Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हॉल तिक‌िटासाठीही ‘परीक्षा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या लेखी परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार असल्या तरी हॉल तिक‌िटाच्या उपलब्धतेसाठीही विद्यार्थ्यांची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सर्व हॉल तिकीटे ऑनलाइन उपलब्ध असून, ती डाऊनलोड करावीत, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांना येत्या ६ मे पासून प्रारंभ होत आहे. विद्यापीठाचा विस्तार राज्यभर असून, लाखो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण केल्याचे विद्यापीठाने सांगितले असले तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची परीक्षा हॉल तिकीट मिळविण्यापासूनच सुरु झाल्याचे दिसून येत आहे. हॉल तिकीट उपलब्ध न झाल्याची तक्रार त्यामुळेच विद्यार्थ्यांकडून होत आहे. विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांसह मुख्यालयातही या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. तसेच, विद्यापीठाच्या फेसबूक पेजवरही अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात विद्यापीठाशी संपर्क साधला असता, विद्यार्थ्यांना सर्व माहिती मोबाइल एसएमएसद्वारे कळविण्यात आली आहे. तसेच, सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जून घाटुळे यांनी सांगितले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या पीएनआर क्रमांक टाकून वेबसाईटवर सर्च केल्यासही हॉल तिकीट उपलब्ध होईल. या हॉल तिकीटावर संबंधित अभ्यास केंद्राचा सही शिक्का विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार आहे, असेही घाटुळए यांनी स्पष्ट केले आहे.

व्हिडिओ उपलब्ध

वेबसाइटवर उपलब्ध असलेले हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासंबंध‌िचा व्हिडिओ विद्यापीठाने फेसबूकच्या पेजवर दिला आहे. या व्हिडिओचाही फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

केंद्र बदल नाहीच

विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र कुठल्याही परिस्थितीत बदलून मिळणार नाही, असे आदेश विद्यापीठाने जारी केले आहेत. परीक्षेच्या तोंडावर परीक्षा केंद्र बदलण्यातून विद्यार्थ्यांची अनुपस्थिती दर्शविली जाते तसेच त्यांच्या उत्तरपत्रिका आणि निकालाबाबतही गोंधळ होतो. त्यामुळे विहित मुदतीपूर्वी अर्ज न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या तोंडावर परीक्षा केंद्र बदलले जाणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

फेसबुकवर करा तक्रार

विद्यापीठाचे अधिकृत फेसबूक पेज असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी तसेच तक्रारी त्या पेजवर कराव्यात, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. या तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात येईल, अशी ग्वाहीही विद्यापीठाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोलनाक्यावर संघर्षाची चिन्हे

$
0
0

पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर कामगारांचा प्रश्न पेटणार!

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत येथील वादग्रस्त पीएनजी टोल प्रशासनाने स्थानिक कामगारांना कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या विरोधात स्थानिक कामगारांनी आक्रमक भूमिका घेत भारतीय मजदूर संघ प्रणित महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनेची स्थापना केली आहे. पीएनजी टोल प्रशासनाने टोलनाका परिसरात संघटनेचा फलक लावण्यास मज्जाव केल्याने स्थानिक कामगार व टोल प्रशासन यांच्यात संघर्ष अटळ असून, स्थ‌ानिक कामगारांना मजदूर संघाच्या प्रमुख नेत्यांनी पा‌ठिंबा दिल्यामुळे कामगार व प्रशासन यांच्यातील वाद चिघळण्याचे संकेत आहेत.

स्थानिक कर्मचारी व वाहनधारक संगनमत करून पीएनजी टोलनाक्याचे आर्थिक नुकसान करतात, असे कारण देत टोल प्रशासनाने स्थानिक कामगारांना ‌१५ एप्रिलपासून कामावरून कमी करण्याचे पत्र दिले होते. मात्र, प्रसारमाध्यमांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर कामगार आयुक्तांनी चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश टोल प्रशासनास दिले होते. त्यानुसार स्थानिक कामगारांना टोल प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देऊन दिलासा दिला होता. मात्र, दि.१ मे पासून पुढे काय? याबाबत कोणताही निर्णय स्पष्ट नसल्याने कामगारांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. दि.१ मे रोजी मजदूर संघाचे नेते व टोल प्रशासन यांच्यात चर्चा होऊन मार्ग निघाला तरच प्रश्न मिटेल, अन्यथा वाद चिघळणार असेच चित्र दिसत आहे.

पिंपळगाव टोल नाक्यावर साधारण तीनशे कामगार असून, सर्वच कामगार संघटनेत सहभागी झाले आहेत. टोल नाक्यावरील महिला कामगार सुध्दा संघटनेत सहभागी झाल्या असून, महिला कामगारांना कामावरून कमी करणार नसल्याने त्यांनी संघटनेत सहभागी होऊ नये, असे आवाहन टोल प्रशासनाने केले आहे.

टोल प्रशासनाविरोधात स्थानिक कामगारांनी आक्रमक भूमिका घेत भारतीय मजदूर संघ प्रणित महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनेची स्थापना केली असून, उद्या (दि.१ मे) महाराष्ट्र व कामगार दिनी येथील टोलनाका परिसरात संघटनेच्या फलकाचे अनावरण भारतीय मजदूर संघाचे मुंबईचे सचिव अॅड. अनिल दुमणे यांच्या हस्ते व मजदूर संघाचे राज्य उपाध्यक्ष विजय मोगल यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सकाळी दहा वाजता होत आहे. पीएनजी टोल प्रशासनाने टोलनाका परिसरात संघटनेचा फलक लावण्यास मज्जाव केल्याने स्थानिक कामगार व टोल प्रशासन यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. फलक अनावरणासाठी भारतीय मजदूर संघाचे पुणे येथील सचिव जालिंदर कांबळे, नाशिक जिल्हाध्यक्ष व्ही. जी. पेंढारकर, श्रम प्रवर्तन अधिकारी श्रीकांत शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटना सर्व शक्तीनिशी येथील स्थानिक कामगारांच्या पाठीशी आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी कायदेशीरपणे लढा उभारून कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल.

