरहीत गोदापात्रातच कुंभमेळा पार पडेल, असे हमीपत्र राज्यसरकारने न्यायालयाला दिल्याची माहिती त्यांनी दिली.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत, ही कामे मुदतीत पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images