Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

५८ किलो सोनेलूट प्रकरणी २ अटकेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

वाडीवऱ्हेजवळ झालेल्या ५८ किलो सोन्याच्या लूट प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे तपासाला गती मिळणार असून, लवकरच मुख्य संशयित गजाआड होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अटक केलेल्या दोघा जणांची कोठडी मिळविण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत असल्याचे समजते.

मागील आठवड्यात २४ तारखेला पहाटे घडलेल्या या धाडसी दरोड्याने नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. चोरट्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. पोलिसांनी सात पथके निर्माण करून अतिशय गुप्तता पाळत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तपास योग्य दिशेने होत असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगितले जात आहे.

अंधेरी येथून झी गोल्ड कंपनीची सिकेल लॉजिस्टीक ही व्हॅन ६० किलो सोन्याची बिस्किटे घेऊन धुळे जिल्ह्यातील शिरपूर गोल्ड रिफायनरीमध्ये चालली होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास वाडीवऱ्हे शिवारात एक सफेद कार व्हॅनला आडवी झाली. कारमधून उतरलेल्या पाच जणांनी पोलिस असल्याची बतावणी करून आणि बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना टेपच्या सहाय्याने व्हॅनमध्येच बांधून टाकले होते. कर्मचाऱ्यांकडील चार मोबाइलपैकी दोन मोबाइल तसेच ५८ किलो सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. लुटलेल्या सोन्याची किंमत १६ कोटी २८ लाख रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शीतगृह अन् निर्यात प्रकल्प धूळखात

0
0

विनोद मालपुरे, कळवण

उत्तर महाराष्ट्रातील पहिले कांदा, डाळिंब शीतगृह अन् निर्यात सुविधा केंद्र पणन मंडळाने वाजतगाजत सुरू केले खरे, मात्र या प्रकल्पास २४ तास वीजपुरवठाच होत नसल्याने आणि विविध अडचणींमुळे हा प्रकल्प शोभेचे बाहुले ठरला आहे. पणन विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रकल्प अजूनपर्यंत सुरू झालेला नाही. पणन विभागाने या प्रकल्पाला वीजपुरवठ्यासाठी निधी दिला तर, प्रकल्प सुरू होईल, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

तेरा कोटी रुपये खर्च करून राज्य पणन महामंडळातर्फे कळवण तालुक्यातील भेंडी येथे नाशिक जिल्ह्यातील पहिलेच कांदा आणि डाळिंब निर्यात व शीतगृह बांधले. मात्र, पाच वर्षानंतरही हे केंद्र कृषी, पणन व सहकार विभागाच्या अनास्थेमुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. काँग्रेस आघाडी शासनाने पणन मंडळाच्या माध्यमातून कळवण शेतकरी सहकारी संघाच्या अधिपत्याखाली तालुक्यातील भेंडी येथे हा प्रकल्प साकारला. सात वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आलेला हा प्रकल्प २४ तास वीजपुरवठ्याअभावी कार्यन्वित होऊ शकलेला नाही. प्रकल्प सुरू झाला नसताना पणन महामंडळास २४ हजार दरमाह द्यावे लागत होते. यामुळे शेतकरी संघाला तोटा सहन करावा लागत आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्याचे आणि त्यामार्फत मिळणाऱ्या उत्पन्नाचा अधिकार कळवण तालुका शेतकरी सहकारी संघाला देण्यात आला. परंतु, त्यात फायदा होण्याऐवजी तोटाच सहन करावा लागत आहे.

तत्कालीन पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प साकारला आहे. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या भेटीला जात असताना या पूर्व भागात शेतकऱ्यांना उपयोगी प्रकल्प बांधता येऊ शकतो, अशी कल्पना पाटील यांना सुचली होती. त्यावेळचे पणन महामंडळाचे व्यवस्थापक सुनील पवार यांनी कसमादे परिसरातील भौगोलिक स्थिती आणि पिके यांची माहिती पाटील यांना देऊन येथे कांदा आणि डाळिंब निर्यात केंद्र उभारण्याची कल्पना मांडली. पुढे शेतकरी सहकारी संघाच्या व माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या पाठपुराव्यातून हा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यात तसेच कसमादे परिसरात कांदा आणि डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांना वरदान ठरणार असून, त्यात रोजगारही निर्माण होणार आहे.

सन २००९ मध्ये प्रकल्पाच्या बाधकामास सुरुवात होऊन २०१० मध्ये सर्व सुविधांयुक्त प्रकल्प चार एकर जागेत बांधकाम होऊन पूर्ण झाला. शीतगृहात ५० टन वजनाचा भूमिगत वजन काटा, कांदा प्रत ग्रेडिंग मशीन, कुलिंग मशीनरी, ५० केव्ही क्षमतेचे चार जनरेटर, अंतर्गत काँक्रीट रस्ते, स्टाफ क्वॉर्टर, २५०० टन क्षमतेच्या १० कांदा चाळी अशी सामग्री आहे.

प्रकल्प सुरू करण्यासाठी २४ तास वीजपुरवठ्यासाठी शासनाने ३० लाख रुपये दिले तर हा प्रकल्प सुरू होईल. प्रकल्पासाठी शेतकरी सहकारी संघाची जागा तसेच तीन लाख रुपये डीपॉजिट दिले आहे. एकप्रकार संघाची फसवणूक केली आहे.

- निंबा पगार, माजी चेअरमन, संचालक शेतकरी सहकारी संघ कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॅमसोनाइटच्या कामगारांना दहा हजारांची पगारवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सॅमसोनाइट इंडिया लिमिटेड कंपनीतील कामगारांना कंपनीने ऐतिहासीक पगारवाढीचा करार केला आहे. यात कंपनीतील १२५ कामगारांना दहा हजार २४० रुपयांची भरघोस पगार वाढ देण्यात आली आहे. पगारवाढ झाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पगारवाढीच्या मोबदल्यात तब्बल ४० टक्के उत्पादन वाढ देखील कामगारांना द्यावी लागणार असल्याचे करारात नमुद केले आहे.

वाडीव-हे गोंदे येथील असलेल्या सँमसोनाइट कंपनीतील पगारवाढीबाबात गेल्या आठरा महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापन व कामगारांची सिटु युनियन यांच्या बोलणी सुरु होती. दरम्यानच्या काळात कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्या संघर्ष देखील निर्माण झाला होता. परंतू औद्योगिक शांतता रहावी म्हणून कामगारनेते डाँ. कराड व कंपनीचे उपाध्यक्ष सिंग यांच्या तडजोडीच्या बोलणीत कामगारांनी देखील शांततेची भावना घेतली होती. यात अनेकदा कामगार उपायुक्त कार्यालयात पगारवाढीच्या बैठकी झाल्या होत्या. त्यात बुधवारी २९ एप्रिलला कामगार उपायुक्त जाधव यांच्या दालनात योग्य तोडगा काढण्यात कंपनी व्यवस्थापन व कामगार युनियनला यश आले. यावेळी कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या दालनात झालेल्या पगारवाढीच्या कराराच्या वेळी सॅमसोनाइटचे उपाध्यक्ष यशवंत सिंग, संचालक महेंद्र सिंगानिया, कामगारनेते डॉ. डी. एल. कराड, सिताराम ठोंबरे यासह कंपनीचे अधिकारी व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कामगार उपायुक्त जाधव व सॅमसोनाइटचे उपाध्यक्ष सिंग यांच्याकडून कराराची स्वाक्षरी प्रत कामगार नेते डॉ. कराड यांनी स्विकारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुमानच्या अमृतानुभवाने साहित्य रसिक तृप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

समतेचा, माणुसकीचा संदेश देणाऱ्या घुमानच्या साहित्य संमलेनाचा अनुभव याची देही, याची डोळा घेतलेल्यांनी आज हा अमृताचा महाकुंभ नाशिकरोडच्या साहित्यप्रेमींपुढे रिता केला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे ऋतुरंग येथे 'घुमान-एक अनुभव' हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, नाशिकरोड शाखेचे प्रमुख उन्मेष गायधनी होते. राजेंद्र देशपांडे यांनी प्रास्तविक केले. सुनील महाजन आणि प्रकाश पायगुडे यांच्या हस्ते गायधनी यांनी शाखेच्या मान्यतेचे प्रमाणपत्र स्वीकारले.