- पांडूरंग भडांगे, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाखल्यातूनच जाती हद्दपार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाला अधोगतीकडे घेऊन जाण्यासाठी जातीव्यवस्थाच मूळ बाधक आहेत. या जातीव्यवस्थेचा कणा मोडण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरील जातीच पहिल्यांदा हद्दपार व्हायला हव्यात. त्यासाठी कायद्याचा आधार हवा अन् या कायद्याच्या निर्मितीसाठी समाजाने एकजूट साधावी, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

अत्याचार प्रतिबंधक चळवळीच्या वतीने मंगळवारी महाकवी कालिदास कलामंदिर येथे जातीअंत परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर बोलताना भाकपाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले, बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचे परिवर्तनाच्या चळवळीवर आघात होत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी परिवर्तनाच्या लढ्यात बळ भरायला हवे. यासाठी तळागाळापासून कार्यकर्त्यांनी हे बदल टिपायला हवेत. चळवळीवरील आघात हे समाजोत्कर्षाच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही.

जातीअंताचा लढा ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत कार्यकर्त्यांचे भरीव योगदान गरजेचे आहे. परिवर्तनाच्या प्रवासात कुठल्याही टप्प्यावर बेसावध राहून चालणार नाही. लोकशाही रूजलेल्या या देशात हुकूमशाह वृत्तीही बलवान होत असल्याचेच द्योतक अलिकडील काही राजकीय बदलांमधून दिसत आहे. सूक्ष्म नजरेने हे बदल टिपावेत अन् परिवर्तनाच्या लढ्याला बळ पुरवावे, असे आवाहन कांगो यांनी नमूद केले. यावेळी मंचावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, भाकपाचे राज्य सचिव भालचंद्र कांगो, भाकपाचे अजित अभ्यंकर, अविनाश पाटील, प्रतिभा परदेशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग शिक्षणासाठी भारतभ्रमंती!

$
0
0

>> फणिंद्र मंडलिक

योगाचे मूळ शोधण्यासाठी जर्मनीतील दोन युवती भारतभ्रमंती करीत आहेत. त्या सध्या नाशिकमध्ये दाखल झाल्या असून, रिक्षाद्वारे भारतभ्रमण करीत योगविद्या जाणून घेत आहेत. लिव्हा आणि इव्हा अशी त्यांची नावे आहेत.

दोघींनी योगाचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशांना भेटी दिल्या. परंतु, योगाचे मूळ भारतात असून, तेथे चांगला अभ्यास करता येईल, असा सल्ला त्यांना जाणकारांनी दिला. त्यानुसार जर्मनीहून त्या चेन्नई येथे आल्या. भारत जाणून घ्यायचा असेल तर ग्रामीण भागातून प्रवास केला पाहिजे, असे त्यांना एका गुरुंनी सांगितले. त्यानंतर त्यांनी चेन्नईत रिक्षा खरेदी केली आणि भारतभ्रमणाला निघाल्या. योगाबरोबरच त्या संस्कृती, जीवनमान, अध्यात्म, योगा, प्राणायाम, निर्सग याचा अभ्यास करीत आहेत. त्यांनी तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, केरळ, महाराष्ट्र आदि राज्यांचा दौरा करीत त्यांनी साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. लिसा जर्मनीत एका खासगी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये काम करीत करते, तर इव्हा ही प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. सध्या त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या योग विद्याधाम आश्रमात त्या योगाचे शिक्षण घेत आहेत. स्नेहबंधन पार्क येथील पोलिस कर्मचारी बाळकृष्ण वेताळ यांच्याकडे त्या वास्तव्यास आहेत. भारतात आल्यानंतर आम्हाला खूप चांगले लोक भेटले. अनेकांनी विचारपूस केली. भारतातील लोकांच्या आदरातिथ्याने तर आम्ही भारावून गेलो आहोत. येथील जेवणही खूप चांगले आहे, असे लिव्हा व इव्हा सांगते. पुढच्या टप्प्यात त्या गुजरात, पंजाब, दिल्ली, बिहार राज्यांचा दौरा करणार आहेत.

अन् धावले लोक

भारतातील वातावरण अतिशय शांतीपूर्ण असून, सगळीकडे उत्तम अनुभव आला. पुण्याहून नाशिकला येत असताना रात्रीच्या वेळी त्यांची रिक्षा बंद पडली. नागरिकांनी रात्रीतून रिक्षा दुरुस्त करून दिली. येत्या ५ मे रोजी त्यांचे त्र्यंबकेश्वर येथील प्रशिक्षण पूर्ण होणार असून, त्यानंतर त्या पुढील प्रवासाला निघणार आहेत.

