Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एक चक्र अन् चार कुंभपर्व

0
0


कुठल्याही प्रभावी संवाद यंत्रणेशिवाय करोडोंचा जनसमुदाय कसा एकत्रित होऊ शकतो ? त्यासाठी किती खर्च येऊ शकतो? अशा आशयाचा सवाल एका इंग्रज अधिकाऱ्याने पं. मदनमोहन मालवीयांना विचारला होता. पंचांग नावाच्या पुस्तकातील केवळ एका मुहूर्ताच्या नोंदीवरून कुंभमेळ्यात ही जनशक्ती एकवटली जात असल्याचा संदर्भ त्यांना दिला त्यावेळी अधिकारी अवाक् झाले होते.. असा एक किस्सा आहे ! या कुंभचक्राचे चार पर्व आहेत. चार कुंभाच्या आयोजनानंतर एक चक्र पूर्ण होत असल्याची भाविकांमध्ये श्रध्दा आहे. याच विषयावर एक नजर :

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या जीवनध्येयांचा विचार भारतीय तत्वज्ञानाने मानवी जीवनाला दिला. याच उद्दिष्टांपैकी धर्माच्या माध्यमातून जाणारा आणि मोक्ष तथा पूर्णत्वाच्या प्रक्रियेकडे नेणारा महासोहळा म्हणून कुंभमेळ्याच्या स्थान भारतात प्राचीन काळापासून आजवर अबाधित आहे. या कुंभाची पताका पिढ्यान् पिढ्या, युगानुयुगे खांद्यावर फडकविणाऱ्या साधू समुदायाच्या रचनेला आखाड्यांनी आश्रय दिला. या आखाड्यांचा कुंभमेळ्यातील सहभाग हा अविभाज्य घटक आहे. किंबहुना आखाड्यांच्या सहभागाशिवाय या महासोहळ्याला अर्थ नाही. दहा शैव पंथीय तर तीन वैष्णव पंथीय आखाड्यांच्या माध्यमातून लाखो साधूंचा समुदाय या सोहळ्यात यंदाही सहभागी होणार आहे. यातील शैव आखाड्यांना पूज्य शंकराचार्यांपासून सुमारे २२०० वर्षांची परंपरा असल्याचे मानले जाते. तर वैष्णव पंथीय आखाड्यांची सुमारे ६०० वर्षांची परंपरा मानली जाते.

कुंभपर्वाला हरिव्दारपासून सुरुवात होत असल्याचा उल्लेख नारद पुराण, शिवपुराण अन् ब्रह्मपुराणासारख्या संदर्भांमध्ये आहे. तर हरिव्दार पाठोपाठ प्रयाग, नाशिक-त्र्यंबकेश्वर, उज्जैन या प्रमाणे हे चक्र पूर्ण होत असल्याचे मानले जाते. या प्रत्येक क्षेत्री दर बारा वर्षांच्या कालखंडाने कुंभमेळा आयोजित केला जातो. हरिव्दार व प्रयाग येथे दर सहा वर्षांनी 'अर्ध कुंभ' साजरा होतो.

दक्षिणकाशी नाशिक

बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक स्थान. सह्याद्री पर्वतरांगांमधील ब्रह्मगिरी टेकड्यांच्या पायथ्याशी नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर वसलेले हे क्षेत्र. ब्रह्मगिरीच्या टेकड्यांवर गोदावरीचा उगम आहे. यामुळे शैव पंथियांच्या दृष्टीने कुंभासाठी त्र्यंबकेश्वरला तर प्रभू रामचंद्र तथा भगवान विष्णूंच्या अवतरांच्या निवासामुळे पावन झालेल्या नाशिक नगरीला वैष्णव पंथियांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. गुरूचा सिंह राशीतील प्रवेश अन् सूर्य व चंद्राचा कर्क राशीतील प्रवेशाच्या तिथीस नाशिक व त्र्यंबकेश्वरी होणाऱ्या महाकुंभास महत्त्व आहे.

अवंतिका तथा उज्जैन

मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेल्या अवंतिकापुरी तथा आजच्या उज्जैनलाही कुंभाच्या दृष्टीने महत्व आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगामुळे हे स्थानही अत्यंत पवित्र मानले जाते. गुरू सूर्य राशीमध्ये व चंद्र आणि सूर्य मेष राशीत असतांना उज्जैन येथे कुंभमेळा आयोजित केला जातो.

प्रयागचा कुंभमेळा

गुरू ग्रह ज्यावेळी वृषभ राशीत व सूर्य आणि चंद्राचा मकर राशीत प्रवेश होतो त्यावेळी प्रयाग क्षेत्री कुंभाचे आयोजन केले जाते. या क्षेत्री गंगा, यमुना व अदृश्य सरस्वतीच्या संगमावर कुंभमेळा पार पडतो. साधू अन् भाविकांची संख्या लक्षात घेता प्रयागमध्ये सर्वात मोठा कुंभमेळा आयोजित केला जातो.

हरिव्दार

हिंदू धर्मियांच्या दृष्टीने पवित्र असणारे हरिव्दार हे आणखी एक स्थान. या ही क्षेत्री कुंभाचे बारा वर्षांनी आयोजन होते. आता सन् २०२२ मध्ये होणारा कुंभ हा हरिव्दारला होणार आहे. हिमालयाच्या रांगांमध्ये शिवालीक टेकड्यांच्या पायथ्याशी उत्तराखंड राज्यात हे क्षेत्र आहे. 'मोक्षव्दार' म्हणूनही हे क्षेत्र भाविकांमध्ये सुपरिचित आहे. गुरूचा कुंभराशीतील प्रवेश, सूर्य व चंद्राचा अनुक्रमे मेष व धनू राशितील प्रवेश झाल्यानंतर हरिव्दार येथे कुंभमेळा आयोजित होतो.दीर्घकालाने हाती येणारी पर्वणी साधण्यासाठी कुंभाच्या कालावधीत करोडो पावलांचे ध्येयही केवळ एकच असते. ते म्हणजे पर्वणीचे स्नान.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हंडाभर पाण्यासाठी पायपीट

0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्याच्या पश्चिमभागातील आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी सुमारे दोन ते तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. एप्रिल महिन्यातच अशी स्थिती असून मे महिन्यात मोठ्या प्रमाणात या परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. सध्या तालुक्यात चार पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू असून, तिसऱ्या टप्प्यात सहा टँकर सुरू करण्यात येणार आहेत. एकूण दहा टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

बागलाण तालुक्यातील १७९ गावांपैकी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची स्थिती जेमतेम असली तरीही आदिवासी भागातील पश्चिम पट्ट्यासह मोसम खोरे, काटवन परिसरात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील रातीर, रामतीर, खिरमाणी, भाक्षी, कऱ्हे, मुळाणे, या गांवाना चार टँकर सुरू आहेत. गत दोन महिन्याच्या काळात अवकाळी पावसाच्या हजेरीने थोड्याशा प्रमाणात पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले असले तरीही आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून या म्हणीनुसार आदिवासी भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

तालुक्यातील भवाडे येथे काही वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी आठ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी काही टक्केच रक्कम विकासावर खर्च झाली असून, विहिरीचे काम अपूर्ण ठेवल्याने कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. साल्हेर, मुल्हेर, गोळवाड, वाघंबा, पिसोळ, भाटांबे परिसरात महिलांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या दोघा धरणातील जलसाठा संपुष्टात आला असून, या दोन्ही धरणातील दोन आवर्तने शेती व पिण्यासाठी देण्यात आले आहेत. गत पंधरवाड्यातच चणकापूरचे एक आर्वतन दिल्याने सटाणा शहरात एक दिवसाआड पिण्याच्या पाणी मिळू लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा नदीपात्रात देखील थोडेच पाणी शिल्लक असल्याने सटाणा शहरात येत्या आठवड्याभरात दोन ते तीन दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हरणबारी धरणामुळे मोसम खोऱ्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत नसली तरीही नामपूरसह काटवन परिसरात अनेक गावांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तळवाडे, देवळाणे, सुराणे, अजमीर सौंदणे या ठिकाणी तर नेहमीचीच पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असल्याने मोठ्या प्रमाणात टँकरची ओरड होऊ लागली आहे. एका टँकरद्वारे या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे.

