Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जगण्याला बळ पुरविणारा ‘अंतर्नाद’

$
0
0

माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याकडून गौरवोद्गार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगण्याच्या उमेदीला निराशेचा अंधार कधी सर्वच बाजूंनी घेरून टाकतो. मात्र, हीच वेळ ओळखायला हवी. अन् सकारात्मक विचारांनी या निराशावादावर मात करायला हवी. असाच संदेश ज्येष्ठ समाजसेविका प्रा. निशा पाटील लिखित 'अंतर्नाद' हे पुस्तक देते, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित सोहळ्यात प्रा. पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की दिवसेंदिवस समाज संकुचित होताना दिसतो आहे. जातीय सलोख्यामध्ये भिंती उभ्या राहत आहेत. समाजिक ऐक्याच्या दृष्टीने ही दरी निर्माण होणे चांगले नाही. या प्रतिकुलतेच्या प्रवाहातही सामाजिक क्षेत्रातील घटक निराश न होता कार्यरत असतात. त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरते. जातीपातींना मूठमाती देऊन मानवतेला प्राधान्य देणाऱ्या विचारांचा प्रसार 'अंतर्नाद'सारख्या पुस्तकांमधून होतो, असेही ते म्हणाले. शब्द मल्हारच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

चिंतनास चालना देणारे, समाजाच्या मनात आशावादाची बीजे पेरणारे अन् मानवतेची शिकवण देणारे पुस्तक,' अशा शब्दात माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी या पुस्तकाचे वर्णन केले. यावेळी प्रकाशक स्वानंद बेदरकर, समीर बेदरकर यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३१ हजार जणांना सवलतीचा लाभ!

$
0
0

सिडकोवासीयांकडून सर्वाधिक प्रतिसाद

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक महापालिकेन एप्रिल महिन्यात पूर्ण वर्षाची घरपट्टी भरणाऱ्यांना देवू केलेल्या पाच टक्के सवलत योजनेला नाशिककरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २३ एप्रिलपर्यंत शहरातील सुमारे ३१ हजार मिळकतधारकांनी मालमत्ता कर जमा केल्याने पहिल्या तीन आठवड्यात महापालिकच्या तिजोरीत सुमारे साडेतीन कोटीची भर पडली आहे. या योजनेला आणखीन सव्वा दोन महिन्याची मुदत असल्याने महापालिकेला चांगलाच फायदा होणार आहे.

मालमत्ता कर भरण्यासाठी मिळकत धारकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने पाच, तीन व दोन टक्के सवलत देण्याची योजना सुरू केली आहे. त्यात एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, मे म‌हिन्यामध्ये भरल्यास तीन टक्के आणि जून महिन्यामध्ये भरल्यास दोन टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पूर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास बिलात पाच टक्के सवलत दिली जाणार असल्याने नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. २३ एप्रिलपर्यंत शहरातील ३० हजार २९४ मिळकतधारकांनी ३ कोटी ३३ लाख ९७ हजार रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यात सिडकोतून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून सिडकोत १० हजार ७८२ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

जनजागृतीचा परिणाम

गेल्या वर्षी या योजनेत एप्रिल महिन्यात एक कोटी २३ लाखाची वसूली झाली होती. तर लाभार्थ्यांची संख्याही कमी होती. मात्र, या वर्षी महापालिकेने जनजागृती केल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढून उत्पन्नातही वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक फायदा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगरोडसाठी अडथळ्यांची शर्यत

$
0
0

दोन ठिकाणी भूसंपादन तर एका ठिकाणी अतिक्रमणाचा खोडा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रिंगरोडच्या कामांना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागते आहे. कुंभमेळा अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपला असून अजूनही दोन ठिकाणी भूसंपादन, एका ठिकाणी अतिक्रमण तर एका रस्त्याला वृक्षतोडीच्या निर्णयामुळे खो बसला आहे. आगामी काळात ही कामे पूर्ण झाली नाही तर पुढील १२ वर्षे ही कामे रखडण्याची चिन्हे आहेत.

शहरातील आतील लिंकरोड, मध्य रिंगरोड आणि बाह्यरिंगरोडचे रखडलेली कामे येत्या सिंहस्थाच्या आत पूर्ण झाल्यास शहरातील कोणत्याही भागातून अवघ्या १० ते १५ मिनिटात मुख्य हायवेपर्यंत पोहचणे शक्य होणार आहे. याबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक पूर्णतः शहराबाहेरून वळल्याने वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटण्याची चिन्हे आहेत. मात्र, यासाठी सर्व कामे सुरळीत पार पडणे आवश्यक आहे. सध्या, सिटी सेंटर चौकाकडून गोविंदनगरकडे येणाऱ्या रस्त्याचे काम भूसंपादनअभावी रखडले आहे. अवघ्या ७० मीटर जागेचे भूसंपादन तत्काळ झाल्यास गोविंदनगरकडून येणारी वाहतूक एबीबी सर्कलपर्यंत सहजतेने जाऊ शकते. यामुळे मायको सर्कलवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होईल. याबरोबर, वडाळा गावातील अतिक्रमणामुळे साधारण एक किलोमीटर अंतराचे काम खोळंबले आहे. हा रस्ता रुंद झाल्यास मुंबईकडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या जडवाहतूकीला सोपा पर्याय मिळेल. यामुळे द्वारकेवरील वाहतुकीचा अतिरिक्त ताण कमी होऊ शकतो. याबरोबर, हिरावाडी परिसरातील गुंजाळ मळा येथील काम देखील भूसंपादनाअभावी रखडले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास पेठ तसेच दिडोंरीरोडवरील वाहतूक थेट मुंबई आग्रा हायवे पुढे तपोवन आणि नंतर नाशिक पुणे हायवेपर्यंत येऊ शकते. भूसंपादनाच्या कामासाठी काही रक्कम भरण्यात आली असून सिंहस्थापर्यंत या रस्त्यांचे काम पूर्ण होण्याची शक्यता महापालिकेतील सूत्रांनी व्यक्त केली.