नाशिकचे वातावरण फार चांगले आहे. लोक मदतीसाठी अगदी तत्पर असतात. येथील भूमीला अध्यात्मिक वारसा असून, त्याचा आभ्यास करणार आहोत. - लिव्हा व इसा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा धमाल ‘हॅपी स्ट्रीट्स’ची

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

रस्त्यावर धमाल करण्याची संधी देणारा 'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅपी स्ट्रीट्स' हा उपक्रम नाशिककरांमध्ये कमालीचा लोकप्रिय झाला आहे. असाच आनंद लुटण्याची संधी आता नाशिककरांना पुन्हा एकदा मिळणार आहे. रविवारी (३ मे) सकाळी सात ते दहा यावेळेत नाशिककरांसाठी कॉलेजरोडवर 'हॅपी स्ट्रीट्स'चे आयोजन करण्यात आले आहे.

'मटा'च्या 'हॅपी स्ट्रीट्स' उपक्रमाची नाशिककर मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांची ही आतुरता लक्षात घेत हा उपक्रम येत्या रविवारी म्हणजेच ३ मे ला ही आयोजित केला जाणार आहे. कॉलेजरोडवरील मॉडेल कॉलनी सर्कल ते बिग बझार सर्कलदरम्यानचा रस्ता केवळ आणि केवळ तुमचाच असणार आहे. स्पर्धा आणि अॅक्टिव्हिटीज यांची रेलचेल असलेल्या या रस्त्यावर नाशिककरांना रविवारची सकाळ एन्जॉय करता येणार आहे. त्यामुळे नाशिक सोडून कुठेही बाहेर जाऊ नका. कारण येणार आहे तुमचा लाडका 'हॅपी स्ट्रीट्स'. चला तर मग तयारीत राहा रविवारची सकाळी फुल टू धमाल करण्यासाठी.

हे असतील उपक्रम

माधवीज् डान्स इन्स्टिट्युटतर्फे झुम्बा डान्स, हेन्री सरदार यांच्यातर्फे स्पेलिंग कॉन्टेस्ट, राहुल म्युझिक अॅकॅडमीतर्फे गिटार तसेच की बोर्ड इन्स्ट्रुमेंट्स सादरीकरण, ईस्ट अँड वेस्ट ग्रुपतर्फे गिटार वादन, निधी अग्रवालच्या फितूर ग्रुपतर्फे स्ट्रीट आर्ट आणि फोटो फ्रेमस्, नाशिक ऑर्थो डेन्टिक ग्रुपतर्फे स्माईल कॉन्टेस्ट, मॅस्कॉट, स्नेहल गोरे यांच्यातर्फे मेंदी, नुपूर डान्स अॅकॅडमीतर्फे डान्स, खुशबू जाजू यांच्यातर्फे कॅलिग्राफी, विनेश अँड गणेश ड्रम लॅबतर्फे ड्रम्स वादन, वन एट वन टॅटूज तर्फे टॅटू आर्ट, श्रीरचना चित्रकला महाविद्यालयामार्फत नेल आर्ट, टॅटू आणि मेंदी. ऋग्वेद आणि ध्रुव सुरावकर यांच्यातर्फे स्कूबी वायर्स डेमो. बिग बँगतर्फे फूट बॉल व गोलपोस्ट, सेल्फी स्टँड, डान्स, फ्लॅग्ज, मॅस्कॉट यांचे आयोजन केले जाणार आहे. याचबरोबर यावेळी मिमिक्री कॉन्टेस्टही होणार आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी रविवारी सकाळी ७ वाजता स्टेजजवळ यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हबल अंतराळ दुर्बिणीवर स्लाईड शो

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

केवळ खगोलशास्त्राच्याच नव्हे तर एकूणच मानवी ज्ञानाच्या संदर्भात २४ एप्रिल १९९० हा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. या दिवशी अमेरिकेच्या 'नासा' या संस्थेने 'हबल अंतराळ दुर्बीण' या प्रकल्पाला सुरवात केली. या प्रकल्पाला २४ एप्रिल २०१५ रोजी २५ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने ' शंकराचार्य न्यास ' आणि ' सायन्स फोरम ' या संस्थांच्या वतीने एका विशेष स्लाईड शो चे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये नाशिकमधील खगोल - अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे 'हबल अंतराळ दुर्बिणीची २५ वर्षे' या विषयावर स्लाईड शो सादर करणार आहेत तसेच सह भाषणही देणार आहेत. या कार्यक्रमात डॉ पिंपळे हबल दुर्बिणीची सविस्तर माहिती देऊन तिने घेतलेले अनेक कलर फोटो तसेच काही व्हिडिओ क्लिप्सहीदाखविणार आहेत. या कार्यक्रमाच्या शेवटी रिमोट कंट्रोल रोबोटचे प्रात्यक्षिकही देण्यात येईल. हा कार्यक्रम शनिवारी ( २ मे २०१५ ) संध्याकाळी ६:३० वाजता कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नासिक येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेटा नारायणी शास्त्रीला

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

मराठी सिनेमे आणि हिंदी मालिकांमधून रसिकांचे मन जिंकणारी अभिनेत्री नारायणी शास्त्रीला भेटण्याची संधी महाराष्ट्र टाइम्स घेऊन आला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या सेलेब मीट या उपक्रमात भाग्यवान विजेत्यांना नारायणी शास्त्रीसोबत गप्पा मारता येणार आहे.

नारायणीचे फॅन होण्यासाठी आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. तर मग आजच एसएमएस करा आणि संधी मिळवा नारायणीसोबत गप्पा मारण्याची या स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यांना कधी व कुठे भेटायचे हे फो करून कळवण्यात येईल.

प्रश्नः नारायणीचा पहिला मराठी सिनेमा कोणता ?