एप्रिल महिन्याअखेर अथवा मे महिन्याच्या प्रारंभीच सुमारे सहा टँकर वाढविण्यात येणार असून, यावेळी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांतून मागणी झाल्यास टँकर तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान, पाणीटंचाई कृती आराखडा योजनेनुसार तालुक्यातील विंधन विहीर, विहीर अधिग्रहण आदी बाबींना प्राधान्य देण्यात येणार असून, चार अधिक सहा अशी दहा ठिकाणी पिण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. - अश्विनीकुमार पोतदार, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या प्रसादची सतार लंडनमध्ये गुंजणार

0
0

फणिंद्र मंडलिक

नाशिककर असलेल्या प्रसिध्द सतारवादक प्रसाद रहाणे याला लंडनच्या पॅलेडियम थिएटरमध्ये सतार वाजवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून, १ मे ते २८ जून या कालावधीत तो आपली कला तेथे सादर करणार आहे. भारतातल्या काही मोजक्याच वादकांना अशी संधी यापूर्वी मिळाली आहे. लंडनच्या या थिएटरमध्ये सतार वाजवणारा महाराष्ट्रातला तो पहिलाच सतार वादक असेल.

लंडन येथील वेस्टिन येथे पॅलेडियम नावाचे थिएटर आहे. तेथे १ मे ते २८ जून या कालावधीत 'बियॉण्‍ड बॉलिवूड' हा भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारताच्या विविध राज्यातील संस्कृतींचा नृत्य, नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून परिचय करून देण्यात येणार आहे. या थिएटरमध्ये हा कार्यक्रम सुमारे दीड महिना चालणार असून, ५६ पेक्षा अधिक प्रयोग सादर होणार आहेत. यात शास्त्रीय व उपशास्त्रीय वादनाबरोबरच नाटकांनाही प्रसाद लाईव्ह संगीत देणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिध्द संगीतकार सलिम सुलेमान यांचे संगीत लाभले आहे.

प्रसाद रहाणे याने सतारचे शिक्षण गुरू कमलाकर जोशी, उध्दव अष्टुरकर यांच्याकडे घेतले असून, सध्या तो मुंबई येथील पंडित रवींद्र चारी यांच्याकडे गुरुकुल पध्दतीने उच्च शिक्षण घेत आहे. सतारी बरोबरच त्याने तबल्यात देखील प्राविण्य मिळवले असून, प्राथमिक शिक्षण नितीन पवार यांच्याकडे तर उच्च शिक्षण तालयोगी पंडित सुरेश दादा तळवलकर यांच्याकडे घेत आहे.

प्रसादने भारतात अनेक दिग्गजांना सतारीची साथ केली असून त्यात हरिहरन, पंडित सुरेशदादा तळवलकर, पंडित शौनक अभिषेकी, रामदास पळसुले, सावनी शेंडे, सुरेश वाडकर नृत्यगुरू शमा भाटे, राजेंद्र गंगाणी इत्यादींचा समावेश आहे.

माझ्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन त्याच्यासह नाशिकमधील वादकांना जाते. इथपर्यंत येण्यासाठी अनेकांनी मला मदत केली. या सर्वांचा मी ऋणी आहे. - प्रसाद रहाणे, सतारवादक

वादन कलेतच उच्च विद्याविभूषित

वयाच्या दहाव्या वर्षी प्रसादने तबला वादनाला सुरुवात केली. तबल्याचे शिक्षण सुरू असताना त्याला सतारचीही गोडी लागली. परंतु, वय लहान असल्याने वाजवण्यास हात कमी पडतील म्हणून गुरू कमलाकर जोशी यांनी त्याला थोड मोठं झाल्यावर सतार शिकण्याचा सल्ला दिला. प्रसादने दहावी पास झाल्यानंतर लगेचच त्यांच्याकडे सतारचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. उच्च शिक्षण प्राप्त केले. प्रसादने याच क्षेत्रात शिक्षण घेतले असून वादनात एम. ए. केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य पुरस्कारांवर नाशि‌कची मोहोर

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील नऊ तहसीलदारांसह एकूण १६ जणांच्या निलंबनाच्या घोषणेमुळे नाशिकचा महसूल विभागावर बदनामीचा डाग लागला. मात्र, येथील नाशकात कार्यरत चार कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे पुरस्कार पटकावित सरकारदरबारी नाशिकची मोहोर उमटविली आहे. त्यामुळे नाशिकच्या महसूल विभागावरील बदनामीचा डाग पुसण्यास मोठी मदत झाली आहे.

क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुंबईत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या सोहळ्यात नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्यासह उपजिल्हाधिकारी उदय किसवे, तसेच तहसीलदार बबन काकडे यांना सन्मानित करण्यात आले. नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून आयोजिलेल्या या सोहळ्यावर नाशिकचा दबदबा राहिला.

सह्यादी अतिथीगृह येथे नुकताच हा कार्यक्रम झाला. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना व मुख्य पोस्ट मास्टर जनरल अशोककुमार दास हे उपस्थित होते. सुरगाणा येथील रेशन धान्य घोटाळ्यामूळे नाशिकचा महसूल विभाग बदनाम झाला. अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी जिल्ह्यातील ९ तहसीलदारांसह तब्बल १६ जणांच्या निलंबनाची विधीमंडळात घोषणा केली. त्यामुळे राज्यात नाशिकच्या महसूल विभागाची प्रतिमा डागाळली. मात्र, येथील चार विद्यमान अधिकारी राज्य सरकारच्या सन्मानास पात्र ठरल्याने नाशि‌ककरांची मान पुन्हा अभिमानाने उंचावली आहे. याखेरीज नाशिकमध्ये यापूर्वी अपर जिल्हाधिकारीपद भूषविणारे व आता नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले राधाकृष्ण गमे, नाशिक जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजितकुमार यांनी नाशिकमध्ये कामाचा ठसा उमटविल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे.

चांगल्या कामाची दखल

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना डॉ. गेडाम यांनी ई गव्हर्नन्सवर अधिक भर दिला. वाळू तस्करी विरोधात नियोजनबद्ध मोहीम आखून वाळू तस्कारांविरोधात राज्यात विक्रमी ५०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले. संगणकीय पद्धतीचा वापर, घाटावर एकच दरवाजा यांसारखे त्यांनी सूचविलेले उपाय देशपातळीवर राबविण्याबाबतही चर्चा झाली. पालवे यांनी प्रशासकीय कामकाज प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने पार पाडली. किसवे यांनी मालेगाव उपविभागीय अधिकारी असताना महाराष्ट्र शेती महामंडळाच्या रावळगाव येथील जमिनीचे माजी खंडकरी व त्यांच्या वारसांना वाटप करणे, महात्मा फुले जल व भूमी संधारण अंतर्गत विविध तलावातील लोकसहभागाने गाळ काढणे आदी उपक्रम यशस्वीपणे राबविले. तहसीलदार काकडे यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे असताना सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींसाठी ७५ टक्के मतदान

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ५०२ ग्रामपंचायतींसाठी राबविण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रिया वादावादी आणि हाणामारीचे काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. उन्हाच्या तडाख्याला न जुमानता ग्रामस्थ मतदानासाठी उत्साहाने घराबाहेर पडले. जिल्ह्यात सरासरी ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. २३) दुपारी तीनपर्यंत सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली असली तरी मतदान केंद्रांवर सकाळी आठनंतर मतदारांचा ओघ वाढू लागला. विशेष म्हणजे उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाही मतदारांचा उत्साह तूसभरही कमी नव्हता. तरुणांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली. जिल्ह्यात काही केंद्रांवर इव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे प्रकार घडले. परंतु, असे नादुरूस्त मशिन तातडीने बदलण्यात आले. मतदानावेळी येवला तालुक्यातील काही गावांमध्ये उमेद्वारांच्या समर्थकांमध्ये हाणामारीचे प्रकार घडले. परंतु, पोलिसांनी तातडीन हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई केली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्हाभरात ६१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदारांचा ओघ वाढला. त्यामुळे मतदानाची वेळ संपेपर्यंत सरासरी ७५ ते ८० टक्के मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरातील मतदान प्रक्रियेची मा‌हिती संकलित करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरू होते. प्राप्त आकडेवारीनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वाधिक ८८.२० टक्के तर नाशिक तालुक्यात सर्वात कमी ६५.०४ टक्के मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंक योजनांना हिरवा कंदील

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकसाठी दमणगंगा-एकदरे लिंक तर सिन्नरसाठी वैतरणा-कडवा-देव नदी लिंक योजनेला राज्य सरकारने हिरवा कंदिल दिला आहे. या योजनांमधून शिर्डी व सिन्नरमधील पंचतारांकित वसाहतीला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असला तरी आतापर्यंत दुष्काळग्रस्त शिक्का बसलेल्या सिन्नर तालुक्याला विशेष लाभ होणार आहे.