बाह्य रिंगरोडही सुरू

बाह्य रिंगरोडमध्ये बारदाण फाटा-पपयानर्सरी, गरवारे पाँईट-पाथर्डी फाटा, वडनेरगेट, विहीतगाव, देवळाली गाव, बिटको पाँईट, जेलरोड, नांदूर नाका ते जत्रा हॉटेल या २० किलोमीटर रस्त्याचा समावेश आहे. यातील ९. २ किलोमीटर रस्ता ३० मीटर तर उर्वरित ११ किलोमीटर रस्ता १३ मीटर रुंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीरा बोरवणकरांना जेलकडूनच सरप्राईज!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड कारागृहाला राज्याच्या अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी गुरुवारी सरप्राईज व्हिजीट दिली. मात्र, नाशिकचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, बॉम्बशोध आणि श्वानपथक आदींनी आठ तास कसून तपासणी करूनही आक्षेपार्ह आढळले नाही. 'खोदा पहाड निकला चूहाँ' असे देखील घडले नाही. त्यामुळे बोरवणकरांबरोबरच खमंग बातमीच्या आशेने दिवसभर ठिय्या दिलेल्या मीडियावरच आश्चर्यचकित होण्याची वेळ आली.

नागपूरच्या कारागृहातून पाच कैदी पळून गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे अचानक भेट दिली होती. राज्यातील कारागृहांची सुरक्षा आणि कारभाराचे आडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे नाशिकरोडला चेकींग होणार हे गृहीतच होते. नाशिकरोड कारागृहात कैद्यांकडे मोबाईल, निरोधची पाकिटे, शस्त्रे सापडली होती. खून, गँगवार, कैदी पलायन यामुळे कारागृह चर्चेत असते. त्या पार्श्वभूमीवर भले मोठे घबाड सापडेल, एखादा तरी अधिकारी सस्पेन्ड होणार ही आशा फोल ठरली.

पोलिसांचा ताफा

मीरा बोरवणकर सकाळी साडेदहाला कारागृहात आल्या. त्यांच्यासमवेत पुण्याचे विशेष पथक, नाशिकचे सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, गुन्हा शाखेचे सहाय्यक आयुक्त गोरे, उपायुक्त संदीप दिवाण, नाशिकरोडचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, उपनगर, अंबड आदी ठिकाणचे पोलिस अधिकारी व कर्मचारी, बांबशोध पथक, श्वान पथक असा मोठा ताफा होता.

इंच-इंचची तपासणी

पथकाने कारागृहातील जमीन व फरशा उकरल्या. छतावर जाऊन पाहणी केली. पाण्याचा साठे तपासले. कारखाने व बराकींची बारकाईने तपासणी केली. कारागृहाची इंचन इंच तपासणी केली. सकाळी साडेदहा ते रात्री आठपर्यंत मॅरेथान तपासणी सुरु होती. रात्री सव्वा आठला मॅडम गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुस्कारा सोडला. कारागृह अधीक्षक जयंत नाईक, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सुनिल कुवर, तुरुंगाधिकारी संदानशिव यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत सुरक्षा अधिकारी चोख काम बजावत असल्यानेच या छाप्यात एकही वस्तू सापडली नसल्याचा दावा कारागृहाच्या सूत्रांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठक्कर बाजारमध्ये युवतीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करणाऱ्या युवतीचा टवाळखोरांनी विनयभंग केल्याची घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ठक्कर बाजार येथे घडली. यामुळे बस स्टॉपवरील रोडरोमियोंचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, रात्रीच्या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की पीडित तरूणी पुणे येथे जाण्यासाठी रात्री ठक्कर बाजार येथे पोहचली. बसची प्रतीक्षा करीत असताना तेथे आलेल्या दोन अज्ञात युवकांपैकी एकाने तरुणीच्या खांद्यावर हात ठेऊन अश्लील चाळे केले. तरूणीने प्रतिकार केला असता रोडरोमियोंनी पळ काढला. या प्रकरणी पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यामुळे रात्रीच्या वेळी प्रवाशांना होणाऱ्या त्रासावर प्रकाश पडला आहे. ठक्कर बाजार येथे रात्रभर अवैध प्रवाशी वाहतूक सुरू असते. अनेक टवाळखोर रात्रीच्या वेळी या परिसरात जमून धिंगाणा घालतात. एकट्या महिलांना प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो. महिला बस वाहकांना देखील रोडरोमियोंच्या त्रासाला सामोरे जावे लागते. सरकारवाडा पोलिसांनी या ठिकाणी पोलिस चौकी सुरू केली असली तरी कर्मचाऱ्यांचा सातत्याने अभाव असतो. सध्या, सुटीचा कालावधी असून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ठक्कर बाजारसह, महामार्ग, ना​शिकरोड व इतर महत्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवावा व प्रवाशांसाठी बस स्थानकावर पोलिस हेल्पलाईन सुविधा सुरू करण्याची मागणी केली जाते आहे.