प्रशांत केंदाळे, मुकुंद पिंगळे या युवकांपासून ८० वर्षाचे उद्योजक पांडुरंग जाधव, अॅड. दौलतराव घुमरे, विठ्ठल वाघ यांनी घुमानचे रोमांचकारी अनुभव कथन केले. चव्हाण म्हणाले की, पंजाबी माणसांनी आम्हाला नाश्त्यापासून पंचपक्वानापर्यंतची सर्व सुविधा दिली. महाराष्ट्र सरकारने फक्त २५ लाख तर पंजाब सरकारने ८० लाख रुपये संमेलनासाठी दिले. यावरुन पंजाबींची दानत कळते. वाघ म्हणाले की, घुमानवासियांनी वऱ्हाडीपेक्षाही चांगली ठेप ठेवली. पंजाबमध्ये संत नामदेवांप्रती भक्तीभाव ओसांडून वाहत असल्याचे पदोपदी जाणवले. संजीव आहिरे म्हणाले की, या संमेलनाने मराठीचे झेंडे अटकेपार लागले. मराठीची कक्षा रुंदावली, आदरातिथ्यशीलता आणि धर्म जगणं काय असते हे पंजाबी माणसांच्या डोळ्यात दिसले. सौरभ शुक्ल यांनी जगण्याचे तत्वज्ञान घुमानला गेल्यामुळे समजल्याचे नमूद केले. विष्णुपंत गायखे म्हणाले की, शिस्त, दानशूरपणा, प्रेम याबाबत पंजाबी माणसाचा आदर्श घ्यावा. मुकुंद बेणी म्हणाले की, घरापेक्षाही उत्तम व्यवस्था घुमानवासायींनी ठेवली. व्ही. टी. जाधव म्हणाले की, पंजाबींनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत उपस्थिती दर्शवत रसिकतेचे आणि समर्पण वृत्तीचे दर्शन घडवले. त्यामुळेच संमेलन यशस्वी झाले. सुभाष बिडवई म्हणाले की, श्रींमतीचा गर्व करु नये, सेवाभावी वृत्ती असावी हा संदेश आम्हाला घुमानमध्ये मिळाला. डाॅ. शंकर बोऱ्हाडे म्हणाले की, युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व क्षेत्रातील रसिकांनी रेल्वेने जाताना एक वेगळं नातं जपलं. मुकंद पिंगळे म्हणाले की, जातीयवाद, भाषावादाला गाडा हे घुमानने आमच्या मनावर बिंबवले. हे विचारांचे, माणूसपण घडविणारे संमेलन होते. प्रशांत केंदाळे म्हणाले की, पंजाबचे दातृत्व आणि नामदेवांचे कतृत्व किती महान आहे हे संमेलनातून उमगले. अॅड. निलेश कुलकर्णी, विश्वास गायधनी, सुदाम सातभाई, शेखर भालेराव आदींनी मनोगत व्यक्त केले.

सेवा हाच आमचा धर्म

घुमानवासीय उपींद्रजी बाजवा थॅंक्स म्हणण्यासाठी नाशिकला आले होते. ते म्हणाले की, सेवा हा आमचा परम धर्म आहे. संताची शिकवण पंजाबींच्या रक्तात भिनली आहे. नामदेवांनी एकतेचा संदेश दिला. राजा असो वा रंक, कोणालाही कमी लेखू नये. सामाजिक एक्यासाठी अशी संमेलने झालीच पाहिजेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मलनिस्सारण’साठी हवेत शंभर कोटी

0
0

गोदाकाठावरील १९ नाले बंद‌िस्त केल्याचा दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थापूर्वीच गोदावरी स्वच्छतेला महापालिकेकडून प्राधान्य दिले जात असून, गोदापात्रात सांडपाणी मिसळणारे १९ नाले महापालिकेने अखेर बंद‌िस्त करून हे नाले मलनिस्सारण केंद्राना जोडण्यात आले आहेत. तपोवन मलनिस्सारण केंद्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण (बीओडी) दहापेक्षा कमी करण्यासाठी निरी संस्थेची मदत घेतली जात आहे. मात्र, महापालिकेच्या चारही मलनिस्सारण केंद्रांच्या पुर्नज्जीवनासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

गोदावरी स्वच्छेतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकार सह महापालिकेला फटकारल्यानंतर गोदावरी स्वच्छतेसंदर्भात महापालिका सरसावली आहे. गोदावरीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याला लगाम लावण्यासाठी बारदान फाटा ते दसक पंचकपर्यंतचे सर्व नाले बंद‌िस्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता यु. बी. पवार यांनी दिली. बारदान फाटा ते दसक पंचक दरम्यान दोन्ही काठावर १९ ठिकाणी नाले नदीत मिसळतात. त्या नाल्यांचे सांडपाणी बंद‌िस्त करून मलनिस्सारण केंद्राला जोडण्यात आल्याने गोदावरीचे प्रदूषण एकदम कमी झाले आहे. पालिकेन पंधरा दिवसात या नाल्यांना पर्यायी व्यवस्था करत, १० नाले कायमस्वरूपी बंद‌िस्त तर, ९ नाले तात्पुरत्या स्वरूपात बंदिस्त करण्यात आले आहेत. हे सर्व पाणी तपोवन, चेहडी, पंचक आणि आगरटाकळी केंद्रामध्ये पाठवून प्रक्रियेनंतर नदीत सोडले जाते. निरी आणि विभागीय आयुक्तांच्या समितीने या सर्व नाल्यांची पाहणी केली असून, तसा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.

सध्या या केंद्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा बीओडी (बायोलॉजिकल ऑक्स‌िजन डिमांड) २० ते २२ पर्यंत आहे. केंद्रांच्या मानकानुसार हा बीओडी १० च्या आत असायला हवा. मात्र त्यासाठी मोठ्या यंत्रणाची गरज आहे. सर्व केंद्राचे पूर्नज्जीवन करावे लागणार असून, त्यासाठी १०० कोटीचा निधी लागेल असे पवार यांनी सांगीतले आहे. एवढा निधी मिळणे शक्य नसल्याने सध्या निरीच्या मदतीने तपोवन केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर बीओडी १० च्या आत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

न्यायालयात अहवाल सादर केला जाणार

गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयाने उपाययोजना संदर्भात ६ मे पर्यंत राज्यसरकारला शपथपत्र दाखल करावे लागणार आहे. त्यात महापालिकेचाही वाटा आहे. न्यायालयातर्फे नियुक्त केलेल्या समितीने गोदावरीच्या उपाययोजनांसदर्भात पाहणी केली असून, समितीचा रिपोर्टही न्यायालयात सादर केला जाणार आहे. सोबतच महापालिकेतर्फे स्वंतत्र शपथपत्र दाखल केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएचडीसाठी मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत नियमित व पूर्णवेळ पीएचडीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठीच्या ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता ५ मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याने पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा (पेट) १० मे ऐवजी २४ मे रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना पदव्युत्तर पदवीचे अंतिम गुणपत्रक आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. मात्र पदवी प्रमाणपत्र नसल्यास पासिंग सर्टिफिकेट जोडावे. परीक्षेच्या नोंदणीसाठी पाचशे रुपये शुल्क असून परीक्षार्थींना १५ मे रोजी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर हॉल तिकीट उपलब्ध होतील. २४ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर ३० मे रोजी निकाल घोषित करण्यात येतील. त्यानंतर ५ जून रोजी उमेदवारांच्या तोंडी परीक्षा घेण्यात येतील. ३० जूनला अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान निवड यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांना ३ जुलै पर्यंत नोंदविता येतील.