३३ टीएमसीची धरणे असलेल्या इगतपुरीशेजारी असूनही सिन्नर तालुका कायम दुष्काळी आहे. गारगाई-वैतरणा-कडवा-देव नदीजोड प्रकल्पात वैतरणाची उपनदी गारगाईच्या नाल्यावर चार धरणे बांधून साडेचार टीएमसी पाणी उचलून वैतरणा धरणात टाकले जाईल. तेथून थेट पाईपलाईनने कडवा धरणात व तेथून उचलून सोनांबेच्या देव नदीच्या उगमात आणले जाईल. सोनांबेच्या धरणातून दीड टीएमसी पाणी देव नदीत सोडले जाईल. उर्वरित पाणी तेथून कालवा काढून डुबेरे, रामोशीवाडी, दापूर, दोडी, नांदूरशिंगोटेमार्गे भोजापूर कालव्यात सोडण्यात येईल. भोजापूर धरण व म्हाळुंगी नदीतही पाणी सोडण्याचा प्रस्ताव आहे. देव नदीच्या प्रत्येक उपनाल्यास पाणी सोडून सर्व पाझर तलाव भरले जातील. तेथून भोजापूर कालवा थेट पाइपलाइनद्वारे दोडी, नांदुरशिंगोटे, निमोण, तळेगाव, रांजणगाव, मिरपूर, निर्मलपिंप्री, कोऱ्हाळे, काकडी शिवारात वाढविण्यात येईल. शिर्डी व पंचतारांकित औद्योगिक वसाहतीस थेट पाइपने पाणी पुरवण्याचा प्रस्ताव आहे.

'जलचिंतन'चे सहकार्य

खासदार गोडसे यांनी जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या समवेत दिल्लीतील राष्ट्रीय जलविकस अभिकरणाच्या कार्यालयाला भेट दिली. गोडसे यांनी अभिकरणास पत्र देऊन सिन्नरसाठी वरील प्रकल्प अहवाल तयार करण्याची विनंती केली. त्याला अभिकरणाने प्रतिसाद देत राज्य सरकारला पत्र पाठवले. राज्याच्या जलसंपदा विभागाकडे गोडसे यांनी दोन महिने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले.

नाशिक व सिन्नरसाठी क्रांतीकारी असलेल्या या दोन्ही जोड प्रकल्पांचे अहवाल तयार करण्याची शिफारस जलसंपदा विभागाने केंद्र सरकारला केली आहे. अहवाल व अंदाजपत्रक करून ही योजना केंद्रामार्फत राबवली जाईल. त्यासाठी जलचिंतन संस्था तांत्रिक सहकार्य देणार आहे. - हेमंत गोडसे, खासदार

नाशिकसाठी दमणगंगा-एकदरे जोड योजनेलाही सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पहिल्या टप्प्यात दमणगंगा नदीवर एकदरे गावाजवळ पाच टीएमसीचे धरण बांधून त्यातील पाणी दोनशे मीटर उचलून कश्यपी धरणात आणून पाइपलाइनने पिण्यास व उद्योस पुरवले जाईल. दुसऱ्याल टप्प्यात भूगड धरणाचे पाणी उचलून एकदरे धरणात टाकले जाईल. त्यामुळे गंगापूर धरणाच्या साठ्याइतके पाणी नाशिकला मिळेल. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल करण्याचे पत्र राज्याने १२ मार्चला केंद्राला पाठविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते गायब

0
0


म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अशोकनगर भागातील मौले संकुलमधील डांबरी रस्तेच गायब झाले आहेत. त्यातच जाधव संकुलमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाचे काम अर्धवट स्थितीत आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आता रहिवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

महापालिकेतील सातपूर भागात रस्त्यांबाबत अनेकांच्या तक्रारी नगरसेवकांकडे आहेत. यामध्ये अशोकनगर भागातील मौले संकुल व जाधव संकुल येथील रस्त्यांची मागणी सातत्याने रहिवाशांकडून होत आहे. मौले संकुलमधील रस्ते ड्रेनेजची लाईन टाकण्यासाठी तीन वर्षांपासून खोदण्यात आले होते. ड्रेनेजची कामे झाली मात्र, रस्त्यांची कामेच करण्यात आली नाही. त्यामुळे रहिवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच अवकाळी पावसाने खोदलेल्या रस्त्यांवरून वाहने चालवितांना किंवा पायी चालतांना रहिवाशांना मोठी कसरतच करावी लागत आहे. जाधव संकुलमध्ये देखील महापालिकेकडून दोन वर्षांपासून अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाचे काम जोमाने सुरू होते. परंतु, यात मारुती मंदिराच्या परिसरातील काँक्रिटीकरणाचे काम महापालीकेच्या ठेकेदाराकडून अर्धवट सोडण्यात आले आहे. याबाबत रहिवाशांनी महापालिका व स्थानिक नगरसेवक यांच्याकडे अनेकदा तक्रारी करून देखील दखल घेतली गेली नाही. यासाठी महापालिकेने मौले संकुल व जाधव संकुलमधील रस्त्यांची कामे लवकर सुरू केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी जाधव संकुल भागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेने सुरू केले होते. परंतु, यात काही रस्ते, तर अर्धवटच ठेवले आहेत, त्यात काही ठिकाणी पावसाळी गटारीचे चेंबरच बुजविल्याचे रहिवाशी सांगतात. यात जाधव संकुलमध्ये राहत असलेले कुमकर यांच्या घराशेजारील पावसाळी चेंबर बुजविल्याने अनेकदा पाणी रस्त्यावर साचत असल्याचे कुमकार यांनी मटाशी बोलतांना सांगितले. याबाबत महापालिका व स्थानिक नगरसेवक यांच्याकडे मागणी करून देखील बुजविलेले चेंबर मोकळे करण्यात आले नसल्याचेही कुमकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांवर उतारा

0
0


प्रवीण बिडवे
काही महिन्यांपूर्वी त्रिमूर्ती चौकातील पाटीलनगर कॉर्नरजवळ एक विचित्र अपघात झाला होता. ट्रकने फरफटत नेल्याने बाईकस्वारसह दोघांनी जीव गमावला. सिडकोवासीय अजूनही ही घटना विसरू शकलेले नाहीत. त्रिमूर्ती चौकात सातत्याने होणाऱ्या अशा छोट्या मोठ्या अपघातांमुळे ही घटना आठवली. वाहनचालकांचा बेशिस्तपणा आणि प्रशासनाची उदासिनता अजून किती बळी घेणार हा खरा प्रश्न आहे. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि येथील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी येथे सिग्नल यंत्रणा बसविली जाणार आहे. नवीन नाशिकमधील हा पहिला सिग्नल ठरेल.