डेबिट कार्ड हॅक

डेबिट कार्ड हॅक करून त्याआधारे एकाच्या खात्यातील ९९ हजार ८४३ हजार रूपये काढून घेण्यात आले. ही घटना २१ ​एप्रिलरोजी राजीव गांधी भवनसमोरील एका बँकेत घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये आयटी अॅक्टच्या कलम ४३ व ६६ सीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंधर्वनगरीत शनिवारपासून बालाजी मंदिर महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंधर्वनगरी येथील बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रती बालाजी मंद‌िराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत २५ एप्र‌‌िल रोजी मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबिर होणार असून, २६ एप्रिल रोजी ओपन रोलर रोड स्के‌टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणाऱ्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात अॅजियोग्राफी, अॅजियोप्लास्टी, बायपास, वॉल बदलणे, डिव्हाईस क्लोजर, दुर्बीणीद्वारे किडनीतील व मुत्रमार्गातील मुतखडे अशा व इतर आजारांचे मोफत तपासणी शिबिर होणार आहे. तसेच रविवारी २६ एप्रिल रोजी ओपन रोलर स्केटींग कॉम्पिटीशनचे आयोजन करण्यात आले आहे. ही कॉम्पिटीशन सकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे. तसेच सकाळी ११ ते २ या वेळेत डायव्हींग कॉम्पिटीशनचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे १ मे व २ मे रोजी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बालाजी सोशल फाऊंडेशनचे कैलास मुदलीयार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तवेरा नदीपात्रात कोसळून राजीवनगरमधील एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ संगमनेर

भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटून वाहन नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात राजीवननगर परिसरातील एका व्यक्तिचा मृत्यु झाला. मुलाला मुलगी पाहण्यासाठी एकाच कुंटुबातील तिघेजण पुण्याला जात असताना चंदनापूरी घाटातील जावळेवस्तीनजीक सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

दिनकर मधुकर पाटील (५४) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिचे नाव आहे. जखमींमध्ये गौरव दिनकर पाटील (२७), विलास मधुकर पाटील (५७) आणि वाहनचालक मनोज छगन आहेर यांचा समावेश आहे. इगतपुरी येथील महिंद्रा अॅण्ड महिंद्र कंपनीत सर्व्हिसला असलेल्या दिनकर पाटील यांचा मुलगा गौरव यास मुलगी पाहण्यासाठी हे चौघे (पुणे) येथे जाण्यास निघाले होते. आज, सकाळी चंदनापुरी येथील जावळेवस्तीनजीक वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याचे वाहन नदीकाठावरील कठडे तोडून खाली कोसळली. या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणावर लोखंडी सळ्या ठेवलेल्या होत्या. त्या थेट गाडीत घुसल्या. या भीषण अपघातात दिनकर मधुकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आजूबाजूच्या व येथील कामगारांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. वाहनचालकाची पुरेशी झोप झालेली नसल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गावितांचा जबाब सुरू

$
0
0

पाचपुतेंना ३० एप्रिलपर्यंत मुदत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाराचाराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीने तक्रारदारांचे जबाब नोंदवण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यत ३० जणांचे जबाब समितीने नोंदविले आहेत. दरम्यान, गुलाबराव पवार यांच्या तक्रारीत थेट उल्लेख असलेले माजी आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांचेही जाबजबाब नोंदविण्यास सुरूवात झाली आहे. पाचपुतेंना ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आदिवासी विभागात सन २००४ ते २००९-१० मधील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी शासनाने चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती एम. जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीकडे आतापर्यंत ३१ तक्रारी प्राप्त झाल्या असून, या तक्रारदारांची उलटतपासणी सुरू आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या शपथपत्रावर साक्षिदारांचे जबाब नोंदविले जात आहे. याचिकाकर्ते आणि तक्रारदार गुलाब पवार यांनी आपल्या शपथपत्रात थेट माजी मंत्री डॉ. गावित आणि पाचपुते यांच्यासह माजी आमदार शरद गावित यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे या तिघांना साक्ष देण्यासाठी समितीने पंधरा दिवसांपूर्वीच समन्स काढले होते. १६ एप्रिलला डॉ. गावित आणि शरद गावितांतर्फे अॅड प्रवीण पाटील यांनी बाजू मांडत खुलासा केला. गुरूवारी पाच तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यात आलेत. त्यात किशोर देविदास पाटील, देवमन चौरे, संतोष धनगर, नागराज पाटील, सयाजीराव मोरे यांनी जबाब दाखल केले. सोबतच डॉ.गावितांच्या वतीने अॅड प्रवीण पाटील यांनी झालेल्या आरोंपावर आपली बाजू मांडली. तर चौकशी आयोगातर्फे अॅड. एस. बी .टर्ले यांनी उलटतपासणी केली.आदिवासी विभागाच्या वतीने सरकारी वकील श्रीधर माने यांनी, तर आदिवासी महामंडळातर्फे एस. एस. कोतवाल यांनी बाजू मांडली. आतापर्यंत तब्बल ३० तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, शुक्रवारी आणखी चार जणांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलेज १४९, पथके अवघी दोन