प्रवेशित विद्यार्थ्यांना आपले संशोधन कार्य विद्यापीठात संबंधित विद्याशाखेत पूर्णवेळ थांबून करावे लागणार आहे. त्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये दरमहा विद्यावेतन (फेलोशिप) दिली जाणार आहे. पीएच.डी. परीक्षेसंदर्भात अधिक माहिती आणि प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटाकडे गांभिर्याने पहा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चित्रपटातील स्वप्नरंजन हे मानसिकरीत्या नुकसानभरपाई करणारे असते. अनेक माणसांना आपल्या आयुष्यात जे प्रत्यक्षात अनुभवायला मिळत नाही, ते चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपट ही संवेदनशील कला असल्याने तिच्याकडे गांभीर्याने पाहायला हवे, असे प्रतिपादन केटीएचएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले. 'फिल्म फेस्टो'च्या उद् घाटनप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर चित्रपट सम‌ीक्षक विलास पाटील, रघुनाथ फडणीस उपस्थित होते. प्रा. डॉ. धोंडगे पुढे म्हणाले की, पूर्वी खेड्यात बैलगाडीतून जाऊन सिनेमे पाहावे लागत. ज्या काळात आपण सिनेमे पाहतो, त्या काळातील मानसिक वयानुसार त्याचे आकलन होते. आधीच्या काळात चित्रपटांचा आकृतिबंध ठरलेला होता. पुढे प्रतिनायकांचा काळ आला. याच काळात भालचंद्र नेमाडे यांनी 'कोसला' लिहिली व त्यातून प्रतिनायकच उभा केला. नंतर ओम पुरी, स्मिता पाटील यांच्या भूमिका असलेल्या कलात्मक चित्रपटांचा काळ आला, असे सांगत चित्रपटांविषयीची जाण विद्यार्थ्यांत वाढायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महोत्सवात कॉलेजच्या व्हिडिओ प्रॉडक्शन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेला 'तीर्थक्षेत्र' हा माहितीपट यावेळी दाखवण्यात आला. 'मराठी पाऊल पडते पुढे' या विषयावर विलास पाटील यांनी मराठी चित्रपट, त्यांतील गाणी, ताल-सूर-लय याबाबत मार्गदर्शन केले. तर रघुनाथ फडणीस यांनी द बटरफ्लाय सर्कस, नागराज मंजुळे यांचा 'पिस्तुल्या', उमेश कुलकर्णी यांचा 'जागर', रेड बलून या लघुपटांचे सादरीकरण करीत 'सिनेमा-संस्कृती' या विषयावर मार्गदर्शन केले. 'आर्ट' या लघुपटाने समारोप झाला. डॉ. संजय सावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्राची पिसोळकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय पानगव्हाणे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निवेक’ची गरुडभरारी

0
0

>> मंदार देशमुख

'निवेक' म्हणजे नाशिक इंडस्ट्र‌ीयल वेल्फेअर कमिटी. नाशिकनगरीचे रूपांतर औद्योगिक नगरीमध्ये करण्यात सर्वांत महत्त्वाचा वाटा स्व. बाबूशेठ राठी यांचा होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व दूरदृष्टीमुळे नाशिक शहरालगत असलेल्या सातपूरला एमआयडीसी आली व बघता बघता नाशिकचे रूप पालटले. मुंबईपासून जवळ असल्याचा नैसर्गिक फायदा व अनुकूल हवामान यांच्या आधाराने नाशिकनगरीची नवी ओळख धार्मिकनगरी ते औद्योगिक नगरीमध्ये रूपांतरीत झाली. त्यालाही आता अनेक दशके उलटून गेली. जिथून नाशिकच्या औद्योगिक जगताला प्रारंभ झाला, त्याच सातपूरमध्ये २५ वर्षांपूर्वी 'निवेक'ची स्थापना करण्यात आली. त्या काळात आपल्या सभासदांमध्ये असलेल्या सुप्त कला-क्रीडागुणांना वाव मिळावा व धावपळीच्या जगातून थोडेसे आरामाचे क्षण मिळावे व यासाठी एका हक्काच्या जागेची उपलब्धता व्हावी या माफक अपेक्षेतून 'निवेक'ची स्थापना करण्यात आली व तिथे गेल्यानंतर पुणे-मुंबईसारखी क्लब संस्कृती जाणवत होती. त्या 'निवेक'चे रूपांतर कालांतराने या शहरातील एका चांगल्या क्रीडा संकुलात कधी झाले हे लक्षात आले नाही. मुख्य शहरापासून थोडे दूर असूनसुद्धा तिथे क्रीडासंस्कृती रुजायला व फुलायला लागली, ती तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे. स्वतः राष्ट्रीय पदक विजेता जलतरणपटू असलेला हिरेन बुजरूक जेव्हा येथील तरण तलावात प्रशिक्षक म्हणून रुजू झाला, तेव्हापासून 'निवेक'ने क्रीडा क्षेत्राच्या मर्यादित अवकाशात एक वेगळी ओळख निर्माण झाली, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही.

साधारणतः एक वर्षापूर्वी 'निवेक'मध्ये टेनिसची दोन सिंथेटिक कोर्ट तयार करण्यात आली. दर्जेदार खेळाडू तयार होण्यासाठी नाशिक जिल्हा टेनिस असोसिएशन सातत्याने प्रयत्न करीत होती. नंतर त्यांना हक्काचे मैदान मिळाले व तेवढ्याच जोमात सुरू झाले. विश्वास साळवे, उल्हास फुलझेले, नंदू रोकडे व ज्यांनी सातत्याने दहा ते पंधरा वर्षे टेनिसची पताका फडकवत ठेवली ती डॉ. विजय थेटे यांनी. आता ही धूरा राकेश पाटील सांभाळतो आहे. राकेश पाटील हा नाशिक जिमखान्यात घडला. त्या खेळातील आपली अल्पजिवी कारकीर्दमध्येच थांबवल्यानंतर चार ते पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर त्याचे रूपांतर झाले ते एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत; पण तो मार्गदर्शक झाला तो टेनिस या खेळाचा. टेबल टेनिसचा नव्हे! हे सर्वच आश्चर्यकारक होते. अचंबित करणारे होते. आपल्या नवीन कारकिर्दीचा प्रारंभ त्याने केला, जिथे तो स्पर्धात्मक खेळातून बाजूला झाला, त्याच नाशिक जिमखान्याच्या माध्यमातून त्याने नव्याने खेळ मांडला. हा खेळ मांडण्यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपसहित १७ ते १८ देशांमध्ये जाऊन त्याने टेनिस मार्गदर्शकाचे छोटे-मोठे कोर्स केले व स्वतःला अद्ययावत केले. तेथील नवीन तंत्राचा व मंत्राचा वापर या महानगरामध्ये करायला त्याने प्रारंभ केला व अगदी लहानपणापासून हा खेळ खेळता येतो याची जाणीव नाशिककरांना करून दिली. त्यामुळे शालेय स्पर्धेपर्यंत मर्यादित असलेल्या खेळाला मोठे अवकाश आता खुणावत होते. त्यामुळे पूर्वी अनुज छाजेड, अजिंक्य कांडेकर यांच्यापुरती मर्यादित असलेली दर्जेदार खेळाडूंची यादी आता मारुतीच्या शेपटीसारखी लांबत गेली व यादीत सध्याचे उगवते खेळाडू अभिषेक शुक्ल, जिताशा शास्त्री, सिद्धार्थ साबळे, अपूर्वा रोकडे, महारूक कोकणी, रोहन देशमुख, कोमल नागरे यांची भर पडली. यापैकी बहुतांश खेळाडू तयार झाले ते राकेश पाटील याच्या मार्गदर्शनाखाली. 'निवेक'मध्ये सिंथेटिक कोर्ट तयार झाल्यानंतर राकेश पाटील ऑगस्टमध्ये 'निवेक'ला प्रशिक्षक म्हणून रुजू झाला व त्या कोर्टच्या आधारे त्याला स्वप्न पडू लागली ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेची.