सिडकोतील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. रोजगाराच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांची ही वसाहत आहे. लोकसंख्येबरोबर वाहनसंख्यावाढीचा वेगही मोठा असला तरी रस्ते मात्र अरुंदच आहेत. त्यामुळे वाहतूक प्रश्न सर्वांचीच डोकेदुखी ठरू लागला आहे. त्रिमूर्ती चौक याचे बोलके उदाहरण आहे. पाटीलनगरच्या कॉर्नरवरून रस्ता ओलांडणे हे मोठे दिव्य ठरू लागले आहे. तीच परिस्थिती त्रिमूर्तीतील मुख्य चौक आणि पुढे दत्तमंदिर चौकातील देखील आहे. अंबड औद्योगिक वसाहतीपासून कामटवाडे, उपेंद्रनगर, उत्तमनगर, पवननगर, सावतानगर इतकेच नव्हे तर जुन्या सिडकोतून होणारी बरीचशी वाहतूक त्रिमूर्ती चौक मार्गे होत असते. कामगार तसेच अन्य घटकांनाही सातपूरला जाण्यासाठी त्रिमूर्ती चौक हाच जसा मुख्य मार्ग आहे तसेच अंबड एमआयडीसी, कामटवाडे, सिटी सेंटर मॉल आणि दिव्या अडलॅब सारख्याठिकाणी जाण्यासाठीही त्रिमूर्ती चौक हाच मुख्य मार्ग आहे. त्यामुळे साहजिकच या परिसरातून वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीचे प्रश्नही फेर धरू लागले आहेत. या चौकालगत व्यावसा‌यिकांनी दुकाने थाटली असून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केली आहेत. परिणामी आधीच अरुंद असलेला हा रस्ता अधिक अरुंद ठरू लागला आहे. त्यातून वाहतुकीशी संबंधीत समस्या भेडसावत असल्या तरी त्याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही.

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यास सुरुवात केली तेव्हापासून या परिसरातील व्यावसायिकांचे धाबेही दणाणले. अनेकांनी दुकानांबाहेर केलेले पत्र्याचे शेड काढून घेतले. मात्र, अजूनही अनेकांनी अतिक्रमणे हटविलेली नाहीत. महापा‌लिकेचे पथक आले की मग बघू अशी व्यावसायिकांची मानसिकता येथील अन्य समस्यांच्या वृध्दीलाही कारणीभूत ठरू लागली आहे. येथे बहुतांश व्यावसायिकांना गाळे मिळाले. त्यांनी रस्त्यावर दुकाने थाटू नयेत हा त्यामागचा उद्देश होता. मात्र तरी काहींनी हे गाळे भाडेतत्वावर देऊन स्वत:ची दुकाने रस्त्यालगत थाटणे सुरूच ठेवले आहे. निम्म्याहून अधिक रस्ता अशा व्यावसायिकांकडून व्यापला जात असल्याने वाहतूक समस्येत भर पडली आहे. सिडकोतील लोकप्रतिनिधींचा आशिर्वाद आणि महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा कानाडोळा या सर्व समस्यांना कारणीभूत ठरत आहे.

देरे आये दुरुस्त आये...

त्रिमूर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय प्रशासनाने खूप उशिरा घेतला. तरीही या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. शिवशक्ती चौक, उंटवाडी, उत्तमनगर आणि कामटवाडे या परिसरांतून होणाऱ्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यास या सिग्नल यंत्रणेमुळे मदत होईल. सिग्नल बसविला म्हणजे या परिसरात वाहतूक पोलिसांची नेमणूक होईल. एरवी सिटी सेंटर मॉल ते एबीबी सर्कल रस्त्यावरच ठाण मांडून बसणारे पोलिस सिडकोच्या रस्त्यांवरही दिसू लागले तर वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल. अर्थात केवळ सिग्नल बसविल्याने येथील वाहतुकीचा प्रश्न सुटेल, असे मानण्याचे कारण नाही. रस्त्यालगत व्यवसाय थाटून बसणाऱ्यांची पर्यायी व्यवस्था करावी लागेल. कारण येथील अतिक्रमणे काढली नाहीत तर हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंदच ठरेल. सिग्नलमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतील. विशेषत: सायंकाळी चार ते सातच्या दरम्यान ही समस्या अधिक प्रकर्षाने भेडसावते. म्हणूनच सिग्नल बरोबरच रस्ता मोकळा करण्याचे आव्हानही प्रशासनाला पेलावे लागणार आहे. तरच ही समस्या निकाली निघू शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंभमेळ्यासाठी ‘आयएमए’ सज्ज

0
0


कुंभमेळाकाळात प्रत्येक हॉस्प‌िटलमध्ये दहा टक्के बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत. संघटनेच्या विकासाबरोबरच रुग्णांचे हित व कुंभमेळ्यात चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा विश्वास आयएमएचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. मनोज चोपडा यांनी व्यक्त केला.

आयएमए' संघटने पुढील आव्हाने ?

नाशिक आयएमए संघटनेचा अध्यक्ष म्हणून संघटनेच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे कर्तव्यच आहे. मात्र आपली संघटना सशक्त होण्यासाठी संघटनेच्या आजीव सदस्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. संघटनेच्या राज्य समित्यांवर प्रतिनिधित्व मिळावे यासाठी हे करणे गरजेचे आहे. हॉस्प‌िटल रजिस्ट्रेशनचा प्रश्न सोडविणे, नव्याने येणाऱ्या क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट तसेच वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन नामांकने मिळवून व्यवसायातील दर्जा सिद्ध करण्याचेही डॉक्टरांसमोर आव्हान आहे. यासाठी सपोर्ट सिस्ट‌िम व थिंक टँक म्हणूनही आयएमए भूमिका पार पाडणार आहे. महाराष्ट्र टीबी सॅनेटोरियमच्या इमारतीचे नव्याने बांधकाम होण्याची गरज आहे.

वैद्यकीय क्षेत्रापुढील आव्हाने ?

पिळवणूक करणारे डॉक्टर अशी वाईट प्रतिमा समाजात निर्माण होत आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी काय करता येईल. यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय क्षेत्र महागडे होत आहे. त्यामुळेही रूग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संबंध ताणले जात आहेत. त्यामुळे मेडिक्लेमबद्दल जनजागृती गरजेची आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्राचे दर नियंत्र‌ित ठेवण्यासाठी मेडिकल इंडस्ट्री देशात निर्माण होण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टी परदेशातून मागवावी लागत असेल तर उपचाराचा खर्च वाढणारच. तीच साधने देशात तयार झाली तर वैद्यकीय सेवा आवाक्यात येतील. त्यादृष्टीने आरोग्य विद्यापीठाच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय सेवेच्या दरपत्रकाबाबतही हॉस्प‌‌िटलच्या दर्जानुसार विचार व्हायला हवा. तसेच सोनोग्राफीच्या मुद्यावरून सुरू असलेल्या संघर्षावर सरकारने विचार करायला हवा.

कुंभमेळ्यात आयएमएची भूम‌िका काय असणार ?

कुंभमेळ्यात शहरात संसर्गजन्य साथींचे आजार फोफावतात. त्यामुळे नाशिककर व शहराबाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी शहरातील वैद्यकीय संघटना, मेडिकल कॉलेज, आरोग्य विद्यापीठाच्या मदतीने आयएमए संघटना सक्रीय सहभाग घेणार आहे. कुंभमेळ्यात शहरातील दहा पाईंटवर मेडिकल कॅम्प उभे केले जाणार असून, यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरविणे व चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने आयएमए प्रयत्नशील असणार आहे. शहरातील प्रत्येक हॉस्प‌िटलमध्ये १० टक्के बेड कुंभमेळ्यातील काळात राखीव ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय आयएमएतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती व कॅम्प या काळात घेतले जाणार आहेत.

अध्यक्ष म्हणून वर्षभरात काय करावेसे वाटते?