$
0
0

पुणे विद्यापीठाचा अजब कारभार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील विविध प्रकारच्या तब्बल १४९ कॉलेजेसमध्ये सध्या बहुविध प्रकारच्या परीक्षा सुरू असल्या तरी अवघ्या दोन पथकांद्वारे त्यावर नजर ठेवली जात आहे. शहरी आणि ग्रामीण भागासाठीच्या या पथकांद्वारे परीक्षा कालावधीत नक्की योग्य कामगिरी बजावली जाते आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात विविध कॉलेजेस कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात ८५ आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज, ४ लॉ कॉलेज, १८ इंजिनीअरींग कॉलेज, ४ आर्किटेक्ट कॉलेज, २३ बीएड कॉलेज आणि १५ फार्मसी कॉलेज असे एकूण १४९ कॉलेजेस आहेत. सद्यस्थितीत पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवीच्या विविध वर्षांच्या आणि शाखांच्या लेखी परीक्षा सध्या सुरू आहेत. त्यामुळेच कॉलेज कॅम्पसमध्ये अत्यंत शुकशुकाट दिसून येत आहे. परीक्षेच्या दरम्यान कॉपी करण्याच्या प्रकारांसह मोबाईलचा वापर किंवा नियमांना हरताळ फासणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी विद्यापीठाकडून दक्षता पथकाची (स्कॉड) नियुक्ती केली जाते. नाशिक जिल्ह्यात तब्बल १४९ कॉलेज असले तरी विद्यापीठाने अवघी २ पथके उपलब्ध करुन दिली आहेत. एक पथक नाशिक शहरासाठी तर दुसरे पथक नाशिक जिल्ह्यासाठी आहे. प्रत्येक पथकात चार ते पाच जणांचा समावेश असतो. हे सर्वजण वेगवेगळ्या कॉलेजचे प्राध्यापकच असतात. त्यातील एक जण पथकाचे नेतृत्व करतो. गेल्या अनेक वर्षांपूर्वीही दोनच पथके विद्यापीठाद्वारे कार्यरत होती. आता जिल्ह्यात कॉलेजची संख्या प्रचंड वाढली असली तरी पथके तेवढीच ठेवण्यात आली आहेत. लेखी परीक्षेचा कालावधी सर्वसाधारणपणे ३ तासांचा असतो. मात्र, शहरातील एका पथकाला या तीन तासांमध्ये तीन ते चार कॉलेजलाच भेट देता येते तर ग्रामीण भागातील पथकाला केवळ एक ते दोन कॉलेजचीच तपासणी करता येते. त्यामुळे अशा परिस्थितीत लेखी परीक्षेवर या दोन्ही पथकांना ठेवणे कसे शक्य होते, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

दादरा-नगर हवेलीचीही जबाबदारी

दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात एकूण चार कॉलेज आहेत. हे कॉलेजही पुणे विद्यापीठाच्याच कार्यकक्षेत येतात. या चारही कॉलेजच्या परीक्षांची तपासणी करण्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीणच्या पथकावरच देण्यात आली आहे. त्यामुळे हे पथक नक्की किती कार्यक्षमतेने कार्य करत असेल, अशी शंका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगण्याला बळ पुरविणारा ‘अंतर्नाद’

$
0
0

माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्याकडून गौरवोद्गार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जगण्याच्या उमेदीला निराशेचा अंधार कधी सर्वच बाजूंनी घेरून टाकतो. मात्र, हीच वेळ ओळखायला हवी. अन् सकारात्मक विचारांनी या निराशावादावर मात करायला हवी. असाच संदेश ज्येष्ठ समाजसेविका प्रा. निशा पाटील लिखित 'अंतर्नाद' हे पुस्तक देते, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित सोहळ्यात प्रा. पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की दिवसेंदिवस समाज संकुचित होताना दिसतो आहे. जातीय सलोख्यामध्ये भिंती उभ्या राहत आहेत. समाजिक ऐक्याच्या दृष्टीने ही दरी निर्माण होणे चांगले नाही. या प्रतिकुलतेच्या प्रवाहातही सामाजिक क्षेत्रातील घटक निराश न होता कार्यरत असतात. त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरते. जातीपातींना मूठमाती देऊन मानवतेला प्राधान्य देणाऱ्या विचारांचा प्रसार 'अंतर्नाद'सारख्या पुस्तकांमधून होतो, असेही ते म्हणाले. शब्द मल्हारच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

चिंतनास चालना देणारे, समाजाच्या मनात आशावादाची बीजे पेरणारे अन् मानवतेची शिकवण देणारे पुस्तक,' अशा शब्दात माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी या पुस्तकाचे वर्णन केले. यावेळी प्रकाशक स्वानंद बेदरकर, समीर बेदरकर यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३१ हजार जणांना सवलतीचा लाभ!

$
0
0

सिडकोवासीयांकडून सर्वाधिक प्रतिसाद

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिक महापालिकेन एप्रिल महिन्यात पूर्ण वर्षाची घरपट्टी भरणाऱ्यांना देवू केलेल्या पाच टक्के सवलत योजनेला नाशिककरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २३ एप्रिलपर्यंत शहरातील सुमारे ३१ हजार मिळकतधारकांनी मालमत्ता कर जमा केल्याने पहिल्या तीन आठवड्यात महापालिकच्या तिजोरीत सुमारे साडेतीन कोटीची भर पडली आहे. या योजनेला आणखीन सव्वा दोन महिन्याची मुदत असल्याने महापालिकेला चांगलाच फायदा होणार आहे.

मालमत्ता कर भरण्यासाठी मिळकत धारकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाने पाच, तीन व दोन टक्के सवलत देण्याची योजना सुरू केली आहे. त्यात एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, मे म‌हिन्यामध्ये भरल्यास तीन टक्के आणि जून महिन्यामध्ये भरल्यास दोन टक्के बिलात सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पूर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास बिलात पाच टक्के सवलत दिली जाणार असल्याने नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. २३ एप्रिलपर्यंत शहरातील ३० हजार २९४ मिळकतधारकांनी ३ कोटी ३३ लाख ९७ हजार रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यात सिडकोतून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून सिडकोत १० हजार ७८२ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

जनजागृतीचा परिणाम

गेल्या वर्षी या योजनेत एप्रिल महिन्यात एक कोटी २३ लाखाची वसूली झाली होती. तर लाभार्थ्यांची संख्याही कमी होती. मात्र, या वर्षी महापालिकेने जनजागृती केल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढून उत्पन्नातही वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक फायदा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगरोडसाठी अडथळ्यांची शर्यत

$
0
0

दोन ठिकाणी भूसंपादन तर एका ठिकाणी अतिक्रमणाचा खोडा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रिंगरोडच्या कामांना अडथळ्याची शर्यत पार पाडावी लागते आहे. कुंभमेळा अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपला असून अजूनही दोन ठिकाणी भूसंपादन, एका ठिकाणी अतिक्रमण तर एका रस्त्याला वृक्षतोडीच्या निर्णयामुळे खो बसला आहे. आगामी काळात ही कामे पूर्ण झाली नाही तर पुढील १२ वर्षे ही कामे रखडण्याची चिन्हे आहेत.