त्यासाठी त्याने सर्वप्रथम तयार केले ते 'निवेक'च्या संदीप सोनार, मंगेश पाटणकर, राजकुमार जॉली, संदीप गोयल, रमेश वैश्य आदी क्रीडाक्षेत्रावर मनापासून प्रेम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना व त्यानंतर नाशिक जिल्हा टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून साकडे घातले गेले ते महाराष्ट्र राज्य टेनिस असोसिएशनला. त्यांचे सचिव सुंदर अय्यर यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात एक नवीन केंद्र उभे राहिले. टेनिसच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर पुणे, मुंबई, सोलापूर, औरंगाबादनंतर पाचवे नवीन केंद्र म्हणून नाशिकची ओळख निर्माण झाली. राकेश पाटीलच्या स्वप्नांना 'निवेक'ने आपल्या पंखांचे बळ दिले. ही गरुडभरारी नक्कीच यशस्वी होईल यात तीळमात्र शंका नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहतूक प्रश्नावर स्वयंशिस्तीचा उतारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वी स्वतंत्र नगरपालिका असलेले नाशिकरोड नाशिक महापालिकेत समाविष्ट झाले. हा परिसर शहराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, येथेही मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. नाशिक पुणे महामार्ग, देवळाली गाव ते नांदुर नाक्यापर्यंतचा परिसरात वाढलेली दाट लोकवस्ती यांमुळे येथेही वाहतूक व्यवस्थेशी संबंधीत आव्हाने निर्माण झाली आहेत. ही आव्हाने निर्माण होण्यामागील कारणे, ती दूर करण्यासाठी व्यक्तीगत पातळीपासून प्रशासनाच्या पातळीपर्यंत काय उपाययोजना करता येतील याचा एका जागरूक आणि सजग वाचकाने आढावा घेतला तर आणखी एका वाचकाने एमजी रोडवरील वाहतुककोंडी टाळण्यासाठी उपाय सूचविले आहेत.

एकेकाळी नाशि‌करोड म्हणजे नाशिकच्या तुलनेत शांत ठिकाण होते. रेल्वे स्टेशन आणि प्रेसच्या आसपास ‍काही वेळासाठी होणारी गर्दी सोडता वाहतूक कोंडीचा प्रश्न फारसा भेडसावत नव्हता. मोकळे रस्ते, तुरळक रहदारी, सिन्नर फाटा येथे असणारा भाजी बाजार असे शांत आणि सुरक्षित वातावरण होते. आज बिटको चौक, दत्तमंदीर चौक, शिवाजी पुतळा चौक, स्टेशन जवळचा आंबेडकर पुतळा चौक, जेलरोड पाण्याची टाकी चौक आणि बिटको कॉलेजजवळील परिसर सगळीकडेच वाहतुकीचा प्रश्न गंभीर रुप धारण करू लागला आहे. बिटको चौक ते गांधी रस्ता येथील वाहतुकीच्या समस्येने तर कळसच गाठला आहे. त्यास कारण आहे वाहनचालकांचा बेशिस्तपणा. त्यास पादचारी, मोटारसायकल चालक, रिक्षावाले आणि टेम्पोचालक थोडे अधिक जबाबदार असले तरी कारचालक आणि ट्रकचालकांचीही जबाबदारी आहेच.

वाहतूक व्यवस्थेसमोर आव्हाने निर्माण करणारा सर्वात मोठा घटक म्हणजे रिक्षाचालक. अनेक रंगांच्या झेंड्यांखाली चालविल्या जाणाऱ्या त्यांच्या संघटना. त्या-त्या संघटनांचे सदस्य वेगवेगळे असले तरी सर्वांची वर्तणूक सारखीच आहे. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे शिस्तपालन. प्रवाशी शोधण्यासाठी त्यांच्या अंगावर जाणे, चौकांमध्ये गोलाकार चकरा मारणे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून उलट्या दिशेने येऊन प्रवाशी रिक्षात बसविणे, रस्त्यात कोठेही थांबणे, एंडीकेटरचा उपयोगच न करणे, पायी चालणाऱ्यांचे लक्ष विचलित करणे हे सर्वच प्रकार वाहतूक व्यवस्थेपुढे आव्हान निर्माण करणारे आहेत. रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि पोलिसांनी थोडी मेहनत घेतली तर ही आव्हाने संपुष्ठात आणणे शक्य आहे.

वाहतूक व्यवस्थेला आव्हान देणारे दुसरे शत्रू म्हणजे मोटरसायकलचालक. वेग मर्यादा, लेनची शिस्त, हॉर्नवर नियंत्रण यांसारख्या नियमांकडे नाशिकरोड परिसरात मोटरसायकल चालक सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळते. ही परिस्थिती सगळीकडेच आहे. दुभाजक असताना आणि नसताना ओव्हरटेक कसा करायचा, अन्य वाहनांचा वेग बघून किंवा पादचाऱ्यांचे चालणे पाहून वळणे वगैरे गोष्टींचे भान ठेवले जात नसल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. स्वयंशिस्त हाच त्यावर सर्वात मोठा आणि खात्रीचा उपाय आहे. पायी चालणाऱ्यांनी रस्त्याच्या डाव्याच बाजूने चालायला हवे. पदपथाचा वापर करणे, बसप्रमाणेच रिक्षा देखील थांब्यावर जाऊनच पकडणे या गोष्टी सहज करण्यासारख्या आहेत.

सूचना आणि उपाय

सिग्नलवर सर्वच वाहनांनी पांढऱ्या पट्ट्यांच्या अल‌िकडे थांबायला हवे. शहरात तसे होताना दिसत नाही. झेब्रा क्रॉसिंग मोकळे ठेवावे म्हणजेच झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडेच नागरिकांनी कटाक्षाने वाहने उभी करावीत, हिरवा दिवा झळकल्यानंतरच निघावे या सूचना सहज अंमलात आणण्यासारख्या आहेत. छोट्या वाहनांनी बाजूच्या लेनने चालणे, लेन कटिंग न करणे, डिव्हायडरच्या बाजूने ओव्हरटेक न करणे, अकारण हॉर्न न वाजविण्याची काळजीही घेता येऊ शकते.

प्रशासनाने चौकातील रिक्षा थांबे आणि इतर रस्त्यांवरील पार्किंगच्या जागा निश्चित कराव्यात, नाशिकरोड उड्डाण पूलाखालील जागा व्यावसायिकांची नाही हे त्यांना दाखवून द्यावे तसेच या परिसरात पे अॅण्ड पार्क सुरू करावे.

सिग्नलच्या वेळा वाढविणे गरजेचे असून रात्री साडे नऊ किंवा दहापर्यंत रस्त्यावरील प्रत्येक चौकात वाहतूक पोलिस असणे आवश्यक आहे. उलट्या दिशेने चालणारी वाहने, ओव्हरसीट रिक्षा किंवा मोटरसायकली, सिग्नल तोडणारी वाहने यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. दंडात्मक कारवाई देखील प्रामाणिकपणे व्हायला हवी.

प्रशासनाने रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स, वेग मर्यादा, हॉर्नसंबंधी सूचना, शाळा, हॉस्पिटल्स, पेट्रोलपंप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिग्नलवर पांढरे पट्टे, तेथेच थांबणे वगैरे सूचना लावा. त्यात रस्त्यावर आणि विशेषत: डिव्हायडरच्या बाजूला चमकणारे रंगीत पट्टे हे करावेच. पथदीप असतीलच, हे गृहीत धरले आहे.