आयएमएच्या प्रतिनिधींना सरकारच्या कमिट्यांवर जाता यावे यासाठी प्रयत्न करणार असून, नाशिक शहर मेडिकल हब होण्याच्या दृष्टीने पूरक सोयीसुविधा व उपक्रम कसे राबविले जातील यावरही भर दिला जाणार आहे. वैद्यकीय सेवा देतानाही आता दर्जा आणि नामांकनाचा विचार होऊ लागल्याने याबाबत डॉक्टरांना अद्ययावत ज्ञान उपलब्ध करून देणे, डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत तसेच रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नाते अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी उपक्रम राबविणे व आयएमए संघटनेला अधिकाधिक लोकाभिमुख कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे.

(शब्दांकन : रमेश पडवळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायत निवडणुका शांततेत

0
0


टीम मटा

जिल्ह्यीतील ५०२ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी किरकोळ वादावादीचा अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात यंदा ४८७ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तर १५ ग्रामपंचायतींसाठी पोट निवडणूक घेण्यात आली.

विसापूरला बहिष्कार

येवला तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकाच पॅनलच्या दोन प्रभागातील उमेदवारांचे चिन्ह ईव्हीएम यंत्रावर बदलून आल्याने सुमारे अडीच तास या प्रभागातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने मतदानच बंद पडले होते. राजापूर व नगरसूल गावात मंगळवारी रात्री पॅनलच्या नेत्यांसह समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर मतदानप्रसंगी तणाव होता. मात्र, दुसरीकडे मतदारांचा उत्साह कायम होता. ५४ ग्रामपंचायतीच्या १८७ प्रभागांमधील ४१२ जागांसाठी सकाळी साडेसात वाजेपासून गावोगावी मतदानाला सुरुवात झाली. ९८१ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.

निफाडमध्ये शांततेत मतदान

लासलगाव, ओझर, विंचूर, सायखेडासह निफाड तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. बुधवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती तर, दुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले. तालुक्यात काही ठिकाणचे किरकोळ प्रकार वगळता एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, आता तालुक्याच्या जनतेचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. लासलगावमध्ये एकूण सहा वार्डातील १७ जागांसाठी मतदान ६५ टक्के मतदान झाले आहे. तर ओझरमध्ये ६१.११ टक्के, देवगाव ८४ टक्के मतदान झाले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलिस प्रशासनाने ४०४ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दुपारी चार वाजेपर्यंत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी सांगितले.

मालेगावात ७० टक्के मतदान

मालेगाव तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीसाठी सायंकाळी ५.३० पर्यंत सरासरी ७० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळपर्यंत मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ प्रकार वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यात एकूण २८८ मतदान केंद्रांवर मतदान झाले. यासाठी १ हजार ८०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. आज, गुरुवारी येथील श्रीरामनगर भागातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात मतमोजणी प्रक्रिया होणार असून २८८ केंद्रांवरील मतदान यंत्र याच ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेवर निरीक्षक सूर्यकांत कुमावत तसेच मुख्य निवडणूक अधिकारी दीपक पाटील यांचे लक्ष असणार आहे.

बागलाणमध्ये उत्साहात मतदान

बागलाण तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर ६ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र उत्साहात व शांततेत मतदान झाले. तालुक्यात सर्वत्र ७८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, नायब तहसीलदार आबासाहेब शिंदे यांनी माहिती दिली. तालुक्यातील लखमापूर, ब्राह्मणगाव, नामपूर, जुनी शेमळी, नवी शेमळी, ठेंगोडा, कंधाणे, ताहाराबाद, सोमपूर, तरसाळी, रामतीर, कऱ्हे, बिजोटे, कोळीपाडा, कोटबेल, करंजाड, काकडगाव, बिलपुरी, बोऱ्हटी, सारदे, खमताणे, दऱ्हाणे, उत्राणे, कुपखेडा, द्याने, निताणे, अंबासन, टेंभे वरचे, मुंजवाड, देवळाणे विंचुरे, आदी गांवाच्या सार्वत्रिक निवडणुकासांठी मतदान शांततेत पार पडले. दरम्यान, आज (दि. २३) सकाळी १० वाजेच्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ होणार असून, येथील तहसील कार्यालयात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी करण्यात येणार आहे.

तणावपूर्ण शांतता

नाशिक तालुक्यातील नानेगाव, लहवित, वंजारवाडी, लोहशिंगवे गावात बुधवारी ग्रामपंचायतींच्या विविध जागांसाठी मतदान झाले. लहवित गावात एकूण १५ जागांपैकी ६ जागांची निवडणूक बिनविरोध झाली होती. उर्वरित ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात होते. ३२०८ एकूण मतदान असलेल्या या गावात २६०८ लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान केले. ८१.३९ टक्के असे मतदान या गावात झाले प्रामुख्याने मनसे विरुद्ध सेना व इतर अशी सरळ लढत या गावात होती. वंजारवाडी गावात ९ जागांपैकी १ जागा ब‌िनविरोध होऊन ८ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते १४९८ असे एकूण मतदार असून, १२२६ लोकांनी आपले मतदान करीत ८१.८४ टक्के असे मतदान झाले. लोहशिंगवे गावात ९ जागांपैकी २ बिनविरोध तर उर्वरित ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये एकूण मतदार ११७१ पैकी ११६८ लोकांनी आपला मतदान करीत ९९.७४ टक्के असे मतदान झाले. तर नानेगाव ग्रामपंचायतीत ११ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये एकूण मतदान २६५० असून २५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला येथे ९५.९६ टक्के मतदान झाले. या सर्व निवडणूक प्रक्रियेवर देवळाली कॅम्प पोल‌िस स्थानकाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, अंबड पोलिस स्थानकाचे वपोनि भोई यांच्यासह ६ पोलिस उपनिरीक्षक,तर ३१ पोलिस कर्मचारी असा फौजफाटा मतदानासाठी चारही गावात तैनात होता, निवडणुकीदरम्यान पोलिस उपायुक्त विजय पाटील व वाहतुक विभागाचे एसीपी प्रशांत वागुंडे यांनी भेटी देत पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योग्य आहारामुळे रक्ताक्षयावर नियंत्रण

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

लोहाच्या कमतरतेमुळे मुलींमध्ये रक्तक्षय म्हणजेच अनेमियाचे प्रमाण वाढत चालले आहे. योग्य आहार आणि औषधोपचारामुळे रक्तक्षयावर नियंत्रण मिळवता येते, असे प्रतिपादन डॉ. विजय देवकर यांनी केले.

नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि हेमेंद्र कोठारी फाऊंडेशनतर्फे कोठारी कन्या शाळेत बुधवारी रक्तक्षयावर प्रबोधनासाठी पालक सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, सहकार्यवाह लक्ष्मी कस्तुरे, कार्यकारी मंडळाचे सदस्य दत्ता नागपुरे, शशांक मदाने, वि. भा. देशपांडे, क्रीडा व आरोग्य समितीचे अध्यक्ष वाय. डी. जोशी, सरोजिनी तारापूरकर, मुख्याध्यापिका कल्पना नागपुरे, डॉ. रुचिता पावस्कर, नगरसेविका शोभना शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. देवकर म्हणाले, की १६ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान या शाळेत ८५० विद्यार्थिंनीची तपासणी केली असता ५५ टक्के मुलींना मध्य तर ५ टक्के मुलींना तीव्र स्वरुपाचा रक्ताक्षय आढळला. आयुर्वेदिक रक्तवर्धक औषधे, नागलीचे लाडू, हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, बाजरी यांचा आहारात जास्त वापर हे त्यावर उपाय आहेत.