शहरातील आतील लिंकरोड, मध्य रिंगरोड आणि बाह्यरिंगरोडचे रखडलेली कामे येत्या सिंहस्थाच्या आत पूर्ण झाल्यास शहरातील कोणत्याही भागातून अवघ्या १० ते १५ मिनिटात मुख्य हायवेपर्यंत पोहचणे शक्य होणार आहे. याबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक पूर्णतः शहराबाहेरून वळल्याने वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटण्याची चिन्हे आहेत. मात्र, यासाठी सर्व कामे सुरळीत पार पडणे आवश्यक आहे. सध्या, सिटी सेंटर चौकाकडून गोविंदनगरकडे येणाऱ्या रस्त्याचे काम भूसंपादनअभावी रखडले आहे. अवघ्या ७० मीटर जागेचे भूसंपादन तत्काळ झाल्यास गोविंदनगरकडून येणारी वाहतूक एबीबी सर्कलपर्यंत सहजतेने जाऊ शकते. यामुळे मायको सर्कलवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होईल. याबरोबर, वडाळा गावातील अतिक्रमणामुळे साधारण एक किलोमीटर अंतराचे काम खोळंबले आहे. हा रस्ता रुंद झाल्यास मुंबईकडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या जडवाहतूकीला सोपा पर्याय मिळेल. यामुळे द्वारकेवरील वाहतुकीचा अतिरिक्त ताण कमी होऊ शकतो. याबरोबर, हिरावाडी परिसरातील गुंजाळ मळा येथील काम देखील भूसंपादनाअभावी रखडले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास पेठ तसेच दिडोंरीरोडवरील वाहतूक थेट मुंबई आग्रा हायवे पुढे तपोवन आणि नंतर नाशिक पुणे हायवेपर्यंत येऊ शकते. भूसंपादनाच्या कामासाठी काही रक्कम भरण्यात आली असून सिंहस्थापर्यंत या रस्त्यांचे काम पूर्ण होण्याची शक्यता महापालिकेतील सूत्रांनी व्यक्त केली.

बाह्य रिंगरोडही सुरू

बाह्य रिंगरोडमध्ये बारदाण फाटा-पपयानर्सरी, गरवारे पाँईट-पाथर्डी फाटा, वडनेरगेट, विहीतगाव, देवळाली गाव, बिटको पाँईट, जेलरोड, नांदूर नाका ते जत्रा हॉटेल या २० किलोमीटर रस्त्याचा समावेश आहे. यातील ९. २ किलोमीटर रस्ता ३० मीटर तर उर्वरित ११ किलोमीटर रस्ता १३ मीटर रुंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२६ किलो सोने लुटले!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। नाशिक

झी गोल्ड कंपनीचे २६ किलो सोने शुद्धीकरणासाठी शिरपूर येथे वाहनातून नेत असताना दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून ते लुटले. मुंबई - आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे गावाजवळ आज, शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. बाजारभावानुसार लुटलेल्या सोन्याची किंमत अंदाजे १६.५ कोटी आहे.

झी गोल्ड कंपनीचे सोने शुद्धीकरणासाठी वाहनातून नेण्यात येत होते. मुंबई - आग्रा महामार्गावर शुक्रवारी पहाटे वाडीवऱ्हे गावच्या हद्दीत दरोडेखोरांनी वाहनचालकाला शस्त्राचा धाक दाखवला आणि वाहनातील तब्बल २६ किलो म्हणजेच अंदाजे १६.५ कोटींचे सोने लुटून पोबारा केला. या दरोड्याच्या घटनेने नाशिकसह जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने ठिकठिकाणी नाकाबंदी केली. वाहनचालकाची चौकशी केली आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून तपास सुरू आहे. या वाहनाला सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे तपासासाठी त्याच्या फुटेजचाही आधार घेण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून हवा संवाद

$
0
0



पारंपरिक पध्दतीच्या नाकाबंदीला मुठमाती देऊन नवीन पोलिस आयुक्तांनी 'पायी पॅट्रोलिंग' ही संकल्पना समोर आणली. यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी शहरभर पोलिसांचे अस्तित्व दिसून आले. यातून गुन्हेगारांवर वचक बसतो आहे. मात्र, आता पोलिस आणि नागरिकांचा चांगला संवाद होणे अपेक्षित आहे. हा संवाद कायम झाल्यास निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल.