पर्यायः a) रन b) पक पक पकाक c) युद्ध

आपले उत्तर एसएमएस करण्यासाठी टाइप करा MTCC स्पेस तुमचं उत्तर स्पेस तुमचं नाव आणि ५८८८८ या क्रमांकावर पाठवून द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याच्या वनातला एक दिवस

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे खास वाचकांसाठी आयोजित केलेल्या मँगो फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत 'एक दिवस आंब्याच्या वनात' या एकदिवसीय सहलीचे आयोजन केले आहे. ही ट्रीप सर्वांसाठी असून यात सहभागी होण्यासाठी ८०० रुपये फी असणार आहे. सिन्नर-घोटी रस्त्यावरील केशरबाग येथे ही ट्रीप जाणार आहे.

वाचकांना आंब्याचा सीझन अनुभवता यावा यासाठी ही ट्रीप जाणार आहे. मँगो फेस्ट असल्यामुळे हा एक दिवस आंबामय होणार आहे. यामध्ये गारगार कैरी पन्हे, आमरस आणि पुरणपोळी, त्याचबरोबर आम्रखंड, कांदाकैरी, गुळांबा आणि मँगो आइस्क्रीम अशी मस्त मेजवानी असणार आहे. याचबोरबर आंब्याच्या वनात फिरण्याची मजा काही औरच असणार आहे. आंब्याच्या वनातला हा धमाल दिवस अनुभवण्यासाठी शनिवारी (२ मे) सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत आपली नावनोंदणी करायची आहे. यामध्ये कुठलीही वयाची अट नसल्याने सर्वच लोक सहभागी होऊ शकतात. ट्रिपसाठी प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपले नाव नोंदवा. नावनोंदणीसाठी ०२५३-६६३७९३९ या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. किंवा 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयातही नावनोंदणी करू शकता.

या ट्रिपमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण साईट सिइंग, अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी, रेन डान्स, ट्रॅव्हलिंग यांचा समावेश असणार आहे. रविवारी (३ मे) सकाळी सात वाजता ट्रीप निघणार असून यासाठी ठक्कर बाजार, त्र्यंबकनाका आणि नाशिकरोडवासीयांकरता फेम टॉकीजजवळ पिक अप पॉईंट असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड-नांदगावदरम्यान चोरट्यांचा प्रताप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कुर्ला-दरभंगा पवन एक्सप्रेसमध्ये बुधवारी रात्री उशिरा मनमाड-नांदगाव दरम्यान पैशासाठी परप्रांतीय तरुणाच्या झालेल्या हत्येने प्रवासी वर्गात घबराट पसरली आहे. धावत्या रेल्वेमध्ये लूटमार करण्यासाठी खून करुन फरार झालेल्या चोरट्याच्या तपासासाठी लोहमार्ग पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे. या प्रकरणाने धावत्या रेल्वेतील लूटमार दादागिरी आणि हत्येच्या घटनांनी रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.

नाशिक येथील राणेनगर परिसरात हॉटेलमध्ये काम करणारा सुनीलकुमार साफी (वय २५) आणि महेशकुमार साफी (रा. जितबापूर, बिहार) हे बुधवारी नाशिक रोड रेल्वे स्थानकातुन पवन एक्सप्रेस मध्ये जनरल डब्यात बसले. गाड़ी उशिरा धावत असल्याने डब्यात खूप गर्दी होती. मनमाड-नांदगांवदरम्यान मनमाड स्थानकातून जनरल डब्यात चढ़लेल्या दोन चोरट्यांनी सुनीलकुमार याला धक्काबुक्की करत त्यांच्या छातीवर चाकूने वार केले. त्याचा भाऊ महेशकुमार याला सुनीलकुमार याच्या पँटमधून पैसे काढ़ण्यास सांगितले.

भीतीने महेशकुमारने साडेचार हजार रुपये चोरट्यांच्या हवाली केले. हल्लेखोरानी नांदगाव रेल्वे फाटकानजिक चैन ओढून गाडीतून पलायन केले. जखमी सुनीलकुमारला रेल्वेतून खाली काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रात्री उशिरा मनमाड लोहमार्ग पोलिसांत खुनासह इतर विविध कलमान्वाये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला नगराध्यक्षपदाची निवडणूक

$
0
0

मटा प्रतिनिधी । मनमाड

मनमाड नगरपरिषदेच्या नव्या नगराध्यक्षाची निवडणूक १२ मे रोजी होणार आहे. आपल्याच आघाडीचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी मोठी चुरस व राजकीय संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार पाच तारखेस नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार आहेत. ११ तारखेस अर्ज छाननी, तर १२ तारखेस निवडणूक होणार आहे. दरम्यान, शहर विकास आघाडीतून बाहेर पडून शिवसेनेच्या आघाडीशी सूत जमविणाऱ्या १५ नगरसेवकांच्या वेगळ्या घरोब्याने राजकीय संघर्ष पेटला असून, पात्रता-अपात्रतेच्या चर्चेत आणि कायदेशीर लढाईत ही निवडणूक सापडल्याचे स्पष्ट आहे. शहर विकास आघाडीतर्फे छगन भुजबळ सांगतील तोच नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार आहे. तर आघाडीतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या काही राष्ट्रवादी तसेच काँग्रेस, अपक्ष आणि शिवसेना अशा एकत्रित आघाडीने मैमुना तांबोली यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका लावणार १४ हजार झाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित कुंभाला मदत म्हणून आणि पावसाळा असल्याने महापालिकेने शहरात १४ हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. खाजगीकरणातून ही झाडे लावण्यात येणार आहे. स्वच्छ व सुंदर नाशिकसाठी महापालिकेचा हा उपक्रम असून वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या वृक्ष व प्राधीकरण समिती बैठक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात शहरात झाडे लावण्याचा एकमेव विषय चर्चेसाठी होता. पावसाळ्यात आणि सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात १३ हजार ८३५ झाडे लावण्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

खाजगी ठेकेदारामार्फत किंवा महापालिकेमार्फत ही झाडे लावण्यास समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. महापालिका स्वतःच ही झाडे लावणार आहे.त्यासाठी निधीही उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे हरित नाशिकच्या दिशेन नाशिकचा प्रवास सुरू झाला आहे.