लक्षणेः अभ्यासात लक्ष न लागणे, भूक मंदावणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी, चक्कर, दम लागणे ही रक्ताक्षयाची लक्षणे आहेत, अशी माहिती डॉ. पावस्कर यांनी दिली. आहारात मूळा, कोबी, माठ, तांदूळ, मेथी, शेपू मुळ्याचा पाला, सफरचंद, कलिंगड, सीताफळ, चिकू, लिंबू, आवळा, मोसंबी, सुकामेवा घ्यावा. भाजी धूवून चिरावी. जंकफूड बंद करावे, चहा, काफी व दूधाचा अतिरेक टाळावा, असेही त्यांनी सांगितले. आजार टाळण्यासाठी आई-मुलींचे मैत्रीचे संबंध हवेत. मुलांचे मानसिक आरोग्य जपावे. मुलींमध्ये कौशल्यविकास, आत्मविश्वास वाढवावा, असे लक्ष्मी कस्तुरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थाची उत्तम कामे करून घ्या

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर नाराजी व्यक्त करण्यापेक्षा प्रशासनाकडून उत्तम कामे करून घ्या, असा टोला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांना लगावला आहे. तसेच केंद्र सरकारने सिंहस्थासाठी निधी दिला पाहिजे, असे सांगत राज्य सरकारने या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करायला हवी, अशी मागणी भुजबळांनी केली आहे. दरम्यान, नारायण राणेंची मते वाढल्याचे सांगून मुंबईच्या विकास आराखड्यावर टीका करणे योग्य नसल्याचेही भुजबळांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना भुजबळांनी पालकमंत्री महाजन यांच्या सिंहस्थाच्या रडगाण्यावर टीका केली. सिंहस्थाची कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे या कुंभमेळ्याच्या कामावर नाराजी व्यक्त करण्यापेक्षा प्रशासनाकडून वेळेत कामे पूर्ण करून घेतली पाहिजे. सिंहस्थाची कामे ३१ मार्चपर्यंत बरीचशी पूर्ण व्हायला हवी होती.

कामे पूर्ण करण्याकडे पालकमंत्र्यांसह प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत. केंद्र सरकारने सिंहस्थासाठी निधी दिला पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करायला हवा असे सांगत सिंहस्थाच्या कामांवर चिंतन व्हायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.

राणेंचे समर्थन

भुजबळांनी यावेळी नारायण राणेंच्या पराभवर थेट टीका करणे टाळत गेल्या वेळेपेक्षा राणेंची मते वाढल्याचा दावा केला. दुसरीकडे मुंबईच्या आराखड्यावरून आघाडी सरकारवर टीका करणे टाळेल पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबई महापालिकेत सेना-भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे आराखड्याची जबाबदारी ही सेना भाजपचीच आहे. आघाडीला दोष कसा देतात असा सवाल त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातपंचायत मूठमाती अभियानाची अमेरिकेतही दखल

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन वर्षांपूर्वी नाशिकमधून सुरू झालेल्या अन् कुठल्याही कायद्याच्या धाकाशिवाय केवळ प्रबोधनाच्या प्रभावाने बरखास्त करण्यात आलेल्या जातपंचायत मूठमाती अभियानाची दखल अमेरिकेतील माध्यमांनीही घेतली आहे.

दोन वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जातपंचायतीच्या उपक्रमास आरंभ केला होता. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जातपंचायती बरखास्त करण्यात अंनिसला यश आले होते. अमेरिकेचे प्रमुख दैनिक लॉस एंजलिस टाइम्सने या लढ्याची दखल घेतली. बुधवारच्या अंकात या लढ्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. बीबीसीनेही याच मुद्द्याची दखल नुकतीच घेतली.

दोन वर्षांपूर्वी नाशिकला झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेनंतर महाराष्ट्र अंनिसने जातपंचायत विरोधी मोहीम सुरू केली. परिणामी, त्यामुळे महाराष्ट्रातील जातपंचायतींचे भीषण वास्तव उघड झाले. अंधश्रध्देवर आधारित न्यायनिवाडे, अघोरी शिक्षेच्या घटना, जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार, आर्थिक दंड, जात शुध्दीकरणाच्या नावाखाली चालणारे शोषण आदी विषय प्रसार माध्यमांनी लावून धरले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर कार्यकर्त्यांनी ही मोहीम जोमाने सुरू ठेवली. मुंबई उच्च न्यायालयानेही जातपंचायत विरोधी कायदा बनविण्यासाठी सरकारला सुनावले आहे.

राज्यात अंनिसच्या वतीने नाशिकसह लातूर, जळगाव, महाड येथे जातपंचायतीला मूठमाती परिषदा घेतल्या. महाराष्ट्र अंनिसच्या मदतीने अनेक प्रकरणात तक्रारीही दाखल केल्या आहेत. मुंबईतील वैदू जातपंचायतचे रूपांतर सामाजिक सुधारणांच्या मंडळात करून बहिष्कार घातलेल्या व्यक्तींना विशेषत: महिलांना त्यात सन्मानाने स्थान दिले आहे. काही जातपंचायतीनी सामाजिक सुधारणांचे निर्णय घेतले आहेत. यंदा मढी (अहमदनगर), माळेगाव (नांदेड),जेजुरी (पुणे) येथील यात्रेत जातपंचायत झाल्या नाहीत. प्रत्यक्ष केलेल्या अनुभवामुळे महाराष्ट्र अंनिसने जातपंचायत विरोधी कायद्याचा मसुदा सरकारकडे सादर केला आहे. हा लढा आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याने लढ्याला बळकटी मिळाल्याची भावना जातपंचायत मुठमाती अभियानाचे संयोजक कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत रस्त्याला भगदाड

0
0


म. टा. प्रतिनिधी, सिडको

सिडकोतील पाटीलनगर रस्ता मंगळवारी रात्री अचानक खचल्याने रस्त्याला मोठे भगदाड पडले. महापालिकेने खड्डयालगत संरक्षक जाळ्या लावल्या असून दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या खड्ड्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

पाटीलनगर येथील सरस्वती पाटील महाविद्यालयासमोर रस्त्याला मंगळवारी रात्री भगदाड पडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने खड्डा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. महापालिकेच्या भुयारी गटार विभागाने बुधवारी सकाळी खड्ड्याच्या बाजूला संरक्षक जाळ्या लावून दुरुस्तीचे काम हाती घेतले. हा रस्ता फायबर ऑप्टिक केबल टाकण्यासाठी काही दिवसांपूर्वी खोदण्यात आला होता. याच ठिकाणी भुयारी गटार योजनेची मुख्यवाहिनीचा चेंबरही आहे आणि त्याच ठिकाणाहून एक जलवाहिनीही गेली आहे. भुयारी गटार वाहिनीचा चेंबरही फुटलेला होता.

जलवाहिनीची गळती होत असल्यामुळे माती ओली होऊन खचली. केबल टाकल्यानंतर खड्डे योग्यरित्या बुजविण्यात आले नाही. शिवाय, झाडांच्या मुळ्या विटांनी बनविलेल्या चेंबरमध्ये घुसल्याने चेंबरही लिक झाले. या तिन्ही कारणांमुळे हा रस्ता खचला. आम्ही तातडीने काम सुरू केले असून गुरुवारी काम पूर्ण होईल. - नाना जगताप, अभियंता, मनपा भूयारी गटार योजना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थाच्या ब्रॅण्डिंगवर भर

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उज्जैन येथील कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग आणि जनसंपर्कासाठी ७८ कोटींची तरतूद केली गेली आहे. आपल्याकडे केवळ आठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांची आठवडाभराच्या निवासाची व्यवस्था ठेवणे तेथील प्रशासनाला शक्य आहे. मात्र, आपल्याकडे पावसाळा, जागेची उपलब्धता यासारख्या अनेक मर्यादा असल्या तरी येत्या काळात सिंहस्थाचे जोरदार ब्रॅण्डिंग करायला हवे, असा आग्रह आपण सरकारकडे धरणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी दिली.

पुढील वर्षी उज्जैन येथे कुंभमेळा होणार आहे. तेथील पाहणी करण्यासाठी कुशवाह दोन दिवस उज्जैन दौऱ्यावर गेले होते. या पाहणीमध्ये काय आढळून आले याबाबतची माहिती त्यांनी दिली. उज्जैन येथील लोकसंख्या पाच ते सहा लाख आहे. तर, आपल्याकडील लोकसंख्या १८ ते १९ लाख आहे. तेथे केवळ नदीच्या एका बाजूला शहर वसले असून, पलीकडे सुमारे तीन हजार एकर क्षेत्र नो डेव्हलपमेंट झोन म्हणून आरक्षित आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी त्यांच्याकडे मुबलक क्षेत्र उपलब्ध आहे. तेथे शेतकऱ्यांकडील क्षेत्र शेतीकरिता आरक्षित करण्यासाठी १५ हजार रुपये एकरी आकारले जातात. आपल्याकडे मात्र त्यासाठी लाखांमध्ये पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आपला खर्च कैकपटींनी वाढतो. आपल्याकडे शहराच्या दाट वस्तीमध्ये कुंभमेळा भरतो. तोही पावसाळ्यात असल्याने आपल्या नियोजनापुढील आव्हाने पूर्णत: वेगळी आहेत.