धार्मिक व शांत शहर अशी नाशिकची ओळख आता नामशेष होत आहे. पोलिस व नागरिकांमधील संवादाची दरी हळुहळू वाढते आहे. गुन्हे घडणे, ते दाखल करून त्याचा तपास करणे एवढ्या वर्तुळाबाहेर पडून पोलिस हे आपलेच आहे असे नागरिकांना वाटणे महत्त्वाचे ठरते. यासाठी संवादचा प्रभावी वापर करण्यात पोलिस दल आतापर्यंत अपयशी ठरले आहे. शहरातील दोन झोनमध्ये (विभाग) एकूण ११ पोलिस स्टेशनचा समावेश आहे. त्यात आणखी तीन ते चार पोलिस स्टेशन लवकरच सुरू होतील. पोलिसांची संख्याही हळूहळू वाढते आहे. नवनवीन पायाभूत सुविधा पोलिसांना उपलब्ध होत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस कर्मचाऱ्यांचा वानवा असला तरी यात नागरिकांचा तरी काय दोष? एकीकडे पोलिस स्टेशनची संख्या वाढत असताना नागरिकांना देण्यात येणाऱ्या वागणुकीचे काय? असाही प्रश्न समोर येतो. कम्युनिटी पोलिसिंग राबवावे की नाही, याबाबत मतभिन्नता असू शकते. मात्र, नागरिकांनाही आपली जबाबदारी झटकता येणार नाही. समाजात तेढ निर्माण झाल्यावर अथवा फेसबुक-व्हॉटसअॅपवरून फिरणाऱ्या वादग्रस्त पोस्टनंतर नागरिकांना एकत्र करून शांततेचे औपचारिक आवाहन करण्यापेक्षा त्यांच्याशी पोलिसांचा कायमचा संवाद वाढणे गरजेचे आहे. टवाळखोरांचा उच्छाद पोलिसांनी मोडून काढल्यास नागरिक त्याचे स्वागत करतील. याउलट पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या मनातील तेढ आणखी मजबूत होते.

ठक्कर बाजार बस स्थानकावर पहाटेच्या सुमारास एका तरुणीची छेड काढून दोघे युवक पसार झाले. पुण्याला जाण्यासाठी ही युवती बस स्टॉपवर थांबली होती. गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पार पडले असले तरी पीडितेला झालेला मानसिक ताण भरून येणारा नाही. याठिकाणी दिवसा व रात्री पोलिसांची गरज आहे. असा कथ्याकुट अनेकदा झाला तरी शहरातील इतर परिसरात असेच चित्र पाहण्यास मिळते. मोहल्ला, महिला, शांतता, दक्षता कमिट्या या केवळ कागदापुरत्या मर्यादित असून काही मोजक्या पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या बैठका नित्यनेमाने सुरू असतात. एखादा बाका प्रसंग घडल्यावर या कमिट्यांच्या सदस्यांची जमावाजमव करून त्यांना वरिष्ठांसमोर उभे करण्याची खेळी पोलिसांकडून खेळली जाते. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीच्या बंदोबस्तापूर्वी एखादा दिवस आधी परिसरातील वरील कमिट्यांच्या सदस्यांना बोलावणे धाडले जाते. पण, हेच नित्यनेमाने सुरू राहिले तर चौक्यांवर येणारे नागरिकांचे मोर्चे थांबू शकतील. किरकोळ कारणांसाठी नागरिक थेट उपायुक्त, सहायक उपायुक्त किंवा थेट आयुक्तांच्या भेटी घेतात. कित्येक घटना प्राथमिक पातळीवर मार्गी लागू शकतात. मात्र, पोलिसांवरील उडालेला विश्वास नागरिकांना वरपर्यंत येण्यास भाग पाडतो. पोलिस किती? यापेक्षा त्यांचा 'प्रेझन्स' आणि कामाची पध्दत महत्त्वाची ठरते. नुकतेच शहर पोलिसांनी 'वॉक पॅट्रोलिंग' ही संकल्पना मांडली असून प्रतिबंधक उपाययोजना आणि संवाद हे या योजनेचे उद्दिष्ट्य आहे. यापूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी देखील मिशन ऑलआऊट, कोम्बिंगसारख्या योजनांमधून नागरिक आणि पोलिसांचा संवाद निर्माण केला. मध्यंतरीच्या काळात सर्व बंद पडले. आता पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी नवीन मार्ग निवडला असून नाकाबंदीला अशंतः मुठमाती देऊन सरप्राईज चेकींगवर भर दिला आहे. विशेष म्हणजे याची सर्व जबाबदारी संबंधित पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकावर टाकली आहे. आता, पोलिस-नागरिक संवादाचा हा सेतू तयार होणार का की नेहमीप्रमाणे पाट्या टाकण्याचे काम होणार हे पोलिस निरीक्षकांच्या निर्णय क्षमतेवर अवलंबून राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४२ मालमत्तांवर लागणार मनपाचे नाव

$
0
0



३९ मालमत्तांचे ५ मे रोजी लिलाव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मूल्य निर्धारण व कर संकलन विभागाने थकबाकी न भरल्यामुळे जप्त केलेल्या ११९ मालमत्तांचे लिलाव प्रक्रिया पूर्ण केली आहे. या ११९ पैकी ७६ मालमत्ताधारकांनी पैसे भरले असून अजूनही ४२ मालमत्ताधारकांनी पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे या ४२ मालमत्तांच्या इतर हक्कात महापालिकेचे नाव लावण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त आर. एम. बहिरम यांनी दिली आहे.