प्रकाश ठोंबरे,

रा. विद्यानगरी, जेलरोड

पार्किंग बॉक्सची गरज

नाशिकमध्ये वाहतूकीचा प्रश्न खूपच गंभीर झाला आहे. तो सोडविण्यासाठी आपण मुंबईच्या धर्तीवरच काही उपाययोजना अवश्य करू शकतो. एमजी रोड, मेनरोड व तत्सम वर्दळीच्या ठिकाणी या उपाययोजनांचा अवलंब झाल्यास त्यातून वाहतुकीविषयीचे प्रश्न निकाली निघू शकतात असा विश्वास महाराष्ट्र टाइम्सच्या एका वाचकाने व्यक्त केला आहे.

रस्त्याच्या कडेला पार्किंगसाठी बॉक्स तयार करून त्यासाठी जागा उपलब्ध करु शकतो. जो त्या बॉक्सच्या बाहेर वाहन उभे करेल त्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली जाईल. उदा. एमजी रोड येथे आपण हा प्रयोग करू शकतो. त्यामुळे कोंडी कमी करता येईल.

संभाजी स्टेडियमचे जे दरवाजे एमजी रोडच्या बाजूने आहे ते उघडे करून दिले तर त्या स्टेडियमचा काही भाग महापालिकेच्या पे अॅण्ड पार्किंगसाठी वापरता येऊ शकतो. तेथे वाहने उभी करता आली तर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल. मैदानावर येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होऊ नये याची काळजीही घेता येईल. दुपारी १२ ते ४ यावेळेत मैदानावर कुणीही नसते. त्यामुळे ही वाहने उभी करता येतील. याचवेळी या रोडवर वाहन कोंडी अधिक असते.

अशोक स्तंभ आणि रविवार कारंजावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निमाणीकडे जाणाऱ्या बसेस रामवाडी मार्गे कळविल्या तर तेथील प्रश्नही सुटू शकेल, असे वाटते.

कप‌िल जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षण सोडतीत अनेकांची गैरसोय

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली असून, आरक्षणामुळे अनेक मातब्बरांची अडचण केली आहे. ममदापूर, चांदगाव, राजापूर, भारम, जऊळके आदी मोठ्या गावात अडचण तर अंदरसूल, नगरसूल, अंगणगाव, सावरगाव, अनकाई आदी ठिकाणी गावपुढाऱ्यांची सोय झाली आहे.

सन २०१५ ते २०२० या कालावधीसाठी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात काढण्यात आली. यामध्ये ११ ठिकाणी अनुसूचित जमाती, २४ ठिकाणी नागरिकांचा मागासवर्ग, ९ ठिकाणी अनुसूचित जाती तर ४५ ठिकाणी सर्वसाधारण गटासाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. अनकुटे गावातील भीमराज पगारे या सहा वर्षाच्या मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. तालुक्यातील मुखेड, पाटोदा, अंदरसूल येथील सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी तर, नगरसूल येथील सरपंचपद नागरिकांचा मागासवर्ग यासाठी निघाले आहे. सरपंचपदासाठी महिला राखीव जागाचे आरक्षणाची सोडत दि. ६ मे रोजी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निघणार आहे.

सरपंच पदाचे आरक्षण

सर्वसाधारण - एकूण ४५ ग्रामपंचायत

बोकटे, निळखेडे, बल्हेगाव, भाटगाव, मुखेड, तळवाडे, नायगव्हाण, पाटोदा, आडगाव चोथवा, रहाडी, नेऊरगाव, गणेशपूर, खैरगव्हाण, पिंपळगाव लेप, महालखेडा पा., सावरगाव, दुगलगाव, मानोरी बुद्रुक, पिंपरी, सातारे, विसापूर, कोळगाव, कोळम बुद्रुक, भुलेगाव, चिचोंडी खुर्द, मातूळठाण, निमगाव मढ, शिरसगाव लौकी, कुसूर, देशमाने बुद्रुक, वाघाळे, आडगाव रेपाळ, जळगाव नेऊर, धामोडे, मुरमी, कातरणी, अंदरसूल, पिंपळखुटे बुद्रुक, कुसमाडी, गारखेडे, एरंडगाव बुद्रुक, सोमठाण देश, अनकाई, आंबेगाव, अनकुटे.

अनुसूचित जमाती - एकूण ११ ग्रामपंचायत

कोटमगाव खुर्द, गुजरखेडे, कानडी, पारेगाव, चांदगाव, सत्यगाव, आहेरवाडी, बाळापूर, विखरणी, ममदापूर, राजापूर

नागरिकांचा मागास वर्ग - एकूण २४ ग्रामपंचायत

नगरसूल, पिंपळगाव जलाल, गवंडगाव, साताळी, नागडे, बाभूळगाव खुर्द, अंगणगाव, ठाणगाव, खिर्डीसाठे, धुळगाव, सुरेगाव रास्ता, एरंडगाव खुर्द, पन्हाळसाठे, नांदूर, खरवंडी, रेंडाळे, देवठाण, उंदिरवाडी, देवरगाव, कोटमगाव बुद्रुक, नांदेसर, पुरणगाव, डोंगरगाव, सायगाव.

अनुसूचित जाती - एकूण ९ ग्रामपंचायत

खामगाव, भारम, अंगुलगाव, पांजरवाडी, जऊळके, धामणगाव, चिंचोडी, देवळाणे, आडसुरेगाव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवी आघाडी स्थापन करणे बेकायदेशीरच!

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड नगरपालिकेतील सत्ताधारी शहर विकास आघाडीतील काही नगरसेवकांनी शिवसेनेबरोबर संधान साधून वेगळी आघाडी स्थापन करण्याच्या सुरू केलेल्या हालचाली बेकायदेशीर असल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांनी पत्रपरिषदेत केला आहे. तसेच कायद्याच्या दृष्टीने हे बेकायदेशीर असून, पुन्हा आघाडीत सामील होण्याचे आवाहन पगारे यांनी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अपात्रता कायद्याच्या नव्या तरतुदीनुसार आधी स्थापन झालेल्या आघाडीतील कोणत्याही सदस्याला नव्या गटात सामील होता येत नाही. नव्या गटास कायदेशीर मान्यता मिळत नाही, असे स्पष्ट करून राजाभाऊ पगारे यांनी शहर विकास आघाडीतून बाहेर पडून नवा गट स्थापन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नगरसेवकांना अपात्रतेच्या संकटात सापडण्यापेक्षा पुन्हा आघाडीत सन्मानाने परत या, आपले स्वागत होईल, असे आवाहन केले आहे. २२ जणांच्या आघाडीतील जवळपास १५ जणांनी एल्गार करीत शिवसेनेसह भुजबळ यांना आव्हान देत नवी आघाडी स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याने पालिकेचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राजाभाऊ पगारे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. अॅड. किशोर सोनवणे यांच्यासह नाशिक, मुंबई व थेट दिल्लीच्या विधीज्ञांचे कायदेशीर मत घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक सचिन दराडे, गटनेते बब्बू कुरैशी उपस्थित होते.

नगरसेवकांचे दावे-प्रतिदावे

आमच्याकडे बहुमत असून, लोकशाहीत बहुमताला महत्त्व असल्याने आमची आघाडी स्थापन होण्यास अडचण येणार नाही, असे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी म्हटले आहे. कायद्याच्या दृष्टीने ते निराधार असल्याचे पगारे यांचे म्हणणे आहे. दावे प्रतिदावे यामुळे मनमाडचे राजकारण ढवळून निघाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेसाठी १०९ उमेदवार रिंगणात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत छाननीची प्रक्रिया संपल्यानंतर आता अर्ज माघारीला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नांदगाव गटातून माजी अध्यक्ष प्रकाश कवडेंनी माघार घेतली आहे. त्यामुळे १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

दरम्यान अर्ज छाननीत उमेदवारी अर्ज बाद झालेले कोंडाजीमामा आव्हाडांसह तीघांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. अर्ज छाननीनंतर उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ मे पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेतले जाणार आहे. माघारीच्या पहिल्याच दिवशी नांदगाव सोसायटी गटातून माजी अध्यक्ष प्रकाश कवडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघे घेतला आहे. तर अर्ज छाननीत उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आलेल्या कोंडाजीमामा आव्हांडासह त‌िघांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे. दिंडोरीचे चंद्रकात राजे आणि शिवाजी ढेपले यांनीही अपील दाखल केले आहेत. यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्याजुन्या गाड्यांवरून वाद रंगण्याची चिन्हे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नव्याजुन्या वाहनांवरून अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. सभागृहनेते सलिम शेख यांनी या वादाला फोडणी दिली असून, 'माझे खटारा वाहन जमा करून घ्या' असे आर्जव प्रशासनाला केले आहे. सभागृहनेतेपदाचा पदभार घेतल्यापासून वाहनाने दिलेल्या धोक्याची मालिकाच त्यांनी सादर केली आहे. तर अधिकाऱ्यांना नवी वाहने आणि पदाधिकाऱ्यांना जुनी वाहने दिली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या कविताताई कर्डक यांनी केला आहे.