मध्य प्रदेश सरकारने कुंभमेळ्याच्या ब्रॅण्डिंगसाठी १०० देशांमध्ये प्रत्येकी एक प्रतिनिधी नेमला आहे. त्यांचा पर्यटन विकास विभाग, आयटी विभाग, सांस्कृतिक विभाग कुंभमेळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये आतापासूनच सिंहाचा वाटा उचलू लागले आहेत. आपल्याकडेही अजून काही महिन्यांचा अवधी शिल्लक असून, चांगल्याप्रकारे ब्रॅण्डिंग करता येऊ शकते, असा विश्वास कुशवाह यांनी व्यक्त केला आहे.

उज्जैन येथे होत असलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तेथील प्रशासनाने सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार केला आहे. विशेष म्हणजे हा अहवाल तीन वर्षांपूर्वीच तयार झाला असून, त्यामध्ये कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी काय करावे आणि का करावे याची उत्तरे मिळतात. त्या अनुषंगानेच प्रशासनाकडून नियोजन करीत असून, सध्या इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित कामे सुरू आहेत. तर आपली ९० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा कुशवाह यांनी केला आहे. जगभरातून पाहुणे बोलावले तरी उपलब्ध परिस्थितीत त्यांची व्यवस्था करणेही शक्य व्हायला हवे असे मत कुशवाह यांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


११ गायींचा विषबाधेने मृत्यू

0
0


मालेगाव : तालुक्यातील निळंगव्हाण येथे बुधवारी सकाळी ११ गाईचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काठेवाडी लोकांचा तांडा गावात निवासी आला होता. त्यांच्या कळपातील जवळपास ५० गायापैकी २५ गायांनी परिसरातील विषारी कांदापात खाल्ल्याने त्या अचानक कोसळल्या, अशी शक्यता वतऱ्र्तवली जात आहे. यातील अकरा गायींचा जागीच मृत्यू झाला तर १३ गायांवर उपचार सुरू आहेत. गावात उपचाराची सोय नसल्याने गोंधळ उडाला. गायांचा मृत्यू विषारी कांदापात खाल्याने झाला की, इतर काही कारण यामागे आहे याचा तपास तालुका पशू वैद्यकीय अधिकारी व पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जपानमध्ये मराठी ग्रंथसंपदा

0
0


अश्विनी पाटील, नाशिक

वाचन संस्कृती हरवत चालली आहे अशी ओरड सगळीकडे होत असते. मात्र, त्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. याच जाणीवेमधून एक चळवळ सुरू झाली आणि वाचकांसाठी हा बौद्धिक फराळ त्यांच्या दारापर्यंत पोहोचला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच असलेला हा पुस्तकांचा खजिना आता विदेशातही उपलब्ध झाला आहे. आजच्या पुस्तकदिनी या अनोख्या वाचन संस्कृतीची मुहूर्तमेढ जपानमधील टोकियोमध्ये रोवली जाणार आहे. 'ग्रंथ तुमच्या दारी' या उपक्रमामधून या ग्रंथपेट्या वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत.

सहा वर्षांपूर्वी सुरू झालेली ग्रंथ तुमच्या दारी ही वाचक चळवळ आज देशातील सहा राज्ये तसेच, दुबई, नेदरलँड यासारख्या देशात पोहोचली. आपली ग्रंथसंपदा वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असलेला हा अभिनव उपक्रम विनामूल्य सुरू आहे. शालेय विद्यार्थी असो वा सिनीअर सिटीझन, आदिवासी पाडे, कारागृहातील कैदी अशा सर्वच स्तरातील व्यक्तींना या चळवळीने अनेक वाचक कुटुंबे निर्माण केली.

भारतात महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, सिल्वासा, गोवा या राज्यांसह बाहेरील देशात आतापर्यंत ५७५ ग्रंथ पेट्या, जवळपास साठहजार पुस्तके यामाध्यमातून पोचली. ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोक एकमेकांशी जोडले गेले. वाचन संस्कृतीच नाही तर विचारांची देवाणघेवाणही यामधून शक्य झाली.

महाराष्ट्रातील बरीचशी मंडळी नोकरी किंवा व्यवसायानिमित्त परदेशात स्थलांतरित झालेली आहेत. मात्र, तेथे जाऊन आपल्याकडील साहित्याशी संपर्कदेखील तुटल्यासारखाच आहे. अशाच लोकांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत आपले साहित्य पोहोचावे व त्यातून उत्तम पिढी घडावी यासाठी 'ग्रंथ तुमच्या दारी' या उपक्रमातून प्रयत्न सुरू झाले. 'टोकियो मराठी मंडळा'ने यासाठी पुढाकार घेत. तेथील मराठीजनांना हा खजिना उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले गेले आणि ही चळवळ आता जपानमध्ये सुरू झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही पुस्तके वाचता यावी यासाठी १०० पुस्तकांची एक पेटी अशा एकूण दहा पेट्या टोकियोतील मराठीजनांना देण्यात येणार आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी प्रत्येक पेटीत पंचवीस पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी टोकियो मराठी मंडळाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.

वाचकांना हवी असलेली पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यातूनच ग्रंथपेटीची सुरुवात झाली. या उपक्रमाचा फायदा परदेशातील मराठी नागरिकांना व्हावा यासाठी प्रयत्न केले. आज टोकियोमध्ये याची सुरुवात होते आहे. - विनायक रानडे, संयोजक, ग्रंथ तुमच्या दारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५ हजार व्यापारी बेपत्ता

0
0


विनोद पाटील, नाशिक

महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) विभागाकडे नोंदणीकृत चार हजार ८०० व्यापाऱ्यांचा पत्ता विक्रीकर विभागालाही लागत नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे विक्रीकर विभागानेच या व्यापाऱ्यांची यादी महापालिकेला दिली होती. महापालिकेने आतापर्यंत तीनदा विभागाला या व्यापाऱ्यांच्या शोधासाठी पत्रव्यवहार केला आहे; मात्र विक्रीकर विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने एलबीटी विभाग आता हतबल झाला आहे. शोध सुरू असल्याचे सांगून विक्रीकर विभाग जुनीच यादी महापालिकेला पाठवत आहे. महापालिका आणि विक्रीकर विभागात बेपत्ता व्यापाऱ्यांच्या शोधा शोधीच्या रंगलेल्या खेळामुळे महापालिकेला मात्र ७५ ते १०० कोटींचा फटका बसणार आहे.

महापालिकेत जकात लागू झाल्यानंतर महापालिकेने विक्रीकर विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या व्यापाऱ्यांची यादी माग‌तिली. विक्रीकर विभागानेही आपल्याकडे नोंदणीकृत असलेल्या १६ हजार ४०० व्यापाऱ्यांची यादी महापालिकेकडे सोपवली. त्यामुळे महापालिकेने या सर्व व्यापाऱ्यांची एलबीटी अंतर्गत नोंदणी करून त्यांच्याकडून एलबीटी वसुलीला सुरुवात केली. मात्र या यादीतील चार हजार ८०० व्यापाऱ्यांचा शोध महापालिकेला लागला नाही. महापालिका विक्रीकर विभागाने दिलेल्या पत्त्यांवर जावून शहानिशाही करीत आहे. मात्र अपुरे पत्ते आणि चुकीचे नंबर्स यामुळे या व्यापाऱ्यांचा दोन वर्षापासून शोध लागत नाही. त्यामुळे बेपत्ता झालेल्या व्यापाऱ्यांची यादी महापालिकेने पुन्हा विक्रीकर विभागाला पाठविली होती. मात्र विक्रीकरने जुनीच यादी पुढे केली. बेपत्तांच्या शोधासाठी पालिकेने दुसऱ्यांदा विक्रीकरला संबंधीतांची नावे पुन्हा तपासणीसाठी पाठवली आहे. मात्र यावेळीही विक्रीकर विभागाने यादीची खातरजमा न करता जुनीच यादी महापालिकेच्या माथी मारली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांकडून दोन वर्षाचे जवळपास ७५ ते १०० कोटी रुपये एलबीटीवर पाणी सोडावे लागणार की, काय असा प्रश्न महापालिकेला सतावत आहे. विक्रीकर विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटकाच महापालिकेला सोसावा लागणार आहे.