महापालिकेन मालमत्ता कराची थकबाकी न करणाऱ्या थकबाकीदारांची संपत्तीच जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील ७६ मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४८ मालमत्ताधारकांनी पैसे भरून आपल्या मालमत्तांची लिलावातून सोडवणूक करून घेतली; तर २८ मालमत्तांचे लिलाव करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात ४१ जणांचे लिलाव करण्यात आले. त्यात २७ जणांनी पैसे भरले असून अन्य १४ जणांनी पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे लिलावात पैसे न भरणाऱ्या ४२ मालमत्ता धारकांच्या मालमत्तांवर इतर हक्कावर महापालिकेचे नाव लावण्यात येणार आहे. महापालिकेच्या परवानगी शिवाय या मालमत्ता विकता येणार नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुंदीकरणानंतरही वाहतूक कोंडी

$
0
0



पर्यायी डीपी रस्ता करण्याची नागरिकांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अशोकनगर रस्त्याचे रुंदीकरण झाले मात्र वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. यात अशोकनगर रस्त्यावर होत असलेल्या कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने गेल्या २० वर्षांपासून आरक्षित केलेला पर्यायी डीपी रस्ता करण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यास अशोकनगर रस्तावरील ५० टक्के वाहतुकीचा भार कमी होणार असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

सातपूर कॉलनीतील कामगार वस्तीनंतर अशोकनगर भागाचा विकास झपाट्याने झाला आहे. त्यातच अशोकनगर व श्रमिकनगर भागात विश्वासनगर, पवार संकुल, राधाकृष्णनगर, हिंदी विद्यालय कॉलनी, गंगासागर नगर या भागात गेल्या काही वर्षांत नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु, या भागात जाण्यासाठी वाहनचालकांना अशोकनगर भाजीमार्केटकडून जाण्यासाठी केवळ एकमेव रस्ता उपलब्ध आहे. यामुळे अशोकनगर रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत होती. यानंतर महापालिकेने गंगापूररोड बारदान फाटा ते समृद्धनगर रस्त्यांचे रुंदीकरण केले. यात अशोकनगर येथील रस्त्याचेही रुंदीकरण झाले; परंतु रस्त्यावरील वाहतूक कोंडी 'जैसे थे'च आहे. यासाठी महापालिकेने गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून आरक्षित केलेला पर्यायी डीपी रस्ता करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. आरक्षित डीपी रस्त्याचे काम ५० टक्के महापालिकेकडून झाले देखील आहे. परंतु, अशोकनगरच्या सिध्दिविनायक हॉलच्या बाजूलाकडून पवार संकुलपर्यंत महापालिकेने रस्ता बनविल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकेल, असे वाहनचालकांचे मत आहे. यात मात्र स्थानिक नगरसेवकच वाहनचालक व रहिवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप होत आहे.

यासाठी नव्याने सभागृहनेतेपदी विराजमान झालेले सलिम शेख यांच्याकडे डीपी रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सायंकाळी पाच वाजेनंतर अशोकनगर रस्त्यावर सततच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले आहेत. त्यातच रोजच होत असलेल्या किरकोळ अपघातांमुळे कट लागण्यावरून भांडणे होत असतात. यासाठी महापालिकेने डीपी रस्ता लवकरात लवकर उभारण्याची मागणी अशोकनगर भागातील रहिवाशी करत आहेत.

महापालिकेने अशोकनगर भागातील वाढती नागरी वस्ती बघता २० वर्षांपूर्वीच डीपी रस्ता आरक्षित केला होता. त्यातच अशोकनगर व श्रमिकनगर भागात अनेक नगरे वसली आहेत. येथील रहिवाशांना वाहने ने-आण करण्यासाठी अशोकनगर येथूनच करावी लागतात. यामुळे अशोकनगर रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. - जितेंद्र हिरे, रहिवाशी, पवार संकुल

अशोकनगरला पर्यायी असलेला डीपी रस्ता करण्यास महापालिका टाळाटाळ करतांना दिसते. रस्ता रुंदीकरण होऊनही अशोकनगर रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. डीपी रस्ता झाल्यास अशोकनगर व श्रमिकनगर भागात वसलेल्या नगरांमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. - राजेंद्र डोमसे, रहिवाशी, श्रमिकनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आवळलेले फास ढिले करतोय’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योग चालविताना केवळ नियम म्हणून घ्याव्या लागणाऱ्या निरुपयोगी परवानग्यांनी उद्योजक बेजार झाले होते. या परवानग्या अन् तपासण्यांचा ससेमिरा मधल्या व्यवस्थेला भ्रष्टाचारासाठीच होत होता. हे चित्र घेऊन आम्ही केंद्राकडे गेलो तेव्हा केंद्राने हे महाराष्ट्र सरकारचेच कर्तृत्व असल्याचे सांगत तुम्हीच काय ते करा, अशा सूचना दिल्या. अन् तेव्हापासून उद्योगास अडसर ठरणाऱ्या क्लिष्ट प्रक्रियेचा आम्ही 'मेक ओव्हर' करीत आहोत, अशी भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मांडली.

उद्योगासाठीच्या परवानग्यांचा डोलारा सांभाळताना उद्योजकांची ‌निम्मी शक्ती खर्च होत होती. नव्या सरकारने या प्रक्रियेत तातडीने बदल करण्याची गरज आम्हाला वाटल्याने त्या प्रक्रियेला सध्या चालना दिली जात आहे. व्यवसाय सुरू करतांना शंभराच्या वर घरात पोहचलेला परवानग्यांचा आकडा घटवून आम्ही २५ वर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब उद्योजकांना प्रोत्साहन देईल, असेही देसाई यांनी नमूद केले.

पूर्वीच्या सरकारने उद्योगांच्या गळ्याभोवती फास आवळण्याचेच धोरण स्वीकारले होते. मात्र, परवानग्यांची ही रचनाच आम्ही बदलत खाबूगिरीची दुकाने बंद केल्याचे देसाई म्हणाले.

भूसंपादन नकोच!