सभागृहनेतेपदी मनसेचे सलिम शेख यांची नियुक्ती होताच प्रशासनाकडून त्यांना अॅसेंट गाडी देण्यात आली आहे. पदभार घेतल्यानंतर पह‌िल्याच दिवशी या गाडीने त्यांना रस्त्यात धोका दिला. अॅसेन्टची दोन्ही चाके पंक्चर झाल्याने त्यांना खाजगी वाहनाने महापालिका गाठावी लागली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अॅसेन्टचे रेड‌िएटर खराब झाले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही वाहन सोडावे लागले. या वाहनाचे दररोज काम निघत असल्याने 'ती गाडी का वापरावी' असा सवाल करत, त्यांनी थेट हे वाहन जमा करून घेण्याची विनंतीच प्रशासनाला केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना नव्या गाड्या आणि पदाधिकाऱ्यांना जुन्या गाड्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'एकतर गाडी नवी द्या, नाहीतर हीच जमा करून घ्या' असा प्रस्ताव त्यांनी प्रशासनाला दिला आहे. तर त्यांच्या या आरोपांना विरोधी पक्षनेत्या कविताताई कर्डक यांना समर्थन करत, अधिकारी भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. जुन्या वाहनांमुळे आपण तर स्थायी समिती अध्यक्षांचे वाहन वापरत असल्याचा खुलासा त्यांनी केला. अशीच परिस्थिती सभापतींची असून, त्यांना खाजगी वाहने वापरावी लागत असल्याने जुन्या नव्या वाहनांवरून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला घाट बांधणीचे प्रशासनापुढे आव्हान

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

हवामान खात्याने २७ मे रोजी पावसाचे आगमन होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. अंदाज खरा ठरल्यास अहिल्या आणि गोदावरील घाटाचे काम वेळेवर पूर्ण झाले नाही तर करायचे काय? असा प्रश्न प्रशासनास सतावत आहे. अहिल्या आणि गोदावरी घाट बांधण्याचा घाट नेमका कशासाठी, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. या कामांची स्थिती पाहता त्यात निश्चितच तथ्य असल्याचे जाणवते.

त्र्यंबकेश्वर येथे १२ कोटींची घाट बांधणी जलसंपदा विभागाने हाती घेतली आहे. मात्र, अवघ्या आठ कोटींची कामे होतील, असा अंदाज बांधला जात आहे. जिल्हा प्रशासनाने या घाटांच्या कामावर लक्ष केंद्रित केले. वारंवर भेटी दिल्या, मजुरांची हजेरी घेतली मात्र, त्यास म्हणावे तसे यश आलेले आजपर्यंत दिसत नाही. सिंहस्थ निधीतून बारा कोटींमध्ये अहिल्या धरण परिसरात तीनशे मीटर, कचरा डेपो अन् स्मशानघाट परिसरात दीडशे मीटर आणि जव्हार फाटा बसस्थानक परिसरात १८० मीटर असे घाट बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे, यामधील केवळ बसस्थानक परिसरातील घाट बांधकाम भाविकांच्या स्नानासाठी उपयुक्त ठरणार आहे. पोलिस यंत्रणेस गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सहाय्यक होणार आहे.

अहिल्या धरण परिसरात होत असलेले घाट बांधकाम विस्तृत आहे. तथापि, भाविक तेथपर्यंत पोहचणार कसे आणि स्नान करून परतणार कसे, हीच खरी समस्या ठरणार आहे. त्याचबरोबर पावसाळयात येथे पाण्यास प्रचंड वेग असतो. या वेगवान पाण्यात स्नानासाठी भाविक उतरवून प्रशासन स्वतःची कसोटी बघणार असे दिसून येत आहे. असाच प्रश्न कचरा डेपोच्या लगत सुरू असलेल्या घाट बांधकामांबाबत होणार आहे. येथे स्मशान आहे. भाविक सहसा स्मशानाजवळ स्नान करण्यास तयार होणार नाहीत. तसेच, कचरा डेपो अद्यापही पूर्णत: हटलेला नाही. अस्वच्छ परिसरात भाविक स्नानासाठी तयार होतील कसे? हा प्रश्नच आहे.

बसस्थानकाजवळील गोदावरी नदीवर होत असलेला १८० मीटर लांबीचा घाट भाविकांना सोयीचा ठरेल. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर येत असल्याने पर्वणीच्या दिवशी वाहनतळापासून पायी आलेले भाविक आणि इतर वेळेस बस स्थानकावर आलेले भाविक गोदास्नानाचे पुण्यपदरी बांधतील, असा अंदाज आहे. एकूणच घाट बांधण्याचा घाट कितपत उपयोगी ठरेल, याचीच चर्चा झडत आहे.

कुशावर्त तीर्थ २० बाय ३० मीटर क्षेत्राचे असून, त्याची खोली सात मीटर आहे. येथे ठराविक वेळेत किती भाविक स्नान करतील, याचा अंदाज केल्यास पर्यायी स्नानाची व्यवस्था होणे क्रमप्राप्त आहे. सन १९६८ च्या दरम्यान बांधण्यात आलेले

अहिल्या धरण त्र्यंबकला पाणीपुरवठा करते.

या धरणातील गाळ काढणे, उंची वाढविणे अशी कामे केल्यास धरणात अधिक काळ पाणीसाठा राहील. सिंहस्थ पर्वकालादरम्यान पावसाने ओढ दिल्यास हे पाणी नदीला सोडून वेळ निभावून नेता येईल, याचा विचार शासकीय पातळीवर झालेला दिसत नाही. एकूणच कुंभमेळ्यातील प्रमुख उद्देश म्हणजे स्नान आहे. येथे आलेल्या प्रत्येक भाविकास कुशावर्तावर स्नानाची अपेक्षा असते. लाखो भाविकांचे समाधान कसे होणार याच बाबतीत प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