'निमा'कडून आश्वासनच

निमाच्या वतीने चालू वर्षी २० हजार झाडे लावून देणार आहे.निमा इंडेक्सच्या वतीने या संदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षी 'निमा'च्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनाचे काय झाले असा सवाल महापालिकेच्या वतीने केला जात आहे. गेल्या वर्षी घोषणा झाली मात्र निमाने महापालिकेच्या पत्राला उत्तरच दिले नसल्याचा दावा उद्यान व वृक्षप्राधिकरण अधिकारी डॉ. गो. बा. पाटील यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किटच्या आगीमुळे आवळा, डाळिंबाचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येवला

येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारातील शेतात शॉर्ट सर्किटमुळे गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीत आवळा व डाळिंबाच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तापलेल्या उन्हात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने विजेच्या तारा एकमेकांना घासल्या गेल्या. यामुळे शेतात काढणीनंतर असलेल्या गव्हाच्या थोटकांनी लागलीच पेट घेतला. काही क्षणातच या आगीने रुद्र रुप धारण केले. गव्हाची थोटकं वाळलेली असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. या आगीमुळे कृषी विभागाच्या शेतातील आवळ्याच्या व डाळिंबाच्या बागेला मोठी झळ बसली. साधारण ६ एकरातील नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सुरवातीला नगरसेवक प्रदीप सोनवणे यांच्यासह सोनवणे वस्तीवरील संतोष सोनवणे, पांडू सोनवणे, किरण सोनवणे, विलास सोनवणे, सुरेश सोनवणे आदी २५ पेक्षा अधिक शेतक ऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सोनवणे वस्तीवरील शेतकऱ्यांनी पंपाद्वारे पाणी फवारणी केली तसेच नगरपालिकेच्या अग्नीशमक यंत्राने ही आग आटोक्यात आणली. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. दरम्यान, आगीमुळे झाडांना चटके बसले तरी नुकसान झाले नसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, घोटी

पाडळी येथे गुरुवारी पहाटे महामार्गावर अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने बिबट्याच्या बछड्याचा जागीत मृत्यू झाला. यामुळे जवळच एका फार्म हाऊसवर झाडांमध्ये बिबट्याची मादी बिथरलेल्या अवस्थेत गुरगुरत असल्याचे अनेकांनी प्रत्यक्ष पहिल्याने या परिसरात घबराट निर्माण झाली.

मुंबई नाशिक महामार्गावर पाडळी शिवारात धोंगडे लॉजिस्टिक गोडावून समोर पहाटेच्या दरम्यान नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने मार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याच्या बछड्यास जोरदार धडक दिली. या स्थितीत या बछड्याच्या तोंडास मार बसल्याने गंभीर ते जखमी झाले. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. परिसरातील कृष्णा चौधरी यांनी महामार्गावरील घटना पाहताच पाडळीचे माजी सरपंच खंडेराव धांडे यांना याबाबत माहिती दिली. धांडे यांनी याची वाडीवऱ्हे पोलिस व वन विभागाला कळविले. पोलिसांनी हे बछडे वन विभागाच्या ताब्यात दिले. बछडे नऊ ते दहा महिने वयाचे असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान हे बिबट्याचे बछडे जिंदाल कंपनीकडून आले की पाडळीच्या दिशेने आले याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे. यानंतर सकाळी आठ ते नऊ वाजे दरम्यान शेनवड शासकीय आश्रमशाळेजवळील जंगल असलेल्या फार्महाऊसमधून बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. अनेकांना बिबट्याचे दर्शनही झाले. नागरिकांची गर्दी पाहताच या बिबट्याने तेथून काढता पाय घेतला. दरम्यान या फार्महाऊसला तार कंपाउंड असल्याने हा बिबट्या येथेच असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एलईडी लाईट बसविण्याची प्रक्रिया थांबवा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेत वादग्रस्त ठरलेल्या एलईडी बसविणाऱ्याची प्रक्रिया थांबवा अशी मागणी मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी केली आहे. त्यांनी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना पत्र दिले असून ही प्रक्रिया सदोष असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एलईडीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

आयुक्तांना दिलेल्या पत्रात भोसले यांनी संपूर्ण एलईडीच्या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे. सदर प्रक्रिया ही ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली असून ठेकेदाराला झुकते माप देण्यात आले आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत ही ४७ कोटी ४० लाख असताना ती उपसूचनेद्वारे २०२ कोटीपर्यंत वाढव‌िण्यात आली. हा प्रकल्प १३ व्या वित्त आयोगातून राबविण्याची गरज असताना त्यावर महापालिकेने खर्च का करावा असा सवाल करत भोसले यांनी बँक गॅरटींच्या विषयावरही आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे या ठेक्याच्या वर्कऑर्डरची मुदत ही एक वर्षापूर्वीच संपली असून मुदतवाढही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हा ठेका आपोआप रद्द झाल्याचा दावा भोसले यांनी केला असून संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असून विश‌िष्ट व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेची उच्च स्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांकडून महापालिकेचे झालेले नुकसान वसूल करावे आणि दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ही प्रक्रिया थांबवण्यात यावी, अशी मागणी भोसले यांनी आयुक्तांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान-नागरिक संघर्ष रोखण्याचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प परिसर अधिक संवेदनशील आणि अन्य भागाच्या तुलनेत वेगळा आहे. कारण या पोलिस स्टेशनचा ५० टक्के भाग लष्करी हद्दीतील आणि उर्वरित भाग नागरी वसाहतीचा आहे. येथे गुन्हेगारीचे प्रमा णनियंत्रणात असली तरी लष्करी जवान व नागरिक यांच्यात अधूनमधून काही कारणास्तव वाद निर्माण होतात. या वादाचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे उद्भवणारे वाद नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