भूसंपादनामधून महाराष्ट्राला वगळा, या आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांच्या सहीने केंद्राकडे गेले आहे. उद्योगांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून भूसंपादन करताना आम्ही कुठलीही सक्ती वा अन्याय करीत नाही. जमिन मालकास बाजारभावाप्रमाणे अधिकाधिक मूल्य देऊनच आम्ही जमिनी मिळविल्या आहेत, असे सांगतनाच भसंपादन महाराष्ट्रात नकोच, अशी भूमिका देसाई यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जर्मनीशी वाढवावे बाँडींग

$
0
0




नाशिकच्या उद्योजकांकडून उद्योगमंत्र्यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जर्मनीमध्ये नुकत्याच झालेल्या हॅनओव्हर एक्झिबीशनमध्ये भारताच्या 'मेक इन इंडिया' टॅग लाईनचा बोलबाला झाला. जर्मनीतील उद्योजकांना विस्तारासाठी हवे असलेले अनुकूल वातावरण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे नाशिकच्या उद्योजकांनी जर्मनीशी बाँडींग वाढवावे, असे आवाहनही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाशिकच्या उद्योजकांना केले.

निमा इंडेक्स २०१५ या प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त देसाई यांनी नाशिकच्या उद्योग वर्तुळाशी संवाद साधला. जर्मनीतील हॅओव्हरच्या भव्य प्रदर्शनापाठोपाठ निमाच्या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आल्याने जर्मनीतील अनुभवांवर आधारित एक सेशन देसाई यांनी शुक्रवारी घेतले.

जर्मनीतील लघुउद्योजक भारतात उद्योग विस्तार करू इच्छितात. त्यांच्या गरजा ओळखा आणि त्यांच्याशी बाँडिंग करून उद्योगात अग्रेसर व्हा, असाही सल्ला देसाई यांन तरुण उद्योजकांना दिला.

स्वत:चे कोडकौतुक!

उद्योगमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चार महिन्यांच्या केलेल्या कामाचा आढावाच देसाई यांनी मांडला. गत सरकारच्या काळात उद्योगांच्या बाबतीत झालेल्या चुकांचे परिक्षालन आपण कसे चालवले आहे, याचे प्रेझेंटेशनच सादर करीत स्वत:च्या हातून पाठ थोपडून घेण्याचा प्रकार उद्योगमंत्र्यांनी केला. नाशिकसाठी पर्मनंट एक्झिबीशन सेंटर आणि भूखंड उपलब्धी सोबतच लागणाऱ्या मूलभूत सुविधांवर मात्र कुठलेही भाष्य त्यांच्याकडून झालेले नाही. स्थानिक स्तरावरील प्रशासनाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असणाऱ्या समस्यांचा पाढा आता उद्योगमंत्र्यांच्या दरबारी वाचण्याची वेळ नाशिकच्या उद्योजकांवर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडातर्फे ७२९ फ्लॅटची लॉटरी

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने नाशिककरांसाठी ७२९ फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यांच्या लॉटरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घरांच्या किमती दहा लाख ते ३७ लाखादरम्यान निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बाजारपेक्षा म्हाडाच्या फ्लॅटची किमत जास्त असल्याने त्यांना प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे.

म्हाडाच्या वतीने शहरात आडगांव, पंचक, पाथर्डी, म्हसरूळ व मखमलाबाद अशा पाच ठिकाणी साईटस बांधण्यात आल्या आहेत. त्यात ७२९ फ्लॅट आहेत. आडगाव येथे सर्वाधिक ३९३ फ्लॅट असून यात अत्यल्प गटासाठी १८०, अल्प उत्पन्न गटासाठी १०६ तर मध्य गटासाठी १०७ फ्लॅट आहेत. एका सदनिकेची किंमत १० लाख ते २४ लाखांपर्यत आहे. पंचक येथे १४० फ्लॅट असून ते सर्व अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. या ठिकाणी एका सदनिकेची किंमत‌ २५ लाख आहे. पाथर्डी फाटा येथे ३४ फ्लॅट असून त्याच्या किंमती ३७ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. म्हसरूळ येथे मध्यम उत्पन्न गटासाठी ५४ फ्लॅट असून त्यांच्या किंमती १९ ते २६ लाखापर्यंत आहेत. मखमलाबाद येथे मध्यम उत्पन्न गटासाठी १०६ फ्लॅट असून त्यांच्या किमती २६ लाख ४८ हजारापर्यंत आहे. येत्या २९ किंवा ३० एप्रिल रोजी या घरांची जाहिरात काढली जाणार असून दीड महिन्यात लॉटरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

वायकरांनी केली पाहणी

म्हाडाच्या घरांच्या चढ्या किमतीची तक्रार आल्यानंतर वायकर यांनी आपली बैठक आटोपल्यानंतर म्हाडाच्या पाथर्डी फाट्यावरील फ्लॅटची पाहणी केली. म्हाडाच्या वसाहतीच्या आजूबाजू्च्या भागातही त्यांनी चौकशी करून तिथल्या सदनिकांच्या किमंती त्यांनी विचारल्यात. त्यांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत चौकशीत तथ्य आढळून आल्याने म्हाडाच्या किमती घोटाळ्यात अनेक जण अडकण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थाची कामे वेळेत पूर्ण करा

$
0
0



नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सोबतच रामकुंडाचा परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी एजन्सीला काम देण्यात येणार असल्याचे सांगून नाशिकची गुन्हेगारी लागलीच कमी होणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मे पर्यंत कामे झाली नाही तर जास्तीत जास्त जूनपर्यंत ती पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगीतले. सोबतच मुख्य शाहिस्नानाचे स्थान असलेल्या रामकुंडाची स्वच्छतेची स्वतंत्र निविदा काढण्यात येणार असून एका एजन्सीलाच स्वच्छतेचे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे हा परिसर सिंहस्थापूर्वीच स्वच्छ होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासोबत नाशिकच्या गुन्हेगारी संदर्भात त्यांनी आयुक्तांची पाठराखण केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images