बांधकाम संथ गतीने

अहिल्या नदीवर घाट बांधण्यात येत आहे. मात्र, धरणाची अवस्था बिकट बनली आहे. जागोजागी गळती तसेच, गाळाने पूर्ण भरलेले हे धरण पहिल्या जोरदार पावसात ओसांडून वाहायला लागते. दि. २७ मे रोजी पाऊस कोसळायला लागल्यास घाटचे शिल्लक बांधकाम आणि तेथून पुढील गोदावरी तीराचे संस्थ गतीने चाललेले काम पूर्ण होईल, असे दिसून येत नाही. कदाचित म्हणूनच १२ कोटींचे काम ८ कोटींवर आले असावे. अर्थात शासकीय नियमांच्या पूर्ततेने अहिल्या धरणाचे संर्वधन केल्यास या घाटांच्या कामाचा अधिक फायदा झाला असता. मात्र, तशी शक्यता दिसून येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किणकिणला ‘अखंड नुपूरनाद’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कायदे, पलटे, तत्कार, तिहाई, भजन, नाट्यगीत अशा एकापेक्षा एक सरस सादर झालेल्या नृत्य प्रकारातून फ्रावशी अॅकेडमीचा परिसर नृत्यमय झाला होता. निमित्त होते 'अखंड नुपूरनाद' कार्यक्रमाचे, जागतिक नृत्य दिनानिमित्त कीर्ती कलामंदिर व फ्रावशी अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सलग १२ तास नृत्य व नृत्याचे विविध प्रकार सादर करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता तोडी रागातील अब सुमिर मन राम चरणको या बंदिशीने झाली. गुरू रेखा नडगौडा, आदिती पानसे यांच्या शिष्यांनी तिश्र आणि चतुश्र अशा नृत्याच्या रचना बांधून १०८ आवर्तने सादर केली. त्यानंतर विलंबित लयीत 'तकिट तकदीन' हे चलन घेऊन आकृतीबंद कलाकृती सादर केली. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी 'जागो मोहन प्यारे' ही रचना सादर केली. दुपारी २ वाजता कार्यक्रमाचे पहिले सत्र संपले. दुसऱ्या सत्रात 'ता थै तत, आ थै तत' या तत्काराच्या बोलातून नृत्याच्या विविध लडी सादर करण्यात आल्या. कीर्ती कलामंदिराच्या मेरी येथील शाखेच्या वतीने 'ती ग दा दिगदिग' ही प्रातमिक रचना सादर केली. संध्याकाळच्या सत्रात मुख्य कार्यक्रमाची सुरुवात 'खेळ मांडियेला' या अभंगाने झाली. लहान मोठ्या नृत्यांगनांनी केलेल्या पदन्यासाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. 'आली राधिका अंगणी' 'बीजे दरस मोहे' या रचना सादर करण्यात येऊन साऊथ इंडियन पध्दतीने गणेशाचे स्तवन सादर करण्यात आले 'वाता पी गणपती गजानन' ही रचना सादर करण्यात आली. रुपक, झपताल, त्रिताल, अशा महत्वाच्या तालातील विविध रचानांनी कार्यक्रमांत रंगत आणली. नाट्यगीतात कोलाज सादर करण्यात आले. भोरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नृत्य दिनाचे औचित्य

जागतिक दर्जाचे नृत्य कलाकार जॉन जोर्ज्स नुव्हेर यांचा २९ एप्रिल हा जन्म दिवस आहे. त्यानिमित्त १९८२ पासून जागतिक नृत्य दिन जगभर साजरा करण्यात येतो. हे सलग ३३ वे वर्ष आहे. नेहमीप्रमाणे या वर्षी जागतिक सोहळ्यामध्ये नाशिकचाही सहभाग हवा म्हणून गेली ४० वर्षे नृत्याची साधना करणाऱ्या नृत्यांगना रेखा नाडगौडा व त्यांची दुसरी पिढी म्हणजेच अदिती नाडगौडा-पानसे या दोघींनी मिळून अखंड नुपूरनाद या कार्यक्रमाची निर्मिती केली. संस्थेमार्फत सलग १२ तास अखंड नुपूरनादाचा हा पहिलाच उपक्रम होता. कथकचे समग्र रूप नाशिककरांना पोहोचविण्यासाठी कथकमधील प्रत्येक अंगाचा; ताल अंग आणि भाव अंग यांचा नामस्मरणाप्रमाणे १०८ आवर्तन करण्याचा संकल्प रेखाताईंनी सोडला होता. उशिरा पर्यंत चाललेल्या कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्राकडे ‍सिंहस्थासाठी निधीची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थाकरिता केंद्र सरकारने २०१४-१५ या वर्षासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अजूनही बरीचशी कामे अपूर्णावस्थेत असून २०१५-१६ या वर्षासाठी देखील निधी मंजूर करून तो लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपला असून, अजूनही बरीचशी कामे अपूर्णावस्थेत आहेत. ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी निधीची काय तरतूद केली आहे, असा प्रश्न गोडसे यांनी उपस्थित केला होता. सिंहस्थाशी संबंधित कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, तसे होताना दिसत नसल्याने केंद्राकडे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ३१ मार्च रोजी केंद्र सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. देशभरात होणाऱ्या मेगा सोहळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा हा एक सोहळा आहे. एक कोटी भाविक हजेरी लावतील, अशा सोहळ्याला १०० कोटी रुपयांची मदत करायची हे केंद्र सरकारचे धोरण आहे. तीन कोटी लोकसंख्येसाठी तीनशे कोटी या प्रमाणात ही मदत दिली जात असते. त्यामुळे नाशिकसाठी १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्र्यंबकेश्वरमधील कामे धिम्या गतीने सुरू असून, ही कामे वेळेत कशी पूर्ण होणार याबाबत गोडसे यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

निधी पडूनच

जिल्ह्यात कावनई हे प्रसिध्द तीर्थक्षेत्र असून, तेथे भाविकांची गर्दी असते. भाविकांच्या सोयीसाठी येथे उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत त्यापैकी केवळ १८ लाख रुपयांचाच निधी खर्च होऊ शकला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याख्यानमालेची वास्तू वादात

0
0

प्लॉट नंबर ४२ मधील रहिवाशांचे कार्यालयाबाबत आयुक्तांना पत्र

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-आग्रा हायवेवरील ऋणानुबंध मंगल कार्यालयामागील मोकळ्या भूखंडावर उभ्या असलेल्या महापालिकेच्या वास्तूत अनधिकृतपणे वसंत व्याख्यानमालेचे कार्यालय उघडले आहे. त्याचे उद्घाटन २ मे रोजी ठेवल्याचा आरोप स्वीकृत नगरसेवक सचिन महाजन यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे काही न काही कारणाने नेहमीच वादात असणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या वास्तूचे उद्घाटनच वादात सापडले आहे.

महामार्गालगत असलेल्या ऋणानुबंध कार्यालयामागे ओपन स्पेसमध्ये महापालिकेने एक समाजोपयोगी वास्तू बांधली होती. या वास्तूचे बांधकाम झाल्यानंतर प्लॉट नंबर ४२ मधील रहिवाशी श्रीकांत बेणी यांनी या वास्तूमध्ये वसंत व्याख्यानमालेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू करण्याची परवानगी मागितली. तसेच, व्याख्यानमालेत झालेल्या विविध वक्त्यांची भाषणे सीडीद्वारे ऐकविता यावी, अशी विनंती केल्याने परिसरातील रहिवाशी तसेच नगरसेवक गुलजार कोकणी, शेवाळे, संदीप लेनकर व सचिन महाजन यांनी बेणींच्या ताब्यात कोरे लेटरहेड देऊन होकार दर्शवला. त्याप्रमाणे महापालिकेत करारनामा करून ही वास्तू बेणींकडे देण्यात आली. तसेच महापालिकेतर्फे येथे कॉम्प्युटर, फर्निचर व इतर सोयी करण्यात आल्या. मात्र, काही दिवसांनी असे लक्षात आले की येथे विद्यार्थी तर येत नाही पण ही वास्तू व्याख्यानमालेचे मुख्यालय म्हणून वापरण्यास बेणींनी सुरुवात केली आहे. तसेच, पत्रव्यवहारासाठी कार्यालयीन पत्तादेखील हाच टाकण्यात आला आहे. या ओपन स्पेसमध्ये बेणी यांनी काही फुलांची झाडे लावली आहेत व लहान मुलांना ते तेथे खेळण्यासाठी मज्जाव करतात. बांधीव मिळकत वापरण्यासाठी दिलेली असताना ओपन स्पेसचा ताबा बेणींनी कसा घेतला असा सवालही रहिवाशांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केला आहे.

करारनाम्यात असलेल्या उल्लेखांचा व नियमांचा वारंवार भंग होताना दिसतो. इतर संस्थांना ही मिळकत वापरण्यास दिल्यास त्याचा रहिवाशांना त्रास होता कामा नये, असे असताना वाहनांच्या पार्किंगचा त्रास होतो. त्यामुळे हा करारनामाच रद्द करण्यात यावा असे पत्रकात नमूद केले आहे. तसेच, येथील रहिवाशांना अंधारात ठेवून बेणी यांनी आपल्या वडिलांचे नाव तेथील रस्त्यास दिले आहे. त्या ठरावासही रहिवाशांनी विरोध केला आहे. वसंत व्याख्यानमाला केवळ मे महिन्यातच असल्याने इतर ११ महिने या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात यावी, अशी परिसरातील रहिवाशांची इच्छा आहे.