काही महिन्यांपूर्वी राजकीय दृष्ट्या असलेला वाद विकोपाला जाऊन त्याचे रुपांतर मोठ्या संघर्षास व दुफळी निर्माण करण्यास कारण ठरले होते. त्यातून आरोपांच्या फैरी एकमेकांवर झडल्या. त्यामुळे शहरात काही दिवस तणाव निर्माण झाला होता. या तणावाला पोलिस यंत्रणेला सामोरे जातांना नाकीनऊ आले. हा वाद पुन्हा कधीही उफाळून येण्याची दाट शक्यता असल्याने पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याची गरज आहे. जातीय दंगली, खुन, दरोडे यासारख्या घटना तुलनेन कमी किंवा जवळपास होत नसणे ही बाब कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने समाधानकारक मानली जात आहे.

भौगोलिक दृष्ट्या पोलिस स्थानकाच्या अखत्यारीत देवळाली कॅम्प शहरासह अन्य ९ गावे व लष्कराचा बराचसा भाग अशी मोठी हद्द येते. शहरी आयुक्तालयाच्या एकमेव पोलिस स्टेशनच्या वाट्याला आलेली असावी. देवळाली कॅम्पसह भगूर, नानेगाव, संसरी, शेवगे दारणा, शिंगवे बहुला, लोहशिंगवे, वंजारवाडी, राहुरी, दोनवाडे अशी गावे या पोलिस स्टेशनच्या अखत्यारित येतात. त्यामुळे काही परिसरात घटना घडली तर पोलिस यंत्रणेला तिथे पोहचण्यास विलंब होतो. ग्रामीण भागाच्या सोयीसाठी भगूर येथे पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र, ती कधीतरी उघडली जाते. काहीही मोठी घटना घडल्यास नागरिकांना देवळालीच्या मुख्य स्टेशनमध्ये धाव घ्यावी लागते.



अपुरे मनुष्यबळ

देवळालीच्या पोलिस स्टेशन हद्दीत १ लाख २५ हजार ७३७ इतकी लोकसंख्या आहे. या परिसराचे क्षेत्रफळ ५८.५ चौरस किलोमीटर इतके असून त्यामानाने असलेली पोलिस संख्या कमीच आहे. या शहरासह परिसरात काही दिवसांपासून वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे या पोलिसांना कठीण जात आहे. या भागासाठी किमान २ वरिष्ठ पोलिस निरीक्षक आवश्यक असतांना प्रत्यक्षात एकच कार्यरत अधिकारी कार्यरत आहे.

देवळालीत हे स्थापित शहर असले तरी याचा समावेश ग्रामीण पोलिस असाच केला जातो. आपापसातील किरकोळ वाद वगळता गंभीर स्वरूपाचे गुन्हे या पोलिस स्टेशनच्या हद्दीत सहसा घडत नाही. मात्र, हद्द अधिक असल्याने मनुष्यबळ अधिक असण्याची गरज आहे. - राजेश आखाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

जानेवारी २०१५ पासून दाखल गुन्हे

गंभीर अपघात/मारामारी/खून/घरफोडी - २६

मोटर अपघात - ३

अकस्मात मृत्यू - १५

किरकोळ अपघात - २

हरवलेले (मनुष्य) - १६

हरवलेले (वस्तू) - ६३८

एकूण - ७००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिमुकल्यांना निकालाची उत्सुकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्याची सुटी लागून जवळपास महिना उलटला असताना चिमुकल्यांना आता निकालाची उत्सुकता आहे. शुक्रवारी, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी शैक्षणिक गुणपत्रक प्रदान केले जाणार असल्याने चिमुरड्यांसह त्यांच्या पालकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण आहे.

पूर्व प्राथमिक ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एप्रिलच्या प्रारंभीच उन्हाळी सुट्या लागल्या. उन्हाचा तडाखा अधिक असल्याने दुपारपर्यंत घराबाहेर न पाडण्याची सक्ती चिमुकल्यांवर आहे. सायंकाळी मात्र शहरातील विविध बगीचे, मैदाने व इतरही सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी होत आहे. दरवर्षी महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रक प्रदान केले जाते. त्यामुळे हे गुणपत्रक मिळण्याबाबत चिमुकल्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून शुक्रवारी सकाळीच पालक आणि विद्यार्थी शाळांमध्ये गुणपत्रक घेण्यासाठी जमणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना नापास न करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी केली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना श्रेणी प्रदान केली जात आहे.

काही शाळांमध्ये वाटप

शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गुरुवारीच निकालपत्रकांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे शहराच्या विविध भागात गुरुवारी सकाळी चिमुकल्यांची वर्दळ पहायला मिळाली. तर, निकालपत्रक घेतल्यानंतर चिमुरड्यांचे चेहरे खुललेले दिसून आले.