बेपत्ता व्यापाऱ्यांना ट्रेस करण्यासाठी विक्रीकर विभागाला तीन वेळा पत्र पाठविले आहेत. मात्र त्यांच्याकडून जुनीच यादी पुन्हा पुन्हा पाठविली जात आहे. महापालिकेने स्वंतत्र पाहणी केली; मात्र संबंधीत व्यक्ती पत्त्यांवर सापडत नाहीत. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. - हरिभाऊ फडोळ, उपायुक्त, मनपा

महापालिका दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना दिलेल्या यादीवरच आम्ही सर्वांकडून विक्रीकराची वसुली करतो. त्यामुळे पत्ते चुकीचे आहेत, असे म्हणणे योग्य नाही. दोन-तीन दिवसात संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. - सुधीरकुमार काले, सहआयुक्त, विक्रीकर विभाग, नाशिक

गायब नावांचे गौडबंगाल काय?

संबंधीत व्यापाऱ्यांची नोंदणी विक्रीकर विभागानेच केली आहे. त्यांच्याकडून वसूल होणाऱ्या विक्रीकराप्रमाणेच महापालिका एलबीटी वसूल करणार होती. मात्र एलबीटी लागू होताच हे व्यापारी अचानक बेपत्ता झाले आहेत. दुसरीकडे मात्र विक्रीकर विभाग या १६ हजार ४०० व्यापाऱ्यांकडून दरवर्षी विक्रीकराची वसुली करत आहे. त्यामुळे नेमकी चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे एलबीटी चुकविण्यासाठी या व्यापाऱ्यांनीच शक्कल लढविल्याची चर्चा विक्रीकर विभागात आहे. विक्रीकर विभागात ऑनलाइन भरणा असल्याने व्यापारी थेट कर भरतात. मात्र हेच व्यापारी आपला पत्ता चुकीचा दाखवून एलबीटी चुकविण्याचा प्रयत्न करतात आहेत अशी चर्चा असून, त्याला विक्रीकर विभागातील काही अधिकाऱ्यांचा यास पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावमध्ये तरुणाई अन् महिलांकडे सत्ता

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींचा एकूण अंदाज बघता यावेळी मतदारांनी प्रस्थापितांना बाजूला सारत नवोदित तरुण उमेदवारांच्या हाती गावाच्या सत्ता दिल्याने एकूणच गावकीचे राजकारण तरुणाईकडे हस्तांतरित करणारी आणि महिलाराज आणणारे निवडणूक निकाल होते असेच म्हणावे लागेल.

तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींसाठी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले आहे. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीकडे सार्‍यांचेच लक्ष लागून होते. आपल्या गावाचा नवा कारभारी नक्की कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता आज गावागावात पाहायला मिळाली. सकाळी १० वाजल्यापासूनच येथील शिवाजी जिमखाना येथे कडक पोलिस बंदोबस्तात ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे निकाल घोषित करण्यात सुरुवात झाली. जस जसे निकाल घोषित होवू लागले तसतसे विजयाच्या घोषणा तर कुठे पराभवाची निराशा पाहायला मिळाली. ८४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी एकूण १२ फेर्‍यांमधून निकाल जाहीर करण्यात आले. यात पहिल्या पाच फेर्‍यांमध्ये तालुक्यातील राजकीयदृष्ट्या मोठ्या आणि संवेदनशील ग्रामपंचायतींचे निकाल घोषित करण्यात आले.

तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या झोडगे ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व कायम राहिले आहे. विद्यमान सरपंच दीपक देसले, विजय देसाई यांच्या आपलं पॅनलने सत्ता रखीत ७ जागा मिळवल्या आहेत. नथू देसले, शरद देसले यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनलला ५ जागांवर विजय मिळाला असून, ३ जागी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे झोडगे ग्रामपंचापतीची सत्ता देसले देसाई गटाकडेच राहील असे चित्र आहे. तसेच निमगाव ग्रापमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून, दीपक आहीरे यांच्या नेतृत्वात १० पैकी ९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर एक जागेसाठी समान मतदान झाल्याने चिठ्ठी टाकून निकाल देण्यात आला. तर रावळगाव, कळवाडी येथे संमिश्र निकाल आला असून, सत्ता परिवर्तन झाले आहे. चिंचावड, साजवाळ, कंधाणे, दहिवाळ, चंदनपुरी येथील ग्रापवर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. चिखलओहळ येथे माजी पस सदस्य भिकण शेळके गटाचे वर्चस्व राहिले आहे. तर तळवाडे, देवारपाडे , शेंदूर्णी , आघार बु . ग्रापमध्ये भाजपने सत्ता मिळवण्यात यश आले आहे. खलाणे ग्रामपंचायतीमध्ये मात्र ८२ वर्षीय वयोवृद्ध महिला उमेदवाराने एका तरुण उमेदवाराचा पराभव केला असून, एक वेगळा निकाल म्हणून तो चर्चेत राहिला आहे.

निकालांच्या १२ फेर्‍या सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याने निकाल हाती यायला चांगलाच उशीर झाल्याने उमेदवारांमध्ये काहीशी नाराजी व्यक्त होत होती. मात्र, मतदान मोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली असून एकूणच तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींचे निकाल पाहता त्यात पक्षीय राजकारणाचा फार प्रभाव दिसला नाही. मात्र गावातील भावुबंदकी, नातीगोती यांचा प्रभाव दिसून आला. त्यात बहुतांशी ग्रापमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून, महिला आरक्षणामुळे अनेक गावांत महिलाराज आल्याचे चित्र आहे, तर गावकडील राजकरणात आता तरुणाई सक्रिय होते आहे असाच या निकलांचा अर्थ घेता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तम भालेरावांची वडनेर भैरवला सरशी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारानी प्रस्थापितांविरुद्ध कौल देत नव्या शिलेदारांवर विश्वास दाखवित विविध ठिकाणी परिवर्तन घडवून आणले आहे. ३८ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींवर जुन्यांनीच मोहर उमटवली असली तरी प्रस्थापितांच्या सत्तेला शह बसल्याचेच निकालात स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील वडनेरभैरव या मोठ्या ग्रामपंचायतीची सत्ता माजी आमदार उत्तमराव भालेराव यांच्या गटाने जिंकून आपला दबदबा सिद्ध केला आहे.

राजकीय पक्षांच्या महत्वापेक्षा स्थानिक गटांना प्राधान्य देत मतदारांनी स्थानिक प्रश्न सोडविन्यास सक्षम असलेल्या नेतृत्वाचा पर्याय निवडल्याचे स्पष्ट झाले आहे. चांदवड शहराला नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्याने तिथे निवडणूक झाली नाही. ५३ पैकी १५ ठिकाणी बिनविरोध निवड झाली. ३८ पैकी बहुतेक ठिकाणी बदलाचे वारे वाहत असल्याने प्रस्थापितांना धक्का बसला आहे. भडाने आणि वड बारे येथे दोन उमेदवारांना समान मते मिळाली. चिठ्ठी टाकून निर्णय जाहीर करण्यात आला वड़नेरभैरव येथे १७ पैकी ११ जागा जिंकून भालेराव गटाने वर्चस्व सिद्ध केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images