या वास्तूचे उद्घाटन स्वाध्याय परिवाराच्या मार्गदर्शिका धनश्रीदीदी तळवलकर यांच्या हस्ते २ मे रोजी करण्याचा विचार आहे. या उद्घाटनास तीव्र विरोध दर्शविण्यात आला असून, त्याची परवानगी नाकारावी असे पत्र महापालिका आयुक्तांना रहिवाशांनी दिले आहे. पत्रकावर अमृतलाल अगरवाल, सचिन महाजन, ओमप्रकाश सोमाजी आदींसह बावीस जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महापालिकेने करारनाम्यावर दिलेल्या या वास्तूत आम्ही अनेक कार्यक्रम राबवतो. त्यावेळी स्थानिक नागरिक एकत्र येतो. एक वर्षापूर्वी आयुक्तांची व महापालिकेची मंजुरी घेऊनच ही वास्तू ताब्यात घेतली. आता तेथील कामे पूर्ण झाल्याने तिचे उद्घाटन करीत आहे. तरीही स्थानिकांचे काही समज-गैरसमज असल्यास ते एकत्र बसवून सोडवू.

- श्रीकांत बेणी, अध्यक्ष, वसंत व्याख्यनामाला

अभ्यासिकेच्या कामासाठी लेटरहेड दिले होते. त्याचा वास्तू हस्तांतरणाशी कोणताही संबंध नाही. - गुलजार कोकणी, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेश नाकारल्यास शाळांची मान्यता रद्द

0
0

आरटीई प्रवेशाबाबत शिक्षण मंडळ आक्रमक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हक्क कायद्यानुसार येत्या २ मे पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश न देणाऱ्या विनाअनुदानित शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा महापालिका शिक्षण मंडळाने दिला आहे. २५ टक्के जागांवरील मोफत प्रवेशाबाबत मंडळाने बुधवारी आढावा बैठक घेतली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. या २५ टक्के जागांसाठी यंदा ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार १२९० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेशित करण्यात आले. मात्र, गेल्या महिन्याभरापासून शाळांनी हे प्रवेश देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. आरटीई प्रवेशाला यापूर्वीच महापालिका शिक्षण मंडळाने दोनदा मुदतवाढ दिली. त्याकडेही शाळांनी दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात लोकक्षोभ उसळण्याचीही चिन्हे आहेत. याची दखल घेत शिक्षण मंडळाने शहरातील खासगी विनाअनुदानित शाळांची बैठक मंगळवारी दुपारी घेतली. प्रभारी प्रशासनाधिकारी वसुधा कुरणावळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला खासगी शाळांचे जवळपास १०० प्रतिनिधी उपस्थित होते. १२९० पैकी केवळ ४५७ विद्यार्थ्यांनाच शाळांनी प्रवेश दिल्याची बाब या बैठकीत समोर आली आहे. तर, १६० अर्ज नाकारण्यात आले असून ५९७ विद्यार्थ्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही, ४७९ पालकांनी प्रवेशाची कुठलीही चौकशी केलेली नाही, असे बैठकीत स्पष्ट झाले. तर, ४४ शाळांनी अद्याप आरटीईचा एकही प्रवेश दिला नसल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल शिक्षण मंडळाने घेतली आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील १२६ शाळांनी आरटीईचे प्रवेश न दिल्याबद्दल त्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव तेथील शिक्षण मंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याची आठवण या बैठकीत करून देण्यात आली. त्यामुळेच येत्या २ मे पर्यंत आरटीईचे सर्व प्रवेश देण्यात यावेत.

अन्यथा शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात येईल, असा इशारा यावेळी शाळांच्या प्रतिनिधींना देण्यात आला. २ मेला संध्याकाळी साडेपाच पर्यंत प्रवेश पूर्ण करावेत तत्पूर्वी ४ वाजेपर्यंत लेखी माहिती मंडळाला कळवावी, असे सांगण्यात आले आहे.

मेस्टाचा बहिष्कार मागे

राज्यभरात आरटीईचे केवळ २६ टक्केच प्रवेश झाल्याची दखल राज्य सरकारने घेतली. त्यामुळेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा संचालकांची बैठक झाली. गेल्या तीन वर्षांचे प्रवेशाचे पैसे थकल्याने नाराजी असल्याचे संचालकांनी सांगितले. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा) ने आरटीई प्रवेशावर घातलेला बहिष्कार मागे घेतल्याचे मेस्टाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख योगेश पाटील यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसपुत्राची PSIला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक आर. एस. धायगुडे यांना निवृत्त पोलिसाच्या पुत्राने कानाखाली वाजवली. यानंतर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संशयित किशोर काशिद या तरुणावर सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनिरीक्षकास मारहाण झाल्याची माहिती आयुक्त कार्यालयात पोहचताच एकच खळबळ उडाली होती. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील संशयितास तत्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. सातपूरमधील पपया नर्सरी येथे पोलिस उपनिरीक्षक धायगुडे चेंकिंग करीत असताना ट्रिपल शिट बसवून किशोर दुचाकी वाहन चालवताना आढळला. किशोरला पोलिसांनी थांबविण्याची विनंती करून देखील तो न थांबला नाही. त्याचा पाठलाग करून धायगुडे यांनी पोलिस अडविले. यानंतर पळून जाण्याबाबत विचारणा केल्यानंतर किशोरने धायगुडे यांच्याशी वाद घातला. तसेच मारहाण केली. धायगुडे यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसात सरकारी कामात अडथळा केला म्हणून संशयित किशोर यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गळफास घेऊन आत्महत्या

सातपूर भागातील अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीत राहणारे प्रभाकर गवळी (वय ४५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊ भरत गवळी यांनी प्रभाकर गवळी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गवळी यांना मृत झाल्याचे सांगितले. यानंतर भरत गवळी यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास सातपूर पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीवरून रस्सीखेच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षण समितीच्या सदस्यांच्या निवडीनंतर आता सभापतीपदाच्या हालचाली सुरू झाल्या असून, मनसेसह अपक्षामंध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मनसेच्या काही सदस्यांनी सभापतीपद मिळ‍वण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत, तर अपक्षांनीही सभापती पद पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, शिवसेना भाजपनेही पश्चिम प्रभाग समिती प्रमाणेच चमत्काराची तयारी सुरू केली आहे.

शिक्षण समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर निवड समितीचा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. हा ठराव पाठविण्यापूर्वीच सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्षांच्या महाआघाडीतच सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मनसे, काँग्रेस आणि अपक्ष गटाने सभापतीपदावर दावा केला आहे. काँग्रेसला प्रभाग समितीपासून दूर रहावे लागणार असल्याने शिक्षण समितीचे सभापती पद मिळावे अशी काँग्रेसची मागणी आहे तर मनसेही आपल्या वंचिताना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. अपक्षांच्या वतीने सदस्य संजय चव्हाण यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर समितीत जास्त महिला असल्याने सभापतीपद महिलांनाच मिळावे यासाठी काही महिला सदस्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महाआघाडीत रस्सीखेच सुरू असताना शिवसेना आणि भाजपनेही पश्चिम प्रभाग समितीच्या निवडणुकी प्रमाणेच चमत्कार करण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेतील नाराजांना हाताशी धरून काही चमत्कार करण्याच्या करता येईल काय? याची चाचपणी केली जात आहे. यात माजी आमदार वसंत गीते यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेकडे तगडे उमेदवार असल्याने सेनेनही यात उडी घेतली असून, भाजप आणि काही नाराजांना हाताशी धरून महाआघाडीला धक्का देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images