खरेदीसाठी धावपळ

निकालपत्रक दिल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षासाठीचे शालेय साहित्य बहुतांश शाळा देतात. त्यामुळे हे साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची झुंबड शाळांमध्ये उडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवलत योजनेचे ४१ हजार लाभार्थी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ताधारकासांठी महापालिकेने एप्रिल महिन्यात सुरू पाच टक्के सवलत योजनेला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण महिनाभरात ४१ हजार ४४३ मालमत्ताधारकांनी १० कोटी ७६ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वसुली पाच पट असून रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होणार आहे.

मालमत्ता कराच्या माध्यमातून महापालिकेने चांगली वसूली केली तरी तब्बल ३५ लाख रिबीट म्हणून नागरिकांना द्यावे लागले आहेत. या योजनेला आणखीन दोन महिन्याची मुदत असल्याने महापालिकेला चांगलाच आर्थिक फायदा होणार आहे. आगाऊ मालमत्ता कर भरण्यासाठी मिळकतधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने पाच, तीन व दोन टक्के सवलत देण्याची योजना सुरू केली आहे. त्यात एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, मे म‌हिन्यामध्ये भरल्यास तीन टक्के आणि जून महिन्यामध्ये भरल्यास दोन टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पूर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास बिलात पाच टक्के सवलत दिली जाणार असल्याने नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. ३० एप्रिलपर्यंत शहरातील ४१ हजार ४४३ मिळकतधारकांनी १० कोटी ७६ लाख ९६ हजार ६४७ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

३५ लाखाची रिबीट

महापालिकेन सुरू केलेल्या या योजनेला अजून दोन महिन्यांची मुदत आहे. यात मे महिन्यात ३ टक्के आणि जूनमध्ये २ टक्के सूट दिली जाणार आहे. एप्रिल महिन्यात ११ कोटी रुपये जमा झाले असली तरी महापालिकेला ३५ लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या तिजोरीत ११ कोटी जमा झाले असले तरी ३५ लाखाचेही नुकसान झाले आहे. विकासकामांसाठी हा निधी वापरता येणार आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीतील खळखळाट दूर होणार आहे. तर जनजागृतीमुळे नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. या वर्षी महापालिकेने जनजागृती केल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढून उत्पन्नातही वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक फायदा झाला आहे.

दोन दिवसात ६ कोटी जमा

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात तब्बल ६ कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाली. २९ एप्र‌िलपर्यंत या योजनेत तब्बल सव्वा आठ कोटीची वसुली झाली आहे. तर बुधवारी (दि. २९) एकाच दिवशी महापालिकेच्या तिजोरीत २ कोटी ६४ लाखाची वसुली झाली आहे. गुरूवारी (दि. ३०) ही वसुली ३ कोटी ५० लाखाच्यावर गेली आहे. सिडकोतून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. सिडकोत १२ हजार ५७९ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापाठोपाठ नाशिक पूर्व आठ हजार ६८१ लोकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. नाशिकरोड सहा हजार ६७१ लोकांनी पैसे भरले आहेत.

विभाग लाभार्थी

सिडको - १२ हजार ५७९

नाशिक पूर्व - ८ हजार ६८१

नाशिकरोड - ६ हजार ७६१

नाशिक पश्चिम - ४ हजार ८६२

सातपूर - ४ हजार ३९०

पंचवटी - ४ हजार १७०

एकूण - ४१ हजार ४४३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावाना नाट्ययज्ञात उद्या ‘दो बजनिए’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावानाच्या १७५ वर्षानिमित्त परशुराम साईखेडकर नाट्यगृहात 'पसा नाट्ययज्ञ'चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, शनिवार, २ मे पासून या नाट्ययज्ञाला सुरुवात होणार आहे. अश्वमेध थिएटर्स 'दो बजनिए' हा दीर्घांक आणि 'कहानी' हा एकांक या महोत्सवात सादर करणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता हे प्रयोग सादर होतील.

वर्षभर नाट्ययज्ञ सार्वजनिक वाचनालयाच्या नाट्य विभागातर्फे सुरू राहणार असल्याचे नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी यांनी सांगितले. त्यानुसार अश्वमेध थिएटर्सच्या 'दो बजनिए' या दीर्घांकाने सुरूवात होणार आहे. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेवरून प्रेरित होऊन प्राजक्त देशमुख यांनी हा दीर्घांक लिहिला असून, अनुजा, अनिरुद्ध, हेमंत, लखन, प्रथमेश, स्वप्नील, सिद्धार्थ, प्रणव, प्राजक्त यांच्या भूमिका आहेत. तर, त्यानंतर प्रणव पगारे लिखित आणि श्रीपाद, प्रफुल्ल दिग्दर्शित कहानी ही एकांकिका होईल. यात प्रणव हेमलता यांच्या भूमिका आहेत.

नाशिकमधील सांस्कृतिक चळवळीला गती देण्याचा वसा स्वीकारणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाने स्थानिक धडपड्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी परशुराम सायखेडकर नाट्ययज्ञ २०१५ -१६ चे आयोजन केले आहे. त्यांतर्गत वर्षभरात बारा दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

मे २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी हा नाट्ययज्ञ आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये एकांकीका, दीर्घांक, नृत्यनाटक, संगीत नाटक, संस्कृत नाटक, तसेच दोन अंकी नाटक तसेच बालभवनतर्फे होणाऱ्या कै. रत्नाकर गुजराथी बालनाट्य स्पर्धेतील प्रथम तसेच द्वितीय एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. नाटकाचा पहिलाच प्रयोग सादर करणाऱ्या संस्थाना या महोत्सवात प्राधान्य देण्यात येणार आहे. नाट्यसंस्थांना नाट्यगृहाबरोबरच प्रकाशयोजना पुरविण्यात येणार आहे. नाट्ययज्ञामध्ये नोंदणीकृत संस्थांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक सादरकर्त्या संस्थेला प्रयोगासाठी एक हजार रुपये शुल्क भरणे अनिवार्य आहे. तसेच रसिकांना प्रत्येक प्रयोगासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. वार्षिक सभासद शुल्क ५०० रुपये घेण्यात येणार असून, त्यामध्ये ११ नाट्यप्रयोग पहाता येणार आहे. त्यातील ५० टक्के रक्कम नाट्यप्रयोग सादर करणाऱ्या संस्थांना दिली जाणार आहे.

२ मे एप्रिल रोजी अश्वमेघ थिएटर्स, १६ मे रोजी बाबाज थिएटर्स, २० जून रोजी दीपक मंडळ आणि १८ जुलै रोजी ऋतुरंगच्या वतीने प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. याखेरीज लोकहितवादी मंडळ, स्पंदन, द जिनियिस, आर.एम. ग्रुप, मेनली अम्यॉच्युअर या संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंत व्याख्यानमाला आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे पान असलेल्या वसंत व्याख्यानमालेला १ मे पासून सुरूवात होणार आहे. यंदा व्याख्यानमालेचे उद् घाटन स्वाध्याय परिवाराच्या मार्गदर्शिका धनश्रीदीदी तळवलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सायंकाळी सात वाजता यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर उद् घाटन होणार आहे. उद् घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौरअशोक मुर्तडक, पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांची प्रमुख उपस्थिती राहील.

व्याख्यानमालेत यंदा मराठी संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, रोणू मुजुमदार, दीपक घैसास, महेश गिरी, उषा दीदी, विनोद दुवा, दानवे शेट्टी, अरविंद इनामदार आदिंची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

शुक्रवार १ मे रोजी धनश्रीदीदी तळवलकर यांचे 'व्यक्ती परिवर्तनातून समाज परिवर्तन हीच विकासीची प्रक्रिया' या विषयावर व्याख्यान गुंफतील. २ मे रोजी अनिल बोकील 'मोदी सरकार आणि अर्थक्रांती', ३ मे रोजी अॅड एकनाथ आव्हाड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारकत्व, ४ मे रोजी भन्ते आर्यनाग यांचे मानवी जीवन जगण्याचा मार्ग या विषयावर व्याख्यान देतील. ५ मे रोजी संजय नहार यांचे सत्ता बदलानंतरचे काश्मिर. यासह ३१ मे पर्यंत विविध विषयावर व्याख्यान होणार आहे.

व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी यशस्वितेसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे आदिंची उपस्थिती राहील.

गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर रोज सायंकाळी १ ते ३१ मेपर्यंत सात वाजता होणाऱ्या वसंत व्याख्यानमालेचा लाभ श्रोत्यांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा ६ मे पासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या परीक्षा येत्या ६ मे पासून राज्यभरात सुरु होत आहेत. महाराष्ट्रातील ७३१ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम शिक्षणक्रमांच्या अंतिम लेखी परीक्षा ६ मे पासून सुरु होणार आहेत. जवळपास ६ लाख ६४ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

विद्यापीठाच्यावतीने राबविण्यात येणारे बी.ए., बी.कॉम. (मराठी/इंग्रजी /उर्दू/हिंदी माध्यम), बी.ए. पोलीस प्रशासन, बी.ए. परिवहन, बी.ए. ग्राहक सेवा, एम. कॉम., बी. एस्सी. एम. एल. टी., बी. एस्सी. ऑप्टोमेटरी, बी. लिब., एम. ए. शिक्षणशास्त्र, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, बी. एस्सी. हॉटेल अॅन्ड टुरिझम मॅनेजमेंट, बी. एस्सी. हॉस्पिटॅलिटी अॅन्ड टुरिझम स्टडीज, बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरिंग ऑपरेशन, बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज अॅन्ड केटरिंग सर्व्हिसेस, सहकार व्यवस्थापन पदविका, आरोग्यमित्र, रुग्णसहायक, डोटा, योगा शिक्षक, बालविकास सेविका, गांधी विचार दर्शन, बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल ड्रग्ज सायन्स), बी. एस्सी. (इंडस्ट्रीयल सायन्स) तसेच बी. एस्सी. (ड्रग सायन्स), बी.ए. (पब्लिक सर्व्हिसेस) व एम. ए. (पब्लिक सर्व्हिसेस), सहकार व्यवस्थापन पदविका (दुग्धव्यवसाय /बँकिंग / सहकारी / कृषी व्यवसाय), (एम. कॉम., एम. एस्सी.) विषय संप्रेषण, बी. एड., एम. एड., बी. ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आदी पदवी/पदविका या शिक्षणक्रमांच्या परीक्षा सुरु होणार आहेत.

बी.ए., बी.कॉम. या शिक्षणक्रमांच्या परीक्षा २४ मे पर्यंत सुरु राहणार आहेत. वरील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांना देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर उपलब्ध आहेत. याशिवाय http://ycmou.digitaluniversity.ac या विद्यापीठाच्या वेहसाईटवरुन देखील प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेता येईल. ज्यांच्याकडे परीक्षा प्रवेश पत्र नसेल अशा विद्यार्थांनी आपल्या परीक्षा अर्जाची छायांकित प्रत, परीक्षा शुल्क भरल्याचे चलन आणि ओळखपत्र परीक्षा केंद्रावर दाखवून हमीपत्र भरून परीक्षेस बसता येईल. विद्यार्थांना काही अडचण असल्यास ०२५३-२२३००९५ यावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images